Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘चैत्रबन’चे पालटले रूप

$
0
0

म. टा. प्रति​निधी, पुणे

माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन्, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी वास्तव्य केलेले रामटेकडीतील राज्य राखीव पोलिस मैदानावरील (एसआरपीएफ) 'चैत्रबन' हे गेस्ट हाउस कात टाकणार आहे.

राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने गेस्ट हाउसच्या १९५४ पासूनच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. वानवडी येथील राज्य राखीव दलाच्या ग्रुप दोनच्या परिसरात गेस्ट हाउस बांधण्यात आले आहे. या छोटेखानी वास्तूमध्ये राहण्यासाठी दोन खोल्या, हॉल आणि स्वयंपाकघर आहे. या गेस्ट हाउसमध्ये माजी राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी ३० डिसेंबर १९५४ मध्ये वास्तव्य केले होते.येथील 'व्हिजिटर बुक'मध्ये त्यांनी अभिप्रायही नोंदविला आहे. त्यानंतरही येथे दिग्गजांनी वास्तव्य केल्याच्या नोंदी आढळतात. तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई, तसेच पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही या गेस्ट हाउसला भेट देऊन'व्हिजिटर बुक'मध्ये नोंद केली आहे. पोलिस आणि संरक्षण विभागातील मोठ-मोठे अधिकारी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार देखील येथे राहिल्याच्या नोंदी आहेत.

गेल्या ६२ वर्षांहून अधिक काळ पोलिस दलाच्या सेवेत असलेल्या 'चैत्रबन'चे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले. मात्र, सध्या त्याची अवस्था अत्यंत खालावली होती. स्पर्धांच्या निमित्ताने ग्रुपचे कमाडंट मनोज पाटील यांनी मैदानासह या गेस्ट हाउसचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला. गेस्ट हाउसचे छत, फ्लोरिंग आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे.या स्पर्धांचे औपचारिक उद् घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, गुरुवारी होत आहे.

गोवा मुक्ती संग्रामातही आघाडीवर

गोवा मुक्ती संग्रमासाठी १९६१मध्ये झालेल्या पोलिस कारवाईत 'एसआरपीएफ'च्या ग्रुप दोनने महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईचे पंडित नेहरू यांनी कौतुक केले होते. सुरुवातीला केवळ दोन ग्रुप असलेल्या 'एसआरपीएफ'चा विस्तार सोळा ग्रूपमध्ये झाला असून, १६ हजार सशस्त्र जवान सध्या कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसेवा, रुपीच्या संचालकांवर संक्रांत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सहकारी बँकांना दिवाळखोरीत आणणारे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दहा वर्षे संबंधित संचालकांना निवडणुका लढविण्यास अपात्र ठ​रविण्याच्या निर्णयामुळे पुण्यातील रुपी, लोकसेवा सहकारी बँकेसह बरखास्त झालेल्या अन्य बँकांच्या संचालकांवरही संक्रांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बरखास्त संचालकांपैकी कोणत्याही संचालकांची अन्य सहकारी बँकांवर संचालक म्हणून नेमणूक झाल्यास त्यांचीही पदे या निर्णयामुळे रद्द होणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सूचनेनुसार सहकारी बँकांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील बरखास्त झालेल्या काही बँकांच्या संचालकांना दहा वर्षे बँकेच्या कारभारापासून दूर राहावे लागणार आहे. रुपी, लोकसेवा सहकारी बँक, आनंद बँक, नवजीवन बँक, सिद्धार्थ सहकारी बँक आदी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त झाल्याने या बँकांच्या संचालकांचे बँकिंग क्षेत्रातील भवितव्य अडचणीत आले आहे.

'सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक आणि राज्य सरकारचे सहकार खाते या दोन्हींचेही नियंत्रण असते. या निणर्यानुसार रिझर्व्ह बँकने बरखास्त केलेल्या बँकेच्या संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. राज्य सरकारने बरखास्त केलेल्या संचालक मंडळासाठी हा निर्णय लागू नाही,' असे दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष आणि विद्या सहकारी बँकेचे कार्यवाहक संचालक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर विलीनीकरण झालेल्या बँकांच्या संचालकांनाही हा निर्णय लागू होणार आहे,' असेही अनास्कर म्हणाले.

'साखर कारखान्यांसाठीही निर्णय लागू करा'

सहकारी बँकांप्रमाणे कर्जाच्या खाईत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांचेही संचालक मंडळ दहा वर्षांसाठी बरखास्त करण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. घोटाळे झालेल्या सहकारी संस्थांची सखोल चौकशी करून जबाबदार दोषी संचालकांच्या मालमत्तांवर टाच आणावी, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणगाड्यांच्या शताब्दीला क्षेपणास्त्रांची सलामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अहमदनगर

लष्कराचे सुसज्ज रणगाडे...लेसर तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्रे सोडणारी सुखोई विमाने...समोर एक किलोमीटरपासून तीन किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा सहज घेतलेला वेध...आदेश मिळाल्यानंतर धडकी भरवणारा आवाज करत सुटलेले क्षेपणास्त्र आणि बॉम्ब....क्षणार्धात उद्धवस्त झालेली टार्गेट्स....अशा छातीत धडकी भरविणाऱ्या वातावरणात लष्कराच्या चिलखती वाहन (आर्म्ड कोअर) विभागाच्या सुसज्जतेचे दर्शन बुधवारी घडले.

जागतिक इतिहासात ६ जानेवारी १९१६ रोजी प्रथमच युद्धात रणगाड्यांचा वापर झाला. त्या घटनेला बुधवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील केके रेंज येथे 'आर्म्ड कोअर सेंटर आणि स्कूल' (एसीसी अँड एस) व 'मेकॅनाइझ्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर'तर्फे (एमआयआरसी) फायर पॉवर अँड मॅन्युव्हर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकांदरम्यान या केंद्रांच्या लष्करी अधिकारी, जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले. आर्म्ड कोअर सेंटर आणि स्कूलचे (एसीसी अँड एस) प्रमुख मेजर जनरल प्रवीण दीक्षित, मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) चे प्रमुख ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा, स्कूल ऑफ आर्म्ड वॉरफेअरचे ब्रिगेडिअर ए. भानोत आदींसह वरिष्ठ लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

या प्रात्यक्षिकांसाठी नगर आणि मनमाड यांना शेजारील देश मानण्यात आले होते. या दोन्ही देशांतील दहा किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून वाद सुरू असतात. अचानक मनमाड नगरवर लष्करी हल्ला करते. प्रत्युत्तरादाखल नगर विविध रणगाडे, बीएमपी, हेलिकॉप्टरच्या मदतीने आक्रमक युद्धनीतीचा वापर करून मनमाडचा पराभव करते, हे या प्रात्यक्षिकाद्वारे दर्शविण्यात आले. रशियन बनावटीचे टी ९०, टी ७२ हे रणगाडे तसेच, देशी बनावटीचा अर्जुन रणगाडा, जवान, शस्त्रे व रसद वाहून नेणारे चिलखती वाहन (बीएमपी २), कॅरिअर मोटार टँक, लष्कराची हेलिकॉप्टर्स प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती. रणगाडे आणि बीएमपीमध्ये वापरल्या जाणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचे प्रदर्शनही या वेळी मांडण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘ते’ तरुण परतले पुण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे आणि आदर्श पाटील या तिघांना गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पुणे पोलिसांनी या तिघांकडे सखोल चौकशी करूनच त्यांना पालकांच्या हवाली केले.

'जोडो भारत' मोहिमेंतर्गत भारताची ओळख करून घेण्यासाठी निघालेल्या विकास, श्रीकृष्ण आणि आदर्श हे तिघे २२ डिसेंबरच्या दरम्यान भामरागडच्या पुढे सायकलवर निघाले होते. नक्षलवाद्यांचा अत्यंत प्रभाव असलेल्या चिंतलनार, सुखमा या गावांजवळ त्यांना गावकऱ्यांनी अडवले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचे हात बांधून त्यांना तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांच्या अपहरणनाट्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गडचिरोली पोलिस दलातील अधिकारी या तरुणांना घेऊन मंगळवारी पुण्यात आला होता. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनीही त्यांच्याकडे चौकशी केली.

या तरुणांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांना शेतातील खळ्यात रात्रभर झोपवण्यात आले. दुसऱ्या दिवशी एक गणवेषधारी नक्षलवादी त्या गावात पोहोचला होता. त्यानेही त्यांच्याकडे कसून चौकशी केली. मात्र, या चौकशीत भाषेची अडचण येत होती. अखेर तेथून त्यांना जवळच्या गावात नेण्यात आले. तेथे आणखी काही नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. कोठून आला आहात, कुठे जायचे होते, ही यात्रा का काढली आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. या तरुणांकडे केलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे नकाशे मिळाले होते. त्यावरूनही चौकशी करण्यात आली, अशी माहिती या तरुणांनी पुणे पोलिसांना दिले. या तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा लपंडाव बुधवारीही कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराबरोबरच राज्यातही अनेक ठिकाणी बुधवारी किमान तापमानात काहीशी वाढ झाली. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील. मात्र, त्यानंतर पुन्हा राज्यात कडाक्याची थंडी परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तरेकडील राज्यात जम्मू काश्मीरजवळ निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यातच सध्या महाराष्ट्रात पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरण अंशतः ढगाळ होऊन किमान तापमानात वाढ होत आहे. पुढील दोन-तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहील. त्यानंतर मध्य भारतासह, वायव्य व पश्चिम भारतात किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमान गोंदिया येथे (१०.५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुण्यात ११.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. नाशिक येथे १०.७, नागपूर येथे ११.२, नांदेड येथे १२, औरंगाबाद येथे १४.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका काहीसा कमी राहून त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस कोटींची दंडवसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वाहतूक कोंडी आणि वाढत्या वाहनसंख्येबरोबरच शहरात बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षात पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० कोटी ३९ लाख ७७ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही गेल्या चार वर्षांतील विक्रमी दंडवसुली ठरली आहे. डिसेंबर २०१५पर्यंत पोलिसांनी १९,३९,२५४ प्रकरणे दाखल केली आहेत.

पुणे वाहतूक विभागातर्फे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी वेळोवेळी विविध प्रयत्न केले जातात. अनेक ठिकाणी नो-पार्किंग आणि नो-एंट्रीमधील वाहनांमुळे तसेच रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. त्यामुळे किमान वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकतो असे सांगून पोलिसांकडून प्रबोधनही करण्यात येते. तरी देखील नियमांचे उल्लंघन करण्यांवर कारवाई करून पोलिसांनी वर्षभरात २० कोटींहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे.

२०१४ च्या तुलनेत साडे सात कोटी रुपयांनी २०१५मध्ये दंडाची रक्कम वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडकरांकडून दररोज सरासरी ५,५८, ८४२ रुपयांचा दंड वसूल होत आहे. २०१४ मध्ये १२ कोटी ८१ लाख ३३ हजार २५० रुपये दंड वसूल झाला होता. तर, २०१३मध्ये ९ कोटी २१ लाख १९ हजार ५०० रुपये, २०१२ मध्ये ११ कोटी ६ लाख ५ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

..

नियम भंगाचा प्रकार दाखल प्रकरणे

हेल्मेट नसणे ३,०८, ५६५

सिग्नल तोडणे ३, ८९, ११४

नो पार्किंग २, ३५, ४६१

कार टेंटेड ग्लास १,१२, ५२४

सीट बेल्ट नसणे १,२०, ४८८

नो एंट्री १,१५, ४९२

विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ७४, ०६७

विनापरवाना वाहन चालवणे १,३४,३९०

रॅश ड्रायव्हिंग २,२२१

दारू पिऊन वाहन चालवणे ५,४५८

अन्य कलमांनुसार गुन्हे ४,४१,४७४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा लपंडाव बुधवारीही कायम

$
0
0

पुणेः शहराबरोबरच राज्यातही अनेक ठिकाणी बुधवारी किमान तापमानात काहीशी वाढ झाली. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील. मात्र, त्यानंतर पुन्हा राज्यात कडाक्याची थंडी परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तरेकडील राज्यात जम्मू काश्मीरजवळ निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यातच सध्या महाराष्ट्रात पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरण अंशतः ढगाळ होऊन किमान तापमानात वाढ होत आहे. पुढील दोन-तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहील. त्यानंतर मध्य भारतासह, वायव्य व पश्चिम भारतात किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमान गोंदिया येथे (१०.५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुण्यात ११.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. नाशिक येथे १०.७, नागपूर येथे ११.२, नांदेड येथे १२, औरंगाबाद येथे १४.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका काहीसा कमी राहून त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून हायकोर्टाची फसवणूक

$
0
0

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : विधी शाखेच्या पेपर तपासणीतील तक्रारीविषयीचा चौकशी अहवाल हाती नसतानाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एका विद्यार्थिनीला चौकशी पूर्ण झाल्याचा निर्वाळा दिला आहे. हायकोर्टामध्येही याच अस्तित्त्वात नसलेल्या अहवालाच्या बळावर विद्यार्थिनीने दाखल केलेली याचिका विद्यापीठाकडे परत पाठविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने हायकोर्टाचीही फसवणूक केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीने केला आहे.

पुण्यातील एका लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने कॉलेज पातळीवर हेतुपुरस्सर होणाऱ्या त्रासाला वैतागून कॉलेज बदलले होते. त्या विषयी संबंधित कॉलेजच्या महिला प्राचार्याकडेही तिने रितसर तक्रार केली होती. त्यानंतरही या विद्यार्थिनाला आपल्याच कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश देण्याबाबत कॉलेजच्याच एका प्राध्यापकाने प्रयत्न केल्याचे आरोप या विद्यार्थिनीने केले आहेत. परीक्षेमध्ये हेतुपुरस्सर नापास केल्याचे आरोप करून विद्यार्थिनीने त्या विषयी विद्यापीठाचा परीक्षा विभाग, विद्यापीठाचे कुलगुरू, तसेच विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांकडेही तक्रार दाखल केली होती. राज्यपाल कार्यालयाने त्या विषयी लेखी पत्र पाठवून या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठाला दिले होते. त्यानंतरही आपण अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थिनीने 'मटा'कडे नोंदविली.

'कॉलेज आणि विद्यापीठ पातळीवरून न्याय मिळत नसल्याने मी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याचे हायकोर्टामध्ये सांगितले. त्याचा दाखला घेऊन हायकोर्टाने हे प्रकरण निकाली काढले. मात्र त्याच समितीचा अहवाल काय आहे, याची माहिती विद्यापीठाने दिलेली नाही. तसेच, माहिती अधिकारामध्ये हा अहवाल मागितला असता, विद्यापीठाकडे हा अहवाल उपलब्धच नसल्याचे उत्तरही विद्यापीठानेच मला दिले. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठीय यंत्रणांवर विश्वास कसा ठेवायचा,' असा सवाल या विद्यार्थिनीने उपस्थित केला आहे.

नेमका प्रकार काय?

विधी शाखेच्या पेपर तपासणीतील तक्रारीविषयीचा चौकशी अहवाल हाती नसतानाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एका विद्यार्थिनीला चौकशी पूर्ण झाल्याचा निर्वाळा दिला आहे. हायकोर्टामध्येही याच अस्तित्त्वात नसलेल्या अहवालाच्या बळावर विद्यार्थिनीने दाखल केलेली याचिका विद्यापीठाकडे परत पाठविण्यात आली आहे.

या प्रकाराविषयी सविस्तर माहिती घेऊन, योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायकल चोराकडून २६ सायकली जप्त

$
0
0

पुणेः पूर्वी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अद्याप चोरांच्या दृष्टीने सायकलीचे महत्त्व तसेच आहे. सायकलचोरीची तक्रार नागरिक देत नाहीत आणि पोलिसांकडून या गुन्ह्यांना फारसे महत्त्व देण्यात येत नसल्यामुळे लोहियानगर येथील चोरट्याने २६ सायकलींची चोरी केल्याचे समोर आले आहे. या सायकल चोरणाऱ्या व्यक्तीला खडक पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून लाख रुपये किमतीच्या २६ सायकली जप्त केल्या आहेत.

राजू उर्फ पावडर मलय्या कोटा (रा. लोहियानगर) असे या चोरट्याचे नाव आहे. अनिता संतोष गुजराथी (रा. गंज पेठ) यांची सायकल चोरीला गेल्यानंतर त्यांनी राजू याच्यावर संशय व्यक्त केला होता. खडक पोलिस ठाण्याचे हवालदार विजय कांबळे रात्री गस्तीवर असताना राजूने चोरलेल्या सायकली लुल्लानगर मधील ट्रान्झिट कॅम्पमधील खोलीत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकांची जबाबदारी आता पालकमंत्र्यांवर

$
0
0

पुणेः पालिका हद्दीत स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारने पालकमंत्र्यांवर टाकली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून स्मारक उभारण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश सरकारने पालिकांना दिले आहे. पालिका आयुक्त या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. महापालिका हद्दीत थोर व्यक्ती, राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, संत, प्रसिद्ध राजकीय व्यक्ती, परमवीर चक्र मिळालेल्या व्यक्तींची स्मारके उभारायची असतील, तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारकडे पाठवायचा आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्ह्याचे नगररचनाकार, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चैत्रबन’चे पालटले रूप

$
0
0

'एसआरपीएफ' मैदानावरील गेस्ट हाउसने टाकली कात

म. टा. प्रति​निधी, पुणे

माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन्, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी वास्तव्य केलेले रामटेकडीतील राज्य राखीव पोलिस मैदानावरील (एसआरपीएफ) 'चैत्रबन' हे गेस्ट हाउस कात टाकणार आहे.

राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने गेस्ट हाउसच्या १९५४ पासूनच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. वानवडी येथील राज्य राखीव दलाच्या ग्रुप दोनच्या परिसरात गेस्ट हाउस बांधण्यात आले आहे. या छोटेखानी वास्तूमध्ये राहण्यासाठी दोन खोल्या, हॉल आणि स्वयंपाकघर आहे. या गेस्ट हाउसमध्ये माजी राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी ३० डिसेंबर १९५४ मध्ये वास्तव्य केले होते.येथील 'व्हिजिटर बुक'मध्ये त्यांनी अभिप्रायही नोंदविला आहे. त्यानंतरही येथे दिग्गजांनी वास्तव्य केल्याच्या नोंदी आढळतात.

तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई, तसेच पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही या गेस्ट हाउसला भेट देऊन'व्हिजिटर बुक'मध्ये नोंद केली आहे. पोलिस आणि संरक्षण विभागातील मोठ-मोठे अधिकारी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार देखील येथे राहिल्याच्या नोंदी आहेत.

गेल्या ६२ वर्षांहून अधिक काळ पोलिस दलाच्या सेवेत असलेल्या 'चैत्रबन'चे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले. मात्र, सध्या त्याची अवस्था अत्यंत खालावली होती. स्पर्धांच्या निमित्ताने ग्रुपचे कमाडंट मनोज पाटील यांनी मैदानासह या गेस्ट हाउसचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला. गेस्ट हाउसचे छत, फ्लोरिंग आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे.या स्पर्धांचे औपचारिक उद् घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, गुरुवारी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस कोटींची दंडवसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वाहतूक कोंडी आणि वाढत्या वाहनसंख्येबरोबरच शहरात बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षात पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० कोटी ३९ लाख ७७ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही गेल्या चार वर्षांतील विक्रमी दंडवसुली ठरली आहे. डिसेंबर २०१५पर्यंत पोलिसांनी १९,३९,२५४ प्रकरणे दाखल केली आहेत.

पुणे वाहतूक विभागातर्फे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी वेळोवेळी विविध प्रयत्न केले जातात. अनेक ठिकाणी नो-पार्किंग आणि नो-एंट्रीमधील वाहनांमुळे तसेच रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. त्यामुळे किमान वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकतो असे सांगून पोलिसांकडून प्रबोधनही करण्यात येते. तरी देखील नियमांचे उल्लंघन करण्यांवर कारवाई करून पोलिसांनी वर्षभरात २० कोटींहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे.

२०१४ च्या तुलनेत साडे सात कोटी रुपयांनी २०१५मध्ये दंडाची रक्कम वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडकरांकडून दररोज सरासरी ५,५८, ८४२ रुपयांचा दंड वसूल होत आहे. २०१४ मध्ये १२ कोटी ८१ लाख ३३ हजार २५० रुपये दंड वसूल झाला होता. तर, २०१३मध्ये ९ कोटी २१ लाख १९ हजार ५०० रुपये, २०१२ मध्ये ११ कोटी ६ लाख ५ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे घटली मद्यविक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे मद्य पिण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत असतानाच पुण्यात डिसेंबरमधील मद्यविक्री निम्म्याने घटल्याचे आढळून आले आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीचा परिणाम मद्यविक्रीवरही झाला असून, दर वर्षी डिसेंबर महिन्यात वाढणारी मद्यविक्री यंदा मात्र घटली आहे. मात्र, कोल्हापूर विभागात मद्यशौकिनांनी डिसेंबर महिन्यात थर्टी फर्स्टसह सुमारे ९२ कोटी ४३ लाख रुपयांची दारू फस्त करून मद्यविक्रीचा उच्चांक केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या मद्यविक्रीचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये सुमारे ७०४ कोटी ७२ लाख रुपयांचे मद्य रिचविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे; पण २०१४ मधील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत त्यात सुमारे ३१३ कोटी रुपयांची घट झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर असे सहा विभाग आहेत. अन्य पाच विभागांच्या तुलनेत कोल्हापूर विभाग हा मद्यविक्रीत दर वर्षी सर्वांत तळाच्या क्रमांकावर असायचा; पण वाढलेल्या तळीरामांमुळे या विभागाने यंदा तिसऱ्या स्थानावर उचल खाल्ली आहे.

मद्याची विक्री कमालीची घसरली असतानाच कोल्हापूरमध्ये मात्र उलटे चित्र आढळले. या विभागात कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात मद्यावर सुमारे ९२ कोटी ४३ लाख रुपये उधळले गेले. २०१४ मध्ये सुमारे ८१ कोटी ७२ लाख रुपये विक्री झाली होती. हे प्रमाण अन्य पाच विभागांच्या तुलनेत सर्वांत कमी होते, असे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात १४ कोटी ६९ लाख रुपये आणि साताऱ्यात ४८ कोटी १७ लाख रुपयांच्या मद्याची विक्री झाली. सांगलीत २९ कोटी ५६ लाख रुपये, रत्नागिरीत २१ लाख आणि सिं​धुदूर्गमध्ये १७ लाख रुपयांची विक्री झाली. सरासरी मद्यविक्रीत दरवर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबाद अग्रेसर राहिले असून, पुण्याने दुसरे स्थान कायम राखले आहे. चौथ्या क्रमांकावर नाशिक आणि त्यानंतर अनुक्रमे नागपूर आणि ठाणे विभाग आहे.

पुण्यातील ​मद्यविक्री निम्म्यावर

औरंगाबाद विभाग हा कायम मद्यविक्रीत प्रथम क्रमांकावर असतो. २०१४ च्या डिसेंबर महिन्यातच ३२७ कोटी १२ लाख रुपयांची मद्यविक्री झाली होती. मात्र, यावेळी हे प्रमाण २९१ कोटी ६४ लाख रुपयांवर आले आहे. पुण्यामध्येही हीच स्थिती आहे. २०१४ मध्ये २५२ कोटी ७५ लाख रुपयांची विक्री झाली असताना, यावेळी मात्र हे प्रमाण १२६ कोटी २० लाख रुपयांवर आले आहे. त्यामुळे निम्म्याने मद्यविक्री कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘ते’ तरुण परतले पुण्यात

$
0
0

पुणेः नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे आणि आदर्श पाटील या तिघांना गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पुणे पोलिसांनी या तिघांकडे सखोल चौकशी करूनच त्यांना पालकांच्या हवाली केले.

'जोडो भारत' मोहिमेंतर्गत भारताची ओळख करून घेण्यासाठी निघालेल्या विकास, श्रीकृष्ण आणि आदर्श हे तिघे २२ डिसेंबरच्या दरम्यान भामरागडच्या पुढे सायकलवर निघाले होते. नक्षलवाद्यांचा अत्यंत प्रभाव असलेल्या चिंतलनार, सुखमा या गावांजवळ त्यांना गावकऱ्यांनी अडवले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचे हात बांधून त्यांना तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांच्या अपहरणनाट्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गडचिरोली पोलिस दलातील अधिकारी या तरुणांना घेऊन मंगळवारी पुण्यात आला होता. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनीही त्यांच्याकडे चौकशी केली.

या तरुणांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांना शेतातील खळ्यात रात्रभर झोपवण्यात आले. दुसऱ्या दिवशी एक गणवेषधारी नक्षलवादी त्या गावात पोहोचला होता. त्यानेही त्यांच्याकडे कसून चौकशी केली. मात्र, या चौकशीत भाषेची अडचण येत होती. अखेर तेथून त्यांना जवळच्या गावात नेण्यात आले. तेथे आणखी काही नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली.

कोठून आला आहात, कुठे जायचे होते, ही यात्रा का काढली आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. या तरुणांकडे केलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे नकाशे मिळाले होते. त्यावरूनही चौकशी करण्यात आली, अशी माहिती या तरुणांनी पुणे पोलिसांना दिले. या तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय दत्त फेब्रुवारीत सुटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तवर फर्लो रजेवरून वेळेत न परतल्याचा तुरुंग प्रशासनाने ठेवलेला ठपका राज्य सरकारने बुधवारी फेटाळला. तुरुंग प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यामुळे गोंधळ झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आले असून, संजय दत्तची २७ फेब्रुवारी रोजी सुटका होण्याची शक्यता आहे.

संजय दत्तला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत १४ दिवसांची 'फर्लो' रजा मिळाली होती. त्यानंतर त्याने लगेचच 'फर्लो' रजेला मुदतवाढ मिळण्यासाठी अर्ज केला होता. तुरुंगामधून सुटताना त्याने सात जानेवारी रोजी पुन्हा परतणे अपेक्षित होते; परंतु त्याच्या रजेच्या मुदतवाढीवरून गोंधळ झाला आणि संजय दत्त पुन्हा मुंबईला परतला. मुदतवाढीवरून माध्यमांनी टीकेची झोड उठवल्यानंतर तुरुंग प्रशासनाने त्याची विनंती अमान्य केली होती.

या गोंधळामुळे तो दोन दिवस उशिरा जेलमध्ये पोहोचला होता; परंतु त्याच्या अर्जावर निर्णय न झाल्यामुळे त्याला परत जावे लागल्याचे कारण गृहीत धरण्यात आले. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी गृह मंत्रालयाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.

सरकारने तुरुंग प्रशासनाचा अहवाल फेटाळला. वेळेत निर्णय न घेतल्याने हा गोंधळ झाल्याचा ठपकाही ठेवला आहे. याबाबत तुरुंग प्रशासनाकडे स्पष्टीकरणही मागण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितली. या प्रकरणी संजय दत्तची वर्तणूक चांगली नसल्याचा ठपका ठेवला असता, तर त्याला वार्षिक ३० दिवसांची सूट मिळाली नसती. त्यामुळे त्याला जेलमध्ये एकूण ३२ दिवस जास्त राहावे लागले असते.

संजय दत्त हा फर्लो रजेवरून उशिरा असल्याचा ठपका तुरुंग प्रशासनाने ठेवला होता. हा अहवाल राज्य सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे संजय दत्तला शिक्षेतील सूट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून फेब्रुवारी-मार्चमध्ये तो सुटेल.

- अॅड. हितेश जैन, संजय दत्तचे वकील

राज्य सरकारने संजय दत्तच्या अहवालाबाबत काय निर्णय घेतला, याबाबत तुरुंग प्रशासनाला काहीही माहिती प्राप्त झालेली नाही.

- भूषणकुमार उपाध्याय, कारागृह अप्पर पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


FTII मध्ये तणाव, विद्यार्थ्यांवर लाठीमार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी ज्या व्यक्तीला अध्यक्षपदावरून विरोध करून चार महिने संप केला त्या 'महाभारता'तील 'युधिष्ठिर' ठरलेले गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयमध्ये आज 'एंट्री' होत असताना त्याआधीच वातावरण तापले आहे. चौहान येण्याआधीच विद्यार्थ्यांनी 'एफटीआयआय'च्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन सुरू केले असून आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला आहे.

गजेंद्र चौहान हे आज फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारत आहेत. त्यांच्यासह अन्य सदस्यही असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चौहान यांना विद्यार्थ्यांचा असलेला विरोध लक्षात घेऊन कालच १७ विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही आज सकाळपासूनच एफटीआयआयच्या गेटवर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले.

गजेंद्र चौहान चले जाव, गजेंद्र चौहान हाय हाय, अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करत किमान २० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात पोलिसांना लाठीमारही करावा लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौहान FTII मध्ये पण, अधिकारांना कात्री

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अखेर आज 'एफटीआयआय' अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असताना त्यांच्या अधिकारांना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात 'कात्री' लावल्याचे वृत्त 'टाइम्स नाऊ'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्याच्यासाठी एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध टीव्ही निर्माते ब्रजेश पाल सिंह यांना अकादमी परिषदेचं प्रमुखपद देण्यात आलं आहे. अकादमी परिषदेच्या अन्य सदस्यांची नाव येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. एफटीआयआयच्या नियामक मंडळात राजकुमार हिरानी, सतीश शहा आणि भावना सोमय्या या तीन नव्या चेहऱ्यांची वर्णीही लावण्यात आली आहे.

एफटीटीआयमधील तणाव कमी करण्यासाठी सरकारने उचललेलं हे पाऊल विद्यार्थ्यांच्या पचनी पडणार का?, या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत आंदोलक विद्यार्थी येत्या एक-दोन तासांत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या मुद्द्यावर सामोपचाराने तोडगा निघावा. या प्रश्नाचं राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, आज सकाळी विद्यार्थ्यांनी आक्रमक होत एफटीआयआयच्या गेटसमोर निदर्शनं केली. यावेळी सुमारे ४० विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर या गोंधळातच गजेंद्र चौहान यांनी एफटीआयआयमध्ये दाखल होत पदभार स्वीकारला. मिळालेल्या माहितीनुसार, चौहान हे एफटीआयआयपासून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथून विद्यार्थ्यांचा विरोध झुगारून ते संस्थेच्या कॅम्पसमध्ये दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, मी काम करण्यासाठी येथे आलो आहे आणि संस्थेच्या हिताचाच अजेंडा राबवणार आहे, असे चौहान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी कमी पडू देणार नाही

$
0
0

पोलिस दलासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामान्य माणसाशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा या ई-प्लॅटफॉर्मवर आणत नाहीत, तोपर्यंत समाधान मानता येणार नाही. सामान्य माणसाला पोलिस ठाण्यात जाण्याची वेळच येऊ नये. पोलिस दलाचे आधुनिकीकरण असो की त्यांच्या घरांचा प्रश्न, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी पॅशन आहेत. यासाठी कुठल्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे क्राइम इन महाराष्ट्र-२०१४ या अहवालाचे तसेच ऑपरेशन मुस्कान, सायबर बुलेटिन या पुस्तिकेच प्रकाशन तसेच व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टिम आणि सिटीझन पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, अप्पर गृह सचिव के. पी. बक्षी, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार, ​ब्रिजेश सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.
'क्राइम इन महाराष्ट्र ही सांख्यिकी असून, ते पोलिस दलासाठी एक उपकरण आहे. गुन्हे कमी झाले अथवा वाढले असतील तर का, याचे विश्लेषण करून त्यावर उपायायोजना करण्यासाठी धोरण ठवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पोलिस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर रिपॉन्स टाइम कमी करता येतो आणि त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन पोलिस दलातील तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. पुण्यात 'सीसीटीव्ही' सर्व्हिलन्स सुरू झाल्यामुळे गुणात्मक परिणाम जाणवला आहे,' असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमत्र्यांचे 'केआरए'
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहविभागासाठी काही 'केआरए' दिले होते. त्यातील काही पूर्ण झालेत काही पूर्णात्वाच्या मागा४वर आहे. तंत्रज्ञान, पुणे येथील सीसीटीव्ही, गुन्हेगारांचे शिक्षेचे प्रमाण वाढवणे आणि गुन्हा कोठेही नोंदवता येणे. हे 'केआरए' पूर्ण करण्यात आम्हाला यश आले. सीआयडीतील फिंगर ​प्रिंट आणि फोटोग्राफी हे विभाग उपेक्षित राहिले आहेत. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि पोलिसांच्या घरासांठी भरीव मदतीची गरज आहे, अशी मागणी राज्याचे अप्पर गृहसचिव बक्षी यांनी केली.
महिलासांठी ASK
महिलासांठी ASK नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. महिलांसमोर काही विघ्न आले, तर या अपॅचा उपयोग करून त्या पोलिसांची तत्काळ मदत मिळवू शकतात. हे अॅप पुणे पोलिस दलाने तयार केले असून, ते राज्यात सगळीकडे राबवण्याचा विचार आहे. तसेच, चोरीस जाणारे वाहने शोधण्यासाठी एक नवीन अॅप तयार करण्यात येते आहे, असे पोलिस महासंचालक दीक्षित या वेळी म्हणाले.
मोबाइल हरवल्याची तक्रार अॅपद्वारे
पोलिसांनी वेगवेगळे अॅप तयार करून नागरिक आणि पोलिस दलातील एक महत्त्वाचा दुवा तयार केला आहे. मोबाइल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यासाठी नागरिकांना पोलिस ठाण्यात जावे लागते. मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार देण्यासाठी एक अॅप तयार करण्यात येत असल्याचे अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर निर्यात करा, अन्यथा रेशनवर देऊ

$
0
0

साखर निर्यात करा, अन्यथा रेशनवर देऊ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‌‌इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी निर्यातीच्या कोट्यातील साखर निर्यात न केल्यास ती साखर सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी (पीडीएस) म्हणजे रेशनसाठी देण्याची सक्ती केली जाईल,' असा ​इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी सहकारी साखर कारखान्यांकडून नियमांचे पालन करण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, तसेच शंकरराव कोल्हे, शिवाजीराव नागवडे, शिवाजीराव गिरीधर पाटील, शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
'साखर कारखान्यांना निर्यातीसाठी केंद्राकडून मदत देण्यात आली आहे. कारखान्यांना ​निर्यातीचा कोटा ठरवून देण्यात आला आहे; पण ते निर्यात करत नाहीत. बाजारात भाव वाढत असल्याचे लक्षात आल्यावर निर्यात थांबविली जाते. गेल्यावर्षी साखरेचे भाव कोसळल्यावर अर्थकारण अडचणीत आले होते. नफेखोरीचा विचार करून निर्णय बदलले, तर प्रतिकूल परिस्थितीत तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे कारखान्यांनी कोट्यातील साखर निर्यात न केल्यास ती साखर 'पीडीएस'च्या भावात घेऊन विकली जाईल,' असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'देशात यावर्षी सर्वांत जास्त 'एफआरपी' देण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. आपण ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचलो असताना, अन्य राज्ये ६० ते ७० टक्के 'एफआरपी' देऊ शकली आहेत. उद्योग आणि शेतकरी हे दोन्ही जगले पाहिजेत, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये सुधारणा केल्या,' असे फडणवीस यांनी सांगितले. 'राज्यातील १३० कारखान्यांनी 'एफआरपी' दिली आहे. ४४ कारखान्यांचे ३३० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्या कारखान्यांकडून एका महिन्यात 'एफआरपी' देण्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून घेण्यात येईल. त्यानंतरच गाळप परवाना दिला जाईल,' असे सहकारमंत्री पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका निवडणुकीत दोन सदस्यांचा प्रभाग?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र (सिंगल) वॉर्ड पद्धतीने घेण्याचा कायदा राज्य सरकारने केला असला, तरी आगामी निवडणूक दोन सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनेच होईल, अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी अध्यादेश काढण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाल्याचे समजते.
महापालिकेत यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन सदस्यांचा प्रभाग होता. या पद्धतीत राजकीय वादातून संबंधित भागाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे पुढे आले होते. प्रभाग पद्धतीच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. प्रभाग पद्धतीऐवजी वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका घ्याव्या, अशी मागणी करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापुढे वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र सरकारच्या वतीने कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारकडून कायद्यातही बदल केला. परिणामी, नुकत्याच झालेल्या कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकात वॉर्ड पद्धतीने घेण्यात आल्या.
पुढील वर्षभरातच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील नऊ प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका वॉर्ड पद्धतीने होणार की प्रभाग पद्धतीने याबाबत राजकीय पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही गटही प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी अनुकूल आहेत. पुढील वर्षीच्या निवडणुकीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी वॉर्ड की प्रभाग यावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने, सरकारी पातळीवरही हालचाली सुरू असून, प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गुरुवारी अनौपचारिक गप्पांमध्ये दिले.
बदलाचे अधिकार सरकारला
'प्रभाग पद्धतीने निवडणुका घ्याव्या, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यासाठी कायद्यात बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत,' असे सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले. चार सदस्यांचा प्रभाग हा खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार दोन सदस्यांचा एक प्रभाग ठेवण्याचा विचार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images