Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रेल्वेच्या प्रवाशांसाठी ‘पिक अप अँड ड्रॉप’

$
0
0

म. टा. प्रततिनिधी, पुणे
रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्याकरीता, प्रवासी वाहन मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत आता काही अंशी संपणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) रेल्वे प्रवाशांसाठी 'पिकअप अँड ड्रॉप'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच बुक केलेले वाहन प्रवाशांच्या दीमतीला हजर राहणार आहे.

एखाद्या शहरात नवीन व्यक्ती आल्यानंतर, इच्छितस्थळी जाण्याचा पत्ता शोधण्यापासून प्रवासी वाहन मिळविण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यातच रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडून अनेकदा जादा भाडे आकारण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, लगेजच्या नावाखाली अधिक पैशांची मागणी केल्याच्याही काही घटना समोर येतात. या पार्श्वभूमीवर 'आयआरसीटीसी'ने सुरू केलेली 'पिकअप अँड ड्रॉप'ची सुविधा प्रवाशांसाठी सोईस्कर आहे. या 'पिक अँड ड्राप' सेवेसाठी ऑनलाइन पद्धतीने कॅब गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे भाडे आकारले जाणार असल्याचे 'आयआरसीटीसी'च्या अधिकृत वेबसाइटवर स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या देशातील २१ शहरांमध्ये ही सुविधा दिली जात असून, येत्या काळात या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.

भुवनेश्वर, चंडीगढ, एर्नाकुलम जंक्शन, हावडा, हैदराबाद डेक्कन, हैदराबादचे कचेगुडा, जयपूर, लखनौ, लखनौ जंक्शन, मदुराई, म्हैसूर, नवी दिल्ली येथील आनंद विहार टर्मिनल, दिल्ली, दिल्ली कँटॉन्मेंट, दिल्ली सफदरगंज, दिल्ली सराई रोहिल्ला, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, सिकंदराबाद, तिरुपती, विजयवाडा या स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातील बहुतांश रेल्वे स्टेशनवर पुण्यातून किंवा पुणे मार्गे अनेक गाड्या जातात. त्यामुळे ही सेवा पुण्यात सुरू झाली नसली, तरीही पुणेकरांना बाहेरील शहरात गेल्यावर या सेवेचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केमिकल कंपनीला भोसरीत आग

$
0
0

पिंपरी : भोसरी, गवळीमाथा येथे शेजारी-शेजारी असलेल्या एल. के. केमिकल आणि ऑटो पार्ट्स या दोन कंपन्यांना शनिवारी (२० फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

भोसरी, एमआयडीसीतील 'जे' ब्लॉकमध्ये एल. के. नावाची केमिकल कंपनी व त्याशेजारी असलेल्या ऑटो पार्ट्स कंपनीला दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली.

संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. पाऊणतासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांनीच भरले अकरा लाख

$
0
0

शाळेला वीसपट दंड

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या १३८ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शिक्षकाकडून वेळेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाकडे (बोर्ड) भरले गेले नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्रच मिळाले नव्हते. मात्र, या चुकीमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच सुमारे अकरा लाख रुपये भरले. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली. मात्र, पन्नास हजार रुपये परीक्षा शुल्क वेळेवर न भरल्याने शाळेला तब्बल वीसपट अतिविलंब दंड म्हणून सुमारे अकरा लाख रुपये भरावे लागले आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तर दहावीची एकमार्चपासून सुरू होणार आहे. दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अशावेळी नापास झालेल्या विषयांची परीक्षा देता येते. त्यानुसार बारावीची परीक्षा देणाऱ्या ६२ आणि दहावीच्या ७६ विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यात परीक्षेचे शुल्क नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील शिक्षक अशोक शिवराम सांगाडे यांच्याकडे जमा केले होते. मात्र, सांगाडे यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क बोर्डाकडे वेळेवर जमाच केले नाही. त्यामुळे बारावी परीक्षेची तारीख जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र मिळाले नाही.

विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक दामोदर उंडे यांच्याकडे धाव घेऊन माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यावेळी शुल्क जमा करणारा सांगाडे हा शिक्षक गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेत हजर नसल्याचे समजले.

ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत, म्हणून उंडे यांनी परीक्षा शुल्क जमा केले. मात्र, रक्कम घेऊन गायब झालेल्या शिक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.



दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगाडे शिक्षकाकडे परीक्षा शुल्क वेळेवर जमा केले. पण सबंधित शिक्षकाकडून जमा झालेली रक्कम बोर्डात वेळेवर भरली गेली नाही. त्यामुळे बोर्डाकडून परीक्षेचे प्रवेशपत्र आले नव्हते. मात्र, विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत, म्हणून मी स्वत:च्या खिशातून वीसपट अतिविलंब दंडासह अकरा लाख भरले. - दामोदर उंडे, मुख्याध्यापक

विद्यार्थ्यांनी शाळेत परीक्षा शुल्क आणि फॉर्म भरूनही शाळेकडून वेळेत ते बोर्डात जमा न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून परीक्षेच्या आदल्या दिवशी शाळेकडून अकरा लाख रुपये भरण्यात आले. याबाबत शाळेकडून खुलासा मागविण्यात आला आहे - मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात घरात घुसून व्यापाऱ्याचा खून

$
0
0

पुणे:

शिवाजीनगर परिसरातील मंगला टॉकीजजवळ येथे एका व्यापाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली. चोरीच्या हेतूनं ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

नारायण हसानंद नागदेव (५५) असं मृत व्यापाऱ्याचं नाव असून ते तेलाचे व्यापारी होते. नागदेव यांच्या घरातील दीड लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने गायब आहेत. त्यामुळं चोरट्यांनीच हे कृत्य केलं असावं असा अंदाज आहे. नागदेव यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून, तसंच गळा दाबून त्यांना मारण्यात आलं आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या हत्येमागे काही वेगळं कारण आहे का याचाही तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजरीतील २५ पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशास मनाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जेजुरी देवस्थानात येणाऱ्या भक्तांकडून परस्पर पैसे घेणाऱ्या तसेच भक्तांनी दिलेल्या देणगीची रक्कम घेणाऱ्या २५ पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भक्तांकडून पैसे घेण्याबरोबर अभिषेकाच्या पावत्या फाडण्यास बंदी घालण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले.

जेजुरी देवस्थानातील काही पुजाऱ्यांकडून भक्तांनी दिलेल्या रकमा, मौल्यवान वस्तू देवस्थानाच्या पेटीत न टाकता स्वत:च्या पिशवीत ठेवत असल्याचे देवस्थानच्या सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. या संदर्भात देवस्थानच्या विश्वस्तांनी धर्मादाय सहआयुक्ताकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन धर्मादाय सहआयुक्तांनी जेजुरी पोलिसांनी संबंधित पुजाऱ्याविरोधात तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही देवस्थानातील येणाऱ्या भक्तांकडून पैसे घेणे, त्यांनी टाकलेल्या मौल्यवान वस्तू घेण्याचे प्रकार थांबले नव्हते.

याबाबत देवस्थानचे विश्वस्त अॅड. दशरथ घोरपडे, संदीप घोणे,डॉ. प्रसाद खंडागळे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे पुन्हा तक्रार केली. पुजाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या रकमामुळे देवस्थानचे आर्थिक नुकसान होत आहे. देवस्थानाचा विकास यामुळे होत नाही. या संदर्भात संबंधित पुजाऱ्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्वस्तांनी केली होती. त्या अर्जाची दखल घेण्यात आली.

भक्तांकडून अभिषेकाच्या पावत्या फाडणाऱ्या पुजाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले आहे. त्यांना देवस्थानाच्या गाभाऱ्यातील ताटातील पैसे घेण्याचा अधिकार नसतानाही पैसे घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देवस्थानाच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच मंदिराच्या परिसरात व मंदिरात येऊन पावत्या फाडणे, भक्तांकडून पैसे घेण्याचे प्रकार करीत असल्याने त्यांना रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे जेजुरी देवस्थानाच्या मंदिरातील २५ पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशास, मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसणे तसेच अभिषेकाच्या पावत्या फाडण्यास मनाईचे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्ब ठेवल्याचा पुन्हा बोगस फोनकॉल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बॉम्ब ठेवला असल्याची सांगणाऱ्या बोगस फोनचे सत्र सुरूच असून शनिवारी पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला दादर येथे बॉम्ब ठेवल्याचा असाच फोन आला होता. याप्रकरणी फोन करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले असून त्यांना बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांनी गंमत म्हणून हा फोन केल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले.

गेल्याच महिन्यात पुणे रेल्वे स्थानक आणि दादर येथे बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देऊन पोलिसांची झोप उडवण्याचा प्रकार झाला होता. तसेच, या फोन कॉलमुळे एक विमान नागपूर विमातळावर उतरवून तपासणी करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. 'मी राधेश्याम बोलतोय..' दादर येथे फोन ठेवला आहे, असे सांगून त्या व्यक्तीने फोन बंद केला. पुणे नियंत्रण कक्षाने तत्काळ याची माहिती 'पुणे एटीएस'ला दिली. 'एटीएस'ने केलेल्या तपासात संबंधित मोबाइल हा यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रज येथील व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळून आले. फोन वापरणारी व्यक्ती ही पनवेल तालुक्यातील केवळे येथे असल्याचे दिसून झाले. त्यानुसार पुणे एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी ही माहिती ठाणे एटीएसला दिली. त्यानुसार ठाणे 'एटीएस'ने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. केवळ गंमत म्हणून बॉम्ब ठेवल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे. दरम्यान, त्या दोघांनाही पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पुणे 'एटीएस'चे सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीला यंदा अभिजात दर्जा नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने उडिया भाषेला अभिजात दर्जा दिला असून, त्यासंबंधी आक्षेप घेणारी याचिका मद्रास हाय कोर्टात दाखल आहे. ही याचिका निकाली निघेपर्यंत कोणत्याच भाषेच्या अभिजात दर्जाविषयीचा प्रस्ताव स्वीकारायचा नाही, तसेच निर्णय घ्यायचा नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या या पार्श्वभूमीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामु‍ळे मराठी भाषा दिनी अभिजात भाषा होण्याची संधी या वर्षीही हुकणार आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याकरिता साहित्य अकादमीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून आता वर्ष उलटले, तरीही त्याला अंतिम मान्यता मिळालेली नाही. मराठी भाषा दिनापूर्वी हा दर्जा मिळावा व तसा निर्णय केंद्र सरकारने घोषित करून मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनी आनंदवार्ता द्यावी, असा सूर मराठी सारस्वत विश्वातून तसेच या संदर्भातील समितीच्या सदस्यांकडून व्यक्त होत असताना, यावर्षीही मराठीजनांचा हिरमोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी, तत्कालीन आघाडी सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पाठविलेला अहवाल मान्य करून साहित्य अकादमीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली. अकादमीकडून केंद्राला अहवाल सादर झाल्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला, तरी अद्यापही मराठीच्या अभिजात दर्जावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणार असून त्यापूर्वी यावर निर्णय शक्य नसल्याचे सांगत राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या उपसचिव अपर्णा गाडवे यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता 'मटा'शी बोलताना फेटाळून लावली.

समज चुकीचा

इतर भाषांना अभिजात दर्जा देण्याबाबत न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे, उडिया भाषेच्या न्यायालयातील निकालावर मराठीचा अभिजात दर्जा अवलंबून असल्याचा पसरविला जाणारा समज अत्यंत अप्रस्तुत आणि चुकीचा आहे, याकडे समितीतील सदस्यांनी लक्ष वेधले.



'यंदा शक्यता कमीच'

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. आमच्याकडून सकारात्मक सादरीकरण झाले असले तरी न्यायालयातील याचिकेमुळे केंद्र सरकार यावर निर्णय घेणार नाही. २७ फेब्रुवारी हा आपल्यासाठी मराठी भाषा दिन असला तरी केंद्र सरकार, त्यांच्याच पद्धतीनुसार काम करते, त्यामुळे या भाषादिनी अभिजात दर्जा मिळणे अशक्य आहे.

- अपर्णा गाडवे, उपसचिव-मराठी भाषा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ससूनच्या सुरक्षारक्षकांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून हॉस्पिटलच्या 'आयसीयू'त जाण्यास मज्जाव केल्या राग मनात धरून चौघांनी तीन सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी गार्डवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत सुरक्षारक्षक अविनाश बाबूराव जाधव (वय २३, रा. कामगांव, ता. दौंड) तक्रार दिली आहे. त्यानुसार, राजेश चव्हाण व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव, जोसेब जाधव व पवन मुसळे अशी जखमी रक्षकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सिक्युरिटी कंपनीत अविनाश सिक्युरिटी गार्ड म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून काम करतात. शुक्रवारी दुपारी तीन ते रात्री दहा दरम्यान त्यांची ससून हॉस्पिटलमधील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या वॉर्डसमोर ड्युटी होती. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता त्यांना सुपरवायझर चंद्रकांत गायकवाड यांनी तिसऱ्या मजल्यावरील वॉर्ड नं. २३ व २४ समोर गर्दी झाली आहे. ती कमी करण्यासाठी सांगितले. अविनाश आणि मुसळे हे दोघेही तिसऱ्या मजल्यावर गेले. त्यांनी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केला असता आरोपी चव्हाणने अतिदक्षता विभागात जाण्याचा प्रयत्न केला. त्यास अविनाश यांनी मज्जवा केला. दोघांनी आरोपी चव्हाणला जमादार कार्यालयात नेले. त्यानंतर आरोपी चव्हाण आणि त्याच्या इतर साथीदारांनी अविनाश, मिसळे आणि जाधव यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. बेदम मारहाण झाल्यामुळे तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सेनापती बापट रोडवर सायकलवरून जाणाऱ्या तरुणाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दीपक कोकरे (वय २१, कर्वेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून निखील राजू जाधव (वय १९, जुनी वडारवाडी), योगेश हरीश आलेर (वय १९, पांडवनगर), संतोष पिरप्पा मगळे (वय १९, जनवाडी) यांना अटक केली आहे. सेनापती बापट रोडवरील रत्ना हॉस्पिटलजवळून गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दीपक त्याचा मित्रासोबत सायकलवरुन जात होता. त्या वेळी अल्पवयीन मुलाने त्यांना अडविले. त्यांच्या पोटाला सत्तूर लावून रोख रक्कम व मोबाइल असा दोन हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. दीपकने त्याच्या मित्राच्या मोबाइलवरुन नियंत्रण कक्षास फोन करुन माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी दीपक यास बरोबर घेऊन आरोपींचा शोध घेतला. अल्पवयीन मुलासह निखील जाधव, योगेश आलेर व संतोष मगळे यांना ताब्यात घेतले. आरोपींना जीपमध्ये टाकून घेऊन जात असताना पोलिसांना गणेशखिंड रस्त्यावरील हॉटेलसमोर त्यांना गर्दी दिसली. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असता इटली होटेलचे व्यवस्थापक व सुरक्षारक्षक यांनी आरोपींना ओळखून त्यांनी होटेलमधील काउंटरची काच फोटून सुरक्षारक्षकाला मारहाण करून पळून गेल्याचे सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी चार मोबाइल, सत्तूर व सायकल असा चार हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आर. डी. चौहान अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्याची लागली चाहूल

$
0
0

दिवसभर उकाडा; किमान तापमानातही वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरावर आतापर्यंत असलेली थंडीची चादर दूर झाली असून, कडक उन्हाळा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरात दिवसभर चांगलाच उकाडा जाणवत असून, किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याने रात्रीही पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकलेला नाही. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

रविवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असले, तरी शहरात कमालीचा उकाडा जाणवत होता. शहरात ३४.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तर, १९.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. कमाल तापमान सरासरीपेक्षा अडीच अंशांनी तर, किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल सात अंशांनी अधिक होते. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात थंडीचा कडाका कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे. रविवारी दिवसभर हवेत चांगलाच उकाडा जाणवत होता. दुपारी हवामान ढगाळ असल्याने उन्हाचे चटके बसत नसले, तरी कमालीचा उकाडा जाणवत होते. सायंकाळनंतर गार वारे वाहिल्याने उकाड्यातून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा पुणेकरांना होती. मात्र, किमान तापमानही सुमारे २० अंशांवर पोहोचल्याने सायंकाळनंतरही हवेत उकाडाच कायम होता.

राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांपुढे गेल्याने राज्यालाही आता कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे (३८.६ अंश सेल्सिअस) तर सर्वात नीचांकी किमान तापमान नांदेड येथे (१५.५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. परभणी येथे ३८, नागपूर येथे ३६.४, सोलापूर येथे ३८, सांगली येथे ३६.६, तर जळगाव येथे ३५.३ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात राज्यात असेच हवामान राहून तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

..

शहर रविवारचे तापमान

चंद्रपूर ३८.६ अंश सेल्सिअस

परभणी ३८ अंश सेल्सिअस

सोलापूर ३८ अंश सेल्सिअस

नागपूर ३६.४ अंश सेल्सिअस

सांगली ३६.६ अंश सेल्सिअस

जळगाव ३५.३ अंश सेल्सिअस

नांदेड १५.५ अंश सेल्सिअस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालफितीने बनवले शिक्षकांना मजूर

$
0
0

सन २०१० च्या डीएड सीईटीतील पात्र उमेदवारांची भयावह अवस्था

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : 'सर, आम्ही शिक्षक बनलो खरे; पण आमच्यासाठी शाळांमध्ये जागाच नसल्याचं सरकारनं सांगितलं. जागा असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलेली कागदपत्रे सांगताहेत, पण संचालक ऐकेनात. त्यामुळे नाईलाजानं कोणी सिक्युरिटी गार्ड बनलंय, कोणी उसतोडणी मजूर. एकजण रिक्षा चालवतोय. आणखी एकाने वडापावचा गाडा सुरू केलायं....' २०१० च्या डी. एड. सीईटीच्या आधारे राज्यात शिक्षक बनण्याचा हक्क मिळविणारे, मात्र शिक्षण खात्याने अद्यापही रुजू करून न घेतलेल्या उमेदवारांनी या शब्दांत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

राज्यात शिक्षकांच्या भरतीसाठी २०१०मध्ये डी. एड. पात्रताधारक उमेदवारांसाठी सीईटी घेण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीमध्ये सामावूनही घेण्यात आले. परीक्षेतील चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन केल्यानंतर २०१२मध्ये या परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर झाला. या निकालापासून ते आजतागायत आपण शिक्षक म्हणून रुजू होऊ, या आशेवर बसलेल्या उमेदवारांनी आपली परिस्थिती नाईलाजाने 'मटा'समोर मांडली. त्यातून सरकारच्या लालफितीत अडकलेल्या कारभाराचे भीषण वास्तवही समोर आले.

सुदर्शन खेडकर हा उमेदवार म्हणाला, 'आम्ही गेल्या चार वर्षांपासून राज्य प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, आम्हाला प्रत्येकवेळी भरतीसाठी जागा नसल्याचेच सांगितले गेले. माहिती अधिकारात अर्ज केला असता, १ जुलै २०१५ अखेर राज्यात उपशिक्षकांच्या एकूण ८३७ जागा रिकाम्या असल्याचे संचलनालयानेच सांगितले. मी गेले काही महिने सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केल्यावर पैसा गोळा करून, ही माहिती बाहेर काढली. मात्र त्यानंतरही भरतीची प्रक्रिया अजून सुरू आहे. तुम्हाला वाट पाहावी लागेल, असेच उत्तर मिळाले.' सध्या ऊसतोडणी कामगार म्हणून काम करणारा नगर जिल्ह्यातील संदीप हुंदे, नगर जिल्ह्यामध्ये देवळाली गावात वडा-पावची गाडी चालविणारा योगेश पालवे, बीडमध्ये रिक्षा दुरुस्तीचे काम करणारा सूर्यकांत मुंडे हे डी.एड. सीईटी पात्र झालेले उमेदवारही सध्या याच विवंचनेमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

बीडमध्ये भाड्याने रिक्षाचालक म्हणून काम करणारे मच्छिंद्र सोनवणे म्हणाले, 'खरं तर ही परीक्षा पात्र झाल्यावर खूप बरे वाटले होते. आमच्यासोबत ही परीक्षा पास झालेले उमेदवार शिक्षक म्हणून रुजू झाल्यावरही आनंद झाला होता. हा आनंद फार काळ टिकला नाही. गेल्या चार वर्षांपासून मलाही कधीतरी नोकरीचा कॉल येईल याची मी वाट पाहतोय. ते होईना म्हणून शेवटी दुसऱ्याच्या रिक्षावर चालक म्हणून काम करायला सुरुवात केली. संचालक कार्यालय अजूनही आमचा विचार का करत नाही, याचं उत्तर आम्हाला सापडत नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कैद्यांचे हात वळणार प्रसादाचे लाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणारा प्रसादाचा लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विचाराधीन आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी याबाबत कारागृह अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

'कळंबा कारागृहात पन्नास महिला कैदी आहेत. शिक्षेच्या काळात त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी डॉ. सैनी यांनी पुढाकार घेतला आहे. महालक्ष्मी मंदिराला रोज तीन हजारांवर लाडू लागतात. सणांच्या दिवशी आणि नवरात्रात ही संख्या दहा हजारांवर जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणवर लाडू बनविण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने कारागृहातील महिलांना हे काम देण्याचा प्रस्ताव आहे. तो मंजूर झाल्यास महिलांना कायमस्वरूपी रोजगार आणि शासननियमाप्रमाणे मानधन मिळेल,' अशी माहिती कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

कळंबा कारागृहात १६०० सोळाशे कैदी आहेत. त्यात ५० महिला आहेत. कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगावे, या उद्देशाने शिक्षेच्या काळात कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून विविध रोजगारांचे प्रशिक्षण दिले जाते.

कारागृह प्रशासन अनुकूल

डॉ. अमित सैनी यांनी नुकतीच कारागृहात जाऊन प्रशासनाशी या प्रस्तावावर चर्चा केली. या प्रस्तावावर कारागृह प्रशासन अनुकूल आहे. जिल्हाधिकारी आणि महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर महिला कैद्यांना लाडू तयार करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची फसवणूक करणारी टोळी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोन्याचे खोटे बिस्कीट स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या टोळीला खडक पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

परमेश्वर राजेंद्र गायकवाड, सुभाष विष्णू मोरे, राजू संग्राम पंचाल, उत्तम श्यामराव मिरकले आणि पांडुरंग तुकाराम जाधव (रा. सर्व लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शिवाजी रोडवर प्रतिमा खंडागळे यांना २७ जानेवारी रोजी अशाच पद्धतीने फसविले होते. खंडागळे या रस्त्याने जाताना त्यांच्यासमोर एक रुमाल टाकण्यात आला. तो आरोपींनी त्यांच्या समोर उघडला. त्यामध्ये दोन पिवळ्या रंगाची बिस्किटे होती. आरोपीच्या एका साथीदाराने त्यातील एक पिवळे बिस्कीट स्वस्तात विकत घेतल्याचे नाटक केले. खंडागळे यांचा विश्वास संपादन करून त्यांनाही बिस्कीट घेण्यास सांगितले. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर गळ्यातील गंठणाच्या बदल्यात त्यांना बिस्कीट देण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर बिस्कीट सोन्याचे नसल्याचे त्यांना आढळून आले.

या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोर्टाच्या परवानगीने या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर, नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भव्य शिवस्मारक व्हायलाच हवे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज ठाकरे म्हणतात म्हणून अरबी सुमद्रातील भव्य शिवस्मारकाचा प्रकल्प सोडून देणे योग्य होणार नाही,' असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्यात गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. गडकिल्लेच हे शिवरायांचे स्मारक आहे. त्यांच्यासाठी अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची गरज काय, असा सवाल ठाकरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमप्रसंगी उपस्थित केला होता. शिंदे यांनी मात्र, ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. ' राज्यात काँग्रेसची सत्ता असताना शिवस्मारकाचा विषय मांडण्यात आला होता. जयंत पाटील अर्थमंत्री असताना २००४मध्ये याविषयी चर्चाही झाली होती. त्यावेळी स्मारकाला पर्यावरणाचा अडथळा आला होता. अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर राज्यात शिवरायांचे भव्यदिव्य स्मारक उभे राहिले, तर ही अभिमानाची बाब ठरेल. तेव्हा राज ठाकरे म्हणतात म्हणून स्मारकाचा प्रकल्प सोडणे हे योग्य होणार नाही,' असेही शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपग्रहाद्वारे करणार जमिनींची मोजणी

$
0
0

हद्दीचे वाद संपण्याची शक्यता; लवकरच ग्लोबल टेंडर

Sujit.Tambade@timesgroup.com

पुणे : जमिनीची पुनर्मोजणी करण्याचा मुळशी तालुक्यात राबविण्यात आलेला प्रायोगिक प्रकल्प आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील जमिनीची प्रथमच उपग्रहाद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव राज्याच्या जमाबंदी विभागाकडून तयार करण्यात आला असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर जमिनीचे अद्ययावत नकाशे आणि नवीन ग्राउंड कंट्रोल पॉइंट निश्चित होणार आहेत.

महसूल अभिलेखाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुळशी तालुक्यातील १२ गावांमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 'ग्लोबल टेंडर' प्रक्रिया राबविली जाणार असून, या बाबतचा प्रस्ताव तयार झाला आहे. प्रकल्पासाठी असणाऱ्या समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे राज्याचे जमाबंदी आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना स्पष्ट केले.

प्रकल्पाअंतर्गत नकाशांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्यानंतर उपग्रहाद्वारे नकाशे तयार होणार आहेत. सध्या असलेल्या ग्राउंड कंट्रोल पॉइंटनुसार नकाशे तयार करताना अडचणी निर्माण होतात. उपग्रहाद्वारे नकाशे बनविताना नव्याने ग्राउंड कंट्रोल पॉइंट निश्चित केले जाणार आहेत. हे काम खासगी संस्थेकडून करण्यात येणार आहे, असेही कडू पाटील म्हणाले. 'डीजीपीएस या पद्धतीचा अवलंब करून नकाशांचे डिजिटायझेशन, उपग्रहावर आधारीत नकाशे तयार होणार आहेत. त्यामुळे हद्दीवरून होणारे वाद कायमचे बंद होतील. सद्यपरि​स्थितीत राज्यातील जमिनींचे पोटविभाजन झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यांचा मेळ लागत नाही. उपग्रहांद्वारे जमिनीची मोजणी झाल्यावर अद्ययावत नकाशे उपलब्ध होणार असल्याने जमिनींच्या हद्दींवरून वाद मिटणार आहेत.

ब्रिटिश काळात जमिनींचे सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर आजपावेतो सर्वेक्षण झालेले नाही. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. आता या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
..

नकाशांचे डिजिटायझेशन करणार

'डीजीपीएस या पद्धतीचा अवलंब करून नकाशांचे डिजिटायझेशन, उपग्रहावर आधारीत नकाशे तयार होणार आहेत. त्यामुळे हद्दीवरून होणारे वाद कायमचे बंद होतील. सद्यपरि​स्थितीत राज्यातील जमिनींचे पोटविभाजन झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यांचा मेळ लागत नाही. उपग्रहांद्वारे जमिनीची मोजणी झाल्यावर अद्ययावत नकाशे उपलब्ध होणार असल्याने जमिनींच्या हद्दींवरून वाद मिटणार आहेत.

..

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये असलेल्या विविध कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील साडेसतरा कोटी कागदपत्रांचे स्कॅनिंग झाले आहे. त्यामध्ये जन्म दाखला, मृत्यू दाखला, सातबारा, फेरफार आदी विविध प्रकारची कागदपत्रे आहेत.

- संभाजी कडू-पाटील, जमाबंदी आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडले पवारांचे अनोखे पैलू

$
0
0

अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेकडून मानपत्र प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माणगाव तालुक्यातील इंदापूर गावात गेल्यानंतर पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वी भेट दिलेल्या 'सोडे' विक्रीच्या दुकानाची आस्थेने विचारपूस करणारे, १९६५मध्ये चीनने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर चीनच्या निषेधासाठी शनिवारवाड्याच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा मोर्चा घेऊन जाणारे, १९८५ मध्ये पुलोदच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी किती निधी लागू शकतो, याची निवडणुकीपूर्वीच सचिवांकडे चौकशी करणारे आणि काँग्रेसमध्ये असताना सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आमदारकीचे तिकीट मिळवून देऊ न शकल्याने रडणारे... राज्यासह देशाच्या राजकारणात विविध महत्त्वाची पदे भूषविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयीचे वेगळे पैलू रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात उलगडले.

पुणे महापालिकेच्यावतीने पवार यांचा अमृतमहोत्सवानिमित्त मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते पवार यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, कलश व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार रामदास आठवले, खासदार अॅड. वंदना चव्हाण, उपमहापौर आबा बागूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, माजी आमदार उल्हास पवार, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम आदी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले.

'मी पुण्यात घडलो.. कधी यश, तर कधी अपयश आले. मात्र, पुण्याने मला कायमच प्रोत्साहित केले. येथेच अनेक कर्तृत्त्ववान माणसे भेटली. या शहराने अनेक आदर्श नेते घडविले. रामभाऊ म्हाळगी यांच्याकडून सभागृहात अभ्यापूर्ण मांडणी कशी करावी, याचा आदर्श मिळाला. बाबूराव सणस यांच्या सारख्या नेत्यांनी समाजकारण कसे करायचे, याचा आदर्श घालून दिला. राजकारणात मतभेद असतात, पण अस्पृश्यता असू नये. सभागृहात आपण भांडतो. मात्र, समाजकारणाच्या विषयावर एकत्र आले पाहिजे,' असे पवार या वेळी म्हणाले.

'एखाद्या राजकीय व्यक्तीच्या सत्कारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहतात, ही चांगली बाब आहे. असे फार थोड्या राज्यांतच पाहायला मिळते. पवार यांना महाराष्ट्राची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी उद्योग, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे,' असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले. पवार यांच्यामुळेच मी राजकारणात आलो आणि उच्च पदांवर पोहोचलो. दिल्लीत विज्ञानभवन येथे त्यांच्या अमृतमहोत्सवाचा झालेला कार्यक्रम देदिप्यमान होता, असे शिंदे यांनी सांगितले. पवार यांच्या कार्यकालात शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे राज्यातील शेतकरी श्रीमंत झाला, असे बापट यावेळी म्हणाले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

-------

आठवले आणि एकच हशा..

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीतर्फे व्यासपीठावरील मान्यवरांना पेढे देण्यात आले. हा धागा पकडून खासदार रामदास आठवले म्हणाले, 'मी राष्ट्रवादीचा पेढा लक्षात ठेवणार नाही. कारण, मी सध्या भाजपचा लाडूच लक्षात ठेवला आहे. आता आम्ही बीजेपीबरोबर सत्तेत आहोत,' यावर एकच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्त प्रबळ दावेदार?

$
0
0

'एसपीव्ही'च्या अध्यक्षपदाचा निर्णय राज्य सरकार घेणार; पालिकेने मागवल्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या 'स्पेशल पर्पज व्हेईकल'च्या (एसपीव्ही) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अथवा विभागीय आयुक्त यांच्यापैकी एकाची निवड 'एसपीव्ही'च्या अध्यक्षपदी होणार असून, त्याबाबत महापालिकेने राज्य सरकारकडून सूचना मागविल्या आहेत.

गेल्या महिनाअखेरीस स्मार्ट सिटीत निवडण्यात आलेल्या २० शहरांमध्ये पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून मिळणारे अनुदान प्राप्त होण्यासाठी 'एसपीव्ही'ची स्थापना करणे बंधनकारक असल्याचे निर्देश केंद्राने या पूर्वीच दिले आहेत. 'एसपीव्ही'च्या रचनेबाबत राजकीय पक्षांमध्ये मतभिन्नता असून, अधिकाधिक लोकप्रतिनिधींना त्यावर स्थान देण्यात येण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. 'एसपीव्ही'च्या अध्यक्षपदी महापौरांची निवड केली जावी, अशी उपसूचनाही स्मार्ट सिटीला मान्यता देताना देण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच 'एसपीव्ही'ची रचना करण्याचे बंधन असल्याने पालिका आयुक्तांनी मांडलेल्या प्रस्तावात केवळ संचालक म्हणूनच महापौर आणि इतर पक्षनेत्यांची वर्णी लावण्यात आली आहे. येत्या बुधवारी (२४ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत 'एसपीव्ही'च्या स्थापनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी, 'एसपीव्ही'च्या अध्यक्षपदी नेमके कोण असेल, याबाबत स्पष्टता यावी, यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडून अभिप्राय मागविला आहे. येत्या दोन दिवसांत नगरविकास विभागाकडून त्याबाबतच्या सूचना प्राप्त होतील, अशी शक्यता आहे. शहरी भागांत स्मार्ट सिटी होणार असल्याने महापालिका आयुक्तांचीच निवड केली जाण्याचे संकेत दिले जात आहेत.

स्मार्ट सिटीच्या नियमावलीनुसार महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांची 'एसपीव्ही'च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते. स्मार्ट सिटीच्या संपूर्ण आराखड्यादरम्यान सातत्याने लोकप्रतिनिधींना गृहित धरण्यावरून सर्व राजकीय पक्षांनी आयुक्तांवर टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे, 'एसपीव्ही'च्या अध्यक्षपदी आयुक्तांची नियुक्ती झाली, तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये वारंवार संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे.

....................

राजकीय वातावरण पेटणार

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देतानाच 'एसपीव्ही'च्या रचनेबाबत अनेक आक्षेप घेण्यात आले होते. तसेच, भाजप वगळता इतर अनेक पक्षांनी त्याविषयी अनेक उपसूचना मांडल्या होत्या. 'एसपीव्ही' स्थापनेचा अंतिम मसुदा आयुक्तांनी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करताना, उपसूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे, 'एसपीव्ही'च्या स्थापनेवरून पुन्हा राजकीय वातावरण गरम होण्याची चिन्हे असून, येत्या बुधवारी त्यावर निर्णय होणार, की प्रस्ताव पुन्हा पुढे ढकलला जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक समस्‍येवर विद्यार्थ्यांचे उत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर वाहतूक पोलिस व काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या वाहतूक नियोजनावरील मॉडेल सादरीकरण स्पर्धेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी पुण्याच्या वाहतुकीच्या समस्यांवर ठोस उपाययोजना सुचवल्या. सहभागी झालेल्या २६ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे पुण्याची वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाय सांगितले आहेत.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या 'आरएसपी' शेडमध्ये वाहतुकीच्या समस्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पुण्याच्या विविध चौकांमधील, रस्त्यांवरील वाहतूक समस्या प्रतिकृतींच्या माध्यमांतून मांडली. त्यावरील उपाययोजनाही या विद्यार्थ्यांनी या वेळी उपस्थितांना सांगितल्या. या वेळी उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त कविता नेरकर, पोलिस निरीक्षक क्रांती पवार यांच्यासह सर्व वाहतूक विभागांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. खुल्या गटासाठीही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तेरा जणांनी सहभाग घेतला होता. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये बी. के. कॉलेज ऑफ आर्किटेक्टला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर, आर. व्ही. रास्ते या ७३ वर्षीय निवृत्त अभियत्यांना द्वितीय तर 'एआरएआय'ला तृतीय पारितोषिक मिळाले. रास्ते यांनी कर्वे रोडवरील एसएनडीटी चौकातील पादचाऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एक प्रतिकृती सादर केली. सध्या चौकामध्ये अस्तित्वात असलेला लोखंडी पादचारी पूल अन्यत्र हलवून त्या ठिकाणी भुयारी मार्ग केल्यास पादचाऱ्यांना अधिक सोपे जाईल. वयस्कर नागरिकांना जिना चढणे आणि उतरणे शक्य होत नसल्यामुळे भुयारी मार्गात स्वयंचलीत जिना देण्याचा उपायही त्यांनी सुचवला आहे.

आगरकर स्कूल पहिले

शालेय स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आगरकर स्कूलने पटकावला. द्वितीय क्रमांक बिना इंग्लिश स्कूल तर तृतीय क्रमांक सिंधू विद्या भवनला मिळाला. दिल्ली पब्लिक स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, ससाणेनगरला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उपायुक्त सारंग आवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महापालिकेची केवळ एकच शाळा सहभागी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरमध्ये प्रौढाचा खून

$
0
0

तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास; परिसरात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मंगला थिएटरच्यापाठीमागील बाजूस असलेल्या इमारतीमध्ये ५५ वर्षांच्या व्यक्तीवर दगडाने हल्ला करून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असण्याची शक्यता असून, घटनास्थळावरून रोख रकमेसह तीन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

नारायण हसानंद नागदेव (वय ५०, रा. शिवाजीनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. मंगला थिएटरपाठीमागील 'नागदेव तेल मसाला' आणि पिठाची गिरणी त्यांची आहे. या प्रकरणी नारायण यांचे बंधू गंगाराम हसानंद नागदेव (वय ६०, रा. सेनापती बापट रोड) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वर्दळीच्या शिवाजीनगर परिसरात खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मंगला थिएटरच्या पाठीमागील बाजूस जहांगीर इराणी यांच्या मालकीची जागा आणि इमारत आहे. या इमारतीतील तळघरात नागदेव कुटुंबीय पिढ्यानपिढ्या राहत आहे. या इमारतीसमोर 'नागदेव तेल मसाला व पिठाची गिरणी' आहे. गंगाराम, भूपिंदर आणि नारायण असे तिघे भाऊ ही गिरणी चालवतात. भूपिंदर आणि गंगाराम सेनापती बापट रोडवर, तर नारायण एकटेच त्या तळघरातील फ्लॅटमध्ये राहतात. नारायण यांनी शनिवारी दिवसभर गिरणीमध्ये काम केले. सायंकाळी ते आपले काम आटोपून फ्लॅटमध्ये गेले होते. गंगाराम यांनी रात्री आठच्या सुमारास गिरणीतील काम आटोपून गल्ल्यातील सुमारे लाखभर रुपये नारायण राहात असलेल्या फ्लॅटमध्ये ठेवले. कपाटाला कुलूप लावले आणि ते घरी निघून गेले. गंगाराम रविवारी सकाळी गिरणीत आले असता, त्यांना गिरणी उघडली नसल्याचे लक्षात आले. ते नारायण यांना पाहण्यासाठी घरात गेले असता दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. आत जाऊन पाहिले असता नारायण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. बेडशेजारील कपाट उघडे होते. नारायण यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त तुषार दोशी, पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, खासदार अनिल शिरोळे आणि आमदार विजय काळे यांनी तेथे भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. व्ही. जाधव, प्रवीण चौगुले, रघुनाथ फुगे यांच्या पथकांनी विचारपूस करून संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडकर झाले ‘हॅपी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रविवारच्या सकाळी निवांत उठायचे...जेवणाच्या वेळेत नाष्टा घेऊन भटकंतीला बाहेर पडायचे...अशी मानसिकता असलेल्या कोथरूडमधील शेकडो नागरिकांसाठी रविवार 'हट के' ठरला. घरातील लहान मुलांना भल्या सकाळीच उत्साहात घराबाहेर पडून या नागरिकांनी मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. बघता बघता हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले अन् 'हॅपी स्ट्रीट'ची गल्ली रंगबिरंगी नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली.

झुंबाच्या तालावर थिरकरणारी तरुणाई, कुठे झेंबे वादनाचा ठेका धरलेले अबालवृद्ध, स्केटबोर्डवरून वाऱ्याच्या वेगाने फिरणारे विद्यार्थी, तर काही ठिकाणी दोर ओढण्यासाठी ताकद लावणाऱ्या कुटुंबांचे समूह...सकाळच्या प्रसन्न वातावरणात सामूहिक धमाल करण्याचा अनुभव कोथरूडवासीयांनी घेतला. कोथरूड येथील आशिष गार्डन परिसरातील श्रीकांत ठाकरे रस्त्यावर आयोजित केलेल्या 'हॅपी स्ट्रीट' उपक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याणीनगर, औंध, पिंपळे गुरव येथे लोकप्रिय ठरलेला हा उपक्रम कोथरूडमध्ये पण झाला पाहिजे, असा नागरिकांनी आग्रह केला होता. आमदार मेधा कुलकर्णी यांनी आकाशात फुगे उडवून या उपक्रमाचे उद् घाटन केले.

महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, व्हीजे डेव्हलपर्स आणि पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उजाडण्यापूर्वीच नागरिकांची या रस्त्यावर वर्दळ सुरू झाली होती आणि साधारणतः साडेआठच्या दरम्यान सुमारे दहा हजार नागरिक या रस्त्यावर खेळण्यामध्ये मग्न होते. सर्वाधिक प्रतिसाद झुंबा आणि ड्रम सर्कलला मिळाला. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही झेंबे वादनात मग्न झाले होते. प्राथमिक वादनापासूनचा हा तालप्रवास जुगलबंदीपर्यंत रंगला. लहान मुलांसाठी स्ट्रीट आर्ट झोन आकर्षण ठरले. छोट्या सायकल घेऊन मुले मनसोक्त फिरत होती. स्केटबोर्डस आणि वेव्हबोर्डर्स घेऊनही अनेक मुले सहभागी झाले होती. अनेकांनी योगा सेंटरमध्ये ताज्या हवेत मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार योगासने केली. जोर लगाके हैय्या, म्हणत ज्येष्ठांबरोबरच लहान मुलांनीही रस्सीखेचीचा अनुभव घेतला.

'रविवारी आम्ही निवांत उठतो आणि नंतर नाष्टा होईपर्यंत दुपार कधी होते कळतच नाही. मात्र, आज सकाळी सात वाजता मुलांसह सगळे आवरून रस्त्यावर उतरलो होतो. खूप मजा आली. किती दिवसांनी आम्ही मुलांबरोबरच त्यांचे खेळ खेळण्याचा आनंद घेतला. रस्सी खेचण्याचा खेळ तर मी शाळेनंतर आज खेळले,' अशा भावना दीपा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या सांगितले.

वृक्षसंवर्धनाचा संदेश

हॅपी स्ट्रीटवर एक भाग 'स्ट्रीट आर्ट'साठी राखीव ठेवण्यात आला होता. यामध्ये साम्राज्य पूरम सोसायटीच्या रहिवाशांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारे स्ट्रीट आर्ट सादर केले. यामध्ये आपण कोणकोणत्या कारणांसाठी वृक्ष तोड करीत आहोत, याची माहिती देण्याबरोबरच वृक्ष संवर्धन कसे करता येईल, याचा संदेश देण्यात आला होता. हे अनोखे स्ट्रीट आर्ट बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या शिवाय बच्चा पार्टीने रस्त्यावर मनसोक्त चित्र काढण्याची मजा लुटली. रस्त्यावर मांडी घालून बसलेली ही मुले चित्र काढण्यात मग्न झाली होती. काहींनी फळे, फुले, कार्टून तर काहींनी चित्रातून पर्यावरणरक्षणाचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images