Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कुलपती घेणार कुलगुरूंची ‘परीक्षा’

$
0
0
राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षा प्रक्रियांचे ऑटोमेशन करण्यासाठी संबंधित विद्यापीठांनी उचललेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ३ नोव्हेंबरला राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक बोलवली आहे.

‘डिस्कव्हरी ऑफ इंडियन्स’ संकल्पना राबविण्याची गरज

$
0
0
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या साठ वर्षांमध्ये देशाला समजून घेण्यासाठी आपण काहीच केले नाही. त्यामुळे सध्या डिस्कव्हरी ऑफ इंडियाची नव्हे तर डिस्कव्हरी ऑफ इंडियन्स ही संकल्पना राबवित माणसाचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समिक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी मंगळवारी व्यक्त केले.

शेतीमालाच्या खरेदीसाठी पणन महासंघामार्फत केंद्रे

$
0
0
शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नसलेल्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याची कार्यवाही जिल्हाधिका-यांनी करावी, अशा सूचना पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

जनावरांची बेकायदा हत्या रोखावी

$
0
0
बकरी ईदच्या दिवशी राज्यात जनावरांची बेकायदा हत्या रोखण्याचे आदेश राज्य सरकारने पोलिस खात्यांना दिलेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत हे आदेश कोणत्याही पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले नसल्याने कत्तलखाने चालविणा-यांचे हित साधत आहे.

पुण्यात बकरी ईद शनिवारी होणार

$
0
0
राज्य सरकारने बकरी ईदची सुट्टी शुक्रवारी जाहीर केली असली तरी मुस्लीम बांधवाच्या कॅलेंडरनुसार शनिवारी (२७ ऑक्टोबर) बकरी ईद साजरी केली जाणार आहे.

एसटी आता सुटणार... घरापासून!

$
0
0
दिवाळीच्या सुटीत परगावी जाणा-यांच्या सोयीसाठी एसटीतर्फे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एकाच गावाला जाणा-या ४५ जणांच्या सोसायटीतील ग्रुपने एसटीकडे बुकिंग केल्यास त्यांना घराच्या ठिकाणी बस उपलब्ध करुन देण्याची योजना एसटीतर्फे यंदा प्रथमच राबवण्यात येणार आहे.

हायकोर्टाचे पालिकेवर ताशेरे

$
0
0
सर्वसाधारण सभेमध्ये मूळ विषयपत्रिकेतील प्रस्तावांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर निर्णय होऊ नये, असे आदेश देत हायकोर्टाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सभा कामकाजाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असेही स्पष्ट केले आहे.

भारती विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी

$
0
0
अभिमत विद्यापीठांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे टंडन समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार भारती विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे.

जुन्या हद्दीतील कॅनॉलवर रस्त्याचे आरक्षण

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीतील बहुचर्चित कॅनॉलवर विकास आराखड्यामध्ये अखेर रस्त्याचे आरक्षण सुचविण्यात आले आहे. दरम्यान, जुन्या हद्दीमध्ये टेकड्यांवर चार टक्के बांधकामास परवानगी देण्यात आल्याने समाविष्ट गावांत बीडीपी आणि जुन्या हद्दीत बांधकाम, अशी एकाच शहरात दुहेरी भूमिका घेतल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

आराखड्यात एफएसआयचा पाऊस

$
0
0
शैक्षणिक संस्थांपासून हॉटेलपर्यंत आणि हॉस्पिटलपासून स्वच्छतागृहांपर्यंत अशा सर्वांसाठी विकास आराखड्यात अतिरिक्त एफएसआयचा पाऊस पाडण्यात आला आहे. शहराच्या जुन्या हद्दीत मोकळ्या जागांचा अभाव आणि निधीची चणचण यांमुळे प्रत्येक योजनेसाठी महापालिकेला एफएसआयचा आधार घ्यावा लागल्याची चर्चा सुरू आहे.

सार्वजनिक वापरासाठी १ हजार ८० हेक्टरची ९२१ आरक्षणे

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी एक हजार ८० हेक्टरची सुमारे ९२१ आरक्षणे सुचविण्यात आली आहेत. दरम्यान, हा विकास आराखडा हा ग्रीन डीपीच असल्याचा दावा शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांनी केला.

विविध भागांत मेट्रोच्या सहा मार्गांचे आरक्षण

$
0
0
वनाझ ते रामवाडी या मान्यताप्राप्त मेट्रोमार्गासह शहराच्या विविध भागांमध्ये सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर मेट्रोच्या सहा मार्गांचे आरक्षण विकास आराखड्यात सुचविण्यात आले आहे. तसेच रस्ते आणि पार्किंगला चालना देण्यासाठीही विविध योजना मांडण्यात आल्या आहेत.

रेनवॉटर हार्वेस्टिंग आता बंधनकारक

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीत तीनशे चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावरील इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर वॉटर हीटर बसविणे आता बंधनकारक ठरविण्यात येणार आहे.

स्वप्नातील घर सत्यात!

$
0
0
परवडणाऱ्या घरांना अडीच एफएसआय, बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी ०.३३ टक्के प्रीमियम एफएसआय, पूरग्रस्त वसाहतींना अडीच एफएसआय, जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी योजना आदींची तरतूद पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) करण्यात आल्याने स्वतःचे घर नसणाऱ्यांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहाता येणार आहे.

मणक्याच्या सर्जरीत कम्प्युटरमुळे अचूकता

$
0
0
कुबड तसेच वक्र झालेल्या मणक्याला सरळ करण्यासाठी आता ‘कम्प्युटर नेव्ह‌िगेशन’च्या तंत्राचा फायदा होणार असून त्यामुळे मणक्याच्या सर्जरीत पूर्वीपेक्षा अचूकता येणार आहे. यामुळे पेशंटला लवकर घरी जाता येणार असल्याने ताठ चालता येणे आता शक्य होणार आहे.

पाणी द्या, अन्यथा आंदोलन...

$
0
0
महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी करूनही मांजरी बुद्रुक येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. याच भागात असलेल्या राजकीय पक्षांच्या संस्थांना एक न्याय आणि पालिकेची पाणीपट्टी नियमित भरणाऱ्या ग्रामस्थांना दुसरा न्याय कशासाठी, असा संतप्त सवाल ना‌गरिकांनी केला आहे.

घुबडांच्या कथा उलगडणार ‌कॉमिक्समधून

$
0
0
घुबडाचे नाव जरी काढले तरी, 'त्याचे दर्शन अशुभ आहे, तो भीतादयक पक्षी आहे', अशी प्रतिक्रिया पटकन ऐकायला मिळते. काळ्या जादूचे बळी ठरणाऱ्या घुबडांविषयीची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी इला फाउंडेशनने 'सिक्रेट स्कूल ऑफ आउल्स' हे एक अनोखे पुस्तक तयार केले आहे.

हवेली पंचायत ‌समितीच्या वेबसाइटचा फायदा गरजूंना

$
0
0
समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी हवेली पंचायत समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वेबसाइटचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

आदिवासी चित्रपट महोत्सवाचे उद्या आयोजन

$
0
0
आदिवासी संस्कृतीची वैशिष्ट्ये नगर संस्कृतीला उलगडून दाखविण्यासाठी तसेच आदिवासी अस्मिता सजग ठेवण्याच्या उद्देशाने बहुरंग संस्थेतर्फे आदिवासी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवारी (ता. २७) दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथील थिएटरमध्ये हा महोत्सव होणार आहे.

कम्प्युटर साक्षरतेसाठी बदलांचा आढावा घ्या

$
0
0
कम्प्युटर आणि त्या आधारे निर्माण झालेल्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामुळेच कम्प्युटर साक्षर समाज घडविण्यासाठी या बदलांचा आढावा घेत भविष्याकडे वाटचाल करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कम्प्युटर तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images