Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कँन्टोन्मेंटच्या पेशंटांना सवलतीत चाचण्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रोगनिदानाच्या अद्ययावत चाचण्या उपलब्ध नसल्याने पेशंटांना खासगी केंद्रांकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी, खिशावर भुर्दंड पडतो. आता, खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्येच पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या पेशंटांना एक्स रे, सोनोग्राफीसह रोगनिदानाच्या चाचण्यांमध्ये ३० ते ४० टक्के सवलत मिळणार आहे. पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाने मार्केट यार्डातील सुयोग हेल्थकेअर यांच्याशी चर्चा केली असून लवकरच या संदर्भात करार करण्यात येणार आहे. त्या करारानंतर कँन्टोन्मेंट हद्दीतील पेशंटांना निदान चाचण्यांमध्ये सवलत दिली जाणार आहे. 'पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रोगनिदानाच्या अद्ययावत चाचण्यांची सुविधा नाही. त्याशिवाय एक्स रे सोनोग्राफी सारख्या चाचण्यांसाठी पेशंटांना बाहेरच्या चाचणी केंद्राकडे जावे लागते. पेशंटना बाहेरच्या केंद्रावर महागड्या चाचण्या कराव्या लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. त्या करिता काही खासगी डायग्नोस्टिक सेंटरशी प्राथमिक चर्चा करण्यात आली. या सेंटरमधून कँन्टोन्मेंटच्या पेशंटना ३० ते ४० टक्के सवलतीत चाचण्या व सुविधा उपपलब्ध होणार आहे. मार्केट यार्डाजवळील सुयोग लाइफकेअर या डायग्नोस्टिक सेंटरशी आम्ही करार करणार आहोत,' अशी माहिती पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांनी दिली. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संबंधित पेशंटला कोणत्याही चाचणी, तपासणीची दिलेली चिठ्ठी सुयोग लाइफकेअरमध्ये दाखविल्यास त्या चाचण्या सवलतीत केल्या जाणार आहेत. त्याशिवाय एमआरआय, सिटीस्कॅनच्या चाचण्यांसाठी देखील आम्ही काही संस्थांशी चर्चा करीत आहोत, असे गिरमकर यांनी स्पष्ट केले. 'सुयोग लाइफकेअरमध्ये रक्ताच्या विविध चाचण्या, व्हिटॅमिन १२, डी, सोनोग्राफी, डिजिटल एक्स रे, मॅमोग्राफी, हाडांची क्षमता तपासणारी बीएमडी, स्ट्रेस टेस्ट, टू डी इको या सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व चाचण्या तसेच तपासण्या करण्यासाठी कँन्टोन्मेंटच्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन येणाऱ्या पेशंटना सवलतीत सुविधा दिल्या जाणार आहेत. त्या पेशंटना त्वरीत चाचण्यांचे रिपोर्ट देण्यात येतील', अशी माहिती सुयोग लाइफकेअरच्या मोनिका शहा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा नदीतील केदारेश्वर बंधाऱ्यातील पाणी अतिशय अस्वच्छ, हिरवेगार व दुर्गंधीयुक्त झाले आहे. याच पाण्याचा पुरवठा नगरपरिषदेकडून नागरिकांना पिण्यासाठी केला जातो. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचा दावा नगरपरिषदेकडून केला जात आहे. दूषित पाणी पिऊन विविध आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा अनेक नागरिक पिण्यासाठी बाटलीबंद जारचे पाणी विकत घेणे पसंत करतात. परिणामी बाटलीबंद जारच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. तसेच, बाटलीबंद जारमधील पाणी स्वच्छ असेलच, याचीही हमी देता येत नाही. राजगुरूनगर शहरात काही व्यावसायिक पाणीविक्रीचा परवाना नसतानादेखील बेकायदा बाटलीबंद पाणी विकतात. दरम्यान, बंधाऱ्यातील पाणी अस्वच्छ दिसत असले, तरी ते पिण्यास योग्य असल्याचा दावा नगरपरिषदेकडून केला जात आहे. बंधाऱ्याच्या वरच्या भागात असलेल्या नाल्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी व मैलापाणी मिसळून बंधाऱ्यातील पाणी दूषित होते. परंतु, नाल्यांतील सांडपाणी व मैलापाणी नदीच्या पाण्यात मिसळू नये, यासाठी नगरपरिषदेकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून राजगुरूनगर शहरातील दूषित पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केलेले आहे. मात्र, हजारो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नाकडे तालुक्याच्या कोणत्याच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. परिणामी या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे. केवळ दूषित पाण्याच्या समस्येमुळे राजगुरूनगर शहराच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. राजगुरूनगरबरोबरच तालुक्यांतील चाकण आणि आळंदी या दोन प्रमुख शहरांतील पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न देखील 'आ' वासून उभा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावातील आदिवासी बांधवाना वर्षानुवर्षे अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. तालुक्याचे दोन्ही लोकप्रतिनिधी खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार सुरेश गोरे हे खेड तालुक्यात हजारो-शेकडो कोटींची विकासकामे केल्याचे दावे करीत असले, तरी स्वच्छ पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. एकीकडे लोकप्रतिनिधी विकासाच्या पोकळ गप्पा मारताहेत, तर नागरिकांनी दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड-पुणे शटलची चाळिशीतील दौड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड दौंड-पुणे शटलच्या प्रवासाला मंगळवारी ४० वर्षे पूर्ण होणार आहेत. दौंड-पुणे प्रवासी संघाकडून विशेष उपक्रम व कार्यक्रमाने शटलचा वर्धापनदिन साजरा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दौंडमधून पुण्याला जाणारी शटल १२ एप्रिल १९७६ रोजी सुरू केली होती. तत्कालीन आमदार उषादेवी जगदाळे यांनी स्टेशन प्रबंधक बाळकृष्ण आर. कुलकर्णी व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शटलला हिरवा झेंडा दाखवला. चाळीस वर्षांनंतरही हा प्रवास सुरू आहे. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दौंड रेल्वे स्थानकावरून हलणारी शटल विद्यार्थी, चाकरमाने, शेतकरी व व्यावसायिकांची जीवनवाहिनी ठरली आहे. पूर्वी वाफेच्या इंजिनावर शटल धावायची व 'गाडी बुला रही है, सिटी बजा रही है,'ची अनुभूती मिळायची. आता शटल डिझेल इंजिनावर धावते आणि थोड्याच दिवसांत विजेवर धावेल. दौंड ते पुण्यादरम्यान पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळीकांचन, लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, हडपसर या स्थानकांच्या परिसरातील विकासात रेल्वेचा नक्कीच मोठा वाटा आहे. शटलमुळे या भागातील नागरिकांचा पुण्याशी संपर्क टिकून आहे. पूर्वी दौंड शहर व परिसरातून नियमित पुण्याला प्रवास करणारे प्रवासी असायचे. आज श्रीगोंदा, कर्जत (जि. अहमदनगर ), शिरूर व बारामती येथून दौंडमार्गे नित्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. शटलच्या चाळीशीनिमित्त सकाळी साडेसहा वाजता शटलचे औक्षण, केक कापणे, सर्वधर्मीय प्रार्थना होणार आहे. सात वाजून पाच मिनिटांनी ज्येष्ठ पत्रकार वी. रा. उगले यांच्या उपस्थितीत माजी आमदार उषादेवी जगदाळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शटलचे प्रस्थान होईल. पुढील प्रत्येक स्थानकात पाच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शटलच्या चाळिशीनिमित्त सायंकाळी साडेसहा वाजता शेठ जोती प्रसाद विद्यालयाचा प्रांगणात दौंड-पुणे शटलने गेली २५ वर्षे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे; तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी व आजी माजी रेल्वे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीरा यात्रेसाठी जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा कोळी बांधवांसह अनेकांची कुलस्वामिनी व महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेहरगाव कार्ला येथील श्री एकवीरा देवीची चैत्री यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. देवस्थानाच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, या वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्याने यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी ही माहिती दिली. लोणावळ्याजवळील वेहरगाव कार्ला गडावर १२ ते १४ एप्रिल या कालावधीत आई एकवीरा देवीची चैत्री यात्रा होणार आहे. राज्याच्या विशेषत: कोकण, तळ कोकण, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागातून सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक या यात्रा काळात गडावर देवीच्या दर्शनाकरिता व नवस फेडण्यासाठी येतात. ही यात्रा शांततेत पार पडावी, याकरीता मावळचे प्रांताधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्ला येथील एमटीडीसी येथे सर्व प्रशासकीय अधिकारी व एकवीरा देवस्थान ट्रस्टची आढावा बैठक घेण्यात झाली. या वेळी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक ढाकणे, देवस्थानचे विश्वस्त मदन भोई, संजय गोविलकर आदी उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या तयारीची माहिती दिली. यात्रा काळात गडावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, अखंडित वीजपुरवठा, स्वच्छ व मुबलक पाणी, आरोग्याची उत्तम सुविधा, सुरळीत वाहतूक नियोजन, पालखी मिरवणुकीच्या वेळेस गडावर पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच, देवस्थानच्या वतीने भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, याकरीता दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. गडाच्या परिसरात संपूर्ण यात्रेच चोवीस तास चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी चार कॅमेरे बसविण्यात आले असून, चार मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे भाविकांना देवीचे व यात्रेचे दर्शन घेता येणार आहे. या वेळी बैठकीत प्रांताधिकारी सुनील थोरवे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांकडून तयारीचा आढावा घेतला. भाविकांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कुमक मागविण्याबाबत तालुका वैद्यकीय विभागाला सूचना दिल्या. तसेच, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, विहिरी व अन्य जलस्रोत निर्जंतुकीकरण करण्याचे गटविकास अधिकारी व पाणी विभागाला आदेश दिले. यात्रा काळात लोणावळा, कार्ला व मळवली, कामशेत परिसरात दारू बंदीचे आदेश देण्यात आले आहे. यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने २१ पोलिस अधिकारी व ३२५ पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरमुक्तीसाठी ग्रामस्थांचे पाऊल

$
0
0

पुरुषोत्तम मुसळे, भोर राजगड किल्याच्या पाठीमागे शिवकालीन येसाजी कंकांच्या भूतोंडे या ऐतिहासिक गावाशेजारी जेमतेम शंभर उंबरा व साडेचारशे लोकसंख्येच्या दुर्गम भागातील गुहीणे गावातील ग्रामस्थांनी विहीर अधिक खोल आणि रुंद करून गाव टँकर मुक्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हे गाव. गेली पंधरा ते वीस वर्षे या गावाला दर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट असते. ही समस्या पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेपर्यंत पोहोचली. संस्थेचे अजित देशपांडे, सुनीताताई गायकवाड, शैला भोंडेकर, यांनी गुहीणीतील सुनील जोरकर व बापू जोरकर यांच्या मदतीने बैठक घेतली. लोकसहभागातून पाणी समस्या सोडविण्याचे आवाहन केले. सुरुवातीला काही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा ग्रामसभेत आवाहन करण्यात आले. गावातील; पण मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या बाळाबाई श्रीपती गुहीणे यांच्या अंबागाणीचे पाणी या जुन्या पडक्या विहीरीचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा पर्याय सुचविण्यात आला. विहिरीच्या जागेचे गावाच्या नावे बक्षीसपत्र करून देण्याची गुहीणेंनी संमती दिली. ग्रामस्थांनी विहिरीपर्यंतचा रस्ता केला. जुनी विहीर पाडली. दरम्यान, ज्ञानप्रबोधिनी संस्थेने पुण्यातील 'केपीआयटी टेक्नॉलॉजी' कंपनीतील सीएसआर प्रमुख तुषार जुवेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या कामासाठी साडेतीन लाख रुपयांचे अर्थसाह्य देऊ केले. त्यातून सुरुंग व क्रेनच्या खर्चाची व्यवस्था झाली. ग्रामस्थांनी घरटी ६०० रुपये लोकवर्गणी जमा केली. शिवाय, दगड, माती भरण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानाची तयारी दर्शविली. १७ फेब्रुवारीला विहीरीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या कामी रामभाउ वरे, मारुती धनावडे, सुरेश रेणुसे, गणपत गुहीणे, तुकाराम मोरे, सुरेश गुहीणे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. विहिरीचे हे काम अजून पंधरा दिवस अखंड चालणार आहे. शासनाच्या जलशिवार मोहिमेच्याही एक पाऊल पुढे टाकून येथील ग्रामस्थांनी समाजापुढे जिद्द, चिकाटी व श्रमदानाचा उत्तम आदर्श ठेवला आहे. मटक्यातील दुधाची चविष्ट कुल्फी तयार करण्याची कला येथील पुरुष मंडळींकडे आहे. दर उन्हाळ्यात पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरांत कुल्फी विकण्यासाठी ही मंडळी चार महिने फिरत असतात. मात्र, यंदा त्यांचे हात विहिरीच्या कामांत गुंतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालांसाठी परीक्षांची घाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या लेखी परीक्षांमध्ये बदल झाला आहे. यापूर्वी २ मेपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आठवडाभर आधीच, २६ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या बदलाच्या पाठीमागे राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी नोंदविण्यात आली असली, तरी निकाल वेळेत लावण्यासाठीचे हायकोर्टाचे निर्देश आणि कॉलेजांकडून परीक्षा लवकर घेण्याची होत असलेली मागणी, या बदलांच्या पाठीमागे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने या विषयी रविवारी, सुट्टीच्या दिवशी एक पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यानुसार सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याने इंजिनीअरिंगच्या परीक्षा लवकर झाल्यास सर्वांच्या सोयीचे होईल, अशा आशयाचे अर्ज विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केले होते. त्यानुसार विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळ बैठकीमध्ये इंजिनीअरिंगच्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक निर्णय दुष्काळग्रस्त भागातून शहरातील विविध इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी 'मटा'ने या निमित्ताने संवाद साधला असता, विद्यापीठाचा हा निर्णय दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. मुळात अनेक कॉलेजांमध्ये प्रॅक्टिकल्सच्या परीक्षाही २६ एप्रिलपर्यंत संपणार नाहीत. गावाकडे असलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे मुळात तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांवरील ताण परीक्षा लवकर घेतल्याने वाढणार आहे. याचा थेट परिणाम निकालावरही दिसू शकतो. परीक्षा लवकर घेतल्याने परीक्षेपूर्वी काही काळ शहरात राहून खर्च वाढविण्यापेक्षा गावी जाऊन लेखी परीक्षेपूर्वी परत येण्याचा विचार करणेही आता शक्य होणार नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही बाजूने हा निर्णय फायद्याचा नसल्याचे या विद्यार्थ्यांनी रविवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीत भरली गंमतशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शाळेला सुट्टी लागली, तरी एक शाळा भरली होती. बच्चेकंपनीला एक कागद दिला जात होता. शब्दांची केलेली मोडतोड मुला-मुलींनी जुळवून अचूक शब्द ओळखायचा होता. गंमतशीर शब्दांचे 'खरे' शब्द करण्यात मुले दंग झाली होती. त्याहून गंमत म्हणजे कोणी कोणाची कॉपी करत नव्हते, की कोणाला काही विचारतही नव्हते...एका अस्सल शाळेचा अनुभव मुले घेत होती. बरं येथे कोणी रागवणारे नव्हते. छडी उगारणे तर लांबच...विद्यार्थी हक्काच्या स्वातंत्र्यात रविवारी 'गंमतशाळा' रंगली होती. अक्षरधारा बुक गॅलरी आयोजित 'खेळा नाचा वाचा' वाचू आनंदे बालकुमार शब्दोत्सवाच्या उद‍्घाटनानिमित्त 'गंमत शाळा' भरली होती. बालसाहित्यिक राजीव तांबे व पालकांच्या उपस्थितीत या वेळी धम्माल तास रंगला. अचूक शब्द लिहून घेऊन तांबे यांनी निरागस मुलांशी तितक्याच निरागसतेने संवाद साधला. पालकांना काही सूचना देण्यासही ते विसरले नाहीत. मुलांसह स्वत:च्या चेहऱ्यावर प्राण्यांचे मुखवटे चढवण्यात सारेच दंग झाले होते. 'वाचणारे पालक मुलांनी पाहिले, तर मुलेही वाचतील. 'आज काय वाचलं, पन्नास रुपयांची पुस्तकं आणली, तरी वाचत नाहीस, शंभर रुपये खर्च केले, तरी काही शिकलास नाही, पुस्तक घेऊन तात्पर्य काय,' असा संवाद मुलांशी साधू नका. पालक म्हणून आपण संवाद कौशल्यात कमी पडतोय. संवाद लिहीत नाही, संवाद ऐकत नाही, म्हणून अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चांगला संवाद करता येईल का, असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहा. लिखाण आणि चित्र यातील संबंध तपासा, त्याविषयी बोला. आपण मुलांना स्वातंत्र्य द्यायला घाबरतो, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नसतं,' अशा शब्दांत तांबे यांनी पालकांचे कान टोचले. अक्षरधारातर्फे मुलांना पुस्तके भेट देण्यात आली व शाळा सुटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुक्का पार्लरवर कारवाई; ६८ ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे विशेष शाखेच्या पथकाने 'एनआयबीएम' रोडवरील हुक्का पार्लरवर कारवाई करून ६८ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये ११ महिलांचा सहभाग आहे. गेल्या काही वर्षांतील हुक्का पार्लर संबंधीची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईने शहरातील हुक्का पार्लर चालकांचे धाबे दणाणले आहेत. आखाती देशातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कोंढवा, वानवडी परिसरात राहत असल्याने कोंढवा परिसरातील हुक्का पार्लरला सुगीचे दिवस होते. सरकारी आशीर्वादामुळे हे हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू होते. पोलिस सहआयुक्त सुनील रामा​नंद, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार 'एनआयबीएम' रोडवरील हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. विशेष शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले, पोलिस निरीक्षक राजेंद्र जरग यांनी येरवडा पोलिसांच्या मदतीने कोंढवा येथील हुक्का पार्लरवर छापा घातला. या वेळी ६८ जणांवर सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, हुक्काची विक्री करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या पार्लरला कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याचे निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ कायद्याचा मसुदा आज चर्चेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील विद्यापीठीय शिक्षणाची पुढची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या नव्या विद्यापीठ कायद्याचा मसुदा आज, सोमवारी विधिमंडळामध्ये चर्चेला येण्याची शक्यता आहे. नागपूर दौऱ्यावर आलेल्या सोनिया गांधींना भेटण्यासाठी रवाना होणारे काँग्रेसजन आणि कायद्याच्या मसुद्याविषयीची अनभिज्ञता या दोन बाबींमुळे कायद्याचा हा मसुदा कोणत्याही विरोधाविना मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नव्या विद्यापीठ कायद्याचा मसुदा सभागृहामध्ये मांडला होता. कायद्याविषयी कोणतीही चर्चा न होता, अधिवेशन संपल्याने मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा कायदा कोणत्याही परिस्थिती मंजूर व्हायलाच हवा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान कायद्याचा मसुदा पटलावर मांडण्याविषयी नानाविध चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेल्या कायद्याच्या मसुद्याबाबत विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचार करून, सरकारने सुधारित मसुदा तयार केल्याचेही समोर आले. मात्र, या सुधारित मसुद्यामधील तरतुदींबाबत सरकारने गुप्तता बाळगल्याने, या मसुद्याविषयी उच्चशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार संदिग्धता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज हा मसुदा चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या एका कायद्याबाबत ही परिस्थिती असताना, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारी नागपूर दौऱ्यावर येणार असल्याने काँग्रेसमधील सर्व उच्चपदस्थ नेते त्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती पक्षाच्या उच्चपदस्थांनी दिली. नव्या विद्यापीठ कायद्याबाबतच्या चर्चेमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांकडून काही मुद्द्यांबाबत आक्षेप घेण्यात येत होते. नव्या मसुद्यामधील चर्चेदरम्यान काँग्रेस आमदारांकडून आक्षेप पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांच्या नागपूर भेटीच्या पार्श्वभूमीवर हे आक्षेपही क्षीण होण्याचे संकेत आहेत. कुलगुरूंचे अधिकार, आरक्षणांचे निकष, अधिकार मंडळांमधील प्रतिनिधित्त्व आदी मुद्द्यांवरून विधिमंडळात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असले, तरी प्रत्यक्षात सुधारीत मसुद्यातील तरतुदींची पुरेशी माहिती नसल्याने विरोध करायचा तरी कसा या विवंचनेत विरोधक आहेत. त्यामुळेच आज, कायद्याचा मसुदा चर्चेसाठी आल्यास, निर्णय राज्य सरकारच्या बाजूनेच लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 000 नव्या विद्यापीठ कायद्याच्या सुधारित मसुद्याविषयी सर्व संबंधित घटकांशी चर्चा खुली चर्चा व्हायला हवी. गेल्या विद्यापीठ कायद्याचा अनुभव लक्षात घेता, कायद्याला पूरक अशा परिनियमांची निर्मिती होण्यासाठी २० वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे नवा कायदा आणताना त्यासाठी पूरक ठरणाऱ्या परिनियमांचीही वेळीच निर्मिती व्हायला हवी. हे परिनियम नसतील, तर विद्यापीठांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी.

- डॉ. अरुण अडसूळ, माजी प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत तापमानवाढीची शक्यता

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील उकाडा रविवारीही कायम होता. शहरात रविवारी ३९.१ अंश सेल्सिअस कमाल तर, २०.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. येत्या दोन दिवसांत शहरातील तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लोहगाव येथे ४० अंश सेल्सिअस कमाल तर, २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. रविवारी वातावरण अंशतः ढगाळ असले, तरी गरम वारे वाहात असल्याने दुपारी रस्त्यावर फारशी गर्दी दिसून आली नाही. सायंकाळनंतरही हवेत उकाडा जाणवत होता. रविवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी उकाडा कायम होता. रविवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील वर्धा येथे (४३.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुढील दोन दिवस राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

........

प्रमुख शहरांचे कमाल तापमान

शहर तापमान (अंश सेल्सियस)

परभणी ४२.६

नांदेड ४२.५

अकोला ४२.३

नागपूर ४२.२

मालेगाव ४२

सोलापूर ४१.३

जळगाव ४०.६

उस्मानाबाद ४०.५

सांगली ३९.६

सांताक्रूझ ३४.५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुक्त हटाव’वरून राष्ट्रवादीत उभी फूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेतील 'कारभारी' असूनही सातत्याने अवहेलना करणाऱ्या महापालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक होण्याचे ठरविले असून, त्यासाठी 'आयुक्त हटाव' मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मात्र, या मोहिमेवरून पक्षातच दोन गट पडले असून, त्यावर एकमत घडविण्यासाठी आज, सोमवारी तातडीने बैठक घेण्यात येणार आहे.
पक्षाच्या शहराध्यक्षांना अपशब्द वापरणाऱ्या, महापौरांनी आदेश देऊनही त्याला केराची टोपली दाखविणाऱ्या; तसेच पालिकेतील पदाधिकाऱ्यांऐवजी राज्य सरकारच्या हुकूमावर चालणाऱ्या आयुक्तांच्या कारभाराविरोधात पक्षात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे, आयुक्त हटाव मोहिमेसाठी पक्षातून सूत्रे हलत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार करण्यासाठी सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार केले जात आहे. या पत्रावर पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू असले, तरी अद्याप त्याला पुरेसे यश लाभलेले नाही. तसेच, अनेक नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणाऱ्या पत्राचा मसुदा काय असेल, हे आधी दाखवा असा पवित्रा घेत, स्वाक्षरी करण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसून येत असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगीबेरंगी टोप्या, गॉगलचा सहारा

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com पुणे : उन्हाच्या झळांनी वातावरण गरम होत असतानाच, दिलासा मिळविण्यासाठी बाजारपेठेतही नवनवे ट्रेंड दिसू लागले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारच्या टोप्या, रंगीबेरंगी गॉगल' आणि सुती कपड्यांचा वापर वाढला आहे. या उकाड्यात पुणेकरांना थंड हवेचा सुखद अनुभव मिळावा यासाठी नागपूरचे डेझर्ट कुलरही बाजारपेठेत दाखल होत आहेत. शहरातील तापमानाने आता चाळिशीचा टप्पाही गाठला आहे. या परिस्थितीत नागरिकांकडून पंख्यांच्या खरेदीत वाढ झाली आहे. त्यासोबत, कुलर्सच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आहे. कुलरच्या किमती तीन ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. एअर कंडिशनरच्या (एसी) किमती वीस हजार रुपयांच्या पुढे असल्याने त्याला ठरावी ग्राहकांची पसंती मिळत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध आकारच्या खास सुती टोप्या बाजारात आल्या असून, त्यांची मागणीही वाढली आहे. यामध्ये स्पोर्टस प्रकारातील हॅट्सला विशेष मागणी आहे. साधरण दीडशे रुपयांपासून पुढे या टोप्या उपलब्ध आहेत. तीव्र उन्हापासून डोळ्यांचा बचाव होण्यासाठी युवक-युवतींकडून पोलराइज्ड, मर्क्युरी, युव्ही प्रोटेक्शन गॉगलची खरेदी होत आहे. ब्रँन्डेड आणि साधारण अशा दोन्ही प्रकारात गॉगल उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्लास्टिक आणि फायबर ग्लासच्या गॉगल्सना अधिक मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून फिक्या रंगाच्या सुती कपड्यांची मागणी वाढली असून फुल आणि शॉर्ट कुर्त्यांना चांगला उठाव आहे. चेहरा झाकण्यासाठी मोठ्या सुती रुमालांचा आ​णि कापडाच्या मास्कचा वापर वाढला आहे. एकंदरीतच उन्हाला दूर ठेवण्यासाठी उपयोगी पडणारे सर्व साहित्य सध्या बाजारात उपलब्ध झाले आहे. ............. 'वैशाखवणव्या'वर नागपुरी उतारा पुणेकरांची उकाड्यापासून सुटका करण्यासाठी तसेच, थंडगार हवा मिळण्यासाठी खास नागपूरहून 'डेझर्ट' कुलर दाखल झाले आहेत. या कुलरला पुणेकर चांगला प्रतिसाद देत आहेत. दोन ते पाच फूट उंचीच्या या कुलरची किंमत दोन ते चार हजारांच्या दरम्यान आहे. दरम्यान, उष्णतेच्या दाहकतेपासून काहीसा दिलासा मिळण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत पुणेकरांची आईस्क्रीम आणि ज्युस पार्लरमध्ये गर्दी वाढल्याचेही चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हातान्हात हिंडून उष्माघाताचा धोका..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शाळांना सुट्ट्या लागल्याने मैदानांवर मुलांची गर्दी जमू लागली आहे. दिवसभर उन्हात खेळणाऱ्या मुलांसह तसेच नोकरीसाठी बाहेर फिरणाऱ्या नोकरदारांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. परिणामी, उष्माघाताचा फटका बसण्याच्या शक्यतेने डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. घामावाटे शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उष्माघाताबरोबर लघवीचा त्रास वाढला असून, मूतखडा, टायफॉइडचे आजार उदभवण्याची भीती असते. उन्हाळ्यात दिवसभर बाहेर काम अथवा खेळल्याने मुले अथवा नोकरदार मंडळी घरात आल्यानंतर थंड पाणी पितात. त्याशिवाय निरा आणि ऊसाच्या रसाला अधिक प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे कावीळ होण्याचा धोका अधिक असतो. उन्हाळ्यात शरिराचे तापमान वाढते. त्यामुळे थंड पाणी पिण्याकडे अधिक ओढा असतो. परिणामी, खोकल्यासह घशाचे आजार, ताप येण्यासारखे प्रकार घडतात. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, उलटी येणे, ताप अथवा थकवा आल्यासारखे अनेकांना वाटते. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. उन्हामुळे पित्ताचा त्रास देखील सुरू होतो, असे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवित आहेत. उन्हातून घरात येताच थंड पाणी प्यायले जाते. त्यामुळे शरिराचे तापमान गरम आणि थंड पाणी पिल्याने यामुळे सर्दी, खोकला होतो. जुलाब देखील होतात. परिणामी, अशक्तपणा येतो. शरिरातून प्रचंड घाम बाहेर पडत असल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो. .. काय काळजी घ्याल? बाहेरून आल्यानंतर बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिल्यास ठसका लागण्याची शक्यता असते. साधे पाणी प्यावे. लिंबू सरबत प्यावे. उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, द्राक्षे मोसंबी, संत्रे आदी फळे खावीत. आंब्यापेक्षा कैरीची चटणी खावी. त्यात व्हिटॅमिन अधिक असते. कलिंगड द्राक्षे काही वेळ पाण्यात ठेवल्यानंतर खावीत. ज्येष्ठ नागरिकांनी खडीसाखर जवळ बाळगावी. उन्हात जाताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल लावावा. वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावीत घाम भरपूर येत असल्यास ग्लुकॉन डी घ्यावे. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. उन्हात काम करताना सावलीत थोडीशी विश्रांती घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसताच काम थांबवावे. .. काय करू नये फळे खाल्यानंतर पाणी पिऊ नये. मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. उन्हातून आल्यानंतर थंड पाणी पिऊ नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाहूल वसंताची अन् बौद्धिकांची..

$
0
0

वसंत व्याख्यानमालेतून होणार ज्ञानसत्रांना सुरुवात Chintamani.Patki@timesgroup.com मोगऱ्याचा सुगंध, वाळ्याचे सुगंधित अन् थंड पाणी, कैरीचे पन्हे, कैरी घालून केलेली डाळ, ऊसाचा रस आणि आंब्याच्या मोहोराचा सुवास या उन्हाळ्याच्या पारंपरिक चाहुलीबरोबरच दर वर्षी वसंत ऋतूमध्ये पुणेकर व्याख्यानमाला अर्थातच ज्ञानसत्रांची चातकाप्रमाणे वाट पाहतात. बुद्धिवंतांची नगरी या बिरुदावलीने मिरविणाऱ्या पुण्यनगरीमध्ये व्याख्यानांच्या बौद्धिक मेजवानीला वसंत ऋतूबरोबर आरंभ होत आहे. वक्तृत्वोत्तेक सभा आणि या सभेकडून होणारी वसंत व्याख्यानमाला हे पुण्याचे खास वैशिष्ट्यच. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी समाजाचा बौद्धिक स्तर उंचवावा आणि वक्तृत्त्वकलेला उत्तेजन देण्यासाठी १८७४ मध्ये सुरू केलेली ही व्याख्यानमाला आजही सुरू आहे. या ज्ञानसत्राचे यंदाचे १४२ वे वर्ष आहे. वसंत व्याख्यानमाला पूर्वी टिळक स्मारक मंदिराच्या मैदानात होत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही व्याख्यानमाला सभागृहात होत असल्याने श्रोते वसंत ऋतूच्या अनुभवाला मुकले आहेत. तरीही असे अनेक श्रोते आहेत ज्यांच्या येण्यामध्ये अद्याप खंड पडलेला नाही. वसंत व्याख्यानमालेची तेही आतुरतेने वाट पाहात असतात. 'वसंत व्याख्यानमालेमुळे शहरात व्याख्यानांची संस्कृती रूजली. पुणे शहरात वर्षभरात किमान ५० व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. तीन किंवा त्यापेक्षा अधिक व्याख्याने असतील,तर व्याख्यानमाला असे म्हटले जाते. सवाई गंधर्व महोत्सवामुळे जसे कान घडले तसेच, व्याख्यानांमुळे श्रोते घडले आणि घडत आहेत,' असे व्याख्यानमाला समन्वय समितीचे सचिव डॉ. मंदार बेडेकर सांगतात. ही व्याख्यानपरंपरा स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली. सार्वजनिक गणेशोत्साच्या काळात मेळे साजरे होत असत. या उत्सवांमध्ये वैचारिक मंथनाच जबाबदारी व्याख्याने पार पाडत. पुण्यात फर्डे वक्ते आणि व्याख्यानमालांनी अनेक पिढ्या घडवल्या. स्वातंत्रपूर्व काळापासून ते अगदी आतापर्यंत या व्याख्यानांनी अनेकांच्या मनात स्फुल्लिंग पेटवले. ​दूरचित्रवाणी, इंटरनेट, मोबाइल अशा माध्यमांमुळे श्रोत्यांची संख्या घटली असली तरी, पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत या व्याख्यानांचे अढळ स्थान कायम राहिले आहे आणि यापुढेही राहणार आहे. -------------------------- शहरभर व्याख्यानमालांचा विस्तार वसंत व्याख्यानमालेनंतर अलीकडच्या काही वर्षांत शहर विस्तारत गेले, तसे स्थानिक भागांतही विविध व्याख्यानमाला सुरू झाल्या. त्यामुळे, कोथरूड-पौड रोड, सहकारनगर, शहराचा पूर्व भाग, येरवडा-विमाननगर अशा विविध ठिकाणी २-३ दिवसांच्या व्याख्यानमाला आता श्रोत्यांना घडविण्याचे काम करत आहेत. .......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानोपानी, फांदोफांदी फुलांची रंगपंचमी

$
0
0

अनुभवा बहावा, नीलमोहर, गुलमोहराची मुक्तहस्ते उधळण Chaitrali.Chandorkar@timesgroup.com पुणे : वसंत ऋतूला आरंभ झाला की वृक्षांनाही नव्या पालवीचे वेध लागतात आणि उघड्याबोडक्या फांद्यांवर रंगीबेरंगी फुलांची यथेच्छ रंगपंचमी सुरू होते. या प्रसन्न दृश्यामुळे उन्हाळ्यात भरदिवसा जाणवणारा उकाडा, उन्हाचे चटके यांतून अल्पसा का होईना दिलासा मिळतो. यंदाचे वर्षही अपवाद ठरलेले नाही. आताही एकीकडे उन्हाचा पारा चढलेला असताना शहरातील वृक्षांमध्ये रंगांची मुक्तहस्ते उधळण करण्याची अहमहमिका सुरू आहे. पानझडीच्या वृक्षांची पर्णगळती सुरू झाली असून, काही ठिकाणी नवी पालवी बहरली आहे. बहुतांश झाडांवर फुलांची दाटी झाली आहे. वृक्षांचे हे नवे रूप निसर्गप्रेमींना खुणावत असून, बोडक्या टेकड्या, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे आणि बागांमधील झाडे रंगीबेरंगी फुलांनी सजली आहेत. मराठी कॅलेंडरनुसार साधारणतः चैत्राची चाहूल लागली की झाडाची पाने गळायला सुरुवात होते. ती सुरू होते. त्यानंतर वैशाखपर्यंत टप्प्याटप्याने फुले फुलतात. शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी सध्या बहावा फुलायला लागला आहे. पुढील महिन्यात हे पूर्ण झाड पिवळ्याधमक फुलांच्या झुंबरांनी व्यापलेले बघायला मिळेल. त्यामुळेच शहरातील अनेक सोसायट्या, रस्त्यांच्या कडेला, बंगल्यांच्या आवारात, टेकड्यांवर लावलेला बहावा लक्षवेधक ठरणार आहे, यात शंकाच नाही. बहावा हा अस्सल देशी वृक्ष असून, त्याला ऋग्वेदातही राजवृक्ष म्हणून गौरविण्यात आले आहे. साहित्यिक, लेखक आणि चित्रकारांच्या लाडक्या गुलमोहरावरही सध्या लालचुटूक फुलांनी एकच गर्दी केली आहे. शहरातील टेकड्या, मध्यवर्ती पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये हा वृक्ष पाहण्यास मिळेल. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांतच फुलांनी व्यापलेला डेरेदार गुलमोहर बघायला मिळेल. निसर्ग अभ्यासक गुलमोहर आणि बहाव्याच्या फुलांना नैसर्गिक हळद-कुंकवाची उपमा देतात. गुलमोहराप्रमाणेच अनेक उद्यानांच्या आणि सोसायट्यांच्या बाहेर सध्या नीलमोहरही फुलला आहे. मूळच्या दक्षिण अमेरिकेतील या वृक्षाला 'निळा जांभळा जॅकरांडा' असेही म्हणतात. या शिवाय उन्हाळ्यातील पुष्पसौंदर्यामध्ये पांढरा चाफा, पिवळ्या फुलांचा पेल्टोफोरम, सिल्व्हर ओक, कॉपर पॉड या विदेशी झाडांचाही समावेश आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ही झाडेदेखील फुललेली पाहायला मिळतील. मूळचा ब्राझीलमधील लाल शिरीष अर्थात गुलाबी फुलांच्या रेन ट्रीही आता फुलांनी लगडला आहे. हे झाड छान सावली देणारे असल्याने उन्हात फिरणारी मंडळी रेनट्री दिसल्यावर आवर्जून थांबतात. जंगली महाराज रस्ता, नामदार गोखले रस्त्यासह शहरातील सर्व मोठ्या रस्त्यांवर हा वृक्ष आहे. केवळ शहरातच नव्हे तर, डोंगरदऱ्यांमध्येही या अनोख्या रंगपंचमीला सुरुवात झाली आहे. लाल फुलांचे अशोक, फुललेला रानपांगारा हे सौंदर्याची परिसीमा गाठणारे देखणे वृक्ष आहेत. या वृक्षांचे अनोखे सौंदर्य काही काळ सर्व अडचणी, ​चिंता विसरून क्षणभर का होईना, मोहीत करतातच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमान प्रवाशांना ‘उन्हाळी सवलती’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विमान कंपन्यांनी हवाई वाहतुकीसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. तिकीटदरात पन्नास टक्के सूट यांपासून तीन हजार रुपयांत परदेश दौऱ्यापर्यंत विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे.

'स्पाइस जेट'ने 'फ्रेंड्स व फॅमिली' यांच्यासाठी ग्रुप बुकिंगवर (किमान चार व त्यापेक्षा अधिक) २५ टक्के सूट दिली आहे. तसेच, स्पाइस क्लब कार्डधारकांना ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. स्पाइस जेट, गो-एअर, एअर एशिया, जेट एअरवेज आदी कंपन्यांनी योजना जाहीर केल्या आहेत.

'गो-एअर' कंपनीने 'हॅप्पी मंगळवार' ही योजना जाहीर केली आहे. यामध्ये २८ जूनपर्यंत दर मंगळवारी तिकिटावर २० टक्के सूट दिली आहे. याचा लाभ २८ जूनपर्यंतच घेता येणार आहे. कंपनीने डिफेन्स, पोलिस आणि निमलष्करी दलामध्ये काम करणारे आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मूळ तिकिटावर ३५ टक्के सूट देणारी एक योजना जाहीर केली आहे.

३१ सप्टेंबरपर्यंत तिकीट बूक करून, ३१ डिसेंबरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा आहे. त्यामध्ये संबंधित

कर्मचारी व त्यांच्या अवलंबून असलेल्यांना (उदा- आई, वडील, मुले) हे लागू आहे.

एअर एशिया कंपनीकडून कोची ते बँकॉक प्रवासासाठी दोन हजार ९९९ तिकीट आणि चेन्नई, बेंगळुरू येथून बँकॉकसाठी पाच हजार ३९९ तिकीट दर आकारण्यात येत आहे. ही योजना १७ एप्रिलपर्यंत राहणार आहे. तोपर्यंत तिकीट बूक करणाऱ्यांच त्याचा लाभ घेता येणार आहे. जेट एअरवेजने १७ एप्रिलपर्यंत तिकीट बूक करणाऱ्या प्रवाशांना देशांतर्गत प्रवासासाठी विशिष्ट मार्गांवर तिकीटदरात ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. त्यामध्ये पुणे-दिल्ली, दिल्ली-पुणे या

मार्गाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेसोबत लढणार की स्वतंत्र राहणार?

$
0
0


पालिका निवडणुकीसाठी भाजपची आज रणनीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने धोरण ठरविण्यासह संघटना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची आज, सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाची रणनीती ठरविली जाणार असल्याची चर्चा आहे. भविष्यात शिवसेनेसोबत लढायचे की स्वतंत्र राहायचे याबाबतही विचार-विनिमय होणार असल्याची चर्चा आहे.

भाजपच्या शहराध्यक्षपदी नुकतीच योगेश गोगावले यांची निवड झाली. त्यानंतर, गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारी करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेना वारंवार सरकारविरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे, युती करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, अशा सूचना प्रदेश बैठकीत केल्या गेल्या. त्यामुळे, युतीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याबाबतही भाजपच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

दोन वर्षांपूर्वी केंद्रात आणि त्यापाठोपाठ लगेच राज्यात सत्तेपर्यंत पोहोचलेल्या भाजपला आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सत्तेपर्यंत पोहोचायचे आहे. पुढील वर्षी एकाचवेळी १० महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने त्यातील जास्तीत जास्त ठिकाणी सत्ता संपादित करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. पुणे महापालिकेत आत्तापर्यंत कायमच विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिलेल्या भाजपला सत्ता प्राप्त करण्यासाठी पुढील वर्षीची निवडणूक सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे. म्हणूनच, आत्तापासूनच पक्षाचे संघटन मजबूत करून कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी नूतन अध्यक्षांनी तातडीने शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली आहे.

..................

प्रभागावरही होणार चर्चा

भाजपच्या सोमवारच्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रभाग दोन सदस्यीय हवा, की चार सदस्यांचा केला तर पक्षाला फायदा होईल, याबाबतही चाचपणी होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूक प्रभाग पद्धतीनेच घेण्याचे सरकारने जवळपास निश्चित केले असून, चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास पक्षाला जास्त जागा मिळू शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर चार सदस्यांच्या प्रभागाला विरोध असून, आत्ताप्रमाणेच दोन सदस्यांचाच प्रभाग असावा, अशी भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे, या बैठकीत प्रभागाच्या रचनेवरील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येणार असून, ती वरिष्ठांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस उन्हाळ्याचे आगी लागण्याचे...

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com पुणे : शहरातील तापमानातील सातत्यपूर्ण वाढ आगीला कारणीभूत ठरते आहे की काय, अशी शंका येण्याची सध्या परिस्थिती आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासून दररोज सरासरी दहा ते बारा आगीच्या वर्दी येत आहेत. नागरिकांनीही सतर्कता बाळगून सोसायट्यांमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. शॉर्ट सर्किट आणि स्वयंपाकाच्या गॅसची गळती ही आगीची दोनच मुख्य कारणे असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास आगीच्या घटना रोखण्यास निश्चित मदत होईल. उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांमध्ये तीन महिन्यांत आगीच्या सहाशे घटना घडल्या आहेत. या दरम्यानच शहरात काही ठिकाणी दुचाकी जाळण्याचे प्रकार घडले आहेत. या आगी ठरवून लावल्याचेही नंतर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. आग लागल्यानंतर नागरिकांकडून ती विझवण्याचा प्रयत्न केला जातो, हे स्तुत्यच आहे. मात्र, अशा घटनांची व्याप्ती पाहून अग्निशमन दलाला तत्काळ सूचना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. कचरा पेटवल्यामुळे अथवा उन्हामुळे कचरा पेटल्यामुळे आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आग लागू नये या साठी आणि आग लागल्यानंतर योग्य ती काळजी घेतल्यास अनेक अपघात टाळता येतील. शहरातील बहुतांश आगींमागे शॉर्टसर्किट आणि गॅसची गळती ही दोनच मुख्य कारणे असल्याचे दिसून येते. या दोन गोष्टींबाबत काळजी घेण्याची खूप गरज आहे. नागरिकांनी गॅसची गळती होणार नाही, या बाबत नेहमी दक्षता घ्यावी. गॅसचा रेग्युलेटर बंद केला आहे का, हे घरातून बाहेर पडताना आणि रात्री झोपताना अवश्य तपासावे. इमारतीचे वायरिंग चार ते पाच वर्षांनी तपासून, बदलून घ्यावे. त्यामुळे शॉर्टसर्किटच्या घटना टळतील. तसेच, घरामधील फर्निचरला अग्निरोधक रंग लावल्यास त्यांचे संरक्षण होते. याच प्रमाणे इमारतीमधील फायर सिस्टीम अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

..

हे करा...

गॅसगळती थांबवा. गळती झाल्यास दारे-खिडक्या उघडा.

इमारतीमध्ये आग लागल्यास इमारत रिकामी करा.

स्वतःबरोबरच इतरांचाही जीव वाचवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस तीव्र झळांचा..रात्रही उकाड्याची..

$
0
0

आणखी दोन महिने उन्हाचा जाच

Prasad.Panse@timesgroup.com

पुणे : दिवसभर रणरणत्या उन्हामुळे घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर पडूच नये, असे वातावरण सध्या पुणेकर अनुभवत आहेत. किमान तापमानातही वाढ झाल्याने दिवसभराच्या काहिलीनंतर सायंकाळी तरी, काहीसा दिलासा मिळेल, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. परिणामी पुणेकरांना दिवसा आणि रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे आणि पुढील दोन महिने अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.

मार्चच्या अखेरच्या आठवड्यातच शहरातील कमाल तापमान ३८-३९ अंशांच्या घरात होते. एप्रिल उजाडला तोच ४० अंश तापमानाने... एप्रिलच्या पहिल्या तीन चार दिवसात कमाल तापमानाची चाळिशी कायम होती. किमान तापमानही थेट २२ अंशांवर गेल्याने दिवसा आणि रात्रीही उकाडा कायम होता. सततच्या उकाड्यानंतर पावसाने हजेरी लावली अन् तापमानात काहीशी घट झाली. परंतु, गेल्या दोन दिवसात पुन्हा पारा ३९ अंशांपर्यंत येऊन ठेपला आहे.

एप्रिल हा सर्वाधिक उकाड्याचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा अनुभवायला मिळतात. उन्हापासून बचावासाठी पुणेकर भर उन्हात बाहेर पडण्याचे टाळतात किंवा टोपी, छत्री, सनकोटसारख्या साधनांचा वापर करत असल्याचेही चित्र आहे. भर दुपारी बाहेर पडावे लागल्यास अगदी सिग्नललाही झाडांच्या सावलीखाली विसावा घेतला जातो. उन्हामुळे होणारी काहिली शमविण्यासाठी रसवंतीगृह, आईस्क्रीम पार्लरचा आधारही घेतला जातो. मे महिन्यातही उकाडा कायम असला, तरी एक दोन वळवाच्या सरीनंतर त्याची तीव्रता काहीशी कमी होते.

दरम्यान, यंदाचा उन्हाळा देशासाठी 'तापदायक' ठरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहून, तीव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या वर्षी मे हिन्यातील उष्णतेच्या लाटेने सुमारे २५०० जणांचा बळी घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेधशाळेने मान्सूनप्रमाणेच उन्हाळ्यातील कमाल तापमानाचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे. हा अंदाज एप्रिल ते जूनपर्यंत लागू असेल.

या अंदाजानुसार कमाल, किमान आणि दिवसाचे सरासरी तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रताही सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटांची शक्यताही या अंदाजात वर्तवण्यात आला आहे.

वाढत्या तापमानाची कारणे

या वर्षीच्या जानेवारीचे तापमान गेल्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाचे, तर फेब्रुवारीचे तापमान गेल्या शतकातील सर्वोच्च पातळीवर नोंदले गेले. गेल्या काही वर्षांत भारतातील उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता वाढली असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. या स्थितीमागे वाढते वायू प्रदूषण, हिंदी आणि प्रशांत महासागरामधील स्थिती आणि तीव्र एल निनो कारणीभूत असल्याचा निष्कर्ष वेधशाळेने काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. आंबेडकरांनीच केली हिंदुंची खरी व्याख्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी सांगितलेल्या विचारांवर काम करणारे असंख्य कार्यकर्ते सध्या देशात आहे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेल्या विचारांवर काम करणारे कुठे आहेत, याचा विचार जनतेने करावा,' असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव यांनी रविवारी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुंची खरी व्याख्या केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक समरसता मंचाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले समरसता पुरस्कार प्रदान समारंभात जाधव बोलत होते. जाधव यांच्या हस्ते श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ या संस्थेला, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या कोषाध्यक्ष रजनी जोशीराव यांना महात्मा ज्योतिबा फुले समरसता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्यावतीने रमेश मेहेर यांनी तो स्वीकारला. मंचाचे अध्यक्ष नंदकुमार राऊत या वेळी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, 'डॉ. हेडगेवार यांच्या विचारांवर असंख्य कार्यकर्ते सामाजिक कार्यासाठी काम करीत आहेत; तसेच संघाच्या विचारावर सामाजिक क्षेत्रात विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना कार्यरत आहेत. मात्र, नेहरू यांनी सांगितलेल्या विचारांवर काम करणारे कुठे आहेत, याचा विचार करावा. पूर्वीपासूनच भारतीय समाजावर आक्रमण होत आले. त्यामुळे समाज विखरत गेला. त्यातून जाती व्यवस्था निर्माण झाली. जाती व्यवस्था संपविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने विचार करण्याची गरज आहे.'

बांगड यांनी रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. मेहेर आणि जोशीराव यांनी मत व्यक्त केले. या वेळी राम बांगड यांच्या पत्नी चंद्रकला बांगड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या ऋषीकेश गोरे आणि भारती बोराडे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राऊत यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images