Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाच दिवसांचे स्त्री अर्भक आढ‍ळले

$
0
0
भोसरी पोलिस चौकीच्या जवळच असलेल्या संत ज्ञानेश्वर भाजी मंडईमध्ये पाच दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने या परिसरामध्ये खळबळ उडाली. बुधवारी रात्री (ता.२४) उशिरा एका महिलेने याबाबत पोलिसांना माहिती दिली. बालिकेवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

दिवाळीची गोडी वाढणार

$
0
0
सर्वसामान्य कुटुंबांना दिवाळीसाठी रेशनवर जादा साखर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, माणशी १६० ग्रॅम साखर सवलतीच्या दरात वितरीत केली जाणार आहे. पुढील नोव्हेंबर महिन्यात रेशनवर ही साखर दिली जाणार आहे.

पुणेकरांची पोलिसांशी 'गपशप'

$
0
0
नागरिक आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या ‘गपशप’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांमध्ये नोंदणी करणाऱ्यांची संख्या दोन हजारापर्यंत गेली आहे.

दिवाळीचा फराळ यंदा 'आंबट'

$
0
0
इंधन आणि घरगुती गॅसपाठोपाठ आता खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा सामान्य पुणेकरांना चटका बसणार आहे. यंदा खाद्यतेलाच्या भावात ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली असून, तुपाचे भाव मात्र स्थिर आहेत. रवा, मैदा यांचे भाव स्थिर असले, तरी बेसनचे भाव वाढले आहेत.

संगीत रंगभूमीबाबत पुण्यात राज्यस्तरीय परिषद

$
0
0
संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी या क्षेत्रातील कलाकारांनी एकत्र यावे या उद्देशाने बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे येत्या ३१ ऑक्टोबरला पुण्यात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘यशदा’मध्ये सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून, गोवा कला अकदामीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ आणि प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार उपस्थित राहणार आहेत.

खासगी संस्थांच्या सरकारी जागेवर शासनाचा फलक

$
0
0
अतिक्रमणे आणि मालकीहक्कासंबंधीचे वादविवाद टाळण्यासाठी राज्य सरकारकडून कब्जेहक्क वा भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनींवर शासनाचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा जमिनी घेणाऱ्यांनी सहा महिन्यांत असे फलक लावण्याची सूचना करण्यात आली आहे.

हेरिटेड वॉकमध्ये तारांगण पाहण्याची पुणेकरांना संधी

$
0
0
पुण्यात असलेले आशिया खंडातील पहिले तारांगण पाहण्याची संधी येत्या रविवारी (दि. २८) पुणेकरांना चालून आली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘एच.व्ही. देसाई महाविद्यालय’ आणि ‘गार्डियन हॉलिडेज’ आयोजित ‘हेरिटेज वॉक’मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील तारांगणची सफर घडविण्यात येणार आहे.

बचतगटांनी वस्तूंचा दर्जा सांभाळावा

$
0
0
मार्केटिंगच्या स्पर्धेत‌ टिकण्यासाठी बचतगटांनी आपल्या वस्तूंचा दर्जा टिकवून ठेवला पाहिजे, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कुत्र्यांसाठीच्या निवा-यास प्रशासनाचा नकार

$
0
0
शहरात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यावर उपाय म्हणून निवारा केंद्र (श्वान वन) उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे. प्रत्येक कुत्र्यामागे महापालिकेला वर्षाला सुमारे १८ ते २५ हजार रुपये खर्च असून त्यांच्या व्यवस्थेसाठी मनुष्यबळ नसल्याने निवारा केंद्र उभारता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटीत महिलासांठी राखीव आसने

$
0
0
एसटी बसने प्रवास करताना महिलांना त्रास होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने कमी अंतराच्या साध्या आणि निमआराम गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वेशीवर झळकणार विजयनगरच्या साम्राज्याची प्रतिके

$
0
0
सातवहन कालखंडापासून ते शिवकालापर्यंतच्या अनेक राजवंशांतील अस्तित्वाच्या खुणा बाळगलेल्या ऐतिहासिक जुन्नरला दगडी धाटणीची नगरवेस साकारली जात आहे. वेशीच्या दोन्ही बाजूंना किल्ले शिवनेरी तसेच रायगडावर असलेल्या गंडभेरुंड शिल्पांची प्रतिके झळकणार आहेत. ही शिल्पे घडविण्याचे काम फलटण येथील ज्येष्ठ कारागीर लक्ष्मण पवार यांच्याकडून सध्या सुरू आहे.

वास्तवाचा विचार करणार

$
0
0
‘नाट्यसंमेलनाध्यक्षपदाच्या माध्यमातून नाट्यचळवळीसाठी काय करता येईल हे माहीत करून घेण्यावर माझा भर राहील. नेमके काय करणार याच्या वल्गना करण्यापेक्षा वास्तवात काय करता येणे शक्य आहे आणि लोकांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे’, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि जेष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी त्यांची भूमिका मांडली.

दाढी, कटिंगच्या दरात वाढ

$
0
0
महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना आता दाढी व कटिंगसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एक नोव्हेंबरपासून नागरिकांना कटिंगसाठी ६० तर दाढीसाठी ४० रुपये द्यावे लागणार आहेत.

स्वच्छतेच्या टेंडरची होणार ‘साफसफाई’

$
0
0
समाजकल्याण खात्याने स्वच्छता व सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्यांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये काही त्रुटी असल्याची कबुली खुद्द राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी दिली. या टेंडरमधील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी ‘मटा’शी बोलताना दिले.

स्कॉलरशिपचे प्रस्ताव मुदतीत द्या

$
0
0
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या स्कॉलरशिपचे प्रस्ताव मुदतीत राज्य सरकारकडे न पाठविणा-या शाळा, कॉलेजवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.

भारतभ्रमणासाठी जागृती यात्रा

$
0
0
तरुणांमध्ये लपलेल्या उद्योजकाला चालना देण्यासाठी दरवर्षी भारतभ्रमण करणारी जागृती यात्रा यंदा २३ डिसेंबर ते ८ जानेवारीदरम्यान होणार आहे. विविध राज्यातील उद्योजकांना भेटण्याची संधी या यात्रेच्या निमित्ताने मिळणार असून तब्बल पंधरा दिवस रेल्वेतून भारत दर्शन अनुभवता येणार आहे.

‘आयुर्वेद फॉर कॅन्सर’ परिषदेचे आयोजन

$
0
0
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’ तर्फे तीन आणि चार नोव्हेंबर रोजी ‘आयुर्वेद फॉर कॅन्सर’ या चौथ्या आंतरराष्ट्रीय कॅन्सर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी एकास अटक

$
0
0
बनावट जात प्रमाणपत्र देऊन त्यापोटी पंधरा हजार रुपये घेणा-या एका भामट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. जात प्रमाणपत्र मिळवून देण्याचे बहाण्याने फसवणूक केल्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.

कपाटास स्टीकर लावण्याचे बहाण्याने चोरी

$
0
0
कपाटाला स्टीकर लावून देण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करण्याची घटना ताडीवाला रोड येथे घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र चोरले

$
0
0
पुणे-सातारा रोडवरील एस. टी. कॉलनीत शुक्रवारी सकाळी कचरा बाहेर टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंग‍ळसूत्र हिसकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images