Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्कॉलरशिप’चा अभ्यासक्रम जाहीर

$
0
0

पेपरची संख्या दोनवर; नव्या बाबींचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यभरातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून आयोजित होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षांचा अभ्यासक्रम अखेर मंगळवारी जाहीर झाला. यंदा पहिल्यांदाच 'बालभारती'च्या माध्यमातून छापण्यात आलेल्या स्कॉलरशिपच्या अधिकृत सरकारी पुस्तिकांचेही प्रकाशनही मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत केले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परिषदेने http://www.mscepune.in या वेबसाइटवरून या दोन्ही परीक्षांचे अभ्यासक्रम आणि परीक्षेतील विविध विषयांची गुणविभागणी जाहीर केली आहे. त्यानुसार दोन्ही परीक्षांसाठी पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणिताचा, तर दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीवरील प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रथम भाषा आणि तृतीय भाषेचे प्रत्येकी २५ प्रश्न, तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रत्येकी ५० प्रश्न सोडवावे लागतील. या सर्व प्रश्नांना प्रत्येकी २ गुण असतील. त्यानुसार या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी ७५ प्रश्नांचा समावेश असेल. दोन्ही पेपरसाठी एकूण १५० गुण, या पद्धतीने यंदापासून तीनशे गुणांची स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाणार आहे.

दोन उत्तरांच्या प्रश्नांचाही समावेश

स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी यंदा पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक उत्तरे असणाऱ्या प्रश्नांचाही विचार केला जाणार असल्याचे परिषदेने जाहीर केलेल्या स्वरूपावरून स्पष्ट होत आहे. परिषदेने या विषयी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त २० टक्के प्रश्नांसाठी चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. हे दोन्ही पर्याय नोंदविणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल. पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी असा विचार झाला नसल्याचेही परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिकता जोपासली जावी, याचा विचार करून परिषदेने या अभ्यासक्रमामध्ये काही नव्या बाबींचा समावेश केला आहे. पेपरची संख्या तीनवरून दोनवर आणताना विद्यार्थ्यांचा वेळ वाचविण्याचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येकी दीड तासांच्या दोन पेपरमध्ये चार विषय समाविष्ट करण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूरस्थिती टाळण्यासाठी आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस शहरात पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यास नदी, तसेच ओढे, नाले यांना पूर येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीतीत कोणतीही जिवीत, तसेच वित्तहानी निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

नदी, तसेच ओढ्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पुराचा सर्वाधिक फटका बसत असतो. त्यामुळे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी नुकसान टाळण्यासाठी आपल्या झोपड्या, घरे स्वत:हून काढून घ्यावीत. नाल्याच्या पात्राजवळ असलेल्या झोपड्यांवर, घरांवर पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे या घरांमध्ये जाऊ नये, तसेच लहान मुलांना तेथे जाण्यास मज्जाव करावा. डोंगर, खाणीजवळ असलेली बांधकामे तातडीने काढून घ्यावीत, धोकादायक झालेले वीजेचे खांब, तुटलेल्या तारा यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीसाठी तातडीने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, क्षेत्रीय कार्यालयासह विविध खात्यांकडे मदत मागण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अनेकदा रस्त्यांवर साठते. त्यामुळे रस्त्यावरून चालताना सावकाश चालावे, तसेच रस्त्यावर साठलेल्या पाण्यामधून वाहने चालविताना वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, रस्त्यावर असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरचा अंदाज घ्यावा, अनेकदा पावसाच्या पाण्यामुळे चेंबरची झाकणे उघडण्याची शक्यता असते. नदीकाठचा भाग, जवळच्या इमारती यांच्यावर लाल रंगाने धोक्याची पातळी दाखविण्यात आलेली असते. पूर आल्यास पाण्याची धोक्याची पातळी गाठली आहे का? याचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याची तयारी करावी. पावसामुळे जुनी इमारत, भिंत पडण्याची शक्यता असल्यास तातडीने महापालिका, तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधावा. मुसळधार पावसामुळे अनेकदा सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सोसायटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यास पाणी काढण्यासाठी मोटार, पंप याची व्यवस्था सोसायटीने उपलब्ध करून ठेवावी, असे आवाहन महापौर प्रशांत जगताप, आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप हंगामासाठी ८० टक्के पेरण्या

$
0
0

जून, जुलैमध्ये राज्यात १०६ टक्के पाऊस

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात जून आणि जुलैमध्ये सरासरी सुमारे १०६ टक्के पाऊस झाला आहे. ३५५ तालुक्यांपैकी २२८ तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याने खरीप हंगामासाठी ८० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
राज्याच्या कृषी खात्याकडून एक जून ते १५ जुलै या कालावधीतील पर्जन्यमान आणि खरीप हंगामाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण सरासरीच्या सुमारे १०६ टक्के झाले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत सरासरी ४१८.१ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र, ४४६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ३५५ तालुक्यांपैकी २२८ तालुक्यांमध्ये शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अपवाद मात्र, नंदूरबार, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा. येथे पावसाचे प्रमाण सुमारे २५ ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. नाशिक, कोल्हापूर, बीड, लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सुमारे ७५ टक्के आहे.
पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने खरीप हंगामासाठी सुमारे ८० टक्के क्षेत्रफळावर पेरणीची कामे झाली आहेत. राज्यात खरीप हंगामासाठी उसाचे क्षेत्र वगळता अन्य पिकांचे सुमारे १३९.६४ लाख हेक्टर क्षेत्रफळ आहे. १५ जुलैपर्यंत त्यापैकी ११२.१८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोल्हापूरमध्ये ३३ पैकी ३० तालुक्यांमध्ये सरासरी शंभर टक्के पावसाचे प्रमाण झाले आहे. या विभागामध्ये ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल आणि सोयाबिन ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. औरंगाबाद विभागामध्ये पावसाचे सरासरी प्रमाण कमी आहे. २८ पैकी १४ तालुक्यांमध्येच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
कोकण विभागातील ४७ पैकी ३४ तालुक्यांमध्ये शंभरहून अधिक टक्के पाऊस पडल्यामुळे भात आणि नाचणी या पिकांच्या पुनर्लागवडीची कामे प्रगतिपथावर आहेत. नाशिक विभागात ४० पैकी १८ तालुक्यांमध्ये, अमरावती विभागात ५६ पैकी ४९ तालुक्यांमध्ये आणि नागपूरमध्ये ६४ पैकी ४० तालुक्यांमध्ये शंभर टक्के पाऊस झाला आहे. लातूरमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने ४८ पैकी २३ तालुक्यांमध्ये शंभर टक्के पावसाची नोंद झाली आहे.
..
पुण्यात पिके समाधानकारक
पुणे विभागातील ३९ तालुक्यांपैकी २० तालुक्यांमध्ये शंभर टक्के पाऊस झाला आहे. या विभागात झालेल्या पेरणीनंतर पिकांची वाढ समाधानकारक असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या पाण्याचा खेळखंडोबा

$
0
0

राजकीय श्रेयासाठी पुणेकरांना वेठीस धरण्याची चढाओढ

Dhananjay.Jadhav@timesgroup.com
पुणे : पुणे शहरात गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्यावरून रणकंदन पेटले आहे. पाणीकपात रद्द करण्याची घोषणा कोणी करायची आणि त्याच्या श्रेयाचे धनी कोण होणार या राजकारणामध्ये पुण्याच्या पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये पाण्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात पुणेकर विनाकारण भरडले जात आहेत.
जून महिन्याचा शेवटच्या पंधरवड्यात पुण्याच्या पाण्यासाठी कोणता राजकीय पक्ष काय करीत होता, याचा लेखाजोखा समोर येईल. धरणांतील पाणीसाठा तळाला गेला असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी इंदापूरला खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याचा केलेला अट्टाहास दिसतो. त्याचवेळी धरणातील पाणी कमी झाल्यामुळे आणखी पाणीकपात लादण्याची राष्ट्रवादीने केलेली तयारी दिसते. आता हेच दोन्ही पक्ष पुण्याची पाणीकपात रद्द करण्याच्या श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसाने खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पंधरा टीएमसी पाणीसाठा झाला. तोपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचा कोणताही विषय चर्चेत नव्हता. पण, शहरात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कपात आता रद्द करा, असा आदेश महापौरांना दिला आणि तेथेच भाजपची राजकीय कोंडी करण्याचा डाव रचला गेला. महापौरांनी लगोलग शहराची पाणीकपात रद्द करून दिवसाआडऐवजी दररोज पाणीपुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. पाणीकपात रद्द करण्याचे श्रेय राष्ट्रवादीला जाण्याची भीती वाटल्याने त्याला लगेचच विरोध केला गेला. पालकमंत्र्यांनी ही कपात लगेच रद्द करता येणार नाही, असेही स्पष्ट केले आणि महापालिका आयुक्तांनीही महापौरांची मागणी अव्हेरली. वास्तविक, धरणांतील पाणीसाठ्याचा अभ्यास केला गेल्यास शहरातील पाणीकपात केव्हाच रद्द व्हायला हवी होती. धरणे आटलेली असताना त्यातून ग्रामीण भागात पाणी सोडताना मागील दहा वर्षांची पावसाची आकडेवारी दाखविली गेली. मग, पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाची आकडेमोड का दाखविली गेली नाही. हा सर्वांचा दुटप्पीपणा नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या श्रेयासाठी धडपडणाऱ्यांना पुण्याच्या पाण्याच्या कोट्यात वाढ करण्यासाठी कधी लढावेसे वाटत नाही. पुण्याचा पाणीकोटा २००७मध्ये निश्चित करण्यात आला. त्यानुसार पुण्याला फक्त ८.५ टीएमसीच पाणी मंजूर आहे. २०११ मध्ये मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत पुण्याला ११.५० टीएमसी पाणी देण्याचे ठरले. पण तो अधिकृत नोंदविला गेलेला नाही. पुण्याच्या पाण्याची गरज सध्या वर्षाकाठी १५ ते १६ टीएमसी आहे. या पाणीवापरावर आक्षेप घेऊन आता मंजूर कोट्याप्रमाणेच पाणीवापर करण्याचे पत्र पाटबंधारे खात्याने दिले आहे. पाटबंधारे खात्याचा कोणताही अधिकारी हे धारिष्ट्य करणार नाही. त्यासाठी राजकीय दबाव असल्याचे नाकारता येणार नाही.
पुण्यामध्ये साधारणतः तीस टक्के पाणी गळती होते. धरणातून प्रत्यक्ष मिळणाऱ्या पाण्यापेक्षा तीस टक्के पाणी पुणेकरांना कमी मिळते. ही गळती कमी करण्यात कोणालाही स्वारस्य नाही. शहरात वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातील साडेसहा टीएमसी पाणी शेतीला देण्याचा करार आहे. पण हा करार कित्येक वर्ष प्रत्यक्षात आला नाही. सध्या दोन ते अडीच टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होते. पण ते पाणी कालव्यातून अपेक्षित गतीने पोहचत नाही. या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी पुणेकरांच्या पाण्याचा खेळखंडोबा करण्यातच राजकीय पक्ष धन्यता मानत आहेत. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी पोहचत नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे गेले दहा महिने पुणेकरांनी पाण्याची काटकसर केली. हे पाणी ग्रामीण भागात पिण्यासाठी दिले. पुणेकरांनी केलेल्या बचतीचे फळ म्हणून आता त्यांच्या पाण्यात आणखी कपात करण्याचा डाव रचला जात आहे. हा डाव हाणून पाडतानाच हक्काच्या पाण्यासाठी पुणेकरांनाच लढा उभारावा लागणार असल्याचे दिसत आहे. तसेच पाणीकपात रद्द करण्याच्या तत्कालीन श्रेयासाठी लढणाऱ्या पक्षांनाही वेळीच त्यांची जागा दाखविली पाहिजे.
..
राष्ट्रवादीला अचानक उपरती
राष्ट्रवादीला अचानक पुणेकरांचा उमाळा आलेला दिसतो. अर्थात येत्या सहा महिन्यांत आलेल्या महापालिका निवडणुकीचा संदर्भ त्यामागे आहे हे न कळण्याइतके पुणेकर भोट नक्कीच नाहीत. अजित पवार यांची 'पुणेकर दोनदा अंघोळ करतात', 'पुण्याच्या पाणीवापरात कपात झाली पाहिजे' अशी वक्तव्ये पुणेकरांच्या अजूनही स्मरणात आहेत. भाजपनेही तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विरोधात केलेली आंदोलने आठवावीत. पुण्याचे वाढीव पाणी आ​णि कपात रद्द करण्यासाठी अग्रेसर असलेले भाजपचे नेते आता कपात कायम ठेवण्यासाठी लढत आहेत हे हास्यास्पद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय ​विद्यापीठे पिछाडीवर

$
0
0

परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षिण्यात अपयशी; 'एआययू'चा निष्कर्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एकीकडे परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे त्या तुलनेत परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्यात भारतीय विद्यापीठे मागेच असल्याचे 'असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज'च्या (एआययू) संशोधकांनी दाखवून दिले आहे. परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठांकडे वळविण्यासाठी विशेष धोरणे योजावी लागणार असल्याचेही 'एआययू'च्या संशोधकांनी स्पष्ट केले.
उच्चशिक्षणाच्या जागतिकीकरणासाठी सध्या केंद्रीय पातळीवरूनच विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयानेही त्यासाठी देशभरातील विद्यापीठांना काही विशिष्ट योजनांवर काम करण्यास सांगितले आहे. मात्र, एवढ्यावरच थांबून चालणार नाही. गेल्या काही वर्षात या बाबतीत झालेली अधोगती थांबविण्यासाठी देशातील विद्यापीठांनी दुप्पट वेगाने प्रगती करणे गरजेचे असल्याचे मत 'एआययू'चे महासचिव प्रा. फुरकान कामर आणि वीणा भल्ला यांनी व्यक्त केले.
'देशात जवळपास ४८8 लाख परदेशी विद्यार्थी येऊन शिक्षण घेऊ शकतात. त्यांच्या सध्याच्या संख्येशी तुलना करता, परिस्थिती नक्कीच वाईट आहे असेच म्हणावे लागेल. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी भरीव प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय, काही योजनांची आवश्यकता आहे. पाच लाख परदेशी विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे,' असे मत कामर यांनी संशोधनातून मांडले आहे. 'एआययू'च्या माहितीनुसार, दरवर्षी जवळपास दोन लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. त्याचवेळी परदेशातून भारतीय विद्यापीठांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमीच आहे. २०१३-१४मध्ये परदेशी विद्यार्थ्यांची भारतातील नोंदणी ११ हजारांवरून ३१ हजार १२६पर्यंत वाढली. या वेळी इतर देशांमध्ये विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली. २००० पासून हा अनुभव असताना, दुसरीकडे भारतीय विद्यापीठांना या संधीचा फायदा घेता आला नाही. या प्रक्रियेत केवळ परदेशी चलन मिळविण्याचीच नव्हे, तर जागतिक पातळीवरील विविधतेचा अनुभव देण्याची संधीही विद्यापीठांनी घालविल्याचे मत प्रा. कामर आपल्या संशोधनातून मांडतात.
000
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर
भारतात शिक्षणासाठी येणारे परदेशी विद्यार्थी हे राज्य पातळीवरील पारंपरिक, केंद्रीय विद्यापीठांचा विचार करताना दिसतात. त्याचवेळी चांगल्या दर्जाच्या होस्टेलच्या सुविधा, केटरिंग सर्व्हिस यामुळे परदेशी विद्यार्थी वेगाने खासगी आणि अभिमत विद्यापीठांकडे वळत आहेत. 'एआययू'च्या आकडेवारीनुसार बहुतांश परदेशी विद्यार्थी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमार्फत (इग्नू) चालणाऱ्या दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करतात. पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी मात्र ते तुलनेने छोट्या शहरांमधील विद्यापीठांचा विचार करतात. परवडणारा खर्च हे त्याचे मुख्य कारण ठरते. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिम्बायोसिस विद्यापीठात एकत्रितपणे सर्वाधिक परदेशी विद्यार्थी नोंदणी झाली आहे. पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात. या विद्यार्थ्यांना स्वतंत्र होस्टेलही उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक उपक्रमांमध्येही पुणे विद्यापीठाचा सहभाग वाढत आहे. त्याद्वारे पश्चिम आशियाई देशांमध्ये 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' ही ओळख असली, तरी 'इग्नू'ने आपल्या कार्यशैलीमध्ये बदल केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरून विद्यार्थी मिळविण्यात पुणे विद्यापीठाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
000
देशभरातील केंद्रीय विद्यापीठे ८,१६६
राज्यांमधील पारंपरिक विद्यापीठे १०,२४८
खासगी, अभिमत विद्यापीठे १०,२८३
000
परदेशी विद्यार्थ्यांची आकडेवारी
नेपाळ ६,००९
अफगणिस्तान ३,८५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी इंदापूरचा पाणीप्रश्न सुटणार

$
0
0

खडकवासला धरणाचे पाणी पोहोचले

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी अखेर इंदापूरपर्यंत पोहोचले. या पाण्यामुळे दुष्काळी इंदापूर तालुक्याला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत १५.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. धरण भरल्यानंतर सांडव्यातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हा विसर्ग थांबविण्यात आला. तथापि, पाणलोटातून पाण्याची आवक होत असल्याने मुठा उजवा कालव्यात गेल्या सहा दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यातून सोडलेले हे पाणी हवेली, दौंड मार्गे मंगळवारी इंदापूरला पोहोचले. दौंड, इंदापूर तालुक्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातून सोडलेले पाणी इंदापूरला पोहोचल्यामुळे तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. खडकवासला धरणात पाण्याची आवक सुरू असेपर्यंत कालव्यातून पाणी सोडले जाणार असल्याचे पाटबंधारे खात्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील पानशेत धरणात ६.१६ टीएमसी (५७.८० टक्के), वरसगाव धरणात ६.२१ टीएमसी (४८.४७ टक्के), टेमघर धरणामध्ये १.५३ टीएमसी (४१.२२ टक्के) व खडकवासला धरणात १.८१ टक्के म्हणजे ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पाचा साठा १५.७१ टीएमसी झाला आहे. गतवर्षी खडकवासला प्रकल्पात याचकाळात फक्त ७.२७ टीएमसी पाणीसाठा होता.
..
मंगळवारपर्यंतचा धरणसाठा
धरणाचे नाव उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी आजचा पाऊस
( टीएमसी) (मिमी)

खडकवासला १.८१ ९१.८१ ००
पानशेत ६.१६ ५७.८० ०६
वरसगाव ६.२१ ४८.४७ ०६
टेमघर १.५३ ४१.२२ १७
...
एकूण साठा १५.७१ टीएमसी (५३.८९ टक्के)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या शनिवारी ‘स्वयं तुमच्या दारी’

$
0
0

प्रेरणादायी विचारवंतांचे पैलू उलगडणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, समाजाला प्रेरणादायी विचार देणाऱ्या व्यक्तींचे अनेक पैलू उलगडणारा 'स्वयं तुमच्या दारी' हा कार्यक्रम प्रथमच शहरात आयोजित करण्यात येणार आहे. 'अमृतयात्रा' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे येत्या शनिवारी (२३ जुलै) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील सकारात्मक आणि उद्यमशील क्षेत्रांत कार्यरत संस्था आणि व्यक्तींचे कार्य उलगडण्यासाठी 'अमृतयात्रा' या संस्थेने 'स्वयं टॉक' ही कार्यक्रमांची साखळी साकारली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारी, स्वतःचा शोध' घेतलेली मंडळी 'स्वयं'मध्ये आपले प्रेरणादायी विचार, काम करत असताना केलेला संघर्ष, त्यावर केलेली मात अशा अनेकविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत. पंचवीस मिनिटांत आपापल्या विषयाचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण आणि नंतर प्रश्नोत्तरे हे 'स्वयं'चे आणखी एक वैशिष्ट्य. गेल्या तीन वर्षांपासून हा कार्यक्रम केवळ मुंबईमध्ये आयोजित करण्यात येत होता. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची व्याप्ती वाढावी या उद्देशाने 'मटा'च्या मदतीने आगामी सहा महिन्यात 'स्वयं तुमच्या दारी'' या नावाने हा कार्यक्रम डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.
येत्या शनिवारी शहरात होणाऱ्या कार्यक्रमात नीतेश बनसोडे आणि गिरीश लाड हे दोन वक्ते विचार मांडतील. अहमदनगर येथील 'सावली' या संस्थेचे बनसोडे संस्थापक असून, त्यांनी सुमारे ५० मुलांना दत्तक घेतले आहे. समाजातील दानशूर मंडळीच्या मदतीने गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेले कार्य बनसोडे या वेळी अनुभवांच्या माध्यमातून व्यक्त करणार आहेत. सोनोग्राफी मशिनचा ट्रॅकर तयार करणारे गिरीश लाड ट्रॅकरच्या माध्यमातून लिंगनिदान चाचणी करणाऱ्यांवर नियंत्रण कसे करता येईल, या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
............
कार्यक्रम कधी : येत्या शनिवारी (२३ जुलै)
वेळ : सकाळी १० ते १२ पर्यंत
स्थळ : बीएमसीसी, टाटा हॉल, डेक्कन
प्रवेश सर्वांसाठी खुला
अधिक माहितीसाठी संपर्क : नवीन काळे ९८६९२७४२३३, ९८२०११८२९६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकिटासाठी एसटीचे ‘अॅप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना आता मोबाइलवर तिकीट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण केंद्रावरील रांगेत थांबावे लागणार नाही. तसेच, इंटरनेटवरून तिकीट आरक्षित करताना येणाऱ्या मर्यादांवर मात करता येणार आहे.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. आता महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे यासाठी 'एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप'ची (msrtc mobile reservation app) निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना हव्या त्या गाडीच्या तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे. या अॅपद्वारे प्रवशांना तिकिटाचे पैसे ऑनलाइन भरता येणार आहेत.

अँड्राइड मोबाइलसाठी 'गुगल प्ले स्टोअर'वर हे अॅप मोफत उपलब्ध आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर आवश्यक माहिती सादर करून प्रवाशांना 'लॉग-इन' करावे लागेल. प्रवाशांना कोठे जायचे आहे, कोणत्या गाडीने जायचे आहे, कोणत्या ठिकाणाहून गाडीमध्ये बसायचे आहे, तसेच कोणत्या ठिकाणावर उतरायचे आहे, या माहितीसह आसन क्रमांक, बसचा प्रकार, बसची वेळ प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार निवडण्याची सुविधा अॅपमध्ये आहे. तिकीट आरक्षण करताना ऑनलाइन पैसे अदा करण्याची सुविधा आहे. त्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्ड वापराचा पर्याय देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुनावणीपर्यंत पतीला बाहेरचा रस्ता

$
0
0

कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कोर्टाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या दाव्यात केसची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पतीला घर सोडण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांवर अनेकदा घर सोडण्याची वेळ येते. मात्र, महिलांना कायद्याने घरात राहता येऊ शकते. कोर्टात दावा दाखल असेल तरच पतीवर राहते घर सोडण्याची वेळ येऊ शकते हे या निकालाने स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे या केसमध्ये अर्जदार पत्नीने घर घेताना पतीपेक्षा तिप्पट रक्कम दिली होती. तसेच, घर सोडावे लागल्यानंतरही ती घराचे हप्ते भरत होती. मात्र, कोर्टाच्या या निकालामुळे तिला दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर यांच्या कोर्टाने नुकताच हा निकाल दिला. अर्जदार महिला उषा पवार (नाव बदलले आहे) यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांनी कोथरूड परिसरात फ्लॅट घेतला होता. फ्लॅट घेताना त्यांनी पतीपेक्षा तिप्पट रक्कम अदा केली होती. पतीकडून सातत्याने होणाऱ्या छळामुळे त्यांच्यावर घर सोडण्याची वेळ आली होती. पतीकडून झालेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दावा दाखल केला होता.

त्यांचे प्रकरण समुपदेशकांकडे पाठविण्यात आले. मात्र, समुपदेशकांनी प्रयत्न करूनही यश आले नाही. कोर्टापुढे प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. कोर्टाने या केसचा निकाल देताना अर्जदार महिलेला घरात राहण्याचे आदेश दिले. तसेच, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घर सोडण्याचे पतीला बजावले आहे.

महिलावर्गाला मोठा दिलासा

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महिलांचा बळी जातो. बहुतांश वेळा त्यांच्यावर घर सोडण्याची वेळ येते. मात्र, या कायद्यानुसार न्यायालयाने पत्नीला दिलासा दिला असून, ती घरात राहू शकते असे म्हटले आहे. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल देताना सबिता मार्क बुर्गेस विरुद्ध मार्क ​लायोनेल या केसचा दाखला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशात गुणवत्तेचा बळी?

$
0
0

ऑनलाइनचे बदललेले निकष गुणवंतांना त्रासदायक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशामध्ये बेटरमेंटची एकच संधी देण्याच्या चुकलेल्या निर्णयासोबतच कोट्याचे प्रवेश टप्प्याटप्प्याने प्रत्यर्पित करून घेण्याचा निर्णयही चुकल्याची ओरड करण्यात येत आहे. त्यामुळेच एकीकडे प्रक्रियेमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठीचे प्रयत्न दर्शविणारी सरकारी प्रक्रिया गुणवंत विद्यार्थ्यांना हक्काच्या चांगल्या कॉलेजांपासून दूर लोटणारी ठरली आहे.

यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य सरकारने नवा आदेश काढला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ एकच बेटरमेंट देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, कोट्यांचे प्रवेश नियमित प्रक्रियेपूर्वीच ऑनलाइन प्रक्रियेसाठी समर्पित करण्याच्या सूचनेचाही समावेश करण्यात आला आहे. यंदा पुण्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेच्या कामाचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने या दोन्ही बाबींचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोट्यांचे प्रवेश समर्पित करून घेताना, समितीने कॉलेजांना प्रत्येक फेरीपूर्वी संधी दिली. त्यामुळे अकरावीच्या पहिल्या ऑनलाइन फेरीपूर्वी समितीकडे प्रत्यर्पित होणाऱ्या जागा या तीन टप्प्यांमध्ये विभागल्या गेल्या. त्यामुळे पहिल्याच फेरीच्या वेळी समितीच्या ऑनलाइन प्रवेश निश्चितीसाठी मिळणाऱ्या जागा तुलनेने कमी मिळाल्या. परिणामी पहिल्या फेरीसाठी प्रवेश निश्चिती देताना, समितीला त्याच तुलनेत कमी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती देता आल्याची नोंद या क्षेत्रातील जाणकार सध्या करून देत आहेत. समितीने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात यश मिळविले असले, तरी प्रक्रियेच्या अखेरीस पंधरा हजारांवर विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित राहिल्याने समितीचा मूळ हेतूही साध्य झाला नसल्याचे जाणकार सांगत आहेत.

एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे बेटरमेंटच्या एकाच संधीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या हक्काच्या चांगल्या कॉलेजपासून लांबच राहावे लागले असल्याची कबुली दस्तुरखुद्द प्रवेश नियंत्रण समिती देत आहे. कोट्याच्या सर्व जागा पहिल्या फेरीत उपलब्ध झाल्या असत्या, तर मोठ्या संख्येने पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चिती मिळाली असती आणि त्यातील अनेकांना दुसऱ्या फेरीत बेटरमेंटही मिळू शकली असती. त्यानंतरच्या दुसऱ्या फेरीत एकूण रिक्त जागांसोबतच बेटरमेंट दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर पुढील नव्या विद्यार्थ्यांना सामावून घेणे शक्य झाले असते. याच क्रमाने इतर दोन फेऱ्या राबवून, तीनच फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले असते, अशी नोंद जाणकार करत आहेत.

अर्जांचे प्रमाण वाढले

दरम्यान आता विद्यार्थी आणि पालकांनाही हा गोंधळ लक्षात आल्याने, विद्यार्थी आणि पालक उपसंचालक कार्यालयात मोठ्या संख्येने तक्रार अर्ज सादर करत असल्याचे मंगळवारी दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दररोज पाण्याची गृहिणींची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गेले वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठ्याला तोंड देऊन आम्ही हैराण झालो आहोत. कमी वेळ कहा होईना, पण दररोज पाणीपुरवठा करावा,' अशी मागणी शहरातील गृहिणींकडून करण्यात येत आहे.

दिवसाआड पाण्याची आता नागरिकांना सवय लागली आहे. मात्र, त्यामुळे जास्त पाणी साठवण्याचा कल वाढला आहे. पाणी साठवल्यामुळे ते शिळे होते या गैरसमजातून ते फेकून देण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेक्षा महापालिकेने दिवसाआड चार तासांऐवजी रोज मर्यादित वेळेसाठी म्हणजेच साधारणतः दोन तास पाणी देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे फेकून देण्यात येणारे पाणीही वाचेल. सध्या पावसाळा सुरू असल्याने साठवलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने निर्णय बदलावा.

हर्षदा नांदुर्डीकर
..
सोसायट्यांमधील नागरिकांकडे बोअरवेल आणि मोठ्या टाक्या असल्याने पाण्याचे व्यवस्थापन करता येते. मात्र, वस्त्यांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांचे दिवसाआड पाण्यामुळे हाल होत आहेत. रात्री, अपरात्री तर कधी अचानक दुपारी येणाऱ्या पाण्यामुळे नोकरदार महिलांची धावपळ होते. दुपारी पाणी येत असल्याने घरगड्यांना काम अर्धवट टाकून पाण्यासाठी पळावे लागते. पाणी साठविण्यासाठी मर्यादित व्यवस्था असल्याने त्रासात भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेने रोज सकाळी ठरावीक वेळेत पाणी दिले पाहिजे.
शिल्पा दुनाखे
..
पाणीपुरवठा जेवढा कमी तेवढे पाणी जास्त वाया जाते. नळाला रोज पाणी येत असले, की ते भरून ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे जास्त पाणी भरून ठेवावे लागते. यामुळे नोकरदार महिलांचीही धावपळ वाढली आहे. त्यापेक्षा रोज ठरावीक वेळ पाणी दिल्यास नागरिकांची गैरसोय टाळता येईल. दरवर्षी पाऊस किती पडेल, धरणात किती पाणी असले याकडे डोळे लावून बसवण्यापेक्षा सोसायट्या स्वावलंबी कशा होतील याचा विचारही झाला पाहिजे.
अश्विनी फणसळकर
..
आमच्या सोसायटीने संपूर्ण उन्हाळा टँकरने पाणी घेतले. महापालिकेचे पाणी एकदिवसाआड केवळ अर्धा तास येत होते. पाऊस सुरू झाल्यापासून हे प्रमाण तासावर आले आहे. पण मुळातच लोकांना पाणीबचतीचे महत्त्व माहीत नसल्याने महापालिकेने दिवसाआड किंवा दररोज पाणी दिले तरी प्रश्न सुटणार नाही. चोवीस तास पाणी दिले तरी लोकांना ते कमीच पडेल. महापालिकेने पाण्याच्या पुरवठ्याबरोबरच पाणी वापरावर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
स्मिता कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट पडताळणी होणार विनाविलंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पासपोर्ट काढताना पोलिस पडताळणीला लागणारा वेळ कमी करण्यासाठी पुणे पासपोर्ट कार्यालयातर्फे पोलिसांसाठी मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून, आयुक्तलयातर्फे त्यांना ऑनलाइन व्हेरिफिकेशनसाठी टॅब देण्यात येणार आहेत. तेलंगण, आंध प्रदेशमध्ये या यंत्रणेमुळे पंधरा दिवसांत व्हेरिफिकेशन पूर्ण होत असल्याने आता पुण्यातही हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरात पासपोर्ट विभागाने पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट मिळविण्याचा कालावधी सरासरी आठवड्यावर आणला आहे. देशातील पासपोर्ट अर्जाच्या पोलिस व्हेरिफिकेशनचे सरासरी प्रमाण तीस दिवसांवर आले आहे. तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये मात्र अवघ्या पंधरा दिवसांत पोलिस घरी येऊन मोबाइल अॅपच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून जातात. या अॅपच्या साह्याने अवघ्या सहा दिवसांत व्हेरिफिकेशन करून हैदराबादने आघाडी मिळविली आहे.

मुंबईसह पुण्यातील पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी गेल्या वर्षभरात घटला असून, सरासरी २१ दिवसांवर आला आहे. या मोबाईल अॅपमुळे पोलिसांना अर्जदाराच्या घरी गेल्यावर तिथेच तत्काळ सगळी माहिती तपासून शेरा देता येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. पुढील महिनाभरात पहिल्या टप्प्यात चार पोलिस स्टेशनांत ही कार्यान्वित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसआरए’ योजनेचे दुसऱ्यांदा उद्‍घाटन?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध औंध येथील डॉ. आंबेडकर वासाहतीचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामात समावेश करून त्याचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु, या वसाहतीमध्ये 'एसआरए' होणार असल्याचे झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जुन्याच योजनेचे पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा उद्‍घाटन केले काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

औंध येथील अंबेडकर वसाहतीमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी (एसआरए) काही झोपडपट्टी धारकांचे करार करण्यात आले आहेत. झोपडपट्ट्यांचा स्मार्ट विकास व्हावा यासाठी या वसाहतीचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत करण्यात आला. परंतु, मागील सरकारची 'एसआरए' योजनाच पुन्हा सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने 'झोपडपट्टी हक्क मेळावा' आयोजित केला होता.

'एसआरए' नको, तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवे धोरण तयार करून झोपडपट्टी धारकांना ५०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. नगरसेवक सनी निम्हण, अॅड. मधुकर मुसळे, रिपाइंचे नेते संजय कांबळे, रमेश ठोसर, हिराताई घोडेराव, नाना वाळके, आनंद जुनवणे, निलेश जुनवणे आदी उपस्थित होते.

अॅड. मधुकर मुसळे म्हणाले, 'झोपडपट्टीवासीयांना केंद्राने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोठी घरे देण्यात यावीत. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि झोपडपट्टीवासीयांनी 'एसआरए'ला विरोध केला. ही योजना नको असल्याचे पत्र नागरिकांनी 'एसआरए' अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत मुलीची अखेर सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर दिल्लीतील महिलेने झारखंडमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पुण्यात सुटका करण्यात आली आहे. अपहरणकर्त्या महिलेने मुलीला दिल्लीत एका महिलेकडे घरकामास ठेवले होते. त्यानंतर तिला हडपसर येथील मुलाकडे घरकामास पाठवले होते. एका सामजिक संस्थेच्या पुढाकाराने त्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणी अमित श्यामसुंदर विज आणि त्याची पत्नी हेमा (दोघे रा. अमनोरा टाउनशिप, हडपसर) यांच्यासह दिल्ली येथील मंजू, रेश्मा, तारादीदी आणि श्रीमती विज या सहा आरोपींवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा झारखंड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अल्पवयीन मुलीला बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी मंजू व रेश्मा यांनी कामाच्या मोबदल्यात पैशाचे आमिष दाखवून पीडित मुलीचे झारखंडमधून अपहरण केले होते. आरोपींनी मुलीला घरकाम करण्यासाठी दिल्ली येथील तारादीदी या महिलेच्या घरी ठेवले होते. त्यानंतर पीडित मुलीची दिल्ली येथील श्रीमती विज यांना विक्री करण्यात आली. त्यांनी पीडित मुलीला तिच्या घरात कामास ठेवले. मात्र, कोणताही मोबदला दिला नाही. तसेच तिच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ दिला नाही. त्यानंतर विज यांनी पुण्यात हडपसरमध्ये राहणारा आपला मुलगा अमित याच्याकडे पीडित मुलीला घरकामासाठी पाठवले. हडपसर येथे या मुलीला शिविगाळ, मारहाण करून तिच्याकडून काम करून घेतले जात होते. या प्रकरणाची माहिती एका सामजिक संस्थेला मिळाली. त्यानुसार संस्थेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

हडपसर पोलिसांनी तत्काळ विज दाम्पत्याच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून तिला झारखंडमधील तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेखणी बंद’चा कामांना फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती बारामती पंचायत समितीच्या लिपिकांचे लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याचा फटका प्रशासकीय कामांना बसला आहे. विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणारे नागरिक पंचायत समितीत कर्मचारी नसल्याचे पाहून माघारी फिरत आहेत. प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने नेमके कोणाला भेटावे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
सभापती, गटविकास अधिकारी फोन उचलत नसल्याने ३० ते ४० किमी अंतरावरून कामांसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शनिवारपासून पंचायत समितीच्या लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी बेमुदत 'लंखणी बंद' सुरू केला आहे. आंदोलनाचा बुधवारी पाचवा दिवस होता. तीन मे रोजी ग्राम विकास राज्यमंत्री दीपक केसरकरांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
राज्यातील १७ हजार, पुणे जिल्ह्यातील ७३२, बारामती पंचायत समितीच्या ३५ लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार शुक्रवारपासून राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. कर्मचारी हजेरी पत्रकावर सह्या करून 'लेखणी बंद' आंदोलनात सहभागी होत असल्याचे संघटनेने मान्य केले आहे.

संघटनेच्या मागण्या...

- लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या 'ग्रेड पे' वेतनात सुधारणा करण्यात यावी. - प्रशासकीय बदल्यांबाबत अन्यायकारक नियम मागे घ्यावेत. - कर्तव्य सूची निश्‍चित करण्यात यावी. - कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना निःशुल्क शिक्षण मिळावे. - निमशासकीय कर्मचारी ऐवजी शासकीय कर्मचारी असे संबोधण्यात यावे. - लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ४५ वर्षे करावी. - जुनीच सेवानिवृत्ती योजना कायम करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माहेश्वरी भजन मंडळातर्फेनिवारा वृद्धाश्रमात कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'तू मंदिर मंदिर क्या भटके तेरे मात पिता ही ईश्वर है, तू जो है उनके कारण है, वे ही सच्चे परमेश्वर है' असे म्हणत एरव्ही मुलांच्या सहवासापासून वंचित राहणाऱ्या आजी-आजोबांना माहेश्वरी भजनी मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी गुरुपोर्णिमेनिमित्त पुत्रभेटीसारखा आनंद दिला.
निमित्त होते माहेश्वरी भजनी मंडळातर्फे निवारा वृद्धाश्रमात आजी- आजोबांसाठी आयोजित केलेल्या भजन संध्येचे. तरुण कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या भजनांना उपस्थित आजी-आजोबांनी भरभरून दाद दिली. ढोलकीच्या तालावर धरलेला ताल, प्रत्येक भजनानंतर टाळ्यानी दिलेली दाद, ओलावलेले डोळे तर कधी हसू अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
'परत कधी येणार भेटायला..?' या आजी-अजोबांच्या एका प्रश्नामुळे निघताना भजनासाठी आलेल्या मंडळींचेही डोळे पाणावले. उमेश करवा, कैलाश झंवर, विनोद जाजू, गिरीराज लढा, गोपाळ जाजू, राजू लोहिया, धीरज मुंदडा, नीलेश सारडा, शुभम मुंदडा, सागर दरक, आनंद जाजू व रोनक झंवर यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला.
माहेश्वरी बालाजी भजनी मंडळाची स्थापन १९७० मध्ये झाली असून, गेली ४५ वर्षांपासून मंडळ संपूर्ण भारतात भजनांचे कार्यक्रम सेवाभावनेने करत आहे. मंडळामध्ये तीसहून अधिक कार्यकर्ते आहेत. युवा वर्गाचाही लक्षणीय सहभाग या मंडळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींना इमारत नोंदीचे अधिकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गावच्या हद्दीमधील करपात्र इमारतींच्या नोंदी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ग्रामपंचायतीमधील नमुना नंबर आठमध्ये या नोंदी घेऊन ग्रामपंचायतींना आता कर आकारणी करता येणार आहे. हे अधिकार ग्रामपंचायतींकडे पुन्हा आल्याने शेकडो इमारतींच्या रखडलेल्या नोंदी होऊन ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
गावच्या हद्दीतील परवानगी घेतलेल्या अथवा विनापरवानगी बांधलेल्या इमारतींची नमुना नंबर आठमध्ये नोंद घेण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. मात्र, यातील अनधिकृत, अतिक्रमित तसेच अवैध इमारती या नोंदीनंतर अधिकृत होत नाहीत असेही ग्रामविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींकडून दिली जाणारी बांधकामे परवानगी आणि बांधकामांच्या नोंदी करण्याचे अधिकार गोठवणारे आदेश यापूर्वी काढण्यात आले होते. या आदेशांमुळे गेली चार-पाच वर्षे ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही बांधकामाची नोंद झालेली नाही. शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली. त्यात विनापरवानगी बांधकामांची संख्याही मोठी आहे. या इमारतींच्या नोंदी नमुना आठमध्ये न झाल्याने त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कर आकारणी करणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नाही. त्या उलट या इमारतींमध्ये सदनिकाधारक राहण्यास आल्याने त्यांना द्याव्या लागणाऱ्या सुविधांचा बोजा ग्रामपंचायतींवर पडत राहिला.
कर आकारणी न झाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटली. कामगारांना पगार देण्याएवढीही ऐपत काही ग्रामपंचायतींची राहिली नाही. त्यामुळे या करपात्र इमारतींच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना आठमध्ये करण्यास पुन्हा परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्या संदर्भातील परिपत्रक ग्रामविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी काढले आहे.
या परिपत्रकामुळे ग्रामपंचायतींना गावच्या हद्दीतील इमारतींची नोंद करून कर वसूल करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यानुसार ग्रामपचंयतींना ही माहिती देऊन तत्काळ कार्यवाही सुरू करावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.
...
ग्रामपंचायती होणार आर्थिकदृष्ट्या सक्षम
ग्रामीण भागात नोंद न झालेली लाख ते सव्वालाख बांधकामे उभी आहेत. जागामालकांनी स्वतःच्या जागेत ही बांधकामे केली आहेत. या बांधकामांना ग्रामपंचायतीने वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा सुविधा दिल्या आहेत. परंतु, गेली चार-पाच वर्षए त्यांची नमुना आठला नोंद नसल्याने त्यांच्याकडून कर वसूल करता आलेला नाही. कर वसुलीअभावी ग्रामपंचायतींचे दरवर्षी १०० ते १२५ कोटी रुपयांचे कराचे उत्पन्न बुडत आहे. हा कर वसूल झाल्यास ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश मोतेवारांवर आणखी एक गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दामदुप्पट योजनेत गुंतविलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी प्रॉस्पॅरिटी अॅग्रो इंडिया प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टी पर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे महेश मोतेवर व इतर संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिल किसन खंदारे (४०, रा. बार्शी, सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून प्रॉस्पॅरिटी अॅग्रो इंडिया प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टी पर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन महेश मोतेवर, इतर संचालक, कंपनीचे संचालक व पदाधिकारी अभिषेक मोतेवार व एक बॉडीगार्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रॉस्पॅरिटी अॅग्रो इंडिया प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टी पर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दामदुप्पट योजनेत खंदारे यांनी त्यांच्या व वडिलांच्या नावाने पाच लाख ८९ हजारांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर ते पैसे मागण्यासाठी कंपनीकडे गेले. मात्र, खंदारे यांना गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी शिवाजीनगर येथील कार्यालयात जाऊन पैशांबाबत चौकशी केली असता, त्यांना एका बॉडीगार्डने मारहाण केली. त्यानंतर त्यांना ऑफिसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर खंदारे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी सहायक आयुक्त टी. डी. गौड हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून कामांना केराची टोपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महिनाभर वैद्यकीय रजेवर असल्याचा गैरफायदा घेऊन कामांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नगरसेवकांनी टीकेची तोफ डागली. नगरसेवकांच्या कामांना केराची टोपली दाखवून कामे करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने संतप्त नगरसेवकांनी संबंधितांवर सर्वसाधारण सभेत कारवाईची मागणी केली.
अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या उर्मट भाषेबद्दलही सदस्यांनी बोर्डाच्या अध्यक्षांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी बोलावण्यात आली होती. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीर्घनारायण यादव, उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, नगरसेवक अतुल गायकवाड, रूपाली बिडकर, विनोद मथुरावाला, डॉ. किरण मंत्री आणि प्रियंका श्रीगिरी आदी या वेळी उपस्थित होते. नागरिकांच्या, नगरसेवकांच्या तक्रारी ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. कोणत्याही कामाची दखल वेळेवर घेतली जात नाही. समस्या सोडविल्या जात नाहीत. नगरसेवकांची कामे होत नसल्याने नागरिकांची कामे कशी होणार, असा सवालही सभेत उपस्थित नगरसेवकांनी केला. कामचुकार आणि नगरसेवकांशी उर्मटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून नगरसेवक अतुल गायकवाड यांनी त्यांना खडेबोल सुनावले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱी नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळेच अधिकारी नगरसेवकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देत असल्याची तक्रार करण्यात आली. गिरमकर यांनी कामचुकार अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवलेल्या कामांची यादी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. रस्त्यावरील कचरा उचलण्या कर्मचारी दिरंगाई करीत असल्याचेही गिरमकर यांनी सांगितले. नगरसेविका डॉ. किरण मंत्री, प्रियंका श्रीगिरी यांनी देखील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांच्याकडे केली.
..
बोर्डाच्या प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
ब्रिगेडियर ए. के. त्यागी, अध्यक्ष, पुणे कँन्टोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडमध्ये फोडले चार फ्लॅट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात घरफोड्यांचे सत्र अद्याप सुरूच असून, चोरट्यांनी कोथरूड परिसरात भरदिवसा पाच फ्लॅट फोडून सव्वाचार लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत महेश सीताराम भट (वय ५८, रा. भुसारी कॉलनी, कृष्णाची अपार्टमेंट, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भट यांचा चप्पलविक्रीचा व्यावसाय आहे. त्यांची पत्नी नामांकित कंपनीत नोकरीला आहे. त्यांचा मुलगा दिवसभर कॉलेजला जातो. त्यामुळे भट कुटुंबीय घराला कुलूप लावून जातात. आरोपींनी मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटामधील रोख ३५ हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरला. भट यांच्या शेजारचा फ्लॅटही चोरट्यांनी फोडला. मात्र, तेथे विद्यार्थी राहत असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. भट यांचा मुलगा अडीच वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
दुसऱ्या घटनेत कविता विक्रम साळवी (वय ३७, रा. संकल्प सोसायटी, जोग हॉस्पिटलसमोर, पौड रोड, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्या दुपारी काही कामानिमित्त बाहेर होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटामधील सोन्याचे-चांदीचे दागिने असा, एक लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरला. महंमद हमीद खान (वय ७४, रा. गुलमोहर सोसायटी, पाटीलवाडा, कोथरूड) यांच्याही घरातही घरफोडी करून सोन्याचे मंगळसूत्र पळवून नेले. दरम्यान साळवी व खान हे दुपारी घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घरफोडी झालेल्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक नसल्याचे आढळून आले आहे. एका लहान मुलाने चोरट्याला पाहिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोथरूड पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images