Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दरोडा: दहा किलो सोने लंपास

0
0
पुण्यातील रास्ता पेठेतील एका ज्वेलर्सवर गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोठा दरोडा पडला. दुकानातून चोरट्यांनी सुमारे १० किलो सोने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या भामट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही पळविले असून पुरावाच मागे ठेवला नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

उद्योजिकांना खुणावतेय कल्पनाशक्तीचे आकाश

0
0
‘चूल आणि मूल’ ही पारंपरिक चौकट मोडून उद्योगविश्वामध्ये भरारी घेतलेल्या महिलांचे उद्योग म्हणजे केवळ त्यांची हौस किंवा आधुनिक लाइफस्टाइलचा भाग नाही. तर आपल्या उद्योगाविषयी त्या तितक्याच गांभीर्याने विचार करत आहेत.

जिल्ह्यातील खासदार-आमदारांना ‘ठाकरी’ प्रसाद

0
0
‘तुम्ही निवडून आलात, तरी त्या भागांत शिवसेनेला ताकद मिळत नाही. त्यामुळे, यापुढे पक्षहिताच्या दृष्टीनेच जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या नियुक्त्या करणार,’ असे स्पष्ट करत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील खासदार आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या.

उन्हाळी पिकांनाही पाणी नाही?

0
0
पावसाने अवकृपा केल्याने पुणे विभागातील अनेक गावांत टंचाईसदृशस्थिती असून, धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात येणार असल्याने यंदा उन्हाळी पिकांना पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. पुणे विभागातील रब्बी पिकांच्या क्षेत्रातही पावसाअभावी घट होण्याची चिन्हे आहेत.

वीज बचतीसाठी ‘पार्थ’चा उपक्रम

0
0
वीज आणि अन्य इंधनांचे वाढते दर लक्षात घेता यावर तोडगा काढण्यासाठी पुण्यातील सात मित्रांना एकत्र येऊन वीज बचतीसाठी काही उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि प्रकल्पांच्या माध्यमातून बचतीचे धडे देण्यास प्रारंभ झाला आहे.

पुनर्मूल्यांकनाचा निकाल परीक्षेच्या आदल्या रात्री!

0
0
इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा घोळ अजूनही सुरू असून, आता तर फेरपरीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. परिणामी, अभ्यास करायचा, की निकालावर लक्ष ठेवायचे, अशा द्विधा मनस्थितीत विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आहे.

भारताने स्वहितालाच प्राधान्य द्यावे

0
0
‘भारत आणि चीन सध्या विविध पातळ्यांवर सहाकार्य करार केले आहेत. चीनचा पूर्वानुभव लक्षात घेता चीनशी संवाद साधताना भारताने स्वहितालाच प्राधान्य दिले पाहिजे,’ अशी अपेक्षा लष्कराच्या क्वालिटी अॅश्युरन्स विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल व्ही. ए. भट यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

दुरुस्तीच्या कामासाठी दोन लोकल रद्द

0
0
लोणावळा ते मळवली रेल्वे स्थानकादरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे तीन ते नऊ नोव्हेंबर दरम्यान पुणे ते लोणावळा दरम्यान धावणा-या दोन लोकलसेवा रद्द करण्यात आल्या असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

मोझे ट्रस्ट कॉलेजची बेकायदा इमारत पाडली

0
0
गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टच्या बालेवाडी येथील इंजिनीअरिंग कॉलेजच्या बेकायदा चार मजली इमारतीवर महापालिकेने शुक्रवारी हातोडा मारला. ही संस्था माजी आमदार रामभाऊ मोझे यांची आहे. संस्थेच्या आवारात बेकायदा इमारत बांधल्याप्रकरणी महापालिकेने दोन वेळा नोटिसा दिल्या होत्या.

दादोजींचा पुतळा हलविण्याचा प्रस्ताव पालिकेकडून मागे

0
0
लाल महालातून हटवण्यात आलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात यावा, असा महापालिका प्रशासनाने पक्षनेत्यांकडे दिलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

‘PMP’ कर्मचा-यांनाही बोनससह सानुग्रह अनुदान

0
0
महापालिका कर्मचा-यांप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) कर्मचा-यांना ८.३३ टक्के बोनस आणि सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. पीएमपीच्या कर्मचा-यांबरोबरच केंद्र सरकारच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काम करणा-या कर्मचा-यांनाही बोनस मिळणार आहे.

मानवतेच्या भावनेचे संमेलन हे प्रतीक

0
0
‘गेल्या आठशे-हजार वर्षांपासून माणसाला माणूस म्हणून वागवा, हे एकच स्वप्न हा समाज पाहतो आहे. त्यासाठीचे प्रयोजन म्हणूनच मी साहित्याकडे पाहतो,’ अशा भावना नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

दोन कोटींच्या सोन्याची चोरी

0
0
रास्ता पेठेतील सराफ पेढी गुरुवारी रात्री फोडून चोरट्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने चोरले. दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, ‘डीव्हीआर’ चोरट्यांनी नेला असल्याने ओळखीच्या व्यक्तीचा या चोरीत हात असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

खडकवासला ग्रामपंचायतीचा समावेशास विरोध

0
0
महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने २८ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राजकीय हेतूने करण्यात आला आहे. या निर्णयामुळे या गावांचा कोणताही विकास होणार नसल्याने महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघातर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या निर्णयाला विरोध करण्यासाठी येत्या रविवारी (४ नोव्हेंबर) मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

जुन्या शहराच्या ‘डीपी’त आमदारांची लुडबूड नको

0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यात (डीपी) आमदारांनी लुडबूड करू नये, असा सल्ला सभागृह नेते सुभाष जगताप यांनी दिला असून, राज्य सरकारकडे आराखडा पाठवल्यानंतर आमदारांनी कोणताही बदल न करता सहा महिन्यांत आराखडा मंजूर करण्याचा शब्द द्यावा, असे आव्हानही दिले आहे.

पीएमपीचा आज प्रवासी दिन

0
0
पीएमपी प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तीन नोव्हेंबर रोजी पीएमपीच्या दहा आगारात प्रवासी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पीएमपीच्या दहा आगारामध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रवासी दिन होणार असून, त्यामध्ये नागरिकांना पीएमपी संदर्भातील तक्रारी लेखी स्वरूपात मांडता येणार आहेत.

‘डीपी’वरून काँग्रेसच्या बैठकीत खडाजंगी

0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरून (डीपी) सत्ताधारी काँग्रेसमधील नाराजी आणि गटबाजी उफाळून आल्याचे चित्र शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत दिसले. आवश्यक गोष्टींची माहिती दिल्याशिवाय ‘डीपी’ला पाठिंबा कसा द्यायचा, असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केल्याने येत्या सोमवारी होणा-या खास सभेत काँग्रेसच्या भूमिककेडे सर्वांचे लक्ष असेल.

एक्स्प्रेस- वेवर अपघात ६ जण गंभीर जखमी

0
0
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे एका विचित्र अपघातात एसटी बस व स्विफ्ट डिझायर कार यांच्या झालेल्या भीषण अपघतात एकविरेच्या दर्शनासाठी निघालेले डोंबिवली रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलदेव भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाचजणांसह एसटी चालक जखमी झाला आहे.

प्रगतीसाठी तंत्रज्ञानाची जोड हवी

0
0
देशाचा विकास साधण्यासाठी केवळ विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास न धरता त्ङ्माला अध्यात्माचीही जोड दिली पाहिजे, असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

फ्लॅटवर एक टक्का व्हॅटसाठी प्रयत्न

0
0
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन जून २००६ ते एप्रिल २०१० दरम्यान विकल्या गेलेल्या फ्लॅटवर सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने एक टक्का व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट) आकारावा, या भमिकेवर बांधकाम व्यावसायिक संघटना ठाम आहे; तसेच याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला जाणार आहे, अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्र आणि पुणे मेट्रोचे अध्यक्ष सतीश मगर यांनी शुक्रवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images