Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुचाक्या आडव्या लावून ९२ हजाराची लूट

$
0
0
भोर- महाड रस्त्यावर कोंढरी गावच्या हद्दीमध्ये मालमोटारीसमोर सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी दुचाकी आडव्या उभ्या करून मालमोटार चालक व क्लिनरला बाहेर ओढून, शिवीगाळ करून ९२ हजाराला लुटले. त्यानंतर ते चोरटे महाडच्या दिशेने पळून गेले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

‘दिल्ली सफारी’ आता इंग्रजीत

$
0
0
‘नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली सफारी’ या अॅनिमेशन पटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाची यशोगाथा परदेशातही पोहोचवण्यासाठी क्रेऑन पिक्चर्सने कंबर कसली असून, सिनेमाच्या इंग्रजी डबिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायिका व्हिनेसा विल्यम्स इंग्रजी व्हर्जनमधल्या गाण्यांना आवाज देण्यावरही नुकतेच शिक्कमोर्तब झाले आहे.

प्रवीण पंतची तक्रार पुरावा म्हणून दाखल

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाची तक्रार दाखल केलेला प्रवीण पंत नेपाळला निघून गेल्यामुळे त्याने दाखल केलेली बॉम्बस्फोटाची तक्रार आणि त्यानुसार दाखल करण्यात आलेला एफआयआर कोर्टातील सुनावणीत सोमवारी पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात आला.

सनी निम्हण यांच्यावरील आरोप बिनबुडाचे

$
0
0
बाणेर येथील जमीन प्रकरणात माझ्या मुलाविरुद्ध खोटी तक्रार करणा-यांनीच अयोग्य आणि अपु-या माहितीच्या आधारे पालिकेकडून नकाशे मंजूर करून घेतले असल्याचे उघड झाले आहे, असा दावा आमदार विनायक निम्हण यांनी सोमवारी केला. माझ्यावर आणि माझ्या मुलावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रिपदाच्या फिल्डिंगसाठी खुलासा

$
0
0
बाणेरमधील जागा बळकाविण्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण आमदार विनायक निम्हण यांनी सोमवारी दिले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून यामध्ये पुण्याला संधी मिळाल्यास फिल्डिंग लावण्याचा उद्देश यामागे असल्याची चर्चा आहे.

जकातचोरीचा प्रकार उघड

$
0
0
महापालिकेला कंत्राटी पद्धतीने वाहने पुरवणा-या कंत्राटदाराच्या गाडीतूनच जकातचोरी करण्यात आला प्रकार उघड झाला आहे. जकात न भरता गाडीतून बीएसएनएलच्या जुन्या मशिन्स नेऊन महापालिकेला फसविण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न जकात विभागाने असफल केला.

भटक्यांसाठी सह्याद्रीत ‘नव्या वाटा’

$
0
0
सह्याद्रीच्या डोंगररांगात लपलेल्या रहस्यमय वाटांमधून भटकंती करण्याची अनोखी संधी गिर्यारोहकांना लवकरच वन विभागाच्या नव्या योजनेतून मिळणार आहे. सह्याद्रीच्या घनदाट वृक्षराजीतून जाणा-या नव्या ‘ट्रेकिंग रूट’चा आराखडा वनाधिका-यांनी तयार केला असून, स्थानिक रोजगार वाढविण्यासाठी गिर्यारोहकांच्या राहण्याची आणि भोजना व्यवस्थाही वन खात्यातर्फेच होणार आहे.

स्थळपाहणी दाखला तत्काळ मिळणार

$
0
0
बिगरशेती (एनए) परवानगीसाठी आवश्यक असलेला तलाठी-तहसीलदार यांचा स्थळपाहणी दाखला तत्काळ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी पावले उचलली आहेत. स्थळपाहणी दाखला पंधरा दिवसांत देण्यासंदर्भातील परिपत्रकही लवकरच जारी केले जाणार आहे.

GPS ठेवणार वृक्षलागवडीवर वॉच

$
0
0
राज्य सरकारने हाती घेतलेला शंभरकोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात केवळ कागदावर कोट्यवधी आकडे आणि प्रत्यक्षात खड्डे रिकामेच अशी वेळ येऊ नये यासाठी संबंधित अधिका-यांना वृक्षारोपणाची छायाचित्रे काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर जीपीएसद्वारे वृक्षारोपण केलेल्या प्रदेशाचे देखरेख ठेवण्यात येते आहे.

भोसरी परिसरात ३ आत्महत्या

$
0
0
कौटुंबिक कलह आणि आजाराला कंटाळून मोशी, भोसरी आणि निगडी परिसरातील दोन महिलांसह तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना शहरामध्ये सोमवारी उघडकीस आल्या.

बिल्डरांची याचिका फेटाळली

$
0
0
फ्लॅटच्या खरेदीवर सरसकट एक टक्का दराने व्हॅट आकारण्याची विनंती करणारी बिल्डरांची याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. राज्य सरकारने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसारच व्हॅट आकारणी करण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

पुणेकर विद्यार्थी सुखरूप

$
0
0
सँडी वादळाचा तडाखा बसलेल्या अमेरिकेच्या ईशान्य भागातील विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी गेलेले पुणेकर विद्यार्थी सुखरूप आहेत. या भागाला मुसळधार पाऊस झोडपत असून, विद्यार्थ्यांना घरात बसण्यावाचून पर्याय नाही. या भागातील विद्यापीठे आणि कॉलेजेसही बंद आहेत.

ती वादळी रात्र नि लोंबकळणारी महाकाय क्रेन

$
0
0
सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस. घरातही भीती वाटावी अशी स्थिती. ‘सुपरस्टॉर्म सँडी’चे हे थैमान आम्ही खिडकीतून पाहात आहेत. पण, काळजी करू नका. आम्ही सुखरूप आहोत...

२०० अनधिकृत झोपड्यांवर कारवार्इ

$
0
0
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) येरवडा येथील नियोजित कार्यालयाच्या जागेवर झालेल्या फुलेनगर झोपडपट्टीतील सुमारे २०० झोपड्या तीन तासांमध्ये पाडून संबंधित जागा मंगळवारी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक लोकांकडून विरोध करण्यात आला. मात्र, त्यास न जुमानता ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियम तोडल्यास समाजसेवेचा दंड करा

$
0
0
वाहतूक नियम तोडणाऱ्यांनी पुन्हा चूक करू नये, यासाठी त्यांच्याकडून दंडापोटी समाजसेवा करून घ्यावी, असा प्रस्ताव नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे सल्लागार चांदमल परमार यांनी केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री सी. पी. जोशी यांना पाठवला आहे. केंद्र सरकारने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केल्यास वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे.

निम्मे ग्राहक अद्याप ‘गॅस’वरच

$
0
0
ग्राहकांना ‘केवायसी’ अर्जांची पूर्तता करण्यास मुदतवाढ देण्यात आली असली, तरी अद्याप ५० टक्के ग्राहकांनीही त्याची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्यादित वितरकांकडे ग्राहकांची मोठी संख्या असल्याने या अर्जांची पूर्तता करून घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

उपजिल्हाधिकारी असल्याच्या बहाण्याने धमकाविले

$
0
0
उपजिल्हाधिकारी असल्याचा बहाणा करीत जागेचा व्यवहार मिटवून टाकण्याविषयी धमकाविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हे वाहन सरकारी आहे, का खासगी याचा तपास सुरू आहे.

कॉल करा... ०२०- २५५०८४७४ वर

$
0
0
शहराच्या विविध भागात डेंगीच्या डासांनी पुणेकरांना हैराण केल्याच्या पार्श्वभूमीमवर आता डासांच्या नायनाटासाठी हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी आपापल्या भागात भेडसावणाऱ्या डासांच्या समस्येविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या हेल्पलाइनवर सकाळी १० ते ५ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विकास आराखड्यावरून काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात ?

$
0
0
नगरसेवकांची नाराजी आणि आघाडीतील राजकारण यांमुळे शहराच्या विकास आराखड्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने विरोधात भूमिका घेतल्यास आराखड्यातील तरतुदींना ब्रेक लागू शकतो, अशी कुजबुज महापालिका आणि शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महागाई भत्त्यासाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0
केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, आगाऊ वेतनवाढीचा निर्णय लवकर व्हावा, निवृत्तीचे वय साठ वर्षे करावे आणि राज्यातही केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा केला जावा अशा विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images