Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साहित्य वेळेत मिळेल काय?

$
0
0

मागील इतिहास पाहता शालेय साहित्यवाटपाबाबत साशंकता

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शैक्षणिक वर्ष सुरू होताना महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत शालेय साहित्याच्या वाटपावरून कायमच वादंग होतो. मागील वर्षी एका ठेकेदाराने निविदा प्रक्रियेविरोधात कोर्टात धाव घेतल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला होता. त्यामुळे यंदा तरी विद्यार्थ्यांना वेळेत साहित्यवाटप होईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांची खरेदी केली जाते. त्यासाठी महापालिका स्तरावर शिक्षण मंडळास भरघोस निधी दिला जातो. शालेय साहित्याची खरेदी कधीच वेळेवर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीच मोफत शालेय साहित्य वेळेत मिळत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. परिणामी, मंडळाची खरेदी विलंबामुळे, तसेच निविदा मंजुरीतील राजकीय आणि आर्थिक स्वारस्यामुळे दर वर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडते.

यंदा पंधरा जूनला शाळा सुरू होत आहेत. मागील वर्षी झालेला गोंधळ पाहता यंदा तरी प्रशासन आणि शिक्षण मंडळ याची काळजी घेते का, ते पाहावे लागणार आहे. ठेकेदार कोर्टात गेल्याने विद्यार्थ्यांना वह्या, बूट, मोजे, दप्तर, कंपासपेटी, फूटपट्टी, नकाशा वही, चित्रकला, प्रयोगवही यांसारख्या गरजेच्या शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागले होते. निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु केवळ प्रक्रिया पूर्ण केली म्हणजे साहित्य मिळेलच, असे आता तरी सांगता येत नसल्याचे बोलले जात आहे.

मागील वेळेस कोर्टाने निविदा प्रक्रियेला स्थगिती आदेश दिल्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात शालेय साहित्य देता आले नसल्याचे शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळावर नाराजी व्यक्त केली होती. कोर्टात बाजू मांडण्यासाठी मंडळाने आणि महापालिका प्रशासनाने दोन स्वतंत्र वकील नियुक्त केले होते. जुनी निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर मंडळाने डिसेंबरअखेर अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध केली होती.

'निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, पारदर्शकपणे राबवली जाते. अतिरिक्त आयुक्त, प्रशासन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हे काम होत असते. त्यानंतर कामाचे आदेश निघतात. विद्यार्थ्यांना वेळेत आणि चांगल्या दर्जाचे साहित्य मिळावे, यासाठीच प्रशासनाचा पाठपुरावा असतो. प्रशासकीय प्रक्रियेत आमचा हस्तक्षेप नसतो. आम्ही कोणालाही झुकते माप देत नाही. सर्व अधिकाऱ्यांचा हा एकत्रित निर्णय असतो,' असे स्पष्टीकरण शिक्षण मंडळाकडून दर वेळी दिले जाते. तरीही विलंब आणि वाद कायमच होत असल्याने महापालिका आयुक्त आणि प्रशासनाकडून यंदा तरी हा प्रश्न निकाली काढला जाईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खडसेंच्या समर्थनार्थ पिंपरीत आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात होत असलेल्या विविध आरोपांच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या खानदेश व विदर्भातील नागरिकांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले. 'खडसे यांना बदनाम करण्यासाठी काही असंतुष्ट लोक त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत,' असे या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संस्था व संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

'महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी खरेदी केलेली भोसरी 'एमआयडीसी'तील जमीन १९६२मध्ये 'एमआयडीसी'च्या नियोजन कक्षेत घोषित झाली. या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला १९७१मध्ये सुरुवात झाली. परंतु, जागेचे संपादन आजतागायत झाले नसून, जमीनमालकालाही मोबदला देण्यात आलेला नाही. त्यासाठी जमीनमालकाने 'एमआयडीसी'कडे वारंवार पत्रव्यवहार करून मोबदला मागितला. तरीही हे प्रकरण धूळ खात पडले होते. 'एमआयडीसी'ने १९६२नंतर तब्बल ४८ वर्षांनी २०१०मध्ये या जमिनीच्या सात-बारावर इतर हक्कांत स्वतःची नोंद करून घेतली,' असे निवेदनात म्हटले आहे.

'या जागेचे भू-संपादन केलेले नसताना आणि सात-बारा उताऱ्यावर जमीनमालक म्हणून नोंद नसताना 'एमआयडीसी'ने १९८२ ते १९८५दरम्यान या जमिनीचे तुकडे पाडून भूखंडाचे वाटप केले. अशीच कागदपत्रे सर्वत्र उपलब्ध आहेत. भू-संपादन झालेले नसल्यामुळे तिची कायद्याने खरेदी आणि विक्री करण्याचे अधिकार कोणालाही आहेत. कायद्यानुसार संपादन प्रक्रिया पूर्ण होईल, त्याच दिवशी मालकाला मोबदला मिळतो. 'एमआयडीसी'च नव्हे, तर प्राधिकरण, सिडको, सरकारची विविध मंडळे, धरणाचे संपादन क्षेत्र अशा अनेक ठिकाणी, तसेच प्राधिकरणाचा पेन्सिल शेरा असणाऱ्या जमिनींचे खरेदी व विक्री व्यवहार अशा प्रकारे होतात. त्यात बेकायदेशीर प्रकार नसतो,' असेही निवेदनात म्हटले आहे.

'कायद्यानुसार अशा जमिनींची खरेदी-विक्री करणे गैर नसताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना केवळ बदनाम करण्यासाठी भोसरी 'एमआयडीसी'तील जमीनखरेदीचे प्रकरण बेकायदेशीर झाल्याची ओरड सुरू आहे. त्यांनी जमीनखरेदी करताना नियम व कायद्याचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही. खडसे विरोधी पक्षनेते असताना बिल्डर हेमंत गवंडे यांच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे गवंडे यांनी खडसे यांना बदनाम करण्यासाठी कट रचून भोसरी 'एमआयडीसी'च्या जमीनखरेदीचा मुद्दा उकरून काढला आहे,' असा आरोप संघटनांनी केला आहे.

या आंदोलनात नामदेव ढाके, रवींद्र माळी, नीना खडसे, रवींद्र बऱ्हाटे, पुरुषोत्तम पिंपळे, शंकर पाटील, शशिकांत पाटील, विजय नागुलकर, महेश बोरवेले, अमोल पाटील, मधुकर पाचपांडे, श्रीकृष्ण शिर्के, रेखा मोने, सारिका पवार यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहर समता भ्रातृमंडळ, खानदेश माळी महासंघ, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मित्रमंडळ, सरदार वल्लभभाई पटेल युवा प्रतिष्ठान, खानदेश युवा प्रतिष्ठान, विदर्भ मित्रमंडळ या संस्था व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुसा’च्या निधीवर इस्रोचे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे देशभरातील विद्यापीठांमधून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) मदतीने सुरू असणारा पायाभूत सुविधांचा विकास पडताळून पाहण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेले 'भुवन-रुसा' हे मोबाइल अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालय आणि 'इस्रो'च्या एकत्रित प्रयत्नातून त्यासाठी सुरू झालेल्या उपक्रमाद्वारे 'रुसा'मधून विद्यापीठांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या वापरावरही मंत्रालय नजर ठेवणार आहे. 'रुसा'मधून उपलब्ध निधीच्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकोणतीस डिजिटल क्लासरूम उभारण्यात आल्या आहेत. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे औपचारिक उद् घाटन होईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी विद्यापीठात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्याच्या रुसा प्रकल्प संचालिका डॉ. मनीषा वर्मा यांनी 'रुसा'मधील विविध उपक्रम आणि त्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड या वेळी उपस्थित होते. डॉ. वर्मा म्हणाल्या, 'रुसामधून विद्यापीठांना उपलब्ध होणाऱ्या भरीव निधीच्या प्रभावी वापराविषयी केंद्र सरकार आग्रही आहे. त्यासाठी या निधीच्या वापरावर वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. 'भुवन-रुसा' हे त्यासाठीचे एक उपयुक्त मोबाइल अॅप्लिकेशन ठरणार आहे. या अॅप्लिकेशनच्या वापरासोबत विद्यापीठांच्या खर्चाचा ऑनलाइन आढावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.' गरज पडल्यास त्रयस्थ यंत्रणांच्या आधारे 'रुसा'मधील कामांचे परीक्षण करून घेण्याची तरतूदही मंत्रालयाने केल्याचे डॉ. वर्मा यांनी या निमित्ताने सांगितले. विद्यापीठाची प्रगती उल्लेखनीय यंदा 'रुसा'च्या आधारे राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमांमध्ये चमकणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील एकमेव ठरल्याचेही डॉ. वर्मा यांनी या निमित्ताने सांगितले. 'रुसा'मधील आर्थिक तरतुदींच्या आधारे विद्यापीठांच्या पातळीवर नेमके कोणते उपक्रम राबविणे शक्य आहे, या विषयी मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. या प्रस्तावांमधून मंत्रालयाने गुणवत्तेच्या आधारे दहा राज्यांची निवड केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाच्या डिजिटल क्लासरूम आणि ई-कंटेंट स्टुडिओचा समावेश आहे. या बाबतीत विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवरही उल्लेखनीय ठरले आहे; तसेच संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबतही विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. डिजिटल क्लासरूम्स आणि ई-कंटेन्ट स्टुडिओचे इराणी यांच्या हस्ते होणारे उद् घाटन ही विद्यापीठाच्या कामगिरीची केंद्राने घेतलेली महत्त्वाची दखल असल्याचे डॉ. वर्मा यांनी सांगितले. अशा आहेत डिजिटल क्लासरूम्स... 'रुसा'च्या माध्यमातून विद्यापीठाला डिजिटल क्लासरूम निर्मितीसाठी जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपयांची आणि ई-कंटेट स्टुडिओ निर्मितीसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध झाली होती. या मदतीच्या आधारे सुरुवातीच्या टप्प्यात विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी विभागासह सामाजिक शास्त्र विभागांमधील एकूण २९ वर्गखोल्यांचे स्मार्ट क्लासरूम्समध्ये रूपांतर करण्यात आले आहे. इंटरॅक्टिव्ह वॉल, स्मार्ट प्रोजेक्टर, वाय-फायची सुविधा असणारे पोडिअम्स, इंटरॅक्टिव्ह टीव्ही अशा अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेल्या या क्लासरूम्समध्ये ई-कंटेटची निर्मितीही शक्य असल्याचे डॉ. गाडे यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबाबदारी निश्चित करण्याचेहायकोर्टाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे हायकोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात नसल्याने अखेर राज्य सरकारने अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश महापालिकांना दिले आहेत. धार्मिक स्थळांवरील कार्यवाहीबात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्याच्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये रस्ते-फूटपाथ आणि इतर सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देतानाच हायकोर्टाने रस्त्यांवर अडथळा ठरणारी सर्व धार्मिक स्थळे काढून टाकण्याचे, ती स्थलांतरित करण्याचे किंवा नियमित करण्याची मोहीम घेण्याचे आदेश दिले होते. त्यासंबंधी ठरावीक कालावधीही निश्चित करून देण्यात आला होता. तरीही महापालिकांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यावर कोर्टाने तीव्र नापसंती व्यक्त करून विहित मुदतीमध्ये कार्यवाही करण्याची सक्त ताकीद दिली होती. कोर्टाप्रमाणेच आता राज्य सरकारनेही याबाबत कठोर भूमिका घेतली असून, अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कार्यवाही निश्चित मुदतीमध्ये व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत. अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत पालिकेने अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्याकडून कारवाईत दिरंगाई होत असल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जावी, असे सुचविण्यात आले आहे. वर्गवारीनुसार कार्यवाही सुरू महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या माहितीचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच नोटीस देऊन धार्मिक स्थळांची सुनावणी घेण्यात आली. त्यासंबंधीची पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल, अशी माहिती अतिक्रमण विभागप्रमुख विलास कानडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बैठकीला नगरसेवकांचीच पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शहराच्या विविध भागांत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. अवघ्या महिन्याभरात शहराध्यक्षांनी बोलाविलेल्या सलग दुसऱ्या बैठकीला अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने पक्षातील नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा आहे. पुढील आठवड्यात १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रम घेण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्याचे सविस्तर नियोजन करण्यासाठी बुधवारी रात्री एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा निरोप नगरसेवकांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी या बैठकीला काही मोजक्या नगरसेवकांशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. महापालिकेतील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीला दांडी मारल्याचे समोर आले आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या नेतृत्वात बदल होईल, अशी अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी काहींनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती; परंतु पालिका निवडणुकीपर्यंत शहराध्यक्षपद चव्हाण यांच्याकडेच कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये नाराजी असून, चव्हाण यांच्या पक्ष कार्यालयात नुकत्यात झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमाकडेही अनेकांनी पाठ फिरवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लोकशाहीसाठी मारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे लहान-लहान प्रश्नांसाठी नागरिकांसमोर उद्भवणाऱ्या अडचणींपासून ते प्रशासकीयदृष्ट्या योजनांची अंमलबजावणी करताना उभ्या राहणाऱ्या समस्यांपर्यंत... बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लोकशाहीसाठी मारक असल्याचा सूर विविध राजकीय पक्षांनी गुरुवारी व्यक्त केला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मात्र, ठरावीक प्रभागाच्या पलीकडे जाऊन शहरासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याकरिता ही पद्धती योग्यच असल्याचा दावा केला. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा (चार सदस्यांचा एक प्रभाग) अवलंब करण्याची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्याला विविध राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत असल्याने नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने बुधवारी या विषयावर 'राउंड टेबल' आयोजित केली होती. यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षांनी प्रभाग पद्धतीविषयीची भूमिका सविस्तर मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे उपस्थित होते. 'चारच्या प्रभागामुळे नक्की कोणत्या नगरसेवकाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. सक्षम लोकशाहीसाठी ही पद्धत अतिशय चुकीची आहे,' अशी टीका चव्हाण यांनी केली. या पद्धतीमुळे स्थानिक स्तरावर वाद, संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त करून नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतील, अशी शक्यता बागवे यांनी वर्तवली. 'प्रभागाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या वाढणार असल्याने स्थानिक नगरसेवक त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार आहे का,' अशी विचारणा शिंदे यांनी केली. चारच्या प्रभागांमुळे केवळ धनदांडगेच निवडणुकीला उभे राहू शकणार असल्याने श्रीमंत-गरीब असा भेद निर्माण होणार असल्याचा धोका कांबळे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या निम्हण यांनीही चारच्या प्रभागामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होणार असल्याकडे लक्ष वेधले. सर्व राजकीय पक्षांचा विरोध असतानाही, भाजपचे शहराध्यक्ष गोगावले यांनी व्यक्तीकेंद्रित व्यवस्थेच्या पलीकडे संपूर्ण शहराचा विचार करण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे असल्याचा दावा केला. ... तर शिवसेना आघाडीसोबत? राज्यातील सत्तेमध्ये भाजपसोबत असूनही नेहमीच त्यांच्याविरोधात उघड विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने प्रभागाच्या विषयातही मित्रपक्षाला साथ देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजप वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका घेतल्या जाव्यात, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे विधिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सरकारच्या विरोधात मतदान करायचे ठरवले, तर सेनाही सोबत असेल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना राजी करण्याचे काम आपण करू, असा पवित्रा विनायक निम्हण यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ स्वप्नरंजन वास्तवात येणार ?

$
0
0

औंधमधील रस्त्यांच्या कायापालटाचा पथदर्शी प्रकल्प
म. टा. प्रतिनिधी, पुणे
रस्ता पुरेसा रुंद, त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी आवश्यक रुंदीचा फुटपाथ, फुटपाथवर सर्व सेवा-सुविधा, सायकल ट्रॅक, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, रस्त्याची खोदाई बंद... पुण्यातील रस्ते असे होतील, हे 'स्वप्नरंजन' आता वास्तवात येण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पथदर्शी योजनेत औंधमधील ब्रेमेन चौक ते परिहार चौक आणि परिसराचा संपूर्ण कायापालट करण्याची योजना लवकरच राबवण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत क्षेत्रनिहाय विकास योजनेमध्ये औंध-बाणेर-बालेवाडीची निवड केली गेली आहे. या परिसरात विविध सुधारणा घडविण्यासाठी 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'ने (पीएससीडीसी) पावले उचलली असून, सुरुवातीच्या टप्प्यात रस्ते-फुटपाथ यांची पुनर्रचना करून नागरिकांना अद्ययावत सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी, तब्बल २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 'ब्रेमेन चौक ते परिहार चौक' दरम्यान पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, परिहार चौक ते आंबेडकर चौक आणि परिहार चौक ते विद्यापीठ रस्ता (पोलिस लाइन्समार्गे) या रस्त्यांवरही त्याचा विस्तार केला जाणार आहे. याशिवाय, पुढच्या टप्प्यात औंध-बाणेर, बालेवाडीतील इतर रस्त्यांवर हा प्रकल्प राबवविला जाणार आहे.
केंद्र-राज्य सरकारच्या विविध कायद्यांनुसार या परिसरातील रस्ते 'मॉडेल रस्ते' म्हणून विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे, अपंग व्यक्तींनाही रस्ता-फुटपाथ याचा वापर सहज करता येईल आणि ते ओलांडता येईल, अशा दृष्टीने त्याची रचना केली जाणार आहे. त्याशिवाय, राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार या ठिकाणी फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांसाठीही ठरावीक जागा निश्चित केली जाणार आहे.
रस्ता-फुटपाथ यांची पुनर्रचना करताना, बसण्यासाठी जागा, कचरापेट्या, स्वच्छतागृह, वाय-फाय सुविधा, माहिती फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था, नागरिकांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी जागा, अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 'पीएससीडीसी'ने टेंडरमध्येच या सर्व अटी-शर्ती घालून दिल्या असून, त्यानुसारच सर्व कामांची पूर्तता करावी लागेल, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
..................
खोदाई बंद, फक्त 'डक्ट'
महापालिकेसह खासगी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांसाठी रस्ते-फुटपाथची खोदाई केली जाते. या रस्त्यांवर मात्र सेवा वाहिन्यांच्या खोदाईसाठी पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या परिसरातील रस्ते-फुटपाथची पुनर्रचना करतानाच, सेवा वाहिन्यांसाठी 'डक्ट' देण्यात येणार असून, रस्ते खोदाई न करता त्याचाच वापर करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे.
.....................
फुटपाथाच्या प्रकल्पाला गती मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यामुळे, येत्या २५ जूनपर्यंत स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेल्या शहरांनी महत्त्वाच्या प्रकल्पांना गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने दिल्या होत्या. 'पीएससीडीसी'च्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही शहरातील अशा १५ प्रकल्पांना गती देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. यातील बहुतेक प्रकल्प अजून नियोजनाच्या स्थितीत असल्यानेच रस्ते-फुटपाथ पुनर्रचनेच्या या प्रकल्पालाच अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी’ सुधारणांसाठी विशेष समिती नियुक्त

$
0
0

स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर रोडवरील जलद बस वाहतुकीत (बीआरटी) सुधारणा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी), महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. नगर रोड बीआरटी मार्गावरील त्रुटी दूर करणे आणि त्याचा कालबद्ध आढावा घेण्याचे काम या समितीकडे असेल.
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्याकडेच या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर, पीएमपीच्या सीईओ मयुरा शिंदेकर यांच्यासह महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत आणि पीएमपी प्रवासी मंच, पादचारी प्रथम या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महापालिका-पीएमपीचे काही वरिष्ठ अधिकारी या समितीमध्ये असतील.
गेल्या महिन्यात बीआरटी मार्गवार सातत्याने होत असणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वतंत्र समिती नियुक्त करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, नुकतीच ही समिती नियुक्त करण्यात आली असून, पहिली बैठक येत्या सोमवारी (६ जून) होणार आहे. नगर रोड बीआरटी मार्गावर पालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांचा नैमित्तिक आढावा घेणे, प्रवाशांना उद्भवणाऱ्या अडचणी दूर करणे आणि बीआरटी मार्गातील सुधारणांसाठी सूचना स्वीकारणे, अशा स्वरूपात ही समिती काम करेल, असे कृष्णा यांनी सांगितले.
बीआरटीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती महापालिकेमार्फत होत असली, तरी प्रत्यक्ष बस संचलनाचे महत्त्वाचे काम पीएमपीतर्फे केले जाते. म्हणूनच, पीएमपीने बीआरटीसाठी स्वतंत्र सीईओ नियुक्त केला आहे. मात्र, महापालिकेकडूनच कामे रेंगाळत असल्याने पीएमपीला अर्धवट स्थितीत नगर रोडची बीआरटी कार्यान्वित करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर ही समिती नियुक्त केल्याचे सांगितले जात आहे.
................
धूळफेक करण्यासाठी समिती
बीआरटीच्या नियोजनापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत सातत्याने उपस्थित केले जाणारे प्रश्न सोडविण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल, असा दावा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला होता. प्रत्यक्षात, आयुक्तांनी नेमलेली ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे पुढे येत आहे. नगररोड बीआरटीतील सुधारणांसाठी तात्पुरत्या स्वरूपात ही समिती नियुक्त करण्यात आली असून, आगामी काळातील बीआरटीचा आराखडा ठरविण्याचे किंवा त्याला मान्यता देण्याचे कोणतेही अधिकार या समितीला नाहीत. वास्तविक, शहरात कोणत्याही एखाद्या रस्त्यावर नव्याने बीआरटी सुरू करायची असेल, तर संबंधित समितीची मान्यता घेण्यात येईल. त्यांनी, बीआरटीची रचना, त्याचा आराखडा याला 'ग्रीन सिग्नल' दिल्यानंतरच बीआरटीचे काम सुरू केले जाईल, असे संकेत आयुक्त कुमार यांनी दिले होते. मात्र, त्यांनीच नियुक्त केलेल्या समितीला केवळ नगररोड बीआरटी मार्गावरील सुधारणांपुरतेच मर्यादित ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफटीआयआय’मध्ये श्रेयांक, सेमिस्टर पद्धत

$
0
0

'आयआयटी'चा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न; विद्यार्थ्यांचा विरोध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) आयआयटी आणि आयआयएम या संस्थांसारखा दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम बदलणार आहे. या शैक्षणिक वर्षात श्रेयांक पद्धत (क्रेडिट सिस्टीम) आणि सेमिस्टर पद्धत लागू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे.
'एफटीआयआय'च्या शैक्षणिक परिषदेची पहिली बैठक बुधवारी संस्थेत पार पडली. या वेळी परिषदेचे अध्यक्ष बी. पी. सिंग, संचालक भूपेंद्र कँथोला आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत ‍आगामी अनेक प्रकल्पांवर चर्चा झाली. सिंग यांनी आगामी पाच वर्षाच्या शैक्षणिक धोरणाबाबत विस्तृत सादरीकरण केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम बदलणार असून, त्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
'संस्थेत चित्रपट व दूरचित्रवाणी मिळून अकरा अभ्यासक्रम असून सर्व विभागप्रमुखांनी सुधारित अभ्यासक्रम तयार केला आहे. नवीन अभ्यासक्रम बैठकीत मांडण्यात आला व त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी नियामक मंडळाची बैठक होणार असून, बैठकीत या अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यानंतर जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होईल,' अशी माहिती कँथोला यांनी 'मटा'ला दिली.
'सर्वत्र शिक्षणपद्धती बदलत आहे. श्रेयांक पद्धत (क्रेडिट सिसीम) आणि सेमिस्टर पद्धत रूढ होत आहे. बदलत्या चित्रपट क्षेत्राशी जुळवून घेण्यासाठी ही पद्धत आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात सहा सेमिस्टर असतील आणि सेमिस्टरच्या शेवटी कार्यानुभव असेल, अशी रचना करण्यात येणार आहे,' असेही कँथोला यांनी स्पष्ट केले.
----------------------------------
निर्णयाचे बैठकीत पडसाद
आयआयटी,आयआयएम या संस्थांमध्ये पन्नास वर्षांपासून श्रेयांक पद्धत असताना तसेच सर्व विद्यापीठांना ही पद्धत लागू झालेली असताना 'एफटीआयआय'ला ही पद्धत का लागू करण्यात आली नाही, याबद्दल बैठकीत सदस्यांनी सखेद आर्श्चय व्यक्त केले. अभ्यासक्रमाचे स्वरूप गेल्या ६० वर्षांत तेच राहिले असल्याने त्याचे पडसाद बैठकीत उमटले. या बैठकीस दोन विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी येऊ घातलेल्या बदलाला तीव्र विरोध दर्शवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी अकोलकर, तावडेंना अटक करा

$
0
0

डॉ. हमीद दाभोलकर यांची आग्रही मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सारंग अकोलकर, वीरेंद्र तावडे या सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या फरारी साधकांना ताबडतोब अटक करून पुढील चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी सीबीआयने सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर आणि हिंदू जनजागृती समितीचे वीरेंद्र तावडे यांच्या घरी छापे टाकले. या वेळी तपास यंत्रणेला दोघांच्या घरातून काही संशयित कागदपत्रे आणि वस्तू मिळाल्या आहेत, त्या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी दाभोलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंनिसचे मिलिंद देशमुख, दीपक गिरमे, ठकसेन गोरणे, नंदिनी जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, 'दाभोलकर यांची हत्या होऊन पावणे तीन वर्षे उलटून गेली तरीही तपास यंत्रणांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. २००८पासून फरार असलेल्या तसेच मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेल्या अकोलकर, रूद्र पाटील, प्रवीण लिंबकर, जयप्रकाश हेगडे या सनातनच्या साधकांची नावे समोर येत होती. तरीही कारवाई करण्यात आली नाही. मंगळवारी तावडे आणि अकोलकर यांच्या घरी छापा टाकून सीबाआयच्या हातात काही संशयास्पद गोष्टी लागल्या आहेत, त्यामुळे तपासाला वेग आल्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिघांच्या हत्येमध्ये साम्य आहे. अकोलकर आणि तावडे यांच्या अटकेमुळे तीनही प्रकरणांच्या तपासाला वेग येईल'
राज्यामध्ये धर्मांध संघटनांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे नेमकी कोणती संस्था आहे हे शोधून काढून मुख्यमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्नही हमीद यांनी उपस्थित केला.
..
'अकोलकरचा चेहरा मिळताजुळता'
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्याचे छायाचित्र आणि सारंग अकोलकरच्या संग्रहित छायाचित्रात मोठे साम्य आहे. दाभोलकरांना ज्या ठिकाणी मारण्यात आले त्या ठिकाणापासून ५ मिनिटांच्या अंतरावर अकोलकरचे घर आहे. त्यामुळे संशय अधिक बळावतो. तपास यंत्रणांनी त्वरीत अकोलकरला पकडणे गरजेचे असल्याचेही हमीद दाभोलकर म्हणाले.
..
'पुनाळेकरांचीही चौकशी करा'
दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर माझ्या संपर्कात आहे, असे सनातन संस्थेचे वकील संजय पुनाळेकर जाहीरपणे सांगत आहेत. त्यांनी त्वरित अकोलकरची माहिती तपास यंत्रणांना द्यावी अन्यथा पुनाळेकर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्य़ात यावी अशी मागणीही दाभोलकर यांनी या वेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेबाजांना चाप लावणार

$
0
0

मर्यादेपेक्षा अधिक डाळसाठवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, पुणे
डाळींची साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास पुरवठा खात्याने सुरुवात केली आहे. मर्यादेपेक्षा अधिक डाळीची साठवणूक केल्यास संबंधित घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
डाळींची साठेबाजी करून कृत्रिम भाववाढ करण्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होता. साठेबाजीमुळे मागील काही महिन्यांपूर्वी डाळीचे भाव किलोमागे दोनशे रुपयांवर गेले होते. सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर दर गेल्याने संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर राज्य सरकारने डाळीची बेकायदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे मारले. तसेच, भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने स्वस्त दरात डाळ उपलब्धही करून दिली.
डाळी, खाद्यतेले आणि खाद्य तेलबियांची साठेबाजी करणारे मोठे रॅकेट आहे. या रॅकेटमार्फत जीवनावश्यक जिन्नसांची साठेबाजी करून कृत्रिम दरवाढ केली जाते. त्यात व्यापारी गल्ले भरतात. हा प्रकार लक्षात आल्यानंतर केंद्र, राज्य सरकारने डाळी तसेच खाद्यतेलांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारने घाऊक विक्रेत्यांना महापालिका क्षेत्रासाठी डाळ, खाद्यतेलाची साठामर्यादा २० हजार क्विंटल केली आहे. महापालिका क्षेत्रातील किरकोळ विक्रेत्यांसाठी ही मर्यादा २ हजार क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.

शहराबाहेर ग्रामीण भागामध्ये घाऊक विक्रेत्यांसाठी साठामर्यादा आठशे क्विंटलहून ८ हजार क्विंटल करण्यात आली आहे. तसेच, किरकोळ विक्रेत्यांना शंभर क्विंटलऐवजी दोन हजार क्विंटलपर्यंत साठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही साठा मर्यादा ओलांडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर, ग्रामीणसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमधील घाऊक व्यापाऱ्यांची बैठक पुरवठा विभागाकडून घेण्यात येत आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या साठामर्यादेचे उल्लंघन व्यापाऱ्यांनी करू नये. तसेच साठ्यासाठी आवश्यक असलेले परवाने त्वरित काढून घेण्यात यावेत, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत असल्याचे उपायुक्त प्रकाश कदम यांनी सांगितले. डाळी व खाद्यतेलांची साठामर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक साठा केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
..
'वायदे बाजारामुळे भाववाढ'
डाळी व खाद्यतेलांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी पुरवठा विभागाकडून व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. या संवादामध्ये व्यापाऱ्यांनी डाळी व खाद्यतेलांची दरवाढ ही वायदे बाजारामुळे होत आहे. त्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी सूचना केली. तसेच डाळींची आयात-निर्यात करणारे व्यापारीही दरवाढीला कारणीभूत असल्याचे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आहारा’साठी स्वतंत्र कक्ष ?

$
0
0

गैरप्रकार समोर येण्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू; पुण्याचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात लवकरच स्वतंत्र यंत्रणा अस्तित्त्वात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यासाठी पावले उचलली असून, राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्मितीचे प्रयत्नही सुरू झाले आहेत.

शालेय पोषण आहार योजनेच्या राज्य पातळीवरील अंमलबजावणीविषयी आक्षेप घेण्यात आले होते. महालेखापाल कार्यालयाने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आणि पोषण आहार योजनेच्या आर्थिक व्यवहारांच्या केलेल्या लेखापरीक्षणामधूनही काही व्यवहारांवर बोट ठेवले आहे. त्यामधून काही कोटींच्या घरात गैरप्रकार झाल्याचा अंदाजही सध्या व्यक्त केला जात आहे. योजनेसाठी स्वतंत्र वेबपोर्टल नसतानाही, राज्याने केंद्राच्या मनुष्यबळविकास मंत्रालयाला असे वेबपोर्टल कार्यरत असल्याची माहिती लिखित स्वरुपात सादर केली होती. असे सर्व आक्षेपार्ह प्रकार 'मटा'ने शैक्षणिक कुपोषण या मालिकेतून उजेडात आणल्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाने या योजनेची झाडाझडती सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर योजनेसाठीच्या अशा स्वतंत्र यंत्रणेच्या निर्मितीचा प्रस्ताव योजनेच्या या पूर्वीच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोपांना पुष्टी देणाराच ठरत आहे.

या विषयी 'मटा'ला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पुण्यात राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामध्येच हा कक्ष उभारला जाणार आहे. त्यासाठी जवळपास चाळीस पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठीचा जवळपास एक कोटी १० लाख रुपयांवर निधी हा केंद्र सरकारकडून योजनेसाठी मिळणाऱ्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या विषयीचा प्रस्ताव सात सचिवांच्या उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्याला वित्त विभागाने या पूर्वीच मंजूरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बाबत चर्चा झाल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील दुर्ग हेरिटेज दर्जाचे

$
0
0

डॉ. शिखा जैन यांचे मत; गडांची सद्यःस्थिती सुधारण्याची गरज

Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : 'जगभरात कुठेही पाहायला मिळणार नाही, असा वारसा राज्यातील गडकोटांना लाभला आहे. राजगड-रायगडसारखे दुर्ग शिवछत्रपतींनी परकीय सत्तांशी झगडून स्वकीयांसाठी उभारलेला सांस्कृतिक ठेवा म्हणून; तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे आरमार आणि लष्करीदृष्ट्या अजिंक्य ठरलेले गड म्हणून जागतिक वारसा (वर्ल्ड हेरिटेज) होऊ शकतील,' असे मत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी व्यक्त केले.

डॉ. जैन यांनी राजस्थान सरकारतर्फे तेथील गड जागतिक वरसा व्हावेत, यासाठी काही गडांचे नामांकन तयार करून ते युनेस्कोकडे सादर केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे चित्तोडगड, कुंभलगड, सवाई माधोपुर, झालावार, आमेर आणि जैसलमेर अशा सहा गडांचा समावेश २०१३मध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये झाला. महाराष्ट्रातील गडकोट जागतिक वारसा व्हावेत, यासाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ. जैन यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना नुकतेच राज्यात दुर्गभेटीसाठी आमंत्रित केले होते. संभाजीराजे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत जैन यांनी गडकोटांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुण्यात दुर्गप्रेमींशी संवाद साधून त्याबाबतचे प्रेझेंटेशन सादर करून माहितीही दिली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महाराष्ट्रातले गडही जागतिक वारसास्थळे होऊ शकतात, असे मत व्यक्त केले.

जागतिक वारसा म्हणून गडांचे नामांकन द्यायचे झाले तर 'सह्याद्री, कोकण आणि मराठी आरमार या गोष्टींची एकत्रित मोट बांधावी लागेल. मराठी आरमार निर्माण करून शिवछत्रपतींनी लष्करीदृष्ट्या किनारपट्टीवर उभे केलेले अजिंक्य दुर्ग, सह्याद्रीतले अभेद्य गडकोट, त्यांनी निर्माण केलेली दुर्गसंस्कृती हे जागतिक वारसा होण्याच्या क्षमतेचे आहे,' असेही जैन म्हणाल्या. गड हेरिटेजमध्ये जाण्यापूर्वी त्यांची जपणूक करून युद्धपातळीवर तेथील अवशेष सांभाळण्याची गरज असल्याचेही सांगितल्यामुळे गडांना जागतिक स्तरावर नेण्यापूर्वी गडांसाठी प्राथमिक गोष्टी करणे अधिक गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पुरातत्व खात्याने गड ताब्यात घेणे, गडांचे मॅपिंग, अतिक्रमणे हटवणे, चतुःसीमा ठरविणे, मालकी, कागदोपत्री नावे, ठिकाण, सर्व्हे नंबर, सातबारा या सगळ्या गोष्टी युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे.

महामंडळाचा विषय धूळ खात

राज्यातील गडदुर्गांची देखभाल, त्यांचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन आणि समांतर विकास व्हावा, यासाठी 'महाराष्ट्र राज्य किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळा'ची स्थापना करावी, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात केली होती. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गेलेली ही फाइल आजही धूळ खात पडून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या सहीविना कारभार

$
0
0

नगरविकास विभागाने उपटले पालिकेचे कान; विभागप्रमुखांना आयुक्तांची तंबी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेमध्ये पुण्याचा समावेश झाला असला, तरी महापालिकेतील अधिकाऱ्यांचे वर्तन अद्याप 'स्मार्ट' झाले नसल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीविनाच राज्य सरकारकडे अनेक प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याने राज्य सरकारने महापालिकेचे कान उपटले आहेत. यापुढे आयुक्तांच्या स्वाक्षरीनेच प्रस्ताव पाठविण्याची तंबीही देण्यात आली आहे. त्यामुळे, योग्य खबरदारी घेऊनच प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.

महापालिकेच्या विविध विभागांचे प्रस्ताव, केंद्र-राज्यांच्या विविध योजना, निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा अशा विविध कामांसाठी पालिकेला राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करावा लागतो. राज्याच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारित महापालिकांचे कामकाज चालत असल्याने पालिकेचा बहुतांश पत्रव्यवहार याच विभागाशी संबंधित असतो. महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने राज्य सरकारच्या नगरविकास विभागांतर्फे केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारावर पालिका आयुक्तांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या स्वाक्षरीविनाच अनेक प्रस्ताव परस्पर पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, पालिकेचा कोणताही पत्रव्यवहार हा संबंधित खात्याच्या सचिवांशी होणे आवश्यक असताना, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र उपसचिव/कार्यासीन अधिकारी यांच्या नावाने पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे, नगरविकास विभागाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सचिवांशिवाय अन्य कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावे पत्रव्यवहार झाल्यास तो वैयक्तिक समजण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

नगरविकास विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्राची दखल आयुक्तांनाही घ्यावी लागली आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीविना एकही प्रस्ताव पुढे पाठविला जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी असे परिपत्रक काढून त्यांनी सर्व विभागप्रमुखांना तंबी दिली आहे.

महत्त्वाच्या संदर्भांचाही अनुल्लेख

कोणत्याही सरकारी पत्रामध्ये एखाद्या निर्णयाचा किंवा यापूर्वी पाठविलेल्या पत्राचा सविस्तर संदर्भ नेहमी देण्यात येतो. मात्र, पुणे महापालिकेला हा संदर्भही महत्त्वाचा वाटत नाही. त्यामुळे, केवळ यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराची तारीखच पालिकेतर्फे नगरविकास विभागाला कळवली जात होती. त्यावरही, आक्षेप घेण्यात आला असून, पत्रामध्ये संदर्भांचा सविस्तर उल्लेख केला जावा, असे बजावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य बँक चौकशीला मुहूर्त कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या तोट्याला जबाबदार धरण्यात आलेल्या राजकीय वजनदार संचालकांच्या चौकशीसाठी 'तारीख पे तारीख' सुरू आहे. गेली दोन वर्षे केवळ दोषारोप आणि खुलासे यामध्येच चौकशी अधिकाऱ्यांचे काम अडकले असून त्यांची मुदत संपल्याने दोषी संचालकांच्या चौकशीला 'ब्रेक' लागला आहे.
या दोषी संचालकांवरील वैयक्तिक आर्थिक जबाबदारी कायम करण्यासाठी चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव २० मे रोजी सहकार आयुक्तांकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नुकतीच मंजुरी दिली असून, त्यांना चौकशीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत चौकशी पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना मुदतवाढीच्या प्रस्तावात करण्यात आली आहे. आर्थिक अनियमिततेमुळे राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची सहकार कायद्याच्या कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये बँकेचे तत्कालीन संचालक व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, दिलीपराव देशमुख, आनंदराव आडसूळ, पांडुरंग फुंडकर, अमरसिंह पंडित, विजय वडेट्टीवार, यशवंतराव गडाख, ईश्वरचंद जैन यांच्यासह ७६ संचालकांना दोषी धरण्यात आले आहे.
या चौकशी अहवालानंतर बँकेच्या तोट्याची संचालकांवरील वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी कलम ८८ प्रमाणे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यासाठी पहिनकर यांची २२ मे २०१४ रोजी नियुक्ती करण्यात आली. तसेच, एक वर्षाच्या चौकशी अहवाल सादर करण्याची सूचनाही करण्यात आली. पहिनकर यांच्या चौकशी समितीने कामकाजाला सुरुवात केल्यानंतर ५ डिसेंबर २०१४ रोजी पहिली सुनावणी झाली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणास्तव संचालकांनी सुनावणीच्या पुढच्या तारखा घेतल्या. याच काळात पहिनकर यांनी संचालकांना दोषारोप पत्रावर अंतिम म्हणणे मांडण्याची संधी दिली. मात्र, संचालकांनी त्याची पूर्तता केली नाही. त्यावर केवळ चौकशीच्या तारखा पडत राहिल्या. असा पद्धतीने चौकशी समितीचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. पहिनकर यांची चौकशी समितीची मुदत मागील महिन्यात (मे २०१६) संपली. या काळात संचालकांच्या चौकशीलाही ब्रेक लागला. पहिनकर यांनी चौकशीला मुदतवाढ मिळण्याची मागणी केल्यानंतर त्या प्रस्तावावर सहकार आयुक्तांनी स्वाक्षरी करून सहा महिने मुदतवाढीचा आदेश दिला आहे. आता या मुदतीत तरी दोषी संचालकांवरील वैयक्तिक तोट्याची जबाबदारी निश्चित होणार का याबाबत उत्सुकता आहे.

संचालकांवरील दोषारोप

बँकेच्या दोषी संचालकांवर चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी अकरा दोषारोप ठेवले आहेत. त्यात संचित तोटा असणाऱ्या आठ साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जात २९७ कोटींचा तोटा, चौदा कारखान्यांची थकीत कर्ज वसुली न केल्याने ४८७ कोटी रुपयांचे नुकसान, केन अॅग्रो एनर्जी (इंडिया) कारखान्याकडील कर्जाची वसुली करण्यात दिरंगाई केल्याने ५४ कोटींचा तोटा, सतरा साखर कारखान्यांच्या तारण मालमत्ता विक्रीत अनियमितता झाल्याने ५८५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा समावेश आहे. तसेच, चार संस्थांना असुरक्षित कर्ज पुरवठा केल्याने एक कोटी ७७ लाखांचे नुकसान, सहा सूत गिरण्यांच्या विक्रीत ८४ कोटी रुपयांचा तोटा आणि विक्री निविदांमध्ये गोंधळ करून ३६ कोटी रुपयांचा फटका संचालकांमुळे बसल्याचाही दोषारोप ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग. ह. खरे व्याख्यानमाला उद्यापासून

$
0
0

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारत इतिहास संशोधक मंड‍ळातर्फे येत्या पाच ते १० जून या कालावधीत 'डॉ. ग. ह. खरे स्मृती व्याख्यानमाला' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने इतिहास, अवकाश, अठराव्या शतकातील मराठी राज्यविस्तार, इतिहासलेखन अशा विविध पैलूंची अभ्यासपूर्ण माहिती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. मंडळाच्या पोतदार सभागृहात दररोज सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत ही व्याख्यानमाला होणार आहे.

डॉ. राजा दीक्षित यांच्या 'इतिहास आणि अवकाश' या व्याख्यानमालेने उद्या, रविवारी या उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. त्यानंतर सहा जूनला डॉ. श्री. मा. भावे यांचे 'राष्ट्रीयता' या विषयावर, सात जूनला पांडुरंग बलकवडे यांचे 'अठराव्या शतकातील मराठ्यांचा राज्यविस्तार' या विषयावर, आठ जूनला डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे 'इतिहासलेखन' या विषयावर, तर नऊ जूनला डॉ. चंद्रकांत अभंग यांचे 'महादजी शिंदे यांचे राजस्थानातील कार्य' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या उपक्रमाचा समारोप डॉ. म. के. ढवळीकर यांच्या 'इतिहासापूर्वीचा इतिहास' या व्याख्यानाने होणार आहे. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी, मलेरियाबाबत पिंपरीत जनजागृती

$
0
0

पिंपरी : पावसाळ्यात पसरणाऱ्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया अशा अजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे अवाहन केले आहे. तसेच याबाबत महापालिकेच्या सहाही प्रभागांतर्गत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेत प्रत्येक प्रभागातील झोपडपट्टी व आसपासच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी पाण्याची साठवणूक करताना एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याच झोपडपट्टी परिसरात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याकरिता डेंग्यू, मलेरियाच्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

कसा पाळाल कोरडा दिवस?

- डेंगी हा आजार एडिस एजिप्ती या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतो. त्या डासांची उत्पत्ती रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कूलर्स, कारंजी, फुलदाण्या आदी ठिकाणच्या स्वच्छ पाण्यात होताना दिसत आहे.
- घराभोवतालच्या परिसरात अडगळीच्या वस्तूंमध्ये, विशेषतः जुन्या टायर्समध्ये साठलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होताना दिसत आहे.
- नागरिकांना तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास तातडीने महापालिकेच्या वैद्यकीय विभागात उपचार घ्यावेत.
- घरात स्वच्छता राखण्यात यावी आणि भांडी कोरडी ठेवण्यात यावीत. पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी एक दिवस रिकामी करून घासून पुसून कोरडी करा.
- घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवा. झाकण नसल्यास कापडाने झाका. घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा.
- डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा व झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
- कोणताही ताप अंगावर काढू नका. ताप आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. तापात अॅस्पिरीन किंवा ब्रुफेन अशी औषधे घेणे टाळा. ती धोकादायक ठरू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सात-बारा’च्या दुरुस्तीसाठी ‘डेडलाइन’

$
0
0

तलाठ्यांना ३० जूनची मुदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ई-फेरफार योजनेद्वारे दिलेल्या सात-बारा उताऱ्यांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी तलाठ्यांना तीस जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सात-बारा उताऱ्यांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित नागरिकांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जमीन खरेदी-विक्री दस्ताची नोंदणी झाल्यानंतर तत्काळ फेरफार व सात-बारा उतारा देण्यासाठी ई-फेरफार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे नोंदवण्यात आलेले सात-बारा आणि फेरफार उताऱ्यांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. या कामासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र या एजन्सीकडे लाखोंच्या संख्येने दस्त आल्यामुळे त्यांचे स्कॅनिंग करताना अनेक चुका झाल्या आहेत.

ई-फेरफार योजनेसाठी 'एनआयसी'कडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. या सॉफ्टवेअरमध्येही अनेक त्रुटी असल्यामुळे सात-बारा उताऱ्यांवर नोंदी करताना तलाठ्यांना अनेक अडचणी येत होत्या. दस्त नोंदणीनंतर फेरफार उतारा केल्यावर चुकीची नावे येणे, सात-बारा उतारा तयार झाल्यावर त्यावरील नावे गायब होणे असे प्रकार या 'ई-फेरफार'च्या सॉफ्टवेअरमुळे होत असल्याचे निदर्शनास आले. हे प्रकार वाढल्यामुळे राज्य सरकारने काही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याची तपासणी केली. त्यात तथ्यांश असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांना पारंपरिक पद्धतीने दिलेल्या सात-बारा उताऱ्यावरील आणि ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आलेल्या सात-बारा उताऱ्यांवरील नोंदींमध्ये तफावत असल्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातून जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनाही अडचण निर्माण झाल्या. यातून मार्ग काढण्यासाठी 'एनआयसी'कडून 'एडिट मॉडेल' ही नवी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून सात-बारा व 'फेरफार'वरील दुरुस्ती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली.

तलाठ्यांना नवी प्रणाली
सात-बारा उताऱ्यांतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व तलाठ्यांना 'एडिट मॉडेल' ही संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षणही संबंधितांना देण्यात आले आहे. या प्रशिक्षणानंतर येत्या तीस जूनपर्यंत सात-बारा उताऱ्यांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यास तलाठ्यांना मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेची ‘मान्सून तयारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पावसाच्या पाण्यामुळे रेल्वेमार्ग वाहून जाण्याच्या दुर्घटना तसेच रेल्वेस्थानकांच्या परिसरातील साठणाऱ्या पाण्यामुळे विस्कळीत किंवा खंडीत होणाऱ्या रेल्वेसेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. पुणे विभागाच्या हद्दीत येणाऱ्या पुणे-कोल्हापूर, पुणे-दौंड व पुणे-लोणावळा या रेल्वेमार्गावर विशेष दक्षता पथकांची नियुक्ती केली जाणार आहेत. तसेच पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतरही सिग्नल व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी योजना आखल्या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रेल्वेमार्गावर पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत होते, ही बाब लक्षात घेऊन पुणे विभागाकडून रेल्वेमार्गाच्या असापासची नालेसफाई पूर्ण करण्यात आली आहे. तसेच रेल्वेमार्गाच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडांची छटाईही करण्यात आली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी ट्रॅकच्या आसपास पावसाचे पाणी साठते, त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या शिवाय ज्या ठिकाणी डोंगरांच्या परिसरातून रेल्वे मार्ग जातो, त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन दुर्घटना टाळण्यासाठीची कामे पूर्ण केली असून धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावरील कामांबरोबरच पुणे रेल्वेस्थानकाच्या परिसरातील नाल्यांची आणि ट्रॅकवर साचलेले पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांचीही सफाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच पाणी साठले तरी ते तातडीने काढण्यासाठी दोन पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत

रेल्वेमार्गांचे मजबूतीकरण गेल्या वर्षी कामशेत ते मळवली रेल्वेस्थानकाच्या दरम्यान, पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे मार्गाखालील माती वाहून गेली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून या वर्षी लोणावळा ते पुणे या मार्गावर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी रेल्वेकडून पाणी साठू नये यासाठी खडी, रेती आणि दगडांचा वापर करून रेल्वेमार्ग मजबूत करण्यात आले आहेत. तसेच पाच धोकादायक ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोठे सिमेंटचे नाले बांधले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावर पावसाळ्यात चोवीस तास विशेष गस्तीपथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस हजार ठिकाणी वायफाय

$
0
0
ग्राहकांना इंटरनेटची उत्तम आणि वेगवान सुविधा देण्यासाठी येत्या दोन वर्षांत भारत संचार निगम लिमिटेडतर्फे (बीएसएनएल) देशात ४० हजार ठिकाणी सुसज्ज वाय-फाय यंत्रणेची निर्मिती करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images