Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अपुऱ्या सोयींमुळे ६३ टक्के महिलांची कुचंबणा

$
0
0
सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील दुरवस्था, कार्यालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखता येत नसल्याची धक्कादायक माहिती भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

डेंगीचा जिल्ह्यात फारसा फैलाव नाही

$
0
0
पुणे जिल्ह्यात दररोज दोन ते चार जणांना डेगींची लागण होत आहे. मात्र, शहराच्या तुलनेत जिल्ह्यात फारसा प्रादुर्भावर नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी केला. बारामती, वालचंदनगर या भागात काही पेशंट आढळले असून, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

सोशल नेटवर्किंगवरही ‘सँडी’चा धुमाकूळ!

$
0
0
‘सँडी’चा तडाखा बसलेल्या अमेरिकन वाताहतीचे प्रतिबिंब आता सोशल नेटवर्किंग साइट्सवरूनही उमटायला लागले आहे. सँडी वादळामुळे होणारे नुकसान, मदतकार्य, मृत्युमुखी पडलेल्या आणि वादळामुळे अडकून पडलेल्यांसाठी सुरू असलेल्या प्रार्थना आणि सुरक्षित राहण्यासाठी संदेश देण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या धावपळीमुळे ‘ट्विटर’सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सातत्याने ट्विट्स होत आहेत.

भारतीयांना ‘सवय’; अमेरिकन घाबरले

$
0
0
वादळामुळे लाइट जाणे, घराची पडझड, पाणीपुरवठा खंडित होणे यांची सवयच नसल्याने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपेक्षा अमेरिकी नागरिकच अधिक भयभीत असल्याचे तेथे राहत असलेल्या अनेकांनी सांगितले.

दहा लाखांची नुकसानभरपाई

$
0
0
लग्नात मानापमान केला नाही म्हणून मारहाण, वारंवार संशय, आईकडून पैसे आणण्याची मागणी, तर कधी दुसरे लग्नच करण्याची धमकी तिला नवरा द्यायचा. रात्री बेरात्री मारहाण करून तिला घराबाहेरच उभे केले जायचे. असे असले तरीही आपल्या तीन वर्षांच्या लहानग्या मुलाच्या भवितव्यासाठी ती त्याच्याकडे नांदायला तयार होती.

अॅमिनिटी स्पेसच्या ९ जागा पीएमपीकडे

$
0
0
महापालिकेने अॅमिनिटी स्पेसच्या नऊ जागा पीएमपीच्या ताब्यात दिल्या आहेत, त्यापैकी सहा ठिकाणी पार्किंग आणि बसस्टॉपची सुविधा तर, उर्वरित तीन जागांवर बस स्टॉपचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी यांनी दिली.

रवा, मैद्यासह तेलाची भेसळ रोखणार

$
0
0
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह फराळाच्या खाद्यपदार्थासाठी वापरण्यात येणाऱ्या रवा, मैदा, बेसन, तेल, वनस्पती तूप, खवा यातील भेसळ रोखण्यासाठी पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सज्ज झाले आहे. एक नोव्हेंबरपासून पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत या संदर्भात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

रस्त्यांवर फटाका स्टॉलला यंदा परवाना नाही

$
0
0
पुणे महापालिकेने यंदा रस्ते आणि फुटपाथवर फटाके विक्री स्टॉलना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनीही रस्ते आणि फुटपाथवर स्टॉलना परवाने देऊ नये, असे पत्र अतिक्रमण विभागाने पोलिस सहआयुक्तांना पाठवले आहे.

स्वारगेट-दादर व्हॉल्वो उद्यापासून सुरू

$
0
0
कात्रज, मार्केटयार्ड या भागातील प्रवाशांना दादरला जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी, एसटी महामंडळातर्फे एक नोव्हेंबरपासून स्वारगेट ते दादर या मार्गावर व्होल्वोसेवा सुरू करण्यात येणार आहे.

शहरात खड्ड्यांमुळे एकही अपघात नाही

$
0
0
शहरातील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे कोणताही अपघात किंवा हानी झालेली नाही, असा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. तसेच, मंडपासाठी किंवा इतर कारणांसाठी खड्डे खोदणाऱ्यांनी ते बुजविले नाहीत, तर त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची तसदीही पालिकेने घेतलेली नाही.

दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट

$
0
0
पुण्यातील तपास यंत्रणांनी गेल्या अनेक वर्षांत जप्त केलेल्या एक कोटी ५५ लाख रुपयांच्या अमली पदार्थांचा वडाची वाडी येथे मंगळवारी नाश करण्यात आला. यात सर्वाधिक अशा अडीच हजार किलो गांजाचा समावेश होता.

देहूरोड रेड झोनची हद्द

$
0
0
देहूरोड दारुगोळा भांडाराच्या सुरक्षितचेच्या दृष्टीने या परिसरातील संरक्षित क्षेत्राची हद्द (रेड झोन) सीमा भिंतीपासून मोजण्यात आली असून ही मोजणी संरक्षण खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.

विधान भवनाच्या आवारात नऊ नोव्हेंबरला चर्चासत्र

$
0
0
विधान मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील विधान भवनाच्या आवारात येत्या नऊ नोव्हेंबरला ‘राज्यातील उद्योगांची प्रगती व आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली.

सामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार

$
0
0
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना तीनशे, चारशे व पाचशे चौरस फूट आकाराची ‘टाइप प्लॅन’ घरे आता बांधता येणार असून या घरांच्या नियमावलीला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. या घरांना बिगरशेती, बांधकाम नकाशे अशा किचकट प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. मात्र, अशी घरे महापालिका हद्दीपासून दहा किलोमीटर अंतराबाहेरच बांधता येणार आहेत.

विद्यार्थीच करणार इकोफ्रेंडली दिवाळी कार्निव्हल

$
0
0
मिलेनियम नॅशनल स्कूलतर्फे येत्या शुक्रवारी (दोन नोव्हेंबर) ‘इकोफ्रेंडली दिवाळी कार्निव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी संयोजक, व्यवस्थापक आणि स्पर्धक अशी सबकुछ जबाबदारी विद्यार्थीच पाहणार आहेत.

कारवाई की नव्याची नवलाई ?

$
0
0
आंबेगाव पठारावर बेकायदा इमारत कोसळून अकरा बळी गेल्यानंतर मोठा गाजावाजा करून बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेली मोहीम नव्याची नवलाईच ठरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली नाही.

‘स्वच्छ’च्या महिला गाणार आता कॉन्सर्टमध्ये

$
0
0
शहरातील कचरा वर्गीकरणासाठी सतत धडपडणाऱ्या ‘स्वच्छ’ संघटनेचे महत्त्व पुणेकरांना समजेल तेव्हा समजेल; पण अमेरिकेतील प्रसिद्ध पियानो वादक किंबॉल ग्लॅलघर याने मात्र त्यांची दखल घेतली आहे.

आता तुम्हीच साकारा इको-फ्रेंडली किल्ला!

$
0
0
दिवाळीची सुट्टी म्हणजे बच्चेकंपनीसाठी धमाल करण्याची पर्वणीच. मातीमध्ये मनसोक्त खेळत अंगणात छानसा किल्ला साकारणे हा या सुट्टीतला अलिखित अजेंडा असतो. इकोफ्रेंडली साहित्यापासून असा किल्ला करणे आता मुलांसाठी आणखी सोपे ठरणार आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा, तटबंदीच्या भिंती, अष्टकोनी बुरुज यांचे ‘डू इट युवरसेल्फ’ हे कीट पुण्यातील अश्विनी आणि वसंत देवधर या दांपत्याने बनविले आहे.

बॉम्ब असलेली बॅग यासीन भटकळनेच ठेवली

$
0
0
जर्मन बेकरी येथे यासीन भटकळने बॉम्ब असलेली बॅग ठेवल्याचे दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात उघडकीस आले होते. बॉम्बची बॅग ठेवणारी व्यक्ती अहमद उर्फ यासीन सिद्दीप्पा भटकळ असल्याचे त्याचा लहान भाऊ अब्दुल समद याने सीसीटीव्हीच्या फुटेजवरून ओळखले होते, अशी साक्ष मुंबई दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश कदम यांनी मंगळवारी कोर्टात दिली.

तरुणाची आत्महत्या

$
0
0
निगडी ओटास्कीम येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय अण्णप्पा बाबर (वय ३० रा. निगडी ओटास्कीम ) असे त्या तरुणाचे नाव आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images