Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि अपंग साह्य संस्था यांच्या वतीने सोमवारपासून (१६ मे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.

अनाथ अंपगांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन एप्रिल २०१६ मध्ये महापालिका आयुक्तांना देऊनही योग्य अंमलबजावणी झाली नाही. संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा आरोप आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला.

अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ आहे तसा राबवावा, पेन्शन योजना सरसकट अपंगांना विनाअट द्यावी (मतिमंदाच्या धर्तीवर), अपंगांसाठी स्वतंत्र विनाअट घरकुल योजना राबवावी, पालक अपंगांच्या पाल्यांना शैक्षणिक अनुदान द्यावे, पीएमपीएमएलचा सर्व मार्गांचा मोफत पास मिळावा, अंध अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद यांच्यासाठी स्वतंत्र उद्यान विकसित करावे, अपंगांसाठी विरंगुळा केंद्र असावे, शहरातील सर्व शासकीय इमारती, उद्याने, खाजगी इमारती, बँका, मॉल, दवाखाने आदी ठिकाणे रॅप (मार्गिका) तयार करणे, लाभार्थी अपंगांना चलनवलन साहित्याऐवजी रोख रक्कम देण्यात यावी. तसेच अपंगांना घरबांधणी आणि दुरुस्तीसाठी अर्थसाह्य द्यावे, या मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोन्या काळभोरला अखेर अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार, वाहनांची तोडफोड, नागरिकांना दमदाटी अशा स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सोन्या काळभोर याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. गेले वर्षभर पोलिस सोन्याचा शोध घेत होते.

रविवारी (१५ मे) रात्री उशिरा आकुर्डीतील दत्तनगर येथील त्यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली आहे.

विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर (२२, रा. आनूबाई काळभोर चाळ, आकुर्डी गावठाण) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या काळभोर हा सराईत गुन्हेगार आहे. गेल्या एक वर्षापासून तो फरारी होता. त्याच्यावर खुनी हल्ला करणे, पिस्तुल बाळगणे, तोडफोड करणे, मारामारी करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी रात्री तो त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संजय नाईकपाटील व त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून सोन्याला अटक केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रॉमा सेंटर’चे काम रेंगाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघातांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 'ट्रामा केअर सेंटर'चा विषय मार्गी लावण्यात आलेला नाही. 'एक्स्प्रेस वे'वर तीन ट्रॉमा सेंटर उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी केवळ एकाचे काम सुरू असून, त्या सेंटरचेही भिजत घोंगडे आहे.

'एक्स्प्रेस वे'वर अपघात झाल्यास जखमींना चिंचवडला किंवा कळंबोलीला न्यावे लागत होते. त्यामुळे त्यांना 'गोल्डन अवर्स'मध्ये वैद्यकीय उपचार मिळण्यावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे 'एक्स्प्रेस वे'वर तीन ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षात ट्रॉमा सेंटरचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. या तीनपैकी केवळ ओझर्डे येथे ट्रॉमा सेंटरचे काम सुरू आहे. तेथे दोन मोठे शेड आणि चार खोल्यांचे केंद्र बांधून तयार आहेत. मात्र, अद्याप येथे वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आलेली नाही. येथे एअर अॅम्ब्युलन्सचाही प्रस्ताव होता. मात्र, त्याबाबतही काही निर्णय झाल्याचे दिसून येत नाही. हे काम पूर्ण होऊन दोन वर्षात सेवा सुरू होईल, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. ही सर्व परिस्थिती पाहता 'एक्स्प्रेस वे'वर ट्रामा सेंटर उभारण्याची घोषणा हवेतच विरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या महिनाभरात 'एक्स्प्रेस वे'वरील अपघातांची संख्या वाढली आहे. लोणावळा परिसरात झालेल्या अपघातातील जखमींनाही चिंचवडच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणले जात आहेत. हा प्रवास जखमींच्या जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे ट्रॉमा सेंटर तातडीने कार्यान्वित होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी 'एमएसआरडीसी'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही.

-------

'व्हिडिओ सर्व्हिलन्स' हवेच

'गेल्या आठवड्यात शनिवारी (१४ मे) 'एक्स्प्रेस वे'वर लोणावळ्याजवळ कारच्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावा लागला. अपघातग्रस्त कार अतिवेगात असल्याने रस्त्यापासून दोनशे फूट अंतरावर असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली होती. हा अपघात मध्यरात्रीनंतर झाला. या अपघाताची माहिती तीन ते चार तास कोणालाही समजली नाही. अशा परिस्थितीत एक्स्प्रेस वेवर व्हिडिओ सर्व्हिलन्स यंत्रणा कार्यान्वित असती, तर या अपघाताची माहिती तातडीने मिळाली असती,' असे मत एक्स्प्रेस वेसाठी सर्व्हिलन्स प्रणालीचे अभ्यासक तन्मय पेंडसे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’च्या कार्यक्रमाला पिंपरीत गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमने रविवारी (१५ मे) पिंपरी येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, औरंगाबाद महानगरपालिकेतील दलित आरक्षित जागेवर निवडून आलेले पाच, मुस्लिम समजाचे नगरसेवक उपस्थित होते. नांदेड महापालिका नंतर विधानसभा आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने राज्यातील आगामी दहा महापालिकांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची तयारी चालविली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचीही निवडणूक देखील लढविणार आहे. त्यासाठी पक्षाकडून शहर कार्यकारिणी निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्यावहिल्या कार्यक्रमालाच शहरातून मोठी गर्दी झाल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे.

नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने एमआयएमने रविवारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दलित बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेल्या भीमगीतांच्या या कार्यक्रमाला सर्वच समाजातील लोकांची मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाला हवीत चार कोटी घरे

$
0
0

वसंत व्याख्यानमालेतील परिसंवादातील सूर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास २०२० पर्यंत चार कोटी घरांची आवश्यकता आहे. या घरांची पूर्तता करण्यासाठी 'प्रिकास्ट'सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बांधकामासोबतच शहरात उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर, वेगाने घरांचे बांधकाम, घर घेण्यासाठी कमी दराने कर्ज पुरवठा, शहराच्या बाहेर पायाभूत सुविधांचा विकास करावा लागणार आहे. घरांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागणार असल्याने थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी आणि बांधकामाला उद्योगाचा दर्जा द्यावा,' असा सूर परिसंवादातून सोमवारी निघाला.

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत 'सामान्य माणसांना परवडणारी घरे' या विषयावर परिसंदाचे आयोजन केले. वास्तुविशारद श्रीराम मोने, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुधीर दरोडे यांनी सहभाग घेतला. मोने म्हणाले, 'देशातील २० कोटी जनता झोपडपट्ट्यांमध्ये राहते. पुण्यातील ४० तर मुंबईतील ५५ टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. सुमारे २० कोटी जनतेसाठी प्रत्येक वर्षी ४४ लाख घरे बांधावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी खासगी बांधकाम व्यावसायिकांची मदत, पीपीपी मॉडेल, एसआरए आणि बांधकामासाठी सवलत यांसारख्या योजना राबविण्याची आवश्यकता आहे. सामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इमारतींचे आणि घरांचे बांधकाम झपाट्याने करावे लागणार आहे. इमारती बांधण्यासाठी रेती, विटा, सिमेंट यांसारख्या घटकांमध्ये अडकून राहण्याची आवश्यकता नसून अॅल्युमिनियम, प्लास्टिक, स्टील यांचा वापर करून घर बांधण्याची गरज आहे. याद्वारे घर बांधल्यास ते टिकाऊ आणि कमी खर्चात तयार होणार आहे.'

दरोडे म्हणाले, 'शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) निवासी परिसरासाठी राखून ठेवलेल्या जागेचा वापर कित्येक वर्षे इमारती किंवा घरे बांधण्यासाठी होतच नाही. या कारणाने जमिनीचा संतुलित वापर निवासी बांधकामासाठी होत नाही. निवासी सोसाट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवाशांना सुविधा पुरविल्या असतात. या सुविधांता फारच कमी रहिवाशांकडून वापर होतो. मात्र, या सुविधांमुळे सदनिकेती किंमत वाढते. त्यामुळे या अनावश्यक सुविधा टाळल्यास सदनिकेच्या किमती कमी होतील. शहराबाहेरील परिसरातील पायाभूत सुविधांचा विकासच होत नाही. त्यामुळे तेथे सामान्य माणसांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती शक्य होत नाही. त्यामुळे बाहेरच्या परिसराचा 'पीएमआरडीए'ने विकास केल्यास तेथे कमी किंमतीत घर उभारण्यात येतील. बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिल्यास घरांच्या किमती कमी होतील.' डॉ. मंदार बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक घैसास यांनी सूत्रसंचालन केले.'

..............

'प्रिकास्ट'चा जगभरात वापर

जगात आणि देशात कमी वे‍ळेत, कमी खर्चात टिकाऊ इमारती आणि घरे बांधण्यासाठी प्रिकास्टसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या तंत्रज्ञानात स्लॅब, जीने, कॉलम, फ्रेम आदी इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कारखान्यात तयार होतात. त्यानंतर त्यांची योग्यपद्धतीने जुळवणी करुन इमारत उभी करण्यात येते. याप्रमाणेच तंत्रज्ञानाने कंटेनरचा वापर करुन आकर्षक घरांची निर्मिती केली जात असल्याचे श्रीराम मोने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञासिंगना सोडणे अयोग्यच : रामदास आठवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग यांना कोर्टाने सोडल्यामुळे राष्ट्रीय तपासणी संस्थेच्या (एनआयए) विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणामध्ये भाजप सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे दिसते. साध्वी प्रज्ञासिंगना सोडणे अयोग्यच आहे,' अशी टीका आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ज्या पद्धतीने प्रज्ञासिंगला सोडण्यात आले आहे, त्यावरून केंद्र सरकार यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे सिद्ध होत आहे. राज्यातील शिवसेना, भाजपचे सरकार पाच वर्षे टिकेल, मात्र पाच वर्षानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र राहतील की नाही, यात शंका आहे. भाजपबरोबर १३० आमदार आहेत, त्यामुळे सेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडत नाही, याची कल्पना सेनेलाही आहे. सेनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तरी, शरद पवार यांचे ४१ आमदार बरोबर येतील, असा दावा आठवले यांनी केला.

सैराट आणि मर्डर..

आपण देखील आंतरजातीय विवाह केला आहे. आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारा 'सैराट' चित्रपट समाजाला जोडणारा आहे. यामध्ये शेवटी 'मर्डर' दाखविला आहे. पण माझा काही 'मर्डर' होऊ शकला नाही. जन्मावर आधारित जातीव्यवस्था निर्माण झाल्याने समस्या निर्मा‍ण झाल्या आहेत, असेही आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरडोई तीनशे लिटर पाणी

$
0
0

पाणीवाटपाबाबत महापालिका प्रशासनाचा जावईशोध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या आठ महिन्यांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याची वस्तुस्थिती असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत शहरातील नागरिकांना दरडोई ३०० लिटर मिळत असल्याचा जावईशोध महापालिका प्रशासनाने लावला आहे. महापालिका प्रशासनाने पूर्वीपासून खोडून काढलेला हा मुद्दा त्यामध्ये कसा समाविष्ट झाला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर नुकतीच पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत पुणे शहराला प्रती माणशी दररोज ३०० लिटर पाणी दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. पुणेकरांच्या पाण्यात कपात करून गेल्या आठ महिन्यांपासून नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असतानाही आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर अशी चुकीची माहिती कशी दिली, असा प्रश्न विचारला जात आहे.
शहराला दररोज १२०० एमएलडी पाणी लागते. शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात आहे. याची आकडेवारी पाहून प्रती माणशी ३०० लिटर पाणी लागते असा अंदाज कुमार यांनी केला असावा. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी धरणातून पाणी घेत असताना ४० टक्के पाण्याची गळती होते. तर, काही भागात पाणी चोरी होत असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही आयुक्त कुमार यांनी कोणत्या अहवालाच्या आधारे ३०० लिटर पाण्याचे सादरीकरण केले असा प्रश्न राजकीय पक्षांकडून विचारला जात आहे. आयुक्तांनी कोणत्या अहवालाच्या माध्यमातून ही माहिती दिली, त्याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
..
गेले आठ महिने पुणेकर काटकसरीने पाणी वापरत असून, धरणातील पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती असताना नागरिकांना प्रती माणशी ३०० लिटर पाणी दिले जाते, अशी माहिती आयुक्त कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना देणे चुकीचे आहे. आयुक्तांनी ही माहिती कोणत्या अहवालाच्या आधारे दिली, याची चौकशी केली जाणार आहे.
प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस भवनात ‘मानापमान’ नाट्य

$
0
0

थरुरांच्या कार्यक्रमावरून पदाधिकाऱ्यांत जुंपली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाच्या स्वागताचा फलक लावण्यावरून झालेला वाद शमतो ना शमतो तोच पुन्हा याच कार्यक्रमावरून काँग्रेस भवनमध्ये सोमवारी 'मानापमान'नाट्य घडले. या कार्यक्रमाची सूत्रे आपल्याकडेच हवीत, असा अट्टाहास प्रदेश काँग्रेसचे चिटणीस शहजाद पुनावाला यांनी धरल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पुनावाला यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

थरूर आज, मंगळवारी पुण्यात येणार असून, काँग्रेस भवनमध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी सध्या काँग्रेस भवनमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमाची सूत्रे आपल्याकडे हवीत, असा आग्रह पुनावाला यांनी धरला. त्यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या परंपरेनुसार ही बाब नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, पुनावाला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी एका माजी नगरसेवकाला काँग्रेस भवनमधून निघून जा, असेही सुनावले. त्यामुळे वातावरण गंभीर झाले. ही बाब उपस्थित असलेल्या तरुण नगरसेवक आणि युवक काँग्रेसच्या नेत्याला खटकली. त्यामुळे त्यांच्यात खडाजंगी झाली. पुनावाला आणि अन्य काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, खासदार थरुर यांच्या स्वागतासाठी काँग्रेस भवनमध्ये लावलेल्या फलकावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांचे छायाचित्र नसल्याने फलक फाडण्याचा प्रकार शनिवारी घडला होता. त्याचे पडसाद रविवारी झालेल्या शहर काँग्रेसच्या बैठकीत उमटले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा वाद झाला. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षात चाललेल्या या मानापमानामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीआरटीतील त्रुटी तीन दिवसांत सोडवा

$
0
0

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर रोडवरील जलद बस वाहतूक मार्गावरील (बीआरटी) सर्व अडचणी आणि समस्या येत्या तीन दिवसांत सोडवण्याच्या स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी केल्या.
उद्या, बुधवारी (१८ मे) बीआरटी मार्गावर उद्भवणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात येणार असून, या बैठकीला स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांत बीआरटीवर झालेल्या विविध अपघातांमुळे प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये कमतरता असल्याचा आरोप केला जात आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष करून घाईघाईने बीआरटी सुरू केल्याचे टीकास्त्र सोडले जात आहे. बीआरटी मार्गावरील पायाभूत सुविधांची निर्मिती महापालिकेने केली असल्याने कुणाल कुमार यांनी सोमवारी सकाळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत बीआरटी मार्गावरील त्रुटींबाबत विचारणा करून त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करण्याचे आदेश त्यांनी दिले. पुढील तीन दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करून बुधवारी पुन्हा त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
बीआरटी मार्गाचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी घेण्यात येणाऱ्या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही बोलावण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांसाठी बीआरटी अत्यंत गरजेची असून, त्यातील सर्व दोष दूर करण्यावरच भर दिला जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत्रांमध्ये सांस्कृतिक पर्यटनाला उधाण

$
0
0

आनंदोत्सव अनुभवण्यासाठी शहरी पर्यटकांची वाढती गर्दी
Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
पुणे : गावांमधील हक्काचा सण असलेल्या जत्रेची आता पर्यटकांनाही भुरळ पडू लागली आहे. जत्रेतील रंगबिरंगी वातावरण, गावरान टच असलेल्या खाद्यपदार्थांची मेजवानी, लोककलेतील वैविध्य अन् महाराष्ट्रीय संस्कृतीविषयी कुतूहल असलेली विविध राज्यातील उत्साही मंडळी सध्या आवर्जून स्थानिक मित्रमंडळींबरोबर गावाची जत्रा आणि ऊरूस अनुभवायला उपस्थिती लावत आहेत.
जत्रा आणि ऊरूस हा गावोगावचा मोठा आनंदाचा ठेवा असून, या उपक्रमांना कित्येक वर्षांची परंपरा आहे. या सांस्कृतिक उपक्रमांमुळे कामानिमित्त शहराबाहेर गेलेली मंडळी ऊरुसाला सुट्टी काढून जातात. काही वर्षापूर्वीपर्यंत शहरी मंडळी या जत्रांकडे फारशी फिरकत नव्हती. मात्र, आता ग्रामीण जीवनशैली आणि संस्कृतीविषयी शहरीमंडळींना आकर्षण निर्माण झाले आहे. या मंडळींनी जत्रेला 'कलर फेस्टिव्हल' असे गोंडस नाव दिले असून, तेथील आनंदोत्सव अनुभवण्यासाठी ते आवर्जून सहभागी होतात. हौशी फोटोग्राफर्ससाठी ऊरूस, जत्रा आणि अस्सल खवय्यांसाठी जत्रेतील खाद्यपदार्थ म्हणजे एकप्रकारची पर्वणीच.. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी तर जत्रा म्हणजे दीर्घ परंपरेतून आलेला व्यवस्थापन शास्त्राचा उत्तम केस स्टडीच होय. महिलांसाठी तर पुरातन दागिने आणि वस्तूंच्या खरेदीचे अनोखे ठिकाण ठरले आहे. लहान मुले मात्र पालकांबरोबर गाव म्हणजे काय असते, हे जाणून घेण्यासाठी आवर्जून जत्रेला येतात.
गावांमध्ये जत्रा आणि ऊरूसाला वातावरण उल्हासित असते. या निमित्ताने ग्रामदैवतांची मंदिरे रंगवली जातात. मंदिराच्या अंगणात पारंपरिक सनई-चौघडा, भोवतालच्या परिसरात मांडव घातले जातात. खाद्यपदार्थ, तर काही ठिकाणी खेळणी, बांगड्या, दागिने, कपडे असे विविध स्टॉल सजायला लागतात. ग्रामदैवताच्या पालखी मिरवणुकीचा मार्गही पताकांनी सजविला जातो. उसाच्या गुऱ्हाळातील घुंगरांचा ठेका कानावर पडतो. गावातील मोठ्या मैदानावर चित्तथरारक शर्यती, कुस्त्यांचे आखाडे रंगतात. रात्रीच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशांच्या राहुट्याही सज्ज होतात. गावाकडेच्या या 'टिपिकल' ग्रामीण जीवनाचा अनुभव देणारा हा उत्सव महाराष्ट्रातील शहरी मंडळांबरोबरच इतर राज्यातील नोकरीनिमित्त राहायला आलेल्या मंडळींनाही खुणावतो आहे. या जत्रांमध्ये जाऊन तेथील फोटो, सेल्फी काढून ही मंडळी सोशल नेटवर्किंग साइटवरही त्यांचे अनुभव शेअर करण्यात धन्यता मानत आहेत.
.........................
स्थानिकांना रोजगाराची संधी
गावाकडील ऊरूस हा तेथील संस्कृती आणि परंपरेचा अनोखा अनुभव असतो. त्यामुळे नोकरीनिमित्त शहरात आलेली मंडळी जत्रेला आवर्जून पुन्हा गावाकडे जातात. त्यांच्याबरोबर त्यांचे इतर राज्यातील सहकारी देखील हा सोहळा अनुभवण्यासाठी येत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने जत्रा, ऊरूस हे महत्त्वाचे उपक्रम असून, स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गावकऱ्यांनी आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत, असे केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या पुण्यातील गाइड दया सुदामा यांनी सांगितले.
................
ग्रामीण पर्यटनाला उत्तम प्रतिसाद
पराशर कृषी आणि ग्रामीण पर्यटन तसेच जुन्नर पर्यटन विकास संस्थेने यंदा मे महिन्यामध्ये पर्यटकांसाठी यात्रा महोत्सव पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये भैरवनाथ यात्रा, ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिर यात्रा, मुक्ताई यात्रा उत्सवांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली होती. या उपक्रमाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक मनोज हडवळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभक्षेत्र शेरे काढले

$
0
0

शेतकऱ्यांना दिलासा ;वीस हजार एकर जमीन विक्रीचा मार्ग मोकळा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंद्र धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हवेली, खेड आणि मावळ तालुक्यातील तीस गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर सोळा वर्षांपूर्वी नोंदविण्यात आलेले लाभक्षेत्राचे शेरे कमी करण्यात आले आहेत. हे शेरे कमी केल्यामुळे २०,४२२ एकर जमिनीवरील हस्तांतरणाचे निर्बंध उठले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या जमिनीची विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेनंतर मावळ तालुक्यात आंद्र धरणाची उभारणी करण्यात आली. या धरणाच्या जलाशयात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासाठी हवेली, खेड आणि मावळ तालुक्यातील तीस गावांत लाभक्षेत्राच्या नोंदी घालण्यात आल्या. २००० मध्ये या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर इतर हक्कात या नोंदी घेण्यात आल्या होत्या. लाभक्षेत्र जाहीर झालेल्या या तीस गावांमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या हस्तांतरणावर निर्बंध घालण्यात आले. स्लॅबपात्र जमिनीव्यतिरिक्त जादा जमिनीची विक्री करायची झाल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागत होती. आंद्र धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन तसेच त्यांचे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील जमिनीवरील हस्तांतरण बंदी उठविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.
या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी नयना बोंदार्डे यांनी राज्य सरकारला या धरणाच्या लाभक्षेत्रावरील जमिनीचे निर्बंध उठविण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. या लाभक्षेत्रात हवेलीतील देहू, माळीनगर, डुडुळगाव, तळवडे, चिखली, वडमुखवाडी, चोवीसवाडी, चऱ्होली, निरगुडी, मोशी तसेच, वडगाव शिंदे या गावांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील कऱ्हाळवाडी, पिंपळगाव, मरगळ, गोरेगाव, सोलू आणि मावळातील वराळे, आंबी, सांगवी, राजापुरी, मंगरूळ, आकुर्डी, इंदोरी, वडगाव आणि जांभूळ या गावांतील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कात असलेली ही नोंद कमी करण्यात येणार आहे.
या तिन्ही तालुक्यांतील ८,१६९ हेक्टर (२० हजार ४२२ एकर) क्षेत्रावरील जमीन हस्तांतरणाचे निर्बंध उठणार आहेत. लाभक्षेत्राचे शेरे कमी झाल्यावर ही जमीन आता निर्वेध होणार असून, जमिनीची विक्री अथवा खरेदीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
..
हिंजवडी, मारूंजीचेही शेरे उठणार?
कासारसाई या धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. जमीन संपादन झालेल्या शेतकऱ्यांना हिंजवडी, मारूंजी येथील लाभक्षेत्र निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तांरण बंदीचे निर्बंध घालण्यात आले होते. या प्रकल्पातील धरणग्रस्तांना पर्यायी जमीन व पुनर्वसन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील लाभक्षेत्राचे शेरे कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पुनर्वसन अधिकारी नयना बोंद्राडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादात पोलिसांचा वाढता हस्तक्षेप

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीत वाढ होत आहे. वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश मिळविण्याऐवजी जमिनीचे वाद मिटविण्यासाठी अति उच्चपदस्य अधिकारी कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधू लागले आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळे वादाच्या जमिनींची मोजणी करताना उपस्थित राहा, भाडेकरू-घरमालक वाद मिटवा, ही कामे पोलिस कर्मचारी करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांचे नेमके काम काय, असे विचारण्याची वेळ आली आहे.

पुणे शहर पोलिसदलात सुडाचे राजकारण निर्माण झाल्याने संपूर्ण वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. अत्यंत दबावात पोलिस अधिकारी-कर्मचारी काम करीत आहे. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे वाढत्या घरफोड्या, चोऱ्यांमुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे. या सगळ्यावर अंकुश मिळविण्यात शहर पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. मात्र, प्रॉपर्टीच्या व्यवहारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना याकडे बघण्यास वेळच मिळत नाही.

पारदर्शी कारभाराचा डंगा पिटणाऱ्या अधिकाऱ्यांचा जमिनीच्या वादातील हस्तक्षेप जरा जास्त होत आहे. भाडेकरू-घरमालक वादात एकाची बाजू ऐकून संबंधिताला घर रिकामे करून द्या, नाहीतर अमूक एकाला त्या घरात प्रवेश मिळवून द्या, असले उद्योग सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बाणेर भागातील एका फ्लॅटचे प्रकरण चांगलेच गाजले. कथित भाडेकरू महिलेचे एकतर्फी म्हणणे एकून घेऊन तिला घरात प्रवेश मिळवून द्या, असा तोंडी आदेश काढण्यात आला. त्यानंतर घरमालक महिलेने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करून देखील यश मिळाले नाही. त्यानंतर संबंधित घरमालकिणीने एका महिला आमदाराला साकडे घातले. त्या आमदार आणि वरिष्ठांची बंद खोलीत बैठक झाली. भाडेकरू महिलेला मदत करा सांगणारे अधिकारी आता 'घरमालकिणीला मदत करा,' असे सांगू लागले. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा अनेक वादांसाठी नागरिक पोलिस आयुक्तालयात खेपा घालत आहेत.

फ्लॅट-बंगला घराप्रमाणेच मोकळ्या जागांसाठी देखील अशीच काहीशी परिस्थिती सध्या आहे. चिंचवडजवळील एका वादातीत जागेसाठी कडक धोरण अवलंबविणाऱ्या अधिकाऱ्याने सगळ्या फाइली घेऊन संबंधितांना बोलावून घेतले होते. त्यानंतर या जागेची मोजणी करण्यासाठी 'घटनास्थळी थोडे लांब हजर राहा,' असा पुन्हा एकदा तोंडी आदेश काढण्यात आला. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. पारदर्शी कारभार चालवा, अमूक चालणार नाही तमूक खपवून घेतले जाणार नाही सांगणारे अधिकारी जमिनीच्या वादांमध्ये नको इतके लक्ष घालताना दिसत आहेत. असे लक्ष घालणारे अधिकारी सध्या सुट्टीवर आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या सुट्टीचे वेगळे कारण दिले आहे. मात्र, त्यामागे खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा रंगली आहे.


नागरिकांना वाली कोण?

जमिनीचा वाद पोलिसांच्या केबिनमध्ये मिटू लागल्याने दलाली करणाऱ्यांचे चांगलेच फावते आहे. मात्र, ज्यांच्यावर कधी काळी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांच्याच फायलींचा तपास पोलिसांना करावा लागतो आहे. गुन्हेगारी मोडून नागरिकांच्या हितासाठी काम करण्याऐवजी नाही त्या उद्योगात उच्चपदस्थ अधिकारी अडकले आहेत. त्यामुळे सामान्यांची अवस्था 'ना दाद, ना फिर्याद' अशी काहीशी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड, इंदापूरचे पाणी बुधवारी थांबवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दौंड, इंदापूर शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी बुधवारी (१८ मे) बंद करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी दिली.
खडकवासला प्रकल्पातून दौंड, इंदापूरला एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला होता. या निर्णयावरून शहरात मोठा वाद झाला. दौंड शहरासाठी खडकवासला धरणातून अर्धा टीएमसी पाणी द्यावे. परंतु इंदापूरला पाणी देऊ नये, अशी भूमिका महापालिकेसह शहरातील भाजपवगळता सर्व राजकीय पक्षांनी घेतली. तथापि, इंदापूरलाही कालव्यातून पाणी देण्याच्या निर्णयावर पालकमंत्री ठाम राहिले.
पालकमंत्र्यांनी खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेला विश्वासात घेतले नाही. त्यावरून मोठा गदारोळ झाला. पाणी देण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिंचन भवनात मोडतोड केली. शिवसेनेने थेट भाजपवर टीका केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. त्यावर पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवण्याचे तसेच वेळ पडल्यास मृतसाठ्यातील एक टीएमसी पाणी शहराला देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिले आणि या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर ४ मे पासून दौंड व इंदापूरला खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. १३ दिवस या कालव्यात पाणी सोडण्यात येत असून, इंदापूरला पुरेसा पाणीसाठा झाला आहे. दौंडचा तलावही भरला आहे. आता फक्त वरवंड व खामगाव येथील तलाव भरायचे आहेत. हे तलाव भरल्यानंतर धरणातील विसर्ग थांबविला जाणार आहेत. खडकवासला प्रकल्पातून एक टीएमसी पाणी सोडल्यानंतर कालवा बंद करण्याचे नियोजन आहे. या टप्प्यात नदीवरील कोप बंधारेही भरले जाणार आहेत. १८ मे रोजी सायंकाळी कालवा बंद होईल, असे लोहार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर पुरुष ‘बीपी’ने त्रस्त

$
0
0

बदलती जीवनशैली कारणीभूत; १० ते १२ टक्क्यांनी पुरुष ग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तणावांसह बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, लठ्ठपणाबरोबर रक्तदाब देखील तिशीत आला आहे. पुणेकर महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये १० ते १२ टक्क्यांनी रक्तदाबाचे (बीपी) प्रमाण वाढले असून, गेल्या दहा वर्षांत त्याचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत.

आज, मंगळवारी जागतिक रक्तदाब दिन जगभर पाळला जातो. 'इंडस हेल्थ'ने वर्षभरात पेशंटच्या केलेल्या तपासण्यांच्या अहवालावरून काही निष्कर्ष पुढे आले आहेत. '२५ ते ३५ वयोगटातील १० ते १२ टक्के तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रक्तदाबाचा आजार तरुण झाला आहे. पुणेकरा तरुणांमध्ये हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेहासारख्या आजांरांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नोकरदारांमध्ये ताणतणाव वाढत चालल्याने उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढले. २० टक्क्यांहून अधिक युवक फास्टफूड खातात. त्यामुळे त्यांच्यातील लठ्ठपणा, तसेच उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे.

'पुण्यातील स्त्रियांपेक्षा पुरुष उच्च रक्तदाबाने पीडीत आहेत. पुरुष -स्त्रियांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण २३:२२ आहे. ९ टक्के नोकरदार मंडळींना मधुमेहाचा आजार आहे. त्यामुळे त्यांच्यात रक्तदाबाचा धोका वाढला आहे. तेलकट तसेच खारट अन्नपदार्थांच्या सेवनामुळे २५ ते ३५ वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये रक्तदाबाचा धोका वाढला आहे,' असे निरीक्षण सर्वेक्षणात नोंदविले आहे.

'इंडस हेल्थ'तर्फे वर्षभरात २३,१४५ पेशंटच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३,९१७ पुरुषांचा तर, ९,२२८ महिलांचा समावेश आहे. २८ टक्के पुरुषांना, तर २३ टक्के महिलांना रक्तदाब जडल्याचे दिसून आले आहे. महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ३९.५८ टक्के आहे तर, २८.०६ टक्के पुरुष लठ्ठ आहेत. पुणेकर महिलांमध्ये वाढत्या तणावामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे ४५ ते ५५ वयोगटातील ७ ते ९ टक्के नागरिकांचा रक्तदाबाचा धोका वाढला आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. गिरीश दाते म्हणाले, 'नोकरदार पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. तणाव, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे रक्तदाब वाढतो. कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, पालेभाज्या, बटाटे रक्तदाब संतुलनाचे काम करतात.'

रक्तदाब हा पूर्वी अनुवांशिक समजला जाणार आजार होता. आता तो बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजार बनला आहे. हृदयविकाराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. त्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत या प्रमाणात वाढ झाली असून, २०ते ३५ वयातील तरुणांमध्ये हृदयविकार दिसून येतो. त्याचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत आहे. रात्रीची जागरणे, ताणतणाव, अनियमित खाणे यांमुळे रक्तदाब वाढतो. अनुवांशिकतेमुळे हृदयरोग तरुणांमध्ये ही दिसू लागला आहे.

डॉ. शिरीष साठे, हृदयरोग तज्ज्ञ

सर्व्हेतील निरीक्षणे

गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे ४५ ते ५५ या वयोगटातील ९ टक्के जणांना रक्तदाबाचा धोका. पुण्यातील शहरी भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २० ते ४० टक्के. ग्रामीण भागात प्रमाण १२ ते १७ टक्के. ३० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींना ६ ते ८ टक्के रक्तदाबाचा धोका. १५ ते २० टक्के तरुणांकडून अस्वस्थता, अचानक घाम येणे, उच्च तणाव आदी तक्रारी. ४५ टक्के नागरिकांना उच्च रक्तदाबाची जाणीव असूनही ते उपचार घेत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणेकरांनी केले पुण्य’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'खडकवासला कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यावरून पुणे शहरात कसलाच वाद नाही. पुणे शहरातून कुणाचाही फोन मला आला नाही. पाणी देण्याइतके कोणतेच पुण्य नाही. हा पुणेकरांचा त्याग आहे. हे पुण्य त्यांनी केले आहे,' असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुण्यातून खडकवासला धरणातून सोडलेले पाणी दौंड आणि इंदापूरला पोहोचले. या पाण्याचे पूजन गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, इंदापूरचे नगराध्यक्ष अशोक इदगुडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार आदी उपस्थित होते. जलपूजन कार्यक्रमाच्या वेळी बापट म्हणाले, 'राज्यासह पुणे जिल्ह्यात या वर्षी पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. निसर्गाशी मानव कधीही संघर्ष करू शकत नाही. त्याला निसर्गाशी जुळवून घ्यावेच लागते. तरंगवाडी तलावामुळे इंदापूर तालुक्यातील १६ गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करील. मात्र, या कामासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे.'

दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्यावरून मोठ्या वादाला बापट यांना तोंड द्यावे लागले. पाणी सोडण्यास भाजप वगळता सर्वच पक्षांचा विरोध होता. पण, विरोध डावलून दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्यात आले होते.



'गाळा'वरून कोटी

आमदार भरणे यांचे भाषण चालू आसताना इंदापूर येथील तलावातील गाळ काढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन भरणे यांनी बापट यांना केले. या वेळी बापट यांनी 'आज माझा गाळात जाण्याचा दिवस आहे,' असे सांगताच भरणे यांनी 'तुम्हाला वरचा आशीर्वाद व मला अजितदादांचा आशीर्वाद असल्याने आपण दोघेही गाळात जाणार नाही,' असे सांगितले. त्यावर लगेचच बापट यांनी 'तुमचे राहू द्या. अजित पवार यांना मात्र गाळात जाऊ देऊ नका,' अशी टिप्पणी करून भविष्यात अजित पवार यांचा काळ खडतर आसल्याचे त्यांनी सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कचरा डेपोसाठी तटस्थ आयोग नेमा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोची पाहणी करण्यासाठी तटस्थ आयोग नेमून कचरा व्यवस्थापनाचा अहवाल तयार करावा, या प्रकरणी साक्षीदार म्हणून माजी कृषिमंत्री शरद पवार, खासदार वंदना चव्हाण यांसह पुण्यातील मंत्री आणि महापालिकेच्या आयुक्तांना समन्स पाठवून न्यायालयात बोलवावे, तसेच राज्यातील कचरा व्यवस्थापनासाठी गार्बेज ट्रेन सुरू करता येईल का,' असा मागणी करणारा अर्ज राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सोमवारी दाखल झाले आहेत.

उरुळी देवाची कचरा डेपोसंदर्भात हरित न्यायाधिकरणाकडे सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी याचिकाकर्ते भगवान लक्ष्मण भडाळे आणि सहकाऱ्यांनी मंगळवारी न्या. जावेद रहीम आणि डॉ. अजय देशपांडे यांच्याकडे अर्ज दाखल केला. याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांनी त्यांची बाजू मांडली. सरोदे म्हणाले, 'डेपोबद्दल महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून देत असलेली माहिती दिशाभूल करणारी देत आहेत. शहरामध्ये सध्या कचऱ्याचे वर्गीकरण चांगल्या प्रमाणात होत नाही, महापालिकेने अद्याप कचरा डेपोंचे विक्रेंद्रीकरण केलेले नाही, असे आक्षेप घेऊन आम्ही न्यायाधिकरणाकडे तीन अर्ज दिले आहेत.'

सरोदे म्हणाले, 'उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोची पाहणी करण्यासाठी तटस्थ आयोग नेमून कचरा व्यवस्थापनाचा अहवाल तयार करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. हा डेपो सुरू झाल्यापासून आजपर्यंतचे महापालिकेचे आयुक्त, माजी कृषिमंत्री शरद पवार, खासदार वंदना चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतारे यांना या प्रकरणी साक्षीदार म्हणून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश द्या, अशी विनंती अर्जात केली आहे. तसेच, परदेशात कचरा वर्गीकरणासंदर्भात सुरू असलेल्या उपक्रमांचे दाखले देऊन महाराष्ट्रातील कचरा समस्येसाठी एक गार्बेज ट्रेन सुरू करा, रिकाम्या जागेमध्ये या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने एकत्रित विल्हेवाट लावा, असा पर्याय आम्ही सुचविला आहे. न्यायाधिकरणाने आमची पत्र स्वीकारली असून या प्रकरणी १२ जुलैला पुढची तारीख दिली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभक्षेत्राचे शेरे आठ दिवसांत काढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंद्र धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हवेली, खेड आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर सोळा वर्षांपूर्वी नोंदविण्यात आलेले लाभक्षेत्राचे शेरे येत्या आठ दिवसांत कमी करण्यात येणार आहेत. हे शेरे कमी केल्यावर या जमिनी खरेदी-विक्रीसाठी निर्वेध होणार आहेत.

हवेलीच्या प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे यांनी ही माहिती दिली. आंद्र धरणग्रस्तांसाठी हवेली, खेड व मावळ तालुक्यातील तीस गावांमध्ये लाभक्षेत्र निश्चित करण्यात आले होते. धरणग्रस्तांना या तीन तालुक्यात पर्यायी जमिनीचे वाटप करण्यासासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर इतर हक्कामध्ये या नोंदी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या जमिनींच्या खरेदी-विक्रीसह अन्य सर्व व्यवहारांच्या हस्तांतरणांवर निर्बंध आले होते.

आंद्र धरणाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, धरणग्रस्तांचे पुनर्वसन व पर्यायी जमीन वाटपाचेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील इतर हक्कात असलेल्या नोंदी कमी करण्याबरोबरच हस्तांतरणावरील निर्बंध उठविण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा पुनर्वसन अधिकारी नयना बोंदार्डे यांनी राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता हस्तांतरण बंदीचे शेरे कमी करण्यात येणार आहे.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी बोंदार्डे यांनी हे शेरे कमी करण्यासंदर्भात हवेलीच्या प्रांत अधिकारी बर्गे; तसेच मावळ व खेड प्रांत अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. हवेलीमधील देहू, माळीनगर, डुडुळगाव, तळवडे, चिखली, वडमुखवाडी, चोवीसवाडी, चऱ्होली, निरगुडी, मोशी तसेच, वडगाव शिंदे या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील या नोंदी आठ दिवसांत कमी करण्यात येणार आहेत. तशी सूचना तहसीलदारांना दिली असल्याचे बर्गे यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील पिंपळगाव, कऱ्हाळवाडी, मरकळ, गोरेगाव, सोलू आणि मावळातील वराळे, आंबी, सांगवी, राजापुरी, मंगरूळ, आकुर्डी, इंदोरी, वडगाव आणि जांभूळ या गावांतील लाभक्षेत्राच्या नोंद कमी केल्या जाणार आहेत. या तीनही तालुक्यांतील ८,१६९ हेक्टर (२० हजार ४२२ एकर) क्षेत्रावरील जमीन हस्तांतरणाचे निर्बंध उठल्यानंतर निर्वेध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहित्रांना लोखंडाचे सुरक्षा आवरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. ७४४ रोहित्रांपैकी आतापर्यंत सुमारे १०० रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात आले आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह राजगुरूनगर, मंचर आणि मुळशी विभागातील ७४४ धोकादायक रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी ४२ लाख रुपये खर्च येणार आहे. पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात ४५२, नगररोड, पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन विभागांत १३७, मंचर, राजगुरुनगर, मुळशी विभागात २५५ धोकादायक रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

रोहित्रांच्या चारही बाजूंनी; तसेच रोहित्राखाली लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण घातल्यामुळे वीज खांबावरील रोहित्रांमध्ये बिघाड, ऑइल गळती, स्पार्किंग आदींमुळे होणारा धोका कमी होणार आहे. रोहित्रांना संरक्षक जाळ्या आणि कम्पाउंड घालण्यात आले आहे; परंतु अनेक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो. त्या ठिकाणी प्राणी येऊन ते वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्यांना विजेचा धक्का बसतो. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध राहावे; तसेच कम्पाउंडमध्ये ओला आणि सुका कचरा टाकू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रिस्क्रिप्शन’विना मलमांचा वापर

$
0
0

Mustafa.Attar

@timesgroup.com

पुणे : सौंदर्यात भर पडावी आणि चार चौघांत आकर्षक दिसण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये 'प्रिस्क्रिप्शन'शिवाय चुकीच्या मलमांचा वापर होत असल्याचे उघटडकीस आले आहे. 'स्टिरॉइड' असलेल्या मलमांच्या चुकीच्या वापरामुळे 'नायटा'सारख्या त्वचेच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक औषधे निष्क्रिय ठरू लागली आहेत. त्याशिवाय, स्त्रियांच्या चेहऱ्यावर फोड येणे, प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारखे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

सध्या तरुणाईमध्ये सुंदर दिसण्यासाठी चढाओढ आहे. मुलींसह मुलेदेखील त्यामध्ये पुढे असतात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, ब्युटी पार्लरच्या सल्ल्याने बरचसे उपाय केले जातात. याचा फायदा घेऊन अनेक औषध कंपन्यांनी विविध प्रकारची मलमे बाजारात आणली आहेत. त्यांच्या जाहिराती वृत्तपत्रे-टीव्हीवर दाखविल्या जातात. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर म्हणाले, ''स्टिरॉइड' असलेल्या मलमांचा सुंदर दिसण्यासाठी किंवा इतर कारणासाठी सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे 'स्टिरॉइड' वापराचे दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसत आहेत. स्त्रियांचा चेहरा लाल होणे, केस येणे, मुरमे येणे, पुरळ येणे; तसेच रक्तवाहिन्या स्पष्ट दिसणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत. अॅलर्जी, सोरायसिससारखे आजार बरे करण्यासाठी 'स्टिरॉइड' मलम, इंजेक्शन अथवा गोळ्यांच्या स्वरूपातील औषधाचा वापर केला जातो. 'स्टिरॉइड' मलमे ही 'शेड्यूल एच' वर्गात मोडतात. पेशंटने ती डॉक्टरांच्या 'प्रिस्क्रिप्शन'वर खरेदी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे सर्रासपणे 'प्रिस्क्रिप्शन'शिवाय उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मलमांचा दुरुपयोग होत आहे.'

ते म्हणाले, 'सध्या 'नायटा' हा बुरशीजन्य आजार फार प्रमाणात पाहायला मिळत आहे. संमिश्र 'स्टिरॉइड' मलमांचा बेसुमार वापरामुळे 'नायटा'सारखे आजार वाढू लागले आहेत. संमिश्र 'स्टिरॉइड' मलमांमध्ये प्रतिबुरशी, प्रतिजैविक आणि 'स्टिरॉइड' अशी तिन्ही औषधे मिश्रित असतात. त्यामुळे सुरुवातीला पेशंटला बरे वाटते. मात्र, 'स्टिरॉइड'मुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन नायट्याचे प्रमाण वाढते.'

पुणे त्वचारोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शरद मुतालिक म्हणाले, '१५ ते ४० वयातील मुले-मुली, तरुण-तरुणींममध्ये सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारची मलमे चेहऱ्याला लावण्याचे प्रकार वाढत आहेत. 'प्रिस्क्रिप्शन'शिवाय चुकीच्या मलमांचा वापर केल्याने दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर २५ ते ३० टक्के पेशंट तज्ज्ञांकडे तक्रारी घेऊन येतात. 'प्रिस्क्रिप्शन'शिवाय मलमांच्या वापराचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मुलींच्या चेहऱ्यावरील पिंपल्स बरे होत नाहीत. त्यामुळे या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे आम्ही अखिल भारतीय त्वचारोग संघटनेने तक्रारी केल्या आहेत.'

त्वचा तज्ज्ञांचा सल्ला

घरात पडलेले किंवा मित्राने शिफारस केलेले मलम वापरू नका.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, 'प्रिस्क्रिप्शन'शिवाय कोणतीही मलम वापरू नका.

'प्रिस्क्रिप्शन'वर दिलेले मलम दीर्घ काळ (अनेक महिने, ‍वर्षे) वापरू नये

गोळ्या, इंजेक्शननुसार मलमदेखील औषधे आहेत. त्याचा दुरुपयोग होता कामा नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ व्हाया डिफेन्स कॉलनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळावरून शहरात येण्यासाठी किंवा शहरातून विमानतळाला जाण्यासाठी विमानतळ परिसरातीलच डिफेन्स कॉलनीतून विमाननगर रोडला जोडणारा रस्ता करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात विमानतळाकडे ये-जा करण्यासाठी विमानतळ रोडखेरीज नगर रोडवरून विमाननगरमार्गे येणे शक्य होणार आहे.

विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या गेल्या काही वर्षांत गंभीर बनली होती. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर सद्य परिस्थितीत केवळ एकच रस्ता उपलब्ध आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लागतात. त्यामु‍ळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता करण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्यासाठी हवाई दलाकडून जागा मिळणे गरजेचे होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या पर्यायी रस्त्यासाठी जागा देण्यास मान्यता दिल्याने या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या विमानतळाच्या 'एक्झिट' गेटमधून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे वळून शहराच्या दिशेने यावे लागते. ‍विमानतळातून बाहेर पडल्यानंतर ५०९ चौकापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते. पर्याय नसल्याने सर्वांना त्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे विमानतळातून बाहेर पडल्यानंतर आता उजवीकडे न वळता, डावीकडे वळून डिफेन्स कॉलनीतून विमाननगर रोडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती स्थानिक आमदार जगदिश मुळीक यांनी दिली.

हा रस्ता हवाई दलाच्या जमिनीतून जाणार आहे. या रस्त्याने त्या जमिनीचे दोन तुकडे होत होते. त्यामुळे हा रस्ता हवाई दलाच्या उपलब्ध जमिनीच्या सुरक्षा भिंती जवळून केला जाणार आहे. याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. एका महिन्यात या रस्त्याची जागा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images