Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कार्याध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत कार्याध्यक्षपदासाठी पंचरंगी निवडणूक रंगणार आहे. कार्याध्यक्षपदासाठी राजीव बर्वे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, श्रीधर कसबेकर आणि सुनील महाजन यांच्यात लढत होणार असून, ३३ जागांसाठी दाखल झालेल्या ९० अर्जांपैकी एक अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी ही माहिती दिली. मसापच्या निवडणुकीसाठी एकूण १३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यापैकी ९० अर्ज दाखल झाले. त्यातील अहमदनगर जिल्हा प्रतिनिदापदासाठीचा अशोक भानुदास यांचा अर्ज अवैध ठरला आहे. ठाणे (३), नाशिक (२), सांगली (१) आणि धुळे-नंदुरबार (१) या जिल्हा प्रतिनिधींची आणि पुणे शहर स्थानिक कार्यवाह क्र. ४ साठी माधव राजगुरू यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे आता या आठ जागा वगळता उर्वरित २५ जागांवर निवडणूक होणार आहे.

प्रमुख कार्यवाहपदासाठी प्रकाश पायगुडे, प्रमोद आडकर आणि सुनील महाजन, कोषाध्यक्ष पदासाठी योगेश सोमण, अनिल कुलकर्णी, सुनीताराजे पवार, सतीश देसाई आणि ह. ल. निपुणगे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. १) दीपक करंदीकर, ज्योत्स्ना चांदगुडे, स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. २) नीलिमा बोरवणकर, बंडा जोशी, जयंत भिडे, स्थानिक कार्यवापदासाठी (क्र. ३) स्वप्नील पोरे, उद्धव कानडे, स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. ५) रमेश राठिवडेकर, वि. दा पिंगळे आणि स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. ६) पदासाठी बाळासाहेब कुलकर्णी, घन:श्याम पाटील, प्रमोद आडकर हे निवडणूक लढवित आहेत.

पुणे शहर प्रतिनिधीपदासाठी संदीप सांगळे, श्रीधर कसबेकर, महेंद्र फाटे, सतीश देसाई, क्षितिज पाटुकले, शिवाजीराव पाटील, नंदा सुर्वे, शिरीष चिटणीस, अरविंद संगमनेरकर, मधुमिलिंद मेहेंदळे, शंतनू चिंधडे आणि अनिल गोरे यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आज, सोमवारी (२५ जानेवारी) अखेरचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

लेखक कुठे गेले ?

मराठी सारस्वतांची आद्य संस्था असलेल्या मसापमध्ये साहित्यिक नसलेले लोक पदांवर असल्याबाबत लेखकांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीत लेखकांचे स्वतंत्र पॅनेल उभे राहणार असल्याचीही चर्चा होती. प्रत्यक्षात, काही मोजक्या लेखकांचे अपवाद वगळता लेखकांनी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत लेखकांचे पॅनेल उभे राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साहित्य बाह्य लोकांचे मसापमध्ये काम काय, असा प्रश्न उपस्थित करणारे लेखक आता कुठे गेले अशी चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोटारचालकाकडून १६ लाखांना गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोटारीवर चालक म्हणून ठेवलेल्या तरुणाने मालकालाच खोटे बोलून सोळा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना बिबवेवाडी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरपत हरिराम बिश्नोई (वय २८, रा. सांचोर, राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत दुकान व्यावसायिक विनोद गांधी (वय ५५, रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गांधी यांचे पुणे सातारा रोडवर रोडवरील मशिन विक्री आणि भाड्याने देण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे राजस्थानातील पाच ते सहा कामगार आहेत. मुलगा सचिन आणि पुतण्या समीर देखील त्यांना मदत करतात.

गांधी यांना मोटारीवर चालकाची आवश्यकता होती. दुकानातील कामगारांच्या ओळखीतून त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी नरपत बिश्नोईला चालक म्हणून नोकरीस ठेवले. गांधी यांचा पुणे सातारा रोडव फ्लॅट आहे. त्या ठिकाणी कामगार नीलेश रंदे, मनोज पटेल व आरोपी नरपत राहण्यास आहेत. शुक्रवारी दिवसभर जमलेली १५ लाख ९५ रुपये घेऊन दुकान बंद करून गांधी मोटारीने घरी जात होते. त्यावेळी दुकानाजवळच आरोपी नरपत बिश्नोईने गांधी यांना थांबवून, पुतण्या समीरने पैसे मागितल्याचे सांगितले. गांधी यांनी रक्कम नरपतच्या हवाली केली. मात्र, त्याने ही रक्कम समीर यांना न देता घेऊन पळून गेला. या प्रकरणी गांधी यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फौजदार डी. व्ही. सपकाळे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर मानेंवर पेपरफुटीचा ठपका?

0
0

पुणे : राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरफुटीच्या अहवालात परीक्षा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष महावीर माने यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. जबाबदार व्यक्तींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केले.

एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टेट) पेपरफुटीचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मला मिळाला आहे. अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या परीक्षेचा पहिल्या भागाचा पेपर पुन्हा घेण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. त्यानंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणी महावीर माने यांच्याकडील पदभार काढणार का, या प्रश्नावर त्यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले. दरम्यान, चार जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर एक परीक्षेआधी फुटल्याचे निदशर्नास आले. त्यानंतर तावडे यांनी याबाबतचा अहवाल ४८ तासांत सादर करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीसाठी ‘मेट्रोझिप’ क्लिक

0
0

Prasad.Panse@timesgroup.com

पुणे : सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या हिंजवडीतल्या आयटीयन्सना 'मेट्रोझिप' हा खासगी बससेवेचा पर्याय 'क्लिक' झाला आहे. सध्या विविध मार्गांवर ९० बस चालविण्यात येत असून दिवसाला सुमारे ४२०० आयटीयन्स या सेवेचा लाभ घेत आहेत. वाढता प्रतिसाद लक्षात घेता लवकरच या सेवेचा विस्तारही करण्यात येणार आहे.

हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एचआयए) अध्यक्ष अनिल पटवर्धन व अॅडमिन व ट्रान्सपोर्ट विभागाचे प्रमुख कर्नल सी. एस. भोगल (निवृत्त) यांनी 'मटा'ला ही माहिती दिली. हिंजवडीमधील विविध आयटी कंपन्यांची समन्वय संस्था असलेल्या एचआयए आणि एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने ही बससेवा एक सप्टेंबर २०१४पासून सुरू करण्यात आली आहे. हिंजवडीत कामासाठी येणाऱ्या दीड लाखाहून अधिक आयटीयन्सपैकी फक्त ३० टक्केच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत होते. ही संख्या वाढावी, या उद्देशाने ही सुरक्षित खासगी बससेवा सुरू करण्यात आली होती. हा उद्देश काही प्रमाणात सफल होताना दिसत आहे. ही सेवा सुरू होत असताना फक्त ८९ आयटीयन्सनी या सेवेसाठी नावनोंदणी केली होती. त्यानंतर मात्र, नियमित बससेवेमुळे आयटीयन्सना हा पर्याय क्लिक झाला असून वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

'पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात राहणाऱ्या आयटीयन्सना हिंजवडीत येणे सोपे जावे, यासाठी सध्या ४१ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या ४१ मार्गांवरून सध्या दररोज ९० बस चालविल्या जातात. त्याचा आयटीयन्सना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागला आहे,' असे पटवर्धन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएस’चे सायबर वॉर

0
0

'आयएस'संबंधित ९४ वेबसाइट ब्लॉक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांची रुजू लागलेली पाळेमुळे उखडून टाकण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरुवात केली असतानाच, या दहशतवादी संघटनेकडून केला जाणारा जिहादचा ऑनलाइन प्रचार थोपवण्यासाठी, दहशतवाद विरोधी पथकानेही (एटीएस) दंड थोपटले आहेत. विचारांची लढाई विचारांनी करण्यासाठी, तसेच 'आयएस'च्या विचारांचे खंडन करण्यासाठी 'एटीएस' लवकरच आपली वेबसाइट सुरू करणार आहे. दरम्यान, 'आयएस'चा प्रसार करणाऱ्या जवळपास ९४ वेबसाइट ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

'दहशतवादाविरुद्ध पहिले पाऊल म्हणून 'एटीएस'कडून लवकरच वेबसाइट सुरू करण्यात येत आहे. 'आयएस'कडून सोशल ​मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा प्रचार थोपवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. 'एटीएस'कडून याबाबत 'आयडेंटिफाय', 'मॉनिटर', 'काऊंटर-रॅडिकलाइज्ड' आणि 'डिस्टर्ब' या चार पर्यायांचा वापर करण्यात येत आहे,' अशी माहिती राज्याच्या 'एटीएस'चे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसळकर यांनी पुण्यात दिली.

'राष्ट्रीय स्तरावर 'आयएस'च्या वाढत्या प्रभावाबाबत गांभिर्याने विचार करण्यात येत असून तपास यंत्रणांची आंतरराज्य मदत घेण्यात येत आहे. 'सोशल मीडिया'ला काऊंटर करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यावर कशी मात करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी काही 'टूल्स'चा वापर सुरू केला आहे तर काही नव्याने शिकण्यात येत आहेत. पालक, शिक्षक तसेच प्रार्थनास्थळांमधील धार्मिक गुरूंनी वाट चुकू पाहणाऱ्या तरुणांना योग्य रस्ता दाखवला पाहिजे. त्यासाठी 'एटीएस'कडून प्रबोधनचा कार्यक्रम हाती घेतला आहे. 'आयएस'शी संबंधित जवळपास ९४ वेबसाइट गेल्या सात ते आठ महिन्यांत ब्लॉक करण्यात आल्या आहेत,' असे फणसळकर म्हणाले.

राज्यात 'आयएस'चा प्रभाव

तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईमुळे आपल्या राज्यात 'आयएस'चा प्रभाव असल्याचे जाणवले आहे. देशभरात 'आयएस'चा प्रभाव असलेली जी काही दहा-बारा राज्ये आहेत, त्यात महाराष्ट्र एक आहे. 'एटीएस'कडून 'काऊंटर रॅडिकलायझेन्‍'साठी राज्यभर प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धार्मिक तसेच स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्यात येत असून त्यांची मोलाची मदत होत आहे, असे फणसळकर म्हणाले.

यापूर्वीची कारवाई

धुळे येथे पाच-सहा तरुणांचा एक ग्रुप तयार झाला होता. या तरुणांचे समुपदेशन करण्यासाठी शिक्षक तसेच स्थानिकांची मदत घेण्यात आली.

नवी मुंबई येथे मध्यवयीन व्यक्तीने 'आयएस' पाठिंबा असल्याचे ऑनलाइन घोषणा केली होती. या व्यक्तीचे समुपदेशन करण्यात आले आहे.

वैजापूर येथून एका तरुणाला 'एनआयए'च्या केसमध्ये अटक करण्यात आली.

माझगाव, जांभळी गल्ली येथून एका तरुणाला अटक केली.

मुंब्रा येथून आणखी एक तरुण गजाआड.

महाराष्ट्र 'एटीएस'ने परराज्यात एका युवकाला अटक केली असून त्याला गोरखपूर येथून मुंबईत आणण्यात आले आहे.

मालवणी येथील तीन तरुण गायब झाले होते. त्यातील दोन तरुण परत आले तर मोहमंद सुलतान हा देश सोडून गेला आहे.

पुण्यात १६ वर्षीय युवतीचा 'आयएस'ची संबंध आला होता. तिचे समुपदेशन करण्यात आले आहे.

महासंचालकांनी

घेतली बैठक

पोलिस महासंचालक प्र​वीण दीक्षित यांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेतली आहे. ​कोस्ट गार्ड, नेव्ही यांच्यासह विविध पोलिस दलांचा प्रतिनिधींचा या बैठकीत सहभाग होता. प्रजाकसत्ताक दिन तसेच पठाणकोट येथील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आल्याचे फणसळकर म्हणाले.

'आयएस'कडून धमकी नाही

'आयएस'कडून काही दिवसांपूर्वी 'एटीएस'ला धमकी देणारे पत्र मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर फणसळकर म्हणाले, 'महाराष्ट्र 'एटीएस'ला 'आयएस'कडून कोणतीही धमकी आलेली नाही आणि अशा धमक्यांना भीतही नाही.'

'एटीएस'मध्ये संभ्रम नाही

'आयएस'शी संबंध असल्याच्या संशयावरून काही तरुणांचे समुपदेशन करण्यात आले तर काहींवर अटकेची कारवाई झाली आहे. याबाबत फणसळकर म्हणाले, 'कायदा मोडणांऱ्यावर कारवाई होणारच. ज्यांनी कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई झाली. काही कायदा मोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना योग्यवेळी रोखण्यात आले. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात आले. ज्यांचे पुर्नवसन करणे शक्य आहे, त्यांचे करण्यात आले. 'एटीएस'मध्ये कारवाई करण्याबाबत कुठलाही संभ्रम नाही. समाज एकसंध राहावा, या दृष्टीकोनातून 'एटीएस'कडून निर्णय घेण्यात येतात.'

आहे तेथेच हल्ले करा

'आयएस'कडून त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या तरुणांना ते आहे तेथेच हल्ले करण्यास सांगण्यात येत आहे 'आयएस'चा प्रचार रोखण्यासाठी वेबसाइटद्वारा त्यांचा चुकीचा प्रचार रोखणे, नागरिकांना आश्वस्त करणे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, असे फणसळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिम्बॉयसिस’ची वेबसाइट हॅक

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील प्रख्यात शिक्षणसंस्था 'सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अँड कम्युनिकेशन'ची अधिकृत वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सने स्वत:चे नाव 'डॉन टू' असल्याचं वेबसाइटवर टाकलं असून अरबी भाषेतून धमकीही दिली आहे. हे हॅकर्स पाकिस्तान किंवा 'आयसिस'शी संबंधित संघटनेचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'सिम्बॉयसिस'च्या वेबसाइटच्या होमपेजवरच हॅकरने अरबी भाषेत धमकीचा मजकूर पोस्ट केला. 'ही केवळ एका युद्धाची सुरुवात आहे. यापुढं जगभरात आमचं राज्य प्रस्थापित होणार आहे,' अशा आशयाचा हा संदेश आहे. या संदेशात रशियाच्या 'एके ७४' या बंदुकांचा तसंच जगभरात युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या 'एफ १६' विमानांचा उल्लेख असल्यानं हे हॅकर्स आयसिसशी संबंधित असावा असा कयास आहे.




^ हॅकर्सने होमपेजवर पोस्ट केलेला अरबी भाषेतील संदेश

याआधी 'डॉन टू' टोळीनं चीनमधील एका विद्यापीठाची वेबसाइट हॅक करून त्यावर असाच संदेश टाकला होता. सिम्बॉयसिसची वेबसाइट मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत काही काळासाठी हॅक करण्यात आली होती. कॉलेज प्रशासनानं या प्रकाराची सर्व माहिती मिळविण्यासाठी आणि नक्की काय गोंधळ झाला, हे जाणून घेण्यासाठी एका खासगी कंपनीकडं हे प्रकरण सोपवलं आहे. विद्यार्थ्यांनी लॅपटॉवरून कॉलेजची वेबसाइट सुरू करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते.

दहशतवादी कारवायांबरोबच सायबर हल्ल्याच्या माध्यमातून जगभरात दहशत माजवण्याची कार्यपद्धती आयसिस व इतर दहशतवादी संघटनांनी सध्या अवलंबली आहे. या पूर्वीही भारतातील काही शिक्षण संस्थांच्या वेबसाइट पाकिस्तानी हॅकर्सकडून हॅक करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’शी संबंधित ९४ वेबसाइट ब्लॉक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेकडून केला जाणारा 'जिहाद'चा ऑनलाइन प्रचार थोपवण्यासाठी दहशतवादविरोधी पथकानेही (एटीएस) दंड थोपटले आहेत. विचारांची लढाई विचारांनी करण्यासाठी; तसेच 'आयएस'च्या विचारांचे खंडन करण्यासाठी 'एटीएस' लवकरच आपली वेबसाइट सुरू करणार आहे. 'आयएस'चा प्रसार करणाऱ्या जवळपास ९४ वेबसाइट ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

'एटीएस'कडून लवकरच पहिले पाऊल म्हणून वेबसाईट सुरू करण्यात येत आहे. 'आयएस'कडून सोशल ​मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. हा प्रचार थोपवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पयार्यांचा वापर करावा लागणार आहे. 'एटीएस'कडून याबाबत 'आयडेंटिफाय', 'मॉनिटर', 'काउंटर-रॅडिकलाइज्ड' आणि 'डिस्ट्रब' या चार पर्यायांचा वापर करण्यात येत आहे,' अशी माहिती राज्याच्या 'एटीएस'चे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसळकर यांनी पुण्यात दिली. या वेळी सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे उपस्थित होते.

'राष्ट्रीय स्तरावर 'आयएस'च्या वाढत्या प्रभावाबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत असून, तपास यंत्रणांची आंतरराज्य मदत घेण्यात येत आहे. 'सोशल मीडिया'ला काउंटर करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यावर कशी मात करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी काही 'टूल्स'चा वापर सुरू केला आहे, तर काही नव्याने शिकण्यात येत आहेत. पालक, शिक्षक; तसेच प्रार्थनास्थळांमधील धार्मिक गुरूंनी वाट चुकू पाहणाऱ्या तरुणांना योग्य रस्ता दाखवला पाहिजे. त्यासाठी 'एटीएस'कडून प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे,' असे फणसळकर

यांनी सांगितले. 'आयएस'शी संबंध असल्याच्या संशयावरून काही तरुणांचे समुपदेशन करण्यात आले, तर काहींवर अटकेची कारवाई झाली आहे. याबाबत फणसळकर म्हणाले, 'कायदा मोडणांऱ्यावर कारवाई होणारच. ज्यांनी कायदा मोडला, त्यांच्यावर कारवाई झाली. काही कायदा मोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना योग्य वेळी रोखण्यात आले; तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात आले. ज्यांचे पुनर्वसन करणे शक्य आहे, त्यांचे करण्यात आले.

चोख बंदोबस्त

'पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेतली. ​कोस्ट गार्ड, नेव्ही यांच्यासह विविध पोलिस दलांच्या प्रतिनिधींचा या बैठकीत सहभाग होता. प्रजाकसत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी या वेळी चर्चा करण्यात आली,' अशी माहिती फणसळकर यांनी दिली.

महाराष्ट्रात 'आयएस'ची पाळेमुळे

धुळे येथे पाच-सहा तरुणांचा एक ग्रुप तयार झाला होता. या तरुणांचे समुपदेशन करण्यासाठी शिक्षक; तसेच स्थानिकांची मदत घेण्यात आली.

माझगाव, जांभळी गल्ली येथून एका तरुणाला अटक केली.

मुंब्रा येथून आणखी एक तरुण गजाआड.

मालवणी येथील तीन तरुण गायब झाले होते. त्यातील दोन तरुण परत आले, तर मोहमंद सुलतान हा देश सोडून गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात १६ वर्षीय युवतीचा 'आयएस'ची संबंध आला होता. तिचे समुपदेशन करण्यात आले आहे.

'आयएस'चा वाढता प्रभाव

'तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईमुळे आपल्या राज्यात 'आयएस'चा प्रभाव असल्याचे जाणवले आहे. देशभरात 'आयएस'चा प्रभाव असलेली जी काही दहा-बारा राज्ये आहेत, त्यात महाराष्ट्र एक आहे. 'एटीएस'कडून 'काउंटर रॅडिकलायझेशन'साठी राज्यभर प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धार्मिक; तसेच स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्यात येत असून, त्यांची मोलाची मदत होत आहे,' असे फणसळकर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे नाट्यसत्ताक’ देणार नाट्यपर्वणी

0
0

पुण्यातील विविध नाट्यसंस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन सुदर्शन रंगमंच इथं सोमवारी 'पुणे नाट्यसत्ताक' या महोत्सवाचं उद्‍घाटन केलं. या वेळी 'तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य' या दीर्घकथेचं अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी केलं. त्यानंतर भरत नाट्य मंदिर इथं पुरुषोत्तम करंडक विजेत्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्‍सच्या 'उळागड्डी' आणि श्री बालाजी ऑन क्रिएशन्सच्या 'वास इज दास'चे प्रयोग रंगले. वाइड विंग्ज मीडिया आणि एक्स्प्रेशन लॅब यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पुण्यातील सर्वोत्तम नाटकांच्या महोत्सवास सोमवारी सुरुवात झाली. पुण्यात प्रथमच होत असलेल्या या महोत्सवास नाट्यरसिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. आज (दि. २६) महोत्सवात भरत नाट्य मंदिर इथं सकाळी ९.३० वाजल्यापासून विविध प्रयोग होणार आहेत. यात मोरया संस्थेचं 'संगीत बायकोची मैत्रीण', अथांग नाट्य निर्मितीचं '९९ बादची एक सफर', आसक्त कलामंचचं 'एएसएल पीएलएस', राजा परांजपे प्रॉडक्शन्सचं 'आपल्यातलं आणि त्यांच्यातलं' आणि थिएटर वर्कशॉप कंपनीचं 'मकबूल' हे प्रयोग होतील. बुधवारी (दि. २७) रात्री ९.३० वाजता भरत नाट्य मंदिर इथं फॅक्टरी संस्थेचं 'संगीत नुडोचा ससा' आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचं 'जार ऑफ एल्पिस' हे प्रयोग होतील. सात फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवास प्रवेशमूल्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जोशी-बर्वे यांच्यात सरळ लढत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकून तयारीत असलेल्या बहुतेकांनी माघार घेतली आहे. त्यामुळे कार्याध्यक्ष पदासाठी आता मिलिंद जोशी आणि राजीव बर्वे यांच्यात सरळ लढत होणार आहे. १७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मसाप निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. मुख्य निर्वाचन अधिकारी अॅड. प्रताप परदेशी, निवडणूक अधिकारी अॅड. सुभाष किवडे आणि डॉ. सुधाकर जाधवर यांनी सर्व अर्जांची छाननी करून अंतिम तयार केली आहे. उमेदवारांच्या अंतिम यादीची घोषणा २७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पॅनेल तयार करण्याची धावपळ सुरू होती. त्यासाठीच्या बैठकाही सुरू होत्या. मात्र, अखेरच्या टप्प्यात राजकारणामुळे बहुतेकांनी माघार घेतली. त्यामुळे आता सरळ लढती होणार आहेत.

कार्याध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांपैकी प्रकाश पायगुडे, श्रीधर कसबेकर आणि सुनील महाजन यांनी माघार घेतल्याने राजीव बर्वे व मिलिंद जोशी यांच्यात लढत होणार आहे. प्रमुख कार्यवाहपदाच्या निवडणुकीतून प्रमोद आडकर यांनी माघार घेतल्याने विद्यमान प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यात लढत होणार आहे. कोषाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतून अनिल कुलकर्णी, सतीश देसाई आणि ह. ल. निपुणगे यांनी माघार घेतली. त्यामुळे योगेश सोमण आणि सुनीताराजे पवार रिंगणात असल्याचे स्पस्ट झाले आहे.

मतदानाच्या प्रक्रियेत बदल?

मतदानाची प्रक्रिया सुविहित करण्यासाठी यंदाच्या मतदान प्रक्रियेत बदल करण्याची चर्चा अॅड. प्रताप परदेशी, अॅड. सुभाष किवडे आणि डॉ. सुधाकर जाधवर या निर्वाचन अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत मुलभूत बदल केल्याने गैरव्यवहार होणार नसल्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेत गदारोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नदीकाठच्या हरित पट्ट्यातील तब्बल १०४ एकर जागेचे रहिवास विभागात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महासभेत सोमवारी (२५ जानेवारी ) चांगलाच गदारोळ झाला.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन गावांतील नदीपात्रालगतच्या हरित पट्ट्यातील जमिनींचे नव्हे, तर शहरातील नदीकाठच्या सर्व जमिनींचे निवासीकरण करा, अशी मागणी सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली. तर, आयुक्तांनी राज्य शासनाच्या आदेशच बदलून सादर केल्याचा आरोप करत, शासनाचा प्रस्ताव जसाच्या तसा सादर करून विषयपत्रिकेतील प्रस्ताव मागे घ्यावा असा आदेश महासभेने दिला. तसेच, याबाबत १० फेब्रुवारी रोजी 'स्पेशल जीबी' घेण्याचा ठरावही संमत केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्दवाढ १९९७मध्ये झाली. नोव्हेंबर १९९७मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. त्याच वर्षी १८ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. महापालिकेच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा २०००मध्ये प्रसिद्ध झाला. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकास योजनेस राज्य सरकारने ३० ऑगस्ट २००८ आणि १८ ऑगस्ट २००९ रोजी भागश: (पार्टली) मंजुरी दिली.

नदी क्षेत्रातील निळी रेषा व लाल रेषेबाहेरील जे काही रहिवासी क्षेत्र आहे त्याला लागून काही हरीत क्षेत्र येते. मात्र, ते वापरात नाही. असे क्षेत्र ही रहिवासी करावे. यासाठी काही दुरुस्ती करून जवळपास १०० एकर जागा रहिवासी करण्यात येणार होती. जी नदी पात्रापासून ३० मीटर अंतराचा हरीत पट्टा वगळून विकसित करण्यात यावी अशी सूचना राज्य शासनाने महापालिकेला १५ जुलै २०१५ रोजीच केली होती.

सभा तहकुबीचे सत्र व काही वेळा विषयच तहकूब करणे या कारणामुळे त्याला सोमवारी मुहूर्त लागला, असे वाटले. मात्र, विषय मांडताना एकूण किती क्षेत्र रहिवासी होणार, नदी बरोबरच नाल्यालाही हाच नियम करणार का, पूर रेषा येण्यापूर्वी जी अनधिकृत बांधकामे या क्षेत्रात झाली ती अधिकृत होणार का, हा नियम नवीन गावांप्रमाणे जुन्या गावांनाही लागू करणार का, अशा एक ना कित्येक शंकांमुळे नगरसेवकांनी प्रश्नांचा व उपसूचनांचा भडीमार केला.

गेले दोन महिने तहकूब असलेल्या या प्रस्तावावर सोमवारी दोन तास चर्चा झाली. महापालिका वाढीव हद्द मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना-विकास क्षेत्राबरोबरच जुन्या विकास आराखड्यातील नदीकाठच्या जमिनींचेही सरकसकट निवासीकरण करावे. त्यामुळे सलग रहिवास क्षेत्र उपलब्ध होईल आणि सुनियोजित विकास होईल, असा आशावाद राष्ट्रवादी सदस्यांनी व्यक्त केला.

तसेच, या मूळ विषयाला १०-१५ उपसूचना देण्याची तयारी दर्शविली. तर, चर्चेदरम्यान आयुक्त राजीव जाधव यांनी राज्य सरकारचे पत्र वाचून दाखविले. त्यामुळे गदारोळ उडाला. आयुक्तांनी सरकारी पत्राचा 'स्यू मोटो' अर्थ काढून 'ध' चा 'मा' केला असा आरोप सदस्यांनी केला.

अपात्र झोपडीधारकांनाही अर्ज करता येणार

झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियमात महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात आल्याने १ जानेवारी २०००पूर्वीच्या अथवा नंतरच्या अपात्र ठरलेल्या झोपडीधारकांनाही पुन्हा अर्ज करता येणार आहे. निष्कासित झालेल्या झोपडीच्या पुराव्याआधारे, स्थळ पाहणी करून पात्र किंवा अपात्रबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. त्याच बरोबर स्पेशल जीबीच्या वेळेस शिक्षण मंडळाचे बजेट सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोगटेंच्या आठवणींना उजाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले...कुणालाही जिंकून घेणारे...विविध उद्योग, व्यवसायांचा पसारा सांभाळतानाही रसिकता जपणारे...गुणांचा गुणाकार व्हावा, या भावनेतून गुणग्राहकता जोपासणाऱ्या रावसाहेब गोगटे यांच्या विविध आठवणी जागवून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पाच कर्तृत्त्ववान व्यक्तींना सलाम करून रावसाहेब गोगटे गुणगौरव सोहळा रविवारी उत्तरोत्तर रंगत गेला.

गोगटे फाउंडेशनतर्फे संस्थापक रावसाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदापासून पाच निवडक मान्यवरांना रावसाहेब गोगटे गुणगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार सिम्बायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, जगप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुधाकर प्रभू, चितळे बंधूंचे श्रीकृष्ण चितळे, प्रसिद्ध स्त्रीआरोग्य तज्ज्ञ वैजयंती खानविलकर, ज्येष्ठ उद्योजक माधव किर्लोस्कर यांना प्रसिद्ध क्रिकेटपटू माधवराव आपटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनचे अरविंद गोगटे, ज्योती गोगटे, अनिल नेने, माधव गोगटे आदी या वेळी उपस्थित होते. फ्रान्सच्या अध्यक्षांसोबतच्या भेटीमुळे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा व्हिडिओ संदेश या वेळी दाखविण्यात आला. लेफ्टनंट जनरल सतीश सातपुते (निवृत्त), लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) आणि निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

'रसिकता, गुणग्राहकता आणि गुणांचा गुणाकार करण्याची भावना यामुळे रावसाहेब विलक्षण लोकप्रिय होते. व्यवसायाचीही उत्तम जाण त्यांना होती,' असे आपटे यांनी सांगितले. शिक्षणक्षेत्र अजूनही परमीटराजच्या बेड्यात अडकून पडले आहे. ही सरस्वती कधी स्वतंत्र होणार, असा सवाल डॉ. मुजुमदार यांनी उपस्थित केला. स्त्रीआरोग्याविषयीचे अज्ञान पाहून निर्माण झालेल्या तळमळीतून आयुष्यभर प्रबोधन व आरोग्यसेवा केली, असे डॉ. खानविलकर यांनी सांगितले. प्रभू, चितळे व किर्लोस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू महाराजांचा विद्यापीठात पुतळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या शुक्रवारी (२९ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीलगत दक्षिणेस हा पुतळा उभारण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता पुतळ्याचे अनावरण होईल. या वेळी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री गिरीश बापट,

खासदार अनिल शिरोळे, खासदार अॅड. वंदना चव्हाण, आमदार विजय काळे, महापौर दत्तात्रय धनकवडे

यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

'ब्राँझमध्ये घडविण्यात

आलेला हा पुतळा १२ फूट उंचीचा असून, सभोवती बाग व कारंजेही

तयार करण्यात आले आहे. शाहू महाराजांचे अनेक पुतळे

घडविण्याचा अनुभव असलेल्या पुण्याच्याच परदेशी आर्ट स्टुडिओच्या एस. बी. परदेशी यांनी हा पुतळा घडविला आहे,' असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले.

'शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे. शाहू महाराजांच्या इच्छेप्रमाणे सर्वसमावेशक शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे आणखी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांचे पुतळे विद्यापीठात उभारण्यात येत

आहेत. त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्यात येऊ नये,' असेही डॉ. गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मात्र मनाने अतिश्रीमंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सध्या प्रामाणिकपणा हरवला असून मालमत्तेसाठी भावां-भावामध्ये वैर निर्माण होत चालले आहे. पण, या जमान्यात सुद्धा प्रामाणिक माणसे शिल्लक असल्याचे एका भंगार व्यावसायिकाने आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे. भंगारामध्ये सापडलेले एक किलो सोने या भंगार व्यावसायिकाने प्रामाणिकपणा दाखवत मूळ मालकाला परत केले. पैशाची आवश्यता असतानादेखील भंगार व्यावसायिकाने दाखविलेला प्रामाणिकपणा लाखमोलाचा ठरला. सुभाष वडवराव असे या प्रामाणिक भंगार व्यावसायिकाचे नाव. वडवराव हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे. पुण्यात ते शिवाजीनगर परिसरात राहतात. गेली २५ वर्षे पुण्यात दारोदार फिरून हातगाडीवर भंगार माल गोळा करण्याचे काम करतात. त्यामुळे अनेकांची ओळख झालेली. त्यामुळे अनेकजण घरी जमा झालेले भंगार देण्यासाठी त्यांना घरी बोलवतात. अशाच प्रकारे गेल्या २२ डिसेंबर २०१४ ला त्यांना परिचयातील बांधकाम व्यावसायिक रमण निरगुडकर यांचा फोन आला. हिराबाग परिसरातील त्यांच्या परिचयाच्या श्रीराम पेंडसे यांच्या घरी काही भंगार माल असल्याचे निरगुडकर यांनी वडवराव यांना सांगितले. त्यानुसार वडवराव पेंडसे यांच्या घरी गेले. पेंडसे यांच्याकडे आजीची दोन जुनी कपाटे होती. ती वडवराव यांनी प्रत्येकी एक हजार रुपयाला विकत घेतली. ही कपाटे विकत घेतल्यावर वडवराव यांना प्रभात रोडवर त्या कपाटांसाठी गिऱ्हाईक मिळाले. कपाटे गिऱ्हाईकाला देण्याअगोदर तपासून पाहावीत, म्हणून त्यांनी कपाट उघडले. त्यावेळी त्यांना कपाटत एक कापडी पिशवी आढळली. ती त्यांनी उघडली असता, त्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने असल्याचे त्यांना दिसले. त्यांचे वजन एक किलोपेक्षा जास्त होते. ही पिशवी मिळताच वडवराव यांनी लगेचच ते निरगुडकर यांना कळवले. निरगुडकर आणि वडवराव हे पेंडसे यांच्या घरी गेले. त्यांनी सोन्याची पिशवी पेंडसे यांना परत केली. त्या वेळी पेंडसे यांनी वडवराव यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संकुचित मनोवृत्तीतूनच संगीतात भेद’

0
0

तुमच्याकडे नव्या पिढीचा शास्त्रीय संगीतकार म्हणून पाहिले जाते. नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही भारतीय शास्त्रीय संगीताकडे कसे पाहता? - आपल्याकडे आहे ते संगीतच खऱ्या अर्थाने जगाचे संगीत आहे. भारतीय संगीताला मानणाऱ्या, अनुभविणाऱ्या, शिकणाऱ्या अशा सर्वांसह जगाच्या संगीताचे उगमस्थान म्हणून मी भारतीय शास्त्रीय संगीताकडे पाहतो. भारतीय शास्त्रीय संगीत हे संगीतातल्या सगळ्या नव्या प्रयोगांचा पाया आणि संगीताचे जेवढे प्रकार आहेत त्या सर्वांचा आत्मा आहे, असेच मी म्हणेन.

संगीताची भाषा जगभरात एक आहे, असे म्हटले जाते. मात्र शास्त्रीय संगीत आणि फ्यूजन असा भेदही केला जातो. तुम्हाला तो मान्य आहे का? - ज्यांना संगीताचा व्यापार करायचा आहे, अशी संकुचित मनोवृत्तीची मंडळी आपापल्या सोयीप्रमाणे असा भेद करत असतात. फ्यूजन हा खूपच अलिकडचा शब्द आहे. वास्तविक पाहता १९५० पासून सिनेसंगीतातही असे प्रयोग झाले आहेत. संगीत या प्रक्रियेत खूप थर आहेत. कलाकार, त्यांना घडविणारे गुरू, संगीत कार्यक्रमांचे आयोजक, त्याचे निर्माते अशा अनेकांचा त्यात सहभाग असतो. आपापल्या सोयीप्रमाणे 'जॉनर' दिला जातो. माझ्यासाठी संगीताचे 'चांगले' आणि 'फारसे चांगले नसणारे संगीत' असे दोनच प्रकार आहेत. सुरांची आराधना करणाऱ्यांसाठी वाईट काहीच नसते.

झितार (इलेक्ट्रीक सितार) या तुम्ही निर्मिलेल्या वाद्याचे वर्णन करताना 'तंत्रज्ञान आणि परंपरेचा समन्वय' असा उल्लेख तुम्ही केलात. सुरुवातीला या वाद्यावर टीकाही झाली. संगीत क्षेत्रातली मंडळी आज त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात? - हे वाद्य सितार आणि गिटार यांचे एकत्रीकरण नाही, असे मी वारंवार सांगत आलोय. लोकांना गिटार सर्वाधिक माहीत आहे. त्यामुळे हे वाद्य सांगताना त्याचा संबंध गिटारशी जोडला गेला. खरेतर प्रयोग करणे आणि नव्या पिढीला त्यासाठी प्रोत्साहित करणे, या हेतूने मी त्याची निर्मिती केली. नाविन्यपूर्ण प्रयोग करणे ही गोष्ट कलाकाराला प्रवाही ठेवते. त्यामुळे टिका झाली तरीही मी माझा मार्ग सोडला नाही. एखादी गोष्ट लोकप्रिय होतेय किंवा खूप आवडतेय असे केव्हा समजले जाते, जेव्हा तिची कॉपी करणे सुरू होते. या वाद्याचे वेगळ्या रंगातले, आकारातले प्रकार केलेले दिसतात, झितारला वेगळे नाव देऊन ते वाजविल्याचे दिसते तेव्हा ते स्वीकारले गेल्याचे दिसते. रंग, नाव वा आकार बदलल्याने वाद्यात काही फरक पडत नाही. टीकेवर त्यामुळेच मी काही प्रतिक्रिया देणे टाळतो.

तुम्ही अनेक सिनेमांतल्या गाण्यांमध्येही 'म्युझिक पीस' वाजवले आहेत. सिनेसंगीत हे संगीतच नाही किंवा त्यात दम नाही, अशी टीका वारंवार होत असते. यावर तुमचे मत काय? - काही काळापूर्वी शास्त्रीय संगीतातल्या कलावंतांनी सिनेसंगीतात काही करणे हे प्रतिष्ठेचे समजले जात नसे. पण काळ हे मला वाटते सगळ्यावरचे उत्तर आहे. शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजांनीही सिनेसंगीतात योगदान दिले आहे. संगीत क्षेत्रात असे कोणी मानत नाही उलट ज्यांना स्टुडिओमध्ये संगीत गाणे, वाजवणे, रेकॉर्डिंग याचा अनुभव नाही; तेच त्यावर टीका करू शकतात. बडे गुलाम अली साहेबही सिनेमाच्या गाण्यासाठी गायले आहेत. भारतीय सिनेसंगीतात गानसम्राज्ञी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या लतादीदींच्या गाण्यात शास्त्रीय संगीत नाही किंवा या मंडळींचे काम कमी आहे, असे जर कोणी म्हटले; तर मग संगीतात काहीच नाही आणि मला संगीतातली काहीच माहिती नाही, असे मी म्हणेन.

पंडित या उपाधीपासून तुम्ही कटाक्षाने दूर राहता, त्याचे नेमके कारण काय आहे? - खरे सांगायचे तर, नावामागे ही पंडित वा उस्ताद अशी उपाधी लावण्याचा जमाना आता खूप मागे पडलाय. पूर्वी एखाद्या क्षेत्रात ठराविक काळानंतर त्या कलाकाराला आदर म्हणून रसिकांकडूनच या उपाध्या दिल्या जात, त्यांचा तसा उल्लेख होई. अशी उपाधी लागली की प्रसिद्धी वा आदर मिळतो, अशा भ्रमात काही मंडळी स्वतःहूनच एखाद्या कार्यक्रमाची वा मैफलीची जाहिरात करताना स्वतःच्या नावामागे या उपाध्या लावा, अशी सूचना करतात. मला वाटते, माझे काम पाहून तो आदर निर्माण व्हावा. माझ्या पालकांनी ठेवलेले नीलाद्री कुमार एवढे नाव त्यासाठी पुरे आहे. रसिकांचे प्रेम आणि आशीर्वाद ही सर्वांत मोठी उपाधी आहे. त्यामुळे मला पंडित, उस्ताद या गोंधळात पडायचेच नाही.

सितारसह आणखी कोणते वाद्य आवडते किंवा वाजवायचा मोह होतो? - मला खूप वाद्ये आवडतात. सितारसह मला गिटार, पियानो ही वाद्ये आवडतात. सितार वाजवण्यापूर्वी म्हणजे मी अडीचएक वर्षांचा असेन तेव्हा तबला वाजवायचो. ते वाजवणे लहान मुले जसे वाजवतात त्या प्रकारचे होते. एकाच वाद्याची निवड करायची झाल्यास मी 'तबला' हेच उत्तर देईन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’त होणार पुण्याचा समावेश?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेतील संभाव्य शहरांची यादी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज, मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत पुण्याचा समावेश निश्चित मानला जात आहे. स्मार्ट सिटी योजनेत देशभरातून निवडलेल्या ९८ शहरांमधून पहिल्या टप्प्यात १० ते १५ शहरांची निवड अपेक्षित आहे.

स्मार्ट सिटीच्या अंतिम २० शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी पुण्याने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतला होता. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यावरून, पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती, तरीही शहराचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. प्रजासत्ताकदिनी स्मार्ट सिटीत निवडण्यात आलेल्या शहरांची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता असून, त्यामध्ये पुण्याला स्थान मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

स्मार्ट सिटीबद्दल पुरेशी माहिती न दिल्याने; तसेच त्यासाठीचा आराखडा वास्तवदर्शी नसल्याची टीका करून पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत विरोध केला होता. अखेर, राज्य सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर पालिकेतील कारभाऱ्यांनी विविध उपसूचनांचा भडीमार करून स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. नागरिकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग हे योजनेचे वैशिष्ट्य ठरले होते. स्मार्ट सिटीअंतर्गत दाखल झालेल्या सर्व शहरांच्या आराखड्याच्या परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या शहरांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

मोदी यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. सुरुवातीला, प्रत्येक राज्याने त्यांच्या कोट्यानुसार ठरावीक शहरांची निवड केली. राज्यातून, दहा शहरांची निवड त्यामध्ये झाली होती. पहिल्या स्तरावर निवडण्यात आलेल्या ९८ शहरांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे गेल्या महिन्यात सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवार यांची प्रकृती स्थिर

0
0

पुणे : अस्वस्थ वाटल्याने रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणखी दोन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगण्यात आले. शरीरातील द्रव पदार्थांचा असमतोल बिघडल्यामुळे तसेच, रक्तदाबावर परिणाम झाल्याने पवार यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे रविवारी सायंकाळी पवार यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पवार यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. आणखी दोन दिवस पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य पोलिसांना राष्ट्रपती पदक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील पोलिस तसेच तुरुंग विभागातील ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरीव कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात पुणे पोलिसांसह, राज्य राखीव पोलिस दल, वायरलेस तसेच तुरुंगातील १८ ​अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय सेवेबद्दलचे राष्ट्रपती पदक पुरस्कार्थी : अतुल कलकर्णी (पोलिस सहआयुक्त मुंबई शहर), रवींद्र कदम (विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र), शशिकांत दत्तात्रय सुर्वे (सहायक आयुक्त, कुलाबा) आणि नागेश लोहार ( सहायक आयुक्त ठाणे शहर)

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे राष्ट्रपती पदक पुरस्कार्थी : हनुमंत भानुदास सुगावकर (फौजदार बंडगार्डन, पोलिस ठाणे), अरुण यशवंत बुधकर (सहायक फौजदार, पिंपरी पोलिस ठाणे), राजेंद्र शरद पोहरे ( सहायक फौजदार, विशेष शाखा, पुणे शहर), सुभाष पिलोबा रणवरे (सहायक फौजदार, एसआरपीएफ ग्रुप दोन, पुणे), सॅम्युअल सदानंद उजागरे (सहायक फौजदार, एसआरपीएफ ग्रुप पाच, दौंड), भरतरीनाथ दामू सोनावणे (सहायक फौजदार एसआरपीएफ ग्रुप एक, पुणे), मधुकर अर्जुन भागवत (सहायक फौजदार ग्रुप पाच, दौंड), सतीश रंगनाथ जामदार (सहायक फौजदार ग्रुप पाच, दौंड), हिम्मत लक्ष्मण जाधव (सहायक फौजदार, एसआरपीएफ ग्रुप पाच, दौंड) आणि प्रकाश लक्ष्मण ब्रह्मा (वायरलेस) हवालदार, पुणे.

सुधारसेवा पदक, येरवडा तुरुंग : राजेंद्र धामणे (कारागृह उपमहानिरीक्षक, औरंगाबाद), चंद्रमणी अर्जुन इंदूरकर (उपअधीक्षक, भायखळा जेल), अनिल रामू लोंढे (हवालदार, कोल्हापूर जेल), महेश हनुमंत हिरवे (शिपाई, येरवडा जेल), अमृत तुकाराम पाटील (शिपाई, प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोशी कुटुंबीयांनी नाकारला ‘पद्मश्री’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण अशी ओळख असलेल्या शरद जोशी यांना केंद्र सरकारने देऊ केलेला मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारला आहे. जोशी यांचे कार्य पुरस्कारापेक्षा मोठे आहे, असे सांगत विनयपूर्वक हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार देण्यात आला, असे जोशी यांच्या कुटुंबीयांतर्फे स्पष्ट करण्यात आले.

जोशी कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे निकटवर्तीय प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांनी 'मटा'ला या बाबत माहिती दिली. रविवारी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे जोशी यांच्या कन्या श्रेया शहाणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी शरद जोशी यांना सरकारतर्फे मरणोत्तर पद्मश्री देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शरद जोशी यांच्या भूमिकेला जागून शहाणे यांनी पुरस्कार स्वीकारण्यास विनयपूर्वक नकार दिला, असे म्हात्रे यांनी सांगितले.

व्ही. पी. सिंह पंतप्रधान असताना त्यांनी देखील जोशी यांना पद्मश्री जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्वतः जोशी यांनीच हा पुरस्कार नाकारला होता. शेतकऱ्यांबद्दल तसेच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांबद्दल सरकारला आपुलकी नाही. यापैकी कितींना सरकारने पद्म पुरस्कार दिले, असा सवाल जोशी यांनी एका लेखाद्वारे उपस्थित केला होता. त्यांची ही भावना लक्षात घेऊन तसेच त्यांचे कार्य हे पुरस्कारापेक्षा मोठे आहे, या भावनेतून हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

........

शरद जोशींनी आयुष्य वेचलेल्या कृषिकेंद्रित अर्थव्यवस्थेची सुरुवात करणे हाच त्यांच्यासाठी एकमेव पुरस्कार असू शकतो'.

सुरेशचंद्र म्हात्रे

..

पद्म पुरस्कारात पुणे उणेच

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये यंदा पुणे उणेच राहिले. पुण्यातील एकाही व्यक्तीचा पद्म पुरस्काराच्या यादीत समावेश होऊ शकला नाही. साहित्य, कला, शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य आदी विविध क्षेत्रात दीर्घकाळापासून पुण्यातील अनेक मान्यवर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यापूर्वी ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगगुरू बी. के. एस. अय्यंगार, डॉ. नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर) यांना गौरवण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीप्रदान’ची सक्ती नाही

0
0

कॉलेजस्तरावरील सोहळ्याबाबत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचे स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेसना कॉलेज स्तरावर पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्याची सक्ती करण्यात येणार नाही. ज्या कॉलेजेसना शक्य आहे, त्यांनी असा सोहळा करावा, किंवा काही कॉलेजेसनी एकत्र येऊन पदवीप्रदान सोहळा करावा. मात्र, त्याची सक्ती केली जाणार नाही, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कॉलेजेसवर अशी सक्ती केली जाऊ नये. अनेक छोट्या कॉलेजेसना असा कार्यक्रम करणे शक्य होणार नाही, अशी भूमिका प्राचार्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. गाडे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्याबाबत डॉ. गाडे यांनी भूमिका स्पष्ट केली. 'लहान कॉलेजेसवर याचा ताण येऊ नये, यासाठी त्यांच्यावर सक्ती केली जाणार नाही. काही कॉलेजेस एकत्रित असा सोहळा आयोजित करू शकतात. किंवा अन्य कॉलेजमध्ये आयोजित समारंभात या विद्यार्थ्यांना पदवी दिली जाऊ शकते,' असे डॉ. गाडे यांनी सांगितले.

'विद्यापीठातर्फे दर वर्षी पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये साधारणत: ८० ते ८५ हजार विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येते. यापैकी ३० हजार विद्यार्थीच प्रत्यक्ष कार्यक्रमाला येऊन पदवी स्वीकारतात. अन्य विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी पाठविण्यात येते. एका वेळी ३० हजाराच्या आसपास विद्यार्थी पदवी स्वीकारण्यासाठी आल्यानंतर त्यांना रांगेत उभे राहावे लागते. त्याचबरोबर व्यवस्थेवरही ताण येतो. याऐवजी कॉलेजस्तरावर विकेंद्रित पद्धतीने पदवीप्रदान सोहळा घेतल्यास ताण आणि गर्दीही कमी होऊ शकेल,' असे डॉ. गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अथर्वच्या प्रसंगावधानाने मिळाले जीवदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कसबा गणपतीजवळील एका इमारतीला लागलेल्या आगीत, दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अडकलेले एक वृद्ध दाम्पत्य...पतीची दृष्टी अधू, तर पत्नीला वृद्धत्वामुळे नीट चालता येत नाही अशी परिस्थिती... धुरामुळे ते गुदमरून जाऊ नये यासाठी, त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी विनवणी करणारा त्यांचा मुलगा... नातेवाइकांमध्ये पसरलेली घबराट व चिंतेचे वातावरण... अशा परिस्थितीत, एका युवकाने फायरब्रिगेडच्या शिडीच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावर जाऊन, ते दाम्पत्य असलेल्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या व व्हेंटिलेशनचा मार्ग मोकळा करून दिला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या वृद्ध दाम्पत्याला जीवदान देणाऱ्या त्या युवकाचे नाव अथर्व पाठक. शनिवार पेठेत राहणाऱ्या, गरवारे कॉलेजमध्ये कॉमर्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या व अवघे १९ वर्ष वय असलेल्या अथर्वमुळे त्या दिवशी मोठा अनर्थ ठळला. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील क्लिनिकला ११ ऑक्टोबरला मध्यरात्री आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी सुरक्षेस्तव गच्चीवर पोहोचले. मात्र, दुसऱ्या मजल्यावर राहणारे दत्तात्रय अंबादास वैद्य (वय ८०) आणि त्यांची पत्नी पार्वती (वय ७५) हे दोघे फ्लॅटमध्ये अडकून पडले होते. दत्तात्रय यांची दृष्टी अधू आहे, तर पार्वती यांना वृद्धत्वामुळे नीट चालता येत नाही. परिणामी, त्यांना काहीच हालचाल करणे शक्य नव्हते. दरम्यान, तेथे फायरब्रिगेडचे जवान दाखल झाले. त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. मात्र, त्यांनी आग आटोक्यात आणण्यास प्राधान्य दिले. काही जवानांनी त्या क्लिनिकच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचा फोडल्या व तेथून पाण्याचा मारा सुरू केला. तेथून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्याच खिडकीच्या वरच्या बाजूस वैद्य दाम्पत्याच्या बेडरूमची खिडकी उघडी होती. तेथून त्यांच्या फ्लॅटमध्ये धूर आतमध्ये जात होता. त्यामुळे वैद्य यांचा मुलगा, फायरब्रिगेडच्या जवानांना त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीच्या काचा फोडण्याची विनंती करीत होता. मात्र, फायरब्रिगेडचे जवान आग आटोक्यात आणण्यात व्यस्त होते. धुरामुळे जिन्यातून वर जाणे शक्य नव्हते. हे सर्व पाहून अथर्वने फायरब्रिगेडची शिडी घेऊन वर चढाई केली. खिडकीच्या काचा फोडल्या व वृद्ध दाम्पत्यास खिडकीजवळ ओढून घेतले. अथर्वच्या या प्रसंगावधनातेमु‍ळे वैद्य दाम्पत्यास जीवदान मिळाल्याची भावना त्यांच्या मुलाने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images