Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ई-लर्निंगचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच शाळांमध्ये शिक्षण मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन यांच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग उपक्रमाचा गुरुवारी (सात जानेवारी) प्रारंभ झाला. त्याअंतर्गत महापौर शकुंतला धराडे आणि शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले यांच्या हस्ते सेटचे वाटप झाले.

महापालिकेच्या सांगवी, वाल्हेकरवाडी, मोशी, पिंपळेगुरव आणि बोपखेल या शाळांमध्ये ई-लर्निंगचा उपक्रम राबविण्यास शिक्षण मंडळाने नुकतीच मंजुरी दिली होती. त्यानुसार 'रोटरी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रॅम' (आरडीईपी) अंतर्गत उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात सर्वच इयत्तांच्या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर तो सामाजिक संस्थांच्या मदतीने महापालिकेच्या शहरातील अन्य शाळांमध्येही राबविण्याचा विचार आहे.

पिंपळेगुरव आणि सांगवी येथील शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक सेट महापौर धराडे आणि सभापती घुले यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामध्ये एक टीव्ही स्क्रिन, एक मोठा स्क्रिन, प्रोजेक्टर, की-बोर्ड, सीपीयू आणि इतर आवश्यक साहित्यांचा समावेश आहे. कार्यक्रमास स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका सुषमा तनपुरे, शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले, विष्णू नेवाळे, सुदाम ढोरे, मुख्याध्यापिका हिरा आभाने, कल्पना शितोळे, क्लबचे चंद्रुशेठ चंदनानी, भाऊसाहेब पांगारे, अनिल शर्मा उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ई-लर्निंग उपक्रम सुरू करण्यात आल्याचे घुले यांनी सांगितले. तसेच, या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनने पुढाकार घेऊन मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या प्रकारचा उपक्रम महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सुरू करण्यासाठी मदत करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. त्याचा विचार करण्याचे आश्वासन चंदनानी यांनी या वेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राधिकरणाला जेव्हा जाग येते!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गोरगरिब कामगारांना स्वस्त दरात घरकूल देण्याच्या मूळ उद्देशाची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला एका तपानंतर आठवण झाली आहे. येत्या महिन्याभरात वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे आश्वासन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी (सहा जानेवारी) दिले. भोसरीतील सेक्टर १२ मध्येही सुमारे आठ हजार घरकुले उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवनगर विकास प्राधिकरणाचे २०१६-१७चे बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी प्राधिकरण सभेला सादर केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम यांनी घरकुल उभारणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की 'गोरगरिब कामगारांना स्वस्त दरात घरकुले उभारून देणे, हा प्राधिकरणाचा मूळ उद्देश आहे. परंतु, २००३ नंतर कोणताही गृहप्रकल्प राबविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाल्हेकरवाडी येथील नियोजित प्रकल्पाबाबत गेल्या दोन-तीन वर्षांतील बजेटमध्ये तरतूद केली जाते. परंतु, पर्यावरण विभागाची परवानगी मिळत नसल्यामुळे प्रकल्पाचे काम मार्गी लागत नव्हते. आता या विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ७९२ घरांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन या महिनाअखेर करण्याचा प्रयत्न राहील. या प्रकल्पासाठी बजेटमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठीची ४.८२ हेक्टर जागा प्राधिकरणाच्या ताब्यात आहे.'

'भोसरीतील सेक्टर क्रमांक १२ येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर (पीपीपी) घरे उभारण्याचे नियोजन होते. परंतु, त्याबाबतचे प्रकरण कोर्टात आहे. हायकोर्टाने एका सुनावणीत प्राधिकरणाने स्वतःच प्रकल्प का उभारू नये, याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार आता प्राधिकरणानेच या ठिकाणी आठ हजार घरे उभारण्याची तयारी दर्शविली असून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,' असेही चोक्कलिंगम म्हणाले.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राला 'ब्रेक'

मोशी येथील पेठ क्रमांक पाच आणि आठ मधील सुमारे दोनशे एकर जागेवर महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्याचे नियोजन होते. त्यासाठी कंपनीची स्थापनाही करण्यात आली आहे. या ठिकाणी अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. यामध्ये सात प्रदर्शन केंद्रे, एक कन्व्हेंशन सेंटर, गोल्फ कोर्स, पंचतारांकित हॉटेल, व्यापारी कार्यालये, मॉल्स, ओपन प्रदर्शन केंद्र यांचा समावेश आहे. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्र उभारू नये. त्याचा वापर शक्य नाही, असा मतप्रवाह निर्माण झाल्यानंतर प्राधिकरणाने या भव्य प्रकल्पाला 'ब्रेक' लावला आहे. तूर्तास प्राधान्याने ओपन प्रदर्शन केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. भविष्यात गरज भासल्यास टप्प्याटप्प्याने उर्वरित प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.

शिलकीचे बजेट

पुढील आर्थिक वर्षात प्राधिकरणाला ३०२ कोटी ७३ लाख रुपये जमा अपेक्षित असून, ३०२ कोटी ३९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ३३ लाख ९५ हजार रुपये शिलकीचे बजेट असेल. राज्य सरकारने प्राधिकरणाचा समावेश 'पीएमआरडीए'त करण्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, प्राधिकरण भागातून वसूल झालेला निधी याच भागातील विकासकामांसाठी वापरणे आवश्यक असल्याचा अभिप्राय प्राधिकरणाने दिला आहे. तसेच कुदळवाडी येथील उड्डाणपुलाचे काम एप्रिल २०१६ अखेर पूर्ण होईल, असा दावा जाधव यांनी केला आहे.

२०१६-१७ बजेट (आकडे रुपयांत)

जमा तपशील

आरंभीची शिल्लक - २३५ कोटी ५६ लाख

महसुली जमा - ३८ कोटी ५७ लाख

भांडवली जमा - २८ कोटी ५९ लाख

एकूण जमा - ३०२ कोटी ७२ लाख

खर्च तपशील

महसुली खर्च - ४३ कोटी ५६ लाख

भांडवली खर्च - २५८ कोटी ८३ लाख

एकूण खर्च - ३०२ कोटी ३९ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई, पुणे ज्येष्ठांसाठी असुरक्षित

$
0
0

राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात मुंबई, पुणे शहर व पुणे ग्रामीणमध्ये ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नसल्याची परिस्थिती आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांचे खून, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याचे सर्वाधिक प्रमाण मुंबई, पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असून, २०१४ मध्ये राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात तब्बल तीन हजार ९८१ गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्याच्या गुन्हेगारीचा आढावा घेणारा 'महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१४' चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या नातेवाइकांनी काळजी घेणे व संरक्षण करणे या गोष्टीचा महत्त्व आहे. पण, अलीकडे एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना एकटे राहावे लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील तीन हजार ९८१ गुन्हे दाखल झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात सर्वाधिक गुन्हे मुंबई शहर येथे सर्वाधिक ९४४ दाखल झाले आहेत. त्यानंतर पुणे शहर येथे २६७ आणि वर्धा येथे १७२ गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्यात २०१४ मध्ये १६७ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत. ५२ ज्येष्ठ नागरिकांच्या खुनाचा प्रयत्न झाला आहे. ६२३ ज्येष्ठ नागरिकांचा शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात आले आहे. ६५४ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. मारहाणीत ३०९ ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यात घडलेल्या १६७ खुनांपैकी सर्वाधिक खून, मुंबई १७, पुणे ग्रामीण ११ येथे झाले आहेत.
५२ खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेत सर्वाधिक घटना पुणे ग्रामीणमध्ये घडल्या आहेत. या भागात १० खून झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना लुटलेल्या एकूण घटनांपैकी सर्वाधिक घटना मुंबई शहर २२३, पुणे शहर १०४ आणि ठाणे शहर ७० घडल्या आहेत. तसेच, फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना सुद्धा मुंबई येथे २९५, पुणे शहर येथे ४२ घडल्या आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे ते या ठिकाणी असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांच्या अठराशे तक्रारींचे निवारण

$
0
0

पुणे : गेल्या वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांच्या हेल्पलाइनवर आलेल्या तब्बल एक हजार ८९६ तक्रारींचे निवारण सामाजिक सुरक्षा विभागाने केले आहे. कॉपी राईट अॅक्टनुसार सहा गुन्हे दाखल करून तब्बल ५३ लाख ३७ हजार २०० रुपयाचा माल जप्त केला आहे. वेश्या व्यवसायातून १०६ तरुणीची सुटका करून पिटा कायद्यान्वये ६१ गुन्हे दाखल केल्याची माहिती सहायक आयुक्त सतीश पाटील आणि वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरात सामाजिक सुरक्षा विभागाच्या कामगरिची माहिती पाटील व वाघचवरे यांनी बुधवारी दिली. ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ मदत व्हावी म्हणून पोलिस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या अथवा तक्रारी ०२०-२६११११०३ या क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी केले होते. त्यानुसार २०१५मध्ये हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीपैकी एक हजार ८९६ तक्रारींचे निवारण केले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठेतील वेश्यावस्ती, मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई करून ८० जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९ अल्पवयीन आणि ९७ सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली. त्यामध्ये १९ बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे.
सहायक निरीक्षक नीता मिसाळ, उपनिरीक्षक दीपक सप्रे, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, रमेश काळे, नितीन तरटे, नितीन तेलंगे, राजेश उंबरे, दत्ता जाधव, सचिन शिंदे, रमेश लोहकरे, संदीप होळकर यांच्या पथकाने या सर्व कामगिरीमध्ये सहभाग घेतला.
...
कॉपीराइट अॅक्टनुसार सहा गुन्हे दाखल
कॉपीराइट अॅक्टनुसार सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी तब्बल ५३ लाख ३७ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. त्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. ऑपरेशन मुस्कान यशस्वीपणे राबवून तब्बल १९ बालकांच्या पालकांचा शोध घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या झोन बदलाच्या अधिमूल्यात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेती तथा ना विकास, सार्वजनिक-निमसार्वजनिक आणि औद्योगिक झोनमध्ये बदल करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रक्रिया शुल्क व अधिमूल्य दरामध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झोन बदल करताना १० ते २५ हेक्टरपर्यंतचे क्षेत्र एकसंघ करण्यामध्ये नैसर्गिक नाले, रस्ते व डोंगराच्या मर्यादा आल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव पूर्वमान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रादेशिक योजनेतील वेगवेगळ्या झोन बदलांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे मंजूर प्रादेशिक योजनेतील प्रस्ताव आता थेट राज्य सरकारकडे मंजुरीसाठी न पाठवता विभागीय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या 'प्रस्ताव छाननी समिती'कडे दाखल करावे लागणार आहेत. ही समिती शेती तथा ना विकास झोन व सार्वजनिक-निमसार्वजनिक झोनचे रहिवास झोनमध्ये; तसेच रहिवास झोनच्या जमिनीचे औद्योगिक, शेती झोनचे वाणिज्य तसेच
वनीकरण, डोंगरमाथा व डोंगर उतार, प्रादेशिक उद्यान, खनिकर्म, पर्यटन व अन्य कोणत्याही विभागातून शेती झोनमध्ये बदल करण्याचे निर्णय घेणार आहे. दहा हेक्टर ते २५ हेक्टर जमिनीच्या एकसंघ झोन बदलाचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. झोनमध्ये बदल करताना त्यासाठी अधिमूल्य शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारने बदल करून हे अधिमूल्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेती तथा ना विकास झोनमधून रहिवास व औद्योगिक झोनमध्ये रूपांतर करण्यासाठी लगतच्या रेडी रेकनरमधील दराच्या ३० टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. शेती तथा ना विकास झोनमधून वाणिज्य झोनमधील बदलासाठी ५० टक्के आकारणी केली जाणार आहे. झोन बदलासाठी समितीकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित जमीन मालकांकडून जमिनीच्या बाजारमूल्य तक्त्यानुसार ५० टक्के किंवा वीस हजार रुपये यामधील
अधिक रक्कम असेल ती शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
..
असे आकारणार अधिमूल्य
शेती तथा ना विकास झोनमधून वाणिज्य झोनमधील बदलासाठी ः ५० टक्के
रहिवासी झोनमधून औद्योगिक झोनमध्ये रूपांतर ः १० टक्के
वनीकरण, डोंगरमाथा, खनिकर्म, पर्यटन यामधून शेती झोनमध्ये ः २० टक्के
प्रादेशिक योजनेतील रस्ता आखणी रद्द व सुधारणा ः १० टक्के
हरित विभाग १ आणि हरित विभाग दोनमधील बदलासाठी ः ३० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिजाऊंवरील टपाल तिकिटाचे अनावरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लखोजीराजे जाधव यांनी मुलगी व्हावी यासाठी नवस केला होता; परंतु आज मुलीचा गर्भ असल्याचे कळाल्यानंतर त्यांची हत्या केली जात आहे. लखोजीराव जाधव, जिजाऊ आणि शिवराय यांच्या विचारांचे वारस आपण झाले पाहिजे,' असे मत लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराव राजे जाधव यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
मावळा जवान संघटनेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सरसेनापती हरजीराजे महाडिक यांचे वंशज विजयसिंहराजे महाडिक, तानाजी मालुसरे यांचे वंशज शितल मालुसरे, जीवा महाले यांचे वंशज संतोष सपकाळ, सुनील मोरे, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, वेंकिजचे व्ही. कुमार, संघटनेचे अध्यक्ष दत्ता नलावडे, कार्याध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, अनुराधा मोहिते पाटील व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मोहिते पाटील यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकराजा शिवछत्रपती महानाट्य बॅनर व ध्वनिफितीचे प्रकाशनही झाले.
'महापुरुषांच्या चरित्रातून आपण चांगले विचार पेरण्याचे काम कायम केले पाहिजे. पूर्वीच्या काळातील विचार आताचे विचार यांत फरक पडला आहे. आताच्या काळात जिजाऊंचा जन्मच होऊ दिला नाही, तर छत्रपती शिवाजी कसे जन्माला येणार, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. एक लहान मुलगा राष्ट्र निर्माणाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून उभा राहिला आणि ते पूर्णही केले. महाराजांनी त्या काळात दिलेला लढा, आजही सुरू आहे. आजचे शत्रू बेरोजगारी आणि गरिबी आहे. आता लोकांनी त्या विरोधात उभे राहिले पाहिजे,' असे सावळेश्वरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-फायलिंग वाढायला हवे

$
0
0

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई हायकोर्टात आता ई-फायलिंगद्वारे केसेस दाखल केल्या जातात. त्यामुळे आता कोणत्याही शहरातून किंवा गावातून हायकोर्टात केसेस दाखल करता येऊ शकतात. ही नवीन प्रणाली वकिलांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. पुणे आणि कोल्हापूरकडून हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे म्हणून मागणी करण्यात येते आहे. मात्र, त्यापूर्वी हायकोर्टात दाखल होणाऱ्या ई-फायलिंगचे प्रमाण वाढले पाहिजे, असे विचार राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शनिवारी व्यक्त केले.
'पुणे बार असोसिएशनतर्फे शनिवारी पुण्यात घेण्यात आलेल्या वकिलांच्या परिषदेत श्रीहरी अणे बोलत होते. पुण्यातील वकिलांकडून खंडपीठ मिळावे म्हणून मागणी करण्यात येते आहे. मात्र खंडपीठाच्या कामकाजासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करणे आपल्याला शक्य आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे,' असे महाधिवक्ता अणे म्हणाले.
'मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळाल्यानंतर खंडपीठापुढे कामकाज करण्यासाठी लागणारे अर्ज पुण्यातील वकिलांनी मुंबईतील वकिलांकडून लिहून घ्यायचे आणि ते कोर्टात सादर करायचे. किंवा मुंबईतील वकिलाने पुण्यात येऊन कामकाज पाहणे, अशा पद्धतीने कामकाज झाल्यास खंडपीठ मागणीचा हेतू साध्य होणार आहे का हे पाहणे आवश्यक आहे. खंडपीठापुढे कामकाजासाठी लागणारी गुणवत्ता आपल्यातील वकिलांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे,'असे महाधिवक्ता अणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मशीद हे परमेश्वराचे घर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मशीद हे परमेश्वराचे घर आहे. ते कोणाला भेट म्हणून देता येत नाही किंवा विकता येत नाही. मशिदीवर परमेश्वराचाच अधिकार आहे,' असे मत बोहरी समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी व्यक्त केले. बोहरी समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे गादीवर बसल्यानंतर प्रथमच पुण्यात आगमन झाले. त्यांच्या आगमनाच्या वेळी समाजाच्या बांधवाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मार्केट यार्डातील बोहरी कॉलनीत बांधण्यात आलेल्या बोहरी समाजाच्या मशिदीचे धर्मगुरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले. 'मशीद हे परमेश्वराचे घर आहे. ते कोणाला भेट म्हणून देता येत नाही. किंवा विकता येत नाही. मशिदीवर परमेश्वराचाच अधिकार आहे,' असे मत बोहरी समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी उद‍्घाटन प्रसंगी व्यक्त केले. त्या वेळी बोहरी समाजाच्या मशिदीचे 'तैय्यबी' असे त्यांनी नामकरण करताच उपस्थित बोहरी बांधवांनी 'मौला मुफद्दल,' 'या हुसैन या हुसैन' असा जयघोष केला.

मशिदीचे बांधकाम झाल्यानंतर बोहरी समाजाच्या प्रथेप्रमाणे मशिदीचे सर्वाधिकार हे मशिदीच्या विश्वस्तांनी धर्मगुरूंना दिले. त्या वेळी मशिदीच्या बांधकामासाठी झटणाऱ्या असगर गोध्रावाला, मन्सूर लोखंडवाला यांच्यासह अन्य विश्वस्तांचा सत्कार करीत त्यांना आशिर्वाद दिले. तसेच त्यांचे आयुष्य सुखसमृद्धीचे जावो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. मशिदीचे उद‍्घाटन झाल्यानंतर बोहरी समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्यासोबत बांधवानी नमाज पठण केले. मशिदीच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले आणि धर्मगुरूंनी पुण्यात महिनाभर मुक्काम करावा, अशी विश्वस्तांनी विनंती केली. त्यानंतर सहा दिवस पुण्यात वास्तव्य करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

धर्मगुरूंचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी बोहरी समाजातील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. धर्मगुरू येणार असल्याने बोहरी कॉलनीत राहणाऱ्या बोहरी रहिवाशांनी घराला विद्युतरोषणाई केली होती. धर्मगुरूंचे दर्शन घेण्यासाठी महिला घराच्या गच्चीत उभ्या होत्या. मशिदीच्या दोन्ही बाजूने बांधवांची गर्दी दिसत होती. बोहरी समाजातील पुरुषांनी डोक्यावर पारंपरिक टोपी व वेष परिधान केला होता, तर महिलांनी रंगीबेरंगी बुरखा परिधान करून हजेरी लावली होती. कार्यक्रमासाठी विश्वस्तासह पुण्यातील धर्मगुरू अब्दीअली नुरूद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली अजीज पूनावाला, अब्बास बूटवाला, कुरेश घोडनदीवाला आदी संयोजकांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भय देईल जगण्याची ऊर्मी

$
0
0

भय देईल जगण्याची ऊर्मी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सध्याचे वातावरण भीतीदायक आहे. सर्वत्र भय पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. हे भयच आपल्याला जगण्याची ऊर्मी आणि ताकद देईल. भयामुळेच आपण एकत्र येतो. आपल्याला विचारही केला पाहिजे आणि भीतीही वाटली पाहिजे', असे मत प्रसिद्ध हिंदी लेखक पत्रकार उदय प्रकाश यांनी शनिवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे (अमेरिका) साधना ट्रस्टच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण प्रकाश यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखिका विद्युल्लता अकलूजकर होत्या. हेमंत नाईकनवरे, रजनी शेंदुरे, हमीद दाभोलकर, विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांना 'समाजकार्य जीवन गौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित असलेल्या बाळ यांच्या वतीने साधना दधीच यांनी पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. साहित्य विभागात लेखक शरद बेडेकर यांच्या 'समग्र निरिश्वरवाद' पुस्तकाला 'वैचारिक ग्रंथ', नितीन दादरावाला यांच्या 'प्रतिमा आणि प्रचिती' पुस्तकाला 'अपारंपरिक ग्रंथ', रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या 'खेळघर' कादंबरीला 'ललित ग्रंथ' आणि अजित देशमुख यांच्या 'सुस्साट' नाटकाला 'रा. शं. दातार नाट्य' पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजकार्य विभागात महिला राजसत्ता आंदोलन या संस्थेतील कार्याबद्दल पुण्यातील भीम रासकर यांना, जातपंचायतीच्या विसर्जनाच्या कार्यासाठी नाशिकमधील कृष्णा चांदगुडे यांना आणि भटक्या-विमुक्तांसाठीच्या कार्याबद्दल मुंबईतील पल्लवी रेणके यांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
'सध्याचे वातावरण घाबरवून टाकणारे आहे. प्रत्येक व्यक्ती, परस्परांचे नातेसंबंध सर्व गोष्टी संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येकाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून भय वाढत असले, तरी हे भयच आपल्याला जगण्याची ऊर्मी, प्रेरणा देईल. जेव्हा माणूस काही बोलत नाही, विचार करत नाही, तेव्हा तो मृतवत झालेला असतो, असे उदय प्रकाश यांनी सांगितले. 'स्त्री पुरुष समानता आपल्याकडे केवळ बोलण्याच्या पातळीवर राहिले आहे. आचरणात मात्र, आपण मागे आहोत,' असे विद्या बाळ यांनी रेकॉर्डेड भाषणात सांगितले.
शनिशिंगणापूर संदर्भात त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. आपल्या मंत्री व अन्य खासदारही जुन्या परंपरा सरसकट चांगल्या आहेत, असे म्हणतात आणि त्या टिकवून ठेवण्याची भाषा करतात, हे दुर्देवाचे लक्षण आहे', अशी टीका बाळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायदान म्हणजे निकाल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
न्याययंत्रणेकडून देण्यात आलेल्या निकालांची अंमलबजावणी करण्यापेक्षा ते पायदळी तुडविण्याचे प्रयत्न होतात. न्यायदान म्हणजे निकाल नाही. आपल्या पक्षकाराला न्याय कसा मिळेल याकडे वकिलांनी लक्ष देणे आवश्यक आहे. कोर्टात फक्त निकालांचे दाखले दिले जातात. प्रत्यक्षात त्याबरोबर कायदा संपूर्णपणे वाचून त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी शनिवारी केले.
पुणे बार असोसिएशनतर्फे शनिवारी अण्णा भाऊ साठे सभागृह येथे एक दिवसीय वकिल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश धर्माधिकारी बोलत होते. न्यायाधीश राजेश केतकर, पुणे​ जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुमंत कोल्हे, राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे उपस्थित होते. 'भारतीय राज्यघटनेने लोकांना न्यायाची हमी दिली आहे. वकिलांनी वकिली हा व्यवसाय ठेवला आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे,'असे धर्माधिकारी म्हणाले. 'न्यायालयीन कामकाजाचा दर्जा घसरतो आहे अशी टीका आता वारंवार ऐकायला येते. चुकीच्या निकालाचे धनी वकीलच असतात. न्यायमूर्तींना काम करायला काही वकिलांनी भाग पाडल्याची उदाहरणे आहेत. न्यायदान म्हणजे निकाल असे होत नाही. न्यायदानाच्या दर्जाचाही विचार करायला हवा,' असेही त्यांनी नमूद केले. 'सध्या वकिलांचा वेळ बार असोसिएशनमध्ये जास्त जातो. त्यांचा वेळ कोर्टापुढे अधिक जायला हवा,' असे त्यांनी सांगितले. पुण्यात वकील क्षेत्रात ५० वर्षे प्रॅक्टिस केलेल्या एम. पी. बेंद्रे, के. आर. शहा, एन. डी. पवार, एस. के. पाषाणकर, सुरेश गुजराथी, हरिदास गुजराथी, बालकृष्ण जगताप, अदिती वैद्य, एम. व्ही. अकोलकर, धनराज कटारे, अनिल लोखंडे या ज्येष्ठ वकिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाणी ऐकू न दिल्याने तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मोबाइलवर गाणी ऐकण्यास आईने मनाई केल्याच्या रागातून तरुणीने पवना नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.
मृगनयनी प्रकाश पाचपिंडे (२०, रा. मनपा शाळेसमोर, काळेवाडी गावठाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृगनयनी ही इंदिरा महाविद्यालयात बीसीए करत होती. तर तिची आई डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. मृगनयनी शनिवारी सकाळी घरात मोबाइलवर गाणी लावून ऐकत बसली होती. त्यामुळे तिच्या आईने तिच्या हातातील मोबाइल काढून घेतला आणि तिला गाणे ऐकण्यास मनाई केली. आईने मृगनयनीला घरातील कामात थोडा हातभार लावण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेली मृगनयनी घरातून बाहेर पडली. काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानाजवळील पवना नदी घाटावरून तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी तो वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. या प्रकरणी वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकरी संगीत संमेलनाचे उद्घाटन

$
0
0

वारकरी संगीत संमेलनाचे उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साधना करून साध्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नातून वारकरी निर्माण होतो. सगुण-निर्गुणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वारकरी आहे, असे मत अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
शनिवारवाडा येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे उद्घाटन मारुती कुऱ्हेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. स्वागताध्यक्ष राजेंद्र भोंडवे, भीमराव दौंड, संदीप ओझा, अॅड. गिरीश मुरकुटे व पं. यादवराज फड उपस्थित होते. याप्रसंगी गीत-नृत्य-वाद्य पुरस्कार दत्तात्रय मिसाळ यांना देण्यात आला.
'संत, पंत, तंत, देव व पृथ्वी ही संप्रदायाची पंचतत्त्व आहेत,' असे सांगून गडकर म्हणाले, 'प्रत्येक कालावधीत विविध व्यक्तींनी संप्रदायासाठी मोठे काम केले. संप्रदाय व नाथ संप्रदायाच्या मिलनातून तसेच साधना करून साध्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नातून वारकरी निर्माण होतो. सगुण-निर्गुणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वारकरी आहे.'
'परंपरेपेक्षा मोठे काही नाही,' असे पं. फड यांनी सांगितले. प्रास्ताविक पं. यादवराज फड यांनी तर सूत्रसंचालन वीणा गोखले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका ठेकेदारावर गुन्हा

$
0
0

पालिका ठेकेदारावर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लक्ष्मीनारायण चौकाकडून डायस प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठेकेदाराने निष्काळजीपणे टाकलेल्या सिमेंटच्या पाइपला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात महापालिकेच्या ठेकेदाराविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश पांडुरंग शकुर (वय २०, रा. वानवडी पोस्ट ऑफीसजवळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार एस. लोखंडे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून महापालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनारायण चौकाकडून डायस प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या ठेकेदाराने कोणतीही काळजी न घेता रस्त्यावर सिमेंटचे पाइप रस्त्यावर टाकून दिले आहेत. त्या ठिकाणी कोणतीही धोक्याची सूचना अथवा फलक लावलेला नव्हता. त्याबरोबरच बॅरिकेड्स लावलेले नव्हते. मुकुंदनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रकाश नोकरीला होता. गुरुवारी रात्री कामवारून तो दुचाकीने घरी जात होता. त्या वेळी लक्ष्मीनारायण चौकाकडे जाणाऱ्या रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रासमोर ठेवलेल्या सिमेंटच्या पाइपला तो धडकला. त्यात प्रकाशच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. बीट मार्शलने प्रकाशला जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचे आढळले. संबंधित ठेकेदाराने पाइप व्यवस्थित व काळजीपूर्वक ठेवलेले नव्हते; तसेच त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक, बॅरिकेड्स लावलेली नव्हती. त्यामुळे तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव पोलिसांना मिळालेले नाही. संबंधित ठेकादाराची माहिती घेण्यासाठी पोलिस शनिवारी महापालिकेत गेले होते. मात्र, महापालिका बंद असल्याने ठेकेदाराचे नाव समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी फौजदार पी. जी. पालांडे हे अधिक तपास करत आहेत. प्रकाशचे वडील खासगी ठिकाणी काम करतात, तर आई घरकाम करते. त्याला एक लहान बहीण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाद थांबवा, आता ताणू नका

$
0
0

वाद थांबवा, आता ताणू नका

संमेलनाबाबत अजित पवार यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या वक्तव्यांचा वाद टोकाची भूमिका घेऊन तुटेपर्यंत ताणू नये. संमेलन सुरळीत पार पाडावे,' असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करून शासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, 'साहित्य संमेलनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या वक्तव्याचा वाद टोकाची भूमिका घे‍‍ऊन तुटेपर्यंत ताणू नये. सर्वांनी सहकार्य करून संमेलन सुरळीत पार पाडावे.'
'सनातन'च्या वकिलांनी ट्विटव्दारे केलेल्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले, 'त्या ट्विटचे दोन्ही बाजूने अर्थ निघतात. धमकी पण होऊ शकते आणि सल्लाही असू शकतो; परंतु अशा प्रकारचे ट्विट करून राज्यातील वातावरण गढूळ करु नये.'
मोहननगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळेल, असा दावा पवार यांनी केला. कार्यक्रमाला महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आयुक्त राजीव जाधव उपस्थित होते. अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू व उपजिल्हाधिकारी वीरधवल खाडे, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू व पोलिस उपअधीक्षक पंकज शिरसाठ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वेटलिफ्टर व तहसीलदार संदीप आवारी यांचा सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी आणि दहा पुस्तकांचा संच देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

$
0
0

विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांपेक्षा दीडपटीने अधिक मदत भाजप-सेना सरकारतर्फे दिली जात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शनिवारी केला. जुन्या चुका झाकण्यासाठीच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आघाडी सरकारतर्फे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साडेचार हजार रुपये मदत केली जात असताना, फडणवीस सरकारने कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. बागायती आणि फळपिकांचे अनुदानही वाढविण्यात आले आहे; तसेच नुकसान भरपाईस पात्र होण्यासाठी ५० टक्के नुकसानीची अट शिथिल करून ३३ टक्क्यांवर आणली आहे. गेल्या दीड वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना दोन वेळा विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे, असे भांडारी यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी सरकारने कायम पुढाकार घेतला असतानाही, सरकारविरोधात चुकीची माहिती दिली जात असल्याची टीका भांडारी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. सबनीस यांच्यामुळे संमेलनाचे अवमूल्यन

$
0
0

डॉ. सबनीस यांच्यामुळे संमेलनाचे अवमूल्यन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'संमेलनाच्या व्यासपीठावरून आत्तापर्यंत अनेक साहित्यिकांनी राजकारणाला दिशा दिली आहे; पण कोणताही ठोस विचार न मांडता बाष्फळ बडबड करणाऱ्या अध्यक्षांमुळे संमेलनाचे अवमूल्यन होत आहे', अशा खरमरीत शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी नियोजन संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. संमेलनाध्यक्ष झालेल्या डॉ. सबनीस यांचे साहित्यातील योगदान तरी काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तेव्हापासून भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले असून, संमेलनस्थळी त्यांना पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रवक्ते भांडारी यांनीही शनिवारी सबनीस यांच्यावर तोंडसुख घेतले.
'साहित्य संमेलनाची सभ्यता सांभाळून राजकारण्यांवर जरूर टीका करावी. त्याबद्दल कोणी आक्षेप घेणारही नाही; परंतु केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी अविचाराने केली जाणारी टीका अत्यंत चुकीची आणि निंदनीय आहे', अशी टीका भांडारी यांनी केली. डॉ. सबनीस यांचे एकूणच वागणे, बोलणे संमेलनाच्या सभ्यतेला शोभणारे नसून, त्यांच्यामुळे संमेलनाचे अवमूल्यन होत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
खासदार अमर साबळे यांच्यातर्फे सबनीसांच्या विरोधात केले जाणारे आंदोलन वैयक्तिक नाही, तर पक्षाचा त्याला पूर्ण पाठिंबा असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

संमेलनाचा निधी दुष्काळाला?
साहित्य संमेलनावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असताना, अशा वेळी सरकारने संमेलनाचे अनुदान देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संमेलनाला दिले जाणार अनुदान यंदा दुष्काळग्रस्तांना देण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

.......................
भाजपचा अघोषित बहिष्कार?
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी निमंत्रितांच्या यादीमध्ये आहेत. डॉ. सबनीस यांच्या विरोधातील आंदोलनामुळे भाजपचे मंत्री संमेलनापासून दूर राहणार असल्याची चर्चा आहे. पक्ष प्रवक्ते माधव भांडारी यांनीही शनिवारी तसे संकेत दिले. 'निमंत्रित म्हणून बोलावले, म्हणजे जायलाच पाहिजे, असे बंधन नसते', असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार जणांनी दिली ‘फेसबुक’ पेजला भेट

$
0
0

दहा हजार जणांनी दिली 'फेसबुक' पेजला भेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मोबाइल अॅप, रेडिओ जिंगल, फेसबुक, ट्विटर, मोबाइल, ई-बुक अशा समाजमाध्यमांचा प्रभावी वापर ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात येत आहे. यामुळे तरुणवर्ग संमेलनाकडे आकर्षिला जात असून, संमेलनाचे 'फेसबुक'वरील पेज १० हजार जणांनी 'लाइक' केले आहे.
'मराठीचे भवितव्य तरुणांच्या हाती असून, त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला जात आहे. संमेलनाचा लोगो, त्यासाठी तयार केलेले अॅनिमेशन, संकेतस्थळ, 'साहित्य मित्र' हे मोबाइल अॅप, रेडिओ जिंगल या सर्वांनाच मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे,' असे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले. या संमेलनाला पन्नास हजार तरुण रसिक भेट देतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करण्याच्या स्पर्धेत १३० जणांनी अर्ज केले होते. या संमेलनासाठी तयार करण्यात आलेली रेडिओ जिंगल विविध रेडिओ चॅनल्स, तसेच यू ट्यूबवरूनही ऐकवण्यात येत आहे. ऋषिकेश रानडे आण मुक्ता जोशी यांनी गायलेले हे एक मिनिटाचे जिंगल केदार परांजपे यांनी संगीतबद्ध केले आहे. याशिवाय संमेलनाच्या
www.sahityasammelan.dpu.edu.in या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध आहे, असे असे संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांनी सांगितले.
.....................
'साहित्य मित्र' अॅप लोकप्रिय
संतोष देशपांडे यांनी 'साहित्य मित्र' हे मोबाइल अॅप तयार केले असून, ते डाउनलोड करणाऱ्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील कामगार सर्वांत जास्त आहेत. 'शब्दांगण' हे शब्दकोडी आणि 'शब्दभेट' यातून अवघड मराठी शब्दांचे सोपे अर्थ सांगणे, या दोन्ही सदरांना तरुण वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय 'ज्ञात-अज्ञात' या विभागात साहित्य, संस्कृती आणि सामान्यज्ञानावर आधारित पाच प्रश्नांना उत्तरे देण्यातही तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला आहे. हे अॅप विशेष लोकप्रिय ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक नसलेल्यांच्या पुस्तकांनी खाल्ला ‘भाव’

$
0
0

साहित्यिक नसलेल्यांच्या पुस्तकांनी खाल्ला 'भाव'

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे
सरत्या वर्षात ग्रंथविक्री तोट्यात राहिली असली, तरी काही पुस्तकांनी मात्र 'भाव' खाल्ला. साहित्यिक नाहीत, असे अनेकजण लिहिते झाले आणि बघता बघता त्यांच्या पुस्तकांवर वाचकांच्या उड्याही पडल्या. वाचकांची अभिरूची बदलल्याचेच हे निदर्शक होते. यामुळे वेगळ्या प्रकारचे अनुभवकेंद्रीत असे साहित्य मराठीत मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहे.
डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे, संदीप वासलेकर, डॉ. नरेंद्र जाधव यांच्यापासून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांनी या ना त्या निमित्ताने सारस्वताच्या दरबारी आपली सेवा रुजू केली. कथा, कादंबऱ्या, ललित, काव्यसंग्रह या नेहमीच्या चौकटीतून मराठी साहित्य बाहेर येऊ लागले आहे. साहित्य मनुष्यकेंद्रीत असावे, असे म्हणताना निव्वळ माणूसकेंद्रीत पुस्तकांनी ग्रंथांची दालने व्यापली आहेत. मुळात लेखक नसलेल्या अनेक मान्यवरांच्या पुस्तकांना वाचकांकडून मोठी मागणी असून, अशा पुस्तकांच्या आवृत्त्या हातोहात संपत आहेत, असे निरीक्षण 'अक्षरधारा'चे रमेश राठिवडेकर यांनी 'मटा'शी बोलताना नोंदवले.
डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा, डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कार्यावरील मेळघाटावरील मोहोर, संदीप वासलेकर यांचे एका दिशेचा शोध, डॉ. विकास आमटे यांचे आनंदवन-प्रयोगवन, श्रीनिवास ठाणेदार यांचे ही श्रींची इच्छा, शरद पवारांचे लोक माझे सांगाती, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आणि आम्ही, डॉ. रवी बापट यांचे पोस्टमार्टेम, तसेच विविध कलावंत, नेते यांच्या आत्मचरित्रांना वाचकांनी उचलून धरले. माणूसकेंद्रीत, तसेच जगण्याला बळ देणाऱ्या अनुभवांमुळे अशा पुस्तकांना मागणी वाढत असल्याचे राठिवडेकर यांनी सांगितले. याशिवाय आरोग्य, भटकंती, निसर्ग या विषयांवरील पुस्तके वाचकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. कथा, कादंबऱ्या, ललित, काव्य अशा पठडीपेक्षा प्रेरणा देणारे साहित्य लोकप्रिय ठरत आहे. हा प्रकार येत्या काळात अधिक वाढत जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
.......
अनुभवविश्व भावले
मूळ साहित्यिक नसलेल्या अनेक नेते-अभिनेत्यांसह अन्य विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी हाती घेतलेल्या लेखणीचे वाचकांमधूनही मोठे स्वागत करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आत्मकथनपर पुस्तकांचा मोठा समावेश आहे. लेखनशैली किंवा भाषेचा साज या दृष्टीने मूळ साहित्यिक मंडळी पुढे असली, तरी या सर्व मंडळींच्या लेखनात अनुभवांचीच तीव्रता आणि व्यापकता मोठी असल्याने थेट कथनाची ही नवी शैली वाचकांच्या पसंतीस उतरल्याचे त्यांच्या पुस्तकांच्या खपावरून समोर येत आहे. शरद पवार यांच्यासारख्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नेत्यांच्या कथनाबाबत मोठी उत्सुकता किंवा अन्य लेखकांच्या लेखनात जीवनाच्या नव्या अंगांवर टाकण्यात आलेला प्रकाशही वाचकांना भावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोनस हवा? वाहतुकीचे नियम पाळा!

$
0
0

Kuldeep.Jadhav
@timesgroup.com

पुणे : हिंजवडी परिसरातील वाहतुकीच्या कोंडीची भीषण समस्या सोडविण्यासाठी येथील कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलाव्यात आणि एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आणणे टाळावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी या कंपन्यांना केली आहे. वेगवेगळ्या वेळेत ही वाहने रस्त्यावर आल्यास वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेता येईल, असा निष्कर्ष पोलिसांच्या अभ्यासात काढण्यात आला आहे. त्याचबरोबर या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या बोनसचा वा भत्त्यांचा संबंध वाहतुकीचे नियम पाळण्याशी जोडण्याची शिफारसही पोलिसांनी केली आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील फेज एक, दोन व तीनमधील सर्व कर्मचाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. येथील सर्व कंपन्यांची ऑफिस सुरू होण्याची व सुटण्याची वेळ एकच आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी वेगवेगळ्या वेळा ठेवण्याची सूचना पुढे आली आहे. गेली काही वर्षे हिंजवडी परिसरात सकाळ आणि सायंकाळी वाहतुकीची भीषण कोंडी होते. ती फोडण्यासाठी चारचाकी वाहनांची संख्या कमी करून सार्वजनिक वाहतूक वाढविणे, हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी येथील कंपन्यांना काही अभिनव कल्पनाही सुचविल्या आहेत.

बहुतांश कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांना पारितोषिके किंवा बोनस देताना, संबंधित कर्मचाऱ्याची नागरिक म्हणून वाहतूक विषयक वागणूक कशी होती, याचाही विचार करावा. विशिष्ट कर्मचाऱ्याने त्या महिन्यात सार्वजनिक वाहतुकीचा किती वेळा वापर केला, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले का, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर केला का, या गोष्टींनाही प्राधान्य द्यावे, असे कंपन्याना सुचविल्याचे वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी 'मटा'ला सांगितले. येथील कर्मचाऱ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची माहिती वाहतूक विभागाकडून त्यांना उपलब्ध करून दिली जाईल.

दरम्यान, ऑफिसच्या वेळा बदलण्याबाबत वाहतूक पोलिसांनी येथील कंपन्यांच्या प्रशासनाशी वार्तालाप केला आहे, असे आवाड यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच वाहतूक विभागाने कोंडीच्या समस्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी हिंजवडी वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. वाकड जकात नाका येथे अंडरपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली आहे. सध्या शिवाजी चौक ते भुमकर चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मेझानाइन ते मारुंजी ते भूमकर चौक रुंदीकरणाचे काम ६० टक्के झाले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी वाकड येथे अंडरपासचे काम सुरू करण्यात आले. तर हिंजवडी फेज-२ ते मारुंजी रोड जंक्शन दरम्यान नवीन रस्त्याचे ४० टक्के काम झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ रोड ब्लॉक; रस्त्यांवर ‘चक्का जाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या चक्रव्यूहाचा आणखी एक भयंकर अनुभव पुणेकरांनी शनिवारी घेतला. त्यासाठी काल निमित्त होते कृषी महाविद्यालय परिसरातील ऑइलच्या गळतीचे. त्यामुळे रस्ता बंद केल्याने विद्यापीठ रस्त्यासह औंध-बाणेर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रोड, डेक्कन जिमखाना आणि शिवाजीनगर या संपूर्ण परिसरात 'चक्का जाम' स्थिती निर्माण झाली.

सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस विद्यापीठ परिसरातून वाहनांनी जाणे, हा गेल्या काही वर्षांत पुणेकरांसाठी अंगावर काटा आणणारा अनुभव ठरू लागला आहे. एक ते दीड किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाऊण ते एका तासाचा अवधी लागणे, ही नित्याची बाब ठरली आहे. समोर सिग्नल दिसत असूनही किमान पाच ते सहा सिग्नल सुटेपर्यंत तेथून सुटका न होणे, लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि दाटीवाटीच्या रस्त्यातून प्रसंगी फूटपाथवरून वाहने काढणारे दुचाकीचालक, हे येथे नेहमीच दिसणारे चित्र बनले आहे. त्यातच शनिवारी कृषी महाविद्यालयाच्या समोरील ब्रिजवर ऑइल सांडल्याने रस्ता काही काळ बंद करण्यात आला.

या ब्रिजवर, ऑइल सांडल्याची वर्दी फायरब्रिगेडला सकाळी १०च्या सुमारास मिळाली. त्यानंतर फायरब्रिगेडच्या जवानांनी साफसफाई करेपर्यंत रस्ता २० ते २५ मिनिटे बंद ठेवण्यात आला. अचानक रस्ता बंद झाल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाहनांच्या रांगा विद्यापीठापर्यंत पोहोचल्या. त्याचा परिणाम, औंध रोड, बाणेर रोड, सेनापती बापट रोड, गोपाळ कृष्ण गोखले रोड आदी मार्गांवर वाहतूक कोंडी होती. वाहतूककोंडीचा चक्रव्यूह

शहरातील एक चौक किंवा रस्ता वाहतुकीसाठी अचानक बंद झाल्यास किती गंभीर स्थिती उदभवते, हे या घटनेतून पुन्हा निदर्शनास आले. हे शहरातील बहुतांश रस्त्यावरील प्रातिनिधिक चित्र आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी डेक्कनला गरवारे ब्रिजजवळ महापालिकेची जलवाहिनी फुटली होती. त्यामुळेही अशाच प्रकारे जंगली महाराज रोडसह नळ स्टॉप चौक, पौड फाटा कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड या संपूर्ण भागात त्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images