Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्यात पुन्हा डाळसंकट

$
0
0

डाळ प्रतिकिलो दीडशेवर जाण्याची भीती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
डाळींची आयात केल्यानंतर तसेच, विविध पक्षांनी आपल्या डाळविक्री करूनही सहा महिन्यांतच पुन्हा राज्यापुढे डाळसंकट उभे ठाकले आहे. उत्पादन घटल्यामुळे तूर डाळीचे दर वाढू लागले असून, लवकरच किलोमागे दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या वर्षी तूर डाळीने किलोमागे दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. त्यानंतर खासगी कंपनीकडून खरेदी केलेली तूरडाळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी १०० रुपये किलो दराने विकली. आता डाळीची दीडशे रुपयांकडे वाटचाल सुरू केल्याने राज्यात पुन्हा डाळीच्या दरवाढीचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्यासह परराज्यातही तूर डाळीचे उत्पादन घटले होते. तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात दोनशे रुपये दराने तूरडाळ खरेदी करण्याची वेळ आली होती. विरोधी पक्षाने या विरोधात आवाज उठवला होता. नंतर विरोधकांच्या सूरात शिवसेनेने आपलाही सूर मिसळला. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी १०० रुपयांत किलोभर तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
अखेर ठाण्यातील बड्या व्यापाऱ्याची जप्त केलेली डाळ खरेदी करून १०० रुपये किलो दराने भाजपतर्फे पुण्यात विकण्यात आली. ब्रह्मदेशासह अन्य देशांतून तूरडाळ आयात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. डिसेंबर महिन्यात राज्यातील विविध भागातून तूरडाळ बाजारात आल्याने दर उतरले. गेल्या महिन्याभरात क्विंटलमागे तूरडाळीत १२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे घाऊक बाजारात १३८ ते १४० रुपये तर, किरकोळ बाजारात १५० रुपये किलो दराने तूरडाळ विकली जात आहे.
सध्या उपलब्ध असलेला डाळींचा साठा अल्प आहे. जूननंतर नव्याने डाळींची पेरणी होईल. त्याचे उत्पादन डिसेंबरमध्ये हाती येईल. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या तूरडाळीवर अवलंबून राहावे लागणार आहे. दर आवाक्यात राहावेत या साठी तूर डाळ आयात करण्याशिवाय पर्याय नाही. तूर डाळीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यास स्वयंपाकघरातून ती पुन्हा हद्दपार होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात नवी तूर डाळ हाती येईल. तोपर्यंत राज्यात पुरेल एवढा डाळीचा साठा उपलब्ध नाही.
.......
सध्या लातूर, बीड, बिदर, बार्शी, अकोला येथील बहुतांश डाळमिल बंद आहेत. तूर डाळीचे उत्पादन घेणाऱ्या मिलकडून साठेबाजी होण्याचा धोका ओळखून त्यांना कर्जपुरवठा करण्यास बँकांना राज्य सरकारने मनाई केली. मिल बंद झाल्याने तूर डाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
एक घाऊक विक्रेता
...
किरकोळ बाजारात आताच तूर डाळीचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यास महिन्याभरात डाळ दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडेल.
नितीन नहार, डाळीचे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंबेडकर जयंतीच्या सुटीच्या लढ्याचे स्मरण

$
0
0

कांशीराम यांचे सहकारी व लढ्याचे साक्षीदार पोपटराव आल्हाट यांनी जागवल्या आठवणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगाला शांतता, अहिंसा आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि दलित जनतेचा श्वास असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महनीय व्यक्तींच्या जयंतीला लष्कराशी संबं​धित उत्पादन विभागांमध्ये सार्वजनिक सुटी मिळत नव्हती. या दिवशी सार्वजनिक सुटी मिळण्यासाठी लढा दिला तो बहुजन समाज पक्षाचे संस्थापक दिवंगत कांशीराम, दिना भाना, डी. के. खापर्डे आणि त्यांचे पुण्यातील खास साथीदार पोपटराव आल्हाट यांनी. त्यांच्या अथक परिश्रमामुळे सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या लष्करातील या सार्वजनिक सुट्ट्यांच्या लढ्याला ५० वर्षे झाली!

तो काळ १९६५-६६चा होता. कांशीराम हे खडकीतील अॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला होते. लष्कराशी संबंधित संस्था आणि विभागांमधील कर्मचाऱ्यांना भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीला सुटी देण्यात येत होती; मात्र तत्कालीन वर्क कमिटीने या सुट्या बंद केल्या. गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्या सुरू केल्या. कमिटीच्या या निर्णयानंतर लढ्याला सुरुवात झाली.

या लढ्यात सहभागी असलेले पुण्यातील आल्हाट हे कांशीराम यांचे विश्वासू साथीदार होते. आज वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले आल्हाट त्या लढ्याविषयी म्हणाले, 'कमिटीचे सदस्य वरदाचारी आणि रौनकराम यांनी सुट्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांशीराम, कमिटीचे सदस्य दिना भाना, डी. के. खापर्डे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. मी त्यामध्ये सहभागी होतो. आंदोलनात सहभागी झालेल्यांवर कारवाई करण्यात आली. दिना भाना यांना निलंबित करण्यात आले. विभागीय चौकशी झाली. न्याय मिळण्यासाठी पुण्यातील दिवाणी कोर्टात दावा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुद्ध जयंती आणि डॉ. आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुटी मिळण्यासाठी लढा सुरू झाला. १९७१मध्ये कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला. या लढ्यात तत्कालीन संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम, तत्कालीन मंत्री आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. अॅड. बाजीराम कांबळे यांनी कोर्टात बाजू मांडली होती. त्यानंतर लष्कराशी संबंधित संस्था आणि उत्पादन विभागांमध्ये या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी लागू झाली.'

गत काळातील या आठवणी आणि कांशीराम यांचा लाभलेला सहवास याविषयी आल्हाट सांगतात, 'कांशीराम त्यावेळी लॉ कॉलेज रोड परिसरात रहात होते. या आंदोलनानंतर त्यांच्या संघटन कार्याला सुरुवात झाली. त्यांनी 'एससी, एसटी असोसिएशन'ची स्थापना केली. त्यानंतर 'एससी, एसटी फेडरेशन' करण्यात आले. पुण्यात नेहरू मेमोरियल हॉलच्या टेरेसवर उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संघटनेचे कार्यालय रास्ता पेठेतील ज्ञानेश्वर लॉज येथे होते. मी ऑफिस सेक्रेटरी म्हणून काम पहायचो. त्यातून पुढे 'बामसेफ'ची स्थापना आणि शोषित जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अग्रेसर असलेले कांशीराम यांचे कार्य जवळून पाहता आले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे भाग्यही लाभले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नशाबाज चालकांना साध्या कैदेची शिक्षा

$
0
0

'ड्रंक अँड ड्राइव्ह'प्रकरणी कोर्टाने सुनावली कैदेची शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नशेच्या अंमलाखाली पुण्यात वाहने दामटणाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागणार आहे. मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या २७ जणांना कोर्टाने बुधवारी प्रत्येकी पंधरा दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. प्रथमच कोर्टाने मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश जयदेव घुले यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी सध्या मोहीम सुरु केली आहे. गेल्या वर्षी पाच हजार आठशे जणांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. या वर्षी आतापर्यंत गेल्या तीन महिन्यांत तीन हजार जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि १८५नुसार खटले दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांमधील २७ जणांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर कोर्टाने त्यांना प्रत्येकी १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या या निकालाविरुद्ध वरिष्ठ कोर्टात दाद मागायची असल्याचे त्यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आले. त्यानंतर कोर्टाने आरोपींची प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.

मागील आठवड्यात जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात या प्रकारचे गुन्हे तडजोडीकरीता ठेवण्यात आले होते. त्यांची संख्या जास्त आणि पॅनेलची संख्या कमी असल्याने गोंधळ उडाला होता. लोकन्यायालयात तांत्रिक कारण आणि नियोजनातील अडचणींमुळे या खटल्यात तडजोड झाली नाही. त्यामुळे कारवाई झालेल्यांना पुन्हा कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ते कोर्टात हजर झाल्याचे काही वकिलांनी सांगितले. लोकन्यायालयात तीन हजार रुपये दंड भरून खटला निकाली काढला गेला होता, असेही त्यांनी नमूद केले. या गुन्ह्यात कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत कारावास ठोठावण्याची तरतूद आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षा सुनावली गेली नाही. कोर्टाकडून दंडात्मक कारवाईच केली जात होती; मात्र आता कोर्टाकडून कैदेची ​शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवड यांनी सांगितले, 'पुणे कोर्टाने मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत २७ जणांना शिक्षा सुनावली. सध्या २७ जणांना बाँडवर सोडले असून, त्यांना हजर राहण्यासाठी तारीख देण्यात आली आहे. शिक्षा झालेले खटले २०१५ व २०१६मधील असून, ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या पाच हजार ८०० जणांवर २०१५मध्ये कारवाई करण्यात आली होती. या वर्षी आतापर्यंत तीन हजार जणांवर कारवाई केली असून, पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार प्रामुख्याने हायवेवर ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील हायवेवर सायंकाळनंतर दररोज ही कारवाई सुरू असते. मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर या निर्णयामुळे वचक बसेल.'

काय शिक्षा होऊ शकते?

मद्यपान करून वाहन चालविल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास ठोठावण्याची तरतूद आहे. तसेच, कायद्यामध्ये दंडाचीही तरतूद आहे. तसेच, अशा वाहनचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द होऊ शकतो. त्याबरोबरच गाडीची नोंदणीदेखील रद्द केली जाऊ शकते. तसेच, मद्यपान करून वाहन चालविल्याची माहिती इन्शुरन्स कंपनीने पोलिसांकडून घेतल्यास विम्याची रक्कमदेखील मिळत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’चा पुण्यावर डोळा

$
0
0

मच्छिमारांच्या वेशात दहशतवादी घुसण्याची शक्यता; अलर्ट जारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'इस्लामिक स्टेट'चे (आयएस) दहशतवादी सागरी मार्गाने मच्छिमारांच्या वेशात मुंबई-पुण्यात प्रवेश करून लष्करी ​कार्यालयांमध्ये घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी लष्करी ​कार्यालयांतील सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

'आयएस' या दहशतवादी संघटनेकडून कायमच भारतविरोधी गरळ ओकण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांकडून 'आयएस' तसेच इतर दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ल्यानंतर शहरातील ​लोहगाव विमानतळ, लष्कराचे दक्षिण मुख्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि इतर लष्करी कार्यालयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे पुणे पोलिसांना बजावण्यात आले आहे.

गुप्तचर यंत्रणांनी नव्याने अलर्ट जारी केला असून, त्यात 'आयएस'चे दहशतवादी मुंबई आणि पुण्यात हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे दहशतवादी मच्छिमारांच्या वेशात दाखल होतील तसेच, त्यांच्याकडून लष्करी कार्यालयांना लक्ष्य करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाने 'आयएस'च्या हल्ल्याबाबत आलेला अलर्ट पुणे पोलिसांना दिला आहे. पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी पुणे पोलिसांना लष्करी कार्यालयांचे 'सिक्युरिटी ऑडिट' तसेच सुरक्षेबाबतचा आढावा घेण्यास सांगितले आहे. मुंबईमध्ये २६/११ च्या हल्ला सागरी मार्गे आलेल्या दहशतवाद्यांकडून झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी समुद्रातील गस्त वाढवून दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कसून प्रयत्नही सुरू केले आहेत.

सिक्युरिटी ऑडिटला विमानतळाचा नकार

लोहगाव विमानतळ हवाई दलाच्या अखत्यारित आहे. विमानतळाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) आहे. पुणे पोलिस तसेच, दहशतवाद विरोधी पथकाने लोहगाव विमानतळाचे सिक्युरिटी ऑडिट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, 'सीआयएसएफ'ने संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीशिवाय 'ऑडिट'ला नकार दिला आहे. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेविषयी पोलिसांकडे फारशी माहिती नाही. पोलिसांनी 'सीआयएसएफ'कडे वारंवार पाठपुरावा करूनही ऑडिटची परवानगी मिळालेली नाही.

पुण्यातील लष्करी तसेच अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांची नजर आहे. पोलिसांकडे येणाऱ्या प्रत्येक माहितीची खातरजमा करून त्यावर काम केले जात आहे.

रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांच्या वेदनेवर बासरीवादनातून फुंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कला काही काळ दुःख विसरायला लावते, कलेचा आविष्कार जगण्याला उभारी देतो, असे म्हटले जाते; पण कला कलेसाठी की जीवनासाठी हा प्रश्न तसा जुनाच. दुष्काळाच्या दाहक वातावरणात तर पुन्हा कला की जीवन असा प्रश्न उभा राहतोच; पण जीवनासाठी कला कशी 'सम' साधू शकते, हे बासरीच्या सुरांनी दुष्काळग्रस्तांच्या वेदनेवर फुंकर मारून सिद्ध केले आहे. ज्येष्ठ बासरीवादक सुभाष शहा यांनी बासरीवादनातून मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम सढळ हाताने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाम संस्थेच्या नावे केली आहे. बासरीवादनातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी देण्याची जाणीव जपणाऱ्या सुभाष शहा यांच्यासाठी ही कला 'लाख'मोलाची ठरली आहे. सर्वोदय सीनियर सिटिझन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुभाष शहा यांचा 'बांसुरी के बोल' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यातून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश शहा यांनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. उद्योजक विष्णू मुजुमदार आणि जयप्रकाश कोठडीया या वेळी उपस्थित होते. 'बासरी हे वाद्य शिकण्याची माझी बालपणापासूनची इच्छा होती. पण, शिक्षण आणि व्यवसाय यामुळे हे शक्य झाले नाही. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी अजूनही काम करतो. वयाच्या ६३ व्या वर्षी बासरीवादन शिकण्यास सुरुवात केली. विवेक सोनार आणि मिलिंद दाते यांच्याकडे प्राथमिक शिक्षण घेतले असून आता प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी यांच्याकडे शिक्षण घेत आहे. बासरीवादनामध्ये प्रावीण्य संपादन केले असून स्वतंत्रपणे कार्यक्रम करू शकतो, असा आत्मविश्वास मला वयाच्या ६८ व्या वर्षी आला. शास्त्रीय संगीत अवघड नाही, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा', अशी भावना शहा यांनी व्यक्त केली. 'सर्वोदय सीनियर सिटिझन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 'क्लासिकल मेड सिंपल' या भूमिकेतून 'बांसुरी के बोल' हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे केला होता. या कार्यक्रमातून मिळालेला निधी सामाजिक कामासाठी द्यायचा, हे मी आधीच ठरविले होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या दातृत्वाचा आदर्श घेऊन मी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणाऱ्या नाम फाउंडेशनला अल्पशी मदत करू शकलो, याचा आनंद वाटतो. जूनमध्ये पं. रूपक कुलकर्णी यांच्यासमवेत कार्यक्रम करणार असून त्यातून मिळणारे उत्पन्नही दुष्काळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याचा विचार आहे', असे सुभाष शहा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरावर्षीय मुलांकडून सावरकरांवरील नाटक

$
0
0

राज्यभर होणार प्रयोग म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वात्रंत्र्यवीर सावरकर म्हणजे सूर्यासारखी विचारांची प्रखरता. स्वातंत्र्यवीरांचे विचार आणि त्यांची भाषाशैली सामान्यांस समजण्यास कठीण असते, असा एक मतप्रवाह असताना अवघ्या सतरा वर्षांच्या तरूण-तरूणींनी सावरकरांचे विचारदर्शन घडविणाऱ्या दोन अंकी नाटकाची निर्मिती करून विचारांच्या प्रखरतेलाच साद घातली आहे. सावरकरांचे विचाररूपी शिवधनुष्य कॉलेजवयात पेलून या तरूणांनी इतरांना विचारांचा आदर्श घालून दिला आहे. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अकरावीत शिकणाऱ्या सुमारे ७० ते ७५ विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित 'स्वातंत्र्यवीरायन...एक असामान्य प्रवास' हे दोन अंकी नाटक साकारले आहे. येत्या १८ एप्रिलला त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत होणार आहे. एखादे नाटक रंगमंचावर उभे राहण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी चांगली कथा, संवाद, अभिनय आणि नेपथ्याची जुळणी चांगली व्हावी लागते. या नाटकांची कथा व संवाद अथर्व देशपांडे व शार्दूल अनसिंगकर यांचे आहेत. तर, ऐश्वर्या तुपे, अथर्व कर्वे, राजवर्धिनी पवार, आर्या महाजन, शिवानी सोमण आदींनी सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलली आहे. या नाटकात एकूण २५ कलाकारांचा समावेश असून, पडद्यामागील ५० कलाकारांचा समावेश आहे. मात्र, दिग्दर्शनाची जबाबदारी सुपरिचित दिग्दर्शक प्रवीण कारळे यांनी पार पाडली आहे. तसेच, अथर्व देशपांडे याने लिहिलेल्या एका गाण्याचाही नाटकात समावेश आहे. 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन' ही वयाच्या चौदाव्या वर्षी सावरकरांनी घेतलेली शपथ, तरूणपणात लंडनला गेल्यानंतर तिथे उभारलेले कार्य, त्यांना अटक झाल्यानंतरची परिस्थिती आणि स्वातंत्र्याच्या कार्यासाठी सहकाऱ्यांसोबतच्या महत्त्वाच्या भेटी याचे दर्शन या नाटकातून घडविले जाणार आहे. या नाटकात अथर्व कर्वे हा स्वातंत्र्यवीरांची भूमिका साकारणार आहे, तर ऐश्वर्या तुपे ही त्यांच्या वहिनीची भूमिका साकारणार आहे. या दोघांनी आजवर टीव्ही मालिका व सिनेमांमधून विविध भूमिका केल्या आहेत.

आमच्या वयातील मुलांना स्वातंत्र्यवीर, त्यांचे साहित्य, विचार याची फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही या नाटकाच्या माध्यमातून तरूणांपर्यंत त्यांचे विचार पोहोचविणार आहोत. पुण्यासह राज्यभरात या नाटकाचे खेळ करण्याचा प्रयत्न असणार आहे. - ऐश्वर्या तुपे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैय्याची सभा २४ एप्रिलला?

$
0
0

पुणे : राज्याच्या दौऱ्यावर असलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्याकुमार येत्या २४ एप्रिल रोजी पुण्यात सभा घेण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) कन्हैय्याच्या राज्यभरातील दौऱ्याच्या नियोजनात पुण्यासाठीही तारीख निश्चित केली आहे.
सध्या राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या कन्हैय्याकुमारच्या नागपूर भेटीदरम्यान गुरुवारी गोंधळ झाला. या गोंधळामुळे 'एआयएसएफ' कन्हैय्याच्या राज्यभरातील इतर कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतही सावध पावले उचलत आहे. दिल्लीतील विश्वसनीय सूत्रांनी मात्र, कन्हैय्याच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी २४ एप्रिल ही तारीख ठरल्याचे 'मटा'ला सांगितले. 'एआयएसएफ'ची राज्यातील कार्यकारिणी या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे.
एका कार्यक्रमाच्या आयोजनावरून फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेल्या गदारोळानंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या गटाने रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसोबत एकत्र येऊन कन्हैयाला पुणे भेटीसाठी निमंत्रण दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडफोड झाल्यास १० टक्के दरवाढ?

$
0
0

नुकसानभरपाईसाठी एसटी महामंडळाचा प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांची तोडफोड करणे, यापुढे महागात पडणार आहे. राज्यातील ज्या भागात बसगाड्यांची तोडफोड केल्या जाईल, त्या भागातील एसटी बसच्या भाड्यात १० टक्के दरवाढ करण्याचा एसटीचा प्रस्ताव आहे. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.
राजकीय पक्ष आणि संघटनांकडून केल्या जाणाऱ्या विविध आंदोलनादरम्यान एसटी बसला सर्रास लक्ष्य करण्यात येते. जमावाकडून तोडफोड झाल्याने एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होते. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीला अधिक नुकसान सोसावे लागते. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान वाढीव प्रवासी भाड्यातून भरून काढण्याचा प्रस्ताव एसटी तयार करीत आहेत, असे रावते यांनी स्पष्ट केले.
ज्या भागात बसची तोडफोड होते, केवळ त्याच भागात दरवाढ करण्यात येणार आहे. दरवाढीचा कालावधी एक महिन्यांचा असू शकतो. हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर नागरिकांच्या माहितीसाठी आणि त्यांच्या सूचनांसाठी एसटीच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.
...........
वाहकांचीही आरोग्य तपासणी
आतापर्यंत एसटी बसच्या चालकांचीच वर्षातून एकदाच मोफत आरोग्य तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे वाहकांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यापुढे वाहकांची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या सुविधेचा लाभ राज्यातील सुमारे ३६ हजार वाहकांना होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजाभाऊंनी घातला मराठी चित्रपटाचा पाया

$
0
0

सुहास जोशींची भावना; राजा परांजपे महोत्सवाचे उद् घाटन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'व्यंकटेश माडगूळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयीने चित्रपट म्हणजे काय ते रसिकांच्या गळी उतरविले. सध्या नैसर्गिक अभिनय असा आरडाओरडा केला जातो. कृत्रिमता कोणालाही पाहावत नाही, पण चित्रपटामधील कृत्रिमता घालवण्याचे काम राजाभाऊंनी केले. आजच्या श्रीमंत मराठी चित्रपटाचा पाया खऱ्या अर्थाने त्यांनीच घातला आहे,' या शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी गुरुवारी चित्रपट महर्षी राजा परांजपे यांचे मोठेपण उलगडले.
राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने सातव्या राजा परांजपे महोत्सवाचे उदघाटन जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, दिग्दर्शक अभिजित पानसे, गायक स्वप्नील बांदोडकर आणि अभिनेत्री स्मिता तांबे यांना जोशी यांच्या हस्ते 'राजा परांजपे सन्मान पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे प्रमुख अर्चना राणे व अजय राणे याप्रसंगी उपस्थित होते.
'माडगूळकर, फडके आणि परांजपे हे मराठी चित्रपट संस्कृतीमधील दत्तगुरु होत. तंत्रज्ञान हातात नसताना, त्याकाळी त्यांनी कसे चित्रपट केले असतील? लाइट्स, कॅमेरा कोणत्या दर्जाचे असतील? पण राजाभाऊंचे चित्रपट पाहाण्यासाठी भानुविलासला गर्दी होत असे. त्यांचे चित्रपट पाहातच आम्ही मोठे झालो. जगातल्या दहा दर्दी अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होईल. या त्रयीने संस्कृती घडवली व सांस्कृतिक वावरण निर्माण केले,' असे गौरवोद्गार जोशी यांनी काढले.
आज मराठी प्रेक्षक केवळ मराठीचा राहिला नसून, तो हिंदी, इंग्रजी आणि दूरचित्रवाहिनीचाही झाला आहे. मराठीकडून प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला अनुसरून चित्रपट बनतो आहे. चित्रपटांचे प्रश्न आणि कलादृष्टी बदलली आहे, पण मनोरंजन आणि प्रबोधन व्हावे हा आशावाद टिकून आहे, अशी भावना खेडेकर यांनी व्यक्त केली. पूर्वार्धात प्रसिद्ध नृत्य कलाकार व अभिनेत्री शर्वरी जमेनीस हिने नृत्यातून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उत्तरार्धात प्रवीण तरडे यांनी पाच कलावंतांची मुलाखत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जगण्याची प्रेरणा केवळ विनोदातच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जीवनात दु:ख टाळता येत नाही, या निष्कर्षापर्यंत आता मी आलो आहे. दु:ख नाहीसे करण्याची शक्ती कशातच नाही, हे मला पटलंय. दु:ख नाहीसे करता आले नाही तरी, दोन प्रकारांनी ते विसरता येते. एक म्हणजे तत्त्वज्ञान तर दुसरा विनोद.. तत्त्वज्ञान तर प्रत्येकालाच समजेल असे नाही, मात्र विनोदाचे तसे नाही. विनोद ही मानवाची नैसर्गिक गरज असून, त्यासाठी कसलीही प्रगल्भता लागत नाही. जगण्याची प्रेरणा विनोदामध्ये असून, त्याने जीवन सुखी होते...' या शब्दांत दमांनी जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडले. निमित्त होते त्यांच्या अभिष्टचिंतनाचे..!
खुमासदार शैलीतील लेखनाने, कथाकथनाने कित्येक दशके वाचकांच्या मनावर गारुड निर्माण केलेले प्रा. मिरासदार यांनी गुरुवारी ९० व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्त 'मटा'ने त्यांच्याशी संवाद साधला. या संवादात ते क्षणोक्षणी खुमासदार शैलीचीच अनुभूती देत होते.
'आयुष्यात काही मिळवलं, काही केल तर काही करायचं राहून गेलं, अशी माझी भावना आहे. अनेक कथा लिहिल्या. या प्रवासात विनोदी लेखन आवडीचा भाग राहिले. गंभीर लेखन देखील केले. मात्र विनोदी कादंबरी व विनोदी नाटक लिहायचे राहून गेले. विनोदी कादंबरी मराठीमध्ये नाही. अनेकजण म्हणत असतील की मी मराठी कादंबरी लिहिली, पण अशी कादंबरी माझ्यापर्यंत तरी आलेली नाही. पहिली मराठी कादंबरी लिहावी असा विचार होता. कथाकथनासाठी वक्तृत्वशैली व अंगी नाट्य हवे. चि.वि. जोशी माझे सर्वांत आवडते लेखक. पण त्यांच्याकडे वक्तृत्व नव्हते...' प्रा. मिरासदार सांगत होते.
'लेखनविद्या ही एकलव्यासारखी असते. त्यासाठी कोणती गुरुकिल्ली वगैरे नसते. समोर छान पुस्तक ठेवायची आणि लिहित रहायचे. चांगली पुस्तकं वाचली ही चांगले लेखन आपोआप येते,' असे त्यांनी सहजपणे सांगितले.
..
'तीन-चार तास वाचतो'
'आता फक्त वाचन करतो, कारण करण्यासारखे आता काहीच उरले नाही. तब्येतीने साथ दिली पाहिजे. आजही दिवसाला तीन ते चार तास वाचन करतो. चांगल्या इंग्रजी कादंबऱ्या मराठीत आल्या आहेत, त्या वाचून काढतो, असा एकूण दिनक्रम आहे,' असे दमा आवर्जून नमूद करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉसमॉस’बँकेवर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रोझरी एज्युकेशन ग्रुपचे विनय विवेक अरान्हा यांनी दिलेल्या खासगी तक्रारीनुसार कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष व सर्व संचालकांवर लष्कर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत बँकेने खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँकेने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
रोझरी एज्युकेशन ग्रुपने कॉसमॉस बँकेकडून ४६ कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी अन्य तारणासोबत एक शेतजमीन नॉन अॅग्रिकल्चर असल्याचे भासवून कर्ज घेतल्याचा दावा करून बँकेने अरान्हा यांच्याविरोधात पूर्वीच गुन्हा दाखल केला होता. स्थानिक कोर्टाने अरान्हा यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टातून सहा फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन मिळवला होता. या प्रकरणी अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. अमित देसाई आणि अॅड. सत्यम निंबाळकर यांनी रोझरीची बाजू मांडली. त्याचबरोबरच अरान्हा यांनी संबंधित जमीन शेतजमीन नसल्याची वस्तुस्थिती लपवली नव्हती. या प्रकरणात बँकेनेच जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याची भूमिकाही हायकोर्टात मांडण्यात आली. त्यानंतर हायकोर्टाने चौकशीचे आदेश देताना लष्कर पोलिस स्टेशनमध्ये बँकेविरोधात तक्रार देण्याचे आदेश दिले. त्यानुसार बँक व बँकेच्या तत्कालीन संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे.
..
'कॉसमॉस'ने आरोप फेटाळले
अरान्हा यांनी केलेले आरोप कॉसमॉस बँकेने फेटाळून लावले आहेत. या बाबत बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर म्हणाले, 'बँकेने हायकोर्टात बाजू मांडलेली नाही. अरान्हा यांनी बँकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे बँकेने रोझरीच्या कॅम्प येथील तारण असलेल्या शाळेचा ताबा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवले आहेत. तहसीलदारांमार्फत ताबा मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळेच अरान्हा यांनी बँकेविरोधात तथ्यहीन तक्रार दिली आहे. याबाबत बँकेतर्फे योग्य कार्यवाही केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदार ठेकेदाराला अभय

$
0
0

महापालिका अधिकाऱ्यांची मेहेरबानी; वरिष्ठांच्या आशीर्वादाने मुजोरी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जास्त दराचे टेंडर रद्द करून अनेक वर्षे लाखोंची थकबाकी असणाऱ्या पार्किंगच्या ठेकेदारांवर मेहरबानी करण्याचा पराक्रम पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने केलेल्या उपकारांकडे दुर्लक्ष करून या ठेकेदाराने पालिकेकडे अद्याप पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे. मालमत्ता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी संबंधित ठेकेदारावर असल्याने चार महिन्यांनंतरही रक्कम भरण्यात आलेली नाही.
पुणे स्टेशनसमोर महापालिकेचा कै. तुकाराम शिंदे वाहनतळ आहे. २०१०पासून या वाहनतळासाठी टेंडर प्रक्रिया राबविली जात आहे. वर्षाला १६ लाख ८० हजार रुपये आणि प्रत्येक वर्षी त्यामध्ये दहा टक्के वाढ करून तीन वर्षांसाठी हा वाहनतळ शैलेंद्र चव्हाण या ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आला होता. ठेक्याची मुदत मार्च २०१५मध्ये संपल्यानंतर या वाहनतळासाठी टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये शुभांगी एंटरप्रायझेस यांनी ७७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांचे टेंडर भरल्याने हा वाहनतळ त्यांना देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे चार महिन्यापूर्वी जानेवारी २०१६मध्ये शुभांगी एंटरप्रायझेस यांनी पैसे भरण्याची तयारीही दाखविली होती. मात्र, नवीन ठेकेदाराने पैसे भरण्याच्या एक दिवस आधी जुन्या ठेकेदाराने मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांमार्फत आयुक्तांची भेट घेऊन ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होइपर्यंत मुदतवाढ मिळण्याची विनंती केली होती. त्याला तातडीने मान्यता देऊन आयुक्तांनी नवीन टेंडर रद्द करून जुन्याच ठेकेदाराला वाहनतळ चालविण्यास देण्याची मान्यता दिली.
महापालिकेने ज्या ठेकेदाराला हे वाहनतळ चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यांच्याकडे जानेवारी २०१६ अखेर लाखो रुपयांची थकबाकी असतानाही हा ठेका त्यांनाच देण्याची शिफारस मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे. टेंडर प्रक्रियेत सर्वांत अधिक दर देणाऱ्या ठेकेदाराला डावलून पालिका प्रशासनाने जुन्याच ठेकेदाराला वाहनतळ चालविण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्याने गेल्या चार महिन्यापासून पालिकेकडे एक दमडाही भरला नसल्याचे समोर आले आहे. वाहनतळासाठी ठरवून दिलेली रक्कम तातडीने भरावी, अशी स्मरणपत्रे पाठवूनही काहीही उपयोग झालेला नाही.
..
अधिकाऱ्याची मर्जी
मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याची मर्जी या ठेकेदारावर असल्याने नवीन कोणालाही वाहनतळाचे काम मिळणार नाही, या कडे लक्ष दिले जाते. पालिकेने पैसे भरण्याची आठवण करून् देऊनही पालिका अधिकाऱ्यांची मर्जी असल्याने पत्रव्यवहाराचा उपयोग झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमली पदार्थविक्रेता नायजेरियन अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूना कॉलेजसमोर मॅफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरिअन व्यक्तीला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून २४ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहेत. खडक पोलिसांनी या पूर्वीही शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली होती.

एजे. सॅम्युअल न्युझे (वय २८, रा. ठाणे, मूळ रा. नायडेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खडक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अतुल ​भिंगारदिवे यांना मिळालेल्या माहितीनुसार न्युझेला पूना कॉलेजसमोरून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली.
पोलिसांनी न्युझेकडून ७२ हजार रुपये किमतीचे 'एमडी' जप्त केले आहे. न्युझे गेल्या वर्षी ऑगस्ट ​महिन्यात व्यावसायिक व्हिसावर भारतात आला होता. त्याच्या व्हिसाची मुदत जुलै महिन्यांत संपणार आहे. तो उच्चभ्रू वस्तीतील मुलांना गाठून त्यांना एमडीची विक्री करत होता, असे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. न्युझे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे इतर साथीदार, त्यांच्याकडील 'एमडी'चा साठा तसेच त्याच्या पाठीमागचा मुख्य सूत्रधार यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने त्याला १८ ए​​प्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, संभाजी शिर्के, फौजदार संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, सर्फराज शेख, सुरेश सोनावणे, महेंद्र पवार, अतुल भिंगारदिवे, अनिकेत बाबर, इम्रान नदाफ यांचा तपास पथकात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलदूत’साठी खर्च ३० लाखांचा

$
0
0

लातूरसाठी प्रतिदिन दोन फेऱ्या करणार; वॅगनची संख्या वाढवणार

Harsh.Dudhe@timesgroup.com

पुणे : दुष्काळग्रस्त लातूरची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी धावणाऱ्या मिरज-लातूर 'जलदूत एक्स्प्रेस'च्या एका फेरीसाठी तीन लाख रुपयांचा खर्च येत आहे. सध्या दहा वॅगनद्वारे पाच लाख लिटर पाणी लातूरला पोहोचविण्यात येत आहे. आगामी काळात 'जलदूत'च्या एका फेरीसाठी पन्नास वॅगनमधून २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक करण्यात येईल. त्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च येईल. लवकरच लातूर शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी दररोज दोन फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासेल. या माध्यमातून पन्नास लाख लिटर पाण्याची वाहतूक करण्यासाठी तीस लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

'जलदूत'च्या दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येकी ५० हजार क्षमतेचे ५० वॅगन लवकरच येणार आहेत. या खर्चामध्ये लातूरमध्ये असणाऱ्या विहिरीतून पाणी जलशुद्धीकरणासाठी उचलणे, शुद्धीकरण करणे, पाइपलाइन टाकणे आदी खर्चांचा समावेश करण्यात आलेला नाही. मिरजला पाणी भरणे आणि ते लातूरपर्यंत वाहून नेणे यासाठी सध्या तीन लाख रुपयांचा बोजा रेल्वेवर पडत आहे. भविष्यात प्रतिदिन दोन फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी वाहून नेण्यासाठी ३० लाखांचा खर्च येणार आहे. तीस लाखांच्या या खर्चात जलदूतच्या फेरीची स्वतंत्र व्यवस्था, रेल्वेचे कर्मचारी, चालक, गार्ड, डिझेल, फेरी पूर्ण करण्याच्या खर्चाचा समावेश आहे.

लातूर आणि परिसरातील सध्याची दुष्काळाची परिस्थिती पाहता 'जलदूत एक्स्प्रेस' आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ एक्स्प्रेसच्या प्रतिदिन दोन फेऱ्या दुष्काळाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईपर्यंत म्हणजेच आणखी दोन ते तीन महिने 'जलदूत एक्स्प्रेस' नियमित धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 'जलदूत' पूर्ण क्षमतेने पाणी वाहून नेण्यासाठी सज्ज आहे. मात्र, राज्य सरकारची त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील सोसायट्यांची मेळघाटाशी ‘मैत्री’

$
0
0

रद्दी विकून कुपोषितांच्या उपचारांसाठी १८ लाख रुपयांची मदत

Prasad.Panse@timesgroup.com

पुणे : शहरातील काही सोसायट्यांमधील रद्दी मेळघाटातील बालकांचे कुपोषण आणि बालमृत्यूपासून संरक्षण करत आहे. 'मैत्री' या नागरिकांच्या गटातर्फे 'रद्दीतून सद्दी' या उपक्रमांतर्गत विविध सोसायट्यांमधून गेल्या नऊ वर्षांत रद्दीच्या विक्रीतून एकूण साडेअठरा लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. मेळघाटातील बालकांचा कुपोषणापासून बचाव व्हावा आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हा निधी वापरण्यात येत आहे.

गेल्या नऊ वर्षांत रद्दीच्या विक्रीतून एकूण १८ लाख ६२ हजार ३०८ रुपये 'मैत्री'कडे जमा झाले आहेत. कोथरूडमधील राहुल टॉवर्स या मोठ्या सोसायटीतून २००७पासून आतापर्यंत सहा लाख २३ हजार ६१५ रुपये, तर स्प्रिंगफिल्ड्स सोसायटीमधून २०११पासून आतापर्यंत ७९ हजार १८२ रुपये जमा झाले आहेत. सिंहगड रस्त्यावरील प्रज्ञानगड, औदुंबर, शुक्रतारा, त्रिमूर्ती-ब्रह्मा आणि पौड रस्त्यावरील पिनाक सदिच्छा, शिल्पा सोसायटी, राहुल टॉवर्स, स्प्रिंगफिल्ड्स, वुडलॅँड सोसायटी या उपक्रमात सहभागी असून, मधुकोष ही सोसायटी या उपक्रमात नव्याने सहभागी झाली आहे. प्रत्येक सोसायटीतून किती निधी 'मैत्री'कडे जमा झाला आणि त्याचा विनियोग कुठल्या उपक्रमासाठी केला याचा एक अहवालही दर सहा महिन्यांनी सोसायटीकडे दिला जातो.

''मैत्री' हा नागरिकांचा गट १९९७पासून सातत्याने मेळघाटातील २८ दुर्गम गावांत कुपोषण, बालमृत्यू आदी मुद्द्यांशी संबंधित काम करत आहे. आरोग्य शिबिर, स्वच्छता, व्यवसाय शिक्षण, शालेय शिक्षण आदी उपक्रम या गटातर्फे राबवण्यात येतात. मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी भागांत प्रत्यक्ष काम करणे प्रत्येकालाच शक्य नाही. परंतु घरात अडगळ होणारी रद्दी सामाजिक कामासाठी देणे अजिबात अवघड नाही. आधी आमचे काम समजून घ्या आणि मगच या उपक्रमात सहभागी व्हा, असा आमचा आग्रह असतो. सगळ्यांसोबत मैत्रीच्या नात्याने जोडले जाण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते,' असे 'मैत्री'चे स्वयंसेवक सांगतात. गुरुदत्त रद्दी डेपो, तुळजाभवानी रद्दी डेपो, यादव रद्दी डेपो यांनी आजवर रद्दी नेण्यासाठीचा वाहन खर्च न घेता त्यांचीही देणगी जमा केली आहे.

असा आहे उपक्रम

सोसायटीचे अध्यक्ष-सचिव यांच्या परवानगीने 'मैत्री'शी ओळख असलेला प्रतिनिधी आणि स्वयंसेवकाच्या मदतीने रद्दीतून सद्दी हा उपक्रम राबवला जातो. त्यानंतर रद्दी नेण्यासाठी विशिष्ट रविवार ठरवला जातो. एक आठवडा आधी इमारतीच्या सूचनाफलकावर तशी सूचना लावण्यात येते. इच्छुक सभासद आपापल्या घरातील रद्दी एकत्र करतात. सोसायटीतील सभासदांनी इमारतीच्या तळमजल्यावर बांधून आणून ठेवलेली रद्दी रविवारी स्वयंसेवक टेम्पोतून रद्दी डेपोत घेऊन जातात. त्या रद्दीची विक्री करून आलेली रक्कम 'मैत्री'कडे सोपवली जाते. त्या रकमेची पावती सोसायटीच्या नावाने केली जाते.

रद्दीतून सद्दी या साध्या उपक्रमातून आम्हालाही मेळघाटातील बालकांसाठीच्या उपक्रमात सहभागी होता येते. आमच्या सोसायटीतून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इतरांनीही याचे अनुकरण करावे.

- दिनेश वैद्य, राहुल टॉवर्स, कोथरूड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात ३८ पोलिसांची पिस्तुले ‘शोभेची’

$
0
0

शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घेण्याचा आदेश

Prashant.Aher@timesgroup.com

पुणे : पुण्यातील ३८ पोलिस अधिकाऱ्यांची पिस्तुले 'शोभेची'च उरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे अधिकारी आपल्या कमरेला नादुरुस्त पिस्तूल लटकवून फिरत आहेत. या पिस्तुलांची दुरुस्ती त्यांनी शक्य तितक्या लवकर करून घेण्यासाठी आदेश काढावा लागला आहे.

नवनियुक्त पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला मे महिन्यात शस्त्र निरीक्षण विभागाच्या तज्ज्ञ व्यक्तींसमवेत आयुधिक कार्यशाळा आणि शस्त्रागाराची तपासणी करणार आहेत. पोलिस आयुक्तांकडूनच तपासणी होणार असल्याने आयुधिक कार्यशाळेने आपल्या विभागाची झाडाझडती सुरू केली आहे. या दरम्यान ३८ पोलिस अधिकाऱ्यांची पिस्तुले नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. पुढील आठवड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आपापले पिस्तूल, रिव्हॉल्व्हर दुरुस्त करून घेण्याच्या 'सक्त' सूचना मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिल्या आहेत.

पुण्यासारख्या शहरात पिस्तुलाचा वापर करण्याची शक्यतो वेळच येत नसल्याने, नादुरुस्त हत्यारे घेऊन फिरण्यास कोणाला गैर वाटत नाही; मात्र मुंबईत झालेल्या '२६/११'च्या हल्ल्यासारख्या दहशतवादी घटनेस तोंड देण्याची वेळ आलीच, तर तेव्हा हे अधिकारी काय करतील, असा सवाल केला जात आहे.

वडाची वाडी येथे पुणे पोलिसांची फायरिंग रेंज आहे. दर वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये या रेंजवर पोलिस अधिकारी गोळीबाराचा सराव करतात. या सरावासाठी त्यांना आपल्याकडील पिस्तुलांचा वापर करावा लागतो. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या सरावादरम्यान पुण्यातील ३८ पोलिस अधिकाऱ्यांचे ​पिस्तुल नादुरुस्त असल्याचे लक्षात आले होते. नवनियुक्त पोलिस आयुक्त शुक्ला यांनी शस्त्र विभागाचा वार्षिक तपासणी कार्यक्रम हाती घेतल्यानंतर मात्र नादुरुस्त हत्यारांची दुरुस्ती युद्धपातळीवर होणार आहे.

साफसफाई राहून गेली

बहुतेक पोलिस अधिकाऱ्यांना नऊ एमएमची ऑटोमेटिक पिस्तुले देण्यात आली आहेत, तर काही अधिकाऱ्यांकडे ग्लॉक, पी. रि. टिटान रिव्हॉल्व्हर, पी. रि. स्टर्म, पी. रि. एस अँड डब्ल्यू या बनावटीची पिस्तुले, रिव्हॉल्व्हर आहेत. वडाची वाडी येथे गोळीबाराचा सराव केल्यानंतर या हत्यारांची साफसफाई करून घेणे आवश्यक असते. अनेक अधिकारी हत्यारांची साफसफाई न करता निघून गेले आहेत. सरावादरम्यान काही अधिकाऱ्यांच्या पिस्तुलांमध्ये कावट/शस्त्राच्या बॅरलमध्ये गंज आल्याने ती नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. पोलिस मुख्यालयात असलेल्या आयुधिक कार्यशाळेत ही हत्यारे दुरुस्त करणे आवश्यक आहे. संबंधितांना वारंवार सूचना केल्यानंतरही त्यांनी ती दुरुस्त केलेली नाहीत.

ते अधिकारी कोण?

पोलिस निरीक्षक : सात

सहायक निरीक्षक : १०

फौजदार : २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरी महोत्सवाचे रविवारी आयोजन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, येरवडा शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खराडी भागात नोकरी महोत्सवाचे आयोजन येत्या रविवारी, १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यामुळे वडगाव शेरी मतदार संघातील गरजू बेरोजगार तरुणांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. पुणे शहर शिवसेना संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते खराडी गावात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. वडगाव शेरी मतदारसंघाचे विभागप्रमुख राजाभाऊ चौधरी यांनी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले असून, महोत्सवात अनेक नामवंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँका सहभागी होणार आहे. येत्या रविवारी खराडी गावातील पठारे स्टेडियममध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पाचवी ते बारावी पास /नापास, पदवीधर, पदव्युतर, डिप्लोमा, आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या आणि अनुभवी तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. नोंदणीनंतर तरुणांना मोफत प्रशिक्षण तसेच पात्र उमेदवारांना तत्काळ ऑफर लेटर देणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक सर्किटमुळे प्लास्टिक कंपनीला आग

$
0
0





म. टा. वृत्तसेवा, जुन्नर जुन्नर तालुक्यातील साठ लघुउद्योगांसाठी उभारलेल्या कांदळी औद्योगिक वसाहतीतील ओंकार प्लास्टीक इंडस्ट्रीज या प्लास्टीक ताडपत्र्या बनविणाऱ्या कंपनीला शुक्रवारी आग लागली. जुन्नर येथील अग्निशामक दल तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या पाण्याच्या टॅँकरच्या साहाय्याने पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत कंपनीचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विलास सखाराम बोऱ्हाडे यांच्या मालकीची ही कंपनी असून, त्यांनी ती दहा वर्षांपूर्वी सुरू केली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ च्या सुमारास ही आग लागली. त्या वेळी सात कामगार काम करत होते. शेडमध्ये लागलेल्या आगीची घटना कळताच कामगार बाहेर पळाले. दरम्यान, आगीने रौद्र रूप धारण केले. त्याचवेळी वसाहतीतील अन्य कामगारांनी आग विझविण्यास प्रारंभ केला. तसेच, तातडीने जुन्नर नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागविण्यात आला. स्थानिक ठिकाणांहून आलेले टॅँकर तसेच आगीच्या बंबाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आली. या घटनेत कंपनीतील मशिनरी, इमारत तसेच साहित्यासह मोठे नुकसान झाले. घटनास्थळी नारायणगावचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, औद्योगिक वसाहतीचे संचालक अमित बेनके, सचिव तुषार पडवळ तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरल्याप्रकरणी एकाला अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे-बारामती शटलने प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा मोबाइल चोरल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी प्रसाद सुहास भंडारी (वय २०, रा. लोणीकाळभोर ) याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी तुळशीदास युवराज गवळी (२६, रा. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुणे बारामती शटलमध्ये दहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी हे पुणे-बारामती शटलने हडपसर ते केडगाव असा प्रवास करत होते. लोणी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे सुरू झाल्यानंतर काही अंतरावर आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हातावर फटका मारून मोबाइल पाडला. फिर्यादी हे रेल्वेतून पडून जखमी झाले. फिर्यादीने आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र, त्याचा मोबाइल आरोपीचा साथीदार घेऊन पळून गेला. आरोपी भंडारीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. अधिक तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयत्याच्या धाकाने लुटमार करणाऱ्या एकाला अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे पुरंदर तालुक्यातील सिद्धनाथवाडी येथे गेल्या महिन्यांत कोयत्याच्या धाकाने लुटमार करणाऱ्या चौघांपैकी एका आरोपीला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (एलसीबी) यश आले. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. सिद्धनाथवाडी येथील राजू तोरवे यांच्या घराच्या बाजूच्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून, कोयत्याच्या धाकाने सोन्याचे दागिने, मोबाइल बळजबरीने चोरले होते. या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने या लुटमारप्रकरणी सुरेश उर्फ गणेश उर्फ विवेक झेमाजी उर्फ झम्या शिंदे (वय १९, रा. सासवड, झणझणे) याला अटक केली आहे. झम्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने तोवरे यांच्या घरात लुटमार केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. या टोळीने जिल्ह्यांत अन्य गुन्हे केल्याची शक्यता आहे. तसेच, झम्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा तपास जेजुरी पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images