Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रलंबित प्रस्तावांना महिन्यात मंजुरी देऊ

$
0
0

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे आश्वासन म. टा. प्रतिनिधी, येरवडा महानगरपालिका शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असून मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या सरकारकडे असलेल्या विविध प्रलंबित प्रस्तावांना महिनाभरात मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाकडून येरवड्यातील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलमध्ये शालेय प्रवेशोत्सव स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, आमदार जगदीश मुळीक, आयुक्त कुणाल कुमार, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, सदस्य बाळासाहेब जानराव, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांच्यासह परिसरातील विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत नव्याने प्रवेश करणाऱ्या मुलांचे राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, दप्तर, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. आयुक्त कुमार म्हणाले, 'महापालिका शाळांमध्ये मुलांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण मंडळ सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. बहुतांश शाळांमध्ये सातवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध असल्याने आठवीसाठी इतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामळे यंदाच्या वीस शाळा 'मॉडेल' बनविणार असून त्यात सातवीला जोडून दहावीपर्यंत वर्ग वाढविणार आहे. पुढील पाच वर्षांत सर्व महापालिका शाळा वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुळीक म्हणाले, 'गरीब कुटुंबातील मुलांसाठी महापालिका मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते. सध्या स्पर्धेचे युग असल्याने प्रत्येकाला इंग्रजी लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यावर अधिक भर द्यावा, अशी सूचना शिक्षण मंडळाला केली आहे.'

मुख्यमंत्री अनुपस्थित महानगरपालिकेच्या येरवड्यातील लहुजी वस्ताद साळवे शाळेत प्रवेश करणाऱ्या मुलांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते; पण वाघोलीतील दुसऱ्या एका कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा एक दीड तास उशीर झाल्याने या शाळेच्या स्वागत समारंभासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शिक्षण मंडळ अधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. अखेरीस राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज दरवाढीचा ग्राहकांना ‘शॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील वीजग्राहकांवर येत्या तीन वर्षांत एकूण १९ टक्के दरवाढ लादण्याचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. यामध्ये यंदा साडेपाच टक्के, तर पुढील दोन वर्षांत प्रत्येकी पावणेदहा टक्के इतकी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली असून, घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांवर या वाढीची टांगती तलवार उभी आहे.
'महावितरण'तर्फे येत्या चार वर्षांतील वीजदरांचा बहुवार्षिक प्रस्ताव आयोगापुढे सादर केला आहे. त्यावर येत्या जुलैमध्ये राज्यभरात जनसुनावणी होणार आहे. त्यामध्ये येत्या आर्थिक वर्षात घरगुती आणि औद्योगिक वर्गातील ग्राहकांसाठी साडेपाच टक्के वीज दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.या वर्षीच्या साडेपाच टक्के वाढीनंतर पुढील दोन वर्षांत प्रत्येकी ९.८३ टक्के वाढ सुचविण्यात आली आहे; तसेच त्यानंतरच्या वर्षात ही वाढ साडेचार टक्के सुचविण्यात आली आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली, तर येत्या तीन वर्षांत राज्यातील वीजदरांमध्ये एकूण १९ टक्के वाढीचा बोजा ग्राहकांच्या माथ्यावर येणार आहे. या दरवाढीतून ५६ हजार ३७२ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट 'महावितरण'ने समोर ठेवले आहे.

उद्योगांना दणका

राज्यातील उद्योगांचे वीजदर हे शेजारील बहुतेक राज्यांपेक्षा अधिक असल्याची तक्रार या क्षेत्रातून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगांना सध्याच्याच वीज दरांमधून काही दिलासा मिळावा, अशी मागणी पुढे आली होती आणि त्यावर सरकारकडून विचारही सुरू होता. मात्र, या प्रस्तावाद्वारे उद्योगांवर पुन्हा दरवाढ लादण्यात येत असल्याने उद्योगांचे स्थलांतर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन महाराष्ट्र धोरणाशीही हे विसंगत असल्याची टीका करण्यात आली.

वितरण हानी वाढली

गेल्या काही काळात वितरण हानी कमी करण्याचे उद्दिष्ट सातत्याने समोर ठेवण्यात येत असताना गेल्या वर्षी वितरण हानी वाढल्याचे आढळून आले आहे. २०१४-१५ या वर्षी १४.१७ टक्के असलेली वितरण हानी १५-१६ या वर्षात १४.५१ टक्क्यांवर पोहोचली आहे. पुढील वर्षी या हानीचे प्रमाण १३.२५ टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट या प्रस्तावात ठेवण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी वसुलीचे सरासरी प्रमाणही ९४.७१ टक्क्यांवर ९३.२७ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघोलीत फडणवीस गुरुजींचा तास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय विद्यार्थ्यांना पाणीबचतीचे धडे देण्यासाठी शिक्षक नेहमीच धडपड करत असतात; पण हीच धडपड जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री करतात, तेव्हा काय होते, ते बुधवारी पुण्याजवळील वाघोलीच्या शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले. विद्यार्थ्यांना पाणीबचत आणि एकजुटीचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विद्यार्थ्यांनी नेहमीच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून बाहेर पडून एक गोष्ट सांगायला लावली. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनाही स्वतः शिक्षकाचे काम किती अवघड ते अनुभवले.
राज्यात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांमध्ये बुधवारपासून शाळांना सुरुवात झाली. या निमित्ताने पुणे भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघोलीच्या जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पहिलीच्या वर्गात 'कसे मिळेल पाणी' हा पाठ शिकवित, या विद्यार्थ्यांना पाणी बचतीचा संदेश दिला. मुख्यमंत्र्यांकडून खाऊ स्वीकारताना शाळेला बुट्टी न मारण्याचे आश्वासन या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी दिले. पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंद कुमार, प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्यासह शिक्षण खात्यातील इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.
आपल्या शाळाभेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना शाळेतील पहिलीच्या विद्यार्थिनींनी बोटाला धरून आपल्या वर्गात नेले. वर्गात पहिलीच्या 'बालभारती'च्या पुस्तकातील 'कसे मिळेल पाणी' हा धडा शिकताना या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनलेल्या फडणवीस यांना आपल्या पाठातून पाणी वाचविण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा संदेश उमगल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या पाठानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना पालकमंत्री बापट यांनी मुख्यमंत्र्यांची नेमकी ओळख करून दिली. तसेच, घरी गेल्यावर आपल्या पालकांना आपण आज मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे सांगण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या चॉकलेट वाटपानंतर हा वर्ग संपला. चॉकलेट स्वीकारताना या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोज शाळेत येण्याचे आणि शाळेला बुट्टी न मारण्याचे आश्वासनही दिले.

केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहा शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक प्रतिनिधींशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या पुढील टप्प्यात राज्यात डिजिटल शाळांची संख्या वाढविण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
- राज्यातील शाळा या केवळ शिक्षकांना पगार देण्यासाठी नसून, विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी उभारल्याची बाब शिक्षकांनीही समजून घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी बुधवारी केले.
- केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आहेत, केवळ शिक्षकांचे पगार करण्यासाठी नाहीत,' असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात दिला. राज्यात शालेय पातळीवर केंद्रीय पद्धतीने शिक्षकभरतीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी नवा कायदाही प्रस्तावित असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानेच स्पष्ट केले.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातून राज्यभरातील सहा निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या निमित्ताने त्यांनी पालकांच्या शिक्षणाविषयीच्या अपेक्षा जाणून घेतानाच, शिक्षकांकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय शिक्षक भरतीसह इतर मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंद कुमार, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

प्रस्तावित केंद्रीय शिक्षक भरतीविषयी फडणवीस म्हणाले, 'या बाबत संस्थाचालकांचे काही प्रश्न आहेत. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता आणि या प्रश्नांची उत्तरे शोधून ही प्रक्रिया राज्यात लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या शाळांमध्ये सर्व बाबींची पूर्तता, त्याच शाळांना अनुदान दिले जाणार. शाळा या विद्यार्थ्यांसाठी आहेत. शिक्षणावर होणारा खर्च हा उत्तम शिक्षण देण्यासाठी, शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आहे. त्यावर सरकारची नजर राहणार आहे. नव्या पिढीच्या उभारणीसाठी आपण काम करत आहोत, याचे भान ठेवून शाळा आणि शिक्षकांनी काम केले, तर सरकारला अनुदान द्यायलाही बरे वाटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.'

खात्याविषयी समाधानी

शिक्षण खात्याने गेल्या वर्षभरात केलेल्या प्रगतीविषयी समाधानी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमित्ताने सांगितले. फडणवीस म्हणाले, 'शिक्षण खात्याला दिलेले उद्दिष्ट खात्याने पूर्ण केले आहे. त्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याविषयी मी समाधानी आहे. अशाच प्रयत्नांच्या आधारे येत्या तीन-चार वर्षांत राज्यभरात सर्व ग्रामपंचायतींपर्यंत वायर्ड नेटवर्क पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या आधारे राज्यभरात सर्वत्र ऑनलाइन डिजिटल शाळा सुरू करण्याचाही सरकारचा मानस आहे.'

'मंत्रिमंडळात मुलं कशी, हे तुम्हाला माहिती...'

मुख्यमंत्र्‍यांनी बुधवारी पुण्यात वाघोलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गावर काही काळ शिकविण्याचाही अनुभव घेतला. या अनुभवाविषयी विचारले असता ते म्हणाले, 'शिकवणं एवढं सोप्प नसतं हे आज लक्षात आलं. शिकविताना खूप आनंद वाटला. पहिलीतल्या विद्यार्थ्यांचं ज्ञान चांगलं होता. चौथीच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसादही चांगला होता. स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता दिसली.' या वर्गाची मंत्रिमंडळाशी तुलना करताना ते म्हणाले, 'शिकविण्यासाठी गेलो तो वर्ग अनुशासित मुलांचा होता. विधानसभा किंवा मंत्रिमंडळामध्ये कशी मुलं आहेत, हे तुम्हालाही माहितीये.'

'राजकारण बाजूला ठेवा'

सनातन संस्थेने नुकत्याच सरकारविषयी जाहीर केलेल्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजचा दिवस हा शिक्षणासाठी राहू द्या म्हणत फडणवीस यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले. फडणवीस म्हणाले, 'एखादा दिवस हा शाळेकरीता ठेवा. राजकारण होतच असतं. आजचा दिवस शाळेकरीता, आजचा दिवस 'बेटी पढाव'साठी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोने चुकविला काळजाचा ठोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे चालक उतरून गेल्यानंतर हमालाने सुरू केलेल्या टेम्पोने पाच दुचाकी, दोन कारला धडक दिली. सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने सर्वांचाच थरकाप उडाला. हा अपघात इतका भयानक होता, की लोखंडी कचराकुंडी आणि एका कारला त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूपर्यंत फरपटत नेले आणि पाच दुचाकींना ठोकरले. या वेळी पार्किंगमधून दुचाकी काढणाऱ्या माय-लेकी आणि एक सायकलस्वार जखमी झाले आहेत.

बापू राजू काळे (वय २५, रा. गंगानंगर, फुरसुंगी, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी श्वेता दर्शन रावल (वय ३४, रा. द्वारकाधीश, बोट क्लबरोड, पुणे) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. काळे आणि टेम्पोचालक दत्तात्रय फडतरे हे एका दुकानात माल देण्यासाठी आले होते. पुणे विद्यार्थी गृहाबाहेर रोडच्या कडेला टेम्पो लावून चालक दुकानात गेला. टेम्पोत बसलेल्या काळेने टेम्पो सुरू केला. त्याच्याकडून ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबला गेला. त्यामुळे क्षणार्धात टेम्पोने समोरच्या कचराकुंडीला धडक दिली. ही कचराकुंडी आणि कार ठोकरत रोडच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दुचाकींवर जाऊन आदळला. तेथे पार्किंगमधून दुचाकी काढत असलेल्या माय-लेकींना कार आणि लोखंडी कचराकुंडी घेऊन आलेल्या या टेम्पोची धडक बसली. यामध्ये तरुणी कचरा कुंडीखाली अडकली.

'अपघात इतका भयानक होता की, टेम्पो दुकानात शिरणार, असे दिसल्याने माझ्या अंगावर शहारे उभे राहिले,' असे प्रत्यदर्शी वनिता चव्हाण यांनी सांगितले. पुणे विद्यार्थी गृहासमोर चव्हाण यांचे माही फुटवेअर हे चप्पलचे दुकान आहे. 'टेम्पो दुकानासमोर असलेल्या दुचाकीवर आदळला. पण, कचराकुंडी व कारमुळे तो थांबला,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ची वर्षपूर्ती पुण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचे उद‍्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी पुण्यातून करणार आहेत. पुण्यासह सोलापूरमधील स्मार्ट सिटी प्रकल्पातील योजनांचे उद‍्घाटन या वेळी करण्यात येणार असून, 'स्मार्ट सिटी'शी संबंधित इतर उपक्रमांचे लोकार्पणही या वेळी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी २५ जूनला स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, दोन टप्प्यात स्पर्धा घेऊन २० शहरांची यादी जाहीर करण्यात आली. या शहरांना केंद्राने निधी वितरित केला असून, 'स्मार्ट सिटी'च्या आराखड्यातील काही योजनांना जूनमध्ये प्रत्यक्ष सुरुवात करा, असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. आता, 'स्मार्ट सिटी'च्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानाच्या उपस्थितीत होणारा मुख्य कार्यक्रमच पुण्यात घेण्याचे ठरवण्यात आले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना तशा स्पष्ट सूचना दिल्या असून, तातडीने कार्यक्रमाची आखणी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

'स्मार्ट सिटी' हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे आणि सोलापूरमधील काही योजनांच्या उद्घाटनासह 'स्मार्ट सिटी'शी निगडित इतर प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. यामध्ये, नागरिकांसाठी 'मेक युअर सिटी स्मार्ट' अशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे स्वरूप आणि इतर तपशील या दिवशी जाहीर केले जातील. त्याशिवाय, देशभरातून निवडण्यात आलेल्या सर्व ९८ स्मार्ट शहरांमध्ये कायमस्वरूपी संवाद राहावा आणि विविध शहरांतील राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती इतर ठिकाणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र वेबसाइट कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच, स्मार्ट सिटीसंबंधी काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. पुण्यातूनच या सर्व प्रकल्पांचे औपचारिक उद्घाटन केले जाणार असून, राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या १० वर्षांमध्ये पुण्याच्या सर्व भागांत समतोल विकास साधल्यानेच केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची निवड झाली. उत्तमोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने पुण्यात कार्यक्रम घेण्यास केंद्र व राज्याने दिलेली संमती म्हणजे राष्ट्रवादीने केलेल्या कामाला दिलेली पावतीच आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

डिजिटल पद्धतीने उद्‍घाटन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'स्मार्ट सिटी'मधील विविध योजनांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यासाठी, 'पॅन सिटी' अंतर्गत औंध-बाणेर, बालेवाडीतील एखादा प्रकल्प, तर वाहतूक आणि दळणवळणाशी संबंधित एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) इमारतीमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष जागेवर न जाता डिजिटल पद्धतीने या दोन्ही ठिकाणच्या प्रकल्पांचे उद्घाटन होईल, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या दौऱ्यात पुणे मेट्रोची घोषणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पाची औपचारिक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या शहराच्या दौऱ्यात होण्याची चिन्हे आहेत. किंबहुना, आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मोदी यांच्या दौऱ्यात मेट्रोच्या घोषणेनेच फोडण्यात येईल, अशी शक्यता आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम २५ जून रोजी पुण्यात घेण्यात येणार आहेत. त्या निमित्ताने मोदी पुण्यात येणार आहेत. शहराचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या पातळीवर प्रलंबित असून, त्यातील सर्वांत महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाची औपचारिक घोषणा मोदी यांच्या दौऱ्यातच केली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
मेट्रोचा प्रकल्प सध्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड-पीआयबी) मान्यता मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो सादर होणार आहे. महापालिका निवडणुकीला सहा महिन्यांहून अधिक कालावधी असला, तरी पुण्याच्या रखडलेल्या मेट्रोला मंजुरी देण्याचा आग्रह वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याकडे धरला जात आहे. त्यामुळे, मोदी यांच्या दौऱ्यातच मेट्रोची औपचारिक घोषणा व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे समजते. नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनापूर्वी केंद्राने अवघ्या दोन दिवसांत सर्व मान्यता पूर्ण केल्या होत्या. त्याच धर्तीवर पुणे मेट्रोच्या प्रलंबित सर्व मान्यता आगामी काही दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे भरधाव रिक्षाच्या आरशाची कड डोक्याला लागून दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. नाना पेठेतील शिवप्रताप चौक येथे मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर रिक्षा चालक पसार झाला आहे.

गजानन सुरेश भिलारे (वय ५८, रा. गुरुवार पेठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भिलारे यांनी नेत्रदान केले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी तक्रार दिली. त्यावरून एका रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारे हे एका बेकरीमध्ये नोकरीला असतात. मंगळवारी रात्री ते नाना पेठेत एका व्यक्तीला चेक देण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून परत येत असताना भरधाव रिक्षाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्या वेळी रिक्षाच्या बाजूचा आरसा त्यांच्या डोक्याच्या मधोमध लागला. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रिक्षा चालक पळून गेला. नागरिकांनी त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच, त्यांच्या जवळील मोबाइलवरून नातेवाइकांना फोन केला. भिलारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलिस तपास करत आहेत. याबाबत भिलारे यांचे लहान भाऊ कमलाकर भिलारे यांनी सांगितले, 'भिलारे हे शुक्रवार पेठेतील शिवाजी चौक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष होते. मृत्युनंतर भिलारे यांनी नेत्रदान केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरटीई’ प्रवेशांची आजपासून दुसरी फेरी

$
0
0

पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्क्यांच्या आरक्षित जागांवरील प्रवेशांसंदर्भात यंदा सुरू असलेला खेळखंडोबा अद्याप सुरूच आहे. त्यामुळेच की काय, पहिल्या फेरीच्या सोडतीनंतर जवळपास दीड महिन्यांनी आजपासून गुरुवारी (१६ जून) शिक्षण विभाग दुसऱ्या फेरीची सोडत काढणार आहे.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा एकूण ७८० शाळांमधून पूर्वप्राथमिक वर्गांचे ५ हजार ९०६, तर पहिलीचे १० हजार ९८८ प्रवेश उपलब्ध झाले आहेत. या प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या सोडतीसाठी शिक्षण खात्याने ११ हजार ८४८ अर्जांचा विचार केला. त्यातून ८ हजार २३० विद्यार्थ्यांना सोडतीद्वारे प्रवेश देण्यात आले. उर्वरीत ९ हजार ३२७ अर्जांसाठी प्रक्रियेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील सोडत काढली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने ३ मे रोजी जाहीर केले होते. पहिली सोडत काढून महिना उलटल्यानंतरही खात्याकडून त्यासाठी पावले उचलली जात नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओलॉजिस्टच्या ‘बंद’मुळे गैरसोय

$
0
0

पुणे : अन्यायकारक कारवाईच्या विरोधात रेडिओलॉजिस्टनी पुकारलेल्या संपामुळे पेशंटची गैरसोय झाली. बुधवारी या संपाचा दुसरा दिवस होता. काही प्रमाणात पेशंटना सरकारी हॉस्पिटलकडे जावे लागले. रेडिओलॉजिस्टचा संप आजही सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

इंडियन रेडिओलॉजी अँड इमेजिंग असोसिएशनच्या पुणे शाखेने पुकारलेल्या संपाचा बुधवारी दुसरा दिवस होता. शहरातील सर्व सोनोग्राफी, एक्स रे, एमआरआय, सीटी स्कॅन, तसेच एमआरआय मशीनच्या सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुविधा बंद असल्याने महापालिकेसह जिल्हा औंध हॉस्पिटल, तसेच ससून हॉस्पिटलकडे गरजू पेशंटना धाव घ्यावी लागली. शहरातील हॉस्पिटलशिवाय एक्स रे, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन सेंटरदेखील बंद होते. आज (गुरुवारी) पुन्हा महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप, आयुक्त कुणालकुमार यांची भेट घेऊन कारवाई मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे, असे पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लाच्छानी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारिकांच्या संपामुळे पेशंटचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध मागण्यांसाठी पुण्यासह राज्यातील वीस हजार परिचारिकांनी संप पुकारल्याने सरकारी आरोग्य सेवा विस्कळित झाली. पुण्यातील ससून हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, औंधचे जिल्हा हॉस्पिटल, तसेच राज्य कामगार विमा हॉस्पिटलमध्ये पेशंटची गैरसोय झाली. तर काही ठिकाणी ऑपरेशन पुढे ढकलण्यात आली.

सरकारी हॉस्पिटलच्या परिचारिकांच्या होणाऱ्या बदल्या रद्द करणे, बंधपत्रित परिचारिकांना सरळ सेवेत सामावून घेणे, बदामी रंगाच्या गणवेशाचे आदेश काढणे यासारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या राज्यातील सुमारे २० हजार परिचारिका संपावर गेल्या होत्या. बुधवारी सकाळीपासूनच संप सुरू असल्याने राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा विस्कळित झाली होती. सरकारी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करताना अडचणींना सामोरे जावे लागले. ससून हॉस्पिटल, येरवड्याचे मेंटल हॉस्पिटल, राज्य कामगार विमा तसेच छातीरोग हॉस्पिटल, औंधचे जिल्हा हॉस्पिटल येथील दीड हजार परिचारिका संपावर होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्य सेवा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या वतीने सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सर्व परिचारिकांनी ससून हॉस्पिटलपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले, सुमन टिळेकर, रेखा थिटे, अनिता फाळके, स्मिता ठावरे, मेघा पवार, प्रेरणा बद्रे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. ससून हॉस्पिटलमध्ये परिचारिकांच्या संपामुळे निम्मे ऑपरेशन पुढे ढकलावे लागली; तसेच काही प्रमाणात सेवा खंडित झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासवड रोड रेल्वे स्टेशनवर थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इंजिनावर चढलेल्या एका व्यक्तीने पोलिसांकडील एके ४७ हिसकावून घेऊन रेल्वे पोलिसांवरच रोखल्याने सासवड रोड स्थानकावर बुधवारी थरार निर्माण झाला. अखेर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ही व्यक्ती ठार झाली. या घटनेत चार पोलिस जखमी झाले आहेत. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

सासवड रोड रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरेश प्रेमसिंग पुरोहित (वय ३१, रा. राजस्थान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड रोड रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या रेल्वे इंजिनावर एक व्यक्ती चढल्याचे चालकास दिसले. त्याने रेल्वेची चेन ओढून रेल्वे थांबविली. त्या वेळी 'आरपीएफ'चे चार जवान त्या ठिकाणी आले. त्यांनी इंजिनावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरण्यास सांगितले. त्या व्यक्तीने खाली उतरून आरपीएफच्या जवानांवर दगडफेक केली. यामध्ये एका जवानाचा जबडा तुटला. तर, दुसऱ्याच्या डोक्याला जखम झाली. जवानांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जवानाकडील एके ४७ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तो तिघांनाही जुमानत नव्हता. या हमरातुमरीत त्याने एका जवानाकडील एके ४७ हिसकावली. ती त्याने जवान व प्रवाशांवर रोखली. जखमी जवानाने प्रसंगावधान राखून त्याच्याजवळील पिस्तुलातून पुरोहितवर गोळी झाडली. ती त्याच्या डाव्या छातीच्या खाली लागली. जखमी अवस्थेत पुरोहितला त्याच रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशन येथे आणले. तोपर्यंत त्या ठिकाणी अॅब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती. त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुरोहित हा वेडसर असून त्याच्या अंगावर कपडे नव्हते. पुरोहित याच्यावर त्याच्या पत्नीचा खून केल्याचा गुन्हा दाखल असून त्याची कोर्टात केस सुरू आहे. याप्रकरणी त्याच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'प्रवाशांना वाचवण्यासाठी गोळीबार'

सासवड रोड रेल्वेस्थानकावर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान करीत असतानाच त्याने जवानांवर दगडाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. त्याने एका जवानाची एके ४७ हिसकावण्याचा प्रयत्न करून सर्वांना मारून टाकण्याची धमकी दिली. या वेळी जवानांनी स्वत:च्या व प्रवाशांच्या रक्षणासाठी पिस्तुलातून त्या व्यक्तीवर गोळी झाडली.

- डी. विकास, विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे रेल्वे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुत्वीय लहरींवर पुन्हा शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शतकातील सर्वांत मोठा वैज्ञानिक शोध मानल्या गेलेल्या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणारा आणखी एक पुरावा मिळाल्याचे अमेरिकेतील लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीने (लायगो) बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

'लायगो'च्या जुळ्या वेधशाळांमध्ये २६ डिसेंबर २०१५ रोजी गुरुत्वीय लहरींची आणखी एक नोंद झाली असून, सूर्यापेक्षा चौदा आणि आठ पटींनी मोठ्या कृष्णविवरांच्या धडकेतून या लहरी निघाल्याचा निष्कर्ष 'लायगो'ने काढला आहे. १४ सप्टेंबर २०१५च्या पहिल्या शोधापाठोपाठ तीन महिन्यांतच गुरुत्वीय लहरींची दुसरी नोंद झाल्यामुळे गुरुत्वीय लहरींच्या विज्ञानावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया लायगोच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुरुत्वीय लहरींच्या दुसऱ्या शोधातही भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

आइनस्टाइनने गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाविषयी शंभर वर्षांपूर्वी भाकीत वर्तवले होते. लायगो या गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणासाठी अमेरिकेत उभारण्यात आलेल्या जुळ्या वेधशाळांनी १४ सप्टेंबर २०१५ रोजी प्रथमच या लहरींचे अस्तित्व प्रत्यक्ष निरीक्षणातून सिद्ध केले होते. सप्टेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत लायगोमधून करण्यात आलेल्या निरीक्षणांचे विश्लेषण नुकतेच पूर्ण झाले. या विश्लेषणातून २६ डिसेंबर रोजी गुरुत्वीय लहरींची आणखी एक नोंद झाल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले. पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅंड अॅस्ट्रोफिजिक्समधील (आयुका) शास्त्रज्ञांनी या शोधात महत्त्वाची भूमिका निभावली.

आयुकातील शास्त्रज्ञ डॉ. सुकांता बोस यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला या शोधाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 'गुरुत्वीय लहरींचा पहिला शोध हा केवळ योगायोग नव्हता, हे सिद्ध करणारा पुरावा आम्हाला मिळाला आहे. २६ डिसेंबर २०१५ रोजी अमेरिकेतील लिविंगस्टन आणि हॅंडफर्ड येथे असणाऱ्या लायगोच्या दोन जुळ्या वेधशाळांमध्ये एक सेकंद कालावधीची कंपने नोंदली गेली. या कंपनांचे विश्लेषण केल्यावर या गुरुत्वीय लहरीच असल्याचे स्पष्ट झाले. १.४ अब्ज वर्षांपूर्वी सूर्याच्या वस्तुमानापेक्षा चौदा आणि आठ पटींनी मोठ्या वस्तुमानाच्या कृष्णविवरांची टक्कर होऊन त्यातून सूर्यापेक्षा २१ पटींनी अधिक वस्तुमानाचे कृष्णविवर तयार झाले. या धडकेतून सूर्याच्या वस्तुमानाएवढी ऊर्जा उत्सर्जित झाली. या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद वेधशाळांमध्ये झाली.'

'या आधी नोंदल्या गेलेल्या गुरुत्वीय लहरींसाठी कारणीभूत ठरलेली कृष्णविवरे सूर्यापेक्षा ३६ आणि २९ पटींनी अधिक वस्तुमानाची होती,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर हत्येचा २००९ मध्ये रचला होता कट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट २००९ मध्येच रचला गेला होता. मात्र, गोव्यात मडगाव येथे त्या वेळी बॉम्बस्फोटाची घटना घडली आणि त्यात 'सनातन'च्या साधकांची धरपकड झाल्याने या कटाची अंमलबजावणी झाली नसल्याची खळबळजनक माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात उघडकीस आली आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्रसिंह तावडे याला अटक करण्यात आली असून, गोवा स्फोटातील फरारी आरोपी सारंग अकोलकर याचा शोध घेण्यात येत आहे. तावडे याच्या पोलिस कोठडीची मुदत आज, गुरुवारी (१६ जून) संपत असून त्याला शिवाजीनगर येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सीबीआयला तावडेवर संशय आल्यानंतर त्याच्यावर अनेक दिवस वॉच ठेवण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा झाल्यानंतर त्याच्या अटकेचा निर्णय घेण्यात आला. तावडेचे सातारा, कोल्हापुरातील वास्तव्य, त्याचे सारंग अकोलकरशी असलेला संपर्क, त्यांच्यात ई-मेलवरून झालेले संभाषण, त्याने पिस्तूल मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याने दाभोलकर यांच्याशी जाहीरपणे घातलेला वैचारिक वाद, गोवा बॉम्बस्फोटाच्या तपासात राष्ट्रीय तपाय यंत्रणेकडून राहिलेला तपास अशा विविध पातळींवर सीबीआयने तपास केला आहे.

तावडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २००९ मध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, गोवा स्फोटातील धरपकड सुरू झाल्यामुळे या कटाची अंमलबजावणी झाली नाही. पुढे २०१२ मध्ये पुन्हा दाभोलकर हत्येचा कट रचण्यात आला आणि २० ऑगस्ट २०१३ रोजी त्याची अंमलबजावणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

'नार्को टेस्ट'साठी हालचाली

तावडे हा सीबीआयच्या कोठडीत तपासाला सहकार्य करत नसल्याने त्याची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याचा 'सीबीआय'ने प्रयत्न सुरू केला आहे. तावडेविरुद्ध मिळालेला डिजिटल पुरावा हा त्याचा दाभोलकर हत्येतील सहभाग असल्याचे दर्शवतो आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या तावडे याला पोलिसांच्या तपासाला कसे सामोरे जायचे, याचा पूर्ण अंदाज असल्याने तो तपासास सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दुचाकी आणि तावडे

डॉ दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकसारखी दुचाकी वापरण्यात आली आहे. तावडे याच्याकडे काळ्या रंगाची दुचाकी होती. तावडे हा कोल्हापुरात वास्तव्यास असताना तो काळ्या रंगाची दुचाकी वापरत होता. हा केवळ योगायोग आहे की कटाचा भाग, याचाही तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाणीतील धान्याचा काळाबाजाराशी संबंध?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे औंध येथील खाणीमध्ये फेकण्यात आलेले रेशनचे धान्य हे काळाबाजार करण्यासाठी नेले जाणार होते, असा संशय असून सातारा जिल्ह्यामधील एक मोठे रॅकेट त्यामागे असल्याचा कयास आहे. सातारा जिल्ह्यात पकडलेल्या एका ट्रकमधील रेशनचे धान्य भोसरी परिसरातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने हे रॅकेट पुण्यासह विविध भागांत कार्यरत असण्याची शक्यता असून त्या दिशेने शोध घेण्यात येत आहे. औंध रस्ता येथील पाटीलपडळ परिसरामधील खाणीत रेशनचे धान्य टाकण्यात आले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शहर पुरवठा कार्यालयाने पंचनामा करून धान्य ताब्यात घेतले. हे धान्य उत्कर्ष महिला बचत गटाच्या रेशन दुकानामधील असल्याचा संशय आल्याने या दुकानाचा पंचनामा करून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे धान्यसाठ्याची पडताळणी केली असता त्यामध्ये सकृतदर्शनी तफावत आढळून आली आहे. खाणीमध्ये फेकण्यात आलेले हे रेशनचे धान्य काळाबाजार करण्यासाठी नेण्यात येत असल्याचा प्रशासनाचा संशय आहे. त्याधारे प्रशासनाने मागोवा घेण्यास सुरूवात केल्यावर काही गोष्टींचे धागेदोरेही हाती आले आहेत. सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी धान्याचे दोन ट्रक पकडण्यात आले. त्यातील धान्य हे पल्टी (रेशनचे धान्य व इतर धान्याचे मिश्रण) मारलेले होते. या ट्रकच्या चालकाकडे सखोल चौकशी केली असता हे धान्य भोसरीमधील रेशन दुकानातून आणल्याची माहिती पुढे आली. तसेच हे रेशनचे धान्य साताऱ्यातील फ्लोअर मिलला पुरविले जात असल्याचेही चौकशीत पुढे आले. काळाबाजारासाठी चालविलेले हे धान्य एका एजंटमार्फत नेले जात होते. त्या एजंटच्या पुण्यातील घरी तसेच अन्य काही ठिकाणी माहिती घेण्यात आली. या एजंटचे पुरवठा कार्यालयात नेहमी येणे-जाणे असते. मात्र, सातारा येथील धान्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर तो फरार झाला आहे. हा एजंट पुण्यातील दुकानांतून रेशनचे धान्य घेऊन त्याचा काळाबाजार करीत असावा, असा संशय आहे. त्या दृष्टीने आता पुरवठा खात्याची तपास सूत्रे काम करीत आहेत. पुरवठा खात्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे उरूळी कांचन भागातील एका मिलची तपासणी करण्यात आली आहे.

दक्षता पथके नावापुरतीच रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत दक्षता पथकाने धान्यसाठा पकडण्याची मोठी कारवाई झालेली ऐकिवात नाही. नागरिकांकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे पुरवठा खात्याकडून कारवाई केली जात आहे. धान्याचा काळाबाजार करणारे एजंट या विभागाच्या कार्यालयात फिरत असतात. असे असताना दक्षता पथकांना त्यांचा सुगावाही लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्मल वारीसाठी‘सेवा सहयोग’ची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे देहू, आळंदी ते पंढरपूर दरम्यान चालणारी वारी 'निर्मल वारी' व्हावी यासाठी पालखी मार्गावर वारकऱ्यांनी राज्य सरकार सेवा सहयोग संस्थेच्या मदतीने पालखी मार्गावर तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून या उपक्रमामुळे वारीचे स्वच्छ आणि सुंदर रूप यंदा पहायला मिळणार आहे. निर्मल वारी या योजनेसाठी राज्य सरकारने दोन कोटी चार लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाच्या 'नमामि चंद्रभागा' या योजनेबरोबर निर्मल वारीची योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सेवा सहयोग संस्थेचे १० हजार कार्यकर्ते संपूर्ण पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांनी शौचालयांचा वापर करावा, यासाठी जनजागृती करणार आहेत. गेल्या वर्षीदेखील सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून हा प्रयोग राबवण्यात आला होता. त्या वेळी लोणी, यवत आणि पंढरपूर अशा ठिकाणी शौचालये बसवण्यात आली होती. यंदा मात्र सर्व मुक्कामांच्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ मुक्काम आहेत; तर माउलींच्या पालखी सोहळ्यात १५ मुक्काम आहेत. या सर्व मुक्कामांच्या ठिकाणी तात्पुरती शौचालये उभारली जाणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींची मदत या उपक्रमासाठी घेतली जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये ५०० तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ३०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. सर्व शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी सेवा सहयोग संस्थेचे कार्यकर्ते सांभाळणार आहेत.

गेल्या वर्षी हा उपक्रम संस्थेने स्वखर्चाने केला होता. यंदाच्या वर्षी सरकारने हा उपक्रम गांभीर्याने घेतला आहे. यंदाची वारी ही निर्मळ, आणि सुंदर होण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्वाकांक्षी ठरणार आहे. संस्थेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निर्मळ वारी विषयी जनजागृती करणार आहेत. - शिवाजीराव मोरे, निर्मल वारी उपक्रमाचे संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्माकोल नको, पत्रावळ वापरा

$
0
0

'शाश्वत इको सोल्यूशन'ने केली तीन लाख लीटर पाण्याची बचत म. टा. प्रतिनिधी, पुणे महाप्रसादासाठी वापरण्यात येणारी स्टीलची भांडी धुण्यासाठी हजारो लिटर पाणी लागते, थर्माकॉलची ताटे वापरल्यास विघटनाची नवी समस्या पुढे येते. यापेक्षा मठ आणि धर्मस्थळांनी पर्यावरणपूरक पत्रावळ वापराव्यात, असे आवाहन 'अभियान शाश्वत इको सोल्युशन आणि कमिन्स इंडिया'ने हाती घेतले आहे. विशेष म्हणजे याची दखल घेऊन शंकर महाराज मठ, निरा नरसिंगपूर यांसह काही संस्थांनी पत्रावळ वापरण्यास सुरू केल्या या उपक्रमातून गेल्या दोन महिन्यात तब्बल तीन लाख लीटर पाण्याची बचत केली आहे. शंकर महाराज मठाने संस्थेला चाळीस हजार पत्रावळची ताटे आणि दोन लाख दहा हजार द्रोणची मागणी केली आहे. तर निरा नरसिंगपूर देवस्थानने सहा हजार पत्रावळ आणि द्रोण घेतले आहेत. याशिवाय ओव्हल नेस्ट सोसायटीने त्यांच्या खाजगी उपक्रमासाठी देखील थर्माकोलऐवजी पत्रावळचा पर्याय निवडला, अशी माहिती शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशनच्या संचालिका प्रज्ञा ठाकूर यांनी दिली. पुणे आणि परिसरातील मंदिरे, आश्रम आणि मठ हे आमचे मुख्य ध्येय असून तेधील विश्वस्तांबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. अन्नछत्रामध्ये दिवसाला काही हजार लोक महाप्रसाद घेतात. एक थाळी धुण्यासाठी किमान दोन लीटर पाणी लागते. मठांमध्ये स्टिलचे ताट, वाट्या वापरल्यास ते धुण्यासाठी लाखो लीटर पाणी वाया जाते. यावर मार्ग काढण्यासाठी काही ठिकाणी प्रसादासाठी थर्मोकॉलच्या ताटां वापर सुरू झाला आहे. थर्माकोल पर्यावरणास घातक असून त्याचे नैसर्गिक विघटन होत नाही. साधारणतः दोन दशकांपूर्वीपर्यंत महाप्रसादासाठी पत्रावळ वापरण्याचे उल्लेखनीय प्रमाण होते. पण सध्या त्याची जागा थर्माकॉलने घेतली आहे. शहरातील विविध संस्था, सोसायट्यांनाही आम्ही छोटेखानी कार्यक्रमांना पत्रावळ वापरण्याचे आवाहन करीत असून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पत्रावळ बनविणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील उप्तादकांना या उपक्रमात जोडले आहे. त्यांनी गरजेप्रमाणे पत्रावळींचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

अलीकडील दोन ते तीन वर्षात वारीत थर्माकोलच्या ताटांचे प्रमाण वाढले असून त्याच्या विघटनास अडचणी येत आहेत. या धर्तीवर वारकऱ्यांसी चर्चा करून पत्रावळ वापरण्याचे आवाहन केले आहे. काही दिंड्यांनी पत्रावळ वापरण्यास संमती दर्शविली आहे. - प्रज्ञा ठाकूर संचालिका, शाश्वत इको सोल्यूशन फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परम शावक’ होणार वेगवान

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com पुणे : देशातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवनव्या संकल्पनांना आणि कौशल्य गुणांना वाव देण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केलेला 'परम शावक' हा सुपरकम्प्युटर आता अधिक वेगवान होणार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन'मध्ये (एनएसएम) लागणाऱ्या इतर सुपरकम्युटरसोबतच 'परम शावक'चा उपयोग होणार आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि अधिक वेगाने सुपरकॉम्प्युटिंग मिशन करण्यास मदत होणार असल्याची माहिती सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी खास 'मटा'ला दिली. सी-डॅकने विकसित केलेला 'परम शावक' सुपरकम्प्युटर हा देशातील प्रमुख एनआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि ईशान्य भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बसविण्यात येत आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालयांकडून त्याला उत्तम प्रतिसाददेखील मिळत आहे. मात्र, बदलत्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानामध्ये त्यामध्ये बदल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये अद्यावत 'परम शावक' तयार होणार आहे. प्रा. मूना म्हणाले की, 'परम शावक' सुपरकम्प्युटरची कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी सी-डॅकचे अभियंते काम करीत आहेत. त्यामध्ये त्याचा वेग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या नव्या सुपरकम्प्युटरच्या डिझायनिंगचे काम सध्या सुरू आहे. हा अद्ययावत सुपरकम्प्युटर सुमारे २० लाखांपर्यत सहज उपलब्ध होणार आहे. हा सुपरकम्प्युटर आकाराने मोठा राहणार असल्याने तो टेबल टॉप स्वरूपात नसणार आहे. त्याचा आकार काहीसा वेगळा असेल. केंद्र सरकारच्या सुपरकॉम्प्युटिंग मिशनमध्ये लहान, मोठे, मध्यम अशा विविध प्रकारचे सुपरकम्प्युटर लागणार आहेत. त्यामुळे लहान प्रकारच्या सुपरकम्प्युटरमध्ये 'परम शावक'चा उपयोग केला जाणार असल्याचे, प्रा. मूना यांनी सांगितले. दरम्यान, 'परम शावक' सुपरकम्प्युटर कॉलेजमध्ये कमीत कमी पायाभूत सुविधांमध्ये स्थापन केला जाऊ शकतो व त्याचा देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी आहे. सध्या त्याच्या कार्यक्षमतेचा वेग २ टेराफ्लॉप व त्यापेक्षा अधिक आहे. यामध्ये पॅरलल प्रोग्रॅमिंग, म्हणजे एकच प्रोग्रॅमिंग अधिक ठिकाणी करण्याची सुविधा आहे. यात विविध प्रकारचे अॅप्लिकेशन, टूल्स आणि ग्रंथालय आहेत.

काय आहे मिशन? केंद्र सरकारने नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशनची घोषणा गेल्या वर्षी मार्च महिन्यात केली. सात वर्षीय कालावधी असलेल्या या मिशनच्या यशस्वितेची जबाबदारी सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग अशा दोन विभागांवर आहे. हे दोन विभाग सी-डॅक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमार्फत मिशन राबविणार आहेत. त्यासाठी ४५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या मिशनद्वारे देशातील राष्ट्रीय स्तरावरच्या शैक्षणिक संस्था (अॅकॅडमिक) आणि संशोधन व विकास संस्थामध्ये (आरअँडडी) ७० प्रकारच्या सुपरकॉम्प्युटिंग यंत्रणा बसवून त्यांना संगणकीय व आयटीचे बळ प्रदान करायचे आहे. त्यामुळे या संस्थांद्वारे सुपरकॉम्प्युटिंगद्वारे मानवी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी विविध अॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी काम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडई खुली करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा मागील काही दिवसांपासून वडगाव शेरीतील पालिकेच्या भाजीमंडईच्या विषयाचे राजकारण तापू लागले आहे. अनेक वर्षांपासून भाजीमंडई बंद अवस्थेत असल्याने ती तातडीने खुली करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष सरसावले आहेत. पालिकेने मंडई सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पक्षांकडून दिला जाऊ लागला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूष करण्यासाठी भाजीमंडई खुली करण्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. महापालिकेच्या वतीने वडगाव शेरी भागात कोट्यवधी रुपये खर्च करून व्यावसायिकांसाठी भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. मंडईच्या इमारतीत दीडशेहून गाळे तयार करण्यात आले आहे; पण गेल्या चार-पाच वर्षांपासून बंद अवस्थेतील मंडई खुले करण्यासाठी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. भाजी मंडईची इमारत धूळ खात पडल्याने तिची दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने मंडई सुरू करून व्यावसायिकांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी पालिकेकडे केली आहे. परिसरातील भाजी आणि फळ विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने स्थानिक नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. भाजी मंडई खुली करण्यासाठी वडगाव शेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी (दि. १७) नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. पुढील तीन दिवसांत पालिकेने कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईलने भाजीमंडई चालू करण्याचा इशारा विभागाध्याक्ष विशाखा गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापौरांना भेटून मंडई खुली करण्याची विनंती केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हायोलिनच्या सुरांत रंगले रसिक

$
0
0

'रसिकप्रिया व्हिओलिना- स्वर आले जुळूनी'ला रसिकांची दाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कोटी कोटी रूप तुझे','शुभंकरोती म्हणा', 'हे चांदणे फुलांनी शिंपीत', 'आज प्रीतीला पंख हे आले', 'जिया ले गयो मोरा सावरिया', 'जरा सी आहटसी होती है' अशा अजरामर गीतांच्या मधूर स्वरांनी मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी व्हायोलिनच्या जादुई मैफलीचा आस्वाद घेतला.
जागतिक व्हायोलिन दिन आणि ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिनवादक पं. प्रभाकर जोग यांच्या मराठी चित्रपट संगीतातील योगदानाला मानवंदना म्हणून त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील संगीतावर आधारीत व्हायोलिन वाद्यवृंदावरील रचनांचा 'रसिकप्रिया व्हिओलिना- स्वर आले जुळूनी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हायोलिनवर एकसे बढकर एक गीतांची बरसात रसिकांनी या वेळी अनुभवली 'बय्या ना धरो', 'धुंद आज डोळे हवा धुंद झाली', 'स्वर आले जुळूनी' अशा विविध गीतांचे व्हायोलिनवर सादरीकरण झाले. प्रत्येक गीताला रसिकांनी 'वन्स मोअर' च्या निनादात उत्स्फूर्त दाद दिली. व्हिओलिना संस्थेचे अभय आगाशे, संजय चांदेकर, चारूशीला गोसावी व डॉ. निलिमा आडकर या चार व्हायोलिन वादकांनी पं. जोग यांच्या स्वररचना सादर केल्या. यावेळी राज्य शासनाचा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्यानिमित्त पं. प्रभाकर जोग यांचा पुण्यातील व्हायोलिन वादकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images