Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दैवीशक्तीच्या नावाने फसविणारा भोंदूबाबा अटकेत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे. माझ्या अंगात दैवीशक्ती आहे,' असे सांगून घरावरील करणी दूर करण्यासाठी महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदूबाबाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. रमजान शेख असे या अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही दिवसांपासून आजारी होती. त्याचवेळी या भोंदूबाबाने तिच्याशी संपर्क साधला आणि कोणीतरी तुमच्या घरावर करणी केली आहे. माझ्या अंगात दैवीशक्ती असून तुमच्या घरावर केलेली करणी मी दूर करू शकतो. त्यासाठी तुम्हाला सात वेळा माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. भोंदूबाबाच्या या मागणीला पीडित महिलेने नकार दिल्यावर त्या भोंदूबाबाने 'तुम्ही मी सांगितले तसे केले नाही तर तुमच्या घरावर संकट येईल आणि घरातील कोणीतरी मरेल आणि या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तुझ्या घरातील कुणाच्यातरी जिवावर बेतेल,' असे सांगत पैशाची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित बाबा काही दिवस गायब झाला होता. या काळआत पीडित महिलेच्या मैत्रिणीच्या देखील संपर्कात आला होता. या प्रकारानंतर काही महिन्यांनी महिलेने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन अध्यादेशानुसार गुन्हा दाखल केला होता. रविवारी भोंदूबाबाची माहिती मिळाल्यावर वाकड पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खेड तालुक्यातील खून प्रकरणाचा छडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खेड तालुक्यातील टाकळकरवाडीच्या परिसरात झालेल्या एका व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबीला) यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार जणांस अटक करण्यात आली आहे.

कुंडलिक संतू राक्षे (वय ३४, रा. राक्षेवाडी, ता खेड), रवी रमाकांत जाधव (वय २८, रा. जाधववाडी, नवलाख उंबरे, ता. मावळ), भरत काळूराम जैद (वय २८, रा. जैदवाडी, ता. खेड), सुरेश सहादू पडवळ (वय ४२, रा. नवलाख उंबरे, चावरस वस्ती, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेत दिगंबर बबन कोहिनकर (वय ३८, रा. कोहिनकरवाडी, ता. खेड, सध्या रा. ब्राह्मण आळी, राजगुरुनगर) यांचा टाकळकरवाडीजवळ चासकमान डाव्या कालव्यालगतच्या शेतात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केला होता. मयत कोहिनकर याची सासूरवाडी मावळ तालुक्यातील आहे. काही महिन्यांपूर्वी कोहिनकर अचानक गायब झाल्यावर ते हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी खेड पोलिसांत दिली होती. त्याच वेळी त्यांच्या सासूरवाडीतील एक विवाहित महिला हरवल्याची तक्रार मावळ पोलिसांत दाखल होती. त्यानंतर दोघेही सोबत पळून गेले होते. पण, नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला होता. या घटनेवरून पोलिसांनी धागेदोरे काढले. त्यावरून एलसीबीचे पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने आरोपींचा माग काढला. कोहिनकर याने आरोपींपैकी एकाच्या बहिणीला पळवून नेल्याने बदनामी झाल्याचा त्याच्या मनात होता. दोघांचा नातेवाईक असलेल्या एका व्यक्तीच्या मध्यस्थीने शुक्रवारी रात्री कोहिनकरला बोलावण्यात आले. चार आरोपी आणि मयत दोन दुचाकींवरून टाकळकरवाडीच्या हद्दीत गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने फसविणारे गजाआड

$
0
0

पुणे : दिल्ली येथील एका कॉलसेंटरमध्ये बसून कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन तरुणांना सायबर शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी आतापर्यंत देशातील ५५ ते ६० नागरिकांची ६५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सोनूसिंग रमेशसिंग (वय २५, रा. आझादनगर, पाणिपत हरियाणा), रमण राजेंद्रसिंग नेगी (वय २१, रा. सुभाषनगर, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोथरूड परिसरात राहणारे सतीश भास्कर मोरे यांना एप्रिल २०१६मध्ये एका व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने सिटी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना १५ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी मोरे यांना स्कॅन करून कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. दोन वर्षांनी मोरे यांना आरोपींनी फोन करून कर्ज मंजूर झाले आहे. प्रोसेसिंग फीससाठी दहा हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी एका बँकेच्या खात्यात पैसे भरले. आरोपींनी मोरे यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना कर्जासाठी ४५ हजार रुपये भरायला लावले. पण, त्यांना कर्ज दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ क्विंटल कांद्याचे उत्पन्न फक्त एक रुपया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
किरकोळ बाजारात कांद्याचा भाव एका किलोस १५ ते २० रुपये असताना, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नऊ क्विंटल कांदा विक्री केलेल्या एका शेतकऱ्याला शेतमालाच्या पट्टीमध्ये फक्त १ रुपया मिळाल्याची घटना पुण्यात घडली आहे. केंद्र सरकारने हमीभाव ठरवून न दिल्याने आणि घसरलेल्या किंमतींमुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

शिरूर तालुक्यातील वडगांव रासाई या गावातील शेतकरी मारुती परमाने यांनी १० मे रोजी मार्केटयार्डातील पल्लवी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे १८ गोणी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे एकूण वजन ९५२ किलो भरले. हा कांदा साधारण दर्जाचा असल्याने प्रति १० किलोस १६ रुपये म्हणजेच कांद्याच्या एका किलोस १ रुपया ६० पैसे इतका दर मिळाला. या मालाची एकूण रक्कम १५२३ रुपये २० पैसे इतकी झाली. त्यामधून आडत ९१ रुपये ३५ पैसे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रुपये ५५ पैसे, तोलाई ३३ रुपये ३० पैसे आणि मोटार भाडे आणि हुंडेकरी खर्च १३२० रुपये झाला. हा सर्व खर्च पट्टीतून कपात केल्यानंतर परमाने यांना फक्त एक रुपया मिळाला. आडतदाराने शेतकरी परमाने यांना त्यांच्या शेतीमालाची माल विक्री करून झालेली एक रुपये किमतीची पट्टी दिली आहे.

परमाने यांनी सुमारे १८ गोणी लहान आकारचा कांदा विक्रीसाठी पाठवला होता. हा कांदा सुमार दर्जाचा असल्याने त्यास कमी दर मिळाला. मात्र, त्यांच्या गावापासून मार्केटयार्डात कांदा दाखल होईपर्यंत लागलेला खर्च अधिक आहे. तसेच, संबंधित हुंडेकरीने पाठविलेल्या मेमोमध्ये अतिरिक्त ६०० रुपये आकारण्यात आले आहेत. त्यामुळे परमाने यांना एक रुपया मिळाला. प्रत्यक्षात हुंडेकरीने अतिरिक्त लावलेले ६०० रुपये परमाने यांनी घेतलेली उचल असावी किंवा ते बारदानाचे पैसे असावेत, असे आडते सुधीर जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा थरार अन् धुक्याने केली निराशा

$
0
0

Chaitrali.Chandorkar
@timesgroup.com

पुणे : संध्याकाळ उलटली तरी पाणवठ्यावर प्राणी का येत नाही... असे म्हणून खट्टू झालेल्या निसर्गप्रेमींच्या अंगावर अचानक सरकन काटा उभा राहिला. लपणाच्या जवळच त्यांना डरकाळी ऐकू आली होती... वनरक्षकाने खूण करूनच बिबट्या आला आहे, शांत बसा अशा सूचना दिल्या.. कुडकुडणाऱ्या थंडीतही त्यांना घाम फुटला.. पाऊण तास लपणाच्या जवळ बसलेल्या या बिबट्याने जंगलातला थरार काय असतो, याचा अनुभव निसर्गप्रेमींना दिला. दरवर्षीपेक्षा यंदाची गणना त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली.

निमित्त होते, वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभयारण्यातील प्राणिगणनेचे! अभयारण्यातील वन्यजीवांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमाशंकरमध्ये बुद्धपौर्णिमेला प्राण्यांची गणना करण्यात आली. या उपक्रमासाठी पुणे परिसरातील पन्नास निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. अभायरण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी शनिवारी दुपारी बैठक घेऊन गणनेबद्दल सर्वांना सूचना दिल्या. दुपारी चार वाजता सुरू झालेली ही गणना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता संपली. मचाण आणि लपणामध्ये बसून निसर्गप्रेमींनी प्राणी आणि पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या.

गणना करून आलेल्या प्राणिप्रेमींच्या वनाधिकाऱ्यांसोबत भरपूर गप्पा रंगल्या. आपल्यापेक्षा इतरांना कोणते प्राणी दिसले, याबद्दल सगळ्यांनाच कुतूहूल होते. काहींना रात्रभर बसून एकही प्राणी दिसला नाही, तर काहींना रात्रभराच्या तपश्चर्येनंतर पहाटे रमतगमत पाण्यासाठी आलेली रानडुक्करे पाहून समाधान मानावे लागले. काही प्राणीप्रेमींना भेकर, सांबर, ससे आणि शेकरूने दर्शन दिले. जंगलातील गूढ शांतता अनुभवणे हाच एक रोमांचकारी अनुभव असल्याचे मत प्राणीप्रेमींनी व्यक्त केले. बिबट्याच्या सहवासात पौर्णिमेचा थरार अनुभवलेला ग्रुप मात्र चर्चेत होता. बिबट्या कधी आला, कसा दिसला, किती वेळ होता, भीती वाटली का, अशा अनेक प्रश्नांचा त्यांच्यावर भडीमार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचे अभय

$
0
0

कायद्याचा मसुदा ऑनलाइन उपलब्ध: किरीट सोमय्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आपल्या भवितव्यासाठी पै-पै जमवून गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार कायदा करत आहे. या स्मॉल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अॅक्टचा मसुदा सध्या ऑनलाइन उपलब्ध आहे. या कायद्यामुळे चिटफंड, पॉन्झी कंपन्यांपासून छोट्या गुंतवणूकदारांचे संरक्षण होऊ शकेल,' अशी माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप सोमय्या यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. पालकमंत्री गिरीश बापट, पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण देशपांडे, उपाध्यक्ष रवींद्र साळुंके, धनंजय गायकवाड, अधिवेशनाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत पाठक, सचिव दुर्गाप्रसाद सैनी, ठकसेन पोरे, डॉ. वीणा पंडित आदी या वेळी उपस्थित होते.
'भ्रष्टाचार करणाऱ्या विविध व्यक्ती, कंपन्यांविरोधात मी आघाडी उघडली असताना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्‍यांकडून मला एकदाही अडवण्यात आले नाही,' असे सांगून सोमय्या म्हणाले, 'नागरिकांच्या व देशाच्या हिताविरोधातील व्यक्तींना सरकार सोडणार नाही. आज देशात १४८२ बोगस कंपन्या आहेत. या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी मी सिक्युरिटी अँड एक्सेंजेस बोर्डाकडे (सेबी) केली आहे. त्यानुसार सेबीने १२०२ कंपन्यांची यादी सरकारकडे कारवाईसाठी दिली आहे. तर २८० कंपन्यांवर स्वतः सेबी कारवाई करत आहे.' 'सरकारकडून एक पैसा लिटर दराने पाणी घेऊन ते किमान दहा रुपये लिटर दराने मिनरल वॉटर म्हणून विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यासाठी बोअरिंगच्या तसेच पिण्यास अयोग्य अशा पाण्याचाही सर्रास वापर सुरू आहे. मुंबईत फक्त दोनच कंपन्यांकडे पाण्याच्या व्यावसायिक वापराचा परवाना आहे,' असे सोमय्या यांनी सांगितले.
'राज्यात ग्राहकांना त्यांच्या हितासाठी संघर्ष करावा लागणार नाही. ग्राहकांशी संबंधित सर्व प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल,' असे आश्वासन बापट यांनी दिले. तर 'अन्न सुरक्षा कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत दोषींना तुरुंगवासाची शिक्षा असावी,' अशी मागणी देशपांडे यांनी केली.
...
बिल्डरांविरोधात देणार लढा
विविध ४० बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सोमय्या यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर बिल्डरांविरोधातील लढा मी सुरूच ठेवणार आहे, असे सांगतानाच या ग्राहकांची लवकरात लवकर मंत्री आणि आयुक्तांशी भेट घालून देण्याचे आश्वासनही सोमय्या यांनी दिले.
.......
मुंबई महापालिकेत पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून दररोज भ्रष्टाचार आणि माफियाराज सुरू आहे. हा माफियाराज संपविण्याचा विडा मी उचलला आहे.
किरीट सोमय्या, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या प्रश्नपत्रिका फुटल्या?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षांचा घोळ समोर असतानाच, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षांमध्येही गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे. इंजिनीअरिंगच्या सोमवारी होणाऱ्या पेपरचे प्रश्न व्हॉट्सअपवरून रविवारीच मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. शहरातील खासगी कॉलेजांमधील प्राध्यापकच त्यासाठीचे मेसेज पाठवत असल्याचेही या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षा वादात सापडल्या आहेत.

पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेत सोमवारी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा पेपर आहे. या पेपरचे संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना रविवारी सकाळीच मिळाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी 'मटा'ला दिली. तसेच, याच शाखेतील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीमचा पेपरही परीक्षेपूर्वीच लिक झाल्याची चर्चा असल्याचेही विद्यार्थ्यांनी रविवारी 'मटा'ला सांगितले.

याविषयी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका कॉलेजमधील प्राध्यापक पेपर सेटर्सच्या मदतीने परीक्षेत येणारे नेमके प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहेत. प्रश्नपत्रिका जशीच्या तशी बाहेर आल्यास, कारवाई होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन, संबंधित प्राध्यापक प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांच्या जोडीने काही अतिरिक्त प्रश्न विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात देत आहेत. यापूर्वीच्या परीक्षांमध्येही असा प्रकार अनुभवायला मिळाला असला, तरी त्याचे प्रमाण अगदीच मर्यादित स्वरूपाचे होते. यंदाच्या परीक्षेत मात्र व्हॉट्सअपच्या प्रभावी वापरामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रश्न पोहोचत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणावर या प्रकाराची चर्चा होत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

अभाविप तक्रार करणार

या प्रकाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तक्रार दाखल करणार असल्याची माहिती संघटनेच्या आनंद पुरोहित यांनी रविवारी दिली. संघटनेने आपल्याकडे आलेले पेपर या पूर्वीच डॉ. चव्हाण यांना पाठविले आहेत. मात्र त्याविषयी चव्हाणप यांच्याकडून रविवारी कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे सोमवारी विद्यापीठात जाऊन, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, ही तक्रार देणार असल्याचे पुरोहित यांनी 'मटा'ला सांगितले.

'चौकशी करून कारवाई'

या प्रकरणी विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या व्हॉट्सअप मेसेजची पडताळणी करणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी रविवारी रात्री सांगितले. विद्यार्थ्यांनी पाठविलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिका यांची पडताळणी केल्यानंतर या विषयीची विद्यापीठाची कारवाई निश्चित केली जाणार असल्याचेही त्यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी शाळाही डिजिटल रुपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या शालेय शिक्षण खात्याने आता राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेला स्वतःची वेबसाइट उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्याच्या शिक्षण खात्याचे वेबपोर्टल किंवा सरल वेबपोर्टलवर आता प्रत्येक सरकारी शाळाही आपल्या यू-डाएस क्रमांकाच्या आधारे स्वतःचे डिजिटल रूप अनुभवू शकणार आहे.

शिक्षण खात्याने गेल्या काही काळापासून आपले व्यवहार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून खात्याने 'सरल' या वेबपोर्टलच्या माध्यमातून शाळांची माहिती गोळा केली होती. याच माहितीच्या आधारे आता सरल वेबपोर्टल प्रत्येक शाळेला स्वतःची अशी डिजिटल ओळख देऊ पाहात आहे.

शिक्षण खात्याच्या https://education.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर शाळांच्या स्वतंत्र टॅबमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या टॅबवर क्लिक केल्यावर येणाऱ्या पर्यायांमध्ये स्कूल वेबसाइट हा पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये शाळेचा यू-डाएस कोड टाकल्यावर शाळेसाठीची माहिती एका वेबसाइटच्या रुपाने समोर येत आहे.

शाळेची मूलभूत माहिती, मान्यता, शाळेचा प्रकार, शाळेमध्ये उपलब्ध शिक्षक, विद्यार्थ्यांची परीक्षानिहाय कामगिरी, शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आवश्यक माहिती, वेगवेगळ्या समित्या, माहितीपत्रक, विविध स्पर्धा आणि त्यामधील कामगिरी, शाळेच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे रिपोर्ट कार्ड आदी माहिती या वेबसाइटवर सध्या पाहता येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलावांबाबत निष्काळजीपणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाण्याच्या टंचाईअभावी महापालिकेतर्फे चालविण्यात येणारे सर्व जलतरण तलाव बंद करण्यात आल्याचा दावा केला जात असताना शनिवारी मात्र पालिकेच्याच जलतरण तलावात एका कोवळ्या जीवाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. त्यामुळे, महापालिकेतर्फे नागरिकांची फसवणूक केली जात असून, जलतरण तलावाबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

शहरात काही महिन्यांपूर्वी पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच, उन्हाळ्याचे दिवस असल्याने जलतरण तलाव सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यावरून, टीका झाल्यानंतर महापालिकेने स्वतःच्या मालकीचे सर्व २१ तलाव बंद करत असल्याचे जाहीर केले. मात्र, तरीही ठेकेदारांच्या भल्यासाठी पालिकेचे मोजके तलाव सुरू ठेवण्यात आल्याची चर्चा होती. घोरपडे पेठेत शनिवारी झालेल्या अपघातामुळे त्यावर शिक्कामोर्तबच झाले असून, सर्व तलाव बंद केल्याचा पालिकेचा दावा फसवा असल्याची टीका केली जात आहे.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्चमध्ये सर्व जलतरण तलाव बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यापाठोपाठ, महापालिकेनेही शहरातील सर्व तलाव बंद करण्यात येतील, असे सुरुवातीला स्पष्ट केले. मात्र, काही दिवसांतच पाण्याचे स्रोत तपासून जलतरण तलाव सुरू ठेवता येतील, अशी भूमिका घेण्यात आली. महापालिकेचे २१ तलाव मात्र पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत बंद राहतील, असा पवित्रा पालिकेने घेतला. घोरपडे पेठेत पालिकेचाच तलाव असून, हा सुरू कसा राहिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने येथे आवश्यक खबरदारी घेतली जात नाही, अशी टीकाही केली जात आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी कार्निव्हलचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील खेळाडूंना आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 'टाइम्स ऑफ इंडिया पॉवर्ड बाय कॉर्पोरेट कार्निव्हल २०१६'चे आयोजन करण्यात आले आहे. 'फेअर सेन्स स्पोर्ट् स कन्स्ल्टन्सी मॅनेजमेंट अँड ट्विड्ल डिझायनोग्रॉफी' यांची संयुक्त संकल्पना असलेल्या या कार्निव्हलमध्ये वीस विभागांत सात विविध क्रीडाप्रकार, गायन आणि नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
कर्मचाऱ्यांमधील कामाचा ताण हलका करण्याबरोबरच कामातील व्यवस्थापनाचा समतोल साधण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. 'मटा कल्चरल क्लब' या उपक्रमाचा कल्चरल पार्टनर आहे. येत्या २८ मेपासून वाकड येथील 'क्लब २९' मध्ये हा महोत्सव रंगणार आहे. पुढील दोन आठवडे म्हणजेच ५ जूनपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत.
या उपक्रमामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील नामांकित कंपन्यांमधील विविध विभागातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सगळ्या विभागात मिळून सर्वाधिक बक्षि‍से मिळविणाऱ्या कंपनीला 'अल्टिमेट कॉर्पोरेट ट्रॉफी'ने सन्मानित करण्यात येणार आहे. कंपनीचे ओळखपत्र असलेला कोणीही कर्मचारी या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. उपक्रमाच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून अधिक माहिती इच्छुकांनी www.corporatecarnival.com या वेबसाइटला भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : तेजस सोहनी ९४२३०१२०७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिल्क स्ट्रिप’ ओळखणार भेसळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुधातील भेसळ तपासण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून 'मिल्क स्ट्रिप' विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे नागरिकांना घरबसल्या दुधातील घटक तपासता येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागाच्या कामाचा आढावा बापट यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी दुधातील भेसळ तपासता येणाऱ्या 'मिल्क स्ट्रिप'विषयी पत्रकारांना माहिती दिली.

'या 'मिल्क स्ट्रिप'मुळे दुधातील फॅट, साखरेचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण समजू शकणार आहे. 'मिल्क स्ट्रिप'मध्ये हे प्रमाण दाखवणारे वेगवेगळे रंग दर्शवण्यात येतात. सध्या चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही 'मिल्क स्ट्रिप' बाजारात उपलब्ध होणार आहे. याद्वारे नागरिकांना दुधातील भेसळ घरबसल्या तपासता येणार आहे,' असे बापट म्हणाले. 'उत्पादनाच्या पॅकिंगची तपासणी करणारी बारकोड ​सिस्टिमही राबवली जाणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यामुळे उसाचा रस, बर्फ आणि आइस्क्रिम यांचा वापर नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामधील भेसळ रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनेबाबत ते म्हणाले, 'उसाची गुऱ्हाळे, बर्फाच्या गाड्या, खवा, आइस्क्रिमच्या गाड्या यांच्या तपासणी करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे यामधील भेसळ रोखली जाणार आहे. औषधांची दुकाने तपासणीचे आदेशही अन्न आणि औषध प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुकाने तपासणीचे प्रमाण वाढले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत.'

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागाच्या कामकाजाविषयी ते म्हणाले, 'या विभागाने मार्च २०१६पर्यंत ४५ हजार ९७२ अन्न परवाने दिले असून, एक लाख ८१ हजार ८३८ नोंदणी प्रमाणपत्र मंजूर केले. त्यापोटी सुमारे ४१ कोटी ८५ लाख रुपये शुल्क वसूल झाले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींचे दर प्रदेशानुसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात लागू करण्यात येणाऱ्या डाळ नियंत्रण कायद्याअंतर्गत राज्याच्या वेगवेगळ्या भागात डाळीचे निरनिराळे दर निश्चित केले जाणार आहेत. यंदा राज्यामध्ये डाळीचे उत्पादन कमी झाले असल्याने डाळ उत्पादनात वाढ करण्यासाठी बियाणे, खते आणि औषधांवर अनुदान देण्याची नवीन योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येणार आहे, असे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी रविवारी सांगितले.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा बापट यांनी घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात लागू होणारा डाळ नियंत्रण कायदा आणि नवीन योजनांविषयीची माहिती दिली. 'राज्यात लागू होणाऱ्या डाळ नियंत्रण कायद्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असून, तो अंतिम मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. या कायद्यात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक भागात डाळीचे वेगवेगळे दर असणार आहेत. तज्ज्ञांकडून हे दर निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे डाळीचे जास्त उत्पादन होणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यात डाळीचे दर कमी असतील, तर अन्य भागात डाळीचे भाव जास्त असतील,' असे बापट म्हणाले.

डाळीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडून डाळ उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणारी नवीन योजना राबवली जाणार आहे. 'योजनेनुसार शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि औषधांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे,' असे बापट यांनी सांगितले.

'सध्या डाळीच्या साठ्यावर निर्बंध आहेत. याबाबत कडक धोरण स्वीकारण्यात आले आहे. डाळ ही प्रक्रियेसाठी मिलकडे दिल्यानंतर ती ४५ दिवसांत प्रक्रिया करून दिली पाहिजे. याबाबत बंधन घालण्याचे सरकारचे ठरवले आहे. महिनाभरात याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे,' अशी माहिती बापट यांनी दिली.

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी नुकतीच देशभरातील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत ते म्हणाले, 'ही बैठक आतापर्यंत वर्षातून एकदा घेण्यात येत असे. आता वर्षातून दोनवेळा घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये कडधान्य उत्पादन, अन्नधान्याचा साठा, वितरणव्यवस्था, गोडउन, जीपीआरएस सिस्टिम, कम्प्युटरायझेशन आदी विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत राज्यांनी डाळीचा बफर स्टॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.'

'डाळ आयात करताना संबंधित माल उतरवण्यात आलेल्या राज्याला पाच ते दहा टक्के डाळ देण्याबाबतही विचार सुरू आहे,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धानोरीमध्ये आयुक्तांकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे धानोरी कळस आणि लोहगाव परिसरात पूरस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान झाले होते. यंदा पुढील महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी धानोरी आणि कळस भागात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यात पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

लोहागाव आणि धानोरी भागाला गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला आलेल्या पावसाने झोडपून काढले होते. या पावसामुळे परिसरातील रस्ते, नाले तुडुंब भरून वाहिले होते. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन, गटारे तुडुंब भरले होती. पावसाचे पाणी वाहून जाण्यास रस्ता नसल्याने परिसरातील सोसायट्या आणि शेकडो घरांत पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. धानोरी भागातील अनेक नागरिकांनी आणि बिल्डरांनी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने जवळपास सर्वच ठिकाणी घरे आणि सोसायट्या पाण्याखाली गेल्याचे समोर आले. पाणी वाहून जाण्यसाठी रस्ताच नसल्याने बहुतांश रस्ते आणि सोसायट्यांची कुंपणे जेसीबीने तोडल्यानंतर मार्ग मोकळा झाला होता.

आयुक्तांनी विश्रांतवाडी, कळस, धानोरी, कलवडवस्ती, टिंगरेनगर, मुंजाबावस्ती परिसरातील पावसाळापूर्व कामांची पाहणी केली. नगरसेवक अनिल टिंगरे, सतीश म्हस्के, सुनीता साळुंके यांनी समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर कातळालाही फुटला पाझर

$
0
0

साताऱ्यातील आखाडेवाडीच्या ग्रामस्थांची किमया; चाळीस वर्षांचा लढा फलद्रुप
Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : राज्यभरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असताना सह्याद्रीतील अवघ्या ३५-४० उंबऱ्यांच्या आखाडेवाडीने (जि. सातारा) कातळाशी झुंज देऊन त्याच्या काळजातील अमृत काढून जगण्याचा संघर्ष सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे अबालवृद्धांची तहान भागवतानाच या ग्रामस्थांनी वन्य जीवांसाठीही झरे खणून खऱ्या अर्थाने निसर्गपुत्र असण्याचे कर्तव्यही निभावले आहे. गेली चाळीस वर्षे त्यांचा हा लढा सुरू आहे.

'मांझी : द माउंटन मॅन' या सिनेमासारखीच ही चित्तरकथा.. आखाडेवाडीतील हातांनीही कातळाशी भिडून कातळातून पाणी काढण्याची किमया केली आहे. साताऱ्याजवळचे कास पठार सर्वांच्या परिचयाचे.. तिथून काही किलोमीटर अंतरावर जुजबी लोकवस्तीची आखाडेवाडी आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्याचे दुर्गम गाव असल्याने प्रशासन काय, त्यातून मिळणाऱ्या सुविधा काय, जबाबदाऱ्या कोणत्या याची काहीच कल्पना या गावकऱ्यांना नाही. सात-आठ कोसांचा परिसर सोडल्यास कुणालाही तालुका, सरकार कुणाचे याच्याशी देणेघेणे नाही.

गेली काही वर्षे जेव्हा येथील वस्तीला पाण्याचा प्रश्न सतावू लागला, तेव्हा या गावाने ना पुढाऱ्यांचे लांगूलचालन केले ना कुठे धरणे धरले. गावातल्या जाणत्या मंडळींनी 'जिथे ओल तिथे पाणी' हे पारंपरिक तत्व प्रमाण मानून पाण्याचा शोध सुरू केला. तिथल्या चिव्याच्या बेटीत (झाडांचा दाटवा) ओल सापडली आणि खोदाई सुरू झाली. गावातील हातांनी असतील-नसतील त्या हत्यारांनी कातळ फोडायला सुरुवात केली आणि त्यांच्या या संघर्षाला यश आले.

डोंगरकपारीला गुरे सोडली की ओढ्या-ओहोळांना बांध घालून पाणी अडवायचे आणि जिरवायचे काम सध्या ही मंडळी करत आहेत. शाळकरी मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच झोकून देऊन हे काम करतात. वर्षभर पुरेल एवढे पाणी साठवण्यासाठी त्यांची आता धडपड सुरू आहे. येथील भयाण वास्तव म्हणजे रात्री बारा वाजता सत्तर वर्षांच्या वृद्धेलाही कड्याचे पाणी शेंदण्यासाठी जावे लागते. कडे खोदण्याची ही परंपरा १९७२च्या दुष्काळापासून सुरू असल्याचे इथले जाणकार सांगतात.
..
'कड्याचे पाणी' उलगडणार संघर्ष
कड्याच्या पाण्याचा हा संघर्ष लवकरच 'कड्याचे पाणी' या लघुपटातून उलगडणार आहे. घनश्याम ढाणे या युवकाच्या दिग्दर्शनाखाली लघुपट तयार झाला आहे. आखाडेवाडीच्या ग्रामस्थांचा संघर्ष प्रकाशझोतात आणण्यासाठी पुण्याचे नीलेश जेधे (निर्माते), विनोद विश्वकर्मा आणि संतोष जाधव (कॅमेरा), तानाजी माने (कला), अमित द्रविड (ध्वनी) संतोष जाधव (संपादन) यांनी पुढाकार घेऊन लघुपट साकारला आहे. लेखणी आणि कॅमेरा या माध्यमांचा उपयोग करून हा संघर्ष सर्वांसमोर आणण्याच्या हेतूने त्यावर काम केले आहे. लघुपटातही स्थानिक ग्रामस्थांनीच कलावंतांची भूमिका केली आहे. जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून पाच जून रोजी हा लघुपट रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे ढाणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोपटे यांचे प्रमाणपत्र नको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवाड
'अनंतराव थोपटे यांची हयात राजकारणात गेली. मात्र, त्यांना सत्ता असतानाही गुंजवणी प्रकल्प सुरू करता आला नाही. त्यांच्या काळात नीरा-देवघरचे पाणी बारामती, इंदापूर, अकलूज, फलटणच्या नेत्यांनी पळवले. त्यामुळे अशा लोकांनी माझ्या ज्ञानाची चिंता करून मला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही,' असे प्रत्युत्तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थोपटे यांना दिले आहे.

चंदुकाका जगताप यांच्या पुरंदर नागरी संस्थेच्या कापूरहोळ येथील इमारतीच्या उद्घाटनावेळी शिवतारे यांचे ज्ञान अपुरे असल्याची टीका थोपटे यांनी केली होती. त्याला शिवतारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मंत्रिमंडळात मला जलसंपदा आणि जलसंधारण खात्यांची जबाबदारी देण्यात आली. संसदीय कामकाज खात्याची देखील जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपवली. त्यामुळे राज्यकर्त्यांना, पक्षप्रमुखांना आणि जनतेला माझ्या बुद्धिची जाणीव आहे,' असे शिवतारे यांनी म्हटले आहे.

'गुंजवणी आणि नीरा-देवघरचे पाणी अधिकृत ठराव करून बारामती, इंदापूर, अकलूज, फलटणच्या नेत्यांनी डोळ्यादेखत पळवले. पण थोपटे पिता-पुत्राला त्याची गंधवार्ता नव्हती. अशा लोकांनी माझ्या ज्ञानाची चिंता करून मला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. गुंजवणी आणि नीरा देवघर खोऱ्यातील बाधित शेतकऱ्यांची खाती विकत घेऊन प्रकल्पग्रस्तांची थोपटे कुटुंबांनी केलेली चेष्टा त्यांच्या तालुक्यात येऊन मी जगजाहीर करणार आहे. आपल्या अगाध ज्ञानाचे धडे थोपटे यांनी आपल्या मुलाला द्यावेत,' अशी टीकाही शिवतारे यांनी केली.

'अनंतराव थोपटे यांचा मुलगा आमदार संग्राम थोपटे हे गुंजवणीचे काम सुरू करताना माझ्यासोबत होते. काही महिन्यांपासून ते गुंजवणीचे काम बंद पाडायला धडपडू लागले. सत्तेत असताना त्यांनी कधी प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही. थोपटे पिता-पुत्रांना पुरंदरमधील जगताप पिता-पुत्राची फूस असल्याची मला माहिती आहे. पण त्यांचे मनसुबे मी उधळून लावल्याशिवाय राहणार नाही,' असेही शिवतारे यांनी म्हटले आहे. थोपटे यांच्या वयाचा मान राखून

आत्तापर्यंत मी शांत होतो. धांगवडी येथील एका जमीन प्रकरणात महिलांच्या तक्रारीवरून थोपटे यांना काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. त्यांचे वर्तन वृत्तवाहिन्यांवर राज्याने पाहिले. ते काय ज्ञानी पुरुषाचे लक्षण होते काय,' अशी टीकाही शिवतारे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मगरपट्टा सिटीतील जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
मगरपट्टा सिटीमधील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्वारगेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून २ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार चालकासह १३ जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय दत्तात्रय मगर (वय ४९, रा. मगरपट्टासिटी, हडपसर) असे जुगारअड्डा चालकाचे नाव आहे. जुगार खेळणारे मंदार महंत जक्कल (वय ३८, रा. धानोरी रोड) नितीन मोहनलाल जिया (वय ४७, रा. हडपसर), निखील संदेश पराडकर (वय २८, रा. वानवडी), सुनीलकुमार प्यारेलाल साने (वय ५१, रा. विश्रांतवाडी), गगनसिंग बिडसिंग थापा (वय ४०, रा. हडपसर), अभय मधुकर साळी (वय ४१, रा. वानवडी), व्यंकट रामा शेट्टी (वय ३१, रा. हडपसर), राहुल साहेबराव चौधरी (वय ४५, रा. कल्याणीनगर), सुरेंद्र तीर्थनारायण बिजुचे (वय ४६, रा. हडपसर), लेकराज परमानंद भट (वय २१, रा. हडपसर), शिवराज देवदत्त भट (वय ३०, रा. हडपसर ), मेघराज परमानंद भट (वय २१, रा. हडपसर) यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. विशेष गुन्हे शाखेचे पोलिस स्वप्नील शिवरकर यांनी फिर्याद दिली आहे.

विशेष गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जरग यांना मगरपट्टा सिटीतील फ्लॅटमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मगरपट्टा सिटीमधील लेबरियन पार्क जे बिल्डिंग, पहिला मजला फ्लॅट क्रमांक १०१मधील जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता पोलिसांनी छापा टाकला. जुगार चालक संजय मगर तिथे होता. यात एकून २ लाख ८२ हजार रोख रक्कम, दहा मोबाइल, पत्ते असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्वारगेट पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराज माने, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे, भोले अहिवळे, हवालदार शकील शेख, हर्षल दुडम, दीपक मोजे, सतीश मोठे, प्रकाश बोरुडे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना गती शक्य

$
0
0

​विमानतळावर दर्जेदार सुविधा देता येणार
Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : मर्यादित जागेअभावी गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारिकरणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. हवाई दलाने विस्तारिकरणासाठी १५.८४ एकर जागा दिली आहे. विमानतळाची सध्याची २६ एकर जागा आणि नवीन जागा यामुळे येत्या काळात पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणांबरोबरच एकूण उड्डाणांची संख्या वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. तसेच, प्रवाशांना प्रत्यक्ष विमानतळावर चांगल्या दर्जाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे विमानतळ प्राधिकरणाला शक्य होणार आहे.
सध्याच्या विमानतळ आवारात एकावेळी पाच विमानांच्या पार्किंगसह टर्मिनल बिल्डिंग, लॉबी, फूड कोर्ट आहे. तर, नवीन जागेत आणखी चार विमानांचे पार्किंग, नवीन टर्मिनल इमारत आणि उर्वरित जागा माल वाहतुकीसाठी राखीव ठेवण्याचे प्रस्तावित आहे. विमानांच्या पार्किंगची क्षमता कमी असल्यामुळे सद्यस्थितीत विमानांच्या लँडिंगसाठी अडथळे निर्माण होतात. तसेच, विमानांच्या उड्डाणांवरही बंधने येतात. त्यामुळे, पार्किंगची क्षमता वाढल्यानंतर विमानांची उड्डाने वाढतील आणि लँडिंग करताना अडथळे येणार नाहीत. सध्या जागेअभावी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव माल वाहतुकीवर निर्बंध येत आहेत. आता विस्तारिकरणात अधिक व हक्काची जागा उपलब्ध होणार असल्याने माल वाहतुकीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची अपेक्षा आहे.
विमानतळावर विशेष सुविधा कक्ष (मीट अँड ग्रीट फॅसिलिटी), लहान मुलांसाठी 'चाइल्ड केअर सेंटर,' विविधोपयोगी वस्तूंची दुकाने, विविध प्रकारच्या पुस्तकांची उपलब्धता, औषधाचे दुकान, स्पा व सलून, पुण्यातील हौशी व व्यावसायिक कलावंतांसाठी आर्ट गॅलरी आणि विमानतळाबाहेर इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवासी साधनांची सोय, यासारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या सुविधा उपलब्ध करून देतानाही विमानतळ प्रशासनावर जागेचे निर्बंध होते. आता या गोष्टींसाठी, तसेच अन्य नवीन उपाययोजनांसाठी अधिकची जागा उपलब्ध होणार आहे.
-----------
विमानतळ..एका दृष्टिक्षेपात..
लोहगाव विमानतळाची सध्याची जागा- २६ एकर
विस्तारिकरणासाठी मंजूर केलेली जागा- १५.८४ एकर
प्रवासी सेवा देणाऱ्या विमान कंपन्या- ८
दररोजची विमानांची वाहतूक- १४४
वार्षिक प्रवासी- ५५ लाख (२०१५-१६)
दररोजचे प्रवासी- सरासरी १५ हजार
देशांतर्गत उड्डाणे- मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नागपूर, गोवा, कोची, इंदूर, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता
आंतरराष्ट्रीय उड्डाणे- फ्रँकफर्ट, अबुधाबी, दुबई
विमान पार्किंगची सुविधा- ८ (५ प्रवासी + ३ खासगी)
नव्याने वाढणारी पार्किंगची क्षमता- ४ विमाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई दलाचा ‘सिक्युरिटी चेक’

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com
पुणे : लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाने जागा दिली आहे. मात्र, हा निर्णय घेतानाच यापेक्षा अधिक जागा मिळणार नाही आणि नागरी उड्डाणांसाठी अधिक वेळही दिला जाणार नाही, असे खुद्द संरक्षणमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यावरूनच हवाई दलासाठी लोहगाव तळाचे असलेले महत्त्व अधोरेखित होते.
लोहगाव हे पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जात असले, तरी हा तळ म्हणजे भारतीय हवाई दलाचा संरक्षणासंदर्भातील व्यूवहरचनात्मकदृष्ट्या (स्ट्रॅटेजिक) अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याला हवाई कनेक्टिव्हिटी असावी, म्हणून त्यावरून नागरी उड्डाणांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी हवाई दलाने काही बंधने घातली आहेत व ती आवश्यकही आहेत.
..
भौगोलिक स्थान
हवाई दलाच्या दृष्टीने या विमानतळाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हा फ्रंटलाइन एअरक्राफ्टचा (सुखोई ३०) तळ असला, तरी तो देशाच्या सीमेला लागून नाही. तरीही अरबी समुद्र आणि राजस्थानकडील पाकिस्तानची सीमा येथून जवळ आहे. त्यामुळे हा तळ सराव तसेच अन्य बाबींसाठी महत्त्वाचा ठरतो. या तळालगत भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाचेही मुख्य तळ किंवा केंद्र आहेत. पुण्यातच लष्कराच्या दक्षिण क्षेत्र या सर्वात मोठ्या क्षेत्राचे (सदर्न कमांड) मुख्यालय आहे. या शिवाय इतर अनेक लष्करी संस्था, ठाणी पुण्याच्या आसपास आहेत. मुंबई आणि विशाखापट्टणम येथे नौदलाचे महत्त्वाचे तळ आहेत. युद्धाप्रसंगी किंवा जेव्हा तिन्ही दलांच्या एकत्रित कृतीची गरज भासेल, तेव्हा या लोहगाव हवाई तळाचे महत्त्व आणखी अधोरेखित होते.
..
सुखोईचा तळ
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवाई दलाकडे असलेल्या सुखोई ३० या फ्रंटलाइन एअरक्राफ्टच्या (सर्वांत आघाडीचे लढाऊ विमान) दोन तुकड्या (स्क्वाड्रन) या विमानतळावर तैनात आहेत. या विमानांचा नियमित सराव येथे चालतो. या शिवाय भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अन्य महत्त्वाची लढाऊ विमानेही येथे आहेत. युद्धकाळात उत्तम भूमिका बजावण्यासाठी नियमित सराव होणे आवश्यक असते. लोहगावमधून उडालेली सुखोई विमाने मध्येच एखाद्या दूरच्या समुद्रावर तैनात युद्धनौकेवर उतरतात. कधी पोखरण, जयपूर किंवा दिल्लीपर्यंत तर कधी बंगाल, आसामपर्यंत रपेट करतात. म्हणूनच या विमानांच्या सरावाला महत्त्व असून, या सरावाच्या वेळेत नागरी उड्डाणांना बंदी आहे. आतापर्यंत याच तळावरून काही महत्त्वाची लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली आहे. या सर्व बाबी लोहगाव तळाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे या तळावर नागरी उड्डाणांचा वाढता हस्तक्षेप वेळीच थांबविण्याची मागणी हवाई दलाकडून केली जात आहे. नागरी उड्डाणांसाठी अधिक वेळ देणे शक्य नसल्याचेही हवाई दलाकडून स्पष्ट केले गेले आहे. त्याचबरोबर आता आणखी जागाही देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुण्याच्या स्वतंत्र नागरी विमानतळाचा 'टेक ऑफ' लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
...............
'आकाश'चे संरक्षक कवच
संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या विमानतळाची सुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठीच या तळाभोवती आकाश या क्षेपणास्त्राचे कवच उभारण्यात आले आहे. जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा भेद करू शकणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या दोन स्क्वाड्रन या ठिकाणी तैनात आहेत. त्यामुळे हवाई मार्गे हल्ला झालाच, तर तो निष्फळ ठरू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज ‘कार्गो टर्मिनल’ची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हवाई दलाचा तळ आणि नागरी उड्डाणांवरील निर्बंधांमुळे पुण्यातून फारशी मालवाहतूक होत नाही. त्यामुळे येथून उड्डाण करणारी विमाने मालवाहतूक करण्याची क्षमता असूनही काही अंशी रिकामीच जातात. ही परिस्थिती पुण्याच्या उद्योजकांबरोबर हवाई वाहतूक उद्योगासाठीही नुकसानदायी ठरत आहे. मालाच्या आयात निर्यातीसाठी पुण्याचे उद्योजक मुंबईच्या विमानतळावर विसंबून असल्याचे चित्र आहे. ऑटो हब, उत्पादक हब बरोबरच कृषी उत्पादने आणि औषधे व लसींच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या पुण्यातील उद्योगजगताला मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही उत्तम कार्गो टर्मिनलची आवश्यकता आहे.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षी साधारणतः सात ते आठ लाख टन उत्पादनांची आयात- निर्यात होते. त्यात पुण्याचा वाटा हा २० ते २२ टक्क्यांच्या आसपास असल्याचे जाणकारांचे मत आहे. हा माल मुंबईला पाठविण्याचा किंवा मुंबईहून आणण्याचा खर्चही उद्योजकांनाच उचलावा लागतो. पुण्याच्या विमानतळावर स्वतंत्र कार्गो हब, टर्मिनल असावे, यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर वर्षानुवर्षे पाठपुरावा करत आहे. चेंबरच्या म्हणण्यानुसार पुण्याला स्वतंत्र कार्गो टर्मिनल झाल्यास ऑटो, इंजिनीअरिंग-मॅन्युफॅक्चरिंग, फार्मसी, कृषी, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नोलॉजी आदी क्षेत्रातील पुणे व परिसरातील सुमारे तीन हजार कंपन्या त्यांच्या उत्पादनांची आयात-निर्यात सहज करू शकतील. पुण्याच्या आसपास उत्पादित होणारी फुले, फळे, भाजीपाला, औषधे आणि लसींसारख्या नाशवंत मालाच्या त्वरित निर्यातीसाठी स्वतंत्र कार्गो टर्मिनल होणे ही काळाची गरज आहे.
-------------------------------
मालवाहतुकीत तळाच्या स्थानी
पुण्यातून सध्या ७० ते ८० टन मालाची हवाईमार्गे वाहतूक होते. येत्या काळात १५० टनांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य आहे. लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या आराखड्यानुसार विमानांचे पार्किंग, नवीन टर्मिनल इमारत आणि उर्वरित जागा मालवाहतुकीसाठी मिळणे प्रस्तावित आहे. कार्गो हब नसल्याने आणि हवाई दलाचा तळ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मालवाहतुकीवर निर्बंध आहेत. या विमानतळावरून २०१४-१५ या आर्थिक वर्षात २७ हजार ३९० टन माल वाहतूक करण्यात आली, तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३१ हजार ७६५ टन वाहतूक झाली. त्यामध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. देशातील सर्व विमानतळांवरील मालवाहतुकीत झालेल्या वाढीत लोहगाव विमानतळाचा २० वा क्रमांक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यात घरोघरी जारच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी प्रक्रिया उद्योजकांनी कायद्यातील पळवाटा शोधून अशुद्ध पाण्याचा बाजार सुरू केला आहे. या उद्योजकांना सरकारी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.

शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांना बंद बाटली, तसेच जारमधून अशुद्ध पाणी देण्यात येत आहे. या पाणी माफियांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे. अशुद्ध पाणी असणाऱ्या जारवर 'पिण्याचे पाणी' असे लिहिलेले नसल्याने कारवाई करता येत नाही, त्याचा गैरफायदा हे पाणी माफिया घेत आहेत.

जारमधून दिले जाणारे पाणी किती शुद्ध, तसेच सुरक्षित आहे याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) करण्याची गरज आहे. पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रणाच अनेक ठिकाणी नसल्याने पाणी उद्योजकांनी नागरिक आणि प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक सुरू केली आहे. बारामतीत जारमधून दररोज लाखो रुपयांच्या विकल्या जाणाऱ्या या पाण्याच्या दर्जाची कोणतीही खात्री नाही. शहरातील जारमधून पाण्याची विक्री विनापरवाना होत आहे. मात्र, आर्थिक लोभापोटी आणि राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास अडचण येते, कारवाई होताच संबधित अधिकाऱ्याची बदली केली जाते, त्यामुळे अधिकारी कारवाई करत नाहीत, असे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, अशुद्ध पाण्याबाबतची कारवाई आता 'एफडीए' आणि 'बीआयएस'च्या हाताबाहेर गेली आहे.

बारामती तालुक्यात ११ ते १७ पाणी प्रक्रिया उद्योजक विनापरवाना व्यवसाय करत आहेत, तर फक्त पाच उद्योजकांकडे परवाना आहे. 'आयएसआय' मार्क असल्यास 'बीआयएस'ला कारवाई करता येते किंवा 'आयएसआय' मार्कचा विनापरवाना वापर झाल्यास कारवाई होऊ शकते, असे 'बीआयएस' प्रशासनाने स्पष्ट केले. शुद्धतेसाठी असलेल्या १४ प्रक्रिया पूर्ण करण्याकडे बहुतांश विक्रेते टाळाटाळ करतात. २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियमही पायदळी तुडवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images