Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पासपोर्ट अपॉइंटमेंट वाढविणार

$
0
0

विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पासपोर्टसाठी पुणे विभागातून अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट कार्यालयानेही कंबर कसली आहे. प्रलंबित अर्ज कमी करण्यासाठी अपॉइंटमेंट्ची संख्या वाढविण्यात येणार आहे,' अशी माहिती पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.
पासपोर्ट विभागातर्फे शिवाजी नगर येथे 'एआयएसएसपीएमएस' शाळेच्या आवारात पासपोर्ट महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याचे उद् घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी गोतसुर्वे यांच्यासह विशेष शाखेचे उपायुक्त संजय पाटील उपस्थित होते. 'हा महामेळावा दोन महिने सुरू राहील. सध्या दिवसाला २०० तर, पुढील आठवड्यापासून दररोज ६०० अपॉईंटमेंट दिल्या जातील. सुट्यांमुळे प्रलंबित राहिलेल्या अर्जांचे प्रमाण कमी करण्यासाठी या अपॉईंटमेंट्सची संख्या वाढविण्यात येणार आहे,' असे गोतसुर्वे यांनी सांगितले. पासपोर्टची प्रक्रिया अत्यंत सोपी व पारदर्शी असून, त्यासाठी नागरिकांनी एजंट अथवा अन्य व्यक्तींना पैसे देऊ नयेत, असेही गोतसुर्वे यांनी सांगितले.
'पासपोर्ट विभागाने कार्यक्षमता वाढवली असली तरी, पोलिसांना प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे अर्जदारांची संख्या वाढली तरी तेवढ्या अर्जांची पडताळणी करण्यासाठी पोलिस यंत्रणा सुसज्ज करावी लागेल. गतवर्षी अर्ज केलेल्या एक लाख ४० हजार व्यक्तींपैकी फक्त १५ टक्के व्यक्तींना विविध कारणांनी पोलिसांनी पासपोर्ट नाकारण्यात आला,' असे पाटील यांनी सांगितले. नामसाध्यर्म्यामुळे तसेच बायोमेट्रिक माहिती अथवा फोटो उपलब्ध नसल्याने ३० टक्के अर्जांच्या पडताळणीत अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिनोलेक्सचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया कालवश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुकानात काम करणारा पोऱ्या ते ५००० कोटींची उलाढाल असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक अशी स्वप्नवत वाटचाल करणारे ज्येष्ठ उद्योजक प्रल्हाद छाब्रिया (वय ८६) यांचे गुरुवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावानी ही फिनोलेक्सची गाजलेली जाहिरात त्यांनी प्रत्यक्षात आणली होती. विद्यापीठ रस्त्यावरील राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्यावर सायंकाळी उशिरा पुण्यातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

छाब्रिया यांचा जन्म कराचीजवळच्या शिकारपूर या गावी एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. कालांतराने त्यांना अत्यंत गरिबीत दिवस काढावे लागले. कराचीत काही काळ एका दुकानात काम केल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यातही प्रथम एका नातेवाईकाच्या दुकानात त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर आपल्या भावंडांसोबत त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचा श्री गणेशा केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता यशाची शिखरे पादाक्रांत केली. दुकानातील पोऱ्या ते फिनोलेक्सचा संस्थापक हा प्रवास प्रल्हाद छाब्रिया यांनी "There's No Such Thing as a Self-Made Man" या आत्मचरित्रात वर्णन केला आहे. हे आत्मचरित्र 'फिनोलेक्स पर्व' या नावाने मराठीत भाषांतरितही झाले आहे. कंपनीचे मुंबई शेअर बाजारात फिनोलेक्स पाइप्स या नावाने, तर राष्ट्रीय शेअर बाजारात फिनोलेक्स इंडस्ट्रीज या नावाने व्यवहार होतात. कंपनीचे चिंचवड (पुणे), रत्नागिरी व मासर (बडोदा) येथे उत्पादन कारखाने आहेत. कंपनीने रत्नागिरीत इंजिनीअरिंग कॉलेजचीही स्थापना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बिले भरण्यात पिंपरी विभाग आघाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महावितरण'ने ​वीजबिले ऑनलाइन भरण्यासाठी दिलेल्या सुविधेचा पुणेकरांनी लाभ घेतल्याने एप्रिल महिन्यात विक्रमी ८६ कोटी ८० लाख रुपये जमा झाले आहेत. 'ऑनलाइन' सेवेचा वापर पिंपरी आणि बंडगार्डन विभागातील वीजग्राहकांनी सर्वाधिक केला आहे.
वीजबिलांचा 'ऑनलाइन' भरणा करण्यात पुणे परिमंडल राज्यात प्रथम क्रमांकावर आले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ८६० कोटी ५७ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. २०१४-१५ या वर्षांच्या तुलनेत सुमारे ३३६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पुणे परिमंडलात एप्रिल महिन्यात 'ऑनलाइन' वीजबिले भरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. पाच लाख तीन हजार २६८ वीजग्राहकांनी या महिन्यात केलेल्या ऑनलाइन भरणामुळे विक्रमी ८६ कोटी ८० लाख रुपये 'महावितरण'च्या तिजोरीत जमा झाले आहेत.
पिंपरी विभागात एप्रिल महिन्यामध्ये ९५ हजार ७१४ ग्राहकांनी सुमारे १२ कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर बंडगार्डन विभागात ४४ हजार ८६० ग्राहकांनी सुमारे आठ कोटी ७४ लाख रुपयांचा 'ऑनलाइन' भरणा केला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाइन' बिल भरणासह ई-मेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छापील कागदाऐवजी गो-ग्रीनअंतर्गत वीजबिलाच्या ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट देण्यात येत आहे. छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर वीजबिलाचा 'ऑनलाइन' भरणा करण्यासाठी क्रेडिट, डेबिट किंवा नेटबँकिंगचा पर्याय देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश मोतेवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुंतवणूकदारांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले 'समृद्ध जीवन फूड इंडिया' या कंपनीचे मालक महेश किसन मोतेवार (वय ४६ रा. धनकवडी ) यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला.

मोतेवार यांना ३१ मार्चला अटक झाली आहे. या गुन्ह्यात मोतेवार यांनी जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. अतिरिक्त सरकारी वकिल सुनील हांडे यांनी जामीनास विरोध केला. ते म्हणाले, 'आरोपीने गुंतवणुकीच्या बेकायदा योजना तयार केल्याची माहिती आयकर विभागाच्या अहवालात नमूद केली आहे. आरोपीच्या कंपनीचे देशभरात सुमारे १३ लाख ४५ हजार ११९ एवढे गुंतवणूकदार आहे. त्यांना कंपनीकडून सुमारे १३५ कोटी रुपये परतावा देणे बाकी आहे. आरोपीच्या धनकवडी येथील घरात 'बायोमेट्रिक'' पद्धतीचे कपाट असून, ते आरोपीची पत्नी लिना मोतेवार याच उघडू शकतात. या कपाटामध्ये महत्त्वाची कागदपत्रे असू शकतात. गुंतवणूकदारांकडून मिळालेले पैसे आरोपीने वेगवेगळ्या प्रकल्पांत गुंतविले आहेत. स्थावर मिळकती, जंगम मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचे तपासात आढळून आले आहे. या कंपनीने कर बुडविला आहे, देशभरात आरोपीविरुद्ध १२ गुन्हे दाखल आहे, सध्या तो ओडिशा येथील गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे, या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही.' सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने मोतेवार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही प्रकल्पाच्या तपासणीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुख्य रस्त्यांवर व चौकाचौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी सुरू असतात का, कंट्रोल रूम हाताळणारे कर्मचारी त्यातील तज्ज्ञ आहेत का, हे कॅमेरे ऑटोमॅटिक नंबर प्लेट व फेस 'रेकग्निशन' करण्याच्या सुविधायुक्त आहेत का, आदी बाबींसह शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही प्रकल्पाची तपासणी करण्याची मागणी पीपल्स युनियन संघटनेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
पीपल्स युनियनने त्यांच्या मागणीचे निवेदन पोलिस आयुक्त कार्यालयात सादर केले आहे. शहरातील महत्त्वाची लष्करी केंद्रे आणि दहशतवाद संवेदनशीलतेमुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी गृह विभागाने 'सेफ सिटी सर्व्हिलन्स' प्रकल्पाअंतर्गत पुणे -पिंपरी चिंचवड शहरात १२८५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यासाठी २२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या योजनेचा प्रभावी वापर होत नसल्यासे पीपल्स युनियचे संयोजक अॅड. रमेश धर्मावत यांनी नमूद केले आहे.
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणे आदी ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र काही मुख्य रस्ते व मुख्य चौकातच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परिणामतः काही सिग्नल तोडणाऱ्या नागरिकांना वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या नोटिसा पाठविल्या जातात. परंतु, सोनसाखळी चोऱ्या, महिलांची छेडछाड, इतर मानवी गुन्हे याबरोबरच रस्ते अपघात याबाबत अपवाद वगळता फारसा प्रभाव पडला नसल्याची वस्तुस्थिती आहे, असे अॅड. धर्मावत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाफगावच्या बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल

$
0
0

राजगुरुनगर : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल आयोजकांसह १५ ते २० जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली. आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक राजकुमार शिंदे, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुरुवार (५ मे) वाफगांव येथील यात्रेमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. या प्रकरणी प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंध कायदा, १९६० चे कलम ११, भादवि कलम २८८ नुसार कारवाई करून सहा जणांना अटक केली. यामध्ये जयेश उर्फ बाळासाहेब वसंत जवळेकर, सुनील मोरवे, रघुनाथ गारडी, संजय लंगोटे, हेमंत मोरवे, सतीश जाधव (सर्व रा. वाफगाव ता. खेड) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याचे पाणी दिल्यानेदौंडवासीयांना दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी बारामतीचे आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे
आभार मानले. या वेळी माहिती देताना आमदार कुल म्हणाले, 'मागील तीन आठवड्यांपासून अथक नियोजनानंतर दौंडसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले. दौंडमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट असताना हे पाणी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धरणांची निर्मिती शेतीच्या पाण्यासाठी झालेली आहे. शेतीसाठी असणारे धरणांचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करताना विरोध केला गेला नाही. खडकवासला धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याबाबत जो निकष लावला गेला, तो निकष मुळशी धरणाला लावण्यात यावा. असे केल्यास पुढील वीस वर्षांचा पाणीप्रश्न सुटेल.'
'पाण्याबाबत पुणेकर बोलत असले तरी पाणी आमच्याही हक्काचे आहे. कारण धरणांसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचे पुनर्वसन दौंडमध्ये झालेे. त्यामुळे आमचाही पाण्यावर हक्क आहे. पाणी देण्याबाबत जी चर्चा झाली ती दुर्दैवी होती. सर्वच राजकीय पक्षांनी शहरात एक, तर ग्रामीण भागात एक अशा वेगळ्या भूमिका मांडल्या. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या भूमिका संदिग्ध वाटतात,'असेही कुल म्हणाले.
....
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही पुण्यासाठी फार काही करतोय, हे दाखविण्यासाठीच पाणी सोडण्याला अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी विरोध केला. पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- अॅड. राहुल कुल, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती मैदान बनले मद्यपींचा अड्डा

$
0
0

दौंड : दौंड शहरातील रेल्वे कामगार मैदान दारूड्यांचा अड्डा झाला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी युवकांची टोळकी जमत असल्याचे दिसून आले आहे. ही टोळकी मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याने या ठिकाणी अशांतता निर्माण झाली आहे. मद्यपानानंतर फेकल्या जाणाऱ्या रिकाम्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे या ठिकाणी व्यायाम करणाऱ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि दौंड पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दौंड शहरातील रेल्वे कामगार मैदान मध्यवर्ती भागात असून, या ठिकाणी सर्व वयोगटातील नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे क्रिकेटचाही सराव या ठिकाणी सुरू असतो. या ठिकाणी मद्यपींचा उपक्रम वाढल्याने असुरक्षित वाटत असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. हे मैदान रेल्वे प्रशासनाचे असल्याने रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ई-फेरफार सुविधा बंद?

$
0
0

योजनेतील अडथळे कायमच; एडिट मॉड्युलची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
खरेदी दस्त झाल्यानंतर तत्काळ फेरफार उतारा व सातबारा देण्यासाटी सुरू केलेल्या ई-फेरफार योजनेमागील शुक्लकाष्ट अजूनही दूर झालेले झालेले नाही. ई-फेरफारच्या नोंदींसाठी सर्व्हरची क्षमता अपुरी पडत असल्याने हे काम बंद झाले असून, त्यामुळे नागरिकांना फेरफार व सातबारे मिळण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान, ई-फेरफार योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेरफार व सातबारा उताऱ्यांमध्ये मोठ्या चुका होत आहेत. या चुकांच्या दुरुस्तीसाठी एनआयसीने नवे एडिट मॉड्युल तयार केले आहे. हे मॉड्युल लवकरच देण्यात येणार असून त्याद्वारे या चुकांची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. हे मॉड्युल मिळाल्यानंतर पुण्यात दोन दिवस त्याची चाचणी केली जाणार आहे. याचाचणीनंतर संपूर्ण राज्यभरासाठी हे मॉड्युल देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
खरेदी-विक्री दस्ताची दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदी झाल्यानंतर त्याचा तत्काळ फेरफार उतारा व विशिष्ट कालावधीनंतर सातबारा उतारा देण्यासाठी इ-फेरफार योजना राज्यात राबविण्यात येत आहे. गेली तीन वर्षे या ई-फेरफारच्या सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे. अजूनही मोठ्या त्रुटी असल्याचे समोर येत आहे. दस्त नोंदणीनंतर फेरफार उतारा केल्यावर त्यातील नावे चार दिवसांनी आपोआप गायब होतात. सातबारा उतारा नोंदविल्यावर त्यातीलल नावांमध्येही आपोआप बदल होतात व भलतीच नावे सातबारा उताऱ्यावर येतात. त्यामुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. सॉफ्टवेअरमधील या चुकांमुळे तलाठी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने त्यांनी यामध्ये दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. ई-फेरफार योजनेतील त्रुटी तलाठ्यांनी निदर्शनास आणल्यावर राज्य सरकारने काही जिल्हाधिकाऱ्यांना त्याची तपासणी करण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी हे सॉफ्टवेअर तपासल्यानंतर या त्रुटी प्राकर्षाने दिसून आल्या.
या चुकांच्या दुरुस्तीसाठी एनआयसीने एडिट मॉड्युल तयार केले आहे. या मॉड्युलच्या माध्यमातून आता चुकांची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. पुण्यात दोन दिवस हे मॉड्युल वापरून पाहिले जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व तहसील कार्यालयांना हे मॉड्यूल दिले जाणार आहे, असे जगताप यांनी सांगितले. दरम्यान, १ मे पासून ई-फेरफारचे काम जवळपास बंदच आहे. सर्व्हरची क्षमता अपुरी पडत असल्याने नोंदी होत नाही. वेबपेजही कम्प्युटरवर दिसत नाही अशा असंख्य अडचणी येत असल्याचे तलाठ्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र टँकरग्रस्त

$
0
0

चार हजार गावांना पाच हजार टँकरने पाणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि आता वाढलेला उन्हाचा कडाका यामुळे राज्यातील तीन हजार ७९८ गावे आणि सहा हजार २१७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये टँकरची संख्या सर्वाधिक असून, राज्यभरातील टँकरची संख्या तब्बल पाच हजारांवर पोहोचली आहे. कोरड्या विहिरी, शुष्क झालेले पाण्याचे स्रोत आणि आटलेली धरणे यामुळे उन्हाळ्याचा कहर असलेल्या मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

बेभरवशी टँकर, टँकरच्या अपुऱ्या खेपा, मुश्किलीने मिळणारे पाणी आणि पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट याला कंटाळलेल्या मराठवाड्यातील अनेक कुटुंबांनी राज्यातील अन्य भागांत आश्रय घेतला आहे. या कुटुंबांनी पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात १९७२च्या दुष्काळानंतर प्रथमच आता स्थलांतराचा वेग वाढला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पावसाची अवकृपा आणि कडाक्याचा उन्हाळा यामुळे यंदा टंचाईची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. विशेषतः मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत टंचाईचे प्रमाण मोठे आहे. मराठवाड्यात बीड व औरंगाबादमध्ये सर्वांत भीषण टंचाई आहे. मराठवाड्यातील धरणांमध्येही केवळ दोन टक्के पाणीसाठा असल्याने माणसे व जनावरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांसह नगरमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. पुणे जिल्ह्यात यंदा ६४ गावे व ६०० वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. नगर जिल्ह्यामधील टंचाईग्रस्त गावांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून, सद्यस्थितीत ४३९ गावे आणि २४१२ वाड्या टँकरग्रस्त आहेत. नाशिक जिल्ह्यातील १५९ गावे व ३५६ वाड्यांना १५६ टँकरने पाणी देण्यात येत आहे.

...................

राज्यातील टंचाईची स्थिती

टंचाईग्रस्त भाग : ३७९८ गावे, ६२१७ वाड्या

टँकरची संख्या : पाच हजार

......................

मराठवाडा विभाग

टंचाईग्रस्त भाग : २५०० गावे, ९२२ वाड्या-वस्त्या

जिल्हानिहाय टँकर :

बीड : ८६६

औरंगाबाद : ७५८

जालना : ४८०

उस्मानाबाद : ३७९

नांदेड : ३१७

लातूर : २८५

परभणी : २२५

मराठवाड्यातील एकूण टँकर : ३३४०

.................

पुणे विभाग

टंचाईग्रस्त गावे : ३१७ गावे, २१६३ वाड्या-वस्त्या

जिल्हानिहाय टँकर :

नगर : ७१०

सांगली : १२७

पुणे : १०५

सातारा : १०२

...................

कोकण विभाग

टंचाईग्रस्त गावे : ११७ गावे व ३६४ वाड्या

जिल्हानिहाय टँकर :

ठाणे : १६

रायगड : १८

रत्नागिरी : ११

पालघर : ३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखाचा औषधसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फूट केअर पावडर' या आयुर्वेदिक औषधाचे लेबल बदलून, औषधाची विक्रीसाठी निर्मिती केल्याप्रकरणी भोर, तसेच बावधन येथील आयुर्वेद औषध उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक लाख ४२ हजार ४२० रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. याबाबत औषध निरीक्षक दिनेश खिंवसरा यांनी राजगड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 'फूट केअर पावडर' या मुदतबाह्य झालेल्या औषधाचे लेबल बदलून उत्पादनास मान्यता नसताना उत्पादनावर खोटा परवाना क्रमांक नमूद करण्यात आला. तसेच त्याची विक्री आणि वितरणासाठी बेकायदा निर्मिती करून ग्राहकांच्या आरोग्यास धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ग्राहक आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी 'महाराष्ट्र आयुर्वेद', तसेच 'वनश्री आयुर्वेद'च्या संचालिका सुनीता अविनाश बेलगमवार यांच्यासह दोन्ही कंपन्या, असा एकूण तिघांवर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिंवसरा यांनी २६ एप्रिलला भोर येथील महाराष्ट्र आयुर्वेदिक सेंटर या संस्थेची पाहणी केली. 'फूट केअर पावडर' या आयुर्वेदिक औषधाची मुदत सप्टेंबर २००८मध्ये संपली होती. तरीही औषधाच्या जुन्या बाटल्यांवर डिसेंबर २०१८ असे लेबल लावण्यात आले आणि उत्पादक म्हणून स्वतःचे नाव लावून 'महाराष्ट्र आयुर्वेद सेंटर प्रा. लि.' यांनी विक्रीसाठी बनावट औषधांची निर्मिती केली. त्यामुळे या कंपनीकडील एक लाख ११ हजार ४२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच भोर येथील महाराष्ट्र आयुर्वेद आणि बावधन येथील वनश्री आयुर्वेद या संस्थेच्या कार्यालयात एकत्रित छापा टाकून औषध निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले यांनी ३१ हजार रुपये किमतीची लेबल बदललेली मुदतबाह्य व बनावट औषधे जप्त केली.

'एफडीए'चे आयुक्त हर्षदीप कांबळे, दक्षता विभागाचे सहआयुक्त हरीश बैजल, तसेच पुणे विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नरेंद्र सुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदणी चौकात उड्डाणपूल

$
0
0

पालिका करणार महामार्ग प्राधिकरण आणि सल्लागारांबरोबर करार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकात होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उड्डाणपूल उभारला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी महामार्ग प्राधिकरण आणि तज्ज्ञ सल्लागार यांच्याबरोबर करार करण्याचा प्रस्तावही महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. या कामाचा 'मास्टर प्लॅन' पालिकेने तयार केला असून, यासाठी तब्बल २२० कोटी रुपये खर्च येणार आहे.

शहराचे पश्चिमेकडचे प्रवेशद्वार चांदणी चौकाची ओळख आहे. तेथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र सतत पाहायला मिळते. या चौकातून मुंबई, कोल्हापूर, कोकण आणि पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. पाच वेगवेगळे रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग या चौकात एकत्र येतात. परिणामी वाहतुकीचे तीन-तेरा वाजतात. या चौकाचे महत्त्व लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा रस्ता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने मुंबई येथील एक्स सीसी कन्सल्टंट या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या कंपनीने सुरुवातीच्या काळात या भागाचे सर्वेक्षण करून प्रकल्पाचा प्रारूप आराखडा आणि २२० कोटी रुपयांचे बजेट पालिकेला दिले होते. महापालिकेकडे प्रकल्पीय तरतूद उपलब्ध होणार नसल्यामुळे आणि हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत असल्यामुळे हा आराखडा त्यांना सादर करण्यात आला होता. हा खर्च करण्याची तयारीही प्राधिकरणाकडून दर्शवण्यात आली. त्यामुळे महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागारांना त्यांनी तयार केलेले आराखडे आणि सल्लामसलतीसाठी वर्ग करण्याबाबत प्राधिकरणाकडून कळवण्यात आले होते.

...........

पुढील आठवड्यात निर्णय

विकास आराखड्याला (डीपी) मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका हद्दीतील मान्य आराखड्यातील रस्त्यांचे भू-संपादन करण्याची जबाबदारी महापालिकेची असेल. त्यामुळे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि तज्ज्ञ सल्लागार यांच्या समवेत हा त्रिस्तरीय करार केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला असून, पुढील आठवड्यात होणाऱ्या समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतही चोवीस तास पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यासह शहरातील दुष्काळ आणि पुण्याचे पाणी पळविणे यावरून एकीकडे खडाजंगी सुरू असतानाच शहरातील ४० टक्के भागात चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या योजनेला शुक्रवारी (६ एप्रिल) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. केंद्र सरकारच्या 'जेएनएनयूआरएम' योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाण्याची नासाडी कमी करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात शहरातील ४० टक्के भागांत भागात ही योजना राबविली जाणार आहे. एकूण २०७ कोटी रुपये खर्च असलेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १४३ कोटी १७ लाख रुपयांच्या प्रकल्प आराखड्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून प्रकल्पाचा पहिला हप्ता महापालिकेला मिळाला आहे. यासाठी दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी 'एसपीएमएल इन्फ्रा प्रा. लि.' या ठेकेदाराने ३१६ कोटी ९२ लाख ३७ हजार ९१६ रुपयांमध्ये, तर 'मे. विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लि.' या ठेकेदाराने २०७ कोटी ५८ लाख २९ हजार ४२४ रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे 'विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

आम्ही निविदा ऑनलाइन खुल्या केल्या होत्या, त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरातीही दिल्या होत्या; तसेच निविदा भरण्याच्या कालावधीत तीन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, आमच्याकडे शेवटी दोनच निविदा आल्या. या योजनेसंबंधी माहिती घेतली असता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, की केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिका ही योजना राबवत आहे. २४X७ पाणीपुरवठा ही योजना मुळात परदेशातील तंत्रज्ञानावर आधारित असून यासाठी आपणही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. नागरिकांना या योजनेमुळे २४ तास महापालिका पाणीपुरवठा करू शकणार आहे.



योजनेच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के खर्च केंद्र सरकार, २० टक्के राज्य सरकार व ३० टक्के महापालिका खर्च करणार

या योजनेनंतर २४ तास पाणी पालिकेच्या पाइपलाइनमध्ये असेल. पाइपलाइनमधील पाणी बंद केले, की पाइपची पोकळी भरून निघण्यासाठी अशुद्ध पाणी पाइपमध्ये जाते. हे पाणी जाऊ नये, म्हणून २४ तास पाणी ठेवले जाणार आहे.

पाइपलाइनमधील १०० टक्के पाणीगळती थांबवणे, ४० टक्के भागातील सर्व घरांतील पाण्याची जोडणी बदलणे किंवा नव्याने करणे, पाण्याचे मीटर बदलणे या तीन प्रमुख गोष्टी केल्या जाणार आहेत.

साठवून ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देण्याच्या वृत्तीला आळा बसेल.

योजनेसाठी एचडीपी पाइप म्हणजेच हाय डेन्सिटी पॉलिथिन पाइप वापरले जाणार असून हे पाइप गंजणार नाहीत. या पाइपचे वयोमानही ४० ते ५० वर्षांचे असणार आहे.

भारतातील नागपूर, नवी मुंबई, मुंबई, दिल्ली येथे चोवीस तास पाण्याची योजना राबवली जात आहे.

४० टक्के भागातील पाण्याच्या टाक्यांचे पूर्णपणे नियंत्रण केले जाईल. टाकीतील पाण्याचे सर्व भागांमध्ये समान वाटप होण्यासाठी ऑनलाइन मॉनिटरिंग केले जाणार आहे. ६० टक्के भागासाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजनही लवकरच सुरू केले जाणार आहे.

या जलक्षेत्रांचा पहिल्या टप्प्यात समावेश

१) त्रिवेणीनगर २) सेक्टर क्रमांक २९ ३) एल्प्रो ४) बोऱ्हाडेवाडी ५) डब्लू डी फोर ६) भोसरी गावठाण ७) संत तुकारामनगर आळंदी रोड ८) सेक्टर क्रमांक ७ आणि १० ९) दिघी गावठाण १०) आण्णा साहेब मगर स्टेडीयम ११) अजमेरा कॉलनी १२) नवी सांगवी १३) पी.डब्लू.डी. सर्व्हे क्रमांक ८५ १४) जुनी सांगवी १५) दत्त नगर बायपास १६) प्राधिकरण निगडी १७) प्रेमलोक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृतपणे चित्रपट देणाऱ्याविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'सैराट'सह अन्य हिंदी, मराठी चित्रपट इंटरनेटद्वारे अनधिकृतपणे पेनड्राइव्ह आणि मेमरी कार्डमध्ये देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

सुलतान मिटू शेख (३०, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर कॉपीराइट अॅक्टप्रमाणे वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा थेरगाव येथील मनीष ट्रान्सफर बस रेल्वे तिकिटांच्या दुकानात चित्रपट अनधिकृतपणे देत असल्याची माहिती यशराज फिल्मचे अधिकारी सुनील शिवाजी मर्ढेकर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बनावट गिऱ्हाइकामार्फत खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी शेख हा १०० रुपयांमध्ये सैराट, फॅन, नटसम्राट, कपूर अॅन्ड सन्स आदी चित्रपटांच्या बनावट चित्रफिती पेनड्राइव्हमध्ये कॉपी करून देत असल्याचे निर्दशनास आले. पेनड्राइव्ह, मेमरी कार्ड, कम्प्युटर, प्रिंटर, पाच कार्डरीडर, दोन डोंगल आणि वेगवेगळ्या हिंदी, मराठी चित्रपटांचे पोस्टर असा एकूण ३० हजार ३५० रुपयांचा ऐवज त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद संशोधनाला उत्तेजन हवे

$
0
0

आयुर्वेदातील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे नेता येईल?

डॉ. पाटणकर : आपल्याकडील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचा साठा म्हणजे आयुर्वेद. एक प्रकारे ही आपल्याला मिळालेली देणगीच आहे. विविध प्रकारच्या आजारांवर कोणत्या प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग होऊ शकतो, निसर्गात आढळणाऱ्या विविध वस्तू उपचारांसाठी उपयोगी ठरू शकतात, औषधी वनस्पती कोणत्या आदी अनेक बाबींचा अभ्यास आपल्याकडे आयुर्वेदामुळे झाला आहे. ही उपचार पद्धती दीर्घकाळ अस्तित्वात असल्याने यातील ज्ञान निश्चितच महत्त्वाचे आहे. जीवनशैलीशी संबंधित विविध आजारांवर आयुर्वेदाच्या उपचारांद्वारे मात करता येते. आयुर्वेदाला आणखी परिणामकारक करण्यासाठी संशोधनाची गरज आहे. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवायची असेल, तर आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करूनच संशोधन करावे लागेल. आपल्याकडे आयुर्वेदाबद्दल भरभरून बोलले जाते; परंतु त्याच्या प्रमाणीकरणावर, तसेच आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार संशोधन करण्यावर फारसा भर दिला जात नाही. त्यामुळे आपल्याकडील आयुर्वेदाच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मुद्रा उमटणे अवघड जाते.

यावर कशी मात करता येते?

डॉ. पाटणकर : संशोधनात शिस्त असणे अतिशय महत्त्वाचे असते. ज्या आजारावरील उपचारासाठीचे संशोधन करायचे असते, त्या उपचाराची दिशा कोणती, आयुर्वेदाद्वारे उपचार करायचे असल्यास त्यात कोणत्या वनस्पती आणि अन्य कोणते घटक वापरणार हे स्पष्ट करायला हवे. वनस्पती किंवा फळे यांचा अर्क औषधासाठी घ्यायचा असेल, तर त्यात कोणकोणते घटक आहेत, शिसे आदी धातूंचे प्रमाण किती आहे, अन्य कोणती रसायने वा धातू आहेत या साऱ्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. शिसे आदी धातूंबाबत आंतरराष्ट्रीय प्रमाण ठरलेले आहेत. या प्रमाणाच्या आतच हे घटक असतील याची दक्षता घ्यावी लागते. त्यानंतर प्रत्यक्ष औषध निर्मितीसाठीच्या निकषांचे पालन व्हायला हवे. त्यातील सर्व घटकांबाबत काळजी घ्यावी लागते. औषधांच्या चाचण्या प्राण्यांवर घेण्यासाठीदेखील निकष आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. औषधाची परिणामकारकता हाही महत्त्वाचा भाग आहे. सर्व निकषांचे पालन झाले; परंतु औषध परिणामकारक नसेल, तर त्याचा काय उपयोग? औषधाचे अन्य दुष्परिणाम, सुरक्षितता आदींकडेही लक्ष द्यायला हवे. या सर्व गोष्टींद्वारेच अडथळ्यांवर मात करता येते. हे काहीही न करता आपल्याकडील आयुर्वेदाच्या वारशाबद्दल गप्पा मारण्यात, अभिनिवेश दाखविण्यात काहीही अर्थ नाही.

ही शिस्त सांभाळून संशोधनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे?

डॉ. पाटणकर : सध्या 'मेक इन इंडिया' या उपक्रमाची चर्चा सुरू आहे. या प्रकारच्या संशोधनाला चालना देणे हाही या उपक्रमाचा भाग असायला हवा. हा उपक्रम गुंतवणुकीसाठीचा असला, तरी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहायला हवे. आपल्याकडील प्राचीन ज्ञान, परंपरा आदींच्या पुनरुत्थानाची चर्चाही सध्या सुरू आहे. आपल्याकडील ज्ञानसाठ्याचा धांडोळा जरूर घ्यायला हवा, त्यामध्ये संशोधनही व्हायला हवे; परंतु केवळ आपलेच चांगले, असा दृष्टिकोन न बाळगता काम व्हायला हवे. आयुर्वेद उपयुक्त असला, तरी आधुनिक वैद्यकशास्त्राशी त्याची तुलना करता येत नाही. दोन्ही उपचार पद्धती वेगळ्या आहेत; परंतु दोहोंचा मिलाफ होऊ शकतो. परिणामकारक औषधनिर्मितीसाठीही आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मापदंडांद्वारे संशोधन व्हायला हवे. अशा संशोधनाच्या मागे सरकारने उभे राहायला हवे. त्यासाठी सर्व ती मदत करायला हवी. मात्र, आयुर्वेदाबाबत पारंपरिक कल्पना कायम ठेवल्यास फारसा उपयोग होणार नाही. याबाबत समाजात आणि धोरणकर्त्यांत जागरुकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या दोहोंचा मिलाफ कसा होऊ शकतो?

डॉ. पाटणकर : या दोन्ही उपचार पद्धतींचा परिणामकारक वापर शक्य आहे. आयुर्वेदाच्या ऐवजी आधुनिक वैद्यकशास्त्र किंवा आधुनिक ऐवजी आयुर्वेद अशी भूमिका घेणे पूर्णतः चुकीची आहे. दोन्ही उपचार पद्धती एकमेकांना पूरक आहेत. मात्र, जिथे आधुनिक वैद्यकशास्त्राची गरज आहे, तिथे त्याचा वापर झाला पाहिजे. शस्त्रक्रियेच्या टप्प्यावर आलेल्या एखाद्या रुग्णावर आयुर्वेदाचा कितपत उपयोग होईल हे सांगता येत नाही. त्यावेळी शस्त्रक्रियेची गरज असल्यास ती केली जावी. त्यानंतर रुग्णाला अधिक आरामदायी वाटण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो. थोडक्यात या दोन्ही उपचार पद्धतीचा तारतम्याने उपयोग करायला हवा.

आपल्या संशोधनाबद्दल थोडे सांगा.

डॉ. पाटणकर : मुतखड्यांवरील उपचाराबाबत, तसेच जखम बरी होण्यासाठी आम्ही संशोधन केले आहे. या दोन्ही आजारांवर आयुर्वेदातील वनस्पतींचा अभ्यास करून, आधुनिक वैद्यकशास्त्राची शिस्त सांभाळून संशोधन केले. प्रत्येक टप्प्यावर निकषांचे पालन करून औषधनिर्मिती केली. त्याबाबतच्या शोधनिबंधांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. यातूनच प्रेरणा मिळाल्याने आयुर्वेदातील संशोधनाबाबत व्यापक विचार करीत आहे. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी जागतिक मापदंडांचे पालन करून संशोधन करणे हाच खरा मार्ग आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी असे वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारला जाण्यासाठी रस्ता न दिल्यावरून मारहाण

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे कर्वेरोडवर कारला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून मित्रासोबत गप्पा मारत उभे असलेले बांधकाम व्यावसायिक गजेंद्र पवार, त्यांची पत्नी तसेच पवार यांचा मित्र आणि त्यांची पत्नी यांना कारमधील तरुणांनी बेदम मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दरम्यान, पवार यांच्या मदतीसाठी आलेल्या व्यक्तींनी कारमधील तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी परस्परांविरोधात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवार आणि त्यांच्या कुटुबीयांना बांबूने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एकजण पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. पवार आणि या तरुणांनी परस्परांविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. डेक्कन पोलिसांनी पवार यांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पवार आ​णि इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शशिकांत किसन वाघोले (वय ३६, रा. जुनी सांगवी), रॉनी जॉन सॅबेस्टिअन (३०, रा. दापोडी) आणि संदीप अरुण तिकोणे (३०, रा. विठ्ठलवाडी) यांना अटक करण्यात आली आहे; तर इतर १० ते १२ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टँकरने पादचाऱ्याचा मृत्यू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, हडपसर सय्यदनगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव नरसिंघ देशमुख (वय ५५) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाण्याचा टँकर महंमदवाडीकडून ससाणेनगरच्या दिशेने जात होता. सोसायटीत टँकरमधील पाणी ओतून तो पुन्हा भरण्यासाठी जात असताना त्याने देशमुख यांना चिरडले. त्यात ते जागीच ठार झाले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदित्य अय्यंगार अव्वल

$
0
0

'सीआयसीएसई'चे दहावी, बारावीचे निकाल जाहीर; बऱ्याच शाळांचा १०० टक्के निकाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स'च्या (सीआयसीएसई) दहावीच्या निकालामध्ये पुण्यातील हॅचिंग्स हायस्कूलच्या आदित्य अय्यंगार याने ९८.८ टक्के गुण मिळवून शहरात अव्वल येण्याचा मान पटकावला. 'सीआयसीएसई'च्या दहावी आणि बारावीच्या निकालामध्ये शहरातील बहुतांश शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांनी १०० टक्के निकाल नोंदविल्याचेही दिसून आले.
'सीआयसीएसई'तर्फे घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांचे ऑनलाइन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाले. देशभरातून १,६८,५९१ विद्यार्थ्यांनी 'आयसीएसई'ची तर, ७२,०६९ विद्यार्थ्यांनी 'आयएसई'ची परीक्षा दिली होती. राष्ट्रीय पातळीवरील या परीक्षांमध्ये दहावीचा एकूण निकाल ९८.५० टक्के, तर बारावीचा निकाल ९६.४६ टक्के लागल्याचे आकडेवारीमधून समोर आले. दुपारी जाहीर झालेल्या निकालामधून शहरातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांच्या निकालांचे चित्रही स्पष्ट झाले. दहावीच्या निकालात शहरात चमकलेल्या आदित्यनेही या निकालानंतर आनंद व्यक्त करताना आपले आई-वडील आणि शिक्षकांना आपल्या यशाचे श्रेय दिले. आदित्यला 'आयआयटी'मधून इंजिनीअरिंग करायचे असून, त्याचीही तयारी आतापासूनच आरंभल्याचे त्याने नमूद केले.
..
'बिशप्स'चा निकाल १०० टक्के
बिशप्स स्कूलच्या दहावी आणि बारावीच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यात यश मिळविल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. बिशप्स स्कूल कँप, बिशप्स को-एड स्कूल कल्याणीनगर, बिशप्स को- एड स्कूल उंड्री आणि बिशप्स ज्युनिअर कॉलेज या सर्व शाखांमधून विद्यार्थ्यांनी ही कामगिरी नोंदविली. दहावीच्या परीक्षेत बिशप्स स्कूल कँपमध्ये रोहित मेहता याने ९७.४ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. कल्याणीनगरमधील बिशप्स को-एड स्कूलमध्ये पार्थ अगरवाल याने ९८ टक्के गुण मिळविले. उंड्रीमधील बिशप्स को-एड स्कूलमध्ये अमन गोयल याने ९६.६ टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला. बारावीच्या पातळीवर बिशप्स ज्युनिअर कॉलेजमध्ये अंजली सुरेशन ही विद्यार्थिनी ९७.५ टक्के गुण मिळवून सायन्स शाखेमधून पहिली आली. कृतिका चौहान हिने ९५ टक्के गुणांसह कॉमर्समधून तर, तर सोयरा गुणे हिने ९५.५ टक्के गुणांसह आर्ट्समधून पहिले येण्यात यश मिळविल्याचे संस्थेतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले.
000
'सेंट मेरीज'चाही१०० टक्के निकाल
सेंट मेरीज स्कूलच्या दहावीच्या १६६ विद्यार्थिनींपैकी १२६, तर ४० विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादित केल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. मुलींमधून इशानी संतुरकर हिने ९८.२० टक्के गुण मिळवित पहिला क्रमांक पटकावला. मुलांमधून अमेय कुलकर्णी हा विद्यार्थी ९७.४० टक्के गुण मिळवत शाळेत पहिला आला. सेंट मेरीज ज्युनिअर कॉलेजमधून ७१ विद्यार्थ्यांनी आयएससी बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. कॉलेजच्या महिमा हसिजा हिने सायन्समधून ९७.३ टक्के गुण मिळवून, तर शुभी रावत हिने कॉमर्समधून ९५.८ टक्के गुण मिळवून आपापल्या शाखेतून पहिल्या येण्याचा मान मिळविला.
000
मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूल
विद्याप्रतिष्ठानच्या मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलच्या दहावीच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी 'आयसीएसई'च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात यश मिळविल्याचे शाळेकडून शुक्रवारी सांगण्यात आले. शाळेतील ४३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ३६ विद्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्क्यांदरम्यान, तर ११ विद्यार्थ्यांना ७० ते ७९ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. शाळेच्या रुजुल देवळीकर (९८.२ टक्के ) याने प्रथम, तर श्रेया सोनवणे हिने ९८ टक्के गुण मिळवित शाळेत द्वितीय क्रमांक पटकावल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुसदस्यीय प्रभाग केल्यास कोर्टात जाऊ

$
0
0

प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सध्या अस्तित्वात असणारी एकसदस्यीय (सिंगल) वॉर्ड पद्धत बदलून बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यास त्याविरोधात आपण पुन्हा कोर्टात जाऊ,' असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे राज्य सरकारच्या संभाव्य निर्णयावर कायद्याच्या लढाईची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिकांमध्ये यापूर्वी बहुसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, ही पद्धत अन्यायकारक असल्याची भूमिका घेऊन आंबेडकर यांनी कोर्टात दाद मागितली होती. या प्रकरणी सरकारच्या वतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आणि त्यानुसार विधिमंडळात कायदा बदलून एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या पार्श्वभूमीवर बहुसदस्य पद्धत लागू केल्यास निवडणुकीत फायदा होईल, असा मतप्रवाह सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मूळ धरू लागल्याने पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत. परंतु, तसे सरकारला करता येणार नाही. तसा निर्णय घेतला, तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा आंबेडकर यांनी 'मटा'शी बोलताना दिला.
दरम्यान, भाजप वगळता अन्य काही पक्ष, विशेषतः छोट्या पक्षांमधून या पद्धतीच्या निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व संपण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, मुख्य प्रवाहातील पक्षांमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही या पद्धतीमध्ये संधी मिळणार नाही, अशीही भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीत सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आगामी महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार, की प्रभाग स्तरावर याबद्दल चर्चा सुरू होती. गेल्यावर्षी कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका वॉर्ड पद्धतीने झाल्या होत्या. त्यामुळे, आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुकाही त्याच पद्धतीने होतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, या महापालिकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनता पक्षाने वॉर्डऐवजी प्रभाग पद्धतीनेच निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रामुख्याने शहरी भागांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद, मनसेचा घटलेला करिष्मा आणि मुंबई-ठाणे हा पट्टा वगळता इतर ठिकाणी शिवसेनेच्या मर्यादा ओळखून प्रभाग पद्धतीने झालेली निवडणूक अधिक फायदेशीर ठरेल, असा कयास भाजपमधील जाणकारांनी वर्तविला. त्यातही, सध्याच्या दोन सदस्यीच प्रभागाऐवजी चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास, भारतीय जनता पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात आली. त्यासाठी, २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीचे दाखलेही अनेकांनी दिले. त्यामुळे, चार सदस्यांचा प्रभाग करून आगामी महापालिका निवडणुका लढविण्यावर पक्षात जवळपास एकमत झाले आहे.
..
लवकरच घोषणा होणार
भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही प्रभाग पद्धतीला अनुकूल असून, काँग्रेस आणि शिवसेनेचा तीव्र विरोध कमी करण्यातही भाजप नेतृत्वाला यश लाभले आहे. प्रभागांची रचना, त्यासाठीचे आरक्षण अशी सर्व प्रक्रिया जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे गरजेचे असल्याने आगामी काही दिवसांमध्येच चार सदस्यांच्या प्रभागाबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पुण्यासारख्या शहरात दोन सदस्यांच्या एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ३० हजार ते ३५ हजारांच्या दरम्यान आहे. यामध्ये, काही प्रभाग ४० ते ५० हजार लोकसंख्येचेही आहेत. त्यामुळे, आता चार सदस्यांचा प्रभाग होताना लोकसंख्येसह प्रभागाचे क्षेत्रफळही वाढणार आहे. परिणामी, संपूर्ण प्रभागापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची घोषणा लवकरात लवकर केली जावी, असा आग्रह इच्छुकांकडून धरला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेरी फेस्टिव्हलमध्ये लज्जतदार पाककृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठमोळ्या लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, कलाविष्काराने सजलेली प्रदर्शने अन् महाराष्ट्राच्या पाककलेचा समृद्ध वारसा उलगडणाऱ्या पुणेरी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. म्हात्रे पुलाजावळील शुभारंभ लॉन्समध्ये हा महोत्सव सुरू झाला असून, या खाद्य जत्रेबरोबरच अनेक कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवायला मिळाली आहे.
'महाराष्ट्र टाइम्स' या महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे. डॉ. ओंकार माळी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुणे फेस्टिव्हलमध्ये कला, करमणूक, व्यवसाय आणि मराठमोळ्या संस्कृतीचे पैलू उलगडण्यात आले आहेत. 'ठेवा लोककलेचा; वारसा पाककलेचा' ही या महोत्सवाची संकल्पना आहे. यामध्ये खवय्यांसाठी खाद्य पदार्थांचे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. शिवाय गोंधळी, वासुदेव यांसह पारंपरिक लोककलाकारांचा कलाविष्कारही 'मदारी' या रॉकबँडमधून अनुभवायला मिळणार आहे.
लहान मुलांसाठी खास 'भातुकली'चे आकर्षण असणार असून, सुमारे तीन हजार भातुकलींच्या खेळण्यांचे सुसज्ज दालन महोत्सवात उपलब्ध करण्यात आले आहेत. तेथे खेळण्याचीही संधी​ लहान मुलांना मिळणार आहे. या शिवाय विविध प्रजातींच्या शेकडो आकर्षक माशांचे अॅक्वेरियम देखील उपलब्ध करण्यात आले आहे. खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर गावरान चुलीवरील मटन, खर्डा, भाकरी, मासवड्या आणि इतर वैविध्यपूर्ण पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. या शिवाय साड्या, लाकडी वस्तू, फॅशन ज्वेलरी, गृहपयोगी आणि गृह सजावटीचेही स्टॉलही मांडण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images