Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खर्चाचा प्रस्ताव तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांसाठी तरतूद खर्च करण्याचा प्रस्ताव आयुक्त राजीव जाधव यांनी तयार केला आहे. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय रकमेस एकत्रित प्रशासकीय मान्यता मिळावी, असे पत्र सर्वसाधारण सभेला दिले आहे.

महापालिकेच्या २०१६-१७ साठी जेएनएनयूआरएम आणि केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह एकत्रित तीन हजार ८८३ कोटी रुपये खर्चाच्या बजेटला सर्वसाधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महसुली खर्च (एक हजार ३०३ कोटी रुपये), भांडवली खर्च (दोन हजार १२४ कोटी रुपये), विकास निधी (४२ कोटी रुपये), महापालिका हिस्सा (४८ कोटी रुपये), पीएमपीएमएल राखीव निधी (१२५ कोटी रुपये), इतर खर्च अनामत परताव्यासह (२४२ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०१६मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंजूर बजेटमधील विकासकामे करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे. या बाबीचा विचार करता सर्व विकासकामांच्या नावासमोर नमूद केलेल्या अर्थसंकल्पीय रकमेस एकत्रित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास त्या कामाची तरतूद त्याच वर्षात खर्च करता येणार आहे. तसेच विकासकामांच्या निविदा प्रक्रिया हाती घेऊन ही विकासकामे उपलब्ध कालावधीत चालू करता येणार आहेत. त्यामुळे आयुक्तांनी हा प्रस्ताव तयार केल्याचे पत्रात नमूद केले आहे.

वास्तविक, महापालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटने उरकण्याचा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने धडाका लावला आहे. गेल्या दोन महिन्यांत तसेच आगामी काळातही कामे मार्गी लावण्याची सदस्यांमध्ये चढाओढ चालू आहे. आगामी सहा ते सात महिन्यांत प्रलंबित कामांसह नवीन कामे मार्गी लावण्यासाठी आणि त्यासाठी तरतूद कमी न पडण्याची खबरदारी सदस्यांकडून घेण्यात येत आहे.

पदोन्नतीचा फेरविचार

महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी पद आहे. या पदावरून डॉ. नागकुमार कुणचगी एप्रिल २०११मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महापालिकेने या पदावर पदोन्नतीने नियुक्तीचा विचार केला. त्यानुसार डॉ. के. अनिल रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्या नावांचा विचार झाला. या दोहोंमध्ये डॉ. रॉय सेवाज्येष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, पदोन्नती समितीची शिफारस, महापालिका सभेची मान्यता, शासन निर्देश आणि नियमातील तरतुदी या बाबी विचारात घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात गेल्या वर्षभरात महापालिकेने शासनाकडे चार पत्रे पाठविली. त्यावर महापालिकेने पदोन्नती समितीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आदेश देत राज्य सरकारने पालिकेचा प्रस्ताव फेटाळला. तसेच सरकारचे आदेश, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचे सेवाप्रवेश नियम, पदोन्नतीसाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि अन्य संबंधित बाबी विचारात घ्याव्यात अशी सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकवीरा देवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळ्यानजीक वेहरगाव कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. आज, मंगळवारी यात्रेला प्रारंभ होणार असून देवीचे बंधू श्री काळभैरवनाथांच्या पालखीची मिरवणूक देवीचे माहेरघर असलेल्या देवघर येथून पारंपरिक वाद्यांच्या निनादात गडावर आणण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त हजारो भाविकांसह कोकणातील पालख्या आणि पायी दिंड्यांचे एकवीरा गडाकडे प्रस्थान झाले आहे.

शक्तिपीठांपैकी येथील श्रीएकवीरा देवी हे एक शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रातील आग्री कोळी बांधवासह अनेकांचे कुलदैवत असणाऱ्या एकवीरा देवीच्या तीन दिवस चालणाऱ्या चैत्री यात्रेला मंगळवारी प्रारंभ होणार आहे. चैत्री षष्टीला मंगळवारी पहाटे देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांचे हस्ते देवीचा अभिषेक, पूजा, महाआरती करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता एकवीरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथांची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गडावर दाखल होणार आहे. बुधवारी चैत्री सप्तमी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे चार वाजता देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते देवीची पूजा, अभिषेक, महाआरती करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता देवीच्या पालखीचे मानकरी चौलचे आग्रावकर यांच्या हस्ते देवीच्या पालखीची पारंपारिक वाद्याच्या निनादात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येईल. गुरुवारी चैत्री अष्टमीला पहाटे तीन वाजता चौलचे आग्रावकर व पेणचे वासकर या मानकऱ्यांच्या हस्ते देवीचा तेलवण आणि मानाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यात्रा कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच भाविकांना व्यवस्थितीत दर्शन घेता यावे यासाठी गड परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गड परिससर व लोणावळा ते कामशेतपर्यंत दारूबंदीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गडावर फटाके वाजविण्यात बंदी घालण्यात आली आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी एकवीरा देवस्थान ट्रस्टने वातानुकुलीत दर्शन रांग उभारली आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांप्रकरणी सासू, जावयाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पावणे दोन लाखांच्या बनावट चलनी नोटा बाजारात आणणाऱ्या सासू व जावयाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून, सध्या भाटनगर पिंपरी येथे वास्तव्याला होते. दोघांकडून एक हजार रुपये किमतीच्या १६९, तर ५०० रुपये किमतीच्या ६ बनावट नोटा, तसेच मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

समसुद्दीन रहमान शेख (वय ३०, रा. कापसे चाळ पवनेश्वर मंदिराजवळ, पिंपरी) आणि जोहरा मन्सूर शेख (वय ५५, रा. बौद्धनगर, बि. नं. १६ भाटनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या जावई व सासूचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. शेख हा शहर आणि ग्रामीण परिसरात जाऊन किरकोळ खरेदी करण्यासाठी बनावट नोटांचा वापर करत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी एस. बी. कलांडिकर यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यावरून निरीक्षक मसाजी काळे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, आर. आर. ठुबल, फौजदार हरिष माने, कर्माचरी कलांडीकर, बाबा इनामदार, नागनाथ लकडे, महादेव जावळे, सुभाष पाटील, खोडगे, महिला कर्मचारी पाटील, महानवर आदींच्या पथकाने शेख याच्या घरी छापा टाकला.

त्याच्याकडे नोटांबद्दल चौकशी केली असता आठवडी बाजारात जाऊन किरकोळ वस्तुंची खरेदी करून वटवत असल्याची माहिती दिली. या नोटा आणखी कुणाला वटविण्यासाठी दिल्या आहेत का याची चौकशी केली असता, काही नोटा सावत्र सासू जोहरा मन्सूर शेख हिच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यावरून तिच्या घरी जाऊन तपासणी केली असता, एका डब्यात हजार रुपयांच्या ६१ नोटा, ५०० रुपयांच्या २ नोटा सापडल्या आहेत, तसेच १०० रुपयांच्या २३ खऱ्या नोटा व १० रुपयांच्या ४२ खऱ्या नोटा सापडल्या आहेत. सासू व जावयाने या नोटांच्या माध्यमातून संसारयोपगी साहित्य खरेदी केले आहे. दोघांकडे केलेल्या तपासणी व चौकशीत हजार रुपयांच्या एकूण १०६ नोटा, तसेच ५०० रुपयांच्या सहा बनावट नोटा आढळल्या आहेत. त्याशिवाय १०० रुपयांच्या ८४ खऱ्या चलनी नोटा व रुपये १० च्या ३६ नोटा सापडून आल्या आहेत. दोघांकडून एकूण १ लाख ७१ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कायद्याविरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
केंद्र सरकारचा प्रस्तावित कामगार कायदा हा कामगारविरोधी असल्याचा आरोप करीत विविध कामगार संघटनांनी एकत्र येत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी प्रस्तावित कामगार कायद्याची होळी केली, तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकळे, कार्याध्यक्ष दिलीप पवार यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात दत्तात्रेय येळवंडे, शाम चक्रनारायण, संतोष रांजणे, संजय कदम हे पदाधिकारी सहभागी झाले होते.

केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सरकार मालकधार्जिणे कायदे आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. रोजगार निर्मितीच्या गोंडस नावाखाली औद्योगिक कलम आणि कंत्राटी कामगार कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसे झाल्यास कामगारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. तसेच कायमस्वरुपी कामगार पद्धत बंद होण्याची भीती या वेळी व्यक्त करण्यात आली.

भाजप सरकारला कामगारांनीच सत्तेवर आणले. मात्र, हे सरकार आता कामगारांच्याच मुळावर उठले आहे. त्यामुळे सरकार खाली खेचण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनात बजाज ऑटो, अॅटलास कॉप्को, केएसबी, थरमॅक्स, मॅथर अँड प्लॅनर, पद्मजी पेपर मील, चाकण येथील गुपोअॅन्थोलीन, लोबर, सनसेरा, सुपरिजत, हुंद्याई, सुझलॉन, व्होरॉक, हिंजवडी येथील लाइरिंग, भारत फोर्स, जेजुरी येथील कोनी क्रेन्स इंडिया आदी कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलपर्णी काढण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
जलपर्णीमुळे शहरातील नद्या प्रदूषित झाल्या असून ही जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. मोशी येथे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात येत आहे.

नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तरतूद करावी लागत असते; मात्र निविदा प्रक्रिया राबविण्यास महापालिका प्रशासनाकडून विलंब होतो. जलपर्णी काढावी लागणार असल्याचे माहीत असतानाही महापालिका प्रशासनाने यंदाही ही निविदा प्रक्रिया उशिरा राबविली. त्यामुळे जलपर्णीत भरमसाठ वाढ झाली. त्याचा नाहक त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून जलपर्णीचा विषय गंभीर झाला आहे. जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने मशीन खरेदीही केली; मात्र या मशीनचा उपयोग झाला नाही. परिणामी मशीनवर झालेला खर्च वाया गेला. गेल्या वर्षी या मशीनच्या साह्याने जलपर्णी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो प्रयत्न फसला. निविदा प्रक्रिया राबवून जलपर्णी काढण्याचा ठेकाही गेल्या वर्षी देण्यात आला होता; मात्र तोपर्यंत पावसाळा तोंडावर आला होता. त्यामुळे जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदाराने संथ गतीने केले. पावसाळ्यात पूर आल्यानंतर जलपर्णी वाहून गेली. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून देण्यात आलेल्या ठेक्याचा फारसा उपयोग झाला नाही. यातून केवळ ठेकेदाराला आर्थिक लाभ झाला.

यंदा इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात येत आहे. मोशी येथे या कामाला सुरुवात झाली आहे. ही जलपर्णी काढण्याचे काम यंदा वेगात सुरू आहे. जलपर्णी काढल्यामुळे नदीतील प्रदूषण कमी होऊन डासांची पैदास होण्यास आळा बसेल. परिणामी शहरवासीयांना दिलासा मिळेल.

उपाययोजनेची मागणी

प्रत्येक वर्षी शहरातील नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात होते. महापालिका प्रशासनाकडून याबाबत त्वरित उपाययोजना केल्या जात नाहीत. याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले जाते. पावसाळा संपल्यानंतर त्वरित यावर उपाययोजना करून जलपर्णी होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. हिवाळ्यात जलपर्णीचे प्रमाण कमी असते. त्या वेळेसच जलपर्णी हटविली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ मागणीसाठी वकिलांचा मुंबईत मोर्चा

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील वकिलांनी मुंबईत आझाद मैदानावर सोमवारी मोर्चा काढला. पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पुण्याला मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांकडून वारंवार वि​विध पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. खंडपीठ मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी २०१५ मध्ये १६ दिवस कोर्ट बंद आंदोलन केले होते. खंडपीठाच्या मागणीचा रेटा वाढविण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वाय. जी. शिंदे, उपाध्यक्ष अॅड. चेतन शेवाळे, अॅड. ज्ञानेश्वर कामठे, सचिव अॅड. सत्यजित तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मुंबईत पुण्यातील वकिलांचा मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील आझाद मैदानावर जमून पुण्यातील वकिलांच्या खंडपीठाच्या मागणीबाबत निदर्शने केली. या वेळी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना मागणीबाबत निवेदन दिले. पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव १९७८ मध्ये संमत करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. पुण्यातील वकील अॅड. सुरेशचंद्र भोसले यांनी मुंबई हायकोर्टाकडून माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीनुसार पुण्याला ४० टक्क्यांहून अधिक केसेस हायकोर्टात प्रलंबित आहे. पुण्यातून दाखल होणाऱ्या केसेसची आकडेवारी पाहता पुण्याला खंडपीठ देण्यात यावे. अंतराच्या मुद्द्यावरून खंडपीठ देण्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात येतो आहे. मात्र, इतर राज्यांमध्ये कमी अंतरावरही खंडपीठ देण्यात आलेले आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे सचिव अॅड. सत्यजित तुपे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खंडपीठासाठी आर्थिक तरतूद आणि शिवाजीनगर कोर्टासमोरील गोडावूनची जागा कोर्टाच्या विस्तारीसाठी देण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, असे तुपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी आगारांत आता ‘शिस्त कट्टा’

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, त्यांच्याकडून गैरव्यवहार होऊ नये आणि काम करताना कर्तव्यांची जाणीव व्हावी म्हणून आता राज्यातील प्रत्येक बस आगारात शिस्त कट्टा राहणार आहेत. या शिस्त कट्ट्याच्या जागेवर एक मोठा सूचनाफलक आणि चर्चा करण्यासाठी मोकळी जागा राहणार आहे. त्या सूचनाफलकावर कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीमुळे त्यांना बजावलेल्या नोटिसा, दंडात्मक कारवाईचे आदेश, कर्मचाऱ्यांना झालेल्या शिक्षा, नवीन नियम, सकारात्मक मजकूर, वर्तमानपत्रातील कात्रणे आदींची माहिती राहील. त्यामुळे एकंदरीतच या शिस्त कट्ट्यांमुळे कर्मचाऱ्यांचे समुपदेशन होणार आहे. एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी शिस्त कट्टा उभारण्याचे आदेश राज्यातील सहा प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच काढले आहे. या शिस्त कट्ट्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लागावी आणि कर्मचारी म्हणून प्रवाशांप्रती कर्तव्यांची जाणीव व्हावी, हा एसटीचा उद्देश आहे. तसेच, कर्मचाऱ्यांमधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी सकारात्मक माहिती या सूचनाफलकावर प्रसिद्ध होणारा मजकूर आगार व्यवस्थापकांच्या संमतीनेच प्रसिद्ध करावा लागणार आहे. शिस्त कट्ट्यावरील सूचनाफलक आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडावा म्हणून आगारप्रमुखांना हा कट्टा मोक्याच्या ठिकाणी किंवा अॅलोकेशन कक्षामध्ये उभारावा लागणार आहे. सूचनाफलक हा किमान तीन फुट लांब व दोन फूट उंच आकाराचा असला पाहिजे. या कट्ट्यावर कर्मचाऱ्यांना सूचनाफलकावरील माहितीवर चर्चा करण्यासाठी मोकळी जागा राहणार आहे. या शिस्त कट्ट्याचा छायाचित्रासह संपूर्ण अहवाल तयार करून तो एसटीच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात पाठवायचा आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून शिस्त कट्ट्यांच्या सूचनाफलकावर वर्तमानपत्रात कर्मचाऱ्यांच्या कामाबाबात वाईट किंवा चांगल्या कामगिरीबाबत आलेल्या बातम्यांची कात्रणे लावायची आहेत. या फलकावरचा मजकूर बदलत राहील, याची काळजी आगार प्रमुखांना घ्यायची आहे. पुणे विभागातील आगारप्रमुखांची नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत शिस्त कट्ट्यांबाबत चर्चा करुन त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे शैलेश चव्हाण (विभाग नियंत्रक) यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडला प्लास्टिकमुक्त मोहीम

$
0
0








नरेंद्र जगताप, दौंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दौंड शहरात स्वच्छतेची गुढी उभारण्यात येत असून त्यानुसार स्वच्छता मोहिमेला वेगात सुरुवात करण्यात आली आहे. प्रमोद बाबुराव खांगल या स्थापत्य अभियंत्याने लोकसहभागातून दौंड शहर प्लास्टिकमुक्त करण्याची नियोजनबद्ध योजना आखली असून त्यानुसारर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. प्रमोद बाबुराव खांगल या स्थापत्य अभियंत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नियोजनबद्धरित्या कामाला सुरुवात केली असून, त्यांच्या या प्रयत्नाला मदत करण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. खांगल यांनी दिवाळीनंतर या अभियानाची रूपरेषा ठरवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी दौंड नगरपालिकेने मुख्य समन्वयक आहे. तसेच, नगरपालिकेच्या सभागृहात अनेक संस्था, मंडळे यांना आमंत्रित करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्रत्येक शाळेत जाऊन खांगल यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून स्वच्छता राखण्याची शपथ दिली. जेसीबी, ट्रॅक्टरसह ५० सफाई कामगार नगरपालिकेने दिले आहेत. एक एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत दौंड शहरातील प्रत्येक प्रभाग, रस्ते, मैदाने बागा संपूर्णपणे कचराविरहित करणार असून पुढे स्थानिक रहिवाशांनी आपल्या योगदानातून 'स्वच्छ दौंड' निर्माण करायचे आहे. एक एप्रिलला दौंड शहरातील ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय सदस्य दत्ताजी शिणोलीकर यांच्या हस्ते लोकसंस्कारपीठ संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार घालून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीलाच झोपडपट्टीबहुल अस्वच्छतेचे प्रमाण जास्त असलेला भीमनगर, इंदिरानगर, साठेनगर, खाटिक गल्ली, सिद्धार्थ नगर, नवगिरे वस्तीचा भाग निवडण्यात आला. भागातील साचलेल्या गटारीमधील गाळ उपसण्यात आला. विखुरलेला कचरा उचलण्यात आला. दररोज सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत स्वच्छतेचे काम चालते. नगरपालिकेच्या टीमला साथ देण्यासाठी दररोज एक संघटना किंवा संस्था आपल्या सदस्यांसह या स्वच्छता अभियानात सामील असतात. स्वच्छता अभियान संपल्यानंतर दुरवस्था झालेल्या व दौंडसाठी कळीचा मुद्दा असलेल्या कुरकुंभ मोरीची स्वच्छता, रंगरंगोटी व लाइटची सोय लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे खांगल यांनी सांगितले. स्वीकृत नगरसेवक राजू बारवकर यांचा यासाठी सक्रीय मिळाला सहभाग असून नानासाहेब धर्माधिकारी संस्था, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ चे जवान, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, ग्लेन मार्क कुरकुंभ यांनीची मदत लाभली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगभरात वाघांची संख्या वाढली

$
0
0

जगभरात वाघांची संख्या वाढली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्याघ्र संवर्धनासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना काकणभर यश आले असून, गेल्या सहा वर्षांत वाघांची संख्या ६९० ने वाढली आहे. अर्थातच भारत या वाघांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच दशकात वाघांची संख्या घटल्याचे आकडे पुढे येत असताना प्रथमच सकारात्मक निष्कर्ष पुढे आला आहे.
वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर आणि ग्लोबल टायगर फोरमने विविध देशांकडून आलेल्या अहवालांच्या आधारे जगात सध्या तीन हजार ८९० वाघ असल्याचे जाहीर केले आहे. वाघांचे अस्तित्व असलेल्या जगभरातील विविध देशांतील मंत्री आणि निर्णयकर्त्यांची बैठक आजपासून (मंगळवार) तीन दिवस दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने वाघांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
व्याघांचे अस्तिव असलेल्या देशांची पहिली बैठक २०१०मध्ये रशियात झाली होती. त्या वेळी प्रत्येक देशाने पुढील बारा वर्षांत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय निश्चित केले होते. दिल्लीतील बैठकीत याचा आढावा घेण्यात येणार आहे; तसेच वाघांच्या वाढत्या शिकारींना आळा घालण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्लोबल टायगर फोरमचे सरचिटणीस डॉ. राजेश गोपाल यांनी सांगितले.
वाघांची संख्या वाढलेल्या देशांमध्ये भारत, रशिया, नेपाळ, भूतान यांचा समावेश असून, त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी जाहीर केलेल्या उपक्रमांना यश आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या शंभर वर्षांचा आढावा घेतल्यास दरवर्षी वाघांची संख्या घटल्याचेच आकडे पाहायला मिळत होते. या वेळी पहिल्यांदाच वाढ दिसली आहे. प्रशासन आणि अभ्यासकांनी लोकसहभागातून योग्य उपाय राबविले तर त्याचे चांगले परिणाम दिसतात, हे यातून स्पष्ट झाले आहे, असे 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'चे महासंचालक मॅक्रो लामबर्टीनी यांनी सांगितले.
'देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी भारत नेहमीच आग्रही राहिला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातही व्याघ्र प्रकल्पासाठी ३८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वाघांची संख्या वाढविण्यात या प्रकल्पाला यश आले आहे,' असे केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
.................
२०१० - जगातील वाघांची संख्या ३ हजार २००
२०१६ - जगातील वाघांची संख्या ३ हजार ८९०
............
देशनिहाय वाघांची सद्यस्थिती
व्हिएतनाम ५ पेक्षा कमी
चीन - ७ पेक्षा जास्त
भूतान - १०३
बांग्लादेश - १०३
थायलंड - १८९
नेपाळ - १९८
मलेशिया - २५०
इंडोनेशेया - ३७१
रशिया - ४५५
भारत - २२२६
................
जगात शंभर वर्षांपूर्वी एक लाख वाघ होते. शिकारींसह विविध कारणांमुळे २०१०मध्ये त्यांची संख्या ३,२०० पर्यंत खाली आली. वाघांना वाचविण्यासाठी रशियात झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या बैठकीत वाघांचे अस्तित्व असलेल्या देशांनी २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे जाहीर केले आहे. या ध्येयाला टूएक्सटू असे नाव देण्यात आले आहे.
.......
'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेशन'च्या (आययूसीएन) रेड लिस्टमध्ये वाघांचा दुर्मीळ होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांमध्ये समावेश केला आहे. शिकार आणि अधिवास नष्ट होण्यामुळे त्यांची संख्या घटल्याचा निष्कर्ष संस्थेने काढला आहे. जागतिक पातळीवर शिकारी रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या ट्रॅफिक संस्थेच्या आकडेवारीनुसार विविध देशातील तपास अधिकाऱ्यांनी जानेवारी २००० ते एप्रिल २०१४ या कालावधीत एक हजार ५९० वाघांच्या शिकारी झाल्याची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. एकीकडे व्याघ्र संवर्धनाच्या बैठकीत विविध देशांचे मंत्री आणि पदाधिकारी वाघांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपक्रमांचे गोडवे गात असले तरी प्रत्यक्षात शिकारींच्या संख्येत उल्लेखनीय घट झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टी हत्या तपास ‘तेलगी’च्या मार्गावर

$
0
0

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही झोप उडाली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा गुन्ह्यांत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू असलेल्या अटक सत्राने पुणे ग्रामीण पोलिस दलात नोकरी केलेल्या अनेक अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. शेट्टी हत्येच्या तपासात यापूर्वी वरिष्ठांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांकडे सीबीआयने चौकशी केली होती. या सर्वांना सीबीआयच्या कारवाईची भीती वाटू लागली आहे.

चौदा वर्षांपूर्वी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगीसह १३ पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी सुरुवातीला विशेष पथक स्था​पन करण्यात आले होते. नंतर या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात तब्बल ६७ आरोपी होते, तर त्यामध्ये अप्पर पोलिस महासंचालकांसह १३ अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे सर्व अधिकारी पुणे-मुंबईतील होते.

सीबीआयने शेट्टी हत्येच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, सहायक निरीक्षक नामदेव कौठुळे यांना अटक करून स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अटकेची आठवण करून दिली आहे.

आंधळकर यांनी मुख्य सूत्रधारांकडून पैसे घेतले होते. ते पैसे त्यांनी आणखी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते का आणि पोहोचवले असतील तर त्याची माहिती सीबीआयच्या ​तपासात निष्पन्न झाली आहे का, या प्रश्नांभोवती सीबीआयचा तपास फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशांचे अर्ज निकाली काढा

$
0
0

पोलिस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना म. टा. प्रतिनिधी, पुणे 'चौकशीसाठी आलेल्या अर्जांवर सात दिवसांत निर्णय घेतला पाहिजे. अर्जांची चौकशी विनाकारण प्रलंबित राहता कामा नयेत,' अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फरासखाना पोलिसांना दिल्या आहेत. यापुढे पोलिस चौक्यांनाही अचानक भेट देणार असल्याचे सांगून चौकीतील अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीची खडानखडा माहिती असणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.शुक्ला यांनी पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या समवेत मंगळवारी फरासखाना पोलिस ठाण्याला भेट दिली. या वेळी पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांच्यासमवेत फरासखाना पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या या भेटीत शुक्ला यांनी पोलिस ठाण्याविषयी माहिती घेतली. पोलिस मित्रही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कुठलेही अवैध धंदे चालू देऊ नका. दुसऱ्या पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून तुमच्या हद्दीतील अवैध धंद्यावर छापा घातला तर, तुमच्या पत कमी होईल. त्यामुळे आपल्या हद्दीत कुठलेही अवैध धंदे सुरू ठेवू नका. पोलिस चौक्यांमधील कामकाज अधिक वेगवान झाले पाहिजे. अधिकाऱ्यांनी पायी पेट्रोलिंग केले पाहिजे. चौक्यांच्या अधिकाऱ्यांना तर आपआपल्या हद्दीची खडानखडा माहिती पाहिजे. आपल्या हद्दीत राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ठेवलीच पाहिजे,' अशी अपेक्षाही शुक्ला यांनी व्यक्त केली. शुक्रवार पेठ पोलिस चौकीच्या हद्दीत वेश्या व्यवसाय चालतो. हा धागा पकडून शुक्ला यांनी अधिकाऱ्यांना कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या. शुक्रवार पेठ पोलिस चौकी ही एक आदर्श चौकी बनली पाहिजे, या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळीने वाजवले ‘बारा’

$
0
0

तूर डाळीने वाजवले 'बारा'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
काही महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात तूर डाळीचे भाव गगनाला भिडले असताना आता तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झटका बसणार आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत तूर डाळीच्या दरात क्विंटलला १२०० रुपयांची वाढ झाली असून, आणखी दरवाढ झाल्यास किलोसाठी तूरडाळीचे दर दीडशेचा टप्पा गाठण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तूर डाळीची विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथून आवक होते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तूर डाळीचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी दरही गगनाला भिडले होते. सामान्यांच्या घरातून डाळी हद्दपार झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती; तसेच गेल्या वर्षी पाण्याअभावी उत्पादन घटले. त्यामुळे तूर डाळीचा मोठ्या प्रमाणात राज्यात तुटवडा निर्माण झाला होता. त्याची झळ संपूर्ण राज्यातील जनतेला बसली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ४० टक्के उत्पादन घटलेले आहे.
घाऊक बाजारात तूरडाळीच्या दरात गेल्या महिन्यात क्विंटलमागे १२०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तूरडाळीच्या एका किलोसाठी १३५ रुपये असा दर मिळू लागला आहे. उडदाच्या दराने दीडशे रुपयांचा, तर मसूरडाळीला ७० रुपये दर आहे. मटकी डाळीला ८८ रुपये, मूगडाळीला ८७ रुपये; तसेच हरभरडाळीला ६५ रुपये मोजावे लागत आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीच्या दरात १० ते ३० रुपये जादा मोजावे लागत आहेत. डाळींच्या उत्पादन आणि किमतीवर वेळीच नियंत्रण मिळवायला हवे. अन्यथा काही महिन्यांसारखी परिस्थिती पुन्हा उद् भवण्याची भीती डाळीचे व्यापारी नितीन नहार यांनी व्यक्त केली.
..................
डाळींच्या किलोमधील दर
डाळींचे प्रकार ................ ११ मार्चचे दर .............११ एप्रिलचे दर.......किरकोळ बाजारातील दर
तूर डाळ ...................... १२३ ............ .... १३५ ............... १५० च्या पुढे
हरभरा डाळ ............... ५५ ............... ६५...................... ७० च्या पुढे
उडीद डाळ ................ १२०.................. १५० ................. १८० च्या पुढे
मसूर डाळ .................. ५६ ....................७० ................. ८० ते ९०
मटकी डाळ .............. ८० ................... ... ८८ .............. १००
मूग डाळ ................ ८२ .................... ८७ ............... १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांचा संप मागे

$
0
0

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर गुरुवारी दुकाने खुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोन्यावरील उत्पादन शुल्काविरोधात राज्यभरातील सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला संप अखेर गुरुवारी मागे घेण्यात येणार आहे. आज, मंगळवारी नवी दिल्लीत केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर येत्या गुरुवारपासून सर्व सराफ दालने खुली होतील. सरकारने सराफांच्या मागण्या मान्य न केल्यास २४ एप्रिलपासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही सराफांनी दिला आहे. देशभरातील निर्णय उद्या दिल्लीत जाहीर होईल.

देशभरातील सराफ संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सोमवारी ही माहिती दिली. सरकार उत्पादन शुल्क मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यानंतर सोमवारी पुण्यात पुणे सराफ असोसिएशन तसेच राज्य फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याच धर्तीवर देशभरात सर्व राज्यांमध्ये सराफांच्या राज्य संघटनांची बैठक घेण्यात आली. त्यांनीही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, देशव्यापी स्तरावर संप मागे घेतल्याची घोषणा उद्या दिल्लीत करण्यात येईल.

'सरकारने उत्पादन शुल्काबाबत आम्हाला त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. आमच्या मागण्यांचे निवेदन मंगळवारी सरकारकडे सादर केले जाईल. त्यानंतर गुरुवारपासून दुकाने उघडण्यात येतील. संसदेचे अधिवेशन २५ एप्रिलपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी सरकारने निवेदनातील मागण्या मान्य न केल्यास २४ एप्रिलपासून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल. उत्पादन शुल्काला आमचा विरोध असूनही बंदमुळे ग्राहकांची व छोट्या व्यापाऱ्यांची झालेली अडचण लक्षात घेत हा संप मागे घेण्यात येत आहे,' असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

व्हॅटच्या आधारावर उत्पादन शुल्काचा प्रस्ताव

पुढील व्यवहार उत्पादन शुल्क आकारून करावे किंवा नाही, याबाबत असोसिएशनचा अजून निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा सुरू आहे. मंगळवारी नवी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदन देण्यात येईल. यामध्ये व्हॅट रिटर्नच्या आधारावर उत्पादन शुल्क आकारले जावे, असा प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात येईल, असे पुणे सराफ असोसिएशनचे सचिव अभय गाडगीळ यांनी सांगितले.

अटकेची तरतूद काढणार?

सरकार सोन्यावर उत्पादन शुल्क लादण्यावर ठाम आहे. मात्र, त्याचा व्यावसायिकांना जाच होणार नाही, असे आश्वासनही सरकारने दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना धाड टाकण्याची परवानगी नसावी, तसेच या सराफ व्यावसायिकांना अटक करण्याची तरतूद काढून टाकावी, अशी मागणी करण्यात आली असून ती मान्य होण्याची शक्यता आहे.

आंदोलनाचा इतिहास

अर्थसंकल्पात सोन्यावर उत्पादन शुल्क लादल्याने पुन्हा इन्स्पेक्टर राजचा सामना करावा लागेल, असा दावा करून दोन मार्चपासून देशातील सर्व सराफ संघटनांनी बेमुदत बंद पुकारला होता. दहा मार्च रोजी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात राज्यभरातील व्यावसायिक सहभागी झाले होते. सत्ताधारी शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी सराफांना साथ दिली होती. सराफ संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या भेटीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अशोक लाहिरी यांच्या नेतृत्वाखाली समितीचीही स्थापना केली. त्यानंतर २० व २१ मार्च रोजी राज्यातील बहुतांश दुकाने उघडण्यात आली होती. त्यानंतर मात्र, पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात येऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. गुढीपाडव्यालाही बहुतांश दुकाने बंदच राहिल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता.

गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत सराफांच्या सर्व प्रमुख संघटनांची बैठक झाली. त्यात फत्तेचंद रांका यांना उत्पादन शुल्काबाबतच्या कृती समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले. या कृती समितीने दिल्लीत विविध मंत्र्यांसह भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली. मात्र, अमित शहा यांच्यासह मंत्र्यांनी सोन्यावरील उत्पादन शुल्क रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट केल्याने संप मागे घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मल्लाला न्याय कधी मिळणार?

$
0
0

ऑलिम्पिक निवडीत बिराजदार, काकापाठोपाठ राहुल आवारेचा बळी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात... मराठी मल्लांच्या बाबतीत ती कायमच होते, तीदेखील ऑलिम्पिक निवडीच्या बाबतीतच. दर वेळेस दिल्लीतील राजकारणाचे बळी मराठी मल्लच पडतात. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या बाबतीत हेच झाले, त्यांचा शिष्य असलेल्या काका पवारच्या बाबतीतही हेच झाले आणि आता काका पवारांचा शिष्य असलेल्या राहुल आवारेच्या बाबतीतही हेच होते आहे. प्रश्न एवढाच आहे की आता राहुलला न्याय कोण मिळवून देणार?

महाराष्ट्रामध्ये कुस्तीची मोठी परंपरा असली तरीही आखाड्यात बाजी मारणाऱ्या मराठी मल्लांना दिल्लीतील दरबारी डावपेचात कायमच पराभव पत्करावा लागला आहे. 'रुस्तुम-ए-हिंद'चा किताब आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कामगिरी करणाऱ्या हरिश्चंद्र बिराजदारांना हेच सहन करावे लागले. त्यांचा पट्टशिष्य असलेल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या काका पवारच्या नशिबात हेच आले होते. काका पवारच्या वेळेस शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांनी मध्यस्थी करून काका पवार आणि पप्पू यादव यांच्यात पुन्हा एकदा लढत घडवून आणली होती; पण त्यामध्ये काकाला अपयश आले. त्यापूर्वी अनेक वेळा धूळ चारलेल्या पप्पूकडून स्वीकारावा लागलेला एक पराभव काकाला त्याच्या हक्काचे ऑलिम्पिकचे दार बंद करून गेला. कारण खरी निवड काकाचीच झालेली असतानाही, ही लढत खेळायला त्याला भाग पाडले गेले होते.

आता काका पवारचा पट्टशिष्य असलेल्या राहुल आवारेच्या नशिबातही असेच दिल्ली दरबारच्या राजकारणाचे डावपेच खेळणे आले आहे. राहुलला ऑलिंपिकच्या प्रवेशाची संधी मिळविण्यासाठी तीन संधी उपलब्ध असतानाही केवळ एका संधीमध्ये त्याचा गाशा गुंडाळायला लावण्याचे राजकारण खेळले जात आहे. त्याला वैतागून थेट महाराष्ट्र गाठणाऱ्या राहुलवर कारवाईची धमकीही दिली जात आहे. दुर्दैव असे, की त्यामध्ये महाराष्ट्रातीलच काही फितुरी करीत आहेत.

अखेर पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे मध्यस्थीची विनंती केली गेली. पवारांनी लक्ष घातलेही! आता उद्या नितीन गडकरी यांचे दार राहुलचे समर्थक ठोठावणार आहेत. त्यांनाही मध्यस्थीची विनंती केली जाणार आहे. या दोघांची शिष्टाई यशस्वी झाली तर राहुलला किमान तिसऱ्या चाचणीत खेळण्याची संधी मिळेल. त्यामध्ये त्याला पहिल्या दोन क्रमांकामध्ये स्थान मिळवावे लागेल. पहिल्या चाचणीत राहुलने तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे हा प्रवास फारसा अवघड असणार नाही. आव्हान असेल ते तोपर्यंत आपली जिद्द टिकवून धरण्याची आणि सरावातील सातत्य कायम ठेवण्याची. त्यासाठी सगळ्या मराठी जनांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याला धीर देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस

$
0
0

स्कायमेट या खाजगी संस्थेचा अंदाज; जूननंतर पावसाचे प्रमाण वाढत जाणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा मान्सूनच्या हंगामात सरासरीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टी आणि मध्य भारतात सबंध हंगामात चांगल्या पावसाची शक्यता असून, जूननंतर देशभरात पावसाचे प्रमाण वाढत जाईल असे 'स्कायमेट'च्या अंदाजात म्हटले आहे.

गेल्या वर्षी पूर्णपणे चुकलेल्या मान्सूनच्या अंदाजानंतर 'स्कायमेट'ने सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, यंदा मान्सून काळात एल निनोचा प्रभाव ओसरण्याची शक्यता असल्यामुळे मान्सूनचा अंदाज बरोबर येईल असा विश्वास 'स्कायमेट'ने व्यक्त केला आहे.

'स्कायमेट'च्या अंदाजानुसार देशभरात यंदा सरासरीच्या ११० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता २० टक्के आहे. सरासरीच्या १०५-११० टक्के पावसाची शक्यता सर्वाधिक ३५ टक्के असून, हंगामातील सरासरीच्या ९६-१०४ टक्के पावसाची शक्यता ३० टक्के आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता (सरासरीच्या ९० - ९५ टक्के) दहा टक्के असून, यंदा दुष्काळाची शक्यता फक्त पाच टक्के इतकी आहे.

जूनमध्ये देशभरात महिन्याच्या सरासरीच्या ९० टक्के पाऊस अपेक्षित असून, जुलैमध्ये १०५, ऑगस्टमध्ये १०८, तर सप्टेंबरमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ११५ टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे अंदाजात म्हटले आहे. ईशान्य भारत, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक हे भाग सोडून देशात इतरत्र पावसाचे प्रमाण चांगले राहील असे स्कायमेटने म्हटले आहे.

'एल निनो'चा प्रभाव नसल्यामुळे चांगला पाऊस

'गेल्या वर्षी एल निनोबाबतचे अंदाज चुकल्यामुळे मान्सूनचा आमचा अंदाज चुकला,' असे स्पष्टीकरण स्कायमेटचे मुख्य सांख्यिकी अधिकारी डॉ. मकरंद कुलकर्णी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिले. डॉ. कुलकर्णी म्हणाले, 'यंदा मान्सून काळात एल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याचे जगभरातील सर्व मॉडेल दाखवत आहेत. एल निनोनंतर सलग दुसऱ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे स्कायमेटचा यंदाचा अंदाज चुकणार नाही असा विश्वास वाटतो. मे महिन्याच्या अखेरीस हंगामाचा सुधारित अंदाजही देण्याचा आम्ही विचार करत आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॅलेस्टिक रिपोर्टला अद्याप मान्यता नाही

$
0
0

डॉ. हमीद दाभोलकर यांचा गौप्यस्फोट म. टा. प्रतिनिधी, पुणे 'दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांची हत्या एकाच पद्धतीने झाली आहे. त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बॅलेस्टिक रिपोर्ट स्कॉटलंड पोलिस आणि अमेरिकेच्या एफबीआयकडून पडताळून घेण्याचा आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिला होता. मात्र, दोन महिन्यानंतरही सीबीआय या बाबतीत ढिम्म राहिले असून, कोर्टाच्य आदेशाचे अद्याप पालन झालेले नाही,'असा गौप्यस्फोट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येतील संशयित आणि गोव्यातील मडगाव येथील बॉम्बस्फोटातील संशयित साधक एकच असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 'दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांची हत्या एकाच पद्धतीने आणि एकसारख्या पिस्तुलातून झाली आहे. मात्र, या बाबतीत ठोस भूमिका घेतली जात नाही. तिघांच्या हत्येची पद्धत एकसारखीच असल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हायकोर्टाने सीबीआयला आदेश दिले होते. मात्र, सीबीआयचा तपास मंदगतीने सुरू असल्याने आदेशावर कार्यवाही झाली नसल्याचे डॉ. दाभोलकर यांनी स्पष्ट केले. 'तिन्ही हत्यांच्या तपासात गडबड केली जात असल्याची आमची भावना आहे. तपासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर संशयित समीर गायकवाडच्या बाबतीत गडबड केली जात आहे. पॉलिग्राफ आणि नार्को चाचण्याही सीबीआयने केलेल्या नाहीत,' या कडे डॉ. दाभोलकर यांनी लक्ष वेधले. मडगाव बॉम्बस्फोटातील सहा संशयित साधक दोन हत्यांमधील संशयित असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) बॉम्बस्फोटाच्या तपासाबाबत गंभीर नाही, त्यामुळे खुनांच्या तपासाबरोबर बॉम्बस्फोटाचा तपास व्हावा, असेही डॉ. दाभोलकर म्हणाले. .. पंतप्रधानांना भेटण्यापासून मज्जाव 'या तिन्ही हत्यांच्या तपासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, वेळ मिळू शकली नाही. भेट घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर पत्रव्यवहार झाला होता, पण प्रतिसाद मिळाला नाही. इच्छा असती तर, पंतप्रधानांची वेळ मिळू शकली असती,' असे सांगून जाणीवपूर्वक मोदींची भेट होऊ दिली जात नसल्याचा आरोप केला. 'या प्रकरणी आता राष्ट्रपतींना भेटून गाऱ्हाणे मांडणार आहोत,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट पुण्या’साठी १९४ कोटींचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिकेच्या स्वतंत्र कंपनीला (एसपीव्ही) मिळणारा १९४ कोटी रुपयांचा निधी सोमवारी केंद्राने वितरित केला. राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (पीएससीडीसी) या कंपनीच्या खात्यात पुढील सात दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची निवड झाली. केंद्राचा निधी प्राप्त करण्यासाठी तातडीने 'एसपीव्ही'ची स्थापना करण्याचे आदेश केंद्राने दिले होते. ३१ मार्चपूर्वी कंपनी स्थापन करणाऱ्या शहरांना तातडीने केंद्राचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, कंपनी स्थापनेची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी पालिकेने पावले उचलली. राज्य सरकारने 'एसपीव्ही'ची रचना अंतिम करताना, लोकप्रतिनिधींची संख्या कमी केली. त्यावरून, एका बाजूला टीका, आरोप केले जात असतानाच कंपनीच्या स्थापनेची आणि नोंदणीची प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केली. 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट' या नावाने नोंदणी केलेल्या कंपनीची सर्व माहिती राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठविण्यात आली. त्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर केंद्राने स्मार्ट सिटीचा १९४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी केंद्रामार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या खात्यात पुढील सात दिवसांत हा निधी जमा करावा, असे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच, हा निधी जमा करताना, राज्याचा आणि महापालिकेचा हिस्साही संबंधित खात्यात जमा केला जावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांसाठीच हा निधी खर्च करता येणार असल्याचे बंधन 'एसपीव्ही'वर घालण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंच्या अधिकारांना कात्री?

$
0
0

विद्यापीठ विधेयकाच्या सुधारित मसुद्यात तरतूद; धार्मिक मुद्द्यांचाही समावेश Yogesh.Borate@timesgroup.com मुंबई : विविध धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान आणि कला आणि संस्कृती यांच्या अभ्यासाद्वारे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्याचे उद्दिष्ट नव्या विद्यापीठ विधेयकाच्या सुधारित मसुद्याद्वारे राज्यातील विद्यापीठांसमोर ठेवण्यात येणार आहे. कुलगुरूंचे अधिकार मर्यादित ठेवण्याचा विचारही राज्य सरकारने केल्याचे स्पष्ट झाले आहे. कायद्याच्या यापूर्वीच्या मसुद्यातील धार्मिकतेच्या वादग्रस्त मुद्द्यांसोबत काही महत्त्वाचे बदल असणारा नव्या विद्यापीठ विधेयकाचा सुधारित मसुदा विधिमंडळामध्ये मांडण्यात आला. या पूर्वीच्या मसुद्यामध्ये विद्यापीठांच्या अधिकार आणि कर्तव्यांमध्ये धार्मिकतेच्या मुद्द्याचा स्पष्ट उल्लेख होता. त्या उल्लेखानुसार राज्यातील विद्यापीठांनी धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान व वैदिक कला, हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, झोरास्ट्रीयन आणि इतर सभ्यता व संस्कृती यांच्या अभ्यासाला चालना द्यावी, आदी कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती. 'मटा'ने ही बाब प्रकाशात आणल्यानंतर त्या विषयी तीव्र आक्षेपही नोंदविण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेल्या विधेयकाच्या मसुद्यातील या मुद्द्यासह इतर आक्षेपार्ह विषयांवर सरकारने सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून, मसुद्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या. या सुधारणांचा समावेश असणारा 'महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६'चा मसुदा चर्चेसाठी विधिमंडळामध्ये मांडलाहे. मंगळवारी या मसुद्यावर चर्चा होऊन तो मंजूर होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या मसुद्यामध्ये आरक्षणाचे निकष पाळले गेले नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. नव्या मसुद्यामध्ये आरक्षणाच्या सर्व निकषांचे पालन रण्यासोबतच कुलगुरूंच्या नामनिर्देशनाद्वारे अधिकार मंडळांवर होणाऱ्या नेमणुकांमध्येही आरक्षणाचे निकष पाळले जाणार आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व विद्यापीठांसाठीच्या सामायिक परिनियम आणि त्या त्या विद्यापीठासाठीच्या परिनियमांच्या निर्मितीसाठी तातडीने समित्यांची निर्मिती करण्याचा विचार नव्या मसुद्यामध्ये करण्यात आला आहे. अभ्यासमंडळांचे सदस्य नामनिर्देशित करण्याच्या कुलगुरूंच्या अधिकारांना नव्या मसुद्याद्वारे कात्री लावत अभ्यास मंडळांमधील तीन जागांसाठी निवडणुका घेण्याचा विचार मसुद्यामध्ये समाविष्ट आहे. विद्यापरिषदेवरून व्यवस्थापन परिषदेवर जाणाऱ्या सदस्यांपैकी दोन सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत. तसेच, कुलगुरूंच्या नियुक्ती प्रक्रियेला विशिष्ट कालावधीची अट घालून, त्या काळानंतर कुलगुरू नियुक्तीचे अधिकार कुलपतींकडे दिले जाणार आहेत. विविध अधिकार मंडळांवर नामनिर्दशनाद्वारे प्रतिनिधी नेमण्यासाठी या पूर्वीच्या मसुद्यात कुलगुरूंना अधिकार देण्यात आले होते. नव्या मसुद्यामध्ये हेच अधिकार केवळ कुलगुरूंना न देता कुलगुरू, एक व्यवस्थापन समिती सदस्य आणि एक शिक्षणतज्ज्ञ यांच्या एका समितीकडे सोपविण्याचा विचारही नव्या मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एक निरीक्षक ‘सीबीआय’च्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय लवकरच आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्याची शक्यता आहे. या पूर्वी तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि सहायक निरीक्षक नामदेव कवठाळे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही शनिवारपर्यंत (१६ एप्रिल) सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. आंधळकर यांच्या समवेत तपास केलेल्या अधिकाऱ्यांना 'सीबीआय'च्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. आंधळकर यांच्या तपास पथकातच हा अधिकारी कार्यरत होता. त्याची यापूर्वीही चौकशी केली आहे. सहा वर्षांपूर्वी १३ जानेवारी २०१६ रोजी तळेगाव दाभाडे येथे धारदार शस्त्रांनी वार करून शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) काहींना अटक केली होती. परंतु, कालांतराने हा तपास सीबीआय एसीबीकडे गेला आणि हे आरोपी बोगस असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. सहा वर्ष तपास केल्यानंतर सीबीआयने सतीश शेट्टी स्वतः फिर्यादी असलेल्या अन्य एका प्रकरणाच्या पुनर्तपासाची परवानगी कोर्टात मागितली. ती मिळाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट सादर केला. यामुळे आश्चर्य व्यक्त केले गेले. सीबीआय एसीबी पुणे कडून हा तपास दिल्ली सीबीआयकडे वर्ग झाला. त्यानंतर ६ एप्रिलपासून पुन्हा याप्रकरणी अटकसत्र सुरू झाले आहे. या घटनेनंतर तपासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या अनेकांची चौकशी होणार असल्याचे समजते. तत्कालीन काही कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाले आहेत. तर, काही कर्मचारी तळेगाव दाभाडेच्या आसपास परिसरातील अन्य पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. .. तपासासाठी उत्तर महाराष्ट्रात पथक शेट्टी यांच्या हत्येनंतर प्रथमच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांची धरपकड सीबीआयने आता सुरू केली आहे. आंधळकर, कवठाळे नंतर आता कोण अशी चर्चा पोलिसदलात सुरू झाली आहे. २०१३मध्ये ग्रामीण पोलिसदलात कार्यरत असणाऱ्या अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून सीबीआयचे एक पथक उत्तर महाराष्ट्रात तपासासाठी दाखल झाल्याचे समजते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीच्या ताफ्यात येणार बाराशे बस

$
0
0

सातशे बसची खरेदी; ५०० बस भाडेतत्त्वावर घेण्यास संचालकांची मान्यता म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी) दिली जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बाराशे बस घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यातील, सातशे बसची खरेदी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे केली जाणार असून, पाचशे बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. आगामी, चार ते पाच महिन्यांत टप्प्याटप्प्याने या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत बसखरेदीचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला विषय अखेर मार्गी लागला. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या तुटपुंजी असून, नव्या बस वेळेवर दाखल झाल्या, तर पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. संचालक मंडळाने बसखरेदीबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती संचालक; तसेच महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. नव्याने घेण्यात येणाऱ्या सातशे बसची खरेदी कशी करायची, याचा सविस्तर अहवाल पुढील १५ दिवसांत संचालक मंडळापुढे ठेवण्यात येणार असून, तातडीने निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. नव्याने घेण्यात येणाऱ्या सातशे बसपैकी दोनशे मिनी बस असून, शहराच्या मध्य भागातील अरुंद रस्त्यांवर त्याचा उपयोग केला जाईल, असे जगताप यांनी सांगितले. पीएमपीच्या ताफ्यात आजमितीस सुमारे एकवीसशे बस असून, नव्या बसमुळे ताफ्यातील बससंख्या तीन हजारांच्या पुढे जाईल. पीएमपीच्या ताफ्यातील सध्याच्या बस; तसेच भविष्यात दाखल होणाऱ्या बसची संख्या लक्षात घेऊन पार्किंगसाठी कोणत्या जागा आवश्यक आहेत, याचा सविस्तर अहवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दोन्ही पालिकांच्या आयुक्तांना सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. हिंजवडीतील सुमारे दोन एकरचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी ७२ लाख रुपये खर्च करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली. तसेच, बीआरटी मार्गांवरील जाहिरातींसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासही मान्यता देण्यात आली.

....................

'एमकेसीएल'कडून पैसे वसूलणार

पीएमपीमध्ये चालक आणि वाहकांची भरती करण्यासाठी 'एमकेसीएल'च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरप्रकार झाल्याने त्याला स्थगिती देण्यात आली. 'एमकेसीएल'ने परीक्षा शुल्क म्हणून अनेक उमेदवारांकडून पाचशे रुपये घेतले होते. हे शुल्क 'एमकेसीएल'कडून वसूल करून संबंधितांना देण्यात यावे, असा निर्णयही संचालक मंडळाने एकमताने घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images