Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुचाकीस्वारावर मुंढव्यात गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंढवा येथील चर्च परिसरात दुचाकीस्वाराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दुचाकीस्वाराने गोळ्या चुकवून तेथून पळ काढल्याने तो बचावला. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक दत्तू सूर्यवंशी (वय ३२, रा. विकासनगर) याच्यावर गोळीबार झाला आहे. गोळीबार प्रकरणी चोडप्पा उर्फ सोड्या उर्फ रवी यल्लप्पा कटिमणी (वय ४२, रा. विकासनगर, घोरपडी), रवी हनुमंता दांडिले (वय ४०, रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी) आणि रिजवान खान (वय ३२, रा. विकासनगर, घोरपडी) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक दुचाकीवरून जात होता. आरोपी कारमधून आले होते. चर्चसमोर कारने दुचाकीला धडक दिली. या वेळी दीपकने आरोपींना कारमध्ये पाहिले आणि ओळखले. ते आपल्यावर जीवघेणा हल्ला करणार असल्याची कल्पना त्याला आली होती. दरम्यान, रिजवानने तत्काळ आपल्याकडील पिस्तुलातून दीपकच्या दिशेने गोळीबार केला. तीन गोळ्या त्यावर झाडण्यात आल्या.

जीवाच्या आकांताने दीपकने थेट पोलिस ठाणे गाठले आणि आपल्यावर झालेल्या गोळीबाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंदवली. आरोपींचा शोध सुरू असून, पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा तपास गुन्हे पोलिस निरीक्षक आर. बी. चव्हाण करीत आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात ‘सिक्युरिटी अॅलर्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुजरातमध्ये १० दहशतवादी घुसल्याची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना दिल्यानंतर पुण्यातही 'सिक्युरिटी अलर्ट' देण्यात आला आहे. पोलिसांच्या सोमवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, जलद प्रतिसाद दलांच्या (क्युआरटी) तुकड्या संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.

महाशिवरात्रीच्यावेळी होणाऱ्या उत्सवांमध्ये घातपात घडवण्यासाठी 'लष्करे तैय्यबा' आणि 'जैश ए मोहंमद' या दहशतवादी संघटनांचे १० दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, 'एनएसजी'चे कमांडो तैनात करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी पुणे पोलिसांनाही सुरक्षेबाबत 'अलर्ट' जारी केला आहे. पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते, अशा ठिकाणी 'क्युआरटी'च्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. पुणे पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शहरात विविध ठिकाणी बंदोबस्त, नाकाबंदी लावण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी, चेकिंग करण्यास सांगण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढल्यास तत्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याराज्यात हवे चित्रपट संग्रहालय

$
0
0

नायर यांचे स्वप्न सत्यात उतरण्याची गरज : कमल हसन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी आज जो उभा आहे, तो पी. के. नायर यांच्यामुळेच. चित्रपटांचे जतन व्हायला हवे, असे त्यांना फार मनापासून वाटे. चित्रपट जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारने संस्था निर्माण करावी व त्यास नायर यांचे नाव देण्यात यावे,' अशी सूचना ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी रविवारी केली. 'प्रत्येक राज्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) स्थापन व्हायला हवे, हे पी. के. नायर यांचे स्वप्न होते,' अशी आठवण त्यांनी सांगितली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्ह आणि फिल्म हेरिटेज फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात हसन बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव सुनील अरोरा, ख्रिस्तोफर डुपेन, शिवेंद्रसिंग डुंगारपूर आणि एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते.

'माहिती व प्रसारण मंत्रालय आणि एनएफएआयने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनमध्ये लोकांना सहभागी करून घ्यावे आणि एनएफएआयची दालने युवा पिढीला अभ्यास आणि संशोधनासाठी खुली करावीत. जे ज्ञान आपल्याला मिळाले आहे, ते स्वत:पुरते सीमित न ठेवता अधिकाधिक लोकांना देण्याचा प्रयत्न करायला हवा,' अशी सूचना हसन यांनी केली.

पी.के नायर यांच्याविषयी कृतार्थता व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे. ते असताना आलो असतो तर खूप बरे झाले असते, अशी भावना व्यक्त करून हसन म्हणाले, 'चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आमच्यासारखे अनेक दिग्दर्शक घडविले. चित्रपट जतन आणि संवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन मी चेन्नईमध्ये चित्रपट संग्रहालय स्थापन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते शक्य झाले नाही.'
..

मी केलेल्या कामाकडे वळून पाहताना मला अवघडल्यासारखे वाटते. असे कसे काम करायचो असा विचार मनात येतो. पण रसिकांनी वेळोवेळी मला स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल मी त्यांचा कायमचा ॠणी आहे.

कमल हसन

..

'हे​रिटेज मिशनला ६०० कोटी'

'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मिशनसाठी पाच वर्षांच्या कालावधीकरिता केंद्राकडून ५९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपये मंजूर झाले असून, येत्या काही दिवसात हा निधी एनएफएआयला मिळेल. तसेच दोन वर्षांतून एकदा देशाच्या विविध भागात ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा भरविण्याचा विचार आहे,' अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीमाल नियमन रद्दसाठी आंदोलन

$
0
0

राज्यातील शेतकरी संघटनांचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतीमाल नियमन रद्द न केल्यास ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील ११ शेतकरी संघटनांनी रविवारी दिला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्पर्धात्मक दर मिळावेत, या साठी सुमारे २० हजार ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांनी ठरविलेल्या दरात शेतमाल कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी शेतीमाल नियमन रद्द होणे आवश्यक आहे. या विषयावर राज्यातील प्रमुख शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, शेतकरी संघटना (शरद जोशी) या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील, इंडियन चेंबर्स ऑफ अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे, भारतीय किसान संघाचे प्रदेशमंत्री मदन देशपांडे, भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील, भूमाता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बालवाडकर, शेतकरी एकता मंचचे ​जिल्हाध्यक्ष भूषण औटी, नरेंद्र लडकत आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शेतीमाल नियमन रद्द करावे, रिंग करून शेतीमालाचे भाव कमी करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाअंतर्गत (मोक्का) कारवाई करावी असे ठराव करण्यात आले. शेती मालाची बाजार आवारात आवक झाल्यावर ठरवून भाव कमी करण्यात येतो. विक्री पट्टीतून बेकायदा कपात केली जाते. हे प्रकार दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला पाहिजे. त्यांच्याविरूद्ध 'मोक्का' अंतर्गत कारवाई करावी; तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र न्यायिक प्राधिकरणाची स्थापना करण्याचाही ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.

'या बैठकीत झालेले ठराव आणि ग्राहकांच्या स्वाक्षरींचे निवेदन १५ मार्च रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन होणार आहे. या प्रश्नावर जनजागृती केली जाणार आहे' असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती अधिकारातून लोकशाहीला बळकटी

$
0
0

सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सध्या देशात बोलणे किंवा मत मांडणे हा एक प्रकारचा गुन्हाच झाला आहे. त्यामुळे ज्यांना हा गुन्हा वाटतो, त्यांना लोकशाही नको असे वाटते. अशा प्रकारचे वातावरण म्हणजे संविधानावर हल्ला आहे. या वातावरणात माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या एकजुटीची ताकद ही सर्वांत मोठी शक्ती असून, त्याद्वारे लोकशाहीला बळकटी मिळेल. त्यामुळे या शक्तीचा देशात प्रसार आणि प्रचार करण्याची आवश्यकता आहे,' असे मत राजस्थानातील शेतकरी आणि मजुरांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांनी व्यक्त केले.

सजग नागरिक मंचच्या वतीने मुंबई येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना डे यांच्या हस्ते सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. गलगली यांनी पुरस्काराची रक्कम 'नाम फाउंडेशन'ला देण्याची घोषणा केली.

डे म्हणाले 'माहिती अधिकार कार्यकर्ता स्वत:च्या आणि देशाच्या अस्तित्वासाठी लढत असतो. तो सत्ता आणि पैशांच्या जोरावर उन्माद करणाऱ्या बड्या लोकांना धडा शिकविण्यासाठी कार्यरत असतो. यामध्ये त्याचा वैयक्तिक फायदा नसतो. मात्र, काळ बदलत असून माहिती अधिकाराच्या पुढे जाऊन आपल्याला या अधिकारात आणखी काही चांगले बदल करता येतील का, याचा विचार करायला हवा. त्यामुळे आपल्याला आता माहिती अधिकाराच्या पुढचा टप्पा आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.' या वेळी डे यांनी राजस्थानात सुरू असणाऱ्या 'राज्यस्तरीय जवाबदेही यात्रे'ची माहिती, तसेच पुण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

गलगली म्हणाले की, 'सरकारच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर केल्यावर सरकारकडून त्यांना विरोधी पक्षातील कार्यकर्ते म्हणून बदनाम करण्यात येते. आजकाल देशात सर्वत्र राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची शर्यत लागली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समाजात चांगले काम करण्याबरोबरच प्रशासनाला चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करीत असतो. तसेच काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संपूर्ण माहिती अधिकार कार्यकर्ते बदनाम होत आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एकजुटीने भ्रष्टाचारमुक्त देशाच्या निर्मितीसाठी झटले पाहिजे.'

या वेळी उपस्थित सजग नागरिकांचा आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. वेलणकर यांनी मंचाच्या कार्याची आणि पुरस्काराची माहिती दिली. राठी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडकरांचा संडे ठरला ‘फन डे’

$
0
0

आबालवृद्धांनी लुटली खेळांची मजा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रविवारची सकाळ निवांत घालण्याऐवजी लवकर उठून भरपूर व्यायाम, मस्ती, विविध खेळांचा आनंद लुटल्याने कोथरूडवासीयांचा रविवार 'फन डे' ठरला. घरातील लहानग्यांनी सकाळीच उत्साहात घराबाहेर पडून मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. सकाळी सात वाजल्यापासूनच लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांच्या उत्साहामुळे 'हॅपी स्ट्रीट'चा रस्ता गर्दीने फुलला होता.

यंदाच्या मोसमातील शेवटचा हॅपी स्ट्रीटचा उपक्रम रविवारी कोथरूडमधील श्रीकांत ठाकरे पथावर रंगला. या शेवटच्या उपक्रमालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा रंगबेरंगी फुगे घेऊन रेंगाळणारी चिमुकली मुले, कुठे झुंबाच्या तालावर थिरकरणारी तरुणाई, कुठे झेंबेवादनाचा ठेका धरलेले आबालवृद्ध, स्केटबोर्डवरून वाऱ्याच्या वेगाने फिरणारे विद्यार्थी, सायकल चालणविण्यात मग्न असलेले काका-काकू तर काही ठिकाणी दोर ओढण्यासाठी ताकद लावणासाठी धडपडणारे सर्वच वयोगटातील तरुण..... सकाळच्या प्रसन्न वातावरणात सामूहिक धमाल करण्याचा अनुभव कोथरूडवासीयांनी घेतला. कोथरूड येथील आशिष गार्डन परिसरात आयोजित 'हॅपी स्ट्रीट' यंदाही अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, व्हीजे डेव्हलपर्स, पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवस उजाडण्यापूर्वीच नागरिकांची ठाकरे पथावर वर्दळ सुरू झाली. साधारणतः आठच्या दरम्यान सुमारे दहा हजार नागरिक रस्त्यावर दाखल झाले. तरुणांचा सर्वाधिक प्रतिसाद झुंबा आणि ड्रम सर्कलला मिळाला. लहान मुलांनी रस्त्यावर निवांत बसून खडूने भरपूर चित्रे काढली. काही उत्साही मुलांनी चित्रांमधून पाण्याची बचत, हवामानाचे संकट, वृक्ष संवर्धनाचे संदेश दिले. काहींनी क्राफ्ट स्टॉलवर जाऊन विविध वस्तू बनविल्या. झेंबे वादनामध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांचा सहभाग होता. प्राथमिक वादनापासूनचा हा तालप्रवास जुगलबंदीपर्यंत रंगला. सायकल झोनमध्ये लहानांबरोबरच त्यांचे पालकही सहभागी झाले होते. अनेकांनी योग सेंटरमध्ये ताज्या हवेत मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार योगासने केली. 'जोर लगाके हैय्या', म्हणत ज्येष्ठांबरोबरच लहान मुलांनीही रस्सीखेचीचा

मनमुराद आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएम’ची टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वर्षभरापूर्वी राज्यातील १२ टोलनाके पूर्णतः बंद केल्याची घोषणा मुख्यमंत्र्‍यांनी केली असली, तरी प्रत्यक्षात केवळ तीनच टोलनाके पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्यातील १२ टोलनाके पूर्ण बंद करण्यात येणार असून, ५३ टोलनाक्यांवर जीप, कार; तसेच एसटीला टोलमधून वगळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० एप्रिल २०१५ रोजी विधानसभेत केली होती. त्याचवेळी ३१ मेच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. संपूर्ण माफी मिळालेल्या टोलनाक्यांमध्ये अलिबाग-पेण-खोपोली, नाशिक-वणी रस्ता, वडगाव-शिक्रापूर आदी टोलनाक्यांचा समावेश होता.

या पैकी किती टोलनाके खरेच टोलमुक्त झाले, याची माहिती घेण्यासाठी पुण्यातील प्रफुल्ल सारडा यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती अधिकारात अर्ज केला होता. तेथून हा अर्ज राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्यात आला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ फेब्रुवारी रोजी दिलेल्या उत्तरातून ही बाब उघड झाली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर ३०७ किलोमीटरवर असलेला येनेगूर पूल टोलनाका बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ वर पनवेल-महाड-पणजी रस्त्यावर पाताळगंगा नदीवर खारपाडा येथे बांधण्यात आलेला मोठा पूल आणि सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग १३वर १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडखल गावातील टोल बंद करण्यात आला आहे.

'राज्यभरात टोलविषयी नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १२ टोलनाके पूर्णतः बंद केल्याची घोषणा केली. त्यामुळे जनक्षोभ काहीसा कमी झाला. परंतु, वर्ष पूर्ण होत आले तरी, अनेक टोलनाक्यांवर वसुली सुरूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे टोलनाके खरेच बंद झाले की ही जनतेची दिशाभूल आहे, हे पाहण्यासाठी मी माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. त्यातून मिळालेली माहिती धक्कादायक असून त्यातून जनतेची दिशाभूल झाल्याचेच दिसून येते', असे प्रफुल्लने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथी लंडनवारी आयुक्तांना महागात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकप्रतिनिधींपासून ते केंद्र-राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळत आपले हेतू साध्य करून घेण्याच्या महापालिका आयुक्तांच्या 'स्मार्ट' कारभारावरून येत्या काही दिवसांत राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. आयुक्तांना एका वर्षात तीनच परदेश दौरे करण्याची परवानगी असताना, चौथी 'लंडन'वारी आयुक्तांना महागात पडण्याची दाट शक्यता आहे.

स्मार्ट सिटीसाठी ब्रिटन सरकारचे सहकार्य मिळणार असल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आयुक्त कुणाल कुमार गेल्या महिनाअखेरीस लंडनच्या दौऱ्यावर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करावा लागल्याने त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने तर सर्वसाधारण सभेतच आयुक्तांना अधिकृत दौऱ्याची मान्यता आहे का, अशी थेट विचारणाच केली होती. आयुक्त कुमार यांनी त्याविषयी कोणताच खुलासा केला नव्हता.

आयएएस अधिकाऱ्यांना वर्षात तीन परदेश दौरे करता येतात. कुमार काही महिन्यांपूर्वीच पालकमंत्री बापट यांच्यासमवेत जपान दौऱ्यावर गेले होते. तत्पूर्वी, बार्सिलोना व सिंगापूरच्या दौऱ्यातही ते सहभागी झाले होते. या तीन दौऱ्यांपाठोपाठ लंडन दौऱ्यावर जाण्यासाठीही त्यांनी राज्य सरकारकडे रीतसर परवानगी मागितली होती. आयुक्तांचा हा चौथा दौरा असल्याने त्याबाबत सरकारनेच काही आक्षेप घेतल्याची माहिती पुढे येत आहे. पालकमंत्री आणि महापौर यांनी दौऱ्यातून माघार घेतल्यानंतरही आयुक्त इतर वरिष्ठ अधिकारी आणि एका खासगी कंपनीच्या 'स्मार्ट' अधिकाऱ्याला घेऊन या दौऱ्यावर रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तावडेंच्या पीएवर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मराठवाड्यामध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांसमक्ष मारहाण करणाऱ्या मंत्र्याच्या पीएवर तातडीने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पीएने आंदोलक शेतकऱ्याला मारहाण करण्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले, 'पोलिसांसमक्ष कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन मंत्र्याच्या पीएने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. सरकारकडून न्याय न मिळाल्याने शेतकरी प्रचंड संतापले आहेत. त्या संतापातून ही घटना घडली. या प्रकारातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असता तर ते हाताळायला त्याठिकाणी पोलिस हजर होते. तरीही मंत्र्याच्या पीएने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे अपेक्षित असता तर कदाचित त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली नसती, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला आहे. मंत्र्याचा पीए शेतकऱ्यांना मारहाण करीत असताना मूक दर्शकाची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रद्दीपासून टेबल, खूर्ची, स्टूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पेपरचे ढीग साठले, की रद्दी विक्रेता गाठायचा, ही मानसिकता घराघरात दिसते. आर्किटेक्ट असलेल्या कोकिला देशपांडे हिने मात्र याच रद्दीचा वापर करून अनोखा उपक्रम केला आहे. पेपर पिशव्यांच्याही पलीकडे जाऊन तिने या रद्दीच्या कागदाचे टेबल, खुर्ची, स्टूल, जड वजने पेलणाऱ्या भन्नाट बॅग्स तयार केल्या आहेत.

फावल्या वेळेत पर्यावरणासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आणि प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी पर्यायी वस्तू शोधण्यावर तिचा भर होता. दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईतील लोअर परेलमधील चाळीत राहणाऱ्या महिलांना कागदाच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्लास्टिकला पर्याय आणि महिलांना रोजगार असे दोन्ही उद्देश त्यातून साध्य झाले. मात्र, जड सामान उचलण्याऱ्या कागदाच्या पिशव्या बनविण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. पेपर एकसारखे गुंडाळून एकत्र केल्यास त्यांची वजन उचलण्याची क्षमता वाढवता येईल, असा विचार एक दिवस मनात आला आणि यातूनच पेपर फर्निचरची कल्पना पुढे आली. टाकाऊ पेपरपासून स्टँड, शो-पीस बनविण्याऐवजी तिने खुर्ची आणि स्टूल बनविण्याचे प्रयत्न केले. तिच्या जिद्दीला यश आले असून सध्या अनेक लोक पेपर फर्निचरची मागणी करीत आहेत. खुर्ची बनविण्यासही फारसा वेळ लागला नाही. वापर केल्याशिवाय प्रयोग यशस्वी झाल्याचे जाहीर करायचे नाही, असे ठरले होते. पण, त्यादिवशी स्वतः बनवलेल्या त्या खुर्चीत बसल्यावर मला आत्मविश्वास आला, असे कोकिला सांगते.

कोकिला म्हणाल्या, 'पेपरचे फर्निचर हे अगदी केन फर्निचरप्रमाणेच आहे. अनेकदा लोक मला विचारतात, या वस्तू बनवताना तू सुतळीचा वापर केलास का, स्पेप्लर पिना वापरल्या का, यावर माझे उत्तर नाही, असते. पेपरच्या वस्तू बनविण्याची एक अनोखी कला आहे. इतर वस्तूंएवढेच ते टिकाऊ आहे आणि ते घरात वापरता येते. या फर्निचरची आवड आणि महत्त्व असलेला वर्ग फार मर्यादित आहे आणि तो फार वाढून हा प्रकार सरसरकट सगळीकडे दिसावा असे मला वाटत नाही. त्यामुळे विविध माध्यमातून या उत्पादनांची जाहिरात करणे टाळले आहे. कागदी वस्तूंची जाण असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे.

तिच्या या कामाची दखल घेऊन पुण्यातील आर्किटेक्ट समूहाच्या 'वाइड अँगल संघटने'ने काही दिवसांपूर्वीच कोकिलाचा 'यंग अचिव्हर पुरस्कारा'ने सन्मान केला. सध्या अनेक घरांमध्ये तिने दिलेल्या खुर्च्या, टेबल, स्टूल आणि मोठ्या पिशव्या पोहोचल्या आहेत.



अभ्यासक पर्यावरणस्नेही जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करीत आहेत. आर्किटेक्ट समूहही घरबांधणीत पर्यावरणपूरक प्रयोग सुचवत आहेत. मात्र, पुरेशी जागृती नसल्याने नागरिक इतर प्रयोग स्वीकारण्यास पटकन तयार नाहीत.

कोकिला देशपांडे

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वापराची ‘कला’कारी

$
0
0

asmita.chitale@timesgroup.com

पुणे : कोणतीच गोष्ट टाकाऊ नसते, यावर विश्वास असेल आणि 'स्क्रॅप'चाही पुनर्वापर कसा होऊ शकतो, हे माहीत करून घ्यायचे असेल, तर धारा काबरिया आणि सोनाली फडके यांच्या 'स्टुडिओ अल्टरनेटिव्ह'ला भेट द्यायला हवी. या स्टुडिओमध्ये कचरा म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंतून चक्क गृह सजावटीच्या वस्तू, टेबल लॅम्प, वॉल हॅगिंग्ज, घड्याळे, टी कोस्टर अशा वस्तू तयार केल्या गेल्या आहेत. लवकरच त्यांची एक 'स्क्रॅप लायब्ररी'ही सुरू होते आहे! आणि विशेष म्हणजे हे सर्व काम जेथे चालते, तो 'स्टुडिओ अल्टरनेटिव्ह' एका मोडीत काढलेल्या शिपिंग कंटेनरमध्येच उभारला गेला आहे!

धारा काबरिया या इंटेरियर डिझायनर आहेत, तर सोनाली फडके इंजिनीअर असून, पर्यावरण आणि इकॉलॉजी यावर त्यांचा अभ्यास आहे. 'अल्टरनेटिव्ह युझ ऑफ मटेरियल' या विषयावर धारा यांनी त्यांच्या प्रोजेक्टसाठी अभ्यास केला होता. सन २००९मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर त्यांनी हा अभ्यास प्रत्यक्षात कसा आणता येईल, यासाठी काम सुरू केले. कामातून उरलेले पीव्हीसी पाइप, प्लायवूडचे तुकडे, हार्डवेअर अशा गोष्टी टाकून देण्याऐवजी गोळा केल्या. त्यावर काम करून बुक स्टँड, टेबल टॉप, बर्ड हाउस, वॉल हॅगिंग्ज करणे सुरू केले. त्यानंतर रद्दीचा वापर करून काही घड्याळे, दिवे आदी वस्तू तयार केल्या. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

'नको असणारी गोष्ट म्हणजे कचरा; पण ती टाकून देण्याऐवजी त्याचा योग्य पुनर्वापर कसा करता येईल, याचा विचार आम्ही करतो. त्यातून आम्हाला नवनव्या गोष्टी सुचत गेल्या. कचऱ्याची समस्या कमी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असे काब्रिया यांनी सांगितले.

फडके म्हणाल्या, 'कचरा टाकायला जागा नाही, हे आपण अनुभवतो आहोत. त्याशिवाय ज्याला रिसोर्स म्हणतो, तेही मर्यादित आहेत. कचराप्रक्रिया प्रकल्पही खर्चिक असतात. या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही कचरा पुनर्वापरासाठी प्रयत्न केले. जी गोष्ट आपल्याला नको आहे, ती आपल्या मते कचरा असते; पण त्यातूनच नवे काही तयार करता येऊ शकते. कुठलीही गोष्ट कचरा नाही, हे एकदा ठरवले, की त्या गोष्टीचा पुनर्वापर सहज आणि सुंदर पद्धतीने करता येतो.'

कचऱ्याचा पुनर्वापर, त्यातून नवनिर्मिती कशी करावी, कोणती काळजी घ्यावी आदी गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी धारा आणि सोनाली शालेय विद्यार्थी, गृहिणी, ते कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींसाठी कार्यशाळाही आयोजित करतात. यामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचा पुनर्वापर कसा करू शकतो, तुम्हाला ज्या गोष्टी कचरा वाटतात, त्यातून नवनिर्मिती कशी होऊ शकते, कचरा पुनर्प्रक्रिया कशी असते, त्याद्वारे पर्यावरणावर काय परिणाम होतो, प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल आदी गोष्टींवर मार्गदर्शन केले जाते.



शिपिंग कंटेनरमध्ये ऑफिस

अनेकदा शिपिंग कंटेनर वापरातून बाद झाल्यावर त्याला 'स्क्रॅफ' केले जाते. त्यासाठीची प्रक्रिया जी आहे, ती खर्चिक असते. शिपिंग कंटेनर स्क्रॅप करण्याऐवजी त्यात ऑफिस, स्टोअरेज, घर होऊ शकते, अशी संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये रूढ आहे. मात्र, आपल्याकडे ही पद्धत फारशी रूढ नाही. धारा आणि सोनाली त्याबाबतही जागृती करण्याचे काम करतात. आतापर्यंत त्यांनी शिपिंग कंटेनरमध्ये शाळा, ऑफिस, फार्म हाउस आदी गोष्टी करून दिल्या आहेत.

स्क्रॅप लायब्ररी

कचऱ्यालाही किंमत आहे आणि कोणतीही गोष्ट कचरा न होता त्यातून काही नवे तयार होऊ शकते. कचरा 'स्क्रॅप' केल्याने पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. त्यासाठी कचऱ्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केला पाहिजे, या उद्देशाने; तसेच काही नवी टूल्स तयार करता येऊ शकतात, ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी धारा आणि सोनाली 'स्क्रॅप लायब्ररी' सुरू करत आहेत. त्यासाठी सध्या विविध प्रकारांतील भंगार सामानाचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी लोकांनी यावे आणि तेथे असलेल्या कचऱ्याच्या नमुन्यातून नवे काय करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असा यामागे उद्देश आहे. ही अभिनव लायब्ररी लोकांसाठी लवकरच खुली करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता विभागातील महिलांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'ओला, सुका कचरा कुठेही आणि कसाही फेकणार, ही प्रवृत्ती आजही पुणेकरांमध्ये टिकून आहे. त्याला छेद देण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे,' असे मत कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी सोमवारी व्यक्त केले. तसेच, गणवेश, साड्या, ग्लोव्हज्, मास्क या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू महापालिकेकडून मिळविण्यासाठी संघटनेला रक्त आटवावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजीनगर नागरी कृती समितीतर्फे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांना स्वच्छतेचे काम करताना वापरायचे साहित्य भेट देण्यात आले. जागृती सेवा संघाच्या अध्यक्षा जयश्री काळे, मंगला पाटील, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, मनीष शिरोळे आदी या वेळी उपस्थित होते. जागतिक महिला दिन म्हणजे, हळदी-कुंकवाचा दिवस नाही. या दिवशी महिलांच्या कष्टाची दखल घेण्याचा दिवस आहे, असे मुक्ता मनोहर यांनी या वेळी सांगितले.

मुक्ता मनोहर म्हणाल्या, 'सफाई कामगार काम करतात; पण त्यांचे काम कोणाला दिसत नाही. ते जेव्हा काम थांबवितात, तेव्हा लोकांना त्यांच्या कामाची जाणीव होते. केंद्र सरकारने 'स्वच्छ भारत' योजना आणली. त्यानंतर विविध सेलिब्रिटी हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना दाखविले गेले. पण, त्यांचा झाडू कधी जमिनीला लागला का?'

स्वच्छता कर्मचारी शहरातील स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला हातभार लावत आहेत. मात्र, घर सांभाळून नोकरी करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वच्छता विभागातील बहुतांश महिलांना कंबर, पाठ, मानदुखीचे आजार आहेत, असे काळे यांनी सांगितले. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो. मात्र, शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान कोणी करीत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे डॉ. दुधाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओळखींच्या व्यक्तींपासूनच महिला असुरक्षित

$
0
0

Shrikrishna.kolhe@

Timesgroup.com

शांत, सुरक्षित आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अलीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला व तरुणींवर अत्याचार करणाऱ्या व्यक्ती या ओळखीच्या व जवळच्या नात्यातील असल्याचे तपासात दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात महिला व तरुणींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी पुण्यात तीन महिलांवर अत्याचार झाल्याचे समोर आले. यामध्ये अत्याचार करणारे जवळचेच असल्याचे निष्पन्न झाले होते. एका तरुणीला तिचा मित्र गुंगीचे औषध देऊन मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने व त्याच्या मित्रांनी तरुणीवर अत्याचार केले. त्या ठिकाणी आणखी एक तरुणी असतानादेखील तिने पोलिसांना कळविले नाही. तसेच, हडपसर येथे 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त आयोजित केलेल्या पार्टीत मैत्रिणीच्या मित्राने रात्री झोपल्यानंतर एका उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता.

जवळच्या नातेवाईकांकडून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. बऱ्याच वेळा जवळची व्यक्ती असल्याने महिला किंवा तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. काही वेळा मुलींच्या बाबतीत अशा घटना घडल्यानंतर त्या घाबरून घटनेबाबत कुणाला सांगत नाहीत. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांचे धाडस वाढते. सरकारी व खासगी कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये वरिष्ठांकडून, तर लग्नाचे आमिष दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकार आपल्यापरीने प्रयत्न करत असताना या कामात सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सजग व जागरूक नागरिकांनी अत्याचार रोखण्याकरिता सहभाग घेतल्यास महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. महिलांमध्ये जागृती निर्माण केल्यामुळे अलीकडे महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, काही वेळा पोलिसांकडून हद्दीचा वाद घालून तक्रार घेण्यासाठी उशीर केला जातो.

पुणे शहरात २०१४मध्ये महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या १९८, तर विनयभंगाच्या ४५४ घटना घडल्या होत्या. २०१५मध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली. या वर्षी २६४ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. तर, विनयभंगाच्या प्रकारात तब्बल ५५ टक्क्यांनी वाढ झाली. या वर्षी ७०५ विनयभंगाच्या घडना घडल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस व सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी तरुणींची छेडछाड काढली जाऊ नये म्हणून महिला पोलिसांची गस्त आहे. तसेच, महिला बीट मार्शल आता शहरात गस्त घालू लागल्या आहेत. त्याचे काही परिणाम दिसू लागले आहेत. मात्र, विश्वास असलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारच्या घटना घडू लागल्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा असा देखील महिलांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.



सोशल मीडियावरही निम्मे ओळखीचेच

फेसबुकवर बदनामी, 'व्हॉट्स अॅप' व मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविणे, तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करणे, अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे येत आहेत. सोशल मीडियावर तरुणी व महिलांसदर्भात बदनामी केल्यासंदर्भातील तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडून तपासासाठी घेतल्या जातात. मोबाइल क्रमांक, 'आयपी अॅड्रेस'वरून बदनामी केलेल्या व्यक्तीचा माग काढला जाते. त्या वेळी बदनामी करणारी व्यक्ती ही तरुणी किंवा महिलेच्या नात्यातील, मित्र किंवा ओळखीचीच असल्याचे समोर येते. सायबर शाखेकडे आलेल्या तक्रारींपैकी निम्म्यापेक्षा जास्त घटनांमध्ये जवळचीच व्यक्ती असल्याचे आढळते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यास टाळाटाळ करून प्रकरण समजुतीने मिटविले जाते. मात्र, असे कृत्य करणाऱ्याला धडा मिळावा म्हणून सायबर शाखेकडून तरुणींना तक्रार देण्याची विनंती केली जाते. पण, बऱ्याच वेळा तक्रार दिली जात नसल्याचे दिसून येते.



तरुणींनी काय काळजी घ्यावी.

त्रास देणाऱ्या व्यक्तीची तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा.

ओळखीची व्यक्ती असेल, तरीही अतिविश्वास ठेऊ नका.

मित्र किंवा इतरांसबोत रात्री मद्यपान करू नका.

निर्मनुष्य ठिकाणी एकटे फिरायला जाऊ नका.

आवश्यकता वाटल्यास तात्काळ पोलिसांना फोन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांशी सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न

$
0
0

ठाण्याच्या हद्दीत कशा स्वरूपाची गुन्हेगारी आहे?

दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टीचा परिसर मोठा आहे. या ठिकाणी किरकोळ कारणांवरून वादावादीचे प्रकार घडतात. या भागात मालमत्तांशी संबंधित गुन्हे अधिक आहेत. त्यामुळे झोपडपट्टी परिसरामध्ये व पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी पाच ते रात्री अकरादरम्यान पायी गस्त, मार्शलद्वारे गस्त घातली जाते. तपासणी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. झोपडपट्टीमध्ये 'ऑल आउट ऑपरेशन' राबवून तडीपार गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. लॉजची तपासणी केली जाते. सापडणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.

सामाजिक सलोख्यासाठी काय प्रयत्न केले जातात?

पर्वती दर्शन येथे घडलेल्या घटनेनंतर हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिकांच्या बैठका घेतल्या जातात. शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. या भागात किरकोळ कारणांवरून होणारे वाद स्थानिक पातळीवर सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. या लोकांमध्ये संवाद निर्माण केला आहे. शांतता समितीच्या बैठका सतत सुरू आहेत. तसेच, या भागातील तरुणांनी पोलिस दलात यावे, म्हणून प्रोत्साहन दिले जाते.

पर्वती टेकडीवर लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?

पर्वती टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी सकाळ व सायंकाळी गस्त सुरू आहे. तसेच, महिला कर्मचारीही गस्त घालत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबई येथून आलेल्या एका तरुण व तरुणीला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी आरोपींना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. असे गुन्हे करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच, पर्वती येथे खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या जातात. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

नागरिकांबरोबर कसा संवाद साधला जातो?

पोलिस ठाण्यात येताना नागरिकांना भीती वाटू नये, असे वातावारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांसोबत संवाद साधून प्रत्येक तक्रारीमध्ये गुन्हा दाखल केला जातो. त्यामध्ये तपास केला जातो. जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाते. तसेच, तक्रारदार व्यक्तीला त्याच्या तक्रारीमध्ये काय तपास केला, याची माहिती दर शनिवारी दिली जाते. नागरिकांशी संवाद वाढल्यामुळे त्याचा देखरेखीमध्ये खूप फायदा झाला आहे. तसेच, पासपोर्ट चारित्र्य पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे लवकर काम केले जाते.

सोनसाखळी चोरी, घरफोडी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत?

पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू केलेल्या गस्तीचा फायदा झाला असून हद्दीत 'चेन्स स्नँचिंग'च्या घटना थांबल्या आहेत. या वर्षी फक्त दोन घटना घडल्या असून त्याही उघडकीस आल्या आहेत. तसेच, घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. सोसायट्यांमध्ये आठवड्यातून चार ते पाच बैठका घेतल्या जातात. सुरक्षितेबाबत नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नेमण्याबाबत सूचना केल्या जातात.

'तंत्रज्ञाना'चा वापर कशा पद्धतीने केला जातो?

पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा 'व्हॉट्स अॅप' ग्रुप तयार केला आहे. त्याच्या मदतीने काम केले जाते. प्रत्येक जण कामाचा 'फीडबॅक'सुद्धा तत्काळ देतात. प्रत्येक पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्याला 'ई-मेल अकाउंट' उघडून दिले आहे. प्रत्येक ई-मेलला चोवीस तासांच्या आत 'रिप्लाय' दिला जातो. तसेच, 'एफआयर'ची 'कॉपी' ई-मेलवरून पाठविली जाते. पोलिस ठाण्यात दाखल होणारे शंभर टक्के गुन्हे सीसीटीएनएस प्रणालीवर तात्काळ नोंदविले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांगलादेशी दलालांना तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांगलादेशात कपड्यांच्या दुकानात काम करीत असलेल्या अल्पवयीन मुलीला काम देण्याचे आमिष दाखवून भारतात आणून वेश्या व्यावसायासाठी विकण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी दलालांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. नासीर सलीम यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

सुलतान उर्फ महंमद गिरीन उर्फ शोबूज सिद्धकी खान (खाँ) (२६) आणि महंमद राजीब अली अकबर चौधरी (२६ दोघे रा. नोडाइल, बांगलादेश) या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक सिद्धवा गहिनीनाथ जायभाये यांनी फिर्याद दिली होती. ३१ जुलै २०१३ रोजी बांगलादेशातील ढाका येथे कपड्यांच्या दुकानात काम करत असलेल्या मुलीला भारतात नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. तिच्या पालकांकडून त्यांनी तिला पुण्यात वेश्या व्यवसायाच्या विक्रीसाठी आणले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी बुधवार पेठ येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

सुटका करण्यात आलेल्या मुलीला विचारणा केल्यानंतर तिने ढाका येथील कपड्याच्या दुकानात कामाला असल्याचे सांगितले. दोघांनी मला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. भारतात आमची चांगली ओळख आहे, तू आमच्या बरोबर चल, आम्ही चांगल्या पगाराची नोकरी लावतो या त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुण्यात आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. बर्गे यांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील कमलाकर नवले यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला अधिकारी आज ठाणे अंमलदार

$
0
0

पुणे : महिला दिनानिमित्त शहरातील सर्व पोलिस ठाण्यात मंगळवारी ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलिस अधिकारी काम पाहणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी महिला अधिकारीच असतील.

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत ठाणे अंमलदार म्हणून महिला अधिकारी व कर्मऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी काढले आहेत. याबाबत त्यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. पुणे शहरात ३८ ठाणी असून, बहुतांश पोलिस ठाण्यात अंमलदार म्हणून पुरुष कर्मचारी काम पाहतात. पोलिस ठाण्यात येणारे गुन्हे नोंदवून घेणे, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, यांसह अन्य जबाबदारी ठाणे अंमलदारास पार पाडावी लागते. महिला दिनानिमित्त ठाणे अंमलदार म्हणून महिलांची नेमणूक केली जाणार आहे. पोलिस ठाण्याच्या नियोजनापासून ते हद्दीमध्ये घडणाऱ्या घटनांची जबाबदारी महिला ठाणे अंमलदारावर असणार आहे. त्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांच्या मैफलीत दोस्तीचे सूर

$
0
0

अजित पवारांसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भाजपशी मैत्री केल्यानंतरही कायम भाजपकडून बोळवण केल्याची भावना मनात खदखदणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी रविवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी केल्याचे उघड झाले. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या या नेतेमंडळींनी चक्क एकमेकांचे गुणगान गायले. भाजपच्या मित्रपक्षांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो' असे वक्तव्य करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय खेळीची चुणूक दाखविली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या निमित्ताने आयो​जित कार्यक्रमात या प्रमुख पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर जमले होते. माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या शेजारी खांद्याला खांदा लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे, विधान परिषदेतील सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, रिपलिब्कन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) गवई गटाचे राजेंद्र गवई आदी प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपकडून मित्रपक्षांना योग्य सन्मान देण्यात येत नसल्याने या पक्षांनी राष्ट्रवादीशी जवळीक साधल्याचे चित्र कार्यक्रमात दिसून आले.
भाजपच्या मित्रपक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्र आणल्याचे कसब दाखविल्यानंतर पवार म्हणाले, 'राजकीय क्षेत्रात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. आम्ही सरकारमध्ये असताना आमचे काम करत होतो. खोत, जानकर, मेटे हे त्यांची भूमिका मांडत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येण्याची भावना सर्वांच्या मनात असली पाहिजे.'
'राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता फक्त अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमध्येच आहे.' असे वक्तव्य करून मेटे यांनी पवार यांचे गुणगान गायले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पवार म्हणाले, 'माझी आणि फडणवीस यांची जन्मतारीख २२ जुलै हीच आहे. त्यामुळे मेटे असे म्हणाले असतील.'
मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. रामराजे निंबाळकर यांनी 'ही भेट शेवटची होऊ नये' असे सूचक विधान केले.
या कार्यक्रमाला का आलो, याचे स्पष्टीकरण खोत यांनी केले. ते म्हणाले, ' या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का? अशी विचारणा अनेकांनी केली. मात्र, शेतकऱ्यांना मदतीचा विषय असेल, तर का जाणार नाही. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आलो आहोत.'
भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करून सतत मित्रपक्षांना डावलण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'आम्ही सरकारमध्ये आहोत; पण आम्हाला आंदोलने करावी लागतात. मात्र, अजितदादा विरोधी पक्षात असले, तरी ते शांत असतात. त्यामुळे सरकारमध्ये नक्की कोण आहे, तेच समजत नाही.' जानकर यांनी तर थेट भाजपवरच टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भाजप आणि काँग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत. या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत असतील, तर सत्तेचा उपयोग काय?' आरक्षणाबाबत स्वामीनाथन अहवाल आघाडी सरकारच्या काळात आला. मात्र, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत त्यांनी नाराजीही दर्शविली.
...
मेटे यांनी केले अजित पवारांचे गुणगान
'राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता फक्त अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमध्येच आहे.' असे वक्तव्य मेटे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पवार यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. ते म्हणाले, 'अजितदादा आणि फडणवीस या दोघांचा अभ्यास आहे. दोघांचा प्रशासनामध्ये वचक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्यापत्नीला पेन्शन द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशात शहीद जवानांच्या पत्नीला पेन्शन देण्यात येते. त्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला राज्य सरकारने पेन्शन योजना सुरू करावी, अशी सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.
राज्यव्यापी सद्भभावना यात्रेचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी ३६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. कार्यक्रमाला सुनेत्रा पवार, महापौर प्रशांत जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे, विधान परिषदेतील सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, रिपलिब्कन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) गवई गटाचे राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार दिलीप मोहिते, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आदी उपस्थित होते.'उन्हाळ्याच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची थट्टा होईल, असे वक्तव्य करू नये. वाढदिवसांवरील खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा.' असे आवाहन पवार यांनी केले.
'सरकार आणि निसर्गाकडून शेतकऱ्याला साथ मिळत नाही. सरकारकडून मिळणारी मदत अपुरी​ असते. त्यामुळे शेतकरी वर्गाला आरक्षण द्या.' असा सल्ला रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’साठी मोबाइल व्हॅन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर व ग्रामीण भागातील शंभर टक्के नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी आता आधार मोबाइल व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही मोबाइल व्हॅन सध्या डोंगरी भाग असलेल्या वेल्हा तालुक्यात आधार कार्ड काढण्यासाठी पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, सन २०११ च्या लोकसंख्येनुसार शहर व ग्रामीण भागातील ८६ टक्के म्हणजे ८१ लाख ८० हजार नागरिकांना आतापर्यंत आधार कार्ड देण्यात आले आहे. उर्वरित १२ लाख ४६ हजार नागरिकांना हे कार्ड देण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांना येत्या मार्चअखेर आधार कार्ड देण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. विशेषतः शाळा व अंगणवाड्यांमधील मुलांचे आधार कार्ड काढले गेले नसल्याचे लक्षात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील सर्व मुलांचे आधार कार्ड काडण्यात आले आहे. पुणे शहर तसेच पिंपरीतील खासगी शाळा व अंगणवाड्यांमध्ये आधार कार्डसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असे उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रारा-गोकुळे यांनी सांगितले.

पुणे शहर व ग्रामीण भागातील शंभर टक्के नागरिकांना ३१ डिसेंबरपूर्वी आधार कार्ड देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, पुरेशी आधार मशिन आणि प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. या कामासाठी नव्याने ९९ मशिन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मशिनची संख्या आता २८३ झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ९४ लाख नागरिकांना आधार देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निर्धारित केले होते. त्यात आता बदल करून २०१५ च्या जनगणनेप्रमाणे ९९ लाख नागरिकांना आधार कार्ड देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नागरिकांना मार्चअखेरपर्यंत आधार कार्ड देण्यासाठी प्रशासनाची मोठी कसरत होणार आहे.


'डोंगरी भागात व्हॅन'

आधार कार्ड देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक मोबाइल व्हॅन तयार करण्यात आली आहे. दुर्गम व डोंगरी भाग असलेल्या वेल्हे तालुक्यात ही व्हॅन पाठविण्यात आली आहे. गावागावांत जाऊन या व्हॅनच्या माध्यमातून आधार कार्ड देणे शक्य झाले आहे.

- समीक्षा चंद्रारा-गोकुळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बम बम भोले’चा गजर

$
0
0

म. टा. प्रतीनिधी, पुणे

शिवलिंगावर दुधाची संततधार, उसाचा रस, शहाळ्याचे पाणी, ब्रह्मवृंदांचे लघुरुद्र पठण, चक्कापूजेने सजविलेले शिवलिंग...आणि 'ओम नम: शिवाय'चा जयघोष अशा वातावरणात सोमवारी महाशिवरात्र साजरी झाली. शहर आणि परिसरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. म‌ंदिरांचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता.

शहरातील ओंकारेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, पांचाळेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर तसेच उपनगरातील अमृतेश्वर, धायरेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, मृत्युंजय मंदिर येथे भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभरा रांगा लावल्या होत्या. तसेच या मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विविध मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली होती. माघ वाद्य त्रयोदशी आणि चतुर्दशी एकाच दिवशी आल्याचा योग साधून भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दरम्यान, बुधवार पेठ येथील आदर्श मंडळाने भाविकांच्या दर्शनासाठी खास अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाची प्रतिकृती तयार केली. सुमारे ५ हजार किलो बर्फाचा वापर करून हे शिवलिंग तयार केले असून ते सुमारे ४८ तास टिकते. मंडळाचे अध्यक्ष अजित कदम, उपाध्यक्ष जतीन कदम, विशाल पारखी, समीर कदम यांच्या संकल्पनेतून हे शिवलिंग तयार करण्यात आले.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदीर ट्रस्टच्या दत्त मंदिरात ६१ किलो चक्क्यापासून शिवलिंग तयार केले होते. शिवाजीनगर येथील श्री वृद्धेश्वर सिध्देश्वर मंदिर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित विविध कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला भजन मंडळाने आणि श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाने भजनाचे कार्यक्रम सादर केले. या वेळी नवनिर्वाचित स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांचा सत्कार करण्यात आला. मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत चर्चा करून त्याप्रमाणे कार्यक्रम आखण्यात आला. देवस्थानाचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुनील सांडभोर, सुधीर दुर्गे, बाळासाहेब शेंडे उपस्थित होते. भरत मित्र मंडळाच्या वतीने शिवमूर्ती, ढोल पथक, चित्ररथ यांचा समावेश असणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, राजाभाऊ नाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images