Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्मार्ट सिटी’साठी स्वतंत्र कंपनी स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (पीएससीडीसीएल) या स्वतंत्र कंपनीच्या स्थापनेची औपचारिकता बुधवारी पूर्ण झाली. या कंपनीची नोंदणी झाली असल्याने, केंद्र-राज्याकडून मिळणाऱ्या निधीचा मार्गही मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या २० शहरांनी निधी प्राप्त करण्यासाठी ३१ मार्चपूर्वी कंपनी स्थापन करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेतर्फे कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या कंपनीमध्ये १५ संचालक असतील. त्यात, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते हे चार पदसिद्ध संचालक असतील. त्याशिवाय, दोन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना संचालक म्हणून संधी मिळणार आहे. त्याचा निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जाईल. राज्य सरकारतर्फे विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, नगररचना विभागाचे सहसंचालक आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदसिद्ध संचालक म्हणून काम पाहतील. या व्यतिरिक्त केंद्र सरकारचा एक संचालक, दोन स्वतंत्र संचालक, आयुक्त आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संचालक मंडळावर असतील. 'स्मार्ट सिटीच्या स्थापना झाली असून, लवकरच संचालक मंडळाची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत पुणेकरांच्या सहभागातून स्मार्ट सिटीमध्ये निवडण्यात आलेल्या प्रकल्पांना गती कशी देता येईल, याचा प्राधान्याने विचार होईल. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने कंपनीचे काम चालेल', अशी माहिती महापालिका आयुक्त आणि कंपनीचे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टर ढकलताहेत स्ट्रेचर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पश्चिम महाराष्ट्रातील 'गरीबांचे हॉस्पिटल' समजल्या जाणाऱ्या ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेकदा पेशंटना स्ट्रेचरवरून नेणे किंवा स्ट्रेचरवरून आलेल्या पेशंटला उचलून बेडवर ठेवण्याचे काम डॉक्टरांनाच करावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली ससून अभ्यागत मंडळाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही विदारक परिस्थिती शिरोळे यांच्यापुढे मांडली. त्या वेळी भाग्यश्री मंठाळकर, डॉ. शिशिर जोशी, डॉ. एन. पी. राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते. ससूनच्या समस्या मांडण्याबाबत उपस्थित डॉक्टरांना खासदार अनिल शिरोळे यांनी सूचना केली. ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अधिक आहेत. कर्मचारी नसल्यामुळे पेशंटचे स्थलांतर करणे, त्यांना वॉर्डात नेणे, बेडवर ठेवणे किंवा स्ट्रेचरवर ठेवणे यासारख्या कामासाठी वॉर्डबॉयसारखे कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा ही कामे निवासी डॉक्टरांनाच करावी लागत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. रिक्त पदांची माहिती आपल्याला द्यावी, त्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिरोळे दिले. ससून हॉस्पिटलवर पेशंटचा ताण वाढत आहे. पेशंटना गुणवत्तापूर्ण उपचार देणे शक्य होत नाही. किरकोळ आजाराचे पेशंट पालिकेच्या दवाखान्यात पाठविल्यास ससून हॉस्पिटलमध्ये टर्शरी केअर उपचार देणे शक्य होईल, याकडे डॉ. शिशिर जोशी यांनी लक्ष वेधले. पालिकेच्या हद्दीतील किरकोळ आजाराच्या पेशंटना जर त्यांच्या दवाखान्यात उपचार मिळाले तर त्यांना ससूनमध्ये यावे लागणार नाही. तसेच औषधांसाठी ससूनमध्ये गर्दी करणाऱ्या पेशंटना पालिकेच्या इतर दवाखान्यात उपलब्ध झाली तर ससूनमध्ये गर्दी होणार नाही. गुणवत्तापूर्ण आणि टर्शरी केअर उपचार देता येईल, अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली. ससून हॉस्पिटल आवारात स्वच्छता आढळत नाही. पेशंटसह नातेवाइकांना त्याचा त्रास होतो, याकडे शिरोळे यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर येत्या एक एप्रिलला ससून हॉस्पिटलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय शिरोळे यांनी घेतला. हृदयविकाराच्या पेशंटसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमती आदी विषयांवर पहिल्या बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिप्र’ निवडणुकीत ‘सीएमओ’चे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील एक महत्त्वाची शिक्षणसंस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानेही रस घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही प्रमुख आणि या संस्थेतील एका माजी सत्ताधारी प्रभावशाली गटाने परिवर्तन पॅनेलची मोट बांधली असून, पूर्वीच्या नियामक मंडळातील दोन सदस्यही या पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने निवडणुकीला रंग चढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर आणि चिपळूण अशा ठिकाणी ४० शाळा-कॉलेजेस असलेल्या या शिक्षणसंस्थेत जवळपास ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शिक्षणक्षेत्रात या संस्थेचा मोठा दबदबा आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी परिवर्तन पॅनेलची मोट बांधण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही प्रभावशाली व्यक्तिंनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. तसेच उमेदवार निवडीसंदर्भात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक 'हाय प्रोफाइल' बनली आहे. त्याबरोबरच संस्थेतील माजी पदाधिकारी सुनिल राडकर यांचाही आशीर्वाद या पॅनेलला असल्याचे सांगण्यात येते. पूर्वीच्या सत्ताधारी पॅनेलमधील जयंत किराड आणि सतीश पवार हे नियामक मंडळाचे माजी सदस्य परिवर्तन पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत; तसेच आमदार माधुरी मिसाळ याही या पॅनेलतर्फे निवडणूक लढवित आहेत. येथील विविध शिक्षणसंस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मानणाऱ्यांची सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक प्रभावशाली शिक्षणसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी ही चढाओढ सुरू झाल्याचे सांगण्यात येते. या पॅनेलमध्ये श्रीकृष्ण चितळे, ज्येष्ठ वकील एस. के. जैन, वसंत देसाई, मिहीर प्रभुदेसाई, दामोदर भंडारी आणि अशोक वझे यांच्यासह पुरुषोत्तम कुलकर्णी व राजेश पटवर्धन (सोलापूर) आणि सुरेश देवळे (मुंबई) यांचा समावेश आहे. दोन्ही पॅनेलमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. येत्या बुधवारी (३० मार्च) मतदान होणार असून यंदा प्रथमच मतदारांनी मतदान केंद्रांवर येऊन मतदान करण्याची तरतुदही वादात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महोत्सवाचा खर्च अकरा लाखांवर

$
0
0

रमाबाई आंबेडकर महोत्सवात तीनच कार्यक्रम म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे महापालिकेच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती‌निमित्त आयोजित‌ महोत्सवाचा खर्च तीन लाखांवरून अकरा लाखांच्या घरात गेला आहे. एवढा निधी खर्च करूनही यंदा तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अवघे तीनच कार्यक्रम होणार असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जयंतीला दीड महिना उलटल्यानंतर पालिका हा महोत्सव कोणाच्या फायद्यासाठी घेत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती ७ फेब्रुवारीला असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेतला जातो. गेल्या वर्षी या महोत्सवात चर्चासत्र, एकपात्री नाटक, परिसंवाद, महाचर्चा, व्याख्यान, महिला कवी संमेलन, वाद संवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेने यासाठी २ लाख ९५ हजार रुपये निधी खर्च केला होता. मात्र यंदा या महोत्सवासाठी तब्बल ११ लाख रुपये खर्च करण्याचा घाट घातला जात आहे. २५ ते २७ मार्च दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसांच्या महोत्सवामध्ये गायक नंदेश उपम, आनंद शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम तसेच स्नेहा गायकवाड यांचे एकपात्री नाटकाचे प्रयोग या कार्यक्रमांसाठी तब्बल ११ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप फुले शाहू आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केला. जयंतीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात हा महोत्सव घेण्यात यावा, असा प्रस्ताव आंबेडकर स्मारक समितीने दिला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करून रमाबाई यांची जयंती होऊन दीड महिना उलटल्यानंतर हा महोत्सव घेतल्याचे गायकवाड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचे आयुक्त होणार पोलिस महासंचालक

$
0
0

पुण्याचे आयुक्त होणार पोलिस महासंचालक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचे पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची पदोन्नती झाली असून, ते आता पोलिस महासंचालक झाले आहेत. पाठक महिनाअखेरीस निवृत्त होत असल्याने, राज्य सरकारने पुणे पोलिस आयुक्तांचे पद प्रथमच पोलिस महासंचालक दर्जाचे केले आहे. त्यामुळे पाठक पुणे आयुक्तपदी असतानाच पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त होतील.

मुंबईपाठोपाठ पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी पाठक यांची पदोन्नती केल्याचे आदेश काढले आहेत. पाठक १९८२ च्या 'आयपीएस' बॅचचे अधिकारी असून, ते मार्चअखेरीस निवृत्त होत आहेत. गेल्या महिनाअखेरीस पोलिस महासंचालक विजय कांबळे यांच्या​ निवृत्तीनंतर पाठक यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्या निवृत्तीला एकच महिना असल्याने त्यांना मार्चमध्ये पदोन्नती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

राज्य सरकारने २२ मार्च रोजी त्यांना पदोन्नती देत त्यांची नियुक्ती पुण्याच्या आयुक्तपदीच कायम ठेवली. त्यासाठी पुण्याच्या आयुक्तपदाची दर्जोन्नती करत हे पद अप्पर पोलिस महासंचालकाचे पोलिस महासंचालक करण्यात आले. पुण्याच्या आयुक्तपदी असताना आणि तेही पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त होणारे पाठक त्यामुळे पुणे आयुक्तालयाच्या इतिहासात पहिले अधिकारी ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई-बापांनाच जेव्हा मूल नकोसे होते...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड येथील नक्षत्र सोसायटीच्या बाहेरील बाकड्यावर दोन महिन्यांचे बाळ आढळले. 'काही कारणास्तव बाळाला सोडून जात आहोत. पुन्हा येऊन घेऊन जाऊ, अभागी आई-बाप..' अशा आशयाची चिठ्ठी बाळाजवळ पोलिसांना सापडली आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२४ मार्च) रात्री दहाच्या सुमारास दोन महिन्यांचा मुलगा प्रेमलोक पार्क येथील नक्षत्र सोसायटीच्या बाहेरील बाकड्यावर एक अज्ञात व्यक्ती ठेवून गेली. सोसायटीत राहणाऱ्या लोकांना बाळ रडत असल्याचा आवाज आला. त्यानंतर नागरिकांनी चिंचवड पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या बालकाला ताब्यात घेतले आहे. 'काही कारणास्तव बाळाला सोडून जात आहोत. पुन्हा येऊन घेऊन जाऊ, अभागी आई-बाप..' अशा आशयाची चिठ्ठी बाळाजवळ पोलिसांना सापडली. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असल्याने त्याला सोडून देण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फौजदार आर. टी. बागूल तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पांचे खासगीकरण हे तर ‘कंपनीराज’

$
0
0

आयुक्तांच्या निर्णयाला राजकीय पक्षांचा विरोध म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची जबाबदारी खासगी‌ कंपनीकडे देऊन लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव महापालिका प्रशासनाने आखला आहे. ही योजना कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा पवित्रा महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. लोकप्रतिनिधींचे महत्त्व जाणूनबुजून कमी करून 'कंपनीराज' आणण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीला अत्यंत घातक असल्याने त्याला वेळीच विरोध करण्याचा निर्णय राजकीय पक्षांनी घेतला आहे. शहरात स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली 'स्पेशल पर्पज व्हेइकल'ची (एसपीव्ही) स्थापना करण्याचा निर्णय यशस्वी झाला. त्यामुळे तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची सूत्रे खासगी कंपनीकडे सोपविण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. मेट्रो, घनकचरा व्यवस्थापन, एचसीएमटीआर याबरोबरच चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी खासगी कंपनीची मदत घेण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पुणे सिटी कनेक्ट या संस्थेमार्फत या प्रकल्पांचे काम करण्यासाठी 'शहर परिवर्तन कक्ष' स्थापन करण्यात येणार आहे. हा कक्ष स्थापन करण्याची मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्त कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. लोकांनी मतदानाच्या जोरावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम आयुक्त करत असल्याची टीका महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी केली. 'कंपनीराजच्या माध्यमातून प्रत्येक प्रकल्प मार्गी लागणार असेल तर महापालिका बरखास्त करायची का? ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक असून याला वेळीच विरोध होणे गरजेचे असल्याने मनसे अशा प्रस्तावांना विरोध करेल', असे संभूस यांनी सांगितले. तर पालिकेच्या स्वायत्तत्तेवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांवर कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण झाल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका सेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी मांडली. 'शहरात कोणतेही महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवायचे झाल्यास ते महापालिकेच्या माध्यमातून केले जातात. यासाठी पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेतली जाते. प्रकल्प राबविताना काही त्रुटी झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करता येते. खासगी कंपनीच्या माध्यामातून असे प्रकल्प राबविल्यास आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्यास ही जबाबदारी कोणावर द्यायची महत्वाचा प्रश्न आहे', असे सभागृह नेते शंकर केमसे यांनी सांगितले. प्रकल्प राबविण्यासाठी संस्था फुकट सल्ला देत असतील आणि त्याबदल्यात पालिकेला कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागत नसेल मदत घेण्यास हरकत नाही. मात्र याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे केमसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांना अडवून लुटणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सासवड वाघापूर रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना उदाचीवाडी येथे अडवून लूटमार केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी तीन दुचाकीस्वार, एक टेम्पो आणि दोन कारचालकांना लुटले असून त्यांच्याकडील मोबाइल, रोख पंधरा हजार आणि एक मोटार चोरून नेली आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे. अमोल सीताराम कुंभारकर (वय २५, रा. वनपुरी, ता. पुरंदर), ज्ञानदेव बबन कुंभार (वय २८, दोघेही रा. वनपुरी, पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी टेम्पोचालक आत्माराम मोहन खेडेकर (वय २६, रा. खामगाव, ता. दौंड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवडकडून वाघापूर गावाकडे जाणाऱ्या रोडवर सात ते आठ जण गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास वाहनचालकांना अडवून लुटत होते. आरोपींनी पहिल्यांदा टेम्पोचालक खेडेकर यांना अडविले. त्यांना मारहाण करून खिशातील एक मोबाइल व दहा हजार रुपये रोख हिसकावून घेतले. तसेच, त्यानंतर आरोपींनी तीन मोटारसायकलवरील प्रवाशांना अडविले. त्यांना मारहाण करून त्यांनाही लुटले. त्यानंतर एक मोटार चालकाला अडवून त्याची काच फोडली. दुसऱ्या कारचालकाला अडवून त्याला मारहाण करून त्यांची कार चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. गौड व सहायक फौजदार एस. एन. महाजन यांनी तपास करून दोन आरोपींना पकडले. त्यांना कोर्टात हजर केले असता २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ब्राह्मण युवकांनी उद्योगधंद्यांकडे वळावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी आपल्या कामांतून इतर समाजांपुढे आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे. समाजप्रबोधनाचे मोठे काम ब्राह्मण समाज करीत आहे. त्यामुळे येत्या काळात ब्राह्मण समाज आणि इतर समाजातील नागरिकांनी सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे समाजात गुण्यागोविंदाने राहावे', असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी केले. ब्राह्मण युवकांनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ब्राह्मण कार्यालय संस्थेच्या ९० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अॅड. गोपाळ गोसावी, कार्यवाह अनिल एरंडे, विश्वस्त व. कृ. नूलकर, गोविंद खरे, हेमांगी कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. बापट यांनी या प्रसंगी स्वतःच्या आणि कुटुंबाच्यावतीने २५ हजार रुपये ब्राह्मण कार्यालय संस्थेला देण्याची घोषणा केली. संस्थेच्यावतीने आळंदी येथील नृसिंह सरस्वती वेदपाठशालेला ३० हजार रुपयांची देणगी देण्यात आली. बापट म्हणाले, 'मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असून त्याचा मला अभिमान आहे. संघाने मला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळेच मला माझ्या मतदारसंघात मुस्लिम समाजातील अनेक नागरिक जोडता आले. ब्राह्मण समाज मला इतर जातींवर प्रेम करायला शिकवतो. त्यामुळेच ब्राह्मण जात ही माझ्या कधीच आड आली नाही. ब्राह्मण समाजाविषयी समाजात जे भ्रम पसरविले जातात, ते खोडून काढण्यासाठी समाजातील तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.' प्रास्ताविक अॅड. गोसावी यांनी केले. वास्तुविशारद गौरांग लेले यांनी कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या आराखड्याची माहिती दिली. कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे माजी अध्यक्ष आबासाहेब महाजन आदींचा सत्कार या वेळी करण्यात आला. सूत्रसंचालन आदिती अत्रे यांनी केले. अॅड. माधव सोमण यांनी आभार मानले.

'चौकटीतून बाहेर पडा'

ब्राह्मण समाजातील युवकांनी आता एका आखलेल्या चौकटीतून बाहेर निघण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता नोकरीसोबतच व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्याची आवश्यकता आहे. चांगल्या युवकांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. त्यांनी एका चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे गिरीश बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताची उपासना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करून ख्रिस्ती बांधवांतर्फे गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताची उपासना करण्यात आली. चर्चेमधील रेव्हरंड यांनी येशूचा जीवन प्रवास प्रवचनातून उलगडला आणि त्याने दिलेल्या शांती, प्रेम आणि दयेच्या संदेशाचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. येशूच्या जीवनावर आधारित सादरीकरणाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव व सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला. मानवतेच्या हितासाठी येशू ख्रिस्ताने गुड फ्रायडे या दिवशी प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळे शुक्रवारी शहरातील सर्व चर्चमध्ये प्रार्थना, प्रवचनांसह विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रभू येशूने दिलेल्या दिव्य त्यागाला प्रणाम करणारी मराठी, इंग्रजी भक्तीगीते सादर करण्यात आली. प्रोटेस्टंट, कॅथलिक, तमिळ आणि अनेक ख्रिस्त बांधवांनी येथूने सांगितलेल्या सात शब्दांचा पुनरूच्चार केला. विविध चर्चमध्ये यानिमित्त प्रवचने आणि संदेश सांगण्यात आले, अशी माहिती पवित्र नाम देवालयाचे सुधीर चांदेकर दिली. बिशप रेव्हरंड अँन्ड्र्यू राठोड यांचे मोहनवाडी येथील सेंट जॉन चर्च, कांचन लोंड अंबरनाथ यांचे गंज पेठेतील इमान्युअल चर्चमध्ये तसेच सेंट मेरी चर्चमध्ये रेव्हरेंड सुधीर गायकवाड यांनी संदेश आणि प्रवचने दिली. गुड फ्रायडेनिमित्त कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावर मरण आणि क्रूसवरील सात उद्गारांवर मेथडिस्ट चर्चचे रेव्हरंड गिरीश गायकवाड यांनी ख्रिस्ती बांधवांना प्रवचनाद्वारे संदेश दिला. प्रभू येशूचे शेवटचे भोजन हा विषय घेऊन गायकवाड यांनी ख्रिस्ती बांधवांना संदेश दिला. प्रभू येशू ख्रिस्ताने शांती, प्रेम, दया यांचा संदेश दिला आहे. त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. या वेळी चर्चच्या सचिव लीना साळवे, खजिनदार सुधीर चोपडे, लीना लोंढे आदी उपस्थित होते. येत्या रविवारी (२७ मार्च) शहरातील सर्व चर्चमध्ये सकाळी ईस्टरची भक्ती होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन योजना निवृत्त?

$
0
0

'एनपीएस'योजना बंद झाल्याचा दावा, फॉर्मही उपलब्ध नाहीत म. टा. प्रतिनिधी, पुणे निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी महत्त्वाची असलेली नॅशनल पेन्शन स्कीम बंद झाली आहे....दचकलात ना. पण कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत गेलात, तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. अनेक बँकांच्या कर्मचाऱ्यांना या योजनेची माहितीच नाही, तर योजनेचे अर्जही पुण्यातील बँकांमध्ये उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी एनपीएसचे अर्ज फक्त ऑनलाइनच उपलब्ध असून ऑनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. दुसरीकडे बँक कर्मचारी या योजनेऐवजी अटल पेन्शन स्कीमचे सभासद होण्याचा आग्रह करत आहेत. बँकांमधील या बेजबाबदार कारभारामुळे खातेदारांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात सर्वांसाठी पेन्शनची तरतूद नाही. निवृत्तीवेतनामुळे केंद्र व राज्य सरकारवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांना पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पेन्शन असलेला समाज (पेन्शन सोसायटी) निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीमही सुरू करण्यात आली होती. ही योजना फक्त नोकरदारांसाठी उपलब्ध होती. मात्र, गेल्या वर्षीपासून केंद्राने अटल पेन्शन स्कीम सुरू केली. ही योजना सर्वांसाठी खुली असल्याने सर्वांनी या योजनेचे सभासद व्हावे, यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. अटल पेन्शन स्कीमसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजीही सुरू असून त्यामुळे नॅशनल पेन्शन स्कीम झाकोळली गेल्याचेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'च्या प्रतिनिधींनी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जाऊन याबाबत पाहणी केली. बहुतांश बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आता ही योजना बंद झाली आहे, असे सांगून बोळवण केली. त्याच वेळी या ऐवजी अटल पेन्शन योजनेचे सभासद होण्याचा आग्रहही या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, एनपीएसविषयीच आग्रह धरल्यास तुम्ही याबाबत इंटरनेटवर माहिती घ्या, तुम्हाला ऑनलाइन खाते उघडता येईल, असेही सांगण्यात येत आहे. 'एनपीएसचे खाते आता बँकेत उघडता येत नाही. ते काम नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेडकडे (एनएसडीएल) सोपविण्यात आले आहे. एनएसडीएलच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरून ऑनलाइन पद्धतीने हे खाते उघडता येईल. त्यासाठी सर्व कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून ई-मेल केल्यानंतर कंपनीकडून किट पाठविण्यात येते. त्यात 'प्राण' या युनिक नंबरचाही समावेश असतो. त्याआधारे हे खाते वापरता येते. त्यासाठी पैसे भरण्याची पद्धतही ऑनलाइनच आहे,' असे एका बँकेतून सांगण्यात आले. 'एनपीएस फक्त नोकरदारांसाठी असून त्यासाठी मालकाची संमतीही आवश्यक आहे. तर अटल पेन्शन योजना मात्र, सर्वांसाठी खुली असून त्याद्वारे कोणीही व्यक्ती या योजनेचा सभासद होऊ शकते,' असेही या वेळी सांगण्यात आले. 'गेल्या काही वर्षांत एनपीएससाठीची मागणी थंडावली आहे. खाते उघडणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचबरोबर आता एनपीएसचे खाते ऑनलाइनही उघडता येते. त्यामुळेही ही संख्या रोडावली असण्याची शक्यता आहे,' असे निरीक्षण एका बँकेच्या कर्मचाऱ्याने नोंदवले.

(क्रमशः) ........

योजनेचे फायदे १८ ते ६० वयोगाटातील सर्वांसाठी खुली योजना पेन्शन फंड निवडण्याची व बदलण्याची मुभा दर वर्षी कमाल ५० हजारांपर्यंत करवजावट फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक शक्य वार्षिक सहा हजार किमान गुंतवणूक आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुण्याची शांतता बिघडवू नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फर्ग्युसन कॉलेजमधील वादाला राजकीय रंग मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यातील बहुतांश विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत, राजकीय नेत्यांनी स्टंटबाजी करून पुण्याची शांतता बिघडवू नये, अशी मागणी एकमुखाने केली. पुणे विद्यार्थी चळवळ या व्यासपीठाच्या माध्यमातून या संघटनांनी येत्या सोमवारी (२८ मार्च) शनिवारवाड्यावर प्रतिज्ञा वाचन आणि सामुहिक राष्ट्रगीत गायन आयोजित केले आहे.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून नुकताच मोठा गोंधळ झाला. या कार्यक्रमाला आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांनी केलेला विरोध आणि त्यातून झालेल्या घोषणाबाजीतून कॉलेज प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल करण्याचाही प्रकार झाला. या तक्रारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आव्हाड यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात कॉलेजमध्ये मारामारीही झाली. या सर्व प्रकारामुळे शहरातील शैक्षणिक वातावरण बिघडत चालल्याची भूमिका पुणे विद्यार्थी चळवळीने मांडली आहे. शहरातील विविध पक्षांच्या, तसेच कोणतेही पक्षीय पाठबळ नसणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी या निमित्ताने एकत्र येत, शहरातील कॉलेज कँपसमधून राजकारण दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

फर्ग्युसनमध्ये घडलेल्या प्रकरणाचा फायदा घेत उजव्या व डाव्या विचारसरणीचे पक्ष शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे शहरातील शैक्षणिक वातावरण बिघडत असल्याने, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने शहरातील कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ नये, अशी मागणी चळवळीने केली आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा शैक्षणिक संस्थेला पाठीशी न घालता वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या माध्यमातून करण्यात आली आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

अभाविपने आपल्या कार्यक्रमासाठी जेएनयूमधील आलोक सिंह याला बोलविण्याच्या पार्श्वभूमीवर रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी थेट कन्हैय्या कुमारला पुण्यात चर्चेसाठी बोलविण्याचा पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकारामध्ये विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा वा नेत्याचा कोणताही विचार केला जात नसल्याचे सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे. येऊ घातलेल्या नव्या विद्यापीठ कायद्याच्या आणि त्यानुसार अपेक्षित असलेल्या विद्यार्थी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आपले प्रयत्न सुरू करण्याआधीच हे सर्व घडत आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या विषयी मोठी अस्वस्थता अनुभवायला मिळत आहे. पुणे विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्यांमध्ये सध्या विद्यार्थी नसलेल्यांची, कॉलेज कँपसचा केवळ प्रवेश प्रक्रियांपुरता संबंध असलेल्यांची संख्याही मोठी दिसून येत आहे. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांमध्येही तितकीच अस्वस्थता असल्याचेही या निमित्तानेच स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी कोणत्याही देशविरोधी घोषणा दिल्या नसल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. आता फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा नाहीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या २९ घोषणांची पूर्ण माहिती पुणे पोलिसांनी घेतली असून, त्यात कोणतीही देशविरोधी घोषणा दिली नसल्याचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात देशविरोधी घोषणा दिली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत. तर केवळ मनुवाद आणि साम्राज्यवादाविरोधात घोषणा दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त तुषार दोशी यांनी माध्यमांना दिली. फर्ग्युसन महाविद्यालयात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष (अभाविप) अलोक सिंह हा 'जेएनयू'बद्दल माहिती देण्यासाठी आला होता. या वेळी आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी त्याच्या उपस्थित सुरू असलेल्या चर्चेला आक्षेप घेतला होता.

या बैठकीदरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या गेल्या. पोलिसांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या फुटेजमध्ये दोन्ही बाजुंनी तब्बल २९ घोषणा दिल्या गेल्याचे स्पष्ट झाले. 'अभाविप'ने १५, तर आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी १४ घोषणा दिल्या होत्या. या घोषणांमध्ये कोणतीही देशविरोधी घोषणा दिली गेली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले आहे.

दरम्यान, महाविद्यालयाच्या आवारात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचे पत्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांना दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. आरोप-प्रत्यारोपानंतर घटनानंतर प्राचार्यांनी पोलिसांना दिलेले पत्र मागे घेतले. असे असले तरी पोलिसांनी आपली प्राथमिक चौकशी पूर्ण करून महाविद्यालयाच्या आवारात कुठलिही देशविरोधी घोषणा दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांमधील लैंगिक अत्याचारांत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे अश्लील साइट्स पाहून लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असल्याचे निरीक्षण पुण्यातील एका अभ्यासातून पुढे आले आहे. मुलांमध्ये लहान वयातच शारीरिक आकर्षण वाढत असल्याची समस्या गंभीर रूप धारण करीत असल्याकडे या अभ्यासाने लक्ष वेधले आहे.

मुलांच्या समस्यांपूर्तीसाठी कार्यरत असलेल्या ज्ञानदेवी चाइल्ड लाइन संस्थेने गेल्या वर्षभरात आपल्याकडे आलेल्या मुलांबाबतच्या तक्रारींचा तौलनिक अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. हेल्पलाइनमुळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील मुलांशी सातत्याने संवाद होत असतो. संस्थेची बालसेनाही विविध शाळांमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्याकडून शाळेतील घडामोडीबद्दल माहिती मिळत असते. 'अश्लील साइट पाहणे आणि लहान वयातील शारीरिक आकर्षण यांबाबतच्या तक्रारींचे फोन गेल्या काही वर्षांत वाढले आहेत,' असे संस्थेच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, 'शाळेतील अल्लड वयात प्रेमप्रकरणे होतात, ती तत्कालीक असतात, असा काही वर्षांपूर्वीपर्यंत समज होता. मात्र, आता हे प्रकरण विचित्र दिशेला जात असल्याचे तक्रारींवरून लक्षात येऊ लागले आहे. याला इंटरनेट जबाबदार असून मुलांच्या मानसिक जडणघडणीवर त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. मुले यू ट्यूबवर कोणताही व्हिडिओ बघत असतात, त्यावेळी स्क्रिनवर पॉर्न साइटच्या जाहिराती येतात. त्यातून मुलांचे कुतुहल वाढते आणि पालकांच्या नकळत ती अश्लील व्हिडिओ बघतात. कुतुहल तिथे थांबत नाही, ही मुले आपल्या वयापेक्षा लहान मुलांशी चाळे करीत असल्याच्या तक्रारी आहेत. यात मुली आणि मुले दोघांचाही समावेश आहे. वसतिगृहांसह काही घरांमध्येही असे प्रकार होत असल्याचे आमच्याकडील माहितीवरून दिसते.'

'मुलांना खेळांचे पर्याय द्या'

कामामध्ये व्यग्र असलेले पालकांना अलीकडे मुलांशी खेळायला वेळ नसतो. त्यामुळे घरात कंटाळलेले मूल न कळत कम्प्युटर, स्मार्ट फोनकडे आकर्षित होते. पालकांनी आणि शाळांनी मुलांना शारीरिक व्यायाम होणाऱ्या खेळांचे पर्याय उपलब्ध केले पाहिजे. भरपूर खेळल्यानंतर मुले आनंदी असतात आणि दमल्यामुळे ती वेळेत झोपतात. त्यांचे कुतूहल वाढविणारे इतर खेळांचे पर्याय मिळाल्यास मुले कम्प्युटरपासून नक्कीच दूर जातील, असे ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांना बदनामीकारक पत्र पाठविणाऱ्या महापालिका आयुक्तांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. तसेच, विधिमंडळामध्ये सरकारला जाब विचारण्यात येईल, असा पवित्रा घेण्यात आला आहे.

शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी खासदार चव्हाण या आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होत्या. परंतु, आयुक्तांनी त्यांनाच दोषी ठरवून तुम्ही अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट राजकारणी असल्याचे पत्र पाठविले. महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी त्याची दखल घेतली असून आयुक्तांनी तातडीने दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसनेही आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शहर काँग्रेसचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी आयुक्तांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच केली आहे. शहराच्या हिताचे विषय घेत, पुणेकरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चव्हाण यांच्याबाबत आयुक्तांनी वापरलेले शब्द गैरलागू आहेत. खासदाराला अपशब्द वापरणाऱ्या आयुक्तांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत रस घेणाऱ्या आयुक्तांना महापालिकेच्या विकास कामांमध्ये कोणतेही स्वारस्य नाही. शहराचा विकास हा त्यांच्यासाठी क्षुल्लक बाब झाली असून, खासदारांना आक्षेपार्ह पत्र पाठविणाऱ्या आयुक्तांवर त्वरेने कारवाई करावी, असे पत्र काँग्रेसच्या नेहरू स्टेडियम ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सचिन आडेकर यांनीही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या परवानगीविना लंडनचा दौरा केला होता. त्याविषयी, सरकारकडे यापूर्वीच खुलासा विचारण्यात आला आहे. येत्या आठवड्यात हा मुद्दा चर्चेला आल्यास, आयुक्तांच्या पत्राबाबतही विचारणा केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी दिली.

राष्ट्रवादीत शांतता?

खासदारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली असताना, राष्ट्रवादीत मात्र अद्याप शांतताच आहे. महापालिकेतील नेते आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने चव्हाण यांच्या बाजूने भूमिका मांडलेली नाही. शहराध्यक्षा म्हणूनच अनेकांचा चव्हाण यांना विरोध असल्याने त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आयुक्तांविरोधात राष्ट्रवादीचे आमदार चकार शब्द काढायला तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिलायन्स, एअरटेलला काम थांबवण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी सुरू केलेली खोदाई थांबविण्याचे आदेश रिलायन्स, एअरटेल कंपनीला महापालिका प्रशासनाने दिले आहेत. नव्याने केलेल्या रस्त्यांची खोदाई होवून, फूटपाथ खोदले जाऊ नये तसेच बेकायदा खोदाईला आळा बसावा, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात मोबाइल कंपन्यांकडून रस्ते खोदाई सुरू असल्याची तक्रार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली होती. मनमानी पद्धतीने मोबाइल कंपन्या ही रस्ते खोदाई करत असल्याने चांगल्या रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर महापौर प्रशांत जगताप यांनी रस्ते खोदाई करणाऱ्या केबल कंपन्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिले होते. महिना, दोन महिन्यापूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते आणि फूटपाथ केबल टाकण्यासाठी सर्रा‍स खोदले जात असल्याचा आरोप सभासदांनी केला होता. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची नुकसान होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती.

मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच परवानगी दिल्याने सर्व कंपन्यांची कामे थांबविता येणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र बेकायदा पद्धतीने होत असलेली रस्ते खोदाईची कामे शहानिशा करून थांबविली जातील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मोबाइल कंपन्यांकडून शहरात होत असलेल्या रस्ते खोदाईची माहिती घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. रिलायन्स, तसेच भारती एअरटेल कंपन्यांची कामे थांबविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाने खोदाईची कामे थांबविण्याचे आदेश दिल्यानंतरही शुक्रवारी अप्पर इंदिरानगर, तसेच इतर काही भागातील केबल टाकण्यासाठी मोबाइल कंपन्यांची कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवरच्या जागांची यादीच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मोबाइल टॉवर उभारण्यासाठी शहरातील महापालिकेच्या ३९४ जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करून घेताना प्रशासनाने या जागा नक्की कोणत्या आहेत, याची कोणतीही माहिती सभागृहात दिली नाही. स्थायी समिती तसेच मुख्य सभेत हा विषय मान्य करून घेताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून हा कारभार केला आहे. लपून छपून मान्य करण्यात आलेल्या या जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याची शक्यता असल्याची भीती नगरसेवक संजय बालगुडे यांनी व्यक्त केली. या विरोधात मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या मालकीच्या जागा भाडेतत्त्वावर देताना प्रशासनाकडून संपूर्ण माहिती स्पष्ट शब्दात देणे गरजेचे आहे. जागा वाटप नियमावलीनुसार मोबाइल कंपनीला शहरात टॉवर उभारण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मुख्य सभेने मंजूर केला. शहरातील विविध भागात असलेल्या ३९४ जागा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत. मात्र या जागा नक्की कोणत्या असतील याची कोणतीही यादी प्रशासनाने स्थायी समिती तसेच मुख्य सभेसमोर दिलेली नाही. अत्यंत गोपनीय पद्धतीने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून घेण्यात आल्याने यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. ज्या कंपनीला पालिका प्रशासनाने ३० वर्षांच्या मुदतीने मोबाइल टॉवर उभारण्याची मान्यता दिलेली आहे. त्या 'इंडस टॉवर्स लिमिटेड' या कंपनीने पालिकेचा मिळकतकर थकविला असल्याचा अभिप्राय दिला होता. तसेच बांधकाम विभागानेही या कंपनीने अनधिकृत मोबाइल टॉवर उभारले असल्याचे कळविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत या कंपनीचे हित जोपासण्यासाठी प्रशासनाने हा उद्योग केला असल्याचा आरोप बालगुडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतकर वसुलीसाठी पालिकेची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मिळकतकराची थकबाकी भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ११ ऑफिस आणि दोन दुकानांवर कारवाई करत, पालिकेने या सर्व मिळकती 'सील' केल्या आहेत. थकबाकीदार मिळकतकरधारकांनी कारवाई टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळकतकर विभागाने केले आहे.

मिळकतकर थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजना लागू केली. त्याशिवाय, मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवून वसुली करण्यासाठी स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत, शहराच्या विविध भागांत लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्यांच्या मिळकतीसमोर बँड वाजविण्यात आला. तरीही, मिळकतकर भरण्यास नकार देण्यात आल्याने येरवडा, कोथरूड आणि हडपसर भागातील ऑफिस आणि दुकाने सील केली गेली.

येरवड्यातील प्रेमा राठी यांच्याकडे २४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने तीन मजली इमारतीतील ९ ऑफिस सील करण्यात आली. अशीच कारवाई २६ लाख रुपये थकविणाऱ्या कोथरूड येथील जयंतीलाल शहा यांच्यावर करण्यात आली. त्यांची मयूर कॉलनीतील दोन ऑफिस सील करण्यात आली. तर, १४ लाखांची थकबाकी भरण्यास नकार दिल्याने हडपसर परिसरातील हांडेवाडी रोड येथील शरद मोटे यांच्या तीन दुकानांना सील ठोकण्यात आले.

मिळकतकर थकबाकीच्या दंडावर ५० टक्के सवलत मिळविण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून, या कालावधीत कर भरून जप्ती टाळावी, असे आवाहन मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कुलमुखत्यारपत्र; गुन्हे नोंदवण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बनावट कुलमुखत्यार पत्राद्वारे औंधमधील अनुपमा सहकारी गृहरचना संस्थेच्या जमिनीचा परस्पर विक्री व्यवहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

औंधमधील अनुपमा गृहरचना संस्थेचे विकसन १९७८मध्ये झाले. त्यानंतर १९९३मध्ये या सोसायटीच्या नावाने कन्व्हेअन्स डिड झाले. या सोसायटीच्या नावे मालकीहक्क झाल्यानंतर चार जणांनी बनावट कागदपत्रांद्वारे जी अँड एस असोसिएटसला सोसायटीच्या जागेचे कुलमुखत्यारपत्र दिले. त्या कुलमुखत्यारपत्राधारे दस्त नोंदणीही करून घेण्यात आली.

दस्त नोंदणीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असताना त्याची नोंद करण्यात आली आहे. या दस्त नोंदणीत संस्थेची जागा लिहून देणाऱ्यांचा पूर्ण पत्ता नाही. पॅनकार्ड जोडलेले नाही. जमिनीचे खोटे नकाशेही दस्तासोबत देण्यात आले. तसेच कुलमुखत्यारपत्रात अनेक ठिकाणी खाडाखोड केली आहे. याशिवाय, दस्तासाठी बनावट मृत्यूपत्र जोडल्याचे उघडकीस आले आहे. खरेदी खताला जोडलेल्या मूळ दस्तातील नावे आणि कुलमुखत्यार पत्रामधील नावे वेगळी आहेत. हा प्रकार जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचा पारा ३९ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी उकाड्याची तीव्रता कायम होती. कमाल तापमान ३९ अंशांवर स्थिरावले असताना, किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने पुणेकर घामाघूम झाले आहेत. पुढील दोन दिवसांत उष्मा कायम राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, शहरासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत उन्हाचा चटका कायम आहे. राज्यातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद जळगाव येथे झाली, तर सोलापूर, मालेगाव, परभणी, नांदेडसह विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये पारा आताच ४० अंशांच्या पुढे पोहोचला आहे.

नगरमध्ये उच्चांक

नगर : नगरमध्ये गुरुवारी ४४.४ अंश सेल्सिअस एवढे विक्रमी कमाल तापमान नोंदले गेले. शुक्रवारी त्यामध्ये घट होऊन पारा ३९ अंशावर स्थिरावला आहे. मात्र, येत्या एक दोन दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images