Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कारवाईतून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी विनापरवाना चिटफंड चालवित असल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केलेल्या वृद्ध दाम्पत्यातील पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (२४ एप्रिल) सकाळी मृत्यू झाला. परंतु, पिंपरी कॅम्पमधील सर्व व्यापाऱ्यांनी पिंपरी पोलिसांच्या जाचामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रविवारी बंद पाळण्याचा प्रयत्न केला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच, दोषी पोलिसांवर मंगळवारपर्यंत कठोर कारवाई न केल्यास बेमुदत बंदचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. सुनीता रामचंद्र नाथानी (वय ५८, रा. धनराज कॉम्प्लेक्स, अशोक थिएटरजवळ, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी सुनीता यांच्यासह त्यांचे पती रामचंद्र रेणुमल नाथानी (६४) यांच्याविरुद्ध विनापरवाना चिटफंड भिशी चालवित असल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. आरोपी नाथानी दाम्पत्य हे विनापरवाना 'टिना एंटरप्रायजेस' या नावाने सभासदांकडून ३०० व ५०० रुपये घेवून ड्रॉद्वारे चिटफंड भिशी चालवत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत त्यांच्याकडून ७ लाख ४३ हजार ५०० रुपयांची रोकड व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. चौकशीनंतर नोटीस बजावून सुनीता नाथानी यांना सोडून देण्यात आले होते. परंतु, काही वेळाने सुनीता नाथानी यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना थेरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरी कॅम्पमधील सेंट्रल पंचायत या संघटनेने याचा निषेध नोंदवित बंद पाळण्याचे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. यासंदर्भात संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'पिंपरी पोलिसांनी कोणाचीही तक्रार नसताना कारवाई कशी केली ? पोलिस पथकात महिला पोलिसांचा सहभाग नसताना घरात एकट्या असणाऱ्या वृद्ध महिलेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात का नेले ? सुनीता नाथानी यांना कोणतीही माहिती न देता, नोटीस न बजावता किंवा वॉरंट न काढता ताब्यात का घेतले ? पोलिसांच्या जाचामुळेच सुनीता यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला,'असा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनाही निवेदन दिले आहे. दोषी पोलिसांवर मंगळवारपर्यंत कारवाई न केल्यास बेमुदत बंद पाळण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष शिवनदास पामनानी यांनी दिला आहे. दरम्यान, 'मृत वृद्ध महिलेला पोलिसांनी कोणताही जाच दिला नाही. तसेच, महिलेला अटकही केली नव्हती. कायदेशीर नोटीस देऊन सोडून दिले होते. संबंधित महिला पूर्वीपासून आजारी होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या भिशी प्रकरणात सुमारे ७०० लोक सभासद असून गेल्या २५ वर्षांपासून बेकायदा ही भिशी चालू आहे. तसेच त्यामध्ये मोठ्या व्यावसायिक व नेत्यांचा हात असून महिलेचा आजारपणात मृत्यू झाला असतानाही पोलिसांवर दबाव आणला जात असून, तपासावर त्याचा परिणाम होण्यासाठी राजकीय लोक पोलिसांनाच वेठीस धरत असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जीवनमूल्यांचे नाटकांतून दर्शन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शेक्सपिअरची नाटके जीवनमूल्याचे प्रश्न उपस्थित करतात. शेक्सपिअर नटांचा असून नटांनी त्यास जिवंत केले आहे व जागे ठेवले आहे,' असे मत ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव वझे यांनी व्यक्त केले.
शेक्सपिअर यांच्या ४०० व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद व काँटिनेन्टल प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'काँटिनेन्टल'तर्फे परशुराम देशपांडे लिखित 'शेक्सपिअरचे विचारधन आणि डेन्मार्कचा युवराज हॅम्लेट' या पुस्तकाचे प्रकाशन परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी लेखक देशपांडे, काँटिनेन्टलच्या प्रमुख देवयानी अभ्यंकर, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
रंगभूमीचा काळ बदलला आहे, असे सांगून वझे म्हणाले, 'लोक नाटकाला जायचे का असा विचार करून दूरचित्रवाणीसमोर बसतात, अशी परिस्थिती असून त्यामुळे कोणती नाटके करायची हा विचार करावा लागत आहे. अशा काळात आम्ही हॅम्लेट सादर केले. शेक्सपिअरची नाटक जीवनमूल्याविषयी विचारणा करतात, त्यामुळे ती या काळातही लागू ठरतात. शेक्सपिअर नटांचा असून नटांनीच त्याला जिवंत केले आहे.'
'शेक्सपिअरचे आयुष्य म्हणजे महानाट्य आहे. शेक्सपिअरचे साहित्य हेच त्यांचे स्मारक आहे. व्यापक संवेदना व वैश्विक भान शेक्सपिअरच्या ठायी होते,' याकडे प्रा. जोशी यांनी लक्ष वेधले. लेखक देशपांडे यांचे 'शेक्सपिअर आणि मी' या विषयावर व्याख्यान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅरिस पुलावरून टेम्पो नदीत पडल्याने आठ जखमी

$
0
0





म. टा. प्रतिनिधी खडकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणूक संपवून परत निघालेला साउंड सिस्टीम सर्व्हिसचा ट्रक मध्यरात्री दीडच्या सुमारास बोपोडी येथील हॅरिस पुलाचा कठडा तोडून मुळा नदीत पडला. या अपघतात टेम्पोतील आठजण जखमी झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्वांना वाचविण्यात यश मिळवले. बोपोडी येथून डाॅ. आंबेडकर जयंतीची मिरवणूक संपवून विनायक डी. जे. साउंड सिस्टीम सर्व्हिसचा टेम्पो (एमएच१४, ९०९) डीजे साउंड सिस्टीम आणि आठ कामगारांना घेऊन पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी-चिंचवडच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो हॅरिस पुलाचा कठडा तोडून मुळा नदीत कोसळला. अजय कलशे (वय २५), विशाल मलाले (२६), चालक शब्बीर (२७), सलमान शेख (१९), भावड्या बोऱ्हाडे (१५), तुषार (१६), सिद्धेश (१४) अशी जखमींची नावे आहेत. आणखी एका जखमीचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती समजताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन लाइफ बोट आणि दोरखंडाच्या मदतीने १५ ते २० मिनिटांत सर्व जखमींना पाण्यातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात हलवले. याकामात स्थानिक तरुणांनी अग्नीशमन दलाला मदत केली. टेम्पो नदीत पडल्यानंतर त्यातील साउंड सिस्टीमचे साहित्य बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सकाळी दहानंतर पाण्यात पडलेला टेम्पो बाहेर काढण्यास सुरुवात झाली. हॅरिसपुलाच्या सब-वे वर क्रेन उभी करून टेम्पो काढण्यात येत होता. त्यासाठी औंध मार्गे बोपोडी चौकात जाणारा सब-वे बंद करण्यात आला होता. सब-वे बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहने उजव्या बाजूने थेट चौकात येत होती. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. टेम्पो बाहेर काढण्यासाठी आलेली क्रेन नादुरुस्त झाल्यामुळे बराचकाळ काम बंद होते. क्रेन दुरुस्त करून दुपारी चारनंतर टेम्पो बाहेर काढण्यात आला. ज्या पुलावर हा अपघात झाला तो बोपोडी आणि दापोडीला जोडणारा हॅरिस पूल हा ब्रिटिशकाळात बांधण्यात आला होता. त्याला शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत. या पुलाला लोखंडी संरक्षण कठडे आहेत. मात्र, त्या कठड्याचे लोखंड कापून नेल्यामुळे कठडा असुरक्षित झाला आहे. काही वर्षांपुर्वी याच ठिकाणच्या सुरक्षा कठड्याला बसने धडक दिली होती. त्यामुळे येथील नदीच्या बाजूचे कठडे तुटले असल्याने तेथे विटांची भिंत बांधण्यात आली होती. ती भिंत टेम्पोने तोडल्यामुळे तो थेट नदीत पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेवन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेची संगीत सभा नुकतीच आयोजिण्यात आली होती. या वेळी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात' सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना संगीतातील बारकावे समजावून सांगितले.
महादेवन म्हणाले, 'भाषेत जसे व्याकरणाचे, तसे संगीतात शास्त्रीय गायनाचे महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाने गाण्याचा पाया भक्कम होतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे गाणे सहजतेने गाता येते.' रमणबागेतील संगीत सभेत दर रविवारी दोन तास शास्त्रीय संगीत शिकविले जात असल्याच्या उपक्रमाविषयी महादेवन म्हणाले, 'हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी केवळ लोकप्रियतेच्या मागे न धावता, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय संगीताचा सखोल सराव करणे आवश्यक आहे.'
मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे यांनी स्वागत केले. संगीत शिक्षक अजय पराड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक महेश काळे, उपमुख्याध्यापिका चारुशीला वंजारी आणि पर्यवेक्षक सुनील शिवलेही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर भाजपमध्ये गटातटाचे राजकारण कायम

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पिंपरी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमोच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. परंतु, भाजयुमोच्या शहराध्यक्षांनी व्हॉट्सअॅपवरून सर्वांना निमंत्रण पाठवून देखील शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी या आंदोलनाला अनुपस्थित होते. त्यामुळे शहरातील गडकरी-मुंडे गट अद्याप गटातटाच्या राजकारणात गुंतला असल्याचे यावेळी दिसून आले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सेल्फी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करत आहे. अशाच प्रकारे रविवारी (२४ एप्रिल) पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आले होते. चिंचवड येथील चापेकर चौकात हे आंदोलन झाले. जोडा मारो आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी मलिक यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला अटकाव केला. आंदोलनानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनाचे रितसर 'आमंत्रण' सर्व पदाधिकाऱ्यांना देऊन देखील ठरावीक जणांव्यतिरिक्त अन्य नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली. शहरातील गडकरी गटाच्या समर्थकांकडे सध्या अनेक पद आहेत. त्यामुळेच या आंदोलनाला या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी विद्यानगर पोटनिवडणुकीत देखील या गटातटाच्या राजकारणामुळेच भाजपला परभवाला सामोरे जावे लागले होते. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप अथवा अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची साधी दखल देखील घेतली नसल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. विशेष म्हणजे भाजयुमोचे प्रदेश पदाधिकारी असलेल्यांनी देखील या आंदोलनाला अनुपस्थिती दर्शविल्याने गटातटाचे राजकारण अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शहर भाजयुमोचे शहराध्यक्ष मोरेश्वर शेडगे यांच्यासह माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, राजू दुर्गे, अमोल थोरात तसेच भाजयुमोच्या वाणी सोनवलकर, माधवी इमानदार, विशाल वाळुंजकर, नवनाथ तरस, दीपक नागरगोजे, सुभाष दराडे, नारायण लांडगे, आदिनाथ माळवे, प्रवीण सिंग, रामदास कावळे, मधुकर बच्चे, सचिन शिवले, सोमनाथ भोंडवे, धनंजय शाळीग्राम, संकेत वाघमारे, गणेश बाबर, रुपेश चांदेरे, पवन जाधवर, संजय बडे, भागवत हांगे, दत्ता इंगळे, ज्योती रासने, नारायण जायभाय, सुभाष पाठक, वैजनाथ शिरसाट, धीरज धराडे आदी सहभागी झाले होते. आंदोलनाला उपस्थित असणारे वरील पदाधिकारी हे मुंडे गटाचे असल्याचे सर्वच जाणतात. भाजयुमो विविध प्रकारे आंदोलन करीत शहरातील राजकारणात आपले अस्तित्व कायमच सिद्ध करीत आले आहे. पण, फादर बॉडी असलेल्या शहर कार्यकारिणीने अशा आंदोलन कार्यक्रमांना पाठबळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा 'लक्ष २०१७' म्हणविणाऱ्या भाजपची पोटनिवडणुकीसारखी परवड झाल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. आंदोलनाचे रितसर 'आमंत्रण' सर्व पदाधिकाऱ्यांना देऊन देखील ठरावीक जणांव्यतिरिक्त अन्य नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली. शहरातील गडकरी गटाच्या समर्थकांकडे सध्या अनेक पद आहेत. त्यामुळेच या आंदोलनाला या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा होती. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप अथवा अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची साधी दखल देखील घेतली नसल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांना पाणीबचतीचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना जलसंधारणाचे मार्गदर्शन करण्यासाठी 'द नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीझन' या संस्थेतर्फे वॉटर कॉन्झर्व्हेशन सेल स्थापन केला आहे. महापालिकेच्या सहभागातून सुरू केलेला या सेलमार्फत शहरातील विविध सोसायट्या, संस्था आणि कंपन्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग, दैनंदिन वापरातील पाण्याची बचत कशी करावी याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाविषयी सातत्याने जनजागृती करणारे कर्नल शशिकांत दळवी यांना या सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. 'द नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटिझन'तर्फे महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत नुकतीच या सेलची स्थापना करण्यात आली. शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसह इतर उपक्रम राबवविणे, दैनंदिन वापरातील पाण्याचे पुनर्प्रक्रिया व्यापक करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि नदीचे पुनरुज्जीवन अशा विविध मुद्द्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
मर्यादित जलसाठा आणि पाण्याच्या वाढत्या मागणी यांचा समतोल साधण्यासाठी यापुढे पाण्याचा वापरावर नियंत्रण निर्बंध आणावे लागणार आहे. सध्या महापालिकेतर्फे होत असलेला पाणीपुरवठा आणि टँकरद्वारे शहराच्या विविध भागात पुरवले जाणारे पाणी याचा ताळमेळ राहिलेला नाही. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हा सेल करणार आहे. 'वाढते शहरीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत आले आहे. यामुळे भूजलपातळी धक्कादायकरित्या खालवते आहे. हा पातळी वाढण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सर्वोत्तम पर्याय असून सोसायट्यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,' असे मत दळवी यांनी व्यक्त केले.
'या प्रकल्पामुळे दर वर्षी वाया जाणारे लाखो लीटर पाणी थेट जमिनीमध्ये साठवणे शक्य होते. प्रकल्प साकारल्यानंतर पुढच्या पावसाळ्यात लगेच थेट परिणामही दिसतात. शहरातील अनेक सोसायट्या, हॉस्पिटल, शाळांमध्ये हे प्रकल्प साकारल्यामुळे त्यांची टँकरची मागणी घटली आहे. शहरात सध्या बोअरवेलची संख्या वाढत असून त्यांच्यावर प्रशासनाचे निर्बंध नाहीत. शहरात प्रत्येक बोअरवेल खणलेल्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असणे बंधनकारक केले पाहिजे. बोअरवेल आणि प्रकल्प यांची आकडेवारी उपलब्ध झाली पाहिजे. सेलच्या माध्यमातून आम्ही अधिकाधिक सोसायट्यांपर्यंत पोहोचून त्यांना पाणी बचतीविषयी मार्गदर्शऩ करणार आहोत,' असे दळवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगासनांच्या क्लासमधून एक लाखाची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

योगासनांचा क्लास चालवणाऱ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ऑफिसमधून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार ढोले पाटील रोडवर घडला. या प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत क्लासचालकाने (वय ३४, रा. वडगावशेरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून योगेश काळंगे, माधुरी काळंगे (दोघे रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ढोले पाटील रोडवरील कपिला हॉटेलमागे विरंगुळा केंद्रामध्ये योगासनांचे क्लास चालवितात. त्याची माधुरीसोबत पूर्वीपासून ओळख आहे. या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्यामुळे माधुरीचा पती योगेश याने 'मी वकील आहे असे सांगून, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन', अशी धमकी दिली. तसेच, त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये भांडण झाले असता, योगासनांचे क्लासचालकाच्या कार्यालयातून त्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून एक लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे अधिक तपास करीत आहे.

खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा

चार वर्षांपूर्वी घेतलेले पैसे न फेडल्याने कर्जदाराची चारचाकी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खासगी सावकाराविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंडलिक गाडे (५५, रा. वाहिरा, रा.आष्टी, जि.बीड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रमेश वाडकर (रा. कामना वसाहत, कर्वेनगर) याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाडे हे मूळचे आष्टी येथील आहेत. ते चार वर्षांपूर्वी कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी येथे राहण्यास होते. त्या वेळी त्यांची व वाडकरशी ओळख झाली. पैशांची गरज असल्याने २०१२ मध्ये त्यांनी वाडकर याच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. रमेश वाडकर याच्याकडे सावकारी कर्ज देण्याचा परवाना नाही. तरीही त्याने तक्रारदार गाडे यांना २० हजार रुपयांचे कर्ज देऊन त्याचे व्याजासह ७० हजार रुपये झाल्याचे सांगून पैशांची मागणी केली. गाडे यांनी मी व्याजासह एवढे पैसे नाही देऊ शकत, असे वाडकरला सांगितल्यावर त्याने तुझी चारचाकी वापरण्यास दे असे सांगून तोंडी कराराने गाडी घेऊन गेला आहे. वाडकर याने गाडे यांच्या गाडीचा स्वतःसाठी वापर करून अपहार केला आहे. त्यामुळे गाडे यांनी वाडकरविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीने अशा प्रकारची कोणाला कर्ज देऊन फसवणूक केली असेल तर वारजे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पांडुळे हे अधिक तपास करीत आहेत.

चोरीप्रकरणी एक अटकेत

नारायण पेठेतील रायटर कार्पोरेशन या कंपनीच्या कार्यालयातून ७० लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला कोर्टाने २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.चंद्रधर केशवराव दुबे (वय ३६, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात कंपनीचे कर्मचारी अभिजीत मगर (वय ३९, रा. धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. अवैद्यनाथ पांडे आणि सुशीलकुमार जंत्री यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ ते १६ एप्रिल २०१६ या कालावधीत रायटर कार्पोरेशन या कंपनीच्या नारायण पेठेतील कार्यालयात ही घटना घडली होती. मगर हे रायटर कार्पोरेशन कंपनीचे कर्मचारी आहेत.
शहरातील वेगवेगळ्या कंपन्या, सराफी पेढ्या, मॉल आदींमध्ये दररोज जमा होणारी रक्कम गोळा करून दुसऱ्या दिवशी ती संबंधितांच्या बँक खात्यात भरण्याचे काम या कंपनीकडून केले जाते. या कंपनीच्या नारायण पेठेतील कार्यालयात एक कोटी ३२ लाख १२ हजार रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. तेथे अवैद्यनाथ पांडे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. रोकड ठेवलेल्या खोलीची किल्ली एका टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात येत असल्याचे त्याला माहित होते. रोकड ठेवलेली खोली उघडून त्यातील सत्तर लाख रुपयांची रोकड घेऊन तो पसार झाला. या कंपनीत वॉल्ट ऑफिसर म्हणून काम करणारा सुशीलकुमार जंत्री याने त्याला मदत केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयटी’साठी बारावीला हवे ७५ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इंजिनीअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण 'जेईई मेन'च्या राष्ट्रीय पातळीवरील रँकिंगसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच, आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटीसारख्या संस्थांमध्ये 'जेईई'च्या आधारे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीला किमान ७५ टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व आयआयटींचे संचालक आणि 'सीबीएसई'च्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जेईई २०१७ साठीच्या बदलांची माहिती देण्यासाठीच्या या पत्राद्वारे सूचित करण्यात आलेले बदल २०१७ पासून अमलात येणार असल्याचेही याच निमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरातील नामांकित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी जेईई परीक्षेचे मेन आणि अॅडव्हान्स्ड हे दोन टप्पे देशभरात आयोजित केले जातात. या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेच्या आयोजनांमधील बदल केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाच्या विचाराधीन होते. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली होती. या समितीने सरकारकडे सादर केलेल्या अहवालाच्या आधारे मंत्रालयाने या सूचना केल्या आहेत. या सूचनांव्यतिरिक्त 'जेईई'विषयी इतर कोणतेही बदल होणार नसल्याचेही या निमित्तानेच स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

- जेईई-मेन'चे नॅशनल रँकिंग ठरविण्यासाठी बारावीच्या गुणांना महत्त्व दिले जाणार नाही.
- आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी सारख्या केंद्र सरकारकडून निधी मिळविणाऱ्या संस्थांमध्ये 'जेईई'च्या आधारे प्रवेश मिळविण्यासाठी बारावीला किमान ७५ टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल. बोर्डाच्या यादीत पहिल्या २० टक्क्यांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनाही 'जेईई'च्या आधारे हे प्रवेश मिळू शकतील.
- अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या गुणांची अट किमान ६५ टक्के इतकी असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एसटी’चे आंदोलन दडपणार?

$
0
0


पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मान्यताप्राप्त कामगार संघटनेतर्फे मंगळवारी २६ एप्रिलला होणारे सामूहिक रजा आंदोलन दडपण्याची तयारी एसटीने केली आहे. उन्हाळ्याची सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवाशांची गर्दी आणि त्यांच्या सुविधेसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी केलेले रजेचे अर्ज रविवारी नामंजूर केले आहेत. त्यामुळे कामगार संघटनेचे प्रतिनिधी रजा आंदोलन यशस्वी होणार असल्याचे सांगत असले तरी रजा नामंजूर झाल्याने आंदोलन कितपत यशस्वी होणार, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संघटनेतर्फे २६ एप्रिलला होणाऱ्या सामूहिक रजा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या सर्व विभागाच्या महाव्यवस्थापकांची तातडीची बैठक एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी घेतली. त्याला एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल उपस्थित होते. रजा आंदोलनात सहभागी होण्यासाठी रविवार संध्याकाळपर्यंत एसटीच्या २ हजार ७५२ कर्मचाऱ्यांनी एसटीच्या प्रशासनाकडे रजेचे अर्ज केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळनिवारणार्थ द्यावेत दहा लाख

$
0
0

नागरी बँकांना राज्य सरकारची सक्ती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकारी आणि खासगी सहकारी साखर कारखान्यांनी जलसंधारण आणि मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी दहा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारने १०० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या नागरी बँका आणि बिगर शेती सहकारी संस्था यांनाही दहा लाख रुपये देण्याचे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम ​दिली, तरच साखर कारखान्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात जलसंधारणासाठी भांडवली निधीतून १५ लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी नदी, नाले, ओढे यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये मुख्यमंत्री निधीमध्ये द्यावेत; तसेच प्रत्येक कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात या कामांसाठी १५ लाख रुपये भांडवली निधीतून खर्च करण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हजर होते. या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये सहकारी आणि खासगी सहकारी साखर कारखान्यांशिवाय १०० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या नागरी बँका आणि बिगर शेती सहकारी संस्था यांनाही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाख रुपये देण्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय राज्यस्तरीय संघीय संस्थांनी दहा ते २५ लाख रुपये निधी देण्याचे राज्य सरकारने सुचवले आहे.
..
'शेतकरी देय रकमेचा संबंध नाही'
जलयुक्त शिवार आणि दुष्काळ निवारणासाठी साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात १५ लाख रुपयांची कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीत दहा लाख रुपये देणाऱ्याच कारखान्यांना ही रक्कम खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उसाची देय बिले आणि या निधीचा संबंध नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. उसाच्या बिलाच्या देय रकमेत कपात करण्यात येऊ नये, असेही आदेश सरकारने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाच्या वक्तव्याने ज्येष्ठश्रेष्ठही मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पट्टीचा वक्ता असलेल्या कन्हैया कुमारने पुण्यातील युवा पिढीसोबतच परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ- श्रेष्ठ नेत्यांनाही आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करून टाकल्याचा अनुभव रविवारी पुण्यात आला. रोहित वेमुलाला श्रद्धांजली वाहून सुरू झालेल्या कन्हैयाच्या भाषणाच्या चढत्या आलेखात आझादीच्या घोषणाबाजीने झालेला शेवट या सभेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा ठरला.
खरं तर पुण्यातील सर्वच विद्यार्थी संघटना गेल्या काही काळापासून एका चांगल्या अभ्यासू विद्यार्थी नेत्याच्या शोधात आहेत. हे नेतृत्त्व कसे असावे, याचा एक अंदाज सर्वच संघटनांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. कन्हैयाच्या भाषणासाठी झालेली विद्यार्थ्यांची गर्दी, विद्यार्थ्यांसोबतच ज्येष्ठांनीही त्याच्या मुद्द्यांना टाळ्यांच्या गजरात दिलेली दाद ही व्यासपीठावर बसलेल्या सर्वच विद्यार्थी, युवक नेत्यांसाठीही प्रेरणादायी ठरल्याची या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले.
आपल्या भाषणामधून कन्हैयाने पुणे शहराचा ऐतिहासिक परिवर्तनवादी वारसा, 'एफटीआयआय'मध्ये झालेले आंदोलन, रानडे इन्स्टिट्यूटमधील वाद यांचा संदर्भ देऊन उपस्थितांना स्वतःशी जोडून घेतले. त्यामुळेच या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी आणि युवा वर्गानेही त्याने उपस्थित केलेले मुद्दे उचलून धरले. विद्यार्थ्यांशी निगडित मुद्द्यांना हात घालताना शिक्षणाच्या व्यावसायिकरणापासून ते थकलेल्या स्कॉलरशिपच्या विषयापर्यंत सर्व टप्प्यांवर होणाऱ्या हेळसांडीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. अशाच मुद्द्यांच्या आधारे त्याने उपस्थितांच्या मनातील प्रश्नांचा थेट आढावा घेतल्याने, टाळ्या आणि जयजयकाराच्या घोषणांमध्ये कन्हैयाचे भाषण संपले. या भाषणानंतर त्याने दिलेली आझादीची हाक आणि त्याला उपस्थितांनी दिलेला प्रतिसाद बालगंधर्व सभागृह दणाणून सोडणारा ठरला.
000
नव्या पिढीच्या नेत्यासाठी ज्येष्ठांचीही गर्दी
एरवी डाव्या आणि परिवर्तनवादी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी समाजातील ज्येष्ठांचीच गर्दी झाल्याचे पुण्यात अनुभवायला मिळते. मात्र कन्हैयाकुमारच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच डाव्या आणि परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्य तरुणांनी गर्दी केल्याचे दिसून आले. महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. बाबा आढाव, आमदार जितेंद्र आव्हाड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर, कॉम्रेड भालचंद्र कांगो, स्मिता पानसरे, ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या संघटनांचे एकानेक पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित होते. या सर्वांनीच कन्हैय्याकुमारचे भाषण लक्षपूर्वक ऐकले. तसेच त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आणि प्रश्नांना मोकळेपणाने दाद दिल्याचे रविवारी सायंकाळी दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनामुळे वाढतील मंदिरातील महिलांचे लोंढे

$
0
0

सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा फक्त समानतेचा लढा होता; पण त्यामुळे मंदिरामध्ये जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील,' अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी रविवारी केली. मंदिर प्रवेशासाठी कायदा असताना त्यासाठी मुख्यमंत्र्यांना रविशंकर आणि शंकराचार्य हवेतच कशाला, असा सवालही त्यांनी केला.
बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 'बलराज साहनी पुरस्कार' तरुण रंगकर्मी ओंकार गोवर्धन यांना, तर 'कैफी आझमी पुरस्कार' प्रसिद्ध लेखक व नाटककार संजय पवार यांना श्रीमती बाळ यांच्या हस्ते देण्यात आला. अलका रमेश देशपांडे आणि अनिकेत बाळ यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. तरुण रंगकर्मी धर्मकीर्ती सुमंत आणि फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर या वेळी उपस्थित होते.
फुले-शाहू-आंबेडकर अशा मोठ्या लोकांची यादी घेऊन काहीही बोलण्याची आता पद्धत सुरू झाली आहे, अशी टीका करून बाळ म्हणाल्या, 'मंदिर प्रवेश हा फक्त समानतेचा लढा होता. मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे. तो दुबळा असून स्वत:चे संरक्षण करू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. इतकी वर्षे मंदिराचे दार का बंद होते आणि आताच का उघडले याचा विचार महिलांनी करायला हवा. स्त्रियांवर बंधने लादली जात आहेत. स्त्री ही शक्ती आणि निर्मितीचे केंद्र असल्याने ती अपवित्र ठरवली जाते.'
'देशात घडणारे प्रकार उबग आणणारे आहेत. राजकीय विचारसरणी स्वीकारणे वाईट नाही. त्यामुळे पाया मिळतो. कला क्षेत्रात राजकीय व समाजजीवनाबाबत स्पष्टता असायला हवी. पुरोगामी लोक जेवढे कामात सृजनशील दिसतात; त्या तुलनेत उजव्यांना काही मर्यादा येतात,' अशी टीका पवार यांनी केली.
..
'प्रसिद्धीसाठी कन्हैयाचा वापर'
आज जे कन्हैयाला घेऊन फिरत आहेत ते आधी कन्हैया होते, या कडे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत वरवरचे काम होत आहे. त्यातून काहींना वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत असल्याचा टोला संजय पवार यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज

$
0
0

शिवसेनेने दिल्या पालकमंत्र्यांना कानपिचक्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांनी निवडून दिल्यामुळेच पालकमंत्री झाल्याची जाणीव गिरीश बापट यांनी ठेवावी आणि पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य द्यावे, अशा शब्दांत शिवसेनेने पाणीकपातीवरून बापट यांना फटकारले आहे. पुणेकरांवर वाढीव पाणीकपात लादण्याचा निर्णय झाला तर, सर्व शिवसैनिक खडकवासला धरणाच्या दारांवर उभे राहून विरोध करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
'दौंड-इंदापूरसाठी एक टीएमसी पाणी दिलेच पाहिजे, असा आग्रह बापट यांनी धरणे म्हणजे पुणेकरांशी प्रतारणा करणे आहे,' अशी खरमरीत टीका शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण आणि शहर संघटक श्याम देशपांडे यांनी केली आहे. आजमितीस धरणांत शिल्लक असलेले सर्व पाणी पुणेकरांच्या सहकार्यामुळेच असून, ते पुणेकरांच्या हक्काचे आहे याची जाणीव पालकमंत्र्यांनी ठेवावी, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. इंदापूर आणि दौंड भागातील मोजक्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सोडण्यात यावेत; पण कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येऊ नये, असा आग्रह शिवसेनेने पालकमंत्र्यांकडे धरला आहे. तसेच, एक खासदार, आठ आमदार आणि तीन मंत्री देऊनही पुणेकरांऐवजी इतरांचे हित जोपासले जात असेल तर हा अपमान पुणेकर कदापीही सहन करणार नाहीत, असेही सुनावण्यात आले.
...............
'आजी-माजी पालकमंत्र्यांची युती'
शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पुणेकरांवरील संभाव्य पाणीकपातीला तीव्र विरोध केला आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा असल्यानेच, कालव्यातून पाणी सोडण्याचा अट्टहास केला जात असून, आजी-माजी पालकमंत्र्यांच्या भ्रष्ट युतीचा हा परिणाम आहे, अशा शब्दांत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी गिरीश बापट आणि अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना, पालकमंत्री वारंवार पुणेकरांवर अन्याय करणारे निर्णय घेत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाढीव कपातीपूर्वी पुणेकरांना उत्तरे द्या’

$
0
0

'सजग नागरिक मंच'ची पालकमंत्र्यांना मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पुणेकर आताच सुमारे ७५ टक्के पाणीकपात सहन करत आहेत. तरीही, त्यांच्यावर आणखी पाणीकपात लादण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी पुणेकरांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत,' अशी मागणी सजग नागरिक मंचने रविवारी केली. भाजपला शत-प्रतिशत पाठिंबा देणारे पुणेकर आगामी पालिका निवडणुकीत तुम्हाला घरी बसवतील, असाही इशारा देण्यात आला.
गेल्या वर्षी अत्यंत अपुरा पाऊस झाल्याचे स्पष्ट असतानाही, पाणीकपातीचा निर्णय जाहीर करण्यात पालकमंत्र्यांनीच उशीर केल्याचा आरोप मंचच्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी केला. सहा महिन्यांहून अधिक काळ एकदिवसाआड पाणीवापर करणाऱ्या पुणेकरांवर आणखी पाणीकपात लादून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.
दौंड-इंदापूरची पाण्याची गरज अवघी ०.३ टीएमसी असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले असताना, आतापर्यंत गरजेच्या चारपट पाणी सोडण्यात आले असून, त्याचा हिशेब पालकमंत्री म्हणून आपण मागितला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, कालव्यातून इंदापूर-दौंडला पाणी पोहोचेपर्यंत त्यात भरपूर गळती होते. ही गळती रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्यात, याची माहिती द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
...............
मंचने उपस्थित केलेले प्रश्न
एक टीएमसी पाण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडावे लागते. एवढे पाणी धरणात आहे का?
इंदापूरची गरज उजनीच्या अचल साठ्यातून भागवता येणार नाही का?
दौंडला रेल्वेने पाणी पुरविता येऊ शकते का?
लवासाचे पाणी पुण्यासाठी सोडण्याबाबत आपली काय भूमिका आहे?
ऑक्टोबरच्या बैठकीतच जुलैपर्यंतचे नियोजन करणे अपेक्षित होते, मग ते का फसले?
कालव्यातून होणारी पाणीगळती रोखण्याची जबाबदारी पालिकेची की पाटबंधारे विभागाची?
कालवा समितीच्या बैठकीला शहरातील सर्व आमदारांना निमंत्रण दिले होते का?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी समिती सदस्यच पुन्हा छाननी समितीत

$
0
0

राज्य सरकारला केलेल्या शिफारसींची पुनर्तपासणी करणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) सरकारला वेळेत सादर करण्याच्या दृष्टीने छाननी समिती नियुक्त करण्यात आहे. या समितीची पहिली बैठक आज, सोमवारी होणार आहे. मात्र, पालिकेकडून डीपी काढून घेतल्यानंतर सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीस समितीतीलच सर्व सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असल्याने आता त्यांनीच केलेल्या शिफारशींची छाननी पुन्हा त्यांच्याकडेच कशी काय, अशी विचारणा केली जात आहे.
शहराचा डीपी सध्या मान्यतेच्या अंतिम टप्पात असून, त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी छाननी समिती नियुक्त केली गेली आहे. या समितीने त्यांचा अंतिम अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर डीपीविषयी निर्णय घेण्यात येईल. नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली गेली असली, तरी डीपीचा विस्तृत अहवाल सादर करणाऱ्या सदस्यांनाच पुन्हा या समितीमध्येही स्थान दिले गेले आहे. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्या त्रिसदस्यीय समितीनेच डीपीचा सुधारित अहवाल सरकारला सादर केला आहे. यामध्ये, नागरी हिताची अनेक आरक्षणे उठविण्यात आल्याचे आरोप केले जात असून, त्याबाबत पुनर्विचार केला जावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर छाननी समितीमध्ये पुन्हा या तिघांचा समावेश केला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या सदस्यांनी शिफारशी केल्या, आरक्षणे कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यांनाच पुन्हा छाननी समितीमध्ये कसे घेतले गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या छाननी समितीमध्ये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (२), गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव, नगररचना संचालक; तसेच नगरविकास विभागाच्या सहसचिवांचा समावेश आहे. या छाननी समितीच्या पहिल्या बैठकीला जलसंपदा विभागाच्या सचिवांसह जलसंपदा विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
...................
अहवालापूर्वीच छाननी समिती?
त्रिसदस्यीस समितीने सादर केलेला अहवाल नगररचना विभागामार्फत सरकारला सादर केला जातो आणि त्यानंतर छाननी समितीमार्फत त्याची तपासणी केली जाते. नगररचना विभागाचा अहवाल अद्याप सरकारला सादरच करण्यात आलेला नाही, तरीही छाननी समिती कशी नियुक्त केली गेली, अशी विचारणाही केली जात आहे. येत्या आठवड्यात हा अहवाल सरकारकडे सादर केला जाण्याची शक्यता असून, त्यानंतरच छाननी समितीची बैठक घेणे अपेक्षित आहे. मात्र, तत्पूर्वीच समिती नियुक्त करून बैठक घेण्याची घाई कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कन्हैयाच्या सभेसाठी पोलिसांची मोठी गर्दी

$
0
0

नगरचे 'सनातन' कार्यकर्ते ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कन्हैया कुमारच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील सभेत गोंधळ होऊ नये, या साठी साध्या वेषातील पोलिसांसह तब्बल तीनशेहून अधिक कर्मचारी-अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात केल्याने सभास्थळाला लष्करी छावणीचे स्वरुप आले होते. दरम्यान, सभा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी नगर (पाथर्डी) येथील सनातन संस्थेच्या तीन कार्यकर्त्यांना बालगंधर्व परिसरातून ताब्यात घेतले.
कन्हैयाला हिंदुत्ववादी तसेच भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि इतर काही संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. त्याच्यावर जाहीर कार्यक्रमांमध्ये चप्पलफेकीचे प्रकार झाले आहेत. त्यातच रविवारी सकाळी विमानाने मुंबईहून पुण्याला येत असताना, विमानात कन्हैयाला धक्काबुक्की केल्याचा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कन्हैयाची पुण्यातील प्रत्येक हालचाल पूर्ण नियंत्रणात ठेवली होती. अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, पोलिस आयुक्त विशेष शाखा श्रीकांत पाठक, सारंग आवाड आणि परिमंडळ एकचे उपायुक्त तुषार दोशी यांनी बंदोबस्तावर नियंत्रण ठेवले होते. परिमंडळ एक आणि दोनमधील तसेच गुन्हेशाखेचे बहुतांश अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
मुंबईतील गोंधळामुळे कन्हैयाला कारने पुण्याला यावे लागले. पोलिसांनी त्याच्या येण्या-जाण्याचा मार्ग फारसा उघड केला नाही. तो पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत आल्यानंतर त्याचा ताबा पोलिसांनी घेतला. पायलट, एस्कॉर्ट तसेच विशेष शाखेचे पोलिस त्याच्या संरक्षणासाठी होते. त्याने देहूरोड बायपासवरील बड्या हॉटेलमध्ये दुपारी चारच्या सुमारास जेवण घेतले आ​णि पाचच्या सुमारास तो बालगंधर्वमध्ये आला. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड होते.
..
प्रवेशासाठी ओळखपत्राची सक्ती
उपायुक्त दोशी आणि पाठक यांनी संयोजकांना सभेसाठी येणाऱ्या श्रोत्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यास सांगितले होते. त्यानुसार पा​लिसांनी बालगंधर्वच्या चारही बाजूने बंदोबस्त तैनात केला आणि कोणालाही मुख्य प्रवेशद्वाराशिवाय प्रवेश करता येणार नाही, याची काळजी घेतली. ज्यांच्याकडे ओळखपत्रे होती त्यांनाच प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अनेकांना कन्हैयाचे भाषण ऐकता आले नाही.
..
गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यास...
कन्हैयाची गाडी अडवणे, त्याच्यावर दगडफेक करणे, शाई फेकणे अशा विविध कारणांनी सभेला गालबोट लावण्याची घटना घडू शकते, अशी माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. कन्हैयाच्या जाण्या-येण्याच्या मार्गापासून त्याच्या कार्यक्रमाची माहिती संदिग्ध ठेवण्यात आली. त्याला विरोध करणाऱ्या संघटनांच्या हालचाली टिपण्यात आल्या. बालगंधर्व परिसरात संशयितांना ताब्यात घेण्याचे प्रकार सुरूच होते.
..
चप्पल फेक होणार नाही...
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सभा सुरू झाल्यानंतर कन्हैयावर चप्पल फेकण्यासारखी घटना घडू नये, या साठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली. ओळखपत्राशिवाय प्रवेशच देण्यात आला नाही. शिवाय ४० हून अधिक साध्या वेषातील पोलिस रंगमंदिरात प्रेक्षकांमध्ये होते.
..
बाउन्सरना बाहेरचा रस्ता
कन्हैयाच्या सुरक्षेसाठी खास बाउन्सरची सोय करण्यात आली होती. मोठ्या संख्येने आलेल्या बाउन्सरना पोलिसांनी बालगंधर्वमधून बाहेर काढले. कन्हैयाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळच्या व्यक्ती, तसेच आयोजकांशिवाय कोणालाही त्याच्या आजूबाजूला फिरकूही दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरवरील औषधे स्वस्तात मिळणार ?

$
0
0

Yogesh.Borate
@timesgroup.com

पुणे : मानवी शरीराला अपायकारक जीवाणूंविरोधात प्रभावीपणे काम करू शकणारे नॅनो-संयुग पुणेकर शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. मॉलिब्डिनम धातूच्या नॅनो स्वरूपाच्या आधारे समोर आलेल्या या संयुगाचे गुणधर्म कॅन्सर प्रतिबंधक औषधे तयार करण्यासाठीही उपयुक्त असल्याची बाब या संशोधनातून समोर आली आहे. या संशोधनाच्या आधारे सर्वसामान्यांसाठी किफायतशीर दरात कॅन्सरप्रतिबंधक औषध उपलब्ध होणे शक्य असल्याचा दावाही या निमित्ताने करण्यात येत आहे.
कोरियातील संगक्युंकवान युनिव्हर्सिटीतील ज्येष्ठ संशोधक दिनेश अमळनेरकर आणि जुन्नर येथील श्री शिवछत्रपती कॉलेजमधील प्रा. डॉ. रवींद्र चौधरी यांच्या मूळ संकल्पनेमधून हे संशोधन करण्यात आले. श्री शिवछत्रपती कॉलेजमधील डॉ. प्रमोद माने, पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीमधील (सी-मेट) संशोधक निलम कुरेशी, डॉ. मनिश शिंदे, डॉ. भरत काळे, डॉ. सुनीत राणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. संदेश जाडकर, भारती विद्यापीठ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी या संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. बायोटेक्नोलॉजीच्या क्षेत्रात नावाजल्या जाणाऱ्या 'ट्रान्झॅक्शन्स ऑन नॅनो-बायोसायन्स' या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेनेही या संशोधनाची दखल घेतली आहे. प्रा. डॉ. चौधरी आणि डॉ. अंमळनेरकर यांनी 'मटा'ला या संशोधनाची माहिती दिली.
जुन्नर कॉलेजमध्ये गेल्या एक वर्षापासून हे संशोधन सुरू आहे. कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे चार जीवाणू आणि एका बुरशीवर या संयुगाचे परिणाम अभ्यासण्यात आले. त्यातून या संयुगामध्ये जीवाणू प्रतिबंधक, तसेच बुरशी प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे समोर आल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. डॉ. चौधरी म्हणाले, 'सध्याच्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्वत्र आढळून येणारे, तसेच प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंवर या संयुगाचे परिणाम अभ्यासण्यात आले. सध्या प्रचलित असणाऱ्या प्रतिजैविकांविरोधात प्रतिकारक्षमता निर्माण झालेल्या जीवाणूंचाही यात समावेश आहे. ऑर्गेनिक प्रकारात मोडणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत हे संयुग इनऑर्गेनिक स्वरूपात असल्याने, जीवाणू आणि बुरशीमध्ये या संयुगाविरोधात प्रतिकारक्षमता निर्माण होत नसल्याचे या अभ्यासातून दिसून आले. हे संयुग बुरशीप्रतिबंधक म्हणूनही उपयुक्त ठरल्याने त्याचा कॅन्सरवरील उपचारांसाठी उपयोग होऊ शकतो, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.'


'ट्रायलसाठी प्रयत्न'

माणसावर या नॅनोसंयुगाचा दुष्परिणाम होतो की नाही, या बाबत प्राथमिक चाचणी घेण्यात आली आहे. सध्याच्या प्रचलित कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या मात्रेपेक्षा खूप अधिक मात्रेमध्ये हे संयुग वापरूनही, त्याचे कोणतेही दुष्परिणाम समोर दिसून आलेले नाहीत. या पुढील टप्प्यात उंदरांमधील कर्करोगांच्या गाठींवर या संयुगाची चाचणी घेणार असून, शेवटच्या टप्प्यात त्याची क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- डॉ. दिनेश अमळनेरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि तिसऱ्यावेळी तिने तिळ्यांना जन्म दिला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील ससून रुग्णालयात एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे. अगदी 'सेम-टू-सेम' दिसणाऱ्या तिळ्यांचा नैसर्गिकरित्या जन्म होणे अशी घटना लाखात एकदाच घडते. मात्र विशेष बाब म्हणजे या महिलेचा आधी दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे तिळ्यांना जन्म देणारी ही महिला आणि तिळे कुतूहलाचा विषय ठरली आहेत.

रेश्मा नावाच्या महिलेला प्रसुती वेदना जाणवू लागल्याने तिला १८ एप्रिल रोजी ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रेश्माच्या प्रसुतीच्या वेळी डॉक्टरांना देखील प्रत्येक उपचार अत्यंत संयमाने आणि दक्षतेने करावा लागला आणि दुपारी ४:३० च्या सुमारास तिने तिळ्यांना जन्म दिला. अशी घटना वैद्यकीय क्षेत्रासाठी देखील अगदी कसोटीची ठरते. कारण अशी घटना लाखांमध्ये एखादेवेळीच घडते, अशी माहिती बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ मज्जारज्जूतज्ज्ञ अजय चंदनवाले यांनी दिली.

रेश्माने तीन मुलांना जन्म दिला आहे. या तिघांचे वजन १.७४० किग्रॅ, १.५८० किग्रॅ, १.६२० किग्रॅ इतके भरले आहे. तिघांपैकी एकाला जन्मजातच हृदयविकार असण्याची शक्यता असल्याने तिघांना डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे, असे स्त्री रोगतज्ज्ञ शिल्पा नाईक यांनी सांगितले.

खरे तर रेश्माची प्रसुती डॉक्टरांसाठी आव्हानच होती. रेश्माचे लग्न होऊन पाच वर्ष झाले. लग्नानंतर पहिल्या वर्षी काही नैसर्गिक घटनांमुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर दुसऱ्यावेळी गर्भाचे स्थान हलल्याने गर्भपात करावा लागला. तसेच तिला अत्यंत त्रास होत असल्याने ट्यूबही काढण्यात आली होती. त्यामुळे तिसऱ्यावेळी धोका अधिक होता. मात्र सर्व व्यवस्थित पार पडले, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाच्या सभेत आव्हाडांना स्टेजवरून उतरवलं

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला पाठिंबा देणारे आणि मुंबई-पुण्यातील सभेच्यावेळी त्याला सुरक्षा व्यवस्था पुरवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कन्हैयाने​च स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितल्याचे कळते. एका खासगी वाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे कन्हैयाचे 'चाहते' असलेले आव्हाड यांना मुंबई आणि पुण्यातील सभेत प्रेक्षकांमध्येच बसून सारा कार्यक्रम पाहावा लागला.

पंतप्रधान मोदींवर टीका करणारा कन्हैया सध्या विरोधकांसाठी आशेचा किरण वाटू लागल्याने विविध पक्षांचे अनेक नेते त्याला पाठिंबा देत आहेत. यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सर्वात पुढे आहेत. या आधी फेब्रुवारी महिन्यात कन्हैयाचे जेएनयूमधील प्रकरण समोर आले, तेव्हा आव्हाड यांनी ठाण्यात कन्हैयाने दिलेल्या 'आझादी'च्या घोषणांचे मोठे पोस्टर लावले होते. कन्हैयाचे भाषण पुण्यात वेळेत व्हावे म्हणून आव्हाडच त्याला पुण्याला घेऊन आले आणि सभा संपल्यावर विमानतळावर घेऊन गेले, अशी माहिती मिळते. कन्हैयाच्या अवती-भवती देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गराडा होता. मात्र प्रत्यक्ष सभेच्या वेळी आमदार म्हणून आव्हाड स्टेजवर जाऊ लागले, तेव्हा त्यांना अडवण्यात आले. आपले स्टेज हे तरुणांचे आहे आणि या स्टेजवर केवळ विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थीच राहतील, असे कन्हैयाने भाषणादरम्यान स्पष्ट केले. मुंबईतही आव्हाड यांना प्रेक्षकांमध्येच बसून सभा पाहावी लागली होती. त्यामुळे आव्हाडांसह साऱ्याच राजकीय नेत्यांना हा इशारा असल्याची चर्चा सुरू होती.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चासकमान’ने गाठला तळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरूनगर
चासकमान धरणातील पाण्याने तळ गाठला असून धरणात केवळ १५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील एकूण शिल्लक पाणीसाठा अंदाजे ६१ दशलक्ष घनमीटर असून यापैकी ३३ दशलक्ष घनमीटर हा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर, उर्वरित मृतसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात सुमारे २५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणात १० टक्के इतका कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा असलेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या धरणाखालील गावांना पिण्यासाठी चासकमान धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन असून, येत्या दोन दिवसांत पाणी सोडले जाणार आहे. खालील भागातील लोकांची पाण्याची गरज भागवताना पाणलोट क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याचाही विचार व्हावा, अशी मागणी केली जात आहे. बागायतदारांसाठी पाणलोट क्षेत्रातील धरणाकाठचे शेतकरी व आदिवासी बांधवांवर नेहमीच अन्याय केला जातो, अशी तीव्र भावना नागरिकांच्या मनात आहे. पाण्याबाबत या दोन्ही घटकांना गृहित धरले जात नाही. धरणाचे पाणी डोळ्यांसमोर असूनही उन्हाळ्याच्या दिवसांत पाणलोट क्षेत्रातील लोकांना कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images