Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणेकरांसाठी संधी सुपरबाइक्स पाहण्याची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सुपर बाइकचे वेड असणाऱ्या पुणेकरांसाठी एक खूशखबर आहे.. सुपर बाइक्सचे वेगवेगळे ब्रँड एकाच छताखाली पाहण्याची आणि त्यांचे वेगळेपण जाणून घेण्याची नामी संधी या वीकेंडला चालून आली आहे. निमित्त आहे..'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'ऑटो एक्स्पो'चे. एरवी केवळ चारचाकींपुरताच मर्यादित असणारा हा उपक्रम यंदापासून सुपर बाइक्सही घेऊन आला आहे.
टाइम्स ऑफ इंडिया आणि पुणे मिररच्या सहकार्याने 'मटा'तर्फे आज आणि उद्या (७ आणि ८ मे) साखर संकुलच्या मैदानावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या ब्रँडच्या सुपरबाइक्स एकाच छताखाली पाहण्याची, त्यांची माहिती घेण्याची आणि बहुविध पर्यायांपैकी आपल्याला हवा तो सोयीचा पर्याय निवडण्याची संधी या उपक्रमातून सर्वांना मोफत उपलब्ध होणार आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित या उपक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. ऑटो एक्स्पोच्या निमित्ताने स्पॉट बुकिंगवर खास बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ८८८८२५४८०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रक्त आदानप्रदानाची जबाबदारी पेढ्यांचीच

$
0
0

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आदेश; अन्यथा चौकशी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
रक्ताच्या आदानप्रदानासंदर्भात 'राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे'च्या (एनबीटीसी) शिफारशींना रक्तपेढ्यांनी केराची टोपली दाखविली असली तरी, प्रत्यक्षात रक्ताच्या आदानप्रदानाची जबाबदारी रक्तपेढ्यांचीच असल्याचे परिषदेने स्पष्ट केले. रक्तपेढ्या आदानप्रदान करीत नसतील तर, त्याची चौकशी करण्यात येईल, असेही स्पष्टीकरण देण्यात आले.
रक्ताच्या आदानप्रदान करण्यासंदर्भात 'एनबीटीसी'ने शिफारशी राज्यांना पाठविल्या आहेत. या शिफारशी राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेने स्वीकारल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी रक्तपेढ्यांना पाठविल्या आहेत. परंतु, पुण्याच्या रक्तपेढ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे पेशंटसह कुटुंबीयांची फरपट होत आहे. रक्ताची पिशवी आदानप्रदान न करण्यामागे आपल्याकडे आलेला ग्राहक रक्ताअभावी दुसऱ्या रक्तपेढीकडे जाईल. त्यामुळे तोटा होईल. या हेतूनेच रक्तपेढ्या आदानप्रदान करत नसल्याचे या क्षेत्रातील माहितगारांनी सांगितले. हॉस्पिटलची मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी रक्ताचे आदानप्रदान करण्यास नकार दिला जातो, असे रक्तदात्यांकडून सांगण्यात आले.
जनकल्याण रक्तपेढीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी म्हणाले,'राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताच्या आदानप्रदानाबाबत शिफारशी केल्या आहेत. त्याचे अद्याप कायद्यात रुपांतर झालेले नाही. कायद्यात रुपांतर होत नाही, तोपर्यंत रक्ताच्या आदानप्रदानात गोंधळ झाल्यास त्याला कोणती रक्तपेढी जबाबदार हा प्रश्न कायम आहे.'
'राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या शिफारशी आम्ही रक्तपेढ्यांना पाठविल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रक्तपेढ्यांची आहे. रक्तपेढ्या रक्ताची आदानप्रदान करीत नसल्याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. परंतु, आदानप्रदान करण्यास रक्तपेढ्या नकार देत असतील तर, त्याची चौकशी करण्यात येईल,' असे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले.
..
आदानप्रदानाच्या शिफारशी
रक्ताची आदानप्रदान होण्यापूर्वी दोन रक्तपेढ्यांमध्ये करार व्हावा.
करारानंतरच रक्ताची मागणी आणि पुरवठा होईल.
एका रक्तपेढीकडून दुसऱ्या पेढीला रक्त पुरविताना पहिल्या पेढीने रक्ताचे प्रक्रिया शुल्क आकारावे. ते दुसऱ्या पेढीला देताना पहिल्या पेढीने पेशंटकडून रक्तगट, रक्त जुळवणीचेही शुल्क घ्यावे.
आदानप्रदानातून दोष आढळला आणि पेशंटला त्रास झाल्यास त्याची जबाबदारी पहिल्या रक्तपेढीची असेल. तसेच रक्तगट आणि रक्त जुळवणी करून घेणारी दुसरी पेढीही गट आणि तपासणीसाठी जबाबदार राहील.
रक्ताच्या आदानप्रदानाला देशभरात परवानगी आहे. ज्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा असेल, त्या ठिकाणी रक्ताचे आदानप्रदान करता येईल.
बॉम्बे ग्रुपसारखे दुर्मिळ रक्त इतर रक्तपेढ्यांकडून मागविणे शक्य होईल.
रक्ताचे आदानप्रदान करताना राज्य संक्रमण परिषदेबरोबर अन्न व औषध प्रशासनाला कळविणे आवश्यक.
रक्त वाया जाऊ नये आणि तुटवडा असेल तेथे उपलब्ध होण्यासाठी आदान प्रदानाचा फायदा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांच्या वेबसाइट मागासच

$
0
0

सोशल नेटवर्किंगच्या लिंकचा अभाव; ई-मेल बाउन्स होण्याचे प्रमाण लक्षणीय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील विद्यार्थ्यांना प्रगतिशील तंत्रज्ञानाचे धडे देणाऱ्या बहुतांश विद्यापीठांच्या वेबसाइट अप्रगतच असल्याची बाब राज्यातील संशोधकांनी समोर आणली आहे. सोशल नेटवर्किंगपासून लांब राहणारी विद्यापीठे आणि विद्यापीठांमधील प्राध्यापक वर्ग ई-मेल वापरण्यातही मागास असून, अधिकृत ई-मेलवर पाठविलेल्या ई-मेलही बाउन्स होण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे.
ज्येष्ठ संज्ञापनतज्ज्ञ डॉ. किरण ठाकूर आणि अश्विनी कांबळे यांनी 'वेबसाइट्स ऑफ स्टेट युनिव्हर्सिटीज् इन महाराष्ट्र : अ स्टडी ऑफ अॅट्रिब्युट्स अँड अॅटिट्युड्स टूवर्ड्स कन्टेंट अँड रिस्पॉन्सेस''या प्रकल्पांतर्गत केलेल्या संशोधनातून ही निरीक्षणे समोर आली आहेत. एप्रिल २०१२, एप्रिल २०१३ आणि एप्रिल २०१६ अशा तीन टप्प्यांमध्ये राज्यातील १९ विद्यापीठांच्या वेबसाइटच्या केलेल्या अभ्यासातून आणि त्यासाठी मागविलेल्या प्रतिसादातून या बाबी ठळकपणे अधोरेखित झाल्या आहेत.
या संशोधन प्रकल्पाविषयी माहिती देताना डॉ. ठाकूर म्हणाले, 'या अभ्यासासाठी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी या तीन ख्यातनाम विद्यापीठांच्या वेबसाइटची वैशिष्ट्ये तुलनेसाठी विचारात घेण्यात आली. आजच्या तरुण पिढीचा जवळचा मित्र असलेल्या सोशल मीडियापासून राज्यातील विद्यापीठे लांबच आहेत. ई-मेलद्वारे विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांना-शंकांना प्रतिसाद देण्याच्या बाबतीतही ही विद्यापीठे अजूनही तत्पर नसल्याचे चित्र या अभ्यासातून समोर आले.'
या अभ्यासामुळे राज्यातील विद्यापीठांना आपल्या वेबसाइट अधिक चांगल्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा असल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले.
000
वेबसाइटवरील दुर्लक्षित घटक
साइट मॅप : १९ पैकी १० विद्यापीठांच्या वेबसाइटर पर्याय दिसत नाही.
फीडबॅक : १० वेबसाइटवर हा घटक सहज दिसेल अशा ठिकाणी नाही.
कॅम्पस मॅप : ९ वेबसाइटवर नाही.
अद्ययावतीकरण : १३ वेबसाइटवर अपडेटची माहिती नाही.
सोशल नेटवर्किंग लिंक : १६ वेबसाइटवर सोय नाही.
पालकांसाठी लिंक : एकाही वेबसाइटवर नाही.
000
असा मिळाला प्रतिसाद
राज्यातील विद्यापीठांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झालेल्या १,२७० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-मेलवर अभ्यासकांनी आपली ओळख उघड न करता विद्यापीठ प्रवेशासंबंधी काही प्रश्न पाठवले. यापैकी २०५ मेल बाउन्स झाले. बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-मेलना प्रतिसाद दिला नाही. केवळ ११ टक्के म्हणजे १३६ ई-मेलना प्रतिसाद मिळाला. ५७ शिक्षकांनी प्रतिसाद म्हणून वेबसाइटचाच पत्ता पाठवला आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांकही त्यासोबत नोंदवले. ३८ जणांनी मात्र प्रश्नकर्त्यांच्या ई-मेलना तपशीलवार प्रतिसाद दिला. आपल्या विभागाच्या कक्षेबाहेरील प्रश्नांनाही उत्तरे देण्याचे सौजन्य या शिक्षकांच्या प्रतिसादांमधून दिसले. संबंधित विद्यार्थ्यांसाठी आपले विद्यापीठ हा अतिशय योग्य पर्याय आहे, असेही या शिक्षकांनी प्रश्नकर्त्यांना दिलेल्या प्रतिसादात म्हटले होते.
000
सोमवारी प्रकाशन
मुंबईतील 'एड्यु-संचार'ने हा अहवाल पुस्तकरूपात प्रकाशित केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर आणि फ्लेम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवी सिंग यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी (९ मे) या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन होणार आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात बंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे जेजुरी मार्तंड देवस्थानच्या मनमानी कारभाराविरोधात जेजुरी ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी आदींनी जेजुरीत बंद पुकारला असून, या बंदला प्रतिसाद मिळाला. जेजुरी देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावे तसेच मंदिरातील शिवलिंगाची झीज होऊ नये यासाठी दिवसभर पूजा करण्याऐवजी दिवसातून तीनदा पूजा करण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले. पुजाऱ्यांनी अभिषेक, पूजा या मंदिराबाहेर कराव्यात. हा निर्णय विश्वस्तांशी चर्चा घेऊन केला गेला होता, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, कडेपठार देवस्थान बरखास्त करण्यात आले या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी शहर बंद ठेवण्यात आले होते. सकाळपासून दुकाने, उपहारगृहे व बाजारपेठ बंद राहिल्याने भाविकांचे हाल झाले होते. सकाळी ग्रामस्थांनी मोर्चाही काढला होता. मोर्चात पुजारी, पुरोहित, व्यापारी, मानकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मादाय सहआयुक्तांना देवस्थानचे विश्वस्त चुकीची माहिती देऊन त्यांचा गैरसमज करीत आहेत. त्यामुळे गावातील धार्मिक वातावरण कलुषित होत आहे, असा आरोपही या वेळी करण्यात आला. सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी सुनील असवलीकर यांनी केली. गुरव, कोळी, वीर, घडशी, या समाजाची उपजीविका खंडोबा मंदिरावर अवंलबून आहे, असेही या वेळी काहींनी सांगितले. स्वयंभूलिंगाची झीज होऊ नये यासाठी दिवसभरची पूजा बंद करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसुविधेसाठीच हे निर्णय घेण्यात आले आहेत, असे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त दशरथ घोरपडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांद्याला प्रतिकिलो तीस रुपये द्यावेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कांद्याचे भाव सध्या पडल्याने केंद्र सरकारने ३० रुपये किलो दराने २० लाख टन कांद्याची खरेदी करावी,' अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली.
'या वर्षी कांद्याचे उत्पादन २०३ लाख टन झाले आहे. दर वर्षी सुमारे १३० लाख टन कांद्याची​ गरज भासते. त्यामुळे यंदा सुमारे ३० लाख टन कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे सरकारने २० लाख टन कांदा ३० रुपये किलो दराने विकत घ्यावा,' असेही शेट्टी म्हणाले. 'कांद्याची टंचाई निर्माण झाल्यावर सरकारने पाकिस्तानातून कांदा मागवला. पाकिस्तानला पैसे देता, मग शेतकऱ्यांना का नको?' असा सवालही त्यांनी केला.
'कांद्याचे भाव कमी झाले आहेत. सध्या चार ते पाच रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. सरकारने निर्यात मूल्य कमी करण्यास विलंब लावला. त्यामुळे निर्यात मूल्य कमी करूनही त्याचा उपयोग झालेला नाही,' असेही ते म्हणाले.
........
'किसान ऋणमुक्त अभियान '
शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी नऊ मेपासून तुळजापूर येथून 'किसान ऋणमुक्त अभियान' सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही तर, कर्जमुक्तीसाठी हे अभियान आहे, असेही खासदार शेट्टी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यसनी पोलिसांची यादी करणार

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com

पुणे : राज्यातील विविध पोलिस ठाणी, वेगवेगळ्या शाखा; तसेच मुख्यालयांत असलेल्या व्यसनी पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचा आदेश राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिला आहे. या व्यसनी पोलिसांच्या हातात शस्त्रे देणे धोकादायक असल्याचे सांगत दीक्षित यांनी या कर्मचाऱ्यांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असेही आपल्या आदेशात म्हटले आहे.

दीक्षित यांनी गेल्या महिन्यांत राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, तसेच अधीक्षकांशी पत्रव्यवहार करत त्यांना मार्गदर्शनपर सूचना पाठवल्या आहेत. राज्यातील कायदा सुव्यव्यस्था, गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढवणे, धार्मिक स्थळांची सुरक्षितता, औद्योगिक वसाहती, पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे कामकाज, पोलिस मित्रांची मदत, माध्यमांशी संपर्क आणि प्रशासकीय सुधारणा करण्याबाबतच्या सूचना या पत्रव्यवहाराद्वारे दिल्या आहेत.

पोलिस अधिकारी व अंमलदार यांना पाठवण्यात आलेल्या कामकाजाबाबतच्या सूचनांमध्ये दीक्षित यांनी व्यसनी पोलिसांचा आढावा घेतला आहे. राज्यातील व्यसनी पोलिसांची यादी तयार करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. या आदेशामुळे राज्याच्या पोलिस दलात किती व्यसनी पोलिस कर्मचारी आहेत, हे समोर येईल. व्यसनी पोलिसांची संख्या अधिक असल्यास त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे की नाही, हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. उत्तरेकडील राज्यांत व्यसनी कर्मचाऱ्यांकडे असलेल्या शस्त्रांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याची दखल दीक्षित यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडमध्ये आठ फ्लॅट फोडले

$
0
0

एकाच सोसायटीतील प्रकार; अडीच लाखांचा ऐवज लंपास
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सुट्टीचा हंगाम असल्यामुळे सोसायटीतील रहिवासी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेऊन कोथरूड येथील तेजसनगर सोसायटीतील नऊ बंद फ्लॅट फोडून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी रात्री ते शनिवार दुपारपर्यंत या घरफोड्या झाल्या. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनुप चव्हाण (वय २९, रा. कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसनगर सोसायटीमध्ये तीन इमारती आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये दहा ते बारा फ्लॅट आहेत. चव्हाण सुट्टीत गावी गेले आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील एक लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. तसेच, याच सोसायटीतील गिरीश जगन्नाथ क्षीरसागर (वय ३५) यांच्या घरातील रोकड आणि चांदीचे ताट असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. अमित नेवगी यांच्या घरातून ७० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोसायटीतील अभिजित सुभाष सस्ते, आनंद विनायक तुंगार, अनिल अशोक भोळे, माधवी सुनील पाठक, अनिष अनंत आलुरकर, सतीश गिरजे यांचे फ्लॅटही चोरट्यांनी फोडले. परंतु, तेथे चोरट्यांना कोणताही ऐवज मिळून आला नाही. या प्रकरणी फौजदार पी. आर. वाघमोडे तपास करीत आहेत.
..
बंद फ्लॅट; सीसीटीव्हीचा अभाव
सोसायटीतील बहुतांश नागरिक सुट्टीच्या निमित्ताने शहराबाहेर गेले आहेत. त्यामुळे बहुतांश फ्लॅट बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडीचा डाव साधला. या सोसायटीमध्ये सुरक्षिततेसाठी कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नसल्याचे आढळून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात वळवाचा पाऊस

$
0
0

टीम मटा, पुणे

उकाड्याने हैराण झालेल्या राज्याच्या काही भागात रविवारी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नाशिक, नागपूरला पावसाने झोडपले. पुण्यात दुपारपासून पावसाचे वातावरण तयार झाले. मात्र, पावसाने पाठच फिरवली. जुन्नरला; तसेच मावळातील टाकवे, कामशेत, वडगाव, तळेगावसह अनेक भागाला गारांच्या पावसाने झोडपले. नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात गारांच्या पावसाने हजेरी लावली.

दोन दिवस ढगाळ हवामान

पुणे : दिवसभर असलेला प्रचंड उकाडा आणि ढगाळ वातावरण यामुळे पाऊस पडून काहीसा दिलासा मिळेल, ही पुणेकरांची अपेक्षा रविवारी फोल ठरली. जिल्ह्याच्या अनेक भागात गारांसह हजेरी लावलेल्या पावसाने पुण्याकडे मात्र पाठ फिरवली. शहरात पुढील दोन दिवस शहरात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरात रविवारी ३८.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तर २३.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सोमवारी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणेः भीमनगर झोपडपट्टीत भीषण आग

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील मंगळवार पेठेतल्या भीमनगर झोपडपट्टीत आज दुपारी भीषण आग आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

मंगळवार पेठेतील जुना बाजारमागे असलेल्या भीमनगरमधील काही झोपड्यांना अचानक आग लागली. ती पसरत असतानाच, घरगुती एकापाठोपाठ एक पाच घरगुती सिलिंडचा स्फोट झाल्यानं संपूर्ण झोपडपट्टीत अग्निकल्लोळच उसळला. आकाश धुराच्या लोटांनी व्यापून गेलं आणि परिसरात घबराट पसरली. परंतु, अग्निशमन दलाचे १३ बंब घटनास्थळी पोहोचले. अरुंद रस्त्यांमुळे त्यांना झोपडपट्टीत शिरता आलं नाही. त्यामुळे थोडं लांबूनच त्यांनी ही आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यात त्यांना यश आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहिनी विश्वात होणार 'माय मराठी'चा प्रवेश

$
0
0

पुणे टााइम्स टीम

मराठी वाहिनी विश्वात आता 'माय मराठी' ही नवी वाहिनी येऊ घातली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात या वाहिनीचं प्रक्षेपण होणार आहे. 'कैवल्याचे चांदणे', आरोग्य विषयक हेल्दी-वेल्दी, कॉमेडी कॉकटेल, क्राईम स्पॉट, मन बावरे, आजीच्या घरात, क्राईम स्पॉट, रानवाटा, मन बावरे असे विविध कार्यक्रम या वाहिनीवर दाखवले जाणार आहेत. 'प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा ध्यास घेऊन माय मराठीनं वाटचाल सुरू केली आहे. उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही कायम झटत राहू. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी प्रेमापोटी या वाहिनीची सुरुवात केली आहे,' असं वाहिनीचे संचालक जगन्नाथ कोरे यांनी सांगितलं. शेफ संजीव कपूर, जेष्ठ अभिनेते विजय गोखले, भूषण कोड, अभिनेत्री, सुहास जोशी, मनवा नाईक, माजी खासदार भारत कुमार राऊत, पत्रकार विनायक पात्रुडकर आदींच्या उपस्थितीत या वाहिनीच्या कामकाजाला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सैराट'ची तिकिटे न मिळाल्याने टोळक्याचा राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, दौंड

सैराट चित्रपटाची तिकिटे न मिळाल्याने दौंडमध्ये तरुणांच्या टोळक्याने राडा केला. थिएटर चालकाला मारहाण व त्यांच्या वृद्ध आईला टोळक्याकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. दौंड शहरातील गणेश मिनी थिएटरमध्ये हा प्रकार घडला.

सैराट सिनेमा हाउसफुल्ल असल्याचे सांगूनही रोहित रवींद्र कांबळे व त्याच्या इतर साथीदारांनी तिकीट न दिल्याचा राग मनात धरून थिएटरचालक श्रीनाथ कांबळे यांना जबर मारहाण केली. मारहाण थांबवण्यासाठी आलेल्या कौसल्या कांबळे यांनाही धक्काबुक्की झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

केवळ मारहाण करून टोळके थांबले नाही तर तलवारीच्या सहाय्याने तोडफोड करून व दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न टोळक्याने केला. शंभर रुपयांचे तिकीट पाचशे रुपयांना विकून काळाबाजार करत असल्याचा जाब विचारल्याने थिएटरचालक श्रीनाथ कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीने मारहाण केल्याची विरोधी फिर्याद विराज कांबळे यांनी दिली आहे. श्रीनाथ कांबळे यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळ्या विदर्भासाठी सार्वमत घ्यावे : जयंत पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्राचे प्रतिनिधी असल्याने नितीन गडकरी यांना दिल्लीमध्ये महत्त्व दिले जाते. विदर्भासारख्या एका छोट्या राज्याचे प्रतिनिधी असते, तर त्यांना हे मिळाले असते का,' असा सवाल राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी केला. 'वेगळ्या विदर्भाची भाषा करणाऱ्यांनी सार्वमत घ्यावे. एकदा काय ते आर या पार होऊ दे, विदर्भातील सामान्य जनता महाराष्ट्रात रहाण्याच्या बाजूनेच कौल देईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 'अखंड महाराष्ट्र आणि विघटनाचे राजकारण' या विषयावर पाटील यांनी आपली भूमिका मांडताना हे मत व्यक्त केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस योगिराज प्रभुणे, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कुटे, कार्यवाह राजेंद्र पाटील या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, 'उत्तर प्रदेशातील खासदारांची संख्या पाहता, दिल्लीतील राज्यकर्त्यांना त्यांचा विचार करावाच लागतो. महाराष्ट्राच्या बाबतीत या परिस्थितीचा विचार केल्यास, महाराष्ट्राने एकसंघ राहून दिल्लीवर प्रभाव निर्माण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. विदर्भासाठी स्वतंत्रपणाची भावना मराठी भाषिकांच्या विरोधातली आहे. मराठी भाषिकांना विकासाची आस आहे, वेगळ्या विदर्भाची नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची भाषा करणाऱ्यांनी सार्वमत घेऊन टाकावे, हा प्रश्न फार काळ भिजत राहून उपयोग नाही.' विदर्भाच्या विकासाच्या संदर्भाने पाटील म्हणाले, 'विदर्भामध्ये सुरू असलेली जलसंधारण प्रकल्पांची कामे पाहता, येत्या तीन- चार वर्षांत पाण्याच्या प्रश्नावर विदर्भाला महाराष्ट्रापासून लांब जाण्याची गरज उरणार नाही. विदर्भाचा जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने भरीव आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. यंदा राज्य सरकारने त्यासाठी तुटपुंजी रक्कम दिली आहे.' देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री जगभर फिरून गुंतवणूकदारांना मेक इन इंडियासाठी भारतात आणि राज्यात आणत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांनी या गुंतवणूकदारांना विदर्भाची वाट दाखवली, तर वेगळ्या विदर्भाची गरज उरणार नसल्याचेही पाटील यांनी याच निमित्ताने स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अष्टेकर यांनी केले. कुटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड, इंदापूरला पाणी सोडल्यावरून निषेध

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, येरवडा पुणेकरांना विश्वासात न घेता पुण्याचे पाणी दौंड, इंदापूरला सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात येरवड्यात निदर्शने करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी शिवसेनेकडून सह्यांची मोहीम राबवली. या वेळी शेकडो नागरिकांनी सह्या करून आपला निषेध व्यक्त केला. शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले. लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा होत असताना दौंड व इंदापूरला कॅनॉलने पाणी का सोडले जात आहे. काही मुठभर कारखानदार व कंपन्यांच्या फायद्यासाठी कॅनॉलने पाणी सोडले जात असल्याचा आरोप केला. या वेळी शहर संघटक सुनील टिंगरे, अजय भोसले, विभाग प्रमुख राजाभाऊ चौधरी, उपविभाग प्रमुख महेश शिंदे, माजी नगरसेवक जाणू आखाडे, सागर माळकर, कार्यकर्ते किशोर पाटील, जितु शेलार, विलास कांबळे, विनोद माळवदकर, संतोष तोरडे, श्रीकांत चव्हाण उपस्थित होते . पुणेकरांचे हक्काचे पाणी दौंड, इंदापूरला सोडताना प्रशासनाकडून खबरदारी न घेतल्याने कॅनॉलमधील पाण्यात वाहून गेल्याने दोन बालकांना जीव गमवावा लागला. या सर्व घटनांना पालकमंत्री जबाबदार असल्याने पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सह्याच्या माध्यमातून निषेध नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा-आसखेड’वर तोडगा हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यावशक असलेला भामा-आसखेडचा प्रकल्प भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या भांडणात रखडला आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केवळ एक बैठक घेण्याची आवश्यकता असताना, त्याबाबतही टाळाटाळ केली जात असल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच त्यावर तोडगा काढावा, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. यूपीए सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) पूर्व भागातील पाणीपुरवठ्यासाठी भामा-आसखेडचा प्रकल्प मंजूर केला. केंद्राने पहिला हप्ताही वितरित केल्याने त्याचे कामही तातडीने सुरू झाले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या कामात सातत्याने अडथळे निर्माण झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी शिवसेनेच्या खासदार-आमदारांनी लावून धरल्याने संपूर्ण प्रकल्पाचे कामकाजच ठप्प झाले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. महापौर प्रशांत जगताप यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेने प्रकल्प अडवून धरू नये, असे गाऱ्हाणे त्यांच्याकडेही घातले. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय झाल्याशिवाय काम करू देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. भाजप-शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणात शहरातील महत्त्वाचा प्रकल्प पूर्णतः बंद पडला असून, हे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविल्यानंतर महसूल आणि मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमवेत बैठक होणे गरजेचे आहे. मात्र, ही बैठक आयोजित करण्यातच वेळकाढूपणा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी (१३ मे) होणाऱ्या बैठकीत तरी त्यावर सर्वमान्य तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

भामा-आसखेडचा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने जून २०१७ ची मुदत दिली आहे. आतापर्यंत महापालिकेने सुमारे ४० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यामुळे, उर्वरित वर्षभराच्या कालावधीत प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण होणे आवश्यक आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण झाला, तरच केंद्राने मंजूर केलेल्या निधीचा सर्व हिस्सा प्राप्त होणार आहे; अन्यथा जेवढे काम झाले, त्या प्रमाणातच निधी मिळणार आहे, अशी ताकीदच देण्यात आली आहे. त्यामुळे, भामा-आसखेडचा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्यास वाढीव खर्चाचा बोजा महापालिकेलाच उचलावा लागणार आहे.

भामा-आसखेड हा केवळ पूर्व पुण्यासाठी नव्हे; तर संपूर्ण शहरासाठीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून अडीच टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास खडकवासला प्रकल्पावरील शहराचे अवलंबित्त्व कमी होणार आहे. त्यामुळे, त्याविषयी तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. - प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीसाठी तज्ज्ञांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भू‌मिका बजाविणाऱ्या हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रुटचा (एचसीएमटीआर) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी एक कोटी ९० लाख रुपये शुल्क देण्यात येणार आहेत. 'एचसीएमटीआर'चा 'डीपीआर' तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. काही वर्षांपूर्वी प्रशासनाने एका सल्लागाराला हे काम देण्याचा विचार सुरू केला होता. मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातून एचसीएमटीआरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३६ किलोमीटर लांब आणि २४ किलोमीटर रुंदीचा हा रस्ता आहे. ६८.०३ हेक्टर या रस्त्याचे क्षेत्रफळ असणार आहे. या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया राबविली होती. यामध्ये बंगलोर तसेच मुंबई येथे काम करणाऱ्या स्तुप कन्सल्टंट प्रा. लिमिटेड यांनी यासाठी १ कोटी ९० लाख रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दाखविली आहे. या कंपनीकडून हे काम करुन घेण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. मंगळवारी (१० मे) होणाऱ्या स्थायीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. कळस, येरवडा या भागातून सुरु होणारा हा रस्ता वडगावशेरी, मुंढवा, घोरपडी, वानवडी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, लुल्लानगर, कोंढवा, महर्षीनगर, स्वारगेट, पर्वती, नवीपेठ, दत्तवाडी, एरंडवणा, कर्वेनगर, कोथरूड, गोखलेनगर या भागातून जातो. हा रोड तयार झाल्यानंतर बहुतांश भागातील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. हा रस्ता करताना सर्वसामान्य नागरिकांची किती घरे यामध्ये जातात. यामध्ये खासगी आणि सरकारी जमीनींचा किती भाग जातो, याचे सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे. हा रस्ता तयार करताना पर्यावरणाच्या दृष्टिने कमीत कमी फटका कसा बसेल, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रस्तावावर स्थायी समिती कोणता निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भैय्यू महाराजांच्या कारला अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांच्या कारला रांजणगावजवळ ट्रकने पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा अपघात नसून, महाराजांवर करण्यात आलेला हल्ला आहे. आहे. यापूर्वीही त्यांच्यावर अशाच प्रकारे हल्ले झाले आहेत, अशी माहिती सूर्योदय आश्रमाचे तुषार पाटील यांनी दिली.

भैय्यू महाराज रविवारी रात्री पुण्याहून इंदूरला जात होते. त्यांच्या बरोबर मनोहर सोनी, राजा बडजात्या, आणि मनमित अरोरा होते. रांजणगाव येथे त्यांच्या कारपुढे एक पांढऱ्या रंगाची ह्युंदाई कंपनीची कार चालली होती. त्या कारचा वेग तुलनेने कमी होता, ही कार महाराजांच्या कारला पुढे जाऊ देत नव्हती. प्रवास सुरू असताना रांजणगावजवळ एका ट्रकने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. यावेळी कारचे नुकसान पाहण्यासाठी थांबलो असता तेथे आलेल्या काही तरुणांनी हल्ला केला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

रांजणगाव येथे घाईघाईने कारमध्ये बसून सर्वजण तेथून बाहेर पडले. मनमाड येथील चौंडी घाटात तिसऱ्या वळणावरही काही व्यक्ती रस्त्यावर हत्यार घेऊन उभ्या होत्या. आपल्यावर हल्ला होतो आहे, हे लक्षात आल्यावर रस्त्याच्या कडेने गाडी घालून तेथून जोरात पळ काढला, असेही पाटील म्हणाले. भैय्यू महाराजांनी समाजातील काही घटकांवर टीका केली आहे. धार्मिक बाजार मांडून करोडो रुपये खर्च केले जातात. सामाजिक कामासाठी लक्ष देण्यात येत नसल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेमुळे अशा प्रकारचे हल्ले होत आहेत, असा दावा पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे फ्लॅट लाटण्याचा प्रकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सोसायटीच्या देखभालीसाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यानेच बनावट कागदपत्रांद्वारे आठ फ्लॅट आणि दुकाने लाटण्याचा प्रकार समोर आला असून, यात महापालिकेच्या मिळकतकर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाजीनगर परिसरातील सुशीला को-ऑपरेटिव्ह सोसायटीत आठ फ्लॅट आणि आठ दुकाने आहेत. मुंबईतील नागरिकांनी हे फ्लॅट आणि दुकाने घेतली असून, त्याची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली होती; परंतु या कर्मचाऱ्यानेच सर्व फ्लॅट आणि दुकानांची बनावट कागदपत्रे तयार करून सर्व मिळकती स्वतःच्या नावावर करून घेतल्या. मुंबईतील मूळ मालकांना ही बाब समजताच त्यांनी पालिकेकडे तक्रार केली. विधी विभागाने त्याविषयी सविस्तर अभिप्राय दिल्याने सर्व मिळकतींवर मूळ मालकांच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यानुसार, मिळकतकर भरण्याची नोटीसही सर्वांना पाठविण्यात आली. तरीही संबंधित कर्मचाऱ्याने पुन्हा सर्व मिळकती स्वतःच्या नावावर करून घेतल्या. मिळकतकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय, सातत्याने जुन्या मालकांऐवजी स्वतःच्या नावावर मिळकती करून घेण्याचा प्रकार करता येणे शक्य नाही. त्यामुळे सर्व मालकांनी घडलेला सर्व प्रकार उपमहापौर मुकारी अलगुडे यांची भेट घेत त्यांच्या कानावर घातला. अलगुडे यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी यांना बोलावून घेत, त्याविषयी विचारणा केली. मिळकतकर विभागाकडून दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याचा आरोप अलगुडे यांनी केला; तसेच चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदी ते पंढरपूरला राष्ट्रीय महामार्ग दर्जा

$
0
0

'एनएचएआय'ची अधिसूचना प्रसिद्ध; चौपदरीकरणाला गती शक्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आळंदी ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाला अखेर राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली. त्यामुळे निधीअभावी धीम्यागतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग तसेच, देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ऑगस्ट २०१४मध्ये केली होती. त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही मार्गांचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. प्रत्यक्षात मात्र, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा प्रस्ताव 'एनएचएआय'कडे सादर करण्यात आला. त्यानुसार 'एनएचएआय'ने या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची चर्चा सुरू होती. आळंदी ते पंढरपूर हा रस्ता पुण्याच्या दिशेला नाशिक महामार्गाला आणि पंढरपूरच्या दिशेने पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या मार्गासाठी ३, ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सद्य परिस्थितीत या मार्गावर हडपसरकडून जेजुरीकडे जाताना दिवेघाट ते जेजुरी दरम्यानच्या रस्त्याचा अपवाद वगळता चौपदरी करण्यात आला आहे. जेजुरी एमआयडीसीपर्यंत चौपदरी रस्ता करण्यात आला आहे. मात्र, चौपदरीकरण झाले असले तरीही दुभाजक नाही, साइड पट्ट्या नाहीत, आदी अनेक कामे अपूर्ण आहेत. दिवेघाट ते फुरसुंगी दरम्यानचा रस्ता अद्याप एकेरी आहे. जेजुरीतून पुढे वाल्हे, निरा या दरम्यानही एकेरी रस्ता आहे. तसेच, लोणंद ते फटलण चौपदरी रस्ता आहे. या मार्गावर सासवड येथे कऱ्हा नदी व फुरसंगी येथे रेल्वे उड्डाणपुलावर एकेरी रस्ता आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
-------
योग्य भरपाईचा अभाव
हडपसर ते जेजुरी दरम्यान भूसंपादन करताना योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे येथील काही काम रखडले आहे. मात्र, यापुढे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भूसंपादनाचा विषय मार्गी लागणे अपेक्षित आहे.
--------
महामार्गाबाबत स्पष्टता नाही
आळंदी ते पंढरपूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडून पुणे विभागीय कार्यालयाला अद्याप काही कळविण्यात आलेले नाही, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेल्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व सहा पदरी रस्त्याचे काम 'एनएचएआय'कडून केले जाणार असल्याचे यापूर्वी निश्चित झाले आहे. त्यामुळे पालखी मार्गाच्या कामाबाबत अद्याप स्पष्ट आदेश आल्यानंतरच ते काम कोणाकडून केले जाणार, असे 'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर आणि परिसरात पावसाचा शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे सोमवारी उन्हाचा चटका कमी झाला. दुपारनंतर शहराच्या काही मोजक्या भागांत पावसाचा तुरळक शिडकावा झाला. पुढील दोन दिवसांतही ढगाळ हवामानासह गडगडाटी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. सोमवारी पारा ३५ अंशांपर्यंत घसरला. दुपारी दोनपर्यंत उन्हाचा चटका जाणवत होता; पण त्यानंतर काळ्या ढगांची दाटी झाली. कॅम्प, कोथरूडचा काही भाग, नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याचा काही परिसर आणि इतर काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाचा हलका शिडकावा झाला. या पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने काही ठिकाणी दुचाकी घसरून पडल्याचे चित्र दिसून आले. पुढील दोन दिवसांमध्येही दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच, शहराच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, बुध ग्रहाचे सोमवारी होणारे अधिक्रमण (मर्क्युरी ट्रान्झिट) बघण्यासाठी पुण्यातील आकाशप्रेमी सज्ज झाले होते. मात्र, त्यांच्या उत्साहावर ढगाळ वातावरणाने पाणी फिरवले. पुणेकरांना दुपारी चार वाजून ४० मिनिटांपासून ते पुढे दोन तास बुधाच्या काळ्या ठिपक्याचा सूर्यबिंबावरून होणारा प्रवास दिसणे अपेक्षित होते. दुपारी तीन वाजल्यापासून आकाश ढगांनी व्यापले. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे अनेकांनी ही दुर्मिळ खगोलीय घटना प्रत्यक्ष आकाशात बघण्याऐवजी कम्प्युटर आणि मोबाइलवर लाइव्ह वेबकास्ट पाहून समाधान मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माफक दरात व्हावेत उपचार

$
0
0

जयंत पाटील यांचे मत; विविध पुरस्कारांचे वितरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यात सध्या ‍भांडवलदारांची रुग्णालये उभी राहत आहेत. तेथे उपचार घेताना रुग्णांची आर्थिक पुंजी संपून जाते. तरीदेखील अपेक्षेप्रमाणे उपचार होत नाहीतच. त्यामुळे राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा माफक दरात मिळण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे,' असे मत राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले.
कृष्णकांत कुदळे पतसंस्था, नर्गिस दत्त महिला पतसंस्थेच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात पाटील बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. पाटील यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रांट यांना शंतनुराव किर्लोस्कर, कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांना सुनील दत्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार महर्षी काकासाहेब थोरात नागरी सहकारी पतसंस्थेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार, अभिनेत्री अनुजा साठे यांना नर्गिस दत्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपमहापौर मुकारी अलगुडे, पतसंस्थेचे अध्यक्ष वामन जाधव, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णकांत कुदळे, फाउंडेशनच्या मंगल कुदळे, मोहन टिल्लू आदी उपस्थित होते.
'पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी रुबी हॉल क्लिनीक हे चांगल्या सुविधा देणारे रुग्णालय असून, राज्यात अशा रुग्णालयांची आवश्यकता आहे,' असे पाटील म्हणाले. बापट म्हणाले,' समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. मात्र, केवळ नकारात्मक गोष्टीच माध्यामांतून समाजापुढे येतात. चांगल्या गोष्टी समाजापुढे आल्यास अनेक समाजात सकारात्मक बदल घडतील.' डॉ. ग्रांट म्हणाले,' रुबी हॉल क्लिनिकद्वारे प्रत्येक महिन्यात विविध आजारांशी निगडीत असलेल्या ३० रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो. आरोग्य सेवेबद्दल पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे.'
कुदळे यांनी प्रास्ताविक केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
.........
बापट-पाटलांची जुगलबंदी
गिरीश बापट उशिरा आल्याने आयोजकांनी जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले. त्यामुळे बापट-पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. भाषणादरम्यान पाटील म्हणाले,'बापटजी, तुमची वाट पाहतापाहता आयोजकांनी माझ्याच हस्ते पुरस्कारांचे वितरण केले. तुम्ही उशिरा आल्याने मला ही संधी प्राप्त झाली.' 'पाटील, तुम्हाला मी माजी मंत्री म्हणणार नाही. कारण तुम्ही भावी मंत्रीही होऊ शकता. त्यामुळे मी भविष्यात उशिरा येऊन तुम्हाला आणखी संधी देऊ शकतो. लग्नात फुलांची माळ गळ्यात घातल्यानंतर झालेला आनंद तुम्हाला आज झाल्याचे दिसून येत आहे. जेवढा आनंद होपुरस्कारवितरणाचा त्यामुळे तुम्हाला लग्नात फुलांची माळ घातल्यावर जसा आनंद होतो, तसा झाला असून तुमच्या हास्यावरुन ते दिसत आहे. तुम्ही गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहात. त्यामुळे तुम्ही आता थोडा विचार करा,' अशी टिप्पणी बापट यांनी करताच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images