Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वर्षभरात लाखभर पेशंटना मोफत उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दारिद्र्य रेषेखालील वर्गाला धर्मादाय खासगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या उपचारासाठी एका वर्षांत सुमारे ५४ कोटी ५२ लाख ४१ हजार १८३ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रकमेपेक्षा खर्च केलेला निधी अधिक असल्याने एका वर्षात एक लाख एक हजार ३०५ पेशंटना मोफत उपचार देण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व धर्मादाय खासगी हॉस्पिटलमध्ये एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरिबांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरासह पुणे जिल्ह्यातील सुमारे ५९ हॉस्पिटलची नोंदणी धर्मादाय हॉस्पिटलच्या योजनेंतर्गत करण्यात आली आहे. प्रत्येक हॉस्पिटलने एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम ही 'आयपीएफ' निधी म्हणून राखीव ठेवणे अपेक्षित आहे. त्यानुसार जून २०१५ ते जून २०१६ या एका वर्षाच्या हॉस्पिटलमधील योजनेच्या कामगिरीचा आढावा धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी घेतला. त्यात अनेक हॉस्पिटलनी स्वतःच्या निधीपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याचे निदर्शनास आले, तर काही हॉस्पिटलनी निधीपेक्षा कमी रक्कम गरिबांसाठी खर्च केल्याचे दिसून आले.
'प्रत्येक धर्मादाय खासगी हॉस्पिटलना उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरिबांसाठी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दर महिन्याला हॉस्पिटलच्या निधीचा खर्चासह विविध तक्रारींचा आढावा घेण्यात येतो. दोन टक्के रक्कम म्हणून ५९ हॉस्पिटलमधून ४६ कोटी ४१ लाख ३५ हजार १५७ रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र प्रत्यक्षात या हॉस्पिटलमधून ५४ कोटी ५२ लाख ४१ हजार १८३ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे,' अशी माहिती खासगी धर्मादाय हॉस्पिटलच्या देखरेख समितीचे सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी 'मटा'ला दिली.
अनेकदा खासगी हॉस्पिटलकडून पेशंटच्या उत्पन्नाच्या रकमेत तफावत असल्याचे हॉस्पिटलला दिसून येते. त्यामुळे हॉस्पिटलकडून चौकशी करून पेशंटना मोफत उपचार नाकारले जातात; परंतु हॉस्पिटलच्या या भूमिकेबाबत पेशंटकडून तक्रारी करण्यात येतात. हॉस्पिटलकडून पात्र व्यक्तींनाच मोफत उपचार मिळावेत, अशी भूमिका आहे; परंतु उपलब्ध निधीपेक्षा अतिरिक्त खर्च केल्याने त्यांच्या कामगिरीची दखल घेणे भाग आहे, असेही धर्मादाय सहायक आयुक्त जगताप यांनी सांगितले.
...............
चौकट
हॉस्पिटलचे नाव ................... दोन टक्के रक्कम ................ खर्च केलेली रक्कम
रुबी हॉल क्लिनिक .........................८,८७,०२,०३४ .................. १२,०७,१७,७१९
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ..............६,३६,५५,१८९..................... ७३४३७४५९६
जहांगीर हॉस्पिटल ..................... ३,५५,४५,०७४ ................. ४,८७,७७,८८४
केईएम हॉस्पिटल ................... २,०९८४३६९ ....................... ३,२७,२६,३५६
पूना हॉस्पिटल ................. ........ २,०४,७०,१९३ .................. ३,०३,७५,९४६
भारती हॉस्पिटल ........................ ७४,०७,६२१ ......................... ९४, ९४,२१६
एनएम वाडिया कॉर्डिऑलॉजी ................. ६६,२३,२०२ .................... ७, ७७.२१८
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थोमोलॉजी ...... ४९८९७८० .............. ६४,३७,७५०
इनामदार हॉस्पिटल .......... ..............१,०६,५८,४४३ .................... ९५,५५,९२४
........

शहरातील सर्वाधिक रक्कम खर्च करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रुबी हॉल क्लिनिकचा अव्वल क्रमांक लागतो. हॉस्पिटलकडे आठ कोटी ८७ लाख दोन हजार ३४ रुपयांची रक्कम राखीव होती. प्रत्यक्षात १२ कोटी ७ लाख १७ हजार ७१९ रुपयांचा निधी खर्च केला आहे. काही हॉस्पिटलनेदेखील अतिरिक्त निधी खर्च केला आहे. एका वर्षात एक लाख एक हजार ३०५ पेशंटना खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्यात आले.
- नवनाथ जगताप, सहायक आयुक्त, धर्मादाय आयुक्तालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महा ‘विभाग’णी वादाच्या भोवऱ्यात

$
0
0

महावितरणचे चार प्रशासकीय विभाग करण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वीजपुरवठा क्षेत्रातील राज्यातील प्रमुख कंपनी असलेल्या महावितरणच्या महा'विभाग'णीचा घाट घालण्यात आला आहे. नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कल्याण असे चार प्रशासकीय विभाग उद्यापासून (१५ ऑगस्ट) स्थापन करण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मात्र कर्मचारी संघटनांनी याला विरोध केल्याने ही विभागणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

येत्या पंधरा ऑगस्टपासून महावितरणचे चार विभाग करण्याची घोषणा बावनकुळे यांनी केली होती. त्यामध्ये नागपूर विभागात विदर्भातील ११ जिल्हे, औरंगाबाद विभागात मराठवाडा आणि खानदेश, पुणे विभागात पश्चिम महाराष्ट्र आणि कल्याण विभागामध्ये कोकण आणि ठाणे-भांडुप या विभागांचा समावेश करून तेथे विभागीय कार्यकारी संचालकांची नियुक्ती करण्याची ही योजना आहे. मात्र, वीज कंपन्यांमधील इंजिनीअर्सची सर्वांत मोठी संघटना असलेली सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन (एसईए) आणि मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने या विभागणीला विरोध केला आहे. प्रारंभी आंदोलन-निदर्शने करून आणि त्यानंतरही हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत काम बंद करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. दुसरीकडे ऊर्जामंत्री बावनकुळे हे या विभागणीसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या विभागांपैकी दोन ठिकाणी तांत्रिक संचालकांची नियुक्ती करण्यात येणार असून उर्वरीत दोन ठिकाणी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची (आयएएस) नियुक्ती करण्यात येणार आहे. या विभागांचे प्रमुख तांत्रिक पार्श्वभूमीचेच हवेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हे काम होणार नाही, अशा आक्षेप संघटनांनी घेतला आहे. त्याबरोबरच फक्त विभागीय कार्यालये वाढवून खर्च वाढेल, त्यातून ग्राहकसेवेचे कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार नाही, अशी टीका संघटनांनी केली आहे. विभाग वाढविण्याऐवजी मंडळ कार्यालये (सेक्शन ऑफिसेस) वाढविण्याची गरज आहे, असे संघटनांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या सेक्शन ऑफिसांकडील ग्राहकांची संख्या जवळपास दुप्पट झाल्याने त्यांना सेवा देण्यात दमछाक होत आहे. त्यामुळे फक्त प्रशासकीय पसारा वाढविण्याऐवजी तांत्रिक मनुष्यबळ वाढवा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, ऊर्जामंत्र्यांनी परस्पर हा निर्णय रेटला, तर त्यातून ग्राहकांच्या पदरी काहीही पडणार नाही, उलट महावितरणच्या मूळ ढाच्यालाच धक्का बसेल आणि त्याचे परिणाम संपूर्ण व्यवस्थेला दीर्घकाळ भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकड्यांवर हवे ८ टक्के बांधकाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील जैववैविध्य पार्कसाठी (बीडीपी) आरक्षित असलेल्या जागांवर झोपडपट्ट्या होऊ नयेत यासाठी येथे बांधकाम करण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बीडीपीमध्ये बांधकाम करण्याची परवानगी देताना महाबळेश्वरमध्ये राबविण्यात येणाऱ्या धोरणापेक्षा कडक धोरण तयार करून आठ टक्के बांधकामाला परवानगी द्यावी, अशी भूमिका आमदारांनी मांडली.

शहराचा विकास आराखडा (डीपी), आरक्षणे, रस्ते विकास, तसेच बीडीपी या विषयातील धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या प्रश्नांवर मत मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक तासाचा वेळ दिला होता. शहराचा डीपी सध्या अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे आहे. डीपीमधील वादाच्या मुद्यांवर पक्षाच्या आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलाविली होती. या बैठकीत प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील प्रश्नांचे लेखी निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

शहराच्या नवीन डीपीमध्ये ९०० हेक्टर जागेवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. या जागेत कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसावे, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. यातील ८५ ते ९० टक्के जागा ही वनखात्याची असून उर्वरित १० ते १५ टक्के जागा खासगी मालकीची आहे. या जागांवर सध्या काही प्रमाणात बांधकाम करण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी न दिल्यास या जागांवर बेकायदा पद्धतीने घरे उभारून झोपडपट्टी होण्याचे प्रमाण वाढेल. महाबळेश्वर येथे बीडीपीमध्ये साडेबारा टक्के बांधकाम करण्याची परवानगी आहे. यापेक्षा कडक नियमावली तयार करून आठ टक्के बांधकाम करण्याची मान्यता द्यावी, अशी एकमुखी मागणी आमदारांनी केली. या बैठकीत खासगी मालकांच्या जागा ताब्यात घेऊन पालिकेने त्यांना मोबदला द्यावा, असा पर्याय सुचविण्यात आला. या दोन्ही पर्यायांचा विचार सरकार गांभीर्याने करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

काही बदल होतील; पण...

डीपीमधील आरक्षणांमध्ये काही बदल होतील; पण लोकांच्या उपयोगी असणारी जास्तीत जास्त आरक्षणे कायम असतील, अशी ग्वाही या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. डीपीतील २५० आरक्षणे कायम ठेवण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. शहरातील नऊ मीटर रस्त्यालगतच्या इमारतींसाठी 'टीडीआर' वापरताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला दीड फूट जागा सोडण्याच्या सूचनेवर योग्य निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांची वाहने बाहेर पडल्याने शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. कोंडीमुळे सुमारे १५ ते १८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वाहतूक वळविली होती. एक्स्प्रेस वेवर शनिवारी सकाळी सात वाजेपासून सुरू झालेली ही वाहतूक कोंडी सायंकाळी उशिरा सुटली.

लोणावळा, खंडाळा, अलिबाग, मुरूड आणि महाबळेश्वरसह विविध ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईहून पुण्याकडे येताना खालापूर टोलनाक्यापासून पाच ते सात किलोमीटर, तर खंडाळा (बोरघाट) बोरघाटातील अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाक्यापर्यंत आठ ते दहा किलोमीटर अशाप्रकारे १२ ते १५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अवघ्या तास दीड तासांच्या प्रवासासाठी अनेकांना चार ते पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे पर्यटकांच्या नियोजनावर पाणी पडले. अखेर एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीचाताण कमी करण्यासाठी बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गाने वळविली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुंजवणी’तून पाइपलाइनने पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्यात पाणी नेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला कालवा रद्द करण्यात येणार असून त्याऐवजी बंद पाइपलाइनने पाणी नेण्यात येणार आहे. या पाइपलाइनच्या मार्गावरील प्रत्येक गावात पाण्यासाठी स्वतंत्र व्हॉल्व्ह ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांना शेती व पिण्यासाठी पाणी मिळू शकणार आहे. गुंजवणी धरणाच्या बंद पाइपलाइनच्या कामाचा आढावा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. या बैठकीला निरा-देवघर योजनेचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, उपअभियंता भरत वायसे, दिगंबर डुबल आदी उपस्थित होते.

या बंद पाइपलाइनचे काम कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करण्याची सूचना राज्यमंत्री शिवतारे यांनी केली. या पाइपलाइनच्या सर्वेक्षणाचे काम ३० ऑगस्टपर्यंत करण्यात यावे. पाइपलाइनचे डिझाइन व ड्रॉइंग हे कार्यकारी अभियंत्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून ३० सप्टेंबरपर्यंत ते मंजूर करून शासनाला सादर करण्याचे नियोजन असावे. १ डिसेंबरपर्यंत महामंडळ अथवा त्रिस्तरीय समितीसमोर या पाइपलाइनच्या मंजुरी प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुंजवणी धरणाचे रखडलेले काम पूर्ण करून त्यात यंदा शंभर टक्के पाणीसाठा करण्यात येणार आहे. या धरणातून पुरंद तालुक्याला पाणी दिले जाणार आहे. यापूर्वी गुंजवणीच्या कालव्यातून पाणी नेण्याचे नियोजन होते. परंतु आता बंद पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. या पाइपलाइनमुळे पाण्याचा वहननाश, बाष्पीभवन यामध्ये बचत होणार आहे. पाइपलाइन जमिनीच्या खालून नेण्यात येणार असल्याने त्यासाठी भूसंपादन करावे लागणार नाही. तसेच पाइपलाइन जात असलेल्या वेल्हे तालुक्यातील प्रत्येक गावासाठी पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र व्हॉल्व्ह ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी खूनप्रकरणातील तिघांना अटक

$
0
0

पुणेः सुमारे सात महिन्यांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबक परिसरात झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील तीन आरोपींना शिवाजीनगर परिसरातून फरासखाना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांपैकी एक नगरसेवकाचा मुलगा आहे. त्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या त्र्यंबक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार होते. हे आरोपी शिवाजीनगरच्या म़ॉडेल कॉलनी परिसरात काही दिवसांपासून राहत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यांनी याबाबत पुणे पोलिसांना कळवले. त्यानुसार, फरासखाना पोलिस नाशिक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासोबत मॉडेल कॉलनी येथे गेले. त्यातील संदीप रमेश गांगुर्डे आणि आकाश दीपक मोहिते यांना जिमला जात असताना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार भूषण लोंढे याला मॉडेल कॉलनी येथे फ्लॅटमध्ये असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिस त्यांच्या फ्लॅटवर गेले. मात्र, लोंढे याला पोलिस आल्याचे समजताच त्याने मागील दरवाज्यातून बाहेर पडून अपार्टमेंटच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून अटक केली. त्यानंतर त्याने केलेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी सागर केकाणे हे किरकोळ जखमी झाले. आरोपी भूषण लोंढे हा नाशिक येथील नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सी-डॅक ने भाड्यापोटी भरले ५५ कोटी

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com

पुणे : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने प्रगत संगणन विकास केंद्राला (सी-डॅक) नव्या इमारतीसाठी मंजूर निधी वेळेत न दिल्याने 'सी-डॅक'ला कारभारासाठी स्वतंत्र जागा भाड्याने घ्यावी लागली. त्यामुळे 'सी-डॅक'ची मुख्य केंद्राची इमारत आणि कोर्सेस व संशोधनासाठी एक इमारत अशा दोन इमारतींच्या भाड्यापोटी 'सी-डॅक'ने आतापर्यंत तब्बल ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. ही रक्कम सुरुवातीला इमारतीची एकूण उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा; तसेच सध्याच्या मंजूर निधीमध्ये 'सी-डॅक'च्या हिश्शाला येणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिक आहे.

'सी-डॅक'च्या कामकाजाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भाड्याच्या इमारतीतून सन १९८८ पासून सुरुवात झाली. त्यानंतर 'सी-डॅक'चे मुख्य केंद्र असल्याने पुणे केंद्राचा कारभार वाढल्याने सन २००८ पासून विविध कोर्सेस आणि संशोधनासाठी औंधसारख्या 'स्मार्ट' परिसरात पॉश इमारतीत मोठी जागा भाड्याने घेतली. 'स्मार्ट' परिसरातील इमारतीत जागा असल्याने या जागेचे महिन्याचे भाडे तब्बल ५० लाख रुपये होते. त्यामुळे सन २०१४ पर्यंत 'सी-डॅक'ने केवळ भाड्यापोटी सुमारे ३६ कोटी रुपये खर्च केले. काही कारणास्तव ही जागा 'सी-डॅक'ला सोडावी लागली. 'सी-डॅक'च्या पाषाण येथील इमारतीचे काम अर्धवट असल्याने 'सी-डॅक'ला सन २०१३ मध्ये करार करून नव्याने 'स्मार्ट' परिसरातीलच आरएमझेड इमारतीतील तिसरा मजला भाड्याने घ्यावा लागला. या मजल्याच्या भाड्यापोटी 'सी-डॅक'ने २०१४-१५ साठी ९ कोटी २२ लाख ७२ हजार १८८ रुपये खर्च केले. २०१५-१६ या वर्षासाठी ७ कोटी ७८ लाख ७८ हजार ०३८ रुपये खर्च केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत केवळ भाड्यापोटी सुमारे १७ कोटी १ लाख ५० हजार २२६ रुपये द्यावे लागले.

सरकारच्या विभागाने मंजूर निधी न दिल्यानेच 'सी-डॅक'च्या नव्या इमारतीचे काम रखडले. मंजूर निधी त्वरित मिळण्याबाबत 'सी-डॅक'नेदेखील पुरेशा प्रमाणात विभागाकडे पाठपुरावा केला नाही. त्यामुळे 'सी-डॅक'ला सन २००८ पासून इमारतीत भाड्याने जागा घ्यावी लागली आणि भाड्यापोटी सुमारे ५३ कोटी १ लाख ५० हजार २२६ खर्च करावे लागले आहे. ही रक्कम सुरुवातीला इमारतीची एकूण उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या म्हणजेच ४९ कोटी ८० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. नवीन मंजूर निधीनुसार, 'सी-डॅक'च्या हिश्शाला येणाऱ्या ४६ कोटी ४८ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. अशा एकंदरीत स्थितीमुळे 'सी-डॅक'ची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या प्रचंड कमकुवत झाली आहे.

विद्यापीठातील केंद्रासाठी २ कोटी रुपये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील 'सी-डॅक'चे मुख्य केंद्र हे विद्यापीठ आणि 'सी-डॅक'मध्ये असलेल्या परस्पर सामंजस्याद्वारे भाड्याच्या इमारतीत सन १९८८ पासून सुरू आहे. या इमारतीच्या भाड्याबाबत जुनी माहिती उपलब्ध नसल्याचे 'सी-डॅक'च्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. औंधच्या जागेच्या तुलनेत येथील भाडे कमी आहे. मात्र, २०१४ ते २०१६ या कालावधीसाठी इमारतीचे भाडे ५ लाख रुपये महिना असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यानुसार, या इमारतीसाठीदेखील 'सी-डॅक'ने विद्यापीठाला सुमारे २ कोटी रुपये दिले आहेत.

'सी-डॅक'चा कारभार वाढल्याने पाषाणमध्ये संशोधन आणि विकासासाठी नवीन इमारत उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी केंद्र सरकारने 'सी-डॅक'साठी निधी देण्याचे ठरवले. मात्र, हा निधी टप्प्याटप्प्यात आल्याने इमारत उभारणीचा खर्च वाढत गेला आणि इमारतीचे काम रखडले. त्यामुळे 'सी-डॅक'ला भाड्याच्या इमारतीतून काम करावे लागले आणि भाड्यापोटी पैसे खर्च करावे लागले. मात्र, आता सरकारने मंजूर निधी त्वरित द्यायला पाहिजे आणि 'सी-डॅक'च्या प्रशासनानेदेखील काही विभागांचे नव्या इमारतीमध्ये स्थलांतर केले पाहिजे.

- विजय भटकर,ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य व चित्रपटात वास्तवाचे भान हवे

$
0
0

सासवड संमेलनातील परिसंवादात उमटला सूर

म. टा. वृत्तसेवा, सासवड

आचार्य अत्रे यांच्या ११८ व्या जयंतीदिनी कऱ्हेकाठी आयोजित दोन दिवसीय १९ वे साहित्य संमेलनात रविवारी दुसऱ्या दिवशी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. प्रभाकर देसाई, मराठी मालिका अवंतिका फेम डॉ. उल्हास आढाव आणि इंदू फार्माचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे आदींच्या सहभागाने हा परिसंवाद साहित्य रसिकांची दाद मिळवून गेला.

संमेलनाचे उद‍्घाटन शनिवारी संमेलनाध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. मसाप (पुणे) चे संचालक व सासवड शाखा अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी प्रास्तविक करून सध्या अत्यंत गाजत असलेल्या सैराट चित्रपटाबाबत साहित्यिकांनी समाजमनावर आणि विशेषत: तरुण पिढीवर याचा नेमका काय परिणाम झाला याबाबत भूमिका मांडण्याचे आणि साहित्य हे वास्तवापासून दूर जाते आहे का, हा प्रश्न उपस्थित करत वक्त्यांना बोलते केले.

'सैराट चित्रपटामुळे दबलेल्या तरुण पिढीला एक व्यासपीठ मिळाल्यानेच सर्वजण व्यासपीठावर येवून दंगा करतात. नागराज मंजुळे यांनी अनेक वर्षे अभ्यास करून हे लिखाण केल्याने आज मराठी चित्रपट १०० कोटींचा विक्रम करतो आहे. तेव्हा साहित्याबाबत वास्तवता असल्यानेच हे खरे ठरले.

मात्र, आज ज्या मालिकांमधून विषय बाजूला ठेवून सादरीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे. यामुळे जरी लोकप्रियता मिळत असली तरी क्षणभंगूर ठरेल. कारण आता संस्काराचा, साहित्याचा पोत तपासणे गरजेचे झाले आहे,' असे देसाई यांनी सांगितले.

'बखरी, शिवकाल, पोवाडे, शाहिरी लावण्या, ओव्या, कादंबरी, कथा, काव्य यातून समाज मन जागृत करून चैतन्य निर्माण करणारे साहित्य प्रा. वसंत बापट, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज यांनी निर्माण करून समाजातील वास्तव पुढे आणले,' असे ठाम मत उल्हास आढाव यांनी मांडले.

अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सध्या मराठी चित्रपट किंवा मालिका यासाठी सकस व दर्जेदार साहित्य मिळत नसल्याची व्यथा मांडून एकीकडे १०० कोटींचा नफा; तर दुसरीकडे १० लाख सुद्धा मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत चांगल्या साहित्य निर्मितीची उणीव भासत असल्याची खंत व्यक्त केली.

'साहित्य भरकटत चालले तर चित्रपटही दिशाहीन ठरते आहे,' असे नमूद करीत समारोप केला. डॉ. अरुण कोळेकर यांनी सूत्रसंचलन करून साहित्य रसिकांना खिळवून ठेवले. सहसचिव प्रा. हनुमंत चाचर यांनी आभारप्रदर्शन केले. संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आगळा पायंडा पाडल्याने रसिकांना भावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘...याची जाण पुणेकरांनी ठेवावी’ : सुभाष वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सध्या पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून वादंग उठले आहे. खडकवासला प्रकल्पातील पाण्यावर पुणेकर आपला हक्क सांगतात; मात्र या प्रकल्पाच्या ऊर्जेवर उभारलेला पुण्याच्या विकासाचा डोलारा हा शेकडो आदिवासींच्या सरणावर आणि शेतकऱ्यांच्या कष्टावर उभा आहे, याची जाण पुणेकरांनी ठेवावी,' असे मत सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी व्यक्त केले.

साधना प्रकाशनाच्या ६९व्या वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून वारे बोलत होते. साधना प्रकाशनचे संपादक विनोद शिरसाट, राजा शिरगुप्पे आदी या वेळी उपस्थित होते. विकास वाळके, आदर्श पाटील, श्रीकृष्ण शेवाळे यांनी या विशेषांकात लेखन केले असून, राज्यातील आदिवासींच्या व्यथा मांडल्या आहेत.

वारे म्हणाले, 'खडकवासला धरणाचे पाणी आमचे, असा हक्क पुणेकर सांगत आहेत. मात्र, तो प्रकल्प तयार होत असताना, शेकडो आदिवासींना त्यांच्या जमिनीवर पाणी सोडावे लागले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबद्दल थोडातरी विचार पुणेकर नागरिक करतात का? त्या आदिवासींबद्दल समाजाला कृतज्ञता असायला हवी.'

मिलिंद बोकील म्हणाले,'आदिवासींची जीवनपद्धती वेगळी असल्याने त्यांना मागासलेले, असे संबोधले जाते. शासनाच्या उदासीनतेमुळे आजही हा समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे. त्यांना योग्य त्या सुविधा मिळाल्या तर ते चांगले आयुष्य जगू शकतात.'

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राजा शिरगुप्पे यांनी विकास वाळके, आदर्श पाटील, श्रीकृष्ण शेवाळे यांची मुलाखत घेतली. आदिवासी भागात जाऊन त्यांचे जीवनमान, त्यांच्याविषयीची असलेली अनास्था, असे सगळे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. विनोद शिरसाट यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’चे यादव यांच्या मुलाला अटक

$
0
0

काकूच्याच घरात दागिन्यांची चोरी

पिंपरीः घराची किल्ली विश्वासाने पुतण्याकडे देऊन पंढरपूरला वारीला गेलेल्या काकूच्या घरात चोरी करणाऱ्या पुतण्यासह त्याच्या साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला पुतण्या हा राष्ट्रवादी सेवा दलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव यांचा मुलगा आहे.

किरण आनंदा यादव (२०), कृष्णा उमेश कार्ले (२०), गणेश वसंत आतनुरकर (२०) शमुशद्दीन ताजुद्दीन शेख (२०, सर्व रा. कुदळवाडी चिखली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी जयवंत गेणभाऊ यादव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत यादव हे पंढरपूरच्या वारीला गेले होते. वारीला जाताना त्यांनी घराच्या किल्या किरणकडे दिल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन किरण आणि त्याच्या साथीदारांनी घर उघडून घरात ठेवेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. यादव हे वारीवरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक फौजदार तात्या तापकीर आणि मंगेश गायकवाड यांना चिखली येथील घरफोडीतील आरोपी वश्या आतनुरकर, पप्या कार्ले आणि छोटा शेख हे असून त्यांची घरफोडी केल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी ४१ तोळे वजनाचे दागिने व रोकड चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाच लाख पन्नास हजार रुपयांचे आठरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. उर्वरीत सोन्याचे दागिने त्यांनी विकले असून लवकरच हे दागिने जप्त करण्यात येतील असे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले यांनी सांगितले. आरोपींना बुधवार (१७ ऑगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांचा परिणाम शैक्षणिक धोरणावर

$
0
0

मसुद्यात विद्यार्थी संघटनांच्या राजकारणाचा उहाप

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : एफटीआयआय-जेएनयूमधील विद्यार्थी आंदोलनांचे प्रतिबिंब प्रस्तावित 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६'च्या निर्मिती प्रक्रियेवरही पडले आहे. तसेच, धोरण निश्चितीसाठीच्या मूळ इंग्रजी मसुद्याच्या मराठी भाषांतरीत प्रस्तावनेत 'भारताने नेहमीच उच्च शिक्षणाला महत्त्व दिले,' असल्याचे सांगण्यात आल्यानेही हा मसुदा चर्चेत आला आहे. म्हणूनच पूर्वप्राथमिक-प्राथमिक शिक्षणाची दुर्दशा होत आहे की काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय पातळीवरील नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या काही मुद्द्यांचा समावेश असलेला 'सम इनपूट्स फॉर ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०१६' हा अहवाल मंत्रालयाच्या वेबसाइटवरून उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील शिक्षणतज्ज्ञांनी मूळ इंग्रजीमधील हा अहवाल प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच, सूचना पाठविण्यासाठी मुदतवाढही मागण्यात आली होती. त्यानुसार मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवरून या अहवालाचा हिंदी अनुवाद नुकताच प्रसिद्ध केला. त्या विषयीच्या सूचना पाठविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या मसुद्यांचा आढावा घेताना या बाबी समोर आल्या आहेत.

मसुद्यात उच्च शिक्षणातील प्रशासकीय सुधारणांच्या संदर्भाने काही मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थी संघटनांचे राजकारण आणि त्याचा उच्च शिक्षणावर होणाऱ्या परिणामाचाही उहापोह करण्यात आला आहे. त्यानुसार, 'लोकशाहीच्या हितांचा पुरस्कार करणे, लोकशाही व्यवस्था, प्रशासन, प्रक्रियांना बळकट करणे, चर्चा, विवाद, बहुवैचारिकता यामधील विद्यार्थी संघटनांच्या सकारात्मक भूमिकेचे सरकार समर्थन करेल आणि त्यांना प्रोत्साहन देईल. तथापि, असे आढळून आले आहे की शैक्षणिक संस्थांच्या आवारात घडणाऱ्या, फूट पाडणाऱ्या घटना आणि मतभेद यांना बाहेरील व्यक्ती आणि कोर्सच्या ठराविक वर्षांच्या कालावधीनंतरही पुढे अनेक वर्षे नोंदणीकृत राहणारे विद्यार्थी कारणीभूत असतात. बाहेरच्या लोकांना आणि शिक्षण संपलेल्या व्यक्तींना विद्यार्थी राजकारणात भाग घेण्यापासून रोखण्यासाठी, वसतिगृहात राहून सुविधांचा गैरवापर रोखण्यासाठी एक सर्वेक्षण केले जाईल.'

भाषांतराचं काय?

मसुद्याच्या मूळ इंग्रजी प्रस्तावनेमध्ये पहिल्या वाक्यात 'भारताने नेहमीच शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे,' अशा आशयाचे वाक्य आहे. या वाक्याचे हिंदीमधील मसुद्यात 'भारत ने हमेशा शिक्षा को उच्च महत्त्व दिया है,' असे भाषांतर देण्यात आले आहे. मराठी भाषांतरीत मसुद्यामध्ये मात्र 'भारताने नेहमीच उच्च शिक्षणाला महत्त्व दिले आहे,' असे सांगण्यात आले आहे. मराठी भाषांतरीत मसुदा मंत्रालयाच्या वेबसाइटवरून उपलब्ध नसला, तरी त्यामध्ये समाविष्ट बाबी या मूळ मसुद्यामधीलच आहेत. त्यामुळे हा मसुदा अधिकृत मानावा की नाही, हा प्रश्न सध्या राज्यातील तज्ज्ञांना पडलेला आहे. हा मसुदा अधिकृत असल्यास, त्यामधील भाषांतराच्या चुकांचे काय, असा सवालही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यदिनासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वातंत्र्यदिनासाठी शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. गर्दीच्या, संवेदनशील ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. बस स्थानके, रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी सुरू आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाच्या चौकांत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांना संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, पुणे लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे स्थानकावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. रेल्वेमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली येत आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीचा मनस्ताप

$
0
0

सलग मिळालेल्या सुट्ट्यांमुळे 'एक्स्प्रेस-वे'सह महामार्गांवर वाहनांच्या रांगा

म. टा. प्रतिनिधी, पुणे/लोणावळा

'वीकेंड' तसेच स्वातंत्र्यदिनामुळे सलग मिळालेल्या सुट्ट्यांमुळे 'एक्स्प्रेस'सह महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र रविवारीही कायम होते. सातारा रोड, ​नाशिक रोड आणि नगर रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. 'एक्स्प्रेस-वे'वरील अमृतांजन पुलाजवळ चार वाहने बंद पडल्याने सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या. 'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात आल्याने तेथेही रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

पुणेकरांनी सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मावळात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे लोणावळा, खंडाळा, ताम्हिणी घाट यासह मावळातील अनेक ठिकाणी गर्दी झाली. सातारा रोडवर खेड शिवापूर, नाशिक रोडवर खेडचा घाट या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.

'एक्स्प्रेस-वे'वर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर शनिवारप्रमाणेच रविवारीही मोठ्या संख्येने वाहने होती. सलग दुसऱ्या दिवशी या लेनवर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या ७ ते ८ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळील चढावर रविवारी सकाळी चार वाहने बंद पडली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. वाहतूक कोंडीची गंभीरता लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविली.

पुणेकरांनी लोणावळा, खंडाळा आणि मावळातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांवर शनिवारपासूनच गर्दी केली होती. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅमच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी गर्दी होती. लोणावळ्यातील टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची या पॉइंटवर, तर गिधाड तलाव, धबधबा, कार्ला, भाजे, बेडसे ही लेणी, पवनाधरण, तुंगार्ली, लोणावळा, वलवन, शिरोता आणि उकसान ही धरणे, लोहगड, विसापूर, कोराईगड, राजमाची, तुंग, तिकोना या गडकिल्ल्यांसह आंदर व नाणे ही मावळातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे भुशी-डॅमकडे जाणाऱ्या मार्गासह लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू कॉलेजजवळील खूनप्रकरणी अटक

$
0
0

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लक्ष्मीनगर परिसरातील शाहू कॉलेजच्या जवळील मैदानात शुक्रवारी रात्री झालेल्या खून प्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिासंनी अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दुर्गेश दिलीप हुंबरे (वय १८, रा. महात्मा फुले वसाहत, दत्तवाडी) याला अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अनिकेत ज्ञानेश्वर साळुंके हा पसार झाला आहे. या घटनेत लक्ष्मण पवार याचा खून झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहू कॉलेजमागील टेकडीवर पवार हा एकटाच दारू पित बसला होता. दोन महिन्यांपूर्वी पवार याने आरोपींना मारहाण केली होती. त्याचा राग या अल्पवयीन मुलांच्या मनात होता. त्यामुळे एकटाच दारू पित असलेल्या पवार याला तिन्ही अल्पवयीन मुलांनी पाहिले. त्यांनी त्यास मारहाण करत शाहू कॉलेजच्या आवारात आणले. त्यानंतर आरोपी दुर्गेश हुंबरे आणि अनिकेत साळुंके यांनाही तेथे बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी पवार याला आणखी दारू पाजली. दारूच्या नशेत असतानाच लाकडी दांडक्याने मारहाण करून आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी हे रेल्वेने मुंबईला पळून गेले. परत रेल्वेनेच पुण्यात येत असताना पोलिसांनी रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे स्थानकावर सापळा लावून सर्वांना ताब्यात घेतले. परंतु, या वेळी पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्याने साळुंके हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मुंबईला जाण्याचा खर्च दहिहंडीसाठी जमा केलेल्या वर्गणीतून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सतीश निकम, हवालदार आजीवन काळे, राजकुमार तांबे, नागनाथ नागरगोजे, रेवनसिद्ध नरोटे, अजित फरांदे, मुकुंद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादाय आयुक्तालय आता ‘ऑनलाइन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात विविध विभागांचे कामकाज एका 'क्लिक'वर सुरू असल्याने आता त्यात धर्मादाय आयुक्तालय देखील मागे नाही. विश्वस्त अर्ज बदल, संस्था, ट्रस्ट नोंदणी आता नागरिकांसह विश्वस्तांना घरबसल्या 'ऑनलाइन' करता येणार असून त्यामुळे आयुक्तालयात त्यांचे हेलपाटे मारणे, वेळ आणि पैसा वाचणार आहे.

कोणतीही संस्था अथवा ट्रस्ट स्थापन करण्यासाठी नागरिकांना धर्मादाय आयुक्तालयात हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नाही. कधी कोणत्या वेळी आपले काम होईल याची शाश्वती नागरिकांसह विश्वस्तांना नाही. एखादा विश्वस्तांचा बदलाचा अर्ज देणे, तो मंजूर करून घेण्यासाठी विश्वस्तांना अनेक वर्ष हेलपाटे मारावे लागल्याचा अनुभव आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी धर्मादाय आयुक्तालयामध्ये 'ई-गव्हर्नन्स' योजना राबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे धर्मादाय आयुक्त शशिकांत साळवे यांच्या आदेशानुसार सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी 'ई-गव्हर्नन्स'चा प्रयोग राबविण्याचा विडा उचलला आहे.

'धर्मादाय आयुक्तालयातील पुणे विभागातील पुणे, सातारा, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यांची कार्यालये एकमेकांना जोडण्यात आल्याने ही कार्यालये 'ऑनलाइन' झाली आहेत. नागरिकांसह विश्वस्तांना आतापर्यंत कोणतीही संस्था, ट्रस्ट स्थापन करण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. धर्मादाय सहआयुक्तालय 'ऑनलाइन' झाल्याने चारही जिल्ह्यातील नागरिकांसह विश्वस्तांना 'ऑनलाइन' पद्धतीने संस्था नोंदणीचे अर्ज भरता येणार आहेत. कागदपत्रांची छाननी देखील 'ऑनलाइन' पद्धतीने केली जाईल. त्यात त्रुटी असल्यास त्यासंदर्भात अर्जदाराला संदेश जाईल. त्यामुळे विश्वस्तांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे,' अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी 'मटा'ला दिली. संस्थांची नोंदणी अथवा त्याचे प्रमाणपत्र देखील विश्वस्तांना 'ऑनलाइन' पद्धतीने थेट मिळणार आहे. त्यासाठी पुन्हा धर्मादाय सहआयुक्तालयात येण्याची गरज नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडी करणारे चौघे जण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढवा रोड येथील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या चौघांना सीसीटीव्हीच्या फुटेजवरून फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्ताफ उर्फ बच्चा इक्बाल बादशाहसाहब पठाण, कृष्णा उर्फ लगाड्या सुरेश लगाडे, हुसेन उर्फ अबु सलीम शेख आणि श्रीकांत उर्फ बाळू पठारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्व आरोपींविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा रोडवर एका फ्लॅटमध्ये ५ ऑगस्ट रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीमध्ये सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या चोरीतील आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर देवकर यांनी या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींपैकी एकाला ओळखले होते. त्यानुसार, फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हे आरोपी बुधवार पेठेतील सपना हॉटेल येथे आले असता, सापळा रचून फरासखाना पोलिसांनी त्याना अटक केली. या सर्व आरोपींविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकाने रोखले पिस्तुल

$
0
0

बारामतीः इंदापूरजवळील टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या रागातून पोलिस निरीक्षकाने पिस्तूल रोखून मारहाण केल्याचा दावा टोलनाक्यावरील तरुणाने केला आहे. या तरुणाला जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून इंदापूर येथे नेण्यात आले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडला.

नवनाथ हरीदास तरंगे (मु. पो. तरंगवाडी, इंदापूर) असे तक्रार देणाऱ्या टोलनाक्यावरील तरुणाचे नाव आहे. या तरुणाने इंदापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यासह स्कॉर्पिओमध्ये बसलेल्या चौघांविरुद्ध पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. निरीक्षक शिंदे हे स्कॉर्स्पिओमधून इतर चौघांसह जात असताना टोल नाक्यावरील तरंगे यांनी चालकाकडे टोल मागितला होता. या वेळी शिंदे हे स्कॉर्पिओमधून खाली उतरले आणि त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरंगे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, ते पाठीमागे धावले तसेच त्यांनी पिस्तूल रोखले. तुला खलास करून टाकतो, असा दम देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तरंगेला स्कॉर्पिओमध्ये बसवले आणि त्याला इंदापूर येथील बाबा चौक येथे नेले. तेथे तरंगे यांना मारहाण करण्यात आली, असा दावा तक्रार अर्जात करण्यात आला आहे. 'शिंदे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे, या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे,' अशी माहिती अप्पर अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकरींनी साधला सुरेश कलमाडींवर निशाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मधल्या काही काळात पुण्याचे नाव घोटाळ्यांसाठी चर्चेत होते. परंतु, आपल्या खासदारकीच्या काळात अनिल शिरोळे अशा प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये पुण्याचे नाव कधीच येऊ देणार नाहीत, आणि पुणेकरांना बदनाम करणार नाहीत, याची ग्वाही मी स्वतः देतो,' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. 'गेल्या २५ वर्षांत झाला नाही असा पुण्याचा विकास शिरोळेंच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत होईल,' असेही त्यांनी सांगितले.

शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. 'शिरोळे हे सच्चे प्रामाणिक, नम्र आणि शालीन कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा गैरप्रकाराचा आरोप आयुष्यात कुणीही करू शकणार नाही, याची खात्री मी देऊ शकतो,' असेही गडकरी म्हणाले.

कॉँग्रेसवर निशाणा साधताना गडकरी म्हणाले, 'आघाडी सरकारने ७० हजार कोटी विमान खरेदीसाठी वापरले. आम्हाला विमानांची नव्हे रस्त्यांची चिंता आहे. विमानाऐवजी शेतकऱ्यांना शेतीसाठी, गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी देता आले असते. आमच्या सरकारचे स्मार्ट शेती, स्मार्ट व्हिलेज, प्रदूषण मुक्त भारताची निर्मिती याला प्राधान्य आहे.'

शिरोळे यांची संसदेत ९९ टक्के उपस्थिती असते. त्यानंतर ते सतत पुण्याच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात पाठपुरावा करत असतात, असेही गडकरी म्हणाले. तर, 'शिरोळे संसदेत इंग्रजीतून प्रश्न विचारून अभ्यासपूर्ण चर्चा करतात,' असे जावडेकर यांनी सांगितले.

भाजपचे 'अष्टप्रधान'

'पुण्यात भाजपचे एक खासदार आणि आठ आमदार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात होते, तसे हे पुण्याचे अष्टप्रधान मंडळच आहे. या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून पुण्याचा विकास होईल. तसेच यापुढे होणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येऊन महापौरही भाजपचा होईल,' असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लष्करामुळे देश सुरक्षित’

$
0
0

खडकी : गेल्या ७० वर्षांत आमच्या देशाचे सैनिक सीमेवर कडक पहारा देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गेल्या देशाच्या सुरक्षिततेविषयी काळजी करावी लागली नाही. कारगिलचे युद्ध, आसाममधील दहशतवाद, तसेच नागालँडमधील अशांतता अशा परिस्थितीत लष्करामुळे शांतता प्रस्तापित होत आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

खडकीतील अपंग कल्याण केंद्रामध्ये रविवारी (१४ आॅगस्ट) आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी खडकी स्टेशन हेडक्वार्टरचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धिरज मोहन, केंद्राचे मेडिकल डायरेक्टर कर्नल आर. के. मुखर्जी, कर्नल प्रशांत महाजन, आमदार विजय काळे उपस्थित होते. देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'आझादी ७०, याद करो कुर्बानी' या कार्यक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ७५ मंत्री देशातील दीडशे भागांमध्ये शहीद जवानांच्या गावाला भेट देत आहेत. त्या अंतर्गत एक कार्यक्रम खडकीच्या अपंग कल्याण केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशातील शेतमालात इंधननिर्मितीची क्षमता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आज आपण देशात ८० टक्के इंधनाची आयात करीत आहोत, यातील पन्नास टक्के इंधन निर्मिती करण्याची क्षमता ही आपल्या देशातील शेतमालातच आहे. त्यामुळे भविष्यात इंधन आणि उर्जा निर्मिती हे शेतीला पूरक ठरू शकतात. त्यामुळे शेतमालाच्या काडीकचऱ्याचा ऊर्जा व इंधन निर्मितीसाठीचा उपयोग हा शेतकऱ्यांबरोबरच देशासाठी फायद्याचा आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.

पुण्यातील प्रायमूव्ह इंजिनीअरिंग या कंपनीने तयार केलेल्या भारतातील पहिल्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन गडकरी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीष बापट, प्रायमूव्ह इंजिनीअरिंगचे कार्यकारी संचालक राजेश दाते, संचालक पुरुषोत्तम शेणॉय, संशोधन आणि विकास विभागाचे संचालक संतोष गोंधळेकर, व्यवस्थापक अतुल अकोलकर, मुख्य वित्तीय अधिकारी विनायक शेणॉय उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, 'पुण्यातील प्रायमूव्ह इंजिनीअरिंग कंपनीने शेतमालाच्या काडीकचऱ्यापासून तयार केलेला 'अॅग्रोगॅस' हा देशाच्या इंधन इतिहासात नोंद घेण्यासारखा प्रयोग आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक नवे साधन तर मिळणार आहेच, याबरोबरच देशाला पर्यावरणपूरक, संपूर्णपणे स्वदेशी इंधन उपलब्ध होणार आहे. देशभरात प्रत्येक गावात एक याप्रमाणे पाच हजार अॅग्रोगॅस प्रकल्प उभारले गेले तर, प्रत्येक गावातील किमान पाचशे नागरिकांना रोजगाराचे साधन मिळेल. इंधन आयातीवर होणारा सात लाख कोटींचा खर्च हा थेट २ ते ३ लाख कोटींवर येईल.'

पर्रीकर म्हणाले, 'कंपनीने तयार केलेले बायो सीएनजी हे एक आनंददायी पाऊल असून भविष्यात इंधन निर्मिती बरोबरच इंधन सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.'

वाहनांसाठी होणार वापर

अॅग्रोगॅस प्रकल्पात शेतीमधील काडीकचऱ्याचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर बायोगॅसचे शुद्धीकरण करून त्याला कॉम्प्रेस करून तो वाहनांमध्ये भरला जाईल. सध्या ज्या वाहनांमध्ये सीएनजी वापरला जातो त्या वाहनांमध्ये काहीही बदल न करता हा बायो सीएनजीही भरता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images