Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कर्ज देण्याच्या अमिषाने दीड लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतनिधी, पुणे खराडी येथील एका व्यक्तीला विमा पॉलिसीवर कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून एक लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय माने (वय ३९, रा. यशवंतनगर, खराडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अजय मल्होत्रा, राहुल अगरवाल आणि शर्मा नावाच्या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील यशवंतनगर येथे माने यांचे कटिंगचे दुकान आहे. त्यांना १४ जानेवारी रोजी एकाने चन्नई येथून एका कंपनीतून बोलत असल्याचा फोन केला. तुम्हाला विमा पॉलिसावर कर्ज दिले जाईल, असे सांगितले. त्यास माने यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर १४ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान त्यांना मल्होत्रा, अगरवाल व शर्मा नावाच्या महिलेने अनकेदा फोन करून त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी १ लाख ५९ हजार ७४० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार माने यांनी पैसे भरले. मात्र, अनेक दिवस झाले तरी पुन्हा कोणतीही प्रक्रिया न झाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंखे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौक सोडणाऱ्या २१ ट्रॅफिक पोलिसांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे वेळोवेळी सूचना करून देखील कामचुकारपणा करणाऱ्या वाहतूक शाखेच्या २१ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नेमणुकीचे ठिकाण सोडून जाणे, नियंत्रण कक्षातील फोनला उत्तर न देणे, कामाच्या वेळी फोन बंद करून ठेवणे, महत्त्वाच्या चौकात वाहतूक कोंडी झाली असताना हजर न राहणे, अशा विविध कारणांवरून ही कारवाई केली आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांचे एक ते दोन दिवस वेतन कापून घेणे, दोन ते पाचशे रुपये दंड अशा स्वरूपाची ही शिक्षा राहणार आहे. वाहतूक पोलिसांना घरापासून जवळ असणाऱ्या ठिकाणी नेमणूक केलेली असते. तसेच, काही काम असेल तर त्यांना वरिष्ठ अधिकारी, वाहतूक नियंत्रण कक्ष, सहकारी पोलिस कर्मचारी यांना सांगून जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, पोलिस उपायुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकाला भेट दिल्यानंतर चौक सोडून जाणारे, वरिष्ठ अधिकारी व नियंत्रण कक्षातील फोनला उत्तर न देणारे. वाहतूक कोंडी झाली तरी चौकात नसणारे असे २१ पोलिस कर्मचारी गेल्या दोन महिन्यांत आढळून आले आहेत. याबाबत या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी कामचुकारपणा केल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड म्हणाले, 'शहरातील महत्त्वाच्या विविध चौकांना भेटी दिल्यानंतर काही वेळेला चौकात यातील कर्मचारी हजर नसल्याचे दिसून येते. कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी वरिष्ठ अधिकारी किंवा नियंत्रण कक्षाला सांगून चौक सोडावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही देखील काहीही न सांगता चौक सोडल्याचे आढळून आले आहे. तसेच, कामाच्या वेळी नियंत्रण कक्षाकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन केल्यानंतर त्याला प्रतिसाद दिला जात नाही. कधी-कधी फोन बंद असतो. त्यामुळे कामाच्या बाबतीत अडचणी येतात. अनेकदा चौकात वाहतूक कोंडी झालेली असते. नागरिकांचा फोन केल्यानंतर त्या ठिकाणी नेमलेले कर्मचारी नसल्याचे आढळून येते. याबाद्दत कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जाते. कामामध्ये चुकारपणा केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाते. त्यानुसार ही करावाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅमेनिटी, ओपन स्पेसचे बंधन शिथिल करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वीस हजार चौरस फुटांच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पंधरा टक्के अॅमेनिटी व दहा टक्के ओपन स्पेस ठेवण्याचे बंधन शिथिल करण्याचा प्रस्ताव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) राज्य सरकारला पाठविला आहे. त्याबदल्यात संबंधित प्रकल्पातील सदनिकांना कमी चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचाही समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे.

'पीएमआरडीए'च्या कार्यक्षेत्रातील वीस हजार चौरस फुटांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अॅमेनिटी व ओपन स्पेस ठेवण्याचे बंधन आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे. हे शिथिल करण्यास राज्य सरकारची मान्यता मिळाली तर छोट्या प्लॉटधारकांचे रखडलेले प्रकल्प लवकर मंजूर होण्यास मदत होणार आहे. तसेच, छोट्या आकाराच्या सदनिकाही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात बांधकाम नकाशे मंजूर करताना एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के ओपन स्पेस आणि पंधरा टक्के अॅमेनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परिणामी, छोट्या प्लॉटधारकांना बांधकाम करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. या बंधनामुळे छोटे प्लॉट विकसित करण्यापासून बांधकाम व्यावसायिक परावृत्त होत आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी छोट्या प्लॉटची विकसन परवानगी घेणेही थांबविले आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ही अट कायम आहे. मात्र, या बंधनातून वीस हजार चौरस फुटांपर्यंतच्या प्लॉटला सवलत देण्यात आली आहे. त्यात धर्तीवर पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात सुद्धा ही अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीच्या अनुषंगाने पीएमआरडीए व नगर रचना विभागाने राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे.

छोट्या आकाराच्या म्हणजे वीस हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये ही अट शिथिल करताना त्यासाठी काही बंधने घालावीत, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या बंधनांमध्ये मुख्यत्वे दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा प्लॉट असेल; तर अॅमेनिटी व ओपन स्पेसची अट शिथिल करावी आणि संबंधित प्लॉटधारकांना मान्य चटईक्षेत्र निर्देशांकाऐवजी ०.७५ टक्केच चटईक्षेत्र देण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच, त्यापेक्षा अधिक म्हणजे वीस हजार चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळाच्या प्लॉटला ०.८५ टक्के चटईक्षेत्र द्यावे, अशीही शिफारस करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षाचालक मालकांच्या विविध मागण्यासाठी आणि परवाना शुल्कवाढी विरुद्ध ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, शिवनेरी रिक्षा चालक-मालक संघटना आणि रिक्षा फेडरेशनसह काही रिक्षा संघटनांच्या वतीने शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील ४०० रिक्षाचालकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली आरटीओ कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. तर, चालकमालक प्रतिनिधी महासंघकृती समितीने अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन केले. आठ मार्च रोजी होणाऱ्या संपामध्ये सर्व रिक्षा संघटना सहभागी होणार असल्याचेही शिंदे म्हणाले. ओला, उबेर गाड्या बंद करा, बेकायदेशीर वाहतूक बंद करा, हप्तेखोरी बंद करा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. तर, सरकारने घेतलेला परवाना नूतनीकरण शुल्कवाढीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली.

बापू भावे, सोमनाथ कलाटे, सुदाम बनसोडे, महेश कांबळे, गोकुळ रावळकर, दत्ता भोसले, अभिमन्यू पवार, वैभव जाधव, राजन जुनवणे, विक्रांत विगरुळकर, अशोक साळेकर, प्रदीप भालेराव आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकेला ६ लाखांचा गंडा

0
0

खडक पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खडक शाखेत बनावट चेक सादर करून सहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत बँकेचे सरव्यवस्थापक मिलिंद पुरोहित (वय ५७, रा. धायरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून विजय आणि रमेश चैमसुख बोरा (रा. मालाड, मुंबई) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरी अॅन्ड सन्स कंपनीकडून सुरत येथील एका व्यक्तीची रक्कम देण्यासाठी सहाशे रुपयांचा वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा चेक काढण्यात आला होता. आरोपींनी या क्रमांकाच्या चेकवरून दुसरा बनावट चेक तयार केला. त्यावर पाच लाख ९८ हजार ६०० रुपयांची रक्कमही टाकली. धारवाड येथील वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत तो चेक वटविण्यात आला. त्यानंतर ही रक्कम अंधेरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधील रमेश बोरा नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर हस्तांतर करण्यात आली.

बोरा नावाच्या व्यक्तीने तेथून रक्कम काढून घेतली. बँकेने तपासणी केल्यानंतर धारवाड येथे वटविण्यात आलेला चेक हा बनावट असल्याचे आढळून आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानुसार खडक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. फौजदार एम. आर. घुगे अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्वे रोडवरील बँक ऑफ बडोदामध्ये एका हॉस्पिटलचा बनावट चेक सादर करून नऊ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही रक्कम देखील मुंबईतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर हस्तांतर करून काढण्यात आली होती. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजग नागरिकांचा ‘मटा’तर्फे सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सुरू केलेला 'सिटीझन रिपोर्टर' हा प्रभावी उपक्रम आहे, अशा शब्दांत या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी आपली भावना व्यक्त केली.

'सिटीझन रिपोर्टर'च्या अॅपद्वारे गेल्या आठवड्यात उल्लेखनीय वार्तांकन केलेल्या डॉ. अरविंद जोशी आणि अनिकेत राठी यांचा 'मटा'तर्फे शुक्रवारी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. नागरिकांना स्थानिक समस्या प्रभावीपणे मांडता याव्यात, या साठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सुरू केलेला 'सिटीझन रिपोर्टर' हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून, त्याद्वारे नागरी प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शहरात दैनंदिन स्वरूपात दिसणारी एखादी समस्या, नागरिकांकडून बहुतेक वेळा दुर्लक्षिली जाते. त्याबद्दल, राग व्यक्त केला जात असला, तरी ती सोडविण्यासाठी नेमके काय करायचे, याची माहिती नागरिकांना नसते. कोणी कधीतरी महापौर, आयुक्त यांना पत्र पाठवायचे; पण समस्या 'जैसे थे' असायची. सिटीझन रिपोर्टर अॅपमुळे या समस्या अनेक लोकांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे प्रशासनाकडून त्याची तातडीने दखल घेतली जाते. या अॅपमुळे नागरिक अधिक सजग होतील,' असे निरीक्षण नोंदविण्यात आले. शहराच्या विविध भागातील, विविध वयोगटातील नागरिकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले असून दररोज ते त्यांना खटकणाऱ्या समस्या 'मटा'पर्यंत पोहोचवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा आसखेड’साठी सर्वपक्षीय आंदोलन

0
0

येत्या मंगळवारी नगर रोडवर उतरणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, खराडी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या भामा आसखेड प्रकल्पाचे बंद पडलेले काम त्वरित सुरू व्हावे, या साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वडगावशेरी विधानसभा नागरीक कृती समितीच्या वतीने येत्या ८ मार्चला नगर रोडवरील टाटा गार्डरूम चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याची मा​हिती माजी आमदार बापू पठारे यांनी दिली. आंदोलनात नगररोडवरील सर्वपक्षीय नगरसेवक सहभागी होणार असून, रखडलेले काम तातडीने पूर्ण व्हावे, या साठी पाठपुरावा केला जाणार आहे.

केंद्रात आघाडी सरकार असताना जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण योजनेच्या (जेएनएनयूआरएम) माध्यमातून प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता. या प्रकल्पामुळे शहराच्या पूर्व भागातील वडगावशेरी, खराडी, नगर रोडवरील पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असताना खेडचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी प्रकल्पाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला विरोध केला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून योजना रखडली आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या सेनेच्या आमदारामुळे काम रखडले असतानाही पालकमंत्री गिरीश बापट लक्ष घालत नसल्याचा आरोप पठारे यांनी केला. जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे याबाबत वारंवार बैठका होऊनही प्रश्न सुटला नसल्याचे ते म्हणाले.

ही योजना कार्यान्वित न झाल्यास पूर्व भागातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण व्हावे, या साठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार असल्याचे पठारे म्हणाले. आंदोलनात नगर रोडवरील सर्वपक्षीय नगरसेवकांसह, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, नागरिकदेखील सहभागी होणार असल्याचे पठारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेमुदत संपाचा सराफांचा निर्धार

0
0

निर्णयाच्या विरोधात १० मार्चला पुण्यात मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेला एक टक्का उत्पादनशुल्क अन्यायकारक असून, केंद्र सरकारने निर्णय मागे घेईपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी घेतला आहे. केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात येत्या १० मार्चला राज्यभरातील सराफ पुण्यात मोर्चा काढण्यात येईल,' अशी घोषणा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली.

फेडरेशनच्या वतीने कृष्णसुंदर गार्डन येथे शुक्रवारी राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रांका बोलत होते. बैठकीला सर्व शहरांतील सराफ असोसिएशनचे पदाधिकारी आणि दोन हजारांहून अधिक सराफ व्यावसायिक उपस्थित होते. सरकारने लादलेल्या अन्य करांबद्दल आमचा आक्षेप नाही; पण उत्पादन शुल्काच्या निर्णयास आमचा विरोध आहे. ज्या सरकारवर आम्ही विश्वास ठेवला. त्यांनीच आता शब्द फिरवले आहेत. त्यामुळे व्यापारी सजग झाला असून, सरकारच्या दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना आम्ही बळी ठरणार नाही. हा अन्यायकारक निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा, असे आवाहन आम्ही केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना केले आहे. लवकरच या प्रश्नी पंतप्रधानांकडेही दाद मागण्यात येईल,' असे रांका म्हणाले.

कायद्यातील क्लिष्टता वाढवून सरकार पुन्हा एकदा इन्स्पेक्टरराज आणू पाहत आहे. कायद्यात बदल केल्याशिवाय माघार घेणार नाही. पुण्यामध्ये येत्या १० मार्चला तसेच, मुंबई येथील आझाद मैदानावरही व्यापारी आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही रांका यांनी दिला. या वेळी कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक, घिसुलाल सोळंकी, संघटनेचे प्रमुख उपाध्यक्ष किरण आळंदीकर, सुभाष मुठा, किशोर पंडित, प्रमुख सचिव प्रेमचंद झांबड, सहसचिव दत्ता देवकर, खजिनदार अमृतलाल सोळंकी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस कर्ज खात्यांद्वारे अपहार

0
0

अजित बँकेच्या दोषी संचालकांचा 'प्रताप'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोगस कर्ज खाती उघडून बँकेच्या पैशांचा अपहार, विनातारण कर्ज, ठेव तारण कर्जांमध्ये गोलमाल, बँकेच्या शाखांमधून बेकायदेशीर उचल, खात्यामध्ये पैसे असल्याचे भासवून ते स्वतःशी संबंधित खात्यांमध्ये जमा करण्यासारखे अनेक 'प्रताप' अजित सहकारी बँकेच्या दोषी संचालकांनी केल्याचे चौकशी अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे.

विशेषतः बँकेच्या हडपसर येथील शाखेत ठेवींमध्ये गोलमाल करण्याचे गैरप्रकार झाले आहेत. या शाखेत झालेले अनेक व्यवहार बँकेच्या मुख्यालयात नोंदविलेच गेलेले नाहीत. या शाखेमध्ये जमा झालेल्या ठेवी आणि मुख्यालयात असलेल्या नोंदी यांमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. तसेच बँकेच्या आंतरशाखीय व्यवहारांमध्ये संशयास्पद नोंदी, संशयास्पद कर्ज प्रकरणे आणि बनावट चालू खात्यामध्ये (सेव्हिंग) व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्थिक गैरव्यवहारांमुळे अजित बँकेची सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. त्यात बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेला झालेल्या तोट्याची संचालकांवरील वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी कलम ८८ नुसार चौकशी करण्यात आली. त्यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष विलास सरनोबत, तत्कालीन संचालक किशोर कुंजीर, राजेंद्र कोंडे यांच्यासर दिवंगत सरव्यवस्थापक ज्ञानेश डांगे यांच्यावर २० कोटी ७९ लाख रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. ही तोट्याची रक्कम संबंधितांकडून १५ टक्के व्याजदराने वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी दिलीप भापकर यांनी दिले आहेत.

या चौकशी अहवालात दोषी संचालकांनी केलेली अनेक कृष्णकृत्ये उघडकीस आली आहेत. बँकेने मार्च २००७ रोजी थकित व अनुत्पादक कर्ज खात्यातील थकबाकीच्या रकमा प्रत्यक्षात प्राप्त नसताना त्या जमा दाखवून अनुत्पादक आणि इतर खात्यातील थकबाकी कमी असल्याचे दाखविले. राजेंद्र कोंडे यांनी बँकेच्या धनकवडी शाखेतील बचत खाते नं. ३४९० मध्ये रक्कम शिल्लक नसताना धनादेश देऊन १९८ लाख रुपये काढले. तसेच नितू राजेंद्र कोंडे यांच्या हडपसर शाखेतील खाते नं. ५०० मध्ये धनादेश सादर करून ४५५ लाख आणि किशोर कुंजीर यांच्या खात्यात धनादेश देऊन १०० लाख रुपये काढल्याचे दाखविण्यात आले. या रकमा मार्च २००७ मध्ये कर्जखात्यात प्रत्यक्ष जमा नसताना त्या जमा असल्याच्या दाखविल्या गेल्या आणि ही खाती बंद करण्यात आली.

त्याचप्रमाणे, अतुल बापूसाहेब धनकवडे, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था आणि सिद्धार्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात पैसे नसताना त्यातून लाखो रुपयांचा आर्थिक गैरप्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

..

जवळेकरांनी लाटली १० कोटींची कर्जे

बँकेचे संचालक राजेश जवळेकर यांनी विविध व्यक्तींच्या नावाखाली ४१ कर्ज खात्यांद्वारे १० कोटी ७५ लाख रुपयांची जबाबदारी मान्य केली आहे. या कर्जांच्या परतफेडीची हमी व त्यासाठी लागणारी तारण मालमत्ता त्यांनी गहाणखताने बँकेला दिली आहे. जवळेकर यांची खेड तालुक्यातील सोळू येथील मालमत्ता विकून बँकेला ३ कोटी ८६ लाख रुपये मिळाले आहेत. तसेच, कर्जत येथील भिसेगावमधील १२ कोटी ८९ लाख रुपये किमतीची जमीन तारण म्हणून बँकेकडे दिली आहे. यातून त्यांची सर्व थकित कर्ज रक्कम वसूल होऊ शकत असल्याने त्यांना नुकसानीच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या काही भागांत शुक्रवारी सकाळीच अवकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. सायंकाळी साडेपाचपर्यंत ३ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली असून, शहरासह मुंबई आणि परिसरालाही पावसाने झोडपून काढले. पुढील दोन दिवसांतही मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवेळी पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी नऊच्या सुमारास पेठांच्या परिसरासह स्वारगेट, डेक्कन जिमखाना, कोथरूड आणि इतर परिसरामध्येही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सकाळीच पाऊस झाल्याने शुक्रवारी शहरातील कमाल तापमानात घट झाली. दरम्यान, शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यासह मुंबई, अलिबाग, नागपूर, चंद्रपूर अशा राज्याच्या विविध भागांतही पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका नवऱ्याच्या चार लग्नांची गोष्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

त्याचे आईवडील पुण्यातील नामांकित डॉक्टर... मात्र त्याच्या वागण्याला कंटाळून जाहीर नोटीस देऊन सगळे संबंध तोडले...अशा नामांकित डॉक्टर दाम्पत्याच्या 'परमप्रतापी' चिरंजीवांनी एक नाही, दोन नाही, तर चार लग्न केल्याचे त्याच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे पत्नीने पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद दाखल केली. दरम्यान, कोर्टाने सासू-सासऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, तर पतीचा अटकपूर्व जा​मीन फेटाळला.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश सुनंदा आपटे यांच्या कोर्टात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रोशनी (नाव बदलले आहे) या महिलेने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तिचे सासू, सासरे आणि पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पतीकडील मंडळींनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. फिर्यादी महिलेतर्फे अॅड. प्रताप परदेशी यांनी काम पाहिले. सरकारतर्फे हिरा बारी यांनी काम पाहिले.

फिर्यादीची डान्स क्लासमध्ये एका व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्याच्याबरोबर ती नांदण्यासाठी गेली असता, त्याचे पहिले लग्न झाल्याचे कळले. दरम्यानच्या काळात त्याने पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर काही दिवसांनी तो रोशनीला त्रास देऊ लागला. सांभाळण्यास असक्षम असल्याचेही त्याने तिला सांगितले. संशय आल्याने तिने अधिक चौकशी केली असता, या महाभागाने आणखी दोन लग्न केल्याचे समजले. मुंबईत त्याने तिसरे लग्न केल्याचेही समजले. फेसबुक प्रोफाइल तपासले असता, त्याची आतापर्यंत चार विवाह झाल्याचे तिला समजले. या प्रकरणी रोशनीने सासू, सासरे आणि पतीविरुद्ध हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती, अशी माहिती अॅड. परदेशी यांनी दिली. कोर्टाने सासू, सासरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. मात्र, पतीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात खोदणार हजार किमीचे रस्ते

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील नागरिकांना 'स्मार्ट सिटी'कडे नेण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांनी कामाचा धडाका लावला असून, मार्चअखेरपर्यंत ५०० किलोमीटरचे, तर त्यानंतरच्या वर्षभरात तब्बल एक हजार किमीचे रस्ते खोदण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या सर्व रस्ते खोदाईमुळे वाहतूक समस्या उद्भवणार असली, तरी त्याची तजवीज करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) घेण्यासाठी आत्तापासूनच अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

शहराच्या सर्वच भागांत सध्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातच, ड्रेनेजच्या लाइनसाठी खोदाईचे कामही अनेक रस्त्यांवर हाती घेण्यात आले आहे. विविध खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी आणि महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांनाही पालिकेने खोदाईसाठी परवानगी दिली आहे. या सर्व विभागांची कामे एकाचवेळी सुरू असल्याने सध्या शहरात सर्वत्र 'काम चालू, रस्ता बंद' अशी परिस्थिती उद्भवली असून, पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

'शहरात काँक्रिट रस्ते, ड्रेनेज, महावितरण, खासगी कंपन्या यांना रस्ते खोदण्यास परवानगी देण्यात आली आहे. विकासकामांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वारगेट-बो‌रिवली व्हाया ऐरोली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवाशांची मागणी तसेच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता स्वारगेट ते बोरिवली व्हाया ऐरोली या मार्गावर उद्यापासून (ता. ५) एसटीची शिवनेरी (वातानुकूलित) बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या पुणे विभागाला नव्या कोऱ्या १२ स्कॅनिया बस मिळाल्याने स्वारगेट आणि बोरिवली अशा दोन्ही बसस्थानकांहून या बसच्या दिवसाला प्रत्येकी सहा फेऱ्या होतील, अशी माहिती एसटीचे पुणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

चव्हाण म्हणाले की, स्वारगेट बसस्थानकाहून या बसच्या दिवसाला सहा फेऱ्या आहेत. त्यापैकी तीन फेऱ्या या चांदणी चौकामार्गे तर तीन फेऱ्या औंधमार्गे होणार आहे. या दोन्ही बसफेरीचे भाडे ५०० रुपये राहणार आहे. नव्या बसफेरीचा मार्ग चांदणी चौक किंवा औंधनंतर वाकड, ऐरोली, विक्रोळी चौक, पवई, एल अॅन्ड टी कंपनी, जोगेश्वरी, गोरेगाव असा असेल. या नव्या बसफेरीमुळे मुंबई परिसरातील विक्रोळी, पवई, साकीनाका, जोगेश्वरी, गोरेगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. दरम्यान, दादर ते हिंजवडी आयटी पार्क अशी शिवनेरी सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

- स्वारगेट - ऐरोली - बोरिवली (व्हाया चांदणी चौक) - सकाळी ७, दुपारी २, सायंकाळी ७ वाजता - ५०० रुपये

- स्वारगेट - ऐरोली - बोरिवली (व्हाया औंध) - सकाळी ९, दुपारी १२, सायंकाळी ५ वाजता - ५०० रुपये

- बोरिवली - ऐरोली - स्वारगेट (व्हाया चांदणी चौक) - सकाळी ९, दुपारी १२, सायंकाळी ७ वाजता - ५०० रुपये

n बोरिवली - ऐरोली - स्वारगेट (व्हाया औंध) - सकाळी ७, दुपारी २ , सायंकाळी ५ वाजता - ५०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुळांवर धावले बायो-डिझेल इंजिन

0
0

'निसर्गमित्र' मध्य रेल्वेत झाले दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालेभाज्यांच्या कचऱ्यापासून तयार केलेल्या बायो-डिझेलवर (जैव इंधन) चालणारे मध्ये रेल्वेतील पहिले इंजिन शुक्रवारी रुळावर धावले. अद्यापही विद्युतीकरणाअभावी रेल्वे इंजिन चालविण्यासाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषणात भर पडते, त्याबरोबरच डिझेल आयात करण्यावरही मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर बायो-डिझेलवर चालणारे इंजिन सेवेत दाखल झाल्याने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

मध्ये रेल्वेतील पहिले बायो-डिझेलवर चालणारे 'निसर्गमित्र' हे रेल्वे इंजिन शुक्रवारी रेल्वेच्या सेवेत रुजू झाले. तर, देशातील पहिल्या भुयारी रेल्वे कंज्युमर डेपोचे (आरसीडी) उद‍्घाटन मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता ए. के. गारेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, सहव्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, संजय अडसूळ, वी. वी. झोडे, शिवेंद्र गुप्ता, राकेश बहल आदी या वेळी उपस्थित होते. घोरपडी येथे उभारण्यात आलेल्या भुयारी डेपोत दोन टाक्या असून, २२५ किलो लिटर डिझेल आणि २२ किलो लिटर बायो डिझेल साठविण्याची त्यांची क्षमता आहे. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत हे युनिट उभारण्यात आले आहे.

देशाला सध्या पर्यायी इंधनाची गरज आहे. बजेटमध्ये त्याबाबत संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात बायो-डिझेल वापरण्यावर भर दिला जाणार आहे. रेल्वेच्या विकासासाठी येत्या काळात 'एचपीसीएल'च्या माध्यमातून अनेक नवनवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती गारेकर यांनी या वेळी दिली. पुण्यात उभारलेल्या या सर्वाधिक मोठ्या आणि अद्ययावत प्रकल्पामुळे विभागासह रेल्वेच्या विकासाला गती मिळणार आहे.

आर्थिक बचत होणार

पुणे विभागातील रेल्वेसाठी एका दिवसाला १४१ किलो लिटर डिझेलची आवश्यकता आहे. या पुढे डिझेलच्या एकूण गरजेच्या पाच टक्के बायो-डिझेल वापण्यात येणार आहे. म्हणजेच, डिझेलमध्ये पाच टक्के बायो-डिझेल टाकले जाणार आहे. बायो डिझेलमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. डिझेलच्या तुलनेत बायो-डिझेलच्या निर्मितीचा खर्च कमी आहे. परिणामी, आर्थिक बचतही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनएफएआय’चे पी. के. नायर निवर्तले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपटांचा चालता-बोलता इतिहास अशी ओळख असलेले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संस्थापक व पहिले संचालक पी. के. नायर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

नायर गेल्या आठवडाभरापासून आजारी होते. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. आज (शनिवारी) सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव एनएफएआय येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'BJPच्या काळात बेळगावातील मराठी भाषिक देशद्रोही'

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून कन्नडीगांकडून केला जाणारा अन्याय, अत्याचार काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र, त्यापूर्वी भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना बेळगावातील मराठी भाषिकांना 'देशद्रोही' असल्याची वागणूक दिली जात होती, असा खळबळजनक आरोप बेळगावचे नवनिर्वाचित उपमहापौर संजय शिंदे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केला.

बेळगावच्या नवनिर्वाचित महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे हे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर 'मटा' प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावचा प्रश्न सुटलेला नाही. तेथील मराठी भाषिक नागरिकांना महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, गेल्या १२ वर्षांत सातत्याने उपेक्षा झाल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे, असे महापौर पाटील आणि उपमहापौर शिंदे यांनी सांगितले.

बेळगावच्या महापौरपदी सलग तिसऱ्यांदा मराठी भाषिक नागरिकाची निवड झाली आहे. सदस्यांचे संख्याबळही जास्त आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बेळगावात मराठी असूनही नसल्यासारखी आहे. सरकारी कागदपत्रे मराठीत नाहीत. सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बसच्या पाट्या मराठीत नाहीत. मी मूळची लातूरची आहे. लग्नानंतर बेळगावात स्थायिक झाले. त्यामुळे मला कन्नड भाषा अजिबात येत नाही. मग माझ्यासारखीने तिथे काय करायचे? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’तून स्त्रीशक्तीला सलाम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्तबगारीच्या सर्व क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या स्त्रीला सलाम करण्यासाठी यंदाही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे महिलांची 'बाइक रॅली' आयोजित करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानंतरच्या रविवारी, १३ मार्च रोजी ही रॅली काढण्यात येईल. पुण्यासह औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर व ठाणे या शहरांमध्ये ही रॅली निघणार आहे.

महिलांच्या कर्तबगारीचा सन्मान करण्यासाठी, त्यांचाच सहभाग असलेली बाइक रॅली 'मटा'तर्फे गेल्या दोन वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. दोन्ही वर्षी या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वेळी भरजरी पैठणी, बांधणीची साडी आणि दागदा‌गिने, भगवे फेटे, सलवार कुडता, जीन्स-टी शर्टही... अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी पेहरावात नारीशक्तीने धमाल केली होती.

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सहभागी महिलांच्या नातेवाइकांनी केलेल्या चीअरिंगमुळे या रॅलीतील उत्साह सुरुवातीपासूनच वाढला. ही रॅली पाहण्यासाठी रस्त्यांवरही गर्दी झाली होती. अशीच धमाल करण्याची संधी यंदा पुन्हा चालून आली आहे. यंदा १३ मार्चला बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) येथून सकाळी आठ वाजता ही रॅली निघेल.

करिअरच्या शिखराच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करतानाच महिला आज कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे सांभाळत आहेत. विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने अनेक आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या या महिलांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'बाइक रॅली' हा स्त्री शक्तीच्या या नव्या साक्षात्काराचा प्रतीकात्मक हुंकार आहे. परंपरेने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि निसर्गाने मातृत्वाच्या वरदानातून दिलेले वात्सल्य यांचा समतोल साधत स्त्री प्रसंगी रणरागिणीही होते, याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्या आसपास घडताना दिसतात. महिला सबलीकरणाच्या केवळ घोषणा न देता त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने मोकळ्या मनाने पुढे येण्याची आता गरज आहे, असा संदेश समाजाला दिला जावा, अशी कल्पना यामागे आहे.

बाइक रॅलीचा मार्ग : बीएमसीसी येथून सकाळी आठ वाजता रॅलीला सुरुवात होईल. टाइस्म हाउस, रत्ना हॉस्पिटल, कर्वे रस्ता, राजाराम पूल, सारसबाग, संभाजीबाग ते पुन्हा बीएमसीसी असा या रॅलीचा मार्ग आहे. नावनोंदणी www.mtonline.in/womenbikerally या साइटवर करता येईल. किंवा Bikerally स्पेस PUN असा संदेश ५८८८८ या क्रमांकावर पाठवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाहाकार करणाऱ्यांना अद्दल घडवू’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकार क्षेत्राचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याऐवजी, त्याचा स्वाहाकार करून नागरिकांना विश्वासघात करणाऱ्यांना अद्दल घडविल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. तसेच, राज्य सरकार रुपी बँकेच्या ठेवीदारांच्या पाठीशी असून, बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी त्याग करण्याची तयारी ठेवावी लागेल, असे संकेत त्यांनी दिले.

सहकार क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार क्षेत्राच्या स्वच्छतेची मोहीम यापुढे सुरूच राहणार असल्याचा निर्वाळा दिला.

सहकाराचा संस्कार ही महाराष्ट्राची संस्कृती असून, त्यातून अनेक संस्थांचा विस्तार झाला. त्याचे लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाले. नागरिकांचे जीवन आणखी सुसह्य होण्यासाठी सहकाराचा वापर करण्याऐवजी गेल्या काही वर्षांत त्याचे रूपांतर स्वाहाकारात करण्याची वृत्ती बळावली. त्यामुळे, सहकारावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्यांचा विश्वासघात झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार क्षेत्रातील उणिवांवर नेमके बोट ठेवले.

सहकाराच्या शुद्धिकरणाच्या मोहिमेसाठी सरकारने काही कठोर पावले उचलली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या संचालकांना निवडणूक बंदी घालण्यात आली असून, काहींवर फौजदारी कारवाई सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आगामी काळात सहकारी संस्थांवर तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून रुपी बँकेचे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही देऊन, काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, रुपी बँकेला अडचणीतून सोडविण्यासाठी काहींना त्याग करावा लागेल, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिजोरीची चावी राष्ट्रवादीकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर अखेरच्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. निवडणुकीत पालिकेत राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब बोडके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

काँग्रेस, राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार दिल्याने गेल्या आठ दिवसांपासून यामध्ये चुरस निर्माण झाली होती. निवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली. मनसेने निवडणुकीत बहिष्कार टाकत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या सभासदांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याने बोडके यांना नऊ मते मिळाली. पालिकेत सत्ता स्थापन करताना मि‌त्रपक्ष असलेल्या काँग्रेसला एक वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची चर्चा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली होती. स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने अविनाश बागवे यांना उमेदवारी दिली होती. मात्र राष्ट्रवादीने बोडके हेच अध्यक्षपदाचे दावेदार असतील, असे स्पष्ट करत निवडणुकीत उडी घेतली. भाजपनेही उमेदवार उतरविल्याने निवडणुकीबाबत उत्सुकता होती. पीठासन अधिकारी पीयुष सिंग यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ उमेदवारांना दिला. यानंतर सूत्रे फिरली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघे काही मिनिट बाकी असताना अचानक काँग्रेसचे बागवे यांनी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मतदान झाले. राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांबरोबरच काँग्रेसच्या तीन सदस्यांनी बोडके यांना मतदान केले. भाजपचे राजेंद्र शिळीमकर यांना तीन मते मिळाली.



चुकीमुळे अध्यक्षपद हुकले

पालिकेत सत्ता स्थापन करताना मि‌त्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने दिलेल्या शब्दानुसार पाच वर्षातील एक वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद पक्षाला मिळण्याचे काँग्रेसने पाहिलेले स्वप्न अखेरच्या वर्षीही अपूर्णच राहिले. पाच वर्षापूर्वी झालेल्या समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेने उमेदवार उभा केल्याने राष्ट्रवादीला पुणे पॅटर्नमधील भाजपच्या गणेश बीडकर यांना समितीचे अध्यक्ष करावे लागले होते. याची सल राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात आजही कायम असल्यानेच अखेरच्या वर्षाचेही अध्यक्षपद काँग्रेसला न देता राष्ट्रवादीकडेच कायम ठेवण्याचा आग्रह धरत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर दावा करत पालिकेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने उमेदवार उभे केल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले बोडके हे महापौरपदाच्या शर्यतीत होते. मात्र पक्षाने त्यांना पुन्हा स्थायी समितीत संधी दिल्याने अध्यक्षपद त्यांनाच दिले जाईल, अशी चर्चा सुरुवातीपासूनच पालिकेत होती. सत्ता स्थापन करताना एक वर्ष अध्यक्षपद देण्याचा शब्द राष्ट्रवादीने दिल्याचे स्पष्ट करत काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उतरविला होता. उमेदवारी अर्ज भरलेल्या दिवसापासून स्थायीचे अध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत चर्चा रंगत होती. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पालिकेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये बोडके यांनाच अध्यक्ष करण्याचे आदेश पवार यांनी दिले.



पालिकेतील शिपाई ते स्थायी समिती अध्यक्ष

महापालिकेत काही वर्षापूर्वी 'शिपाई' म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. शिवाजीनगर भागातून सलग तीन टर्म नगरसेवक म्हणून काम करणारे बाळासाहेब बोडके, असे या व्यक्तीचे नाव आहे. बोडके यांनी पाच वर्षे पालिकेत शिपाई म्हणून काम केले आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने पालिकेच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे आली आहे.

वडीलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर बाळासाहेब बोडके यांनी महापालिकेत शिपाई म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील काळूराम बोडके हे पालिकेत 'नाईक' पदावर काम करत होते. १९७८साली त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी पालिकेत कामाला सुरुवात केली. १९७८ ते १९८३ या पाच वर्षांच्या काळात त्यांनी नगरसचिव कार्यालयात काम केले. राजकीय कारर्किदीला सुरुवात केल्यानंतर गेल्या १४ वर्षांपासून बोडके शिवाजीनगर भागातून प्रतिनिधित्व करत आहेत. २००२सालापासून बोडके राजकारणात सक्रीय आहेत. पहिली निवडणूक काँग्रेसकडून, तर त्यानंतरच्या दोन टर्म त्यांनी राष्ट्रवादीकडून लढविल्या आहेत. 'सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम पक्षाने केले आहे. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवित सर्वांच्या सहकार्याने जबाबदारी पार पाडणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष बोडके म्हणाले.



पिंपरीमध्ये 'स्थायी'च्या अध्यक्षपदी आसवाणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी यांची बिनविरोध निवड झाल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. समितीत १६ पैकी १२ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. संख्याबळानुसार याच पक्षाचा अध्यक्ष होणार हे निश्चित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जेल विभाग हा पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात जेल विभागाचा विकास होऊ शकलेला नाही. राज्यातील जेल अधुनिक व सुरक्षित झाली पाहिजे, त्यासाठी इस्राइलच्या 'एजन्सी'बरोबर चर्चा सुरू आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

जेल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे जेलचे प्रमुख व अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रधान सचिव डॉ. विजय सदबीर सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपती पदक मिळालेल्या जेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेत जेलच्या पाच विभागातील २८३ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिस्तबद्ध पद्धतीने सलामी दिली.

फडणवीस म्हणाले, 'कायदा सुव्यवस्थेचा विचार केल्यास पोलिसांबरोबच जेल विभागही महत्वाची भूमिका निभावत आहे. जेल विभागाचे काम तसे जिकीरीचे असून वाट चुकलेल्या कैद्यांना मार्गावर आणण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे. दुर्दैवाने जेल विभाग हा पहिल्यापासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे या विभागाचा

पाहिजे तसा विकास झाला नाही. मात्र, अलिकडे या विभागाच्या सुधारणेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.

पूर्वी पोलिसांसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या निर्णयात जेल विभागाचे उल्लेख होत नव्हता. पण, आता पोलिसांच्या प्रत्येक निर्णयामध्ये जेल विभागाचा उल्लेख सुरू केला आहे. तसेच, पोलिसांची भरती सुरू असताना त्यामध्ये जेलसाठी काही जागा ठेवल्या जाणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images