Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्कॉलरशिप पुस्तकांची छपाई, वितरण रखडले

$
0
0

सरकारकडून ऐनवेळी आलेल्या सूचना कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यंदा प्रथमच तयार केलेल्या स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांविषयी काही सूचना नव्याने पुढे आल्यामुळे छपाई आणि वितरण पूर्ण झाले नसल्याची बाब सोमवारी उघड झाली. त्यामुळे अभ्यासक्रम असला, तरी पुस्तके नाहीत अशा परिस्थितीत राज्यभरातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा स्कॉलरशिपची तयारी करावी लागणार आहे.
यंदा राज्यात प्रथमच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. परिषदेने या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम नुकताच जाहीर केला. तसेच, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याच आधारे परिषदेने तयार केलेल्या स्कॉलरशिप मार्गदर्शकांचेही प्रकाशन केले. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी लवकरच पुस्तके उपलब्ध होण्याविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या पाठ्यपुस्तकांच्या निर्मिती आणि वितरणाची जबाबदारी असणाऱ्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे (बालभारती) सोमवारअखेर ही पुस्तके वितरणासाठी उपलब्धच झाले नसल्याचे उघड झाले. या विषयी संबंधितांकडे चौकशी केली असता, स्कॉलरशिपच्या पुस्तकांविषयी नव्याने काही सूचना पुढे आल्याने, या सूचनांची पूर्तता करून ही पुस्तके लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी स्कॉलरशिपच्या पुस्तकांसाठी विद्यार्थी आणि पालकांना केवळ खासगी प्रकाशकांवरच अवलंबून राहावे लागत होते. यंदा प्रथमच परिषदेने बालभारतीच्या मदतीने स्कॉलरशिपच्या तयारीसाठीही पुस्तकांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम आणि पुस्तकांचे प्रकाशन एकाच दिवशी जाहीर करण्याची काळजीही शिक्षण खात्याने घेतली होती. स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम अगोदर जाहीर झाला असता, तर त्या आधारे खासगी प्रकाशकांनी आपली पुस्तके बाजारात आणली असती आणि त्याचा अधिकृत सरकारी पुस्तकांच्या खपावर परिणाम झाला असता, असा अंदाज होता. मात्र आता अभ्यासक्रम जाहीर होऊन आठवडा उलटून गेल्यानंतही अधिकृत पुस्तके बाजारात न आल्याने, पालकांना पुन्हा खासगी प्रकाशकांकडेच वळावे लागणार असल्याची नोंद या क्षेत्रातील जाणकार करत आहेत. त्यामुळे खात्याने पुरेशी तयारी केल्यानंतरही पुन्हा खासगी प्रकाशकांनाच स्कॉलरशिपचा फायदा होणार असल्याचे अंदाज हे जाणकार वर्तवित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण मंडळाच्या कारभारावर ताशेरे

$
0
0

सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील कारभार बिघडत चालला असून, शाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य याबरोबरच रेनकोटही मिळालेला नाही. मंडळातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदारांचे हित जपण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप सोमवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सभासदांनी केला.
सभासदांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पुढील दहा दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट देण्यात यावेत, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले. या मुदतीत गणवेश न दिल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले. शिक्षणमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना त्यांना पुरेशा सुविधा दिल्या जात नसल्याचे गाऱ्हाणे सभासदांनी सर्वसाधारण सभेत मांडले. शिक्षणमंडळाच्या कारभाराचे वाभाडे सर्वपक्षीय सभासदांनी सभागृहात काढून जोरदार टीका केली. अडीच ते तीन तास यावर जोरदार चर्चा झाली. विद्यार्थ्यांना साहित्यच वेळेत मिळत नसेल आणि मंडळाच्या शाळांचा दर्जा सुधारणार नसेल शाळांची पटसंख्या कधी वाढणार अशी विचारणा करून हाच पालिका प्रशासनाचा स्मार्टपणा कशी उपरोधिक प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. शिक्षणप्रमुखांचा कारभार असलेल्या व्यक्तीला जबाबदारी झेपत नसेल तर त्यांच्यावरील भार हलका करून सक्षम अधिकारी द्यावा, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. शाळांची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता, मंडळातील भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या ठेकेदाराने केवळ साडेतीन हजार गणवेश दिले असून, उर्वरित गणवेश लवकरच दिले जातील, असा खुलासा प्रभारी शिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण यांनी केला. गणवेश पुरविण्यासाठी ठेकेदाराला २६ मेला कामाची ऑर्डर देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित ठेकेदार काळ्या यादीत असताना त्याला काम दिलेच कसे, अशी विचारणा सभासदांनी केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर जगताप यांनी विद्यार्थ्यांना येत्या दहा दिवसात गणवेश आणि रेनकोट दिले जावेत यासाठी आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे, त्याचबरोबर पूर्णवेळ शिक्षण प्रमुख नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि शिक्षण मंडळात कायमस्वरुपी शिक्षक नेमण्याची प्रकिया तात्काळ राबविण्यात यावी असे आदेश दिले.
..
पावसाळा संपल्यावर रेनकोट?
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या रेनकोटसाठी फेरटेंडर काढण्यात आले आहे. ठेकेदाराने दिलेले दर आणि माल याची तपासणी प्रयोगशाळेत केल्यानंतरच त्याकडून खरेदी केली जाणार आहे. यासाठी ६० दिवसांचा कालावधी असतो. रेनकोटची अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्याने प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना रेनकोट मिळण्यास सप्टेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना झोंबला ‘परिवर्तन’चा अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतील नगरसेवकांच्या कामाच्या 'परिवर्तन' या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेल्या अहवालावरून सोमवारी सर्वसाधारण सर्वपक्षीय नगरसेवकांची आकांडतांडव केला. या संस्थेने तयार केलेला अहवाल चुकीच्या माहितीवर तयार करण्यात आला असून, निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना बदनाम करण्यासाठी हा उद्योग केल्याचा आरोप करण्यात आला. नगरसचिव कार्यालयाकडून चुकीची माहिती दिल्याचा आरोप सभासदांनी करून नगरसचिवांवर टीका केली.
'परिवर्तन'ने नगरसेवकांच्या कामाचे प्रगतिपुस्तक तयार करून वेबसाइटवर प्रसिद्ध केले. यामध्ये सभागृहात गेल्या चार वर्षांत एकही प्रश्न न विचारणारे 'मौनी' नगरसेवक, सभांना अनुपस्थित राहणारे सभासद, सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले सभासद, अशी माहिती देण्यात आली आहे. पालिकेतील नगरसेवकांची अशा प्रकारची माहिती या संस्थेला कोणी दिली, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. सभागृहात आमचे लेखी प्रश्न घेतले जात नाहीत, मग प्रश्न विचारायचे तरी कशाला असा प्रश्न मनसेच्या अस्मिता शिंदे यांनी उपस्थित केला. या संस्थेला माहिती देताना त्यांचे शहरातील योगदान नक्की काय आहे, याची माहिती प्रशासनाने घेतली का असा प्रश्न भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी उपस्थित केला. 'परिवर्तन'चे संस्थापक अध्यक्ष आम आदमी पक्षाशी संबंधित असून, निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना बदनाम करण्यासाठीच ही चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला.
या अहवालाममध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांना मनसेच्या असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यांच्यावर कसलाही गुन्हा नसताना गुन्हा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. अशी मा​हिती विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी दिली. ही सर्व माहिती नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आल्याचा दावा 'परिवर्तन'ने केला आहे. सभागृहाचे काम कसे चालते याची कोणतीही माहिती संस्थेला दिसत नाही, सभागृहात आम्ही अनेक विषयांवर चर्चा करत असल्याचे नंदा लोणकर यांनी सांगितले.
मनसेच्या वनिता वागस्कर, काँग्रेसचे अविनाश बागवे यांनीही संस्थेवर अयोग्य माहिती प्रसिद्ध केली असल्याची टीका केली. वर्तमानपत्रातील बातम्यांवर सभागृहात चर्चा करता येणार नाही असा मुद्दा राष्ट्रवादीचे रवींद्र माळवदकर यांनी उपस्थित केला. मात्र सर्व नगरसेवकांनी त्याला विरोध केला.
..
'दिलेली माहिती खरीच'
माहितीचा अधिकार कायद्यानुसार विभागाकडे काही लोकांनी मा‌हिती मागवली होती, त्यानुसार त्यांना ही माहिती देण्यात आली असून, कार्यालयाने सर्व माहिती खरीच दिल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांवरून सेनेचा महापौरांना घेराव

$
0
0

पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सोमवारी पालिकेत आंदोलन करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप यांना १२०० गुलाबाची फुले देऊन त्यांना घेराव घालण्यात आला. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम करणाऱ्या संबधित ठेकेदारांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. शहरातील अनेक रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले असतनाही शहरात खड्डे नसल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, त्यानंतर दहा दिवसातच प्रशासनानेच शहरातील बाराशे खड्डे बुजविल्याचा अहवाल महापौर जगताप यांच्याकडे दिला होता. यामागे नक्की कोणते गौडबंगाल आहे, हे पुणेकरांना समजावे, यासाठी शिवसेनेचे शहर संपर्कप्रमख आणि माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली महापौरांना गुलाबाची फुले देऊन घेराव घालण्यात आला. पक्षाचे पालिकेतील गटनेते अशोक हरणावळ, शहर संघटक अजय भोसले, नगरसेविका संगीता ठोसर, भरत चौधरी या आंदोलनात सहभागी झाले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० टक्के टोलआकारणी पूर्ण

$
0
0

एक्स्प्रेस-वे टोलमुक्त करण्याची मागणी; सहा महिन्यांत २५० कोटींची वसुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर टोल आकारणीच्या मुदतीपर्यंत (मार्च २०१९) टोलद्वारे अपेक्षित असलेल्या रकमेच्या ९० टक्के जून अखेरीस जमा झाली आहे. गेल्या सहा महिन्यात २४९ कोटी रुपये टोल वसुली झाली आहे. परिणामी, उर्वरित १० टक्के रक्कम मुदतीआधीच प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक्स्प्रेस-वेच्या टोलमुक्तीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी सजग नागरी मंचाने केली आहे.
एक्स्प्रेस-वेवर संबंधित कंपनीला टोलवसुलीपोटी मार्च २०१९ पर्यंत २,८६९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात २००४पासून जून २०१६ पर्यंत २७०३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे २०१९पर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम जमा होणार हे निश्चित आहे. टोलवसुलीचा वेग पाहता ऑक्टोबर २०१६अखेर टोल वसुलीची अपेक्षित रक्कम प्राप्त होईल. गेल्या दहा महिन्यांपासून या विषयी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही. ही परिस्थिती समोर आल्यानंतर आतातरी मुख्यमंत्री याबाबत निर्णय घ्यावा, असे मंचाचे वेलणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या मेलमध्ये नमूद केले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनंतर ही बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यात एक्स्प्रेस वेवर दर महिन्याला सरासरी ४० कोटी रुपये वसूल झाले आहेत. ऑक्टोबर २०१६पर्यंत अपेक्षित टोलवसुली झाल्यानंतर त्यापुढील उर्वरित २७ महिन्यात टोल वसुली सुरू राहिल्यास सुमारे ११०० कोटी रुपये अधिक वसूल होतील, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
--------
टोल वसुलीची आकडेवारी (उत्पन्न कोटी रुपयांत)
वर्ष अपेक्षित टोल उत्पन्न प्रत्यक्षातील टोल उत्पन्न
२००४ ९७ २८.५
२००५ १२० ५४.२
२००६ १०१ ६१.०२
२००७ १०६ १४८
२००८ १३२ १८७
२००९ १३९ २००
२०१० १४५ २१४
२०११ १८० २००
२०१२ १८९ २७५
२०१३ १९८ २९४
२०१४ २४६ ३६०
२०१५ २५८ ४३३
२०१६ २७१ २४९ (जून २०१६ पर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार खूनप्रकरणी दोन संशयित अटकेत

$
0
0

कोथरूड पोलिस, गुन्हे शाखेची कामगिरी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या आठवड्यात किश्किंधानगर पोलिस चौकीजवळ मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. हा तरुण बाजीराव रोडवरील फर्निचरच्या दुकानात कामगार असून, त्याच्या खुनाप्रकरणी कोथरूड आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
करणकुमार रंगीलाल वर्मा (वय २५, रा. वुड कन्सेप्ट फर्निचरच्या दुकानामागे, बाजीराव रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. निखिल बाळासाहेब गोळे (२१, रा. किश्किंधानगर, रामबाग कॉलनी, कोथरूड) आणि आशुतोष अनिल पालके (२०, रा. जयभवानीनगर, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्माचा १९ जुलै रोजी सायंकाळी कोथरूड परिसरातील आईमाता मंदिराशेजारीच्या मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आला होता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुराव्यांअभावी ओळख पटू शकली नाही. पोलिसांना घटनास्थळीवर सापडलेल्या चिठ्ठीवर मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर फोन केला असता महिलेने उचलला. हिलेकडे चौकशी केली असता त्यांनी फर्निचर दुकानातील कामगाराचा क्रमांक असल्याचे सांगितले. पोलिसांनी फर्निचर दुकानाचा पत्ता विचारून संबंधिताशी संपर्क साधला. पोलिसांनी राकेशकुमार संभरलाल कौलीक (रा. वुड कन्सेप्ट फर्निचरच्या मागे, बाजीराव रोड) यांना घटनेविषयी माहिती दिली.
गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाने सखोल तपास करून गोळेला अटक केली. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या पथकाने कौलीककडे विचारपूस केली. त्यावेळी वर्माला काही जणांनी बेदम मारहाण केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला मारहाण झालेल्या ठिकाणी नेले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले फुटेज संकलित करण्यात आले. त्यावरून कोथरूड पोलिसांनी पालकेला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनचे ९२व्या वर्षांत पदार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ब्रिटिश काळात उभारलेले आणि ऐतिहासिक वास्तूचा दर्जा असलेले पुणे रेल्वे स्टेशन उद्या, बुधवारी (२७ जुलै) ९२व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या अनेक वर्षांतील अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मिती धक्के पचवून आजही ही इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे.
पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा आराखडा १९१५मध्ये तयार करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष कामास १९२२ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर तीन वर्षांनी स्टेशनचे काम पूर्ण झाले. मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशनचे उदघाटन करण्यात आले होते. त्यासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. नंतरच्या काळात या स्टेशनचा वेळोवेळी विस्तार करण्यात आला असला, तरीही मूळ ब्रिटिशकालीन आराखडा कायम ठेवण्यात आला आहे. पुणे स्टेशनमध्ये सध्या सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ प्लॅटफॉर्म आहेत. येथून दररोज मेल गाड्या, एक्स्प्रेस, पॅसेंजर, लोकल, सुपर फास्ट, गरीब रथ, दुरांतो, संपर्क क्रांती यांसारख्या २५० गाड्या धावतात. त्यातून दैनंदिन चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात.
मेट्रो, मोनो रेल, बुलेट ट्रेन, रिंग रेल, लोकल, भारत दर्शन स्पेशल ट्रेनची सेवा या स्टेशनवरून सुरू केली पाहिजे, अशी मागणी या निमित्ताने रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली.
-------
आंतरराष्ट्रीय दर्जा देणार
पुणे स्टेशन आणि पाकिस्तानातील लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखेच आहे. रेल्वे बोर्डाने १३ वर्षांपूर्वी पुणे स्टेशनला मॉडेल स्टेशन म्हणून गौरविले. तसेच, सध्या हे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
--------
'वर्धापनदिन थाटात करणार'
रेल्वे प्रवासी ग्रुपतर्फे दरवर्षी डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे यंदा रेल्वे स्टेशनचा वर्धापनदिनही थाटामाटात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. २७) सकाळी साडेदहा वाजता पुणे रेल्वे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित राहणार असल्याची माहिती हर्षा शहा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबनीस आता सैराट सुटलेत

$
0
0

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचा घणाघात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करून प्रसिद्धीझोतात आलेले साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत. 'आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाध्यक्षांची अध्यक्षीय भाषणे सर्व घटकांना सामावून घेणारी नव्हती; तसेच केवळ मेहुण म्हणून मिरवण्यासाठी संमेलनाध्यक्षाचे पद वापरण्यात आले,' या त्यांच्या वक्तव्याचा साहित्य वर्तुळातून जोरदार विरोध होत आहे.

'सबनीसांनी आत्मगौरव करायला हरकत नाही, पण अन्य साहित्यिकांचा अपमान करून बिभत्स आणि हिडीसपणे करू नये. सबनीस आता सैराट सुटले असून, खालच्या स्तराला जात असल्याने त्यांनी आता थांबावे,' असा सणसणीत टोला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी लगावला.
सबनीस यांच्या विधानावरून साहित्य वर्तुळात सोमवारी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. डॉ. मोरे यांनी 'मटा'शी संपर्क साधून सबनीसांच्या विधानाचा निषेध केला. 'गं. बा. सरदार, प्रा. रा. ग. जाधव यांनी साहित्यातून उपेक्षितांचे चिंतन करण्यात आपली हयात घालवली. त्यामुळे अन्य साहित्यिकांना वेठीस धरणे सबनीसांनी थांबवावे. सबनीस संमेलन झाल्यापासून बोलतच सुटले असून, संमेलनाध्यक्षपदाची उंची त्यांनी कायम राखावी. दुसऱ्यांवर टीका करून त्यांनी स्वत:चे मोठेपण सांगू नये. महाराष्ट्रात बरे चालले असून, वातावरण गढूळ करू नये,' या शब्दांत डॉ. मोरे यांनी सबनीसांचा खरपूस समाचार घेतला. 'निवडणुकीमध्ये सर्वांची मते मिळत नसतात,' असा टोला लगावून 'राज्यातून मते मिळाली; पण पुण्याने दगा दिला,' या सबनीसांच्या विधानाचीही खिल्ली त्यांनी उडवली.

'व्यासपीठावर एकत्र येणार नाही'

'डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या स्तरावर प्रगल्भ विचार मांडणे अपेक्षित आहे. पण, ते अधिक खालचा स्तर गाठत असल्याने यापुढे मी त्यांच्याबरोबर कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येणार नाही,' अशी सडेतोड भूमिका डॉ. सदानंद मोरे यांनी जाहीर केली. 'संमेलनात व्यासपीठावर पत्नी बरोबर असणे हा सन्मान असतो. पत्नीचे योगदान असल्याने तो गौरव असतो. ते मेहुण म्हणून मिरवणे नसते. काही सभ्य संकेत पाळणे संमेलनाध्यक्षांचे कर्तव्य असते,' अशा कानपिचक्या डॉ. मोरे यांनी मारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिक्षा चालकासोबत सुट्ट्या पैशांवरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी रामवाडी येथे दुपारी घडली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तीन महिलांसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार एस. डी. देशमुख यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून भास्कर रामकृष्ण सोनवणे (वय ४२, रा. मुंबई) आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख येरवडा पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी ते व त्यांचे सहकारी रामवाडी परिसरातून जात होते. त्यावेळी रिक्षाचालक सलीम शेख (वय ३८, रा. गंज पेठ) व आरोपी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशांवरून वाद सुरु होता. देशमुख भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र, आरोपींनी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली.
..
दोन गटांमध्ये मारामारी
वानवडी परिसरातील शिवरकर रोडवर पूर्ववैमन्यासातून तरुणांच्या दोन टोळक्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, आठ जणांना अटक केली आहे. राम बाबूराव कदम (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाबू जाधव, विकी पवार, गणेश पवार, जाधव यांना अटक करण्यात आली आहे. विकी भिमा पवार (२८) यांच्या तक्रारीवरून सुनील बाबू जाधव, अक्षय जाधव, रामा जाधव, सागर जाधव यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार हे एकाच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात यापुर्वी वाद झाला होता. रविवारी दुपारी आरोपींमध्ये पुन्हा वाद होऊन, त्यांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी अधिक वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
..
दोन गुंड तडीपार
दत्तवाडी, मार्केट यार्ड परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी शहर आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांनी सोमवारी आदेश दिले. बाबासाहेब दत्तात्रय लोखंडे (रा. आंबेडकरनगर, झोपडपट्टी, मार्केटयार्ड) व स्वप्नील उर्फ मुन्ना सुखदेव रॉय (वय २४, रा. जनता वसाहत, दत्तवाडी) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत. मारामारी करणे,परिसरात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परिमंडळ दोनचे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी सोमवारी या दोघांना तडीपार करण्याचे आदेश काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला-उबर बंदीसाठी ‘स्वा​भिमानी’ रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ओला-उबरसारख्या प्रवाशांची टप्पा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालण्यासाठी स्वाभिमानी रिक्षा संघटनेने सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर आंदोलन केले. कार्यकर्ते आणि रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात ठिय्या मांडला. संतप्त रिक्षाचालकांनी टायर, सीट आणि कुशन जाळून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमारे दीड तास गोंधळाचे वातावरण होते.
स्वा​भिमानी संघटनेने बाणेरपासून आरटीओ कार्यालयावर रिक्षासह मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने रिक्षाचालकांनी पायीच आरटीओ कार्यालयाकडे मोर्चा वळविला. बाणेर येथे गर्दीमुळे पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्या रिक्षाचालकांना ताब्यात घेण्यात आले. मोर्चा आरटीओ परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी आरटीओ बाहेरील मुख्य चौकात ठिय्या मांडला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आरटीओच्या दारात येण्याची विनंती केली. पण, त्यांनी ती मान्य केली नाही. आरटीओने निवेदन स्वीकारण्यास खाली यावे आणि १० मिनिटांत लेखी आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेले. परंतु, आंदोलकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
संतप्त रिक्षाचालकांनी थेट कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यालयाची दारे बंद करण्यात आली. त्यामुळे दाराबाहेर बसून त्यांनी घोषणाबाजी केली. सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या या आंदोनामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, कोणतीही अनूचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. अखेर संघटनेने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांच्याकडे निवेदन दिले.
..
तोडफोडीचा इशारा
ओला-उबरमुळे रिक्षाचालकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडत आहे. राज्य सरकारने येत्या आठ दिवसांत या कंपन्यांच्या गाड्यांवर बंदी घालावी; अन्यथा संघटनेकडून अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी ओला-उबरच्या गाड्यांची तोडफोड देखील केली जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश ससाणे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवी उत्तीर्णांनाच १७ क्रमांकाचा अर्ज

$
0
0

बहिःस्थ दहावीच्या पात्रतेच्या अटीत बदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बहिःस्थ पद्धतीने दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी पात्रतेची अट बदलण्यात आली आहे. ही परीक्षा देण्यासाठी चौथी पास ही सध्याची अट बदलून पाचवी पास अशी करण्यात आली आहे.
या विषयीचा अधिकृत सरकारी निर्णय सोमवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यानुसार, बाहेरून दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी यापूर्वी पहिली ते चौथीचे शिक्षण पूर्ण करण्याची अट होती. चौथी उत्तीर्ण असलेले उमेदवार १७ नंबरच्या अर्जाच्या आधारे बाहेरून दहावीच्या परीक्षेसाठीचे अर्ज भरू शकत होते. मात्र, राज्यात आता शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यानुसार प्राथमिक शिक्षणामध्ये पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक शिक्षणामध्ये सहावी ते आठवीच्या वर्गांचा समावेश होतो. त्यामुळे १७ नंबरच्या अर्जासाठी पात्रता म्हणून प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना, चौथीऐवजी पाचव्या इयत्तेचा विचार होणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून १७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी किमान पाचवी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरविले जातील.
पात्रतेच्या या नव्या निकषामुळे राज्यात शिक्षणहक्क कायदा लागू होण्यापूर्वी किंवा त्याहीपूर्वी चौथीनंतर शिक्षण सोडलेल्या आणि आता १७ नंबरच्या सुविधेच्या आधारे किमान दहावी उत्तीर्ण होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना पाचवीला प्रवेश घ्यावा लागणार आहे. या प्रकारामुळे शिक्षणाविषयी आस्था निर्माण होण्याऐवजी उमेदवारांमध्ये शिक्षणाविषयीची अनास्था वाढीस लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमली पदार्थांचा पुण्याला विळखा

$
0
0

गेल्या सहा महिन्यांत ६४ लाखांचा ऐवज जप्त; आयटी कर्मचारी रडारवर

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
पुणे : पुण्यात गांजा, अफू, चरस अशा अंमली पदार्थाची जागा आता हेरॉइन, एमडी, एलएसडी स्टँप, केटामाइनने घेतली आहे. या अंमली पदार्थांची बाजारपेठ म्हणून पुणे 'नावारूपाला'येत असल्याने तस्करांकडून शहरावर विशेष लक्ष्य केंद्रीत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांत पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ६४ लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
पुणे शहर आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात विद्यार्थी, परदेशी नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. या वर्गाकडे बक्कळ पैसा असल्यामुळे तसेच, त्यांची अंमली पदार्थ खरेदी करण्याची क्षमता लक्षात घेता त्यांना तस्करांकडून टार्गेट करण्यात येते. पुण्यात पूर्वी गांजा, अफू, चरस आदी अंमली पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असे. मात्र, आता त्यांची जागा एमडी, केटामाइन, हेरॉइन, एलएसडी स्टँप आदी महागड्या अंमली पदार्थांनी घेतली आहे.
या पदार्थांचे सेवन करणारा वर्ग उच्चभ्रू आहे. पुण्यात आयोजित अनेक पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरातील तस्करांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येते. कॉलेज परिसर, मोठ्या पार्ट्यांमध्ये या जीवघेण्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती सातत्याने काढण्यात येत आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच शनिवारवाड्याजवळ दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे हेरॉटन जप्त करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील तिघांना येरवडा परिसरात अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
गेल्या वर्षी अंमली पदार्थांसंदर्भात ५३ गुन्हे दाखल करून १.२१ कोटी रुपयांचे नशाबाज पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केले होते. चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २८ गुन्हे दाखल करून ३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६३ लाख ८३ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
..
जून २०१६ पर्यंत पुण्यात जप्त केलेले अंमली पदार्थ
पदार्थाचे नाव गुन्हे अटक आरोपी किंमत (रुपये)
गांजा १८ २४ ९.८४ लाख
हेरॉइन ३ ३ ३५.१८ लाख
चरस २ २ ४.३५ लाख
अफू २ २ ७.०६ लाख
एमडी २ ३ ५.८२ लाख
अन्य पदार्थ १ २ १.५६ लाख
एकूण २८ ३६ ६३.८१ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा विद्यार्थी ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

मुंबईहून पुण्याला येत असलेली MH 14 EU 7038 क्रमांकाची सियाज कार भरधाव वेगात असतानाच चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानं जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार पलटी झाली. या कारमध्ये सहा जण होते. त्यापैकी पाच जण जागीच ठार झाले, तर एकाचा निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमधील तिघांची ओळख पटली आहे. आदित्य भांडारकर, यश शिराली आणि अभिषेक हे तिघं पुण्याचे रहिवासी आहेत. या अपघाताची चौकशी कामशेत पोलीस करत आहेत.



आदित्य भांडारकर



यश शिराली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या अपघातग्रस्त गाडीत गांजाची पुडी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताच्या तपासाला वेगळंच वळण मिळण्याची चिन्हं आहेत. अपघातग्रस्त गाडीत गांजाची पुडी सापडल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली आहे. त्यामुळे या अपघाताभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं आहे.

विशेष म्हणजे, अपघातात ठार झालेल्या सहा विद्यार्थ्यांपैकी कुणीही अमली पदार्थाचं सेवन केलं नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होतंय. त्यामुळे ती गांजाची पुडी गाडीत कशी आणि कशासाठी आली, असा प्रश्न उपस्थित झालाय.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाचं भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सियाझ कार पलटली आणि त्यातील सहाही विद्यार्थी ठार झाले. ते अतिवेगाचे बळी ठरले असावेत, अशी शक्यता वाटत असतानाच, त्यांच्या कारमध्ये गांजाची पुडी सापडल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळागौरीच्या खेळातून सामाजिक संदेश

$
0
0

संस्कारभारतीच्या महिला विभागाचा उपक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बदलत्या काळानुसार निर्माण झालेल्या समस्यांबद्दल महिलांमध्ये जागृती करण्यासाठी 'संस्कार भारती'ने मंगळगौरीचे माध्यम निवडले आहे. तरुणींमधील मंगळागौरीच्या खेळांची क्रेझ लक्षात घेऊन संस्कार भारतीच्या महिला विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. यासाठी त्यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचारापासून ते अगदी वाहतुकीच्या समस्येवरही पारंपरिक चालींवर आधारित गाणी आणि खेळ तयार केले आहेत.
मंगळगौरीचे खेळ काळाच्या पडद्याआड जाणार असल्याची टीका आता तरुण पिढीने पुसून टाकली आहे. आपली परंपरा असलेल्या या खेळांमध्ये महिलांसाठी आवश्यक व्यायामाचे सूत्र असल्याची जाणीवर तरुणींना झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मंगळागौरीला गेटटुगेदरचा स्वरूप आले आहे. याच बदलाचा संस्कार भारतीने महिलांच्या सबलीकरणासाठी उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कार भारतीच्या महिला विभागातर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून तरुणींना मंगळागौरीच्या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते आहे. आत्तापर्यंत दीड हजारांहून अधिक महिलांनी येथे प्रशिक्षण घेतले असून, त्या आता त्यांच्या परिसरातील इतर महिलांना हा खेळ शिकवित आहेत.
'पूर्वी होणाऱ्या मंगळागौरी, त्याची गरज आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे. पूर्वी महिलांना सासरी असलेली बंधने आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती. आजची महिलांसमोरील आव्हाने निराळी आहेत. त्यामुळे आम्ही मंगळागौरीच्या खेळातील पारंपरिक बाजाला धक्का न लावता सध्याच्या सामाजिक समस्यांचा त्यात मेळ घातला आहे,' अशी माहिती संस्कार भारतीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा अपर्णा कुकडे आणि प्रशिक्षक रेखा होशिंग यांनी दिली.
'आम्ही साधारणतः दीड तासाचा खेळांचा आराखडा केला आहे. यामध्ये चाळीसहून अधिक खेळ सादर केले जातात. आम्ही खेळांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. प्रत्येक खेळाशी निगडित योगासने आणि त्यांमुळे शरीराच्या कोणत्या अवयवाचा व्यायाम होतो, याचेही मार्गदर्शन करतो. या खेळांच्या निमित्ताने विविध वयोगटातील महिला एकत्र येतात. त्यामुळे आम्ही सामाजिक समस्या यातून मांडायला सुरुवात केली आहे. कार्यक्रमता मुलींची घटत असलेली संख्या, समाजात मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार यावर आधारित गाणी सादर करीत आहोत. याशिवाय व्यायामाचे महत्त्व, शहरातील वाहतुकीचा प्रश्न, संवाद हरवलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक असे विविध विषय आम्ही या खेळांमधून मांडले आहेत,' असेही होशिंग यांनी सांगितले.
...............
आर्थिक मोबदला नाही
मंगळागौरीचे खेळांसाठी आम्ही आमंत्रण देणाऱ्यांकडून मानधन घेतो. पण ही रक्कम प्रशिक्षणार्थी किंवा आमच्या कार्यकर्त्या स्वतःला घेत नाही. हे सर्व मानधन संस्कार भारती तर्फे सुरू असलेल्या सामाजिक कार्यासाठी दिले जाते. गेल्या पंधरा वर्षांपासून खेळांविषयी जागृतीचे काम निःस्वार्थ भावनेने सुरू आहे. आजही मध्यवर्ती पुण्याबरोबरच हडपसर, कात्रज, कोंढवा अशा विविध भागात आमच्या कार्यकर्त्या प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती होशिंग यांनी दिली.
...
व्यायामाचा मंत्र
'प्रशिक्षण वर्गामध्ये आम्ही फुगडी, झिम्मा, गाठोडे असे तब्बल ५६ खेळ शिकवितो. या सर्व खेळामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन, शरीराला होणारा फायदा आणि संस्कृती या विषयी सविस्तर माहिती दिली जाते. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण वर्ग सुरू झाल्यावर पहिल्या वर्गातच आम्ही सगळ्यांचे वजन नोंदवतो आणि प्रशिक्षण संपल्यानंतर पुन्हा वजन करतो. त्या वेळी आम्हाला प्रत्येकीचे वजन किमान एक ते दोन किलोने कमी झाल्याचे आढळून येते. या खेळांमधून सर्वांगाचा व्यायाम होतो,' असे रेखा होशिंग म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुद्रणकलेचा सांस्कृतिक इतिहास मराठीत

$
0
0

'प्रिंटिंग प्रेस इन इंडिया'चा अनुवाद लवकर
Aditya.Tanawade@timesgroup.com
पुणे : मिशनरींमुळे भारतात रुजलेल्या मुद्रणकलेचा टप्प्याटप्प्याने होत गेलेला विकास, मुद्रणकलेत झालेली सांस्कृतिक स्थित्यंतरे, अक्षरजुळणीत होत गेलेले बदल आणि वाङ्मयीन आणि साहित्याच्या प्रसारासाठी त्याचा झालेला वापर, असा मुद्रणकलेचा सांस्कृतिक इतिहास आता मराठीत उपलब्ध होणार आहे. मुद्रणकलेचे अभ्यासक अ. का. प्रियोळकर यांनी १९५८ मध्ये लिहिलेल्या 'प्रिंटिंग प्रेस इन इंडिया' या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यात आला असून, लवकरच मराठी संशोधन मंडळाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
सुधा भागवत यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला असून, मराठी वाचकांना भारतातील मुद्रणकलेचा जवळजवळ ५०० वर्षांपूर्वींपासूनचा इतिहास अनुभवायला मिळणार आहे. १५५७ च्या सुमारास मिशनरी भारताच्या पश्चिम किनारी म्हणजे गोव्यात दाखल झाले. त्यांच्याबरोबर मुद्रणकलेसाठी आवश्यक असे साहित्य आणि यंत्रसामुग्री होती. ते जहाज काही कारणास्तव पुढे जाऊ शकले नाही आणि भारतातच राहिले. त्यामुळे भारतात गोव्यातून खऱ्या मुद्रणकलेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि त्यानंतर मुद्रणकला हळूहळू देशात रुजू लागली. भारतात बायबलच्या छपाईसाठी सुरुवातीला मुद्रणकला वापरली जाऊ लागली. इंग्रजी भाषेत होणारी अक्षरजुळणी प्रादेशिक भाषेमध्ये व्हावी, यासाठी विल्यम केरी याने प्रादेशिक भाषेतील खि‍‍ळे (फाँट) तयार केले. त्यानंतर मुद्रणकलेचा प्रादेशिक भाषेमध्ये वापर केला जाऊ लागला. गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य आल्यानंतर या कलेवर त्यांचा प्रभाव पडला. पुढे इंग्रजांनी प्रादेशिक भाषांचा अभ्यास करण्यासाठी खिळ्यांच्या आधारे भाषाकोष तयार केले. या सगळ्या घटनांचा आढावा प्रियोळकर यांनी या पुस्तकातून घेतला आहे.
'मुद्रणकलेचा वाङ्मयासाठी केलेला वापर आणि त्यामुळे साहित्याचा झालेला विकास हे टप्पे प्रियोळकरांनी रंजक पद्धतीने मांडले आहेत. या पुस्तकात 'मुद्रण आणि छत्रपती शिवाजी' असे एक प्रकरण असून, त्याद्वारे शिवाजी महाराजांच्या काळात मुद्रणकला महाराष्ट्रासह देशात रुजत होती,' असे प्रियोळकरांनी नमूद केले असल्याचे मराठी संशोधन मंडळाचे संचालक प्रदीप कर्णिक यांनी सांगितले.
मूळच्या गोव्याच्या असल्याने प्रियोळकरांचा पोर्तुगीज भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे पोर्तुगीजांनी मुद्रणकलेचा केलेला विकास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. केवळ यंत्रसामग्रीत होत जाणाऱ्या बदलांमध्ये न अडकता प्रियोळकरांनी मुद्रण आणि त्याद्वारे होणारी सांस्कृतिक स्थित्यंतरे वाचकांसमोर ठेवली आहेत.
..............
१९५८ मध्ये मुद्रण कलेचा संपूर्ण इतिहास पहिल्यांदा प्रियोळकरांनी वाचकांसमोर इंग्रजीमध्ये ठेवला. हा इतिहास अत्यंत रंजक असून मराठी वाचकांना देखील त्याचा आस्वाद घेता यावा, या दृष्टिकोनातून प्रिंटिंग प्रेस इन इंडिया या पुस्तकाचा अनुवाद करण्याचा निर्णय मराठी संशोधन मंडळाने घेतला आहे. या माध्यमातून मुद्रण कलेमुळे साहित्याचा झालेला विकास आणि इतिहास वाचकांसमोर येणार आहे.
- प्रदीप कर्णिक, संचालक, मराठी संशोधन मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमपालनासह व्हावे ढोलवादन

$
0
0

पोलिस आयुक्त वाकडे यांची ढोल-ताशा पथकांकडून अपेक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ढोल-ताशा पथकांनी नियमांचे पालक करून वादन करावे, त्यांना गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिले.
गजलक्ष्मी ढोल-ताशा पथकाच्या वतीने सुरेश पवार, मिलिंद भोई, क्षितीज रणधीर, महेंद्र अगरवाल, आशिष गांधी यांना वाकडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी तो बोलत होते. ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, विवेक खटावकर, बाळासाहेब मारणे, अॅड. प्रताप परदेशी आदी या वेळी उपस्थित होते.
वाकडे म्हणाले, 'ढोल-ताशा पथकांमुळे गणेशोत्सवाची शोभा वाढते. ढोल-ताशा पथकांनी देऊ केलेल्या अर्थिक मदतीतून आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत झालेली आहे. सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणाऱ्या ढोल पथकांना उत्सवाच्या काळात त्रास होणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जाईल. विसर्जन मिरवणुकीतून डिजिटल स्पीकर हद्दपार करण्याचे काम ढोल-पथकांनी केले आहे. भरकटणारी तरुणाई पथकांच्या माध्यमातून चांगल्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. मानाच्या गणपतीनंतरही आता बहुतांश मंडळे ढोल-ताशा पथकांना मिरवणुकीत सहभागी करून घेत आहेत.'
प्रताप परदेशी म्हणाले, 'गजलक्ष्मी पथकाने तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आहे. ढोल-ताशा पथकांनी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करून आवाजाची मर्यादा ठेवून वादन करावे.' पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. रविंद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर समीर देसाई यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठी साहित्याचा कविता हा गाभा’

$
0
0

सुनीताराजे पवार यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मनाची जळमटे दूर करणारी, भावनांची समृद्धी वाढवणारी, आपल्या मनामध्ये चैतन्य फुलवणारी, मनातील शल्य दूर करणारी अशी कविता असते. काव्य हा आपल्या साहित्य प्रकाराचा महत्त्वाचा भाग आहे. कविता हा मराठी साहित्याचा गाभा आहे,' असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी व्यक्त केले.
'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या कवी रमेश जाधव यांच्या 'नाते मनाशी मनाचे' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व निमंत्रितांचे कवी संमेलन मसाप पुणेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. या वेळी त्या बोलत होत्या. योगगुरू डॉ. दत्तात्रय कोहिनकर पाटील, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, लेखक आनंद सराफ, प्रकाशक घनश्याम पाटील उपस्थित होते.
'अनेक पानांमध्ये व्यक्त न करता येणारे भाव अवघ्या दोन ओळींमध्ये व्यक्त करण्याची क्षमता कवितेमध्ये असते. समाजजीवनात जी आपली जडणघडण होते, ज्या गोष्टी आपण टिपतो ते कवितेच्या माध्यमातून कवी व्यक्त करतो. मनातला संवाद कागदावर उतरवणे अवघड असते. रमेश जाधव यांनी या सर्व भावना खूप सुंदर रीतीने मांडल्या आहेत,' असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.
दत्तात्रय कोहिनकर पाटील, कोळसे पाटील यांनीही भाषण केले. या वेळी निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. माधव गीर, जयश्री घुले, परी बांदेकर, विलास कुडके, अतुल सोळस्कर, राणी कदम, संध्या पोळ, प्रल्हाद दुधाळ, आनंद गायकवाड, आसित मेश्राम, दीपक कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर यांनी आपल्या रचना सादर केल्या. 'चपराक प्रकाशन'चे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कवी माधव गीर यांनी सूत्रसंचालन तर शुभांगी गिरमे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज’वैभव लुप्त होतेय...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे लष्करीदृष्ट्या केलेली अजोड बांधणी, तीन माच्या आणि बालेकिल्ला, सुवेळा आणि संजीवनी माचीची देखणी तटबंदी, महाद्वाराची रचना तसेच बुरूजांमध्ये बेमालूमपणे लपवलेली गुप्त प्रवेशद्वारे, चंद्रतळे, पद्मावती आणि राजवाड्याचे तळे, तटात बांधलेले शौचकूप, भागीरथी, जननी, बह्मर्षी, रामेश्वर, पद्मावती अशा दैवतांची मंदिरे असा अवशेषसंपन्न दुर्ग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राजगडाची दिवसेंदिवस अधिक दुरवस्था होऊ लागली आहे. रखडलेल्या सदरेसह राजगडाच्या तटबंदीची दुरूस्ती पुरातत्व खात्याने चुकीच्या पद्धतीने केल्याने तटबंदीचे विद्रूपीकरण झाले आहे. संभाव्य जागतिक वारसा स्थळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्वराज्याच्या या राजधानीचे राजवैभवच लुप्त होण्याचा धोका त्यामुळे निर्माण झाला आहे. 'गडांचा राजा आणि राजांचा गड' अशी राजगडाची ख्याती आहे. राजगडावर दुर्ग आणि इतिहास अभ्यासकांसह गिर्यारोहक, वनस्पती आणि वास्तू अभ्यासक तसेच पर्यटकांचा वर्षभर राबता आहे. गडाच्या माच्यांसह कातळी बालेकिल्ला हे मुख्य आकर्षण आहे. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावर शिवछत्रपतींचे २५ वर्षे वास्तव्य होते. स्वराज्याच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींचा साक्षीदार असणारा गड म्हणून राजगडाचे महत्त्व वेगळे आहे. या गडाच्या दुरुस्तीबाबत पुरातत्त्व खाते आणि राज्य शासनाने वेगळे धोरण ठेवण्याची गरज असतानाही गडावरच्या कामे चुकीच्या पद्धतीने होत आहेत. मूळ तटबंदी कशी होती हे दर्शविणारा तटबंदीचा भाग पद्मावती मंदिराच्या मागील बाजूस शिल्लक आहे. शिवकालीन बांधकामाचा हा नमुना समोर असूनही राजवाड्याच्या तळ्यापासून पाली दरवाजाकडे जाणाऱ्या तटबंदीवर पुरातत्त्व खात्याने अक्षरक्षः कम्पाउंड वॉलसारखी भिंत बांधली आहे. गेली अनेक वर्षे कधी योग्य ठेकेदार न मिळणे; तर कधी निधीची चणचण अशा दुष्टचक्रात रखडलेले पद्मावती माचीवरील सदरेचे काम यंदा पूर्णत्वास जाण्याची शक्यता होती. मात्र ठेकेदार आणि पुरातत्त्व खाते यांच्यातील वादामुळे हे काम ठप्प झाले आहे. सागवानी लाकडाचा वापर सदरेसाठी करण्यात आला आहे. सदरेच्या छताचेही काम राहिलेले असल्याने आता सागवानी लाकडांच्या तुळया, चौकटी आणि नक्षीदार खांब गडावरच्या धुवांधार पावसात भिजत आहेत. तुळया आणि खांब भिजून ते कुजले की केलेले कामही वाया जाणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी राजगड हा वारसा आणि वास्तूसंपन्न गड असल्याची ग्वाही दिली होती. जागतिक वारसास्थळांच्या यादीत हा गड जायलाच हवा, असेही त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिल्लक गडावशेषांची वाट लागत असूनही पुरातत्त्व खाते त्याबाबत उदासीन आहे.

मंदिरांमध्ये हॉटेल्स राजगडाच्या पद्मावती माचीवरील पद्मावती आणि रामेश्वर मंदिरांसह महादरावाजातील पहारेकऱ्यांच्या देवड्यांमध्येही सध्या भजी आणि पिठलं-भाकरीची हॉटेल्स स्थानिकांनी सुरू केली आहेत. गडाच्या परीघात रोजगार उपलब्ध होण्यास कोणाचा विरोध नाही मात्र या हॉटेल्समुळे थर्माकोलच्या प्लेट, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा कचरा प्रचंड वाढला असून तो थेट गडाच्या तटावरून खाली भिरकावला जातो आहे. पुरातत्त्व खात्याचे अधिकारी गडावर फिरकत नसल्याने त्यांना या गोष्टीचे काहीही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक विषयांसाठी संस्कृतचा बळी

$
0
0

पुणे : शालेय पातळीवर कम्प्युटर, पर्यावरणशास्त्र, अॅग्रिकल्चर अशा विषयांसाठी पर्याय म्हणून सातत्याने संस्कृतचाच बळी दिल्याने देशात या भाषेचा विकास खुंटल्याचे महत्त्वाचे निरीक्षण संस्कृतच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचविणाऱ्या समितीने मांडले आहे. त्याचवेळी भविष्यात संस्कृतचा विकास साध्य करण्यासाठी शालेय पातळीपासून कॉलेज पातळीपर्यंत नेमके काय करावे, संस्कृतचे शिक्षण आंतरविद्याशाखीय व्हावे यासाठी काय करावे, या विषयीच्या सूचनाही समितीने केल्या आहेत. देशभरात संस्कृत भाषेचा दैनंदिन जीवनामधील वापर वाढावा आणि संस्कृत शिक्षणाचे सध्याचे स्वरूपही अधिक व्यापक व्हावे, यासाठी या समितीने केलेल्या सूचना अहवालाच्या माध्यमातून केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या निरीक्षणांचा समावेश आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या समितीने संस्कृत शिक्षकांच्या प्रशिक्षणापासून ते शालेय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या स्वरूपापर्यंतच्या टप्प्यापर्यंत वेगवेगळे बदल सुचविले आहेत. अहवालामध्ये नमूद माहितीनुसार, देशात बहुतांश राज्य बोर्डांमध्ये दहावीपर्यंत तीन भाषांचा, तर अकरावी- बारावीला दोन भाषांचा अभ्यास केला जातो. सीबीएसई, आयसीएसई आणि एनआयओएस या राष्ट्रीय बोर्डांसाठी आठवीपर्यंत तीन भाषा, नववी- दहावीला दोन भाषा, तर अकरावी आणि बारावीमध्ये एक भाषा अभ्यासली जाते. 'सीबीएसई'- 'आयसीएसई'सारख्या राष्ट्रीय बोर्डांमधून संस्कृतला प्रोत्साहन दिले जात नसल्याने, त्यांच्याच मार्गावर चालणाऱ्या इतर राज्य बोर्डांमधूनही केवळ इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांचा अभ्यास चालतो. पर्यायाने संस्कृतचा अभ्यास मागे पडला आहे. परिणामी कॉलेज पातळीवर आणि उच्चशिक्षणासाठीही संस्कृतसाठी विद्यार्थी मिळेनासे झाले आहे. इंग्रजांच्या काळामध्ये संस्कृत शिक्षकांना तुलनेने कमी पगार दिला जात होता. स्वातंत्र्योत्तर काळातही संस्कृतच्या शिक्षकांना दुय्यम दर्जा दिला जात असल्याने चांगल्या शिक्षकांनीही संस्कृतकडे पाठ फिरविल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

उपाय काय ? - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून (एनसीईआरटी) माध्यमिक पातळीवर त्रिभाषा सूत्र, तर उच्च माध्यमिक पातळीवर द्विभाषा सूत्राची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आवश्यक माहिती गोळा करणे. त्यासाठी पदव्युत्तर पातळीवरील संस्कृत विभागांच्या मदतीने काम करणे, अकरावी आणि बारावीला सर्व शाखांमधून, तसेच विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विषय पर्याय म्हणून उपलब्ध करून देणे. - संस्कृत शिकविण्याच्या पद्धतीमध्ये अामूलाग्र बदल करणे. संस्कृत शिक्षकांनाही त्यासाठी प्रशिक्षित करणे. - प्रत्येक विषयामध्ये भारतीय पारंपरिक ज्ञानाचा समावेश करणे. त्या आधारे संस्कृतविषयीची जाणीव जागृती करणे. - बीएड आणि डीएडच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत कसे शिकवावे, याच्या पद्धतींचा समावेश करणे.

संस्कृत शिक्षण दृष्टिक्षेपात - जवळपास पाच हजार संस्कृत पाठशाळा. - एक हजार वेदपाठशाळा. - ८ राज्यांमधून माध्यमिक पातळीपर्यंत संस्कृत अभ्यासण्याची सुविधा. - जवळपास तीन लाख विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करतात. - १२० विद्यापीठांमधून संस्कृत पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर शिकविले जाते. - १५ संस्कृत विद्यापीठे, एक हजार संलग्नित कॉलेजे, जवळपास दहा लाख विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images