Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोसायट्यांसाठी ई-गव्हर्नन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे नुकतेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महासंघातर्फे ई-संचालक कंपनीच्या सहकार्याने विकसित ई-गव्हर्नन्स प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील यांच्या हस्ते व महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या उपस्थितीत 'ई-गव्हर्नन्स' प्रणालीचे उद् घाटन झाले. महासंघाच्या www.pdchf.org या वेबसाइचे अनावरणही या वेळी झाले. यात प्रामुख्याने पुढील सेवा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मेळाव्यात धरणीधर पाटील यांनी 'मानीव अभिहस्तांतरण', बाळासाहेब तावरे यांनी 'सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक', सुहास पटवर्धन यांनी 'पुनर्विकास' तर एस. आर. पंडित यांनी 'हिशेब व लेखापरीक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले. थकबाकी वसुली व १०१ अंतर्गत कारवाई या विषयावर अॅड. मृदगंधा जोशी, पदाधिकाऱ्यांचे व सभासदांचे दायित्व या विषयावर सुभाष ढवळे, भाडेकरार, ई रजिस्ट्रेशन यावर मनीषा कोष्टी यांनी मार्गदर्शन केले.

ई-गव्हर्नन्स पोर्टल

या पोर्टलमध्ये सर्व संस्थेच्या मुख्य, सह व नाममात्र सभासदांची सर्व माहिती, भाडेकरूंची माहिती, गाड्यांची माहिती साठवता येते. अकाउंट थकबाकीदार सभासदांना स्वयंचलित मेंटेनन्स चार्जेसचे रिमाइंडर पाठविण्यात येतात. सर्व सभासदांना त्यांच्या ई-मेल वर महत्त्वाच्या नोटीस पाठविल्या जातात. सर्व आवश्यक रजिस्टर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतात.

स्वयंचलित सभासद पोर्टल

या पोर्टलमध्ये प्रत्येक सभासदाला युझरनेम व पासवर्ड दिला जातो. त्या माध्यमातून सभासदांना स्वतःचे मेन्टेनन्स चार्जेस बील, पैसे भरल्याची पावती पाहण्याची व डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच सभासदांनाही ई-मेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सोय आहे. प्रत्येक तक्रार-विनंती ही नंबरद्वारे (तिकिट) पाठपुरवठा केला जातो.

सोसायटी अकाउंट

ई-गव्हर्नन्स प्रणालीमध्ये सोसायटीचे संपूर्ण अकाउंट्स हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते. बँक व कॅशचे महिन्याला ताळेबंद केले जाते. प्रत्येक सभासदाचे लेजर,जमा/खर्च रिपोर्ट, थकबाकीदार यादी दर महिन्याला व्यवस्थापकीय समितीला पाठविण्यात येते.

अंतर्गत अकाउंट आणि ऑडिट

सोसायटीचे दर तीन किंवा सहा महिन्यातून एकदा अंतर्गत आर्थिक ऑडिट व को ऑपरेटिव्ह ऑडिटही केले जाते. त्यात प्रामुख्याने अकाउंटसंबंधी सर्व रेकॉर्ड्स व सोसायटी आदर्श नियमावलीप्रमाणे आवश्यक असणारे सर्व रेकॉर्ड्स तपासून चुकांची दुरुस्ती सुचविण्यात येते. सोसायटीचे टीडीएस व प्राप्तिकर रिटर्न भरण्याची सोयही उपलब्ध आहे.

ई-गव्हर्नन्स सेवा

सोसायट्यांना आवश्यक विविध रजिस्टर, हस्तांतरण कागदपत्रे तयार करणे व सोसायटी आदर्श नियमावली व सहकार कायद्यानुसार लागणारा कायदेविषयक सल्लादेखील दिला जातो. या व्यतिरिक्त सर्व साधारण सभा आयोजित करण्यासंबंधी मार्गदर्शन, व्यवस्थापकीय समिती निवडणूक मार्गदर्शन, भाग प्रमाणपत्र, डिझाईन व प्रिंटिंग, भाडेकरार नोंदणी, कलम १०१ नुसार थकबाकी वसुली सोसायटी नावनोंदणी, जमीन हस्तांतरण, सोसायटी आदर्श नियमावली दुरुस्ती व निबंधक ऑफिसमध्ये जमा करणे, या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची दीड लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदीप बुच्चे (वय २४ रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून बिपीन चिने पाथरे (रा. पाथरे, नाशिक), राहुल कुमार शहाणे, राहुल रॉय, वतन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बुच्चे याने मर्चंट नेव्हीचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. नगर-नाशिक रोडवरील गावात बुच्चे राहतात. त्या ठिकाणी त्याच्या नातेवाइकाच्या माध्यमातून आरोपी पाथरे याच्याशी ओळख झाली. पाथरेने ओळख वाढवून मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून बुच्चे याच्याकडून दीड लाख रुपये घेतले. बुच्चे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नोकरीसाठी बोगस प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत येथे नोकरीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वर्षा बापट (वय २८, रा. वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून विकास नवनाथ गर्जे (वय २८, रा. लातूर ) व इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठ येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या ठिकाणी आरोपींनी नोकरीसाठी राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सादर केले होते. ते बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फौजदार डी. एस. म्हेत्रे तपास करीत आहेत.

सव्वा कोटीची फसवणूक

फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांना जमीन दाखवून बुकिंग आणि करारनाम्याचे पैसे घेऊन अर्थवट व्यवहार करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने एक कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सूरज राकेश चौबे ऊर्फ स्वरूप शर्मा ऊर्फ राज शुक्ला असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथे ऑलमॅकस रियालटी एकर्स प्रा. लि. नावाची चौबे याने कंपनी सुरू केली आहे. तसेच, एक वेबसाइट सुरू करून त्याद्वारे प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जाहिरात पाहून अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्याने ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फ्लॉट दाखविले. त्यानंतर करारनामा व बुकींगसाठी पैसे घेतले. परंतु, अनेक दिवस झाले तरी व्यवहार होत नसल्याने नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. चौबे हा कराड येथील ओगलेवाडी येथील सूर्या हॉटेलजवळ असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयपीएल सामान्यांवर बेटिंग;दहा जणांवर कारवाई

$
0
0







म. टा. प्रतिनिधी, पुणे आयपीएलमधील हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायर्डस या सामन्यांवर बेटिंग खेळणाऱ्या उच्चभ्रू कुटुंबातील दहा जणांस विशेष शाखा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. कोरेगांव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाच्या 'द मगशॉट' हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री रात्री ही कारवाई केली. या ठिकाणाहून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन बुकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल दरम्यानची ही पहिलीच कारवाई आहे. जतीन दिलीप गुंदेशा (वय २४, रा. गंगाधाम सोसायटी, मार्केट यार्ड), अंकुश दिनेश गांधी (२३, रा. एकबोटे कॉलनी, शंकरशेठ रोड), दर्शन महेंद्र निबजिया (२३, रा. वीर भारत सोसायटी, भवानी पेठ), राज रमेश ओसवाल (२३, रा. आदीनाथ सोसायटी, पुणे सातारा रोड), हर्ष श्रीपाल पोरवाल (२१, रा. शुक्रवार पेठ,) योगेश उमेश ओसवाल (२५, रा. आदिनाथ सोसायटी, सातारा रोड), राहुल शरद लोढा (२३, रा. इशा पॅलेस, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी), श्रेयांस श्रेनिक जैन (२६), भाविक जितेंद्र जैन (२२), सिद्धार्थ श्रेनीक जैन (२४, तिघेही रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बेटिंग घेणारे अमित पटेल (गुजरात), देवांग मेहता (रा. भवानी पेठ) व राहुल शहा (पनवेल) हे तिघे फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील ज्युएल्स स्केअर मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर द मगशॉट हॉटेल आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या मालकीचे हे हॉटेल आहे. विशेष शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जरग यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या हॉटेलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स व हैद्राबाद सनरायजर्स संघात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाइलवरून बेटिंग सुरू आहे. त्यानुसार विशेष शाखा व खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या हॉटेलवर छापा टाकला. त्या वेळी हे तरुण फरार पटेल, मेहता व शहा यांच्याकडे प्रत्येक बॉल व विकेटनुसार बेटिंग लावत असल्याचे आढळून आले. दहा जणांना या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले असून, मोबाइल, एलसीडी व इतर साहित्य असा, एकूण ४ लाख ४२ हजारांचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंगची पहिली सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या आदेशानुसार, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र जरग, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैदुवाडीत गुंडाचा धुमाकूळ; तिघांना अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, हडपसर वैदुवाडी, महात्मा फुले नगरमध्ये वाहनांची तोडफोड, नागरिकांना धमकावणे व हत्याराद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघां आरोपी विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत तिलकसिंग टाक उर्फ तिलाक्या (रा. रामटेकडी, हडपसर ) सह इतर दोन अज्ञात आरोपी विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिंक्य दिलीप गायकवाड (वय २४, रा. महात्मा फुले नगर, वैदूवाडी, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिस ठाणे गुन्हे पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगार तिलकसिंग टाक हा इतर दोन अज्ञात साथीदारासह हातात कोयत्यासारखे हत्यार घेऊन स्वतःची दहशत पसरविण्याच्या उद्देशाने महात्मा फुले नगर येथे आला. त्याने चौकात आलेल्या रिक्षा अडवून रिक्षाच्या काचा फोडल्या तसेच रिक्षाचालक भारत गायकवाड धमकावत असताना तेथील उभा असलेला अजिंक्य गायकवाड भांडणे सोडवण्यासाठी आला. आरोपी तिलकसिंगने कोयत्यासारख्या हत्याराने अजिंक्यच्या अंगावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याच परिसरात गौरव वाघमारे याची उभी असलेली पेगो टेम्पोची काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. दुकानाच्या शटरवर हत्याराने मारले. वस्तीतील नागरिकांनी घाबरलेल्या अवस्थेत हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर तात्काळ हडपसर गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी पोलिस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन फरार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर करीत आहेत. तिलकसिंग टाक उर्फ तिलाक्या यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता

$
0
0









म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) उत्पन्न वाढविण्यासाठी ड्रायव्हर व कंडक्टरला २० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटीने निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळविणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नावर प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. एसटीच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने एसटीचे अध्यक्ष व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांना ही अभिनव भेट दिली आहे. एक जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. एसटीकडून प्रवासी तिकिटावर एक रुपया अधिभार आकारला जात आहे. याद्वारे जमा होणारे उत्पन्न आणि एसटीने निश्चित करून दिलेले उद्दिष्ट या व्यतिरिक्त जमा होणाऱ्या उत्पन्नावर हा भत्ता दिला जाणार आहे. तसेच, जून २०१५मध्ये उत्पन्नाच्या तुलनेत जून २०१६ मध्ये उत्पन्न कायम किंवा उत्पन्नात वाढ असल्यास संबंधितांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. एक ते १० मे या कालावधीतील सरासरी उत्पन्नावर कंडक्टर, ड्रायव्हरला उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाणार आहे. एसटी महामंडळाने याबाबतचा आदेश सर्व विभाग नियंत्रकांना पाठविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात एसटीच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे एसटीचा संचित तोटा वाढत आहे. तसेच, यंदाच्या वर्षात दुष्काळामुळे राज्यभरातील एसटीच्या प्रवाशांची सुमारे पाच टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमी फंडाची तरतूद बाजार समित्यांकडे करावी

$
0
0













म. टा. प्रतिनिधी, पुणे 'बाजार समितीच्या नियमनातून फळे, भाजीपाला मुक्त करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देताना बाजार समित्यांकडे हमी फंडाची तरतूद करून सरकारने मदत करावी,' अशी मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली. बाजार समितीच्या बंधनातून काढून शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्याचे आडत्यांसह हमालांमध्ये पडसाद उमटत आहेत. त्याबाबत हमाल मापाडी मंडळाने आपली भूमिका मांडत सरकारकडे काही मागण्या केल्या. त्या वेळी महामंडळाचे सचिव नितीन पवार उपस्थित होते. 'फळे, भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय बनवाबनवीचा प्रकार आहे, असा आरोप करून उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाची अंमलबजावणी बाजार समित्यांना करता आली नाही. त्यासाठी समित्यांकडे हमी फंडाची तरतूद केली पाहिजे. फंडासाठी सरकारने त्यांना मदत केली पाहिजे,' अशी मागणी डॉ. बाबा आढाव यांनी केली. 'स्थानिक पातळीवर प्रतवारी भाव निश्चिती, किलो पॅकिंग आदी सुधारणांबरोबरच भाजीपाला सुद्धा गड्ड्यांऐवजी निवडून छोट्या पॅकिंगमध्ये आणल्यास चांगला दर मिळू शकतो. कोणत्याही प्रकारची विपणन योजना नसताना सरकारने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाची तातडीची बैठक येत्या रविवारी (२९ मे) मार्केट यार्डातील हमालभवन येथे होणार आहे. त्यात आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात येईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी ते ग्राहक योजना चांगली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही, याची हमी दिली पाहिजे. शेतीच्या बांधावरच मालाची प्रतवारी करणे, ग्राहक सहजपणे खरेदी करू शकेल असे पॅकिंग स्थानिक पातळीवर गरजेचे आहे, असे आढाव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा नुसता पोरखेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे, या मेट्रोच्या भूमिपूजनाचे श्रेय पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ नये, यासाठी भाजप सरकार हा प्रकल्प रखडवीत असल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला. मेट्रोचा पोरखेळ चालविला असून हा प्रकार राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक चालविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन कॉलेज रोड) आणि जंगली महाराज रस्त्यावर मेट्रोचा मार्ग करणे अशक्य असल्याने नदीपात्रातून मेट्रोचा मार्ग दिल्ली मेट्रो रोड कार्पोरेशन (डीएमआरसी) ने प्रस्तावित केला आहे. नदीपात्रातून मेट्रोचा मार्ग जात असल्याने याला आक्षेप घेत शहरातील स्वंयसेवी संस्थांनी (एनजीओ) राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. याबाबत महापौर जगताप यांना विचारले असता, ते म्हणाले 'राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेले भाजप सरकार पुणे मेट्रोबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. लवकरच मेट्रोला मान्यता दिली जाईल, अशी आश्वासने दिली जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प रखडविण्याचा भाजप सरकारचा डाव असून जाणीवपूर्वक यामध्ये त्रुटी काढल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणेकरांनी शहराचा विकास व्हावा, या उद्देशाने भाजपचे आठ आमदार, एक खासदार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, मात्र मेट्रोसाठी कोणताही प्रयत्न न करता त्याला खोडा घालण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी केले आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी हा प्रकल्प रखडविला जात आहे.' 'नदीप्रवाहाला कोणताही अडथळा नाही' नदीपात्रातून मेट्रोचा मार्ग निश्चित करताना पालिकेने डीएमआरसी बरोबर चर्चा करून त्यानंतरच हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मेट्रो मार्गासाठी नदीपात्रात खांब उभारल्याने नदीच्या प्रवाहामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याचा संपूर्ण अभ्यास पालिकेने केला आहे. त्यानंतरही हरित लवादाने बाजू मांडण्याचे आदेश दिल्यानंतर त्यासमोर सविस्तर बाजू मांडली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारच्या घोषणांची खिल्ली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्रात सत्ता स्थापन करून दोन वर्षे झाल्यानंतरही मोदी सरकारला सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारच्या फसव्या घोषणांची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उडविण्यात आली; तर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा पर्दाफाश सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. दोन वर्षानंतरही मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहिल असे कोणतेही ठोस काम केले नाही. सत्तेत येण्यापूर्वी केवळ घोषणाबाजी या सरकारने केली असल्याचा आरोप करत 'राष्ट्रवादी'च्या वतीने टिळक चौकात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर प्रशांत जगताप, मोहनसिंग राजपाल, कमल ढोले पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उमेश पाटील, आप्पा रेणुसे, रवींद्र माळवदकर, शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राकेश कामठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने आठ विधानसभा मतदार संघात एलईडी स्क्रीन लावून मोदी यांनी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष पूर्ण केलेली आश्वासने दाखविली जाणार आहेत. सत्तेवर येण्यापूर्वीची भाषा आणि सत्तेवर आल्यानंतरची भूमिका सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी हा उपक्रम केला जाणार असून २ जूनपर्यंत चौकाचौकात हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. स्वारगेट चौकात गुरुवारी सकाळी या उपक्रमाची सुरुवात झाली. या वेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, आमदार दिप्ती चवधरी, उपमहापौर मुकारी अलगुडे, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, अजित आपटे, संगीता देवकर, मुख्तार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक व्यवहारांची माहिती गायब?

$
0
0

ऑडिटसाठी माहिती देण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाची असमर्थता
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पोषण आहार योजनेसंदर्भात गेल्या काही वर्षातील आर्थिक व्यवहारांची लेखी माहिती नसल्याची बाब आता समोर येत आहे. त्यामुळे महालेखापाल कार्यालयाने सुरू केलेल्या ऑडिटदरम्यान या माहितीची विचारणा होत असतानाही, संचालनालयाला ही माहिती सादर करता आली नसल्याचेही याच निमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संचालनालयाच्या यापूर्वीच्याच नव्हे, तर सध्याच्या व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाने शालेय पोषण आहार योजनेच्या गेल्या वर्षभरातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. आयुक्त कार्यालयाने त्यासाठी गेल्या वर्षभरातील हिशेबांचा तपशील संचालनालयाकडे मागितला आहे. मात्र, संचालनालयामध्ये सध्या महालेखापाल कार्यालयाचे ऑडिट सुरू असल्याने, सध्या हा तपशील सादर करण्यास विलंब होत असल्याचे कारण संचालनालयाने पुढे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महालेखापाल कार्यालयाच्या या ऑडिटचा 'मटा'ने आढावा घेतला. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळापासून 'मटा'ने शैक्षणिक कु'पोषण' या मालिकेमधून पोषण आहार योजनेतील आक्षेपार्ह कारभार उघड केला आहे. त्या पाठोपाठ सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षणादरम्यान समोर येत असलेल्या या बाबींमुळे, गेल्या काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या आक्षेपार्ह व्यवहारांचा पाढा तशाच पद्धतीने सध्या सुरू राहिल्याचेही दिसून येत आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, महालेखापाल कार्यालयाने या पूर्वी झालेल्या लेखापरीक्षण अहवालामधूनही प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आर्थिक व्यवहारांवर आक्षेप नोंदविले होते. प्राथमिक शिक्षण संचालनालयामध्ये अंतर्गत मूल्यमापन करणारी यंत्रणा नसल्याविषयीही महालेखापालांनी आक्षेप घेतला होता. त्या पाठोपाठ सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षणामध्ये अधिकाऱ्यांना २०१० ते २०१४ या काळातील काही आर्थिक व्यवहारांविषयी अधिक स्पष्टता गरजेची वाटत आहे. त्यासाठी हे अधिकारी या दरम्यानच्या काळातील काही बिलांविषयी सातत्याने विचारणा करत आहेत. मात्र, संचालनालयामधून ही बिले अद्याप सादर होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या लेखापरीक्षण अधिकाऱ्यांनी संचालनालय सहकार्य करत नसल्याविषयी यंदाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये शेरा मारण्याचा इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संचालनालयाकडे खरंच ही माहिती नाही, की लेखापरीक्षणातील अहवालामधून त्या विषयी आक्षेप घेण्याच्या भीतीने ही माहिती सादर केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँन्टोन्मेंट हद्दीतील बैठ्या घरांचे नुकसान?

$
0
0
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील १९८४ पूर्वीच्या इमारतींना सध्याच्या क्षेत्रफळाएवढ्या पुनर्बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या या आदेशात बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीबाबत स्पष्टता नाही.

निकृष्ट कामांसाठी कंत्राटदार जबाबदार

$
0
0

कारवाई करण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधील प्रस्तावित विविध वीज वितरण यंत्रणा सक्षमीकरण आणि विस्तारीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री आणि जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी दिले.
जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी सौरव राव, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, सुरेश गोरे आणि गौतम चाबुकस्वार, महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, 'केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधील वीज वितरण यंत्रणेची कामे उत्कृष्ट दर्जाची होण्यासाठी वीज अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. वीज अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांशी समन्वय ठेऊन त्यांचे सहकार्य घ्यावे.' शहरात महावितरणच्या इन्फ्रा दोनमधील काही कामे पूर्णत्वाकडे आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आठ ते दहा दिवसांसाठी पुणे महानगरपालिकेने भूमिगत वाहिन्या टाकण्यास खोदाईला परवानगी द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी या बैठकीत केली. बापट यांनी याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा नसलेल्या वाड्या आणि वस्त्यांमध्ये विजेची सोय उपलब्ध करून द्यावी. महावितरणचा कारभार प्रभावीपणे होण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्पर राहावे,' असे आवाहन बापट यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंदीकरण होणार कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वारगेट चौकातील उड्डाणपुलावरून सारसबागेकडे येणारा रस्ता दादावाडी जैन मंदिर तसेच आनंद मंगल कार्यालयाजवळ अरुंद झाल्याने या भागात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद केल्यानंतरच या पुलाचे उद्घाटन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत पुलाचे उद‍्घाटन करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात‌ होणारे या पुलाचे उद्घाटन अलीकडे घेत शुक्रवारी (२७ मे) याचे उद्घाटन उरकले जाणार आहे. स्वारगेट चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये खर्च करून जेधे चौकात उड्डाणपूल उभारला आहे. रस्ते विकास महामंडळाकडून या पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. या पुलाचे डिझाइन तयार करताना रस्ते विकास मंडळाने दादावाडी जैन मंदिराच्या येथे सहा पदरी रस्ता दाखविला होता. मात्र पालिकेने एक लेन कमी करून पाच लेनचा रस्ता येथे ठेवला आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आनंद मंगल कार्यालयाजवळ पुढील काळात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता असल्याची तक्रार ऐश्वर्य सहकारी गृहरचना संस्था, सारसनगर सिद्धीविनायक सहकारी गृहरचना संस्था, निरामय को ऑपरेटिव्ह सोसायटी, सुखानंद बंगला, सिद्धीविनायक अपार्टमेंट येथे राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. या रोडवर असलेले मंगल कार्यालय आणि मंदिराचा काही भाग पाडून हा रस्ता सहा पदरी होत होता. मात्र, रोडमध्ये मंगल कार्यालय आणि मंदिर येत असल्याने पालिकेतील अधिकारी रस्ता तसाच ठेवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा रस्ता सहा पदरी न करता पूल सुरू केल्यास येथे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ता मोठा केल्यानंतरच हा पूल सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत पालिकेने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दादावाडी जैन मंदिराचे विश्वस्त तसेच मंगल कार्यालयाचे विश्वस्त यांच्याबरोबरच पालिकेची चर्चा सुरू आहे. या दोन्ही संस्थांनी आपली भिंत काही प्रमाणात आत घेण्याची तयारी दाखविली असून लवकरच हा निर्णय घेतला जाईल. त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा सुरू आहे. अपघात होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल. - प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी सोहळ्यामध्ये यंदा फटाक्यांना बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात येणार असून प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या कमानींची उंची ही सुरक्षितता व अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने निश्चित केली जाणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरव राव यांनी विविध शासकीय विभाग व पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा व पालखी सोहळा नियोजनबद्ध होण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. या संपूर्ण पालखी सोहळ्यास पोलिस बंदोबस्ताबरोबरच पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज पुरवठा याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीला पालखी सोहळा प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे सीईओ दौलत देसाई, ग्रामीण पोलिस अधीक्षक जय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते. वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी पुढे येणाऱ्या मंडळांची संख्या वाढतच आहे. ही संख्या कमी करण्याचा प्रस्तावही पोलिसांनी दिला. पालखी आल्यावर फटाके वाजविले जातात. त्यामुळे गोंधळ होण्याची भीती असल्याने फटाके वाजविण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. बंद पडणाऱ्या वाहनांमुळे पालखीमध्ये अडथळे येऊ नये यासाठी क्रेनची व्यवस्था करावी, अशी सूचनाही करण्यात आली. पालखी मार्गावर विद्युत पुरवठाखंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचीही सूचना वीज मंडळाला करण्यात आली. पालखीच्या काळात पिंपरी येथील कत्तलखाना, विश्रांतवाडीमधील मासळी केंद्र बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांबरोबर असणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली, असा प्रस्ताव पाठविण्याचे सूतोवाच बैठकीत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील परिस्थिती आणीबाणीसदृश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'मांस खाल्ले म्हणून घरात घुसून ठार मारले जाते, ही देशातील परिस्थिती आणीबाणीसदृश आहे', अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी गुरुवारी सरकारवर हल्ला चढवला. 'दुष्काळ पडलेला असताना गंगेच्या स्वच्छतेसाठी २९०० कोटी खर्च केले जातात. हे पैसे कुठे गेले, ही कसली सुसंस्कृतता,' असे उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त गज्वी यांना 'जीवनगौरव पुरस्कार'; तर प्रा. वैजनाथ महाजन यांना 'भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अन्य पुरस्कारांचे वितरण झाले. परिषदेचे विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार याप्रसंगी उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते. 'गंगेत फक्त निर्माल्य टाकले नाही तरी ती स्वच्छ होईल. पण त्या कारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत तर दुसरीकडे दुष्काळ पडला आहे. मी कलावंत, लेखक असून हे पैसे कुठे गेले, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार मला आहे,' असे गज्वी यांनी ठणकावून सांगितले. 'बौद्ध समाजाचे प्रश्न मांडले तर फक्त तेच प्रश्न दिसतात का, म्हणून विचारणा होते व ब्राह्मण समाजाचे प्रश्न मांडले तर तुला ब्राह्मणांच्या प्रश्नांशी काय करायचे आहे. तू तुझ्या समाजाचे प्रश्न मांड, असे सल्ले देऊन आसपासचे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊ देत नाहीत. या प्रतिक्रियांमुळे मी कोणत्या समाजाचा आहे, असा प्रश्न मला पडतो,' अशी उद्विग्न भावना गज्वी यांनी व्यक्त केली. 'मराठीच्या नावाने गर्जना केली जाते; पण इंग्रजीचे प्रतिशब्द शोधण्याची यंत्रणा आहे का,' असा सवाल करून सर्वांचे मराठीचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका साधू यांनी केली. मराठी भाषा विचित्र अवस्थेतून जात असून येत्या शंभर वर्षात ती संपेल की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 'राजकीय लोक मराठीचा प्रश्न सोडवणार नाहीत. भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तो सोडवणे आपल्या हाती आहे,' असे डॉ. कसबे यांनी सांगितले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बायफ्रेन रोप’चे काम अद्याप प्रलंबित

$
0
0

लेखी आदेश नसल्याने कामास सुरुवात नाही
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर रस्ता दुभाजकाला बायफ्रेन रोप बसविण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) संचालक मंडळाने रोप बसविण्यास मान्यता दिली आहे. मात्र, त्यासंबंधीचे लेखी आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही.
एक्स्प्रेस-वेवर वाहने दुभाजकाला धडकल्याने आणि दुभाजक ओलांडून होणारे अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी बायफ्रेन रोप बसविण्याची घोषणा रस्तेविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. एक्स्प्रेस-वेवर धोकादायक ठिकाणांची पाहणी करून २५ किलोमीटर अंतरावर बायफ्रेन रोप बसविण्यास 'एमएसआरडीसी'च्या संचालक मंडळाने देखील मान्यता दिली. त्यानंतर या कामासाठीची टेंडर प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये चार कंपन्यांनी टेंडर भरले होते. आणि ही प्रक्रिया संपून एप्रिलच्या अखेरीस बायफ्रेन बसविण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप लेखी आदेश नसल्याने कामास सुरुवात करता आली नाही, अशी माहिती 'एमएसआरडीसी'च्या सूत्रांनी दिली.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर दुभाजक तोडून समोरच्या लेनमध्ये वाहन जाण्याचे किंवा दुभाजकावर आदळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा रोप धोकादायक वळण, तीव्र उतार व चढ अशा अपघातप्रवण क्षेत्रामध्ये बसविला जाणार आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तातडीने बायफ्रेन रोप बसविण्याची मागणी केली जात आहे.
---------
कडक उपाययोजना कधी?
प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला बुधवारी मध्यरात्री खंडाळा एक्झिट येथे अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला असून, कुलकर्णी गंभीर जखमी झाले आहेत. दुभाजक ओलांडून आलेल्या कंटेनरमुळे हा अपघात झाला. साडेतीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे झालेल्या अपघातात ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर, अभिनेता अक्षय पेंडसे आणि त्यांचा लहानग्याचा मृत्यू झाला होता. या मार्गावर वाहन चालकाच्या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. हे असे आणखी किती दिवस चालणार, प्रशासन याबाबत ठोस उपाययोजना केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूर्वकल्पना न देताच आळंदीत वाडा पाडला

$
0
0

'जिप'च्या सीईओंविराधात गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पूर्वकल्पना न देता कुलूप तोडून आळंदीतील दोन मजली इमारत जमीनदोस्त केल्याबद्दल पुण्यातील डॉ. सत्यशील नाईक यांनी आळंदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील दोनशे वर्षांपूर्वीच्या वाड्यावर धोकादायक म्हणून कारवाई करताना पूर्णतः अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप डॉ. नाईक यांनी आळंदी नगरपरिषदेच्या सीईओंवर केला आहे.
आळंदीमध्ये डॉ. नाईक यांच्या पूर्वजांनी बांधलेला वाडा आहे. या वाड्याची देखभाल आणि डागडुजी डॉ. नाईक यांनी २०१०मध्ये केली होती. या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील काही भाग धोकादायक झाला असल्याने गेल्या महिनाअखेरीस नगरपरिषदेने त्याबाबतची नोटीस काढली. त्यानंतर, डॉ. नाईक यांनी १६ मे ला आळंदी नगरपरिषदेत जाऊन सीईओ आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी, पुढील १० दिवसांमध्ये संबंधित मिळकत दुरुस्त करून घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. नाईक यांनी दिले होते.
तरीही, आळंदी नगर परिषदेने गेल्या शुक्रवारी (२० मे) संबंधित मिळकत डॉ. नाईक यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता पाडली. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवविता खासगी जागेत घुसून बेकायदेशीरपणे इमारत पाडल्याप्रकरणी डॉ. नाईक यांनी सीईओंविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या वाड्यातील अनेक जुन्या ऐतिहासिक, पारंपरिक वस्तूंची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून माझ्या मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.
................
पूर्वकल्पना दिल्यासा सीईओंचा खुलासा
पालखी सोहळ्यात प्रदक्षिणा मार्गावर हा धोकादायक वाडा असल्याने कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कारवाई करण्यात आल्याचा खुलासा नगर परिषदेचे सीईओ डॉ. संतोष टेंगळे यांनी केला आहे. तसेच, डॉ. नाईक यांना पूर्वकल्पना देऊनही वेळेत इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. म्हणून, केवळ इमारतीचा धोकादायक भाग पाडण्याची कारवाई केली जात असताना, जुनी आणि जीर्ण झालेली इमारत असल्याने ती सगळीच कोसळली, असा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रायोगिक चळवळ ठप्प

$
0
0

गेल्या वर्षभरात नाटकांचे प्रमाण घटले; चांगल्या जागांचा अभाव म. टा. प्रतिनिधी, पुणे मराठी प्रायोगिक रंगभूमी केवळ पुण्यापुरती उरलेली असताना पुण्यातील प्रायोगिक चळवळही गेल्या सहा महिन्यांत ठप्प झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास होणारे प्रायोगिक नाटकांचे प्रयोग यंदाच्या सुट्टीत झालेले नाहीत. प्रायोगिक नाटकांसाठी यंदाचा उन्हाळा तापदायक ठरला आहे. नाटकांच्या विविध प्रवाहांमध्ये प्रायोगिक रंगभूमीचे महत्त्व वेगळे आहे. राज्यात प्रायोगिक चळवळ कमी झालेली असताना पुणे शहर या चळवळीसाठी आशेचा किरण आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील प्रायोगिक रंगभूमीचे चित्र निराशाजनक राहिले आहे. पुण्यामध्ये आसक्त, नाटक कंपनी, रंगदृष्टी, रंगभाषा या नाटक संस्था विविध प्रयोग करत असतात; तसेच अनेक कलावंत प्रायोगिक रंगभूमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र गेले सहा महिने मोठ्या संख्येने प्रयोग झालेले नाहीत. त्यातच विविध महोत्सवांच्या माध्यमातून जागतिक अभिजात चित्रपट पुण्यात पाहायला मिळत असताना नाटकाच्या बाबतीत या विषयात निराशाच पदरी येत आहे. कलाकारांना किंवा नाट्य रसिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटके पाहायला मिळत नसल्याने तसेच मराठीतूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर नाटक जात नसल्याने जागतिक रंगभूमीपासून मराठी रंगभूमी अद्याप कोसो दूर राहिली आहे. गेल्या वर्षभरात पूर्णतः परदेशी नाटकाचा प्रयोग पुण्यात झालेला नाही. तर मराठी प्रायोगिक नाटकाचे हातावर मोजण्याइतपतच प्रयोग परदेशात होऊ शकले आहेत. प्रायोगिक नाट्य चळवळीतील कलावंतांनी यास दुजोरा देत प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगाचे प्रमाण कमी झाल्याचे मान्य केले. 'प्रायोगिक नाटकांचे प्रयोग काही प्रमाणात कमी झाले आहेत. प्रायोगिक चळवळीवर कलाकाराला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. त्यामुळे वेगळे मार्ग शोधून पुन्हा प्रयोग करावे लागतात. प्रायोगिक चळवळ पुण्यापुरती राहिली असली, तरी मुंबईमध्ये पुन्हा काम होत आहे. सशक्त नाटकांची निर्मिती होण्यासाठी चांगल्या जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. कलाकारांनी प्रयोग करायचे आणि त्यासाठी जागा शोधायच्या, या विचित्र परिस्थितीमुळे प्रयोगांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रायोगिक नाटकांना काही वेळ जावा लागतो; पण बऱ्याच दिवसांत प्रयोग होताना दिसलेले नाहीत,' असे निरीक्षण 'आसक्त'चे आशिष मेहता यांनी 'मटा'शी बोलताना नोंदवले. प्रसाद वनारसे रसिकांपर्यंत जाऊन प्रयोग करत आहेत. रिंगणसारखी चळवळ उभी राहिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'टप्प्याटप्प्याने प्रयोग होत आहेत. प्रायोगिकसाठी काही वेळ जावा लागतो,' असे मत युवा नाटककार धर्मकीर्ती सुमंत याने व्यक्त केले.

सुदर्शन रंगमंच दोन महिन्यांनी सुरू प्रायोगिक रंगभूमीचे हक्काचे केंद्र मानले जाणारा सुदर्शन रंगमंच सुमारे दोन महिन्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे 'सुदर्शन' बंद ठेवावे लागल्याने त्याचा फटका प्रायोगिक चळवळीला बसला आहे. या दरम्यान टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात काही प्रयोग झाले. मात्र सुदर्शनला जाणारा रसिक वर्ग ठरलेला असतो. रस्त्याच्या कामामुळे या वर्गाला प्रयोगांपासून मुकावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनोळखी व्यक्तीच्या खुनाला फुटली वाचा

$
0
0

दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या आठवड्यात जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराजवळ सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचे गूढ उकलण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. खून झालेली व्यक्ती लष्करात लान्स नाईक म्हणून नोकरीस आहे. ओळख नसताना दारू पिण्यासाठी घेऊन गेल्यानंतर पैशांसाठी दोन सराईत गुन्हेगारांनी त्यांचा निर्घूनपणे खून केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
संजय लक्ष्मण लवंगे (वय ३९, रा. पोफळी, ता. मोताळा. जि. बुलडाणा) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रतीक अशोक हाके (वय २९, रा. ४४२, नाना पेठ) आणि अमित प्रफुल्ल सदनकर (वय २१, रा. रास्ता पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. २० मे रोजी जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराजवळ जळालेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांच्या अहवालावरून दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. बाटल्यांवरील बॅच क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या बाटल्या कोणत्या दुकानातून विकल्या गेल्या आहेत याचा शोध घेण्यात आला. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. दारू विकत घेताना आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. आरोपींपैकी प्रतीकचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी तो कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर खूनाचे गुढ उकलले. आपण आणि अमित सदनकर याने खून केल्याचे कबूल केले.
मयत लवंगे हा लष्करात नोकरीस आहे. आरोपी बुधवार पेठेत दारू पिण्यास बसले होते. आरोपी आणि लवंगे यांची ओळख नसतानाही त्यांनी दोघांना दारू पिण्यास बोलविले. निवांत बसून दारूचा आस्वाद घेण्यासाठी ते जनता वसाहत येथे गेले. पिताना लवंगे यांच्या खिशातून एटीएम कार्ड बाहेर पडले. आरोपींना पैशांचा मोह सुटला. त्यांनी एटीएम ताब्यात घेऊन पासवर्ड विचारला. मात्र, लवंगे यांनी तो देण्यास नकार दिला. त्यामुळे अमित आणि प्रतीकने त्यांच्या डोक्यात बाटल्यानी जबर मारहाण करत खून केला. त्यानंतर गाडीतील पेट्रोल काढले आणि त्यांच्या चेहरा जाळला. हाके आणि सदनकर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
..
वाढदिवसासाठी घेतली होती सुट्टी
संजय लवंगे यांचा २० मे रोजी वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी १९ मे पासून नऊ दिवसांची सुट्टी घेतली होती. सुट्टीबाबत गावाकडे काही सांगितले नव्हते. गावी जाऊन पत्नीला सरप्राइज देणार होते. मात्र, दारूने त्यांचा घात केला. लवंगे हे घोरपडी पेठ येथील ईएमई येथे लान्स नाईक म्हणून नोकरीस होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शकांना कलातीर्थ पुरस्कार

$
0
0

पुणे : थर्ड बेल एंटरटेन्मेंटच्या वतीने देण्यात येणारे कलातीर्थ पुरस्कार जाहीर झाले असून यंदा नाट्य व चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शकांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, विजय केंकरे, मंगेश कदम, मंदार देवस्थळी, केदार शिंदे, सतीश राजवाडे, समृद्धी पोरे, उमेश कुलकर्णी, राजेश देशपांडे, हेमंत देवधर या दिग्दर्शकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. 'कलातीर्थ दिग्दर्शन गौरव पुरस्कार' असे पुरस्काराला नाव देण्यात आले आहे. २८ मे रोजी रात्री ९.३० वाजता अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये हा सोहळा होणार असून ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. डॉ. सतीश देसाई या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजेसाठी मुलगी मागणारे गजाआड

$
0
0

बारामती तालुक्यातील प्रकार; पोलिसांत गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, बारामती
दैवीशक्तीची पूजा करण्यासाठी अल्पवयीन मुलीच्या वडिलांना प्रलोभन दाखवून तिची मागणी करणाऱ्या सहा जणांविरोधात बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांविरोधात 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक आणि उच्चाटन अधिनियम २०१३'अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली.
तरडोली जवळील धायगुडेवस्ती येथील पंधरा वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली. नाना मारुती कोळेकर (रा. मासाळवाडी, ता. बारामती), दिगंबर बापूराव भापकर, महादेव बाजीराव भापकर (दोघेही रा. लोणी भापकर, ता. बारामती) भाऊसो ग्यानबा सोनवलकर (मूळ रा. ढेकळवाडी, ता. बारामती, सध्या रा. लोणी भापकर, ता. बारामती), पोपट शिवराम नाळे (रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा) आणि विकास दादाराम मोहिते (रा. केंजळ, ता. वाई, जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेले असता आरोपी कोळेकर फिर्यादीचे नातेवाइक असल्याचा बनाव करून घरी गेले. नातेवाइकाकडे पूजा असून, त्यासाठी सहा फुटांपेक्षा अधिक उंची असणाऱ्या मुलीची गरज असल्याचे सांगितले. एका दिवसासाठी मुलगी ​पूजेसाठी दिल्यास बदल्यात सात ते आठ तोळे सोने आणि दोन लाख रुपये रोख देऊ असेही आरोपीने सांगितले. त्यामुळे फिर्यादी आणि आरोपीत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी मुलीच्या मागणीचा पाठपुरावा चालूच ठेवला. आरोपींच्या हेतु​विषयी शंका आल्याने मुलीच्या वडिलांनी मंगळवारी (२४ मे) पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्या अनुषंगाने चौकशी करून पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.
मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, भारत विठ्ठलदास, नेताजी खंडागळे, बाळकृष्ण भापकर आदींनी तरडोली येथे धायगुडेवस्तीवर जाऊन संबंधित मुलीची आणि तिच्या पालकांची भेट घेतली. या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत झाले होते. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन थेट वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे गाठले. दोनशेहून अधिक ग्र्रामस्थांचा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमला. गंभीर प्रकार असतानाही गुन्हा दाखल का केला जात नाही, असा सवाल जाधव यांनी केला. आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याशिवाय पोलिस ठाणे सोडणार नसल्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
-----------
तपासाधिकारी बदलले
या प्रकरणी २४मे रोजी अर्ज दाखल झालेला असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुरुवारी (२६मे) गुन्हा दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून तपास काढून घेऊन बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images