Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुंबई-पुणे रेल्वेची वाहतूक आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईतील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल आज, रविवारी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा १८ तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू झाला. परिणामी, पुणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे स्टेशन येथून एसटीच्या शंभर जादा गाड्यांचे नियोजन केल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्याबरोबरच दर रविवारी १०० शिवनेरी गाड्या आणि ७५ हिरकणी गाड्याही प्रवाशांच्या सेवेत राहणार आहेत. त्याबरोबरच पुणे स्टेशन येथून कॅब सेवाही उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ रोड ब्लॉक; रस्त्यांवर ‘चक्का जाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या चक्रव्यूहाचा आणखी एक भयंकर अनुभव पुणेकरांनी शनिवारी घेतला. त्यासाठी काल निमित्त होते कृषी महाविद्यालय परिसरातील ऑइलच्या गळतीचे. त्यामुळे रस्ता बंद केल्याने विद्यापीठ रस्त्यासह औंध-बाणेर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रोड, डेक्कन जिमखाना आणि शिवाजीनगर या संपूर्ण परिसरात 'चक्का जाम' स्थिती निर्माण झाली.

सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस विद्यापीठ परिसरातून वाहनांनी जाणे, हा गेल्या काही वर्षांत पुणेकरांसाठी अंगावर काटा आणणारा अनुभव ठरू लागला आहे. एक ते दीड किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाऊण ते एका तासाचा अवधी लागणे, ही नित्याची बाब ठरली आहे. समोर सिग्नल दिसत असूनही किमान पाच ते सहा सिग्नल सुटेपर्यंत तेथून सुटका न होणे, लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि दाटीवाटीच्या रस्त्यातून प्रसंगी फूटपाथवरून वाहने काढणारे दुचाकीचालक, हे येथे नेहमीच दिसणारे चित्र बनले आहे. त्यातच शनिवारी कृषी महाविद्यालयाच्या समोरील ब्रिजवर ऑइल सांडल्याने रस्ता काही काळ बंद करण्यात आला.

या ब्रिजवर, ऑइल सांडल्याची वर्दी फायरब्रिगेडला सकाळी १०च्या सुमारास मिळाली. त्यानंतर फायरब्रिगेडच्या जवानांनी साफसफाई करेपर्यंत रस्ता २० ते २५ मिनिटे बंद ठेवण्यात आला. अचानक रस्ता बंद झाल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाहनांच्या रांगा विद्यापीठापर्यंत पोहोचल्या. त्याचा परिणाम, औंध रोड, बाणेर रोड, सेनापती बापट रोड, गोपाळ कृष्ण गोखले रोड आदी मार्गांवर वाहतूक कोंडी होती.

वाहतूककोंडीचा चक्रव्यूह

शहरातील एक चौक किंवा रस्ता वाहतुकीसाठी अचानक बंद झाल्यास किती गंभीर स्थिती उदभवते, हे या घटनेतून पुन्हा निदर्शनास आले. हे शहरातील बहुतांश रस्त्यावरील प्रातिनिधिक चित्र आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी डेक्कनला गरवारे ब्रिजजवळ महापालिकेची जलवाहिनी फुटली होती. त्यामुळेही अशाच प्रकारे जंगली महाराज रोडसह नळ स्टॉप चौक, पौड फाटा कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड या संपूर्ण भागात त्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धिंड काढणाऱ्यांच्या स्वागताला मी तयार

$
0
0

धिंड काढणाऱ्यांच्या स्वागताला मी तयार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'विरोधकांबद्दल माझ्या मनात तेढ नाही. माझ्या भूमिकेला विरोध असला, तरी विरोधकांसह सर्वांनी झाले गेले विसरून या संमेलनाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे. विरोधासाठी पुतळा जाळणाऱ्यांचे व धिंड काढणाऱ्यांचे स्वागत करायला मी संमेलनात तयार आहे,' अशी भूमिका नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी 'मटा'शी बोलताना मांडली. पंतप्रधानांचे कौतुक हा गुन्हा असेल, तर त्यासाठी माफी मागणार नाही, असा पुनरुच्चार करत राग-लोभ विसरून सर्वांनी संमेलनात सहभागी व्हावे, ही माझी जाहीर विनंती आहे, असे ते म्हणाले.
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरीत शुक्रवारपासून सुरू होत आहे. 'पाडगावकरांआधी मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती', या विधानामुळे डॉ. सबनीस अडचणीत आले आहेत. अध्यक्षांना संमेलनस्थळी प्रवेश करू देणार नाही, अशी भाषा भाजपच्या एका गटातून बोलली जाऊ लागली आहे. त्यातच एका ट्विटमुळे खळबळ उडाली. डॉ. सबनीस यांना विरोध करण्यासाठी पुतळा जाळण्यात आला; तसेच प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली.
या पार्श्वभूमीवर डॉ. सबनीस यांनी भूमिका मांडली. 'माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून विरोध होत आहे, पण विरोध करणाऱ्यांविषयी माझ्या मनात राग नाही. त्यांनी माझा अवश्य विरोध करावा, पण संमेलनात सहभागी व्हावे. संमेलन माझ्या एकट्याचे नाही. ते अकरा कोटी मराठी लोकांचे आहे. माझा विरोध कायम ठेवा. संमेलनानंतरही माझा विरोध करा, पण मराठी भाषेच्या उत्सवात सर्वांनी झाले गेले विसरून सहभागी व्हावे. मी स्वत: प्रत्येकाचे स्वागत करायला संमेलनात उभा असेन. सर्वांना नम्र आवाहन करणे हे माझे कर्तव्य मी करत आहे. चूक झाली तर आवश्य माफी मागेन,' असे डॉ. सबनीस यांनी स्पष्ट केले.
................
पंतप्रधानांना पत्र
जे प्रकार सध्या होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतीत सविस्तर पत्र लिहून पाठवले आहे. त्यामध्ये मी माझी भूमिका आणि पंतप्रधानांचा केलेला गौरव मांडला आहे. या संमेलनाला त्यांनी शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुपी बँकेच्या विलीनीकरणास सहकार्यच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्मचाऱ्यांची संख्येत कपात करून रुपी बँकेचे विलिनीकरण शक्य असल्यास बँकेचे कर्मचारी त्यासाठी तयार आहेत. बँकेचे कर्मचारी ठेवीदारांच्या हिताआड येणार नाहीत. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट न ठेवता व्हीआरएस योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी बँक कर्मचारी संघाचे सरचिटणीस विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, याबाबत लवकरच सहकार आयुक्तांच्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीतील निर्णयावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.
'राज्यातील अडचणीत असलेल्या बँकांबाबत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे बैठक आयोजिण्यात आली होती. त्यामध्ये कर्मचारी संख्या कमी केल्यास अन्य बँक रुपी बँकेचे विलिनीकरण करून घेण्यास तयार असेल, तर आम्हीही कर्मचारी कपात करण्यास तयार आहोत, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार पाटील यांनी प्रशासकीय मंडळाला व्हीआरएस योजना सर्वांसाठी लागू करण्याबाबत फेरविचार करण्याचे आदेश दिले. व त्या संदर्भात तीन -चार दिवसात सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे होणाऱ्या बैठकीत भूमिका मांडण्यात सांगितले आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास अन्य कर्मचारीही व्हीआरएस घेतील. त्यामुळे कर्मचारी संख्या कमी होऊन प्रशासकीय मंडळाला विलिनीकरणासाठी अपेक्षित कर्मचारी संख्या मिळू शकेल,'असे अनास्कर यांनी सांगितले.
बँकेच्या विलिनीकरणासाठी कोणताही ठोस प्रस्ताव प्रशासकीय मंडळाकडे नाही, असा दावा करत अनास्कर म्हणाले, प्रशासकीय मंडळाने विलिनीकरणासंदर्भात दिलेल्या अन्य अटी कधीही मान्य होण्यासारख्या नाहीत. मंडळाने विमा महामंडळाकडून २३२ कोटी, तर जी बँक रूपी बँकेला विलीन करून घेईल, त्या बँकेला राज्य सरकारने २८२ कोटी बिनव्याजी स्वरूपात द्यावेत, अशी मागणी केली आहे.'आधी या मागण्या सरकारने मान्य केल्यास, कर्मचारी स्वतःहून कर्मचारी कपात करण्यास तयार होतील. प्रशासकीय मंडळ स्वतःला कर्जवसुलीत आलेले अपयश झाकण्यासाठी व बँक बुडीत निघाल्यास त्याचे खापर आपल्यावर येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना पुढे करत आहे. त्यासाठीच नव्या वेतन करारासाठी नोटीस देण्यात आली आहे,' असेही अनास्कर म्हणाले.'कोर्टकचेरी आधी काही मार्ग निघू शकतो का, हे आम्ही पाहत आहोत,' असेही त्यांनी सांगितले. बँक कर्मचारी संघ व ठाणको बँक कर्मचारी संघातर्फे घेण्यात आलेल्या सभेला माजी उपमहापौर दीपक मानकर,संघाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी, भरत पासलकर, ठाणको बँक कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय देशमुख व उपाध्यक्ष शिरीष केतकर, तसेच राहुल आलमखाने या वेळी उपस्थित होते. 'रुपीचे प्रशासकीय मंडळ कायदा न जुमानता हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे,'असे उटगी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते अपघातात पुणे आघाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्र अनेक क्षेत्रात पुढे आहे. त्याबरोबरच रस्ते अपघातातही पुढेच असून, राज्यात घडणाऱ्या एकूण अपघातांपैकी एक तृतीयांश अपघात पुण्यात घडतात. त्यामुळे वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यासाठी, अपघात कमी होण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे,' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले.

प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक पोलिस, व ग्रामीण पोलिस यांच्या वतीने २७ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, आमदार मेधा कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य इंजिनिअर डी. वाय. पाटील, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, गायिका-कलाकार केतकी माटेगावकर आदी या वेळी उपस्थित होते. 'वाहन म्हणजे गतीने काम करण्यासाठीचे साधन आहे. त्याच दृष्टीने वाहनांचा वापर झाला पाहिजे. आपले वाहन कंट्रोल करता येईल, इतक्या वेगातच ते चालविले पाहिजे. तरुणांच्या वाहनांचा वेग अधिक असतो,' असे बापट यांनी सांगितले.

'सध्या स्पर्धेचे युग आहे, असे आपण म्हणतो; ही स्पर्धा केवळ चौकांत सिग्नलवर पाहायला मिळते. शहरातील वाहतुकीची परिस्थिती गंभीर आहे, असे सर्वच बोलतात. मात्र, आपणही त्या वाहतुकीचा घटक आहोत आणि आपल्यावरही त्याची जबाबदारी आहे, याचा फारसा विचार कोणी करीत नाही,' अशी खंत आवाड यांनी व्यक्त केली. 'एका अपघातात जीव गमावण्याइतके आपले आयुष्य स्वस्त नाही. आपण आयुष्यात विशिष्ट क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय ठेवलेले असते, त्याबरोबरच
अनेक स्वप्नेही पाहिलेली असतात. ती पूर्ण करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा,' असे आवाहन केतकी माटेगावकर हिने तरुणांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमेवरील जवानांसाठी तीळगूळ

$
0
0

शहरातील १५ गणेशमंडळांनी एकत्रितपणे सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी तीळगूळ पाठविला आहे.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्राणांची बाजी लावून देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून पहिल्या टप्प्यातील सुमारे ५० किलो तीळगूळ पाठविण्यात आला. भारत माता की जय... अशा घोषणा देत सैनिकांच्या शौर्याला सलाम करीत तीळगूळाचे पूजन करण्यात आले.

मागील १५ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमात १५ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. शनिवार पेठेतील जोशी विठ्ठल मंदिरात शनिवार पेठ मेहूणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भास्करराव काटदरे स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वेळी नगरसेविका मुक्ता टिळक, महेश काटदरे, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, केशव जोशी, प्रा. संगीता मावळे, शिरीष मोहिते, मनोज लोखंडे, कुमार रेणुसे, पीयुष शहा, रमेश परचुरे, बाप्पू प्रसादे आदी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीर, लेह लडाख, पूछ, कच्छचे रण आदी भागांत तीळगूळ पाठविला जाणार आहे. हनुमान व्यायाम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ नवी पेठ, तुळशीबाग मंडळ, पोटसुळ्या मारुती मंडळ, काळभैरवनाथ मित्र मंडळ, नवाविष्णु चौक मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ, जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशन आणि संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात सायबर गुन्हे दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंटरनेटचा झपाट्याने वापर वाढत असताना महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये २०१४मध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हे मुंबई व पुणे शहरात दाखल झाले आहेत. सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पुण्यात अधिक असले, तरी सायबर गुन्ह्यात पुणे पोलिसांना फक्त वर्षभरात २३ आरोपींना अटक करण्यात यश आल्याचे समोर आले आहे.

राज्याच्या गुन्हेगारीचा आढावा घेणारा 'महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१४'चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील २०१४मध्ये झालेल्या सायबर गुन्ह्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट) व भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमानुसार राज्यात २०१४मध्ये १८७९ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 'आयपीसी'नुसार १३४७, तर आयटी अॅक्टनुसार ५११ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण ९४२ आरोपींना अटक करण्यात

आली आहे.

कंप्युटरशी संबंधित गुन्हे आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. राज्यात २०१३मध्ये एकूण ९०७ गुन्हे दाखल होऊन ५४३ आरोपींना अटक करण्यात आली होती. २०१४मध्ये सायबर गुन्हे दाखल होण्याचे व आरोपींना अटक करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. वयानुसार विचार केल्यास सायबर गुन्ह्यात १८ ते ३० वयोगटातील सर्वाधिक ११६ आरोपी अटक करण्यात आले आहेत. तर, ३० ते ३५ वयोगटातील ११० आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक गुन्हे मुंबई शहर येथे ६०८ दाखल झाले झाले असून २१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे शहरात १४० गुन्हे दाखल झाले असून या ठिकाणी फक्त २३ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. नवी मुंबई येथे ८३ गुन्हे दाखल झाले असून ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यात मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे शहर या ठिकाणी सायबर क्राइम सेल सुरू करण्यात आले आहेत. पुणे सायबर सेलकडे तक्रारी येण्याचे प्रमाण खूप असून वर्षाला सहाशे ते सातशे तक्रारी पुणे सायबर सेलकडे येतात. त्यापैकी १३० ते १४० गुन्हे दाखल केले जातात. मात्र, गुन्हे दाखल झाले तरी आरोपींना शोधण्यामध्ये पुणे सायबर सेल कमी पडत आहे.





एका दृष्टिक्षेपात...

राज्यात २०१४मध्ये १८७९ सायबर गुन्हे दाखल

सायबर गुन्ह्यात १८ ते ३० वयोगटाली सर्वाधिक आरोपी

फसवणूक व कम्प्युटरसंबंधी सर्वाधिक गुन्हे

२०१३मध्ये ९०७ गुन्हे होते दाखल





शहरांनुसार दाखल सायबर गुन्हे (वर्ष २०१४)

शहर गुन्हे अटक

मुंबई ६०८ २१३

पुणे १४० ०२३

ठाणे १३२ ०२१

नवी मुंबई ८३ ४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार साबळेंसह ४० जणांवर गुन्हा

$
0
0

पिंपरी : पोलिसांचे आदेश झुगारून अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेची धिंड काढल्याबद्दल भाजपचे खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह ४० जणांविरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबनीस यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप खासदार साबळे व अन्य आंदोलन करीत आहेत. दोन ते पंधरा जानेवारी दरम्यान पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे प्रक्षोभक वक्तव करणे, घोषणाबाजी करणे, कोणत्याही इसमाच्या प्रतिमेचे दहन करणे, दोन गटांत तेढ होईल असे वक्तव्य करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. बंदी असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सबनीस यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेची धिंड काढली. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याने सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विकासात शिक्षणाचे महत्त्व’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'भारताच्या आर्थिक व्यवस्थेत वाढ होण्यास पिंपरी-चिंचवडचा मोलाचा वाटा आहे. विकासात शिक्षण संस्थांचे महत्त्वाचे योगदान आहे. देशासह जगाला कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन ही तूट भरून काढणे आवश्यक आहे,' असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

पिंपरी चिंचवड शैक्षणिक संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, माजी खासदार नानासाहेब नवले, सदानंद मोहोळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, संचालक पद्मिनी भोसले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, भाईजान काझी आदी या वेळी उपस्थित होते.

'पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक क्षेत्र आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशियामध्ये वेगाने विकासकामे करण्यासाठी ओळखली जाते. पिंपरी-चिंचवड क्षेत्राच्या विकासामध्ये शैक्षणिक संस्थांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे,' असे राज्यपाल राव म्हणाले. केंद्राच्या स्मार्ट सिटीत पुण्याचा समावेश झाल्याबाबत राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. मात्र, या वेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडचा देखील समावेश या योजनेत झाल्याचा उल्लेख अनवधानाने केला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, समता जाती व धर्माने येत नाही. त्यासाठी चांगल्या शिक्षणची गरज आहे. शिक्षणामुळे विकासाची सगळी दारे उघडी होतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला ओळखून शिक्षकांनी त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा.' सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. भाईजान काझी यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्ष धमकी निषेध ठराव संमेलनात मांडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आपल्या लोकशाहीप्रधान देशात प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारांनीच व्हावी. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना ज्या पद्धतीने संपविण्यात आले, ते पाहता नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना धमक्या देण्याच्या प्रकाराचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनात मांडण्यात येईल. तत्पूर्वी तो नियामक मंडळासमोर मांडू,' असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील वक्तव्याने सबनीस यांचा विरोध करण्यासाठी पुतळा जाळण्यात आला तसेच, धिंड काढण्यात आली. सकाळी मॉर्निंग वॉकला जात जा अशा आशयाचे धमकीवजा ट्विट एकाने केल्याने या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांचा निषेध करणारा ठराव मांडणार का, असा प्रश्न डॉ. वैद्य यांना विचारण्यात आला. त्यावर श्रीमती वैद्य म्हणाल्या की, 'भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. सबनीस यांचे मत वैयक्तिक आहे. त्यांच्या विचारांचा सामना विचारांनी व्हावा. धमक्या देणे, दहशत निर्माण करणे योग्य नाही. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना ज्या पद्धतीने संपविण्यात आले ते पाहता धमक्या देण्याच्या प्रकारांचा निषेध करणारा ठराव संमेलनात मांडण्यात येईल, पण त्या पूर्वी तो नियामक मंडळासमोर मांडू. मारण्याची भाषा कोणी करत असेल तर ते योग्य नाही.'

..

'राज्यकर्ते संमेलनाला येणार'

पंतप्रधानांशी संबंधित वादामुळे मुख्यमंत्री व इतर मंत्री संमेलनाला येणार का, असे विचारले असता, सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यकर्ते संमेलनाला येतील, असा विश्वास वाटतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

..

डॉ. श्रीपाल सबनीस यांची मांडणी चिंतन व चर्चेचा विषय होऊ शकते; पण पुतळा जाळणे आणि धमकावणे योग्य नाही. घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होऊ नये. त्यांना धमकावणारे अशा प्रकारातून लोकशाहीवर आपला विश्वास नाही, हेच सिद्ध करतात. आताच्या वातावरणात तर हे फार भयंकर आहे. उल्हास पवार, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनासाठी तळेगावकरांची तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, तळेगाव दाभाडे
साहित्य म्हणजे समाजमनाचा आरसा असे म्हटले जाते. काळ कितीही बदलला, डिजिटल झाला तरी साहित्य आणि त्याविषयीचे प्रेम कमी होणार नाही. हाच प्रत्यय गेल्या काही दिवसांमध्ये तळेगाव आणि परिसरात येतो आहे.

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनासाठी साहित्यप्रेमींची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कलापिनी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलनासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

तळेगावात साहित्य संमेलन पूर्व संमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री फैय्याज यांची मुलाखत घेण्यात आली. या संमेलनास साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे सचिन इटकर, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन व जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे उपस्थित होते.

फैय्याजजींनी आपल्या पन्नास वर्षांच्या गायन अभिनयाचा प्रदीर्घ प्रवास उलगडला. त्यांनी वीज म्हणाली धरतीला, कट्यार काळजात घुसली, महानंदा या नाटकातील पदे सादर केली. त्या संदर्भातील घटना, किस्से आणि काही प्रसंग आपल्या कसदार अभिनयाने साकार केले आणि रसिकांना थक्क केले. साहित्य संमेलनाचे औचित्य साधून संमेलनपूर्व संमेलनाने तळेगावकरांना एका अविस्मरणीय कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. साहित्य परिषदेच्या मावळ शाखेचे अध्यक्ष सुरेश अत्रे म्हणाले, 'मावळवासीयांसाठी संमेलन काळात दोन बसची व्यवस्था केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्ञानपीठवरून न्यूनगंड नको’

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : 'मराठी साहित्यात वैचारिक लेखनाची वानवा आहे, अशी टीका केली जात असली तरी अनेक मराठी लेखकांनी उत्तमोत्तम साहित्यकृतींनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. महाकवी द. रा. बेंद्रे यांच्यासह केवळ पाच ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्राच्या वाट्याला आले. जी. ए. कुलकर्णी यांच्यासह अनेक लेखकांचा ज्ञानपीठने गौरव व्हायला हवा होता, असा एक मतप्रवाह आहे. जीएंचे साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असते, तर त्यांना साहित्याचा नोबेलही मिळाला असता. पण पुरस्कार हा योग्यतेचा निकष असू नये. पुरस्कार न मिळाल्याने पात्रता कमी होते असे नाही. साहित्यिकांनी यावरून न्यूनगंड निर्माण करू नये,' ही मते आहेत माजी संमेलनाध्यक्षांची...

मराठी साहित्य ठरावीक ढाच्यात अडकून पडले, मराठीत वैचारिक साहित्याची वानवा आहे, अशी टीका केली जाते. मात्र, त्याच वेळी अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती मराठी भाषेत निर्माण झाल्या आहेत. त्या साहित्यकृतींची दखल राष्ट्रीय स्तरावर, तसेच अनुवाद न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली नाही. देशात साहित्यासाठी देण्यात येणाऱ्या ज्ञानपीठ पारितोषिकाचा विचार केला तर वि.स.खांडेकर यांच्या 'ययाती' या साहित्यकृतीच्या रूपाने मराठीला पहिले ज्ञानपीठ १९७४ मध्ये मिळाले. 'ययाती' आजही वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना 'नटसम्राट' या नाटकासाठी १९८७ मध्ये ज्ञानपीठने गौरविण्यात आले. विंदा करंदीकर यांना २००३ मध्ये 'अष्टदर्शने' तर शेवटचा ज्ञानपीठ भालचंद्र नेमाडे यांना 'हिंदू' कादंबरीसाठी मिळाला.

महाराष्ट्राचे सुपुत्र महाकवी द. रा. बेंद्रे यांनाही कन्नड भाषेतील साहित्यासाठी ज्ञानपीठने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ज्ञानपीठ चार की पाच, हा वाद अजून कायम आहे. देशातील दुसरा महत्वाचा पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा. त्याबाबतीत विचार केला तर सुमारे ६० ते ७० साहित्यिकांना हा सन्मान मिळाला आहे. ज्येष्ठ समीक्षक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्या मते, 'पुरस्कार हा सर्वश्रेष्ठतेचा निकष नाही. पण, अनेक मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा होता. जी.ए.कुलकर्णी यांचे साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले असते तर त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता, इतकी क्षमता मराठी साहित्यात आहे. विश्राम बेडेकर, गंगाधर गाडगीळ यांनाही ज्ञानपीठ मिळायला हवा होता.'

मराठी कलावंत, क्रीडापटू यांना जागतिक प्रसिद्धी मिळते तर मग साहित्यिकांना का मिळत नाही, असा खडा सवाल त्यांनी केला. मराठी साहित्याचा एकमार्गी प्रवास सुरू आहे, मराठी साहित्य इतर भाषांमध्ये गेले पाहिजे, अशी अपेक्षाही 'दभिं'नी व्यक्त केली. पण पुरस्कार हे योग्यतेचे मूल्यमापन नाही, त्यामुळे त्याबाबतीत खंत बाळगत बसू नये, असे मतही त्यांनी नोंदवले.

८८ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी असेच मत नोंदवून पुरस्कार हा योग्यतेचा निकष नाही. बटण दाबले की लाइट लागावे तसे हे नाही. ज्ञानपीठ नाही तर नाही. साहित्यिकांनी यावरून न्यूनगंड निर्माण करायचे काही कारण नाही, सल्ला त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख मराठी पुस्तकांचा खजिना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरीत येत्या शुक्रवारपासून (१५ जानेवारी) रंगणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील १५० प्रकाशक आणि १७० पुस्तकविक्रेते सहभागी होणार आहेत. या माध्यमातून सुमारे सव्वा लाख मराठी पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध होईल.

संमेलनातील पुस्तक विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या ४०० गाळ्यांचे वाटप सोडत पद्धतीने शनिवारी पूर्ण झाले. संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रकाशक परिषदेचे अनिल कुलकर्णी व रमेश राठीवडेकर यावेळी उपस्थित होते.

मौज, पॉप्युलर, पद्मगंधा, अमेय, रसिक, कॉन्टिनेण्टल, मेहता, रोहन, साकेत, शुभम, डायमंड, राजहंस, गदिमा, ज्योत्स्ना, गमभन अशा प्रकाशन संस्था ग्रंथप्रदर्शनात सहभागी झाल्या असून, अक्षरधारा, ज्ञानगंगा यांसारख्या संस्था सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री करणार आहेत. या शिवाय बुकगंगा आणि डेलियंट मोबाइल ई-बुक अॅपचे दालनही वाचकांसाठी खुले होणार आहे. तसेच १६ गाळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व सरकारी प्रकाशनासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. ८८ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनातील सर्वाधिक विक्रीच्या पाच पुस्तकांची नावे संमेलनाच्या अखेरच्या दिवशी जाहीर केली जातील. पुस्तक गाळेधारकांकडून आकारण्यात आलेली रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे.

सहा एकरावर पुस्तक प्रदर्शन

धुळीचा त्रास होऊ नये म्हणून कार्पेट, १२ चौरस मीटर आकारचे स्टॉल, दिवे अशी व्यवस्था ग्रंथ दालनांसाठी असेल. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या एकूण ४० एकराच्या मैदानापैकी सहा एकर जागेत पुस्तक प्रदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रंथ दालनाच्या परिसरात प्रकाशन मंच उभारण्यात येत असून, नवीन पुस्तकांचे प्रकाशन साहित्यिकांच्या हस्ते तिथे करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष निरीक्षकांसमोर कारभाऱ्यांत चकमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संघटनात्मक निवडणुकांची चाहूल लागताच भारतीय जनता पक्षात पुन्हा वादांना तोंड फुटले आहे. या निवडणुकांशी संबंधित नियुक्तीच्या मुद्द्यावरून शहरातील पक्षाच्या प्रमुख कारभाऱ्यांमध्ये रविवारी जोरदार चकमक उडाली.
या बाबत बोलाविण्यात आलेल्या बैठकीत शहरातील पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये प्रदेश निरीक्षकांसमोरच घडलेल्या या प्रकाराची शहरभर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला शहरात मोठ्या मताधिक्याने सर्व जागांवर विजय मिळाला. त्या काळात पक्षातील गटबाजी थंडावली होती. मात्र, आता महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या पक्षात संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. चालू वर्षात खासदार अनिल शिरोळे यांची शहराध्यक्षपदाची मुदत पूर्ण होत आहे. त्यानंतर नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.
नव्या अध्यक्षांच्या काळात महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने पक्षावर आपली पकड राहावी, यासाठी बडे नेते प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीसाठी एका कारभाऱ्यांच्या समर्थकाची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा घाट घालण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत चर्चेसाठी बैठक आयोजिण्यात आली होती. काही आमदार आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मात्र, बैठकीच्या प्रारंभीच शहरातील दुसऱ्या कारभाऱ्याने 'हे नाव निश्चित करण्यापूर्वी आम्हाला, तसेच पक्षाच्या शहर शाखेला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही,' अशा शब्दांत या नियुक्ती प्रक्रियेस जोरदार आक्षेप घेतला. तसेच हा प्रकार आपण वरिष्ठांच्या कानी घालणार असल्याचेही त्याने बजावले. तसेच, ससून हॉस्पिटलची समिती आणि अन्य काही सरकारी नियुक्तींबाबतही कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यावेळी दुसऱ्या कारभाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले, त्यामुळे दोघांमध्ये चकमक उडाली. निरीक्षकांसमोरच हा प्रकार घडल्याने त्याची चर्चा शहरभरात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ससून हॉस्पिटलच्या सल्लागार समितीवरील सदस्य नियुक्ती आणि सरकारी समित्यांवरील नियुक्तींच्या विषयावरून वाद सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शहराध्यक्षपदासाठी चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ठरविण्यासाठी रविवारी साडेपाच तासात बारा इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. आपण शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचा दावा करणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यातच खरी चुरस असल्याची चर्चा आहे. आकुर्डी येथील हॉटेलमध्ये भाजपचे योगेश गोगावले आणि सुजितसिंह ठाकूर यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी भाजप सरसावला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या भाजपचे संख्याबळ चार आहे. चार नगरसेवकांवरून पक्ष थेट महापौरपदाची मजल गाठेल असा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादीच्या गोटातून भाजपमध्ये जाऊन आमदार झालेले जगताप हेच महानगरपालिका हातात ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. शहराध्यक्ष बदलाबाबत गेल्या काही महिन्यांपासून शहरात चर्चा रंगली आहे. जगताप यांनी मध्यंतरी आपण या स्पर्धेत नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता त्यांच्यासह विद्यमान शहराध्यक्ष खाडे यांच्यात चुरस निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी पुण्यातील विश्रामगृहात पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठक घेतली. त्याला भाजपचे मुख्य निवडणूक अधिकारी सुजितसिंह ठाकूर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश चिटणीस योगेश गोगावले यांच्यासह राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते. या बैठकीत शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या बारा जणांशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर व्हावा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे रविवारी आकुर्डी येथील हॉटेलमध्ये बैठक झाली. खासदार दिलीप गांधी यांनी नियुक्त केलेल्या कोअर टीमबरोबर प्रथम चर्चा करण्यात आली. त्यानंतर शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले मोहन कदम, रघुनंदन घुले, नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, विलास मडेगिरी, माऊली थोरात, बाळासाहेब गव्हाणे, प्रकाश जवळकर, अमोल थोरात, उमा खापरे यांच्यासह सदाशिव खाडे आणि लक्ष्मण जगताप यांच्याशी चर्चा करण्यात आली. सध्या तरी निर्णय प्रदेश कार्यकारिणीकडे सोपविल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्य संमेलनस्थळी लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनासाठी शहरात मोठी लगबग सुरू आहे. पिंपरीतील एचए मैदानावर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे १५ ते १८ जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनाच्या भव्य मंडप उभारणीचे काम सुरू आहे.

एचए मैदानाच्या ४० एकर क्षेत्रात हे मंडप उभारले जात आहेत. संमेलनासाठी विविध मंडप तयार करण्यात येत आहेत. एचए मैदानावरील मुख्य सभामंडप, उपमंडप, ग्रंथदालन कविकट्टा, ग्रंथप्रदर्शन या विभागांसह पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृह या पाच ठिकाणी संमेलन होणार आहे. मुख्य मंडपात संमेलनाचे उद्घाटन आणि महत्त्वाचे कार्यक्रम होतील. उपमंडप आणि आचार्य अत्रे सभागृहात विविध विषयांवरील परिसंवाद होणार आहेत. कवींसाठी खास कविकट्टादेखील तयार करण्यात आला आहे. ग्रंथप्रदर्शन विभागात दिग्गजांच्या मुलाखती आणि पुस्तक प्रकाशन हे कार्यक्रम होतील.

प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र मंडप आणि व्यासपीठ असल्याने एकाच वेळी विविध कार्यक्रम या पाच विभागांत सादर होणार आहेत. स्वतंत्र विभाग असल्याने एकाच वेळी अनेक रसिकांना या कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे. मुख्य सभामंडपात १२ हजार जणांची आसनव्यवस्था, तर ग्रंथमंडपात आणि कविकट्टा येथे ५०० जणांची आसनव्यवस्था केली आहे. ग्रंथमंडपात ४०० स्टॉलसाठी सोय करण्यात आली आहे. संमेलन अवघ्या चार दिवसांवर आल्याने एचए मैदानावर युद्धपातळीवर मंडप उभारणीचे काम सुरू आहे. परिसर सजवण्यासाठी थर्माकोलच्या शिल्पांचेही काम या मैदानावर होत आहे. १३ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाषा प्रसारासाठी तंत्रज्ञान आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मातृभाषेतून शिक्षण झाले नाही, तर वैचारिक आणि सांस्कृतिक आक्रमण होते. हे आक्रमण आणि प्रदूषण घालवायचे असेल तर साहित्य, संस्कृतीचे महत्व जाणायला हवे. मराठी भाषेचा अभिमान वृद्धिंगत करायचा असल्यास तंत्रज्ञान महत्वाचे आहे,' असे मत ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

पिंपरी येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची विस्तृत माहिती देणाऱ्या 'मराठी साहित्य गौरव' या ई-बुकच्या अनावरणप्रसंगी पवार बोलत होते. सीड इन्फोटेक या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र बऱ्हाटे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ कवी अरुण शेवते, 'डेलीहंट'च्या संचालक अंजली देशमुख, तंत्रज्ञ प्रतीक पुरी आदी या वेळी उपस्थित होते. साहित्य संमेलनाची माहिती देणारे हे पहिलेच ई-बुक असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि डेलीहंट यांनी या ई-बुकची निर्मिती केली आहे. 'मराठी भाषेवर इंग्रजी भाषा व तंत्रज्ञानाचे आक्रमण होत असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न या ई-बुकमधून झाला आहे. या बुकमुळे जगभरातील मराठी माणूस साहित्य संमेलनाशी जोडला जाईल,' असा विश्वास बऱ्हाटे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन महेंद्र मुंजाळ यांनी केले. संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांनी आभार मानले.

'ई-बुक'मध्ये नेमके काय?

साहित्य संमेलनाची संपूर्ण निमंत्रण पत्रिका, आयोजक संस्था डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची माहिती, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा इतिहास, आतापर्यंतच्या ८८ साहित्य संमेलनांचा इतिहास, आजी आणि माजी संमेलनाध्यक्षांची ओळख अशी विविध माहिती ई-बुकच्या २०० हून अधिक पानांत समाविष्ट करण्यात आली आहे. जगभरातील किमान १५ टक्के मराठी भाषिकांपर्यंत ही माहिती ई-बुक वरुन नक्की पोहचेल, असे अंजली देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ्या पैशांबाबत अपेक्षित कामगिरी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

'काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असले तरी, या बाबत सरकारकडून म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही, अशी टिप्पणी योगगुरू बाबा रामदेव यांनी रविवारी केली. मात्र, यावर काहीही बोलण्यापूर्वी सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
अमनोरा पार्क टाउन येथे झालेल्या 'इंडिया नाउ अॅण्ड फ्युचर' या विषयावर अभिनेते सचिन खेडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव बोलत होते. अमनोरा नॉलेज फाउंडेशनचे संस्थापक अनिरुद्ध देशपांडे या वेळी उपस्थित होते. काळ्या पैश्यांविषयी प्रश्न विचारला असता बाबा रामदेव म्हणाले, की 'देशात भ्रष्टाचाराचा प्रश्न खूप मोठा आहे. जेवढा काळा पैसा देशाबाहेर आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक पैसा देशात आहे. हा काळा पैसा योग्य पद्धतीने उपयोगात आणला तर जगातील भारताचे स्थान सर्व प्रगत देशांपेक्षा खूप पुढे असेल हे नक्की.'
बाबा रामदेव यांच्या संकल्पनेतून आणि अमनोरा नॉलेज फाउंडेशनच्या मदतीने मांजरी येथे राज्यातील पहिले 'आचार्यकुलम्' विद्यालय उभारण्यात येणार आहे. या विद्यालयाचा कोनशिला समारंभ रविवारी पार पडला. चार एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या या विद्यालयात सुमांरे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती नवीन पिढीमध्ये रूजावी, तिची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी 'आचार्यकुलम्' विद्यालय विशेष प्रयत्न करेल, असेही बाबा रामदेव यांनी नमूद केले. 'आचार्यकुलम्' योजनेंतर्गत बाबा रामदेव देशभरात ६०० विद्यालये उभारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जातपडताळणीचे काम मार्गी लावणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'आदिवासी ठाकर समाजासाठी जातीचा दाखला मिळवणे ही मोठी समस्या बनली आहे. विविध कारणे देऊन जातपडताळणी समितीकडून हे दाखले देण्याच्या कामात टाळाटाळ केली जात आहे. यंदाच्या वर्षी हे जातपडताळणीचे काम मार्गी लावून आदिवासी ठाकर बांधवांना नोकरी आणि शिक्षणाच्या संधी देण्यात येईल,' असे आश्वासन समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.

आदिवासी ठाकर समाज कृती समितीच्या वतीने आयोजित आदिवासी ठाकर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात कांबळे बोलत होते. चिंचवडच्या बिजलीनगर परिसरातील विश्वेश्वर मंदिरात हा कार्यक्रम झाला. 'सरकार गोरगरिबांसाठीच आहे. तुम्ही संघटीत व्हा आणि आपल्या समाजाचा विकास करा. प्रत्येक कार्यात मी तुमच्या सोबत आहे,' अशी ग्वाही देखील कांबळे यांनी दिली. या वेळी खासदार अमर साबळे, अॅड. रामचंद्र मेंदाडकर आदी उपस्थित होते.

खासदार अमर साबळे म्हणाले, 'सरकारच्या अनेक योजना आपल्यासाठी आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आपल्या समाजासाठी असलेल्या योजना आणि कायद्यातील तरतुदी यांचा अभ्यास करणारा एक गट बनवावा. त्यामाध्यमातून समाजाचा विकास करता येईल.'

मेळाव्यात ठाकर समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, नाशिक, उस्मानाबाद येथून आलेल्या आदिवासी समाजातील बांधव या वेळी उपस्थित होते. रंजना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलीनीकरणामुळे विकासाला गती

$
0
0

Mustafa.Attar @timesgroup.com
पुणे : युती सरकारने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत हवेलीसह पुणे बाजार समितीचे अखेर विलीनीकरण केले. यामुळे आता पुणे बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढले असून पायाभूत सुविधांसह बाजार घटकातील सोयी सुविधांच्या विकास कामांना गती मिळणे शक्य असल्याचे दिसू लागले आहे.
तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारने कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणे आणि हवेली बाजार समिती अशा दोन समित्यांमध्ये रूपांतर केले. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सोय करण्यात आली होती. परंतु, आघाडी सरकारने हे राजकीय हित बाजूला ठेऊन पुन्हा दोन्ही बाजार समित्यांच्या एकत्रिकरणाच्या दिशेने पावले उचलली. गतवर्षाच्या अखेरीस बाजार क्षेत्रातील घटकांच्या दृष्टीने विलीनीकरणाची चांगली बाब घडली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा अस्तित्वात आली. भाजप सरकारने मात्र दोन्ही समित्यांपैकी भाजपच्या कार्यकर्त्यांचीच संचालक मंडळावर वर्णी लावली. खरे तर संचालक मंडळ नेमणे अपेक्षित असताना पणन खात्याने प्रशासकीय मंडळ म्हणून सदस्यांची नियुक्ती केली. प्रशासकीय मंडळाच्या मुख्य प्रशासकपदी दिलीप खैरे यांना, तर भूषण तुपे यांना उपमुख्य प्रशासकपदी नियुक्त केली. सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरुण कार्यकर्त्यांना संधी देताना या प्रशासकीय मंडळावर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. सेनेच्या कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना आहे. एक मात्र बरे झाले, की मांजरीतील हवेली बाजार समिती आणि गुलटेकडीतील पुणे बाजार समिती यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे १० ते १५ किलोमीटरचे अंतर होते. यामुळे मार्केट यार्डाबरोबर हवेली समितीकडून एकाच व्यापाऱ्याकडून दुहेरी सेस आकारला जात होता. त्याशिवाय मार्केट यार्डातील भुसारातील घाऊक विक्रेत्यांशिवाय हवेलीतील बाजार समितीकडून तेथील व्यापाऱ्यांना घाऊक विक्रीचे परवाने दिले जात होते. दुहेरी परवाने दिले जात असल्याने मूळच्या मार्केट यार्डातील भुसारातील घाऊक विक्रेत्यांच्या विक्रीवर परिणाम होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. विलीनीकरण झाल्याने या गोष्टींना आळा बसणे आता शक्य होणार आहे. हवेली बाजार समितीत पायाभूत सुविधा होत्या. पण त्यांच्या विकासांना फारशी संधी नव्हती. नव्याने पुणे शहरातील परिसरातील ३४ गावांचा समावेश होणार आहे. त्यामुळे मांजरीसह उत्तमनगर येथील बाजार समित्यांचे असलेल्या पायाभूत सुविधांचा फायदा झाला नसता. विलीनीकरणामुळे गावांचा समावेशाबरोबर कार्यक्षेत्र वाढण्यास मदत झाली. मार्केट यार्डातील भुसार विभागात अतिरिक्त बांधकामांना परवानगी मिळविण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्त्यावरील खड्डे दूर करून तेथे कॉँक्रिटीकरण करणे, पाइपलाइन, ड्रेनेज दुरुस्ती यासारख्या विकासकामांना आता संधी आहे. त्याशिवाय, मार्केट यार्डात दर रविवारी होणारी वाहतूक कोंडी, वाहतूक नियोजन, तसेच डमी आडते यासर्व समस्या सोडविण्याची प्रशासकीय मंडळासमोर आव्हाने आहे. या संदर्भात पालकमंत्री गिरीश बापट, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. परंतु, पूर्वीच्या बाजार समितीच्या संचालक मंडळांकडून झालेल्या गैरप्रकारामुळे आर्थिक खर्चाच्या मर्यादांवर बंधने आली आहेत. दहा लाख रुपयांपुढे खर्च करण्याचे अधिकार बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाला नसल्याने त्यांचे हात बांधले गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images