Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ज्येष्ठ साहित्यिक रमेश मुधोळकर यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुर्लक्षित राहणाऱ्या बालसाहित्याचे दालन तीनशेहून अधिक पुस्तकांनी समृद्ध करणारे व लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये स्थान पटकाविणारे बालसाहित्यकार आणि चित्रकार रमेश मुधोळकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

अमरेंद्र गाडगीळ यांनी काही सहकाऱ्यांसमवेत स्थापन केलेल्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते. मुधोळकर यांचा जन्म १९ जुलै १९३५ रोजी मलकापूर (जि. बुलडाणा) येथे झाला. त्यांनी मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले. त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा श्रीगणेशा अनुवादापासून झाला. १९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रेही मुधोळकर यांचीच असत, हे त्यांच्यातील कलावंताचे वेगळेपण होते. बालकुमारांवर संस्कार करणारी मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी, बिरबल-बादशहा (१७५ गोष्टी), सर्कसच्या गोष्टी, थोरांच्या गोष्टी (राष्ट्रपुरुषांची चरित्रे), गाढवाला आली अक्कल, देशोदेशीच्या लोककथा, फंटूश संपावर जातो, अलीबाबा आणि चाळीस चोर अशी त्यांची पुस्तके गाजली. गेल्या वर्षी त्यांनी देवेंद्र पटेल यांच्या 'पंतप्रधान' या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नशेबाज मुलाचा आईकडून काटा

0
0

नातेवाइकांची घेतली मदत; आईसह पाच जण अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नशा करून कुटुंबीय, इतरांना त्रास देणाऱ्या मुलाचा आई, चुलते आणि शेजाऱ्यांनी मिळून खून केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे. खून केल्यानंतर टेम्पोतून ताम्हिणी घाटाच्या दरीत मृतदेह टाकून दिला होता. कोणतीही तक्रार अथवा पुरावा नसताना तीन महिन्यानंतर प्रॉपर्टी सेलच्या पोलिसांनी या खुनाला वाचा फोडली. या प्रकरणी आईसह पाच जणांस अटक केली आहे.

अक्षय रामदास मालपोटे (वय २०, रा. किष्किंधानगर, पौड रोड, कोथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई इंदुमती मालपोटे (वय ४०), काका गणपत ज्ञानेश्‍वर मालपोटे (वय ३२), शेजारी बाबाजी धोंडिबा यादव (वय १९), अरुण शांताराम अडसूळ (वय ५०) व पप्पू उर्फ प्रशांत सुरेश भिंताडे (वय २२, रा. किष्किंधानगर, पौड रोड, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ताम्हिनी घाटात टाकलेला मृतदेहाची कवटी आणि पायाची हाडे आढळली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अक्षय सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. तो नशा करून कुटुंबीय आणि नातेवाइकांना त्रास देत होता. २ डिसेंबर २०१५ रोजी रात्री शेजारी राहणाऱ्या अडसूळ यांच्या पत्नीस मारहाण करत होता. त्यावेळी त्याचे काका गणपत, आई आणि शेजारी राहणारे यादव भांडण सोडविण्यासाठी गेले. तरीही तो कोयत्याने महिलेस मारहाण करू लागला. त्यामुळे अडसूळ यांनी फरशीचा तुकडा त्याच्या डोक्यात घातला. तर, त्याच्या आईने स्टीलच्या रॉडने डोक्यात मारला. या भांडणामुळे या ठिकाणी बरेच लोक जमले होते. अक्षय याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघाले असता त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्यामुळे त्याचा मृतदेह चौघांनी टेम्पोत घालून ताम्हिनी घाटातील डोंगरवाडी परिसरात दोनशे फूट खोल दरीत टाकून दिला.

अक्षय सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्यावर तडीपारीच्या कारवाईची नोटीस बजावण्यासाठी पोलिस घरी गेले होते. त्यावेळी आईने तो बाहेरागावी असल्याचे सांगितले होते. तसेच, दोन मार्च रोजी भांडण झाल्यापासून अक्षय घरी आला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रॉपर्टी सेलच्या पोलिसांनी अक्षयचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताम्हिणी घाटात जाऊन त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’चा अभ्यासक्रम बदलणार

0
0

विद्यार्थी तीन वर्षांतच बाहेर पडणार; महिनाभरात मान्यता शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांची तुकडी संस्थेत असणे अशा वादांच्या पार्श्वभूमीवर 'एफटीआयआय'चा अभ्यासक्रम बदलणार आहे. संस्थेच्या विद्यापरिषदेची महिन्याभरात मान्यता मिळाल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. विशेष म्हणजे यापुढे विद्यार्थ्यांना तीन वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण करून संस्थेतून बाहेर पडावे लागेल.

'राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे'च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि अन्य सदस्यांच्या विरोधात संप पुकारला होता. संस्थेची २००८ ची तुकडी उत्तीर्ण होऊन बाहेर नसल्याची बाब आंदोलनादरम्यान स्पष्ट झाली होती. त्यानंतर आता ही तुकडी बाहेर पडत असून प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. २००८ ची तुकडी संस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह संस्थेला टीकेचे धनी व्हावे लागले होते. असा प्रसंग पुन्हा उदभवू नये म्हणून प्रशासनाने गंभीर दखल घेत नवीन अभ्यासक्रमाच्या निर्मितीकडे पाऊल टाकले आहे.

'नवीन अभ्यासक्रम अनालॉग, डिजिटल सिनेमा यांच्याशी सुसंगत असणार आहे. संस्थेला ८० कोटीचा निधी मंजूर असून, त्यातील शैक्षणिक साधनांसाठी ३७ कोटी रुपये खर्च केले जातात तर उर्वरित निधी पायाभूत सुविधांसाठी खर्च होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत सर्व्हर रूम, क्लासरूम, कॅमेरे, प्रोसेसिंग युनिट उपलब्ध होतील. आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली असून, लवकरच त्याचा निकालही लागणार आहे. महिन्याभरात विद्या परिषदेची अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल. त्यानंतर जुलैपासून नवीन अभ्यासक्रम लागू होईल,' अशी माहिती 'एफटीआयआय'चे कुलसचिव उत्तमराव बोडके यांनी दिली.

..

'संस्थेचे प्रशासन जबाबदार'

'एफटीआयआय'ची स्थापना १९६० मध्ये सुरू झाली. मात्र, १९७४ पासून या संस्थेचे कामकाज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणानुसार चालते. ही एक स्वायत्त संस्था असल्याने वेळोवेळी गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात आले, तरीही हा अभ्यासक्रम ठरावीक वेळेत विद्यार्थ्यांना पूर्ण करता आलेला नाही. दरम्यान,प्रत्यक्ष प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्यास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. अभ्यासक्रमाच्या काहीशा किचकट प्रक्रियेमुळे नियोजित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत अडचणी येतात, त्यामुळे यास प्रशासन जबाबदार आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांच्या मानधनात पाचशेंची वाढ

0
0

मासिक मेहनताना गेला अडीच हजारांवर

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : वाढत्या महागाईची झळ कैद्यांनाही बसू लागली असून, खर्चासाठी महिन्याला ठरवून दिलेली रक्कम अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे कारागृह विभागाने राज्यातील कैद्यांच्या महिन्याच्या मेहनतान्यात पाचशे रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कैदी आता महिन्याला अडीच हजार रुपये खर्च करू शकणार आहेत तसेच, बचत करून काही रक्कम कुटुंबीयांनादेखील पाठवू शकतील.

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह, २९ जिल्हा आणि अकरा खुली कारागृहे अशी एकूण ५३ कारागृहे आहेत. राज्यातील कारागृहांमध्ये सध्या २९ हजार कैदी आहेत. शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृहात विणकाम, शिवणकाम, सुतारकाम, चर्मकला, कागदांपासून पिशव्या बनविणे, बेकरी, शेती अशी विविध कामे केली जातात. कामातील कौशल्यानुसार कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशी विभागणी करून कैद्यांचे वेतन ठरविले जाते. वाढती महागाई लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी जेल विभागाने कैद्यांच्या एका दिवसाचे वेतन पंधरा रुपयांनी वाढविले होते.

कैद्यांना मिळालेल्या वेतनाच्या पैशातून ते महिन्याला दोन हजार रुपये खर्च करू करू शकत होते. तसेच, काम करत नसलेल्या कच्च्या कैद्यांना त्यांचे कुटुंबीय खर्चासाठी महिन्याला दोन हजार रुपये देऊ शकत होते. वाढती महागाईमुळे त्यांना ही रक्कम कमी पडू लागली होती. त्यामुळे कैद्यांच्या खर्चामध्ये वाढ करावी, अशी मागणी कैद्यांनी जेल प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जेल प्रशासनाने वाढती महागाई पाहून कैद्यांना महिन्याला अडीच हजार रुपये खर्च करण्यास परवानगी दिली आहे. जेल विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी याबाबतचे आदेशचे नुकतेच आदेश काढले आहेत.

जेलमध्ये प्रत्येक कैद्याचे एक खाते असते. कैद्याने काम केल्याचे पैसे या खात्यात जमा केले जातात. कैदी या पैशातूनच जेलच्या कँटिनमधून बिडी, साबण, तेल, चिवडा, फरसाण अशा वस्तू खरेदी करतात. काही कैदी या वेतनातून मिळालेली रक्कम साठवून ठेवतात. ती रक्कम कुटुंबीयांना 'मनीऑर्डर'द्वारे पाठवितात. आता या निर्णयामुळे प्रत्येक महिन्यात कैद्यांना खर्च करण्यास जास्त पैसे मिळणार आहेत. तसेच, यामध्ये बचत करुन कुटुंबीयांना ते पाठवू शकतील.

जेलमध्ये पाणीटंचाई

पुण्यात पाणी कपात केल्यामुळे आपोआपच जेल विभागाची पाणी कपात करण्यात आली. येरवडा जेलमध्ये सध्या चार हजार कैदी आहेत. मात्र, त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. जेलमध्ये असलेले पाणी खराब आहे. त्यामुळे जेल विभागाकडून महापालिकेकडे पाणी देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच, दोन बोअरवेल घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच झालेले नाही. त्यामुळे जेल प्रशासन पाणी टंचाईचा सामना करत आहे. याबाबत डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बोअरवेलचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल भरूनही ‘शॉक’

0
0

डॉ. माधव गाडगीळ यांना 'महावितरण'चा अनुभव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्चअखेरचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणच्या वतीने वीजबिलांच्या वसुलीचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. मात्र, शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील नियमित वीजबिले भरलेल्या ग्राहकांनाही सरधोपट कारवायांचा तडाखा बसल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी आगाऊ बिल भरूनही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यांच्या मुलीने बिल भरल्यानंतरही घराचा वीजपुरवठा खंडित करण्याची 'तत्परता' महावितरणकडून दाखविण्यात आली आहे.

डॉ. गाडगीळ पाषाण रोड परिसरात राहतात. त्यांनी घराचे वीजबिल आगाऊ भरले आहे. या पूर्वी त्यांना आलेल्या वीजबिलामध्ये एक हजार ७२८ रुपये आगाऊ भरल्याची आणि 'नो ड्यूज' अशी नोंदही आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना महावितरणकडून 'वीजबिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल,' अशी नोटीस आली. त्यामुळे ते हैराण झाले आहेत. तसेच, त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या घरात कन्या राहतात. या फ्लॅटचेही वीजबिल भरण्यात आले होते. परंतु, तेथील वीज कनेक्शन घरात कोणीही नसताना खंडित करण्यात आले, अशी तक्रार गाडगीळ यांनी केली आहे. अशाच प्रकारच्या कारवायांचा सपाटा सध्या शहर आणि जिल्ह्यात सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, मार्चमध्ये आर्थिक वर्षाची अखेर असल्यामुळे या काळात थकलेल्या वीजबिलांच्या वसुलीचा धडाका लावण्यात येतो. अशा बिलांची वसुली करणे ही आवश्यकच बाब आहे, परंतु, त्यापूर्वी महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्यात आणि थकलेल्या बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नियमानुसार पंधरा दिवसांची नोटीस द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे भीमसेन खेडकर यांनी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्याकडे केली आहे.

अनेकदा टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशी नोटीसही न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. अशा प्रकारे सरधोपट कारवाई केली, तर प्रामाणिकपणे वेळेत बिले भरणाऱ्यांनाही त्याचा फटका बसतो आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला विनाकारण सामोरे जावे लागते, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामटेकडी येथे पाण्याची गळती

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे, धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे, शहराचे महापौर उन्हाळ्यात पाणी जपून वापरा असे आवाहन करत आहेत. मात्र, रामटेकडी येथील पाणी टँकर पॉइंटवरून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणीगळती रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिकेने गांभीर्याने लक्ष घालून ही पाणी गळती रोखावी, अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.

रामटेकडी औद्योगिक विभागात टेकडीवरील पाण्याच्या टाकीतील पाणी खाली टँकर पॉइंटवरून टँकरमध्ये भरले जाते. पिण्याच्या पाण्याची मागणी असलेल्या ठिकाणी हे टँकर पाठवले जातात. रोज शेकडो टँकर येथून पाणी भरून जातात. पाणी भरून झाल्यावर वेळीच वॉल बंद करणे अपेक्षित आहे. मात्र, वॉल बंद केला जात नाही. त्यामुळे रोज शेकडो लिटर पिण्याची गळती होते. येथील कर्मचारी जागेवर नसल्याने हा प्रकार रोज घडत आहे. पुणेकरांना पिण्यासाठी पाणी मुबलक मिळत नाही. कोंढवा, महंमदवाडी, महादेवनगर, मांजरी, फुरसुंगी, केशवनगर भागात नागरिकांना आजही पाच किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यामुळे रामटेकडी येथील पाणी गळतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापलिकेच्या लष्कर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मोरे यासंदर्भात म्हणाले, 'शहरात पाण्याचा तुटवडा वाढत आहे. प्रत्येकाने पाणीगळती रोखण्याकडे लक्ष दिले पाहिजे. रामटेकडी टँकर पॉइंटवर कर्मचाऱ्याकडून पाणी गळतीकडे दुर्लक्ष होत असेल, तर येथील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यास सांगतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणेकरांनी पाण्याची बचत करावी’

0
0

हडपसर : पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाणी बचत करावी, तसेच 'स्मार्ट' नागरिकांनी एका दिवसाचे पाणी शिळे झाले म्हणून ते ओतून देऊ नये, त्याचा वापर करावा, असे आवाहन महापौर प्रशांत जगताप यांनी केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी जनजागृती कार्यक्रम सुरू करावेत, तसेच पाण्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांन दिले.

कोंढवा-वानवडी सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने महापौर प्रशांत जगताप यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सहायक आयुक्त अलेस पोरे, कार्यालायचे अधिकारी व कर्मचारी यांनी जगताप यांचा सत्कार केला. या वेळी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, नगरसेविका कविता शिवरकर, नंदा लोणकर, संगीता ठोसर, प्रभागाचे विभागीय आरोग्य निरीक्षक डोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य सेवा बाजारात अडकलेली’

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
'सरकारसमोर आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा आहे. दहा लाख खेडी व मोठी मोठी शहरे यांना आरोग्य सेवा कशा द्यायच्या याचा विचार सरकार करत आहे. सध्या ७० टक्के खासगी, तर ३० टक्के सरकारी आरोग्य सेवा नागरिकांना दिली जात आहे. आरोग्य सेवा ही आजार आणि बाजार यामध्ये अडकून आजारांचा बाजार भरला आहे. खासगी आणि सरकारी या दोन आरोग्य सेवा पद्धतींच्या व्यतिरिक्त साने गुरुजी हॉस्पिटलसारखी हॉस्पिटल उभी करावीत,' असे प्रतिपादन डॉ. अभय बंग यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या वतीने वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात डॉ. सि. तु. उर्फ दादा गुजर स्मृती पुरस्कार वितरण समारंभ झाला. या वेळी डॉ. बंग बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कांतिलाल संचेती होते. डॉ. अभय बंग, तसेच नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी डॉ. अविनाश पोळ यांना यांना डॉ. सि. तु. उर्फ दादा गुजर स्मृती पुरस्कार डॉ. संचेती यांच्या हस्ते देण्यात आला.

या वेळी मंडळाचे अध्यक्ष एस. एफ. पाटील, सचिव अनिल गुजर, सतीश अग्रवाल, डॉ. सुदाम काटे आदी उपस्थित होते. या वेळी गुजर यांचे सहकारी अब्दुल सय्यद, डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. डॉ. अभय बंग यांनी पुरस्कराची रक्कम गडचिरोलीतील नागरिकांसाठी अर्पण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रमिकनगर भागात दोन गाड्यांना आग

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
धानोरीतील श्रमिकनगर भागामध्ये रविवारी रात्री अचानक चारचाकी गाडीने पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीची तीव्रता अधिक असल्याने शेजारील गाडीला आगीची झळ पोहचल्याने काही क्षणातच दोन्ही गाड्या भस्मसात झाल्या. छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

श्रमिकनगरमधील रोड नं. दोनमधील मोकळ्या जागेत इंडिका आणि इंडिगो या दोन चारचाकी गाड्या पार्क केल्या होत्या. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास इंडिका गाडीने अचानक पेट घेतला. आगीची तीव्रता अधिक असल्याने शेजारील गाडीला देखील आग लागली.

गाड्यांना आग लागल्याचे समजताच छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव, संदेश वैरागर, गौतम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. शेजारील घरांमधून हंड्याने पाणी आणून कार्यकर्त्यांनी गाड्यांवर मारले. दरम्यान पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

आगीची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. काही वेळाने अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचन आग आटोक्यात आणली. पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडखे, विकास धावडे, शहादेव हवाले आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणगाडे अर्धा तास खोळंबले

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून निघालेले दोन रणगाडे, तसेच दोन मोठ्या गाड्या कळस येथील विकास आणि संशोधन संस्थेत जात असताना विश्रांतवाडी येथे अर्धा तास अडकून पडल्याचा प्रकार सोमवारी घडला.

विश्रांतवाडीतील शॉपर्स ऑरबीट मॉलसमोरील टँक रोडवर इंडिका कार उभी राहिल्याने या रणगाड्यांना खोळंबून राहावे लागले. अखेरीस सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडिका कारचा चालकाने गाडी बाजूला घेतल्याने रणगाडे मार्गस्थ झाले. शॉपर्स ऑरबीट मॉलसमोरील टँक रोडवर एक चालक इंडिका गाडी पार्क करून निघून गेला होता. काही वेळातच खडकी दारूगोळा कारखान्यातून निघालेले दोन टँक आणि क्रेन विश्रांतवाडीतील टँक रोडवर आले. पण इंडिका गाडी टँक रोडवरच उभी राहिल्याने सोमवारी सकाळी अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.

पाच-दहा मिनिटे होऊनही इंडिका गाडीचा चालक येत नसल्याचे पाहून लष्करी वाहनांनी जोरात हॉर्न वाजवले. या वेळी अनेक वाहनचालकांनी रस्त्यावर थांबून गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. सुमारे अर्धा तासानंतर इंडिकाचा चालक हॉर्नच्या आवाजाने गाडीकडे धावत आला. इंडिका काढल्यानंतर अर्धा तास खोळंबलेले दोन रणगाडे मार्गस्त झाले. मात्र, काही अंतर पार करीत नाही तोच टँक रोडवर उभ्या असलेल्या दुचाकींमुळे त्यांना पुन्हा काही वेळ थांबावे लागले.

खडकी दारूगोळा कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रणगाड्यांना कळस येथील विकास व संशोधन संस्थेत (आर अँड डी) जाण्यासाठी विश्रांतवाडी रस्त्याच्या कडेला विशेष टँक रोड बनवला आहे. मात्र, अनेकदा खासगी वाहनचालकांकडून टँक रोडवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे रणगाड्यांना अडचण होते. वाहतूक पोलिसांकडून अशा खासगी वाहनांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. परिसरातील नागरिक आणि मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून टँक रोडवर सातत्याने खासगी वाहने उभी केली जातात. विश्रांतवाडीत वारंवार असे प्रकार घडूनही वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्कम मिळण्यासाठी कामगारांचे उपोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
राष्ट्रीय परिवर्तन चालक कामगार युनियनच्या अधक्ष्यांनी पदाचा राजीनामा न देताच विंग्स ट्रॅव्हल्स कंपनीत व्यवस्थापकाची नोकरी स्वीकारली आहे. व्यवसायात मंदी असतानाही 'विंग्स'ने नवीन कंपनी स्थापन करून जुन्या चालकांवर अन्याय केला आहे, असा आरोप युनियनने केला आहे. चालकांकडून घेतलेली सुरक्षा रक्कम परत मिळावी, तसेच इतर मागण्यांसाठी मागील सात दिवसांपासून युनियनने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

विंग्स कंपनीने व्यवसाय नसताना देखील आधीच्या चालकांचा विचार न करता नवीन कंपनी सरू करू नये. युनियन अध्यक्ष रफिक शेख यांनी पदाचा राजीनामा द्यावा, पोलिस व्हेरिफिकेशनसाठी शेकडो चालकांकडून घेतलेली रक्कम परत करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. सुरक्षा रक्कमेच्या नावाखाली घेतलेले हजारो रुपये परत मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सरू ठेवणार असल्याचे कामगारांनी सांगतले. सुखदेव डावरे, आप्पासाहेब माने, युवराज बोराडे आणि संजय चव्हाण हे उपोषणा करीत आहेत. या उपोषणाला सर्व चालक, कामगार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील प्रार्थनास्थळे नियमित करण्याचा निर्णय

0
0

जिल्ह्यातील प्रार्थनास्थळे नियमित करण्याचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर व ग्रामीण भागातील ६७८ प्रार्थनास्थळे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १८९ अतिक्रमित प्रार्थनास्थळांबाबत येत्या दोन दिवसांमध्ये अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील अनधिकृत प्रार्थनास्थळांबाबत जिल्हाधिकारी राव यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यातील अनधिकृत प्रार्थनास्थळांचा आढावा घेण्यात आला. त्यात शहर व जिल्ह्यात ८७६ अनधिकृत प्रार्थनास्थळे असल्याची माहिती देण्यात आली. यापैकी ६७८ प्रार्थनास्थळे नियमित होण्याजोगी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ती नियमित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला; तसेच या प्रार्थनास्थळांची यादी राज्य सरकारकडे पाठवून त्यांना अंतिम मान्यता घेण्याचेही निश्चित करण्यात आले.
राज्यातील अनधिकृत प्रार्थनास्थळांबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीत अशा प्रार्थनास्थळांवर काय करवाई करणार, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुषंगाने राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनधिकृत प्रार्थनास्थळांची यादी तयार करून त्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी राव यांनी नगर रचना विभाग, पोलिस व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. काही प्रार्थनास्थळांचे स्थलांतर तर काहींना कायदेशीर मान्यता देऊन नियमित करता येऊ शकतात असे स्पष्ट झाले. त्यामुळे ती नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित प्रार्थनस्थळांबाबत पोलिस, महसूल आणि नगर रचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित अहवाल तयार करावा. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिस्तानातून अफू पुण्यात?

0
0

पाकिस्तानातून अफू पुण्यात?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारजे नाका येथील स​र्व्हिस रोडलगत राजस्थानातील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून ३२३ ग्रॅम वजनाची अफू जप्त करण्यात आली आहे. ही अफू पाकिस्तानातून सीमा ओलांडून राजस्थानात आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घाशीराम सवलाल गुर्जर (वय २९, सध्या रा. अप्पर इंदिरानगर, मूळ रा. उदयपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त तुषार दोशी यांच्या विशेष पथकाने कारवाई करत गुर्जरला सुमारे पावणेसात लाख रुपयांच्या अफू व इतर साहित्यासह अटक केली आहे. या प्रकरणी विशेष पथकाचे पोलिस नाईक डी. बी. पालवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ​वारजे पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुर्जरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुर्जर दुचाकीवरून वारजे येथे अफू विक्रीसाठी चालला होता. त्याच्या दुचाकीच्या हॅण्डलला प्लॅस्टिकच्या पिशवीत अफू ठेवण्यात आली होती. पोलिस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रेऊ रेसिडेन्सीसमोर गुर्जरला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीमध्ये ३२३ ग्रॅम अफू मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
पाकिस्तान सीमेलगत असलेल्या भारतातील राज्यांत सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येते. पुण्यात पकडलेली अफू राजस्थानातील आरोपीने आणली आहे आणि तीही राजस्थानातून आणल्याचे सांगितले आहे. पोलिसांकडून या अफूचा माग काढण्यात येत आहे. गुर्जरने पुण्यात यापूर्वी किती वेळा अफूची विक्री केली, याचाही शोध घेण्यात येत आहे. गुर्जरच्या अटकेमुळे राजस्थानातील अमली पदार्थांचे मोठे नेटवर्क पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनकार्डवर तब्बल लाखभर बोगस युनिट

0
0

रेशनकार्डवर तब्बल लाखभर बोगस युनिट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्याच्या मोहिमेत पुणे जिल्ह्यात तब्बल एक लाख बोगस युनिट आढळली आहेत. हे बोगस युनिट रद्द केल्यामुळे एका युनिटला पाच किलो धान्य याप्रमाणे दरमहा पाच लाख किलो धान्याची बचत होणार आहे. रेशनकार्डला शंभर टक्के आधार जोडणीचे काम झाल्यास आणखी बोगस युनिट सापडण्याची शक्यता आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी ही माहिती दिली. रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रेशनला आधार जोडणीचे काम करण्यात येत आहे. शहर व जिल्ह्यातील २४ लाख रेशनकार्डधारकांपैकी जवळपास ६३ टक्के रेशनकार्डांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. या जोडणीदरम्यान ग्रामीण भागातील रेशनकार्डांवरील तब्बल एक लाख युनिट बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रेशनकार्डला आधार जोडणी करण्यासाठी संबंधित रेशनकार्डधारकांना संधी देण्यात आली आहे. ती करताना आधार क्रमांक नसलेल्या कार्डधारकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे; तसेच कार्डवर नाव असलेली मृत व्यक्ती, स्थलांतरीत आणि दुबार रेशनकार्ड असलेल्यांची एक यादी या आधार जोडणीमध्ये करण्यात आली आहे. त्यात अशी 'बोगस' युनिट आढळली आहेत. कुटुंबातील व्यक्ती मृत पावल्यानंतर रेशनकार्डवरील त्या व्यक्तीचे नाव कमी करून घेणे आवश्यक आहे; परंतु ते नाव कमी करून घेतले जात नाही.
घर स्थलांतर केल्यानंतर रेशनकार्डवरील पत्त्यातही बदल केला जात नाही. नवीन ठिकाणी राहण्यास गेल्यावर नवे रेशनकार्ड काढताना जुन्या पत्त्याच्या कार्डावरील नावे कमी केली जात नाहीत. त्यामुळे रेशनकार्डवरील युनिटचा आकडा फुगलेला दिसतो.
रेशनकार्डला आधार जोडणी करण्याच्या मोहिमेमध्ये अशी बोगस युनिट प्रकर्षाने आढळली आहेत. या मोहिमेदरम्यान आढळलेली एक लाख युनिट रेशनकार्डवरून कमी करण्यात आली आहेत. एका युनिटला दरमहा पाच किलो धान्य देण्यात येते. ही एक लाख युनिट कमी झाल्यामुळे पाच लाख किलो धान्याची बचत झाली आहे. रेशनला आधारची जोडणी शंभर टक्के झाल्यावर आणखी बोगस युनिट आढळण्याची शक्यता आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
...
'आधार' नसेल तरी धान्य वाटप होणार
रेशनकार्ड नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आधार जोडणी करण्यात येणार आहे. आधार कार्ड काढले नसेल तर संबंधितांना कार्ड काढण्याची संधी देण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात आधार मशिन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधार कार्ड नाही म्हणून कोणाचेही धान्य वाटप थांबविलेले नाही. परंतु आता 'आधार'ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. रेशनकार्डला आधार जोडणी नसेल तर संबंधितांचे धान्य भविष्यात रोखले जाऊ शकते. त्यामुळे आधार कार्ड काढून त्याची रेशन कार्डला जोडणी करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना जामीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) संचालकांना घेराव घालून कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी सोमवारी ३५ विद्यार्थ्यांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांनी जामीन मंजूर केला.

'एफटीआयआय'चे संचालक प्रशांत पाठराबे यांनी या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी प्रशासनाने २००८च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी संचालक प्रशांत पाठराबे यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घातला होता.

विद्यार्थ्यांनी पाठराबे यांच्या कामात अडथळा आणून काम करण्यास मज्जाव केला. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ते घरी जाण्यास निघाले असता त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास प्रतिबंध केला.

विद्यार्थ्यांनी एकत्रीपणे साखळी करून एफटीआयच्या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात रोखून ठेवले. तसेच कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून संस्थेचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी ३० ते ३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून सोमवारी न्यायालयात ३५ विद्यार्थ्यांवर दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या ३५ विद्यार्थ्यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने या सर्वांचा जामीन मंजूर केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील उज्वला पवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गमतीने केला कुत्र्यांवर गोळीबार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर परिसरातील कॉलेजमध्ये अकरावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून कुत्र्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. गाडी नंबरच्या आधारे या विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, गंमत म्हणून गोळ्या झाडल्याची माहिती त्यांनी दिली.

सोमवारी डेक्कन परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घ़डली. फरासखाना पोलिस ठाण्याचे फौजदार गिरीश सोनावणे यांना खबऱ्याकडून गोळीबाराची माहिती मिळाली. खबऱ्याने त्यांना गोळीबार करणाऱ्या युवकांच्या दुचाकीचा नंबर दिला.

सोनवणे यांच्या पथकाने नंबरच्या आधारे युवकांचा शोध घेतला. त्यांच्याकडील पिस्तुल जप्त करण्यात आले. डेक्कन परिसरातील कचरा कुंडीजवळ काही कुत्री बसली होती. त्यांच्या दिशेने या दोघांनी गोळीबार केला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, बंदूक मित्राने दिल्याचे सांगितले. हे दोघे कॉलेजमध्ये मिरवण्यासाठी बंदूक घेऊन जात होते. या दोघांचेही कॉलेजमध्ये पेपर सुरू आहेत. पोलिसांनी दोघांच्या पालकांना बोलावून त्यांचा 'प्रताप' कानावर घातला. या दोघांचा मंगळवारी पेपर असल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आलेहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामे ‘जीपीएस’च्या कक्षेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले असले, तरी शहरातील अनधिकृत बांधकामांची नेमकी संख्या 'जीपीएस मॅपिंग'ची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच समजू शकेल. महापालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेतून बांधकाम विभागाला अनधिकृत बांधकामांची सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल.

सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत गेल्या आठवड्यात धोरण जाहीर केले. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेला आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. सरकारचे हे धोरण हायकोर्टासमोर मांडण्यात येणार आहे. हायकोर्टाने त्याला मंजुरी दिली, तरच ते राज्याच्या विविध भागांतील अनधिकृत बांधकामांसाठी लागू करता येणार आहे.

महापालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार शहरात सुमारे २० ते २५ हजार अनधिकृत बांधकामे असण्याची शक्यता आहे. त्याबाबत महापालिकेने आत्तापर्यंत सर्वेक्षण केले नसल्याने नेमकी आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र, अनधिकृत बांधकामांची नेमकी संख्या येणाऱ्या सहा ते आठ महिन्यांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे शहरातील सर्व मिळकतींचे जीपीएस मॅपिंग केले जाणार आहे. या मॅपिंगमध्येच बांधकाम विभागाच्या विविध निकषांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे, महापालिकेने परवानगी दिलेल्या बांधकामांची नेमकी संख्या किती, किती बांधकामे अनधिकृत आहेत, कोणत्या बांधकामांमध्ये मंजूर उपयोगापेक्षा वेगळा उपयोग केला जात आहे, याची सर्व माहिती मिळू शकणार आहे. त्यानंतर, शहरातील अनधिकृत बांधकामांची नेमकी माहिती उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीकडून वाढीव पदांची निर्मिती

0
0

सभासदांचे 'हित' जपण्यासाठी खेळी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या सेवकवर्गाची मागणी नसतानाही स्थायी समितीने वाढीव २९ पदांची निर्मिती करून त्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला आहे. यामध्ये वर्ग एक ते वर्ग चार अशा पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने दिलेल्या पदाच्या नावात परस्पर बदल करण्याचा 'पराक्रम' देखील स्थायीने केला आहे. सभासदांचे 'हित' जपण्यासाठीच हा प्रकार झाल्याची चर्चा‍ सुरू आहे.

महापालिकेचा कारभार चालविण्यासाठी आवश्यक नोकरभरतीसाठी प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवला जातो. नवीन पदांच्या वेतनाचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून जात असल्याने त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करावा लागतो. गेली अनेक वर्षे याच पद्धतीने नोकरभरती केली जाते. सध्या महापालिकेत विविध संवर्गाची २२०० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, सुरक्षा रक्षक, क्लार्क, चालक, बिगारी अशा पदांचा समावेश आहे. ही पदे भरण्यासाठी सेवकवर्गामार्फत स्थायी आणि मुख्य सभेच्या मान्यतेने ही पदे भरली जातात.

मात्र, सेवकवर्गाने कोणताही प्रस्ताव दिलेला नसतानाही स्थायी समितीने परस्पर २९ पदे भरण्याची मान्यता दिली आहे. गेल्या महिन्यातील बैठकीत या ठरावास मान्यता देण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. नगरसचिव कार्यालयासाठी एक प्रशासन अधिकारी, अधीक्षक, ज्येष्ठ समिती लेखनिक, समिती लेखनिक, लिपिक टंकलेखक, शिपाई, बिगारी अशी नवीन २० पदे भरण्याची शिफारस यामध्ये आहे. पालिकेच्या हॉस्पिटलचे दररोजचे काम पाहण्यासाठी पाच अवैद्यकीय प्रशासक पदे भरण्यास समितीने मान्यता दिली आहे. प्रशासनाने कोणतीही मागणी केलेली नसतानाही समितीने परस्पर ही पदे भरण्यास मान्यता दिल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. मुख्य सभा यावर कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

..

मुख्य अधिकारी होणार उपायुक्त

महापालिकेत एका खात्याचे मुख्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला उपायुक्त करण्याची अनोखी शिफारस स्थायी समितीने केली आहे. उपायुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्याला काही 'लाखमोलाचा' पडला आहे. स्थायी समितीने केलेल्या शिफारशीच्या ठरावात आपल्या पदाचा समावेश आहे की नाही, यासाठी हे अधिकारी रात्रभर पालिकेच्या प्रिंटिंग प्रेसमध्येच बैठक मारून होते. या अधिकाऱ्यावर सुरक्षेची जबाबदारी असल्यानेच तो प्रिटिंग प्रेसमध्ये मुक्कामी असल्याची चर्चा पालिकेत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या फटाक्यात दुचाकी जळून खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लग्न लागल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दुचाकी जळून खाक झाल्याची घटना कात्रज बायपास येथील त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत आग नियंत्रणात आणल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बायपासवर रोडवर डीमार्टच्या जवळ त्रिमूर्ती मंगल कार्यालय आहे. या मंगलकार्यालयात सोमवारी एक लग्न होते. साडेसातच्या सुमारास लग्न लागल्यानंतर मंगलकार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. फटाक्याची ठिणगी कार्यालयासमोर उभ्या केलेल्या दुचाकीवर पडली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतला. दुचाकीला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी दुचाकी विझवण्याचा प्रयतन केला. पण, ती दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली. मंगल कार्यालयासमोर लग्नासाठी आलेल्यांच्या १०० ते १५० दुचाकी उभ्या केलेल्या . त्यामुळे नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने दुचाकीवर पाणी मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारी उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या आगीतून बचावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीतून आले मैलामिश्रित पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महात्मा फुले पेठेतील मीठगंज पोलिस चौकी परिसरात रविवारी सायंकाळी महापालिकेच्या पिण्याच्या जलवाहिनीतून नळातून मैलामिश्रित पाणी आल्याचा धक्कादायक आरोप स्थानिकांनी केला. मीठगंज पोलिस चौकी परिसरात दाट लोकवस्ती आहे. सध्या तेथे एक दिवसाआड पाणी येते. रविवारी सायंकाळी परिसरात नळाला पाणी आले, त्यावेळी वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी खराब असल्याचे निदर्शनास आले नाही. काही नागरिकांना पाणी पिताना पाण्यातून दुर्गंधी आली. त्यानंतर त्यांनी पाणी लक्षपूर्वक पाहिले असता, हा प्रकार उघडकीस आला.

या पूर्वी अनेकदा गढूळ पाणी आले होते. मात्र, गढूळ पाणी येऊ शकते असे गृहीत धरून नागरिकांनी तक्रार केली नाही. परंतु, रविवारी घडलेला प्रकार घृणास्पद आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. महापालिकेने याबाबत काळजी घेतली पाहिजे, अशी भावना येथील रहिवासी भरत मिसाळ यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images