Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘नेट’ची तारीख जाहीर, ‘सेट’ कधी?

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) घेण्यात येणारी वर्षातील दुसरी ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ अर्थात ‘नेट’ आता ३० डिसेंबरला होणार आहे. परीक्षेच्या टप्प्यांची सविस्तर माहिती ‘यूजीसी’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातर्फे राज्यभरात प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणारी ‘सेट’ होणार कधी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे.

खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू

$
0
0
बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात पडून सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. लक्ष्मी प्रिया बासुदेव हाती (रा. वृदावन निवास समोर, ज्योतीबा नगर काळेवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे.

आयुक्त दौऱ्यावर, विकासकामे वा-यावर

$
0
0
पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी परदेश दौऱ्यावर असल्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः विकासकामे सुरू करण्याचे आदेश, बांधकाम परवानगी, धोरणात्मक निर्णय या संदर्भातील फायली अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.

स्वप्नातील घराचा शोध उद्या संपणार

$
0
0
अॅफोर्डेबल होम, बजेट होम, मिड हाउसिंग, लक्झुरिअस होम्स आदी प्रकारांमधील प्रत्येकाच्या स्वप्नातील घराचा शोध ‘महाराष्ट्र टाइम्स प्रॉपर्टी शो’च्या माध्यमातून उद्या (शनिवारी) संपणार आहे. ‘मटा’तर्फे शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे तीन आणि चार नोव्हेंबर रोजी (शनिवारी आणि रविवार) या प्रॉपर्टी शोचे आयोजन करण्यात आले आहे.

बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0
पिस्तुलाचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यशश्री मारुलकर यांनी हा निकाल दिला.

‘स्वाइन फ्लू’ बाबतचे दुर्लक्ष बेतले जीवावर

$
0
0
सर्दी, ताप, खोकला आदी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असूनही पेशंट त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वेळेवर उपचार घेत नसल्याने परिणामी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. उशीरा उपचारासाठी दाखल झालेल्या नवी पेठेतील एकाचा रुबी हॉलमध्ये बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने या आजाराविषयीचे गांभीर्य समजत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

डेंगीचा मोर्चा आता ग्रामीण भागाकडे

$
0
0
शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही डेंगीची लागण होण्यास सुरूवात झाली असून, आतापर्यंत १९ जण डेंगीग्रस्त झाले आहेत. मावळासह, खेड, बारामती आणि नीरा या ठिकाणी डेंगीचे पेशंट आढळून आले आहेत. तसेच, मावळातील इंदोरी आणि वडगाव मावळमध्ये प्रत्येकी तीन पेशंट आढळून आल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने गुरुवारी स्पष्ट केले.

ऑइल कंपन्यांची ‘शॉक ट्रीटमेंट’

$
0
0
घरगुती ग्राहकांना वर्षाला केवळ सहाच सिलिंडरसाठीच अनुदान देण्याच्या निर्णयाने हैराण झालेल्या ग्राहकांना ऑइल कंपनीने नवीन ‘शॉक’ दिला आहे. मार्च २०१३ पर्यंत दिल्या जाणाऱ्या तीन अनुदानित सिलिंडरनंतर चौथ्या सिलिंडरच्या दरात चालू महिन्यात २८ रूपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ९२० रूपयांना उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरसाठी पुणेकरांना आता ९४८ रूपये मोजावे लागणार आहेत.

नॅपकिन्सच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

$
0
0
सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यासंदर्भात स्त्रियांमध्ये असणारे अज्ञान, गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि नॅपकिन्सच्या विल्हेवाटीसंदर्भात व्यापक जनजागरणाची गरज आहे. महापालिकेने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष न करता नॅपकिन्सच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी भारतीय स्त्री-शक्ती जागरण संस्थेने केले आहे.

वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांना झटका

$
0
0
शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील वीज ग्राहकांना पंचवीस ते पन्नास टक्के जादा वीजबिले आल्याने झटका बसला आहे. दरवाढीस मान्यता मिळाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा वाढीव दरांचा फरक या बिलात वसूल करण्यात आल्याने जादा बिले आल्याचे स्पष्टीकरण महावितरणच्या वतीने देण्यात आले आहे.

कामचुकार प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा

$
0
0
विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या प्राध्यापकांना या पुढच्या काळामध्ये थेट कारवाई सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. प्राध्यापकांकडून पर्यवेक्षणाच्या कामामध्ये केली जाणारी टाळाटाळ आणि प्राध्यापकांकडून होणाऱ्या चुका पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गांभीर्याने घेतल्या आहेत.

बांधकाम, उद्यान विभागात ‘एनओसी’वरून कलगीतुरा

$
0
0
इमारतींना भोगवटा पत्रासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्यावरून बांधकाम विभाग आणि उद्यान विभागात हक्कासाठी कलगीतुरा सुरू झाला आहे. बांधकाम झालेल्या ठिकाणी पुन्हा लावलेली झाडे योग्य प्रतीची आहेत का, हे तपासण्याचे उद्यान विभागाचे अधिकार काढून घेण्याबाबत बांधकाम विभागाने काढलेले परिपत्रक हे वादाला निमित्त ठरले आहे. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास उद्यान विभागाने ठाम नकार दिला आहे.

बँक ऑफ इंडियावर दरोड्याचा प्रयत्न

$
0
0
फर्ग्युसन कॉलेजच्या आवारातील ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ची शाखा चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान फोडण्याच प्रयत्न केला. बँकेच्या छत उचकटून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी मुख्य तिजोरीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

राजगुरुनगर विमानतळाची जागा निश्चित

$
0
0
राजगुरुनगरजवळ विमानतळाची जागा निश्चित करण्यात आली असून, या जागेची पाहणी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे ‘तंत्रज्ञानाचे पथक’ सोमवारी पुण्यात दाखल होणार आहे. जागेच्या पाहणीनंतर तांत्रिक माहितीच्या आधारे या संदर्भातील अंतिम अधिसूचना काढली जाणार आहे.

दादोजी पुतळा विषय न्यायप्रविष्टच

$
0
0
लाल महालातून हटविण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे गुरूवारी सांगण्यात आले. त्यामुळे हा पुतळा त्यांच्या गावी पाठविण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेणे शक्य आहे का, असा प्रश्न महापालिकेत विचारण्यात येत आहे.

दिवसभरात २३ जण डेंगीग्रस्त

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीतील शुक्रवार पेठेसह वारजे माळवाडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, विमाननगर, औंध, पिंपळेनगर, पाषाण, पिंपळेगुरव या भागातही डेंगीचे नव्याने पेशंट आढळल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवारी दिवसभरात तेवीस जण डेंगीग्रस्त झाले असून, ऑक्टोबर महिन्यात एकूण २७० जणांना डेंगीचा लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजगुरूनगर, चाकणसाठी नगरपरिषद?

$
0
0
पुण्यापासून जवळच असलेल्या आणि झपाट्याने विकसित होत असलेल्या राजगुरूनगर व चाकणला नगर परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाला देण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही नगर परिषदांच्या स्थापनेचा स्वयंस्पष्ट अहवाल नसल्याने नगररचना विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे.

लाल दिव्याच्या गाडीसाठी ‘फिल्डिंग’

$
0
0
गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत हुलकावणी देणारी लाल दिव्याची गाडी यंदा तरी पुणे शहरात येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नियोजित मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळावे, याबाबत शहर आणि जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्यासत्र सुरूच

$
0
0
पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी आत्महत्यासत्र सुरू आहे. देहूरोड आणि भोसरी येथे एका गरोदर महिलेसह दोघींनी आत्महत्या केली. यामुळे गेल्या तीन दिवसात आत्महत्या केलेल्यांची संख्या सात झाली आहे.

फुले-केशवसुतांचा मी वारसदार

$
0
0
'साहित्यातून प्रकट होत असलेल्या वेदनेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करताना मी स्वतःला फुले-केशवसुत यांच्या परंपरेचा वारसदार समजतो,' अशी प्रतिक्रिया अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी व्यक्त केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images