Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कोरेगाव पार्कात फोडले दोन फ्लॅट

0
0

दहा लाखांचा ऐवज पळवला; चोरटे सीसीटीव्हीत कैद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोरेगाव पार्कमधील दोन कुलूपबंद फ्लॅटचे फोडून चोरट्यांनी तिजोऱ्या पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका फ्लॅटमधून दहा लाखांचा माल चोरीला गेल्याचे समोर आले असून, दुसऱ्या फ्लॅटमधील चोरीच्या रकमेचे अद्याप तपशील समजलेले नाहीत. हा फ्लॅट परदेशी नागरिकाच्या नावावर असून, ते आल्यानंतरच चोरीचे तपशील समजतील. दरम्यान, घरफोडी करणारे दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

या प्रकरणी ऋषीकेश कुलकर्णी (वय ३८, रा. फ्लॅट नं. ३०१, ब्लॉसम बुलवार्ड, लेन नंबर ७, कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी व्यवसायाने आर्किटेक्ट असून, पत्नीसोबत ब्लॉसम सोसायटीतील ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आहेत. त्यांची पत्नी खासगी कंपनीत नोकरी करते. त्यांचे आई-वडील कोथरूडमध्ये वास्तव्यास आहेत. दर शनिवारी, रविवारी कुलकर्णी दाम्पत्य येथे राहण्यास येते आणि सोमवारी परत जाते. शनिवारी रात्री सातच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून ते आईवडिलांकडे गेले. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परत आले. त्यावेळी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये गेल्यानंतर चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. कुलकर्णी कोथरूडला गेल्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटामधील रोख पन्नास हजार, सोन्याचे दागिने, असा एकूण १०.२५लाख रुपयांचा माल तिजोरीसह चोरून नेला.

याच सोसायटीमधील ए विंग मधील ४०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये हॉलंड येथील व्हिल्मा ऑस्ट्रिम राहतात. ते कुलकर्णी यांचे ते मित्र असून, सध्या हॉलंडला गेले आहेत. चोरट्यांनी त्यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात असलेली तिजोरी पळवून नेली आहे. व्हिल्मा यांच्याशी संपर्क साधला असता, हो होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्या फ्लॅटमधून नेमके काय चोरीला गेले याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, कोरेगाव पार्क पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले असता, त्यामध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत. त्यांचे चेहरे झाकले असल्याने ते स्पष्ट ओळखू येत नाहीत. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आर. जे. पाटील अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आम्हाला पूर्वीपासूनच धमक्या येत होत्या

0
0

'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक खुलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आम्हाला पूर्वीपासूनच धमक्या येत होत्या; पण त्या थेट नसल्याने आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत,' असा धक्कादायक खुलासा 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांनी केला आहे. 'एफटीआयआय'पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुखांनाही स्फोटकांचे पार्सल आणि धमकीचे पत्र मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर कन्हैयाला संस्थेत निमंत्रित केले नसतानाही ऐतिहासिक आणि उज्ज्वल परंपरा असणाऱ्या शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केले जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये दहशतवाद माजवणे गंभीर आहे, अशी टीका विद्यार्थ्यांनी केली आहे.
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि इतर सदस्यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 'जेएनयू'मधील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला होता. 'कन्हैयाच्या पुणे दौऱ्यात त्याला संस्थेत निमंत्रित करण्यात आले नव्हते. कन्हैयाचा आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा थेट संबंध नसताना, तसा तो जोडून धमकावण्याचे प्रकार गंभीर आहेत,' अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. 'धमक्यांना गांभीर्याने घेतले नाही; पण कन्हैयावरून संस्थेत थेट लेटरबॉम्ब पाठवणे धक्कादायक आहे. यावरून विरोध करणारे कोणता स्तर गाठू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. हा एक प्रकारे इशाराच असून, देशातील महत्वाच्या संस्थांकडे विशिष्ट दृष्टिकोन ठेवून संशयाने पाहणे, योग्य नाही,' अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी स्टुडंट असोसिएशनने केली आहे.
'कन्हैयाकुमारला निमंत्रित केले नव्हते. तो आला तर आम्ही त्याचे स्वागत करू असे म्हटले होते. बाहेरच्या व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना डावे, नक्षलवादी अशा बिरूदावली लावल्या जातात. आंदोलनादरम्यान आमच्या विरोधात सोशल मीडियावर वाईट संदेश पसरवले जात होते. तसेच या काळात अनेक पत्रे आम्हाला मिळाली असून, धमकावण्याचे प्रकार घडले आहेत,' याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले.
-------------------------------------------
व्यक्तीपाठोपाठ संस्थाही टार्गेटवर
रानडे इन्स्टिट्यूटमधील वृत्तपत्रविद्या विभागाची ख्याती मोठी आहे. अनेक पत्रकार या संस्थेतून घडले आहेत. कन्हैयाच्या पुण्यातील सभेचा आणि येथील बहुतांश विद्यार्थ्यांचा काही संबंध नसताना विभागप्रमुखांना धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याने थेट संस्थेलाच लक्ष करण्यात आले आहे. या बाबत अनेक विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन-चार विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण संस्थेलाच बदनाम करण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर बोगस रेशनकार्ड रद्द

0
0

२० लाख किलो धान्याची बचत होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेशनकार्डला आधार क्रमांकाची जोडणी केल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे लाखभर रेशनकार्ड कमी झाले आहेत. या 'बोगस' रेशनकार्डवरील धान्याचे वितरण थांबविण्यात आल्याने वीस लाख किलो धान्याची बचत होणार आहे.
रेशनकार्डला आधार क्रमांकाची जोडणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आधार क्रमांक जोडणीच्या माध्यमातून धान्य पुरवठ्यामधील गळती रोखण्याबरोबरच बोगस रेशनकार्डांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेशनकार्डला आधार जोडणीसाठी म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आधार जोडणी न करणाऱ्यांना रेशनचे धान्य न देण्याचा इशारा प्रशासनाने दिला. तसेच, रेशन दुकानदारांनाही त्यांच्या दुकानाशी संबंधित सर्व कार्डांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यात सुमारे नऊ लाख रेशनकार्डधारक आहेत. या रेशनकार्डधारकांना आधार जोडणी आवश्यक केल्याने आतापर्यंत ७२ टक्के कार्डधारकांनी आधार क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. हा आधार क्रमांक रेशनकार्डला जोडण्याचे काम सुरू आहे. या जोडणीदरम्यान बोगस रेशनकार्डांची माहिती पुढे आली आहे. या मोहिमेमध्ये एकाच नावाची दोन रेशनकार्ड, बोगस नावाने रेशनकार्ड तसेच स्थलांतर केल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणचे रद्द न केलेले रेशनकार्ड आढळले आहे. जिल्ह्यात ही संख्या सुमारे चाळीस हजारांच्या आसपास आहे.
शहरात दुबार, स्थलांतरीत आणि बोगस नावाची जवळपास साठ हजार रेशनकार्ड आढळून आली आहेत. ही सर्व रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एक रेशनकार्डवर सर्वसाधारणपणे चार ते पाच युनिट आहेत. या निर्णयामुळे शहर आणि जिल्ह्यातील एक लाख रेशनकार्डांवरील अशी पाच लाख युनिट कमी होणार आहेत. रेशनकार्डवरील एका युनिटला पाच किलो धान्य दिले जाते. त्यामुळे वीस लाख किलो धान्याची बचत होण्यास मदत होणार आहे. शहरातील साठ हजार रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे साडेतीन लाख युनिट कमी झाले आहेत. यापूर्वीही ९० हजार युनिट रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती शहर पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी दिली.
..
आधार क्रमांकांच्या जोडणीमुळे बोगस रेशनकार्डांचा प्रकार उघडकीस आला आहे. दुबार असलेली सुमारे चाळीस हजार रेशनकार्ड आतापर्यंत रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एक लाख साठ हजार युनिट संख्या कमी झाली आहे.
ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल प्रवेश होणार राज्यातील यादीनुसारच

0
0

खासगी, अभिमत विद्यापीठांमधील प्रवेश केंद्रीय स्तरावरून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात 'नीट' परीक्षेच्या आधारे वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रवेश देताना, राज्य पातळीवर तयार होणाऱ्या स्वतंत्र यादीतून ८५ टक्के जागा भरल्या जाणार असल्याचे राज्य वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने मंगळवारी स्पष्ट केले. अभिमत आणि खासगी विद्यापीठांमध्ये मात्र राष्ट्रीय पातळीवरील यादीनुसारच प्रवेश होणार असल्याचेही संचालनालयाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बीएचएमएस, बीएएमएस, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या अभ्यासक्रमांचे प्रवेश 'एमएचटी-सीईटी'च्या गुणांच्या आधारेच होणार आहेत.

मेडिकलच्या प्रवेशांसाठी राज्य पातळीवरील प्रवेश परीक्षा नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील 'नीट' ही परीक्षाच ग्राह्य धरली जाणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट केले. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेशही कोर्टाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार प्रवेश होताना, राज्याच्या पातळीवर नेमके काय चित्र असेल, याविषयी 'मटा'ने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी डॉ. शिनगारे यांनी या बाबी स्पष्ट केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षावाल्याचा मुलगा २२व्या वर्षीच IAS

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'माझे वडील रिक्षा चालवितात. मी मराठवाड्यातून आलो असून, त्यातही अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी आहे. पण म्हणून खचलो नाही. चिकाटीने तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी झालो. आता माझ्यासारख्याच इतरांसाठीही काम करायचंय...' अन्सार शेख सांगत होता.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या निकालात जालना जिल्ह्यातील शेलगावच्या अन्सारने राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत ३६१ वे स्थान मिळविल्याचे स्पष्ट झाले. फर्ग्युसन कॉलेजमधून गेल्या वर्षी राज्यशास्त्र विषयातून बी. ए. झालेल्या अन्सारने पदवीनंतर लगेचच दिलेल्या परीक्षेत यश संपादित केले आहे. सध्या पुण्यात असलेल्या अन्सारशी 'मटा'ने संवाद साधून त्याची भावना जाणून घेतली.

अन्सार म्हणाला, 'घरच्या बिकट परिस्थितीमुळे दहावीला असतानाच मी आयएएस होण्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. त्यानुसार अभ्यास केला. जिल्हा परिषदेच्या शाळेतून दहावीला ७६ टक्के मार्क्स मिळविले. बारावी कला शाखेत ९१ टक्के गुण मिळाले. पदवीला ७३ टक्के गुण मिळविले. पदवीचा अभ्यास करताना सोबत यूपीएससीची तयारीही सुरू होती. मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि मित्र- मैत्रिणींनी केलेल्या सहकार्याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविणे शक्य झाले.'

अन्सारच्या घरी आई-वडील, लहान भाऊ आणि लग्न झालेल्या दोन बहिणी असा परिवार आहे. या निकालामुळे आपल्या गावातून पहिलाच अधिकारी बनलेल्या अन्सारचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. बिकट परिस्थितीचा अनुभव घेतलेल्या अन्सारला भविष्यात नागरी सेवांच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकता, महिला सबलीकरण, ग्रामविकास आदी मुद्द्यांवर काम करण्याची इच्छा आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची मुलगी बनली आयएएस

हैद्राबादच्या अदिरे मंजूने यूपीएससी परीक्षेत २९ वे स्थान पटकावले आहे. अदिरे मंजूचे वडिल चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मूळचे महेबूब नगरला राहणारे मंजू कुटुंब रोजगारानिमित्त हैद्राबादमधील विजयापुरी परिसरात राहायला आले.



रिक्षा चालकाच्या मुलगा झाला यूपीएससी पास

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात रिक्षा चालवणाऱ्या भुजंग राव यांचा मुलगा इज्जदा मधुसूदन राव यांने यूपीएससी परीक्षेत ६५८ क्रमांक पटकावला आहे. भुजंग राव या रिक्षा चालकाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. अशा परिस्थितीत यूपीएससी परीक्षा पास झालेल्या इज्जदा मधुसूदन रावचे परिसरात कौतुक होत आहे.



दुकानदाराच्या मुलीचे तिहेरी यश

पश्चिम बंगालच्या भद्रेश्वर परिसरात राहणाऱ्या श्वेता अग्रवालने यूपीएससी परीक्षेत १९वे स्थान पटकावले आहे. श्वेताचे वडील साधे दुकानदार आहेत. या अगोदर श्वेता या अगोदर आयआरएस आणि आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. मात्र तिला आयएएस बनायचे होते. आता तिच्यासह तिच्या कुटुंबाचे स्वप्न देखील पू्र्ण झाले आहे.



विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमधील यूपीएससी परीक्षा पास करणाऱ्या सर्व उमेदवारांहून श्वेताने उच्च श्रेणी प्राप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससी: अंसारचे 'शुभम' असे नाव बदल्यानंतर मिळाले घर

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

बडोद्यात नोकरीसाठी गेलेल्या उच्चशिक्षित बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य असल्यांमुळं राहण्यासाठी घरं मिळत नव्हतं. नोकरी वाचवण्यासाठी मग बाबासाहेबांना आपलं नाव बदलून पारशी नाव धारण करावं लागलं होतं. मात्र या कहाणीची शतकापूर्ती होत असली, तरी नुकताच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंसार अहमद शेखलाही अगदी अशाच सामाजिक भेदभावाच्या कटु अनुभवाचा सामना करावा लागला आहे. शिक्षणासाठी पुण्यात भाड्याचे घर मिळावे म्हणून अंसारला शेवटी आपले नाव मुस्लिम नाव बदलून ते 'शुभम' असे ठेवावे लागले. त्यानंतर कुठे अंसारला पुण्यात राहण्यासाठी घर मिळालं.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील रिक्षा चालकाचा मुलगा असलेल्या २१ वर्षं वय असलेलया अंसार अहमद शेख याची ही कहाणी देखील चर्चेचा विषय ठरली आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागला आणि अंसार आपलं शिक्षण पूर्ण करू शकला.

अत्यंत हुशार विद्यार्थी असलेला अंसार पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ३६१ वं स्थान प्राप्त करून उत्तीर्ण झाला. असा हुशार आणि ध्येयवादी असलेला अंसार ३ वर्षांपूर्वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी पुण्यात आला. मात्र त्याला धार्मिक भेदभावासारख्या कटु अनुभवाचा सामना करावा लागला. या समस्येवर मात करण्यासाठी अंसारला अखेर आपलं नाव बदलून आपला धर्म लपवावा लागला.

विशेष म्हणजे या अपमानजनक अशा कटु अनुभवामुळे विचलित न होता अंसारनं मोठं यश संपादन केलं. आता सरकारी अधिकारी बनल्यानंतर अंसारनं आपल्या समोर सकारात्मक दृष्टी ठेवून समाजातील धार्मिक भेदभाव दूर करण्याचा उद्देशानं काम करायचं ठरवलं आहे. समाजात धार्मिक सलोख्या वाढवण्यावर आपला कटाक्ष असेल असा संकल्पच अंसारनं सोडला आहे.

अंसार दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जालना जिल्हात असलेल्या शेलगावचा रहिवाशी. अंसार २०१५ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात ७३ टक्के गुण मिळवून बीए पास झाला. ओबीसी वर्गातील असल्यामुळं अंसारला आयएएस मिळण्याची पूर्ण आशा आहे. जर असं झालं, तर अंसार देशातील सर्वात युवा आयएएस अधिकारी बनेल.

आपल्याला तीन बाजूंनी मार बसला आहे असे अंसार सांगतो. एक तर आपण अल्पसंख्याक समाजाचे आहोत, दुसरं म्हणजे आपण गरीब कुटुंबातील आहोत आणि तिसरं म्हणजे आपण मागास भागात राहणारे आहोत अशी वस्तुस्थिती अंसार मांडतो. यापुढे आपण या तीन समस्या कशा सोडवता येतील यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे तो आवरर्जून सांगतो. याच तीन गोष्टींनी आपलं आयुष्य मर्यादित झालं होतं असंही असारचं म्हणणं आहे.

आपला भाऊ एका गॅरेजमध्ये काम करत असून त्यांच्या मदतीशिवाय आपल्याला हे यश मिळवता आलंच नसतं, असं म्हणत आपल्या यशाचं श्रेय अंसारनं आपल्या भावाला देऊ केलं आहे.

अंसार बोलत असताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात. अंसारच्या वडिलांना तीन पत्नी आहेत. त्याच्या घरी शिक्षणाचं कोणतंही वातावरण नव्हतं. अंसारच्या लहान भावानं शाळेतूनच शिक्षण सोडलंय, तर दोन बहिणींचं लहान वयातच लग्न उरकून टाकण्यात आलं होतं. आपण यूपीएससी परीक्षा पास झाल्याचं सांगितल्यावर घरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याचं अंसार सांगतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबा, माउलींच्या पालख्यांचा कार्यक्रम जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून २७ जूनला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून २८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संस्थानांनी कार्यक्रमाची पत्रिका जाहीर केली आहे.
परंपरेप्रमाणे आळंदी आणि देहू येथून पालख्यांचे प्रस्थान तिथीनुसार होणार आहे. या सोहळ्यात राज्याच्या विविध भागातील भाविक सहभागी होतात. त्यामुळे आत्तापासूनच तयारी चालू झाली आहे. माउलींच्या समाधी मंदिरात आणि देहूतील मुख्य मंदिरात पालखी सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बैठका झाल्या आहेत. दिंडीचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा प्रमुख, दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त यांच्यामार्फत शासकीय स्तरावर पत्रव्यवहार चालू असून, भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता भासू नये, याविषयी खबरदारी घेण्यात येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २८ जूनला आळंदीहून प्रस्थान होणार आहे. २९ आणि ३० जूनला पालखी पुण्यात भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला असेल. एक आणि दोन जुलैला पालखी सासवड येथे मुक्कामासाठी असेल. त्यानंतर जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी येथे मुक्काम असेल. चांदोबाचा लिंब, बाजीराव विहिर आणि वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे. तसेच सदाशिवनगर, खुडुसफाटा, ठाकूरबुवांची समाधी आणि बाजीराव विहिर येथे गोल रिंगण होणार आहेत. १४ जुलैला पालखी पंढरपूरात दाखल होईल.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदाचे ३३१ वे वर्षे आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका संस्थानने जाहीर केली आहे. त्यानुसार २७ जूनला देहूतील मुख्य मंदिरातून पालखीचे प्रस्थान होईल. २८ जूनला पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे राहील. त्यानंतर २९ आणि ३० जूनला पुण्यात नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम राहणार आहे. यंदा तिथीक्षय किंवा तिथीवाढ नसल्यामुळे पुण्याव्यतिरिक्त पालखीमार्गावर अन्य कोणत्याही ठिकाणी दोन मुक्काम नसतील, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.

पहिले रिंगण बेलवडीत

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण प्रथेनुसार बेलवडी येथे होईल. त्यानंतर इंदापूर, अकलूज येथे गोल रिंगण आणि माळीनगर, वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे. तोंडले बोंडले येथे धावा होईल. लोणी काळभोर, यवत, वरवंड, गवळ्याची उंडवडी, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली आणि वाखरी येथे पालखी मुक्कामाची ठिकाणे असतील. १४ जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगावपार्क येथे फ्लॅट फोडून आठ लाखांची चोरी

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे कोरेगाव परिसरातील आणखी एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला असून, गोव्याला मूळगावी गेलेल्या एका व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेआठ लाखांचा माल पळविला आहे. मंगळवारी या परिसरातील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी तिजोऱ्या चोरून नेल्याचे उघडकीस आले होते. याबाबत सलीम अमिनूर शेख (वय ३६, रा. फ्लॅट नं. ३, बी बिल्डींग, मिशननगर हाउसिंग सोसायटी, कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम हे मूळचे गोव्याचे असून, पत्नी व मुलांसोबत कोरेगावपार्क येथे राहतात. तीन मे रोजी ते मूळगावी कुटूंबासोबत गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप कापून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटामधून रोख एक लाख ३० हजार व सोन्याचे दागिने असा एकूण आठ लाख ६४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. त्यांच्या सोसायटीचे सेक्रेटरी यांनी सहा मे रोजी सलीम यांच्या घराचे दार उघडे असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी सलीम यांना घरात चोरी झाल्याचे कळवले. सलीम हे १० मे रोजी पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी फौजदार एम. एच. तडवी हे अधिक तपास करत आहेत. या सोसायटीत सीसीटीव्ही बसवले नसून, सुरक्षारक्षकही ठेवण्यात आलेला नाही. मंगळवारीच कोरेगावपार्क परिसरातील ब्लॉसम बुलेवार्ड सोसायटीतील फ्लॅटमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी तिजोरी पळवली होती. यामध्ये १० लाख २५ हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता. तर, याच सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावरील एका परदेशी नागिकाच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. मात्र, या फ्लॅटमधून किती माल गेला याची माहिती मिळालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७३ नागरिकांना ७८ लाखांचा मुद्देमाल परत

0
0







म. टा. प्रतिनिधी, पुणे पै-पै करून जमविलेली पुंजी; तर कोणाच्या सौभाग्याचे लेणेच चोरीला गेले होते... ते परत मिळेल की नाही याची चिंता होती. पण, पुणे शहर पोलिसांनी ७३ गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करून नागरिकांना परत केला. नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद झळकत होता. मुद्देमाल परत मिळाल्यामुळे त्यांनी पोलिस दलाचे आभार मानले. तसेच, पोलिसांवरील विश्वास वृद्धिंगत झाल्याची भावना व्यक्त केली. घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरी अशा विविध ७३ गुन्ह्यातील जप्त केलेला ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल बुधवारी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते नागरिकांना प्रदान करण्यात आला. या वेळी पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, 'नागरिकांच्या चोरीला गेलेल्या वस्तू त्यांना परत मिळवून देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. त्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगले काम केले आहे. चोरट्यांकडून मिळालेला मुद्देमाल परत करण्यासाठी दीड महिन्यांत कोर्टाकडून ऑर्डर आणत नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत केला. लवकर आणखी मुद्देमाल परत केला जाईल.' मुद्देमाल परत मिळालेल्या प्रज्ञा केळकर म्हणाल्या, 'कर्वेनगर परिसरातून माझी सोन्याची साखळी चोरीला गेली होती. पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे तक्रार देताना विचार करतात. पण, मी तत्काळ तक्रार दिली. नागरिकांना मदत करण्यासाठी पोलिस चोवीस तास तत्पर असतात, हे समजले. नागरिकांनी न्यूनगंड काढून पोलिसांना सहकार्य करावे. असे कार्यक्रम झाल्यास पोलिसांबद्दलचे गैरसमज व भीती दूर होण्यास मदत होईल.' मंदाकिनी दिवेकर म्हणाल्या, 'माझे वय ८७ असून, पतीचे वय ९३ वर्षे आहे. माझे सौभाग्याचे लेणेच चोरट्यांनी चोरून नेले होते. ते पोलिसांनी तत्काळ मिळवून दिले. माझे स्त्रीधन लवकर मिळाले याचा मला आनंद आहे. यामुळे पोलिसांवरील विश्वास वाढला आहे.' नंदकुमार थोरात म्हणाले, 'माझ्या पत्नीचे गंठण चोरीला गेले होते. सौभाग्याच्या लेण्याची किंमत काय असते याची माहिती पत्नीकडून मिळाली. ते लेणं पोलिसांनी तत्काळ मिळवून दिले. पुणे पोलिसांची कामगिरीबाबत विचारले तर त्यांच्या कामाची पावती म्हणून हा दागिना दाखवेल.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. आर. पाटील यांनी केले. तर, सूत्रसंचालन सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज पडून तरुणाचा मृत्यू

0
0

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील दरकवाडी येथे शेतात काम करत असलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळून तो मृत्युमुखी पडला. मार्तंड कोंडिभाऊ वाडेकर (३५, रा. वाडा) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

तीन वाजण्याच्या सुमारास चासकमान धरणाअंतर्गत वाडा, दरकवाडी, गुंडाळवाडी, तसेच धरणाच्या परिसरांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अर्धा ते पाऊण तास पडत होता. वाडा गावचे रहिवासी असलेले मार्तंड वाडेकर दरकवाडी येथे आपल्या शेतातील मेथीची काढणी करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तातडीने घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सायंकाळीही खेड तालुक्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालकासह पाच जणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भय्यूजी महाराज यांचे चालक प्रशांत देशमुख यांना झालेल्या मारहाणप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी बुधवारी पाच जणांना अटक केली. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये ट्रकचालकाचाही समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

ट्रकचालक अशोक पवार (रा. जळगाव), सहायक रवी राठोड, सागर तावरे, सुहास बांदल आणि विशाल शिंदे (तिघेही रा. रांजणगाव गणपती, शिरूर) यांच्यावर दंगल माजवून शिवीगाळ करणे; तसेच धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ मे रोजी भय्यूजी महाराज पुण्याहून इंदूरकडे जात असताना, रांजणगाव बस स्थानकाजवळ त्यांच्या गाडीला एका ट्रकची धडक बसली. या वेळी ट्रकमधून चालक पवार आणि सहायक राठोड उतरले. त्यांच्यात व भय्यूजी महाराज यांच्या गाडीचे चालक देशमुख यांच्यात बाचाबाची झाली.

'बसस्थानकाजवळ असलेल्या तावरे, बांदल आणि शिंदे यांनीही बाचाबाची केली. त्यानंतर या पाचही जणांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करून धमकीही दिली,' असे देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे इंदलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्तांना मदत बेतली जीवावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्त वाहनातील लोकांना बाहेर काढून स्वतःच्या कारमध्ये परतणाऱ्या दोघांना मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. या घटनेत उज्जैन येथील एका महाराजांचा मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उर्से टोलनाक्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. अनिरुद्ध कर्मयोगी महाराज (रा. उज्जैन, मध्य प्रदेश) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर जखमी झालेल्याचे नाव समजू शकले नाही.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से टोलनाक्याजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक कार द्रुतगती वेगात दुभाजकावर जाऊन अडकली. त्यामुळे त्या कारच्या मागून येताना अनिरुद्ध महाराजांनी स्वतःची कार रस्त्याच्या कडेला थांबविली. अपघातग्रस्त कारमधून लोकांना बाहेर काढले. त्यानंतर स्वतःच्या कारकडे जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या कारने महाराज व त्याच्यासह असणाऱ्या एकाला ठोकरले. यात महाराजांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळीचे संकट टळणार

0
0

सात हजार टन डाळीच्या पुरवठ्याची केंद्राची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तूर डाळीचे राज्यासमोरील संभाव्य संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला असून, पहिल्या टप्प्यात सात हजार टन तूर डाळीचा पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. एकूण २८ हजार टन तूर डाळीचा पुरवठा करण्याची मागणी राज्याने केंद्राकडे केली असून, त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्यात गेल्या वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यातच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा तूर डाळीचे अपेक्षित उत्पन्न झाले नसल्याने यंदाही मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत पडण्याची भीती आहे. तूर डाळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी राज्याने कायदा केला असला, तरी राज्यातील सर्व नागरिकांना डाळ उपलब्ध होण्यात अडचण येऊ नये, यासाठी अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. केंद्राच्या बफर स्टॉकमधील २८ हजार टन डाळ राज्याला उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी या भेटीमध्ये पासवान यांच्याकडे करण्यात आली. प्रत्येक महिन्याला सात हजार टन यानुसार चार महिने डाळीचा पुरवठा करण्याचा आग्रह बापट यांनी धरला. त्यानुसार, पहिल्या महिन्यासाठी सात हजार टन डाळीचा पुरवठा करण्यास पासवान यांनी मंजुरी दिल्याची माहिती बापट यांनी दिली. ही डाळ राज्यासाठी अपुरी पडण्याची शक्यता असल्याने दोन हप्त्यांत १० हजार टन डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्राकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तूर डाळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी राज्याने कायदा केला असून, त्यावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर उमटताच विभागीय स्तरावर तूर डाळीचे भाव निश्चित केले जातील, असा दावा बापट यांनी केला.

.............

चौकट

मेट्रोचा निर्णय लवकरच

पुणे मेट्रोचा अहवाल केंद्र सरकारला काही दिवसांपूर्वीच सादर झाला आहे. केंद्राच्या विविध विभागांकडून त्या अहवालाविषयी काढण्यात आलेल्या शंका महापालिकेमार्फत राज्य सरकारला पाठवण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल येत्या दोन दिवसांत केंद्रीय नगरविकास विभागाला प्राप्त होईल. त्यानंतर तातडीने 'पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डा'समोर (पीआयबी) त्याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न असेल. तसेच मेट्रोसाठी जागतिक बँकेकडून वित्तीय साह्य उपलब्ध व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.................

- दिल्लीत बुधवारी झालेले इतर महत्त्वाचे निर्णय

- नाशिक फाटा ते राजगुरूनगर (खेड) रस्ता सहा पदरी होणार

- लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १५ मे रोजी पुण्यात बैठक

- पुणे-सातारा रस्त्याचे प्रलंबित काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करणार

- बोपखेलवासीयांसाठी पर्यायी रस्ता विकसित केला जाणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रेमा’साठी तरुणाई ‘पळते’ आहे!

0
0

पालकविरोधामुळे रोज एका किशोरवयीन 'कपल'चे पलायन

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : तरुणाईचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून दिवसाला सरासरी एक 'कपल' पालकांच्या विरोधामुळे पळून जात असल्याची धक्कादायक आकडेवारी पोलिसांकडील नोंदीवरून उघड झाली आहे. करिअर घडवण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणाई अवलंबल्या जात असलेल्या मार्गामुळे पालकांसह पोलिसही हैराण झाले आहेत.

मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या घटना अलीकडे पुण्यात वेगाने वाढत आहेत. फूस लावून पळवून नेलेल्या मुलींचे सरासरी वय १४ वर्षांपासून पुढे असल्याचे पोलिस दप्तरी असलेल्या नोंदीमध्ये आढळले आहे. पळवून नेलेल्या मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास संबंधित मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.

पुण्यात दर दिवशी या संदर्भातील सरासरी एक ते दोन गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर या तरुण-तरुणींना शोधण्यासाठी पोलिसांना मोहीम हाती घ्यावी लागते. ज्यांच्या मुलीला पळवून नेलेले असते, ते पालक हवालदिल होतात. अनेकदा पालकांकडून पोलिसांवर तपासाबाबत आरोप करण्यात येतात. त्यामुळे अशा या वाढत्या 'लव्ह स्टोरीज' पालकांसोबतच पोलिसांसाठीही त्रासदायक ठरत आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी मुलींचे पालक पोलिस ठाण्यांचे उंबरे झिजवत असल्याची उदाहरणे वाढल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पुण्यात २०१४मध्ये १०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०१५मध्ये तिप्पट वाढ होऊन, तो आकडा ४४४वर गेला आहे. तरुण-तरुणींचे पळून जाण्याचे प्रमाण या वर्षीही वाढतच आहे. मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या १५० घटना गेल्या चार महिन्यांत पोलिस दप्तरी दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडे नोंद झालेली आकडेवारी पाहता पुण्यातून दररोज एक 'कपल' पळून जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मुलगा-मुलगी पळून जात असल्यामुळे पालकांसमोरील चिंता वाढली आहे. किशोरवयीन मुलांचे प्रेम आणि त्यानंतरचे जीवन, त्यातून पुढे येणारे गंभीर प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. कॉलेजमध्ये शिक्षण घेताना जुळलेल्या नात्यांना अनेकदा पालकांकडून विरोध होतो. हा विरोध अनेकदा करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, यासाठी असतो. तरुणांना मात्र पालकांकडून जाच होत असल्याचे वाटून पळून जाण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे

वर्ष-संख्या

२०१४-१०६

२०१५-४४४

२०१६-१५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: चाकणजवळ बस-ट्रकचा अपघात, ४ ठार

0
0

म.टा. प्रतिनीधी । पुणे

पुणे-नाशिक मार्गवरील चाकणजवळ मेदनकरवाडी येथे गुरुवारी पहाटे एका कंपनीची बस आणि ट्रकचा अपघात झाला. बसला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ४ कर्मचारी जागीच ठार, तर ५ जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणारी एक बस नेहमीप्रमाणे मेदनकरवाडी परिसरात पहाटे उभी होती. इतक्यात या मार्गावर भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक आला. ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि ट्रकची बसला धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की ४ जण जागीच ठार झाले. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ५ जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते अपघाताचा तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ईव्हीएम मशिनद्वारे

0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांप्रमाणेच सहकारी संस्थांच्या निवडणुका या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (ईव्हीएम) घेण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 'ईव्हीएम' मशिन देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. राज्यात सुमारे दोन लाख ३० हजार सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे काम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत करण्यात येते. निवडणुकीची प्रक्रिया वर्षभर सुरू असते. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पारंपरिक पद्धतीने कागदी मतपत्रिका आणि शिक्का याद्वारे घेण्यात येते. मतदानाची प्रक्रिया पार झाल्यानंतर मतमोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासते; तसेच अनेक निवडणुकांमध्ये मतमोजणीला विलंब होतो. काही वेळा फेरमतदानाची मागणी केली जाते. त्यामुळे अडचण निर्माण होते. हे प्रकार थांबण्यासाठी 'ईव्हीएम' मशिन देण्याची मागणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने केली आहे. सध्या 'ईव्हीएम' मशिनद्वारे ​घेण्यात येणाऱ्या निवडणुकांसाठी हैद्राबाद येथील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडून मशिन घेतल्या जातात. या कंपनीकडून मशिन खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संबंधित कंपनीने प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. 'प्राधिकरणाकडून मशिनची मागणी करण्यात आली आहे. या आठवडयात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.' असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचे प्रश्न मार्गी लागणार?

0
0

लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची अखेर आज बैठक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

झपाट्याने वाढत असलेल्या पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांनंतर वेळ दिला असून, आज, शुक्रवारी याबाबत बैठक होणार आहे. फडणवीस यांच्याबरोबरच यापूर्वी झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेले अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. त्यामुळे या बैठकीत नक्की कोणते ‌निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याने त्याबाबत मोठी उत्सुकता आहे.

शहराचा विकास आराखडा (डीपी), समान पाणीपुरवठ्यासाठी वाढीव कोटा यापासून ते सरकारकडून प्रलंबित अनुदान आणि पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) अडीच एफएसआय असे अनेक प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. शहरात गेल्या आठ महिन्यांपासून होणारा दिवसाआड पाणीपुरवठा आणि भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याशी संबंधित विषयही चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असल्याने शहरासाठी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जाणार आहे. त्यासह भामा-आसखेड प्रकल्प, जायका, अमृत योजना आणि पाण्याच्या टाक्यांबाबतही चर्चा होणार आहे.

शहराचे अनेक प्रश्न राज्य सरकारच्या दरबारी मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. रखडलेल्या प्रश्नांवरील चर्चेसाठी मुख्य वेळ द्यावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाने, तसेच पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा केली होती; मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासन दिले गेले.

...................

शरद पवारांची मध्यस्थी

शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, यासाठी शहराचे आठ आमदार, खासदार यांनी पुढाकार घेऊन वेळ मिळवून द्यावी, अशी विनंती पालिकेने अनेक वेळा केली होती; मात्र हा 'योग' जुळून येत नव्हता. अखेर शरद पवार यांनाच यामध्ये हस्तक्षेप करून आपले 'वजन' वापरावे लागल्याने मुख्यमंत्र्यांना ही बैठक घ्यावी लागली. पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहरातील आमदार, खासदार आणि पालिकेतील गटनेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

...................

हे आहेत पुण्याचे प्रश्न

घनकचरा व्यवस्थापन, एचसीएमटीआर प्रकल्प, नदीकाठ संवर्धन आणि सुशोभीकरण, पुण्यातील रिंगरोड अशा विषयांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला सुमारे ३४० कोटी रुपयांचे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. तसेच 'पीएमपी'च्या जागांचा व्यावसायिक वापर करण्यासाठी अडीच एफएसआय देण्याचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यावरही निर्णय घेण्याची विनंती या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागराजच्या घटस्फोटित पत्नीला हवाय न्याय!

0
0

>> मिहीर भणगे । टाइम्स वृत्त, पुणे

आर्ची आणि परश्याची 'याड' लावणारी प्रेमकहाणी आणि तिचा सुन्न करणारा शेवट पाहून अवघी मराठी सिनेसृष्टी सध्या 'सैराट' झाली असतानाच, सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे एका कौटुंबिक वादात अडकण्याची शक्यता आहे. नागराज यांची घटस्फोटित पत्नी सुनीता आणि तिच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी घटस्फोटाचा जुना खटला नव्याने सुरू करायचं ठरवलंय. त्यामुळे नागराज यांना पुन्हा कोर्टाची पायरी चढावी लागू शकते.

नागराज आणि सुनीता यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर २०१४ मध्ये काडीमोड घेतला होता. नागराजनं सुनीताला कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही, उलट तिला अपमानास्पद वागणूकच दिली, असा दावा करत सुनीताच्या माहेरच्या मंडळींनी, अर्थात लष्करे कुटुंबानं हा घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. त्यानंतर नागराज-सुनीता वेगळे झाले होते. परंतु, आता हे प्रकरण पुन्हा कोर्टात उभं राहण्याची शक्यता आहे. माझ्या बहिणीवर झालेला अन्याय दूर व्हावा म्हणून नागराज यांच्याविरोधातील घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती सुनीता यांचा चुलत भाऊ सागर लष्करेनं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली.

नागराज बारावीत असताना त्याचं सुनीताशी लग्न झालं. त्यानंतर पुढची १५ वर्षं सुनीतानं त्याला प्रत्येक सुख-दुःखात सावलीसारखी सोबत केली. पण, दिग्दर्शक झाल्यानंतर नागराज बदलला. तो गावाकडे येईनासाच झाला आणि आला तरी सुनीताकडे तो दुर्लक्षच करायचा. साधं बोलायचाही नाही. या सततच्या अपमानाला कंटाळून आम्ही २०१२ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१४ मध्ये ते वेगळे झाले, असा घटनाक्रम सागर लष्करेनं सांगितला. घटस्फोटानंतर पोटगी म्हणून नागराजनं आम्हाला ६-७ लाख रुपये दिले होते. गरज लागेल तेव्हा आणखी पैसे देण्याचं आश्वासनही त्यानं दिलं होतं. पण तसं झालं नाही. आज तो यशस्वी दिग्दर्शक आहे, कोटींमध्ये पैसे कमावतोय, पण माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळताना त्यानं एकदाही विचार केला नाही, याबद्दल तीव्र संताप त्यानं व्यक्त केला. आम्हाला पैसे किंवा आणखी काही नकोय, पण माझ्या बहिणीच्या वाट्याला आलेली अवहेलना दूर व्हावी, तिला न्याय मिळावा इतकीच आमची अपेक्षा आहे, असं त्यानं स्पष्ट केलं.

जेव्हा नागराज यांच्याभोवती कुठलंही वलय नव्हतं, घरची परिस्थिती हलाखीची होती, अशा काळात मी त्यांना साथ दिली. पण आज एवढ्या उदंड यशानंतर त्यांना माझ्याबद्दल काहीच सांगावंसं वाटत नाही, याचं खूप वाईट वाटतं, अशी कैफियत सुनीता यांनी मांडली. पडत्या काळात साथ देणाऱ्या सगळ्यांचा विसर त्यांना पडलाय, याबद्दल खेद वाटतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आकाश पेंटर यांनी नागराज आणि सुनीतामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले, सुनीता तिची तक्रार घेऊन आल्यानंतर मी नागराजला फोन करून भेटायला बोलावलं होतं. तो 'हो' म्हणाला, पण नंतर आलाच नाही. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं आणि त्यांचा घटस्फोट झाला.

या सगळ्या घडामोडींबाबत नागराज मंजुळे यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय्यु महाराजांना मारहाण; ५ जणांना जामीन

0
0



शिरूर : राष्ट्रसंत भैय्युजी देशमुख महाराज यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची शुक्रवारी शिरूर न्यायालयाने जामिनावर मुक्त्तता केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसानी दिली. ८ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे नगररोड वरील रांजणगाव गणपतीजवळ भैय्युजी महाराज हे पुण्याहुन इंदूरकडे मोटारीमधून चालले असता मागून येणाऱ्या ट्रकची धडक देशमुख यांच्या गाडीला बसली. याबाबत ट्रकचालकाला विचारणा केली असता ट्रकचालकाने दोघा-तिघांना जमवून भैय्युजी महाराज, मनमित अरोरा आणि मनोहर सोनी यांना मारहाण व शिवीगाळ केली होती. त्यासंबंधीची फिर्याद भैय्युजी महाराज यांचा चालक प्रशांत नानासाहेब देशमुख (रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विशाल भाऊसाहेब शिंदे, सुहास जालिंदर बांदल, सागर चंद्रकांत तावरे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) अशोक पवार व रवी राठोड (रा. येवती, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी या सर्वाना शिरूर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. ------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना तलाठ्याला अटक

0
0

शिरूर : कुळकायदात मिळालेल्या जमिनीची शर्त रद्द करून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलाठी ज्ञानेश्वर भगवान चौधरी (रा. बागवान नगर, शिरूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शिरूरच्या मध्यवर्ती शासकीय कार्यालयात पकडले. यासंदर्भात कोंढापुरी येथील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. लाचेचा पहिल्या हप्ता ३० हजार रुपयांचा घेताना पथकाने चौधरी याला पकडले. लाचलुचपत विभागाचे उपपोलिस अधीक्षक जे. डी. सातव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images