Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लग्नाच्या आमिषाने मुलीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , हडपसर

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश येथे घेऊन गेलेल्या युवकाला कोंढवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कलमांतर्गत (पास्को) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेहफाक सुबानआली शेख (वय २१ रा, पिसोळी ता. हवेली) याला कोंढवा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. कोर्टाने त्याला ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शेखने २१ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशात नेले. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे तपास करून शेखला ताब्यात घेतले आणि मुलीला पालकांकडे सोपवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदाही तरतुदीवरच बोळवण?

$
0
0

मेट्रो शर्यतीत इतर शहरे पुण्याच्या पुढे जाण्याची भीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चर्चेवर चर्चा आणि अर्थसंकल्पात कागदावर होणारी तरतूद, हा टप्पा ओलांडून पुणे मेट्रो पुढे जाणार, की पुन्हा एकदा नव्या आर्थिक वर्षात केवळ केंद्राच्या अर्थसंकल्पातील तरतुदीवरच समाधान मानावे लागणार, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून आज मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी तरतूद अपेक्षित असली तरी, मेट्रो प्रकल्पाला यंदा मान्यताही हवीच, असा आवाज आता पुणेकरांनीच उठविण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी जेटली यांनी मेट्रोसाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यात शहराच्या खासदारांचा निरुत्साह आणि राज्य सरकारची ढिलाई, यामुळे अंतिम मान्यता मिळू शकली नाही. परिणामी, मेट्रोचे पैसे परत गेले. प्रकल्पासाठी भरीव तरतूद करूनही त्याला मान्यता मिळण्यात अडचणी येत असतील, तर इतर मेट्रो प्रकल्पांना संबंधित निधी वळविला जाण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रोची अंतिम मान्यता अद्याप प्रलंबित असताना, देशातील अनेक शहरांकडून मेट्रोचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर झाले आहेत. मध्य प्रदेश सरकारने भोपाळ आणि इंदोर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनीची (एसपीव्ही) स्थापनाही केली आहे. त्यासह, इतर राज्यांतूनही मेट्रो प्रकल्प केंद्राकडे सादर झाल्याने मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकल्पांनाच प्राधान्य दिले जाण्याची दाट चिन्हे आहेत. पुण्याच्या मेट्रोसाठी यंदा तरतूद तरी होणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

..

खासदार काय करतात?

शहराच्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी खासदारांनी पाठपुरावा करणे, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अपेक्षित असताना, खासदार अनिल शिरोळे यांनी सुरुवातीपासूनच मेट्रोच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. मेट्रोच्या अहवालाला त्यांचा वैयक्तिक विरोध असला, तरी सर्व तज्ज्ञ, अभ्यासकांनी त्याची तपासणी केली आहे. केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनीही खासदारांना त्यावरून खडे बोल सुनावले होते. तरीही, मेट्रो प्रकल्प व्हावा, यासाठी खासदार नक्की काय करतात, याचे कोडे पुणेकरांना अद्याप सुटलेले नाही.

...................

स्वयंसेवी संस्थांचाही खोडा

पुण्यातील स्वयंसेवी संस्थादेखील मेट्रोच्या मार्गात मोठा अडथळा ठरल्या आहेत. आत्ताही, एका स्वयंसेवी संस्थेने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पत्र पाठवून सुधारित अहवाल आणि खर्चाला आक्षेप घेतल्याने पालिकेकडून पुन्हा खुलासा मागविण्यात आला होता. याबाबत, महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व आक्षेपांचे निराकरण केले असतानाही, स्वयंसेवी संस्थांच्या पत्रांवर आणखी किती वेळा खुलासे मागविणार, अशी विचारणाच त्यांनी नगरविकास मंत्रालयाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीतील तरुणीवर सामूहिक बलात्कार

$
0
0

मित्रांनीच केला अत्याचार; सहा जण अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ येरवडा

हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीत (आयटी) कार्यरत इंजिनीअर तरुणीवर तिच्याच मित्रांनी धानोरीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह पाच आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीला थंड पेयातून गुंगीचे औषध दिला गेल्याचा संशय आहे. तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी अभिनय संतोष साही (वय २८, रा. गोकुळनगर, धानोरी, मूळ गाव डेहराडून), दिप्तांशू अखिलेशकुमार गुप्ता (वय २३, सहकारनगर), देवरथ प्रशांत दुबे (वय २३, रा. भैरवनगर, धानोरी), अनंत प्रल्हाद चाणार (वय २७, रा. श्रीहौस सोसायटी, धानोरी, मूळ केरळ ), अभिजित गोविंद देवराय (वय २५, रा. लिब्रोई पॅरोडाइन सोसायटी, कोरेगांव पार्क) आणि तनुश्री हर्बनसिंग जग्गी (वय ३०, रा. संकल्पनगरी, धानोरी) या आरोपांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी दिली.

पीडित तरुणी आणि साही एकाच कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीचे शनिवारी स्नेहसंमेलन होते. त्यासाठी तरुणीच्या मोटारीतून ते कंपनीत जाण्यासाठी निघाले होते. साही पीडितेला सायंकाळी पाचच्या सुमारास येरवडा परिसरात भेटला होता. कार्यक्रमाला उ​शीर असल्याने साही आणि तरुणी मुंढवा रोडवरील 'आयरीश' हॉटेलमध्ये गेले. तेथे साहीने मद्यप्राशन केले, तर पीडितेसाठी 'आइस टी' मागवला. तरुणी स्वच्छतागृहामध्ये गेल्यानंतर त्याने आइस-टीमध्ये गुंगीचे औषध टाकले. आइस टी पिल्यानंतर काही वेळानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर अभिनयने तिला मोटारीतून धानोरी येथील रेनबो सोसायटीतील फ्लॅटवर नेले. त्यानंतर काही आठवत नसल्याचे तरुणीने आपल्या जबाबत म्हटले आहे.

मध्यरात्री जाग आल्यानंतर तरुणीला आपण फ्लॅटमध्ये असल्याचे लक्षात आले. तिने तेथे मित्र साहीसह अन्य चार तरुण आणि तरुणीला पाहिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तरुणीने तडक घर गाठले आणि घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पहाटेच पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे तिला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपींची माहिती मिळताच पोलिसांनी धानोरी येथील सोसायटीत छापा घातला. त्यावेळी पाचही आरोपी फ्लॅटमध्ये सापडले. हा फ्लॅट हवाई दलातील अधिकाऱ्याचा असून, त्यांनी दुबे याला दीड महिन्यापूर्वी भाड्याने दिला होता. या गुन्ह्यातील चारजण 'आयटी' कंपनीत कामाला असून, एक जण शिकत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जान महंमद पठाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसोळीत महिलेवर बलात्कार

$
0
0

कोंढवा पोलिसांकडून आरोपीला अटक; गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिसोळी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर पतीच्या कंपनीच्या मालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीने महिलेच्या पतीला कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मारहाण केली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या बाबत पीडितेने तक्रार दिली आहे. त्यावरून शेषराम रामदत्त मौर्य (वय ३५, रा. सुंदर आकाश सोसायटी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची उत्तर प्रदेशातील असून, पतीसोबत पिसोळी परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. शेषराम याच्या कंपनीत पीडितेचा पती नोकरीला आहे. पंधरा दिवसांपूर्वी पती कामावर गेल्यानंतर आरोपी दुपारी घरी आला. पीडिता घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने ही बाब लपवून ठेवली.

तीन दिवसांपूर्वी आरोपी शेषरामने दुपारी महिलेच्या घरी जाऊन पुन्हा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने आरडाओरडा केला. त्यामुळे चिडलेल्या शेषरामने तिला मारहाण केली. नंतर तो फोन करून महिलेला त्रास देऊ लागला. त्यामुळे तिने घटनेविषयी पतीला माहिती दिली. महिलेच्या पतीने फोन करून आरोपीला घटनेबाबत जाब विचारला. मात्र, त्याने असा कोणताच प्रकार केला नसल्याचे सांगून काम सोडण्याविषयी बजावले.

पीडितेच्या पतीने शेषरामला पुन्हा फोन केल्यानंतर तो शनिवारी सकाळी महिलेच्या घरी आला. महिलेच्या पतीला दमदाटी करून करू लागला. त्यावेळी महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर फोन करून घटनेविषयी पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेषरामला पोलिस चौकीत नेले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हसता हसता अंतर्मुखही व्हा’

$
0
0

'हसता हसता अंतर्मुखही व्हा'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरस्वतीच्या मंदिरात मोरांनी रात्र, रात्र जागवली
तरीसुद्धा 'पिंपरी', 'चिंच' आणि 'वडा'च्या
झाडाखाली येडी बाभूळ उगवली...

पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमलेनात साहित्यिकांपेक्षा राजकीय व्यक्तींना मिळालेला अधिक 'ग्लॅमर' आणि संमेलनादरम्यान घडलेल्या घडामोडींवर भाष्य करणारी ही वात्रटिका रामदास फुटाणे यांनी सादर केली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा मैफली'त फुटाणे यांचा राजकीय भाष्यकवितांचा कार्यक्रम झाला. या वेळी 'मटा'चे सहायक वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर आपल्या नेहमीच्या शैलीत टोकदार भाष्य करताना, त्यांनी गंभीर प्रकृतीच्या कविता सादर करून श्रोत्यांना अंतर्मुखही केला.या वेळी ते म्हणाले, 'लोकांना हसत-खेळत ठेवणे हा व्यंगकाव्याचा उद्देश आहे. जे बघे आहेत, त्यांना श्रोते करूया आणि श्रोत्यांना अंतर्मुख करूया, अशी भूमिका असली पाहिजे.'

कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन,
कधी कधी सिंहासनाचा मुगुट होऊन,
लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पहुडलेला असतो
आणि चारित्र्यवान मनातसुद्धा एक
आसारामबापू दडलेला असतो...

या कवितेद्वारे त्यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील प्रश्नावर बोट ठेवले. तर,

अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली
चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते
कान्होपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते...

'कान्होपात्रेला क्लिओपात्रा करण्याचे स्वप्न दाखविणारी, जी मुक्त अर्थव्यवस्था चालत आली, त्यामुळे आठ-दहा कुटुंबांच्या ताब्यात सर्व देशाची संपत्ती जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे,' असे मत फुटाणे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायस प्लॉटजवळ चालत्या कारला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी जवळील डायस प्लॉट येथे चालत्या चारचाकी मोटारीने शनिवारी रात्री अचानक पेट घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून कार बाजूला घेऊन मोटारीतील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले.

मोटारीचे मालक महेश अनारगट्टे आणि कुटुंबातील चार व्यक्तींसह सोलापूरच्या दिशेने निघाले होते. परंतु, डायस प्लॉटजवळ अचानक कारच्या समोरील बाजूकडून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच त्याने कार बाजूला घेतली. कारमधून सर्वांना खाली उतरविले आणि घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली.

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल, विलास दुगाणे, अतुल मेहिते, चंद्रकांत गावडे, प्रदीप पवार, कैलास शिंदे, संजय जाधव, मनीष बोंबले, तेजस खरीवले, सचिन आवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संपूर्ण कारला आगीने वेढले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांमध्ये पाण्याचा मारा करून आग विझविली. कारमध्ये सीएजी गॅसची टाकी असल्यामुळे स्फोट होऊन मोठी दुर्घटना होण्याचा धोका होता. परंतु वेळीच आग विझविल्यामुळे हा संभाव्य धोका टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किंटमुळे लागली लोकमान्यनगरात आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्यवर्ती भागातील लोकमान्य नगरमधील एका इमारतीतील फ्लॅटला रविवारी दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीतून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात फायरब्रिगेडच्या जवानांना यश आले. तीन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटने लागी असल्याचा अंदाज आहे.

आगीची माहिती मिळताच फायरब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे इमारत आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. दरम्यान, फ्लॅटमधे चार जण अडकल्याची माहिती स्थानिकांनी जवानांना दिली. जवानांनी तत्परतेने फ्लॅटमधे धाव घेऊन स्नेहल चव्हाण, संकेत चव्हाण, सीमा चव्हाण आणि मेघना चव्हाण यांना आगीतून सुखरूप बाहेर काढले. जवानांनी पंधरा ते वीस मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमधे संसारपयोगी सर्व वस्तू जळाल्या आहेत.

आग नियंत्रणात आणून संबंधितांनी सुखरूप बाहेर काढण्यात केंद्रप्रमुख राजेश जगताप, प्रमोद सोनावणे, तांडेल कैलास पायगुडे, जवान प्रकाश कांबळे, प्रवीण रणदिवे, किशोर बने, छगन मोरे, योगेश पिसाळ, नीलेश माने, सचिन वाघोले, चालक ज्ञानेश्वर खेडेकर आणि रवींद्र हिवरकर यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ चौकात दुचाकींना स्वतंत्र लेन

$
0
0

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आनंदऋषीजी महाराज चौकात (विद्यापीठ चौक) चिंचोळ्या रस्त्यामुळे औंध रोडवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुचाकी आणि अन्य वाहनांसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्वतंत्र लेन करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. नुकतीच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, त्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहनचालकांना दिलासा मिळत आहे.

आनंदऋषीजी महाराज चौकातील (विद्यापीठ चौक) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आले. विद्यापीठ रोडने औंध, बाणेर जाण्यासाठी या उड्डाणपुलांचा वापर करावा लागतो. औंध, बाणेरकडून येताना चौकातून यावे लागते. औंध आणि बाणेरकडून सिमला ऑफिसकडे जाताना, उड्डाणपुलाची सुरुवात होते, त्या ठिकाणी चिंचोळा रस्ता आहे. परिणामी, तेथे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी समस्येत अधिकच भच पडते. परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागतात. अशा परिस्थितीत कोंडीतून अयोग्य पद्धतीने वाट काढणाऱ्या बेशिस्त दुचाकीचालकांमुळे आणखीन कोंडी होते. या पार्श्वभूमीवर चतुःश्रृंगी वाहतूक पोलिस विभागाने विद्यापीठ चौकात औंध रोडकडून येणाऱ्या दुचाकी आणि अन्य वाहनांसाठी वेगळ्या लेन केल्या आहेत.

सकाळी, सायंकाळी गर्दीच्या वेळेस या चौकात वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक असते. या रस्त्यावर चारचाकी वाहनांची संख्या जास्त आहे. रांगा लागल्यानंतर दुचाकीस्वार दोन वाहनांवच्या मधून मार्ग काढून गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. दुचाकी मध्येच घुसविल्याने वाहने अडकून पडतात आणि सिग्नलचा कालावधी संपेपर्यंत वाहन चालकांना चौक ओलांडता येत नाही. आता दुचाकीसाठी स्वतंत्र लेन केल्याने दुचाकीस्वारांना चारचाकीच्या रांगेत अडकून पडावे लागणार नाही. त्यामुळे सिग्नल सुटल्यानंतर ते विनाअडथळा जात आहेत, अशी महिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतपत्रिकांची पळवापळवी

$
0
0

साहित्य परिषदेच्या निवडणुकीत आचारसंहिताभंगाला उधाण

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : 'हॅलो...नमस्कार, तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मतदार आहात ना...मग तुम्हाला मतपत्रिका मिळाली असेलच. ती मतपत्रिका माझ्याकडे द्या...पोस्टाद्वारे पोहोचण्यास विलंब होत आहे. बरं, तुम्ही कोणाला मतदान केले, नवनिर्माण की परिवर्तन...? ' असे फोन साहित्य परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांकडून मतदारांना सध्या जाऊ लागले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप हा गुन्हा असताना अशा संवादातून मतपत्रिका गोळा करण्याचे काम उमेदवारांनी आरंभले आहे.

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था अशी ओळख असलेल्या साहित्य परिषदेतील वातावरण निवडणुकीमुळे चांगलेच तापले आहे. चुकीचा प्रचार, उमेदवारांची पळवापळवी अशा प्रकारांमुळे साहित्य परिषदेच्या निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले असताना आता थेट मतदारांशी संपर्क साधून मतपत्रिका गो‍ळा करण्याचे काम निवडणुकीच्या आखाड्यातील मंडळी करू लागली आहेत. काही मतदारांनी 'मटा'शी संपर्क साधून ही बाब कानावर घातली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून परिषदेतील शह-काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. परिषदेच्या विद्यमान अधिकार मंडळाची मुदत ३० मार्च २०१६ रोजी संपत आहे. त्यापूर्वी पंधरा दिवस म्हणजेच १५ मार्च २०१६ रोजी नवीन अधिकार मंडळ अस्तित्त्वात येणे घटनेप्रमाणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला आता काही दिवसच शिल्लक राहिले असल्याने विविध युक्त्या उमेदवारांकडून लढवल्या जात आहेत. फोन करून थेट मतपत्रिकांची मागणी होत असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप मतदारांनी केला आहे.

मतपत्रिका गोळा करण्यासाठी काही महिल्या घरोघरी फिरत आहेत. घरी कुणाची भेट झाली नाही,तर संबंधित मतदाराशी फोनवरून संपर्क साधण्यात येत आहे. 'मतपत्रिका आमच्याकडे द्या, आम्ही त्या थेट परिषदेच्या कार्यालयात पोहोचवू. पोस्टाद्वारे विलंब लागत आहे. तुम्ही कोणाला मतदान केले आहे, या पॅनलला केले असेल तर योग्य आहे,' असा संवाद सध्या फोनवरून रंगत आहे.

आम्ही नियम कडक केल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. तरीही रोज काही ना काही चांगले-वाईट प्रकार समोर येत आहेत. अशा पद्धतीने मतदारांशी संपर्क साधून मतपत्रिका गोळा करणे चूक आहे. मतदारांनी तक्रार केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू.

अॅड. प्रताप परदेशी, मुख्य निर्वाचन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात आणखी तीन बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर येथे व्हॅलेंटाइनच्या पूर्वसंध्येला तरुणीवरील बलात्काराची घटना, त्यानंतर हनुमान टेकडीवर विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार; या दोन्ही घटना ताज्या असतानाच, शहरात गेल्या २४ तासांत बलात्काराच्या तीन घटना नोंदविल्या गेल्या आहेत. मुंढवा येथे 'आयटी' इंजिनीअर तरुणीला ​गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने पुणे हादरले आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बलात्काराच्या घटनांची मालिका सुरू झाल्याचे यावरून समोर आले आहे.

मुंढवा येथील बलात्कार झालेली तरुणी ही हिंजवडी येथे 'आयटी' इंजिनीअर आहे. त्यांच्या कंपनीत शनिवारी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला जाताना तिला शीतपेयातून गुंगी आणणारे पेय पाजण्यात आले. त्या पेयाने नशेच्या अमंलाखाली गेल्यानंतर तिच्यावर धानोरी येथील फ्लॅटवर बलात्कार करण्यात आला. मध्यरात्री शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे त्या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर ती आपल्या घरी गेली आणि पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी लगेचच पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह पाच जणांना सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांत अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत, पिंपरी येथे मॉलमध्ये नोकरी करणाऱ्या घटस्फोटित महिलेला, विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २५ वर्षांच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे; तर, तिसऱ्या घटनेत पिसोळी येथील २४ वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीच्या कंपनीच्या मालकाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या विवाहितेचा पती नोकरीवर गेला असताना आरोपीने घरी ​येऊन तिच्यावर बलात्कार केला. या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तिला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये बलात्कारांच्या घटनांची मालिका सुरू झाल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात घामाच्या; इतरत्र पावसाच्या धारा

$
0
0

टीम मटा पुण्यात एकीकडे उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या असतानाच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाच्या धारा लागल्या आहेत. विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात रविवारी गारपीट झाली. तर नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. जळगावच्या रावेरमध्येही रविवारी वादळीवाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब आणि रब्बी हंगामातील गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात गारपीट दोन प्रकारच्या हवांचे मिश्रण होऊन निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारी अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली. चांदूर बाजार तालुक्यात रस्त्यांवर गारांचा थर साचला होता, तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. येत्या दोन दिवसांत विदर्भातील ५० टक्के भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये शिडकावा नाशिकमध्ये रविवारी पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर मार्चमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने आहे. रावेरमध्ये गारपीट जळगावच्या रावेर तालुक्यातील पाल परिसरात रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. सातपुडा पर्वतरांगेतील पाल परिसरात लिंबाएवढ्या गारा पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले, तर गारबर्डी धरणाजवळ विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. दक्षिण महाराष्ट्रातही हजेरी सांगली, सातारा, सोलापूर या दक्षिण महाराष्ट्राच्या भागांतही रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. नगरमध्ये आवकाळी नगर ः नगर जिल्ह्यात रविवारी दुपारी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. जामखेड, नगर तालुक्यात जोरदार वाऱ्याबरोबर पाऊस कोसळला. नगर तालुक्यातील हिवरेबाजार, बाबुर्डी बेंद, खडकी, खंडाळा, अरणगाव वाळकीसह परिसरात सुसाट वाऱ्यासह पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पुनर्विवाहाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर तरुणाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक उत्तम वडलीक (२५, रा. पिंपळेगुरव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरीतील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता व आरोपी शहरातील एका मॉलमध्ये काम करतात. त्यांची आपसात २०१४ पासून ओळख आहे. पीडितेचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांनी दीपक याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पुणे, सिंहगड येथील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केले. पीडित महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर दीपक लग्नास टाळाटाळ करू लागला. तसेच, दीपक याचे लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने पिंपरी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. फौजदार रत्ना सावंत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाश्चात्य संगीताची लय...या संगीताचे सामाजिक वातावरण...यातून रंगलेली लयपश्चिमा... अस्तित्वाच्या शोधासाठीच इतिहासाचा प्रवास सुरू असतो, असा उमटलेला सूर...कार्यशाळांतून लेखनाविषयी आलेली सजगता... विविध कवींच्या सादरीकरणाने बहरलेला काव्यकट्टा...त्यास रामदास फुटाणे यांच्या वात्रटिकांची जोड ...मराठी भाषेचे झालेले गंभीर चिंतन व त्यानंतर झाडाखाली रोषणाईमध्ये रम्य सायंकाळी रंगलेली 'मी माझा' ही मैफल...'मटा मैफल'चा भरगच्च रविवार असा अवर्णनीय होता. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दोन दिवस रंगलेल्या 'मटा मैफल'चा समारोपही त्याच उत्साहात झाला पुढच्या वर्षी भेटण्यासाठी!

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या 'मटा मैफल'चे यंदाचे दुसरे वर्ष होते. रसिकांनी दिलेल्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे 'मटा मैफल' उत्तरोत्तर रंगत गेली. रविवारच्या मैफलीची सुरुवात डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या 'लयपश्चिमा' या सांगीतिक कार्यक्रमाने झाली. पाश्चात्य संगीताची लय...या संगीताचे सामाजिक वातावरण...यातून लयपश्चिमा रंगली. या वेळी सादर झालेल्या रॉक गाण्यांना ज्येष्ठ रसिकांनीही मनापासून दाद दिली. दुपारच्या सत्रात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, योगेश नांदूरकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक लेखनावर परिसंवाद रंगला. अस्तित्वाच्या शोधासाठी इतिहासाचा प्रवास सुरू असतो, असा सूर या परिसंवाद उमटला.

झाडाखाली रंगलेल्या काव्यकट्ट्याने व रामदास फुटाणे यांच्या वात्रटिकेने उन्हाची तीव्रता कमी करत काव्यमय शीतलतेची अनुभूती रसिकांना दिली. अनुवाद, कथालेखन आणि ऑनलाइन लेखन या कार्यशाळांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तरुण लेखकांची लिहिण्यासाठीची तीव्र इच्छा त्यांच्या प्रश्नांतून जाणवली. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या उपस्थितीत मैफलीचा समारोप झाला. मराठीच्या सद्यस्थिती व भविष्याबाबत त्यांनी मुक्तचिंतन करत मराठी जगवण्याचे आवाहन रसिकांना केले. समारोपाच्या सत्रानंतर कवी चंद्रशेखर गोखले यांचा 'मी माझा' ही मैफल रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्ग, बॉम्बस्फोट अन् पिझ्झा-बर्गर…!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाढत्या शहरीकरणामुळे सिमेंट कॉंक्रिंटच्या जंगलांनी निसर्गावर केलेले अतिक्रमण, जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोट, विविध क्षेत्राबरोबर साहित्यातील आरक्षण, याबरोबर नव्या युगाचा तरुणाने आईला 'व्हाट्स अप'ला 'कनेक्ट' होण्याच्या दिलेल्या सल्ल्यापासून ते प्रेयसीबरोबर पिझ्झा बर्गर खायला कसा येऊ, हा ग्रामीण विद्यार्थ्याचा सवाल अशा वास्तवतेचे भान ठेवणाऱ्या कवितांनी 'काव्यकट्टा' रविवारी बहरला.

निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित 'मटा मैफल' कार्यक्रमांतर्गत काव्यकट्ट्याचे. 'मटा'च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विविध ठिकाणाहून कवींनी आपल्या कविता काव्यवाचनासाठी पाठविल्या होत्या. त्यातील निवडक कवींना काव्यवाचनाची काव्यकट्ट्यावर संधी देण्यात आली. 'मटा'चे मुख्य उपसंपादक मंगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

'सांगा निसर्गाने जायचे कुठे' या कवितेतून वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गवरील आक्रमण, त्याचे विपरित परिणाम कवी बिपीन सांगळे यांनी उलगडून दाखविले.

'सगळीकडे घुसलाय माणूस, सांगा निसर्गानं जायचं कुठं,

सगळीकडे नाचलाय माणूस, सांगा निसर्गानं जायचं कुठं'

तमाशा महिला कलावंतांच जीवन कशा स्वरूपाचे असते. समाजाच्या विषारी नजरांना त्यांना कसे सामोरे जावे लागते याचे चित्रण नितीन चंदनशिवे यांनी 'तमाशा' कवितेतून शब्दबद्ध केले.

'मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात,

मोगऱ्याचे चांदणे माळते मी वेलीच्या अंगणात'

जंगलीमहाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर दहशतीत कसे जगतात, या वास्तवतेवर भाष्य करणारी लिनता आंबेकर यांनी 'बॉम्बस्फोट' ही कविता सादर केली. कवितेतून बॉम्बस्फोट झाल्यानंतर आजी सावध राहण्याचा सल्ला देते. त्यावर अपघात, स्वाइन फ्लूचा संसर्ग, दरोडे, घरफोडी, दुष्काळ, भूकंपासारख्या आपत्ती येत असताना आम्ही पुणेकर कसे जगतो. मग या बॉम्बस्फोटाचे काय घेऊन बसलीस अशा अर्थाचा सवालच आजीला करताना परिस्थिती सांगून टाकते. या कवितेत पुण्यातील वास्तव बरेच काही सांगून जाते.

'आजी म्हणते, नुकताच झालाय बॉम्बस्फोट

दंगलीची आहे शक्यता

ब्रेकिंग न्यूज झळकतेय

घ्यायला सांग दक्षता'

महाराष्ट्रात विविध क्षेत्रात आरक्षण येऊ लागले आहे. त्या नियमाला साहित्य संमेलन, साहित्य क्षेत्र देखील अपवाद राहू शकत नाही. त्यावर भाष्य करणारी आरक्षण कविता मिलिंद जोशी यांनी सादर केली.

'नवे नियम येणार साहित्यात आता

शब्दांनाही मिळणार आहे जात आता'

या शिवाय स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीची अवस्था, काळासंदर्भात भाष्य करणारे, वसंत ऋतू, सायंकाळ यासारख्या विविध विषयांची कविता सादर करण्यात आल्या. कवितांमधून वास्तव, कल्पनेचा बहर आला असताना एकेक कवीच्या कवितेमुळे काव्यकट्ट्यावर चांगलीच रंगत आणली. सोलापूरहून आलेला आणि पुण्यात शिकणारा चंद्रशेखर गायगवळी या तरुणाने मात्र काव्यकट्ट्यावर शेवटच्या टप्प्यात रंगत आणताना 'मला माफ कर प्रिये' या कवितेतून थेट प्रेयसीलाच सवाल केला. 'आई वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. मुलगा मोठा साहेब झाल्यावर सावकाराचे कर्ज फिटेल. आई सध्या चटणी भाकर खाते. वडील शेती पिकवितात. मग प्रेयसीबरोबर पिझ्झा बर्गर खायला कसा येऊ,' असा सवाल करीत उपस्थितांच्या काळजाला हात घातला.

तिकडे माय माझी रानात

रोज राब राब राबत असे

वास्तवतेची भाकर पाण्यात भिजून खात असे

तू मला म्हणतेस, प्रिये चल हॉटेलात जाऊ, पण आईच्या जिभेवर चटणी असताना

मी कसा पिझ्झा बर्गर खाऊ?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानवृक्षाखाली शब्दफुलांना बहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनावर पहाट,
पेंगुळलेली रात्र
प्राजक्ताच्या दवात
भिजलेली रात्र

जगण्यातल्या प्रत्येक भावभावनेला स्पर्श करत, मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींना पुन्हा जागवत, कधी भरभरून हसवत, तर कधी आसवांना जागवत ज्ञानवृक्षाखाली झालेली शब्दफुलांची मनसोक्त उधळण रसिकांनी रविवारी अनुभवली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अन् संध्यासमयीच्या शांत-निवांत वातावरणात 'मटा मैफली'चा बहारदार समारोप झाला. पुढल्या वर्षीही मैफलीला हजेरी लावण्याचा संकल्प सोडतच रसिकांनी मैफलीचा निरोप घेतला.

डेक्कन येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारात 'मटा मैफली'चे शेवटचे सत्र रंगणार होते, ते ज्येष्ठ चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांच्या काव्यरसाने. गोखलेंच्या विविध वयोगटातील चाहत्यांनी ज्ञानवृक्षाखाली गर्दी केली होती.

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात बसलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका

या चारोळीने गोखले यांच्या गप्पांना सुरुवात झाली. एरवी काव्यातूनच बोलणाऱ्या गोखलेंना 'मटा'चे अभिजित थिटे यांनी बोलते केले. लहानपण, शाळेतले अनुभव, कवितालेखनापासून चारोळीकार होण्यापर्यंतचा प्रवास, विजय तेंडुलकर, प्रिया तेंडुलकर यांच्या घरी झालेले गोखलेंमध्ये दडलेल्या कवीचे कौतुक, तिथपासून 'मी माझा' या पुस्तक प्रकाशनापर्यंतचा प्रवास, त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता, सहचारिणीने दिलेली साथ अशा विविध विषयांवर हा संवाद रंगत गेला. गोखलेंच्या चारोळ्यांनी या संवादाचा गोडवा आणखी वाढवला.

'कविता ही दैवी देणगी आहे. त्यामुळे कवीने कधी मिजास करू नये. कविता शिकून येत नाही ती आतून उमटावी लागते. माझ्यासाठी कवितेला पूरक वातावरण आईने पुरविले. ती लडीवाळपणे कथा सांगायची. भावविश्व आणि वास्तव याची सुंदर संगत त्यात असायची. आजच्या मुलांना हे मिळू शकत नाही याची खंत वाटते. शाळेतही कविता अतिशय अघोरी पद्धतीने शिकविली जाते. कविता केल्यावर तिचा आनंद स्वतःलाही मिळायला हवा. केवळ पुस्तक काढण्यासाठी

कविता करू नये. सुचणे ही प्रक्रिया आहे,' अशी भावना गोखले यांनी व्यक्त केली.

झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही,
त्याला इजा होत नाही.

अशा सुंदर सुंदर चारोळ्यांनी गोखले यांनी ही मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली. गोखले यांच्या 'गणू खानोलकर', 'रुखवत', 'शेवंती' या कथांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले. थिटे यांनी या कथांचे अभिवाचन केले.

मनात एक असतं,
ओठांवर भलतंच
कितीनी नाही म्हटलं तरी
मनाला सलतंच

अशा खास चारोळ्या ऐकवत त्यांनी रसिकांची फर्माईशही पूर्ण केली. 'मटा'चे वृत्तसंपादक श्रीधर लोणी यांनी गोखले यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विचारपूर्वक पोस्टचा परिणाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आपण एखादी गोष्ट किंवा घटना पाहतो. ती पाहून लगेचच उत्स्फूर्तपणे सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्यामुळे ती घटना आणि तिचा विचार मर्यादित काळापुरताच राहतो. मात्र, असे न करता ती गोष्ट मनात रुजवून आणि तिचा नीट विचार करून व उत्तम लिहून पोस्ट केल्यास तिचा परिणाम वाचकांवर अधिक होतो,' असा सल्ला ऑनलाइन लेखक विक्रम भागवत यांनी रविवारी पुणेकरांना दिला. या वेळी त्यांनी ऑनलाइन लेखन करण्यासाठी आवश्यक गोष्टींचे मार्गदर्शक करून उपस्थितांना ऑनलाइन लेखन करण्यासाठी प्रेरित केले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा मैफली'त रविवारी सायंकाळी 'ऑनलाइन लेखन' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी भागवत यांनी मार्गदर्शन केले. 'टीम नुक्कड'चे जयंत पोंक्षे, अक्षय वाटवे आणि केतकी करंदीकर हे सहकारी उपस्थित होते.

भागवत म्हणाले, 'ऑनलाइन लेखन करण्यासाठी विशेष असा लिहिण्याचा सराव करावा लागत नसून केवळ मुक्तछंदपणे जगायला शिका. जे तुम्ही जगले असाल म्हणजेच त्याचा अनुभव लिहा. एवढा सराव तुम्ही केल्यास तुम्हाला आरामात लिहायला जमेल. मात्र, हे लिहून झाल्यावर ते लगेचच सोशल मीडियावर पोस्ट करू नका. एकदा ते लिखाण शांतपणे वाचून आणि त्याचा त्रयस्थेपने विचार करून मगच पोस्ट किंवा शेअर करा.'

'सोशल मीडीया साइट्सवर वाचकवर्ग प्रगल्भ आहे. त्यांची वैचारिक शक्ती आणि बुद्धिमत्ता विलक्षण आहे. त्यामुळे ते तुमच्या लिहिण्याचा व्यवस्थित अर्थ काढतात. त्यामुळे ऑनलाइन लेखन करण्यासाठी लिखाणाबाबतच्या सर्व संकल्पना बाजूला ठेवा. तुम्हाला ज्या विषयाबाबत व्यक्त व्हावे वाटत आहे, त्या विषयावर मनसोक्तपणे लेखन करा. मात्र, हे लेखन निर्भीड आणि मनमोकळे असले पाहिजे. कारण अशा प्रकारचे लेखन थेट वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडते,' असे भागवत यांनी सांगितले.

ऑनलाइन लेखन करताना फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या साइट्सवर दुसऱ्याची मते वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. तरुणांना ऑर्कूटवरून कविता लिहायला

प्रोत्साहन मिळाले, तर फेसबुकहून कथा लिहायची संधी मिळत असल्याचे भागवत यांनी सांगितले. वाटवे आणि करंदीकर यांनी फेसबुकवरील कथा वाचून दाखविल्या. 'मटा'च्या उपसंपादक अस्मिता चितळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनुवादासाठी वाचन आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'उत्तम अनुवादक होण्यासाठी खूप वाचन केले पाहिजे. दोन किंवा तीन भाषांवर लक्ष केंद्रित करा. त्यात सखोल अभ्यास करून प्रभुत्व मिळवा. भाषांतराचा सतत सराव करा. भाषेच्या क्षमता जाणून त्या वापरणे आवश्यक आहे. अनुवाद करताना शब्दांच्या मागचा आशय पोहचवता आला पाहिजे. आशय पोचला नाही, तर अनुवाद फसला असे समजावे...'

'मटा मैफली'च्या दुसऱ्या दिवशी अनुवादाचे मर्म असे उलगडले. 'उत्तम अनुवादक होण्यासाठी लागणारी प्रतिभा सरावाने अंगी बाणवता येते. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनुवादक म्हणून आपणही भर घालू शकतो,' असा सल्ला 'ट्रान्सलेशन पनाशिया' या कंपनीच्या संचालक विदुला टोकेकर यांनी दिला. अनुवादावरील कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करत होत्या.

'अनुवाद करताना मूळ लेखकाने जे लिहिले त्याचा अनुवाद झाला असे समजले जाते. मूळ लेखन आणि अनुवाद यात विसंगती दिसत नाही. मूळ लेखकाने जे त्याचा अनुवाद करायचा ते मूळ भाषेत लिहिल्यासारखे वाटले पाहिजे. अनुवाद करताना चांगली भाषा वापरणे, आवश्यक शब्द शोधणे याची जबाबदारी अनुवादकावर असते. मूळ भाषा काय आहे, विषय काय आहे, कोणासाठी अनुवाद करत आहोत, हे माहीत असणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अनेक चांगले विस्मरणात गेलेले शब्द वापरले पाहिजेत,' असे टोकेकर यांनी सांगितले.

'सर्व भाषा समृद्ध असतात. भाषेच्या क्षमता जाणून त्या वापरल्या पाहिजेत. शब्दांच्या मागचा आशय वाचकापर्यंत पोहचवता आला पाहिजे. उत्तम अनुवादक होण्यासाठी खूप वाचन केले पाहिजे. अनुवाद कौशल्यासाठी लागणारी प्रतिभा सरावाने येते,' असे टोकेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडली पाश्चात्त्य संगीताची मर्मज्ञ ओळख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'संगीताचा सूर हा आपला किंवा परकीय नसतो. ती असते एक सामाजिक घटना आणि ती उमटत असते प्रत्येक ठिकाणी त्या भूमीचा एक साज लेवून...' पाश्चात्य संगीताचे मर्म उलगडून दाखवणाऱ्या आणि त्याचा भारतीय संगीताशी असलेला मर्मज्ञ बंधही सांगणाऱ्या 'लयपश्चिमा' या कार्यक्रमाने रविवारी 'मटा मैफल' नादावली.

'संगीत ही सामाजिक घटना आहे,' असे आपल्या सर्व धारणांनाच छेद देणारे विधान ठेवून प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी हा कार्यक्रम रंगवला आणि रसिकांच्या मनातील सूर निरागस झाला. 'गाणे काही शून्यातून निर्माण होत नाही. ती एक सामाजिक घटना आहे. पाश्चात्य संगीत आपल्याला फारसे समजत नाही, म्हणून ते आवडत नाही. आपल्याला शब्द समजले नाही, तरी सूर कळतात. या सुरांची 'फिरत' थोडी निराळी असते. ती एकदा समजली, की भाषेचा प्रश्न राहत नाही,' असे सांगत जावडेकर यांनी रसिकांना पाश्चात्य संगीताच्या मुळांची ओळख करून दिली. या संगीताचीही असलेली समृद्ध परंपरा, जडणघडण याचाही त्यांनी आलेख मांडला. या संगीताचे विवेचन करतानाच त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाद्वारे प्रेक्षकांना गाणीही दाखवली.

अमेरिकेतील पर्वतरांगांमध्ये जन्मलेल्या 'कंट्री म्युझिक'ची ओळख करून देताना शनाय क्विनचे 'एनी मॅन ऑफ माइन', मिली सायरस आणि तिचे वडील ​बिली सायरस यांचे 'बटर फ्लाय, फ्लाय अवे' हे गाणे दाखवून नात्यांमधील गुंता 'कंट्री म्युझिक'द्वारा मांडला.

जावडेकर यांनी 'रॉक' संगीतातील हिंसेचेही विवेचन केले. जिमी हेन्ड्रिक्स या गायकाने आपल्या गाण्यात गिटार कशी जाळली, फोडली, याचा व्हिडिओ दाखवताना, त्यामागे त्याच्या कृष्णवर्णीय म्हणून असलेल्या जखमेची वेदना असेल का, असा प्रश्नही मांडला. मर्दानी, रगेल अशा रॉक संगीतातील ब्रायन अॅडम्स या गायकाचे 'समर ऑफ सिक्स्टी नाइन' हे गाणे मात्र कसे वेगळा आनंद देणारे आहे, हेही जावडेकर यांनी सांगितले. भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांचे 'नादान परिंदे' हे गाणे रॉक प्रकारातील असले, तरी त्यालाही कसा बंदिशीचा आत्मा आहे, हे त्यांनी अतिशय रंजकपणे मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा संपणे म्हणजे स्वतःची ओळख संपविणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास असून ती लहान भाषा नाही. मराठीचा समृद्ध वारसा आपण धोक्यात आणला आहे. आपली भाषा टाकून देणे ही गंभीर चूक असून हे सारे क्लेषकारक आहे. भाषा संपणे म्हणजे स्वत:ची ओळख संपवण्यासारखे आहे, यामुळे आपण मराठीचे मोठे गुन्हेगार ठरू,' असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांनी रविवारी 'मटा मैफली'मध्ये मांडले. 'मराठी वाचक वर्ग म्हातारा झाला आहे, नवीन वाचक निर्माण होणार नाही, अशीच व्यवस्था आपण निर्माण करत आहोत,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवस रंगलेल्या 'मटा मैफली'चा समारोप प्रा.पठारे यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वरिष्ठ उपसंपादक सुनीता लोहकरे यांनी प्रा. पठारे यांच्याशी संवाद साधला. 'मटा मैफली'मध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांना 'अक्षरधारा'च्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली. 'सर्व जण इंग्रजी भाषेत शिकत असून, तेही धड बोलता येत नसल्याने कोणतीच भाषा आत्मसात होत नाही, याकडे लक्ष वेधून भाषा ही फक्त शब्दांचा समूह नसते, भाषेला प्रतिमेची जोड असते. त्यामुळे ज्या भाषेची प्रतिमा आणि संस्कृती माहीत नाही, त्यातून ज्ञानार्जन कसे करणार,' असा सवाल प्रा. पठारे यांनी उपस्थित केला.
'इंग्रजी भाषा महत्त्वाची आहेच. भाषेवर प्रेम असेल तर ती शिकता येते, पण शिक्षण व रोजचा व्यवहार मातृभाषेतच असायला हवा. आगामी काळात इंग्रजी अधिक तापदायक ठरणार असून मराठीपण गमावून बसणे हे त्या भाषेचे गुन्हेगार ठरण्यासारखे आहे,' यावर प्रा. पठारे यांनी बोट ठेवले. संमेलनात कशाला जायचे?
'मी पूर्वी साहित्य संमेलनात जायचो. संमेलनाचे स्वरूप पाहून आता जाणे बंद केले आहे. संमेलनाध्यक्ष होण्यासाठी मलाही विचारणा झाली होती, पण त्यासाठी होणारे प्रकार पाहून कशासाठी हे सर्व करायचे,असा प्रश्न मला पडतो,' असे सांगून, 'साहित्य संमेलन कोणत्या पातळीवर आणून ठेवले आहे,' असा सवाल प्रा. रंगनाथ पठारे यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्य अन् जबाबदारीही... मैफलीच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरे रंगली. रसिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रा. रंगनाथ पठारे म्हणाले, 'लेखकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर त्याच्या लिखाणात केलाच पाहिजे. मात्र, स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीपूर्वक करणे गरजेचे आहे.'

'माध्यमे वाढल्याने संवाद संपत चालला आहे. अशा परिस्थिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने अशा उपक्रमातून संवाद निर्माण करणे मराठी भाषेसाठी मौलिक आहे. मातृभाषेसाठी सर्वांनी एकत्र येऊन झाडाखाली मैफल भरवणे हे अभिनव आहे,' अशा शब्दांत प्रा. रंगनाथ पठारे यांनी 'मटा मैफली'चे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पाबाबत टीकेचा सूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात स्वप्न दाखविण्यात आल्याची टीका करण्यात आली आहे. काही जणांनी काही तरतुदींचे स्वागत केले आहे.
..
गुंतवणुकीला चालना
अर्थसंकल्प अपेक्षेनुसारच वित्तीय तूट 'जीडीपी'च्या ३.५ टक्कांपर्यंत मर्यादित ठेवणारा आणि देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देणारा आहे. देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवरील परिस्थिती आव्हानात्मक असताना पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागाच्या विकासावर भर देणारा आहे. मेक इन इंडिया, स्कील इंडिया, स्टार्ट अप इंडियासारख्या महत्त्वकांक्षी मोहिमांद्वारे सरकार अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देत आहे.
- बाबा कल्याणी, अध्यक्ष, भारत फोर्ज
...
उत्तम व सर्वसमावेशक
हा अर्थसंकल्प एक उत्तम व सर्वसमावेशक आणि भारताला वेगाने डिजिटल इंडियाच्या मार्गावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल. आयटी क्षेत्रासाठी एसईझेडच्या सवलती २०२० पर्यंत सुरू राहण्याच्या निर्णयामुळे देशाच्या विविध भागातील छोट्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल.
- गणेश नटराजन
उपाध्यक्ष व सीईओ, झेन्सार टेक्नोलॉजीज
०००
महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा आराखडा
'ग्रामीण भागातील एकूण पायाभूत सोईसुविधांवर आणि खासकरून शेतीवर आपल्या अर्थमंत्र्यांनी योग्य भर दिला आहे. जाहीर केलेल्या कृषी अनुकूल सर्व पावलांव्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा आराखडा सादर केला आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल. भारताला ज्ञानाधारित उत्पादक अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आरोग्यसेवा, शैक्षणिक कौशल्ये आणि रोजगार निर्मिती यांसह ग्रामीण क्षेत्र व सामाजिक क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. या पावलांमुळे पीव्हीसी पाईप आणि फिटिंग्जची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल.'
- प्रकाश छाब्रिया,
कार्यकारी अध्यक्ष, फिनोलेक्स इंडस्ट्रीज
...
समतोल अर्थसंकल्प
सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन मांडलेला अत्यंत समतोल असा हा अर्थसंकल्प आहे. गरीब महिलांच्या नावे गॅस सिलेंडर, कौटुंबिक आरोग्य विमा योजना, प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस केंद्र, छोट्या करदात्यांना दिलासा अशी वैशिष्ट्ये आहेत. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतानाच कौशल्य विकास योजना व रस्ते , पायभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.
- अनिल शिरोळे, खासदार
..............................
महत्त्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष
राज्यासह देशातल्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती असतांना त्यावर ठोस अशी कोणतीही उपाययोजना केली नाही. संशोधन, संरक्षण यासारखी महत्त्वाची क्षेत्रे पूर्ण दुर्लक्षित झाली आहेत. यूपीए सरकारच्या ज्या योजनांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले, त्याच योजना नवनवीन नावे देऊन सादर करण्यात आल्या. तंबाखूजन्य पदार्थ महाग झाल्याचे स्वागतच आहे. पायाभूत सुविधा, पेट्रोल, गॅसवर १ टक्का कर लावल्याने महागाई वाढणार आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार
...................................
सर्वसमावेशकतेचा अभाव
सूक्ष्म दृष्टिकोन न ठेवता मांडल्यामुळे सर्वसमावेशकतेचा अभाव या अर्थसंकल्पात निश्चितच दिसून येत आहे. मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे. वाहन उद्योग, संरक्षण, सेवा आदी क्षेत्राचाही अपेक्षाभंग झाल्यामुळे शेअर बाजारही घसरला आहे. प्राप्तिकराची मर्यादा वाढवून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, याबाबत अपेक्षाभंग झाला आहे. सेवाकराचे जाळे व्यापक करतानाच 'स्वच्छ भारत अभियान' अधिभाराबरोबरच आता 'कृषी' अधिभारही लावण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे मागच्या पानावरून पुढे.... अशा सुमार स्वरूपाचा आहे.
- वंदना चव्हाण, खासदार
................
सामान्यांची निराशा
अर्थसंकल्प म्हणजे आकडेवारी दाखविणारा खेळाचा अर्थसंकल्प आहे. सामान्य माणसासाठी निराशावादी आहे. केवळ शेतीमालासह औद्योगिक उत्पादनासाठी आर्थिक तरतूद दाखवून योजनांचा तपशील जाहीर केला नाही. महिलांच्या आर्थिक विकास, रोजगारासाठी तरतूदन नाही. सेवा कर वाढवून जनतेवर बोजा वाढविला आहे.
- दीप्ती चवधरी, आमदार
................
मध्यमवर्गींयांचा अपेक्षाभंग
सर्वसामान्यांच्या व मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा भंग करणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. सेवा कर वाढविल्यामुळे सामान्य माणसांच्या जीवनावर ताण निर्माण होणार आहे. अर्ध टक्का शेतीसाठी अधिभार वाढविला आहे. स्वप्न दाखविण्याचे काम केले आहे.
- अभय छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस
.............
उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प
छोट्या उद्योगधंद्याला चालना देणारे व नवीन उद्योगांना कॉर्पोरेटमध्ये सवलत देणार आहे. छोट्या करदात्यांना दिलासा दिला आहे. पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद तर डाळींच्या किंमती स्थिर राहण्यासाठी ९०० कोटींची तरतूद आहे. हे अर्थसंकल्प राजकीय नसून सामाजिक आहे.
- प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, पुणे मर्चंट्स चेंबर
...............................
शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद
शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. जमिनीचा कसदारपणा वाढविण्यासाठी माती परीक्षण प्रयोगशाळा, चांगल्या बियाण्यांच्या निर्मितीसाठी प्रयोगशाळा, भूजल संशोधनावर भर देण्यात आला आहे.
- दिलीप खैरे, प्रशासक, पुणे बाजार समिती
..........................
व्यावसायिकांवर बोजा वाढणार
कृषी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ३५ हजार ९८४ कोटी रुपयांची तरतूद केली. कृषी व ग्रामीण विकासावर भर देताना व्यावसायिकांवर बोजा ठेवला आहे. कृषी कल्याण नावाने अर्धा टक्का सेवा कर वाढल्याने महागाई वाढणार आहे. १०० टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मुभा दिल्याने त्याचा स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे.
- वालचंद संचेती, माजी अध्यक्ष, पूना मर्चंट चेंबर
.........................
महाराष्ट्राला काहीच नाही
शेतीसाठी खूप काही तरतुदी केल्याचा आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांवर भर दिल्याचे दाखविले आहे. परंतु, महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. अवकाळी पाऊस, गारपिटीने ग्रस्त आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. शेतीवर अवलंबून असलेले सर्व शेतकरी अडचणीत आणि ग्राहक, शेतीमाल विक्रेते श्रीमंत हा विरोधाभास आहे. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची गरज आहे.
- डॉ. बुधाजीराव मुळीक, शेतीतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images