Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष

$
0
0

संतराम घुमटकर, बारामती
महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपास आलेल्या बारामती शहरातील सरकारी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला गेल्यास ९२ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, याबाबत नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गांभीर्य नसल्याने हा प्रकल्प फक्त कागदावरच पूर्ण करून घेण्यात प्रशासन धन्यता मानत आहे.

पाण्याची गरज लक्षात घेऊन 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. बारामतीमधील येथील प्रशासकीय भवन, कृषी भवन, अभियांत्रिकी भवन, परिवहन कार्यालय व अन्य सरकारी कार्यालयांच्या इमारती 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्पाविनाच पूर्ण करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेने त्यांना पूर्णत्वाचा दाखलाही दिला आहे. बांधकाम व्यवसायिक, तसेच नागरिक याच संधीचा फायदा घेऊन खासगी इमारतींना 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करत नसल्याचे चित्र आहे.

प्रशासकीय भवन १६३००, कृषी भवन १०६५०, अभियांत्रिकी भवन १०६५० अशा अकरा प्रशासकीय इमारती मिळून २,२७,७५९ चौरस फूट टेरेस उपलब्ध आहे. बारामती नगरपालिका जुने व नवीन कार्यालय १४४२८ चौरस फूट, तसेच बारामती नगरपालिकेच्या स्थावर मालमत्तेवरील टेरेस ४०५०० चौरस फूट आहे. अशा प्रकारे २,८२,६८७ चौरस फूट टेरेस उपलब्ध आहे. या इमारतींवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' केल्यास ९१ लाख ६८ हजार ६०० लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

नागरिकांनी आपले घर, कारखाने, दुकानांवरच्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केल्यास कितीतरी पटीने पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीने पुनरर्भरण करण्याची आवश्यकता आहे. सध्या पाणी उपलब्ध होण्यासाठी कोणताच स्रोत उपलब्ध होत नसल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा सुरू आहे. अनेक ठिकाणी ६०० ते ८०० फुटांपर्यंतच्या कोरड्या पडलेल्या कुपनलिका भयाण स्थितीची जाणीव करून देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘यशदा’ देणार धोरणांना दिशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या विकासासाठी आखली जाणारी विविध प्रकारची धोरणे आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजाचा सहभाग वाढविणे याबाबतची दिशा आता पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतून निश्चित केली जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यशदामध्ये 'धोरण निश्चिती' आणि 'जल साक्षरता व जल जागृती' ही राज्यस्तरीय केंद्र स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जल साक्षरता केंद्रामध्ये समाजात करावयाच्या प्रचाराबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकारचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच या दोन्ही केंद्रांची रचना व कार्यपद्धती याबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती यशदाचे संचालक हेमंत वासेकर यांनी 'मटा'ला दिली. राज्यात आणि विशेषतः दुष्काळी भागात पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचे महत्त्व समजावे. त्यासाठी प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर यशदामध्ये जल साक्षरता व जल जागृती राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्रातून 'मास्टर ट्रेनर' तयार केले जातील. ते पुढे जिल्हास्तरावर प्रशिक्षण देतील; तसेच यामध्ये वाचन साहित्यही निर्माण करणे अपेक्षित आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अमरावती, नागपूर व औरंगाबाद या शहरात या केंद्राची उपकेंद्रे स्थापन केली जाणार आहेत, असे वासेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर महिलांच्या सेवेला ‘तेजस्विनी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहर आणि परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) राज्य सरकारतर्फे थेट बस उपलब्ध होणार असल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 'तेजस्विनी' या महिलांसाठीच्या विशेष बसचा फायदा पुण्याला होणार असून, किमान ५० बस तरी पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक नव्या योजना जाहीर केल्या. त्यात मोठमोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणींचा पाढा त्यांनी वाचला. या महिलांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्यातील सहा प्रमुख शहरांमधील सार्वजनिक उपक्रमांना 'तेजस्विनी' योजनेअंतर्गत तीनशे बस पुरविण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यात राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरसह पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहरात राज्य सरकारच्या योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या शहरातील प्रवाशांकरता अपुरी असून, नव्या बससाठीची प्रक्रिया सध्या रखडली आहे. त्यामुळे 'तेजस्विनी' योजनेतून उपलब्ध होणाऱ्या बस पीएमपीसाठी फायदेशीरच ठरणार आहेत. काही वर्षांपूर्वी गर्दीच्या मार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्याचा प्रयोग पीएमपीने केला होता. आता, खास महिलांसाठीच बस उपलब्ध होणार असल्याने पीएमपीला महिलांसाठीच्या विशेष बस अधिक मार्गांवर वाढवता येतील. सहा परिवहन उपक्रमांसाठी तीनशे बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सरकारने केले असल्याने सरासरी ५० बस प्रत्येक शहराला मिळतील, अशी प्राथमिक शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत त्या संदर्भातील नेमके स्पष्टीकरण सरकारतर्फे दिले जाईल; तसेच या बस संबंधित परिवहन उपक्रमांना कधीपर्यंत मिळतील, हेदेखील निश्चित केले जाईल. .............. राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. त्या बाबत सरकारशी पाठपुरावा करून जास्तीत जास्त बस पीएमपीला मिळाव्या, यासाठी प्रयत्न केले जातील. अभिषेक कृष्णा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यासाठी स्वागतार्ह, उद्योगांसाठी निराशाजनक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सरकारचा अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचीच छोटी प्रतिमा आहे. एकूणच राज्याचा विचार करता हा अर्थसंकल्प राज्यासाठी स्वागतार्ह असला, तरी उद्योगजगताच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात उद्योगांवर करवाढ दिसत नसली, तरी लेखी अर्थसंकल्पातूनच त्यातील बारकावे समोर येतील, असा सूर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) व्यक्त करण्यात आला. 'केंद्रीय अर्थसंकल्पाच्या धर्तीवर हा अर्थसंकल्पही ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर भर देणारा आहे. करासंबंधीचे प्रलंबित खटले कमी करण्यासाठी अभय योजना आणण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या लेखी प्रतीचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा आहेत. राज्यावरील कर्जाचा डोंगरही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करणार, हे पाहावे लागेल,' असे एमसीसीआयएचे अध्यक्ष सतीश मगर यांनी सांगितले. 'केंद्रीय अर्थसंकल्पाच्या धर्तीवर ग्रामीण, कृषी व पायाभूत सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. दुष्काळ, कृषी उत्पादनात होणारी घट आणि या क्षेत्रात दिसणारी उणे वाढ यामुळे कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतुदींची आवश्यकता होती. कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने अन्न प्रक्रिया उद्योगांनाही सवलत देण्यात आली आहे. वाहनांच्या इंधनक्षमतेनुसार कर आकारणीचा फटका वाहन उद्योगाला बसेल. एकूणच राज्यासाठी हा अर्थसंकल्प स्वागतार्ह असला, तरी उद्योगांसाठी तो निराशाजनक आहे. रस्ते विकास व अन्य पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदींचा उद्योगांसाठी अप्रत्यक्ष फायदा होईल,' असे एमसीसीआयएचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख यांनी सांगितले. 'हा अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणेच कृषीप्रधान असून, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. स्मारकांऐवजी सभागृह उभारणे स्वागतार्ह आहे. काही गोष्टींवरील अर्धा टक्का वाढ निधीसंकलनासाठी आवश्यकच होती. करप्रणाली अधिक सुटसुटीत, सोपी करण्यासाठी काही तरतुदी अपेक्षित होत्या,' असे एमसीसीआयएचे खजिनदार सीए चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.
....
अर्थसंकल्पात शेती व शेतकऱ्यांवर भर दिला आहे. व्यवसाय सुकर करण्याच्या धोरणानुसार करांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. नोंदणी व रिटर्न संदर्भात चेंबरने; तसेच टॅक्स प्रॅक्टिशनर्सने केलेल्या मागण्यांचा विचार करण्यात आला आहे. अभय योजनाही स्वागतार्ह आहे. व्हॅटबाबत राज्याबाहेर विक्री केलेल्या वस्तूच्या सेट ऑफ बाबतची तरतूद जाचक आहे. - प्रकाश पटवर्धन, अध्यक्ष, एमसीसीआयए कर समिती, पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते खोदाईत ‘भाईगिरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी परवानगी न घेता शासकीय, निमशासकीय किंवा खासगी संस्थांना भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई करून देणारी भाईगिरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उघडकीस आली. त्याची गंभीर दखल घेऊन चौकशी करून संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहे. महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांमधून भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदाई परवानगीसाठी प्रकरणे वेळोवेळी सादर होतात. या सेवावाहिन्या नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्यामुळे नियमानुसार पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात येते. खोदलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी खर्च वसुल करण्यासाठी पालिकेने दर निश्चित केले आहेत. सद्यस्थितीत खर्चापोटी प्रतीमीटर ६,५०० रुपये आणि महापालिका अधिभार ३,००० रुपये याप्रमाणे आकारणी केली जाते. हा खर्च आगाऊ स्वरूपात वसूल केला जातो; परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि भारत संचार निगम लिमिटेड या शासकीय संस्थांनी शुल्कामध्ये सवलत द्यावी किंवा विनाशुल्क परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्याबाबत विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार आयुक्त जाधव यांनी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद करून सदस्यांनी चौफेर टिका केली. अनेक कंपन्या परवानगी न घेताच रस्ते खोदाई करतात, ही बाब निदर्शनास आणून दिली. यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला जातो, असा आरोपही करण्यात आला. जागा किंवा रस्ता महापालिकेचा मात्र, त्यावर गुंडगिरी फोफावत असून, हा एकप्रकारे रस्त्यावर पडलेला दरोडा आहे, अशी टीका सदस्यांनी केली. या चोरीला, एजंटगिरीला आळा घाला अशी आग्रही मागणी केली. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे; तसेच प्रत्येक प्रभागात तपासणी पथक नियुक्त करून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले. अनधिकृत फ्लेक्स हटवा शहरात अनधिकृत फ्लेक्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे बकालपणा दिसून येतो. कारवाई होत नाही, अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. शहरात केवळ ३४८ अनधिकृत फलक (क्षेत्रीय कार्यालय अ-७१, ब-५६, क-३, ड-२३, इ-११२, फ-८३) आहेत. तर, परवानाधारक फलकांची संख्या १,२४५ असल्याची आकडेवारी सुलभा उबाळे यांनी सादर केली. ती बोगस असल्याचे निदर्शनास आणून देत कठोर कारवाईची मागणी केली. .................. प्रस्ताव मागे भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई करताना शासकीय संस्थांकडून सवलतीच्या दरात शुल्क आकारावे किंवा त्यांच्याकडून शुल्कच घेऊ नये याबाबतचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी ठेवला होता. तो दप्तरी दाखल करण्याची शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे केली होती. त्यावर सभेत सदस्यांनी प्रखर टीका करून विरोध दर्शविला. त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्यास प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की आयुक्त जाधव यांच्यावर ओढवली; परंतु संबंधित प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सभेने घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मान्यता

$
0
0

महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या मुख्य सभेसमोर स्थायी समितीने सादर केलेल्या पाच हजार ७४८ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींचे कौतुक करतानाच सर्व सभासदांना समान न्याय न देता ठरावीक प्रभागाला अध्यक्षांनी झुकते माप दिल्याची टीका सभासदांनी केली. विकासाची कामे करताना कमी पडणारा निधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही कदम यांनी सभागृहात दिल्याने सर्वानुमते अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.
महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या पाच हजार १९८ कोटींच्या अर्थसंकल्पात ५४९ कोटींनी वाढ करत तीन आठवड्यापूर्वी स्थायी समितीने तयार केलेला अर्थसंकल्प मुख्य सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चा सुरू होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत यावर चर्चा करून अखेर या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षी होणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समिती अध्यक्षा कदम यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर यामध्ये अनेक योजना जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न अनेक सभासदांनी सभागृहात उपस्थित केला. सर्व सभासदांना समान न्याय देण्याची भाषा करणाऱ्या कदम यांनी प्रत्येक नगरसेवकाला समान तरतूद दिली नसल्याबाबत सभासदांनी नाराजी व्यक्त केली.
एकाच कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तरतूद उपलब्ध करून घेत काही सभासदांच्या प्रभागांना कोट्यवधी रुपयांची खैरात, तर काही सभासदांची बोळवण स्थायी समितीने केल्याचे टीकास्त्र सोडण्यात आले. विकासकामांना कात्री लावताना स्थायी समितीच्या अध्यक्षांनी थेट आयुक्तांच्या बजेटलाच हात घातल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली. ज्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडेल त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर हा अर्थसंकल्प मान्य करण्यात आला.
..................
राष्ट्रवादीच्या सभासदांनाच निधी
महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी गेल्या चार वर्षांत सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी प्रभागासाठी नेला आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रभागाला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे गटतेने अशोक हरणावळ यांनी केला. समितीच्या अध्यक्षा कदम यांच्या प्रभागासाठी ९३ कोटी रुपयांचा निधी घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या सभासदांनाच मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पात निधी देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस, मनसे, भाजपसह सेनेच्या नगरसेवकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन उद्योगासमोरील अडचणी वाढणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही वाहनांवरील करात वाढ केल्याने आधीच संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने चारचाकी वाहनांवरील कर वाढविल्यानंतर राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात दुचाकी व तीनचाकी वाहनांवरील करात वाढ केली आहे. त्यामुळे वाहन उद्योगावर संकटाचे ढग घोंघावू लागले आहेत. अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वातावरणामुळे मागणीत मोठ्या प्रमाणावर घट होऊन वाहन उद्योगाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदीच्या गर्तेत सापडलेल्या या क्षेत्राला केंद्रीय अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण न करताच केंद्राने चारचाकी वाहनांवर अतिरिक्त कर लादला. त्यातून हे क्षेत्र सावरत असतानाच मेक इन महाराष्ट्र म्हणून उद्योगस्नेही बनू पाहणाऱ्या राज्य सरकारनेही वाहनोद्योगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकी व तीनचाकी वाहनांवरील वाहन नोंदणी करात वाढ केली आहे. पूर्वी सरसकट आकारल्या जाणाऱ्या कराऐवजी आता या वाहनांच्या इंजिन क्षमतेनुसार कर आकारणी केली जाईल. व्यक्तिगत मालकीच्या वाहनांसाठी ९९ सीसीपर्यंत ८ टक्के, १०० ते २९९ सीसीपर्यंत ९ टक्के, तर ३०० सीसी हून अधिक क्षमतेच्या वाहनांसाठी १० टक्के कर आकारला जाणार आहे. संस्था अथवा कंपनीच्या मालकीच्या वाहनांना दुप्पट कर आकारला जाईल. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होऊन मागणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाहनोद्योगात गेल्या वर्षीपासूनच मंदीसदृश्य परिस्थिती आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून चारचाकी वाहन उत्पादक कंपन्यांपुढील संकट वाढले होते. वाढीव कराचा बोजा शेवटी ग्राहकांवरच आला आहे. त्यात राज्य सरकारनेही वाहन नोंदणी करात केलेल्या वाढीमुळे दुचाकी व तीनचाकी उत्पादकांबरोबरच सर्व प्रकारची वाहने बनविणाऱ्या कंपन्यांना याचा अधिक फटका बसेल, असे एका कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. ................... हायब्रीड बस व बॅटरीसाठी करमाफी पारंपरिक इंधनावरील दुचाकी व तीनचाकी वाहनांवरील नोंदणी कर वाढवताना हायब्रीड बसेसना मात्र, पूर्ण करमाफी दिली आहे. त्याचबरोबर यासाठीच्या बॅटरीसाठीही पूर्णतः करमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे हायब्रीड वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. विरोधकांकडून मात्र, केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’ची रोकड नेणाऱ्या व्यक्तीवर हल्ला

$
0
0

'महावितरण'ची रोकड नेणाऱ्या व्यक्तीवर हल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महावितरण'च्या वीज बील भरणा केंद्रात जमा झालेली तेरा लाखांची रोकड घेऊन निघालेल्या व्यक्तीवर हल्ला करीत ती लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वानवडीच्या हॅचिंग स्कूलजवळ घडली. चोरट्यांना प्रतिकार केल्याने त्यांनी रोकड असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात रॉडने मारहाण केली. यामध्ये गंभीर ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राकेश नरेंद्र अगरवाल (वय ३८, रा. बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राकेश यांचे वडील नरेंद्र रामगोपाळ अगरवाल (वय ६५) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात मोटार सायकलवरील दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र 'महावितरण'मधून सेवानिवृत्त झाले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्याकडे 'महावितरणच्या' वीज बिल भरणा केंद्रवर जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्याचे 'कॉन्ट्रॅक्ट' त्यांनी घेतले आहे. हे काम त्यांची चार मुले पाहतात. पुणे शहरात एकूण दहा वीज बिल भरणा केंद्र आहेत. या ठिकाणी दररोज जमा होणारी रक्कम गोळा करून ती दुसऱ्या दिवशी बँकेत भरतात. राकेशने नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी तीनला रास्ता पेठ व मम्मादेवी चौकातील सेंट मेरी वीज भरणा केंद्र अशी दोन्ही ठिकाणची एकूण १० लाखांची रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेत घेऊन ते दुचाकीवरून एनआयबीएम येथील वीज बील भरणा केंद्राकडे जात होते.
वानवडी येथील पार्वती व्हिला रोडवरील हॅचिंग स्कूलजवळ सायंकाळी सव्वापाच वाजता आले असता त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी अडविले. त्यांच्या तोंडावर मिरचीची पूड टाकली आणि रोकड असलेली बॅग हिसकावली. राकेश यांनी दोघांना प्रतिकार केला. मात्र, आरोपींनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केले. त्यांच्याजवळची रोकड असलेली बॅग घेऊन पळून गेले. राकेश गंभीर जखमी झाल्याने जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. या ठिकाणी वीस ते तीस मिनिटे पडले होते. या ठिकाणावरून जाणाऱ्या एका जागरुक महिलेने त्यांना पाहिले. कारमध्ये घालून त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या महिलेनेच राकेश यांच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, पोलिसांना या घटनेची माहिती होण्यास रात्रीचे साडेआठ वाजले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी घटनास्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरातन वास्तूचे अवशेष आढळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा कार्ला फाट्याजवळील टाकवे खुर्द येथे नव्या घराच्या बांधकासाठी खोदकाम करताना पुरातन जुन्या तटबंदी वाड्याचे भूमिगत अवशेष आढळून आले असून, यामध्ये दोन खोल्या, अंतर्भागात पाण्याने भरलेल्या कुंडासह एका कोरड्या कुंडाचा समावेश आहे. जमिनीत पुरातन वास्तू आढळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. टाकवे खुर्द येथील शहाजी शंकर गरुड, मुरलीधर विठ्ठल गरुड, मधुकर चंद्रराव गरुड, जयसिंग विश्वासराव गरुड यांच्या मालकीची जागा आहे. या जागेत (शेतात) सुबोध गरुड व बाळासाहेब गरुड यांच्या वतीने नवीन घर बांधण्यासाठी संबंधित जागेची स्वच्छता करून जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी खोदकाम करताना खडखड असा आवाज येऊ लागला. त्याची पाहणी करण्यासाठी गेलो असता एका फरशीसारखे दगडी आवरण (झाकण) आढळले. ते बाजूला काढले असता तेथे भुयार आढळले. त्यानंतर भुयार कशाचे आहे याची उत्सुकता वाढल्याने कुतूहलापोटी त्याची पाहणी करून अधिक खोदकाम केले असता आत दोन खोल्यांचे कोठार आढळले. बाहेरील खोलीवरील दगडी आवरण (छत) पाडून ते बाजूला केल्यानंतर भुयार पूर्णपणे उघडे पडले. भुयारातील आतील बाजूस आणखी एक खोली असून, तिच्यामध्ये एक व्यक्ती जाईल एवढेच अंतर आहे. साधारणपणे आठ बाय चार चौरस फुटांच्या अंतरात दगडी चौथऱ्यात दोन खोल्या व्यवस्थित बांधण्यात आल्या आहेत. उजवीकडील बाजूच्या भिंतीत दोन कोनाडे असून, त्यात पाणी साठविण्यासाठी जागा आहे. संपूर्ण दगडी बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आला आहे; तसेच दोन पाण्याच्या कुंडांपैकी एक भरलेले व दुसरे कोरडे कुंड आढळले आहे. ............. शिवकालीन की पेशवेकालीन ? टाकवे खुर्द येथे सापडलेल्या पुरातन वास्तूचे अवशेष शिवकालीन किंवा पेशवेकालीन असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात पेशवेकालीन वास्तूही पाहावयास मिळालेल्या आहे. त्याचप्रमाणे या गावापासून काही अंतरावर प्राचीन कार्ला लेणी असल्याने आढळलेल्या वास्तूचे अवशेष त्यावेळचे असतील का? याबाबत चर्चा सुरू असून, पुरातत्त्व विभागाने पाहणी केल्यानंतरच ते स्पष्ट होईल. वास्तू आढळलेल्या ठिकाणी पूर्वी जुना वाडा अस्तित्वात होता. या वाड्याच्या जोत्याचे अवशेष पाहावयास मिळतात. यामुळे आढळलेली वास्तू ही प्राचीन वाड्याचाच भाग असावा असा तर्क लावला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ व्यावसायिकाला खंडणीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची फोनवरून खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत एका ३० वर्षीय सराफ व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यवसायिकाला गुरुवारी दुपारी फोन आला. त्या व्यक्तीने दहा लाख रुपये खंडणी द्या, अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या व्यावसायिकाला तीन वेळा फोन आला असून, जीवे मारण्याची धमकी तसेच, खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीची मागणी करणारा फोन हा कॉइन बॉक्सवरून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
खंडणीची धमकी आलेले सराफ व्यावसायिक पुण्यात प्रसिद्ध असून, त्यांची लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोडवर दोन सोन्याची दुकाने आहेत. या प्रकरणी अलंकार पोलिस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून समांतर तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक समिती अध्यक्ष प्रक्रियेबाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळासाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी या पूर्वी नेमलेल्या समितीमध्ये नाट्यमय बदल झाल्याचे समोर आले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केलेल्या समितीचे अध्यक्षही सध्याच्या समितीमध्ये नसून, पाच सदस्यांची नवी समिती यंदाच्या निवडणुकीवर देखरेख करणार आहे. बारा जागांच्या या निवडणुकीसाठी एकूण ४३ उमेदवार रिंगणात असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही काळापासून या निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी समितीमधील बदल समोर आले. शि. प्र. मंडळीचे प्रशासक असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी या पूर्वी डी. जी. देशपांडे, विलास पाटील आणि पद्माकर गायकवाड यांची निवडणूक समिती नेमली होती. त्यातील देशपांडे आणि पाटील यांनी काही वैयक्तिक कारणांनी या समितीचे राजीनामे दिल्याची माहिती शुक्रवारी मिळाली. त्यामुळे आता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव, सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. एम. वाय. रचभरे, अॅड. सदानंद फडके आणि बद्रीनाथ मूर्ती यांची समिती येत्या ३० मार्चला होणाऱ्या निवडणुकीवर लक्ष ठेवणार असल्याचेही या निमित्ताने समोर आले.
दरम्यान निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी ५३ पैकी एकूण १० व्यक्तींनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामध्ये भास्कर सोहनी, अजय दातार, उमेश भोसले, राजेंद्र जोग, प्रफुल्ल गवंडी, माधव देशपांडे, राजाभाऊ ढेपे, जयंत कुलकर्णी, सुहास शेडदाळे, सतिश वळसंगकर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता एकूण ४३ उमेदवारांमध्ये ही निवडणूक होणार असल्याचेही शुक्रवारी स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटी रुपयांचे विष जप्त

$
0
0

सर्पविषाची विक्री करणारे दोघे अटकेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सिंहगड रोड परिसरात सर्पविष विक्री करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर परिसरातील दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचे ५५० मिलीलिटर विष जप्त करण्यात आले आहे.
त्यांच्याकडील विषाचा साडेपाच कोटी रुपयांना व्यवहार ठरविला होता, अशी माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली. महेश सुरेश पाटील (वय ३५, रा. घोडकेनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि विजय राजाराम कुंभार (वय ३३, रा. हरळी खुर्द ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पाटील आणि कुंभार यांनी गडहिंग्लज आणि परिसरातून अनेक सापांचे विष काढले होते. विष विकण्यासाठी हे दोघे सिंहगड रोडवरील जयदेव नगर परिसरात येणार असल्याची माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक रवींद्र फुलपगारे यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलिस कर्मचारी तानाजी निकम, रवींद्र फुलपगारे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची तपासणी केली असता एक कोटी रुपये किमतीचे ५५० मिली सापाचे विष मिळाले. आरोपींविरुध्द वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. महेश पाटील याला मिरज कोर्टाने एका गुन्ह्यात शिक्षाही सुनावली होती. दोन वर्षापूर्वी तो जेलमधून पॅरोलवर बाहेर आला. तेव्हापासून तो फरार आहे. कुंभार याचे एमएपर्यंत शिक्षण झाले असून, पाटील पदवीधर आहे. दोघेजण पुण्यात कोणाला विष विकणार होते, याबाबत दत्तवाडी पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएमएसद्वारे मिळणार वीजदेयकाची माहिती

$
0
0

कॉल सेंटरमध्ये मोबाइलच्या नोंदणीचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महावितरणतर्फे ग्राहकांना लवकरच एसएमएसद्वारे वीजदेयकांसह इतर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी कॉल सेंटरमध्ये मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलात आतापर्यंत सुमारे २४ लाख ५० हजारांपैकी पाच लाख ९८ हजार २२८ वीजग्राहकांनी संपर्क क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेले सर्वाधिक ग्राहक पिंपरी विभागातील (९६ हजार ७२७) आहेत. पुणे परिमंडळात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर; तसेच राजगुरुनगर, मंचर आणि मुळशी विभागाचा समावेश आहे. वीजग्राहकांनी मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांकाची नोंदणी करून त्याद्वारे कॉल सेंटरशी केव्हाही संपर्क साधल्यास तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी स्वतःचे जास्तीत जास्त दोन मोबाइल क्रमांक किंवा एक दूरध्वनी क्रमांकाची कॉल सेंटरमध्ये नोंदणी करावी, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.
महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून, कोणत्याही कंपनीच्या मोबाइल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे (आयव्हीआरएस) वीजग्राहकांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क झाल्यावर मराठीसाठी एक, इंग्रजीसाठी दोन आणि हिंदीसाठी तीन हे अंक दाबल्यानंतर ग्राहकांना भाषेची निवड करता येते. सहा अंक दाबल्यानंतर कॉल सेंटरमधील ग्राहक प्रतिनिधीशी थेट संपर्क होतो. त्यानंतर वीजग्राहकांना स्वतःच्या वीजग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांक ग्राहक प्रतिनिधींना सांगून ते रजिस्टर्ड करता येतात.


ऑनलाइन नोंदणीचीही सुविधा
कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवरून ऑनलाइन बील भरणाऱ्या वीजग्राहकांनाही लॉग इन केल्यानंतर संपर्क क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ वीजग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी खासदार बापूसाहेब थिटे यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार बापूसाहेब थिटे यांचे शुक्रवारी दीर्घशा आजाराने निधन झाले. बापूसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते.

शिरुर पंचायत समिती सभापती, पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. रांजणगाव एमआयडीसीचे संस्थापक, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक,तसेच तालुक्यातील अनेक संस्थेत विविध पदांवर त्यांनी काम केले होते. थेटे यांच्या पार्थिवावर १९ मार्च रोजी वैकुंठ स्माशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धक्कादायक! नातवाचा खून करुन आजोबाची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

दहा वर्षाच्या नातवाचा खून करुन आजोबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोंढाव्यातील जैन सोसायटीमध्ये राहणारे सुधीर दागडूमल शहा (वय-६५) यांनी जिनय शहा या नातवाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुधीर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी रात्री घरातील सर्व जण जेवण करुन झोपले होते. जिनयचे आई-वडील त्यांच्या बेडरुममध्ये झोपले होते. तर जिनय आजोबांसोबत त्यांच्या बेडरुममध्ये झोपला होता. पहाटेच्या सुमारास सुधीर यांनी जिनयचा गळा आवळून खून केला. त्यानंतर सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमक्या कोणत्या कारणामुळे सुधीर यांनी हे कृत्य केले याचा पोलिस तपास करत आहेत. त्यांनी सुधीर सुसाईड नोट लिहली आहे का याचा देखील पोलिस शोध घेत आहेत. पोलिस उायुक्त सुधीर हिरेमठ, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फ्रॉड कॉलसेंटर’ उद‍्ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिल्लीकर ठकांकडून पुणेकरांना फसवण्यात येत असल्याचे आणखी एक मोठे रॅकेट गुन्हे शाखेच्या सायबर सेलने उघडकीस आणले. या ठकांनी पुणेकरांसह देशातील ६५० गरजू तरुणांना अडीच कोटी रुपयांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी दिल्लीतील 'फसवणुकीचे कॉलसेंटर' उद‍्ध्वस्त करत एका ठकाला गजाआड केले.

कुणाल स्वराज सिंह (वय ३२, रा. ई-सेक्टर ३९, नोएडा, उत्तर प्रदेश) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नोएडा येथे आरोपींकडून सुरू असलेल्या कॉलसेंटरमध्ये ६० कर्मचारी काम करत होते. सायबर सेलने नोएडा येथे छापा घालून त्या कॉलसेंटरमधील कम्प्युटर, हार्डडिस्क आणि दोन लाख ३० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

सिंह हा 'युव्ही कॅरिअर स​र्व्हिसेस'चा मालक आहे. त्याने shine.com व naukari.com या वेबसाइटवर नोकरीची गरज असलेल्या तरुणांनी 'अपलोड' केलेली माहिती विकत घेतली. त्या माहितीच्या आधारे तरुणांना नोकरीसाठी फोन करून त्यांना फसवण्यात येत असल्याचे सायबर सेलच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आरोपींनी विविध बँकांचे अठरा अकाउंट वापरले आहेत. या अकाउंटवर देशभरातील विविध गरजू तरुणांनीनी तब्बल अडीच कोटी भरल्याचे उघडकीस आले आहे.

सायबर सेलचे सुनील पवार, सहायक निरीक्षक संजय ठेंगे, सीमा साठे, गिरीषा निंबाळकर, फौजदार प्रवीण स्वामी, आशा मांगुरे, मोहन साळवी, अस्लम आत्तार, अजित कुऱ्हे, राजेश जाबा, किरण अब्दागिरे, राजू भिसे, विजय पाटील, दीपक माने, अश्विन कुमकर, भास्कर भारती, गिरीष गावडे आदींचा तपास पथकात सहभाग होता.

अशी झाली फसवणूक

वाकडेवाडी येथील वैभव दशरथ कांबळे (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबरसेलमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी कांबळे यांना नोकरीबाबत विचारणा केली होती. पर्मनंट हायरिंग प्लेसमेंटमधून बोलत असल्याचा बहाणा करत त्यांचे नाव नोकरीसाठी निवडले गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या​कडून रजिस्ट्रेशन, सीव्ही फॉरर्वडिंग, कागदपत्रे पडताळणी यासाठी वेळोवेळी १८ हजार ७०० रुपये अकाउंटवर भरून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना 'एचसीएल' कंपनीतून नोकरीसाठी कॉल आल्याचे भासवण्यात आले. नोकरीसाठी त्यांना २१ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरण्यास सांगण्यात आले. कांबळे यांनी तिही रक्कम भरली. त्यानंतर त्यांना नोकरीचे काम होत नसल्याने रक्कम तुमच्या अकाउंटवर पाठवण्यात येत असल्याचे सांगितले. ही रक्कम पाठवण्यासाठी त्यांनी कांबळे यांना त्यांच्या बँक अकाउंटची गोपनीय माहिती विचारली. कांबळे यांनी त्यांच्या काकांच्या अकाउंटची माहिती दिल्यानंतर त्यावरील एक लाख नऊ हजार ९९९ रुपये परस्पर काढून फसवणूक करण्यात आली. अशा प्रकारे आरोपींनी कांबळे यांची तब्बल दीड लाख रुपयांची फसवणूक केली.

पुण्यातून आठ, तर राज्यातून ६३

महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद, बारामती, ठाणे, नागपूर, जळगाव, अकोला, सातारा, नवी मुंबई, बुलढाणा, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातून ६३ जणांची फसवणूक झाली आहे. पुण्यातून आठ तरुणांनी आरोपींच्या अकाउंटमध्ये पैसे भरल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती कामामुळे लोकल विस्कळित

$
0
0

पुणे : पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर खडकी रेल्वेस्थानकाजवळ पादचारी पूल उभारण्याच काम आज, रविवारी (२० मार्च) रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे ते २ वाजून २० मिनिटांपर्यंत करण्यात येईल. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजता सुटणारी लोणावळा-पुणे लोकल चिंचवडपर्यंत धावेल, तर दुपारी एक वाजता सुटणारी पुणे-लोणावळा लोकल ही पुण-चिंचवड दरम्यान रद्द असेल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याजदर कपातीने नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) व किसान विकास पत्र या दोन्ही अल्पबचत योजनांवरील व्याजदर शुक्रवारी कमी केले. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. सरकारी योजनांमधील पैसा काढून नागरिकांनी बेभरवशाच्या शेअर बाजारात पैसे गुंतवावेत, यासाठी सरकार हा डाव खेळत आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.

पीपीएफ किंवा पोस्टातील ठेवी, किसान विकास पत्र ही सर्वसामान्यांसाठीची हक्काची गुंतवणूक समजली जाते. पीपीएफमधील गुंतवणूक तरुणपणी भविष्याची तरतूद म्हणून केली जाते. तर अनेकजण आपल्या निवृत्तीनंतर हाती येणारी रक्कम किसान विकास पत्र आणि पोस्टाच्या ठेवींमध्ये गुंतवून त्यावरील व्याजातून घरखर्च चालवतात. सरकारने आता याच ठेवींवरील व्याजदरात कपात केल्याने या सर्वसामान्य गुंतवणुकदारांपुढे नवी समस्या उभी ठाकली आहे.

'मी दरमहा पीपीएफ खात्यात नियमित पैसे भरतो. या योजनेत मिळणारे चांगले व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी करमुक्त रक्कम यामुळेच मी गुंतवणूक सल्लागारांच्या सल्ल्यानुसार या योजनेत गुंतवणूक केली आहे. परंतु, सरकारने पीपीएफवर केलेली व्याजकपात स्वप्नांवर पाणी फेरणारी आहे,' असे अमोल चक्रनारायण यांनी सांगितले.

सरकारी योजनांचे व्याज दर कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शेतीचा विकास, देशातील पायाभूत सुविधांचा विकास यासाठी काटकरसर करून निधी वापरण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असावा, असे मला वाटते. ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे व्याज दर कमी झाल्याचे वाईट वाटणारच. सरकार देशहितासाठी असा निर्णय घेत असेल तर ज्येष्ठांनी त्याला पाठिंबाच द्यायला हवा, असे सांगाती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाथ वळे यांनी सांगितले.

'देशातील पेन्शनर आणि पेन्शन नसलेल्या बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ ठेवींवरील व्याजावर चालतो. चरितार्थाचे साधन असलेले व्याज दरच कमी झाले तर ज्येष्ठांचे जगणेच असह्य होईल. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे त्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्याला या व्याजाच्या आधारे कसेबसे जगता येत आहे. ते कमी झाले तर मोठी कुऱ्हाडच कोसळणार आहे. सरकारने तीन महिन्यांनंतर या दरांचा फेरविचार करण्याचे जाहीर केले आहे; पण जर दर पूर्ववत झाले नाहीत तर ज्येष्ठांना जगणे मुश्कील होईल. सरकारी योजनांचे व्याज दर पूर्ववत करून सरकारने ज्येष्ठांचे जगणे सुसह्य करावे,' अशी अपेक्षा डिफेन्स अकाउंट्स पेन्शनर असोसिएशनचे कार्यकारी सदस्य शैलेंद्र म्हसकर यांनी व्यक्त केली.

'अच्छे दिनची स्वप्न दाखविणारे हे सरकार प्रत्यक्षात काळे दिन आणत आहे. सध्या सर्वच ठेवींवरील व्याजदर कमी झाले आहेत, हे कारण देऊन या ठेवींवरचे व्याजही कमी केले आहे. आता म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीत यापेक्षा अधिक रिटर्न मिळतील, असे दाखवून सर्वसामान्यांनाही या बेभरवाशाच्या गुंतवणुकीकडे ओढण्याचा प्रयत्न आहे,' असे रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

'म्हातारपणातील आधारासाठी ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेअंतर्गत वृद्धांना इतरांपेक्षा जास्त दर दिला जात होता. मात्र, आता सरकारने या ठेवींवरील व्याजदर कमी केल्याने आमचे नुकसान होणार आहे. निवृत्तीनंतर मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर घर चालविणारे माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना या निर्णयाचा फटका बसेल,' असे सुमन जाधव यांनी सांगितले.

'पहिल्यांदा सरकारने पीएफच्या रकमेवर कर लावला. जनक्षोभानंतर तो मागे घ्यावा लागला. आता पीपीएफ, एनएससी, केव्हीपी आणि पोस्टातील ठेवींवरच्या व्याजदरात मोठी कपात करून सरकार सर्वसामान्यांच्या पोटावरच पाय देऊ पाहात आहे,' असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खटल्याच्या त्रासामुळे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर
'कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात घालवून मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा या कटकटीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या बरोबर मी जीनयला घेऊन जात आहे. कारण मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. मी त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. मनावर दगड ठेऊन मी त्याला बरोबर नेण्याचा निर्णय घेतला आहे'.

कोंढवा येथील 'शांतीनगर' या सोसायटीत घडलेल्या खून आणि आत्महत्या नाट्यातील आजोबांनी लिहिलेली सुसाइड नोट अनेकांची झोप उडवणारी आहे. भावाविरुद्ध सुरू असलेल्या खटला हा केवळ आपल्याला त्रास देण्यासाठी लावला असल्याची भावाना झालेल्या सुधीर शहा यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

शहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जीनयचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शहा कुटुंबीय एक वर्षापासून कोंढवा बुद्रक येथील शांतीनगर सोसायटीमध्ये राहण्यास आले. जीनय हा सिंहगड रोड येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. त्याला एक तीन वर्षांची छोटी बहीण आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनाक्रम समजून घेत सोसायटीतील 'सीसीटीव्ही' फुटेज तपासले. पोलिस पोहचण्यापूर्वी स्थानिकांकडून घातपात घडवून आणल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करत हा खून सुधीर शहा यांनी केल्याच्या निर्णयाप्रत आले आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला. शांतीनगर येथील घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. व्हॉट्सअॅपवर ​फिरणाऱ्या मेसेजमुळे 'शांतीनगर'मध्ये गर्दी वाढू लागली होती. पोलिसांनी बंदोबस्त नेमत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अश्लील शेरेबाजीबाबत कारवाई करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागातील अश्लील शेरेबाजी प्रकरणाची योग्य दखल घेतली गेली नसल्याचे समोर येत आहे. याबाबत तब्बल ५५ विद्यार्थिनींनी तिघा कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार देऊनही याची माहिती वरिष्ठ स्तरावर देण्यात आली नाही. हे प्रकरण विभाग स्तरावरच हाताळण्यात आले. या पार्श्वभूमीवर कुलगुरुंनी मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार अमोल ग. खंदारे (शिपाई), विलास ल. कांबळे (लॅब असिस्टंट) व अष्टशील वा. मगरे (लॅब असिस्टंट) या तिघांना निलंबित केले आहे. हे तिघेही विद्यापीठात नुकतेच रूजू झाले असून सध्या प्रोबेशनवर काम करत होते. तक्रारीनुसार या तिघांनीही विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार केले आहेत. विद्यापीठाच्या स्पष्ट सूचना असूनही विभागातर्फे याची कल्पना वरिष्ठ स्तरावर देण्यात आली नाही. सुप्रीम कोर्ट व विशाखा समितीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अशी प्रकरणे हाताळण्यात येतात. आताही विद्यार्थिनींनी तक्रार मागे घेतली असली, तरी विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.

'विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागातील ५५ विद्यार्थिनींनी तिघा कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण विभाग स्तरावरच हाताळण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्याचे कारण देत सहा विद्यार्थिनींनी इतर सर्व विद्यार्थिनींच्या वतीने तक्रार मागे घेतली. विशाखा समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल,' असे डॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images