Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सीए परीक्षेचे निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंसी (सीए) परीक्षेत देशभरातील ५.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट अर्थात सीपीटी परीक्षेचा निकाल ३४.४५ टक्के लागला आहे. फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घट झाली आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) रविवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. डिसेंबर २०१५ मध्ये घेण्यात सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपसाठी ४२,४६९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी पावणेसहा टक्के म्हणजेच २, ४४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी या परीक्षेत ८.२३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा पहिल्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या ७७, ४४२ विद्यार्थ्यांपैकी १२.६१ टक्के म्हणजेच ९,७६४ विद्यार्थी यशस्वी झाले. तर दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या ७५ हजार ७७४ विद्यार्थ्यांपैकी ११.९९ टक्के म्हणजेच ९०८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सीए (फायनल) परीक्षेत चेन्नईच्या जेम्स जॉन ब्रिट्टो या विद्यार्थ्याने ७४.३६ टक्के गुण मिळवत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. तिरूपती येथील नागोलू मोहन कुमार याने ७१.५० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर कोलकाता येथील अविनाश संचेती याने ७०.७५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

डिसेंबर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सीपीटी परीक्षेचा निकाल ३४.४५ टक्के लागला. ही परीक्षा दिलेल्या ९९ हजार ७७ विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार १२९ विद्यार्थी उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाले. परीक्षेस बसलेल्या ६० हजार २७१ विद्यार्थ्यांपैकी २० हजार ६७९ म्हणजेच ३४.३१ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले. तर ही परीक्षा दिलेल्या ३८ हजार ८०६ विद्यार्थिनींपैकी ३४.६६ टक्के म्हणजेच १३ हजार ४५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तापमानात घट; थंडीत मोठी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तापमानात मोठी घट झाल्याने शहरात पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. शनिवारी १५.३ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान पाच अंशांनी उतरून थेट १०. ३ अंश सेल्सिअसवर आले. तापमानात झालेली घट आणि थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील दोन दिवसात तापमानात एक ते दोन अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

पुण्यात गेल्या चार दिवसात किमान तापमानात सातत्याने वाढ होत होती. शनिवारी हे तापमान १५ अंशांवर पोहोचले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर मात्र, तापमानाचा पारा घसरत गेला आणि रविवारी सकाळी साडेआठ वाजता १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तापमानात घट झाल्यामुळे रविवारी पहाटे शहराच्या अनेक भागात धुक्याची चादर पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी काहीशी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य प्रदेशच्या नैऋत्य भागात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे या भागात बाष्प जमा झाले आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे आणि बंगालच्या उपसागराकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे या वाऱ्यांचा संयोग मध्य प्रदेशाच्या काही भागावर होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत या भागात मेघगर्जना व गारांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम विदर्भातही जाणवणार आहे. विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी गारांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कारपुलिंग’चा वापर वाढणे आवश्यक

$
0
0

Prasad.Panse@

timesgroup.com

पुण्याच्या चारही दिशांना आता एमआयडीसी किंवा आयटी पार्कचे जाळे पसरलेले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा उपनगरातून दिवसाला अक्षरशः लाखो नोकरदार या परिसरात नोकरीसाठी येतात. परंतु, ठोस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने त्यांना स्वतःच्या वाहनाचाच वापर करावा लागतो. कारपुलिंगसाठीचा उत्साह केवळ नव्याचे नऊ दिवसच टिकला. मेट्रोझिपसारख्या खासगी सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असला, तरी त्यालाही मर्यादा असल्याने वाहनांची संख्या वाढतेच आहे.

टाटा मोटर्स, बजाज, सँडविक अशा कंपन्यांनी पुणे-पिंपरी चिंचवडच्या विविध भागातून कर्मचाऱ्यांसाठी विविध शिफ्टमध्ये बससेवा उपलब्ध केली आहे. कर्मचाऱ्यांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी किमान कामावर जाण्या-येण्यासाठी तरी त्यांची खासगी वाहने रस्त्यावर येत नाहीत. चाकण, तळेगाव, रांजणगाव, पिरंगुट या भागातही एमआयडीसी असली, तरी तेथील कर्मचारी बहुसंख्येने खासगी वाहनांचा वापर करतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले होते. या एमआयडीसींमधून पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून थेट बससेवा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

काही खासगी कंपन्या, विविध बीपीओ-आयटी कंपन्या कॅब सर्व्हिसेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची ने-आण करतात. परंतु, एका कॅबमधून तीन ते चारच कर्मचाऱ्यांची वाहतूक होत असल्याने कॅबची संख्या वाढते. ऑफिसला जाण्यासाठी कारचा वापर करणाऱ्यांमध्ये आयटी कंपन्यांमधील कर्मचारी आघाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले होते. उत्तम पगार, हाय स्टेटसमुळेही अनेकांनी कारचा वापर सुरू केला होता. परंतु, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रदूषणामुळे आयटी कंपन्यांनी यावर मार्ग काढावा, अशी मागणी होत होती. त्यावर उपाय म्हणून सुरुवातीला सोशल नेटवर्किंग व अन्य वेबसाइटव्दारे कार पूलिंगचा पर्याय समोर आला. एकाच किंवा जवळपासच्या कंपनीत काम करणाऱ्या व एकाच परिसरात राहणाऱ्या काही व्यक्तींनी एकाच कारमधून प्रवास करावा, असा हा प्रयत्न होता. परंतु, या नव्याची नवलाई काही दिवसच टिकली. प्रत्येकाची कामाची वेळ, व्हिजिट्स आणि मिटिंगची जागा वेगवेगळी असल्याने या पर्यायाने फारशी उचल खाल्ली नाही. आज अगदी मोजक्याच व्यक्ती सध्या कार पुलिंगचा वापर करतात. यातही एका कारमध्ये दोन किंवा जास्तीत जास्त तीन व्यक्ती प्रवास करतात. काहींना स्वतःची कार वापरणे प्रतिष्ठेचे वाटत असल्यानेही कारची संख्या वाढते आहे.

हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्के खासगी वाहनांचा वापर करतात. इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए) आणि एमआयडीसीच्या संयुक्त प्रयत्नातून दीड वर्षापूर्वी मेट्रोझिप या खासगी बससेवेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला ८९ प्रवाशांपासून आता नियमित तीन ते साडेतीन हजार कर्मचारी या बससेवेचा वापर करत आहेत. सुरक्षित, स्मार्ट व नियमित पर्याय उपलब्ध असल्याने या बससेवेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. जसजसी वापरकर्त्यांची संख्या वाढते आहे, त्या प्रमाणे या बसची संख्या व फेऱ्यांमध्येही वाढ केली जात आहे.

..

कर्मचाऱ्यांमध्ये जागृती आवश्यक

कारपुलिंग असो कंपनीची बस असो, कॅब असो किंवा मेट्रोझिपसारखी व्यवस्था, जोपर्यंत कर्मचाऱ्यांमध्ये या बाबतची जागृती होत नाही, तोपर्यंत याचा फारसा उपयोग होणार नाही. या आयटीयन्स किंवा कॉर्पोरेट वर्कर्सना त्यांना समजेल, पटेल अशा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून खासगी वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी याबाबत मार्गदर्शन करत त्यांचे मतपरिवर्तन घडविणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम पाळल्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल

$
0
0

Prashant.Aher@

timesgroup.com

पुणे : पुण्यात दिल्लीप्रमाणे सम-विषम वाहतूक व्यवस्था राबवणे योग्य होणार नसल्याची प्रति​क्रिया वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुण्यात वाहतुकीची कोंडी होत असली तरी दिल्ली-मुंबईच्या तुलनेत तितकी तीव्र समस्या अजूनही जाणवत नाही. पुणेकरांनी वाहतुकीचे नियम पाळले, तरी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

दिल्लीत सम-विषम वाहतूक व्यवस्थेचा प्रयोग राबवण्यात आला. या प्रयोगादरम्यान दिल्ली पोलिसांनी सुमारे दहा हजार चालकांवर कारवाई करून दोन कोटी रुपयांचा दंडही वसूल केला. मात्र, दिल्ली सरकारला अखेर हा प्रयोग गुंडाळावा लागला. दिल्लीचे क्षेत्रफळ आणि वाहनांची संख्या यांचे गुणोत्तर विषम झाल्याने दिल्लीकरांचे वाहतुकीचे गणित बिघडले आहे.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसताना दिल्लीसारख्या सम-विषम वाहतूक व्यवस्थेचा विचार करणे योग्य ठरणार नसल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. पुणे-मुंबईत असा प्रयोग केला, तर तो दिल्लीसारखाच फसेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका खासगी संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार पुण्यात दररोज एक कोटीवेळा नियम मोडले जातात. याचाच अर्थ एक चालक एकाहून अधिक वेळा नियम मोडतो. वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी इतिहास रचून वीस कोटी रुपयांहून अधिक दंडाची रक्कम जमा केली होती. पोलिसांची आकेडवारी पाहता नियम मोडणाऱ्या दहा टक्के चालकांवरही कारवाई होत नाही. तटस्थ आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण केली गेली, तरच नियम मोडणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी होईल.

..

दंडाची पावती थेट घरी

पुण्यातील रस्त्यांवर बिनधास्त नियम मोडून बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या निष्काळजी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महापालिका, पोलिस, परिवहन विभाग (आरटीओ) यांना एकत्र घेऊन नवीन अॅप विकसित करण्यात येत आहे. 'सीसीटीव्ही'चा उपयोग करून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थेट घरातच दंडाची पावती दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीला बेशिस्तीचा हातभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील वाहतूक व्यवस्था हाताबाहेर जात असताना, त्याला पुणेकरांच्या वाहतूक बेशिस्तीने हातभारच लागतो आहे. लेनची शिस्त तर सोडाच; पण सिग्नलही शक्यतो न पाळण्यासाठीच असतात, असा समज असलेल्या बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात या पुणेकरांसाठी नित्याच्याच बाबी बनल्या आहेत.

पुण्यामध्ये अनेक ठिकाणी एकेरी वाहतुकीचा प्रयोग करूनही वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहनांची वाढती संख्या; मात्र त्या प्रमाणात रुंद नसलेले रस्ते, सार्वजनिक वाहतुकीचा उडालेला बोजवारा या कारणांबरोबरच वाहनचालकांची बेशिस्त हेही पुण्यातील वाहतूक समस्येमागचे एक मोठे कारण आहे, हे वाहनचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. वाहनचालकांमधील स्वयंशिस्तीचा अभाव हेही अनेक अपघातांचे प्रमुख कारण असल्याचेही आता समोर येत आहे.

पुणे हे पूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ते स्वयंचलित दुचाकींचे शहर झाले आहे. चारचाकी गाड्यांच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येत चालल्याने आता जवळपास प्रत्येक घरात एक चारचाकी गाडी आहे. या सर्व गाड्या रोजच्या रोज रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी अनुभवास येते. शाळा आणि ऑफिस भरण्या किंवा सुटण्याच्या वेळातच नाही, तर दिवसभरात कोणत्याही वेळी हल्ली कोंडी ही असतेच. प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई हे वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण आहे. सिग्नलला लाल दिवा असूनही वाहनचालक आपल्या गाड्या पुढे दामटताना दिसतात. ही घाई इतकी भीषण असते, की एखाद्या वाहनचालकाने सिग्नल पाळायचा ठरवला, तर त्याला मागून येणाऱ्या गाडीची धडक बसणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. गल्लीबोळातून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनचालकांनी सर्वसाधारपणे कमी वेगात येणे आणि मुख्य रस्त्यावरील वाहनांना आधी जाण्याची संधी देणे अपेक्षित असते. मात्र, विशेषतः दुचाकीस्वारांना हा संकेत मान्यच नसतो. ते आपली गाडी अशा काही तोऱ्यात दामटतात, की मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या वाहनालाच थांबणे भाग पडावे.

एका दुचाकीवरून तीन-तीन जणांनी प्रवास करणे, रात्रीच्या वेळी उगाचच आरडाओरडा करत गाड्या दामटणे, विचित्र कर्णकर्कश हॉर्न वाजवत राहणे असे प्रकारही सर्रास सुरू असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीविक्रेत्याकडून भाजी खरेदी करताना दुचाकीस्वारांचा गाडी पार्क करायचे कष्ट न घेता दुचाकीवर बसूनच खरेदी करायचा अट्टाहास असतो. त्यामुळे होणाऱ्या कोंडीकडे ते सोयीस्कर कानाडोळा करताना दिसतात.

..

शिस्त सर्वांच्याच फायद्याची

वाहतूक नियम मोडल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यावर त्यांच्यावरच अरेरावी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. यावरून अनेकदा हमरीतुमरीवर येण्याचेही प्रसंग घडतात. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा येतात. वाहतूक कोंडी ही कोणाच्याच फायद्याची नाही, याचे भान ठेवून वाहनचालकांनी किमान शिस्त बाळगण्याचा पण केला, तरी पुणेकरांचा रोजचा प्रवास सुखकर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालण्यास प्रोत्साहन देणारी व्यवस्था हवी

$
0
0

Kuldeep.Jadhav@

timesgroup.com

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचे सरासरी चालण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. भाजी आणण्यापासून ते किरकोळ खरेदीपर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी दुचाकींचा वापर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहराचे नियोजन करताना नागरिकांना जास्तीत जास्त चालण्यास प्रोत्साहन मिळावे, या दृष्टिने सरकारच्या नगररचना विभागाने शहराची रचना केली पाहिजे. भाजी मंडई, शाळा यासारख्या अत्यावश्यक गोष्टी घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असल्या पाहिजेत. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल.

परदेशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये या पद्धतीने शहरांचे नियोजन करण्यात आहे. अनेक देशातील नागरिकांचे सरासरी चालणे हे भारतातील शहरी नागरिकांपेक्षा अधिक आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे रस्त्याच्या कडेला सायकल ट्रॅक उभारण्यात आला. त्याप्रमाणे परदेशात पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्याच्या मध्यवस्तीत हा प्रयोग करणे शक्य आहे का, याबाबत साशंकता आहे. मात्र, नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरात नक्कीच हा प्रयोग करता येईल. नगररचना विभागाने याबाबत गांभीर्याने विचार करावा. केवळ या सुविधा देऊन भागणार नाही, तर लोकांमध्ये त्याबाबत जागृती करावी लागेल.

याखेरीज शहरातील खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा एकमेव उपाय आहे. पुणे व पिंपरी चिंचवडची वाहनसंख्या ४० लाखाच्या पुढे गेली आहे. दररोज त्यामध्ये हजारो वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे ही वाढ रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. बीआरटी, मेट्रो हे पर्याय आहेत. मात्र, त्या व्यतिरिक्त आणखी काय करता येऊ शकते, याची पडताळणी केली पाहिजे. चंद्रपूरसारख्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस 'कार मुक्त' दिवस घोषित करण्यात आला आहे. पुण्यातील वाहतुकीची परिस्थिती त्याहून गंभीर आहे. मात्र, आपल्याकडे त्यादृष्टिने काही उपाययोजना केल्या जात नाहीयेत.

--------

मध्यवस्तीतील कोंडी टाळावी

शहराच्या मध्यवस्तीत खरेदी किंवा अन्य कामानिमित्त दररोज लाखो लोक येतात. पेठांमधील रस्ते खूपच अरुंद असल्याने येथे वाहतूक कोंडी प्रचंड होते. या वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड परिसरात कामानिमित्त येणाऱ्यांना त्यांची वाहने डेक्कन, नदीपात्र किंवा स्वारगेट या भागात पार्क करूनच पुढे येणे बंधनकारक करावे. आतादेखील काही सुज्ञ वाहन चालक त्यांची चारचाकी वाहने डेक्कन नदीपात्रात लावून खरेदीसाठी जातात. हे सर्वांसाठी बंधनकारक केल्यास पेठांमधील रस्त्यावरील वाहनांची संख्या ५० ते ६० टक्क्यांनी कमी होऊ शकेल.

--------

लायसन्सपद्धती कडक हवी

आरटीओकडून वाहन चालविण्यासाठी दिले जाणारे लायसन्स सध्या सहज मिळते. त्यामुळे लायसन्सची प्रक्रिया खूप कठीण केल्यास झपाट्याने वाढणाऱ्या वाहन संख्येला अटकाव घातला जाईल. लंडनमध्ये वाहन चालविण्याचे लायसन्स काढण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. तसेच, लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण होणे, म्हणजे मोठे दिव्य समजले जाते. त्याप्रमाणे आपल्याकडील लायसन्स वितरणाची प्रक्रिया बनवली पाहिजे. म्हणजे, कमी संख्येने चांगले वाहनचालक निर्माण होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्ययनाचा ‘कॅमेरा देखा’ हाल

$
0
0

Siddharth.kelkar@timesgroup.com

पुणे : आपण जे शिकलो, ते आपल्याला प्रत्यक्षात येते, की नाही, याचा 'कॅमेरा देखा' हाल मांडू शकणारी 'प्रोसेसफोलिओ' ही नवतंत्रज्ञानावर आधारित मूल्यमापन यंत्रणा महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) विकसित केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या कागदी प्रमाणपत्रापेक्षा विद्यार्थी नक्की किती शिकला, याचा सप्रमाण पुरावा देणारी 'व्हिडिओ प्रमाणपत्र' व्यवस्था यामुळे तयार झाली आहे.

'एमकेसीएल'ने एमएस-सीआयटी या कम्प्युटर प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी ही 'प्रोसेसफोलिओ' पद्धत गेल्या वर्षीपासून वापरण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत ५२,००० विद्यार्थ्यांनी असे प्रोसेसफोलिओ तयार केले आहेत,' अशी माहिती 'एमकेसीएल'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांनी 'मटा'ला दिली.

'प्रोसेसफोलिओ' ही यंत्रणा वापरण्यास अगदी सोपी आहे. एमएस-सीआयटीचे विविध स्तरांवरील अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी ते जे काही शिकले आहेत, त्याचे प्रयोग कम्प्युटरवर करताना त्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण या यंत्रणेद्वारे करू शकतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम करतो आहे आणि त्याला भेटकार्ड तयार करण्याचा प्रकल्प कम्प्युटरवर करायचा आहे. अशा वेळी कम्प्युटरवर भेटकार्ड तयार करण्याचे काम सुरू करताना, विद्यार्थी प्रोसेसफोलिओ नावाच्या आयकॉनवर क्लिक करतो. त्यामुळे कम्प्युटरवरील कॅमेरा सुरू होतो. त्या कॅमेरात सहा एलईडी आहेत; तसेच माइकही आहे. विद्यार्थी भेटकार्ड करताना त्याचे कॅमराद्वारे चित्रीकरण होते. एलईडीमुळे चित्रीकरणाचा दर्जा चांगला राहतो. त्याचप्रमाणे हा प्रकल्प सुरू असताना विद्यार्थी त्याबाबत माहितीही देतो, जी माइक असल्याने चांगल्या प्रकारे ध्वनिमुद्रित होते. अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या संपूर्ण प्रकल्पाचे ऑनलाइन ध्वनिचित्रमुद्रण होते.

'एका मिनिटाला एक एमबी एवढ्याच क्षमतेची फाइल निर्माण होत असल्याने संपूर्ण प्रकल्प पाच मिनिटांचा असेल, तर पाच एमबीचीच फाइल तयार होते. ही व्हिडिओ फाइल विद्यार्थी यूट्यूबवर अपलोड करू शकतो; तसेच पेन ड्राइव्हमध्येही घेऊन जाऊ शकतो. हे विद्यार्थ्याने स्वतःच स्वतःचे केलेले पुरावाजन्य मूल्यमापन आहे. 'एमकेसीएल'तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावरही त्याचा उल्लेख केला जातो. एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी किंवा अगदी नोकरीच्या वेळीही या व्हिडिओ दस्तावेजाचा उपयोग होऊ शकतो,' असे सावंत यांनी स्पष्ट केले.

..

विद्यार्थी प्रत्यक्षात काय आणि किती शिकला, याचा थेटच पुरावा मिळत असल्याने परीक्षा पद्धतीचे परिवर्तन करण्याची क्षमता या नव्या पद्धतीत आहे. विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या विकासाचा असा व्हिडिओ बायोडेटा बनवून त्याचे दस्तावेजीकरण करणेही शक्य आहे.

- डॉ. विवेक सावंत

व्यवस्थापकीय संचालक, एमकेसीएल

..

ऑनलाइन शब्दकोशात दखल

'एमकेसीएल'ने सुरू केलेल्या प्रोसेसफोलिओ या पद्धतीची दखल मॅकमिलनच्या ऑनलाइन शब्दकोशानेही घेतली आहे. 'प्रोसेसफोलिओ हा इंग्रजीतील नवा शब्द म्हणून त्याची नोंद करण्यात आली असून, त्याचा अर्थ देऊन, तो तयार करण्याचे श्रेय 'एमकेसीएल'ला देण्यात आले आहे,' असे विवेक सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्य महामंडळाचा कारभार भ्रष्टांच्या हाती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

पाच साहित्यिकांची समिती नेमून संमेलनाध्यक्षाची निवड करा, या शरद पवार यांच्या भूमिकेला सहमती दर्शवत, 'अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कारभार भ्रष्ट असून साहित्याशी संबंध नसलेल्या लोकांच्या ताब्यात महामंडळ आहे. साहित्यात पारंगत नसलेली ही मंडळी निवडणुकीत मात्र तरबेज आहेत. अशा लोकांच्या ताब्यात महामंडळ आहे हे दुर्दैव आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी रविवारी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर तोफ डागली.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात शरद पवार यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून साहित्यिकांचे कान उपटले, यापार्श्वभूमीवर संमेलनात आलेल्या वाघ यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, शरद पवारांची भूमिका योग्य आहे, असे सांगून त्यांनी सहमती दर्शवली. पत्रकारांशी बोलताना वाघ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच बरसले.

'रा. चिं. ढेरे, ना. धों. महानोर अशा प्रज्ञावंतांना संमेलनाध्यक्ष करा. महामंडळाचा कारभार भ्रष्ट असून निवडणुकीची पद्धत चुकीची आहे. साहित्याशी संबंध नसलेल्या लोकांच्या ताब्यात महामंडळ आहे. साहित्याशी त्यांना काही घेणे-देणे नाही. ही मंडळी साहित्यात तरबेज नसली तरी निवडणुकांमध्ये तरबेज आहेत. अशा लोकांच्या हाती महामंडळाचे भविष्य आहे, हे दुर्दैव आहे,' अशी टीका त्यांनी केली.

वाद नको म्हणून बोललो

साहित्य संमेलन चांगल्या वातावरणात पार पडावे. संतभूमीची रणभूमी होऊ नये असे वाटत होते. वारकऱ्यांच्या भूमीत वाद नको, या भावनेने संमेलन रद्द करा, असे विधान आपण केल्याचा खुलासा विठ्ठल वाघ यांनी केला. 'पंतप्रधानांच्या संदर्भातील वक्तव्यामुळे श्रीपाल सबनीस यांनी दिलगिरी व्यक्त केली, हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाविषयी टिप्पणी करायला मी विद्वान नाही,' असा टोला वाघ यांनी लगावला. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाघ उमेदवार होते.
..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डीपी’विरोधात जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करताना राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा आराखडा तयार केला आहे. सार्वजनिक हिताची अनेक आरक्षणे या समितीने वगळण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने केलेल्या चुकीच्या आराखड्याची माहिती सर्वसामान्य पुणेकरांना व्हावी, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन जनजागृती आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचा मतदारसंघ असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून रविवारी या जनजागृती आंदोलनाला रविवारी सुरुवात झाली.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार शरद रणपिसे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, रोहीत टिळक, नगरसेवक दीपक मानकर, आप्पा रेणुसे, बाबूराव चांदेरे, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, प्रशांत जगतात यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'डीपी हटाव शहर बचाव', 'नही चलेंगी नही चलेंगी आयुक्तांची हुकुमशाही नही चलेंगी' अशा आशयाचे फलक हातात घेऊन राज्य सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.

'पुणेकरांना नक्की काय हवे आहे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, याची कोणतीही कल्पना नसलेल्या अधिकाऱ्यांना शहराचा डीपी तयार करण्याचे काम राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे यामध्ये पुणेकरांचा विचार झालेला नाही. खेळाची मैदाने, उद्याने, लहान मुलांसाठी बाग अशी अनेक महत्त्वाची आरक्षणे रद्द करण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे. बिल्डरला खूश करण्यासाठी हा डीपी तयार करण्यात आला आहे,' असा आरोप खासदार चव्हाण यांनी केला.

समितीने तयार केलेल्या डीपीच्या अंमलबजावणीमुळे शहरातील नागरिकांवर कोणते संकटे येणार आहे, याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील सात विधानसभा मतदारसंघात हे आंदोनल केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. डीपीमधील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष छाजेड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यसनमुक्ती साहित्य संमेलन गोंदियाला

$
0
0

पुणे : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित चौथे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २२ व २३ जानेवारीला गोंदिया येथे होणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संमेलनाचे उद्घाटन २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह उपस्थित राहणार आहेत. तर, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. तसेच, या वेळी वर्ष २०१५-१६च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण होईल, असे बडोले यांनी सांगितले.

या दोन दिवसांच्या संमेलनात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता रोखण्यात महिलांचा सक्रिय सहभाग, शेतकरी आत्महत्यांना व्यसनाधीनता कितपत जबाबदार, संत साहित्यातून व्यसनमुक्तीचा संदेश, आदी विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या संमेलनाच्या अनुषंगाने विविध चित्रफिती आणि पथनाट्ये तयार करण्यात आली आहेत. या माध्यमातून समाजप्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही बडोले आणि कांबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेचे व्यवहार संशयास्पद : शेट्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
'सध्या वायदेबाजाराच्या माध्यमातून होणारा साखर खरेदी-विक्री व्यवहार संशयास्पद आहे, त्यामुळेच मी गेल्या आठवड्यात त्याची तक्रार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे,' असे खासदार राजू शेट्टी यांनी बारामती भेटीदरम्यान पत्रकार परिषदेत सांगितले.

'गेल्या वर्षी जुलै महिन्यत साखरेचे दर १८०० ते १९०० होते. मात्र, कालचा दर ३२०० रुपये होता. इतका मोठा चढ-उतार हा अनैसर्गिक वाटतो. साठेबाजाराच्या माध्यमातून कमी भावाने साखर खरेदी करायची आणि भविष्यात तीच साठेबाजी केलेली साखर चढ्या भावाने विक्री करायची असा व्यापाऱ्यांचा डाव आहे. त्यामुळे दर वाढूनही साखरेचा उठाव होत नसल्याची बोंब कारखानदार करत आहेत,' असे शेट्टी म्हणाले.

'शेतकऱ्यांना जादा भाव देता यावा, म्हणून निर्यातीला सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जे साखरेचे दलाल कमी भावने साखरेची खरेदी करून साठेबाजीत पुन्हा जादा दराने साखर विक्री करतील अशा ट्रेडिंग कंपन्यावर नजर ठेवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, वायदे बाजाराला माझा विरोध नसून वायदे बाजाराच्या माध्यमातून होत असलेल्या सट्टेबाजीला माझा विरोध आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

'वायदे बाजाराचा दर पाडण्यासाठी उपयोग होतो. ज्या ट्रेडिंग कंपन्यांचा साखरेशी कोणताही संबंध नाही, मात्र त्यांनी साखर खरेदी केली अशा संबंधित ट्रेडिंग कंपन्याची चैकशी करण्यात यावी व साखर खरेदीसाठी कोणाच्या काळ्या पैशाचा वापर करण्यात आला याचाही खुलासा सरकारने करावा,' अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेक्षकांच्या गोंधळाचा ‘पिफ’मध्ये ‘शो’

$
0
0

पुणे : विख्यात इराणी दिग्दर्शक जाफर पनाहीचा बहुचर्चित 'टॅक्सी' चित्रपट पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे 'पिफ'मध्ये गोंधळ उडाला. अखेर आयोजकांवर पोलिसांना बोलावून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर काढण्याची वेळ आली. त्यामुळे प्रेक्षक आणि आयोजकांमध्ये वादाचा प्रसंग उद्भवला.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) रविवारी जाफर पनाही दिग्दर्शित टॅक्सी हा चित्रपट आयनॉक्स चित्रपटगृहात दुपारी चार वाजता दाखवण्यात येणार होता. हा चित्रपट जगभरात चर्चिला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी पुण्यातील चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र, टॅक्सीच्या स्क्रीनिंग दाखवण्यात आलेल्या चित्रपटाला बसलेल्या प्रेक्षकांनी चित्रपट संपल्यावर प्रेक्षागृह सोडले नाही. त्यामुळे टॅक्सीच्या स्क्रीनिंगसाठी आलेल्या प्रेक्षकांना आत सोडता येत नव्हते. त्यामुळे चित्रपट सुरू होण्यास विलंब झाला.

महोत्सवाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर समर नखाते यांनी प्रेक्षकांना बाहेर येण्यास विनंती केली. तरीही प्रेक्षक आपल्या जागा सोडण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांना बोलावण्याची वेळ आली. या प्रकारात पोलिसांनी हस्तक्षेप करून बसलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृह सोडायला लावले. त्यामुळे बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांढरदेवी यात्रेसाठी प्रशासनाचे नियोजन

$
0
0

पुणे : मांढरदेवी येथील काळूबाईची यात्रा येत्या २२ ते २४ जानेवारी दरम्यान होणार असून या यात्रेसाठी वाहतुकीपासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंत नियोजन करण्यात येणार आहे. या यात्रेला किमान अडीच लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे.

मांढरदेवी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. या काळात वाहतूक व्यवस्थापासून सर्वच बाबींचे नियोजन करावे लागते. त्यासाठी भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी महसूल, पोलिस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मांढरदेवीची यात्रा सुकर होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मांढरदेवी यात्रेसाठी भाविक वाहने घेऊन येतात. भोरमध्ये वाहने आल्यानंतर मांढरदेवीला जाण्यासाठी घाट लागतो. या घाटात वाहने थांबल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे घाटात कोणतेही वाहन उभे राहणार नाही यादृष्टीनेही नियोजन केले जात असल्याचे बर्डे यांनी सांगितले. या यात्रेसाठी सातारा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रथमच मायक्रोप्लॅनिंग केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेक्षकांच्या गोंधळाचा ‘पिफ’मध्ये ‘शो’

$
0
0

पुणेः विख्यात इराणी दिग्दर्शक जाफर पनाहीचा बहुचर्चित 'टॅक्सी' चित्रपट पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे 'पिफ'मध्ये गोंधळ उडाला. अखेर आयोजकांवर पोलिसांना बोलावून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर काढण्याची वेळ आली. त्यामुळे प्रेक्षक आणि आयोजकांमध्ये वादाचा प्रसंग उद्भवला.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) रविवारी जाफर पनाही दिग्दर्शित टॅक्सी हा चित्रपट आयनॉक्स चित्रपटगृहात दुपारी चार वाजता दाखवण्यात येणार होता. हा चित्रपट जगभरात चर्चिला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी पुण्यातील चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र, टॅक्सीच्या स्क्रीनिंग दाखवण्यात आलेल्या चित्रपटाला बसलेल्या प्रेक्षकांनी चित्रपट संपल्यावर प्रेक्षागृह सोडले नाही. त्यामुळे टॅक्सीच्या स्क्रीनिंगसाठी आलेल्या प्रेक्षकांना आत सोडता येत नव्हते. त्यामुळे चित्रपट सुरू होण्यास विलंब झाला.

महोत्सवाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर समर नखाते यांनी प्रेक्षकांना बाहेर येण्यास विनंती केली. तरीही प्रेक्षक आपल्या जागा सोडण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांना बोलावण्याची वेळ आली. या प्रकारात पोलिसांनी हस्तक्षेप करून बसलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृह सोडायला लावले. त्यामुळे बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समान नागरी कायदा अमलात यायला हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हिंदू आणि मुस्लिम या धर्मांत कायद्यामुळे एक भिंत निर्माण झाली आहे. ती भिंत तोडण्यासाठी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तरच, एकात्मता अस्तित्वात येईल,' असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय एकता समितीतर्फे राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष बाबा आढाव, परिषदेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, प्रमुख वक्ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, उद्घाटक डॉ. जब्बार पटेल, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर, शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे, विजय साळकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर आदी या वेळी उपस्थित होते.

'देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. त्यानंतरही एकात्मता परिषद घ्यावी लागत आहे, ही शर्मेने मान खाली घालावी लागणारी गोष्ट आहे. आपण देशासाठी राष्ट्र हा शब्द वापरतो, पण सामाजिकदृष्ट्या हा देश कधीही एक नव्हता. देश एकात्म करण्यासाठी मुस्लिम तरुणांनी आग्रही भूमिका घेऊन समान नागरी कायद्याची मागणी केली पाहिजे,' असे कसबे यांनी सुरुवातीला स्पष्ट केले.

'हिंदू मूलतत्त्व वादापेक्षा मुस्लिम मूलतत्त्ववाद अधिक घातक आहे. मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांकडून जगभरात निष्पाप जिवांच्या कत्तली केल्या जात आहेत,' असे कसबे यांनी सांगितले. 'देश एकात्म करायचा की नाही, हे तरुणांनी ठरवावे. देश घडवायचा असेल, तर सर्व जाती, धर्म व पंथातील तरुणांनी एकत्रित येऊन आपली शक्ती निर्माण करावी. आणि त्याद्वारे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करावा, तरच न्याय मिळेल, असे आवाहन कसबे यांनी केले. 'सरकारच्या अपंगत्वावर डोस कसा द्यायचा, हा खरा प्रश्न आहे. शेतकरी कामगारांना मिळणारा पैसा महागाई घेऊन जात आहे. दुसरीकडे, भारतीय राज्यघटना धोक्यात आहे,' असे मत आढाव यांनी व्यक्त केले.

'संविधान बचाव'चा ठराव

'संविधान बचावा'साठी पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न आणि देशभर प्रचार करण्याबाबतचा ठराव या परिषदेत करण्यात आला. बाबा आढाव यांनी हा ठराव मांडला. त्यास प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी अनुमोदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे-मुंबई दरम्यान धावणार ‘अश्वमेध’

$
0
0

पुणेः राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या व अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असलेल्या 'अश्वमेध' या गाडीच्या सफारीचा लाभ पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवाशांना घेता येणार आहे. एसटीने मुंबई-हैदराबाद या मार्गावर 'अश्वमेध' ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. ती बस पुणे-सोलापूर मार्गे जाणार असून त्या बसला स्वारगेट थांबा देण्यात आला आहे.

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते गुरुवारी या बससेवेचे उद्घाटन झाले. 'अश्वमेध' गाडीत करण्यात आलेल्या इंटेरिअरमुळे गाडीचे वजन वाढले होते. त्यामुळे त्या गाड्या पेणमध्ये आरटीओ पासिंगविना पडून होत्या. अखेर या गाड्या दाखल होऊन आता धावू लागल्या आहेत.

'अश्वमेध' गाडी स्कॅनिया कंपनीची असून मल्टिअॅक्सल, मल्टिस्पेशालिटी बस आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तीन एलईडी टीव्ही बसविले आहेत. मुंबई सेंट्रल बस स्टँडवरून दुपारी एक वाजता हैदराबादकरीता बस सुटणार आहे. ती स्वारगेटला सायंकाळी पाच वाजता पोहोचेल, तर रात्री सव्वादोन वाजता हैदराबादला पोचेल. आणि हैदराबाद येथून ही बस दुपारी दोन वाजता परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे. मुंबई-हैदराबादचे प्रवासभाडे एक हजार ७३४ रुपये आहे, तर मुंबई-पुण्याचे तिकीट ४४२ रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’विरोधात जनजागृती

$
0
0

काँग्रेस आ‌णि राष्ट्रवादीच्या आंदोलनाला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करताना राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा आराखडा तयार केला आहे. सार्वजनिक हिताची अनेक आरक्षणे या समितीने वगळण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने केलेल्या चुकीच्या आराखड्याची माहिती सर्वसामान्य पुणेकरांना व्हावी, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन जनजागृती आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचा मतदारसंघ असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून रविवारी या जनजागृती आंदोलनाला रविवारी सुरुवात झाली.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार शरद रणपिसे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, रोहीत टिळक, नगरसेवक दीपक मानकर, आप्पा रेणुसे, बाबूराव चांदेरे, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, प्रशांत जगतात यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'डीपी हटाव शहर बचाव', 'नही चलेंगी नही चलेंगी आयुक्तांची हुकुमशाही नही चलेंगी' अशा आशयाचे फलक हातात घेऊन राज्य सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.

'पुणेकरांना नक्की काय हवे आहे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, याची कोणतीही कल्पना नसलेल्या अधिकाऱ्यांना शहराचा डीपी तयार करण्याचे काम राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे यामध्ये पुणेकरांचा विचार झालेला नाही. खेळाची मैदाने, उद्याने, लहान मुलांसाठी बाग अशी अनेक महत्त्वाची आरक्षणे रद्द करण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे. बिल्डरला खूश करण्यासाठी हा डीपी तयार करण्यात आला आहे,' असा आरोप खासदार चव्हाण यांनी केला.

समितीने तयार केलेल्या डीपीच्या अंमलबजावणीमुळे शहरातील नागरिकांवर कोणते संकटे येणार आहे, याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील सात विधानसभा मतदारसंघात हे आंदोनल केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. डीपीमधील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष छाजेड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीही करा महापालिकेचे बजेट...

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणारे महापालिकेचे बजेट तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये पुणेकरांचा थेट सहभाग असावा यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढाकार घेतला असून, पुणेकरांच्या बजेटविषयीच्या अपेक्षा व सूचना जाणून घेऊन त्या थेट महापालिकेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जगामध्ये अनेक शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे बजेट तयार करण्यामध्ये नागरिकांचा थेट सहभाग घेतला जातो. भारतामध्येही बंगळूरमध्ये अशा प्रकारे नागरिकांना सहभागी करून घेऊन बजेट तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुणे महापालिकेने २००६मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष रशीद शेख यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहभागाने बजेट तयार करण्यास प्रारंभ केला आहे. पण प्रारंभी नागरिकांच्या थेट सहभागाने तयार होणारा अर्थसंकल्प हा नंतर नगरसेवकांना त्रासदायक ठरू लागला. त्यानंतर, सर्वसाधारण सभेने ठराव करून नागरिकांनी केलेल्या सूचना या परस्पर अर्थसंकल्पात दाखल करण्याऐवजी त्या नगरसेवकांना विचारूनच दाखल करण्यात याव्यात, असे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर या प्रक्रियेला खीळ बसली होती.

त्यामुळे, आता 'मटा'ने यामध्ये पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये नागरिकांकडून दोन प्रकारच्या सूचना मागविण्यात येणार आहेत. नागरिक शहर पातळीवर कोणते प्रकल्प असावेत, याची सूचना करू शकतात; तसेच स्थानिक पातळीवर त्यांना कोणते काम होणे आवश्यक वाटते याबाबतही सूचना करू शकतात. त्याचा अधिक तपशील मंगळवारच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आठवडाभरामध्ये आलेल्या सूचनांचे संकलन करून, तसेच त्यांची व्यवहार्यता तपासून त्या सूचना महापालिका आयुक्त कुणालकुमार आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांच्याकडे सूपूर्त करण्यात येणार आहेत. त्याची दखल त्यांनी घेऊन येत्या वर्षाच्या बजेटमध्ये तरतूद करणे अपेक्षित आहे.

सूचना येथे पाठवा

आपल्या सूचना आपण punemata1@gmail.com या ई-मेलवर किंवा 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयामध्ये (५७७, गोपाळकृष्ण गोखले पथ अर्थात फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४१००००४, फॅक्स ०२० - ३०११७५००) पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’ परीक्षा रद्दचा अद्याप निर्णय नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरात शनिवारी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) उत्तरपत्रिकांनी भरलेल्या गाड्या रविवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आवारात दाखल झाल्या. परिषदेमध्ये रात्री उशिरापर्यंत या उत्तरपत्रिका दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. परीक्षा रद्द करायची की नाही, या विषयीचा अंतिम निर्णय मात्र झाला नसल्याचेच परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यभरात झालेली ही परीक्षा यंदा पेपरफुटीच्या प्रकारामुळे वादात सापडली. पुण्यासह बीड, धुळे शहरांमध्ये या परीक्षेतील भाग १ ची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतः नागपूरमध्ये या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंदकुमार यांना आदेश दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी ४८ तासांची मुदतही देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडूनही प्रत्येक जिल्हा पातळीवरील परीक्षेसंदर्भात माहिती गोळा केली जात असल्याची बाब रविवारी अनुभवायला मिळाली.

राज्यभरातील उत्तरपत्रिका परिषदेकडे सादर करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील अधिकारी आणि उत्तरपत्रिकांनी भरलेल्या गाड्या रविवारी परिषदेच्या आवारात थांबल्या होत्या. दुपारी उशिरा या गाड्यांमधून उत्तरपत्रिका परिषदेच्या कस्टडीमध्ये जमा करून घेण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील परीक्षेसंबंधीचा लिखित अहवालही या अधिकाऱ्यांनी परिषदेकडे सादर करावा, अशा सूचना परिषदेकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या अधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय उत्तरपत्रिकांच्या पेट्या आणि त्यासंबंधीचा अहवाल परिषदेकडे सादर केला जात होता.

शिक्षण सचिव निर्णय घेणार

टीईटी परीक्षेतील पहिला पेपर फुटल्याच्या चर्चेमुळे यंदा झालेली परीक्षा रद्द करण्याबाबतच्या चर्चांनाही पेव फुटले होते. परिषदेचे अध्यक्ष महावीर माने यांनी पूर्ण परीक्षा रद्द होण्याच्या शक्यतांचा इन्कार केला. परीक्षेतील पहिला पेपर फुटला असला, तरी दुसऱ्या पेपरविषयी कोणत्याही तक्रारी नाहीत. त्यामुळे पूर्ण परीक्षा रद्द होण्याची तूर्तास शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेतील पहिला पेपर पुन्हा घ्यायचा किंवा नाही, तो कधी घ्यायचा या विषयी अधिकृत निर्णय शिक्षण सचिवांच्या पातळीवरूनच होईल. या विषयीचा अहवाल शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेंद्र महाराज देव यांच्या आत्महत्येमुळे खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज धरणीधर देव (वय ६३) यांनी मंगलमूर्ती वाड्यात त्यांच्या योगसाधनेच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारानंतर शहरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. महाराजांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवड, भाऊ असा परिवार आहे.

देव महाराज नेहमीप्रमाणे सकाळी उठून पूजेसाठी आले नाहीत. त्यांना मोबाइलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या एका शिष्यानेच पूजा केली. त्यानंतर शिष्य त्यांना ते झोपतात, त्या खोलीत पाहण्यासाठी गेला. ते तेथे नव्हते. योगसाधनेच्या खोलीचे दार वाजविले असता, प्रतिसाद न आल्याने शिष्यांनी महाराजांचा मुलगा दर्शन याला बोलावले. महाराज प्रतिसाद देत नसल्याचे सांगताच त्यांच्या मुलाने व शिष्यांनी दार तोडले असता, महाराजांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. सुती दोरीच्या साह्याने फॅनच्या हुकला महाराजांनी गळफास घेतला होता.

त्यानंतर पोलिसांनी महाराजांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेला. तसेच महाराजांच्या सर्व खोल्यांची तपासणी केली. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही. महाराजांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आज अंत्यसंस्कार

सुरेंद्र देव महाराज यांचे पार्थिव आज (सोमवारी) सकाळी सात ते नऊपर्यंत अंत्यदर्शनासाठी मंगलमूर्तीवाडा येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नऊ वाजता मोरया मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पत्नी बाहेरगावी गेल्या असल्याने त्या आल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images