Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मान्सूनशी जुळवून घेताना संघर्ष

$
0
0

मयुरेश प्रभुणे, कदमतला (मध्य अंदमान)
भिन्न प्रदेश, भिन्न भाषा आणि शेतीच्या पद्धतीही निराळ्या. आठ महिने पाऊस बरसणाऱ्या नव्या प्रदेशात मुख्य भूमीतून आणलेले त्यांचे पारंपरिक ज्ञान उपयोगात येत नाही. शेतीचे सर्व पर्याय खुले ठेवणे, हा एकच पर्याय त्यांच्यासमोर उरतो. स्वातंत्र्यानंतर देशाच्या विविध राज्यांतून अंदमानमध्ये स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांना येथील मान्सूनच्या चक्राशी जुळवून घेण्यासाठी अद्यापही संघर्ष करावा लागत आहे.

प्रोजेक्ट मेघदूत अंतर्गत मध्य आणि उत्तर अंदमानमधील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांनी एकाच वेळी अनेक पिके घेण्याची पद्धत अवलंबल्याचे सांगितले. स्वातंत्र्यानंतर उत्तर अंदमानमध्ये पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील बंगाली, मध्य अंदमानमध्ये झारखंड आणि छत्तीसगड येथील आदिवासी, पूर्व किनारपट्टीवर तेलगू आणि दक्षिण अंदमानात तमिळ शेतकरी आणि मच्छीमार स्थलांतरित झाले आहेत. देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पारंपरिक पद्धतीही निराळ्या आहेत. मात्र, नव्या प्रदेशात आपापल्या प्रदेशातून आणलेले पारंपरिक ज्ञान लागू पडत नाही, याचा प्रत्यय या शेतकऱ्यांना येत आहे.

अंदमानात नैऋत्येकडून आणि नंतर ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मे ते डिसेंबर असा आठ महिने पाऊस पडतो. आठ महिन्यांच्या पावसाच्या या चक्रामध्ये मुख्य भूमीतील खरीपाची पद्धत निरुपयोगी ठरते. अशा वेळी बहुतेकशेतकरी एकाच वेळी भात, भाज्या, फळे, सुपारी आणि शेततळ्यातील मत्स्यपालन असे सर्व पर्याय एकाच वेळी आजमावताना दिसतात. मान्सूनमध्ये कितीही चढ-उतार आले तरी, कोणत्या तरी एका पिकापासून तरी उत्पन्न मिळू शकेल, ही त्यामागील कल्पना.

ज्यांचा जन्म अंदमानातच झाला आहे, अशी नवी पिढी आता शेतात राबत आहे. गेल्या दहा वर्षांत पाऊस बदलत असल्याचे आणि त्यामुळे नुकसानही वाढल्याचा अनुभव सर्व भागांतील शेतकरी सांगतात. पूर्वीच्या पिढीकडून मिळालेल्या पारंपरिक ज्ञानापेक्षा संशोधन संस्थांकडून मिळणाऱ्या माहितीचा शेतीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे नव्या पिढीचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना 'कॅरी'ची साथ

सेन्ट्रल आयलॅण्ड अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे (कॅरी) गेली चाळीस वर्षे अंदमानच्या हवामानावर आणि या हवामानात अनुकूल ठरेल अशा शेतीच्या, पशुपालनाच्या पद्धतींवर संशोधन सुरू आहे. गेल्या पन्नास वर्षांत अंदमानातील पावसाचे प्रमाण कायम राहिले असले, तरी त्यातील चढ-उतार वाढले आहेत, असे संशोधनातून समोर आल्याचे 'कॅरी'चे संचालक डॉ. एस. दाम रॉय यांनी सांगितले. ते म्हणाले, 'अंदमानात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी, त्यातील चढ-उतार शेतीसाठी घातक ठरतात. शेतीतील नुकसान कमी व्हावे यासाठी एका वेळी अनेक पिके घेण्याची पद्धत आम्ही रुजवत आहोत. त्याचप्रमाणे अंदमानच्या हवामानाशी अनुकूल भाताची वाणे आम्ही विकसित केली आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्रांतवाडीत आगीत दुकाने जळून खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विश्रांतवाडी परिसरात शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत बेकरीसह कापडाचे दुकान जळून खाक झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. यामध्ये चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून दोन घरांचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

विश्रांतवाडी चौकात शबिना बेकरी नावाचे दुकान आहे. त्याच्या शेजारी एक कपड्याचे व चप्पलचे दुकान आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन बेकरीला आग लागली. काही वेळातच अगीने उग्ररूप धारण केले. नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. येरवडा, कसबा व मध्यवर्ती अग्निशमनच्या दोन फायर गाड्या व एका टँकरने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बेकरी आणि कपड्याचा दुकानाला अगीने विळाखा घातला होता. अग्निशमक दलाच्या जवानांनी पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर अगीवर नियत्रंण मिळवले. बेकरी आणि कपड्याचे दुकान अगीत जळून खाक झाले आहे. तर, शेजारील दोन घरे आणि चप्पलच्या दुकानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दलित-मातंग एकतेची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एकत्र आले असते, तर इतिहास घडून मातंग आणि दलित समाजातील प्रश्न सुटले असते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आता मातंग आणि दलित समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजे,' असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आरपीआय मातंग आघाडीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन मातंग सभा घेण्यात आली. या वेळी आठवले बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, आरपीआयचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, राज्याचे उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, प्रा. सुकमार कांबळे, प्रा. मच्छिंद्र सकटे, महेश शिंदे, मिलिंद आवाड आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एकत्र आले असते, तर मातंग आणि दलित या दोन्ही समाजांची ताकद वाढली असती. मात्र, तसे झाले नाही. आता आपल्याला दोन्ही समाजांची ताकद वाढविण्यासाठी एकत्र यायचे आहे. दलित समाजाबरोबर मातंग समाजावरील अन्यायांमध्ये वाढ होत आहे. आपण सर्व एकच आहोत, असे आपण नेहमी दाखवतो. मात्र, आपण एकत्र कधीच येत नाही. रिपब्लिकन मराठा, ब्राह्मण, महार, मांग, खिश्चन, मुस्लिम अशा सगळ्या समाजाच्या अघाड्या आहेत. मात्र, ऐन निवडणुकीत या आघाड्यांच्या बिघाड्या होतात.'

बापट म्हणाले, 'रामदास आठवले लोकांची कामे करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याचा सत्कार लवकरच माझ्या हस्ते करण्यात येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने त्यांची भेट अमित शहा यांच्याशी घडवून आणत आहे.' महेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्य क्षेत्रात प्रचंड राजकारण’

$
0
0


पुणे : 'मराठी साहित्यात इतरांच्या साहित्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींची आणि त्यांच्या साहित्याचीच दखल घेतली जात असून साहित्य क्षेत्रात संकुचित वृत्ती आणि गटातटाचे राजकारण वाढले आहेत,' अशी टीका ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रभा गणोरकर यांना त्यांच्या 'स्त्रियांची कविता' या ग्रंथासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते 'कृष्ण मुकुंद उजळंबकर स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी गणोरकर बोलत होत्या. या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, मोहन गुजराथी, सुधीर उजळंबकर उपस्थित होते.
गणोरकर म्हणाल्या, 'मराठी संदर्भात काळजी करावी, अशी परिस्थिती झाली आहे. याचे कारण समाजात विद्वत्ता आणि वाङ्मयनिष्ठा राहिली नाही. मला आज रा.ग. जाधव यांची प्रकर्षाने आठवण येत आहे, त्यांनी मला लिहायला शिकवले.' सूत्रसंचालन बंडा जोशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहांच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना सक्ती?

$
0
0

पुणे : पुणे शहर भाजपने रविवारी आयोजित केलेल्या महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी अकरावी आणि बारावी व्यवसाय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आल्याची ओरड रविवारी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारही गर्दी जमविण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार घेत आहे की काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

शहर भाजपने रविवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारच्या 'प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना'च्या संदर्भाने विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. त्यासाठी व्यवसाय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सकाळी १० वाजता आपल्या ओळखपत्रासह हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच सरकारच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, सरकारने सध्या भाजपचे कार्यकर्ते नसलेल्या विद्यार्थ्यांना पक्षाकडे आकर्षित करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकल्याचेही दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रगतीचा केंद्रबिंदू नागरिक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भाजप सरकावर गेल्या दोन वर्षांत भ्रष्टाचाराचा कुठलाही कलंक लागलेला नाही,' असे सांगून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'देश बदल रहा है'चा नारा पुण्यात दिला. शेती, उद्योग, व्यापार, संरक्षण आदी क्षेत्रात प्रगती होत असून प्रगतीचा केंद्रबिंदू सर्वसामान्यच असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'विवेक संवाद' या कार्यक्रमात शहा यांनी शंभर ते दिडशे मान्यवर निमंत्रितांशी संवाद साधला. शहा यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला १५ ते २० मिनिटे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल​ शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.

'देशातील कोटभर नागरिकांनी आपली गॅस सबसिडी परत केली आहे. त्यामुळे तीन कोटी गॅस कनेक्शन नव्याने देता आले. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, शेती, संरक्षण, व्यापार, उद्योग आदी क्षेंत्रामध्ये देश प्रगती करतो आहे. 'देश बदल रहा है'ची भावना आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे, तसेच इतर पक्षांनाही त्याची जाणीव होऊ लागली आहे. प्रगती एका रात्रीतून होणारी नाही. त्याला थोडा वेळ लागेल,' असेही शहा यांनी या वेळी सांगितले.

आंदोलनांचे काय?

'जेएनयू', 'एफटीआय'मध्ये झालेली आंदोलने असो की देशभरात सरकार विरोधी वातावरण तयार करण्याच्या घटना असोत. हा 'विरोधी' आवाज यापूर्वीही होता. मात्र, या सरकारच्या काळात त्यांना चिमटे बसायला लागले असल्याने त्यांचा आरडाओरडा वाढला आहे. त्यातून ही आंदोलने होत असल्याचे शहा म्हणाले.

खडसेंबाबत योग्य ती दखल

भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नाहीत, हे सरकारचे यश असल्याचे शहा यांनी उपस्थितांना सांगितले. प्रश्नोउत्तरादरम्यान निमंत्रितांपैकी एका व्यक्तीने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत प्रश्न विचारला. या वेळी शहा यांनी खडसे यांच्याबाबत पक्षाने योग्य ती दखल घेतले असल्याचे सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारज्यात भांडणामधून तेरा वाहनांची तोडफोड

$
0
0

वारज्यात भांडणामधून तेरा वाहनांची तोडफोड नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण म. टा. प्रतिनिधी, पुणे दोन गटांच्या वादातून वारजे परिसरातील विठ्ठलनगर व म्हाडा वसाहत येथील चौदा ते पंधरा वाहनांची तोडफोड केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दोन्ही गटाच्या टोळक्याने परिसरातील घरांवर दगडफेक केली. यामुळे येथे दहशतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणी दोन्ही गटांच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी काही जणांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत संभाजी सीताराम पिंपरे (वय ५२, रा. चैतन्य चौक) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रोहित पासलकर, मंदार उर्फ मन्या जोशी, संकेत शिंदे, अक्षय जाधव आणि इतर चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय किसन जोरी (वय ३९, रा. म्हाडा वसाहत) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सूरज पिंपरे, नेहाल शिंदे, जावेद पठाण व इतरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात सूरज पिंपरे व रोहित पासलकर यांच्या स्थानिक टोळ्या आहेत. त्यांच्यात सतत वाद होत राहतात. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर सूरज पिंपरे याच्या टोळीने रात्री आठच्या सुमारास म्हाडा वसाहत परिसरात जाऊन जोरी यांच्या घरावर दगडफेक केली. या बिल्डिंगच्या पार्किंगमधील गाड्यांचे नुकसान केले. या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तोडफोड केल्यानंतर ही टोळी निघून गेली. रोहित पासलकर याला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो साथीदारांना घेऊन रात्री अकराच्या सुमारास विठ्ठल नगर परिसरात आला. पासलकर व त्याच्या साथीदाराच्या हातात लाकडी दांडके, कोयता यासारखी हत्यारे होती. ते ओरडत नागरिकांना शिवीगाळ करत होते. आरोपींनी तक्रारदार पिंपरे यांच्या घरावर दगडफेक करीत घरासमोरील पार्क केलेल्या त्यांच्या अल्टो मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर दोन पॅगो टेम्पोच्या काचा फोडल्या. एका दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर कोयता मारून दुचाकीचे नुकसान केले. तसेच, शेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समोर पार्क केलेल्या आणखी एका टेम्पोची काच फोडली. आरडा-ओरडा करत जाताना आरोपींनी पिंपरे यांचा पुतण्या सूरज पिंपरे याच्या नावाने शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हे दुचाकीवरून भरधाव निघून गेले. जाताना त्यांनी काही अंतरावरील कमलाकर गलांडे यांच्या फियाट कारची तोडफोड केली. तसेच, धन्यवाद डावरे यांच्या कारची काच फोडली. जाताना आणखी काही गाड्यांचे नुकसान केले. या घटनेत आरोपींनी बारा ते पंधरा गाड्यांची तोडफोड केली आहे. टोळक्याने धुडगूस घातल्याने नागरिक घाबरून गेले होते. काही नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तडीपार गुंडाने केली तोडफोड वारजे परिसरात सूरज पिंपरे व रोहित पासलकर यांच्या स्थानिक टोळ्या आहेत. त्यांच्यात सतत वाद होतात. पासलकर हा सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तरीही त्याने शनिवारी रात्री येऊन विठ्ठलनगर परिसरात तोडफोड केली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून दंगल करणे, सार्वजनिक शांततेचा भंग, मालमत्तेचे नुकसान अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वीही वाहनांची तोडफोड 'टीव्ही पाहत असताना अचानक काच फुटल्याचा आवाज आला. खाली पाहिले तर आरोपी वाहनांची तोडफोड करत होते. दोन दिवसांपूर्वीदेखील माझ्या एक टेम्पो व कारची काच फोडण्यात आली होती. या प्रकरणीही मी तक्रार दिली आहे. टेम्पोची काच दुरूस्त करून आणल्यानंतर पुन्हा दोन टेम्पो, एक मोटार आणि दुचाकीचे नुकसान केले आहे. वाहनांची तोडफोड का केली, हे समजू शकलेले नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे', अशी माहिती संभाजी पिंपरे यांनी दिली.

वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार राजरोस शहरात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार राजरोसपणे घडू लागले आहेत. याकडे पोलिसांचे हवे तसे लक्ष नसल्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. त्याचा त्रास नागरिकांना विनाकारण सहन करावा लागत आहे. हडपसर येथील ससाणेनगर परिसरात एका टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी शुक्रवारी रात्री बांबूने तीन दुचाकी व एका मोटारीची तोडफोड केली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पिंपरी परिसरातदेखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, तोडफोड करणाऱ्या आरोपींवर ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र आणि राज्यातील भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शहर काँग्रेसने रविवारी भारतीय जनता पक्षाचे अमित शहा यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. तसेच, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे वाढते दर, शेतकऱ्यांची कर्जमाफी यावरूनही सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शहा यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमापूर्वी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. परंतु, शांततेने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगूनही पोलिसांकडून अडवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. तसेच, कोणतीही गडबड करणार नाही, असे आश्वासन देऊनही अश्रूधुराच्या नळकांड्याही तयार ठेवण्यात आल्याची टीका त्यांनी केली. 'काँग्रेसने आत्तापर्यंत कायदा हातात घेत कोणतेही आंदोलन केले नाही. तरीही, पुण्याचा गुजरात करण्याचा हा प्रयत्न असून, शहराची संस्कृती बदलण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे,' अशा शब्दांत काँग्रेसने भाजपवर टीका केली.

काँग्रेसच्या आंदोलनात बागवे आणि शिंदे यांच्यासह माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भीमसृष्टी प्रकल्पाला गती देण्याची मागणी

$
0
0







म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या भीमसृष्टी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात व्हावी,' अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प मार्गी लागावा, यादृष्टीने विविध पक्ष आणि संघटनांनी आग्रह धरला आहे. पिंपरीच्या मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरत पुतळा चौक परिसरात भीमसृष्टी उभारण्याची संकल्पना आहे. त्यामध्ये सांस्कृतिक भवन, अभ्यासिका केंद्र, ग्रंथालय आणि वाचनालय, जीवनप्रसंगांचे शिल्प यांचा समावेश आहे. त्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. अनेकदा माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागण्यात आली. परंतु, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप करण्यात येत आहे. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी भीमसृष्टीच्या उभारणीबाबत दोन वर्षांपूर्वीच ठोस आश्वासन दिले होते. परंतु, त्यांची बदली झाली तरी आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आता या कामात दिरंगाई होऊ न देता तातडीने भूमिपूजन करावे, या मागणीने जोर धरला आहे. वास्तविक, गेल्या एप्रिल महिन्यातच काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे संघटनांनी म्हटले आहे. पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जवळ सांस्कृतिक भवन असावे, यासाठी २००७ पासून आजतागायत पाठपुरावा चालू आहे. या कालावधीत तीन धरणे आंदोलन, दहा निवेदने देण्यात आली आहेत. सांस्कृतिक भवनाऐवजी भीमसृष्टी उभारण्याचे आश्वासनही पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रकल्पाचे लवकर भूमिपूजन व्हावे, अशी मागणी धम्मदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वडमारे, आनंद साळवे, रमेश पवार, कैलास परदेशी, सुभाष विद्यागर यांनी केली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात प्रतिष्ठानला सहभागी करून घ्यावे, असेही निवेदनात नमूद केले आहे. भीमसृष्टीच्या कामाला गती मिळावी. अन्यथा, येत्या १५ दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड नागरी हक्क सुरक्षा समितीने दिला आहे. समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, प्रदीप पवार, नीलेश सुंबे, दिलीप काकडे, नागेश निकम, बापूसाहेब देशमुख यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. आंबेडकर पुतळा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रविषयक स्मृतीशिल्प आणि ग्रंथालय उभारले जाणार आहे. याबाबतच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने परवानगी देऊन चार महिने झाले तरी कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली नाही. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा झाला तरीही प्रकल्पाला विलंब होत आहे, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भीमसृष्टी उभारावी, याबाबत २००७ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. विविध पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. तसेच या वर्षीच्या पालिकेच्या बजेटमध्ये दोन कोटी ७० लाख रुपये खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाचा किमान प्रारंभ तरी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासदरात भारत पुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'विकासदराच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांमध्ये देशाने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे,' असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत हातामध्ये देश सोपविल्याने हे शक्य झाल्याचे सांगतानाच, शहा यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्याविषयी पुढे आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलणे मात्र टाळले.

पुणे शहर भाजपतर्फे रविवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहा बोलत होते. राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेची माहिती तळागळात पोहोचविणाऱ्या एका विशेष व्हॅनचेही या वेळी शहा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भाजप सरकारच्या दोन वर्षांतील विविध योजनांचा आढावा घेत, देशाच्या प्रगतीचा चढता आलेख शहा यांनी या वेळी मांडला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार जगदीश मुळीक, आमदार योगेश टिळेकर, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह पक्षातील इतर मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शहर भाजपतर्फे या वेळी शहा यांचा पुणेरी पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

शहा म्हणाले, 'देशाला राजकीय अस्थिरतेतून बाहेर काढण्याचे काम एकमताने सत्तेत आलेल्या मोदी सरकारने केले. गेल्या दोन वर्षांत सरकारने जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळेच देशाची सध्याची प्रगती दिसून येत आहे. देशातील गरिबी दूर करण्यासाठी सरकारने धोरणांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. युवकांमधील कौशल्य विकासाकडे लक्ष देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय उभारणारे मोदी सरकार हे पहिलेच ठरले आहे.'

'स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया हे प्रकल्प युवकांना बेरोजगारीच्या गर्तेतून बाहेर काढणारे ठरले आहेत. जनधन योजना, गॅस सबसिडी सोडण्यासाठी केलेले आवाहन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद याद्वारे सरकारने वंचितांच्या विकासासाठीही प्रयत्न केले. भविष्यात देशाचा इतिहास लिहिला गेल्यास, देशाचे भविष्य बदलणारी योजना म्हणून मेक इन इंडिया योजनेचा गौरवोल्लेख होईल,' असेही शहा म्हणाले. गोगावले यांनी प्रास्ताविक केले. शिरोळे यांनी आभार मानले.

राष्ट्रवादीची संस्कृती नव्हे, विकृती : बापट

बापट यांनी आपल्या मनोगतातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला. 'जनतेसाठी काम करणे हीच भाजपची संस्कृती आहे. काँग्रेसची संस्कृती वेगळी होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला संस्कृतीच नव्हती, ती विकृती होती,' असे मत मांडत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला. तर, दानवे यांनी सर्वसामान्य जनतेने सरकारचे ऑडिट करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत २६ केंद्रीय मंत्री राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी पर्यायी व्यवस्था उभी करण्याची गरज : प्रकाश आंबेडकर

$
0
0







म. टा. प्रतिनिधी, पुणे 'काळाची गरज ओळखून पुरोगामी डाव्या संघटनांनी आपली कमकुवत मानसिकता दूर करून नव्या पिढीची विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. यातूनच नवी पर्यायी व्यवस्था उभी करता येईल,' असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. राष्ट्र सेवा दलाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सानेगुरुजी स्मारक येथे सुरू असलेल्या दोन दिवसांच्या या महोत्सवामध्ये रविवारी 'देशापुढील आव्हाने व राष्ट्र सेवा दलाची अपरिहार्यता' या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. अभिजित वैद्य, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. संजय दाभाडे, अॅड. रेखा दळवी, प्रा. मधुकर निरफराके सहभागी झाले होते. 'दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर आपली जात, धर्म विसरून लाखो विद्यार्थ्यांनी कुठल्याही नेतृत्वाशिवाय रस्त्यावर उतरत मोठे आंदोलन घडवून आणले,' असा दाखला देऊन आंबेडकर म्हणाले, 'भ्रष्टाचाराचे आकडे ऐकल्यामुळेच नव्या पिढीने कॉँग्रेसला बाजूला सारले. ही पिढी भ्रष्टाचार मुळातून उखडून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांना जाती-धर्मांपेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. एवढेच नव्हे; तर धर्म नाकारणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे धर्म या विषयावर मोकळेपणाने चर्चा व्हायला पाहिजे. गेल्या काही वर्षात धर्माचे राजकारण वरचढ होत असल्याची सद्यःस्थिती आहे. मात्र, याला विरोध करण्यासाठी आपली मानसिकता सक्षम करून चांगली पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याची गरज आहे,' असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या प्रवृत्तीनेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व डॉ. कलबुर्गी यांचा खून केला आहे. 'अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी पुरोगामी डाव्या संघटनांनी आपापसातील भांडणे आणि मतभेद दूर करण्याची गरज आहे,' अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. 'डॉ. दाभाडे यांनीही कॉर्पोरेट शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी डाव्या पुरोगामी शक्तींनी समाजातील सर्व प्रश्‍नांवर एकत्रित लढण्याची गरज आहे,' असे सांगितले. डॉ. वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकीत पुन्हा पे-अॅँड पार्क

$
0
0

खडकीत पुन्हा पे-अॅँड पार्क



म. टा. प्रतिनिधी, खडकी खडकी कँटोन्मेंट बोर्डाने उत्पन्नवाढीसाठी खडकीमध्ये पुन्हा 'पे-अॅँड पार्क' योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, खडकीतील पाच प्रमुख रस्त्यांसह चार मोकळ्या जागांवर पे-अॅँड पार्कची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा मागविण्याचा निर्णय बोर्डाच्या शनिवारी (४ जून) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. खडकी कँटोन्मेंट बोर्डाने उत्पन्न वाढविण्यासाठी पुन्हा एकदा खडकीमध्ये पे-अॅँड योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोलेदिना रोड, शिकारीलाल जैन मार्ग, आंबेडकर रस्त्यावरील गणेश मंदीर ते शिख लाइन, नाझरत रोड-नीता अपार्टमेंट ते टिकाराम चौक, महात्मा गांधी रस्ता, याचबरोबर फिश मार्केट, चौपाटी, आकाशदीप समोरील मोकळी जागा, बसस्थानकावरील प्रफुल्ल रसवंती ते दर्गा, खडकी बिझनेस सेंटर परिसर या जागेमध्ये पे-अॅँड पार्क करण्यास बोर्डाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली असून सवकरच यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. यामुळे योजनेमुळे खडकीतील गाड्या पार्क करण्यास शिस्त लागणार आहे. बोर्डाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण हाटविण्यात येणार आहे. तसेच, खडकी बिझनेस सेंटर, आकाशदीप बिल्डींग, मेहता टाॅवर, गणपती मंदीर चौक, खडकी बसस्थानक या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत गाड्या उभ्या करून दिवसभर गायब राहणाऱ्या वाहनचालकांचाही शोध यामुळे लागणार आहे. बोर्डाने पाच वर्षांपूर्वी ही योजना राबवली होती. मात्र, त्यावेळी बोर्डातील काही राजकीय मंडळींनीच या योजनेला खो घातला होता. तसेच, अनेक व्यापाऱ्यांनीही या योजनेला विरोध केला होता. त्यामुळे त्यावेळी पे-अॅँड पार्क योजना गुंडाळावी लागली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी खडकी बिझनेस सेंटर या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर पे-अॅँड पार्क योजना सुरू केली होती. काही महिने बोर्डानेच ठेकेदारामार्फत ही योजना राबवली होती. मात्र, त्यावेळीदेखील बोर्डाने या योजनेकडे गांभीर्याने न पाहिल्याने पुन्हा ते बंद करावे लागले होते. यंदा मात्र, पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या धर्तीवर बोर्डाला उत्पन्नाचा एक चांगला मार्ग मिळवून देण्यासाठी ही योजना कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग पद्धती कचाट्यात?

$
0
0

भाजप वगळता अन्य पक्ष कोर्टात जाण्याची शक्यता
Jitendra.Ashtekar@timesgroup.com
पुणे : कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून एकेरी वॉर्डांची रचना लागू केल्यानंतर त्यात बदल करून पुन्हा चार सदस्यांच्या प्रभागंची पद्धत सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आता कायदेशीर लढाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
पुण्यासह राज्यभरातील अनेक ठिकाणच्या विविध पक्ष-संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी याविरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. आजपासून (सोमवार) कोर्टाची उन्हाळी सुटी समाप्त होत आहे. याविरोधात अनेक याचिका कोर्टापुढे येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भारिप-बहुजन महासंघ, तसेच मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण अशा अनेकांनी या निर्णयात कायदेशीर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. आता याविरोधात दाखल होणाऱ्या याचिकांवर कोर्टाचे निकाल लागेपर्यंत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबतचा संभ्रम कायम राहणार आहे.
येत्या फेब्रुवारीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. केंद्र आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख शहरांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच पक्ष उत्सुक आहेत. त्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने इतर सर्व पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच या निर्णयास कायदेशीर आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. या निर्णयासही मोठी पार्श्वभूमी आहे.
यापूर्वी २००२ मध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्यात आला होता. मात्र, त्यातील तिन्ही सदस्यांमध्ये वादंग होतात, असे लक्षात आल्याने पुन्हा २००७ मध्ये सिंगल वॉर्ड पद्धतीने निवडणुका झाल्या. तेव्हा महिलांना ३३ टक्के आरक्षण होते. त्यामध्ये वाढ करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामध्ये प्रस्थापितांच्या संधी हुकण्याचे सावट दूर करण्यासाठी द्विसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झाली आणि २०१२ च्या महापालिका निवडणुका या पद्धतीने झाल्या. दरम्यान, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. एका मतदारास एकच मत देण्याचा अधिकार आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला होता. यावर बाजू मांडताना सरकारने ही पद्धत मागे घेऊ आणि सिंगल वॉर्ड करू, असे अॅफिडेव्हिट कोर्टात सादर केले. त्यानंतर विधिमंडळात सिंगल वॉर्डांचा कायदा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप इतर पक्षीयांकडून होत असून त्यातील कायदेशीर त्रुटी शोधण्याची कामे सध्या सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कायदे तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र, हे कायदे घटनेतील तत्त्वांशी विसंगत ठरत असल्याचे विरोधक सिद्ध करू शकले, तर बहुसदस्यीय प्रभाग पद्धत कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
..
प्रमुख आक्षेप कोणते ?
घटनादुरूस्ती विरोधी : राज्यकारभाराचे विकेंद्रीकरण करण्याचे तत्व स्वीकारून काही काळापूर्वी ७३ आणि ७४ वी घटनादुरूस्ती करण्यात आली. त्यामध्ये कारभाराचे अधिकाधिक विकेंद्रीकरण करण्यास घटनात्मक रूप देण्यात आले आहे. मात्र, चार सदस्यांचा मोठा प्रभाग केल्याने घटनेतील या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
भेदभाव : या पद्धतीमुळे एकाच राज्याच्या वेगवेगळ्या शहरातील मतदारांच्या बाबतीत भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. म्हणजे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर येथील मतदारांनी एका प्रभागात एकच मत दिले आहे, तर अन्य महापालिकांच्या निवडणुकीत चार मते द्यावी लागणार आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या बाबतही कशा पद्धतीचा प्रभाग करायचा, याचा निर्णय अद्याप सरकारने घेतलेला नाही, त्यामुळे तेथेही हाच आक्षेप लागू होण्याची शक्यता आहे.
आरक्षणाला धोका :
या पद्धतीमुळे राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर, पर्यायाने घटनेने दिलेल्या आरक्षणावर गदा येत असल्याचा एक आक्षेप घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारांसाठी जगणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज

$
0
0

अमित शहा यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सध्याचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपला वेगळे केले तर, काहीच उरत नाही. स्वतःबद्दल विचार न करता पक्ष आणि विचारधारेसाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांची देशाला गरज आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केले.
साप्ताहिक विवेकतर्फे निर्मित 'राष्ट्रद्रष्टा : पं. दीनदयाळ उपाध्याय' या ग्रंथाचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, गोविंददेवगिरी महाराज, हिंदुस्तान प्रकाशनचे अध्यक्ष रमेश पतंगे, साप्ताहिक विवेकचे संपादक दिलीप करंबळेकर आणि डॉ. राजेंद्र फडके आदी या वेळी उपस्थित होते.
शहा म्हणाले, 'सरकार बनवणे हे केवळ साधन असून राष्ट्रनिर्माण हे साध्य आहे. अनेक जण वारंवार माझ्याकडे येतात. आमदार, मंत्रिपद, कॅबिनेटची मागणी करतात. महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यास नाराजही देखील होतात. ते ज्यांच्या पुण्याईवर जगत आहेत त्यांचा विचार कधीच करत नाहीत. सध्याचे सरकार देशात सकारात्मरक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असून, पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवता दर्शन हा त्याचा आधार आहे. '
पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रीय चेतना जागृत ठेवण्याचे काम केले. त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे मत गोविंददेवदिरी महाराज यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी प्रभागात; विरोधक विरोधात

$
0
0

राज्य सरकारने आगामी महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग (चार सदस्यांचा एक प्रभाग) पद्धतीने घेण्याची अधिसूचना गेल्या महिन्यात काढली. तेव्हापासून, राजकीय क्षेत्रात उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विविध राजकीय पक्षांची नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने नुकतीच 'राउंड टेबल' घेतली होती. या चर्चेत सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच, आगामी काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला कोर्टात आव्हान दिले जाण्याची चिन्हे आहेत. या प्रभाग पद्धतीवरचा लेखाजोखा...
.................
सरकारचा निर्णय सामाजिकदृष्ट्या चुकीचा
अॅड. वंदना चव्हाण, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुका बहुसदस्यी प्रभाग पद्धतीने घेण्याबाबत राज्य सरकारने काढलेले आदेश राजकीय पक्ष म्हणून आमच्यावर बंधनकारक आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच त्याची कल्पना दिली होती आणि कोणत्याही स्वरूपाची रचना झाली, तरी त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. एक-दोन-चार अगदी सहा सदस्यांचा प्रभाग केला, तरीही आम्ही घाबरत नाही. कारण, गेल्या दहा वर्षांमध्ये पुणे आणि पुणेकरांसाठी राष्ट्रवादीने नेहमीच चांगले काम करायचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये, काही त्रुटी राहिल्या असतील. त्या दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या १० वर्षांत केलेल्या विविध विकासकामांमुळे देशभरातील मोजक्या स्मार्ट सिटीमध्ये दुसऱ्या क्रमांकाने पुण्याचा समावेश झाला. प्रभाग कितीचाही असो, नागरिकांपर्यंत काम पोहोचवण्याला सर्वाधिक महत्त्व आहे.
राजकीयदृष्ट्या सरकारने घेतलेला निर्णय बंधनकारक असला, तरी सामाजिकदृष्ट्या तो अत्यंत चुकीचा आहे. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करणारा हा निर्णय आहे. विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून नागरी सहभागाला प्राधान्य देण्यात आले होते. परंतु, सरकारच्या निर्णयामुळे, प्रशासनाचे, नागरी सहभागाचे आणि उत्तरदायित्त्वाचे प्रमाण कमी होणार आहे. एका प्रभागातून चार-चार जण निवडून येणार असले, तर आपल्या भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी नक्की जायचे कोणाकडे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीत गुंडगिरी, धाकदपटशा आणि बळाच्या जोरावर निवडून येण्याचे प्रमाण वाढल्याने दोनसदस्यीय पद्धती स्वीकारण्यात आली. यामध्ये, सध्या काही त्रुटी आहेत. तरीही, दोनवरून चार सदस्यीय प्रभाग पद्धती करण्याची खरेच गरज नव्हती. यामुळे, सामान्य नागरिकांनाच अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तसेच, एका प्रभागातील चार-चार नगरसेवकांमध्ये विकासकामांवरून स्पर्धा लागण्याची शक्यता असून, त्यात सामान्य करदात्यांचा पैसा अकारण वाया जाण्याची मोठी भीती आहे.
नगरसेवक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या प्रभागात घरोघरी पोहोचणे अत्यंत जरूरीचे आहे. प्रभागातील-वॉर्डातील घराघरांत त्याचा संपर्क असला, तर अनेक समस्या संबंधित नगरसेवकाला थेट समजू शकतात. प्रभाग-वॉर्डातील नागरिकही केव्हाही हक्काने नगरसेवकासमोर अडचणी सांगू शकतात. चारच्या प्रभाग रचनेमध्ये हे शक्य होणार नाही. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल, असे दिसते.
पुणेच नाही, तर देशातील अनेक मोठ्या शहरांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. नागरीकरणाच्या या प्रचंड रेट्याचे आव्हान स्वीकारून त्यानुसार विकास कामांची पूर्तता करण्यासाठी शहरातील प्रशासन सक्षम पाहिजे. दुर्दैवाने, सध्या ती स्थिती नाही. किंबहुना, प्रशासनाची तेवढी क्षमताच नाही. त्यामुळे, प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक असायलाच हवा; अन्यथा शहर उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे, शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारचा मी निषेध करते.
..
कार्यक्षम यंत्रणेसाठी प्रभाग पद्धती
योगेश गोगावले, अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांच्या प्रभागांकडे मी एक विद्यार्थी अभ्यासक म्हणून पाहतो. महापालिकेचा कायदा पाहिला तर सर्वसाधारण सभा ही धोरण ठरविणारी असते. त्यामुळे प्रभाग किती सदस्यांचा याची चर्चा प्रत्येकाने करावी. मी १९७९ पासून महापालिका पाहतो आहे. पूर्वी महापालिकेला एक विशिष्ट दर्जा होता. एम. एम. जोशी, भाई वैद्य, जनसंघाचे... हे एक वॉर्ड पद्धतीतून निवडून आले होते. त्यावेळी महापालिकेचे काम धोरण ठरविण्याच्या दृष्टीने होत होते. पण आता व्यक्तीभोवती केंद्रित होणारे राजकारण केले जात आहे. आपण २५ वर्षे पुण्यात कारभारी आहात. पुण्याची पंचवीस वर्षांत मोठी वाढ झाली. मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले. पण, विकास मात्र झाला नाही. हा विकास न झाल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
चार सदस्यांचा प्रभाग हा व्यक्ती केंद्रित नाही. पूर्वी नगरसेवक हा पॉलिसी मेकर असतो. तो सॅनिटरी इन्स्पेक्टर नाही. नगरसेवक हा शहराचा असतो. त्याला वॉर्डापुरता मर्यादित करणार का हा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रयोगशाळा आहे. शहराच्या नियोजनाचे कामकाज करण्याचे निर्देश तेथून दिले जातात. त्यामुळे दूरगामी विचार करूनच चार सदस्यांच्या प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. चार सदस्यांच्या प्रभागामुळे राजकीय पक्ष नाहीसे होतील हे म्हणणे चुकीचे आहे. ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती करण्यामागे कोणतेही षडयंत्र नाही. पॉलिसी मेकिंग आणि कार्यक्षम यंत्रणा यासाठी प्रभाग पद्धती गरजेची आहे.
शहराची अवस्था पाहिली तर मुठा नदीचे ड्रेनेज झाले आहे. गेल्या वीस वर्षांत हे कोणाला दिसले नाही. शहराचा विकास आराखडा करायला सात वर्षे लागतात. 'जायका'चे काय केले आणि पीएमपीएमएलची अवस्था काय झाली आहे. पुण्याची मेट्रो नागपूरला पळविली असा आरोप केला जातो. पण, मेट्रो पळविलेली नाही. नागपूरसुद्धा देशातीलच एक शहर आहे. शहराचा विकास आणि नियोजनपूर्वक अंमलबजावणी करणारी खिलाडू वृत्ती ही यासाठी आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा धोरणात्मक निर्णय विचार करूनच झाला आहे. शहराच्या सर्वंकष विकासासाठी अंदाजपत्रकीय विचार करणे ही भविष्याची गरज आहे. खिलाडूवृत्ती ही पुण्याचा स्थायीभाव आहे आणि सध्या भांडण, द्वेष हा टोकाचा झाला आहे.
(शब्दांकन : धनंजय जाधव, सुनीत भावे आणि चिंतामणी पत्की)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ही तर घटनेची पायमल्ली

$
0
0

महेंद्र कांबळे, शहराध्यक्ष- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
चार सदस्यांच्या प्रभागामुळे नक्की कोणत्या नगरसेवकाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण होणार आहे. लोकशाहीसाठी ही पद्धत अतिशय मारक आहे. या पद्धतीमुळे स्थानिक स्तरावर वाद, संघर्ष निर्माण होण्याची भीती असून, नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतील. चारच्या प्रभागांमुळे केवळ धनदांडगेच निवडणुकीला उभे राहू शकणार असल्याने श्रीमंत-गरीब असा भेद निर्माण होणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे.
केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असलो तरी वरील कारणांमुळे रिपब्लिकन पार्टीचा चारच्या प्रभाग पद्धतीला तीव्र विरोध आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी यापूर्वीच या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करून आवाज उठवला आहे. हा निर्णय हाणून पाडण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पुण्यातील ४२ टक्के लोकसंख्या आज झोपडपट्टीमध्ये राहते. हा निर्णय म्हणजे त्यांचा बळी घेण्याचे काम आहे. २००३मध्ये तीनचा प्रभाग, तर २०१२ला दोनच्या प्रभागामुळे गोंधळ झाला होता. त्यात आता चार सदस्यीय प्रभागामुळे गोंधळ आणखी वाढणार आहे. या पद्धतीमुळे क्रॉस व्होटिंग वाढणार आहे. नागरिकांच्या समस्यांवरून नगरसेवकांमध्ये हेवेदावे वाढतील. हा निर्णय मुळातच घटना विरोधी आहे. या निर्णयामुळे फक्त धनदांडग्यांना निवडणूक लढवता येईल. या निर्णयामुळे छोट्या पक्षांचे भवितव्य संपुष्टात येण्याचा धोका असून, अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही. प्रचार यंत्रणेसाठी आज लाखो करोडो रुपयांचा चुराडा होत असून, त्यात वाढ होणार आहे. गरीब उमेदवार यामुळे निवडणूक लढवूच शकणार नाही. या निर्णयाने निवडणूक लढवण्याचा हक्क हिरावला जाणार असल्याने ही घटनेची पायमल्ली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनाचे चार झाल्यास वाद वाढतील

$
0
0

अजय शिंदे, शहराध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेना
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रशासकीय काम आणखी अवघड होणार आहे. या पद्धतीमुळे महापालिकेच्या कारभारात अनागोंदी माजण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या पद्धतीला विरोध आहे. या पद्धतीमुळे लोकशाहीचा खून वगैरे होईल, असे वाटत नाही. त्याचवेळी या पद्धतीमुळे प्रशासकीय काम किती अवघड होईल, याचा विचार करण्याची गरज आहे. नागरिकांचा दैनंदिन संपर्क नगरसेवकांशी असतो. तसा तो आमदार अथवा खासदारांशी नसतो. चार सदस्यीय प्रभागामुळे नागरिकांचा नगरसेवकांशी संपर्क कमी होईल. नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कोणाकडे जायचे, कोणत्या नगरसेवकाकडे दाद मागायची, असे प्रश्न निर्माण होतील.
चारच्या पद्धतीमुळे सुमारे ८० हजार लोकसंख्येचे प्रभाग होतील. ही संख्या खूप मोठी आहे. धनशक्तीच्या जोरावर सत्ता आणता येईल, असा विचार ही पद्धत लागू करण्यामागे आहे. पुणे महापालिकेच्या कारभारात अनागोंदी माजलेली आहे. नव्या पद्धतीमुळे त्यात भरच पडणार असून, पक्ष म्हणून आम्ही या प्रकारास ताकदीने विरोध करणार आहोत. हा नियम कायम राहिल्यास व चार सदस्यीय प्रभाग या पद्धतीने निवडणूक झाल्यास त्यासही मनसे ताकदीने सामोरे जाईल, पण या निर्णयास आमचा शेवटपर्यंत विरोध असेल.
सध्या दोन सदस्यीय प्रभाग अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन नगरसेवक आहेत. या दोन नगरसेवकांचे आपसात पटत नसल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक प्रभागात असेल, तर श्रेय कोणी घ्यायचे यावरून वाद सुरू आहेत. पुण्यात असा एकही पक्ष नाही; ज्या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वाद नाहीत. दोनाच्या ऐवजी चार नगरसेवक झाले, तर त्यांच्यातील वाद विकोपाला जातील. प्रभागात काम करताना योजना आणणे, उद्घाटन- अंमलबजावणी यामधून कुरघोडी करण्याचे प्रकार घडतील. यामुळे प्रशासकीय व विकासाचे काम ठप्प होईल. प्रभागाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या वाढणार असल्याने स्थानिक नगरसेवक त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकतील का, हा मोठा प्रश्नच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉर्ड पद्धतीवर शिवसेनेचा भर

$
0
0

विनायक निम्हण (शहराध्यक्ष, शिवसेना)
केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे 'अच्छे दिन' येतील आणि पुण्याची प्रगती होईल अशी अपेक्षा होती. पण, शहराचे कोणतेही मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेवर होती. त्यांनी विकासाच्या प्रश्नांसाठी प्रयत्न केले. पण, भाजप सत्तेवर आल्यावर हे प्रयत्न होताना दिसत नाहीत. पुण्याला या सरकारकडून एक नया रुपयाही अद्याप मिळाला नाही.
यापूर्वीच्या आघाडी सरकारने 'जेएनएनयूआरएम'च्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपये पुण्याला दिले. त्या पैशांतून पुण्याचा विकास झालेला दिसतो. नवे सरकार आल्यानंतर महापालिकेचे साधे उत्पन्नही ते वाढवू शकले नाहीत. केंद्र व राज्य सरकारने निधी दिला तर योजना मार्गी लागू शकतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत या पैशांतून योजना झाल्या आहेत. 'जायका' प्रकल्प आता मंजूर झालेला आहे. परंतु, त्यासाठी यापूर्वी नगरसेवकांसह सर्वांनी प्रयत्न केले होते हे लक्षात घ्यायला हवे.
महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्यात येणार आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांचा या चार सदस्यांच्या प्रभागाला विरोध आहे. या चारच्या बहुसदस्यीय प्रभागांमुळे मोठी प्रशासकीय अडचण तर उभी राहणार आहेच, पण त्याबरोबरच नागरिकांनाही अडचणी येणार आहेत. सध्याच्या द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणी नागरिकांनी पाहिल्या आहेत. एकाच प्रभागात निवडून आलेले एकाच पक्षाचे दोन नगरसेवक एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये कामाच्या श्रेयावरून स्पर्धा लागलेली दिसते. त्यांच्या स्पर्धेत कामासाठी कोणाकडे जायचे हा प्रश्न नागरिकांना पडतो.
नागरिक व प्रशासकीय सोयीसाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विकेंद्रीकरणाचे धोरण आणले. केंद्रापासून ग्रामपंचायतींपर्यंत अधिकारांचे विकेंद्रीकरण झाले. महापालिकेतही कामाचे विकेंद्रीकरण करताना क्षेत्रीय कार्यालये निर्माण करण्यात आली. या विकेंद्रीकरणाच्या विरोधात भाजपने भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेत चार सदस्यांचा प्रभाग करण्याऐवजी वॉर्ड पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. सत्ताधारी भाजपने त्यांच्या सोयीसाठी बहुसदस्यीय प्रभागनिर्मितीचा अध्यादेश काढला आहे. त्यावर महापालिकेत मत आजमावले जाणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असेल तर, शिवसेना एक वॉर्ड पद्धतीसाठी दोन्ही काँग्रेससोबत जायला तयार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्षउद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून वॉर्ड पद्धतीसाठी मदत करता येईल का यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू.
महापालिकेत निवडून येणारा नगरसेवक हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आहे, हा भाजपच्या शहराध्यक्षांनी लावलेला तर्क चुकीचा आहे. नगरसेवकाला हे निर्णय घेण्याबरोबरच त्याच्या भागातील सर्व कामे करावी लागतात. प्रत्येक कामासाठी नागरिक त्याच्याकडे येतात आणि त्याला ती कामे करून प्रश्न सोडवावे लागतात. निवडणुकीसाठी चार प्रभागांची निर्मिती झाली तरी लढण्यास शिवसेना तयार आहे. शिवसेनेकडे सर्व प्रभागांसाठी उमेदवार आहेत. पण चार सदस्यीय प्रभागाची निवडणूक भाजपलाही सोपी नाही. तसेच धनाढ्य लोकच ही निवडणूक लढू शकतात. सामान्य कार्यकर्ता व नागरिक चार सदस्यीय निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यांनी चार सदस्यांच्या प्रभागात निवडणूक लढण्याचे स्वप्नही पाहू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्ष, लहान पक्षांच्या आकांक्षांना सुरुंग

$
0
0

रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची मोडतोड करून लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा डाव केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या दोन वर्षांपासून सुरू केला आहे. राज्यातील सरकारची पावलेही त्याच दिशेने पडत असल्याचे बहुसदस्यीय प्रभागाच्या निर्णयावरून स्पष्ट होते. स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सर्वांना लोकप्रतिनिधी होण्याची समान संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, अगदी छोट्या-मोठ्या पक्षांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कोणीही, या निवडणुकांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा प्रतिनिधी होण्याची आकांक्षा बाळगू शकतो. दुर्दैवाने, सरकारने घेतलेल्या चार सदस्यीय प्रभागाच्या निर्णयामुळे नागरिकांची सेवा करण्याची संधी अपक्ष, लहान पक्ष यांच्यापासून हिरावून घेतली जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशात पसरलेल्या मोदी लाटेचा परिणाम अजून कायम असल्याचा भ्रम भाजपच्या नेतृत्वाला आहे. त्यामुळेच, केंद्र आणि राज्यानंतर आता महापालिकांमधील सत्ता प्राप्त करण्यासाठी चार सदस्यांचा प्रभाग केला आहे. परंतु, या दोन वर्षांमध्ये केंद्र-राज्यातील सत्ता मिळाल्यानंतरही नागरिकांना अच्छे दिनची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे, नवी प्रभाग रचना सोयीची असल्याचा भाजपचा भ्रमाचा भोपळा येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये निश्चित फुटेल.
चार सदस्यीय प्रभाग होण्यापूर्वी आत्ता दोनसदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे. काही वर्षांपूर्वी तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. परंतु, एका प्रभागातील ३-४ नगरसेवकांमुळे विकासाला गती मिळणार नाही. एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून आले, तरी त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली, तर विकास कामांच्या श्रेयवादावरून नगरसेवकांमध्ये आणखी भांडणे होण्याची भीती आहे. एका नगरसेवकाने रस्ता केला, तर दुसरा तोच रस्ता केबलसाठी खोदण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या नगरसेवकाला त्या भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकायची असेल, तर चौथ्या नगरसेवकाला अजून काहीतरी वेगळेच करायचे असेल. त्यामुळे, विकासाऐवजी संघर्षाला तोंड फुटण्याची अधिक चिन्हे आहेत. परिणामी, नागरिकांकडून कररुपात मिळणाऱ्या पैशांचा अपव्यय होण्याचा धोका अधिक आहे. चार नगरसेवकांच्या वेगवेगळ्या तऱ्हांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल, अशी शक्यता आहे. त्याशिवाय, एकेका कामासाठी नागरिकांनी अनेकदा हेलपाटे मारावे लागतील. कधी एका नगरसेवकाचे उंबरठे झिजवावे लागतील, तर कधी दुसऱ्या नगरसेवकांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतील. त्यामुळे, सरकारने घेतलेला हा निर्णय सकस लोकशाहीसाठी घातकच आहे.
दोन, तीन किंवा चार, सरकारने निवडणुकीसाठी कितीही सदस्यांचा प्रभाग केला, तरी काँग्रेसला त्याचा काही फरक पडणार नाही. काँग्रेस हा या देशातील सर्वांत जुना आणि तळा-गाळातील नागरिकांपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. काँग्रेस वगळता इतर पक्षांची सत्ता देशात किंवा राज्यात असली, की महागाईपासून ते असहिष्णूतेपर्यंत अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आगामी पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने आजवर शहरात केलेली विकासाची कामे आम्ही नागरिकांपर्यंत घेऊन जाऊ. तसेच, इतर सर्व पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचे पुरोगामित्त्व सिद्ध करून दाखवू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलच्या तुलनेत सुविधांचा अभाव

$
0
0

टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यात रस्त्यांची बांधणी आणि त्यांची किंमत, रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याचे, टोलवसुली करणे आदी सर्व महत्वाची कामे कंत्राटदार करीत आहेत. मात्र, त्याप्रमाणात वाहनचालकांना सुविधा व सुरक्षितता मिळत नाही. त्यामुळेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे कंत्राटदारावर गुन्हे दाखल का करण्यात येऊ नयेत,' असा सवाल टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी रविवारी उपस्थित केला.
सजग नागरिक मंचाच्यावतीने 'टोल : एक झोल' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिरोडकर बोलत होते. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वस्त जुगल राठी उपस्थित होते.
शिरोडकर म्हणाले,'कंत्राटदाराच्या मुंबई एंट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलद्वारे आणि द्रुतगती मार्गावरील दोन टोलद्वारे वाहनचालकांची अक्षरश: लूट सुरू आहे. कंत्राटदार जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखवून राज्य सरकारची लूट करीत आहे. ज्याप्रमाणात टोल वसूल होतो, त्या प्रमाणात वाहचालकांना सुविधा आणि सुरक्षितता मिळत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या अपघातांमध्ये आतापर्यंत सुमारे १५०० नागरिकांचा जीव गेला आहे. द्रुतगती मार्गावर डिव्हायडरच्या जागी बॅरिकेड्स आणि रोप लावण्याची तातडीने आवश्यकता आहे. मात्र, अद्याप कंत्राटदार आणि राज्य सरकारने या बाबत काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत.'
'द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांद्वारे लेन कटिंगचे प्रकार सर्रास घडतात. ज्या वाहनांची महामार्गांवर धावण्याची योग्यता नाही, अशी वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अपघात वाढत आहेत. वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडे कोणत्याच प्रकारची यंत्रणा नाही. योग्यता नसलेल्या आणि क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी कमी पडत आहेत,' असेही शिरोडकर म्हणाले.
सर्वपक्षीयांचा टोलला पाठींबा आहे; त्यामुळे ते बंद करण्याची कोणाचीही इच्छा नाही, असे वेलणकर म्हणाले. राठी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images