Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सराईत चोरट्यांकडून घरफोड्यांचा माल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन सराईत चोरट्यांना गजाआड करण्यात आले असून, त्यांच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीच्या सात गुन्ह्यांतील सव्वा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शांतीनगर सोसायटी नेहरू रोड टिंबर मार्केट केरिंग हॉस्पिटलसमोरील प्लायएज या दुकानात चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी राजेश जैन यांनी फिर्याद दाखल केली होती. खडक पोलिस तपास करत होते. पोलिस कर्मचारी इम्रान नदाफ यांना चोरट्यांविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गाडीखाना पीएमटी बसस्टॉप शिवाजी रोड येथे सापळा रचून मंगेश संजय पवार (वय १९ रा. मरळनगर, कोंढवाखडी मशिन), सलमान हमीद शेख (वय १८, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द), बिकास अशोक त्रिपाठी (वय १९ रा. सिखरापूर, उत्तर प्रदेश) या तिघांना अटक करण्यात आली. पवार आणि शेख या दोघा आरोपींकडून घरफोडीचे चार अन्य गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
​त्रिपाठीला सिखरापूर, आझमगड येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून शुक्रवार पेठेतील गणेश मित्र मंडळ चिंचेची तालीम पुणे येथील गणपती मंदिराच्या दानपेटीतून चोरीला गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच गंजपेठ येथून वाहनचोरी केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी ​शिर्के, तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, पोलिस कर्मचारी सुरेश सोनवणे, एकनाथ कंधारे, विजय कांबळे, महेंद्र पवार, सर्फराज शेख, इम्रान नदाफ, प्रदीप शिंदे, अनिकेत बाबर, दीपक धाबेकर, अशोक माने यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एसएमएस’वर घ्या मालमत्तेची माहिती

$
0
0

Sujit.Tambade@timesgroup.com

पुणे : एखादी मालमत्ता खरेदी करायची आहे आणि त्या मालमत्तेची कागदपत्रे; तसेच मालमत्तेचा मालक खरा आहे की खोटा, हे तपासणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नवीन कम्प्युटर सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यावरून मोबाइलवर एसएमएस पाठवून नागरिकांना मालमत्तेबाबत माहिती दिली जाणार आहे. या सेवेमुळे आता मालमत्ता खरेदी-विक्रीतील फसणवुकीचे प्रकार कायमचे बंद होणार आहेत.

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संबंधित मालमत्ता कोणाची आहे, कागदपत्रे खरी आहेत का, असे प्रश्न नागरिकांना पडतात. त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी या नवीन प्रणालीचा उपयोग होणार आहे. त्यानुसार नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून मोबाइल क्रमांक देण्यात येणार आहे. त्या मोबाइलवर मालमत्ता खरेदी करणाऱ्याने त्याचे नाव आणि खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेची माहिती एसएमएस करून द्यायची आहे. ती माहिती ​दिल्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून दिलेल्या माहितीच्या आधारे मालमत्तेचा सध्याचा मालक कोण आहे, या बाबत तपासणी करून एसएमएस पाठवला जाणार आहे. त्यामुळे मालमत्तेबाबतची कागदपत्रे खरी आहे का, हे नागरिकांना घरबसल्या समजणार आहे.

'या सेवेमुळे मालमत्ता खरेदी आणि विक्रीतील गैरप्रकारांना आळा बसेल; तसेच फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल,' अशी मा​हिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामस्वामी यांनी सांगितले. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी मालकीहक्कात झालेले बदल तपासणे आवश्यक असते. यापूर्वी नागरिकांना संबंधित कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागत होती. आता www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवरून नागरिकांना मालमत्तेचा सर्च रिपोर्ट घेता येतो.

मालमत्ता क्रमांक किंवा दस्ताच्या क्रमांकावरून यापूर्वी झालेले व्यवहार पाहता येतात. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने 'आय सरिता' या सॉफ्टवेअरद्वारे प्रॉपर्टीच्या दस्त नोंदी ऑनलाइन बघण्याची व्यवस्था २०११पासून सुरू केली आहे. या सेवेद्वारे २००२ पासूनच्या नोंदी नागरिकांना ऑनलाइन बघता येतात. त्यानंतर आता १९८५ पासूनच्या दस्त नोंदी बघण्याची सुविधाही देण्यात येत आहे.

या विभागाकडून नोंदवलेले दस्त 'डिजिटल लॉकर'मध्ये ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे नोंदणी झालेल्या मालमत्तांची माहिती या विभागाकडे आहे. नागरिकांनी मोबाइलवर एसएसएस पाठवल्यानंतर त्या माहितीच्या आधारे मालमत्तेची पडताळणी करून या विभागाकडून एसएमएस पाठवून अद्ययावत माहिती पुरवली जाणार आहे.


अशी मिळणार माहिती

नागरिकांना ९७६६८९९८९९ या क्रमांकावर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये मालमत्तेचा सर्व्हे क्रमांक किंवा दस्त क्रमांक द्यावा लागेल. त्याद्वारे या विभागाकडून संबंधित मालमत्तेचा सध्याचा मालक कोण आहे, या बाबतचा एसएमएस पाठवला जाणार आहे.

नागरिकांना मालमत्तेची एसएमएसद्वारे माहिती पाठवण्याच्या सेवेची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. एक आठवड्यानंतर नागरिकांना या सेवेचा लाभ मिळू शकणार आहे.
डॉ. एन. रामस्वामी नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायपनिंग चेंबरला अद्याप मुहूर्त नाहीच

$
0
0

आंबा हंगाम संपण्याच्या मार्गावर; बाजार समितीचा कारभार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
हंगाम संपत आला तरी, आंबा पिकविण्यासाठी आवश्यक रायपनिंग चेंबरची सुविधा उभारण्यास पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती अपयशी ठरली आहे. हंगाम संपत असताना बाजार समितीला उशिरा जाग आली असून, येत्या दोन दिवसांत चेंबर सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करण्यास बंदी आहे. त्याऐवजी रायपनिंग चेंबरचा वापर करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी आंबा पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे मागणी केली होती. त्यावेळी केळी बाजाराच्या मुख्य कार्यालयाच्या तळमजल्यावर रायपनिंग चेंबर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आंब्याचा हंगाम संपत आला तरी रायपनिंग चेंबर उपलब्ध न झाल्याने व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त कऱण्यात येत आहे.
अखेर स्प्रेच्या माध्यमातून आंबा पिकविण्याशिवाय व्यापाऱ्यांकडे पर्याय राहिला नाही. सध्या उभारण्यात येत असलेल्या रायपनिंग चेंबरची दहा ट्रकमधील आंब्याच्या पेट्या अर्थात दोन हजार पेट्यांची क्षमता आहे. परंतु, हंगामात दररोज तीन ते पाच हजार रत्नागिरीच्या आंब्याच्या पेट्यांची आवक होते. आवकेच्या तुलनेत कमी क्षमतेचे रायपनिंग चेंबरची सुविधा अपुरी ठरणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
रायपनिंग चेंबरचे काम पूर्ण झाले आहे. चेंबरमध्ये आवश्यक त्या मशिन अद्याप कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत. त्या कार्यान्वित करण्याचे काम अजून सुरूच आहे. तांत्रिक बाबींमुळे हे काम रेंगाळले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण क्षमतेने रायपनिंग चेंबर सुरू होईल. या वर्षी उपक्रमाला थोडा उशीर झाला असला तरी, पुढील वर्षी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दिलीप खैरे यांनी सांगितले.
..
बाजार समितीच्या आवारात अद्याप रायपनिंग चेंबर सुरू झालेले नाही. ते लवकरात लवकर सुरू होईल.
भूषण तुपे, उप प्रशासक, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्यूसबारमध्ये खून; आरोपीला बेड्या

$
0
0

डेक्कन पोलिसांची कामगिरी; किरकोळ वादातून घेतला जीव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
घोले रोड परिसरातील ज्युस सेंटरमध्ये सहकारी कामगाराचा झोपेतच धारदार सुऱ्याने गळा चिरून पसार झालेल्या आरोपीला डेक्कन पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.
बळीराम अशानंद तिवारी (वय १९, रा. पाटणा, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुड्डू फकिरे गौतम (वय २०, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) याचा खून झाला आहे. या प्रकरणी दुकानमालक विशाल रमेश कटारकर (४२, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांचे घोले रोडवरील एमजेएम रुग्णालयासमोरील गल्लीत कृष्णा ज्यूसबार नावाचे दुकान आहे. कटारकर यांच्याकडे आरोपी तिवारी हा घटनेपूर्वी पाच ​दिवस रूजू झाला होता. कृष्णा ज्यूसबारशेजारी असणाऱ्या चहाच्या हॉटेलात मयत गुड्डूचे मित्र कामास आहेत. त्यांना भेटण्यासाठी गुड्डू येत होता. कटारकर यांनी गुड्डूलाही कामावर ठेवले. गुड्डू आणि बलिराम यांची ओळखही त्याच सुमारास झाली होती. दिवसभर काम करून दोघे ज्युसबारमध्ये झोपत असत. रविवारी रात्री तिवारी आणि गुड्डूमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी गुड्डूने त्याला लाथ मारली. त्याचा राग बळीरामला होता. त्यामुळे गुड्डू झोपेत असताना बळीरामने पहाटे अडीचच्या सुमारास सुरीने गळा कापून त्याचा खून केला. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारा ही घटना उघडकीस आली.
खुनाचा तपास गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिस करत होते. दरम्यान डेक्कन पोलिसांना तिवारी रेल्वेने बिहारमध्ये गेल्याची माहिती मिळाली. डेक्कन पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर पाटणा येथे गेले. तेथे दोन दिवस शोध घेऊन त्याला अटक केली. परिमंडळ एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, सहायक फौजदार शंकर कुंडले, पोलिस शिपाई प्रवीण पडवळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांनी अनुभवले होममेड आइस्क्रीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाढत्या उकाड्यापासून हमखास दिलासा देणारा पदार्थ म्हणजे आइस्क्रीम...उन्हाळ्यात दुकानांमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्याघरी उपलब्ध पदार्थांपासून गारेगार आइस्क्रीम बनविण्याच्या टीप्स पुणेकरांनी मिळवल्या.
निमित्त होते, 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे खास आयोजित 'होम मेड नॅचरल आइस्क्रीम मेकिंग कार्यशाळे'चे. २१ मे रोजी आयोजित या कार्यशाळेत श्रुती केतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. टेंडर कोकोनट, चिली आइस्क्रीम, जिंजर हनी, फ्रेश मँगो, चॉकलेट चिप, चिक्कू आइस्क्रीम, कुल्फी आणि कॅड-बी आदी आइस्क्रीमचे भन्नाट प्रकार या कार्यशाळेत उपस्थितांना शिकायला मिळाले. कार्यशाळेला 'मटा कल्चर क्लब'च्या सभासदांबरोबरच अन्य महिला आणि पुरुषांचा मोठा प्रतिसाद लाभला.
घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींना अन्य वस्तूंची जोड देऊन आइस्क्रीम बनविण्याच्या टीप्स केतकर यांनी दिल्या. दुकानात मिळणाऱ्या तयार आइस्क्रीममध्ये घालण्यात येणारे कृत्रिम पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात. त्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांपासून ताजे आइस्क्रीम बनविणे अतिशय सोपे असते, हे केतकर यांनी सोप्या कृतीद्वारे दाखवून दिले. 'ही कार्यशाळा खूपच माहितीपूर्ण आणि रंजक होती. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून आइस्क्रीम कसे बनवयाचे, हे यातून समजले. मी आता शिकविण्यात आलेल्या कृती घरी नक्कीच करून पाहीन, ' अशी प्रतिक्रिया सहभागी झालेल्या देवयानी रास्ते यांनी दिली. 'या कार्यशाळेत आम्हाला वेगळ्या पद्धतीची आइस्क्रीम घरच्याघरी कशी बनवायची, हे शिकता आले. त्यामुळे आता होममेड आईस्क्रीमची चव चाखायला अधिक मजा येईल,' असे सानिका सरनाईक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या गुरुवारी पुण्याचे पाणी बंद

$
0
0

बुधवारी, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (२६ मे) संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. बुधवारी (२५ मे) आणि शुक्रवारी (२७ मे) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, सातारा रोड, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्त नगर, भारती विद्यापीठ, सेमिनरी झोनवरील मिठा नगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.

चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, राम नगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंद नगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्त नगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

नवीन होळकर : विद्या नगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताणामुळेही वाढतो स्किझोफ्रेनिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्किझोफ्रेनिया' हा आजार नियंत्रणात राहणारा असला तरी तो पूर्णतः बरा होत नाही. अनुवांशिकतेमुळे हा आजार काही प्रमाणात होत असला तरी सध्याच्या बदलत्या जीवनशैलीतील वाढत्या तणावामुळे 'स्किझोफ्रेनिया'च्या आजारात भर पडत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले.

जागतिक 'स्किझोफ्रेनिया' दिन आज, मंगळवारी (२४ मे) जगभर पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने 'स्किझोफ्रेनिया'च्या आजारासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञांनी काही निरीक्षणे नोंदविली. 'जगण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे मनोरुग्ण चिडतो हे इतरांनी समजून घेतले पाहिजे. विचारांची मालिका शाबूत नसल्याने इतरांसारखे काम करता येत नाही हे इतरांनी लक्षात घ्यायला हवे. त्याच्या क्षमतेनुसार योग्य काम शोधले पाहिजे. स्किझोफ्रेनियाच्या पेशंटशी वागताना इतरांनी समजूतदारपणा दाखवायला हवा. ताणतणावामुळे स्किझोफ्रेनिया वाढतो असे नाही. मात्र, ज्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेल्या आहेत त्यांना बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या ताणतणावामुळे स्किझोफ्रेनिया होण्याची स्थिती निर्माण होते,' अशी माहिती ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी दिली.

मेंदूचा हा विशिष्ट आजार आहे. मेंदूतील होणारे बदल हे प्राथमिक कारण आहे. 'स्किझोफ्रेनिया' होण्याचे अनुवंशिकता हे कारण समजले जाते. परंतु, ते संपूर्णपणे कारणीभूत ठरत नाही. ताणतणाव वाढत असला तरी पेशंटचे प्रमाण वाढते असे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून निदान होत असल्याने 'स्किझोफ्रेनिया'बाबत जागृती वाढत आहे, याकडे डॉ. लुकतुके यांनी लक्ष वेधले.

'स्किझोफ्रेनिया हा आयुष्यभर मानसिक आजार आहे. अनुवंशिकतेमुळेच हा आजार होत असून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे 'स्किझोफ्रेनिया'चा आजारात वाढ होण्यात अधिक भर पडत आहे,' असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. 'प्रत्येकाविषयी संशयी वृत्ती, मित्र, पत्नी, बायको किंवा कुटुबांतील इतरांविषयी शंका घेणे. सर्वांशी वेगळे होणे तसेच आपल्याला आजार झाला आहे मुळात जाणीव नसते. त्यासाठी उपचार घ्यायला तयार होत नाहीत. त्यांच्याविरोधात बोलले तरी ती व्यक्ती त्यांच्या अंगावर जाते. लोकसंख्येच्या एक टक्के 'स्किझोफ्रेनिया'च्या पेशंटचे प्रमाण आहे. हा आजार बरा होऊ शकत नसला तरी त्याच्यावर नियंत्रण मिळविता येते. अनुवांशिकता जरी असले तरी पालकांकडून मुलाला आजार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असू शकते तर पूर्वीच्या पिढीकडून हा आजार होण्याची १० टक्के शक्यता असते,' असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.

'स्किझोफ्रेनिया'ची लक्षणे

पेशंट एकटा स्वतःशीच बडबडतो. हातवारे करतो. कुटुंबीयांशी वार्तालाप कमी करतो. अचानक राग येतो. पुरेशी झोप न होणे. आजूबाजूंशी मिसळत होत नाही. अचानक हिंसक होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांत सुपर कम्प्युटरचे उत्पादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सुपर कम्प्युटरच्या विकसनात भारताने स्वतःचे स्थान निर्माण केले असले, तरी सुपरच काय इतर कम्प्युटर्सच्या हार्डवेअर निर्मितीतही भारत अजूनही पिछाडीवरच आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांत आपण सुपर कम्प्युटर्सचे हार्डवेअरही विकसित करू शकू,' असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा यांनी सोमवारी व्यक्त केला.

पुणे दौऱ्यावर असलेल्या डॉ. शर्मा यांच्यासह माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगला (सी-डॅक) भेट दिली. विभागाचे अन्य संचालक संजीव मित्तल, आर. बालानी आणि कविता भाटिया यांच्यासह डॉ. शर्मा यांनी सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत याबाबत सविस्तर चर्चा केली. त्याची माहिती डॉ. शर्मा यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

डॉ. शर्मा म्हणाल्या, 'भविष्याच्या दृष्टीने भारताला आपली सुपर कम्प्युटिंग क्षमता आणखी वाढवावी लागेल. त्यात हार्डवेअरचाही समावेश आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून येत्या दोन वर्षांत आपण सुपर कम्प्युटर्ससाठीचे हार्डवेअर विकसित करू शकू. त्याचबरोबर आपण इतरांसाठी सॉफ्टवेअर विकसित करत असल्याने पेटंट्स किंवा बौद्धिक संपदा हक्क मिळविण्यातही आपण कमी पडतो. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बौद्धिक संपदा हक्क मिळविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.'

सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'सरकारने भारतातच सुपर कम्प्युटरचे उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्या संदर्भात ही बैठक झाली. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करून भारतात अधिकाधिक सुपर कम्प्युटर कसे विकसित करता येतील, याबाबत चर्चा झाली. भारतात मोठ्या प्रमाणावर कम्प्युटरायझेशन झाले आहे. सरकार लोककल्याणासाठी विविध योजनाही राबवत आहे. त्यातून प्रचंड मोठा माहितीसाठा तयार होत आहे. सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून आपण या माहितीसाठ्याचे योग्य विश्लेषण करून त्यातून काही ट्रेंड्स काढू शकतो. त्याद्वारे योग्य व्यक्तीपर्यंत योग्य माहिती कमीत कमी वेळेत पोहोचवणे शक्य होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्किझोफ्रेनिया’च्या पेशंटशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्ताने 'जन्मरहस्य' नाटकाच्या कलाकारांनी चैतन्य हॉस्पिटलच्या स्किझोफ्रेनियाच्या पेशंटची विचारपूस करीत त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जन्मरहस्य नाटकाच्या होणाऱ्या प्रयोगादरम्यान स्किझोफ्रेनियाच्या पेशंटसह पालकांचा आज, बुधवारी (२५ मे) गौरव करण्यात येणार आहे.
भाग्यश्री देसाई निर्मित आणि डॉ. आनंद नाडकर्णी लिखित 'जन्मरहस्य' नाटकामध्ये स्किझोफ्रेनिया या आजाराचे खरे रूप समोर आणले आहे. नाटकात आजाराच्या पेशंटच्या जीवनावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने भाग्यश्री देसाई, अमिता खोपकर, गुरुराज अवधानी या कलाकारांनी पेशंटबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्या आजाराचे स्वरूप जाणून घेतले. भाग्यश्री देसाई या वेळी म्हणाल्या, 'स्किझोफ्रेनिया आजाराला उपाय नाहीत; पण तो नियंत्रणात राहू शकतो. हेच जन्मरहस्य नाटकातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, नागरिकांमध्ये आजाराविषयीच्या चुकीच्या गैरसमजुती दूर करण्याचा आमचा मानस आहे.'
'सध्याच्या बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे स्किझोफ्रेनिया हा आजार वाढत चालला आहे. त्यामुळे अशा पेशंटची संख्या वाढत आहे. मेडिटेशन, मेडिकेशन आणि समुपदेशन या मार्गांनी आम्ही पेशंटला बरे करतो. येथून पेशंट बरा होऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान आम्हाला प्रेरणा देते,' असे चैतन्य हॉस्पिटलचे संचालक सुशोप्ती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या दलालास अटक

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे परराज्यातील मुलींना बोलवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. त्याच्या ताब्यातून दिल्ली येथील एका सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली आहे. चंद्रा बहादूर पुरी (वय २५, रा. गोल्डन कास्ट सोसायटी, तिसरा मजला फ्लॅट नं. ४२, खांदवेनगर, वाघोली, मूळ रा. आसाम) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस कर्मचारी नितीन तेलंगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चंद्रा पुरी हा परराज्यातील मुलींना कॉन्ट्रक्ट बेसवर बोलावून त्यांच्याकडून गोल्डन कास्ट सोसायटी येथे वेश्या व्यवसाय करून घेतो. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दिल्ली येथील सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली आहे. त्याच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्याच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी सुटका केलेल्या मुलीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, पाच दिवसांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर पुरीने बोलावून घेतले होते. पोलिस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची होस्टेलमध्ये आत्महत्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये डिम्प्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या रणजित चांडे (२३, रा. बारामती) याने होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (२४ मे) हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रणजितने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची परीक्षा सुरू झाली होती. दोन पेपर देखील त्याने दिले होते. दरम्यान, महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळूनच रणजित याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. तसेच, रणजित याला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. रणजित याचे कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार दिल्यावर दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे यंदाच्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या विविध भाषांमधील १० चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व आशय फिल्म क्लबच्या वतीने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या २७ ते २९ मे दरम्यान हा महोत्सव अर्काइव्ह थिएटर येथे पार पडणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार आणि विरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते. महोत्सवामध्ये हिंदी, मराठी, कोकणी, मल्याळम, तेलगू, बंगाली, मैथिली अशा भाषांमधील आठ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या चित्रपटांना यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महोत्सवात पुरस्कार मिळालेले दोन लघुपट देखील दाखवण्यात येणार आहेत. मैथिली भाषेमध्ये तयार करण्यात आलेला 'मिथिला माखन' हा पहिलाच चित्रपट पुणेकरांना या महोत्सवात पाहता येणार आहे. २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर तलवार या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरुवात होईल. २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचा समारोप होणार असून, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. मसान या हिंदी चित्रपटाने महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरलेल्या मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मगदूम यांनी सांगितले. महोत्सव सर्वांसाठी खुला असून, सर्व चित्रपट अर्काइव्ह थिएटर येथे दाखवण्यात येणार आहेत. तलवार (हिंदी), निर्णायकम् (मल्याळम), सांखचिल (बंगाली), एनिमी (कोकणी), कांचे (तेलगु), पिकू (हिंदी), मसान (हिंदी) यांसह औषध व पायवाट हे लघुपट दाखवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या बाहुबली हा दाक्षिणात्य चित्रपट अर्काइव्हमध्ये दाखल झाला आहे. अर्काइव्हमध्ये या चित्रपटाचे जतन केले जाणार आहे. बाहुबली हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये जतन केला जावा यासाठी प्रकाश मगदूम यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. त्यांनी त्वरित चित्रपटाची प्रत संग्रहालयाला दिली आहे. गेल्या वर्षभरामध्ये संग्रहालयामध्ये ३५० हून अधिक चित्रपट दाखल झाले असल्याचे मगदूम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासाच्या नावाखाली सहलीची टूर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सहलीची मजा लुटत असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाकडे दुर्लक्ष करीत सिक्कीम पाठोपाठ केरळ दौऱ्याची टूर निघाली आहे. त्याबाबतच्या ऐनवेळच्या प्रस्तावास मंगळवारी (२४ मे) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नऊ महिला नगरसेविका केरळ दौऱ्यावर जाणार असून, त्यासाठी पाच लाख रुपयांच्या अपेक्षित खर्चाला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. केरळमधील महिला बचत गटाचे काम, बाजारपेठेचे ज्ञान, संवाद कौशल्य, उद्योगाचे मार्गदर्शन याबाबतच्या अभ्यासासाठी नऊ ते १६ जून कालावधीत केरळ दौरा आयोजित करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या नेतृत्त्वाखाली सहा नगरसेविका सिक्कीम दौऱ्यावर आहेत. तर, महापौर शकुंतला धराडे यांच्या नेतृत्त्वाखाली १४ जणांच्या शिष्टमंडळाने नुकताच सिक्कीम दौरा पूर्ण केला आहे. महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असल्यामुळे 'अभ्यास' करण्याचे वेध सत्तारूढ पक्षाला लागले आहेत. त्या अनुषंगाने दौरे आयोजित करण्यावर भर देत असल्याची टीका होऊ लागली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले होते. त्या म्हणाल्या, 'राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी सिक्कीम येथील थंड हवेच्या ठिकाणी मजा करायला गेलेत. ही बाब निंदनीय आहे. शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यांची गाऱ्हाणी ऐकायला नगरसेवक आणि पदाधिकारी शहरात असणे गरजेचे आहे. परंतु, फुकटच्या पैशातून फिरण्याची चटक लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्याचे कारण सांगून फिरतात, ही बाब योग्य नाही.' त्या म्हणाल्या, 'एवढीच फिरायची हौस आहे तर तुमच्याबरोबर दुष्काळ भागात जा. तो अभ्यास शहरवासीयांच्या पाणीबचतीसाठी उपयोगी पडेल. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्त भागाला दिले आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करदात्या नागरिकांच्या पैशातून मौजमजा करतात, याचा निषेध व्यक्त व्हायला हवा.' या निषेधानंतर महापौर धराडे यांनी अभ्यास दौरे शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात, असा दावा केला होता. त्यानंतरही सिक्कीम आणि केरळ दौऱ्याची टूर निघाली आहे. त्याची कुजबूज पालिकेत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार राज्यातील दुष्काळी भागात फिरून मदतीचे आवाहन करतात. त्यांना दुष्काळाचे भयाण चित्र पाहून नीट झोप येत नाही. तर, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम नागरिकांच्या पैशावर अभ्यास दौऱ्याच्या नावावर मौजमजा करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सहलीसाठी भीक मागो आंदोलन' करणार आहे. बुधवारी (२५ मे) सकाळी दहा वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन होईल, असा इशारा शहरप्रमुख राहुल कलाटे आणि संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूड-विमानतळ बस रिकामीच

$
0
0

कोथरूड-विमानतळ बस रिकामीच

Harsh.Dudhe@timesgroup.com
पुणे : शहरातील नागरिकांना विमानतळावर जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मोठा गाजावाजा करून गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेली एक बस बंद पडण्याच्या स्थितीत आहे. हिंजवडी-विमानतळ बससेवेला उत्तम प्रतिसाद असला, तरी कोथरूड डेपो-विमानतळ बससेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच विमान प्रवाशांना प्रीपेड रिक्षा, खासगी टॅक्सींना प्राधान्य द्यावे लागत आहे.
विमानतळ-कोथरूड डेपो बससेवेला सुरुवातीच्या दिवसांत आठ फेऱ्या होत असत. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत गेल्याने या फेऱ्या कमी होत गेल्या. त्यामुळे सध्या केवळ एकच फेरी सुरू आहे. ही बससेवा देखील मार्गावरील प्रवाशांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. विमानतळावर ये-जा करणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि खासगी कंपन्यांच्या वाहतूक सेवेच्या तुलनेत ही बससेवा आरामदायक, वातानुकूलित, सुरक्षित आणि कमी खर्चिक असून देखील प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विमानतळ-हिंजवडी बससेवेला विमान प्रवाशांसोबतच हिंजवडी येथील आयटी पार्कच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आयटीयन्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपन्यांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पिकअप-ड्रॉप सेवेच्या तुलनेत ही सेवा स्वस्त आहे.
प्रवाशांसाठी विमानतळावर प्रीपेड रिक्षा स्टँड असून तो प्रवाशांसाठी चोवीस तास खुला आहे. या स्टँडवर २०० रिक्षांचा राबता असून, शहराच्या सर्वच भागांत सेवा दिली जाते. जवळच प्रीपेड टॅक्सी स्टँड असून त्यांच्याकडूनही २४ तास सेवा दिली जाते. तसेच विमामतळावर ओला, उबर यांसारख्या खासगी कंपन्यांच्या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोचे प्रकल्प धूळ खात

$
0
0

नगरपालिकेच्या नियोजनाअभावी नागरिक सुविधांपासून वंचित ​ संतराम घुमटकर, बारामती पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगरपालिका म्हणून बारामती नगर पालिकेकडे पहिले जाते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा मतदारसंघ. मात्र, विकासाचे मॉडेल असणाऱ्या याच बारामतीमध्ये बायोगॅस वीज निर्मिती प्रकल्प व संगणकीकृत जलशुद्धीकरण केंद्र हे दोन्ही प्रकल्प नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे लाखो रुपये खर्च करूनही धूळ खात पडले आहेत. बारामती शहरातील पाच टन शहरी जैविक घन कचऱ्यापासून या बायोगॅस प्रकल्पात वीज निर्मिती केली जात असे. या प्रकल्पासाठी ८८ लाख रुपये खर्च करूनही आठ महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. मात्र, प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी अंदाजे १० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सूत्रांनी 'मटा'ला सांगितले. प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवर १२० खांबावरील २५० वॅटचे बल्ब चालतात. या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता दर दिवशी ३६ किलोवॅट आहे. हा प्रकल्प सुरू राहिल्यास शहरातील ५ टन कचऱ्याची विल्हेवाट लागते. बारामतीमधील नागरिकांना शुद्ध पाणी देण्याच्या उद्देशाने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढाकार घेतल्याने सन २००९ मध्ये २ कोटी ९१ लाख ०५ हजार रुपये खर्च करून ६.५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. नगरपालिकेच्या नियोजनाअभावी हा दुसरा प्रकल्प तीन महिन्यांपासून धूळ खात पडला आहे. सध्या हा प्रकल्प चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर सुरू आहे. संगणकीकृत जलशुद्धीकरण केंद्रावर कुशल कामगार नसल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेबाबत बारामतीकरांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगणकीकृत जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद आहे; मात्र पिण्याचे पाणी शुद्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे, तर हे दोन्ही प्रकल्प मनुष्यबळ नसल्यामुळे बंद असल्याचे पालिका प्रशासनाने 'मटा'ला सांगितले. ----------- जलशुद्धीकरण केंद्र आठ दिवसांत सुरू केले जाईल; तर बायोगॅस प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल. - नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका ------------ बारामती नगरपालिका प्रशासन व नगरसेवक यांना जनतेशी काही घेणे देणे नाही. काम आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळाले पाहिजे, या त्यांच्या अट्टाहासापायी हे दोन्ही प्रकल्प बंद पडले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरसेवकांनी व प्रशासने कामे करायला हवीत. - तानाजी दळवी, रहिवासी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीक कर्जवाटप वेळेत करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या एकूण पीक कर्ज वाटपातील राष्ट्रीयीकृत बँकांचा पूर्वीचा वाटा ३० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मे अखेरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरवून दिलेल्या ७० टक्क्यांपैकी किमान ४० टक्के पीक कर्ज वाटप करणे गरजेचे आहे. मात्र, आजमितीस केवळ १० टक्केच कर्ज वाटप झाले असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज देऊन दिलासा द्यावा, असे आवाहन राज्य सरकारच्या 'वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन'चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी नुकतेच केले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक तिवारी यांनी कृषी आयुक्तालयाच्या सभागृहात घेतली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस कृषी संचालक के. व्ही. देशमुख, डॉ. एस. एल. जाधव, डॉ. एस. एस. अडसूळ, प्रकाश अडागळे उपस्थित होते. पूर्वी जिल्हा सहकारी बँकांचा पीक कर्ज वाटपातील हिस्सा ७० टक्के होता. तो आता ३० टक्के करण्यात आला आहे, असे सांगून तिवारी म्हणाले, 'राष्ट्रीयीकृत बँकांना मे अखेरपर्यंत ७० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातही पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच इतर कारणांमुळे किमान ४० टक्के पीक कर्ज वाटप ३१ मेपर्यंत होणे गरजेचे होते. मात्र केवळ १० टक्क्यांपर्यंतच पीक कर्ज वाटप झाले आहे.' मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव, सहकार विभागाचे प्रधान सचिव, आरबीआय, 'नाबार्ड'चे वरिष्ठ अधिकारी आदींची बैठक घेऊन जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप होईल, यासाठी वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही या बँकांचा प्रतिसाद सकारात्मक नाही. शेतकऱ्यांकडून सर्च रिपोर्ट, थकबाकी नसल्याचा दाखला घेऊ नये, केवळ शपथपत्र चालेल; अशा सूचना असतानाही सर्च रिपोर्ट, थकबाकी नसल्याचा दाखला अशा गोष्टींसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. ३१ मे पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज न मिळाल्याने पेरणी करू न शकल्याने हतबल होऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास यास संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा तिवारी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉलिवूडला खुणावतोय जुन्नर परिसर

$
0
0

धर्मेंद्र कोरे, जुन्नर हिरवाईची मुक्त उधळण, पाच धरणांच्या पाण्याने आणलेली समृद्धी आणि हिरवाईची बहार, लेण्याद्री-ओझर तीर्थक्षेत्रांमुळे असलेली निवासाची सुयोग्य व्यवस्था अन् सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला परिसर या जुन्नर तालुक्यातील सृष्टीसौंदर्याची चित्रपटसृष्टीला जणू भुरळ पडली आहे. गेल्या दशकभरात हिंदी, तमिळ, मराठी चित्रपटांबरोबच अॅड फिल्म्सचे चित्रीकरण करण्यासाठी येथे जणू स्पर्धा असल्याचे चित्र आहे. उपेंद्र लिमये, संजय जाधव यांच्या 'सूरसपाटा' या सिनेमाबरोबरच नागेश भोसले याच्या 'संचार' या सिनेमाचे चित्रीकरण सध्या जुन्नरच्या शिवछत्रपती महाविद्यालयात तसेच निरगुडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या 'शेम टू शेम' सिनेमात ग्रामीण संस्कृतीचा वेध घेतला गेला, तो जुन्नर परिसरातून. त्यानंतर मंगेश हाडवळे यांचा 'टिंग्या', लक्ष्मण उतेकर यांच्या 'टपाल'चे चित्रीकरण जुन्नर तालुक्यात केले गेले. 'बिस्कीट' सिनेमाच्या प्रोमोचे चित्रीकरण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात झाले. अभिनेता गिरीश कुलकर्णींच्या 'देऊळ' सिनेमाच्या काही भागांच्या चित्रीकरणाबरोबरच 'क्रांतीवीर राजगुरु', ऊर्मिला मातोंडकरच्या अभिनयातून साकारलेल्या 'आजोबा'चेही चित्रीकरण जुन्नरच्याच परिसरात झाले. डिस्कव्हरी वाहिनीसाठी तयार केलेल्या 'शुगरकेन लेपर्डस' या मालिकेचेही चित्रीकरण येथे झाले आहे. शाहरुख खानचा सुपरहिट 'चलते चलते', 'रब ने बना दी जोडी', मणीरत्नम यांचा बिग बजेट सिनेमा 'रावण' यासाठी माळशेज घाटात मोठमोठे सेट उभारले गेले. अभिनेता अक्षयकुमारचा 'तीस मार खान', , त्यानंतर 'एक था विनाशक' या सिनेमांचे चित्रीकरणदेखील जुन्नर परिसरात झाले आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा हृतिक रोशन अभिनित 'मोहेंजोदडो', तमिळ चित्रपट 'आयन', मल्याळी चित्रपट 'वुरुंधी' याबरोबरच अनेक मोटार कंपन्या, मोटारसायकल, विमा कंपन्या, बँकांच्या अॅड फिल्म्सदेखील या भागात चित्रीत करण्यात आल्या आहेत. मुंबईपासूनची कनेक्टिव्हीटी, तुलनेने स्वस्तात उपलब्ध असलेली निवास व्यवस्था, आणि निसर्गसौंदर्याचा आविष्कार यामुळे दिग्दर्शकांची पावले या भागाकडे वळत आहेत. मुळातच शिवनेरी किल्ला, दोन अष्टविनायक गणपती स्थाने, मान्सूनसाठी तरुणाईला खुणावणारा माळशेज घाट, सातवाहनकालीन नाणेघाट यामुळे ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले यांचाही या चित्रीकरणात खुबीने वापर करून घेतला जात आहे. सध्या लोकप्रिय असलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचे लेखक-दिग्दर्शकही या भागात खास मालिकेच्या पहिले काही एपिसोड लिहिण्यासाठी जुन्नरमध्ये मुक्कामास होते. हा परिसर चित्रीकरणासोबतच लेखन आणि चिंतनासाठी पूरक असल्याचे 'झी'चे प्रोग्रामिंग हेड नीलेश मयेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळ्या झाडून केली सुभेदाराने आत्महत्या

$
0
0

लोहगाव एअरफोर्स येथील घटना; चौघांकडे अंगुलीनिर्देशन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोहगाव एअर फोर्स स्टेशनच्या 'आर्मी पोस्टल सर्व्हिसेस'मध्ये नेमणुकीस असलेल्या ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) म्हणून काम करणाऱ्या सुभेदाराने पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या ठिकाणी सुसाइड नोट आणि खासगी रिव्हॉल्वर पोलिसांना आढळून आली आहे. 'सुसाइड नोट' मध्ये सुभेदाराने चार व्यक्तींना आत्महत्येस जबाबदार धरले असून, विम्याचे क्लेम कुटुंबीयांना देण्याची विनंती केली आहे.
बी. अनंत सिंह (रा. उन्हा, हिमाचल प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या सुभेदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी आस्थापनेच्या ठिकाणी आर्मीची पोस्टल सर्व्हिस असते. त्यामध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून सुभेदार दर्जाचा अधिकारी काम पाहत असतो. लोहगाव एअर फोर्स येथील आर्मी पोस्टल सर्व्हिसेस येथे सिंह नेमणुकीला होते. लोहगाव एअर फोर्स येथे खोलीत ते एकटेच राहत असत. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या छातीमध्ये दोन गोळ्या लागलेल्या होत्या. ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. येथील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिस व एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
सिंह यांच्याजवळ पोलिसांना खासगी रिव्हॉल्वर मिळाले आहे. तसेच, त्यांनी लिहून ठेवलेली सुसाइड नोटही आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये त्यांनी सुरुवातीला कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे सर्व क्लेम कुटुंबीयांना देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर एअरफोर्समधील चार जेसीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांना मृत्यूस जबाबदार धरले आहे. या अधिकाऱ्यांचे देव कधीही भले करणार नसल्याचेही सुसाइड नोटमध्ये म्हटल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली.
..
लष्करी चौकशीला सुरुवात
या बाबत एअर फोर्सकडून प्रसिद्धपत्रक काढण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी प्राथमिक चौकशीत सिंह यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. सिंह यांच्या मृत्यूबाबत स्थानिक पोलिस आणि लष्कर पोलिस तपास करत असल्याचेही म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृह खाणावळीचे पुन्हा टेंडर काढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील खाणावळ चालविण्यासाठी मंजूर झालेले टेंडर रद्द करून फेरटेंडर काढण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी आग्रह धरल्याचे समोर आले होते. त्यातच पुन्हा फेरटेंडरचा निर्णय घेतल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
घोले रोडवर असलेल्या पालिकेच्या आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खाणावळीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आहे. यासाठी सर्वांत कमी म्हणजे २ हजार ९०० रुपये प्रती विद्यार्थी या दराने एका ठेकेदाराने टेंडर भरले आहे. मात्र, त्याला काम न देता ४ हजार रुपये दराने टेंडर भरणाऱ्या ठेकेदाराला देण्यासाठी स्थायीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके प्रयत्नशील होते. त्यासाठी बोडके यांनी वसतिगृहाचे व्यवस्थापक सोमनाथ बनकर यांना दमबाजी केल्याचा प्रकारही उघडकीस आला होता.
या प्रकारामुळे बोडके अडचणीत आले असतानाही मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत कमी रक्कमेचे टेंडर भरणाऱ्या ठेकेदाराला काम न देता फेरटेंडर काढण्याची उपसूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
फेरटेंडरच्या निर्णयाबाबत बोडके यांना विचारले असता, ते म्हणाले 'बैठकीत समाजकल्याण खात्याच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना जेवण द्यायचे असेल तर, १०० रुपयात ते देणे शक्य आहे का असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे निकषांनुसार फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी खाणावळीसाठी महापालिका ५० टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत होती. मात्र आता केवळ २५ टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून घेऊन ७५ टक्के रक्कम पालिका भरणार आहे.' कमी दराचे टेंडर रद्द करून समितीला वाढीव दराने टेंडर येणे अपेक्षित आहे का, या प्रश्नावर मात्र बोडके यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे समितीचा फेरटेंडरचा निर्णय संशयात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारशे कोटींचे ‘मिशन मान्सून’

$
0
0

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती म. टा. प्रतिनिधी, पुणे 'मान्सूनचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भू विज्ञान विभागाने 'मिशन मान्सून' हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मान्सूनचा अधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी लवकरच डायनॅमिक मॉडेल लागू करण्यात येईल,' अशी माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भू विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. डेंग्यू आणि मलेरियाची लस विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. हर्ष वर्धन यांनी देशभरातील निवडक पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. 'सध्या भारताच्या हवामान विभागाकडे दहा ते वीस दिवस व संपूर्ण मोसमाचा अंदाज देण्याचे कसब आहे. त्याद्वारे गेल्या दोन वर्षांत कमी पावसाचे अचूक भाकित हवामान विभागाने केले होते. सध्या स्टॅटॅस्टिकल मॉडेल व डायनॅमिक मॉडेल दोन्हीचा एकत्रित वापर केला जातो. मात्र, लवकरच यासाठी डायनॅमिक मॉडेलचा वापर सुरू केला जाईल,'असे चार डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. 'ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत देशातील १.१ कोटी शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषांमधून कृषी व हवामानविषयक इशारे-सल्ले मिळतात. कृषी-हवामान आधारित सेवांचा लाभ ४२ हजार कोटी रुपये इतका होता. गहू, तांदूळ, ऊस, कापूस उत्पादक या सेवांचे प्रमुख लाभार्थी आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देणाऱ्या यंत्रणेत आमूलाग्र सुधारणा झाली असून हैदराबादच्या ओशन इन्फर्मेशन सेंटरला युनेस्कोनेही प्रादेशिक त्सुनामी इशारा केंद्राचा दर्जा दिला आहे,' असेही ते या वेळी म्हणाले. कोयना धरणाच्या क्षेत्रातील भूकंपप्रवणतेच्या अभ्यासासाठी ४७५ कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली असल्याची माहिती हर्ष वर्धन यांनी दिली. 'विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्ट-अपना चालना देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत २०० विद्यार्थ्यांच्या अभिनव प्रकल्पांचे उद्योगात रूपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. संशोधनाच्या पाठ्यवृत्तीमध्ये मागील सरकारपेक्षा आम्ही ५० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. महिला वैज्ञानिकांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे,'असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. 'चांगल्या संधी, उत्तम वातावरण आणि प्रोत्साहनाअभावी देशातील हुशार संशोधक देशाबाहेर जाऊन 'ब्रेन ड्रेन'ची स्थिती निर्माण झाली होती. आता मात्र, सरकारने पोषक वातावरण, चांगल्या संधी आणि वेतनही देऊ केल्याने परदेशात गेलेले संशोधक भारतात पुन्हा परतू लागल्याने 'ब्रेन गेन'ची स्थिती निर्माण झाली आहे,'असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. 'पुण्यासह भुवनेश्वर, हैदराबाद आदी विज्ञान संशोधन संस्थांना निधी कमी असतो, उपकरणे बंद असतात, अशा तक्रारी काही पत्रकारांनी केल्या. मात्र आपल्यापर्यंत कोणतीही गाऱ्हाणी आली नसून निधीची उणीव नाही,'असा दावा डॉ. हर्ष वर्धन यांनी केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images