Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या

$
0
0

हडपसर परिसरातील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ हडपसर

प्रेमप्रकरणातून एका तेवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हडपसर परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. 'कोणालाही दोषी धरू नये,' असे त्यात म्हटले आहे. तरुणाच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे नैरश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.

शुभम संभाजी टिळेकर (२३, रा. कसबा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील 'टाउन प्लॅनिंग' येथे नोकरीस आहेत, तर आई शिक्षण मंडळात नोकरीला आहे. शुभमला मोठी बहीण आहे. तो गरवारे महाविद्यालयात डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. त्याचे आई-वडील कसबा परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे सप्तरंग हाउसिंग सोसायटीत फ्लॅट घेतला होता. शुभम झोपण्यासाठी तेथे जात होता. सोमवारी त्याच्या बहिणीच्या नणंदेचे हडपसर परिसरात लग्न होते. त्यासाठी तो गेला होता. शुभमला त्याचा मित्र शुभंकर ढोले याने दुचाकीवरून घरी सोडले. तसेच, शुभमने त्याला सकाळी घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. दरम्यान, मध्यरात्री शुभमने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याचा मित्र शुभंकर त्याला घेण्यासाठी आला. त्याने दरवाजा ठोठावला; पण बराच वेळ दार वाजवूनही उघडले नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून पाहिले. त्या वेळी शुभमने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याने तत्काळ शंभर क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभमचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

शुभमचे एका मुलीवर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते; मात्र शुभमच्या आई-वडिलांचा त्याला विरोध होता. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

..............

'आई-वडिलांकडे लक्ष ठेव'

शुभमने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. 'आई-वडिलांना साभाळ. माझ्यामुळे आई-वडिलांना खूप त्रास झाला आहे. आता कोणीही त्रास देणार नाही. मित्रांना माझ्या प्रेमाबाबत माहिती होते. त्यांनी तुम्हाला समजावून सांगायला पाहिजे होते; मात्र त्यांनी तसे केले नाही. माझी आठवण आल्यास माझा फोटो पहा,' असे त्याने बहिणीला उद्देशून लिहले आहे. तसेच, 'माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही; मात्र ते तुम्हाला सांगूनही कळले नाही,' असेही त्याने लिहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संमेलनाध्यक्षपद मिरवण्यासाठी नाही’

$
0
0

वादावर पडदा टाकण्याचा सबनीसांचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सर्व माजी संमेलनाध्यक्ष व सर्व घटकांच्या चिंतनात ज्यांनी हयात घालवली, त्या सर्व साहित्यिकांबद्दल माझ्या मनात आदरच आहे. माझा मुद्दा फक्त अध्यक्षीय भाषणाचा होता, व्यक्तिगत टीका करण्याचा माझा उद्देश नव्हता. मी अहं किंवा न्यूनगंडाने पछाडलेला नसल्याने मला व्यक्तीपेक्षा मराठी बहुसंस्कृतीची एकात्मता महत्त्वाची वाटते. संमेलनाध्यक्षपद हे मिरवण्यासाठी नाही,' असे स्पष्टीकरण देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'सबनीस यांचा विषय माझ्यासाठी आता संपलेला आहे,' असे सांगत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी अधिक बोलणे टाळले.

'आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाध्यक्षांची अध्यक्षीय भाषणे सर्व घटकांना सामावून घेणारी नव्हती; तसेच केवळ मेहुण म्हणून मिरवण्यासाठी संमेलनाध्यक्षाचे पद वापरण्यात आले,' असे विधान डॉ. सबनीस यांनी केले होते. त्या विधानाला आक्षेप घेऊन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी 'सबनीस सैराट सुटले असून, त्यांनी आता थांबावे,' अशी टीका केली. या पार्श्वभूमीवर डॉ. सबनीस यांनी स्पष्टीकरण देऊन 'मी तसे म्हणालोच नव्हतो,' अशी भूमिका मांडली.

'आधीच्या सर्व अध्यक्षांबद्दल मला आदर आहे. सर्व घटकांना सामावून घेणारी भूमिका माजी संमेलनाध्यक्षांनी मांडली नसेल तर तो कमीपणा मला वाटत नाही. ही भूमिका मांडावी, म्हणून मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. टीका वैयक्तिक पातळीवर घेऊ नये. माझे माझ्यापेक्षा माझ्या भूमिकेवर अधिक प्रेम आहे,' असे डॉ. सबनीस यांनी स्पष्ट केले.

................

'मेहुण शब्दाचा अर्थ माहीत नाही'

'माजी संमेलनाध्यक्षांचे मेहुण संमेलनात मिरवले, असे शब्द मी वापरलेले नाहीत. माझी पत्नी सदैव माझ्या बरोबर असते, तेव्हा मी दुसऱ्यांच्या पत्नीचा अनादर कसा करेन,' असा सवाल करून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी 'मेहुण या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही,' असे स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शूरां मी वंदिले

$
0
0

कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणाऱ्या भारतीय सैन्यातील शहीदांना मंगळवारी पुण्यातील 'नॅशनल वॉर मेमोरिअल'मध्ये लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यासोबतच लष्करी जवानांच्या शौर्यालाही पुणेकरांनी सलाम केला.

भारत- पाकिस्तानमध्ये १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय'च्या माध्यमातून पाकला धूळ चारली होती. या मोहिमेमध्ये भारतीय लष्करातील जवानांनी दाखवलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे 'नॅशनल वॉर मेमोरिअल'मध्ये मंगळवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांनी या वेळी लष्कराच्या वतीने शहीदांना मानवंदना अर्पण केली. पुणे आणि परिसरातील लष्करी छावण्यांमधील अधिकारी आणि जवान या वेळी उपस्थित होते. विजय दिवसानिमित्त वॉर मेमोरिअल नागरिकांसाठीही खुले ठेवण्यात आले होते. पुणेकरांनीही मेमोरिअलला भेट देऊन शहीद जवानांना मानवंदना दिली.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रयत्नांमधून पुण्यात उभारण्यात आलेले नॅशनल वॉर मेमोरिअल सर्वांसाठी नेहमी खुले न ठेवल्याबद्दल विनिता देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आक्षेप नोंदवला. मेमोरिअलच्या उभारणीसाठी मदत करणाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असलेला फलक लष्कराने हटवल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. सर्वसामान्य नागरिक लष्करी अधिकाऱ्यांना सन्मान देत नसल्याची ओरड लष्करातर्फे केली जात असताना, दुसरीकडे नॅशनल वॉर मेमोरिअल उभारण्यासाठी चालना देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा लष्कर अशा पद्धतीने अनादर का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याविषयी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संवाद साधून, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने उभे राहिलेले मेमोरिअल सर्वांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी 'मटा'ला सांगितले.

सामाजिक संस्थांतर्फे श्रद्धांजली

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभाग क्रमांक ४७ हरकानगरतर्फे शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. अजय रामानंदी, आरती रामानंदी, निलेश चव्हाण, नितीन म्हेत्रे, मच्छिंद्र परदेशी, निलेश चव्हाण या वेळी उपस्थित होते. शौर्य प्रतिष्ठानतर्फे कारगिल दिनानिमित्त आझादनगर येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनराज घोगरे, शाम चव्हाण, विनय कदम व आझाद नगरमधील नागरिक या वेळी उपस्थित होते.

...............

एक सेल्फी असाही...

कारगिल विजय दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामध्ये असणाऱ्या 'नॅशनल वॉर मेमोरिअल'मध्ये लष्करी अधिकारी, जवान आणि सर्वसामान्य नागरिकांनीही मंगळवारी शहीदांना मानवंदना दिली. लष्करी वातावरणाने भारावलेल्या, केवळ आणि केवळ देशसेवेचाच विचार करणाऱ्या जवानांसाठी सेल्फीसुद्धा तितकेच देशप्रेमाने भरलेले असतात, हे दाखवण्यासाठी पुरेसे ठरणारे हे चित्र या वेळी अनुभवायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोची कोर्टवारी

$
0
0

राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या परिसरातून मार्ग आखल्याचा आक्षेप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या बहुप्रतीक्षित 'पुणे मेट्रो'समोरील अडथळे अद्यापही दूर होण्याची चिन्हे नसून, आता राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या परिसरातून मेट्रोचा मार्ग आखण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. पुण्यातील 'परिसर' संस्थेने त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून, कोर्टाने केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, पुरातत्त्व विभाग आणि दिल्ली मेट्रो या सर्वांना त्या संबंधात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे मेट्रोच्या नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रो मार्गाला आक्षेप घेऊन, यापूर्वीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाद मागण्यात आली आहे. येत्या एक ऑगस्टला 'एनजीटी'समोर सुनावणी असताना, आता शहरातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकाजवळून मेट्रो जाणार असल्याने त्याविरोधात कोर्टात धाव घेण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टातील न्या. विद्यासागर कानडे आणि एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी त्या संदर्भातील याचिकेची सुनावणी झाली. 'परिसर'तर्फे मेट्रोला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती; पण कोर्टाने कोणतीही स्थगिती न देता, सर्व प्रतिवादींना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.

पाताळेश्वर मंदिर, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस या शहरातील तीन वास्तू राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जातात. या वास्तूंच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही स्वरूपाच्या बांधकामावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग याच स्मारकांच्या जवळून नेण्यात आले आहेत. त्यामुळे या स्मारकांना धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने मेट्रोला मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी 'परिसर'ने केली आहे. या तिन्ही वास्तूंच्या शेजारून मेट्रोचा मार्ग जात असला, तरी त्याविषयीची कोणतीही कल्पना भारतीय पुरातत्त्व खात्याला देण्यात आली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

पुणे मेट्रो प्रकल्प गेल्या १० वर्षांपासून चर्चेच्या ट्रॅकवर रेंगाळत असून, त्यामध्ये आतापर्यंत अनेक अडथळे आले आहेत. मेट्रो भुयारी हवी की एलिव्हेटेड यापासून, मेट्रोचे मार्ग कोठून असावेत, यापर्यंत अनेक विषय निव्वळ चर्चिले जात आहेत. यामध्ये मेट्रोचा खर्च सुमारे दुपटीने

वाढला आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रलंबित राहिलेल्या मेट्रोला युती सरकारच्या काळात मान्यता मिळेल, ही पुणेकरांची अपेक्षाही फोलच ठरली असून, आता तर मेट्रोच्या विरोधात पुन्हा कोर्टबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या मान्यतेत पुन्हा अडथळा निर्माण होण्याची ​भीती आहे.

महापालिकेचा दावा

'परिसर' संस्थेने यापूर्वी स. गो. बर्वे चौकात उभारण्यात येत असलेल्या 'ग्रेड सेपरेटर'लाही विरोध केला होता. तसेच त्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्या वेळी महापालिकेने ग्रेड सेपरेटरचे काम शंभर मीटरमध्ये येत नसल्याची बाजू मांडली होती. कोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. आता पुन्हा त्याच मुद्द्यावरून कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत. पाताळेश्वर मंदिरासमोरून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गात यापूर्वीच बदल करण्यात आले असून, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस येथील मेट्रो मार्गही संरक्षित स्मारकाच्या कक्षेत येत नाहीत, असा दावा महापालिकेने केला आहे.

............


मेट्रोच्या मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत हा प्रस्ताव 'पीआयबी'समोर सादर होईल. कोर्टासमोर आमची भूमिका मांडू.

- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी समिती वाऱ्यावर

$
0
0

डिसेंबर २०१२नंतर बैठकीचे आयोजनच नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवासी आणि प्रवासी वाहतूकदार यांच्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करणे, त्यांच्यात समन्वय राखणे यासाठी कार्यरत असलेल्या प्रवासी समन्वय समितीची बैठक गेल्या तीन वर्षांपासून झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नियमानुसार या समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घेणे बंधनकारक आहे; मात्र डिसेंबर २०१२मध्ये झालेल्या बैठकीनंतर पुन्हा बैठक झालेली नाही.

शहरी भागांत सार्वजनिक वाहतूक सेवा, रिक्षा, टॅक्सी व काही प्रमाणात एसटीकडून प्रवासी सुविधा दिल्या जातात. ही सुविधा देताना येणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी, वाहतुकीचे नियम, स्टॉप अशा सर्व बाबींवर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये वाहतूक पोलिस उपायुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, संबंधित सार्वजनिक सुविधा देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी (एसटी, पीएमपी) यांचा या समितीत समावेश आहे. पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून या समितीची बैठक झाली नसल्याने प्रवासी वाहतुकीसंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली नाही. या संदर्भात काही वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी वाहतूक पोलिस उपायुक्तांना निवेदनही सादर केले आहे.

मीरा बोरवणकर पोलिस आयुक्त व विश्वास पांढरे वाहतूक उपायुक्त असताना आरटीओ कार्यालयात डिसेंबर २०१२मध्ये या समितीची बैठक झाली होती. त्यानंतर आजतागायत ही बैठक झालेली नाही. शहरात सध्या ४५ हजार परवानाधारक रिक्षा आहेत; मात्र त्यांच्यासाठी संपूर्ण शहरात फक्त ९४५ अधिकृत रिक्षा स्टँड आहेत. तसेच परवानाधारक इतर प्रवासी वाहनांना शहरात

थांबण्यासाठी अधिकृत व्यवस्था नाही. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतूकदार महासंघाचे बाबा शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.

खासगी बससाठी स्टॉप हवा

शहरातून राज्यभरात व राज्याबाहेरही खासगी प्रवासी दिल्या जातात. तसेच, पुणे-मुंबई सेवा देणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड आहे. मुंबई मार्गावरील बहुतांश प्रवासी वारजे, चांदणी चौक, पाषाण, वाकड, हिंजवडी, कात्रज या ठिकाणी चढ-उतार करतात. महामार्गालगत या बस उभ्या करण्यासाठी अधिकृत व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतूकदारांची गैरसोय होते. त्यांना रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागतात. 'एक्स्प्रेस-वे'वर अशा प्रकारे गाडी थांबवणे एक प्रकारे अपघाताला निमंत्रण आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवण्यासाठी बस वे किंवा खासगी बससाठी स्टॉपची व्यवस्था केली पाहिजे, अशी खासगी वाहतूकदारांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’मध्ये आता शिस्तीचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना शिस्तीचे 'दिग्दर्शन' करण्यासाठी आणि संस्थेतील वातावरण रॅगिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने दोन प्रॉक्टरसह दोन विशेष पथकांची नियुक्ती केली. आज, बुधवारपासून नवीन विद्यार्थी संस्थेमध्ये प्रवेश करणार असल्याने उपाययोजना म्हणून रॅगिंगविरोधात प्रथमच पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये अँटि रॅगिंग समिती असणे बंधनकारक आहे, तशी 'एफटीआयआय'मध्येही ९ लोकांची समिती कार्यरत आहे. मात्र, या समिती व्यतिरिक्त दोन विशेष पथके नियुक्ती करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये ५ सदस्य राहणार असून, ३ प्राध्यापक आणि अनुक्रमे तरुण आणि तरुणी अशा दोन वरिष्ठ बॅचच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. रॅगिंगसारख्या घटनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन होण्यासाठी पहिल्यांदाच सहयोजित सदस्य म्हणून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सम आणि विषम तारखेला ही दोन पथके काम करतील. संस्थेमधील प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. रॅगिंगचे प्रकार विशेषत: सायंकाळनंतर आणि मध्यरात्री होतात, त्यामुळे खबरदारी म्हणून या वेळेतही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे काम या दोन पथकांचे असेल. रॅ​रँगिंगच्या घटना घडत असल्याचे दिसून आल्यास त्यात हस्तक्षेप करून त्या रोखणे आणि ही गोष्ट प्रॉक्टरच्या निदर्शनास आणून देणे ही पथकाची जबाबदारी असेल.
------------------------
नियामक मंडळ आणि विद्या परिषदेकडून या पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय विद्यार्थ्यांच्या हिताबरोबरच संस्थेमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रथमच प्रा. मॅटिन अहमद आणि वैभव घाम या दोघांची अनुक्रमे प्रॉक्टर व सहाय्यक प्रॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही एल निनोचा प्रभाव?

$
0
0

मान्सूनच्या अखेरीस ला निना निर्माण होण्याचा अंदाज

मयुरेश प्रभुणे, पुणे
प्रशांत महासागरात यंदा 'ला निना' विकसित होण्याची शक्यता गृहीत धरून बहुतेक सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी ला निना निर्माण होण्याची प्रक्रिया लांबत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी यंदाच्या मान्सूनवरही एल निनोचाच प्रभाव अधिक असल्याचे हवामानशास्त्रज्ञ आता मान्य करू लागले आहेत. त्यामुळे या वर्षी पाऊस खरोखरीच जास्त पडेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशांत महासागरातील सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा (एल निनो) फटका सलग दोन वर्षे भारतातील मान्सूनला बसला. यंदा, एल निनोची स्थिती जाऊन त्याची जागा ला निना (एल निनोच्या विरुद्ध स्थिती) घेणार असे अंदाज जगभरातील बहुतेक मॉडेलने वर्तवले. मात्र, मान्सून काळात ला निना निर्माण होण्याची पूर्वीची ७५ टक्के शक्यता आता कमी होऊन ती ५५ ते ६० टक्के असल्याचे हवामानशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने नुकतेच जाहीर केले आहे. सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील तापमान सरासरीच्या दरम्यान (न्यूट्रल) नोंदले जात असून, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात कमी तीव्रतेचा ला निना निर्माण होण्याची शक्यता आहे, असे क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने म्हटले आहे. मान्सूनच्या अखेरच्या काळात ला निना निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा यंदाच्या पावसासाठी किती फायदा होईल याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंतच्या मान्सून काळातील हवामानामधूनही एल निनोचा प्रभाव पूर्णपणे ओसरला नसल्याचे आढळून आले आहे. यंदा समुद्रावर कमी दाबाची क्षेत्रे क्वचितच निर्माण झाली असून, जमिनीवरील वातावरणात चक्रीय स्थिती निर्माण होऊन देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस देणाऱ्या ढगांचे स्वरूपही मान्सूनच्या सर्वसाधारण प्रकारापेक्षा भिन्न असून, अतिवृष्टी देऊ शकणाऱ्या या ढगांमुळे हवामानाचे अंदाजही चुकत आहेत. अशी स्थिती एल निनोच्या काळात आढळून येते असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एल निनोच्या प्रभावाचा आधार घेऊन देण्यात येणाऱ्या हवामान अंदाजानुसार २६ जुलैपर्यंत मध्य भारतात, तर दोन ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राच्या मध्य आणि पश्चिम भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आधी यूके मेट ऑफीसनेही जुलैच्या उत्तरार्धात पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तवली होती. जी बऱ्याच अंशी खरी ठरल्याचे पावसाच्या नोंदींवरून दिसून आले आहे.
........
यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्ये असामान्य
देशभरात मान्सूनने समाधानकारक आणि हवामान अंदाजांना पूरक अशी हजेरी लावली असली, तरी मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजात गृहीत धरण्यात आलेली हवामानाची स्थिती आणि प्रत्यक्षात असणारी स्थिती यात फरक असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी मान्य केले. ते म्हणाले, 'मान्सूनच्या तीव्र प्रवाहामुळेच आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून, कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव हा असामान्य आहे. ऑगस्टमध्ये ला निना निर्माण होण्याची शक्यता असून, मॉन्सूनच्या हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये ऑगस्टपासून दिसू शकतात. त्यामुळे हंगामाच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0

पालकांची आक्रमकता वाढल्याने पोलिसांचा वापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावीला चांगल्या कॉलेजांमधील प्रवेशांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. उपसंचालकांसोबतच्या चर्चेदरम्यान पालकांची आक्रमकता वाढल्याने, शेवटी पोलिसांच्या मदतीने आंदोलन नियंत्रित करावे लागले. पालकांच्या तक्रारी शिक्षण खात्यातील उच्चपदस्थांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दहावीला चांगली टक्केवारी असूनही अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून तुलनेने दुय्यम कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांचा विचार करताना आतापर्यंत कॉलेजनिश्चिती न मिळालेल्या, दूरचे कॉलेज मिळालेल्या, नॉट रिपोर्टेड राहिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केल्याचे दिसते. त्याचवेळी प्रक्रियेतील त्रुटींमुळे बेटरमेंट मिळाल्यानंतरही तुलनेने दुय्यम कॉलेजमध्ये प्रवेश निश्चिती करण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील टप्प्यांमध्ये विचार केला नसल्याची ओरड विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. या पुढील टप्प्यांमध्ये आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर बेटरमेंटची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याचे संकेत अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने पालकांसोबतच्या चर्चेमध्ये दिले होते. मात्र, असे झाल्यास चांगली टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कॉलेजांमध्ये शिल्लक राहणाऱ्या जागांवर प्रवेशाचा विचार करावा लागणार आहे.
ही बाब विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याने, एकदा बेटरमेंटची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना या पुढील प्रक्रियेत प्राधान्याने प्रवेश देऊन त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आग्रही मागणी पालकांनी या वेळी केली. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून समितीची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी काढलेल्या सरकारी आदेशानुसार ही प्रक्रिया राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाबाहेरील बाबींचा विचार करण्यासाठी समितीला सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. पालकांच्या मागणीनुसार नव्या मुद्द्यांचा विचार करण्यासाठी समितीचे प्रतिनिधी बुधवारी मुंबईला शिक्षण खात्यातील उच्चपदस्थांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उच्चपदस्थांच्या मार्गदर्शनानुसार या पुढील टप्प्यातील प्रक्रिया जाहीर केली जाणार असल्याचेही टेमकर यांनी सांगितले.
000
वंचितांसाठी आजपासून कॉलेज
अकरावीमध्ये सायन्स आणि कॉमर्सच्या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा कॉलेजांमध्ये बुधवारपासून जादा तासिकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २७ जुलै ते १३ ऑगस्टदरम्यान या तासिका सुरू ठेवण्याचे नियोजन समितीने मंगळवारी जाहीर केले. संबंधित कॉलेजांनी या नियोजनानुसार विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश समितीने संबंधित कॉलेजांच्या प्राचार्यांना दिले आहेत.
हे नियोजन पुढीलप्रमाणे -
ज्युनिअर कॉलेज शाखा
एस. पी. कॉलेज विज्ञान
मॉडर्न ज्युनिअर कॉलेज कॉमर्स
एस. एम. जोशी ज्युनिअर कॉलेज विज्ञान
साधना ज्युनिअर कॉलेज कॉमर्स
श्री म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज सायन्स
जयहिंद ज्युनिअर कॉलेज कॉमर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एक्स्प्रेस-वे’वर सहा विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी / लोणावळा

'एक्स्प्रेस-वे'वर कामशेत बोगद्याजवळ पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचालकाचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील सहा महाविद्यालयीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघाताची तीव्रता इतकी होती, की कारमधील पाच तरुण जागीच ठार झाले. सहाव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आदित्य दीपक भांडारकर (वय १७, रा. पाटील नगर, बावधन), अभिषेक अरुणकुमार रॉय (वय २१, रा. पाषाण), यश अजय शिराली (वय १८, रा. बावधन), अक्षय राजाराम भिलारे (वय २०, रा. कोथरूड), जोकिम जॉन सॅम्युअल (वय १९, रा. पुनावळे) उमेश गिरीश पाटील (वय २४, सध्या रा. ऐश्वर्या अपार्टमेंट, कोथरूड, पुणे मूळ सांगली) हे या अपघातात मृत्युमुखी पडले. या तरुणांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण सोमवारी रात्री अकरापर्यंत पुण्यातच होते. त्यानंतर ते कधी आणि कोठे गेले हे अनेकांना माहीत नव्हते. काही पालकांना, तर आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीनेच मुलगा घरात नसल्याचे समजले. हे तरुण लोणावळा येथे गेले असण्याची शक्यता असून पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथून हे तरुण पुण्याच्या दिशेने सुझकी सियाझ कारने परतत होते. कामशेत बोगदा सोडल्यानंतर पवना पोलिस चौकीसमोरील उतारावर कारचालक यश शिराली याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरील अज्ञात वाहनाला धडकून ती उलटली. उलटलेली कार तशीच ६० ते ७० फूट फरफटत ब्रायोफोनवर जाऊन आदळली. या घटनेची माहिती मिळताच 'आयआरबी', 'डेल्टाफोर्स' आणि 'देवदूत' या यंत्रणेचे कर्मचारी-अधिकारी पोहोचले. वडगाव महामार्ग पोलिस विभागाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर डोंगरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतांना तसेच जखमी उमेश पाटील याला बाहेर काढले. उमेशला उपचारासाठी निगडी येथे आणण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आदित्य लोहगाव येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. अभिषेक आणि अक्षय सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये 'बीबीए'च्या दुसऱ्या वर्गात शिकत होते. यश बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजमध्ये 'बीबीए'च्या वर्गात शिकत होता, तर सॅम्युअल हा एरवंडणा येथील काशीबाई नवले कॉलेजमध्ये शिकत होता. महामार्ग पोलिस दलाचे अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक मयुरी कांगणे, ग्रामीण पोलिस दलाचे अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंड ऑफ’पूर्वीच घेतला जगाचा निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकातल्या नेहमीच्या अड्ड्यावर सोमवारी रात्री ते एकत्र भेटले, त्यानंतर एका मित्राला 'सेंड-ऑफ' देण्याचे निश्चित झाले. त्यासाठीची जागाही ठरली; पण त्याच्यासोबत इतर मित्रांवरही जगाचाच 'निरोप' घेण्याची दुर्दैवी वेळ ओढवली. अवघ्या विशी-बाविशीतील तरुणांवर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांसह कॉलेजमधील मित्र मैत्रिणीही सुन्न झाले होते.

शहरातील विविध कॉलेजांमध्ये शिकणारे सर्व मित्र फूटबॉलच्या निमित्ताने एकत्र येत असत. त्याशिवाय, इतरही अनेक विषयांवर गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी ते अनेकदा भेटत. सोमवारी रात्रीही चांदणी चौकात नेहमीच्या वेळी ते भेटले. त्यांच्यातल्याच एका मित्राला (यश शिराली) मणिपाल विद्यापीठातील एका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला होता. तो पुन्हा लवकर भेटण्याची शक्यता नसल्याने त्याचा जंगी 'सेंड ऑफ' करण्याचे सर्वांनी ठरवले. त्यानुसार, सर्वजण दोन गाड्यांमधून लोणावळ्याच्या पुढे गेले. रात्री ठराविक वेळेला येणारी मुले वेळेत आली नाहीत म्हणून पालकांनी एकमेकांकडे विचारणा केली; पण नक्की सर्व जण कुठे गेले याचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री पुण्याकडे परतत असताना, एका गाडीला अपघात झाला अन् त्यातील सहा जण कायमचाच निरोप घेऊन गेले.

बावधन, पाषाण, कोथरूड, कोंढवा अशा शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या या मुलांच्या कुटुंबीयांवर मंगळवारी अपघाताची बातमी समजताच दुःखाचा डोंगरच कोसळला. आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये शिकणारी, करियरचा निश्चित मार्ग निवडणाऱ्या मुलांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांसह नेहमीच्या मित्र-मैत्रिणींनाही मोठा धक्का बसला. 'एक्स्प्रेस-वे'वरून पुण्याला येताना कामशेत बोगद्याजवळ असलेला उतार अपघातांना निमंत्रण देत आहेत. या ठिकाणी गेल्या दहा वर्षांत झालेल्या ३५ अपघातांमध्ये ५० पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठराशे वाहनांवर कारवाई

$
0
0

एक्स्प्रेस-वेवर वेगमर्यादेचे उल्लंघन भोवले

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाईचे हत्यार उगारण्यात येते१६ जून ते २६ जुलै या कालावधीत १,६७५ वाहनांवर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र, जूनच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण घटल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर अतिवेगात जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. १६ जूनपासून ही कारवाई सुरू झाल्यानंतर २७ जूनपर्यंत एक हजार १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. २८ जून ते २६ जुलै या कालावधीत ६६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, दिवसाला ४ ते पाच जण दंड भरण्यासाठी कार्यालयात येतात.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर बेशिस्तपणे वाहन चालवित लेनकटिंग करणाऱ्या आणि निर्धारित वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटीस घरपोच पाठविण्यात येत आहेत. एक्स्प्रेस-वेवर आरटीओच्या फ्लाइंग स्कॉडच्या मदतीने कारवाई करण्याची योजना राबविण्याचा निर्णय गेल्याच महिन्यात घेण्यात आला. यामध्ये आरटीओच्या वाहनांना कॅमेरे लावून ती वाहने एक्स्प्रेस-वेवर प्रवास करणार होती. या प्रवासादरम्यान वाहनांना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून पुढे जाणारी वाहने ताशी ८० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनांना कैद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन कारवाईचे निर्धारित केले आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओबरोबरच पनवेल आरटीओच्या दोन फ्लाइंग स्कॉडची वाहने देखील गस्त घालत आहेत. कारवाईमध्ये वाढ करून सातत्य ठेवण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
..
कारवाईचा वेग मंदावला
पिंपरी चिंचवड आरटीओच्या फ्लाइंग स्कॉडची दोन वाहने या कारवाईसाठी नेमण्यात आली होती. या वाहनांना सुरवातीला १,०१२ वाहनांना कॅमेऱ्यात कैद केले होते. या वाहनांच्या क्रमांकावरून संबंधितांना घरपोच नोटीस पाठविण्यात आली. कारवाई करूनही वाहनांचा वेग कमी होत नसला, तरी कारवाईचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर उगारणार ‘बायोमेट्रिक’ छडी

$
0
0

सभासदांच्या हजेरीसाठी घेतला निर्णय; ३ ऑगस्टपासून होणार लागू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका सभासदांना ‌शिस्त लागावी, यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळातील सर्वसाधारण सभांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याच्या सूचना जगताप यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी ३ ऑगस्टपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर असणाऱ्या नगरसेवकांची हजेरी घेतली जाते. सभागृहातील हजेरीपत्रकावर स्वाक्षरी घेऊन ती नोंदविण्याची पद्धत आहे. दोन वर्षापूर्वी महापालिकेने सर्वसाधारण सभा होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण केले. नूतनीकरणाच्या कामात अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्वसाधारण सभेला हजर राहिलेल्या सभासदांची उपस्थिती घेण्यासाठी सभागृहाच्या बाहेर बायोमेट्रिक मशिन लावण्यात आले आहे. सभागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर महिन्याच्या आत हे मशिन कार्यान्वित केले जाईल. त्यानंतर प्रत्येक सभासदाची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही ही यंत्रणा धूळ खात पडून आहे.
बायोमेट्रिक हजेरी सुरू न झाल्याने बहुतांश सभासद सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहून दुसऱ्या दिवशी हजेरीपत्रावर सही करत असल्याचे दिसून आले होते. त्यावर सभागृहात चर्चाही झाली होती. गेल्याच आठवड्यात 'परिवर्तन' या स्वयंसेवी संस्थेने नगरसेवकांच्या कामाचे प्रगतिपुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला असून, त्यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापौरांनी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यास सुरुवात करावी, अशा सूचना नगरसचिव कार्यालयाला दिल्या. त्याची सुरुवात म्हणून ३ ऑगस्टला होणाऱ्या सभेसाठी आपण स्वत: बायोमेट्रिक मशिनवर हजेरीची नोंदणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..
बहुतांश सदस्यांची नोंदणी नाही
महापालिकेत लोकनियुक्त आणि स्वीकृत नगरसेवकांची एकूण संख्या १५७ एवढी आहे. त्यापैकी केवळ ९० ते ९५ सभासदांनी बायोमेट्रिकसाठी नोंदणी केलेली आहे. अन्य काही सभासदांनी नोंदणीची तयारी दर्शविल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले. ज्या सभासदांची नोंदणी झाली आहे, त्यांची मशिनवर तर, उर्वरितांची हजेरीपत्रकावर नोंदणी घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुलाच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथे सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याला पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
अथर्व क्षीरसागर (वय १६, रा. कर्वेनगर) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व डेक्कन परिसरातील कॉलेजमध्ये अकरावी सायन्समध्ये शिकतो. मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता त्याच्या आईने त्याला कॉलेजमध्ये सोडले. कॉलेजमध्ये लेक्चर नसल्यामुळे अथर्व लवकर घरी निघाला. पीएमटीने डेक्कन येथून तो कर्वे पुतळा बस स्टॉपवर उतरला आणि राहुलनगर मार्गाने कर्वे नगरकडे निघाला. तोपर्यंत सकाळचे सव्वाआठ वाजले होते. काही अंतर गेल्यानंतर दुचाकीवरून एक तरुण त्याच्याजवळ आला. त्याने अथर्वशी हिंदी भाषेत संवाद साधून वेळ विचारली. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल आणि तीनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर तो पसार झाला. घाबरलेल्या अथर्वने हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांना सांगितला. त्यानंतर त्या महिलांनी त्याला घरापर्यंत सोडले. घरी गेल्यानंतर शेजाऱ्यांनी अथर्वच्या आईवडिलांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घरी आल्यानंतर अथर्वशी बोलून पोलिसांकडे तक्रार दिली.
अलंकार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या चोरट्याने अथर्वला बनावट पिस्तुलाच्या मदतीने धमकाविले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्ररकरणी उपनिरीक्षक ए. एस. मोरे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’ने घेतली पुण्यात बैठक

$
0
0

संशयितांची माहिती; शस्त्रप्रशिक्षण, खरेदीसाठी नक्षल्यांशी संपर्क

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी 'इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया'च्या (आयएस) स्थानिक संशयितांनी पुण्यासह देशभरातील विविध नऊ ठिकाणी बैठका घेतल्याचे उघडकीस आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या संशयितांनी तपासादरम्यान बैठकांची माहिती उघड केली. तसेच, त्यांनी स्फोटकांच्या प्रशिक्षणासाठी आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी नक्षलवाद्यांशी संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले आहे.

'एनआयए'ने देशभरातून 'आयएस'शी संबंधित असलेल्या १६ संशयितांची धरपकड केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासानंतर कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये या संशयितांच्या पुण्यातील बैठकीबाबत माहिती उघड करण्यात आली आहे. पुण्यातील बैठक ८ डिसेंबर रोजी झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, ही बैठक पुणे स्टेशन येथे झाली असण्याची शक्यता स्थानिक यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामध्ये आणखी काही स्थानिकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. 'इंडियन मुजाहिदीन'या दहशतवादी संघटनेचा प्रमुख संशयित शफी अरमार 'आयएस'मध्ये भरती झाला असून, सध्या तो सीरियामध्ये प्रसिद्धी विभागाचा प्रमुख आहे. शफीने फेसबुक, व्हॉटस्अॅप, स्काइप, ट्विटर, चॅट सेक्युअर, निमबझ आणि टेलिग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संपर्क साधल्याचे उघडकीस आले आहे. या संशयितांनी भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी 'जुनूद-उल-खलिफा-फिल-​हिंद' या नावाची संघटना स्थापन केली होती.

'वेगवेगळ्या तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करणे, बॉम्ब बनवण्यासाठीचे साहित्य मिळवणे, बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी लपण्याच्या जागा शोधणे आणि त्यानंतर भारतातील संवेदनशील ठिकाणी हल्ले घडवून आणण्यासाठी शफी तरुणांना तयार करीत होता. तयारीसाठी संशयितांनी देशभरात अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. पुण्याखेरीज देवबंद, तुमकूर हिल्स, बेंगळुरू, लखनऊ आणि हैदराबाद येथे या बैठका झाल्या आहेत. या बैठकांच्या तारखा आणि ठिकाणांची माहिती 'एनआयए'ला तपासादरम्यान समजली.

'एनआयए'ने देशभरात विविध ठिकाणी छापे घालून संशयितांची घरे तपासली होती. त्यामध्ये बेंगळुरू, हैदराबाद, तुमकूर, मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणांचा समावेश आहे. या छाप्यांमध्ये 'एनआयए'ला आरोपींकडे स्फोटकांसाठी लागणारी पावडर, अडीच इंच व्यासाचा जीआय पाइप, अॅनॉलॉग घड्याळ, सोल्डर वायर, ९०० एमएल हायड्रोजन पॅराक्साइड तसेच हवालामार्गे मिळालेली अडीच लाख रुपयांची रोकडेही हाती लागली.

'आयएस'चे नक्षल कनेक्शन

संशयितांना स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवून आणण्यासाठी प्र​शिक्षणाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी नक्षलवाद्यांशी संधान साधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. घातपात करण्यासाठी लागणारी शस्त्रे नक्षलवाद्यांकडून खरेदी करण्याचा त्यांचा विचार होता, असे 'एनआयए'च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी. वाय. पाटील संस्थेवर इन्कम टॅक्सचे छापे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या पुणे, कोल्हापूर, मुंबई व रायगड येथील विविध कार्यालयांवर इन्कम टॅक्स विभागानं आज छापे टाकले. हे छापे नेमके कशासाठी टाकण्यात आले व त्यातून हाती नेमकं काय लागलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.

संस्थेच्या पुणे येथील पिंपरी व आकुर्डी येथील वेगवेगळ्या कार्यालयांत सकाळी सातच्या सुमारास छापा टाकण्यात आला. अधिकाऱ्यांसोबत यावेळी पोलिसांचा मोठा ताफा होता. छाप्याची कारवाई सुरू असताना कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. काही वेळानंतर ओळखपत्र तपासून कर्मचाऱ्यांना आत सोडण्यात आलं. सकाळपासून अधिकारी कागदपत्रांचा कसून तपास करत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील डी. वाय. पाटील वैद्यकीय आणि अभियांत्रिक महाविद्यालयांवर इन्कम टॅक्स विभागानं सकाळी साडेआठच्या सुमारास छापा टाकला. याशिवाय, मुंबई, दिघी येथील कार्यालयांचीही झाडाझडती घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रत्नाकर मतकरी यांना इंदिरा-भालचंद्र पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या आई-वडलांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा इंदिरा-भालचंद्र पुरस्कार ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे. मतकरी यांना 'माझे रंग प्रयोग' या ग्रंथासाठी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ७ ऑगस्ट रोजी कर्वे रस्ता येथील सिद्धार्थ हॉल येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उत्तरार्धात डॉ. देशपांडे हे मतकरी यांची मुलाखत घेणार आहेत. नाट्यलेखनाच्या व्यक्तिरिक्त नाट्यविषयक लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यामध्ये आत्मचरित्र्य, आत्मकथन, नाट्यविषयक वैचारिक लेखन यांचा समावेश असतो. या आधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. पुणे नगर वाचन मंदिर या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा मीटरची पडताळणी पुन्हा आरटीओकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिक्षा मीटर पडताळणी आणि मुद्रांकनाचे काम वैधमापन विभागाकडून काढून पुन्हा परिवहन विभागाकडे द्यावे, असा आदेश नुकताच मुंबई हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे पडताळणी आणि मुद्रांकनाचे काम एकाच जागी होणार असून रिक्षा चालकांचे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
यापूर्वी रिक्षाची मीटरचे 'पासिंग' व वार्षिक तपासणी परिवहन विभागाकडेच होत होती. मात्र, मागील वर्षी मीटर पडताळणी व मुद्रांकनाचे काम वैधमापन विभागाकडे सोपविण्यात आले होते. त्यामुळे रिक्षा चालकांना दोन वेगळ्या विभागांकडे हेलपाटे मारण्याबरोबरच अनेक दिवस 'पासिंग'साठी घालवावे लागत होते. यासंदर्भात रिक्षा पंचायत व ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीने सतत आवाज उठवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले.
मुंबई रिक्षा मेन्स युनियनने या विरोधात हायकोर्टात दाद मागितली होती. त्यानुसार अनुजा प्रभुदेसाई व रणजित मोरे यांच्या खंडपीठाने रिक्षा मीटर पडताळणी व मुद्रांकनाचे काम पुन्हा परिवहन विभागाकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, परिवहन विभागाने तातडीने निर्णयानुसार काम हाती घ्यावेत, अशी सूचना वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी परिवहन विभागाला पत्राद्वारे केली आहे. पुण्यातही या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामदास फुटाणे यांना काव्यहोत्र पुरस्कार प्रदान

$
0
0

पणजी : गोवा कला अकादमीतर्फे दिला जाणारा काव्यहोत्र पुरस्कार प्रख्यात वात्रटिकाकार, कवी रामदास फुटाणे यांना गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते नुकताच येथे प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अकादमीतर्फे काव्यहोत्र हा राष्ट्रीय स्तरावरील भव्य कविता महोत्सव दर वर्षी आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी (२४ जुलै) फुटाणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात झालेल्या या सोहळ्यात काव्यहोत्र प्रशंसा पुरस्कारही देण्यात आले. नीलबा खांडेकर व डॉ. अनुजा जोशी यांना हे प्रशंसा पुरस्कार देण्यात आले. सुमारे २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी बोलताना फुटाणे यांनी गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात इंग्रजीच्या प्रभावामुळे प्रादेशिक भाषांवर आक्रमण चालूच असतानाच गोव्यात सर्व भाषकांना एकत्र आणून काव्यहोत्रसारखा महोत्सव घडवून आणला जातो यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.'
मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांना जागतिक स्थान प्राप्त व्हावे, अशी तीव्र इच्छा असल्याचेही फुटाणे यांनी सांगितले.
'गोवा सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण आहे. इथे सर्व जाती, समाजातील बांधव गुण्यागोविंदाने नांदत असून हीच गोव्याची खरी ओळख आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी या वेळी बोलताना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकोश निर्मिती मंडळावर परवानगीविना नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सरकारची विविध मंडळे, समित्या आणि संस्था यावर केली जाणारी नियुक्ती हा कायमच वादाचा विषय ठरला आहे. सरकारच्या सांस्कृतिक खात्यांतर्गत येणाऱ्या विविध मंडळांवरील नियुक्तींवरून गेल्या वर्षी चांगलाच वाद झाला होता. नियुक्तीसाठी परवानगी घेतली जात नाही तसेच कामासाठी वेळ देता येणार की नाही, हा विचार न करता केल्या जाणाऱ्या नियुक्तींचा वाद पुन्हा समोर आला आहे. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यांचे राजीनामे हे या वादाचे कारण ठरले आहे.
शासनाच्या विविध संस्थांवर व्यक्तींची नावे सुचवून त्यांची नियुक्ती केली जाते; पण बहुतांश व्यक्ती अशा आहेत ज्यांना पदाचा स्वीकार करण्याबाबत विचारातच घेतले जात नाही. नियुक्तीनंतर त्यांना दूरध्वनी करून सांगितले जाते आणि मग नियुक्ती पत्र हातात देण्यात येते. संबंधित व्यक्ती संस्थेला वेळ देऊ शकते का किंवा बैठकांना उपस्थित राहू शकते का नाही, या गोष्टी विचारातच घेतल्या जात नाहीत. ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्याबाबत हेच घडले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप करंबेळकर यांची तर सदस्यपदी अरविंद जामखेडकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे, अरुण फडके, सुहास बहुलकर, श्रीनंद बापट, प्रदीप कर्णिक, दत्तात्रय पाष्टे, डॉ. अरुणचंद्र पाठक, डॉ. वसंत शिंदे, दीपक जेवणे, डॉ. गौरी माहुलीकर, प्रा. लक्ष्मणराव टोपले, भगवान इंगळे, सुरेश वाघे, डॉ. बाळ फोंडके, डॉ. ग. व्या. माने, डॉ. चंद्रशेखर सोलापुरे, डॉ. नीरज हातेकर, विवेक घळसासी, वसंत आबाजी डहाके, आशा बगे, डॉ. अक्षयकुमार काळे यांची नियुक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती होती. या नियुक्तीस एक वर्ष पूर्ण होत असताना सदस्यांच्या राजीनाम्यामुळे नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यपदासाठी सरकारकडून कोणतीच विचारणा झाली नव्हती, याकडे डहाके यांनी लक्ष वेधले. नियुक्तीचे पत्र मला मिळाले; पण वैयक्तिक खूप कामे असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहता येणे शक्य नसल्याने ही नियुक्ती स्वीकारली नसल्याचे त्यांनी सांगितले. विवेक घळसासी यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या दोन जागांवर डॉ. अरुणा ढेरे व दीपक घैसास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कामास वेळ देता येत नसल्याने वसंत आबाडी डहाके व विवेक घळसासी यांनी कळवले आहे. सदस्यांच्या नियुक्तीवरून कसलाही वाद नाही. मंडळाच्या कामाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे.
- दिलीप करंबेळकर, अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिक झाले ‘मेघदूत’मय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सरोदच्या छेडल्या जाणाऱ्या मंद तारा, कानांना सुखावून जाणारे पार्श्वसंगीत, सुरेल गायिकेच्या मधुर बोलांवर नर्तिकांचा मोहक पदन्यास आणि या सर्वांबरोबर खुलत जाणारे महाकवी कालिदासाचे 'मेघदूत'... ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या प्रवेश संस्थेच्या वतीने मराठी रंगभूमीवर प्रथमच 'मेघदूत' हा नृत्य-नाट्याविष्कार रंगला. या अनोख्या प्रयोगाने बालगंधर्व रंगमंदिरातील प्रेक्षक भारावून गेले.
प्रणव पटवारी लिखित आणि निखिल शेटे दिग्दर्शित मंचावर साकारणाऱ्या मेघदूताने रसिकांची उत्स्फूर्त वाहवा मिळवली. अलकानगरीपर्यंत ढगांचा (मेघदूत) होणारा प्रवास आणि त्यांच्या वाटेत येणाऱ्या रंजक गोष्टींचं मूळ काव्यातून केलेलं रसभरीत वर्णन नाटकातूनही तितक्याच ताकदीने उभे राहिले.
नाटकातील सर्व नृत्य रचनांच्या दिग्दर्शिका आणि ढगांच्या भूमिकेतील अमीरा पाटणकर, रमा कुकनूर आणि मधुरा आफळे या तिघींनी उल्लेखनीय कामगिरी केली. यक्ष आणि यक्षिणीच्या भूमिकेतील जयदीप वैद्य आणि श्रुती आठवले यांच्या गायन आणि अभिनयास उपस्थितांची भरभरून दाद मिळाली.
सानिया गोडबोले, मौशमी जाजू, सायली वैद्य, पूजा शेडे, मानसी जोग या नृत्य कलाकारांनी नाटकाची रंगत वाढवली. त्यांना केतन पवार (तबला), ब्रह्मानंद देशमुख (पखवाज), नितीश पुरोहित (सरोद), तुषार कदम (साइड ऱ्हिदम्स), रेणुका जोशी (सतार), अनुप कुलथे (व्हायोलिन), आशुतोष मुंगळे व प्रांजली बर्वे (समूहगायन) यांनी 'लाइव्ह' वाद्य साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images