Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नववर्षाच्या शुभेच्छांसह हॅपी स्ट्रीटची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
नववर्षातील पहिला हॅपी स्ट्रीट पिंपळे सौदागर येथे रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हॅपी स्ट्रीटवर हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देत सर्वांनी फुलऑन कल्ला केला. सेल्फी व ग्रुफ्फी काढतच अनेकांनी नेक्स्ट संडेचे प्लॅनिंग करत आठवड्याभराचा शिणवटा दूर केला. दरवेळेसप्रमाणे झुम्बा डान्सला अबालवृद्धांची गर्दी सुरुवातीपासूनच वाढत गेली. सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत अनेक स्टेप्स करत नवा जोश अनुभवायास मिळाल्याचे समाधान अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स आणि व्हिजे डेव्हल्पर्स यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक कोंडीऐवजी नागरिकांनी गजबलेल्या रस्त्याचा अनुभव घेतला. आठवड्यातील सहा दिवस सकाळपासून वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या नाशिक फाट्याजवळील पिंपळे सौदागर रस्त्यावर येथील शिवार गार्डन चौक ते कोकणे चौक येथे रविवारी (३ जानेवारी) गुलाबी थंडीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी सात वाजल्यापासून चिमुरड्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सहकुटुंबाने हॅपी स्ट्रीटवर हजेरी लावली.
हॅपी स्ट्रीटसाठी राखीव रस्त्यावर सकाळपासूनच गर्दी होऊ लागली होती. हॅपी स्ट्रीटअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या झुम्बा, एरोबिक्स आणि फिटनेस अरेना, योगसाधना, फुटबॉल, बॅडमिंटन, सायकलिंग, स्केटिंग, जेंबेवरील ताल, फन झोन, बचपन गल्ली आणि किड्स कॉर्नर, मेडिटेशन झोन, आर्ट झोन सारखे विविध उपक्रम एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी पिंपळे सौदागरवासीयांना अनुभवायला मिळाले. ताल, पॉट पेटिंग सारख्या विविध कला प्रकारांचा आनंद देखील या वेळी घेतला.
झुम्बापासून विविध फन झोनला झालेली गर्दी प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये कैद करत होता. फोटो आणि व्हिडिओचे शेअरिंग तसेच सोशल मीडियावर अपलोडिंग करत अनेक जण एकमेकांना ते टॅग करत होते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बिझी शेड्यूलमुळे कुटुंबाला एकत्रित वेळ हॅपी स्ट्रीटमुळे मिळत असल्याने पिंपळे सौदागर 'हॅपी'झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकारी संस्थांची नोंदणीरद्द करण्याचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकार खात्याने केलेल्या पाहणीत त्रुटी आढळलेल्या तीन हजार ६५१ संस्थांची तातडीने नोंदणी रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) कार्यालयाने दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थाचा नुकताच सर्व्हे केला. यामध्ये सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १८ हजार ३०२ गृहनिर्माण संस्थांची २१ विविध मुद्द्यांवर पाहणी केली. या दरम्यान, १६४० संस्था बंद आढळल्या. २०११ संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळल्या नाहीत. अशा तीन हजार ६५१ संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील यांनी दिला.
या संस्थांची नोंदणी रद्द झाल्यास संस्थेच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होतील. तसेच, दैनंदिन देखभालीचा जमाखर्च करण्याबाबत सभासद व संस्था यांच्यातील वादाबाबत कायदेशीर व्यासपीठ म्हणून सहकार न्यायालय व सहकार खाते उपलब्ध राहणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे सर्व गृहनिर्माण संस्था व त्यांच्या सभासदांनी संस्थेचा पत्ता बदलणे, सर्व्हे दरम्यान अपुरी माहिती देणे, या कारणांमुळे रद्द होणाऱ्या संस्थांच्या यादीत आपली संस्था नसल्याची खात्री करण्यासाठी पाटील यांनी केली. त्याकरीता साखर संकुल येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालये, गुलटेकडी येथील उपनिबंधक कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील उपनिबंधक कार्यालये येथे पुढील सात दिवसांत प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरअखेरपर्यंत दोन टीएमसी पाणीबचत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत पुणेकरांनी दोन टीएमसी पाण्याची बचत केली असून जून अखेरपर्यंत ही पाणीकपात सुरू राहिल्यास आणखी तीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. पाणी बचतीसाठी पुणेकरांनी घेतलेला पुढाकार याबरोबरच महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याची बचत करणे शक्य झाले आहे.
पावसाने मारलेल्या दडीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाण्याचा साठा कमी झाला होता. उपलब्ध पाणी पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. सप्टेंबर महिन्यापासून शहरातील नागरिकांना सम आणि विषम तारखेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला धरणातून दररोज १२०० ते १२५० एमएलडी पाणी घ्यावे लागत होते. मात्र, पाणीकपात सुरू केल्याने पालिकेला दिवसाला केवळ ८०० ते ८५० एमएलडी पाण्याची गरज भासते. यापूर्वी महिन्याला पुणेकरांना सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज भासत होती. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सर्वसाधारण एक टीएमसी पाणी पुणेकरांना लागत आहे. त्यामुळे महिन्याला अर्धा टीएमसी पाण्याची बचत होत असल्याचे समोर आले आहे. पाणीकपात लागू केल्यापासूनच्या चार महिन्यात दोन टीएमसी पाण्याची बचत झाल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
धरणातील घटता पाणी लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाणीकपात सुरू केली. याला प्रतिसाद देत पुणेकरांनी देखील पाणीबचतीसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या. तसेच, पाणीगळती रोखणे, पाण्याचा अपव्यय टाळणे. बांधकाम करण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची ठोस अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केल्याने ही पाणीबचत झाल्याचे पालिकेतील अ‌धिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाच्या घटकांनी घेतला वादाचा धसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण ठरले आहे. संमेलन गाजण्यासाठी वाद उपयोगी पडतात. वादांमुळे संमेलन चर्चेत येते आणि संमेलनाचे कवित्व सुरू राहते. यंदाचे संमेलनही त्यास अपवाद ठरले नाही. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्याने संमेलन आतापासूनच गाजू लागले आहे, मात्र दुसरीकडे संमेलनाच्या प्रक्रियेशी निगडीत काही घटकांनी या प्रकाराचा चांगलाच धसका घेतला आहे.

'पाडगावकरांआधी मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती', या विधानामुळे डॉ. सबनीस अडचणीत आले आहेत. त्यांना विरोध होऊ लागल्याने संमेलनाच्या प्रक्रियेशी संबंधित घटकांनी या प्रकाराचा आता चांगलाच धसका घेतला आहे. ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथे १५ते १८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाला आता अवघे बारा दिवस शिल्लक राहिलेले असताना वादाचा परिणाम संमेलनावर होऊ नये, ही काळजी संयोजकांना लागली आहे. अध्यक्षांना संमेलनस्थळी प्रवेश करू देणार नाही, अशी भाषा भाजपच्या गोटातून बोलली जाऊ लागली आहे तर यामुळे भाजपलाच फटका बसेल असे भाकीत करून माफी मागणार नाही, असे डॉ. सबनीस यांनी स्पष्ट केल्याने संमेलन जवळ येताना वादावर पडदा पडलेला नाही.

'अशा प्रकारांमुळे धसका बसतो. तयारीचे काम उत्साहात सुरू होते पण मध्येच हा वाद निर्माण झाल्याने आनंदावर विरजण पडले असून संमेलन कसे रेटायचे याची काळजी लागली आहे,' अशी बोलकी प्रतिक्रिया अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्याने रविवारी 'मटा'कडे व्यक्त केली. यंदाच्या संमेलनाचा घाट मोठा आहे. संमेलन चार दिवस असून कार्यक्रमांची रेलचेल असेल. संमेलन भव्यदिव्य असल्याने गर्दीही होईल, अशा वातावरणात संमेलन रेटावे लागणार आहे. ते शांततेत पण उत्साहात होईल, यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत, पण वादामुळे आधीच उत्साह मावळतो त्याचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

..

वादामुळे संमेलनावर कसलाही परिणाम होणार नसून सर्व घटकांना बरोबर घेऊन संमेलन यशस्वी करायचे आहे. वाद निर्माण झाला असला तरी आमच्यापर्यंत विरोधाचा सूर आलेला नाही. कुणी तक्रारही केलेली नाही.

डॉ. पी. डी. पाटील, संयोजक, साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रिक कारमध्ये वापरणार लिथियम बॅटरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवकाश मोहिमांसाठीच्या रॉकेट लाँचरमध्ये वापरली जाणारी लिथियम बॅटरी या पुढील काळात भारतात इलेक्ट्रिक कारमध्येही वापरली जाण्याची शक्यता आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) एकत्रित संशोधन प्रकल्पाद्वारे त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या वर्षभराच्या काळात त्याद्वारे इलेक्ट्रिक कार रस्त्यावर आणण्याचा विडा दोन्ही संस्थांनी उचलला आहे.
'एआरएआय'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लिथियम बॅटरीच्या बाबतीत सुरू असणारा हा संशोधन प्रकल्प या उपक्रमांमधील महत्त्वाचा उपक्रम ठरण्याचा विश्वास संस्थेच्या संचालिका रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी रविवारी व्यक्त केला. तिरुवअनंतपुरम येथील 'इस्रो'च्या विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. के. सिवन आणि ऊर्ध्वरेषे यांनी या एकत्रित संशोधन प्रकल्पाची माहिती दिली.
डॉ. सिवन म्हणाले, 'केंद्रीय नागरी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकल्पाविषयी 'इस्रो'कडे विचारणा केली होती. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही एआरएआयसोबत काम करणार आहोत. लाँच व्हेइकलसाठी वापरली जाणारी बॅटरी ही खूप खर्चिक बाब असते. दैनंदिन वापरात असलेल्या इलेक्ट्रिक कारसारख्या गोष्टीसाठी अत्यल्प खर्चात ही बॅटरी कशी तयार करता येईल आणि गाड्यांमध्ये त्याची उपयुक्तता कशी असेल, या विषयीचे संशोधन एआरएआयने करणे अपेक्षित आहे.'
आयात करण्यात येणाऱ्या 'बॅटरी'पेक्षाही एक दशांश किमतीमध्ये ही 'लिथियम बॅटरी' उपलब्ध होईल, असा विश्वास सिवन यांनी या निमित्ताने व्यक्त केला. 'इस्रो'ने पाण्याला दूर ठेवणारे सुपर हायड्रोफोबीक मटेरियल', तयार केले असून, त्याच्याही संशोधनासाठी भविष्यात एआरएआयबरोबर विचार करण्यात येणार असल्याचेही सिवन यांनी या वेळी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्ती-पाड्यांवर संमेलने

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : साहित्य संमेलन म्हटले की पूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे समीरकण पक्के असायचे. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलले आहे. विविध स्तरांतून शंभरपेक्षा अधिक साहित्य संमेलने राज्यात थंडीच्या मोसमात होऊ लागली आहेत. संमेलनांच्या भाऊगर्दीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महत्त्व टिकून राहिले असले, तरी मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भाग व वस्ती-पाड्यांवर होणाऱ्या संमेलनातून नव्या उमेदीच्या धडपडणाऱ्या लेखक, कवींना हक्काचे व्यासपीठ मिळू लागले आहे.

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथे होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने म्हणून विभागीय, एकदिवसीय अशी संमेलने सध्या रंगत आहेत. याशिवाय विविध पातळ्यांवर आयोजित केली जाणारी संमेलने तरुण लेखक व कवींसाठी अभिव्यक्ती माध्यम ठरत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबर राज्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, अत्रे संमेलन, सातारा ग्रंथोत्सव, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संमेलन, दक्षिण संमेलन याबरोबरच महाविद्यालयीन साहित्य संमेलन आयोजित करण्याचे प्रमाण वाढले आहे.

ही संमेलने एकीकडे होत असताना, शोषित, वंचित घटकांचा आवाज बुलंद करणारी अनेक संमेलने होऊ लागली आहेत. या संमेलनांमुळे वंचित घटकातील नव्या लेखक, कवींना अभिव्यक्त होण्याची संधी मिळू लागली आहे. कामगार संमेलन, दलित साहित्य संमेलन, ग्रामीण संमेलन, विद्रोही संमेलनांमुळे मोठा वर्ग साहित्याकडे वळू लागला आहे. पुण्यात गेल्या काही वर्षापासून होणाऱ्या सम्यक साहित्य संमेलनाने चांगली उंची गाठली आहे. दर्जेदार कार्यक्रमांतून साहित्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होऊ लागला आहे. ही सर्व संमेलने नव्या लेखक, कवींसाठी महत्वाची आहेतच. कारण प्रत्येक साहित्यिकालाच मोठ्या व्यासपीठावर जाता येईल असे नाही. पण संमेलनांच्या या भाऊगर्दीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने आपले महत्व टिकवून ठेवले आहे, हेही तितकेच खरे.

संमेलनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली की साहित्य रसिकांना साहित्याच्या उत्सवाचे वेध लागतात. यामध्ये काही रसिक असे असतात की संमेलन कुठेही असो, यांची हजेरी ठरलेली असतेच. साधारण दिवाळीनंतर सुरु होणारा संमेलनांचा काळ पुढे चार-सहा महिने बहरतो. संमेलनातून काय सिद्ध होते, असे म्हणण्यापेक्षा संमेलनातून नव्या लेखक, कवींना व्यासपीठ मिळते. निमशहरी व ग्रामीण भागातील रसिकांना साहित्य नगरीची सैर घडते, अनेक प्रतिभावान साहित्यिकांना अनुभवण्याची संधी मिळते. ग्रंथ खरेदी होते व यातून साहित्याची, शब्दांची सेवा आपोआप घडते. शोषित , वंचित घटकांचा आवाज संमेलनातून बुलंद होतो, हीच या संमेलनांची उपलब्धी ठरू लागली आहे.

'मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांना प्रतिसाद मिळतो. रसिक येतात, यावरूनच संमेलनांचे महत्व ठरते. मोठ्या संख्येने यायला लोक काय वेडे आहेत का' असा सवाल उपस्थित करत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाच्या उपयुक्ततेकडे 'मटा'शी बोलताना लक्ष वेधले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनीही संमेलनाच्या संख्येवर शिक्कामोर्तब केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबर महाराष्ट्रात शंभर पेक्षा जास्त संमेलने आयोजित केली जातात. मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत होणाऱ्या या संमेलनामुळे विविध घटकातील लेखक, कवींना हक्काचे व्यासपीठ मिळू लागले आहे. चार लाखांपासून दहा लाखांपर्यंत खर्च या संमेलनांना येतो, अशी माहिती त्यांनी दिली.

..
सीमाभागात गावोगावी संमेलने होतात. अस्मिता जागृत करण्यासाठी ते महत्वाचे आहे. संमेलन ही अभिव्यक्त होण्याची संधी असून, डॉल्बीवर नाचण्यापेक्षा हे केंव्हाही बरे, अशी भूमिका मांडत राज्यात शंभरपेक्षा जास्त संमेलने होतात. या संमेलनांची माहिती ठेवणारी केंद्रीय व्यवस्था नसली तरी डिरेक्टरी तयार करून सर्व संमेलनांची माहिती ठेवता येऊ शकते‍.

डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य मंडपाला देणार पाडगावकरांचे नाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू असतानाच कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संमेलनाच्या मुख्य मंडपाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. ५०० स्टॉलच्या भव्य ग्रंथ दालनाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या मंडपाला साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे.

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथे १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत रंगणार आहे. संमेलनाचा सर्व कार्यक्रम ठरला तरी संमेलननगरी व व्यासपीठाला कोणाचे नाव द्यावे, याचा निर्णय झालेला नव्हता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे नाव संमेलनस्थळाला देण्यात यावे, अशी मागणी होत होती. मंगेश पाडगावकरांच्या निधनाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भावना साहित्यप्रेमींमध्ये निर्माण झाली. त्यातून संयोजकांनी मार्ग काढून या तीन ही नावांचा सन्मान करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या मुख्य मंडपाला कविवर्य मंगेश पाडगावकर, ग्रंथ दालनाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दुसऱ्या मंडपाला साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात येईल, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी रविवारी 'मटा'शी बोलताना सांगितले. मुख्य मंडपाला नाव देऊन पाडगावकरांना 'सलाम' करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या मंडपाला अण्णा भाऊ साठेंचे नाव देऊन त्यांना 'लाल सलाम' करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे प्रतीक. त्यामुळेच त्यांच्या नावाने भव्य ग्रंथ दालनाला एक उंची प्राप्त होणार आहे. या दालनामध्ये बाबासाहेबांचे विपुल साहित्य त्यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवी वर्षानिमित्त उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एआरएआय’चे वाहन उद्योगावर पुण्यात संग्रहालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतातील वाहन उद्योगाच्या विकासाची माहिती देणारे आणि पूर्णपणे वाहन उद्योगाला वाहिलेले खास संग्रहालय लवकरच पुण्यात सुरू होणार आहे. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआय ही संस्था या संग्रहालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संग्रहालयाच्या कल्पनेचे स्वागत केले आहे.
वाहन उद्योगासाठी गुणवत्ता चाचण्या आणि नवनवीन संशोधनांच्या बाबतीत 'एआरएआय' एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून हे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी रविवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दिली.
हे संग्रहालय केवळ संस्थेसाठीच नाही, तर पुण्याच्या नावलौकीकासाठीही एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याचा विश्वास फडणवीस यांनी या निमित्ताने व्यक्त केला. स्टुटगार्डमधील आपल्या भेटीदरम्यान मर्सिडिज बेंझने उभारलेल्या अशाच संग्रहालयाचा संदर्भ देताना फडणवीस यांनी पुण्यात उभारले जाणारे हे संग्रहालय भारतीय वाहन उद्योगासाठीही दिशादर्शक ठरण्याचा विश्वास व्यक्त केला.
या संग्रहालयासोबतच संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंट्री संस्था तयार करत आहे. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून वाहन उद्योगाचा भारतातील वाटचालीचा १८९७ पासूनचा इतिहास पुणेकरांसमोर मांडला जाणार आहे. भारतात आलेली पहिली इम्पोर्टेड गाडी, स्वातंत्र्यानंतर भारतातील वाहन उद्योगाची वाटचाल, खासगी कंपन्यांची स्थापना आणि त्यांची प्रगती, नव्या तंत्रज्ञानाने वाहन उद्योगामध्ये आणलेले बदल, मार्केटपासून ते प्रमुख उत्पादक देश म्हणून भारताची बदलती ओळख, वाहनांमधील महत्त्वाचे भाग आणि त्यांचे तंत्रज्ञान असे नानाविध मुद्दे या डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने एकत्रित स्वरूपात मांडले जाणार असल्याची माहितीही या निमित्तानेच देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाअंतिम फेरीचा आजपासून जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील महाविद्यालयीन रंगकर्मींना आव्वाज पुण्यात घुमणार आहे. महाविद्यालयीन नाट्यविश्वात मानाच्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ते ७ जानेवारी दरम्यान भरत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. वेगळ्या आशय-विषयांवरील एकांकिकांची मेजवानी या निमित्ताने नाट्यप्रेमींना मिळणार आहे.

महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाअंतिम फेरीचे उद्घाटन रंगकर्मी व दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या हस्ते आज, सोमवारी (४ जानेवारी) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि जळगाव या केंद्रांवरील एकवीस एकांकिका सादर होणार आहेत. २५०हून अधिक विद्यार्थी महाअंतिम फेरीत सहभागी होत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, प्रदीप वैद्य, डॉ. प्रवीण भोळे अंतिम फेरीचे परीक्षण करणार आहेत. गतवर्षीच्या महाअंतिम फेरीत चार करंडकांपैकी एकही करंडक पुण्यातील एकांकिकेला मिळाला नव्हता. या पार्श्वभूमीवर, यंदाच्या स्पर्धेत पुण्याची कॉलेज करंडक राखण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

'महाअंतिम फेरीचे यंदा सातवे वर्ष आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. विद्यार्थी आपापल्या स्तरांवर प्रयत्न करून स्पर्धा करतात. विद्यार्थ्यांमधील नाट्यगुणांची जोपासना करण्यासाठी महाविद्यालयांनीही पाठबळ दिले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना नाट्यविषयक मार्गदर्शनाचीही गरज आहे. मात्र, महाअंतिम फेरीमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यास मदत होत आहे,' असे संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर जिल्ह्यातील राहुरी येथून मुंबईकडे निघालेल्या एसटी बसला लोणीकंद गावच्या हद्दीत थांबून कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडील ६५ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना कोर्टाने ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या गुन्ह्यात पुणे शहर पोलिस दलाच्या एसपीयूमधील दोन पोलिसांचा सहभाग असल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

रूपेश दिनकर गायकवाड (वय ३२), सुनील उर्फ कपिल मदन रंदवे (वय ३२), ज्ञानेश्‍वर उर्फ ज्ञानोबा उर्फ माऊली हनुमंत सोनमाळी (वय २३, रा. मांजरी), अश्‍विन अंबादास गिरवले (वय ३१, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), रविंद्र श्रीहरी दिवाण (वय २२, रा. मांजरी, पुणे), शामसिंग रामदास परदेशी (वय ३८), भरत उर्फ भाऊ निवृत्त कांडेकर (वय ३१), राजू उर्फ राजेंद्र मोहन फडतरे (वय २५), सचिन प्रकाश राजगुरू (वय २४ चौघे रा. केडगाव, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अहमदनगर येथील आधुनिक कुरिअर्स, सोमाणी कुरिअर्स आणि गांधी कुरिअर्सचे पार्लसच्या गोणीमध्ये घेऊन रोहिदास विठ्ठल चिताळे (रा. वाकोडी, गवळी गल्ली, अहमदनगर) आणि अनिल औसरकर हे २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री नगरहून राहुरी ते मुंबई या एसटी बसमधून मुंबईला निघाले होते. आरोपींनी दोन बुलेट आणि एका चारचाकी मोटारीने एसटी बसचा नगरपासून पाठलाग सुरू केला. २९ डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बस लोणीकंद गावच्या हद्दीत आल्यानंतर आरोपींनी बस थांबविली. बसमधून चिताळे आणि औसरकर यांना खाली उतरवले. आरोपींनी त्यांच्याकडील ६४ लाख ९३ हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेले. अनिल औसरकर यांना जबरदस्तीने इंडिका कारमध्ये बसवून मांजरी येथे नेले. त्या ठिकाणी त्यांना सोडून आरोपी पसार झाले.

६५ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांना दिले होते. त्यानुसार राम जाधव, सहाय्यक निरीक्षक व्ही. यू. घोळवे यांनी तपास सुरू केला. पोलिसांची पथके नगर आणि पुणे परिसरात तपास करीत असतानाच आरोपी मांजरी, केसनंद आणि हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने त्यांना सापळा रचून आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपी रूपेश गायकवाड आणि रंदवे हे विशेष सुरक्षा पथकामध्ये (एसपीयू) कार्यरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याबाबत पोलिस दलातील वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. आरोपींच्या टोळीचा म्होरक्या कोण आहे. आरोपींनी ही योजना कधी आखली होती आणि लुटलेल्या पैशाचे त्यांनी काय केले आहे याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी कोर्टाकडे केली. कोर्टाने त्यांना सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फुलराणी’ उपाशी; कर्मचारी मात्र तुपाशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वडगावशेरी परिसरातील उद्यानांमध्ये महापालिकेने दोन फुलराणी मंजूर करून त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. परंतु, एकाच उद्यानात फुलराणी बसविण्यात आली असून, फुलराणी अस्तित्त्वात नसतानाही त्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरप्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.

वडगावशेरी भागातील अण्णा हजारे उद्यान आणि कालभैरवनाथ उद्यानात फुलराणी सुरू करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. प्रत्यक्षात, हजारे उद्यानातच फुलराणी प्रत्यक्ष धावत असून, कालभैरवनाथ उद्यानात फुलराणीसाठी ट्रॅकही बसविण्यात आलेला नाही. तरीही, दोन्ही उद्यानांतील फुलराणींसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, गेल्या पाच वर्षांपासून त्यांना मासिक वेतनही अदा केले जात आहे. गेल्या पाच वर्षांत या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पालिकेने १९ लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती पालिकेच्याच व्हेइकल डेपो विभागाने संदीप दहिफळे आणि आशिष माने यांना माहिती अधिकाराअंतर्गत दिली आहे. फुलराणी सुरू नसतानाही, कर्मचाऱ्यांना वेतन अदा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि व्हेइकल डेपोच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक सचिन भगत यांनी दोन्ही उद्यानांमध्ये फुलराणी सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. 'कालभैरवनाथ उद्यानातही फुलराणी सुरू झाली होती. या फुलराणीचे इंजिन बिघडल्याने ठेकेदाराला केवळ २० टक्के बिलच अदा करण्यात आले आहे. पुन्हा फुलराणी सुरू झाल्यानंतरच संपूर्ण बिल अदा केले जाईल', असा खुलासा भगत यांनी केला. तसेच, या प्रकरणात काही चुकीचे घडले असेल, तर आयुक्तांनी चौकशी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू पिण्यावरून जिवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे घरात घुसून कोयत्याने वार करून तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळजाई वसाहत येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सहकागनगर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन तुपसुंदर (वय २६, रा. तळजाई वसाहत) हा तरुण हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून धीरज आरडे, राजू उर्फ बंड्या लोंढे, ऋषीकेश बारक्या लोंढे, अतिश आरडे (रा. सर्व तळजाई वसाहत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन व आरोपी हे एकाच वसाहतीमध्ये राहण्यास आहेत. आरोपी सचिनकडे नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागत असत. काही वेळा त्याने आरोपींना पैसे दिलेही होते. पण, काही दिवसांपूर्वी आरोपींनी सचिनकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. सतत पैसे मागत असल्यामुळे सचिनने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोपींना त्याचा राग होता. शनिवारी रात्री सचिन हा घरात टीव्ही पहात बसला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्याला शिवीगाळ करून घराबाहेर ओढत गेले. त्याला सुरुवातीला बांबूने मारहाण करण्यात आली. त्यानंतर धीरजने कोयत्याने सचिनच्या डोक्यात वार केला. त्यावेळी सचिनचे नातेवाइक त्याला वाचविण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपींनी शिविगाळ तसेच मारहाण केली. हातात कोयता फिरवून 'आम्ही भाई आहोत, कोणालाही जिवंत सोडणार नाही,' अशी धमकीही दिली. मारहाणीत सचिन गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सहकानगर पोलिस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. डी. पाटील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर काँग्रेसतर्फे संकल्प पाणीबचतीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पुणेकरांमध्ये पाणीबचतीबाबत जनजागृती करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने 'संकल्प नव्या वर्षाचा पाणीबचतीचा' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. महात्मा फुले मंडईमध्ये शुक्रवारी या मोहिमेची सुरुवात झाली.

शहराला पाण‌‌ीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणीसाठा घटत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील चार महिन्यांत पाण्याची स्थिती अधिकच गंभीर होणार आहे. नागरिकांमध्ये पाणीबचतीबाबत अधिकाधिक जागृती करण्यासाठी काँग्रेसने ही मोहीम हाती घेतली आहे. आगामी चार महिने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत घरात विशेषत: स्वयंपाकघरात पाण्याची बचत कशा प्रकारे करता येईल, याची माहिती देणारी पत्रके वाटण्यात येणार आहेत. मंडइमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलांना काँग्रेसच्या वतीने पत्रके वाटण्यात आली. नगरसेविका कमल व्यवहारे, सुनंदा गडाळे, अंजली निम्हण, वंदना जगताप, संध्या माने, पूजा गायकवाड, रशिदा शेख आदी उपस्थित होत्या. पाणीबचतीचा संकल्प यावेळी महिलांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर भाग खचल्याने धोका

$
0
0

बंडू येवले, लोणावळा

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील दस्तुरी गावच्या हद्दीत एक्स्प्रेस वेवरील मॅजिक पॉइंट ते दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिस ठाण्यापर्यंत अनेक ठिकाणी मार्गावर मोठ्या भेगा पडल्या असून, काही ठिकाणी खचलेल्या सिमेंटच्या ब्लॉकमुळे या परिसरात अपघात झाले आहेत. या ठिकाणची वेळेत दुरुस्ती न केल्यास अपघाताचा शक्यता आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील दस्तुरी गावच्या हद्दीत आडोशी बोगद्याजवळ मॅजिक पॉइंट ते दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिस ठाण्यापर्यंतच्या मार्गावरील ४१ ते ४५ या चार किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच, मार्गावरील सिमेंटच्या ब्लॉक (प्लेट) खचल्याने अपघातांचा मोठा धोका वाढला आहे. तसेच, आडोशी बोगद्यात चार महिन्यांपासून मोठा खड्डा पडला असून, तो दुरुस्त करण्यास आयआरबीला अद्याप वेळ मिळालेला नसून, मोठी दुर्घटना घडल्यास वेळ मिळणार का, असा प्रश्न प्रवासी व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे याच परिसरात मुंबईहून पुण्याकडे जाताना बोगद्याजवळ सिमेंटच्या ब्लॉकमध्ये मोठे अंतर पडले असून, येथील दोन ब्लॉकमध्ये चढउतार निर्माण झाल्याने अनेक अपघात झाले आहे. यात विशेषतः मोटारसायकलच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. या अपघातात आतापर्यंत १० ते १२ जण जखमी झाले आहेत. हा परिसर घाटमाथ्याचा असून, चढ आणि उताराचा तसेच नागमोडीचा वळणाचा आहे. या मार्गावरून प्रवास करणारी वाहने वेगात असतात. त्यांचा ताशी वेग किमान ८० ते १२० असतो. यामुळे भेगा पडलेल्या भागावरून जाताना व येताना वाहने जोरात आदळत असल्याने चालकांचे नियंत्रण सुटून वाहने दिशाहीन होतात. याच परिसरातील

पुलांवरील लोखंडी खांब मोकळे झाले असून, या ठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच, या परिसरात सर्व्हिस लेनचा अभाव असल्याने ओव्हरटेक करताना वाहन चालकांची लेनची फसगत होते. तसेच, नियंत्रण सुटल्यावर वाहने मार्गालगतच्या संरक्षक कठड्यावर आदळतात व घासतात. यासंदर्भात बोरघाट महामार्ग पोलिसांनी संबंधित आयआरबी कंपनीला कल्पना दिली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रारीनंतर आयआरबीने डांबराच्या सहाय्याने भेगा बुजविण्याचा वरपांगी प्रयत्न केला होता. मात्र, उन्हामुळे त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला असून, पुन्हा भेगा जशाच तशा राहिल्या आहेत. यामुळे अपघातांचा धोका कायम असून, संबंधित यंत्रणा दुर्घटनेनंतर लक्ष देणार आहे का, असा गंभीर प्रश्न प्रवाशांसह वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. या मार्गावरील भेगा बुजवून खचलेले सिमेंटचे ब्लॉक तात्काळ दुरुस्त करून अपघात रोखून सुरक्षित प्रवासाची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेईई’ अर्जप्रक्रियेसाठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आयआयटी' आणि 'एनआयटी'मधील प्रवेशांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या 'जेईई-मेन' या परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता १२ जानेवारीपर्यंत अर्ज भरणे शक्य आहे. मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया प्री-मेडिकल/प्री-डेन्टल टेस्ट अर्थात 'एआयपीएमटी' या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदतही १२ जानेवारीपर्यंतच आहे.

जेईई-मेन ही परीक्षा देशभरात १२४ केंद्रांवर होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातील (२०१६-१७) आयआयटी प्रवेशांसाठीची 'जेईई-मेन' ही प्रवेश परीक्षा ३ एप्रिल २०१६ रोजी होणार आहे. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या दीड लाख विद्यार्थ्यांना 'जेईई-अॅडव्हान्स्ड' या पुढील टप्प्यातील प्रवेश परीक्षेला बसता येणार आहे. राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशांसाठी आता राज्याची 'सीईटी' होणार असल्याने राज्याच्या विद्यार्थ्यांना 'जेईई-मेन' देणे बंधनकारक नाही. मात्र, अखिल भारतीय स्तरावरील १५ टक्के कोट्यातील प्रवेशांसाठी या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील.

'एआयपीएमटी' ही मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीची अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा आहे. राज्यातील २० एमबीबीएस आणि चार डेंटल कॉलेजांतील अखिल भारतीय स्तरावरील १५ टक्के कोट्यातील जागा या परीक्षेच्या स्कोअरवर भरण्यात येणार आहेत, अशी माहिती माहितीपुस्तिकेत नमूद करण्यात आली आहे.

'जेईई-मेन'चा अभ्यासक्रम, परीक्षेला बसण्यासाठीचे पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्रे आदी माहितीचा समावेश असलेली माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध आहे. बीई आणि बीटेकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना पेपर-१, तर बीआर्क/बीप्लॅनिंगसाठी पेपर-२ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना पेपर-१ पेन-पेपर आधारित किंवा कम्प्युटर आधारित पद्धतीने देता येईल.

आगामी शैक्षणिक वर्षात 'आयआयटी' अथवा 'एनआयटी'त प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 'जेईई-मेन' देणे आवश्यक राहील. 'आयआयटी' प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना या परीक्षेतून 'जेईई-अॅडव्हान्स्ड'साठी पात्र ठरावे लागेल. त्यानंतर 'जेईई-अॅडव्हान्स्ड'मध्ये 'कट ऑफ'एवढे गुण मिळवावे लागतील; तसेच आपल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेंटाइलमध्ये यावे लागेल.

राज्यातील परीक्षा केंद्रे

देशभरातील १२४ केंद्रांवर जेईई-मेन होणार असून, त्यामध्ये राज्यातील पुण्यासह अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि ठाणे या पाच शहरांतील केंद्रांचा समावेश आहे. 'एआयपीएमटी'साठी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि नागपूर तीन शहरांतील केंद्रांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन उद्योगावर पुण्यात संग्रहालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतातील वाहन उद्योगाच्या विकासाची माहिती देणारे आणि पूर्णपणे वाहन उद्योगाला वाहिलेले खास संग्रहालय लवकरच पुण्यात सुरू होणार आहे. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआय ही संस्था या संग्रहालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संग्रहालयाच्या कल्पनेचे स्वागत केले आहे.

वाहन उद्योगासाठी गुणवत्ता चाचण्या आणि नवनवीन संशोधनांच्या बाबतीत 'एआरएआय' एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून हे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी रविवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दिली.

हे संग्रहालय केवळ संस्थेसाठीच नाही, तर पुण्याच्या नावलौकीकासाठीही एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याचा विश्वास फडणवीस यांनी या निमित्ताने व्यक्त केला. स्टुटगार्डमधील आपल्या भेटीदरम्यान मर्सिडिज बेंझने उभारलेल्या अशाच संग्रहालयाचा संदर्भ देताना फडणवीस यांनी पुण्यात उभारले जाणारे हे संग्रहालय भारतीय वाहन उद्योगासाठीही दिशादर्शक ठरण्याचा विश्वास व्यक्त केला.

वाहन उद्योगावर आधारित डॉक्युमेंट्रीही!

या संग्रहालयासोबतच संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंट्री संस्था तयार करत आहे. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून वाहन उद्योगाचा भारतातील वाटचालीचा १८९७ पासूनचा इतिहास पुणेकरांसमोर मांडला जाणार आहे. भारतात आलेली पहिली इम्पोर्टेड गाडी, स्वातंत्र्यानंतर भारतातील वाहन उद्योगाची वाटचाल, खासगी कंपन्यांची स्थापना आणि त्यांची प्रगती, नव्या तंत्रज्ञानाने वाहन उद्योगामध्ये आणलेले बदल, मार्केटपासून ते प्रमुख उत्पादक देश म्हणून भारताची बदलती ओळख, वाहनांमधील महत्त्वाचे भाग आणि त्यांचे तंत्रज्ञान असे नानाविध मुद्दे या डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने एकत्रित स्वरूपात मांडले जाणार असल्याची माहितीही या निमित्तानेच देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी प्रामाणिकपणा हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नेते आणि सरकार हे चांगले वागायचे असतील, तर समाजजागृतीची गरज आहे. त्याप्रमाणे नेते आणि सरकार यांनी केलेले चांगले काम टिकायचे असेल, तरीही समाजाने जागे राहिले पाहिजे. समाज परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन होते. देशाचा विकास योग्य मार्गाने व्हायचा असेल, तर त्यासाठी प्रामाणिकपणाची गरज आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी मारुंजी येथे केले.

संघाच्या​पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने मारुंजी येथे 'शिवशक्ती संगम' आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. 'शिवत्वाचा अविष्कार होऊन कृती उत्पन्न व्हायची असेल, तर शिवत्त्वाला शक्तीची जोड मिळावी लागते. त्यासाठी शिव आणि शक्ती यांचा संगम व्हायला पाहिजे. जगात शक्तीशिवाय सत्याची चलती नाही. त्यामुळे शिव आणि शक्तीचा संगम झाला पाहिजे.देशाच्या उत्थानासाठी 'आरएसएस' ही एकमेव शक्ती आहे,' असे भागवत यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह शहरातील खासदार आणि आमदार उपस्थित होते. 'आरएसएस'चे सरकार्यवाह भय्या जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव आदी​ व्यासपीठावर उपस्थित होते.

भागवत उवाच...

संघ हे तत्त्वनिष्ठ संघटन आहे. तत्त्वाचे प्रतीक म्हणून भगव्या झेंड्याकडे पाहिले जाते. सद् गुणांचा आदर्श म्हणून स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना आपल्या मनात करतात. संघाकडून सहा उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये व्यक्तीशी संबंधित उत्सव नसले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस 'आरएसएस'च्या स्थापनेपासून साजरा केला जातो. सत्यम, शिवम, सुंदरम ही आपली संस्कृती आहे आणि नीळकंठ (शिव) हे आपले दैवत आहे.

अपूर्ण मूल्यांवर आधारित केलेले मानवतेचे प्रयत्न फसलेले दिसतात. म्हणून नव्या मार्गाच्या शोधात सर्व जग आहे. आपल्या देशाकडे सर्व जग आशेने बघत आहे. त्यामुळे समाजाचे संघटन करणे आवश्यक आहे. विरोध न करता, ओळखीचा धिक्कार न करता एकसंघटित समाज उभा करण्याच्या हेतूने डॉ. हेगडेवार यांनी १९२५ मध्ये 'आरएसएस'ची स्थापना केली. आपत्तीच्या काळात मदतीसाठी संघ पुढे असतो.

देशात चालत आलेली सनातन संस्कृती ही विविधतेत एकतेचे दर्शन घडविते. प्रांत, भाषा, जात, पक्ष, पंथ वेगवेगळे असले, तरी संस्कृती एक आहे. जग या संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणून ओळखते. निरनिराळ्या भेदांनी पोखरलेला समाज कितीही मोठा असला, तरी त्याची माती होते. त्यामुळे सावधानता बाळगती पाहिजे. समाज संघटित झाल्यास काय होते, हे इस्त्रायल या देशात दिसून आले. त्यांनी दोन हजार वर्षांनी स्वातंत्र मिळवून प्रगती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम बॅटरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवकाश मोहिमांसाठीच्या रॉकेट लाँचरमध्ये वापरली जाणारी लिथियम बॅटरी या पुढील काळात भारतात इलेक्ट्रिक कारमध्येही वापरली जाण्याची शक्यता आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) एकत्रित संशोधन प्रकल्पाद्वारे त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या वर्षभराच्या काळात त्याद्वारे इलेक्ट्रिक कार रस्त्यावर आणण्याचा विडा दोन्ही संस्थांनी उचलला आहे.

'एआरएआय'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लिथियम बॅटरीच्या बाबतीत सुरू असणारा हा संशोधन प्रकल्प या उपक्रमांमधील महत्त्वाचा उपक्रम ठरण्याचा विश्वास संस्थेच्या संचालिका रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी रविवारी व्यक्त केला. तिरुवअनंतपुरम येथील 'इस्रो'च्या विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. के. सिवन आणि ऊर्ध्वरेषे यांनी या एकत्रित संशोधन प्रकल्पाची माहिती दिली.

डॉ. सिवन म्हणाले, 'केंद्रीय नागरी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकल्पाविषयी 'इस्रो'कडे विचारणा केली होती. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही एआरएआयसोबत काम करणार आहोत. लाँच व्हेइकलसाठी वापरली जाणारी बॅटरी ही खूप खर्चिक बाब असते. दैनंदिन वापरात असलेल्या इलेक्ट्रिक कारसारख्या गोष्टीसाठी अत्यल्प खर्चात ही बॅटरी कशी तयार करता येईल आणि गाड्यांमध्ये त्याची उपयुक्तता कशी असेल, या विषयीचे संशोधन एआरएआयने करणे अपेक्षित आहे.'

संशोधनासाठी एक वर्ष

या एकत्रित संशोधन प्रकल्पासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये या बॅटरीची वाहनांसाठीची उपयुक्तता विचारात घेतली जाईल. त्यानंतर स्वयंचलित वाहनांमध्ये तपासण्यात येणार असून, त्यानंतर त्याची उपलब्धता किफायतशीर किमतीमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबनीसांनी गाठले पोलिस आयुक्तालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर अडचणीत आलेले नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी पोलिस आयुक्तालय गाठले. मात्र, आयुक्तांची भेट होऊ न शकल्याने माघारी परतलेले सबनीस पुन्हा सोमवारी आयुक्तांना भेटून सुरक्षेसाठीचा अर्ज देणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात येत आहे. १५ ते १८ जानेवारी दरम्यान हे संमेलन होत आहे. संमेलन तोंडावर आलेले असतानाच संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संमेलन राजकीय मुद्द्यांनी गाजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांबाबत त्यांनी केलेल्या विधानानंतर सबनीस यांना जीवे मारण्याची धमकी आली. तसेच, जाहीर माफी न मागितल्यास संमेलनाच्या व्यासपीठावर येऊ न देण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर, सबनीस यांनी उमरगा पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार नोंदवली होती.

आता पुण्यात परतल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याचे पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेऊन त्यांनी अर्ज देण्यासाठी सबनीस रविवारी पोलिस आयुक्तालयात गेले होते. आयुक्तांची भेट न झाल्याने त्यांना घरी जावे लागले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस आयुक्तांची भेट घेणारे डॉ. श्रीपाल सबनीस हे बहुधा पहिलेच संमेलनाध्यक्ष आहेत. महाबळेश्वर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्याबाबतही वाद निर्माण झाला होता, त्यांच्याबाबत झालेला वाद हा पुस्तकासंदर्भातच होता. मात्र, डॉ. सबनीस यांच्याबाबतीत झालेल्या वादाला राजकीय किनार असल्याने त्याचे पडसाद संमेलनात उमटतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत तिन्ही विद्यार्थी सुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारत जोडो' मोहिमेसाठी पुण्यातून गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचे छत्तीसगड येथे शनिवारी रात्री अपहरण झाले होते. 'हे विद्यार्थी सुखरूप असून त्यांच्याशी पोलिस संपर्क ठेवून आहेत,' अशी माहिती पुण्याचे पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. त्याबरोबरच या प्रकरणी एका विद्यार्थ्यांच्या वडिलांचा पोलिस जबाब नोंदवून घेणार आहेत. या घटनेत 'एटीएस'कडून तपास सुरू आहे.

विकास वाळके (रा. पुणे), आदर्श पाटील (रा. कराड) आणि श्रीकृष्ण शेवाळे (पाटण, सातारा) हे तीन विद्यार्थी 'भारत जोडो' मोहिमेच्या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. पुण्यातून २२ डिसेंबर रोजी निघाले होते. सायकलवरून ते छत्तीसगडमार्गे ओडिशात जाणार होते. मात्र, छत्तीसगड येथे शनिवारी रात्री ते गायब झाले. या विद्यार्थ्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांचे अपहरण झाल्याचे लक्षात आले. मात्र, रविवारी सकाळी त्यांची नक्षलवाद्यांनी सुटका केली.

बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन युवकांना पोलिसांच्या चिंतलनार छावणीमध्ये आणण्यात आले आहे. विजापूर जिल्ह्यातील बासागुडा येथून या तिघांचे अपहरण केल्यानंतर त्यांना चिंगर जंगलातील तिम्मापुरम गावामध्ये माओवादी म्होरक्या पापा राव याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या युवकांना सुखरूप सोडण्यासाठी नक्षलवाद्यांशी वाटाघाटी करण्यात आल्या, असेही कल्लुरी यांनी सांगितले.

याबाबत एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे म्हणाले, 'या प्रकरणी एटीएसकडून विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली आहे. हे विद्यार्थी सुरक्षित आहेत. गेल्या वर्षी हे विद्यार्थी 'भारत जोडो' मोहिमेंतर्गत वर्धा येथे गेले होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images