Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लाल महालाचे प्रवेशद्वार बदलणार

$
0
0

पर्यटकांच्या सोयीसाठी शिवाजीरस्त्यावर नवे प्रवेशद्वार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहासाची साक्ष असणाऱ्या ऐतिहासिक लाल महालाच्या प्रवेशद्वारामध्ये बदल करण्यात येणार असून, शिवाजी रस्त्यालगत नवीन प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. लाल महालाकडे जाण्यासाठी सध्याचा रस्ता अरुंद असल्याने होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या भवन रचना विभागाने हा प्रस्ताव मांडला होता.

शिवाजी रस्त्यावरून कसबा गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या लाल महालाचे प्रवेशद्वार आहे. हा रस्ता अरुंद असल्याने वास्तूला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी सध्या असलेल्या प्रवेशद्वारात बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या वतीने लाल महालाचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्चण्यात येणा आहेत. या रकमेतून लाल महालाची डागडुजी केली जाणार आहे. नूतनीकरणामध्ये लाल महालाच्या छतावर विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि त्यांची सविस्तर माहिती पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे तैलचित्र आणि छायाचित्रांचाही समावेश आहे.

लाल महालाची ऐतिहासिक माहिती सर्वांना समजावी, त्याची अधिकाधिक प्रसिद्धी व्हावी यासाठी पालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या वास्तूला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अगदी सहजपणे प्रवेश करता यावा, यासाठी सध्या असलेले प्रवेशद्वार बंद करून नवीन प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. नव्याने उभारले जाणारे प्रवेशद्वार शिवाजी रस्त्याच्या बाजूने असेल. पूर्व-पश्चिम दिशेने नवे प्रवेशद्वार असल्याचे पालिकेच्या हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे यांनी सांगितले. या सुशोभिकरणाच्या कामामध्ये लाल महालातील पहिल्या मजल्यावरील प्रदर्शनात नव्याने काही दुर्मिळ छायाचित्रे मांडण्यात येणार आहेत. तसेच, महालाची सुरक्षितता आणि अन्य महत्त्वाची कामे करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत पा‌लिका प्रशासनाने मांडलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
..
लाल महालाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वास्तूचे सध्याचे प्रवेशद्वार दक्षिणोत्तर आहे. अरुंद रस्त्यावर जुने प्रवेशद्वार असल्याने पर्यटकांना ये-जा करताना त्रास होतो. पर्यटकांच्या सोयीसाठी आता शिवाजी रस्त्यावर पूर्व-पश्चिम असे नवीन प्रवेशद्वार उभारले जाईल.
श्याम ढवळे, हेरिटेज विभाग प्रमुख, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राठोड दाम्पत्याची बनवाबनवी उघड

$
0
0

'एव्हरेस्ट' सर केल्याची थाप; नेपाळ सरकारकडून बंदी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे पो​लिस दलातील तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या दाम्पत्याने एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा बहाणा केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर दहा वर्षांची बंदी घातल्याची नोटीस नेपाळ सरकारने पाठवल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी या दाम्पत्याची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरू झाल्यापासून दाम्पत्याने आयुक्तालयाकडे पाठ फिरवली आहे. त्यांच्यावरील कारवाईची शक्यता ​गडद झाली असून, लवकरात लवकर त्यावर निर्णय अपेक्षित आहे. राठोड दाम्पत्य २००६ मध्ये पोलिस खात्यात रुजू झाले. त्यानंतर ते २००८मध्ये विवाहबद्ध झाले. सध्या ते शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कथीत 'एव्हरेस्ट मोहिमे'चे वृत्त जून महिन्यात प्रकाशित झाल्यानंतर अनेकांकडून शंका व्यक्त करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी त्यांच्या कामगिरीची खातरजमा करण्यासाठी नेपाळ सरकारकडून अहवाल मागवला होता. या अहवालाची औपचारिक माहिती पुणे पोलिसांना मिळाली असून, त्यात राठोड दाम्पत्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
'राठोड दाम्पत्याची एव्हरेस्ट प्रकरणी चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करायची, हे स्पष्ट होईल,' अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. दरम्यान, राठोड दाम्पत्याने केलेला प्रकार हा पोलिस आणि देशाची प्रतिमा खराब करणारा असून, याबाबत चौकशी करण्यात येईल असे, पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी म्हटले होते. राठोड दाम्पत्याचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी मूलही जन्माला न घालण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यांनी जून महिन्यांत एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पुण्यातील एका फोटोग्राफरने मॉर्फ केल्याची चर्चा आहे. त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे सांगण्यात येत आहे.
..
तो अहवाल वरिष्ठांकडे
पोलिस मुख्यालयाचे सहायक आयुक्त गणपत माडगूळकर यांनी राठोड दाम्पत्याची चौकशी केली होती. या चौकशीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. एव्हरेस्ट मोहीम पूर्ण केल्याचा दावा केल्यानंतर राठोड दाम्पत्याला चौकशीला बोलावण्यात आले. ते एकदा चौकशीसाठी उपस्थित होते. 'एव्हरेस्ट' शिखर सर केल्याप्रकरणी त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयाकडे पाठ फिरवली आहे. ते विनापरवाना नोकरीवर गैरहजर असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई शक्यता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचित्र अपघातात एक ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मावळ तालुक्याच्या हद्दीतील ताजे-बोरजमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. काल (सोमवारी) रात्री उशीरा झालेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला.

एक्स्प्रेस वेवर रात्रीच्या सुमारास एक टॅम्पो बंद पडल्याने तो दुरुस्तीसाठी सर्व्हिस रोडला लागून उभा होता. त्यावेळी या टॅम्पो चालकाला मदत करण्यासाठी दुसरा एक टॅम्पो चालक थांबला. आपला टॅम्पो बाजूला थांबवून बंद टॅम्पो दुरुस्त करत असतानाच मागून भरधाव वेगात येणाऱ्या तिसऱ्या वाहनाने या दोन्ही टॅम्पोंना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मदत करण्यासाठी थांबलेला टॅम्पो चालक काही अंतरावर फेकला गेला. जबर मार लागल्याने मदत करणाऱ्या टॅम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'नाझी भस्मासुराचा उदयास्त' या गाजलेल्या पुस्तकाच्या अनुवादामुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती. 'युद्ध युद्ध युद्ध, नाझी भस्मासुराचा उदयास्त, विन्स्टन चर्चिल, महाभारताचा इतिहास, होरपळ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदीजी... बलुचिंसाठी लढता, मराठीची उपेक्षा का?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारकडून होणाऱ्या विलंबावरून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखठोक शब्दांत त्यांची 'मन की बात' सुनावली आहे. 'मोदीजी, तुम्ही पाकिस्तानातील बलुचि लोकांना स्वातंत्र्य मिळावं अशी अपेक्षा ठेवता, मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या अकरा कोटी जनतेची उपेक्षा का करता,' असा थेट सवाल सबनीस यांनी केला आहे.

तसं पत्रच सबनीस यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे. मराठीच्या अभिजात दर्जासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पंतप्रधानांना पत्र पाठविले जाणार होते. मात्र, सबनीस यांनी आधीच पत्र पाठवून त्यांच्यावर कुरघोडी केली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या या पत्रात सबनीस यांनी बलुचिस्तानबाबत मोदींनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. 'बलुचिस्तानविषयी तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळं मी प्रभावित झालो आहे. या निमित्तानं मलाही आपल्याशी एक 'मन की बात' करायची आहे. आमची मराठी भाषा सर्व निकषांवर पात्र ठरूनही आतापर्यंत तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू शकला नाही? सहृदयी असूनही तुम्हाला आमच्या सांस्कृतिक व्यथा-वेदना कशा कळत नाहीत?,' अशा प्रश्नांची सरबत्ती सबनीस यांनी केली आहे.

'मराठी भाषेला तातडीनं अभिजात दर्जा मिळावा अशी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, रानडे, आगरकर, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्यामुळं कृपया मराठीचा सन्मान करा. मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करा,' अशी मागणी सबनीस यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस-वेवर अपघातात एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ताजे पेट्रोल पंपाजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. या अपघातात सहकारी मित्राच्या बंद पडलेल्या टेम्पोच्या दुरुस्तीसाठी मदत करणाऱ्या टेम्पो चालकाचाच मृत्यू झाला.

सूर्यमणी विष्णुकांत तिवारी (वय २५, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. तर जखमींमध्ये अजयकुमार यादव, (वय ३५, रा. ऐरोली, नवी मुंबई) रमाकांत शंकर ब्रीदलालपाल (वय २५, रा. भिवंडी, ठाणे) यांचा समावेश असून, दोघांची नावे समजली नाही.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून गुजरातला जाणाऱ्या एका टेम्पोचा (क्रमांक - एमएच- ४३/एफ-२११९) जॉइंट रॉड तुटला होता. दुरुस्तीसाठी टेम्पो चालकाने टेम्पो मार्गाच्या सर्व्हिस लेनवर उभा केला होता. या वेळी मागून येणाऱ्या त्याच्या सहकारी मित्राने टेम्पोच्या दुरुस्तीकरिता त्याचा टेम्पो (क्रमांक - जिजे - १/सीएक्स-३३३५) हा मार्गालगत उभाकरून मित्राच्या टेम्पोचा तुटलेला जॉइंट रॉड बसविण्याचे काम करीत होता. या वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (डी एन ०९/एच-९९१३) नादुरुस्त टेम्पोला मागून जोरात धडक दिल्याने रॉड बसविण्याची मदत करणाऱ्या सूर्यमणीचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहे. यामध्ये दोन गंभीर जखमींचा समावेश आहे. अपघाताची माहिती कळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पहाणी केली. तत्पूर्वी देवदूत आपत्कालीन यंत्रणेच्या विशाल ठाकर, राकेश खुळपे, अरविंद सावंत, संदीप केदार यांनी टेम्पोत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी निगडीतील लोकमान्य रुग्णालयात रवाना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगलमूर्तींच्या पालखीचे शुक्रवारी प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भाद्रपदी यात्रेनिमित्त चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी प्राप्त श्री मंगलमूर्तींची पालखी येत्या शुक्रवारी (२ सप्टेंबर) मोरगावकडे प्रस्थान ठेवणार आहे.
पालखीचा कार्यक्रम चिंचवड देवस्थान ट्रस्टने जाहीर केला आहे. त्यानुसार दोन सप्टेंबरला दुपारी बारा वाजता चिंचवड गावातील मंगलमूर्ती वाड्यातून पालखी निघेल. त्यानंतर महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शन घेऊन मिरवणुकीने दुपारी साडेबारा वाजता पालखी पिंपरीमार्गे पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यात ढोल-ताशा ध्वजपथक, हरिपाठ मंडळे, भजनी मंडळे, बँड पथक भाग घेणार आहेत. पालखी प्रस्थानाच्या दिवशी पुण्यातील एकनाथ मंगल कार्यालयात मुक्काम असणार आहे.

पालखी तीन सप्टेंबरला पहाटे साडेचार वाजता पुण्यातून मार्गस्थ होईल. दुपारी वडकीनाला येथील दिव्यवाटिका आश्रम येथे पूजा, नैवेद्य, विश्रांती होईल. त्यानंतर रात्रीचा मुक्काम सासवड येथील कऱ्हाबाई मंदिरात होईल. चार सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जेजुरीतील विश्रांतीनंतर पालखी मोरगावला पोहचेल. तेथे पाच आणि सहा सप्टेंबरला मुक्काम असेल. त्यानंतर जेजुरी, सासवड, पुणे मार्गे पालखी ११ सप्टेंबरला चिंचवडला परतणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेची उपेक्षा का ?

$
0
0

सबनीसांची पंतप्रधानांशी 'मन की बात'; 'मसाप'वर कुरघोडी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वक्तव्याने प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा मोदींशी 'मन की बात' करून काही सवाल उपस्थित केले आहेत. 'मोदीजी तुम्ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी घेतलेल्या भूमिकेने मी प्रभावित झालो आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा अद्याप मिळालेला नाही. बलुचिस्तानच्या नागरिकांचे स्वातंत्र्य तुम्हाला अपेक्षित आहे, पण अकरा कोटी मराठी जनतेच्या मराठी भाषेची उपेक्षा का?' असा रोकडा सवाल सबनीस यांनी मोदींना पत्रातून केला आहे. पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र पाठवून सबनीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेवर कुरघोडी केली आहे.
जानेवारीत झालेल्या साहित्य संमेलनाआधी मोदींच्या पाकिस्तानदौऱ्याबाबत वक्तव्य करून सबनीस अडचणीत आले होते. त्यानंतर सबनीस विविध कारणांनी चर्चेत राहिले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारकडे पडून आहे. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी पंतप्रधान मोदींशी 'मन की बात' करण्यासाठी त्यांना पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे याच मागणीसाठी साहित्य परिषदेत गेल्या आठवड्यात लेखकांची बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधानांना पत्र पाठवण्याचे ठरले होते. त्याआधी सबनीस यांनी वैयक्तिक पत्र पाठवून साहित्य परिषदेवर कुरघोडी साधली आहे. साहित्य वर्तुळात त्यांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
'भारतीय स्वातंत्र्य दिनी बलुचिस्तानच्या लोकांच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन आपण इतिहास निर्माण केला आहे. आता पाकिस्तानला काश्मीर शिवाय पाकव्याप्त काश्मीरसाठी झुंजावे लागेल. आपल्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेमुळे मी प्रभावित झालो असून, मी त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. मी तुमच्याशी 'मन की बात' करू इच्छितो. मराठी भाषा सर्व निकषांवर पात्र ठरूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही, बलुची नागरिकांचे स्वातंत्र्य तुम्हाला अपेक्षित आहे, पण अकरा कोटी मराठी लोकांच्या उपेक्षेचे काय, आपण सह्रदयी असूनही, आमचे सांस्कृतिक दु:ख का समजत नाहीत?' असे सवाल सबनीस यांनी पंतप्रधानांना केले आहेत.
'संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, रानडे-आगरकर-डॉ. आंबेडकर यांचा महाराष्ट्र मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा सन्मान करावा,' अशी विनंती सबनीस यांनी पंतप्रधानांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैवविविधता समितीने केली मेट्रो मार्गाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या मेट्रो प्रकल्पात भविष्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्रातील प्रस्तावित मार्ग जैवविविधतेच्या दृष्टीने हानीकारक नाही ना, याची पाहणी मंगळवारी महापालिकेने केली. पालिकेच्या जैवविविधता समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांसमवेत नदीपात्रातील प्रस्तावित मार्गाला भेट देऊन, मेट्रोमार्गाची माहिती घेतली आणि काही सूचना केल्या.
नदीपात्रातील प्रस्तावित मेट्रो मार्गाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये (एनजीटी) याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने महापालिकेच्या जैवविविधता समितीला पत्र पाठवून प्रस्तावित मेट्रो मार्गाची पाहणी करण्यास सांगितले होते. मेट्रोच्या प्रस्तावित मार्गामुळे जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचत नाही ना, याबद्दलचा अहवाल सादर करण्याची सूचनाही जैवविविधता मंडळाने केली होती. त्यानुसार, मंगळवारी समितीचे अध्यक्ष सचिन दोडके यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मेट्रो मार्गाची पाहणी केली. पालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे आणि मेट्रो सेलचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
नदीपात्राच्या एकदम कडेने मेट्रोचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे, नदीच्या परिसरातील जैवविविधतेवर त्याचे अत्यल्प परिणाम होतील, असे निरीक्षण समितीतील सदस्यांनी व्यक्त केले. या संदर्भातील सविस्तर अहवाल 'एनजीटी'च्या पुढील सुनावणीपूर्वी जैवविविधता मंडळाला सादर केला जाणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या वेगवेगळ्या भागांत अनेक वर्षांपासून रस्त्यावरच उभी असलेली बेवारस वाहने जप्त करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिले. गणेशोत्सवानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे ही मोहीम राबवण्यात येणार असून, अशी वाहने महापालिकेच्या वारजे येथील मोकळ्या जागेत ठेवण्यात येणार आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक लहान-लहान रस्त्यांवर आणि गल्ली-बोळामध्ये अनेक बेवारस वाहने वर्षोनुवर्षे धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. नागरिकांकडूनही त्याविषयी तक्रारी केल्या जातात. ही बेवारस वाहने बाजूला करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, महापौर जगताप यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
गणेशोत्सवानंतर १६ सप्टेंबरपासून बेवारस वाहनांच्या जप्तीला सुरुवात केली जाणार आहे. जप्त केलेली सर्व वाहने महापालिकेच्या वारजे येथील जागेत हलवण्यात येणार आहेत. त्यामुळे, रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांमध्ये शहरातील नागरिकांची वाहने असल्यास त्यांनी ती गणेशोत्सवापूर्वी हलवावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 'बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण आखण्यात आले आहे,' अशी माहिती महापौर जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यविधीचा खर्च पालिका करणार

$
0
0

सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका हद्दीत मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधीचा संपूर्ण खर्च महापालिकेच्या वतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मांडून त्याला मान्यता देण्यात आल्याचे समि‌तीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मान्य झाल्यानंतर याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
पालिका हद्दीत मयत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीचा संपूर्ण खर्च पालिकेने करावा, यासाठी आमदार अनिल भोसले यांनी दोन आठवड्यापूर्वी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले होते. त्या वेळी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले होते. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मांडून त्याला मान्यता घेण्यात आल्याचे बोडके यांनी सांगितले. सर्वधर्मीयांमध्ये अंत्यविधीचा खर्च सर्वसाधारण दोन ते पाच हजारांपर्यंतच येतो. अनेक कुटुंबांना अंत्यविधीचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकदा व्याजाने पैसे घेऊन हा खर्च करावा लागतो. मात्र, पुणे महापालिकेतर्फे केवळ सहाशे रुपये इतका अंत्यविधीसाठीचा खर्च दिला जातो. हा खर्च देण्यापेक्षा पालिकेने अंत्यविधी मोफत करावा, अशी मागणी केली जात होती.
मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक या महापालिका हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांचा अंत्यविधी मोफत करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत देखील याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बोडके यांनी सांगितले. पालिकेच्या मुख्य सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक स्मशानभूमीत व्यवस्था केली जाणार असल्याचे बोडके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावाला एकमताने मान्यता

$
0
0

टाक्यांचा २४५ कोटींचा खर्च; २८५ एमएलडीने साठवण क्षमता वाढणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नव्याने ८२ टाक्या बांधण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत एकमताने मंजूर करण्यात आला. तब्बल २४५ कोटी रुपये खर्चून पुढील अडीच वर्षांत या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यानंतर पालिकेची पाणी साठवण क्षमता तब्बल २८५ दशलक्ष लिटरने (एमएलडी) वाढणार आहे.
शहरातील पाण्याची गळती कमी करून सर्वत्र समान पाणीपुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेने हाती घेतली आहे. तब्बल २८०० कोटी रुपयांच्या योजनेतून नव्या टाक्यांची उभारणी, पाइपलाइन आणि वॉटर मीटर बसविले जाणार आहेत. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागांमध्ये ८२ टाक्या नव्याने बांधण्यात येणार आहेत. त्याचे २४५ कोटी रुपयांचे टेंडर स्थायी समितीने मंगळवारी मान्य केले. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीला हे काम मिळाले असून, पुढील अडीच वर्षांत सर्व टाक्यांचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी मंगळवारी दिली. सध्या पालिकेची साठवण क्षमता २६० एमएलडी असून, नव्या टाक्यांच्या पूर्ततेनंतर एकूण साठवण क्षमता पाचशे एमएलडीहून अधिक होणार आहे.
साठवण टाक्यांचे पहिले टेंडर रद्द करून आयुक्तांनी पुन्हा फेरटेंडर मागविले होते. त्याचवेळी, एका विशिष्ट कंपनीसाठी टेंडर काढण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता. मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत हे टेंडर जादा दराने येऊनही त्याबाबत साधी विचारणाही झाली नाही. अवघ्या काही मिनिटांत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुढील आठवड्यापासूनच या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असल्याचेही बोडके यांनी स्पष्ट केले.
...................
पालिकेच्या ताब्यात ७३ जागा
महापालिकेने ८२ ठिकाणी साठवण टाक्या बांधण्यासाठी जागा निश्चित केल्या असल्या, तरी त्यापैकी ७३ जागा पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित, नऊ जागा ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून, यातील काही जागा अॅमेनिटी स्पेसमधील आहेत. आगामी काही दिवसांमध्ये जागा ताब्यात घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.
.....................
'शहरातील सध्याची पाणीपुरवठा वितरण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी साठवण टाक्यांची क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे होते. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे टाक्यांचे काम गतीने करता येणार आहे.'
कुणाल कुमार
महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील टोळी अटकेत

$
0
0

सात बुलेटसह दहा लाखांच्या दुचाकी जप्त
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. देहूरोड येथे मंगळवारी (३० ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली. टोळीकडून सव्वादहा लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सुरेश रामदास वाघमारे (२६, रा. खेड), विक्रम उर्फ सोन्या दादाभाऊ शेलार (२७, रा. जुन्नर), सचिन सुदार भोईर (२१, रा. खेड), हरीश रंगनाथ झांबरे (२७, रा. पारनेर, जि. अहमदनगर), सुदाम बबन भोईर (४२, रा. खेड), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हेशाखेतील फौजदार अंकुश माने यांना बातमीदारामार्फत टोळीबाबत माहिती मिळाली. त्यावरून देहूरोड कँटोन्मेंट हद्दीतील ब्रम्हपूरन बिल्डिंगसमोरील मुंबई महामार्गालतच्या रस्त्यावर असलेल्या एचडीफसी बँकेच्या भिंतीजवळ आरोपी लपून बसले असल्याचे दिसले. ही टोळी एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची चौकशी केली असता या दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली दिली. तसेच पुणे ग्रामीणच्या हद्दीमधील खेड, चाकण तळेगाव, मंचर, वडगाव मावळ या परिसरामध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, या टोळीने ग्रामीण भागातून सात बुलेट आणि इतर कंपन्यांच्या पंधरा दुचाकी चोरल्याचे कबूल केले. सात बुलेट, युनिकॉर्न, हिरो होंडा अशा विविध कंपनीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एटीएम सेटंरवर दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये दोन दुचाकी, चार मोबाइल, चाकू, लोखंडी कोयते, स्टीलची फोल्डिंग कात्री, नॉयलॉन दोरी, मिरची पूड समावेश आहे. टोळीवर खेड, चाकण, तळेगाव, मंचर, वडगाव मावळ या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विजय पाटील, दिलीप जाधवर, दत्तात्रेय जगताप, डी. डी. लिमन, शंकर जम आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक निरीक्षक सतीश होडगर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपंचायत विरोधी कायदा लागू करा

$
0
0

राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जात पंचायतीच्या बहिष्कारामुळे वडगाव शेरीतील अरुण नायकू या व्यक्तीने आत्महत्या केली. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ जात पंचायत विरोधी कायदा लागू करावा,' अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या पूर्व संध्येला राज्य सरकारने जात पंचायत विरोधी कायदा एकमताने मंजूर केला. मात्र, हा कायदा लागू होण्यासाठी राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र अंनिसच्या शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये जाऊन या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होण्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र अद्याप स्वाक्षरी होऊ शकलेली नाही. जातपंचायतीमुळे जाणारे जीव वाचवण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया तत्काळ पार पाडून कायदा लागू करावा,' अशी मागणी राज्य अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी केली. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. पुढील महिन्यात राष्ट्रपती राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने त्यांनाही भेटून ही मागणी करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
'राज्य अंनिसने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्त्वाखाली जातपंचायतीच्या विरोधात आंदोलन छेडले होते. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर हा लढा अधिकच तीव्र झाला. तेव्हापासून वेगवेगळ्या जातपंचायतीचे वास्तव अंनिसने समाजासमोर आणून वाळीत टाकण्यापासून अनेक अमानुष शिक्षेचे आणि दंडाचे प्रकार उघड केले आहेत,' याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले. या वेळी नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४९ रुपयांत लँडलाइन

$
0
0

'बीएसएनएल'ची योजना; रात्री ९ ते ७ दरम्यान मोफत कॉल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ग्राहकांना लँडलाइनकडे आकर्षित करण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडतर्फे (बीएसएनएल) पुण्यात ४९ रुपयांमध्ये लँडलाइन जोडणी पुरविण्याची योजना सुरू झाली आहे. या अंतर्गत ग्राहकांना दररोज रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत, तसेच दर रविवारी २४ तास मोफत कॉल करता येणार आहेत.
'बीएसएनएल'तर्फे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुणे विभागाचे प्रिन्सिपल जनरल मॅनेजर डॉ. पी. के. होता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी ग्राहक योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यानंतर योजनेला मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन, आगामी नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'बीएसएनएल' येत्या दोन महिन्यांमध्ये शनिवारवाडा, सारसबाग आणि आगाखान पॅलेस या तीन पर्यटन स्थळांवर मोफत वाय-फायची सुविधा देणार आहे. शहरात सर्वत्र सरसकट मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे आमच्या नेटवर्कचे मोठे नुकसान होत आहे. भविष्यात हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहोत,' असे डॉ. होता यांनी स्पष्ट केले.
महापालिकांचे आयुक्त, तसेच स्थानिक आमदार आणि खासदारांसोबतही संवाद सुरू करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आवश्यक प्रभावी वाय-फाय पुरविण्याची बीएसएनएलची क्षमता आहे. मात्र, नागरिकांना थेट मोफत सुविधा देण्याऐवजी आम्ही महापालिकेला ग्राहक म्हणून बल्क वाय-फाय सुविधा योजना पुरवू शकतो. त्या आधारे पालिका नागरिकांना मोफत ही सु​विधा मिळू शकेल, असेही होता म्हणाले. पुण्यात 'बीएसएनएल' लँडलाइन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २००४-०५ मध्ये साडेसहा लाख होती. शहर आणि परिसरातील खोदकामांमुळे ती घटून तीन लाखांवर आली आहे.
000
'ब्रॉडबँड'मुळे वाढले ग्राहक
वाढत्या मोबाइलमुळे गेल्या काही वर्षांत लँडलाइन जोडणी घेणाऱ्या ग्राहकांची संख्या घटत आहे. मात्र, ब्रॉडबँडमुळे 'बीएसएनएल'ची सेवा वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. सध्या पुण्यात तीन लाख लँडलाइनधारक आणि १.२० लाख ब्रॉडबँड यूझर आहेत. या ग्राहकांच्या मदतीने कंपनीने गेल्या वर्षी ' २६० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. एकूण व्यवसायात ६३० कॉर्पोरेट ग्राहकांचा वाटा २५ ते ३० टक्के आहे. आगामी काळात मोठ्या सोसायट्यांमध्ये व्यवसायवृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. होता यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेहसीन पूनावाला यांच्या विरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जैन मुनी तरुण सागर यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते तेहसीन पूनावाला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते अॅड. सेजल शहा यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जैन मुनी तरुण सागर यांना हरियाणा विधानसभेत मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याबाबत दोन दिवसांपूर्वी पूनावाला यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि जैन समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना निवेदन दिले. पूनावाला यांना चोवीस तासाच्या आत अटक करावी, अशी मागणी गोगावले यांनी केली होती.
गणेशोत्सव आणि पर्यूषण काळात हेतुपरस्पर धार्मिक तेढ पसरविण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पूनावाला यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशीही मागणी गोगावले यांनी केली. या प्रकरणी तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम २९५नुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याचे निरीक्षक मदन बहादूरपुरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राँझ गणपती शिल्प प्रदर्शन

$
0
0

पुणे : गणेशोत्सवानिमित्त भोसलेनगर येथील इंडियाआर्ट गॅलरीत ३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ब्राँझमधील गणपती शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तपस सकरकार, सोमनाथ चक्रवर्ती, तन्वय बॅनर्जी, चंदन रॉय आणि दिनेश सिंग या नामवंत शिल्पकारांनी साकारलेली गणेशाची ५१ मनोवेधक शिल्पे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती गॅलरीचे संचालक मिलिंद साठे यांनी दिली आहे.
कोलकात्याच्या 'स्कल्प्चर गॅलरी'चे संस्थापक तपस सरकार यांनी सिध्दीविनायक, हरिद्रा आणि बाल गणेशाची आकर्षक शिल्पे सादर केली आहेत. कोलकात्याच्या शासकीय कला महाविद्यालयाच्या सोमनाथ चक्रवर्ती यांनी सिध्दीदाता आणि सिध्दीविनायकाची सर्वांगसुंदर रुपे साकारली आहेत. नंदीवर आरूढ झालेला गणेश व जननी गणेश या सुंदर शिल्पांची निर्मिती शांतिनिकेतन विश्‍व भारती विद्यापीठाच्या तन्मय बॅनर्जी यांनी केली आहे. ब्राँझ'मधील भव्य मूर्ती साकारण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या चंदन रॉय यांची बासरीवादन करणारा गणेश आणि सिध्दीदाता गणेश ही सुबक शिल्पे मांडली असून, मणिपूरच्या दिनेश सिंगने गणपतीची पितळ आणि स्टीलमधील लक्षवेधक मूर्ती सादर केल्या आहेत. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यंकटेश माडगूळकर यांचे चौकाला नाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवंगत साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या पंधराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ३६ मधील चौकास त्यांचे नाव देण्यात आले.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने सदर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी होते. त्यांनी माडगूळकर यांच्या स्मृती-दालनाला भेट देऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 'अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य असेलेल्या तात्यांच्या स्मृतींचे नामफलकाच्या रूपाने जतन करता आले, याचा आनंद वाटतो. माडगूळकर हे साहित्यिक, चित्रकार आणि निसर्गप्रेमी असल्याने त्यांच्या साहित्यातील एका शैलीदार वाक्याचा समावेश या फलकावर केला आहे,' असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. 'आपल्या जीवनाला फुरसतीचा एक लांबलचक जरतारी पदर असावा, कृत्रिम जगातून बाहेर पडून निसर्गाची भव्यता, श्रीमंती आणि सौंदर्य यांचा अनुभव घ्यावा,'हे तात्यांचे वाक्य, त्यांच्या कन्या डॉ. ज्ञानदा नाईक यांनी उपलब्ध करून दिले.
'माडगूळकरांच्या साहित्यावर पोसलेली आमची पिढी आहे. ते भाग्य आता नव्या पिढीला मिळणार नाही. त्यामुळे तात्यांचे समग्र साहित्य एकत्रित करून नव्याने प्रकाशित व्हावे,' अशी इच्छा भांडारी यांनी व्यक्त केली. या वेळी ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, घोले रोड कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी नितीन उदास, विजय गवारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कृष्ट सजावटीत ‘गोसावीपुरा’ प्रथम

$
0
0

महाराष्ट्र टाइम्स उत्सवमूर्ती सन्मान'च्या विजेत्यांचा गौरव

म. टा, प्रतिनिधी, पुणे
'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'महाराष्ट्र टाइम्स उत्सवमूर्ती सन्मान' या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्ती, पर्यावरणपूरक मूर्ती, लोकप्रिय गणेश मंडळ अशा विविध विभागांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शहरातील ८० हून अधिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला.
एकूण चार विभागांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट सजावट विभागात सोमवार पेठेतील गोसावीपुरा मंडळाने बाजी मारली. याच विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, तर बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला. उत्कृष्ट मूर्ती विभागात भवानी पेठेतील बनकर तालीम मंडळाच्या बाप्पांच्या मूर्तीने पहिला क्रमांक मिळवला. बाल शिवाजी मंडळ, दत्तवाडीने दुसरा तर, टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विभागात भवानी पेठ येथील सुभाष मंडळाच्या मूर्तीला पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यंदा १२५वे वर्ष साजरे करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील भव्य मंदिरांच्या प्रतिकृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती राजाराम मंडळास लोकप्रिय गणेश मंडळाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
स्पर्धेसाठी आनंद सराफ, प्रसाद ठकार, शाहीर मावळे, रुपाली मावळे, शेखर कोरडे आणि स्वाती ओतारी यांनी परिक्षण केले. दर वर्षी महाराष्ट्र टाइम्सतर्फे महाराष्ट्र टाइम्स उत्सवमूर्ती सन्मान आयोजित केला जातो. त्यामध्ये विधायक कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना, तसेच नाविन्यपूर्ण सजावटी करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सन्मानित केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या समारंभात श्रीकृष्ण तरुण मंडळ, बनकर तालीम मंडळ, सुभाष मंडळ व राजाराम मंडळांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’मध्ये खुला प्रवेश

$
0
0

आमदार विजय काळे यांचा पुढाकार; १७,१८ सप्टेंबरला दर्शन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारची संस्था असूनही सर्वसामान्यांना प्रवेश नसलेली 'राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था' (एफटीआयआय) आता खुली होणार आहे. आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोत्यात आलेली 'एफटीआयआय' नेमकी कशी आहे, आतमध्ये कशाप्रकारे काम चालते, असे कुतूहल चित्रपट रसिकांना तसेच लोकांना असते. या पार्श्वभूमीवर ही संस्था आता पाहता येणार आहे. आमदार विजय काळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विधी महाविद्यालय रस्त्यावरील ही संस्था अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. त्यातच गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनामुळे 'एफटीआयआय' चर्चेत आली होती. संस्थेत सामान्य व्यक्तीला प्रवेश दिला जात नसल्याने पुण्यात असूनही ही संस्था पुणेकरांच्या फारशा परिचयाची नाही. संस्थेतील केवळ प्रभात संग्रहालय रसिकांना पाहता येते. या पार्श्वभूमीवर प्रभात संग्रहालय, चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान, अभिनय, दिग्दर्शन, संपादन, दूरचित्रवाणीचा स्टुडिओ, ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान या विभागांची माहिती रसिकांना घेता घेणार आहे. १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रसिकांना संस्थेत खुला प्रवेश असेल.
आमदार विजय काळे यांनी मध्यंतरी संस्थेला भेट दिली. भारतीय चित्रपट सृष्टी व दूरचित्रवाणीला समृध्द करणारी रत्ने घडविणारी ही संस्था लोकांसाठी अनोळखी आहे. त्यामुळे लोकांना ही संस्था पाहता यावी, असा प्रस्ताव त्यांनी संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्यापुढे ठेवला. ही सूचना मान्य करून १७ आणि १८ सप्टेंबरची तारीख ठरविण्यात आली. 'चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी आवश्यक तंत्रज्ञ, अभिनेते, दिग्दर्शक घडविण्याचे प्रशिक्षण या संस्थेत दिले जाते. या संस्थेचे कामकाज कसे चालते याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणूनच शनिवारवाडा कलामहोत्सव समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोन दिवस संस्था सर्वांना पाहाण्यासाठी खुली ठेवण्याचे मान्य केले आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा विचार आहे,' अशी माहिती काळे यांनी दिली.
--------------------------------
पुण्यातील संस्था पुणेकरांना पाहता यावी, अशी चांगली सूचना आमदार विजय काळे यांनी केली. त्यानुसार १७, १८ सप्टेंबर रोजी संस्था सर्वांसाठी खुली असेल. किती लोक येऊ शकतील, किती तुकड्या कराव्या लागतील तसेच काय दाखवता येईल, याबाबत एक समिती अभ्यास करत आहोत. आलेल्या नागरिकांना संस्थेची सर्व माहिती दिली जाईल.
- भूपेंद्र कँथोला , संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images