Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आनंद यादव होऊ दिले नाही...!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'मी पुण्याला पचत नाही की मला पुणे पचत नाही, हे सांगता येणे अवघड आहे. पण आता मी पुण्याला पचू लागलो आहे. मी बुचकळ्यात पडण्याचा संबंध नाही, त्यामुळे वाद झाले तरी संमेलनाध्यक्ष होण्याचा पश्चाताप मला झाला नाही. मी स्वतःला आनंद यादव होऊ दिले नाही. यादव यांच्या भूमिकेलाच एकप्रकारे न्याय दिला,' असे सडेतोड मत मांडून 'सबनीसनंतर एकाही संमेलनाध्यक्षाचे यादव होणार नाहीत,' असेही साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी सांगितले. पिंपरी येथील साहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खासदार अॅड. वंदना चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, मधुकर भावे, कवी अरुण शेवते, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, भारत देसडला, सरहदचे संस्थापक संजय नहार, संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे व कार्याध्यक्ष सचिन ईटकर या वेळी उपस्थित होते. कानडे यांच्या 'आम्ही घामाचे धनी' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन या वेळी झाले. 'महामंडळाचे पदाधिकारी माझ्या बाजूने नव्हते. पण स्वागताध्यक्ष आणि माझे संबंध चांगले झाले,' असे डॉ. सबनीस म्हणाले.

'संमेलनामुळे माफी मागायची सवय लागली'

संमेलनामागे परमेश्वरी शक्ती होती. केवळ शिक्षण क्षेत्रात काम केले असते, तर साहित्याची संपत्ती मला अनुभवता आली नसती. साहित्यिक तुम्हाला त्रास देतील, अशी भीती मला दाखवली गेली पण साहित्यिकांमुळे माझे आयुष्य बदलले. मात्र, या संमेलनामुळे मला माफी मागायची सवय लागली, असे वक्तव्य डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी स्टँडजवळ अवैध प्रवासी वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथील स्टँडच्या दोनशे मीटरच्या परिसरात दररोज सरासरी १२८ खासगी वाहनांकडून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. एसटी प्रशासनाने दररोजच्या वाहनांची नोंद ठेवून, त्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय व स्थानिक पोलिसांना पाठविली आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी, एसटीचे उत्पन्न व प्रवासी वाढावेत, या उद्देशाने अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार अवैध खासगी वाहनांना एसटी स्टँड आणि स्टँडच्या २०० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. स्वारगेट स्टँडच्या परिसरात जानेवारी महिन्यात एक हजार २१ प्रवासी बसेस आणि ८६९ जीपद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली. तर, फेब्रुवारी महिन्यात एक ते १० तारखेपर्यंत २५९ बसेस आणि ३९३ जीपद्वारे वाहतूक करण्यात आली. शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथून जानेवारी महिन्यात २१०० वाहनांकडून व फेब्रुवारीच्या पहिल्या १० दिवसात ६०८ वाहनांनी प्रवासी वाहतूक केली. एसटी प्रशासनाने या वाहनांच्या नंबरची नोंद करून, पुढील कारवाईसाठी आरटीओला सुपूर्द केली आहे. तसेच, या तिनही स्टँडमधून दररोज किमान तीन ते चार खासगी वाहतूक एजंटांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जात आहे, अशी माहिती एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. एसटीच्या पुणे विभागात अवैध वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी पुणे, पिंपरी आणि बारामती या ठिकाणी तीन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये एसटी, आरटीओ आणि पोलिसांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. जिल्ह्यातील १७ एसटी स्टँडवर अशा पद्धतीने एसटीकडून कार्यवाही केली जात आहे.

एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास...

एसटीचे तिकीट म्हणजे १० लाखांचा विमा... खासगी प्रवासी वाहनातून प्रवास म्हणजे जिवाशी खेळ.., अशी माहिती पथनाट्याच्या माध्यमातून देऊन प्रवाशांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न स्वारगेट एसटी स्टँड येथे मंगळवारी करण्यात आला. नागरिकांनी खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करू नये, याबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात उभारणार कौशल्य विद्यापीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वतंत्र कौशल्य विद्यापीठाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित कायद्याला संसदेमध्ये मान्यता मिळाल्यास, देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्याचे संकेत केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्य मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी पुण्यात दिले. हा कायदा होण्यासाठी संसदेचे कामकाज सुरळीत चालणे आवश्यक असले, तरी काँग्रेस आणि इतर विरोधक संसदेचे कामकाज बंद पाडण्याचे घाणेरडे राजकारण खेळत असल्याचा आरोपही रुडी यांनी केली. सिम्बायोसिसमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर रुडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या बाबींवर प्रकाश टाकला. रुडी म्हणाले, 'कौशल्य विकासाविषयीची धोरणे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत नीती आयोगाने प्रकाशसिंह बादल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या पाहणीनुसार, कौशल्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि राज्य सरकारने विशेष अभिनंदन करायला हवे. देशात स्वतंत्र कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याची कौशल्य विकासाबाबतची प्रगती पाहता, हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन होणे शक्य आहे. हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी संसदेमध्ये त्या विषयीचा कायदा होणे गरजेचे आहे. मात्र काँग्रेसच्या राजकारणामुळे हा कायदा झाला नाही, तर राज्याला मोठे नुकसान सोसावे लागू शकते.' रुडी म्हणाले, 'संसदेमध्ये काहीही होत नाही, हे दुर्दैव आहे. लोकसभेमध्ये कामकाजाला अडचण येत नाही, कारण तेथे भाजप बहुमतामध्ये आहे. मात्र, राज्यसभेमध्ये बहुमत नसल्याने, त्या ठिकाणी विरोधक कामकाज चालूच देत नाहीत. प्रश्नोत्तराच्या तासानंतरही मुद्दाम गोंधळ घातला जातो. संसदेच्या कामकाजाचा बहुमूल्य वेळ वाया घालविण्याचे कारस्थान काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करीत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासाठीही ही बाब दुर्दैवी अशीच म्हणावी लागेल.' चर्चेतून सर्व प्रश्न सोडविणे शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातूनही सरकार सगळ्यांशीच चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये विरोधक कामकाज चालू देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्र्यांनी केले '१०८' सेवेचे कौतुक

पुणे : अपघाताच्या ठिकाणाहून मदतीसाठी फोन येताच अवघ्या वीस मिनिटांत घटनास्थळी पोहोचणाऱ्या १०८ या 'इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या अॅम्ब्युलन्स सेवेचे (इएमएस) केंद्रीय कौशल्यविकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी कौतुक केले. याशिवाय, कौशल्य विकासावर आधारीत छोट्या स्वरूपातील काही अभ्यासक्रम राबविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी औंध येथील 'इएमएस'च्या नियंत्रण कक्षाला भेट दिली. या वेळी प्राची जावडेकर, श्रीकांत भारतीय, राजेश पांडे, भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) अध्यक्ष हनुमंत गायकवाड, 'इएमएस' सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके आदी उपस्थित होते. 'इएमएस' अंतर्गत घटनास्थळी धावणाऱ्या अॅम्ब्युलन्सची केंद्रीय मंत्री रुडी यांनी पाहणी केली. पेशंटला हॉस्पिटलला नेताना त्याच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांसह अॅम्ब्युलन्समधील सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. घटनास्थळावरून नियंत्रण कक्षात मदतीसाठी कॉल आल्यानंतर नेमकी पुढची प्रक्रिया कशी होते, मदतीसाठी अॅम्ब्युलन्स कशी पाठविली जाते, याची गायकवाड यांनी माहिती दिली. त्यावेळी 'बिहारमध्ये अशा अॅम्ब्युलन्सची सुविधा नाही का,' अशी विचारणा करताना सेवेचे त्यांनी कौतुक केले. 'बीव्हीजी'च्या कौशल्य विकासाच्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजारांची लाच घेताना पकडले

$
0
0

पुणे : गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चाकण पोलिस ठाण्यातील फौजदार सुहास सुरेश ठोंबरे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी चाकण परिसरातील एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारदाराच्या भावाविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. त्याच व्यक्तीविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून ठोंबरे यांची २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात या प्रकरणी तक्रार आल्यानंतर ठोंबरे यांनी लाचेची मागणी केल्याबद्दल पडताळणी करण्यात आली. त्यानुसार चाकण पोलिस ठाण्यात सापळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ठोंबरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिली.

प्रसिद्ध अशी १०८ बॅच

नाशिक; तसेच तासगाव येथील पोलिस प्रबोधिनीतून पास झालेल्या १०८ बॅचमधील बऱ्याच फौजदारांवर लाचप्रकरणी कारवाई झाली आहे. ठोंबरे हे सुद्धा १०८च्या बॅचचे असल्याचे सांगण्यात येत आहे. लाचप्रकरणांसाठी राज्यात ही बॅच प्रसिद्ध आहे. या बॅचमधील फौजदारावर पुण्यातच लाचप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचा निकाल लागला असून संबंधित फौजदार निर्दोष सुटला आहे. या बॅचमध्ये १८०० उमेदवारांची निवड झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोरेगाव पार्क’मधील अतिक्रमणे हटविली

$
0
0

हडपसर ः कोरेगाव पार्क नॉर्थमेन रस्त्यावर हॉटेलसमोरील अतिक्रमणांवर मंगळवारी पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. हॉटेलसमोरील पार्किंगकरीता असलेल्या जागांवर अतिक्रमण करून अवैध व्यवसाय सुरू होता. नॉर्थमेन रस्त्यावर हॉटेलमुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हॉटेलसमोरील पार्किंगच्या जागेवर बांबू हाउस, झोपडी, पत्र्याचे शेड उभारून व्यवसाय थाटण्यात आले होते. या व्यवसायांमुळे हॉटेलमध्ये येणारा ग्राहकवर्ग रस्त्यावर पार्किंग करीत होता. महापालिकेने येथील हॉटेल चालकांना याबाबत नोटिसा दिल्या होत्या. मात्र अतिक्रमणे काढून न घेतल्याने मंगळवारी कारवाई करण्यात आली. जेसीबी, दोन गॅस कटर, वीस बिगारी, वीस पोलिस; तसेच महापालिकेचे कनिष्ट अभियंता नरेंद्र देवकर, मनोज गाठे, पोलिस उपनिरीक्षक नाईक यांनी कारवाई केली. यामध्ये दहा हजार पाचशे चौरस फुटांचे, बांबू हाउस, पत्र्याचे शेड, झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर दीड तासात दोन अपघात; दोन ठार

$
0
0

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर डुक्कर खिंड आणि चांदणी चौक येथे मंगळवारी दुपारी अवघ्या दीड तासाच्या अवधीत झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण दगावले.

पुरुषोत्तम साहू आणि त्यांचे मित्र मुंबईहून कात्रजच्या दिशेने जात असताना, चांदणी चौकाकडून आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये साहू (२१, रा. उंड्री) यांचा जागीच मृत्यू झाला असून, पोपटराव गुळमकर आणि सुधींद्र पुरोहित हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला असून, पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

साडेचारच्या सुमारास चांदणी चौकातून जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत करिष्मा कांबळे (२०, रा. हडपसर) दगावली असून, विशाल पाटोळे जखमी झाला आहे. दोन्ही अपघातांचा तपास वारजे पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे

$
0
0

आयुक्तांकडून अर्थसंकल्पात विकासासाठी १२२७ कोटींची तरतूद

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात डावलल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होण्याचा आशावाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिसून आला आहे. महापालिकेचा २०१६-१७चा ३९८२ कोटी रुपयांचा आणि कोणतीही करवाढ नसलेला शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त राजीव जाधव यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. त्यात विकास कामांसाठी १२२७ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच 'स्मार्ट सिटी'च्या दुसऱ्या टप्प्यात समावेश गृहीत धरून ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच ट्राम योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे विचाराधीन असून, त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद आहे. येत्या दोन वर्षांत संपूर्ण शहरात २४ तास पाणीपुरवठ्याचा संकल्प करण्यात आला असून, पुढील तीन वर्षांत शहर एलईडी दिव्यांनी युक्त होईल, असे नियोजन आहे.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेसाठी ४० कोटी रुपये, पंतप्रधान आवास योजनेसाठी पाच कोटी आणि स्वच्छ भारत योजनेसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. २०१५-१६च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये स्थापत्यविषयक कामांसाठी २०९ कोटी रुपये, जलनिस्सारण कामांसाठी ५० कोटी रुपये, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागासाठी प्रत्येकी ११ कोटी आणि पाणीपुरवठा विशेष निधीमध्ये ३९ कोटी रुपये आणि पर्यावरण विभागासाठी दहा कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आंद्रा धरणातून शंभर दशलक्ष लिटर पाणी आणण्यासाठी ३३.८५ कोटी रुपयांची तरतूद आहे.

केंद्र सरकारकडील योजनेसह हा एकत्रित अर्थसंकल्प आहे. महापालिकेचा स्वतंत्र अर्थसंकल्प २७०७ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये शिलकीचे २७७ कोटी रुपये, महसुली जमा २३२५ कोटी रुपये आणि भांडवली जमा १०५ कोटी रुपये अपेक्षित आहेत. २०१५-१६च्या तुलनेत २०१६-१७मध्ये ३९१ कोटी रुपयांचा वाढीव महसूल जमा होणे अपेक्षित आहे. 'एलबीटी'च्या माध्यमातून सर्वाधिक १३५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

.....

करवाढ नाही

अर्थसंकल्पात प्रत्यक्षात करवाढ नाही. किंबहुना करवाढ गृहीत न धरताच अर्थसंकल्प तयार केला आहे; मात्र मिळकतकर आणि पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या अर्थसंकल्पावर स्थायी समिती अभ्यास करून निर्णय घेणार आहे. त्यानंतर तो पुढील आठवड्यात सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे अध्यक्ष अतुल शितोळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुकथा लेखकांसाठी ‘मटा’चे व्यासपीठ

$
0
0

लघुत्तम आणि लघुकथा यांसाठी आगळी स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ट्विटरवरील १४० कॅरेक्टरपासून फेसबुकच्या पानापर्यंत आणि 'व्हॉट्सअॅप'पासून पारंपरिक पद्धतीने कोऱ्या कागदापर्यंत विविध माध्यमांतून मराठीमधून अभिव्यक्त होणाऱ्या सर्जनशील लेखकांसाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने लघुत्तम आणि लघुकथांची अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. शंभर शब्दांपर्यंतच्या लघुत्तम कथा आणि सुमारे एक हजार शब्दांपर्यंतच्या लघुकथा लिहून तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर 'मटा'ने ही आगळी स्पर्धा आयोजित केली असून, ती सर्वांसाठी खुली आहे. लघुत्तम कथा आणि लघुकथा या दोन प्रकारांत ही स्पर्धा होईल. कमीत कमी शब्दांत आशय व्यक्त करणाऱ्या लघुत्तम कथेचा प्रकार अलीकडच्या काळात लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे या प्रकारच्या कथांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. कमाल शंभर शब्द ही त्यासाठी शब्दमर्यादा आहे. लघुकथेसाठीही शब्दमर्यादा असून, जास्तीत जास्त एक हजार शब्दांपर्यंतच्या कथा त्यासाठी स्वीकारण्यात येणार आहेत. कथेसाठी विषयाची मर्यादा नाही. ज्येष्ठ साहित्यिकांच्या समितीद्वारे या कथांचे परीक्षण करण्यात येणार असून, त्यातून विजेते निवडण्यात येतील.

या दोन्ही किंवा दोहोंपैकी एका प्रकारचे कथालेखन करणाऱ्या लेखकांनी या स्पर्धेसाठी आपले लेखन पाठवावे. लेखन सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेले किंवा टाइप केलेले असावे. त्यावर लेखकाचा पूर्ण पत्ता, फोन क्रमांक यांचा उल्लेख करायला हवा. सोबत लेखकाचे छायाचित्रही जोडावे. लेखन पाठवण्याची अंतिम मुदत २४ फेब्रुवारी २०१६ ही असून, साहित्य टपालाने किंवा ई-मेलद्वारे पाठवता येईल. टपालाद्वारे लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता असा : महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स हाउस, दुसरा मजला, गोपाळकृष्ण गोखले पथ (एफसी रोड), शिवाजीनगर, पुणे. लिफाफ्यावर लघुत्तम/लघुकथा स्पर्धा असा स्पष्ट उल्लेख करायला हवा.

ई-मेलद्वारेही लेखन स्वीकारण्यात येणार असून, मजकूर वर्ड आणि पीडीएफ फाइल अशा दोन्ही स्वरूपांत पाठवावा. लेखकाने आपला पूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक द्यायला हवा. तसेच छायाचित्रही जोडायला हवे. लेखन पुढील ई-मेलवर पाठवावे : matamaifalpune@gmail.com

..........

स्पर्धा कशाची?

लघुत्तम कथा (शंभर शब्द), लघुकथा (एक हजार शब्द)

अंतिम मुदत : २४ फेब्रुवारी २०१६

पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स हाउस, दुसरा मजला, गोपाळकृष्ण गोखले पथ (एफसी रोड), शिवाजीनगर, पुणे

ई-मेल : matamaifalpune@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सिंहगड’ची बेकायदा डोंगरफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे लोणावळा येथील कुसगावमध्ये बेकायदा डोंगरफोड केल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मावळ प्रांत अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून या उत्खननाची इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशनद्वारे (इटीएस) मोजणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटने नेमके किती उत्खनन केले आहे याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार आहे. हा अहवाल आल्यानंतर उत्खननाची सरकारी दराने वसुली आणि त्यावर किमान पाच पट दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कुसगाव येथे सिंहगड इन्स्टिट्यूटने शैक्षणिक इमारती व वसतिगृह बांधले आहे. या इमारतींकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगरफोड केल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय, डोंगरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ मैदान तयार करण्यात येत आहे. या मैदानाकडे जाण्यासाठी खासगी वनक्षेत्रातील डोंगर फोडून रस्ता तयार करण्यात येत आहे. या उत्खननासाठी सिंहगड इन्स्टिट्यूटने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यासंबंधी संस्थेला दोनदा बेकायदा उत्खनन थांबविण्याची नोटीस देण्यात आली. त्याला संस्थेने दाद दिली नाही. या ठिकाणी नेमके किती उत्खनन झाले आहे याचे मोजमाप करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार मावळचे तहसीलदार शरद पाटील यांनी इटीएस मशिनद्वारे ही मोजणी सुरू केली आहे. येत्या दोन ते दिवसांत ही मोजणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर संस्थेला बेकायदा उत्खनन व त्यावर पाच पट दंड केला जाणार असल्याचे मावळचे प्रांत अधिकारी सुनील थोरवे यांनी सांगितले. सिंहगड इन्स्टिट्यूटने खासगी वनक्षेत्राच्या जागेत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम व डोंगरफोड केली आहे. हे काम अहोरात्र सुरू असल्याने ते थांबविण्याची नोटीस वनक्षेत्र अधिकाऱ्यांनीही दिली आहे. मात्र, त्यालाही इन्स्टिट्यूटने जुमानले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर. के. लक्ष्मण यांचे बालेवाडीत स्मारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि रंग-रेषांद्वारे राजकीय, सामाजिक, आर्थिक यांसह कोणत्याही विषयांतील विसंगती अचूक हेरणाऱ्या दिवंगत आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालेवाडीत त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या दीड वर्षांत हे स्मारक पूर्ण होईल, अशी अपेक्षा असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. लक्ष्मण यांचे गेल्या वर्षी जानेवारीत निधन झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस संस्थेच्या आवारात त्यांच्या कार्टूनचा अविभाज्य घटक असलेल्या 'कॉमन मॅन'चा पुतळा उभारण्यात आला आहे. बालेवाडीतील सर्व्हे क्र. २४/४ ब येथील मोकळ्या जागेत लक्ष्मण यांच्या नावे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचे, १ कोटी ५२ लाख रुपयांचे टेंडर स्थायी समितीने मान्य केले असून, 'सलिम कन्स्ट्रक्शन्स'तर्फे हे काम केले जाणार आहे. 'रंग-रेषांच्या दुनियेत आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या लक्ष्मण यांचे स्मारक त्यांच्यासारख्या श्रेष्ठ कलावंताला साजेसे असेल. त्यांच्या स्मारकातून नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल', अशी अपेक्षा स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी व्यक्त केली. आर. के. लक्ष्मण स्मारकाच्या प्रवेशद्वारावरच 'कॉमन मॅन'चा भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे. तळमजल्यावर पार्किंगच्या सुविधेसह 'हॉल ऑफ फेम' अंतर्गत लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे दालन उभारले जाणार आहे. चारशे स्क्वेअर फुटांचा प्रदर्शन हॉल, आर्टिस्ट पॉइंट, कॅफेटेरिया आणि दोनशे आसनक्षमता असणारे खुले प्रेक्षागृह (अॅम्फी थिएटर) ही या स्मारकाची काही वैशिष्ट्ये असतील. स्मारकाची रचनाही वेगळ्या पद्धतीने केली जाणार असून, येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने बाहेरील भिंतींची रचना केली जाणार आहे. यावरही लक्ष्मण यांची काही व्यंगचित्रे प्रदर्शित केली जातील. स्मारकाचे संपूर्ण काम दीड वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

'लक्ष्मण यांच्यासारख्या थोर कलावंतांचे स्मारक बालेवाडी परिसरात होणे, हे येथील नागरिकांचे भाग्य आहे. पुण्यात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आवर्जून स्मारकाला भेट देण्याची इच्छा होईल, अशा रीतीने त्याची उभारणी केली जाईल.' - बाबूराव चांदेरे, स्थानिक नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

अनुत्तीर्ण झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

लोहगाव येथील 'डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग'च्या मेकॅनिकल शाखेमध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मंगळवारी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या कॉलेजमध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी येणार होते. ते येण्यापूर्वी ही घटना उघडकीस आल्याने त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला.

प्रतीक अशोक पाटील (२०, सध्या रा. अजिंक्य डी. वाय. पाटील हॉस्टेल, मूळ - भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सत्र परीक्षेत पाचपैकी चार विषयांत तो नापास झाला होता. ही बाब वडिलांच्या लक्षात आल्यावर ते पुण्यात येण्यासाठी निघाले होते. त्या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता दिघी पोलिसांनी वर्तवली आहे.

प्रतीक मूळचा भुसावळ येथील असून, तो पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता. त्याने या हॉस्टेलच्या शौचालयामध्ये बेडशीटच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कॉलेजचे विद्यार्थी भेदरले होते. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने वडगाव शेरीतील एका विद्यार्थ्याने गेल्या वर्षी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते.

प्रतीक सोमवारी रात्री आईबरोबर फोनवर बोलला होता. त्याने आईला तो तीन विषयांत नापास झाल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्याचे वडील भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याचे त्याला समजले होते. त्यानंतर तो खूप तणावाखाली होता. त्याचे रूम पार्टनर मंगळवारी सकाळी आपापले आटोपून कॉलेजला निघून गेले होते. त्याचे वडील सकाळी अकराच्या सुमारास हॉस्टेलवर पोहोचले आणि त्यांनी प्रतीकचा शोध सुरू केला. बराच वेळ शोधूनही तो सापडत नसल्याने शेवटी हॉस्टेलच्या शौचालयात त्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे, शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

NCP-BJP ‘युती’ने पाणीपट्टीवाढ लादली

$
0
0

सरासरी पाणीपट्टी नऊशे रुपयांवरून अठराशे रुपयांवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधक असलेला भारतीय जनता पक्ष यांच्या नव्या युतीने अखेर लाखो पुणेकरांवर पाच वर्षांसाठी पाणीपट्टीवाढीचा बोजा लादला. काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचा विरोध डावलून मतदानाच्या जोरावर या दोन्ही पक्षांनी पाणीपट्टीतील वाढीस सर्वसाधारण सभेत मान्यता दिल्यामुळे पुणेकरांची सरासरी पाणीपट्टी नऊशे रुपयांवरून अठराशे रुपयांवर जाणार आहे.

शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी यंदा पाणीपट्टीत १२ टक्के, तर पुढील चार वर्षे प्रत्येकी १५ टक्के वाढ करून त्यानंतर २०४७पर्यंत प्रत्येक वर्षी पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. यावर सभेत दुपारी एक ते रात्री नऊ असे आठ तास जोरदार चर्चा झाली. पहिल्या वर्षी १२ टक्के आणि पुढील चार वर्षे १५ टक्के वाढ करावी, तसेच ही योजना राबवताना 'स्पेशल पर्पज व्हेइकल'ची (विशेष कंपनीची) स्थापना न करता पालिकेने स्वत: राबवावी, अशी उपसूचना मान्य करण्यात आली. वाढीला विरोध झाल्याने अखेर मतदानाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवलेल्या ५० टक्के वाढीच्या प्रस्तावात बदल करून स्थायी समितीने पहिल्या वर्षी १२ टक्के, तर त्यानंतरची चार वर्षे १५ टक्के वाढ सुचवली. काँग्रेससह शिवसेना, मनसेच्या सभासदांनी याला कडाडून विरोध केला. चार वर्षांनंतर सुरू होणाऱ्या योजनेसाठी पुणेकरांनी आतापासूनच जादा शुल्क का द्यायचे, असा प्रश्न विचारून, 'या वाढीमुळे पुढील पाच वर्षांत पुणेकरांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागणार आहे. शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, तसेच कंपन्यांकडे सुमारे पाचशे कोटी रुपयांची थकबाकी असतानाही तिच्या वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न न करता नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या सर्वसामान्यांवर हा अन्याय आहे,' असे सांगून मनसे, शिवसेना, काँग्रेस यांनी विरोध केला; मात्र मतदान घेऊन पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने पाणीपट्टीतील वाढ पुणेकरांवर लादण्यास यश मिळवले. या निर्णयास विरोध म्हणून मनसेचे सदस्य काळे कपडे घालून तब्बल आठ तास सभागृहात उभे राहिले, तर शिवसेनेच्या सदस्यांनीही महापालिकेत आंदोलन केले.

....

'खुलासा' झालाच नाही

प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पुणेकरांवर ही वाढ लादली जात असल्याचे टीकास्त्र सर्वपक्षीय सभासदांनी सोडले. महापालिका नियमावलीत प्रत्येक वर्षी करवाढीचा निर्णय घ्यावा, अशी तरतूद असताना २०४७पर्यंत वाढ करण्याचा अधिकार आयुक्तांना कुणी दिला, असा प्रश्न उपस्थित करून अनेक सभासदांनी पालिका आयुक्तांवर कडक शब्दांत टीका केली. या योजनेमुळे नक्की काय होणार, याची अंमलबजावणी कशी करणार, याचा खुलासा आयुक्तांनी करावा, अशी मागणी सभासदांनी वारंवार करूनही आठ तासांच्या चर्चेत एक चकार शब्दही आयुक्तांनी काढला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सं. स्वयंवर’ची पदे यू-ट्यूबवर

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे ः देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या संगीताने अजरामर झालेल्या 'संगीत स्वयंवर' या नाटकातील पदे स्व. हरिभाऊ देशपांडे यांच्या स्वतंत्र ऑर्गन वादनातून यू-ट्यूबवर ऐकता येणार आहेत. तसेच बालगंधर्वांच्या अमृतमय स्वरांची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. 'संगीत स्वयंवर' या नाटकाच्या शताब्दी वर्षानिमित्त हा अनमोल ठेवा रसिकांसाठी खुला होत आहे. नाटकातील नांदीने या अभिनव प्रयोगाची नांदी झाली आहे.

नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या 'संगीत स्वयंवर' या नाटकाचा पहिला प्रयोग १० डिसेंबर १९१६ रोजी झाला. यातील पदे आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत; पण मूळ नाटकातील बालगंधर्वांचे गायन व हरिभाऊ देशपांडे यांचे ऑर्गनवादन रसिकांना ऐकता येत नाही. ठराविक मंडळींकडे हा ठेवा जतन केलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे संजय देशपांडे हे होत. नाटकाच्या शताब्दी वर्षानिमित्त हा ठेवा रसिकांसाठी खुला करण्याचे देशपांडे यांनी ठरवले असून 'शताब्दी संगीत स्वयंवरची' हा कार्यक्रम मेहेंदळे मोशन पिक्चर्सच्या सहाय्याने यू-ट्यूबवर आकार घेत आहे. देशपांडे यांनी ही माहिती 'मटा'ला दिली.

'माझे वडील हरिभाऊ देशपांडे यांनी बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांना तब्बल ३० ते ३५ वर्षे संगीत नाटक व शास्त्रीय संगीताच्या बैठकीतून ऑर्गनची साथ केली. संगीत स्वयंवर या नाटकातील बालगंधर्वांच्या आवाजातील पदे तसेच वडिलांच्या स्वतंत्र ऑर्गन वादनातील पदे माझ्या संग्रही आहेत. जी नाट्यगीते हरिभाऊंच्या स्वतंत्र ऑर्गन वादनातून उपलब्ध नाहीत, ती हरिभाऊंनी त्या काळातील गायक, गायिकांना प्रत्यक्ष प्रयोग सुरू असताना केलेल्या साथीतून उपलब्ध आहेत. हा सारा ठेवा आम्ही रसिकांसाठी यू-ट्यूबवर उपलब्ध करत आहोत', असे देशपांडे यांनी सांगितले.

३० नाट्यगीते ऐकायला मिळणार!

थोडक्यात गाऊन कथानक पुढे न्यायचे असते, अशी पदे संजय देशपांडे ऑर्गनवर वाजवणार आहे, ती देखील यू-ट्यूबवर ऐकता येतील. या मालिकेसाठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र खरे यांनी निवेदन केले आहे. ही सुमारे ३० नाट्यगीते 'शताब्दी संगीत स्वयंवरची' या मालिकेद्वारे https://youtu.be/RqEaz_WEpdE या लिंकवर पाहायला, ऐकायला मिळतील. नाटकाची जुनी छायाचित्रेही या ठिकाणी पाहता येतील.

''संजय देशपांडे यांनी ऑर्गनवर वाजवलेली या नाटकाची नांदी सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाटकाच्या कथानकाप्रमाणे ही मालिका पुढे जाईल. शताब्दी वर्षाच्या अखेरीस म्हणजे १० डिसेंबर २०१६ रोजी शेवटचे पद उपलब्ध करून देण्यात येईल.'' - धनंजय मेहेंदळे , मेहेंदळे मोशन पिक्चर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर डुक्कर खिंडीत मंगळवारी दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेने इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यातील एका विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर, एक जण जखमी आहे.

पुरुषोत्तम रवींद्र साहू (वय २१, रा. विद्या निकेतन सोसायटी, उंड्री), निलेश पोपटराव गुळमकर (वय २३, रा. हडपसर) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पुरुषोत्तम सुधीर पुरोहित (२२, रा. उंड्री) हा जखमी झाला आहे. नोकरीसंदर्भात मुलाखत देऊन तिघेही दुचाकीने घरी परत येत असताना हा अपघात झाला. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिती अंधाळे (वय २१, रा. बी. टी. कवडे रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील के. जे. इजिनीअरिंग कॉलेजमध्ये तिघेही तिसऱ्या वर्षाला शिकत होते. कॉलेजच्या वतीने बालेवाडी येथील एका कंपनीत इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोकरीसंदर्भात मुलाखती ठेवल्या होत्या. त्यासाठी तिघेही एकाच दुचाकीने बालेवाडी येथे गेले होते. त्या ठिकाणी मुलाखत दिल्यानंतर ते परत दुचाकीने कात्रजकडे जात होते. त्यावेळी चांदणी चौकाकडून येणाऱ्या ट्रकने डुक्कर खिंडीत त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये साहू याचा जागीच मृत्यू झाला. तर, निलेश गुळमकर व पुरुषोत्तम पुरोहित गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. निलेश याचा रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर, पुरोहित याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. निलेश गुळमकर याच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. त्याचे वडील टेम्पो चालक आहेत. तो 'पार्टटाइम' नोकरी करून इजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. तर, साहू याचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ससून’मध्ये ओपीडी एकाच ठिकाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ससून हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर हवा तो बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) नेमका कोठे आहे याची पेशंटसह नातेवाइकांना शोधाशोध करावी लागत होती. आता ही शोधाशोध थांबणार असून त्याच इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील जागेत सर्व महत्त्वाच्या ओपीडी एकाच ठिकाणी तयार करण्यात येणार आहे.

या संदर्भात उपलब्ध जागेचे नियोजन करून त्यात दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत ससूनच्या ओपीडीचा कायापालट बदलण्याचा संकल्प ससून हॉस्पिटल प्रशासनाने सोडला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील गरिबांचे हॉस्पिटल म्हणून ससूनची ख्याती आहे. ससूनमध्ये रोज दोन हजारांहून अधिक पेशंट उपचारांसाठी बाह्यरुग्ण विभागात येत असतात. दर मंगळवारी, बुधवारी हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाच्या आजारांच्या पेशंटची गर्दी ससूनमध्ये दिसून येते. तर आठवड्याच्या अन्य दिवशी अस्थिरोग, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र, बालरोग, कान नाक घसा, सर्जरी यासारख्या विभागाच्या ओपीडी असतात. त्यामुळे पेशंटची सातत्याने ये-जा सुरू असते. परंतु, सकाळी नऊ वाजण्याआधी येऊन पेशंटला केस पेपरसाठी रांगेत उभे राहावे लागते. तेथून हवी ती ओपीडी नेमकी कोठे आहे याचा शोध घ्यावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर ओपीडींमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रकल्प हॉस्पिटल प्रशासनाने हाती घेतला आहे.

'ससून हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीत कॅज्युअॅलिटी विभागाशेजारील जागेत सध्या मेडिसीन, सर्जरी, टीबी या विभागाची ओपीडी आहे. इमारतीच्याशेजारील दुसऱ्या इमारतीत अस्थिरोग विभागाची ओपीडी सुरू असते. तर पहिल्या मजल्यावर स्त्री रोग, कान नाक घसा, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग या विभागाची ओपीडी सुरू असते. नव्या रचनेत तळमजल्यावर गर्भवती महिलांसाठी स्त्री रोग, अस्थिरोग, मेडिसीन तसेच तातडीचा कॅज्युअॅलिटी विभाग या विभागांची व्यवस्था करण्यात येणार आहे,' अशी माहिती सूसन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

पहिल्या मजल्यावर नेत्ररोग, कान नाक घसा, टीबी आणि त्वचारोग या विभागांच्या ओपीडीचे स्थलांतर करण्यात येणार आहे. उपलब्ध जागेत फेररचनेमध्ये बदल करून पेशंटना हवी ती ओपीडी शोधणे सोपे जावे हा उद्देश आहे. विविध ओपीडी दर्शविणारे फलक देखील लावण्यात येणार आहेत.


मे आय हेल्प यू?

ससूनमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या पेशंट, नातेवाइकांना डॉक्टर, हवा तो उपचाराचा विभाग शोधण्यासाठी धावपळ करावी लागते. हे टाळता यावे यासाठी 'मे आय हेल्प यू' हा कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात निवृत्त परिचारिका स्वेच्छेने पेशंटसाठी मार्गदर्शन, मदत करण्याचे काम करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता फोनवरूनही रेल्वे तिकीट रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रावर जाऊन तिकीट काढणाऱ्या (मॅन्युअली) प्रवाशांना यापुढे १३९ या हेल्पलाइनवर फोन करून आरक्षित तिकीट रद्द करता येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाडी सुटण्याच्या वेळेच्या आधी तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांची होणारी धावपळ थांबणार आहे.

रेल्वेची आरक्षित तिकिटे 'आयआरसीटीसी'च्या वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्र व अधिकृत एजंटांमार्फत काढता येतात. ऑनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना, ते ऑनलाइन रद्द करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध होती. आता 'मॅन्युअली' तिकीट काढणाऱ्यांनाही ती सुविधा उपलब्ध होणार आहे. या निर्णयाची येत्या पंधरवड्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी वेटिंगवर असलेल्या आरक्षित तिकिटाची चालू स्थिती १३९ या हेल्पलाइनला 'एसएमएस' किंवा फोनद्वारे विचारता येत होती. आता १३९ क्रमांकावर फोन करून प्रवाशाने 'पीएनआर' क्रमांक सांगितल्यानंतर तिकीट रद्द होणार आहे. या प्रक्रियेसाठी हेल्पलाइनवरील रेल्वे अधिकारी प्रवाशांकडून आवश्यक माहिती घेऊन कार्यवाही करणार आहेत. तिकीट रद्दची कारवाई पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला 'एसएमएस'द्वारे त्याची माहिती मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आयटीआयची परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून कॉलेजला निघालेल्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव एसटीने धडक दिली. यामध्ये एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे-ताम्हिणी रोडवरील माजगाव येथे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

निखील अनिल चव्हाण (वय १८, रा. बहिरवाडी, माणगाव, रायगड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर अंकुश धोंडिबा ढेबे (रा. कोळवाडी) हा विद्यार्थी जखमी आहे. याप्रकरणी एसटी चालक आत्माराम गायकवाड (रा. पिंपरी-चिंचवड) याच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश व अंकुश हे दोघेही माले येथील 'आयटीआय' कॉलेजमध्ये शिकतात. त्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. त्यामुळे दोघेजण सकाळी पेपर असल्याने दुचाकीवरून मालेला निघाले होते. त्यावेळी पुण्यावरून दोपोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने माजगाव येथे त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकी चालविणारा निखील हा एसटीच्या पुढच्या चाकाखाली चिरडला गेल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ढेबे हा बाजूला फेकला गेला. बसखाली अडकेल्या निखीलला बाजूला काढले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. ढेबे याला उपचारांसाठी पौडला पाठविले. याप्रकरणी पौड पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकांचा आंदोलनाचा विचार

$
0
0

पाच वर्षांतील १०८ कोटींचे अनुदान प्रलंबितच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनुदानित वसतिगृहांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत राज्यभरातील वसतिगृह चालक राज्यव्यापी आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. येत्या २३ फेब्रुवारीला मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारातील संत गाडगे महाराज धर्मशाळेत चालकांची बैठक होणार आहे. त्यात पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृहांना दिल्या जाणाऱ्या निधीला राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत सातत्याने कात्री लावली आहे. त्यामुळे पाच वर्षांत खर्चाच्या तुलनेत १०७ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी अद्याप मिळणे बाकी आहे. तसेच, शासकीय वसतिगृहांच्या तुलनेत अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तुलनेने खूपच कमी अनुदान दिले जात आहे. याबाबतची वृत्तमालिका 'मटा'मध्ये प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली आहे. आता राज्यभरातील वसतिगृह चालक मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह संस्था चालक असोसिएशनच्या माध्यमातून राज्यव्यापी लढा देणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सचिव अशोक शहा यांनी दिली.

पुण्यातील ज्ञानेश्वर वसतिगृहातील विद्यार्थी एक दिवस उपाशी राहिले, तसेच शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेपासून सर्वच ठिकाणी तीव्रतेने मांडला जातो. मात्र, अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे काणाडोळा केला जातो, असा आरोप शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केला आहे. राज्यातील सर्व अनुदानित वसतिगृहांमध्ये आठ हजार १०४ कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात. त्यामध्ये अधीक्षक, स्वयंपाकीण, चौकीदार आणि मदतनीस यांचा समावेश आहे. त्यापैकी अधीक्षक आणि स्वयंपाकीण ही पदे वसतिगृह योजनेतील मूळ पदे आहेत. त्यापैकी अधीक्षक हे पद मूलतः वेतन श्रेणीमध्ये होते. त्यांना प्राथमिक शिक्षकाच्या पन्नास टक्के वेतन निश्चित केले होते. आज प्राथमिक शिक्षकांना ४० हजार रुपये वेतन आहे. त्यानुसार अधीक्षकांना २० हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. या सर्व बाबी येत्या बैठकीत चर्चेला घेतल्या जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले. (समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासयंत्रणांची पुण्यात बैठक

$
0
0

संशयितांसह, उपलब्ध पुराव्याबाबत झाली चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंदराव पानसरे आणि कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी पुण्यात तपासाच्यादृष्टीने बुधवारी समन्वय बैठक घेतली. या बैठकीत संशयितांसह उपलब्ध पुराव्याबाबत चर्चा झाली करण्यात आली.

या तिन्ही हत्येच्या प्रकरणांचा तपासावर हायकोर्टाचे लक्ष आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार तपास करणाऱ्या यंत्रणांनी एकत्रित बैठक घेऊन तपासाबाबत चर्चा करणे अपेक्षित होते. त्यानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक आणि पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे प्रमुख संजय कुमार यांनी दिली. बैठकीसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष पोलिस महानिरीक्षक नीना सिंह, कर्नाटक पोलिस दलातील विशेष पोलिस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर, कोल्हापूरचे अधीक्षक पी. व्ही. देशपांडे, 'सीबीआय'चे अधीक्षक नंदकुमार नायर, एस. आर. सिंह, सहायक आयुक्त गणपत माडगूळकर आदी उपस्थित होते.

दाभोलकर हत्येचा तपास 'सीबीआय'कडे आहे तर, पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. कुलबर्गी यांच्या हत्येचा तपास कर्नाटक पोलिस करत आहेत. 'सीबीआय'च्या अधिकारी सिंह यांनी सकाळच्या सत्रात दाभोलकरांची हत्या झालेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे चौकशी केली. पाषाण येथील 'सीआयडी'च्या मुख्यालयात दिवसभर बैठक सुरू होती. दाभोलकर, पानसरे आणि कुलबर्गी यांच्या हत्येच्या घटनांमध्ये बरेच साधर्म्य आहे. त्याचा आधार घेऊन तिन्हीही तपास यंत्रणांनी एकत्रित तपास करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.

..............

'सीबीआय' करणार गोळ्यांची तपासणी

दाभोलकर यांच्या शरीरात मिळालेल्या बंदुकीच्या गोळ्या 'सीबीआय'कडे आहेत. त्यामुळे सीबीआयला पानसरे यांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या तपासासाठी हव्या आहेत. या दोन्ही गोळ्या जुळाल्या तर, मारेकरी एकच असावेत, असा निष्कर्ष काढण्यात येईल. त्यासाठी 'सीबीआय'ने कोल्हापूरच्या कोर्टात धाव घेऊन पानसरे यांच्या शरीरातील गोळ्या तपासासाठी मिळाव्यात, असा अर्ज केला होता. कोल्हापूर कोर्टाने 'सीबीआय'चा अर्ज मान्य करून तपास पथकाला आदेश दिले. त्यानुसार 'सीबीआय' पुढील दोन दिवसांत त्या गोळ्या ताब्यात घेईल. नंतर 'सीबीआय'च्या लॅबमध्ये गोळ्यांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढ ‘जैसे-थे’च

$
0
0

पाणीपट्टीत दुप्पट दरवाढीचा प्रशासनाचा विचार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरात दोन ते चार टक्के सुचविलेली दरवाढ फेटाळून चालू वर्षांप्रमाणेच करआकारणीची शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे केली आहे. या विषयी येत्या शनिवारी (२० फेब्रुवारी) होणाऱ्या सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, पाणीपट्टीत दुप्पट दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो लवकरच मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

शहरातील करांचे दर आणि करोत्तर बाबींच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव आयुक्त राजीव जाधव यांनी ११ जानेवारीला स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावर चर्चा होऊन आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थायी समितीने चालू आर्थिक वर्षाप्रमाणेच करवाढ कायम ठेवण्याची शिफारस २९ जानेवारीला सर्वसाधारण सभेकडे केली. तसा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता स्थायी समितीचाच निर्णय कायम ठेवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेत सद्यःस्थितीत मीटर पद्धतीने पाणीपट्टी वसुली करण्यात येते. त्याअंतर्गत घरगुती वापरासाठी पहिल्या ३० हजार रिडींगसाठी प्रति हजार लिटर पाण्याला अडीच रुपये, ३० ते ५० हजार लिटरला प्रतिहजार साडेपाच रुपये, ५० ते ७५ हजार लिटरला प्रतिहजार दहा रुपये आणि ७५ हजाराच्या पुढे प्रतिहजार लिटरला १५ रुपये याप्रमाणे आकारणी केली जाते. तसेच व्यावसायिक वापरासाठी प्रतिहजार लिटरला ३५ रुपयांप्रमाणे आकारणे केली जाते. या सर्वांसाठी जवळपास दुप्पट दरवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केला आहे. तो मंजुरीसाठी लवकरच सादर केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

....

असा आहे प्रस्ताव (करयोग्य मूल्यावर)

कर सध्याचे दर प्रस्तावित दर

सामान्य कर १३ ते २४% १५ ते २८%

मलप्रवाह कर ५% ६%

पाणीपुरवठा लाभ कर ४ ते ५% ५ ते ६%

पथ कर २ ते ३% ३ ते ४%

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images