Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाण्याच्या टाक्या वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्याच्या दृष्टीने पाणी साठवण टाक्यांची संख्या वाढविण्याचे महत्त्वाकांक्षी काम महापालिकेने हाती घेतले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल ८२ टाक्या उभारण्याचे नियोजन असून, त्याद्वारे शहराच्या पाणीपुरवठ्यात आमूलाग्र सुधारणा करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून समान पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत; पण त्याला पुरेशी चालना मिळाली नव्हती. समान पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २८०० कोटी रुपयांचा प्रकल्प पालिकेने मान्य केला आहे. त्यासाठी, पाणीपट्टीत वाढ करण्यासही मंजुरी दिली गेली असून, आता या प्रकल्पासाठी आवश्यक मूलभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

गेल्या महिन्यात कॅनॉलमधून घेण्यात येणारे पाणी बंद करून ते बंद पाइपलाइनद्वारेच घेण्यास महापालिकेने सुरुवात केली. त्याचाच पुढच्या टप्प्यात शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साठवण टाक्या उभारण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. संपूर्ण शहराचे आठ विभागांमध्ये विभाजन करून ८२ टाक्या उभारण्याचे टेंडर नुकतेच काढण्यात आले आहे. त्यामुळे, समान पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने पालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगितले जात आहे.

समान पाणीपुरवठ्याचा संपूर्ण प्रकल्प २८०० कोटी रुपयांचा असला, तरी त्याचे विविध टप्पे करून कामाची सुरुवात करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पासाठी केंद्र अथवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे, या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल, अशी पालिकेची धारणा आहे.



टाक्यांसाठी २३५ कोटी रुपये

शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या या सर्व टाक्यांसाठी महापालिकेला तब्बल २३५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. या साठवण टाक्यांची क्षमता २० लाख लिटरपासून ते एक कोटी लिटरपर्यंत असेल. त्यामुळे, शहराच्या विविध भागांतील नागरिकांची गरज आणि तेथील लोकसंख्या लक्षात घेऊन वेगवेगळ्या क्षमतेच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित धरण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौशल्य विकासासाठी भाजपचा महामेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'स्किल इंडिया' मोहिमेंतर्गत राज्य सरकराच्या 'प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना'चा महामेळावा येत्या रविवारी (५ जून) आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

या मोहिमेतील सहभागी प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, प्रशिक्षण संस्था, उद्योजक, सरकारी अधिकारी महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या महामेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.

'शहराच्या सर्व भागांमध्ये कौशल्य विकास मोहिमेचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यादृष्टीने, जूनअखेर १५ हजार, तर पुढील चार महिन्यांत तब्बल ५० हजार प्रशिक्षणार्थी संपूर्ण शहरातून तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी, विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष मोहीम राबविली जाणार आहे', असे गोगावले यांनी सांगितले.

शहरातील १८ ते ४५ या वयोगटातील प्रशिक्षणार्थींना उपयुक्त ठरतील, असे अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहेत. प्रशिक्षणार्थींचा कल निश्चित करून त्यानुसार हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी, पहिल्या टप्प्यात एकवीसशे विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी योजनांसाठी मोबाइल व्हॅन

केंद्र सरकारच्या जन-धन आणि सुरक्षा विमा योजनेची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या 'मोबाइल व्हॅन'चे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या व्हॅनमध्ये सरकारी अधिकारी, मार्गदर्शक, कौन्सिलर आणि जनता सहकारी बँकेचे अधिकारी असतील. शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये ही व्हॅन जाणार असून, नागरिकांना केंद्राच्या योजनांविषयी मार्गदर्शन करणार आहे.



'कौशल्य निर्मिती आणि कौशल्य वृद्धीसाठी केंद्र-राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची फी सरकारतर्फे भरण्यात येणार आहे.'

योगेश गोगावले

शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेक्कन क्वीन’मध्ये प्रवाशांत हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा ८६वा वाढदिवस साजरा केला जात असतानाच, प्रवासादरम्यान पासधारक आणि तिकीटधारक प्रवाशांत सीटवर बसण्यावरून बुधवारी हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे 'दख्खनच्या राणी'च्या उत्सवाला गालबोट लागले.

पुण्याहून मुंबईला जाताना डेक्कन क्वीनच्या अनारक्षित डब्यात गर्दी झाल्याने 'टीसी'ने तिकीटधारकांना पासधारकांच्या डब्यात बसण्याची परवानगी दिली. मात्र, पासधारक महिला प्रवाशांनी रिकाम्या जागा असतानाही जागा न दिल्याने वादावादी सुरू झाली. त्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. पासधारक महिलांच्या डब्यात तीन जणांची आसन क्षमता असलेल्या काही सीटवर दोन महिला बसल्या होत्या. त्या वेळी त्या सीटवर जागा देण्याची विनंती अन्य महिलांनी केली. या वेळी पासधारक महिलांकडून अन्य महिलांना धक्काबुक्की, दमदाटी करण्यात आली. चालत्या गाडीत हा प्रकार घडल्याने रेल्वे पोलिसांनाही यात हस्तक्षेप करता आला नाही. अखेरीस महिला पोलिस कर्मचारी दाखल झाल्यानंतर वाद शमविण्यात आला. तिकीटधारक प्रवासी आणि पासधारकांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्याविरोधात रेल्वे पोलिस किंवा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारपासून डेक्कन क्वीनमध्ये रेल्वेच्या वाणिज्य विभागाचा आणि रेल्वे सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक कर्मचारी साध्या गणवेशात बंदोबस्तासाठी नेमण्याचा निर्णय, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी घेतला. तसेच, कर्मचाऱ्यांची संख्या येत्या काळात वाढविली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दख्खनच्या राणीचा वाढदिवस साजरा

पुणेकर आणि मुंबईकर यांच्यामध्ये गेल्या ८६ वर्षांपासून जिव्हाळ्याचे व मैत्रीचे ऋणानुबंध वृद्धिंगत करणाऱ्या दख्खनच्या राणीचा म्हणजेच 'डेक्कन क्वीन' एक्स्प्रेसचा वाढदिवस केक कापून, सजावट करून असंख्य प्रवाशांनी बुधवारी साजरा केला.

वर्धापनदिनानिमित्त रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे-मुंबई प्रवासी संघाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, उपमहापौर मुकारी अलगुडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी आमदार उल्हास पवार, ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, संघाचे अध्यक्ष हेमंत टपाले आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, 'डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमुळे पुणे आणि मुंबई शहरांतील नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या कामानिमित्त मैत्रीचे संबंध निर्माण झाले. एवढ्या वर्षांपासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस प्रवाशांना अविरतपणे सुविधा देत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे.' गणेश ओसवाल, पुरुषोत्तम लढ्ढा, एकनाथ शेटे, अशोक जैन, रामकरण वर्मा, चारुलता कुलकर्णी उपस्थित होते.

साडेतीन हजार प्रवासी

इंग्रजांनी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही कल्याण ते पुणे दरम्यान १ जून १९३० रोजी साप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून सुरू केली. त्यानंतर तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस (आत्ताचे सीएसटी) ते पुणे अशी दररोज सुरू झाली. या रेल्वेत प्रवाशांना आरामात बसून नाश्ता करता येईल, अशी 'डायनिंग कार' आहे. सध्या विविध कामानिमित्त पुणे-मुंबई-पुणे असा रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे १० हजार आहे. त्यात सर्वाधिक संख्या म्हणजेच सुमारे ३५०० हजार डेक्कन क्वीन एक्स्प्रेसने ये-जा करणाऱ्यांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पावसाचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संपूर्ण मे महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर जूनच्या पहिल्याच दिवशी वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा लाभला. दुपारी तीनच्या सुमारास शहराच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या काही सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मे महिन्यात वळवाच्या पावसाने पुण्याकडे पाठ फिरवली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरातील उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला होता. कमाल व किमान दोन्ही तापमानात मोठी वाढ झाल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. त्यामुळे अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसात भिजत सेल्फी घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती. शहराच्या विविध भागांत पावसाचा जोर कमी अधिक होता. मात्र, पावसाचे स्वरूप किरकोळ असल्याने त्याची वेधशाळेत नोंद होऊ शकली नाही. पावसामुळे काही ठिकाणीच पाणी जमा झाले होते. मात्र, जोरदार वारे वाहिल्याने कोरेगाव पार्क, येरवडा भागात आठ-दहा ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्याच्याही घटना घडल्या. कौन्सिल हॉल परिसरात वीजही कोसळल्याचे समजते.

मान्सूनची प्रगती शक्य

पुढील एक-दोन दिवसांत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातील उर्वरित भाग; तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

कमी दिवसांत अधिक पाऊस

'यंदा मान्सूनच्या कालावधीत एल निनोचा प्रभाव जून महिन्यात कमी; तर जुलै महिन्यात अत्यंत कमी राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत पावसात खंड पडेल. मान्सूनचे आगमन उशिरा होणार असले, तरी पुढे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे', अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. राज्यातील १५ वेधशाळांतील ३० वर्षांच्या माहितीवर आधारित हवामानाचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे.

कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्र्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड असे यंदा हवामान राहील. पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११६, मध्य विदर्भात ११०, तर पूर्व विदर्भात १०७ टक्के पावसाची शक्यता आहे. यामध्ये अकोल्यात ११६, नागपूर १००, यवतमाळ १२०, शिंदेवाही १०७ टक्के पाऊस होईल. मराठवाड्यात साधारणपणे ८१५ मि.मी. एवढी पावसाची सरासरी असून, तेथे ८९६ मि.मी. पाऊस होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा आहे. कोकण विभागाची सरासरी ३३३९ मि.मी. इतकी आहे. मात्र, या कालावधीत ३२८७ मि.मी. पावसाचा अंदाज असून, सरासरीच्या ९८ टक्के पावसाचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात १०२ टक्के पावसाचे संकेत असून, त्यामध्ये निफाड ११४, धुळे ९२, जळगावात १०० टक्के पाऊस होईल, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याची स्वच्छतेकडे वाटचाल

$
0
0

गेल्या महिन्याच्या तुलनेत स्वच्छ प्रभाग वाढल्याचा पालिकेचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत मोहिमेत पुण्याचा समावेश झाल्याने शहर स्वच्छ करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. शहरातील सर्व प्रभागांच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात गेल्या महिन्याच्या तुलनेत महापालिकेचे गुणांकन सुधारले असून, स्वच्छ प्रभागांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे.
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वेक्षणात पुण्याचा ११वा क्रमांक आला होता. तेव्हापासून, त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरमहा शहरातील सर्व प्रभागांचे विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यांना १ ते ५ या गुण देण्यात येत आहे. गेल्या महिन्यातील सर्वेक्षणात पालिकेला सरासरी १.९८ गुणांकन प्राप्त झाले. त्यामध्ये, जून महिन्यात अंशतः वाढ झाली असून, पालिकेचे सरासरी गुणांकन २.१६वर पोहोचले आहे.
घरोघरी जाऊन गोळा केला जाणारा कचरा, झोपडपट्टीतून गोळा केला जाणारा कचरा, ओला-सुका वर्गीकरणाद्वारे गोळा करण्यात येणारा कचरा, घनकचरा, स्वच्छतेबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये झालेली घट, तक्रार निवारणाचे प्रमाण, कचरा आढळणाऱ्या ठिकाणांमध्ये झालेली घट, सेवाशुल्क संकलनाचे प्रमाण, प्रभागातील शौचालयांचे प्रमाण आणि हागणदारीमुक्त प्रभाग करण्यात आलेले यश, अशा नऊ निकषांवर प्रत्येक प्रभागाची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. त्याचे सविस्तर विश्लेषण करून १ ते ५ या निकषांवर गुणांकन (ठरावीक रंग) निश्चित केले जातात.
'गेल्या महिन्याच्या तुलनेत पालिकेला १-२ गुणांकनावर असणाऱ्या प्रभागांची संख्या कमी करून ४-५ गुणांकन असणाऱ्या प्रभागांची संख्या वाढविण्यात यश आले आहे. शहरातील सर्वांगीण स्वच्छतेसाठीचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत', असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि घनकचरा विभागप्रमुख सुरेश जगताप यांनी बुधवारी व्यक्त केला.
यापुढेही, प्रभागनिहाय सर्वेक्षणाचे काम दरमहा केले जाणार असून, स्वच्छ प्रभागांमध्ये (अधिक गुणांकन) वाढ व्हावी, या उद्देशाने प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
..................
प्रभागातील स्वच्छतेचे प्रमाण
गुणांकन एप्रिल मे
४-५ ९ ११
३-४ १७ २०
२-३ ३१ ३०
१-२ १९ १५
..
उद्दिष्टपूर्तीवर भर
देशातील महत्त्वाची शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक शौचालये बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत मे अखेरपर्यंत महापालिकेने साडेचार हजार शौचालये बांधून पूर्ण केली आहेत. येत्या गांधीजयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) १६ हजार शौचालये बांधण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने नियोजन केले असल्याचा दावाही जगताप यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा-आसखेड’ला आठ महिन्यांनी गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भामा-आसखेड योजनेला अखेर आठ महिन्यांनी गती मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठविल्याने अखेर गेल्या सोमवारपासून या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू झाले आहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) हा प्रकल्प मंजूर झाला होता. त्याद्वारे, भामा-आसखेड धरणातून सुमारे २.६ टीएमसी पाणी पूर्व पुण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या स्थानिक खासदार-आमदारांनी गेल्या ऑक्टोबरपासून प्रकल्पाचे काम रोखून धरले होते. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम अडवू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरीही, प्रस्ताव पाठविण्यात येईपर्यंत काम करू देणार नाही, असा पवित्रा आमदार सुरेश गोरे यांनी घेतला होता. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी १३१ कोटी रुपयांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे काम सुरू करण्यास मान्यता देण्याचा आग्रह गोरे यांच्याकडे धरला. गोरे यांनीही त्याला संमती दिल्याने गेल्या सोमवारपासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. भामा-आसखेडपासून सुमारे ४२ किमीची जलवाहिनी टाकण्याचे अपूर्ण राहिलेले काम आता पूर्ण होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रशासनाकडून सांडपाण्याचा पुनर्वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'रेल्वे, लोहमार्ग, रेल्वेस्थानक, स्वच्छतागृहांसाठी वापरले जाणारे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दोन मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांची क्षमता प्रतिदिन ३ लाख ५० हजार लिटरची आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे,' अशी माहिती पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के दादाभॉय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या वेळी दादाभॉय बोलत होते. अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वाणिज्य विभागाचे व्यवस्थापक गौरव झा, विभागीय सुरक्षा आयुक्त डी. विकास आदी या वेळी उपस्थित होते. दादाभॉय म्हणाले, 'पुणे रेल्वे स्थानकासाठी प्रतिदिन सुमारे पाच लाख लिटर पाण्याची गरज भासते. हे पाणी घोरपडीतील रेल्वेची विहीर आणि महापालिकेकडून घेण्यात येते. बहुतांश पाणी रेल्वे आणि ट्रॅक धुण्यासाठी वापरले जाते. या पाण्याचा पुनर्वापर होत नसल्याने ते वाहून जाते. मोठ्या प्रमाणावर वाया जाणारे पाणी पाहता प्रशासनाने स्वच्छ करून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पुणे रेल्वेस्थानक आणि घोरपडी यार्ड येथे दोन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता दिवसाला साडेतीन लाख लिटरची आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी कमी होईल.' दरम्यान, पुणे विभागातील २१ रेल्वे स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याचेही ते म्हणाले.
..
'सुरक्षेची जबाबदारी प्रवाशांचीच'
मेटल डिटेक्टर आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली असता दादाभॉय यांनी हात झटकले. ते म्हणाले,' रेल्वे स्थानकावर मेटल डिटेक्टर चालू असेल तरच सुरक्षा असते का? रेल्वेस्थानकाचा परिसर सर्व बाजूंनी उघडा आहे. मग, आम्ही काय तेवढेच काम करायचे का या शब्दांत त्यांनी आपली जबाबदारी झटकली. शिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वैयक्तिक सुरक्षेची काळजी स्वतःच घ्यावी, असा अनाहूत सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत.
..
वीचबचतीसाठी प्रयत्न सुरू
वीज बचतीसाठी सर्व रेल्वेस्थानकांवर एलईडी बल्ब लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागाने पुणे स्टेशन, तळेगाव तसेच शिवाजीनगर या स्थानकांवर एलईडी दिवे बसविले आहेत. या माध्यमातून दररोज १५ हजार रुपयांची वीज बचत होत आहे. वर्षाकाठी ही रक्कम ५५ लाखांवर पोहोचते. खासगी कंपनीच्या माध्यमातून पुणे स्टेशनवर सौर उर्जेचे पॅनल बसविण्यात येत असून, त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दररोज २५० युनिट बचत होत असल्याचे, दादाभॉय म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हुकमी’ प्रभागांची मोडतोड करणार?

$
0
0

विद्यमान सत्ताधाऱ्यांसाठी धक्कातंत्राची खेळी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने चार सदसीय प्रभागाचा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेतील सत्तेसाठी आता जोरदार मोर्चेबांधणी केली जाणार असल्याचे निश्चित आहे. त्याची सुरुवात प्रभागाच्या रचनेपासूनच केली जाण्याची शक्यता असून, विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या 'हुकमी' प्रभागाची मोडतोड करून ते सत्तेसाठी अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीतील या संभाव्य राजकीय हस्तक्षेपाला वेळीच आळा घालण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याची अधिसूचना गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली. त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्यामुळे, आता निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त होताच, प्रा-रूप प्रभाग रचनेला सुरुवात होईल. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तर आत्तापासूनच तयारी सुरू केली असून, चारच्या प्रभागामध्ये कोणते प्रभाग जोडता येतील, कोणते प्रभाग जोडणे फायदेशीर ठरेल, कोणते प्रभाग अधिक 'सेफ' आहेत, यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या प्रभागांना विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागाला कसे जोडता येईल, याचाही विचार केला जात आहे. तसेच, विरोधी पक्षांची हुकुमत असणारे प्रभाग तोडून ते आपल्याला फायदेशीर कसे ठरतील, यादृष्टीनेही व्यूहरचना सुरू असल्याचे समजते. विरोधी पक्षातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे प्रभाग नैसर्गिक हद्दीचा विचार करून 'ब्रेक' करता येऊ शकतात का, याची शक्यता तपासण्यात येत आहे. प्रभाग रचनेचे सर्व काम महापालिकेमार्फत केले जाणार असले, तरी त्यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा असल्याने भाजपला फायदेशीर प्रभाग रचना केली जाण्याची धास्ती विरोधकांना वाटते आहे.
..
..तर आयोगाकडे दाद मागू
दरम्यान, प्रभागाच्या रचनेमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप असता कामा नये, अशी भूमिका विरोधी पक्षांकडून मांडली जात आहे. नदी-नाले, मोठे रस्ते यासारख्या नैसर्गिक हद्दींची विभागणी करून प्रभागांची रचना केली गेली, तर त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्कायडायव्हिंगच्या नव्या विक्रमाची पुण्यात नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बास्केटबॉ़लच्या मैदानाइतक्या प्रचंड आकाराचा झेंडा हाती घेऊन पॅराशूटमधून स्कायडायव्हिंग करण्याचा नवा राष्ट्रीय विक्रम नुकताच पुण्यात नोंदला गेला. तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेते विंग कमांडर कमल सिंह ओबड यांच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) देशातील सर्वांत मोठा झेंडा घेऊन स्कायडायव्हिंग करीत विक्रम नोंदवला.
ओबड यांनी २९ मे रोजी भल्या पहाटे भारतीय लष्कराच्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून सात हजार फूटांवरून उडी घेतली. त्यांनी ५१ फूट १० इंच रूंद आणि ८१ फूट ३ इंच लांब म्हणजेच चार हजार २११ चौरसफूट आकाराचा झेंडा सोबत घेतला. या उडीदरम्यान त्यांच्याकडे ७७ किलोग्रॅम वजन होते; पैकी झेंड्याचे वजन ५२ किलो तर, पॅराशूटचे वजन २५ किलो होते. हा झेंडा गुंडाळून कंटेनरमध्ये ठेवण्यासाठी त्यांना २७ छात्रांनी मदत केली. त्यासाठी या छात्रांना खास प्रशिक्षणही देण्यात आले. हा झेंडा एखाद्या बास्केटबॉल मैदानाला पूर्णतः झाकू शकेल, इतका मोठा आहे. ओबड हे पॅराशूट जंपिंगमधील तज्ज्ञ प्रशिक्षक असून, त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी आतापर्यंत १३००हून अधिक वेळा पॅराजंपिंग केले आहे. त्यापैकी दीडशे वेळा त्यांनी रात्री उडी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हुशार’ विद्यार्थी वाढले

$
0
0

Yogesh.Borate

@timesgroup.com

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य बोर्ड) बारावीच्या परीक्षेच्या पद्धतीत झालेले बदल सर्वच स्तरांमधील विद्यार्थ्यांना टक्केवारीच्या बाबतीत वरच्या दिशेने ढकलत असल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे राज्याचा एकत्रित निकालच नव्हे, तर राज्यातील 'हुशार' विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढत गेल्याचे ही आकडेवारी सांगत आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी अंतर्गत गुणांची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच्या काळात सलग दोन वर्षे राज्याच्या एकत्रित निकालाने ९० टक्क्यांहून अधिक टक्केवारी नोंदवली. यंदा राज्य मंडळाने अंतर्गत परीक्षेतील 'खैरात' रोखल्याने हा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी घटल्याचे अनुभवायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर 'मटा'ने गेल्या सहा वर्षांच्या निकालाच्या केलेल्या तुलनात्मक अभ्यासातून या निकालाचे अंतरंग स्पष्ट झाले आहेत.

परीक्षा पद्धतीत बदल होण्यापूर्वीच्या तीन आणि बदल झाल्यानंतरच्या तीन निकालांची तुलना केली असता, नंतरच्या टप्प्यातील निकाल तुलनेने खूप वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. या निकालामध्ये एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत निव्वळ उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण परीक्षा पद्धतीत बदल होण्यापूर्वीच्या टप्प्यापेक्षा खूपच कमी दिसते. ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांच्या तुलनेतही हीच परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. त्याच वेळी बारावीला प्रथम श्रेणीमध्ये येणाऱ्या, तसेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरच्या टप्प्यामध्ये लक्षणीयरीत्या वाढल्याचे बोर्डाच्या निकालांची आकडेवारी सांगत आहे.

यंदा निकाल घटला असला, तरी तो परीक्षा पद्धतीमध्ये बदल होण्यापूर्वीच्या निकालापेक्षा तुलनेने बराच वरचढ आहे. अंतर्गत परीक्षांच्या पातळीवर काटेकोर मूल्यमापनामुळे २०१६च्या निकालामध्ये घट दिसत असेल, तर या मूल्यमापनामध्ये अधिक अचूकता आणणे शक्य असल्याचेही बोर्डाच्या आकडेवारीमधून दिसून येत आहे.



श्रेणीनिहाय निकाल (एकूण उत्तीर्णांच्या तुलनेत टक्केवारी)

वर्ष......७५% आणि पुढे....६०% आणि पुढे...४५% आणि पुढे....३५ % आणि पुढे...एकत्रित टक्केवारी

परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरचा टप्पा

२०१६...८.२३..................३८.९४................४८.६७................४.१४.............८६.६०



२०१५...८.६२...................४०.१२................४७.३६...............३.८८.............९१.२६

२०१४...७.३६...................३७.०७................५०.४४...............५.१०.............९०.७३



परीक्षा पद्धतीमध्ये बदल होण्यापूर्वीचा टप्पा

२०१३....५.७१..................२८.४०.................५३.३९..................१२.४८............७९.९५

२०१२....६.९०..................२७.३५.................५१.१४..................१४.५९............७४.४६

२०११....६.३१..................२७.९८..................५१.६४..................१४.०५............७०.६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटीचे अस्तित्वअबाधित राहणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) वाटचाल ही नफ्याकडे होत आहे. हे यश एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्यातील जनता प्रवास करत आहे, तोपर्यंत एसटीचे अस्तित्व अबाधिच राहणार आहे,' असा विश्वास आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
एसटीच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे विभागातील सात कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. नगरसेवक अशोक हरणावळ, विभाग नियंत्रक नितीन मैंद, मध्यवर्ती प्रशिक्षण शाळेचे उपमहाव्यवस्थापक बी. एम. जाधव, प्रादेशिक अभियंता प्रकाश पाटील, विभागीय कार्यशाळा प्रमुख अरुण गोले, स्वारगेट आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुनील भोकरे, एम. एम. शेख, दक्षता समितीच्या सदस्या मनिषा धारणे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले आदी उपस्थित होते. एसटीचा वर्धापन दिन राज्यभरामध्ये परिवहन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीचे सर्व कर्मचारी एकत्रित काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच एसटी प्रवशांना उत्तम प्रकारची प्रवासी सेवा मिळते आहे. चालक आणि वाहकांनी प्रेमाने व आनंदाने काम करून एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू केलेला प्रोत्साहन भत्ता हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सध्या एसटीसमोर खासगी वाहतूकदारांची मोठी समस्या आहे. एसटीकडे गाड्या, निधीची कमरतता आहे. मात्र, परिवहन मंत्री त्यावर उपाय शोधून काढतील.'
जाधव म्हणाले, '६८ वर्षांपूर्वी अवघ्या ३५ गाड्यांवर एसटी सुरू झाली. आता एसटीकडे १८ हजार ५२५ गाड्या असून रोज ५७ लाख ३८ हजार किलोमीटरचा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. एसटीची राज्यात ५७८ स्थानके आहेत. दररोज एसटीने ६ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतात.' स्वारगेट बस स्थानकावर ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सजवलेल्या एसटी बसला डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे - नगर विशेष सजविलेल्या बसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. तसेच एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन केले.
-----
विविध कार्यक्रमांचे आयोजन
स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकात कुमार आहेर व कलाकारांनी एसटीचा इतिहास सांगणारा पोवाडा सादर केला. आहारतज्ज्ञ कविता धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांना आहाराबाबत मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. प्रवाशांना गुलाबाचे वाटप करण्यात आले. शिवाजीनगर आगाराचे व्यवस्थापक आर.डी. शेलोत, वाहतूक शोखेचे सहायक पोलिस निरीक्षक महेश सरतापे, एसटीचे अधिकारी सागर गाडे, राजेंद्र उबाळे, प्रवीण कांबळे, वैशाली नेर्लेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळासमोरील रस्त्यावरस्वच्छता अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
लोहगाव विमानतळाची सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने सोमवारी विमानतळासमोरील मुख्य रस्त्याच्या प्रांगणात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मागील आठवड्यात विमानतळ परिसरातील माल वाहतूक (कार्गो) व विमानतळ भागाची प्राधिकरणाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली होती. त्या वेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अजयकुमार साफसफाई करण्यात सहभाग घेतला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि विमानतळ प्राधिकरणाचे शंभर अधिकारी आणि कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानात जमा झालेला सर्व कचरा नष्ट करण्यात आला. लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार, 'सीआयएसएफ'चे डेप्युटी कमांडट एस. के. वाजपेयी, सहायक आयुक्त अनिता दलाल, प्राधिकरण मानव संसाधन विभागाचे प्रबंधक विजय गच्चे, विशेष कार्यकरी अधिकारी मिलन जोशी, 'सीआयएसएफ'चे निरीक्षक संजयकुमार, विनोद धूळ, अभय कुमार, अविनाश रंजन आणि अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी स्थानकात बेकायदा पार्किंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहनांचे बेकायदा पार्किंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी स्थानकात बस ऐवजी खासगी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे एसटी स्थानकातून एसटी बस हद्दपार झाल्याचे दिसून येते आहे.
खासगी वाहनांच्या गर्दीमुळे बसस्थानकात बस आणणे ही गोष्ट वाहनचालकांसाठी मुश्किलीची झाली आहे. त्यामुळे बसचालक एमटीडीसीच्या कार्यालयाजवळ बस उभी करणे पसंत करतात. याचा थेट फटका एसटीच्या प्रवासी संख्येवर होतो आहे. या गोष्टीकडे वाहतूक नियंत्रक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.
बसस्थानकाच्या आवारात एक हजार चौरस फूट जागेमध्ये एका बचतगटाला फी आकारून पार्किंगचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, या बचतगटाने संपूर्ण आवारातच बेकायदा पार्किंग करण्यास सुरुवात केली आहे. बसच्या फलाटावरही चारचाकी गाड्या उभ्या केलेल्या असतात.
हा बचत गट भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या एका विद्यमान विश्वस्ताशी निगडीत आहे. या विश्वस्ताने दहशतीच्या जोरावर दुचाकी वाहनांच्या पार्किंगच्या नावाखाली चारचाकी वाहनांकडून बेकायदा 'वसुली' सुरू केली आहे. यासाठी तीस, पन्नास व शंभर रुपयांची बनावट पावती पुस्तके छापण्यात आलेली आहेत. या बचतगटाच्या मनमानीला आळा घालण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
...
दुर्लक्ष का?
अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करतानाच म्हातारबाची वाडी येथे वन्यजीव विभागामार्फत दुचाकी व चारचाकी वाहनांकडून टोल आकारला जातो. एमटीडीसी आवार ते अभयारण्य या मधील जागेत पार्किंग करणाऱ्या चालकांकडूनही या बचतगटाकडून अवैध पद्धतीने पार्किंगशुल्क आकारले जाते. या दोन्हीकडच्या पार्किंग शुल्क वसुलीला देवस्थानच्या एका विश्वस्ताचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात येताच संबधित वनरक्षकाने पार्किंग फी वसुल करणाऱ्या तरुणांना रोखले असता ते पळून गेले. संबधित वनरक्षकाने हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आणला असता त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.
...
भीमाशंकर वन्यजीव विभागाच्या हद्दीत पार्किंग केलेल्या खासगी वाहनचालकांकडून पावतीद्वारे पैसे घेण्यास कोणत्याही त्रयस्थ संस्थेला किंवा व्यक्तींना परवानगी देण्यात आलेली नाही. मुळातच वन्यजीव क्षेत्रात नियमानुसार वाहने आणण्यास व उभी करण्यास बंदी आहे. संबंधितांवर वन्यजीव अधिनियमानुसार कारवाई केली जाईल.
- सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, पुणे वन्यजीव विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्दीचा अभिमान वाटावे असे काम करा

$
0
0

अपर पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचे मत
म. टा. वृत्तसेवा, दौंड
वर्दीचा अभिमान वाटावे असे काम आपल्या हातून झाले पाहिजे. सकाळी कामाला जाताना तुम्हाला तुमच्या वर्दीने सांगायला पाहिजे, की तुमच्या शरीरावर असताना मला अभिमान वाटतो. समाजासाठी उपयोगी पडणारा पोलिस अशीच तुमची प्रतिमा असायला हवी. पोलिस हाच तुमचा धर्म. तुमची जात घरात ठेवून तुम्ही पोलिसधर्माचे पालन केले पाहिजे,' असे मत महाराष्ट्र पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक (नियोजन व संनियंत्रण ) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले.
नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या ३७ व्या सत्राच्या नवप्रविष्ट पोलिस प्रशिक्षणार्थींच्या दीक्षान्त समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. शानदार दीक्षान्त समारंभानंतर ८७७ पोलीस शिपाई पोलिस दलात रुजू झाले. अतिशय तालबद्ध व लयबद्ध संचलनाची मानवंदना व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी स्वीकारली
या वेळी नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नीलेश अष्टेकर, राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक ७ चे समादेशक अजित बोराडे, पोलीस उपअधीक्षक अनिल सांडभोर, पोलिस उपअधीक्षक ईश्वर आंधळकर यांच्यासह पोलिस प्रशिक्षण केंद्राचे पोलिस अधिकारी, कर्मचारी व नवप्रविष्ठ प्रशिक्षाणार्थींचे कुटुंबीय व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
या वेळी नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना लक्ष्मीनारायण म्हणाले, 'महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव भारतातच नव्हे तर जगामध्ये आहे. या उज्ज्वल परंपरेला साजेसे काम तुमच्याकडून व्हावे. तुमची वैयक्तिक ओळख संपली आहे. तुम्ही महाराष्ट्र पोलिस म्हणून काम करणार आहात. प्रत्येक गावात आदर्श कोण असे विचारल्यास, पोलिसांचे नाव समोर आले पाहिजे. असे काम तुमच्या हातून घडले पाहिजे. प्रशिक्षण काळातील दीक्षेची आठवण ठेवा आणि निवृत्तीपर्यंत त्या दीक्षेनुसार काम करा.'
या वेळी प्रशिक्षणार्थींनी कराटेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवले. तसेच प्रशिक्षण काळातील अष्टपैलू व गुणवान प्रशिक्षणार्थींना व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. नारायण सुरेश खाडे याला अष्टपैलू प्रशिक्षणार्थीचा चषक देण्यात आला. दीक्षान्त समारंभातील संचालनाचे समालोचन सुचित्रा तबीब व सीताराम नरके यांनी केले.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाणेरमधील मंडईचेभाजपतर्फे उद्‍घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध
बाणेर येथे सहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या भाजी मंडईचे उद्घाटन भाजपाच्या वतीने करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या नामफलकाला पुष्पहार घालून भाजी मंडईचे उद्घाटन करण्यात आले. मागील सहा वर्षांपासून बाणेरमध्ये भाजी मंडईची कोट्यवधी रुपयांची इमारत धूळ खात पडून आहे. या इमारतीचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. परंतु, राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे ही भाजी मंडई वापरात आली नव्हती. प्रशासकीय पातळीवर फेरीवाला समितीच्या अनेक बैठकाही झाल्या. गरजू फेरीवाले आणि पथारीवाल्यांचे पुनर्वसन या इमारतीमध्ये झालेले नाही. या इमारतीत १३८ गाळे असून, अद्याप या गाळ्यांचे वाटप झालेले नाही, प्रशासनाने याबाबत कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे अमोल बालवडकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शौचालयाची उभारणी नियमबाह्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कात्रज
'स्वच्छ भारत' अभियानाअंतर्गत शहरातील झोपडपट्ट्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने शौचालयांची उभारणी होत असल्याचा आरोप राष्ट्रशक्ती संघटनेने केला आहे. नियमबाह्य पद्धतीने शौचालये उभारून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेला स्थगिती द्यावी, असे निवेदन संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
नगर विकास विभागाच्या सरकारी निर्णयानुसार ज्यांच्याकडे शौचालय नाही, पण शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्यांना वैयक्तिक शौचालयाची उभारणी करून देण्यात येते. ज्यांच्याकडे जागा आहे, त्यांना शौचालय बांधून देण्यास विरोध नाही. मात्र, दाटीवाटीच्या वस्तीत चालण्यासाठी जागा नसते, अशा ठिकाणी फक्त योजनेत दिलेली उद्दिष्ट्ये वैयक्तिक शौचालये बांधून देण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. ही गोष्ट थांबवली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेने केली आहे.
याबाबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले, 'ज्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवले आहेत अशा झोपडपट्ट्यांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्याची कामे वेगाने सुरू आहेत. पुनर्वसन होणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची उभारणी करून जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे. त्याचबरोबर योग्य लाभार्थी, अधिकृत ठेकेदार, बांधकाम नियमांचे पालन याबाबत साशंकता आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही कामे केली जात असल्याने या कामांना स्थगिती द्यावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या सुधारणेसाठी प्रयत्नशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ग्रामीण भागातील बंद पडलेल्या बसफेऱ्या सुरू व्हाव्यात, बसस्थानकांवर जादा सीसीटीव्ही कॅमेरे व मेटल डिटेक्टर लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड बसस्थानकांच्या प्रवेशद्वारांवर गेट लावण्याचे काम काही दिवसात पूर्ण करण्यात येईल,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाचे नियंत्रक नितीन मैंद यांनी बुधवारी दिली.
एसटीचा ६८ व्या वर्धापन दिवसाच्या स्वारगेट येथील कार्यक्रमानंतर मैद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. मैंद म्हणाले, 'एसटीच्या पुणे विभागात असणाऱ्या १३ आगारांच्या व्यवस्थापकांना काही कारणास्तव ग्रामीण भागातील बंद पडलेल्या बसफेऱ्यांची माहिती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बसफेऱ्यांचा अभ्यास करून त्यातील फायद्यात चालू शकणाऱ्या बसफेऱ्या सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.'
मैंद म्हणाले, 'बसस्थानकांमध्ये खासगी वाहने सर्रास येतात. काही वेळेला एजंट बसस्थानकांवर येऊन प्रवाशांना खासगी वाहनांमधून नेण्यासाठी गळ घालतात. हे प्रकार थांबवण्यासाठी शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड बसस्थानकांच्या प्रवेशद्वारांवर प्रशस्त गेट लावण्याचे काम काही दिवसात पूर्ण करण्यात येईल. स्वारगेट बसस्थानकामध्ये शंकरशेठ रस्त्यावर अशा प्रकारचे गेट लावले असून, सातारा रस्त्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येईल. याशिवाय या सर्व प्रवेशद्वारांवर २४ तास सुरक्षा रक्षक नेमला जाईल. पुणे विभागात गर्दी असणाऱ्या स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड आदी बसस्थानकांमध्ये जादा सीसीटीव्ही लावण्यात येईल. बसस्थानकांवर बंद अवस्थेत असलेले आणि काही नव्याने मेटल डिटेक्टर लावण्यात येणार आहे.'
....................
खासगी कंपन्यांसाठी बस
नागरिकांना राजगुरुनगर बसस्थानकाहून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या खासगी कंपन्यांमध्ये कामाला जाण्याची सोय व्हावी यासाठी प्रायोगिक तत्त्वांवर बस सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी दोन खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १०० पास काढले आहेत. ही योजना यशस्वी झाल्यास त्याचा वापर पुणे विभागात इतरत्र राबविण्याबाबत विचार केला जाईल. पुणे विभागासाठी नव्या १५ वातानुकुलीत स्कॅनिया बस काही दिवसात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकांहून असलेली शिवनेरी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येईल,असे मैंद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी खाद्यवैभव जगासमोर

$
0
0

विनय घोणसगी यांचे 'एक्झॉटिक मराठी क्विझीन' प्रकाशित म. टा. प्रतिनिधी, पुणे पोहे, वडापाव आणि पुरणपोळी या पलीकडे विस्तारलेल्या महाराष्ट्राच्या स्वादिष्ट आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीची ओळख साऱ्या जगाला करून देण्याचे काम विनय घोणसगी यांनी 'द एक्झॉटिक मराठी क्विझीन' या पुस्तकामार्फत केले आहे. राज्याच्या विभागांनुसार आणि ऋतुंनुसार बनविण्यात येणारे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तसेच लोकप्रिय आणि पारंपरिक चविष्ट पदार्थांचे आकर्षक सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. लाजवाब 'फूड फोटोग्राफी, स्टायलिंग' आणि परंपरा तसेच आधुनिकता यांचा सुरेख संगम साधत मराठी पदार्थांचे 'ब्रँडिंग' आणि 'प्रमोशन' करण्याचे मोठे काम यामुळे झाले आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले विनय सध्या पुण्यामध्ये राहत असून, आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. फोटोग्राफी आणि वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची आवड यामुळे विनय यांना 'द एक्झॉटिक मराठी क्विझीन'ची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली. यामध्ये त्यांना पत्नी दीप्ती यांचीही मोलाची साथ लाभलेली आहे. तोंडाला पाणी सुटेल, अशी फोटोग्राफी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

जबरदस्त 'मेन्यू' - गोड पदार्थ, ऋतुंनुसार होणारे पदार्थ, कोकणातील खाद्यसंस्कृती, उपवासाचे पदार्थ अशा विविध विभागांमध्ये पदार्थ मांडण्यात आले आहेत. - त्यात उकडीचे मोदक आणि पुरणपोळी या पारंपरिक पदार्थांप्रमाणेच तूप-गूळ पोळी, ड्रायफ्रुट पंचामृत, केशर-नारळी भात, तूप-शिंगोळे हे पदार्थही पुस्तकाची गोडी वाढवितात. - सोलकढी, फणसाची भाजी, चवळीची उसळ, नारळाची कढी, तांदळाची उकड, तांदळाची भाकरी आणि श्रावणातील खास पाककृती कोकणच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देतात. - शेंगदाणा आमटी, वऱ्याचे तांदूळ (भगर), बटाट्याची भाजी, मठ्ठा, रताळ्याचा किस हे पदार्थ मन तृप्त करून टाकतात. - मुगाची खिचडी, वांगी-पावटा-गाजर मिक्स भाजी, पातीचा कांदा, खान्देशी वांग्याचे भरीत हे पदार्थ थंडीतील उदरभरणाची माहिती देतात.

महाराष्ट्राची ओळख - महाराष्ट्राची वैशिष्ट्य समजली जाणारी मिसळ, बटाटेवडा, कांदा भजी, दडपे पोहे, वरणफळे, वाटली डाळ, काकडीचा कायरस, पिठलं, भरली वांगी, शेवग्याची आणि गोळ्याची आमटी, वांग्याचे काप असा अस्सल मराठमोळा 'मेन्यू' पाहून पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते.

वेगळ्या पदार्थांना स्थान - खोबरे-लसूण ब्रेड रोल्स, दोडक्याचा ठेचा, तिखटाके कानवले, उकडीचे तिखट मोदक, कोल्हापुरी वडापाव, भाकरीचा उपमा, सुक्या खोबऱ्याची चटणी, दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी, हिरव्या टोमॅटोचा ठेचा, मुळ्याचे थालिपीठ, वांग्याच्या भरिताचे थालिपीठ, काकडीचे धपाटे आणि पोह्याचे वडे अशा ऐकिवात नसलेल्या पदार्थांनी 'मराठी क्विझीन'ची पाने सजली आहेत.

स्वयंपाकघर सजले मराठी स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी सर्व भांडी यामध्ये दाखविण्यात आली आहेत. त्यात पाटा-वरवंटा, खलबत्ता, सोयऱ्या, किसणी, विळी, कढई, तांब्या-पितळ्याची भांडी, जुन्या काळातील जाते यांची ओळखही यामध्ये करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शकांच्या मुलाखतीही जतन व्हाव्या

$
0
0

टॉकटाइम

-- तुम्ही आपले २३ चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यामागची भूमिका काय आहे?

- चित्रपटाचे आयुष्य एक-दोन वर्षाचे असते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने चित्रपट जतनाचे मोठे काम हाती घेतले आहे. यामुळे चित्रपटाचे आयुष्य शंभर वर्षांपेक्षाही जास्त झाले आहे. माझे मुक्ता आर्ट्सचे २३ चित्रपट मी संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी दिले आहेत. त्यांनी ते स्वीकारले हा मी माझा सन्मान समजतो. आपली कला जतन होत आहे, यापेक्षा कलाकाराला दुसरे मोठे सुख ते काय?

चित्रपट जतन करण्याच्या चळवळीमध्ये तुम्ही काही सहभाग घेणार आहात का? - संग्रहालयातील चित्रपट परिपूर्ण असतो. फिल्म हेरिटेज मिशन ही महत्त्वाची चळवळ असून त्यामध्ये योगदान द्यायला आवडेल. संग्रहालयात चित्रपट जतनाचे मोठे काम होत आहे; पण त्याबरोबर चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या मुलाखती संग्रहालयाने घेतल्या व त्या जतन केल्या तर चित्रपटाबरोबर खूप मोठी माहिती तसेच चित्रपट करताना करावा लागणारा संघर्ष या निमित्ताने समोर येईल. अशा उपक्रमांमध्ये संग्रहालयाला पूर्ण सहकार्य करायला मी तयार आहे. माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी पुढील पिढीला देण्याचे ठरवले आहे. कारण मला जे दिले आहे ते सर्व चित्रपटानेच दिले आहे. त्यामुळे माझे जीवन मी चित्रपटांसाठी अर्पित केले आहे.

चित्रपट करतानाची तुमची काही वेगळी आठवण आहे का? - 'कालिचरण'च्या कथेला अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी नकार दिला होता. माझा मित्र शत्रुघ्न सिन्हा याच्यासाठी हा चित्रपट मी करणार होतो; पण त्याने नकार दिला. एक निर्माते तयार झाले व त्यांनी शत्रुघ्नलाही तयार केले. पुढे मीच हा चित्रपट दिग्दर्शित केला. हास्य हे माझ्या चित्रपटाचे सूत्र आहे. चित्रपट करत गेलो, शिकत गेलो. चित्रपट ही लोकशाही कला आहे, असे मला वाटते.

कलात्मक चित्रपटांचे प्रमाण वाढण्यासाठी काय करता येईल? - कलात्मक चित्रपटासाठी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न करून काही वेगळी चित्रपटगृहे तयार करता येतील का, हे पाहायला हवे. व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत कलात्मक चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ मिळायला हवे.

सेन्सॉर बोर्डाच्या धोरणावर बरीच टीका होत आहे. शिव्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. तुम्हाला त्रास होतो का? - त्रास कधी नव्हता? पूर्वीदेखील त्रास होताच. त्रासातून तर शिकायला मिळते, आनंद मिळतो. पूर्वी आम्ही त्याही परिस्थितीत काम केले व चित्रपट काढले. 'कालिचरण'च्या वेळी मी ऐकले होते, की सेन्सॉर बोर्ड कडक होणार आहे. या गोष्टीलाही आता चाळीस वर्षे होऊन गेली. ते तसेच आहे.

'एफटीआयआय'चे माजी विद्यार्थी म्हणून मध्यंतरी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तुमची काय भूमिका आहे? - मी 'एफटीआयआय'मध्ये शिकलो. एफटीआयआय ही माझी मातृसंस्था आहे. मध्यंतरी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केले त्यापासून मी अनभिज्ञ आहे. त्यांचे सुख, दुःख मला माहीत नाही. ते आंदोलन का करतात, त्यांना काय त्रास आहे, हे मला काहीच माहीत नाही. त्यामुळे त्याबाबतीत माझी काहीच भूमिका नाही. दोन विचार सगळीकडेच असतात इतकेच सांगेन.

रसिकांना तुमच्याकडून यापुढे काय पाहायला मिळेल? - चित्रपट करत राहणे हेच माझे काम आहे. आम्हाला तेच करता येते. आम्ही कलाकार मंडळी चित्रपट केले तर जिवंत राहू. त्यामुळेच जिवंत राहण्यासाठी का होईना, चित्रपट काढावेच लागतील. काही चित्रपटांवर काम सुरूच आहे. लवकरच कळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या पथकाला मारहाण

$
0
0

खडकी : खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकाऱ्यांना हातगाडी विक्रेत्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामुळे खडकीतील हातगाडी विक्रेत्यांची वाढत असलेली गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. या हातगाडी व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडे, तसेच दारूगोळा कारखाना आणि लष्करी मुख्यालयाकडेही तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी दिली.

बोर्डाचे मुख्य राजस्व अधिकारी एस. एल. कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक शिरीष पत्की, करसंकलन निरीक्षक प्रवीण बाबेल आणि पथकाने ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानुसार कुलकर्णी आणि पत्की खडकी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास गेले होते; मात्र 'खडकी पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. तुम्ही पोलिस बंदोबस्त न घेता कारवाई करण्यासाठी का गेलात, असा उलट प्रश्न उपस्थित करून हातगाडी विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यास नकार दिला,' असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितेल. 'बोर्डाच्याच अधिकाऱ्यांनी हातगाडी विक्रेत्यांविरोधात कारवाई करू नका, फक्त समज देऊन सोडा, असे सांगितल्याने आम्ही कारवाई केली नाही,' असे खडकी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images