Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षकाकडून मुलावर अत्याचार

0
0

शिक्षकाकडून मुलावर अत्याचार

पुणे ः कोंढवा परिसरात एका शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यावरून उस्ताद हफिज इसरार (रा. नाझ हॉटेलमागे, कोंढवा खुर्द), चेअरमन मुफ्ती शाहीद, मैलाना तैसिफ आणि मालक मुफती शाकिर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर कलम ३७७, ५०६, ३४ सह लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमन कायदा २०१२ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपटाचे रसग्रहण बहादूर यांनी शिकवले

0
0

चित्रपटाचे रसग्रहण बहादूर यांनी शिकवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे'
चित्रपटाचे रसग्रहण कसे करावे, हे प्रा. सतीश बहादूर यांनी शिकवले. विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते कमालीचे उदारमतवादी होते. कमालीचा लोकशाही दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. त्यांनी स्वत:चे मत कधीच पुढे रेटले नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला मूल्य जपू दिले. चांगला शिक्षक असाच असतो...' अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी शुक्रवारी प्रा. बहादूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. अक्षर वाङमयतर्फे प्रा. बहादूर यांच्यावर काढण्यात आलेल्या 'चित्रपटभाषा' या विशेषांकाचे प्रकाशन कासारवल्ली यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी विशेषांकाच्या अतिथी संपादक डॉ. श्यामला वनारसे, कार्यकारी संपादक डॉ. अरुण प्रभुणे, चित्रपट अभ्यासक अनिल झणकर, आरती कारखानीस, अंकाचे संपादक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी, कार्यकारी संपादक डॉ. शिवाजीराव देशमुख, डॉ. विजय वारकड, डॉ. दीपक चिद्दरवार व डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.कासारवल्ली म्हणाले, 'प्रा. बहादूर यांनी पाच दशके चित्रपट चळवळीसाठी काम केले. माझी आणि त्यांची भेट एफटीआयआयमध्ये झाली. चित्रपटाचे रसग्रहण कसे करावे, हे त्यांनी शिकवले; पण आपले मत लादले नाही. विद्यार्थ्यांनी चित्रपटांवर व्यक्त व्हावे असे त्यांना वाटे. ते प्रत्येकाला पाठिंबा देत. चित्रपटात अमूक हेच मत व्यक्त झाले आहे, असे ते कधी सांगायचे नाहीत. व्यक्त होण्यासाठी ते सतत पाठीशी असत. विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते कमालीचे उदारमतवादी होते. कमालीचा लोकशाही दृष्टिकोन त्यांच्याकडे होता.'
'बहादूर यांनी विविध चित्रपटांवर विविध भाषांमध्ये लिहून ठेवले आहे. समाजाने चित्रपटांकडे वळावे यासाठी ते प्रयत्नशील होते,' असे डॉ. वनारसे यांनी सांगितले. श्रुती तांबे यांनी सूत्रसंचालन केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुलं’चे विविध पैलू उलगडणार आज

0
0

'पुलं'चे विविध पैलू उलगडणार आज

पुणे ः बहुरंगी, चतुरस्र, हजरजबाबी, हरहुन्नरी अशी ओळख असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू रसिकांसमोर उलगडणार आहेत. 'पुलं'नी मराठी साहित्यात, चित्रपटात, संगीतात, सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून आशय फिल्म क्लबतर्फे 'या सम हा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने 'पुलं'च्या कार्याचा आढावा या वेळी घेतला जाणार आहे. आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजता अर्काइव्ह थिएटर, प्रभात रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा 'पुलं चे देणे' हा परिसंवाद या वेळी रंगणार आहे. त्यामध्ये रेखा इनामदार-साने, रामदास फुटाणे, डॉ. सलील कुलकर्णी, डॉ. वि. भा, देशपांडे, सुधीर गाडगीळ आदी सहभाग घेणार आहेत. 'पुलं'चे साहित्यिक, सांगीतिक, विनोदी योगदान या विषयांवर ही मंडळी प्रकाश टाकणार आहेत. सामाजिक कार्य या विषयावर मुक्ता पुणतांबेकर बोलणार आहेत. उत्तरार्धात 'या सम हा' हा लघुपट दाखवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य कृषी आयुक्तपदी विकास देशमुख कायम

0
0

राज्य कृषी आयुक्तपदी विकास देशमुख कायम

पुणे ः कृषी आयुक्त विकास देशमुख यांची रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाच्या सचिवपदी झालेली बदली रद्द करण्यात आली असून, शिक्षण संचालक पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कृषी आयुक्तपदी देशमुख कायम राहणार आहेत.
खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच कृषी आयुक्त देशमुख यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. ऐन हंगामाच्या तोंडावर देशमुख यांची बदली झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. गतवर्षी पुरेशा पावसाअभावी राज्यातील अनेक भागांत टंचाईची परिस्थती निर्माण झाली. यंदा चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत कृषी आयुक्तांची बदली केल्यामुळे हंगामाच्या नियोजनावर परिणाम होईल, अशीही भीती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्त देशमुख यांच्या बदलीचे आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रोजगार हमी व जलसंधारण विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार भापकर यांच्याकडे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसायप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

0
0

वेश्या व्यवसायप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नगर रोडवर मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दीपक हिरा वराली (वय २०, रा. सोनावणे वस्ती ,चिखली गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक मधुकर थोरात यांनी फिर्याद दिली आहे. पुणे नगर रोडवरील कृष्ण लॉजमध्ये दोन तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणले होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर लॉजवर छापा टाकून दीपक आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. वेश्या व्यवसाय करण्यासाठी लॉजचा वापर करण्यास मदत केल्याप्रकरणी लॉजचे मॅनेजर करणसिंग विद्याधर ठाकूर (वय ३२, रा. कृष्णा लॉज, नगर रोड) आणि दीपकचा साथीदार शक्ती ऊर्फ मुक्ती भंडारी (वय ३२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजमध्ये ताब्यात घेतलेल्या दोन तरुणींना हडपसर येथील अभिरक्षा सुधारगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सराईत गुन्हेगाराला भोसरीत अटक
पिंपरी ः तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भोसरीतील आदर्शनगर येथे ही कारवाई करण्यात आली. शिवदास शंकर गायकवाड (वय ३१, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, दंगा, मारहाण करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत. शिवदासला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भोसरी, आदर्शनगर येथील युवराज हॉटेलसमोर शिवदास थांबला असल्याची माहिती पोलिस शिपाई मोहन जाधव यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयव विकण्यासाठीही होईल शेतकऱ्यांची गर्दी

0
0

अवयव विकण्यासाठीही होईल शेतकऱ्यांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सततचा दुष्काळ आणि व्यवस्थेकडून होणारे शोषण यामुळे शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती बिकट आहे. एकीकडे निसर्ग आणि दुसरीकडे व्यवस्था शेतकऱ्यांचा बळी घेत आहे. सध्या त्यांच्याकडे विकण्यासाठीही काही नाही. त्यामुळे शरीराचे अवयव विकण्याची बाजारपेठ निर्माण झाल्यास, शेतकरी त्यांचे अवयव विकण्यासाठी गर्दी करतील, अशी भयानक परिस्थिती सध्या आहे,' असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळातर्फे आयोजित शेतकऱ्यांवर आधारित चित्रपटांवरील 'चित्रपटातील बळीराजा- सावकारी पाश ते बारोमास' या चर्चासत्रामध्ये शेट्टी बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, बारोमास कादंबरीचे लेखक सदानंद देशमुख, चित्रपटाचे निर्माते अरुण कचरे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर, दिग्दर्शक धीरज मेश्राम, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी या वेळी उपस्थित होते.
'दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या समस्यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. राजकारण्यांबरोबरच सामान्य जनताही शेतकऱ्यांचे दुःख समजू शकत नाही. हतबल झालेला शेतकरी आता आत्महत्या करत आहे,' असे शेट्टी म्हणाले. राजकारणी, कलाकार, चित्रकार अशा अनेकांनी देशातील गरिबीचा वापर केला आहे. मात्र, गरिबी दूर करण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही, अशी खंत फुटाणे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआयआरचा फोटो काढण्यास परवानगी

0
0

पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षितांचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर 'एफआयआर'ची कॉपी तत्काळ देणे शक्य नसेल, तर नंतर त्या 'एफआयआर'ची कॉपी 'व्हॉट्स अॅप'वर पाठवा. तसेच, पाठविणे शक्य होत नसले तर नागरिकांना मोबाइलवरील कॅमेऱ्यात 'एफआयआर कॉपी'चा फोटो काढण्यास परवानगी देण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी दिली.

पुणे पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांची शनिवारी पोलिस महासंचालकांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दीक्षित यांनी ही माहिती दिली. या बैठकीला पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. पोलिस महासंचालकांनी केलेल्या सूचनांनी कोणी अंमलबजावणी केली, कोणी केली नाही, कशामुळे केली नाही, याबाबत आढावा घेतला. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी महासंचालकांनी चांगलेच फैलावर घेतले.
दीक्षित म्हणाले, 'पोलिस दलाकडून नागरिकांसाठी विविध अॅप सुरू करण्यात आली आहेत. त्याचा चांगला फायदा होत आहे. शहरात अलीकडे गाड्या जाळण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. यामध्ये वैयक्तिक वैमनस्यातून या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी शहरातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये दिव्यांची सोय करण्याच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
००
शिक्षेचे प्रमाण ४१ टक्क्यांवर

राज्यात या वर्षी गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिक्षा होण्याच्या प्रमाण ४१ टक्क्यांवर गेले आहे. यामध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जबरी चोरी, चेन्स स्नॅचिंग या गुन्ह्यात ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. दरोडा, घरफोड्या व इतर गुन्ह्यांमध्ये घट आहे. यापुढे अपघाताच्या घटनांमध्ये आरोपी बाहेरील राज्यातील असेल तर त्या गुन्ह्यांमध्ये देखील त्या गुन्ह्यांत आरोपपत्र चोवीस तासांच्या आत दाखल करण्याचे आदेश दिल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओलॉजिस्ट १४ जूनपासून संपावर

0
0

आरोग्य अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित जपे यांच्यावर पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या अन्याय कारवाईच्या निषेधार्थ १४ जूनपासून महाराष्ट्रातील रेडिओलॉजिस्ट संपावर जात आहेत. त्यानंतर पुण्यातील रेडिओलॉजिस्ट बेमुदत संप सुरूच ठेवणार आहेत.
संपादरम्यान राज्यातील सर्व सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे सेवा बंद राहणार आहेत. नऊ हजार रेडिओलॉजिस्ट संपात सहभागी होणार आहेत.
'शहरातील रेडिओलॉजिस्ट डॉ. जपे यांच्या सोनोग्राफी केंद्राची पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्या पथकाने तपासणी केली. त्या तपासणीमध्ये गर्भलिंग निदान व प्रसवपूर्व कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) एफ फॉर्म भरणे बंधनकारक आहे. परंतु, डॉ. जपे यांच्या केंद्रावर आढळलेल्या 'एफ' फॉर्ममध्ये सोनोग्राफी केलेल्या महिलेच्या माहितीत किरकोळ चूक होती. संबंधित महिलेला दोन मुली होत्या. तिसऱ्यांदा गर्भवती असताना २० आठवड्यानंतर सोनोग्राफी करण्यात आली. त्या वेळी बाळात दोष असल्याचे सोनोग्राफीत निदान झाले होते. त्याचा अहवालही देण्यात आला होता. मात्र 'एफ' फॉर्ममध्ये त्याबाबत लिहिण्याचे राहून गेल्याने डॉ. जपे यांच्यावर खटला भरण्यात आला होता. ही अन्यायकारक कारवाई असल्याने त्याविरोधात १४ जूनपासून महाराष्ट्रातील रेडिओलॉजिस्ट संपावर जात आहेत,' अशी माहिती इंडियन रेडिओलॉजिकल अॅँड इमेजिंग असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. सुरेश चांडक यांनी 'मटा'ला दिली.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. जपे यांच्यावर खटल्याबरोबर त्यांच्याकडील तीन सोनोग्राफी मशिन देखील सील करण्यात आली आहेत. त्याबाबत आपण स्वतः पालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याशी चर्चा केली. डॉ. जाधव यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संपाशिवाय पर्याय नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
'कायद्यातील जाचक ठरणाऱ्या तरतुदमुळे प्रामाणिक डॉक्टरांवर नाहक कारवाई होत आहे. खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यांना पकडण्यासाठी स्टिंग ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे,' अशी भूमिका पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. वीरेन कुलकर्णी यांनी मांडली.
...
डॉ. अभिजित जपे यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ येत्या १४जूनपासून राज्यात संप पुकारला आहे. १५ जूनपासून पुण्यातील ४४८ रेडिओलॉजिस्टचे सोनोग्राफी सेवा बंद राहणार आहे. पुण्यातील रेडिओलॉजिस्ट हा संप बेमुदत सुरू ठेवणार आहेत.
- डॉ. वीरेन कुलकर्णी -अध्यक्ष, पुणे शाखा, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटीझन रिपोर्टर म्हणजेसमस्यांवर प्रभावी उपाय

0
0

सहभागी नागरिकांच्या भावना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या विविध भागांत फिरताना सर्वसामान्य नागरिकांना दिसणाऱ्या, भेडसावणाऱ्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सुरू केलेला 'सिटीझन रिपोर्टर' हा प्रभावी उपक्रम असल्याची भावना उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी व्यक्त केली.
'सिटीझन रिपोर्टर'द्वारे गेल्या आठवड्यात उल्लेखनीय वार्तांकन केलेल्या सतीश इनामदार, गिरीश घोडके, मोहन सुवर्ण यांचा 'मटा'तर्फे प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. 'नागरिकांना स्थानिक समस्या प्रभावीपणे मांडता याव्यात, यासाठी सिटीझन रिपोर्टर हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून, त्याद्वारे नागरी प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. या अॅपमुळे सार्वजनिक समस्या वर्तमानपत्रातून अनेकांपर्यंत पोहोचतात. प्रसिद्धीनंतर प्रशासनाकडून त्याची त्वरित दखल घेतली जाते आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
'मटा'च्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य माणसातील बातमीदाराला प्रोत्साहन मिळते आहे. यामुळे शहरात कुठेही फिरताना आम्ही समस्या टिपायला लागलो आहोत, असे सांगून त्यांनी अॅपवरील बातमी 'मटा'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर घडलेल्या बदलांचीही माहिती दिली. पुण्यासारख्या शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असताना, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'मटा'ने 'सिटीझन रिपोर्टर' उपक्रमाची सुरुवात केली आहे. शहराच्या विविध भागांतील, विविध वयोगटांतील नागरिकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले असून, दररोज ते त्यांना खटकणाऱ्या समस्या 'मटा'पर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन सतीश इनामदार, गिरीश घोडके, मोहन सुवर्ण यांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिताच्या मुलींना मिळाला आधार

0
0

'बीजेएस'ने घेतली शिक्षणाची जबाबदारी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
वंशाच्या दिव्यासाठी कौटुंबिक छळाला वैतागल्याने तीनही मुलींसह आत्महत्या करण्याची सरकारकडे परवानगी मागणाऱ्या अनिताला देवकुळेला भारतीय जैन संघटनेला जगण्याची नवी वाट मिळवून दिली आहे. तिच्या तिन्ही मुलींची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याबरोबरच संघटनतर्फे अनिताला काम मिळवून देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हे अनिता देवकुळे यांचे मूळ गाव. डोंबिवलीतील विष्णू देवकुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एका मागे एक तीन मुली झाल्या. मुलगा होत नाही म्हणून नवरा, सासू-सासरे यांनी अनिता आणि तिच्या मुलींचा सातत्याने मोठ्या प्रमाणात छळ केला. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून त्या मुलींसह गावाला निघून आल्या. यातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तिन्ही मुलींसह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली.
'हा सगळा प्रकार प्रसिद्धी माध्यमातून पुढे आणल्यानंतर भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कार्यकर्त्यांनी अनिता, तिची आई आणि भावाशी चर्चा केली. अनिता यांची मोठी मुलगी सोनाली नुकतीच नववीची परीक्षा पास झाली आहे. तिने घरच्या त्रासाची माहिती दिली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटनेने तीनही मुलींच्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. एवढेच नव्हे तर अनिता यांनाही आम्ही काम मिळवून देणार आहोत,' अशी माहिती संस्थेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी दिली.
संघटनचे कार्यकर्ते सोमवारी (१३ जून) अनिता आणि तिन्ही मुलींना बीडवरून पुण्यात घेऊन येणार आहेत. बीजेएस सध्या राज्यातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सातशे मुले आणि मेळघाट-ठाणे परिसरातील तीनशे अशा एकूण एक हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आणत आहे, असे मुथ्था यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी चालकांवरील कारवाई वाढवा

0
0

पोलिस महासंचालकांचे वाहतूक पोलिसांना आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पुणे शहरात जीवघेण्या अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई वाढवा. दिवसाला साधारण पाचशे केस व्हायला हव्यात,' असे आदेश पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी वाहतूक पोलिसांना दिले. तसेच, या वेळी त्यांनी पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
पुणे पोलिसांच्या आढावा बैठकीनंतर पोलिस महासंचालकांनी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांना दिले आहेत. दीक्षित म्हणाले, 'पुण्यात अलीकडे अपघातांची संख्या वाढते आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांकडे असलेल्या ब्रेथ अॅनालायझरचा वापर करून मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई वाढवा. दिवसाला साधारण पाचशे तरी केस करा. या केसेस केल्यानंतर निश्चतच फरक पडेल.'
'पीएमपी बसमध्ये महिलांना सुरक्षित वाटावे म्हणून प्रत्येक पीएमपीमध्ये व पीएमपी बस स्थानकावर सीसीटीव्ही बसवा. त्यासाठी पीएमपीच्या अधिकाऱ्यांना सूचना द्या, शहरातील प्रत्येक रिक्षा चालकांना त्यांची माहिती असलेले स्टीकर लावण्यास सांगावे, त्या स्टीकरवर रिक्षा चालकाचे नाव, फोटो, मोबाइल क्रमांक व इतर माहिती असावी. यामुळे महिलांना सुरक्षित वाटेल,' असेही त्यांनी सांगितले.
------
पालखी मार्गावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश
पालखी सोहळ्याला सुरुवात होत असून, पालखी मार्गावर असलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेची मदत घेण्याची सूचना केली. पालखी मार्गावर असलेल्या गाड्या, दुकाने, कन्स्ट्रक्शनचा राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना व वाहतुकीला अडथळा होतो. नागरिकांनी रोडवर अतिक्रमण केले असल्यास ते तत्काळ काढून घ्यावे, अन्यथा त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारिका १५ जूनला संपावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील वीस हजारांहून परिचारिका येत्या १५ जूनला संपावर जाणार आहेत. एक दिवसाच्या संपात निदर्शने करून सरकारकडे मागण्या करणार आहेत.
'सरकारी हॉस्पिटलमधील परिचारिकांच्या विनाकारण बदल्या केल्या जात आहेत. त्या करण्यात येऊ नये. तसेच बंधपत्रित परिचारिकांचा बाँड संपल्यानंतरही त्यांना सरळ सेवेत सामावून घेण्यात येत नाही. त्यांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावेत. तसेच याबाबत दौन बैठकांमध्ये सरकारने सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण झाले नाही. परिचारिकांना असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गणवेशाऐवजी आता बदामी रंगाचा गणवेश देण्यात आला आहे. मात्र त्याबाबत सरकारने अद्याप अध्यादेश काढला नाही. अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी १५ जूनला संप लाक्षणिक संप पुकारला आहे. संपात २० हजार परिचारिका सहभागी होतील,' अशी माहिती महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी दिली.
सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना वैद्यकीय कामाव्यतिरिक्त अन्य कामे लावली जातात. कारकुनाचे काम करण्याची वेळ येत असल्याने त्या कामातून परिचारिकांची मुक्तता करावी. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही तर यापुढे बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडले ५५९ बेशिस्त चालक

0
0

सापडले ५५९ बेशिस्त चालक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी व महामार्ग पोलिसांनी एकत्रितपणे गुरुवारी आणि शुक्रवारी अशा दोन दिवसांत ५५९ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. ही कारवाई अतिवेगाने वाहन चालविणे, लेन कटींग करणे, सीटबेल्टचा वापर न करणे, ओव्हरलोड अशा कारणांसाठी करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण दोन लाख ७४ हजार १५० रुपयांचा महसूल जमा झाला.
एक्सप्रेस वेवरील अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे 'आरटीओ'तर्फे तीन पथके, तर पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'तर्फे तीन पथके तयार करण्यात आली आहेत. 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांसोबतच महामार्ग पोलिसांची पथकेदेखील कारवाई करीत आहेत. 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांनी आणि महामार्ग पोलिसांनी एक्सप्रेस वेवरील अमृतांजन पूलापर्यंत विविध ठिकाणी ही पथके कार्यरत ठेवली आहेत.
'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने लेन कटींग व अतिवेगाने वाहन चालविणे यासाठी १३५, तर सीटबेल्टचा वापर न करण्यासाठी ५८ वाहनचालकांवर कारवाई केली. वाहनांत ओव्हरलोड माल भरल्याप्रकरणी २५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या पथकातील अधिकारी ट्रक आणि खासगी बस यांची प्रामुख्याने तपासणी करीत आहेत. महामार्ग पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून लेन कटींग करणे व अतिवेगाने गाडी चालविणे यासाठी १९५ वाहनचालकांवर कारवाई केली.
दरम्यान, शहरातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांमार्फत नवशिक्या वाहनचालकांना वाहन चालविणे शिकविले जाते. त्यावेळीच त्यांचा पाया पक्का करणे गरजेचे आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूल चालकांच्या प्रशिक्षकांनाही अत्याधुनिक कोर्सद्वारे प्रशिक्षित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असला, तरीही रिफ्लेक्टर, माहिती फलक, नादुरूस्त दुभाजक आणि पावसाच्या पाण्याचा प्रश्न आदी मूलभूत समस्यांवर उपाययोजना कधी केल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एक्स्प्रेस-वेवर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. एक्स्प्रेस- वेवर अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, संपूर्ण मार्गावर बायफ्रेन रोप बसविणे, ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरू करण्याचे निर्णयही घेण्यात आले. या सर्व कामांसाठी डेडलाइन निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ही अत्याधुनिक प्रणाली अस्तित्वात येण्यासाठी काही महिन्यांचा किंवा वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात टाळण्यासाठी सुरक्षित वाहतुकीचे धडे

0
0

अपघात टाळण्यासाठी सुरक्षित वाहतुकीचे धडे

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गांवरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला. यातील बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे निदर्शनास आल्याने, भोसरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) संस्थेत वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), टाटा मोटार्स आणि 'आयडीटीआर'तर्फे चालकांना प्रशिक्षित करण्यासाठी कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पहिल्या टप्प्यात हा कोर्स पाचशे चालकांसाठी आहे. दुसऱ्या टप्प्यात त्याचे स्वरूप विस्तारण्यात येणार आहे. जड वाहनांच्या लायसन्स नूतनीकरणासाठी येणाऱ्या चालकांना गटागटाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका गटाला दोन दिवस आहेत.
या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात संबंधित चालकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, त्यांची दृष्टीही तपासली जाणार आहे; तसेच चालकांची अत्याधुनिक अशी 'व्हिज्युअल स्कॅनिंग मेथड'द्वारे तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रात्री गाडी चालवित असताना अचानक एखादी वाहन, पादचारी किंवा अन्य कोणतीही गोष्ट संबंधितांच्या गाडी समोर आल्यास, त्यांच्या प्रतिसादाची वेळ किती आहे, हे पाहिले जाणार आहे. अनेक अपघातांमध्ये चालकांकडून उशीरा मिळणारा प्रतिसाद कारणीभूत ठरतो, त्यामुळे ही तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. या बरोबरच चालकांच्या मानसिक आरोग्याची तपासणीही केली जाणार असून, त्यांना सुरक्षित वाहतूक आणि 'सॉफ्ट स्किल्स'चे धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती 'आयटीडीआर'चे मुख्य समन्वयक के. माधवराज यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छंदाकडे गांभीर्याने पाहायला हवे ः काळे

0
0

छंदाकडे गांभीर्याने पाहायला हवे ः काळे

पुणे ः 'चाकोरीबद्ध जीवन जगण्यापासून परावृत्त करण्यासाठी माणसाला त्याचा छंद कामी येतो, पण बऱ्याचदा त्या छंदाकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या छंदाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,' असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.
सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारी 'सीप' व 'लाइफ रिपब्लिक' यांच्यातर्फे महेश काळे यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 'हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची उत्पत्ती आणि त्यामध्ये कालानुरुप होत गेलेले बदल' यावर काळे यांनी प्रकाश टाकला. आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असलेल्या तरुण-तरुणींची उपस्थिती या वेळी लक्षणीय ठरली.
काळे म्हणाले, 'शास्त्रीय संगीताला भाषेचे बंधन नाही; त्यामुळे जागातील कोणीही हे संगीत आत्मसात करू शकतो. हा संगीत प्रकार एखाद्या नक्षीकामासारखा आहे. त्याला जवळ जाऊन निरखून पाहावे लागते. त्यामुळे ते अधिक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. सध्याच्या धावत्या जगात माणसांकडे वेळ नसल्याने ही कला आत्मसात करण्याचा कुणी अधिक प्रयत्न करत नाही. ज्यांना शास्त्रीय गाण्याचा छंद आहे ,त्यांनी त्या छंदाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.'


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारशाच्या संवर्धनाची ग्वाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे रायगडासह राज्यातील ४५ राष्ट्रीय संरक्षित वास्तूंच्या शास्त्रशुद्ध संवर्धनाबाबत केंद्राकडून होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांनीही दुर्गवारसा जपण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. 'राज्याच्या वारशावर केंद्रातून अन्याय' या वृत्ताद्वारे 'मटा'ने केंद्राकडून होत असलेल्या उपेक्षेकडे लक्ष वेधले होते. कागदावर असलेल्या आणि प्रत्यक्षात 'गायब' असणाऱ्या वास्तू, संरक्षित वास्तूंवर झालेली अतिक्रमणे, सुरक्षारक्षकांची वानवा, नामनिर्देश फलकांतील त्रुटी आणि फलकच नसणे आदी विविध बाबींचा उल्लेख या वृत्तात करण्यात आला होता. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'रायगडाबाबत दुजाभाव होऊ देणार नाही. गडासाठी पाचशे कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. रायगडासारख्या महत्त्वाच्या गडाला 'अ' दर्जा कसा मिळेल, हे पाहिले जाईल. केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी चर्चा केली आहे. राज्यातील पुरातत्त्व विभागाशी करार करावा आणि वारसास्थळांचे प्रश्न सोडवावेत,' अशी विनंती केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गडकोटांचे संवर्धन करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याचे तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'रायगडाच्या विकासाचा वेगळा आराखडा तयार आहे. दुर्ग संवर्धन समितीला चांगला पाठिंबा आणि यंत्रणा विकसित करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्यातल्या वारसास्थळांचा योग्य पाठपुरावा केला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेने भाकरी फिरविली

0
0

किशोर शिंदे गटनेते; धंगेकर 'स्मार्टसिटी'वर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीस अवघे काही महिनेच शिल्लक असतान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवाची अचानक पक्षनेतेपदाची भाकरी फिरविली. मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांना पदावरून दूर करून त्यांच्या जागी कोथरूडचे नगरसेवक किशोर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत उशिरापर्यंत कोणालाही माहिती नव्हती, त्यामुळे अचानक केलेल्या बदलाबाबत पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे.

पालिकेचे गटनेतेपद बदलण्याचा निर्णय यापूर्वीच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला होता. त्याची माहिती केवळ शनिवारी जाहीर झाली, असा दावा पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला. काही दिवसांपूर्वी वागस्कर स्मार्ट ‌सिटीच्या संचालकपदासाठी स्वत:च्या नावाची शिफारस आयुक्तांकडे करून परदेश दौऱ्यावर निघून गेले. हे प्रकरणाचे वाद थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्या पार्श्वभूमीवर गटनेतेपदाची भाकरी फिरविण्यात आल्याची चर्चा पक्षात आहे.

गेल्या निवडणुकीत तब्बल २९ नगरसेवक विजयी होऊन मनसे शहरात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्या वेळी गटनेतेपदी वसंत मोरे यांना संधी मिळाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे यांनी शहरात मुक्काम करुन पदाधिकारी, नगरसेवक यांची मते जाणून घेतली होती. पालिकेच्या निवडणुसाठी आक्रमक नेतृत्व हवे, असे सांगून वागस्कर यांची या पदावर निवड झाली. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर त्यांची अचानक उचलबांगडी झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वागस्कर यांच्या निवडीला पक्षातील एका गटाचा विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून ठाकरे यांनी त्यांना संधी दिली होती.

स्मार्ट सिटीच्या संचालकपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर पक्षातील एका गटाने वरिष्ठांपर्यंत धाव घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांना भेटायला गेलेल्या वागस्कर यांना पक्षात बदल करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार हा बदल झाल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. किशोर शिंदे यांना पक्षाने आजपर्यंत कोणतेही महत्वाचे आणि मोठे पद न दिल्याने त्यांना गटनेतेपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

धंगेकरांनाही ताकद

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपनीच्या संचालकपदासाठी वरिष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. या टर्ममध्ये त्यांना कोणतेही पद न दिल्याने त्यांचा एसपीव्हीच्या संचालकपदाची जबाबदारी देऊन पुन्हा ताकद देण्यात आल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-लोणावळा रेल्वेसाठी पिंपरी देणार २७५ कोटी

0
0

पुणे-लोणावळा रेल्वेसाठी पिंपरी देणार २७५ कोटी

पिंपरी ः पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या हिश्श्याचा २७५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला द्यावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंगळवारी (१४ जून) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण सोडून दोन हजार ३०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी ५० टक्के सहभागाने करावयाचा आहे. त्याबाबतची मान्यता मध्य रेल्वेने दिली असून, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला कळविले आहे. जमीन अधिग्रहण सोडून प्रकल्पाला प्रतिकिलोमीटर ३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; तसेच प्रकल्पासाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (एमयूटीपी) धर्तीवर राज्य सरकारकडून ५० टक्के आर्थिक सहभाग अपेक्षित धरला आहे. राज्य सरकारने ज्याप्रमाणे मुंबई नागरी परिवहन प्रकल्पामध्ये सरकारच्या वतीने द्यावयाची ५० टक्के रक्कम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत दिली जाते. त्याचप्रमाणे पुणे-लोणावळा दरम्यानच्या या प्रकल्पासाठी (पीयूटीपी) राज्य सरकारकडून अपेक्षिलेली ५० टक्के रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्राधिकरण, पुणे प्रादेशिक विकास महामंडळाने द्यावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार २६ वर्षे पगाराच्या प्रतीक्षेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खोपोली येथील पेपर अँड पल्प कन्व्हर्शन कंपनीतील कामगारांना त्यांची देणी अजूनही मिळालेली नसून, त्याबाबत कोणतीच सरकारी यंत्रणा पुढाकार घेत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

बाबुराव पारखे उद्योग समुहातील ही कंपनी १९९० मध्ये बंद पडली. त्यानंतर ३१ डिसेंबर २००६ रोजी मुंबईतील डेब्ट रिकव्हरी ऑफिसर ३ यांच्या कार्यालयाने या कंपनीची स्थावर व जंगम मालमत्ता विक्री करण्याची सूचना काढली. त्यानंतर वर्षभरात या मालमत्तेच्या विक्रीचा करारही पूर्ण झाला. त्यातून सुमारे ६५ कोटी रुपये संबंधित यंत्रणेकडे जमा झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यानंतर २००८ मध्ये या कंपनीच्या अवसायक अधिकाऱ्यांनी सर्व कामगारांकडून त्यांचे येणे असलेल्या रकमेचा तपशील मागवून घेतला. व त्यातील पन्नास टक्के रक्कम मंजूर करण्यात आल्याचे पत्र २१ नोव्हेंबर २००९ रोजी प्रत्येक कामगाराला पाठविण्यात आले. हे पत्र आल्यानंतर पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही; तसेच कोणतीही रक्कम कामगारांना मिळालेली नसल्याची तक्रार केली आहे.

सुमारे ७८० कामगार व स्टाफ यांना देणे असलेली सुमारे २२ कोटी रुपयांची रक्कम बँकेत ठेवण्यात आली आहे. या विलंबाबाबत खोपोली येथील कामगारांनी सर्वोच्च्य न्यायालयात धाव घेतली. तेथील निकालही कामगारांच्या बाजूने लागल्यानंतरही या रकमेचे वाटप अजूनही करण्यात आलेले नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सर्व सरकारी यंत्रणा व वित्तीय संस्थांनी आपल्याला येणे रक्कम वसूल केली असून, कामगारांच्या देण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार या कामगारांनी केली आहे.

कामगारांना त्यांची देणी तब्बल २६ वर्षानंतरही मिळालेली नसल्याने, शिवाय त्याबाबत कोणतीच सरकारी यंत्रणा पुढाकार घेत नसल्याने कामगार अस्वस्थ आहेत. त्यांची आर्थिक स्थिती दयनीय असून या परिस्थितीकडे सरकारने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारशाच्या संवर्धनाची ग्वाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रायगडासह राज्यातील ४५ राष्ट्रीय संरक्षित वास्तूंच्या शास्त्रशुद्ध संवर्धनाबाबत केंद्राकडून होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांनीही दुर्गवारसा जपण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने शनिवारी प्रसिद्ध केले होते.

'राज्याच्या वारशावर केंद्रातून अन्याय' या वृत्ताद्वारे 'मटा'ने केंद्राकडून होत असलेल्या उपेक्षेकडे लक्ष वेधले होते. कागदावर असलेल्या आणि प्रत्यक्षात 'गायब' असणाऱ्या वास्तू, संरक्षित वास्तूंवर झालेली अतिक्रमणे, सुरक्षारक्षकांची वानवा, नामनिर्देश फलकांतील त्रुटी आणि फलकच नसणे आदी विविध बाबींचा उल्लेख या वृत्तात करण्यात आला होता.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'रायगडाबाबत दुजाभाव होऊ देणार नाही. गडासाठी पाचशे कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. रायगडासारख्या महत्त्वाच्या गडाला 'अ' दर्जा कसा मिळेल, हे पाहिले जाईल. केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी चर्चा केली आहे. राज्यातील पुरातत्त्व विभागाशी करार करावा आणि वारसास्थळांचे प्रश्न सोडवावेत,' अशी विनंती केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गडकोटांचे संवर्धन करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याचे तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'रायगडाच्या विकासाचा वेगळा आराखडा तयार आहे. दुर्ग संवर्धन समितीला चांगला पाठिंबा आणि यंत्रणा विकसित करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्यातल्या वारसास्थळांचा योग्य पाठपुरावा केला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images