Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कुत्र्यामुळे भांडण; तरुणाचा बळी

$
0
0

कुत्र्यामुळे भांडण; तरुणाचा बळी

म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर

कुत्रा भुंकला म्हणून झालेल्या भांडणात नाहक एका तरुणाला जीव गमवावा लागला. हडपसर परिसरातील डवरीनगर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. या वेळी झालेल्या दंगलीत महिलांनाही मारहाण झाली. पोलिसांनी या भांडणाची दखल वेळीच घेतली असती, तर या तरुणाचा जीव वाचू शकला असता.

सागर नामदेव चौगुले (वय २३, रा. डवरीनगर, हडपसर) असे तरुणाचे नाव आहे. गोरख लोंढे, उमेश खंडागळे आणि नागेश जगताप (सर्व रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी गणेश वाबळे (वय २५), प्रदीप करपे, इतर सहा-सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींच्या मारहाणीत सनी चौगुले, संदीप शिंदे, केसराबाई शिंदे, शकुंतला सावंत जखमी झाल्या आहेत. नीलेश प्रकाश शिंदे (वय २६, रा. डवरीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भांडणाचा हा प्रकार डवरीनगर येथील लोखंडी पुलाजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडला होता.
तक्रारदार शिंदे बुधवारी सायंकाळी सार्वजनिक शौचालयाकडे चालले होते. त्या वेळी वाबळे याचा पाळीव कुत्रा त्यांच्यावर भुंकला. शिंदे यांनी त्या कुत्र्याला हाकलले. त्या वेळी वाबळे याच्या आईने शिंदे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हे भांडण सुरू असताना वाबळे तेथे आला आणि त्याने शिंदे यांना शिवीगाळ केली. शिंदे यांनी हडपसर पोलिस ठाणे गाठले आणि त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

दरम्यान, शिंदे, भाऊ शिंदे, संदीप शिंदे असे डवरी वस्तीसमोरील लोखंडी पुलाजवळ उभे होते. त्या वेळी वाबळे आ​णि त्याचे साथीदार दुचाकींवर तेथे पोहोचले. ते मारहाण करण्याच्या इराद्याने येत असल्याचे पाहून शिंदे बंधू तेथून निघून गेले. त्या वेळी वाबळे यांनी शिंदे यांची चुलत मावशी शालन ठाकरे यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे लक्षात येताच वाबळे आणि त्याचे साथीदार तेथून पळून गेले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले; तेथे थोडा वेळ थांबले, मात्र वाबळे न सापडल्याने निघून गेले. त्यानंतर वाबळे पुन्हा आपल्या साथीदारांसमवेत तेथे वस्तीवर पोहोचला. त्या वेळी त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी सागर चौगुले हाणामारी सोडवण्यासाठी गेला असता त्यालाच लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी काही महिलांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट पोलिसांच्याच दुचाकीला लाथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नो-एंट्रीतून आलेल्या तरुणीला वाहतूक पोलिसांनी थांबवल्याचा राग अनावर झाल्याने तिने थेट वाहतूक पोलिसांच्या दुचाकीलाच लाथ मारली आणि ती ढकलूनही दिली. फर्ग्युसन रोडवर (नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता) गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती. तिच्या या रुद्रावतारामुळे वाहतूक पोलिसांची दुचाकी रस्त्यावर पडली, तिचे इंडिटेकर तुटले, हँडलही बेंड झाला.

वाहतूक पोलिसांसोबत सुरू असलेल्या या वादाचे पर्यवसान तरुणीकडून अर्वाच्च भाषेत संवाद साधण्यापर्यंत गेले. हा प्रकार पाहण्यासाठी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीमुळे फर्ग्युसन रोडवर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ सरकारी वाहन बोलावले आणि तिला त्यात बसवून डेक्कन पोलिस ठाण्यात नेले.

एका छोट्या फायनान्स कंपनीची मालक असलेली ३५ वर्षांची तरुणी आणि वाहतूक पोलिसांत झालेला हा 'सामना' फर्ग्युसन रोडवर चर्चेचा विषय ठरला होता. ही तरुणी हॉटेल वैशालीशेजारील लेनमधून फर्ग्युसन रोडवर आली होती. आपटे रोडवरून या गल्लीतून फर्ग्युसन रोडवर येण्यास मनाई आहे.

नो-एंट्रीतून आलेल्या या तरुणीला वाहतूक पोलिसांनी थांबवले आणि तिच्या दंडाची कारवाई करण्यास सुरुवात केली. या वेळी झालेल्या वादातून​ तिने वाहतूक पोलिसांच्या दुचाकीचे नुकसान केले आणि त्यांच्यावर अर्वाच्च भाषेचा वर्षावही केला.
​वाहतूक पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या तरुणीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उशीर झाला होता. पर्यायाने तिला नोटीस बजावून शुक्रवारी पुन्हा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ९ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील बालेवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळून ९ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.

बालेवाडी परिसरात 'पार्क एक्स्प्रेस' या १४ मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास १४व्या मजल्यावर स्लॅब ठोकण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी स्लॅब कोसळला. त्याखाली सापडून ९ बांधकाम मजुरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की काही मजूर १४व्या मजल्यावरून थेट खाली फेकले गेले.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी लगेचच तिथं धाव घेतली. तसंच, पोलिसांनाही कळवण्यात आलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: अकरावी प्रवेशाची विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी सर्व प्रकारच्या तक्रारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार आणि मंगळवारी (१ आणि २ ऑगस्ट) पुन्हा नव्याने महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदविण्याची संधी मिळणार आहे. त्याआधारे ४ ऑगस्टला नवी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने आज, शुक्रवारी रात्री पाचव्या एकत्रित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात दूरच्या अंतरावरील महाविद्यालये मिळालेली, 'बेटरमेंट' घेऊन बाहेर पडलेले, प्रवेश रद्द केलेले, प्रवेश न घेतलेले, शाखा बदलून हवी असलेले, कॉलेजांच्या पसंतीचा चुकीचा क्रम नोंदवलेले, अन्य कोणत्याही कारणाने महाविद्यालय बदलून हवे असलेले आणि अद्याप महाविद्यालय निश्चिती न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या पाचव्या फेरीचे सविस्तर नियोजन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (३० जुलै) महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा तपशील http://pune.fyjc.org.in या वेबसाइटवर जाहीर होणार आहे. त्यातील रिक्त जागांच्या आधारावर विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरताना किमान पाच, तर कमाल १५ पसंतीक्रम नोंदविण्याची संधी समितीने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जुन्याच लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या आधारे विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतील. सर्व विद्यार्थ्यांना ४ आणि ५ ऑगस्टला महाविद्यालयांमधील प्रवेश अंतिम करणे गरजेचे असेल.

प्रक्रियेबाहेरील विद्यार्थ्यांसाठी...

अद्याप प्रक्रियेतच सहभागी न झालेल्या, अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठीही या फेरीतून प्रवेश निश्चितीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी १ आणि २ ऑगस्टला नव्याने माहिती पुस्तिका घेऊन, त्याआधारे अर्जाचे दोन्ही भाग पूर्ण करणे गरजेचे असेल. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ८ ऑगस्टला जाहीर होईल. त्या आधारे विद्यार्थ्यांनी ८ आणि ९ ऑगस्टला प्रवेश घेणे आवश्यक असेल. त्यानंतरच्या टप्प्यातील विशेष फेरीसाठीच्या रिक्त जागांचा तपशील १० ऑगस्टला जाहीर होणार असल्याचे प्रवेश नियंत्रण समितीने जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण तलावाला फायरमनचे नाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील जलतरण तलावाला दिवंगत फायरमन बाळासाहेब लांडगे यांचे नाव देण्यात येणार असून, येथील २४ मीटर रस्त्याला दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम उद्या, रविवारी होणार आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागातून १९९९मध्ये फायरमन पदावरून निवृत्त झालेले बाळासाहेब बबन लांडगे यांचे नाव जलतरण तलावाला देण्यात येणार आहे. विहीर असो किंवा नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात लांडगे यांचा हातखंडा होता. त्यामुळे उद्यान विभागात नियुक्ती असूनही विशेष बाब म्हणून त्यांची अग्निशमन विभागात बदली करण्यात आली होती. पाण्यात खोलवर आणि लांब पल्ल्यात कसे पोहायचे, याचे प्रशिक्षणही त्यांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यांचा आठवणींना उजाळा म्हणून जलतरण तलावाला नाव देण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेवक नितीन लांडगे यांनी सांगितले.

एव्हरेस्ट मोहिमेवर असताना गिर्यारोहक रमेश गुळवे यांचा २०१२मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी भोसरी सहल केंद्रासमोरील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेने बुजवले १४०० खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पावसाने काहीशी उघडीप देताच पिंपरी-चिंचवडमधील खड्डे बुजवण्याच्या कामाने वेग घेतला असून, आजपर्यंत सुमारे दीड हजार खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी शुक्रवारी केला.

शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय व्हॉट्सअॅप क्रमांकही जाहीर केले. त्यामुळे स्थापत्य विभाग अंमलबजावणीसाठी सरसावला. शहरात २० जुलैअखेर सुमारे एक हजार ६४७ खड्डे आढळले. त्यापैकी एक हजार ४०८ खड्डे बुजवण्यात आले. त्यासाठी खडी, डांबर, मुरूम, पेव्हिंग ब्लॉक या पद्धतीचा अवलंब करण्यात आला, असे चव्हाण यांनी सांगितले. व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केल्यानंतर गेल्या आठ दिवसांत केवळ २७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी आठ खड्डे बुजवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खड्डे बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदारांचे सहकार्य घेण्यात येत असून, यापुढील काळात स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करून चव्हाण म्हणाले, 'नागरिकांनी व्हॉट्सअॅप क्रमांकावर खड्ड्याची तक्रार नोंदवताना खड्ड्याच्या जवळचे मुख्य ठिकाण (लँडमार्क) स्पष्टपणे नमूद करावा. त्यामुळे खड्डा शोधून तो बुजवण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यास मदत होईल. नागरिकांनी खड्ड्यांच्या तक्रारीसाठी 'सारथी'चा पर्यायही उपलब्ध आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिपॅटायटिस रोगाबाबत जनजागृती व्हायला हवी’

$
0
0

पुणे : 'हिपॅटायटिस विकाराबद्दल आजही समाजामध्ये आवश्यक जागृती झालेली नाही. या आजाराला गांभीर्याने घेतले जात नाही. स्वयंसेवी संस्थांनी या जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी होऊन नागरिकांना वेळोवेळी तपासणी आणि निदान करून घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे,' असे आवाहन पोटविकार आणि यकृततज्ज्ञ डॉ. नचिकेत दुबळे यांनी केले. जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त सदाशिव पेठेतील 'पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर'तर्फे 'हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी' या विषयावर डॉ. दुबळे यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

'भारतात एकूण लोकसंख्येच्या पाच ते सात टक्के म्हणजे तीन ते चार कोटी लोक 'हिपॅटायटिस बी'ने, तर १.२५ कोटी लोक 'हिपॅटायटिस सी'ने बाधित आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी तपासणी आणि निदान करून घेणे आवश्यक आहे. 'हिपॅटायटिस बी'साठी प्रभावी लस उपलब्ध आहे. ती प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनेही केले आहे. हिपॅटायटिस बी हा संसर्गजन्य विकार इंजेक्शन, रक्त, थुंकी, लाळ, शारीरिक संबंधाच्या माध्यमातून, तर हिपॅटायटिस सी हा बाधित व्यक्तीच्या स्वच्छता साधनांचा वापर केल्यामुळेदेखील प्रसारित होतो,' असे सांगून डॉ. दुबळे यांनी या आजारावरील उपयांची माहिती दिली. या वेळी हिपॅटायटिस बी आणि सी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे ४०० जणांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यानंतरचे आवश्यक उपचार आणि इतर औषधोपचारांकरिता हॉस्पिटलतर्फे सवलतीचे कुपनदेखील देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘...तरच पुढच्या पिढीला चांगले संस्कार’

$
0
0

पुणे : 'आपल्या धर्मात कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य दिले आहे. जुन्या पिढीतील लोकांनी आचार, धर्मपालन, श्रद्धा, वात्सल्य, भक्ती असे सर्व प्रकारचे जीवन व्यतीत केले. परंतु सध्याच्या पिढीत याची कमतरता दिसत आहे. त्यांच्यातील वात्सल्य, प्रेम कमी होत असून, पैशाला जास्त महत्त्व दिले जात आहे. आपण कर्तव्याचे, धर्माचे पालन केले, तर हे जीवन आनंददायी होईल आणि यातूनच पुढच्या पिढीला चांगले संस्कार देता येऊ शकतात,' असे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती (फुलगाव) यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत म्हसोबा मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती (फुलगाव) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. या वेळी कसबा संस्कार केंद्राचे अनिल दिवाणजी, नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे, शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र शिंदे, पीयूष शहा, कुमार रेणुसे, संजय थोरात, ट्रस्टचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, 'इमारत बांधताना पाया भक्कम असेल, तर ती इमारत व्यवस्थित उभी राहते. त्याप्रमाणेच आपल्या जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी आचरण, धर्मपालन, श्रद्धा, वात्सल्य, आनंदी वृत्ती असली पाहिजे. शांती आणि आनंद आपल्या अंतरात आहे. तो शोधण्याचा प्रयत्न करा. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज असतेच. परंतु शांती व आनंदी जीवनाचीदेखील गरज असते. आनंदी जीवनापुढे ऐश्वर्य, संपत्ती गौण ठरते. धर्माचे पालन व आई-वडिलांची सेवा करा, तरच आपले जीवन आनंददायी होईल.'

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव दोन ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. उत्सवानिमित्त एक ऑगस्टला ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धा होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी भूषण पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, रांका ज्वेलर्सचे संचालक ओमप्रकाश रांका, 'प्रवीण मसालेवाले'चे संचालक विशाल चोरडिया, खारवडे म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके-मारणे आणि पत्रकार सुनील जगताप यांना देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साजिरा, गोजिरा श्रावण आला

$
0
0

निसर्गोत्सवी महिन्याच्या स्वागतासाठी महिलावर्ग सज्ज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आषाढ महिना संपत आल्याने महिलांना वेध लागले आहेत श्रावणापासून सुरू होणाऱ्या सण-समारंभांचे. श्रावण आला, की व्रतवैकल्ये सुरू होतात आणि टप्प्याटप्प्याने गणपती, नवरात्र आणि दिवाळीपर्यंतच्या आनंदोत्सवाची मालिका सुरू होते. पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या श्रावणाच्या आगमनाचे वेध लागल्याने मंदिरांबरोबरच घरोघरी व्रतवैकल्यांचे नियोजन सुरू झाले आहे.

पूर्वजांनी हिंदू संस्कृतीची, सण-समारंभांची सांगड निसर्गाच्या ऋतुचक्राशी घातली आहे. उन्हाळ्यात काहीसा रुक्ष झालेला निसर्ग पावसाळ्याची चाहूल लागल्यावर बहरत जातो. आषाढ संपेपर्यंत या निसर्गाने हिरवा शालू परिधान करून एक नवे रूपच जणू धारण केलेले असते. याच वेळी हिंदू धर्मातील सणांचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि वातावरणही हळूहळू आल्हाददायक वाटायला लागते. आषाढ संपला, की ऊन-पावसाचा, माहेरवाशिणी आणि सासुरवाशिणींचा, भावा-बहिणींचा, उपासतापासांचा महिना अशी विविधांगी ओळख असलेला श्रावण येतो. या महिन्यातील प्रत्येक वाराबरोबर व्रतवैकल्यांचे नाते जोडण्यात आले आहे.

येत्या बुधवारपासून श्रावण महिना सुरू होतो आहे. त्यामुळे श्रावणी शुक्रवारच्या व्रताने या महिन्याला सुरुवात होणार आहे. मग पुढे श्रावणी सोमवारी श्रीशंकराच्या मंदिरात शिवामूठ अर्पण आणि उपवास, तर दुसऱ्या दिवशी नवविवाहितांच्या घरात मंगळागौरीचे खेळ रंगणार आहेत. बदलत्या काळानुसार सण-समारंभ मागे पडत आहेत, असे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात हे सण साजरे करण्याची लाट पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. एरव्ही नातेवाइकाशी संवाद साधायलाही वेळ मिळत नाही, म्हणून सणांच्या निमित्ताने आवर्जून स्नेहमेळावे घेण्याची मानसिकता वाढते आहे. याचे उत्तम उदारहरण म्हणजे आता अनेक महिला मंगळागौर खास हॉल घेऊन साजरी करीत आहेत.

श्रावणातील महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. खऱ्या नागाच्या पूजेवर कायद्याने बंदी आली असली, तरी महिलांनी आता नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यास सुरुवात केली आहे. श्रावणातला बुधवार, गुरुवार आणि शनिवारालाही विशेष महत्त्व आहे. गुरुवारी अनेक महिला बृहस्पतीची पूजा करतात. कापसाची, आघाड्याची माळ घालून जिवतीचे पूजन करतात. लहान मुलांना औक्षण करतात. श्रावणी शनिवारला संपत शनिवार म्हणतात. त्या दिवशी मारुतीची उपासना करतात. कृष्ण जन्माष्टमी हा श्रावणातील मोठा उत्सव. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये मोठ्या भक्तीने हा सोहळा साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी दही, दूध, पोहे यांचा काला करतात. दहीहंडी फोडतात. गणेशोत्सवाप्रमाणेच जल्लोषात सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची लाट सध्या आली आहे. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धांची संख्याही वाढते आहे.

श्रावणातील नारळी पौर्णिमा हा समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा सण. ही मंडळी पौर्णिमेला सागराची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. शहरातील मंडळी ती पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. जाते. बहीण-भावाचे नाते दृढ करणारा, श्रेष्ठ व पारंपरिक सांस्कृतिक महत्त्व असलेला हा सण उत्साहात साजरा केला जातो.

विशेष म्हणजे श्रावणातील शेवटचा दिवस असलेल्या अमावास्येलाही पूर्वजांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे. या दिवशी शेतकरी बैलपोळा सण साजरा करतात. वर्षभर शेतीची कामे करणारा बैल म्हणजे शेतकऱ्यांचे दैवत. त्यावरून शेतकऱ्यांचे प्राण्यांवरील प्रेमाचे दर्शन होते. पूर्वजांनी श्रावण महिन्यात कुटुंबातील प्रत्येक नात्याचे पैलू उलगडणाऱ्या आणि नातेसंबंध दृढ करणाऱ्या सणांची रचना केली आहे. अशा या श्रावण महिन्याचा निसर्गोत्सव पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगडाचा ठेकेदार काळ्या यादीत

$
0
0

राजगडाचा ठेकेदार काळ्या यादीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राजगडाच्या पद्मावती माचीवरील ऐतिहासिक सदरेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने ठेकेदार अरुण लांजेवार यांना पुरातत्त्व विभागाने काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले आहे. त्यामुळे सदरेचे काम स्थगित असून नव्याने अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी कळविले आहे. राजगडावरील वास्तूंचे आणखी विद्रूपीकरण न होता गडावरील संवर्धनाची कामे ऐतिहासिक पद्धतीने व्हावीत, यासाठी दुर्गसंवर्धन समितीने पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने गडासाठी मास्टर प्लॅनही तयार केला आहे.
राजगडाचे नाव संभाव्य जागतिक वारसास्थळ (हेरिटेज साइट) म्हणून सुचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजगडावरील सदरेसह पद्मावती माचीवरील राजवाड्याचे तळे ते पाली दरवाजा या तटबंदीचे काम पुरातत्त्व विभागाने चुकीच्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे तटबंदीचे विद्रूपीकरण झाले आहेच; मात्र महाद्वाराच्या बुरूजांवरील दगडी पाकळ्यांच्या जागी सलग बांधकाम केल्याने त्याच्या सौंदर्यालाही बाधा आली आहे. गडावरील मंदिरांमध्ये स्थानिकांनी भजी आणि पिठलं-भाकरीची हॉटेल्स थाटल्याने गडावर प्लास्टिकचे ग्लास, ताटे असा कचराही वाढू लागला आहे. हा कचरा राजरोसपणे गडाच्या तटावरून भिरकावला जातो आहे. ही गडाची वस्तुःस्थिती 'राज'वैभव लुप्त होतेय या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या बुधवार, २७ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाली होती.
या वृत्ताची दखल घेत पुरातत्त्व विभागाने सदरेच्या कामात अनियमितता असल्याने अरुण लांजेवर यांच्याकडून काम काढून घेतल्याचे कळविले आहे. गडावर नव्याने बांधलेल्या तटबंदीवर कोपिंगचे काम बाकी असल्याचा; तसेच हे काम पूर्ण झाल्यावर ते मूळ तटबंदीस अनुरूप होईल, असा दावा पुरातत्त्व विभागाने केला आहे. गडावरील पद्मावती मंदिराचे आवार, रामेश्वर मंदिर तसेच पहारेकऱ्यांच्या देवड्यांमध्ये कोणालाही हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी नाही, असे करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची ग्वाहीही देण्यात आली आहे. नव्याने अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून राजसदरेचे उर्वरित काम हाती घेतले जाईल, असेही वाहणे यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमले तर चित्र, हे मत चुकीचे

$
0
0

जमले तर चित्र, हे मत चुकीचे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शब्द नसलेले चित्र आव्हानात्मक आहे. शब्दविरहित चित्र भाषिक सीमा ओलांडते. चित्रकलेचे व्याकरण समजल्याशिवाय आशयपूर्ण चित्र व व्यंगचित्र रेखाटता येत नाही. जमले तर चित्र अन्यथा व्यंगचित्र, ही व्याख्या चुकीची असून हे चुकणंच अवघड आहे...' अशा भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केल्या.
फडणीस यांनी शुक्रवारी ९२ व्या वर्षात पदार्पण केले. फडणीस यांचा वाढदिवस मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे केक कापून छोटेखानी समारंभात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. फडणीस यांच्या पत्नी शकुंतला फडणीस, व्यंगचित्रकार चारुहास पंडित या वेळी उपस्थित होते.
'व्यंगचित्रामध्ये निखळ आनंद, भाषा, आशय याला महत्त्व आहे. शब्दविरहित व्यंगचित्राचे महत्त्व अधिक आहे. शब्द पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी चित्र पोहोचते. त्यामुळे चित्राचे व व्यंगचित्राचे स्थान काय, याचा विचार व्हायला हवा,' अशी अपेक्षा फडणीस यांनी व्यक्त केली.
मिरासदार म्हणाले, 'स्वत:चे स्वतंत्र नाणे काढणारा राजा वेगळा मानला जातो, तसेच स्वतंत्र शैली असणारा कलावंत वेगळा मानला जातो. वेगळेपण हे 'शिदं'चे मर्मस्थान आहे.' प्रास्ताविक वैभव गोडसे यांनी केले. सूत्रसंचालन आभा तळवलकर यांनी केले. सुनील मेहता यांनी आभार मानले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ दुकानात कात्रज येथे चोरी

$
0
0

सराफ दुकानात कात्रज येथे चोरी

पुणे ः कात्रज परिसरातील दत्तनगर येथील विकास ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी सात तोळे सोने व पाच किलो चांदी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश चोटीलाल शर्मा (रा. दत्तनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तनगर परिसरात शर्मा यांचे विकास ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून गेले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून प्रवेश केला. दुकानातील सात तोळे सोन्याचे दागिने आणि पाच किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. सकाळी शटर उचकटलेले दिसल्याने शेजारच्यांनी शर्मा यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुकानाला सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींची माहिती मिळू शकलेली नाही; तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व सराफ व्यवसायिकांची बैठक घेऊन त्यांना सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही शर्मा यांनी त्याची अंमलबजाणी केलेली नव्हती. दुकानात असलेले दागिने त्यांनी तिजोरीत ठेवलेले नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता

$
0
0

सोमवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता
पुणे ः शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाच्या काही हलक्या सरींनी हजेरी लावली. रात्री साडेआठपर्यंत १.८ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढील दोन दिवसांत पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता असून, सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने त्यानंतर विश्रांती घेतली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत अधूनमधून तुरळक स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत असला, तरी त्याला जोर नाही. गुरुवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. शुक्रवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास काही मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. त्यानंतर, रात्रीपर्यंत थांबून थांबून एक-दोन सरी पडत होत्या. पुढील एक-दोन दिवसांतही असाच तुरळक ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

$
0
0

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यंदा ऑक्टोबर महिन्यापासून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाने जवळपास दोन महिने अगोदरच जाहीर केली आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा, तसेच पालकांनाही 'मुहुर्तां'चे नियोजन करणे सोयीचे जावे, या दृष्टीने विद्यापीठाचे हे पाऊल स्वागतार्ह ठरण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या वेबसाइटवर या वेळापत्रकांची सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. या माहितीनुसार विद्यापीठाने कला, ललितकला आणि प्रयोगजीवी कला शाखेमधील सहा, कॉमर्स आणि लॉ विद्याशाखेमधील प्रत्येकी १२, शिक्षणशास्त्र आणि इंजिनीअरिंग विद्याशाखेमधील प्रत्येकी ४, सामाजिक शास्त्र विद्याशाखेमधील ८, शारीरिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील ३ आणि विज्ञान विद्याशाखेतील एकूण १५ परीक्षांची वेळापत्रके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. व्यवस्थापन, तसेच इंजिनीअरिंग विद्याशाखेतील उर्वरीत परीक्षांची वेळापत्रकेसुद्धा विद्यापीठ लवकरच जाहीर करणार असल्याचे विद्यापीठाकडून शुक्रवारी सांगण्यात आले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा मार्चमध्ये झालेल्या परीक्षांचे निकालही दरवर्षीपेक्षा बरेच अगोदर जाहीर केले. इंजिनीअरिंगचा दरवर्षीचा निकालही यंदा महिनाभराच्या काळातच जाहीर झाला. त्यासाठी विद्यापीठाने नियोजनपूर्वक कार्यक्रम आखल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा ऑक्टोबरचे वेळापत्रक खूप अगोदर जाहीर करण्यासाठीही विद्यापीठाने असेच नियोजन केल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी 'मटा'ला सांगितले. वेळापत्रक जाहीर झाले असल्याने आता आपले अभ्यासक्रम नेमके कधीपर्यंत पूर्ण करायचे, त्यासाठी काय नियोजन करायचे, याची पुरेशी कल्पना प्राध्यापकांना वेळेआधीच मिळणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांनाही निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास डॉ. गाडे यांनी व्यक्त केला. विद्यापीठाने यंदा स्वतः पुढाकार घेत, केलेले हे नियोजन या पुढील काळात सातत्याने वापरले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना बांधकाम भोवले

$
0
0

बालेवाडीतील 'पार्क एक्स्प्रेस'मधील घटना; तेराव्या मजल्याचा स्लॅब कोसळला

म. टा. प्रतिनिधी, पुणे/औंध
बालेवाडी येथील हायस्ट्रीटवरील 'पार्क एक्स्प्रेस' या उच्चभ्रू सोसायटीचे बांधकाम सुरू असताना तेराव्या मजल्याचा स्लॅब कोसळून नऊ कामगार मृत्युमुखी पडले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पडली. इमारतीच्या तेराव्या मजल्याच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी नसल्याचे उघड झाले आहे.
स्लॅबचे काम सुरू असताना अचानक सळल्याने तेथे काम करणाऱ्या १४ कामगारांपैकी नऊ कामगार फेकले गेले. त्यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला; तर एकाचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. उर्वरित पाच कामगारांपैकी दोघे जण किरकोळ जखमी झालेत. याच साइटवर आणखी तीन सुपरवायझर काम करत होते. ही घटना पाहणाऱ्यांनी तत्काळ पोलिस तसेच महापालिकेला त्याविषयी कळवले. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले.
लखन मोहन सहा (वय ४५, समस्तीपूर, बिहार) सर्वन रवींदर सहा (वय ३५, रा. बालूपूर, मोहकीनगर, समस्तीनगर बिहार), वरुण सीकुमार सिंग (वय २३, रा. मोहतीनगर, समस्तीनगर, बिहार), मुन्ना बोनू पासवान (वय २२, रा. मोईसुद्दीन नगर, बिहार), विजय रामकरण पासवान (वय २७, रा. विद्यापती नगर, बिहार), करण रवींदर सहा (वय २६, रा. मोहद्दीननगर, बिहार), वसंत गणोरी सहा (वय २७, रा. वच्छवारा, बिहार), बिपीन जयकुमार ठाकूर (वय २०, रा. बिहार) आणि तुफान बोऱ्हन सहा (वय २६, रा. विद्यापती, बिहार) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. येथे सुपरवायझर संतोष चव्हाण आणि भावीन साहा कामाची देखरेख करीत होते. इमारतीच्या १३ मजल्यावरील बाल्कनीच्या स्लॅबचे काम करण्यात येत होते. हा स्लॅब कोसळल्यावर त्यावर काम करणारे १४ पैकी नऊ कामगार खाली जमिनीवर कोसळले आणि त्यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. एका कामगाराने चपळाईने लोखंडी रॉडला धरून ठेवले. उर्वरित कामगारांनी त्याला ओढून बाहेर काढल्याने तो बचावला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावरील राडारोडा बाजूला काढण्यास सुरुवात केली. दरम्यान स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी औंध तसेच ससून हॉस्पिटलमध्ये पाठविले. पालिका अधिकाऱ्यांनी अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटताच प्रशासनही वेगाने हलले.
..
महापौरही घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच महापौर प्रशांत जगताप, आयुक्त कुणाल कुमार, औंध प्रभाग अध्यक्षा संगीता गायकवाड, विधी समिती अध्यक्ष कैलास गायकवाड, नगरसेवक बाबूराव चांदेरे, रंजना मुरकुटे, रोहिणी चिमटे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अमोल बालवडकर, प्रल्हाद सायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तेराव्या मजल्याचे बेकायदा बांधकाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बालेवाडी येथील 'पार्क एक्सप्रेस' इमारतीच्या तेराव्या मजल्याचे काम बेकायदा असल्याचे पुढे आले आहे. महापालिकेने या इमारतीच्या बारा मजल्यांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र, तेथे विनापरवानगी तेराव्या मजल्याचे काम बेकायदा सुरू असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
पालिका हद्दीतील बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ५मध्ये पार्क एक्सप्रेस या बहुमजली गृहसंकुलातील एकूण पाच इमारतींच्या बांधकामास पालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगी दिलेली आहे. त्यामधील के-एल आणि एम-एन या विंगच्या दोन इमारतींचे बांधकाम सुरू होते. त्यामधील एम-एल या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील स्लॅबचे काम सुरू असताना काही भाग शुक्रवारी सकाळी कोसळला. या दुर्घटनेत नऊ कामगारांना आपला जीव गमवावा लागला. ज्या मजल्याचे काम सुरू होते, त्याची परवानगी घेण्यात आली नाही. बेकायदा पद्धतीने हे काम सुरू असल्याचे कुमार म्हणाले.
इमारतीला तळमजला अधिक बारा मजल्यांचे नकाशे मंजूर होते. त्याचे आरसीसी, वीट बांधकाम प्लास्टर काम पूर्ण झाले आहे. मात्र, तेराव्या मजल्याचे स्लॅबचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करून बांधकाम व्यावसायिकाला आणि आर्किटेक्टला काम थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच, यामध्ये महापालिकेचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा बांधकामे ठरताहेत जीवघेणी

$
0
0

महापालिकेसह यंत्रणांचा सोयीस्कर काणाडोळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बालेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बेकायदा बांधकामे जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहर आणि उपनगरांमध्ये सर्रास बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले असताना महापालिकेच्या सर्वच यंत्रणा याकडे काणा डोळा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांधकाम प्रस्ताव दाखल करून परवानगी मिळण्यापूर्वीच सर्रास बांधकाम केले जात असल्याचे प्रकार शहरात वेळोवेळी उघडकीला येऊनही महापालिकेचा बांधकाम विभाग त्याकडे काणा डोळा करत असल्याचे दिसून आले आहे. मूळ प्रस्ताव मान्य झाल्यानंतर पालिकेकडे वाढीव बांधकामाचा प्रस्ताव (रिवाइज) दाखल करू मंजुरी मिळेल, या आशेवर अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना बांधकाम निरीक्षक बघ्याची भू​मिका घेत असल्याने यंत्रणांची भीती राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
चुकीच्या पद्धतीने काम सुरू असताना दुर्घटना घडल्यास पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांकडून दिले जाते. प्रत्यक्षात मात्र, संबधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. दुर्घटना घडल्यानंतर काही दिवस चर्चा होते, पण नंतर 'ये रे माझ्या मागल्या' अशीच स्थिती होते. बेकायदा इमारत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदाची नोंदणी रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे इशारे देण्यात येतात. प्रत्यक्षात आजवर कोणताही बांधकाम व्यावसायिक तसेच आर्किटेक्टवर कारवाई करण्याची हिंमत प्रशासनाने दाखविलेली नाही. बळींचे कुटुंबीय किंवा जखमींना मदत जाहीर होते; त्यापैकीही अनेकांना कागदपत्रांची मागणी करून पालिकेत खेटे मारण्यास भाग पाडले जाते.
बांधकामाच्या पाहणीची जबाबदारी असलेले बांधकाम निरीक्षक ती योग्य पद्धतीने पार पाडतात का, असा प्रश्न उभा राहतो. बांधकाम पूर्ण करून त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांकडून दंड भरून नकाशा मंजूर केला जातो. अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच चुकीचे काम करणाऱ्यांचे फावत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
..
पुणे शहरातील दुर्घटना
तळजाई पठार येथे इमारत कोसळून अकरा जणांचा मृत्यू (सप्टेंबर २०१२)
नऱ्हे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू (३१ ऑक्टोबर २०१४)
वाघोली येथे स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू (१८ डिसेंबर २०१२)
दांडेकर पूल येथे सीमा भिंत पडून तीन महिला ठार (१६ जून २०१३)
..
आयुक्तांची अपुरी माहिती..
बालेवाडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ बारा मजल्यांना परवानगी होती. तेराव्या मजल्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आले होते असा खुलासा आयुक्तांकडून करण्यात आला. मात्र, ज्या दोन इमारतीचे काम सुरू होते त्यावरील स्लॅब टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. असे असताना आयुक्तांनी मात्र शुक्रवारपासून काम सुरू झाल्याची माहिती दिली. तासाभरात एवढे काम लगेच कसे पूर्ण झाले अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, अभियंता अमर शिंदे यांनी दहा दिवसांपासून कामाला सुरवात झाल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या परवानगीने बांधकामाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पार्क एक्सप्रेस या गृहप्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी मृगांक कन्स्ट्रक्शन यांच्याबरोबर करार करण्यात आला आहे. या करारानुसार बांधकाम प्रकल्पावर आवश्यक ती सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. तेराव्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी पालिकेतील अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली होती. त्यानंतरच हे काम सुरू झाले,' असा दावा प्राइड पर्पलचे विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष राजेश नारंग यांनी पत्रकार परिषदेत केला. इमारतीच्या बारा मजल्याची परवानगी पालिकेने यापूर्वीच दिली असून तेराव्या मजल्याच्या कामासाठी 'टीडीआर' विकत घेण्यात आला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून हा टीडीआर ३० जूनला खर्ची पडला आहे. आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करू बांधकाम सुरु होते. स्लॅब कोसळणे ही दुर्घटना असून, कामगारांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाइकांना आम्ही दोन लाख रुपयांची मदत देणार असून, सर्व कायदेशीर गोष्टींना सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचेही नारंग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गज हाती लागल्याने वाचलो

$
0
0

कोसळता स्लॅब डोळ्यांदेखत पाहिलेल्या पारसची पाचावर धारण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इमारतीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सर्वांत उंच मजल्यावर स्लॅब भरण्याचे काम सुरू केले होते... सिमेंट, वाळू मिक्स केलेले काँक्रिट पसरवण्यात येत होते... मी सुद्धा काँक्रिट पसरवण्यात गुंग होतो... त्याचवेळी स्लॅबच्या खाली असलेले सेंट्रिंग अचानक खचले आणि एका क्षणात सर्वच खाली फेकले गेले... मीदेखील घसरत होतो... तेवढ्यात माझ्या नजरेस लोखंडी गज लागला..सारी शक्ती एकवटून मी गज पकडला...
स्लॅब पडण्याची घटना 'याची डोळा' अनुभवणारा पारस ठाकूर भेदरलेल्या अवस्थेत सांगत होता. आपल्या सहकाऱ्यांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्याने त्याला काय बोलावे, हेच सुचत नव्हते. 'एकीकडे गजाला लोंबकळत असताना अन्य साथीदार जमिनीवर कोसळून रक्तबंबाळ झाल्याचे डोळ्याने पाहिले. खाली पडलेल्या कामगारांमध्ये माझा भाचाही (बिपीन ठाकूर) होता. परंतु, मी काहीही करू शकलो नाही. माझ्या सोबत असलेला बाबुलाल रॉयसुद्धा गजाला पकडल्याने बचावला,' पारस ठाकूर सांगत होता.
पारसच्या डो‍ळ्यांसमोर नऊ कामगार तेराव्या मजल्यावरून खाली पडले. त्यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. पारस आणि बाबुलाल रॉय यांनी गजाला धरल्यामुळे ते वाचले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील आहेत. ठाकूर सुद्धा याच गावातील असून, सर्वजण पुण्यात कामासाठी आले होते. कोसळलेल्या इमारतीच्या समोरच पत्र्यांचे तात्पुरते शेड ठोकण्यात आले आहे. त्यामध्ये हे सर्व कामगार राहतात.
'इमारतीच्या तेराव्या मजल्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरू केले. जागेवर १४ कामगार आणि तीन इंजिनीयर होते. सकाळपासून येथे पाच ट्रक माल टाकला होता. शेवटच्या विंगमधील इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. मी टाकलेला माल पसरविण्याचे काम करत होतो. अन्य कामगार स्लॅब भरत होते. तर, काहीजण बाजूला उभे होते. अचानक सेट्रिंगची खालची बाजू खचली आणि काही कळायच्या आतच स्लॅब भरणारे कामगार तेराव्या मजल्यावरून जाळी तोडून खाली पडले. मी ही घसरत होतो. पण, माझ्या हाताला लोखंडी गज लागल्यामुळे मी त्याला धरले. माझ्यासोबतच बाबुलालने गजाला धरल्यामुळे तोही बचावला. आमच्या मागे असलेल्या कामगारांनी मला वर ओढले,' पारस सांगतच होता.
..
आवाज आला अन् सगळे धावलो.
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारी असलेल्या अन्य एका इमारतीमध्ये आम्ही प्लॅस्टरचे काम करत होतो. दहाच्या सुमारास एकदम मोठा आवाज आला. त्यामुळे आम्ही सगळे धावत बाहेर आलो. पाहतो तर शेजारच्या इमारतीचा स्लॅब कोसळून कामगार खाली पडले होते. आम्ही तिकडे धाव घेतली. काही स्थानिक नागरिकही धावत आले. खाली पडलेल्या कामगारांना राडारोडा बाजूला सारून बाहेर काढण्यात आले. मृत्यूमुख पडलेल्या कामगारांचे चेहरे ओळखताही येत नव्हते. जखमी एकाला तत्काळ रुग्णालयात पाठविण्यात आले. स्लॅबला खालून आधार देण्यात आलेले पाइप निखळल्यामुळे स्लॅब कोसळल्याची माहिती येथे कार्यरत चंदर पवार यांनी दिली. काम सुरू असणाऱ्या इमारतीत ते गवंडी म्हणून काम करतात.
..
आठवड्यापूर्वीच एका कामगाराचा मृत्यू
स्लॅब कोसळलेल्या शेजारच्या इमारतीचे काम सुरू असताना एक आठवड्यापूर्वीच कामगाराचा पडून मृत्यू झाला होता. काम करताना या कामगाराकडून सेफ्टी बेल्ट व्यवस्थित न लावल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ दिवसातच मोठी घटना घडल्यामुळे येथे काम करताना असुरक्षिततेची भावना वाटत असल्याचे कामगारांनी 'मटा'ला सांगितले.
..
'दोषींवर कारवाई करू'
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. या घटनेतील सर्व व्यक्तींकडे तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी दिली.
..
बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीच्या १३व्या मजल्याचे स्लॅब कोसळून नऊ कामगार मृत्युमुखी पडल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराबरोबरच बांधकाम व्यावसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.

सारंग कामतेकर, संस्थापक अध्यक्ष, बांधकाम असंघटित कामगार संघ
..
सख्ख्या भावांचा मृत्यू
बिहार येथील समस्तीपूर जिल्ह्यातून कामाच्या शोधत पुण्यात आलेल्या चौदा कामगारांपैकी नऊ कामगारांचा शुक्रवारी सकाळी स्लॅब कोसळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. कामगार असणाऱ्या मामाच्या डोळ्यादेखत त्याच्या भाच्याचा मृत्यू झाला. मामाने लोखंडी गजाला धरल्यामुळे तो बचावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्जन्म मिळाला तर भावे स्कूलमध्येच जाईन

$
0
0

शिवशाहिरांनी व्यक्त केली शाळेविषयी कृतज्ञता
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पुन्हा जन्माला आलो तर पुण्यातच जन्म घेईन आणि शिक्षणासाठी भावे हायस्कूलमध्येच दाखल होईन... या शाळेने आणि शिक्षकांनी जे शिकवलं..त्यामुळेच मी घडू शकलो,' अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 'माझ्या नातवंडांनो, खूप शिका, अभ्यास करा, मस्ती करा, भरपूर खेळा,' असा संदेश विद्यार्थ्यांना देऊन बाबासाहेब पुन्हा शालेय आठवणींमध्ये रममाण झाले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या बाबासाहेबांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. या वेळी थोर पुरुषांच्या वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिवशहिरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्याध्यापक के. एन. अर्नाळे उपस्थित होते.
'माझ्या शाळेच्यावतीने होणारा हा सन्मान थक्क करणारा आहे. सन्मानामुळे मी भारावून गेलो आहे. एका वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत आहे. या वेळी मला शाळेत केलेल्या गमतीजमती, शिक्षकांचा मार आणि स्नेहसंमेलन आठवत आहे. लक्ष्मण फाटक, दत्तोपंत माजगावकर, बी. व्ही. या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी आजही चांगल्याच लक्षात आहेत. शाळेने आणि शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळेच मी घडू शकलो आणि यशस्वी होऊ शकलो. विद्यार्थ्यांनो खूप शिका, खूप अभ्यास करा, मस्ती करा, खेळा अन गमतीजमती करा आणि मोठे व्हा. सोबतच शिवचरित्रावर प्रेम करायला शिका,' या शब्दांत पुरंदरे यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

तत्पूर्वी भालचंद्र पुरंदरे, गौरी पुरंदरे, गायत्री जवळीकर, स्मिता खरात, प्रमिला सातपुते, अतुल दळवी यांनी अभिवाचनाद्वारे रायगडच्या हिरकणी बुरुजाची कहाणी सांगितली. शिक्षक संघटनेचे पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी देखील बाबासाहेबांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

...........

'हल्लीचे सर मारतच नाहीत'

आमच्या वेळी सर आणि मॅडम आम्ही एखादी चूक केल्यास मारायचे आणि मगच समजावून सांगायचे. मात्र, आजकाल मॅडम किंवा सर विद्यार्थ्यांना अजिबातच मारत नाहीत, हे ऐकून फार वाईट वाटते, असेही बाबासाहेब म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images