Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

PCMT कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

$
0
0
‘पीएमपीएमएल’मधील पूर्व ‘पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि प्रत्येकी नऊ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी घेतला. याचा लाभ एक हजार ६२२ कर्मचाऱ्यांना होणार आहे.

पुणे विद्यापीठाचेही TV चॅनेल

$
0
0
टिव्हीचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापर करून घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने आता पाऊल उचलले आहे. टिव्हीच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ स्वतःचे टिव्ही चॅनेल सुरू करणार आहे. त्यासाठीचा प्रस्तावही विद्यापीठाने शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राच्या (ईएमआरसी) माध्यमातून केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे.

आता शिका ई-स्कूलमध्ये

$
0
0
शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन आणि पालकांना समावून घेणारी ई-स्कूल सिस्टीम निगडीच्या माता अमृतानंदमयी स्कूलमध्ये सुरू होत आहे. येत्या एक नोव्हेंबरला या ई-स्कूलचे उद्घाटन होत आहे.

डेंगीचा प्रादुर्भाव, अधिकारी फैलावर

$
0
0
शहरात डेंगीच्या साथीचा फैलाव होत असताना अधिकारी मात्र सुस्तावले आहेत. विविध उपाय योजना करताना ते काटकसरीच्या नावाखाली टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी मंगळवारी केला.

अभ्यासासाठी हवा जादा तास

$
0
0
पुणे आणि हिंजवडी आयटी पार्कला जोडणारा दुवा, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत सुविधा पुरविताना होणारी ओढाताण, यामुळे सांगवी परिसरातील नगरसेवकांना अभ्यासासाठी जादा तासाची आवश्यकता भासते आहे. त्याचीच तयारी करण्यात पहिली सहामाही निघून गेली.

परीक्षा विभाग, की तक्रार निवारण केंद्र?

$
0
0
पुढच्या आठवड्यापासून इंजिनीअरिंगची सुरू होणारी परीक्षा लक्षात घेऊन, पुनर्मूल्यांकनासाठी आलेले अर्ज त्या-त्या विषयाच्या परीक्षेपूर्वी निकाली काढण्यासाठी पुणे विद्यापीठ सध्या प्रयत्नशील आहे. मात्र, विद्यार्थ्यांना फोटोकॉपी देण्यामध्ये विद्यापीठाकडून होत असलेला विलंब आणि निकालाविषयी विद्यार्थ्यांकडील अपुऱ्या माहितीमुळे विद्यापीठाचा परीक्षा विभाग सध्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण केंद्रच बनला आहे.

आता कारवाईचा ससेमिरा

$
0
0
फ्लॅटवरील व्हॅल्यू अॅडेड टॅक्सची (व्हॅट) रक्कम मुदतीच्या आत न भरलेल्या बिल्डर्सची खाती गोठविण्याबरोबरच, व्याज आणि दंड आकारण्यात येण्याची शक्यता विक्रीकर विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. जून २००६ ते ३१ मार्च २०१० दरम्यान विकल्या गेल्या फ्लॅटवरील व्हॅट रक्कम भरण्याची ३१ ऑक्टोबर ही शेवटची मुदत होती.

पुणे डेंगीच्या विळख्यात

$
0
0
कसबा, पद्मावती, खराडी, ससाणेनगर, वाघोली, कोंढवा, वानवडी, मांजरी, घोरपडी या भागांतही लागण झाल्याने डेंगीने संपूर्ण शहराला व्यापल्याची माहिती समोर आली आहे. डेंगीची २९ जणांना लागण झाली असून, महिन्याभरात डेंगीचे २६९ पेशंट आढळले आहेत.

दादोजी कोंडदेवांचा पुतळा शहराबाहेर हलविणार?

$
0
0
लाल महालातून हटविण्यात आलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात यावा, असा ठराव महापालिकेत सादर करण्यात आला आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीचा वादग्रस्त विषय पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

डेंगीच्या लक्षणांमध्ये होतोय बदल

$
0
0
अनेक वर्षांपासून अंगदुखी, ताप यासारख्या लक्षणांबरोबर साथ घेऊन येणाऱ्या डेंगीची यंदा लक्षणे बदलल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविली आहेत. पोटात दुखणे, उलट्या होण्याचे वाढते प्रकार डेंगीच्या बदलत्या लक्षणांची पुष्टी देत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

थंडी अल्पजीवी ठरण्याची शक्यता

$
0
0
शहर आणि परिसरात बुधवारी किमान तापमानात अंशतः वाढ होऊनही थंडीचा कडाका कायम होता. परंतु पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळामुळे पुढील दोन-तीन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

हे आहेत अपघाताचे ब्लॅक स्पॉट...

$
0
0
अपघातांसाठी कुख्यात असलेली काही नेहमीची ठिकाणे केंद्रीय रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने निश्चित केली असून, ते ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल हायवे क्रमांक चारवरील लोणावळा ते कोल्हापूरजवळच्या टोप गावांदरम्यानच्या वाहत्या रस्त्यावर असे आठ ‘ब्लॅकस्पॉट’ निश्चित करण्यात आले आहेत.

करणच्या लग्नाची गोष्ट

$
0
0
बॉलिवुडमध्ये ‘मोस्ट बॅचलर’ कलाकारांमध्ये आता करण जोहरचंही नाव समाविष्ट झालंय. इतक्या उशीरापर्यंत लग्न का केलं नाही, हे वाचा खुद्द करणकडूनच...

थंडीने गाठला बाराचा पारा...

$
0
0
शहर आणि परिसरात मंगळवारी किमान तापमानात मोठी घट झाली. गेल्या दोन दिवसांपासून १७ अंशांवर असलेला पारा १२.७ अंशांवर स्थिरावला. राज्याच्या बहुतांश भागांत थंडीचे प्रमाण वाढले असून, नाशिक येथे नीचांकी ११.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. थंडीचा हा कडाका तात्पुरता ठरण्याची शक्यता असून, पुढच्या दोन दिवसांत पुन्हा ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यताही असल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

पिस्तुल बाळगल्याने अटक

$
0
0
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या टोळीतील एकाला बनावट पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी हा आदेश दिला.

मतदार नोंदणीसाठी आता २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

$
0
0
मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठीची मुदत राज्य निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. एक जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मतदारयादीत नव्याने नाव नोंदविण्यासाठी; तसेच त्यात काही सुधारणा करण्यासाठीची मोहीम निवडणूक आयोगाने एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले होते.

संगीत नाट्य अकादमी स्थापन करण्याची मागणी

$
0
0
बालगंधर्व संगीत नाट्य मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संगीत नाट्यपरिषदेमध्ये संगीत नाटकांकडे पाठ फिरवणारे प्रेक्षक, शासनाची अनास्था, कलाकारांना मिळणारे कमी मानधन आणि भेडसावणाऱ्या समस्या या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या समस्यांवर मात करण्यासाठी संगीत नाट्य अकादमीची स्थापना करावी असे मत पंडित रामदार कामत यांनी चर्चासत्रामध्ये मांडले.

जप्तीचा होर्डिंगधारकांना इशारा

$
0
0
थकबाकीतील नवा पैसाही न भरणाऱ्या होर्डिंगधारकांविरोधात आता पुणे कॅन्टोमेंट बोर्डाने कडक पावले उचलली आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास नव्या वर्षात जप्तीची कारवाई करण्याचा इशारा बोर्डाने ‌दिला आहे. त्यामुळे दोन महिन्यांत सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.

मनमानी हमाली घेण्यास सुरुवात

$
0
0
बोगस हमालांना मार्केट यार्डाच्या आवारात फिरकू न देण्याचा इशारा बाजार समितीने दिल्यानंतरही या हमालांकडून जादा हमाली घेतली जात असल्याचे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. या हमालांनी आता एक पोत्यासाठी १५ रुपये मनमानी हमाली घेण्यास सुरू केली आहे. बेकायदा हमाली आकारणाऱ्या लोकांबाबत तक्रारी आल्या नाहीत, असे समितीने स्पष्ट केले.

‘जेईई-मेन’चे अर्ज ८ नोव्हेंबरपासून ‘ऑनलाइन’

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘जेईई-मेन’ या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षेचे अर्ज ८ नोव्हेंबरपासून ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरायचे आहेत. ‘जेईई-मेन’साठी तयार करण्यात आलेल्या www.jeemain.nic.in या नव्या वेबसाइटवर ही माहिती दिली असून, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फॉर्म भरण्यासाठी पुण्यात तीन मदत केंद्रे जाहीर केली आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images