Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘अन्नदात्याला जगवणे हीच खरी देशभक्ती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारत माता की जय, वंदे मातरम, जयहिंद केवळ या घोषणा देणे म्हणजे, राष्ट्रवाद किंवा देशभक्ती नाही. घोषणा जरुर द्या. पण, दुष्काळी भागात जाऊन तेथील लोकांची सेवाही करा. दुष्काळामुळे संपूर्ण देशाचा अन्नदाता शेतकरी संकटात सापडला आहे. अन्नदात्याला जगवणे हा खरा राष्ट्रवाद असून, हीच खरी देशभक्ती आहे,' असे मत ज्येष्ठ राजकीय व सामाजिक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादव यांचे 'महाराष्ट्रातील दुष्काळ' या विषयावर व्याख्यान आयोजिण्यात आले होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस योगिराज प्रभुणे उपस्थित होते. या वेळी 'कविवर्य भालचंद्र खांडेकर स्मृती उत्कृष्ट मुद्रितशोधक पुरस्कार' यादव यांच्या हस्ते पुरुषोत्तम काळे यांना प्रदान करण्यात आला.

'गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवाद व देशभक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत माता की जय, वंद मातरम किंवा जयहिंद म्हणणारेच देशभक्त आहेत, असे नाही. केवळ या घोषणा देऊन स्वतःवर राष्ट्रवादाचा शिक्का मारून घेणाऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागात जावे. तेथील शेतकऱ्यांसाठी काम करावे. हे राष्ट्रवादी गोहत्यांविरोधात लढतात. मात्र, दुष्काळामुळे जनावरांवर मृत्यूचे सावट आहे, त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही,' अशी खंतही यादव यांनी व्यक्त केली. मराठवाडा दुष्काळात होरपळला असताना देखील तेथील शेतकरी उसाचे पीक घेतात. जास्त पाणी लागणारी पिके या काळात घेणे योग्य नाही. तसेच, साखर कारखान्यांचा गाळप हंगामही उशिरा सुरू करावा आणि मद्यनिर्मिती उद्योग काही महिने बंद ठेवावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली असल्याचे यादव यांनी सांगितले.

'राज्यात मनरेगा अपयशी'

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबविण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याची टीका यादव यांनी केली.राज्यातील २१ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहा हजार ३५२ गावांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत एकही काम करण्यात आलेले नाही. तसेच, पुणे जिल्ह्यातील एक हजार ४०४ ग्रामपंचायतींपैकी ९५४ ग्रामपंचायतीत एकही काम करण्यात आले नाही. सरकार या योजनेसाठी निधी देत नाही, असे यादव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांचा विषय आता थांबवा

$
0
0

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे सर्वपक्षीयांना आवाहन; मानले आभार म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिका आयुक्तांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत आपण योग्य ठिकाणी दाद मागितली असून, आता त्याबाबत चर्चा नको, असा पवित्रा घेऊन राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी सोमवारी विषयावर पडदा टाकल्याचे स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणी सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी संस्था आणि पुणेकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले. शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ई-मेलमध्ये चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावरून, आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. तसेच, विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले होते. आयुक्तांना समज देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तरीही, 'आयुक्त हटाव' मोहिमेद्वारे मुख्यमंत्र्‍यांकडे तक्रार करण्याची तयारी राष्ट्रवादीतर्फे सुरू असतानाच, चव्हाण यांनी या विषयावरील चर्चेला पूर्णविराम देण्याचे आवाहन केले. 'आयुक्तांनी पाठविलेले पत्र राज्यशिष्टाचाराचे उल्लंघन करणारे असून, त्याबाबत योग्य ठिकाणी दाद मागितली आहे. पुणेकरांसह सर्वपक्षीय नेते आणि संस्था-संघटनांनी माझ्या बाजूने उभे राहून आयुक्तांच्या विधानाचा निषेध केला. या भावना मी कधीच विसरू शकणार नाही', अशा शब्दांत श्रीमती चव्हाण यांनी निवेदन प्रसिद्धीला दिले. कुमार यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबतची चर्चा आता थांबवा, असेच त्यांनी या निवेदनाद्वारे सूचित केले आहे. शहराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची वेळ आली असून, आता त्यासाठी पाठपुरावा करायला हवा, असेही चव्हाण म्हणाल्या. तसेच, शहराला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर अधिक काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. ................ पक्षातील फुटीमुळे चर्चा थांबवली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या आयुक्तांविरोधात 'आयुक्त हटाव' मोहीम पक्षातर्फे हाती घेण्यात येणार होती. त्यासाठी, पक्षातील सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आयुक्तांना परत बोलवा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले जाणार होते. परंतु, पक्षातील अनेक नगरसेवकांनी या पत्रावर सह्या करण्यास नकार दिला. वरिष्ठांनी सांगितले, तरच सह्या करू, असा पवित्रा काही ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे, पक्षामध्येच दोन गट पडल्याचे चित्र दिसून आल्याने त्याबाबत अधिक वाच्यता होऊ नये, यासाठी याबाबतची चर्चा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरप्रवेशाचा लढा ‘अंनिस’ही लढणार

$
0
0


धार्मिक स्थळांमध्ये महिलांच्या मुक्तप्रवेशाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धर्मांतील अंधश्रद्धेविरूद्ध पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त काळ लढा देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता पुन्हा महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी लढा देण्याचे ठरवले आहे. 'महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून देणे, हा त्यांना धर्मश्रद्धेकडे नेण्याचा प्रकार अथवा वैचारिक गोंधळ नसून समतेचा लढा आहे. शनिशिंगणापूर येथील प्रवेशानंतर सर्व धर्मातील प्रार्थना स्थळांवर महिलांना प्रवेश मिळायला हवा. अंनिस त्यासाठी लढा देणार आहे,' अशी माहिती अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी सोमवारी दिली.

'घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला उपासनेचा अधिकार आहे. सर्व धर्मांतील महिलांना उपासनेचा अधिकार मिळावा, अशी समितीची भूमिका आहे. मागणीसाठी समितीने मुंबई हायकोर्टात २०००मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या मुद्द्यावर समिती १५ वर्षांपासून लढत आहे. शनिशिंगणापूर येथे महिलांना प्रवेश मिळणे हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लढ्याचा विजय आहे,' याकडे लक्ष वेधून 'हा समतेचा आणि संविधानिक मूल्यांचा लढा आहे. अधिकार मिळाल्यानंतर प्रार्थनास्थळांमध्ये जायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,' असे डॉ. दाभोलकर यांनी स्पष्ट केले.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी तसेच, साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनाशी जुळणारी ही भूमिका आहे,' असेही डॉ. दाभोलकर म्हणाले. मुंबईतील हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, या साठी केलेली याचिका प्रलंबित आहे. अंनिस महिलांबरोबर असून, आगामी लढ्याची दिशा ठरवण्यासाठी १ मे रोजी अहमदनगर येथे परिषद होणार असल्याचेही डॉ. दाभोलकर म्हणाले.

..

अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन सांगली येथे १४ आणि १५ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.

मिलिंद देशमुख, मुख्य सचिव, अंनिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मरावे परी पेंढारुपी उरावे..

$
0
0

पक्षिप्रेमींसाठी मृत माळढोकवर टॅक्सीडर्मी प्रक्रिया; महिनाअखेरीस पुण्यात येणार म. टा. प्रतिनिधी, पुणे देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाने प्रथमच पेंढा भरलेला (टॅक्सीडर्मी) माळढोक तयार केला आहे. वन्यजीव जतन केंद्रातील डॉ. संतोष गायकवाड यांनी हा माळढोक तयार केला असून, महिनाअखेरीस हा पक्षी पुण्यात हजेरी लावणार आहे. नान्नज अभयारण्यातील निसर्ग परिचय केंद्रामध्ये या पक्ष्याला ठेवण्यात येणार आहे. 'वन विभागाच्या नियमानुसार जंगलामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या वन्यप्राण्याला वनाधिकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जाळून नष्ट करतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वनाधिकाऱ्यांना अल्फा नामक हा माळढोक पक्षी मृतावस्थेत आढळला. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या पक्ष्याला जाळण्याऐवजी त्यात पेंढा भरून ठेवल्यास अभयारण्यात फिरायला येणाऱ्या निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष माळढोक बघण्याची संधी मिळेल. या उद्देशाने आम्ही त्याला डॉ. गायकवाड यांच्याकडे सोपवले,' असे पुणे वन विभागाचे मुख्यवनसरंक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी सांगितले. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये देशातील एकमेव वन्यजीव जतन केंद्र आहे. या केंद्राची धुरा सांभाळणारे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संतोष गायकवाड यांनी मृतावस्थेतील अनेक दुर्मिळ वन्यप्राण्यांवर शास्त्रीय पद्धतीने 'टॅक्सीडर्मी' ही प्रक्रिया केली आहे. 'अल्फा'च्या प्रतिकृतीवरही त्यांनी नुकताच शेवटचा हात फिरवला. 'अल्फा' या मृत माळढोक पक्ष्याला महिना अखेरीस पुण्यातील वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात येईल. त्यानंतर सोलापूरमधील नान्नज माळढोक अभयारण्यातील निसर्ग परिचय केंद्रामध्ये त्याला ठेवण्यात येईल. या केंद्रात पर्यटनासाठी येणाऱ्यांना माळढोकची चित्रे, रेखाटने आणि आकडेवारी समजावून सांगण्यात येते. आता अल्फा माळढोक त्यांच्यांसाठी नक्कीच आकर्षण ठरेल, असे लिमये म्हणाले. .. कशी करतात टॅक्सीडर्मी? टॅक्सीडर्मीसाठी वन्यप्राण्यांचे मोजमाप घेऊन शास्त्रीय पद्धतीने कातडी काढली जाते. जतनासाठी आवश्यक रसायनांचा वापर करून त्या प्राण्याचा अथवा पक्ष्याचा साचा तयार करतात. यामध्ये अचूकतेला खूप महत्त्व असते. .............. माळढोकमध्ये पेंढा भरण्यासाठी मला तीन आठवडे लागले. तो अत्यंत दुर्मीळ पक्षी असल्याने त्याच्यावर टॅक्सीडर्मी करणे, माझ्यासाठी आव्हानात्मक होते. हा पक्षी मुळातच अत्यंत देखणा आहे. डॉ. संतोष गायकवाड .. 'अल्फा सगळ्यांचा लाडका' अल्फा माळढोक पक्षी नान्नजमध्ये जवळपास दहा वर्षे वास्तव्यास होता. खास माळढोक पाहण्यासाठी येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना त्याने दर्शन दिले होते. एवढेच नव्हे तर, वन्यजीव छायाचित्रकारांनी या अभयारण्यात सर्वाधिक फोटोही अल्फाचेच काढले. मृतावस्थेत सापडल्यानंतर जाळण्याऐवजी जतन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लिमये म्हणाले. ............... 'शेकरूही पुण्यातच' डॉ. गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी पेंढा भरलेले शेकरूही तयार केले होते. सध्या ते वन विभागाच्या कार्यालयात ठेवले आहे. भीमाशंकर अभयारण्यामध्ये सध्या निसर्ग परिचय केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या केंद्रामध्ये या शेकरूला पर्यटकांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'डाव्या, उजव्यांचा राष्ट्रवाद इम्पोर्टेड'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'डाव्या आणि उजव्या संघटनांना राष्ट्रवादाशी काहीही देणेघेणे नाही. या दोन्ही संघटनांनी युरोपातून राष्ट्रवाद आयात केला असून, त्याचा आपापल्यापरीने वापर आरंभला आहे. खरा राष्ट्रवाद देशामध्ये एकात्मता निर्माण करणारा आहे,' असे मत ज्येष्ठ सामाजिक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सोमवारी व्यक्त केले.

डॉ. यशवंत सुमंत स्मृती व्याख्यानात 'राष्ट्रवाद : नवीन संदर्भ, नवीन कसोट्या' या विषयी यादव यांनी विचारप्रदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. राजा दीक्षित, किशोर बेडकिहाळ, संजीव साने आदी उपस्थित होते. यादव म्हणाले,की 'देशात स्वातंत्र्यापू्र्वी खरा राष्ट्रवाद होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादात बदल होत गेला. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादावर जी चर्चा सुरू आहे, त्यामुळे सर्वांना राष्ट्रवादाचा नव्याने विचार करण्याची प्रेरणा मिळाली. मात्र, डाव्या आणि उजव्या संघटनांचा राष्ट्रवाद युरोपातून आयात केलेला असून, हवा त्या पद्धतीने त्याचा वापर करणे सुरू आहे. युरोप आणि भारताच्या राष्ट्रवादात मोठ्या प्रमाणात भाषा, संस्कृती, इतिहास यांच्यात तफावत आहे. तेथील राष्ट्रवाद नकारात्मक गोष्टींपासून प्रेरीत आहे. याउलट भारताचा राष्ट्रवाद हा एकात्मता निर्माण करणारा आहे. त्यामुळे युरोपाचा राष्ट्रवाद भारतात यशस्वी होणार नाही.'

'सध्या, देशाची परिस्थिती जगाच्या व्यासपीठावर अत्यंत बिकट असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणीच ऐकत नाही. मोदी केवळ अमेरिका आणि जर्मनी या देशांचे लांगुलचालन करतात,' असेही यादव म्हणाले. डॉ. दीक्षित यांनी डॉ. यशवंत सुमंत यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोरपडी उड्डाणपूलास संरक्षण खात्याची मंजुरी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे घोरपडीतील पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या पुणे महापालिकेच्या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण खात्याने अखेर हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे संरक्षण खात्याची ही जमीन प्रति चौरस मीटर एक रुपये वार्षिक दराने महापालिकेला उपलब्ध होणार आहे. पालिकेची ही जमीन ३० वर्षांसाठी उपलब्ध होणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. घोरपडी येथे रेल्वेमार्गावर उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल संरक्षण खात्याच्या जमिनीवर उभारला जाईल. अर्थात त्यामुळे जमिनीची मालकी ही संरक्षण खात्याकडे राहील. त्याशिवाय जागेचे व्यवस्थापन पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडे राहणार आहे. त्याशिवाय जमिनीवरील विस्थापितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही पुणे महापालिकेवर राहील, असे या संदर्भात झालेल्या करारात स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात सर्व अधिकृत कागदपत्रे संरक्षण खात्याकडून महापालिकेला पाठविण्यात आली आहेत. या उड्डाणपुलासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी प्रयत्न केल होते. मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलास यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. रेल्वे उड्डाणपुलाची बांधणी, सर्व्हिस रस्ते, त्याचे व्यवस्थापन यांचीही जबाबदारी पालिकेकडे राहणार आहे. तसेच, लोहगाव विमानतळ रस्त्यावरील संरक्षण खात्याच्या जागेवरील रस्त्याचे रुंदीकरण सुरू करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने पुणे महापालिकेला पत्र दिले आहे, अशी माहिती खासदार शिरोळे यांनी दिली. पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील एलबीटी रद्द केल्याने राज्य सरकारने बोर्डाला भरपाईची देण्याच्या रकमेसंदर्भात संरक्षण खात्याने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळविले आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारीचा असाही झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या माहिती आयुक्तांकडे ऑनलाइन तक्रार सादर झाली आणि गेल्या तीन महिन्यांच्या दुर्लक्षानंतर टोल कंत्राटे आणि मासिक उत्पन्नाची माहिती एका तासाभरातच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वेबसाइटवर झळकली. माहिती आयुक्तांनी तक्रारीची दखल घेण्यापूर्वीच मंगळवारी हा प्रकार घडला. गेल्या वर्षी पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर दरडी कोसळून अपघात आणि वाहतूक कोंडीचे अनेक प्रकार घडले होते. त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आणि सरकारी टोलवाटोलवीमुळे पुण्यातील सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहिती आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सर्व टोल प्रकल्पांची कंत्राटे आणि दरमहा टोलच्या उत्पन्नाची माहिती स्वतःहून वेबसाइटवर जाहीर करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले होते. डिसेंबरपर्यंत दरमहा ही माहिती जाहीर करण्यात येत होती. मात्र, जानेवारीपासून तीन महिने ही माहिती जाहीर करण्यात आली नाही. याबाबत वेलणकर यांनी मंगळवारी पुन्हा माहिती आयुक्तांकडे ऑनलाइन तक्रार केली. ही माहिती जाहीर न केल्याने माहिती अधिकार कायद्याच्या कलम १८चे आणि केंद्र सरकारच्या परिपत्रकाचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे ही माहिती नियमित सादर करण्याचे आदेश द्यावेत, असे या तक्रारीत म्हटले होते. ही तक्रार केल्यावर आयुक्तांनी दखल घेण्यापूर्वीच चक्रे फिरली आणि एका तासाच पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेच्या टोलच्या उत्पन्नाची आकडेवारी एमएसआरडीसीच्या वेबसाइटवर झळकू लागली. तीन महिन्यांची संपूर्ण माहिती एका तासातच उपलब्ध होत असेल, तर कायद्यातील तरतुदींनुसार ही माहिती नियमितपणे दरमहा सादर करण्यात काय अडचण आहे, असा सवाल वेलणकर यांनी विचारला आहे. दरम्यान, एक्स्प्रेस वे आणि पुणे-मुंबई जुना हाय वे वगळता राज्यातील अन्य प्रकल्पांबाबत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये टोल कंत्राटातील अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याचे या आकडेवारीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. यंदा संपूर्ण वर्षभरात एक्स्प्रेसवेवर २७१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना पहिल्या तीन महिन्यांतच ११५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एमएसआरडीसीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या त्रयस्थ पाहणीत अपेक्षित वाहनसंख्येपेक्षा ४० टक्के अधिक प्रत्यक्ष वाहनसंख्या असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे कोल्हापूरचा टोल बंद करून त्यापोटी ४४० कोटी रुपये मोजणारे राज्य सरकार एक्स्प्रेसवेबाबत गप्प का ?', असा सवाल विवेक वेलणकर (सजग नागरिक मंच) यांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी देत डेटेव्हिव्हकडून महिलेवर अत्याचार

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, येरवडा पतीचे अनैतिक संबंध पुराव्यासह उघडकीस आणण्यासाठी पत्नीने खासगी डिटेकटिव्ह एजंटचीच (गुप्तहेर) नेमणूक केली. पण, पतीच्या हालचालींच्या माहितीची देवाणघेवाण करण्याच्या प्रयत्नात संबंधित महिला आणि डिटेकटिव्हचा संपर्क वाढला. या संधीचा फायदा घेत डिटेक्टिव्हने महिलेवर वर्षभर अत्याचार केला. तसेच, या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप इंटरनेट आणि सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . सोमनाथ चंद्रकांत नेवसे (रा. विघ्नहर्ता सिक्युरिटी प्रा. ली, प्रतीकनगर, येरवडा) असे डिटेकटिव्ह एजंटचे नाव आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत सोमवारी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. पतीचे घराबाहेरील संबंध पुराव्यानिशी उघडकीस आणण्यासाठी मागील वर्षी महिलेने प्रतीकनगरमधील विघ्नहर्ता डिटेक्टिव्ह एजन्सी सिक्युरिटी प्रा. ली. या कंपनीतील आरोपी सोमनाथशी संपर्क साधून कामाचे कंत्राट दिले. पतीच्या बाहेरील प्रत्येक हालचालीची माहिती महिलेला देण्यासाठी सोमनाथने दोघांचे मोबाइल क्रमांक घेतले होते. यामुळे सोमनाथ आणि पीडित महिला सतत संपर्कात येऊ लागले. काही दिवस माहिती जमाविल्यानंतर सोमनाथने महिलेला आपल्या कार्यालयात मिटींगसाठी बोलाविले. त्या वेळी सोमनाथने महिलेला थंड पेयात गुंगीचे औषध मिसळून दिले. त्यामुळे काही वेळातच महिला बेशुद्ध पडल्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केला. तसेच, या अत्याचाराचे त्याने व्हिडिओ क्लिपही काढले होते. त्यानंतर सोमनाथने वारंवार हा व्हिडिओ आणि फोटो इंटरनेट आणि सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वर्षभर वारंवार अत्याचार केल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांकडे दिली आहे. सोमवारी पीडित महिलेचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतल्यानंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालेवाडीत झोपड्यांना आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बालेवाडी स्टेडियमच्या पाठीमागे म्हातोबानगरमध्ये लागलेल्या आगीत २२ झोपड्या खाक झाल्या. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.

बालेवाडी स्टेडियमच्या पाठीमागे संजय बालवडकर यांच्या मजुरांच्या ४० ते ५० झोपड्या आहेत. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एका बाजूच्या झोपडीत अचानक आग लागली. त्यामध्ये तेथील सिलेंडरचा स्फोट झाल्याने शेजारील झोपड्यांमध्ये आग पसरली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. कोथरूड, पाषाण आणि मध्यवर्ती अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. झोपड्यांमधील सात सिलेंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्यामुळे आग भडकली. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. झोपड्यांचे पत्रे तापल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना अडथळे आल्याची माहिती कोथरूड अग्निशमन केंद्राचे प्रमुख गजानन पाथरुडकर यांनी दिली.

यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खबरदारी म्हणून महावितरणकडून तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, एका झोपडीत आग लागून सिलेंडरचा स्फोट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. कोथरूड, पाषाण व सेंट्रल फायर ब्रिगेडच्या तीन गाड्यांच्या मदतीने १५ जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली. प्रत्येकजण आपले घर वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. या आगीत २० ते २२ झोपड्यांमधील सर्व साहित्य खाक झाले. त्यामुळे मजुरी करून गुजराण करणाऱ्या या नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत दिली.

हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे व तलाठी भाऊसाहेब चडचणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

... इथेही घर हिरावले

मराठवाड्यातील दुष्काळ व पाण्यामुळे अनेकजण पुण्यात कामाला आले आहेत. परभणी येथून आलेले काही नागरिक म्हसोबावस्तीत राहत होते. मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह भागवत होते. कशीबशी उभी केलेली झोपडी हाच त्यांचा खंबीर आधार होता. मात्र, मराठवाड्यात पाण्याने आसरा घालवला, तर इथे आगीने छप्पर हिरावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग परीक्षा मूळ वेळापत्रकानुसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षा पुन्हा मूळ वेळापत्रकानुसार, २ मेपासूनच सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने सोमवारी घेतला. दरम्यान, वेळापत्रक बदलाबाबतच्या विद्यापीठाच्या निर्णयांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाला कारणीभूत अधिकाऱ्यांवर विद्यापीठाने कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी केली.

विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये इंजिनीअरिंगच्या २ मेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा २६ एप्रिलपासूनच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यापीठाने रविवारी या विषयी प्रसिद्धीपत्रक काढून सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले होते. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता वेळापत्रकामध्ये हा बदल केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. निकाल लवकर जाहीर करण्यासाठी आणि कॉलेजांकडून परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यासाठी झालेली मागणी विचारात घेत, इंजिनीअरिंगच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्याचे नंतर समोर आले होते. या प्रकारानंतर अभाविपने विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत वेळापत्रकातील बदल विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने पुन्हा पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे सोमवारी रात्री उशिरा कळविले.

परीक्षा पुढे घेण्याची मागणी कोणत्याही विद्यार्थी संघटनेने केलेली नव्हती. कॉलेज प्रशासनांच्या दबावाखाली विद्यापीठाने वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. संघटनेने या दरम्यानच्या काळात उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइनवर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, वेळापत्रकातील बदलांमुळे मानसिक दडपण आल्याच्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही ही बाब कदापिही सहन करणार नसल्याचे अभाविपच्या पुणे महानगर मंत्री आनंद पुरोहित यांनी सांगितले.

'विद्यार्थ्यांची भूमिका जाणून घ्या'
विद्यापीठाने अशा निर्णयांसाठी या पुढील काळात कॉलेजांची नव्हे, तर विद्यार्थ्यांची भूमिका जाणून घ्यावी. तसेच, या गोंधळाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही अभाविपतर्फे कुलगुरू डॉ. गाडे यांच्याकडे करण्यात आल्याचे आनंद पुरोहित यांनी मंगळवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान पुन्हा ३९.५ अंशांवर

$
0
0

तापमान पुन्हा ३९.५ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील कमाल तापमानात मंगळवारी वाढ होऊन ते ३९.५ अंशांवर पोहोचले, तर किमान तापमानात किंचित घट होऊन २०.२ अंशांवर आले. पुण्यात नोंदले गेलेले किमान तापमान राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान होते. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पुण्यात लोहगाव येथे ४०.४ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर २२.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नांदेड येथे (४३ अं.से) झाली. पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
.........
प्रमुख शहरांचे कमाल तापमान
अंश सेल्सिअस
सांगली ४१.१
उस्मानाबाद ४१.२
जळगाव ४१.५
अकोला ४१.६
मालेगाव ४१.७
परभणी ४२.३
नागपूर ४२.५
सोलापूर ४२.६
नांदेड ४३
सांताक्रूझ ३६
महाबळेश्वर ३४.७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ दुकाने आजच उघडणार

$
0
0

सराफ दुकाने आजच उघडणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशभरातील सराफ दुकाने गुरुवारऐवजी आजच (बुधवार) उघडण्याचा निर्णय सर्व सराफ संघटनांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उत्पादन शुल्काबाबत संघटनेचे निवेदन आज (बुधवारी) केंद्र सरकारकडे देण्यात येणार आहे. त्यावर सरकार कसा प्रतिसाद देते, यावर पुन्हा संप पुकारायचा की नाही, याचा निर्णय होणार आहे.
सराफ संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सर्व प्रमुख सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी नवी दिल्लीत झाली. 'येत्या २५ एप्रिलपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वी सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २५ पासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात येईल,' असे रांका यांनी सांगितले.
'व्हॅट रिटर्नप्रमाणे उत्पादन शुल्क आकारावे. उत्पादन शुल्कासाठी किमान मर्यादा सहा कोटींऐवजी २५ कोटी करावी. जुन्या साठ्यावर उत्पादन शुल्क आकारू नये. व्यापाऱ्यांना विविध रजिस्टर सांभाळावी लागू नयेत. झडती व छाप्याची तरतूद काढून टाकावी. ग्राहकांकडे असलेल्या जुन्या सोन्यावर उत्पादन शुल्क आकारू नये, आदी मागण्यांचे निवेदन बुधवारी सरकारकडे दिले जाईल,' असे रांका यांनी सांगितले.
'उत्पादन शुल्क कायद्यातील अनेक जाचक बाबी ग्राहकांसाठीही खूप त्रासदायक आहेत. या अटी दूर करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल,' असे पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे भागीदार अभय गाडगीळ यांनी सांगितले.
...........
काही दुकाने आधीच खुली
संप मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मंगळवारीच काही व्यावसायिकांनी आपली दुकाने खुली केली होती. यात काही छोट्या व्यावसायिकांबरोबर काही बड्या व्यावसायिकांचाही समावेश होता. तर काहींनी दुकानांची रंगरंगोटी किंवा साफसफाई सुरू केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
स्कूलबसने ठोकरल्याने रस्त्यावर लावलेली दुचाकी सुरू करून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी बसचालकाला अटक केली आहे.

सबा साजिद शेख (वय १७, पिंपळेसौदागर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ज्ञानोबा खरात (३१, रा. चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबा हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. ती पिंपळेसौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर असणाऱ्या डी-मार्टमध्ये खरेदीसाठी आली होती. तेथून बहिणीसाठी चॉकलेट घेऊन परतत होती. रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी काढून ती घरी निघत होती. तेवढ्यात मुलांना घरी सोडून जाणाऱ्या स्कूलबसने सबा हिला ठोकरले. ही धडक एवढ्या जोरात होती की सबा थेट बसच्या मागील चाकाखाली सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर खरात याने घटनास्थळावरून पळ काढला होता. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील मुलांना ने-आण करण्याचे काम खरात करतो. अपघातावेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. पोलिसांनी खरात याला काही वेळातच अटक केली. सहाय्यक निरीक्षक बलभीम ननावरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांनी जागविल्या बाबासाहेबांच्या आठवणी

$
0
0

वकिलांनी जागविल्या बाबासाहेबांच्या आठवणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम पुण्यात झाला होता. या घटनेचे साक्षीदार आहे पुणे जिल्हा न्यायालय. न्यायालयातील लायब्ररीत त्यांचे पहिले जाहीर व्याख्यान झाले होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील वकिलांनी त्यांच्या या आठवणी जागवल्या.
पुणे जिल्हा न्यायालयातील लायब्ररीमध्ये डॉ. आंबेडकर यांचा २२ डिसेंबर १९५२ रोजी राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर पहिला जाहीर कार्यक्रम झाला होता. त्यावेळी डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरही उपस्थित होत्या.
पुणे जिल्हा न्यायालयातील लायब्ररी कोर्टात प्रॅक्टीस करत असलेल्या वकिलांसाठी माहितीचा खजिना आहे. या लायब्ररीमध्ये कोर्टातील केसेससाठी लागणारे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. ही लायब्ररी ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील वकिलांनी त्यांच्या आठवणी यानिमित्ताने जागवल्या.
डॉ. आंबेडकर यांच्या शताब्दीनिमित्त पुण्यातील सर्व स्तरातील वकिलांनी एकत्र येऊन वकील विचार मंच स्थापन केला. या मंचातर्फे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे कार्य जागविण्याचे काम यानिमित्ताने केले जाते, अशी माहिती अॅड. विजय सावंत यांनी दिली.
डॉ. आंबेडकर यांचा पुण्यातील लायब्ररीत जाहीर कार्यक्रम झाल्यानंतर त्या संदर्भातील छोटी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. त्या पुस्तिकेची किंमत बारा आणे होती. ही पुस्तिका वकिलांच्या पुढाकारातून मराठीत अनुवादित करण्यात आली. आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा पुण्यातील वकिलांचा हा प्रयत्न आहे.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमात 'कंडिशन्स प्रिसेडेन्ट फॉर सक्सेसफुल वर्किंग ऑफ डेमोक्रसी' या विषयावर डॉ. आंबेडकर यांनी व्याख्यान दिले होते. या कार्यक्रमात एल. आर. गोखले यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले होते. ए. बी. सेटना, एच. व्ही. तुळपुळे या दोन वरिष्ठ वकिलांनी दिलेल्या पुस्तकांचा लायब्ररीतील पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला होता. पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. सी. भट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी या वेळी स्वागतगीत गायले होते. हे स्वागत गीत एस. जी. भट यांनी रचले होते. लायब्ररीचे उपाध्यक्ष के. एस. चौबल यांनी प्रास्ताविक केले होते. बी. डी. बाळ यांनी डॉ. आंबेडकर यांना गोखले यांच्या चित्राचे अनावरण करण्याची विनंती केली होती. कार्यक्रमाची रुपरेषा या पुस्तिकेत नमूद करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत व्याख्यानमालेत यंदाचे सत्र २१ पासून

$
0
0

वसंत व्याख्यानमालेत यंदाचे सत्र २१ पासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर , शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, पालकमंत्री गिरीश बापट, गायिका आरती अंकलीकर- टिकेकर, युवा गायक महेश काळे अशा दिग्गजांच्या विचारांनी यंदाची वसंत व्याख्यानमाला बहरणार आहे.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे १४२ वे ज्ञानसत्र २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ६.३० वाजता रंगणार आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आली.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी १८७५ मध्ये वक्तृत्वोत्तेजक सभा सुरू केली. लोकांसाठी विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने सादर करणे या मूळ उद्देशाने सुरू केलेली ही व्याख्यानमाला पं. जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा दिग्गज वक्त्यांच्या विचारांनी समृद्ध झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत याच व्यासपीठावरून दिले होते. अशा अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार ही व्याख्यानमाला ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करताना यंदाचे ज्ञानसत्र रंगणार असून, त्या माध्यमातून दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी जाणकार रसिकांना मिळणार आहे.
प्रा. शेषराव मोरे, फ्रान्सिस दिब्रिटो, विकास आमटे, प्रकाश आंबेडकर, श्रीकांत इंगहळ्ळीकर, डी. एस. कुलकर्णी, सुकृत खांडेकर, सतीश मगर, राम मोने, श्रीनिवास सोहोनी, प्रा. मिलिंद जोशी आणि सुभाष पाळेकर अशा विविध वक्त्यांची भाषणे होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाडीच्या चाकात साडी अडकून पडल्याने मृत्यू

$
0
0

पिंपरी : मुलीसह दुचाकीवरून जात असताना दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकून खाली पडल्याने आईचा मृत्यू झाला. मंगळवारी (१२ एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शितोळेनगर, देहूरोड येथे ही घटना घडली.
प्रतिभा राजेंद्र भोसले (वय ४०, रा. काकडे पार्क, चिंचवडगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले या मुलीसह दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. भोसले या दुचाकीच्या मागच्या सीटवर बसल्या होत्या. अचानक त्यांची साडी दुचाकीच्या मागच्या चाकात गेल्याने त्या खाली पडल्या. यात भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना त्वरीत देहूरोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांच्या विश्वासू सहकाऱ्याला अध्यक्षपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांची वाढलेली गर्दी... एकमत होत नसल्याने आगामी निवडणुकांपर्यंत आहे त्याच अध्यक्षांकडे सूत्रे कायम ठेवण्याची मागणी... पक्षातील वरिष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपविण्याच्या हालचाली... अन् अखेर प्रदेशाध्यक्षांच्या विश्वासू सहकाऱ्यावर जबाबदारी... अशा क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणाऱ्या वातावरणात अखेर रमेश बागवे यांच्या निवडीमुळे काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची अनेक महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा सोमवारी थंडावली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अभय छाजेड यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदावर कायम राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. तेव्हापासूनच शहराध्यक्षपदाच्या चर्चेने वेग घेतला होता. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पराभव पत्करावा लागल्याने पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली होती. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भवनला दिलेल्या भेटीदरम्यान इच्छुकांनी त्यांच्यासमोरच जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, त्यावेळी कोणताच निर्णय न घेता, सद्यस्थितीत छाजेड हेच पदावर कायम राहतील असे स्पष्ट संकेत चव्हाण यांनी दिले होते.
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी छाजेड यांचे नाव पुढे केले गेले असले तरीही बदल होणार याची कुणकुण सर्वांनाच होती. तो फक्त केव्हा होणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पक्षातील हालचालींना वेग प्राप्त झाला होता. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराची धुरा पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडेच सोपविली जाणार असल्याचे संकेत दिले गेले. त्यामुळे, स्पर्धेतील अनेक नावे आपोआप अपात्र ठरली होती. अखेर, चव्हाण यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या काळात त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या बागवे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले अन् सोमवारी त्याची अधिकृत घोषणा केली गेली.
...............
शहरातील सर्व जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षातील गटबाजी संपविण्यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. मोदी आणि फडणवीस सरकारमुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि अशांततेचे वातावरण दूर करून पुणे महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे उद्दिष्ट आहे.
रमेश बागवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीव्ही’चा कार्यभार देशभ्रतार यांच्याकडे

$
0
0

पहिली बैठक १६ एप्रिलला होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेइकलच्या (एसपीव्ही) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा तात्पुरता कार्यभार पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सीईओपदाचा कार्यभार देशभ्रतार यांच्याकडे सोपवावा, या आशयाचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. दरम्यान, एसपीव्हीची पहिली बैठक १६ एप्रिलला होणार आहे.
'एसपीव्ही'च्या पहिल्या बैठकीत कंपनीचे पदसिद्ध अध्यक्ष आयुक्त, विभागीय आयुक्त आणि महापौर हे तीन संचालक उपस्थित असणार आहेत. कंपनीच्या सीईओ म्हणून देशभ्रतार यांच्याकडे कार्यभार सोपविल्याने राज्य सरकारकडून १०० कोटी आणि महापालिकेचा ५० कोटी रुपयांचा हिस्सा प्राप्त करून स्मार्ट प्रकल्प सुरू होतील, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी सात दिवसांत कंपनीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर संचालक मंडळ नियुक्ती, सीईओ नियुक्ती तसेच प्राधान्यक्रमाणे करावयाची कामे याचे धोरण निश्चित केले जाणार आहे. 'एसपीव्ही'च्या १५ संचालकांपैकी महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि सर्वाधिक सदस्य संख्येनुसार पहिल्या तीन राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असे सहा राजकीय तर, उर्वरित सरकारी संचालक असणार आहेत.
..
देशभ्रतार यांच्याकडे सीईओ पदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. कंपनीच्या सीईओ पदाची नियुक्ती जाहिरात देऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सीईओवर असल्याने यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
कुणाल कुमार, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी रमेश बागवे

$
0
0

पा​लिका निवडणुकीत फायदा होण्याचे आडाखे
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची निवड झाली आहे. महापालिकेत विविध पदांवर कामाचा अनुभव असलेल्या बागवे यांच्याकडे पक्षाची धुरा दिल्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदा होईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
तीसपेक्षा अधिक वर्षांपासून बागवे शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. १९८५ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर, सलग २२ वर्षे त्यांनी महापालिकेत काँग्रेसचे प्रतिनिधित्त्व केले. दरम्यान, १९९०-९१ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले, तर २००२ ते २००७ या पाच वर्षांच्या कालावधीत ते सभागृहनेते होते. महापालिकेत कार्यरत असतानाच, पक्षाने २००४ मध्ये त्यांच्यावर पर्वती मतदारसंघातून लढण्याची जबाबदारी सोपविली. बागवे यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवित आमदार म्हणून विधिमंडळात प्रवेश केला. २००९ मध्ये त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून बाजी मारली. त्यानंतर, सुमारे वर्षभर गृहराज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना लाभली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. त्यांच्या गृहराज्यमंत्रिपदाच्या काळात देशातील पहिले महिला कारागृह येरवड्यात सुरू झाले. आमदारकीच्या कारकि‍र्दीत राज्यातील पहिली झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) विकसित करण्याचे कामही त्यांनी केले.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करताना, राज्यातील विविध जिल्ह्यांत आणि तालुक्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. पक्षासह मातंग एकता आंदोलनाचे ते अध्यक्ष असून, बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. महापालिकेची निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली असताना, पक्षाने शहराध्यक्ष म्हणून बागवे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसची शहरात झालेली पीछेहाट भरून काढून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागविण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. महापालिकेतील कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेत काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यात ते यशस्वी होतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

प्रदेश कार्यकारिणीवर आजी-माजी पदाधिकारी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेश कार्यकारिणीची निवड सोमवारी जाहीर करण्यात आली. यात, पुण्यातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये, आमदार शरद रणपिसे, रत्नाकर महाजन (उपाध्यक्ष), माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, रोहित टिळक (सरचिटणीस), तर संजय बालगुडे, अजित आपटे, संगीता देवकर, सुधीर जानजोत, हरिदास चरवड, शहजाद पूनावाला (चिटणीस) यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणी सदस्यपदी कमल व्यवहारे आणि उल्हास पवार यांची नियुक्ती केली गेली आहे. तसेच, प्रवक्ते म्हणून आमदार अनंत गाडगीळ, रत्नाकर महाजन आणि उल्हास पवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅलो, मी कृषी आयुक्त बोलतोय’

$
0
0

आमदार मेधा कुलकर्णी यांना अज्ञाताकडून निनावी फोन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आमदारसाहेब, मी कृषी आयुक्त बोलतोय. कृषी विभागात सध्या भरती सुरू आहे. आपले तीन-चार कार्यकर्ते पाठवा,' असा फोन भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांना आला. खात्री करण्यासाठी आमदारांनी थेट कृषी आयुक्तांना फोन केला आणि सारा बनाव लक्षात आला. कृषी आयुक्तांकडून अशाप्रकारे कोणताही फोन केला नसल्याचे उघड झाले. त्यामुळे दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत कृषी सहसंचालक सुधीर ननावरे (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मेधा कुलकर्णी आणि योगेश घोलप यांना रविवारी मोबाइलवर संपर्क साधण्यात आला. 'आपण कृषी आयुक्त बोलत असून, कृषी विभागात विविध पदांची भरती सुरू आहे. आपले तीन-चार कार्यकर्ते या भरतीसाठी आमच्याकडे पाठवा,' असे संबंधिताने दोघांनाही सांगितले. या बाबत खातरजमा करण्यासाठी कुलकर्णी आणि बबनराव घोलप यांनी राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्याशी संपर्क साधला. देशमुख यांनी असा फोन केला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार कृषी सहसंचालकांनी पोलिसांत तक्रार दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांनी दिली.
समाजकंटक आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून कृषी विभागाबद्दल गैरसमज पसरविण्यासाठी आणि कृषी विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी आयुक्तांच्या पदनामाचा वापर करून विधानसभा सदस्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, असे कृषी विभागाकडून दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images