Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे-जबलपूर, पुणे-नागपूर दोन विशेष रेल्वे गाड्या

$
0
0

पुणे-जबलपूर, पुणे-नागपूर दोन विशेष रेल्वे गाड्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उन्हा‍ळ्याच्या सुट्ट्यांमधील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-जबलपूर आणि पुणे-नागपूरदरम्यान प्रत्येकी दोन विशेष साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत, तर यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसला नागपूर हा अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
पुणे-जबलपूर आणि जबलपूर-पुणे या गाड्या चार ते २८ एप्रिलदरम्यान धावणार आहेत. जबलपूरवरून सोमवारी पावणेसात वाजता सुटणारी गाडी मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजता पुण्याला पोहोचेल, तर पुण्यावरून मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजता सुटणारी गाडी बुधवारी सकाळी सव्वासहा वाजता जबलपूरला पोहोचेल. आणि पुणे-नागपूर-पुणे या दरम्यान पाच ते २७ एप्रिल दरम्यान, दोन गाड्यांच्या प्रत्येकी चार फेऱ्या होणार आहेत. पुण्यावरून सहा, १३, २० आणि २७ एप्रिलला आणि नागपूरवरून पाच, १२, १९ व २६ एप्रिलला या गाड्या सुटणार आहेत.
दरम्यान, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस आणि बिकानेर-यशवंतपूर एक्स्प्रेस या गाड्यांना नागपूर हा अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. त्यांची अंमलबजावणी अनुक्रमे २० व २१ मार्चपासून केली जाणार आहे. पुणे-हातिया एक्स्प्रेस व हातिया-पुणे एक्स्प्रेस या गाड्यांना राज॔नांदगाव हा थांबा देण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी २२ मार्चपासून केली जाणार आहे. विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) या गाडीला सलामकोट हा थांबा देण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी १७ मार्चपासून केली जाणार आहे. हे बदल प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी केले आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
---------
१७, २० ला ब्लॉक
लोणी व उरुळीकांचन स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरूस्तीसाठी १७ मार्च व २० मार्च रोजी दुपारी १२.३० ते ३.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवरून दुपारी 3.१५ वाजता सुटणारी पुणे-निजामाबाद पॅसेंजर ५० मिनिटे उशिराने सुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौन्सेलिंगचा कोर्स वीस एप्रिलपासून

$
0
0

कौन्सेलिंगचा कोर्स वीस एप्रिलपासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'श्यामची आई फौंडेशन'तर्फे २० एप्रिल २०१६ ते २८ मे २०१६ या कालावधीमध्ये 'करिअर मित्र' या कौन्सेलिंग अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार सायंकाळी ६.३० ते ८.३० आणि शनिवारी सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत हा कोर्स भांडारकर इन्स्टिट्यूट, लॉ कॉलेज रोड येथे राबविण्यात येणार आहे.
'श्यामची आई फौंडेशन' ही संस्था महाराष्ट्र सरकारच्या करिअर कौन्सिलिंग समितीची सदस्य आहे. या वर्षी इयत्ता दहावीच्या १६ लाख विद्यार्थ्यांच्या झालेल्या कलचाचणीत संस्थेने महत्त्वाचे योगदान दिले. संस्थेने राज्य सरकारच्या आयव्हीजीएस विभागातील ५०० करिअर कौन्सेलरना प्रशिक्षणही दिले आहे. त्याचबरोबर संस्थेमार्फत पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये करिअर कौन्सेलिंग केले जाते.
'विद्यार्थ्यांपुढे सध्या करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या पर्यायांतून नेमकी कोणत्या शाखेची निवड करायची, याबाबत विद्यार्थी आणि त्यांचे पालक संभ्रमात असतात. त्यातून मार्ग दाखविण्यासाठी सध्या कौन्सेलरची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे शास्त्रशुद्ध अॅप्टिट्यूड टेस्टही गरजेची बनली आहे. या दोन्हींबाबत या कोर्समध्ये प्रशिक्षण दिले जाते,' अशी माहिती फौंडेशनच्या शीतल बापट यांनी दिली. ज्येष्ठ करिअर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत हे या कोर्सचे संचालक आहेत. 'करिअर मित्र'चा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित कौन्सेलरना 'श्यामची आई फौंडेशन'च्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचीही संधी मिळते.
....................
कोर्सची माहिती
- वेळ : प्रत्येक आठवड्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सायं. ६.३० ते ८.३० आणि शनिवारी सायं. ५ ते ८
- स्थळ : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, लॉ कॉलेज रोड
- अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०००४१३७० किंवा ९३२६१७९४५९ किंवा ९८५०८८६५७५; ई-मेल : shyamchiaaifoundation@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत उकाडा वाढणार

$
0
0

येत्या दोन दिवसांत उकाडा वाढणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी हवेतील गारवा कायम आहे. दोन दिवसांत मात्र तापमानात वाढ होऊन व हवामान ढगाळ होऊन उकाडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील दोन दिवसांपर्यंत शहरातील कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांदरम्यान होते, तर किमान तापमान १५ ते १८ अंशांदरम्यान होते. त्यानंतर अचानक तापमानात घट होऊन कमाल तापमान ३३ व किमान तापमान १२.८ अंशांपर्यंत उतरले होते. सोमवारी मात्र, तापमानात काहीशी वाढ होऊन कमाल तापमान ३५.४ तर किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. राज्यातही काही ठिकाणी तापमानात वाढ झाली.
मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमान परभणी येथे (३८.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. सोलापूर येथे ३८.१, अकोला येथे ३७.१, कोल्हापूर येथे ३५.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले.
उत्तरेकडील काही राज्यात थंडी असून काही भागात पाऊस होत आहे. तेथून राज्याकडे गार वारे वाहत आहेत; परंतु मंगळवारपासून मराठवाड्याच्या भागात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या काहीशा उष्ण व बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मंगळवार व बुधवारी विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर पुण्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा त्रास

$
0
0

महिला कर्मचाऱ्याने वाचला आयुक्तांसमोर पाढा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतील उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने केली आहे. स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच या महिलेने नगरसेवकांची भेट घेऊन संबधित अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाचा पाढा पालिका आयुक्तांसमोर वाचला. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला.
समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी महिला कर्मचारी सभागृहाच्या बाहेर आली. समितीच्या सदस्या आणि शिवसेनेच्या नगरसेविका दीपाली ओसवाल यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडून दिला जाणारा मानसिक त्रास आणि सतत होणाऱ्या अपमानाची माहिती रडतरडतच दिली. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात ही महिला कामाला असून, तेथील उपायुक्त दर्जाचा अधिकारी त्रास देत असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांसमोर जाणीवपूर्वक अनेकदा अधिकाऱ्याने अपमान केल्याचीही तक्रार या महिलेने आयुक्तांसमोर केली.
प्रभारी उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आलेला या अधिकाऱ्याने या पूर्वी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. येथे काम करत असतानाही एका महिला कर्मचाऱ्याने तत्कालीन आयुक्तांकडे या अधिकाऱ्याची तक्रार केली होती. यानंतर संबंधित अधिकाऱ्याची बदली घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली. हा अधिकारी महापालिका आयुक्तांचा अत्यंत विश्वासू असल्याने आजवर कोणतीही कारवाई त्याच्यावर करण्यात आलेली नाही. उलट एका महत्वाच्या विभागाची प्रभारी उपायुक्त पदाची जबाबदारी देऊन त्यांना प्रमोशन देण्याचा प्रकार करण्यात आला आहे. अनेकदा पालिकेतील नगरसेवकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्याची भेट घ्यायची झाल्यास ते कधीही वेळेवर कार्यालयात भेटत नाहीत, अशी या अधिकाऱ्यांची ख्याती आहे. मात्र, केवळ आयुक्तांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्यानेच त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई झाली नसल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमेंट रस्त्यांसाठी पाण्याचा अपव्यय

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले; विकासकामे जूनपर्यंत थांबवण्याचे सूतोवाच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करून वापरात काटकसर करीत असताना शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे योग्य नाही, अशा शब्दांत जिल्हाधिकारी सौरव राव यांनी महापालिकेला फटकारले. पाण्याचा वापर होत असलेल्या विकास कामांवर पावसाळ्यापर्यंत निर्बंध घालायला हवेत, असे सांगून त्यांनी सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचे सूतोवाच केले.
पिण्याच्या पाण्याचा वापर होत असलेली सिमेंटच्या रस्त्यांची कामे लगेचच करण्याची निकड नाही. ही कामे चार महिन्यांनी केली तरी चालू शकतात. त्यामुळे विकास कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर तो थांबवावा, अशी सूचना महापालिकेला करणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. धरणांत पाणी नसल्याने पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शेतीसाठी देण्यात येणारे पाणीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांतील पाणीसाठी जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी काटकसरीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे.
या संदर्भात पत्रकारांनी जिल्हाधिकारी राव यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी पिण्याच्या पाण्याचा सिमेंट रस्त्यांसाठी होत असलेल्या वापराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे नागरिकांना दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. पाणीवापराचे हे निर्बंध असताना सिमेंट रस्त्यांसाठी स्वच्छ पाणी वापरणे योग्य नाही. त्यासाठी प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी महापालिका वापरू शकते, असे सांगितले. पाण्याची कमतरता असल्याने शहरात सुरू असलेल्या विकास कामांवर पावसाळ्यापर्यंत निर्बंध घालायला हवेत. ही कामे चार महिन्यांनी केली तरी कोणतीही अडचण येणार नाही, असेही जिल्हाधिकारी राव यांनी स्पष्ट केले.
..
स्वीमिंग टँक, गॅरेजच्या पाण्यावर निर्बंध
धरणांतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शहरात पाणीवापरावर बंधने घालण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. शहरातील स्वीमिंग टँक, गॅरेज तसेच नव्याने होणाऱ्या बांधकामांसाठी महापालिकेने पाणीवापराची बंधने घालणे आवश्यक आहे.
..
रेन डान्सला परवानगी नाही
होळी व रंगपंचमीला रेन डान्स पार्टीचे आयोजन केले जाते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडून परवानगी देण्यात येते. परंतु यंदा पाणीटंचाई असल्यामुळे शहर व ग्रामीण भागात रेन डान्स पार्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच या उत्सवकाळामध्ये खडकवासला धरणात कोणालाही उतरू दिले जाणार नाही. त्यासाठी खडकवासला धरणावर पोलिस तसेच होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील धरणांमध्ये ७.५ टीएमसी साठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणीकपातीची सद्यस्थिती कायम ठेवून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिली. धरणांत पिण्यापुरताच पाणीसाठा असल्याने शेतीसाठी पाणी दिले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांत सद्यस्थितीत ७.५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. पवना धरणातही पिण्यासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा आहे. यंदा उन्हाळा लवकर जाणवू लागल्याने धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. तथापि, पुणे व पिंपरी-चिंचशहरामध्ये सद्यस्थितीत लागू करण्यात आलेली पाणीकपात कायम ठेवल्यास १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत आहे, असेही त्यांनी सांगितले.
धरणांत पिण्यासाठी पुरेल एवढेच पाणी असल्याने ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही. इंदापूर व दौंडमधील गावांना एप्रिलमध्ये सिंचनासाठी आवर्तन दिले जाते. ते यंदा बंद राहणार आहे. तसेच या तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे तलाव मागील महिन्यात धरणांतील पाणी सोडून भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही. इंदापूरमध्ये पाणीटंचाई जाणवल्यास उजनी धरणाच्या जलाशयातून पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याची हवा श्वसनाला घातक

$
0
0


Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणे : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या हवेच्या परिक्षणानुसार हवेतील सल्फरडाय ऑक्साइडचे वार्षिक प्रमाण बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि मुंबईशी तुलना करता अधिकच आहे. श्वसनाला घातक असलेल्या धुलिकणांचे पुण्यातील प्रमाण प्रमाणित पातळीपेक्षा दोन पटीने जास्त आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक वायूच्या उत्सर्जनाबद्दल मर्यादाही स्पष्ट केल्या आहेत. पण, सार्वजनिक वाहतूक सुधारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे.
गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास काही अपवाद वगळता बहुतांश दिवस हवेची गुणवत्ता खालावल्याचेच (पिवळा रंग) दिसून आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हिरवा रंग म्हणजे कमी त्रास देणारी हवा, पोपटी म्हणजे संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास काही प्रमाणात त्रासदायक असणारी हवा, पिवळा रंग हा श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांना घातक हवा, नारंगी म्हणजे सर्वांनाच श्वसनास त्रासदायक असणारी हवा, तांबडा आणि गडद तांबडा रंग हे गंभीर हवामानाचे प्रतीक आहेत.

.........................
प्रदूषक घटकांमुळे होणारे दुष्परिणाम
रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टीक्युलेट मॅटर : श्वसनाचे विकार, दमा, हृदयरोग
सल्फर ऑक्साइड : हृदयरोग, श्वसनाचे विकार, कर्करोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी
नायट्रोजन ऑक्सॉइड : फुफ्फुसाचा दाह, जंतू संसर्ग
कार्बन मोनॉक्साइड : मानवी हृदयावर परिणाम, रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्बोक्सी हिमोग्लोबिनमध्ये रुपांतर होते
..
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी
जानेवारी २०१६
(कमाल मर्यादा)
सल्फरडायऑक्साइड नायट्रोजन आरएसपीएम

(८० मायक्रॉन प्रति घनमीटर) (८० मायक्रॉन प्रति घनमीटर) (१०० मायक्रॉन प्रति घनमीटर) पिंपरी चिंचवड ५३ १३६ २०६ (केवळ १ दिवस मर्यादेपेक्षा कमी)

कर्वे रोड ४१ ९१ २१७ (केवळ ५ दिवस मर्यापेक्षा कमी)

नळ स्टॉप ३४ १३३ ३२२ (सर्वच दिवस मर्यादेपेक्षा जास्त)

भोसरी ७३ ९४ ३३६ (सर्वच दिवस मर्यादेपेक्षा दुपट्टीने जास्त )

स्वारगेट ३० १२८ ५५० (मर्यादेपेक्षा तिपटीने जास्त )
...............
फेब्रुवारी
पिंपरी चिंचवड ७९....११७....२२० (महिन्यात एकही दिवस मर्यादेपेक्षा कमी नाही)
कर्वे रोड २१.....७०.......१५०
..

मार्च
पिंपरी चिंचवड ५९......९७....१६०
कर्वे रोड २४.....७३....१११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाश्वत पर्यटनाची गरज

$
0
0

रोजगार मिळाल्यास स्थानिकांकडून कासचे संरक्षण; तेर पॉलिसीचा अहवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पर्यटकांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण, गावकऱ्यांना रोजगार आणि कास पठारावरील जैववैविध्याचे संवर्धन या तिन्हींचा समतोल साधण्यासाठी शाश्वत पर्यटनाच्या दिशेने पावले उचलण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाल्यास तेच कासचे संरक्षण करतील, असा निष्कर्ष तेर पॉलिसी सेंटरने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
पश्चिम घाटातील कास पठार, कोयना अभयारण्य, चांदोली आणि राधानगरी अभायरण्यातील संवेदनशील जैववैविध्याची दखल घेऊन 'युनेस्को'ने या ठिकाणांना 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चा दर्जा दिला आहे. हे मानांकन मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तेर पॉलिसी सेंटरतर्फे कास पठारावर सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दर्जा मिळून चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेंटरने पठाराचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सेंटरचे डॉ. राजेंद्र शेंडे आणि अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी हा अहवाल तयार केला आहे.

'पठारावर सुरू असलेल्या कामांबद्दल गावकरी समाधानी आहेत. मात्र, अर्थार्जनाच्या संधी वाढविण्याची अपेक्षा त्यांच्याकडून सातत्याने व्यक्त होत आहेत. पर्यटकांची प्रचंड संख्या असतानाही येथे अद्याप सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी निधी मिळालेला नाही. सध्या अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहे अकार्यक्षम आहेत. तासन्तास होणाऱ्या लोडशेडिंगमुळे गावकऱ्यांना होम स्टेची सुविधा देता येत नाही. गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वनविभाग, पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटकांनी सहकार्य करावे,' असे शेंडे म्हणाले.
पश्चिम घाटातील संवेदनशील ठिकाण असलेल्या पठारावर आपण राहतो, याचा अभिमान गावकऱ्यांनी बाळगला पाहिजे. पर्यटनातून गावकऱ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या साठी त्यांनी स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पर्यटकांचे आदरातिथ्य, उत्तम जेवण आणि राहण्याची चांगली सोय उपलब्ध झाल्यास नक्कीच चांगला रोजगार उपलब्ध होईल, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी सांगितले.
.....
सर्वेक्षणातील निरीक्षणे
- पठारावरील जैववैविध्याच्या संरक्षणाची गावकऱ्यांमध्ये जाणीव कायम राहणे आवश्यक
- पर्यटकांना पेलण्याच्या क्षमतेचा विचार करून शाश्वत पर्यटनाची गरज
- वाहनांची गर्दी आणि पार्किंग व्यवस्थेचे काटेकोरपणे व्यवस्थापन आवश्यक
- पठार परिसरात पर्यटकांना माहिती देणारे निसर्ग परिचय केंद्र सुरू करावे
- वनविभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यातील सहकार्य वाढण्याची गरज
- पठारावरील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दिल्या पाहिजेत
..................

वर्ष गाड्यांची संख्या पर्यटकांची संख्या

२०११ ५६,६६० ३,३३,६१९

२०१२ ३,३२७ ९१,१६७

२०१३ ४,५६० १,२८,४१४

२०१४ ६,७६३ ९९,२८०

२०१५ १५,८३१ १,२५,९२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच रविवारी दोन स्पर्धा परीक्षा

$
0
0

एमपीएससी, रेल्वेसाठी अर्ज भरलेल्यांची सत्वपरीक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि रेल्वे भरती मंडळाची नॉन टेक्निकल पॉप्युलर गटासाठीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांना अर्ज केलेल्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगामार्फत शक्यतो रविवारीच परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यानुसार आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीही १० एप्रिलचा रविवार निश्चित केला आहे. त्यासाठीच्या जाहिरातीमध्येही तशी स्पष्टताही करण्यात आली होती. दुसरीकडे रेल्वे भरती मंडळाने परीक्षेची निश्चित तारीख जाहीर न करता, मार्चचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला आठवडा असा कालावधी जाहीर केला होता. तसेच, त्यामध्ये राज्यातील उमेदवारांसाठी दोन हजार १०० पदे दाखविण्यात आली होती. त्यामुळेच तारीख निश्चित नसली, तरी राज्यातील हजारो उमेदवारांनी या परीक्षेचे अर्ज भरले आहेत. रेल्वेने या परीक्षेसाठीचे हॉलतिकीट उपलब्ध करून देताना उमेदवारांना परीक्षेची तारीख कळविली आहे. त्यातूनच राज्यसेवा परीक्षेच्या दिवशीच राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना रेल्वेची परीक्षा द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही प​रीक्षांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची अडचण झाली आहे. त्यामुळे एक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळ आणि आयोगाकडे या विषयीचा पत्रव्यवहार केला असला, तरी त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे उमेदवारांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
..
नियोजनात सुसूत्रतेचा अभाव
पदवीनंतरच्या टप्प्यावरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रविवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, रेल्वे भरती मंडळ, स्टाफ सिलेक्शन कमिशन, देशभरातील बँकांच्या नोकरभरतीसाठी कार्यरत 'आयबीपीएस' या परीक्षा मंडळांसोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट, तर राज्य पातळीवरील प्राध्यापक पात्रता परीक्षाही (सेट) शक्यतो रविवारच्याच दिवशी आयोजित केली जाते. या परीक्षांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे असले, तरी अनेकदा दोन वा तीन वेगवेगळ्या परीक्षांचे निकष पूर्ण करून, त्या परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्याही मोठी दिसून येते. असे असतानाही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील परीक्षा यंत्रणांमध्ये समन्वयाचा आणि सुसूत्रतेचा अभाव असल्याने अशा उमेदवारांना त्यापैकी केवळ एकाच परीक्षेला बसता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधींना ठेंगा

$
0
0

स्मार्ट सिटीच्या 'एसपीव्ही'वर 'अधिकारी राज'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) या विशेष कंपनीतील लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाला कात्री लावण्यात आली आहे. महापालिकेने राज्य सरकारला पाठविलेल्या प्रस्तावात आठ लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आले असले, तरी सरकारने एसपीव्ही मंजूर करताना, संचालक मंडळावर सहाच लोकप्रतिनिधींना स्थान दिले आहे. त्यामुळे एसपीव्हीच्या १५ सदस्यीय संचालक मंडळावर अधिकाऱ्यांचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचा सविस्तर प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने गेल्या महिन्यात राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. यामध्ये संचालक मंडळावरील १५ सदस्यांमध्ये आठ लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. राज्य सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या कमी केली असून, सहा लोकप्रतिनिधींना संचालक मंडळावर स्थान देण्यात आले आहे. यामध्ये, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त महापालिकेतील राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार दोन संचालकांची नेमणूक सर्वसाधारण सभेकडून करावी, असे सरकारने सूचित केले आहे.

पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावातून उपमहापौरांना वगळण्यात आले असून, राजकीय पक्षाच्या एका प्रतिनिधीलाही डच्चू देण्यात आला आहे, तर राज्य सरकारच्या तीन प्रतिनिधींना स्थान देण्याचे पालिकेच्या प्रस्तावात म्हटले असताना, चार सदस्यांना संचालक मंडळावर नेमण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांसह, पोलिस आयुक्त, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह नगररचना विभागाच्या सहसंचालकांना संचालक मंडळावर स्थान देण्यात आले आहे; तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांचीही संचालक मंडळावर नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एसपीव्हीच्या संचालक मंडळावर महापालिकेच्या सहा लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. त्या व्यतिरिक्त राज्य सरकारचे चार प्रतिनिधी, केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी, दोन स्वतंत्र संचालक आणि महापालिका आयुक्त व सीईओ यांचा समावेश संचालक मंडळावर असेल. महापालिका आयुक्त एसपीव्हीचे अध्यक्ष असतील, तर सीईओ हे कार्यकारी संचालक असतील.

.................

राजकीय संचालक नावापुरतेच?

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळावर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांचा समावेश असला, तरी इतर अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याने राजकीय संचालक केवळ नावापुरतेच असल्याची तक्रार केली जाते. एसपीव्हीच्या रचनेमध्येही लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. प्रत्यक्षात सहाच लोकप्रतिनिधींना संधी दिली गेली असून, उर्वरित सर्व अधिकारीच संचालक मंडळावर असतील. त्यामुळे, राजकीय संचालकांनी संचालक मंडळाच्या बैठकीत एखाद्या प्रस्तावाला विरोध केला, तरीही अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्याची दखल घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर यांच्याकडे सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

.......................

शिवसेनेला स्थान नाही

राज्य सरकारने सूचित केल्यानुसार महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे हे एसपीव्हीचे संचालक असतील. याशिवाय, राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार दोन सदस्यांची नेमणूक केली जाणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी एका सदस्याला संचालक म्हणून संधी मिळणार आहे. पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ कमी असल्याने संचालक मंडळावर शिवसेनेला स्थान मिळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ अटकेचे पुण्यातही पडसाद

$
0
0

किरीट सोमय्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ, राष्ट्रवादीने पुण्यात केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचा निषेध करतानाच खासदार किरीट सोमय्या यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले. बेफाम आरोप करणाऱ्या सोमय्या यांना पुण्यात पाय ठेवू देणार नसल्याचाही इशारा या वेळी देण्यात आला.
भुजबळांच्या अटकनाट्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना पुण्यातही विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा चौकात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आंदोलन केले. 'भाजपकडून सूडापोटी कारवाई केली जात असल्याची टीका करून सोमय्या अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. भाजपच्या सांगण्यानसुर 'ईडी'कडून कारवाई करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, मोहनसिंग राजपाल, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सभागृह नेते बंडू तथा शंकर केमसे, माजी उपमहापौर दीपक मानकर,राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
..
अजित पवारांवरील टीकचे पडसाद
सोमय्या यांनी सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते ​अजित पवार आणि सुनील तटकरे यांनाही लवकरच अटक होईल, असे भाष्य केले आहे. पुण्यातील आंदोलनात सोमय्या यांच्या वक्तव्यावर टीका करत हिंमत असेल तर सोमय्या यांनी पुण्यात येऊन बोलावे, असे आव्हान त्यांना स्थानिक नेत्यांकडून देण्यात आले. भाजप सरकार हायहाय, या सरकारचे करायचे काय- खाली डोके वर पाय, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भुजबळांच्या अटकेचा निषेध केला.
..
धायरी येथे आंदोलन
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे महानगरच्यावतीने धायरी येथील आमदार रमेश वांजळे उड्डाणपुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महानगर अध्यक्ष प्रीतम गव‍ळी यांनी भुजबळांवर केलेली कारवाई ही आकसापोटी केल्याची टीका केली. यावेळी महिलाध्यक्षा मंजिरी धाडगे, प्रभावती भूमकर, पंढरीनाथ बनकर, शिवराम जांभूळकर आदी उपस्थित होते.
..
महात्मा फुले मंडळाच्यावतीने निषेध
महात्मा फुले मंडळ, माळी आवाज संस्था, साध्वी सावित्रीबाई फुले मंडळ यांच्यावतीने भुजबळ यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. चांगदेव पिंगळे, मधुकर राऊत, सतीश भुजबळ, गुलाब रासकर, तुषार गद्रे, हनुमंत टिळेकर, कल्पना करपे, छबू नेवसे, शारदा लडकत, उषा भगत, मंगल जगताप, निलिमा कलावंत, उज्वला कांडपिळे, शशिकला ढोलेपाटील आदींच्यावतीने निषेधाचे पत्र काढण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’मध्ये ‘परिवर्तन’

$
0
0

नवनिर्माण पॅनेलला हरवून परिवर्तन पॅनेल विजयी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने महत्त्वाच्या तीन पदांवर आपला झेंडा रोवून 'नवनिर्माण' घडवले. परिषदेच्या कार्याध्यक्षपदी परिवर्तन पॅनेलचे प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहपदी प्रकाश पायगुडे, तर कोषाध्यक्षपदी सुनीताराजे पवार यांची निवड झाली. त्यांनी नवनिर्माण पॅनेलचे अनुक्रमे राजीव बर्वे, सुनील महाजन व योगेश सोमण यांचा पराभव केला.

साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी रात्री उशिरा निकाल जाहीर केला. निवडणूक अधिकारी अॅड. सुभाष किवडे, डॉ. सुधाकर जाधवर व साहित्य परिषदेच्या मावळत्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आदी या वेळी उपस्थित होते. परिवर्तन व नवनिर्माण या दोन पॅनेलमध्ये झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने विजय नोंदवला.

निवडणुकीत मतदानाचा टक्का यंदा वाढला होता. राज्यातील ११ हजार ३३६ मतदारांपैकी ६८४२ मतदारांनी मतदान केल्याने ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. २१ जागांसाठी ४८ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. 'परिवर्तन'चे २१ पैकी १३ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. कार्यवाह म्हणून दीपक करंदीकर, बंडा जोशी, उद्धव कानडे व अॅड. प्रमोद आडकर विजयी झाले. माधव राजगुरू व वि. दा. पिंगळे बिनविरोध निवडून आले.

प्रा. जोशी यांच्या रूपाने सर्वांत तरुण व पेशाने इंजिनीअर असलेला कार्याध्यक्ष परिषदेला मिळाला आहे. 'परिषदेत यापुढे राजकारण नाही तर साहित्यकारण घडेल. या संस्थेला वैभव प्राप्त करून देऊ,' अशी प्रतिक्रिया प्रा. जोशी यांनी नोंदवली.

-------------------------------------------

एकूण मते : ११,३३६

कार्याध्यक्ष :

प्रा. मिलिंद जोशी - ४२६३

राजीव बर्वे -२४७९

प्रमुख कार्यवाह

प्रकाश पायगुडे -४१२१

सुनील महाजन -२५१३

कोषाध्यक्ष

सुनीताराजे पवार - ३९३३

योगेश सोमण - २७२०
..............
विजयी प्रतिनिधी

शिरीष चिटणीस, डॉ. सतीश देसाई, डॉ. अरविंद संगमनेरकर, पुरुषोत्तम काळे, रावसाहेब पवार, राजन लाखे, विनोद कुलकर्णी, सोपानराव चव्हाण, रवींद्र बेडकीहाळ, पद्माकर कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, कल्याण शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याची हवा बनतेय अधिकाधिक प्रदूषित

$
0
0

काँक्रिटीकरण, वाहनांच्या धुरामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणे : 'चांगल्या हवेचे शहर' अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम, त्यातून वाट काढत जाणारी चाळीस लाखांहून अधिक वाहने अन् पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे उभ्या राहत असलेल्या काँक्रिटच्या जंगलामुळे पुणेकरांवर सध्या सिमेंटचाच श्वास घेण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या प्रदूषणाने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, याला काँक्रिटीकरण आणि वाहनांचा धूर हे घटक सर्वाधिक जबाबदार असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.

पुण्यासह प्रमुख प्रगत शहरांमधील पर्यावरणीय वास्तव जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दररोज शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हवा प्रदूषणाचे आकडे प्रसिद्ध केले जातात. गेल्या तीन महिन्यांतील आकडेवारीनुसार वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. पुण्यातील हवेच्या प्रदूषणात स्वयंचलित वाहने आणि काँक्रिटचा वाढता वापर यांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रस्त्यावर दररोज धावणाऱ्या चाळीस लाख वाहनांमधून प्रामुख्याने जीवाश्म इंधनाचा वापर होत असल्याने धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक वायू हवेत मिसळत आहेत. यातील 'रेस्पिरेटरी सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर'चे प्रमाण सर्वाधिक गंभीर आहे. तीस दिवसांपैकी बोटावर मोजण्याएवढे दिवस वगळल्यास इतर दिवशी हे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्तच बघायला मिळते आहे. रहदारी आणि काँक्रिटीकरणामुळे उत्सर्जित होऊन तरंगणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण ४५.८ टक्के आहे. या आकडेवारीचा विचार करता पुण्यात गंभीर स्थिती असल्याचे स्पष्ट होते.

...............

'वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक दुष्परिणाम'

'शहरातील गल्लीबोळांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या बांधकामामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडीदेखील वाढली आहे. या कोंडीतून मानवी आरोग्यास सर्वाधिक दुष्परिणाम संभवतात. या रस्त्यावरून गाडी हळू चालवताना वेग मंदावतो, गाडी अॅक्सिलरेट करताना जास्त धूर बाहेर पडतो आणि यातून धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याने श्वसनाचे आजार वाढले आहेत,' असे 'चेस्ट रिसर्च फाउंडेशन'चे डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले. 'या कामांमुळे सर्दी, खोकल्याबरोबरच ताप, दम्याच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. धूलिकणांच्या त्रासापासून वाचण्यासाठी महापालिकेने रात्रीदेखील काम करून ते लवकरात लवकर संपवावे,' असे आवाहन साळवी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुपरफास्ट सुपरकम्प्युटर

$
0
0

इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सी-डॅकने बनविला परम शावक

Harsh.Dudhe@timesgroup.com

पुणे ः देशातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवनव्या संशोधनाला चालना आणि त्यांच्यातील कौशल्यगुण वाढविण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) या विद्यार्थ्यांसाठी परम शावक सुपरकम्प्युटर तयार केला असून तो देशातील बहुतांशी एनआयटी आणि प्रमुख कॉलेजमध्ये बसविण्यात येत आहे. देशातील सर्वच इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये ही सुविधा निर्माण होण्यासाठी सी-डॅकची अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) चर्चा सुरू आहे. येत्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातील इंजनिअरिंग कॉलेजमध्ये हा सुपरकम्प्युटर दिसण्याची शक्यता आहे.

देशातील इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्प करता येण्यासाठी सर्व्हर व त्याला जोडलेले संगणक असतात. मात्र, या सर्व्हरचा वेग आणि त्याच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा लक्षात घेता त्याद्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करताना व प्रकल्प बनवताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सी-डॅकने शावक हा लहान आकाराचा सुपरकम्प्युटर तयार केला आहे. देशात डिसेंबर २०१४मध्ये कोइम्बतुरच्या पी. एस. जी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हा पहिला सुपरकम्प्युटर बसविण्यात आला. त्यानंतर देशातील काही एनआयटी, ईशान्य भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयात व प्रमुख महाविद्यालयांमध्ये हे सुपरकम्प्युटर बसविल्याची माहिती, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी सांगितले.

मूना म्हणाले की, कॉलेजना एक साधा सुपरकम्प्युटर बसवायचा असल्यास सुमारे ५ ते १० कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे संशोधन करण्यात आणि प्रकल्प बनवण्यावर मर्यादा येतात. त्यासाठी सी-डॅकने लहान आकाराची सीपीयू मशिन तयार केली आहे. या मशिनद्वारे हा सुपरकम्प्युटर काम करेल. या सुपरकम्प्युटरचा वेग महाविद्यालयातील सर्व्हरच्या वेगापेक्षा शंभरपट अधिक आहे.

असा आहे परम शावक

परम शावक सुपरकम्प्युटर कॉलेजमध्ये कमीत कमी पायाभूत सुविधांमध्ये स्थापन केला जाऊ शकतो तसेच त्याची देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी आहे. या सुपरकम्प्युटरच्या कार्यक्षमतेचा वेग २ टेराफ्लॉप व त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजमधील सर्व्हरच्या तुलनेत या सुपरकम्प्युटरच्या कार्याचा वेग अधिक आहे. यामध्ये पॅरलल प्रोग्रॅमिंग, म्हणजे एकच प्रोग्रॅमिंग अधिक ठिकाणी करण्याची सुविधा आहे. यात विज्ञान आणि इंजिनीअरिंग विषयाशी संबंधित अप्लिकेशन, टुल्स आणि ग्रंथालय आहेत. सी-डॅकने विकसित केलेले सॉफ्टवेअर असतील. तसेच उपयोगी सुपरकम्प्युटरच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी माहितीची गरज भासल्यास सी-डॅक पुणे केंद्रातील परम युवा - दोन या सुपरकम्प्युटरमार्फत मिळवण्याची मुभा असेल.

अभियांत्रिकीचे प्रकल्प तयार करुन त्यांचा फायदा लोकोपयोगासाठी करण्याबाबत मदत होईत. या सुपरकम्प्युटरचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना होण्यासाठी एआयसीटीई आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांसारख्या (सीओईपी) शिक्षण संस्थांशी चर्चा सुरु आहे.

- प्रा. रजत मूना,

महासंचालक, सी-डॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पिंपरी-चिंचवड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम चव्हाण (वय ३७) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. लोणीकंद येथील एका लॉजमध्ये चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे चव्हाण यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.

बिर्ला हॉस्पिटल, चिंचव देवस्थान, लोणावळा जवळील वाटरपार्क आणि NDA च्या हद्दितील अनधिकृत बांधकामे अशा अनेक प्रकरणांचा तुकारम चव्हाण पाठपुरावा करत होते. पुणे-नगर रस्त्यावरील लोनिकंद येथील एका लॉजमध्ये बुधवारी सकाळी गळफास घेतल्याच्या अवस्थेत तुकाराम चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळाची पाहणीतून तुकाराम चव्हाण यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली असा संशय निर्माण झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

चव्हाण हे माहिती अधिकार कायद्याचा वापर करून अनेक प्रकरणांचा पाठपुरावा करत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे काही अन्य कारण आहे का? याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पासपोर्ट पडताळणीत पोलिसांची उदासीनता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तेलंगण, आंध प्रदेश अवघ्या पंधरा दिवसांत पासपोर्टसाठीचे पोलिस व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकते, जम्मू काश्मीर, नागालँडमधील पोलिस देखील सकारात्मक प्रतिसाद देत असताना महाराष्ट्रातील पोलिस मात्र व्हेरिफिकेशनमध्ये उदासीन आहेत. नागपूरमधील पोलिस अद्याप ऑनलाइनही आलेले नाहीत, अशा शब्दांत देशाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी राज्यातील पोलिसांवर ताशेरे ओढले.

गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक पासपोर्ट काढणाऱ्या देशातील पहिल्या चार राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. याच वेळी राज्यातील पोलिस यंत्रणा व्हेरिफिकेशनच्या बाबतीत नकारात्मक प्रतिसाद देते आहे. देशातील पासपोर्ट अर्जाच्या पोलिस व्हेरिफेकशनचे सरासरी प्रमाण ३० दिवसांवर आले आहे. तेंलगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पोलिस घरी येऊन मोबाइल अॅपच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून जातात. हैदराबादने सहा दिवसांमध्ये ही यंत्रणा पूर्ण करून आघाडी मिळविली आहे. व्हेरिफिकेशन आणि पासपोर्टचे वितरण कमीत कमी कालावधीत होण्यासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर ऑनलाइन प्रक्रिया आणली आहे. मोबाइल अॅपमुळे पोलिसांचे निम्मे काम कमी झाले आहे. मात्र महाराष्ट्र या सर्व प्रक्रियेला अपवाद ठरला आहे. जम्मू काश्मीर, नागालँडमधील छोट्या शहरांपेक्षा राज्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे, असे परदेशी म्हणाले.

पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात चांगली प्रगती असून व्हेरिफिकेशनचा कालावधी घटला आहे. नागपूर पोलिसांशी वारंवार संवाद साधून त्यांनी सुधारणा केलेली नाही. नागपूर पोलिस अजून ऑनलाइन येण्यास तयार नाहीत. सध्या महाराष्ट्रात सरासरी व्हेरिफेकशनचे प्रमाण ५१ दिवसांपर्यंत लांबले आहे. महाराष्ट्रात पोलिसांनी मानसिकता बदलली पाहिजे, अशी अपेक्षा परदेशी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणी काळभोरमध्ये विटांनी ठेचून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोणी काळभोर येथे दारू पिताना झालेल्या वादात दोघांनी एका मित्राच्या डोक्यात सिमेंटच्या विटा घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मोहसीन मेहबुब तांबोळी (वय २६, रा. मारुती मंदिराजवळ, लोणी काळभोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप सूर्यकांत काळभोर (वय २४, रा. घोरपडेवस्ती, लोणी) व सागर राजेंद्र कुंदेकर (वय २५, रा. लोणी स्टेशन) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन व आरोपी हे तिघे मित्र आहेत. मंगळवारी रात्री सातच्या सुमारास तिघेही कदम वाकवस्ती परिसरातील एंजल इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दारू पित बसले होते. दारू पिताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. त्यावेळी आरोपींनी जवळ असलेल्या सिंमेटच्या विटा मोहसीनच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मोहसीन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मोहसीनच्या डोक्यात विटा घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. त्याचे वडील आल्यानंतर त्यांनी मोहसीनला ओळखले. मोहसीन याने घरी भाजी आणून दिल्यानंतर त्याचे मित्र प्रदीप काळभोर व सागर कुंदेकर यांच्याकडे जात आहे, असे सांगून बाहेर पडल्याचे वडिलांनी सांगतिले. त्यानंतर तो परत आलाच नाही. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी दोघेही आरोपी मंतरवाडी परिसरात लपल्याची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन साखर कारखान्यांवर जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नांदेडमधील तीन साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची रास्त आणि फिफायतशीर भाव (एफआरपी) रक्कम न दिल्यामुळे साखर आयुक्तांनी जप्तीचा आदेश दिला आहे. त्यामध्ये शंभू महादेव शुगर अँड अलाइड इंडस्ट्री, सिद्धी शुगर्स आणि पूर्णा सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.

थकित 'एफआरपी'बाबत १५ मार्च रोजी साखर आयुक्तांसमोर सुनावणी झाली होती. त्यामध्ये 'एफआरपी' न दिल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आयुक्तांनी जप्तीच्या कारवाईचा आदेश दिला आहे.

बाभुळगाव येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे चार कोटी ७७ लाख ५८ हजार रुपयांची 'एफआरपी'ची थकबाकी आहे. हावरगाव येथील शंभू महादेव शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीकडे दोन कोटी सहा लाख ८३ हजार रुपयांची, तर अहमदपूरमधील सिद्धी शुगर्सकडे एक कोटी ५१ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी व्याजासह वसूल करून ती शेतकऱ्यांना देण्यासाठी जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस यांची विक्री करण्यात यावी. आवश्यकता असल्यास कारखान्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्री करावी. त्याद्वारे संबंधित शेतकऱ्यांना 'एफआरपी' द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेडमधील भाऊराव चव्हाण कारखान्याने थकित 'एफआरपी'चे सुमारे साडेबारा कोटी रुपये दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे.

थकित 'एफआरपी' मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी याचिका दाखल केली होती. कोर्टाने व्याजासह थकित 'एफआरपी' वसूल करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले होते. त्यानुसार साखर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. 'कारखान्यांकडे गेल्या वर्षभरापासून थकबाकी असल्यामुळे व्याज देणे बंधनकारक आहे. व्याज न दिल्यास कोर्टात दाद मागण्यात येणार आहे.' असे इंगोले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राडारोडा काढण्याचे दातार फार्मला आदेश

$
0
0

पुणे : मुठा नदीच्या पूररेषेमध्ये टाकलेला राडारोडा काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली बेंचने अंजली दातार फार्मस् यांना दिले आहेत. या कामासाठी दातार यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

सिंहगड रोडवरील श्री नवशा मारुती परिसरामध्ये दातार फार्म आहे. बहुद्देशीय हॉलसाठी त्यांनी नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून कृत्रिम पटांगण तयार केले होते. हे सर्व काम मुठा नदीच्या पूररेषेच्या आत केल्याने सारंग यादवडकर यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. यासंदर्भात बुधवारी दिल्लीमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांनी बाजू मांडली.

नदीपात्रात केलेले काम हे पूररेषेच्या निळ्या पट्ट्याच्याही आत असून तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. तरी देखील व्यावसायिक कामासाठी आत्तापर्यंत या पटांगणाचा वापर होत होता, असे सरोदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पक सेवेसाठी एकच बस कार्यरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या 'पुष्कक' सेवेला घरघर लागली आहे. या सेवेसाठी पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या तीन पैकी केवळ एकच बस सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. पार्थिव घेऊन जाण्यासाठी दररोज सरासरी दहा कॉल येतात. मात्र, एकच बस उपलब्ध असल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे.

शहराच्या कोणत्याही भागात पीएमपीकडून पुष्पक सेवा दिली जाते. पार्थिव स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी नाममात्र दरात ही बस सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात तीन बसचा समावेश होता. मात्र, एका बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असून, दुसऱ्या बसला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूक परवाना नाकारण्यात आला आहे. त्यामुळे एकाच बसद्वारे सेवा दिला जात असून सेवेवर ताण येत आहे. एका कॉलसाठी सुमारे तीन ते चार तासांचा कालवधी लागतो. परिणामी, दिवसभरात तीन ते चार कॉललाच सेवा देणे शक्य होते.

पुष्पक बसची बदललेली रचना नियमात बसत नाही. त्यामुळे या बसला अॅम्ब्युलन्स सेवेचा परवाना घ्यावा, अशी सूचना आरटीओने केली आहे. मात्र, वर्षानुवर्षे या बसला प्रवासी वाहतूक परवाना असून, तो कायम ठेवावा असे पीएमपीचे मत आहे. या वादात ही सेवाही बंद पडू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images