Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अडीच लाखांचे वाघाचे कातडे जप्त

$
0
0

महिलेला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाघाचे कातडे आणि दात विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून एकूण २५ दात आणि ३३ इंच लांबीचे वाघाचे कातडे आदी अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. कोर्टाने तिला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मीरा लक्ष्मण परदेशी (वय २८, रा. सध्या महात्मा फुले मंडई, गाळा नं. १२३६, मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत वनअधिकारी सागर होले यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवार पेठेतील हॉटेल सुशीलजवळ एक महिला वाघाच्या कातड्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अतुल भिंगारदिवे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर होले यांच्यासोबत शुक्रवार पेठेत सापळा रचून महिलेस अटक केली. तिच्याकडून ३३ इंच लांब, १७ इंच रुंद, शेपटी १० इंच, मुखवट्याचे कातडे आणि २५ दात असा दोन लाख साठ हजार रुपये किमतीच माल जप्त करण्यात आला. या महिलेकडे तपास केला असता, त्यावेळी तिने कातडे विक्रीसाठी आणऱ्याचे सांगितले. या महिलेने वाघाचे कातडे कोठून आणले, तिचे साथादीर कोण आहेत, वाघाची शिकार कोठे केली, आणखी कातडी आहे का या बाबत पोलिस तिच्याकडे तपास करत आहेत. आरोपी महिलेस कोर्टात हजर केले असता सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार कोर्टाने ती मान्य केली.

खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, संजय गायकवाड, पोलिस कर्मचारी सुरेश सोनवणे, महेंद्र पवार, सर्फराज शेख, झाकिर पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोपाळ कृष्ण गोखलेंच्या घरात होणार ‘संग्रहालय’

$
0
0

खासगी वास्तूमध्ये पालिकेतर्फे प्रथमच जतन-संवर्धनाचे काम

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू आणि थोर समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या घराचे जतन महापालिकेतर्फे करण्यात येणार असून, या वास्तूत संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून खासगी वास्तूच्या जतन-संवर्धनासाठी महापालिकेने प्रथमच पुढाकार घेतला आहे. येत्या ऑगस्टपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे राहते घर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या आवारात आहे. गोखले यांना भेटायला येणाऱ्या महात्मा गांधी, महंमद अली जिना, मदनमोहन मालवीय यांच्या खोल्या; तसेच गोखले यांच्यातर्फे वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तू आणि त्यांना मिळालेले मान-सन्मान कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यासाठी संग्रहालय करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. गोखले स्मारक ही ग्रेड-१ अंतर्गत येणारी ऐतिहासिक वास्तू आहे. परंतु, गोखले यांचे घर खासगी संस्थेच्या आवारात असल्याने 'ग्रेड-१ दर्जा असूनही 'तेथे सुधारणा करण्यास पालिकेवर मर्यादा येत होत्या. गोखले यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून नवीन पिढीपर्यंत त्यांचे कार्य पोहोचावे, यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याचे निश्चित केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) अनुशंगिक बदल केले गेले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही त्याला मंजुरी दिली. त्यामुळे, गोखले यांच्या निवासस्थानापासून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या खासगी वास्तूचे जतन-संवर्धन करणे पालिकेला शक्य होणार आहे. गोखले यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये, नादुरुस्त लाकडी स्ट्रक्चरल मेंबर्स बदलणे, छताचे वॉटरप्रुफिंग करणे, नादुरुस्त छत आणि व्हरांडा यांची पुनर्बांधणी करणे, दगड, लाकूड कामावरील ऑइलपेंट काढणे, जुनी कौले साफ करून पुन्हा बसविणे, नवीन डेकोरेटिव्ह खांबांची उभारणी करणे आणि लँडस्केपिंग अशी विविध स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील. त्यासाठी, २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती हेरिटेज सेलचे प्रमुख श्याम ढवळे यांनी दिली.

..................

गोखलेंचे जीवनकार्य मांडणार

गोपाळकृष्ण गोखले यांना मिळालेले मान-सन्मान, त्यांचे जीवनकार्य यावर आधारित संग्रहालयाची निर्मिती करण्याचाही पालिकेचा मानस आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे दर्शन आणि शाळा-महाविद्यालयांच्या सहलीसाठी संग्रहालय खुले करण्यात येणार आहे.

..................

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केंद्र-राज्य आणि महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये जतन-संवर्धनाचे काम आजवर करता येत होते. गोखले यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांच्या निवासस्थानाचे काम पालिकेने करावे, अशी इच्छा होती. त्यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त हे काम सुरू झाले, याचे समाधान आहे.

अभय छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्युमुखी विद्यार्थ्यांचा विमानिधी सुपूर्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुरूड दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विम्याचा पूर्ण निधी नुकताच दिला. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही विद्यार्थी विम्याचा दुसऱ्या टप्प्यातील निधी लवकरच दिला जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कॉलेजमधील बीसीएचे १४ विद्यार्थी मुरूड येथील समुद्रात बुडाले होते. या दुर्घटनेनंतर विद्यापीठाने विद्यार्थी विमा योजनेअंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले होते.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विद्यापीठाने या पूर्वीच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधला होता. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे पहिल्या टप्प्यातील पन्नास हजार रुपये कॉलेजकडे सुपूर्द करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरीत ५० हजार रुपयांचा निधी पालकांकडे देण्यासाठी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी पालकांची भेट घेतली. स्वप्नाली सलगर, सन्ना शेख, शिफा काझी आणि सुप्रिया पान या विद्यार्थ्यांचे पालक या वेळी उपस्थित होते.

पालकांशी संवाद साधताना डॉ. गाडे यांनी मुरूड दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडेही लवकरच हा निधी सुपूर्द केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संजयकुमार दळवी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस करणार बँकांची तक्रार

$
0
0

तीन हजार जणांना फसवणुकीचे कॉल्स

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील पाच बँकांकडून खाते उघडताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. त्यामुळे बनावट खाते उघडून नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या संबंधित बँकांकडून खाते उघडताना ग्राहकांची पुरेशी खातरजमा (केवायसी) करण्यात येत नसल्याची तक्रार पुणे पोलिस रिझर्व्ह बँकेकडे करणार आहेत.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने नुकत्याच पकडलेल्या दिल्लीतील ठकसेनांनी ७५० नागरिकांची फसवणूक करून अंदाजे ४.६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हे पैसे ​मिळवण्यासाठी आरोपींनी नऊ बनावट बँक खाती उघडल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर 'आयसीआयसीआय', 'रत्नाकर', 'एचडीएफसी', 'अॅक्सिस' आणि 'सिटी युनियन' या बँका'विरुद्ध रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती सायबर सेलचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

सायबर सेलने पकडलेल्या आरोपींनी बँक खात्यांद्वारे ७५० जणांकडून पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पैसे कोठून आले, याचा शोध घेण्यात येत आहे. कर्जाच्या बहाण्याने फसवणूक झाल्याच्या केवळ १४ तक्रारी आहेत. त्यानुसार दोन गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी वर्षभरात पुणे आणि परिसरातील दोन ते तीन हजार नागरिकांना कर्जासाठी फोन केले. त्यातील किती जण त्यांच्या भूलथापांना बळी पडले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कर्जाच्या बहाण्याने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या सायबर सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन साकोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस विद्यार्थ्यांवर अाराेपपत्र दाखल

$
0
0

सोमवारी कोर्टात हजर राहण्याची नोटीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एफटीआयआय'च्या संचालकांना घेराव घातल्याप्रकरणी पोलिसांना १८ विद्यार्थी नव्याने संशयित म्हणून आढळले आहेत. नव्या १८ विद्यार्थ्यांसह पूर्वी जामिनावर सुटलेले १२ अशा एकूण ३० विद्यार्थ्यांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (१४ मार्च) सेशन कोर्टात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी 'एफटीआयआय' प्रशासनाने २००८ च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे कोंडीत पकडू नये, अशी भूमिका घेऊन प्राध्यापकांनी मूल्यमापनास नकार दर्शविला होता. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी संचालक प्रशांत पाठराबे यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घातला. त्यावेळी संचालकांनी पोलिसांना बोलावले असता, कारवाई टळावी या हेतूने विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणणे सुरू केले. त्यानंतर १७ विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली.

विद्यार्थ्यांना जामीन देण्यात आला तरी, त्यातील महत्त्वाच्या पाच विद्यार्थ्यांच्या केसचे स्वतंत्रपणे काम पाहिले जाणार आहे. त्यातील जुन्या १२ आणि नवीन १८ विद्यार्थ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील १२ विद्यार्थ्यांना पुणे सोडून जाऊ नये असे, आदेश या पूर्वीच देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाला सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून, आंदोलनही मागे घेण्यात आले, तरीही प्रशासनाने हे पाऊल उचल्यामुळे विद्यार्थ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

'एफटीआयआय प्रशासन एकीकडे शैक्षणिक धोरणांचे नियोजन करत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्यावर खटले भरण्यात येत आहेत. हा विरोधाभास असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा एफटीआयआय प्रशासन आणि मंत्रालयाशी संघर्ष यापुढे सुरूच राहील,' अशी प्रतिक्रिया एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेळीत कांदा न टाकल्याने ग्राहक-विक्रेत्यात मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वती दर्शन येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ भेळ विक्रेता व ग्राहक यांच्यात भेळीत कांदा टाकण्यावरून वाद झाल्यानंतर दोन गटात शुक्रवारी सायंकाळी जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी भेळ विक्रेता आणि ग्राहक अशा सहा जणांविरुद्ध दत्तवाडी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

भेळ विक्रेता रवींद्र श्रीपती आलिमकर (वय ४०, रा. पर्वती दर्शन), सचिन नामदेव चव्हाण (वय २६), संतोष नामदेव चव्हाण (वय २४, दोघेही रा. आर्वी, खेड शिवापूर) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन चव्हाण आणि रवींद्र आलिमकर यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि संतोष हे दोघे बंधू प्लेसमेंटची कामे करतात, तर आलिमकर सातारा रस्त्यावर पर्वती दर्शन येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ 'एस भेळ' अशी भेळीची गाडी लावतो. सचिन आणि संतोष सातारा रोडवरून जात असताना भेळ खाण्यासाठी आलिमकर यांच्या गाडीवर शुक्रवारी सायंकाळी आले. भेळ घेतल्यानंतर या दोघांनी आलिमकर यांच्याकडे आणखी कांदा मागितला. त्या वेळी आलिमकर यांनी जास्तीचा कांदा देण्यास नकार दिला. त्यावरून भेळ विक्रेता व चव्हाण बंधू यांच्यात वादावादी सुरू झाली. कांदा मिळणार नसेल तर भेळ नको, असे या दोघांनी सांगितले. त्यानंतर आलिमकर आणि त्यांच्या तीन साथीदारांनी दोघांना 'फायटर'ने मारहाण केली; तसेच संतोषच्या गळ्यातील ५२ हजार ५०० रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारुन चोरली, असे सचिन चव्हाण याने फिर्यादीत म्हटले आहे.
आलिमकर यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी भेळीच्या गाडीवर असताना सचिन आणि संतोष भेळ खाण्यासाठी तेथे आले. त्यांच्या भेळीत कांदा टाकल्याच्या कारणावरून आलिमकर यांना मारहाण करून गल्ल्यातील दोन हजार रुपये चोरून नेले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी फोन करून माहिती दिली. दोघा जणांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेच्याच लढ्याचे श्रेय

$
0
0

अनधिकृत बांधकामे नियमित होण्याबाबत शिवसेनेचे स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित होण्याच्या निर्णयाचे श्रेय कोणा एका राजकीय पक्षाचे नसून, पिंपरी-चिंचवडमधील
सर्वसामान्य जनतेने दिलेल्या लढ्याचेच आहे,'असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (१२ मार्च) व्यक्त केले. अनधिकृत बांधकामे काही अटींवर दंड आकारून नियमित करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले. त्यानंतर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून झाला. परंतु, या प्रश्नासाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची आठवण करून देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बारणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर, नगरसेवक धनंजय आल्हाट, गजानन चिंचवडे, योगेश बाबर उपस्थित होते.
बारणे म्हणाले, 'पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकेम नियमित करण्यासाठी केलेल्या लढ्यात विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये महापालिकेवर, जुलै २०१३ मध्ये प्राधिकरणावर आणि मुंबई विधानसभेवर पायी मोर्चा नेला. डिसेंबर २०१३ मध्ये नागपूर विधानभवनावर मोर्चा काढून या प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. शिवाय कायदेशीर स्वरुप निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अहवाल मागविला. तो मार्च २०१५ मध्ये राज्य सरकारला प्राप्त झाला. त्यानुसारच राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी निवेदन सादर केले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करायला हवे.'
'या निर्णयाचे श्रेय घेण्याचा कोणता पक्ष प्रयत्न करीत असेल तर ती त्यांची बाब आहे,' असे नमूद करून बारणे म्हणाले, 'ही लढाई श्रेयवादाची करण्याचा प्रयत्न झाला तरी पिंपरी-चिंचवडकर आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. त्या सर्वसामान्य जनतेच्याच लढ्याचे श्रेय आहे.नागरिकांनी एकत्र येऊन चौकाचौकांत सभा घेतल्या. आंदोलने केली. सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच सरकारला निर्णय घेणे भाग पडले. ही बाब विसरून चालणार नाही.'
'राज्य सरकारच्या निर्णयाचा लाभ शहरातील किमान ५० टक्के नागरिकांना होणार आहे. नवनगर विकास प्राधिकरण, रेडझोन, पूररेषा, आरक्षणे आणि एमआयडीसी क्षेत्रातील बांधकामे नियमित होणार किंवा नाहीत, याबाबतचे स्पष्टीकरण नियमावलीतून मिळेल,'असे बारणे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच दुकानावरील कारवाईत तफावत

$
0
0

एकाच दुकानावरील कारवाईत तफावत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या दोन परिमंडळांनी घोरपडे पेठेतील एकाच दुकानावर केलेल्या कारवाईत मोठी तफावत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण विभागाचा कारभार समोर आला असून, हेतूपुरस्सर अनधिकृत साठ्याचे प्रमाण कमी दाखविण्यात आल्याचा आरोप लोकहित फाउंडेशनने केला आहे.
काही महिन्यांपूर्वी घोरपडे पेठेतील एका किराणा मालाच्या दुकानावर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या 'ग' परिमंडळाने कारवाई केली होती. त्या वेळी त्या दुकानात अन्नधान्याचे अतिरिक्त पन्नास कट्टे आढळले होते. या विभागाने हा सर्व अनधिकृत साठा असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले होते, तर 'ड' परिमंडळाने त्याचवेळी पाहणी केली होती. मात्र, त्यांनी त्यांच्या अहवालात केवळ २१ धान्याचा अनधिकृत साठा केला असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी दिली.
'ग' आणि 'ड' परिमंडळाचे अहवाल माहितीच्या अधिकारात प्राप्त झाले आहेत. या माहितीवरून 'ड परिमंडळाने सादर केलेल्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही अहवालांसह निवेदन सादर केले असल्याचे खान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉटेल प्राइडमधून फॉर्च्युनरची चोरी

$
0
0

हॉटेल प्राइडमधून फॉर्च्युनरची चोरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइड या तारांकित हॉटेलच्या पार्किंगमधून टोयोटा फॉर्च्युनर गाडी चोरीला गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. वॉचमनकडे ठेवायला दिलेली चावी चोरट्याने अगदी सहजपणे तेथील रूममधून उचलली आणि त्या चावीने गाडी सुरू करून तो पसार झाला.
या प्रकरणी व्यावसायिक प्रशांत मोहिते यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. मोहिते बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये गेले होते. ते पोर्चमध्ये पाहोचल्यानंतर तेथील वॉचमनकडे त्यांनी गाडीची चावी दिली आ​णि टोकन घेतले. वॉचमनने नेहमीप्रमाणे गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि चावी तेथील बोर्डला लटकवली.
'मी रात्री अकराच्या सुमारास आपले काम आटोपून हॉटेलमधून बाहेर पडलो होतो. गेटवरील वॉचमनकडे गाडीचे टोकन दिले आणि गाडी आणण्यास सांगितले. वॉचमनला जवळपास अर्धा तास गाडीची चावी शोधण्यास गेला. त्यानंतर मी वॉचमनला गाडी शोधण्यास लावले, तर त्यांनी पुढील अर्धा तास गाडी शोधण्यास लावला. अखेर मी आरडाओरडा करत पोलिसांना फोन केला. पोलिस आल्यानंतर 'सीसीटीव्ही' फुटेज तपासण्यात आले होते. त्यात गाडी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले,' असे मोहिते यांनी सांगितले.
या फुटेजमध्ये चावी ठेवण्याच्या बोर्डवरून एक संशयित चावी काढताना दिसत आहे. तो संशयित वॉचमनसमोर तब्बल १५ ते २० मिनिटे फिरतो. त्याला कोणी हटकत नाही की त्याच्याकडे काही विचारणा होत नाही. हॉटेल प्रशासनाच्या ताब्यातून गाडी चोरीला गेली असताना, त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे महागडी गाडी चोरीस गेली आहे,' असा आरोप मोहिते यांनी केला.

वॉलेट पार्किंग सुरक्षित आहेत का?
हॉटेलमध्ये पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेकदा हॉटेल चालकांकडून वॉलेट पार्किंगची सुविधा देण्यात येते. अनेकदा या गाड्या रस्त्यांवर इतरत्र पार्क केल्या जातात. या गाड्या तेथील पार्किंगमधून चोरीस गेल्या, अथवा त्यांचे नुकसान झाले तर ही जबाबदारी कोणाची? हॉटेल मालकांकडून ही सुविधा पुरवताना गाड्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये वॅलेट पार्किंगमध्ये पार्क करण्यात येणारी वाहने खरचं सुरक्षित आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर पुणेकरांना ‘काचबिंदू’चा धोका

$
0
0

लाखभर पुणेकरांना 'काचबिंदू'चा धोका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अंधत्वास कारणीभूत ठरणाऱ्या काचबिंदूच्या आजाराचे पुण्यातील प्रमाण वाढत आहे. शहरातील लाखभर नागरिकांना काचबिंदू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रक्तदाब, मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे हा आजार वाढत असल्याचे काही नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक काचबिंदू सप्ताह सहा ते १२ मार्चपर्यंत पाळण्यात येतो. त्यानिमित्त काचबिंदूचा आजार, त्याची लक्षणे आणि त्याचे वाढते प्रमाण याबाबत नेत्रतज्ज्ञांनी 'मटा'ला माहिती दिली. 'काचबिंदूचा आजाराची लक्षणे पेशंटसह डॉक्टरांनादेखील लवकर कळत नाहीत. ही मोठी अडचण आहे. मधुमेहाचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्यामुळे 'ग्लॉकोमा' अर्थात काचबिंदूचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी काचबिंदूमुळे दृष्टी गेल्याचे समजताच आजार झाल्याचे कळत होते. पूर्वी ५० ते ८० वयाच्या दरम्यान दिसणारा हा आजार आता चाळीशीनंतर दिसू लागला आहे. शंभर व्यक्तींमागे एक या सूत्रानुसार पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरीच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता पुण्यात एक लाख जणांना काचबिंदूचा आजार झाल्याचा अंदाज आहे,' अशी माहिती नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित गोगटे यांनी दिली.
डॉ. गोगटे यांच्या मताला राज्य नेत्ररोग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे यांनी दुजोरा देत पुण्यात लाखभर जणांना काचबिंदूचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले. 'रक्तदाबासारखा डोळ्यांनादेखील विशिष्ट दाब असावा लागतो. त्यात डोळ्यांच्या पुढील बाजूला 'अॅक्विअस' हा द्रव प्रमाणापेक्षा जास्त तयार झाला अथवा डोळ्याच्या पुढच्या भागात तो अधिक प्रमाणात साचला गेला, तर त्यामुळे डोळ्यांवर दाब येतो आणि काचबिंदू होऊन अंधत्व येते. काचबिंदूच्या पेशंटचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केल्यास अंधत्व टाळता येण्यासारखे आहे. दीर्घायुष्य, तसेच निदानाचे तंत्र विकसित झाल्याने काचबिंदू वाढत असल्याचे लक्षात येत आहे,' असेही डॉ. मराठे यांनी स्पष्टे केले.
..................
काचबिंदूची लक्षणे -
चोरीछुपे मार्गाने येणारा आजार
हळहूळू दृष्टीची हानी होते
सुरुवातीला परिघीय दृष्टीची हानी होते
योग्य वेळी उपचार केले नाहीत, तर अंधत्व येऊ शकते
डोळ्यांत अचानक तीव्र वेदना
कमी झालेली किंवा अंधूक दृष्टी
मळमळ आणि उलटी
डोळ्यात लालसरपणा, सूज येणे
.....................
काचबिंदूचा आजार वाढत असला तरी त्यावर उपचार करता येतात. आजाराच्या प्रकारानुसार आय ड्रॉप्स, गोळ्या, लेसरचे उपचार किंवा ऑपरेशन या सारख्या उपायांमुळे काचबिंदूवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.
डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष डॉ. किरण मंत्री यांनी राजीनामा दिल्याने आता या उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहर भाजपच्या वरिष्ठांकडे 'फिल्डिंग' लावली जात आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात येत्या मंगळवारी (१५ मार्च) कँन्टोन्मेंट बोर्डाची बैठक होणार आहे.
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष राजीनामा मंजुरी आणि नव्या उपाध्यक्षांचा राजीनामा मंजुरी तसेच निवडीसाठी बोर्डाने येत्या १५ मार्चला बैठक बोलविली आहे. पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीनंतर डॉ. किरण मंत्री यांची बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे डॉ. किरण मंत्री यांनी आपल्या पदाची मुदत संपल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी यांच्याकडे अखेर राजीनामा सुपूर्त केला. या पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू केली. इच्छुकांची नावे चर्चेत असतानाही डॉ. मंत्री राजीनामा देत नव्हत्या. राजीनामा न दिल्यास त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी अन्य नगरसेवकांनी केली होती. अखेर उपाध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. मंत्री यांनी दिला. उपाध्यक्षांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बोर्डाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत नव्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड निश्चित करण्यात येईल, असे सांगण्यात येते. या संदर्भात दोन दिवसांत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात उपाध्यक्षपदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य परिषदेच्या निवडणुकीत चुरस

$
0
0

शनिवारपर्यंत झाले ५० टक्के मतदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. सभासदांना सोमवार (१४ मार्च) सायंकाळी सात वाजेपर्यत मतपत्रिका जमा करण्याची मुभा असल्याने या टक्केवारीत पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. दुबार मतपत्रिकांसाठी ४१० सभासदांनी अर्ज केला असून, त्यापैकी पात्र ३५३ उमेदवारांना दुबार मतपत्रिका देण्यात आली. मंगळवारी (१५ मार्च) सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी शनिवारी सांगितले.
निवडणुकीतील मतदानाची माहिती देण्यासाठी साहित्य परिषदेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी अॅड. परदेशी आणि अॅड. सुभाष किवडे उपस्थित होते. परदेशी म्हणाले, 'साहित्य परिषदेच्या एकूण ११ हजार ३३६ मतदारांपैकी ५ हजार ४८९ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास आहे. मतपत्रिका जमा करेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारीत पाच टक्क्यांची वाढ होऊन ती ५५ टक्क्यांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी (१५ मार्च) रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, सायंकाळी सहा वाजता निकाल हाती येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Bank of Maharashtra, Munhot

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे बॅँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत यांनी एकाच वेळेस दोन घरांचा उपभोग घेतल्याबद्दल त्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस अर्थ मंत्रालयाने बजावली आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. याबाबतच्या कारवाईच्या मान्यतेची फाइल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. 'बँकेचे अध्यक्ष म्हणून एकाच वेळी दोन घरांचा क्वार्टर म्हणून वापर केल्याबद्दल सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये,' याचे स्पष्टीकरणही मुनहोत यांच्याकडून मागविण्यात आले आहे. या संदर्भात पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अर्थ मंत्रालयाकडे तक्रार केली होती. बँकेसंदर्भातील अनियमिततांमध्ये सरकारने एखाद्या बँकेच्या अध्यक्षाच्या बडतर्फीपर्यंत जाणे दुर्मिळ मानले जात आहे. मे २०१४ पासून बँकेचे मुख्यालय असलेल्या पुण्यातील क्वार्टरबरोबरच मुंबईतही एक घर आपल्यासाठी क्वार्टर म्हणून घेऊन त्याचा वापर मुनहोत करीत आहेत. त्याबाबत पुण्यातील बँक शेअरहोल्डर्स असोसिएशनचे संस्थापक सुहास वैद्य व माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. 'ही कारवाई बँकेच्या वरिष्ठांच्या मनमानी कारभाराला चाप बसविणारी आहे. आपणही सरकारला उत्तरदायी आहोत, याची त्यांना जाणीव होईल, माहिती अधिकार कायद्याचा हा विजय आहे,' असे वेलणकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत मुनहोत यांच्याशी विविध माध्यमातून संपर्क साधल्यानंतरही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. बँकेच्या अन्य वरिष्ठांनीही याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

मुंबई - पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मुनहोत यांना बँकेने कोणती क्वार्टर दिली आहे, याची माहिती माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. त्यावर बँकेने सुहास वैद्य यांना 'मुनहोत यांना पुण्यात क्वार्टर देण्यात आली आहे. मुंबईत ते बँकेच्या गेस्ट हाउसमध्ये राहात आहेत,' असे उत्तर दिले. विवेक वेलणकर यांनीही हीच माहिती मागवली असता, त्यांना 'मुनहोत यांना मुंबईत क्वार्टर देण्यात आली असून, पुण्यात ते गेस्टहाउसमध्ये राहात आहेत,' असे लेखी उत्तर मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त पाणी कपात टळली

$
0
0

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या सहा महिन्यात तब्बल अडीच टीएमसी पाणी वाचविण्यात पुणेकरांना यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि त्याला नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले आहे. पाण्याचा घटता साठा लक्षात घेऊन नागरिकांनी केलेल्या पाणीबचतीमुळे पुढील काळात होणारी अतिरिक्त पाणीकपात टळली आहे.
पावसाने मारलेल्या दडीच्या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने सप्टेंबर महिन्यापासूनच ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दर महिन्याला शहरातील नागरिकांना १.२५ टीएमसीऐवजी ०.८५० टीएमसी पाण्याचा पुरवठा केला जातो. या महत्त्वाच्या निर्णयामुळे गेल्या सहा महिन्यात अडीच टीएमसी पाणी वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात १६.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. पुढील पावसाळा सुरु होइपर्यंत हे पाणी पुरविण्यासाठी दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेऊन त्याची कडक अंमलबजावणीही करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामे तसेच वॉशिंग सेंटरसाठी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी बांधकाम विभागाने प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर कार्यालयापासून शहरातील अमृततुल्य, हॉटेल्स या ठिकाणीही अर्धा ग्लास पाणी देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिका प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची संख्या काही प्रमाणात वाढली असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्याची शहानिशा केली जात आहे. प्रशासनाने आजपर्यंत तक्रारींमधून तीन लाख रुपये दंड वसूल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या खडकवासला धरणसाखळीमध्ये साडेसात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पंधरा ऑगस्टपर्यंतच्या पाण्याचे नियोजन यामधून केले जाणार असल्याने पुणेकरांच्या पाण्यात अतिरिक्त कपात होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिईंग ह्युमन ब्रॅन्ड’च्या दोन तरुणींचा विनयभंग

$
0
0

'बिईंग ह्युमन ब्रॅन्ड'च्या दोन तरुणींचा विनयभंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अॅमेनोरा मॉल येथील 'बिईंग ह्युमन ब्रॅन्ड'च्या शोरुमध्ये काम करणाऱ्या तरुणींना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन तोतया अधिकाऱ्यांनी दोन तरुणींना कामावरून काढण्याची धमकी देत मोटारीत जबरदस्तीने नेऊन त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत वीस वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून राजेश राजीव कौल (वय ४५, रा. सम्राट गार्डन, हडपसर), दीपक शिवाजी पाटील (वय ४०, रा. महंमदवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी व तिची मैत्रीण ही हडपसर येथील अॅमेनोरा मॉलमध्ये 'बिईंग ह्युमन' ब्रॅन्डच्या कपडे विक्रीचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी कौल व पाटील मॉलच्या शोरुममध्ये आले. त्यांनी तरुणी व इतर कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांना विविध कारणावरून दमदाटी करण्यास सुरुवात केली; तसेच पीडीत तरुणीला कामासाठी सोबत येण्यास सांगितले. तिने त्याला नकार दिल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली. सोबत घेऊन गेल्यानंतर कमी कपडे घालत जा, असे सांगत चांगला पगार देण्याचे आमिष दाखवत मोटारीत तरुणीचा विनयभंग केला. गर्दीमध्ये मोटार थांबल्यामुळे तरुणी मोटारीतून उतरली.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही आणखी एका तरुणीशी अशाच पद्धतीचे वर्तन झाले होते. तिला मोटारीत बसवून खराडी आयटी पार्क परिसरात नेण्यात आले होते. या ठिकाणी तिलादेखील चांगला पगार व नोकरीचे आमिष दाखवून विनयभंग केला होता. या दोघींनी सर्व प्रकार मॉलमध्ये येऊन त्यांच्या मॅनेजरला सांगितला. त्यानुसार त्यांनी या दोन व्यक्तींबाबत चौकशी केली. त्यावेळी या नावाचे कंपनीत कोणीच वरिष्ठ अधिकारी नसल्याचे आढळून आले. त्यानुसार या तरुणींनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे व मोटारीच्या क्रमांकावरून दोघांना अटक केली आहे. फौजदार ए. एस. गवळी हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेसबुकची ओळख महिलेला महागात

$
0
0

फेसबुकची ओळख महिलेला महागात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने ब्रिटनमधून 'गिफ्ट' पाठविल्याचे सांगत ते सोडवून घेण्यासाठी महिलेकडून १९ हजार रुपये मागवले. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कुंजलता डिचोलकर (वय ४१, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून फिलीफ थॉमस, रोशनी पटेल यांच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजलता या एका एनजीओत कौन्सिलर म्हणून काम करतात. मे २०१५ मध्ये त्यांची आरोपी थॉमससोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यांच्यात गप्पा वाढत गेल्या. थॉमसने त्याच्या पत्नीचे निधन झाल्याचे सांगत तो एकटाच मुलासोबत राहत असल्याचे सांगितले. त्या दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर त्यांच्याच फेसबुकवरून 'चॅटिंग' सुरू झाले. थॉमस याने कुंजलता यांना ब्रिटनमधून गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी कुंजलता यांना आरोपी रोशनी पटेल नावाच्या महिलेचा फोन आला. दिल्ली येथील ग्लोबल सर्व्हिस या कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे तिने सांगितले. 'गिफ्ट' सोडवून घेण्यासाठी १९ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांना बँकेचा खाते क्रमांक दिला. त्यानुसार कुंजलता यांनी जून २०१५ मध्ये आरोपींनी दिलेल्या खात्यात १९ हजार ५० रुपये भरले. त्यानंतर कुंजलता यांना पुन्हा दोन दिवसांनी फोन आला. त्यांना 'गिफ्ट 'सोडवून घेण्यासाठी आणखी ३८ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष बर्गे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शि. प्र.’ निवडणुकीत चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीमध्ये यंदा पुण्यातील भाजपच्या आमदारांनी उडी घेतली असून, त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पॅनलही सक्रीय झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या निवडणुकविषयक हालचालींमुळे या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्वस्त मंडळ धर्मादाय सहआयुक्तांनी बरखास्त केले होते. गेली चार वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे, संस्थेमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आदी कारणांवरून हे मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर सहायक आयुक्त नवनाथ जगताप यांनी प्रशासक म्हणून या संस्थेच्या कारभाराची जबाबदारी स्वीकारली होती. गेल्या दोन महिन्यांपासून संस्थेच्या नियामक मंडळासह इतर सर्वच पदांसाठीच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सध्याच्या विद्यमान शिक्षणप्रेमी पॅनेलमध्येही फूट पडल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. त्यातच आता आमदार माधुरी मिसाळ यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याने यंदाची निवडणूक चर्चेचीच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
संस्थेच्या निवडणुकीसाठी या पूर्वीच्या काळात पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवून मते मागविली जात होती. यंदा फेब्रुवारीमध्ये ही निवडणूक होण्याची अपेक्षा असल्याने, संस्थेचे मतदार गेल्या काही काळापासून या मतपत्रिकांची वाटही पाहात होते. मात्र यंदा छापील मतपत्रिकांऐवजी थेट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याचे अचानक समोर आल्याने मतदारांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या असल्या, तरी अद्याप मतदारांना त्या विषयीची माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही, मतदार यादीचीही परिपूर्ण माहिती दिली गेली नाही आदी आक्षेपही याच निमित्ताने समोर आले आहेत. निवडणूक प्रक्रियेविषयीचा ही संभ्रमावस्था दूर करण्याची मागणीही मतदारांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खंड्या’ची कर्ज झाली व्हायरल

$
0
0

पुणे : किंगफिशर एअर लाइन्सचे सर्वेसर्वा आणि यूबी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या हे भारतात कधी येतील, त्यांना शिक्षा होईल, ते कर्जाची परतफेड करतील की नाही, हे माहिती नाही; पण नागरिकांनी या 'खंड्या'प्रेमीला मोबाइल आणि इंटरनेटवर व्हायरल केले आहे. विनोद, कविता, वात्रटिका, कार्टुनच्या माध्यमातून उत्साही नागरिकांनी मल्ल्या यांची आर्थिक कुंडली मांडली आहे.
विविध बँकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची कर्ज थकवून विजय मल्ल्या यांनी परदेशात पोबारा केल्याची कबुली सरकारने तीन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाला सादर केली. तेव्हापासूनच इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्रातील हेडलाइन्स बरोबरच मल्ल्या यांनी सोशल नेटवर्किंग साइट आणि मोबाइल अॅपवरही चर्चेत आले आहेत.
पहिल्या दिवशी मल्ल्या यांनी केलेल्या 'उद्योगां'ची माहिती फिरत होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर आधारित विनोद, वात्रटिका आणि व्यंगचित्रे व्हायरल झाली आहेत. व्हॉट्स अॅपसह बहुतांश सोशल नेटवर्किंग अॅपवर सध्या मल्ल्या हिट ठरले आहेत. किंगफिशर एअरलाइन्सबरोबरच विविध उद्योगांची कुंडली, आर्थिक उड्डाणे, बँकांची केलेली फसवणूक यावर तोंडसुख घेतानाचा सर्वसामान्य नागरिक मात्र कसा सरकारी यंत्रणेचे बळी ठरतात, याची तुलना करणारी मते अनेकांनी मांडली आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर विजय मल्ल्या यांना कधी ताब्यात घेतले जाईल, त्यांना शिक्षा होणार का, हे माहिती नसले तरी मल्ल्या यांचा खंड्या हिट ठरला आहे.
...
असेही विडंबन
उडून मल्ल्या गेला..
उडून मल्ल्या गेला..
केव्हा तरी पहाटे,
उडून मल्या गेला...
चुकवून सर्व डोळे, बुडवून कर्ज गेला...
सांगेल कोण कुणा,
भय हात भाजण्याचे...
गुंतवून मद्य मदनिकां,
फसवून बँक गेला...
कळले जनां न केव्हा,
सुटला फासा जरासा..
कळले जनां न केव्हा,
निसटून 'फिशर' गेला...
उरले देशात काही
आवाज विरोधांचे
आकाश तारकांचे
उचलून 'किंग' गेला...
सुचले कुणा न काही,
घडले अवचित सारे
खेळ पैसा नि भ्रष्टाचा,
दाखवून 'विजय' गेला..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतनीकरणासाठीचा खर्च सव्वा कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बॅँक ऑफ महाराष्ट्रचा व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत यांनी एकाच वेळेस दोन घरांचा उपभोग घेत असतानाच मुंबईतील सदनिकेच्या नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे.
पुण्यातील बँक शेअरहोल्डर्स असोसिएशनचे संस्थापक सुहास वैद्य यांनी ही माहिती मागवली होती. बँकेच्या अध्यक्षांनी घरासाठी घेतलेल्या दोन क्वार्टर्स, बँकेने आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीतील तफावत आणि बँकेच्या अध्यक्षांनी क्वार्टरच्या नूतनीकरणासाठी केलेले अवाढव्य खर्च या बाबी लक्षात घेत १४ ऑगस्ट रोजी विवेक वेलणकर यांनी ई-मेलद्वारे अर्थ मंत्रालयाच्या दक्षता विभागाकडे तक्रार केली, तर वैद्य यांनी आठ ऑक्टोबर २०१५ रोजी याच विभागाकडे सर्व पुराव्यांसह लेखी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालय, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केला होता. त्यावर कार्यवाही करत अर्थ मंत्रालयाने ही नोटीस बजावली आहे.
'मुनहोत यांनी बँकेत मनमानी कारभार चालवला होता. एका वेळी दोन क्वार्टर घेण्याची परवानगी कोणत्याही सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याला नाही. तरीही त्यांनी दोन घरांचा वापर केला. त्याचबरोबर स्वतःचा वार्षिक पगार वीस लाख रुपये असताना मुंबईतील घराच्या नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटींची उधळपट्टी बँकेच्या पैशाने केली. त्यासाठी बँकेचे संचालक मंडळ, अर्थ मंत्रालयाची परवानगी घेतली नव्हती. तसेच निविदाही काढली नव्हती. त्यामुळेच आम्ही ही तक्रार दाखल केली,' असे वैद्य यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ अर्थसंकल्प १२९ कोटींच्या तुटीचा

$
0
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तब्बल १२९ कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पास शनिवारी अधिसभेत मान्यता देण्यात आली. जुन्या विद्यापीठ कायद्यानुसार सादर झालेला हा अखेरचा अर्थसंकल्प मानला जातो.
येत्या आर्थिक वर्षासाठी ५०२ कोटी रुपये जमा व ६८५ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर झाला. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, विद्यापीठ व महाविद्यालय मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य, आमदार राहुल कुल, तम चाबुकस्वार, रामहरी रूपनवर उपस्थित होते.
विद्यापीठातील नेटवर्क कम्प्युटिंग केंद्र, आयटी सेल, आरोग्य केंद्र व विद्यापीठ मुद्रणालय या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी साडेपाच कोटी रुपयांची, तर विद्यार्थ्याची वसतिगृहे, ग्रंथालये, प्रयोगशाळा, आरोग्य सेवा योजना आणि कल्याण मंडळासाठी साडेचार कोटींची तरतूद आहे. विद्यापीठ प्रयोगशाळा व वर्ग अद्ययावत करण्यासाठी आठ कोटी, तर शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधांसाठी ४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images