Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रिपाइं’चे सासवडमध्ये ‘जेल भरो’

$
0
0
मुंबईतील इंदू मिलची साडेबारा एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकास मिळाली पाहिजे, या मागणीसाठी सासवड, जेजुरीसह तालुक्यातून रिपब्लिकन पार्टीने निदर्शने केली. तसेच, या वेळी १६५ रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी अटक करून घेत जेल भरो आंदोलन केले.

विद्यार्थ्यांना गवसली ‘सिलिकॉन व्हॅली’

$
0
0
एक मोठा कारखाना...नेहमीप्रमाणे कामाची लगबग...एवढ्यात अॅप्रन घातलेले काही शाळकरी विद्यार्थी तेथे येतात.. प्रत्येक गोष्ट कुतूहलाने पाहतात... अनेक प्रश्नही विचारतात...आणि केवळ सिनेमातच पाहिलेले जग प्रत्यक्ष अनुभवल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावरून स्पष्ट दिसत असतो.

मणक्याच्या फ्रॅक्चरवर आता ‘व्हेसलप्लास्टी’चा उपाय

$
0
0
वृद्ध महिलेचे ‘ऑस्टिओपोरेसिस’मुळे फ्रॅक्चर झालेल्या मणक्यांच्या ठिकाणी पूर्णपणे भूल न देता ‘व्हेसलप्लास्टी’च्या केलेल्या रोपणामुळे दबलेले मणके पूर्वस्थितीवर आणण्यात यश आले. त्यामुळे होणा-या वेदनेतून त्यांची सुटका झाली आहे.

‘सरकारी दुर्लक्षामुळे गड-किल्ल्यांची परिस्थिती बिकट’

$
0
0
केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग, अॅटर्नी जनरल, राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या पुरातत्व खात्याच्या संचालकांकडून होणा-या दुर्लक्षामुळे राज्यातील गड-किल्ल्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचा आरोप सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे.

ग्राहकाला २.२५ लाखांची नुकसानभरपाई

$
0
0
गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी नेऊन दिलेल्या कारला आग लागून कार जळून खाक झाल्याप्रकरणी कारमालकाला दोन लाख ३८ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्यायमंचाने इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

सिंचन फुगवट्याला धोरणांची कात्री लावा

$
0
0
‘मर्यादांची जाणीव असूनही फुगविलेल्या आकडेवारीच्या आधारे जलसंपदा खात्याने आवाक्याबाहेरील योजनांचा घाट घातला. खात्याचे कोणतेही प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची शाश्वती नव्हती. म्हणूनच, सिंचन घोटाळ्यासारखे गैरव्यवहार होण्यासाठी मूलभूत धोरणेच कारणीभूत आहेत. त्यांचा फेरविचार करण्याची गरज आहे,’ असे मत सिंचन विभागाचे मुख्य इंजिनीयर डॉ. विजय पांढरे यांनी रविवारी व्यक्त केले.

वाहनाच्या धडकेत मनोरुग्ण महिला ठार

$
0
0
‘एनआयबीएम’ रोडवर सर्वोदय सोसायटीच्या उत्तरेस शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने एक मनोरुग्ण महिला मृत्युमुखी पडली. कोंढवा पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीस्वाराला उडवले

$
0
0
कृषि महाविद्यालयाच्या गेटसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी पावणेसातच्या दरम्यान घडली. धनजंय रामकृष्ण काची (वय ३०, रा. दापोडी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी संजय रामकृष्ण काची (वय ३२, रा. दापोडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महिलेला चिरडले

$
0
0
गोल्फ क्लब चौक रोडवरील करण चायनीज कॉर्नरजवळ नुकतीच एका स्कॉर्पिओ गाडीने ८० वर्षांच्या महिला पादचा-याला चिरडून पळ काढल्याची घटना घडली. अपघातग्रस्त महिला ठार झाली असून, येरवडा पोलिस ठाण्यात जीप चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिष्यवृत्ती रकमेसाठी २ वर्षांची प्रतीक्षा

$
0
0
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव मंजूर होण्यास आणि संबंधित रक्कम शाळेकडे येण्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लोटत असल्याने शिष्यवृत्तीच्या रकमेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

इनोव्हेशनला जोड हवी अंमलबजावणीची!

$
0
0
‘इनोव्हेशनला अंमलबजावणीची जोड मिळाल्यासच उद्योगात यश मिळू शकते. त्यामुळे आंत्रप्रेनुअरने या दोन्हींची सांगड घालण्याची गरज आहे,’ असा कानमंत्र मॅरिको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हर्ष मारिवाला यांनी दिला.

बंग भारतीयांचा उत्साही रंग

$
0
0
नवरात्रीनिमित्त बंगभारतीच्या पिंपरी- चिंचवड शाखेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बंगाली संस्कृतीचे दर्शन घडविले. त्यामुळे शहरात सर्वधर्मीयांच्या सहभागाने आनंद द्विगुणित होऊ लागला आहे.

खंडणी मागणारा पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0
शहरातील एका खासगी कंपनीचा वितरक आणि त्याच्या भागीदाराकडे खोट्या नावाने खंडणी मागणाऱ्या एका ‘अॅक्टर’ला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. तो अण्णा पुजारी, दयानंद शेट्टी; तसेच नगर येथील विखे पाटील अशा खोट्या नावाने खंडणी मागत असे. काही चॅनेलवरील गुन्हेविषयक मालिकांमध्ये पोलिसाची भूमिका केली असल्याचे त्याने तपासात सांगितले.

प्रॅक्टीकलच्या मार्कांकडे दुर्लक्ष करू नका

$
0
0
महाराष्ट्राच्या विकासात बहुभाषिकांचा हात आहे. राज्यात सत्ता मिळविण्याची निवडणुक परिक्षा असेल तर बहुभाषिक आणि बहुधर्मियांकडे या परिक्षेत पास होण्याचे प्रॅक्टीकलचे मार्क आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बहुभाषिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने केला पाहिजे, असे केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.

भुंडेवाडीत साजरे होते म्हसोबाचे नवरात्र

$
0
0
राज्याच्या विविध भागात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना, जुन्नरजवळच्या भुंडेवाडी गावात मात्र म्हसोबा देवाचे नवरात्र बसविण्याची प्राचीन परंपरा जोपासली जात आहे.

कुत्र्याच्या मालकांना द्यावे लागणार हमीपत्र

$
0
0
पाचगाव पर्वती टेकडीवर कुत्र्यांना फिरायला घेऊन येणा-या नागरिकांना आता वन विभागाला हमीपत्र(अंडरटेकिंग) द्यावे लागणार आहे. कुत्र्याच्या उपद्रवामुळे वन्यप्राणी अथवा इतर नागरिकांना कोणतेही नुकसान झाल्यास कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. हाच न्याय शहरात इतरत्र लावण्यात आला, तर इतरांना त्रास देऊन प्राणी पाळायचे की नाहीत, याबाबत पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

लुटण्याचा प्रयत्न करणा-यास अटक

$
0
0
बिस्किटे अर्धवट खाऊन तोंडावर थुंकून ५० हजार रुपयांची रोकड लुटणा-या तमिळनाडू येथील आरोपीला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शंकरशेठ रोडवरील ‘एचडीएफसी’ बँकेच्या आवारात बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. अक्षय ज्ञानेश्वर काडगी (वय २३, रा. धनकवडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सर्वनन शिवा (वय २४, रा. तामीळनाडू) याला अटक करण्यात आली आहे.

दक्ष पोलिसांमुळे टळले शूट आउट

$
0
0
एस. पी. कॉलेजच्या मैदानाजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास खून करण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावून तयारीत असलेल्या तिघांना फरासखाना पोलिस स्टेशनच्या दक्ष कर्मचा-यांमुळे दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे मैदानात खेळत असलेल्या एका तरुणाचा जीव वाचू शकला. अटक केलेल्या तिघांकडून पोलिसांनी पाच कोयते आणि एक भरलेले पिस्तुल जप्त केले आहे.

पोलिसांना मारहाण करणा-यास अटक

$
0
0
पोलिस अधिकारी आणि त्यांच्या चालकास मारहाण करून त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करणा-या कारचालकास पोलिसांनी अटक केली. अरुण ज्ञानेश्वर मोरे (दुधानेवस्ती, कोथरूड) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तर, विनायक तुळशीराम दुधाने व अन्य दोन साथीदार फरार झाले आहेत.

कुणाच्या ‘बा’ला पण घाबरत नाही

$
0
0
कॅमेरासमोर चार कागद लांबूनच दाखवायची, क्षणिक प्रसिद्धीसाठी केले जाणारे हे उद्योग थांबवा. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोणतेही चुकीचे काम करत नसल्याने आपण कुणाच्या ‘बा’ला पण घाबरत नसल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images