Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कौशल्याधारित शिक्षणप्रणाली हवी : राज्यपाल

$
0
0

कौशल्याधारित शिक्षणप्रणाली हवी : राज्यपाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'उच्चशिक्षण व्यवस्थेत कौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यासाठी कौशल्य शिकवणारी आणि संशोधनावर भर देणारी शिक्षणप्रणाली कशा प्रकारे विकसित करता येईल, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे,' असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त केले. याबाबत मुख्यमंत्र्‍याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनादिनाचे औचित्य साधत सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सन्मानार्थ पहिला श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार एकल विद्यालय फाउंडेशनला राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोसायटीचे सचिव आनंद भिडे, सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग बाग्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
'लोकसंख्येच्या लाभांशामुळे (डेमोग्राफिक डिव्हिडंड) भारत २०२० मध्ये जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश बनणार आहे. लोकसंख्या आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या दोन गोष्टींचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेतो, यावर आपल्या देशाचे भविष्य अवलंबून आहे. आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना देशातील युवकांना उद्योजकतेकडे वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडिया, स्टॅँडअप इंडिया हा नारा दिला आहे,' असे विद्यासागर राव यांनी सांगितले.
डॉ. अजित पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले; अनंत भिडे यांनी आभार मानले.
.................
असे आहे एकल विद्यालय
प्रत्येक विद्यालयात एक शिक्षक याप्रमाणे ही एकशिक्षकी शाळा चालविण्यात येते. शिकणाऱ्या मुलांनी स्वयंरोजगारावर भर द्यावा, असा प्रयत्न असतो. शिक्षकांसाठी दहावी उत्तीर्ण ही अट असून, विद्यार्थी तीन तास शाळेत असतील, यासाठी प्रयत्न केले जातात. नक्षलग्रस्त जिल्हे, काश्मीर खोरे अशा भागांतही ही विद्यालये असून १३ जिल्ह्यांतील ५२ हजार गावांतून १५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नक्षलग्रस्त भागात शाळा असूनही नक्षलग्रस्तांकडून कोणताही त्रास होत नाही. उलट त्यांचीच मुले या शाळांमध्ये शिकतात, असे बजरंग बाग्रा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज शिवशक्ती संगम

$
0
0

एक लाख स्वयंसेवकांची आणि ५० हजार नागरिकांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित बहुचर्चित शिवशक्ती संगम हे महासांघिक आज मारूंजी येथे पार पडणार आहे. एक लाखाहून अधिक गणवेशातील स्वयंसेवक व ५० हजार नागरिकांची उपस्थिती असलेल्या या महासांघिकासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या महासांघिकामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशीही व्यासपीठावर असतील. अतिविशेष व्यक्ती, संत-महंत, वारकरी, उद्योजक, नागरिक असे दहा हजार विशेष निमंत्रित उपस्थित राहतील. दुपारी बारा वाजेपर्यंत बाहेरगावातील स्वयंसेवक संघस्थानी पोहोचतील. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व स्वयंसेवक प्रत्यक्ष संघस्थानी नेमून दिलेल्या जागी उपस्थित राहतील. अन्य नागरिकांना साडेतीनपर्यंत प्रवेश दिला जाईल. साडेचार वाजता प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होईल. सर्व स्वयंसेवकांच्या सांघिक (गीतानंतर) अडीच हजार स्वयंसेवकांच्या घोषपथकाचे सादरीकरण होईल.
असे आहे व्यासपीठ
संघस्थानी सात मजली उंच (७० फूट) ध्वजस्तंभ, २०० फूट लांब, १०० फूट रुंद आणि ८० फूट उंचीचे मुख्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या मागे तोरणा किल्ल्याचे चित्र, राजगडावील सदरेची प्रतिकृती आणि रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीत छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती आहे. व्यासपीठालगत ७० फूट म्हणजेच सात मजली उंचीचा ध्वजस्तंभही उभारण्यात आला आहे.
भोजनव्यवस्था
पाण्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे १५ हजार जार उपलब्ध असतील. सकाळी निघून दुपारी पोहोचणाऱ्या स्वयंसेवकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी १४ केटरर्सच्या ७०० टीम भोजनव्यवस्था सांभाळणार आहेत. जेवणामध्ये चपाती, भाजी, मुगाची खिचडी व ताक असा मेन्यू असेल. जेवणासाठी पर्यावरणपूरक अशी सुपारीच्या झाडापासून बनविलेल्या पत्रावळी व द्रोणांचा वापर केला जाईल. एका सिद्धता केंद्रात अडीच ते तीन हजार स्वयंसेवकांची व्यवस्था असेल. इस्कॉनतर्फे एक लाख स्वयंसेवकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
रात्रीची शिदोरी
सायंकाळी कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतणाऱ्या बाहेरगावातील स्वयंसेवकांसाठी पुण्यातील स्वयंसेवक व नागरिक शिदोरी देणार आहेत. दहा तिखट-मिठाच्या पुऱ्या, त्यांना पुरेशी शेंगदाण्याची कोरडी चटणी आणि तिळाच्या दोन वड्या अशी ही शिदोरी असेल. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील जवळपास एक लाख घरातून ही शिदोरी गोळा करण्यात आली आहे. एका पॅकबंद बॉक्समधून ही शिदोरी स्वयंसेवकांच्या हाती दिली जाईल.
नागरिकांसाठी बसेसची व्यवस्था
या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता येणार आहे. नाममात्र शुल्कातील बसव्यवस्थेसाठी ९१६८६२५१०२, ९१६८६२५१२७ किंवा ०२०-२४५८०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.


एकूण परिसर : ४५० एकर

वाहनतळ : २०० एकर

सिद्धता केंद्र : १५० एकर

संघस्थान : १०० एकर

एकूण स्वयंसेवक नोंदणी : एक लाख ५८ हजार ७७८

महाविद्यालयीन तरुण : ३५ हजार ७१३

नोकरदार : ३५ हजारहून अधिक

व्यावसायिक : ३३ हजाराहून अधिक

डॉक्टर, वकील, सीए, सीएस : ८ हजारांपेक्षा अधिक

सेवानिवृत्त : ८ हजारांपेक्षा जास्त

शेतकरी : २० हजारांचे जास्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐच्छिक शुल्काला कुलूप

$
0
0

पुणेकरांनी वन विभागाचा उपक्रम बंद पाडला

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाचगाव टेकडीवर फिरण्यासाठी ऐच्छिक प्रवेश शुल्क घेण्याच्या वन विभागाच्या उपक्रमाला नागरिकांनीच कुलूप लावले आहे. आम्ही टेकडीच्या सुरक्षेसाठी पैसे देणार नाही, वन विभागाने स्वखर्चाने सुरक्षारक्षक नेमावेत, अशी भूमिका घेत नागरिकांनी अवघ्या सहा महिन्यातच प्रवेश शुल्क उपक्रम बंद पाडला आहे.
चोहोबाजूंनी अतिक्रमणाने वेढलेल्या पाचगाव पर्वती टेकडीवर सातत्याने गैरप्रकार उघडकीस येत आहेत. वृक्षतोड, दारूपार्ट्या, कचरा, शिकारी, भटकी कुत्री आणि डुकरांचा स्वैराचार अशा विविध कारणांमुळे टेकडीची सुरक्षा धोक्यात आली आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वन खात्याकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने वनाधिकाऱ्यांनी खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या पगाराची तरतूद करण्याचे अधिकार वनाधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी नागरिकांकडूनच ऐच्छिक प्रवेश शुल्क घेऊन निधी उभारण्याचा निर्णय़ घेतला. या संदर्भात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेण्यात आली, मात्र अनेकांनी विरोध केला होता. सुरुवातीला वनाधिकाऱ्यांनी प्रवेश शुल्क बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला पण टीकेचा सूर लक्षात घेऊन ऐच्छिक प्रवेश शुल्कावर एकमत झाले होते. या निधीतून सुरक्षा रक्षकांच्या पगाराएवढी रक्कम जमा झाली की इतर टेकड्यांवरही या उपक्रमाचे अनुकरण करण्याचा वनाधिकाऱ्यांचा विचार होता. पुणेकर टेकड्यांबद्दल संवेदशनील असल्यामुळे दिवसाला एक रुपया शुल्क ते नक्कीच देतील असा अधिकाऱ्यांनाही विश्वास होता. पण नागरिकांच्या थंड प्रतिसादामुळे हा उपक्रम सहा महिन्यातच बंद पडला आहे.
पर्यावरण दिनी उपक्रम सुरू झाला तेव्हा महिनाभरात सुमारे दहा हजार रुपये निधी जमा झाला. पुढील दोन महिन्यात काही संघटनांनी विरोध केल्यानंतर अवघे दीड हजार रुपये मिळाले. ऑगस्टमहिन्यात बोटावर मोजण्याएवढ्या लोकांनी पास काढला. गेल्या दोन महिन्यात नागरिकांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने वनाधिकाऱ्यांनी उपक्रम आवरता घेतला आहे. इतर टेकड्यांवरील बैठकांमध्ये देखील हा विषय चर्चेला आलेला नाही. स्थानिक नागरिक आणि वनाधिकाऱ्यांच्या वादामध्ये मात्र, सुरक्षारक्षकांचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे. टेकडीवर सुरक्षेवर नियंत्रण नसल्याने गैरप्रकारही वाढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा वाळू उपशाला मदत केल्यास गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नदीपात्रातील वाळूची चोरी करणाऱ्या वाळूमाफियांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. वाळूची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.
नदीपात्रातील वाळूचे बेकायदा उत्खनन करणाऱ्या वाळूमाफियांवर कडक कारवाई करण्यास प्रशासनाने सुरूवात केल आहे. गेल्या काही दिवसांत वाळूच्या सुमारे दोन हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला पूर्णपणे अटकाव घालण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच आता वाळूमाफियांना मदत करणाऱ्या शेतकऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चोरीची वाळू विक्री करण्यापूर्वी म्हणजे उत्खनन करताना पकडण्यासाठी नद्यांमध्ये गस्त घालण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या गस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे उपलब्ध असलेल्या बोटींचा वापर करण्यात येणार आहे. या गस्तीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यासह पाच ते सहा कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. सर्वाधिक वाळू चोरी होणाऱ्या उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधूनच या गस्तीला सुरुवात केली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी सांगितले.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर केल्या जाणाऱ्या दंडामध्येही वाढ करण्यात आली आहे. या दंडाची रक्कम आता ८५ हजार रुपये केली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) व महसूल खात्यामार्फत त्यासाठी संयुक्त कारवाई केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोक्का व महाराष्ट्र समाजविघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येत आहे.
वाहनांचा लिलाव करण्यात अडसर
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधकारी सौरव राव यांना केली आहे. परंतु अवैध वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नसल्याने ही कारवाई करण्यात अडसर येत असल्याचे सांगण्यात आले. त्याऐवजी वाहन जप्त केल्यानंतर संबंधित वाहनाचे परमिट तीस दिवसांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीयू’च्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा

$
0
0

पुणे ग्रामीण पोलिसांच्या 'एलसीबी'ने केली अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर येथून मुंबईकडे बसमधून नेण्यात येणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटण्याची घटना बुधवारी घडली होती. या लुटीच्या घटनेत पुणे शहर पोलिस दलातील विशेष सुरक्षा पथक (एसपीयु) मधील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांसह अकरा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही जणांस अटक केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
रुपेश गायकवाड आणि सुनील रणदिवे अशी अटक केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या 'विशेष सुरक्षा पथका'मध्ये नेमणुकीस आहेत. रणदिवे चालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कुरिअर कंपनीची दहा लाखांची रोकड घेऊन कर्मचारी २९ डिसेंबर रोजी नगर येथून मुंबईकडे जात होता. आरोपींनी नगरपासूनच या बसचा पाठलाग सुरू केला. बसच्या पुढे एक मोटारसायकल व पाठीमागे दोन मोटारीमधून एकूण अकरा जण पाठलाग करीत होते. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका निर्जनस्थळी ही बस थांबवण्यात आली. बसमध्ये चढून आरोपींनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला खाली उतरवले. त्यांच्याकडून रोकड काढून घेत असतानाच पाठीमागून पोलिसांची मोटार येताना दिसल्यामुळे आरोपींची पळापळ झाली. परंतु, आरोपींनी काही रोकड लंपास केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी तपासाला सुरुवात केली. त्या वेळी खबऱ्याकडून त्यांना या गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर यामध्ये पुणे शहर एसपीयूच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. या प्रकरणात पुण्यातील चार व नगर येथील सात अशा एकूण अकरा जणांचा सहभाग असून, काही जणांस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीवरून काढल्याने केली चोरी

$
0
0

चोरट्याला अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमीजवळील पी. एच. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये झालेल्या पंधरा लाखांच्या चोरीचा गुन्हा दत्तवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी सेंटरमध्येच ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्यानेच नोकरीवरून काढल्यामुळे ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गणेश भारत जाधव (२०, रा. सर्व्हे नं. ९२, आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो गेल्या आठ महिन्यापासून पी. एच. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. २० ते २२ डिसेंबर दरम्यान तो कामावर गैरहजर राहिला. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून जाधवने २५ डिसेंबर रेाजी मध्यरात्री सेंटरमध्ये घरफोडी करून पंधरा लाख आठ हजार रुपये चोरून नेले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील सेंटरमध्ये घरफोडी झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच एक जानेवारी रोजी पोलिस नाईक अशोक गवळी यांना सेंटरमध्ये चोरी करणारा लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ थांबला असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्या पथकाने सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चोरी केली त्या दिवशी जाधव सेंटरच्या पार्किंगमध्ये झोपला होता. सेंटर बंद झाल्यानंतर त्याने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. दत्तवाडी पोलिसांनी आरोपी गणेश जाधव यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये आणि एक मोबाइल जप्त केला आहे. आरोपीने बाकीची रक्कम कोठे आणि कोणाकडे ठेवली आहे याचा सुरू आहे. जाधवला कोर्टाने पाच जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव या तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमंडळाला दंड

$
0
0

मंडपाच्या बांबूला अडकून जखमी झाल्याप्रकरणी कोर्टाने दिला आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेश विसर्जनानंतरही रस्त्यात पडलेले बांबू न हटविल्यामुळे त्यामध्ये अडकून एक महिला जखमी झाल्याप्रकरणी गणेश मंडळाच्या अध्यक्षाला आठशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मंडपाच्या कॉन्ट्रॅक्टरची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिल कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
अखिल बिबवेवाडी गावठाण गणेश मंडळाचे अध्यक्ष मंगेश भाऊसाहेब कदम यांना दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मंडप कॉन्ट्रॅक्टर अनिल कानडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या केसचे कामकाज सरकारी वकील अनंत चौधरी यांनी पाहिले.
१३ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिला मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चिंतामणी हॉस्पिटलसमोर फुटपाथलगत असलेल्या गणपती मंडळाच्या मांडवाच्या काढून ठेवलेल्या बांबूमध्ये पाय अडकून रस्त्यात पडली. तिच्या उजव्या हाताला आणि नाकाला मार लागला. तेथून ​​जाणाऱ्या लोकांनी तिला चिंतामणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रस्त्यावर पडलेले बांबू अखिल बिबवेवाडी गावठाण गणेश मंडळाचे असल्याचे तिला समजले. मंडळाच्या अध्यक्षाचे नाव मंगेश कदम आणि मंडप कॉन्ट्रॅक्टरचे नाव अनूप कानडे असल्याचे समजले. याप्रकरणी तिने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. सर्वसाधारणपणे बांबूवर कोणीही ओळखण्यासाठी खुणा करत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही खुणा नसल्या तरी ते बांबू मंडळाचेच होते, असा निष्कर्ष काढता येतो. काही मंडळे त्यांचे विसर्जन रथ रस्त्यावरच सोडतात व नंतर घेऊन जातात. घटनास्थळापासून मंडळ जवळ असल्यामुळे ते बांबू त्याच मंडळाचे असल्याचे सिद्ध होते, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.
'महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार विसर्जनानंतर दोन दिवसाच्या आत मंडप व अन्य साहित्य रस्त्यावरून हटविण्याची हमी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. आरोपींनी या अटी व हमी न पाळल्यामुळे फिर्यादी महिलेला झालेल्या जखमांसाठी ते जबाबदार आहेत. मंडप काढून घेण्याची हमी देऊनही त्या प्रमाणे कृती केली नाही म्हणून दुर्घटनेला जबाबदार आहे,' असे कोर्टाने निकालात नमूद केले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएएमएस’ला ‘सेमिस्टर’ पद्धतीचा डोस

$
0
0

विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ठरणार डोकेदुखी
पुणे : 'आयुर्वेदा'च्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या 'बीएएमएस'ला आता 'सेमिस्टर' पद्धत अवलंबण्याचा घाट 'सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन'ने (सीसीआयएम) घातला आहे. सातासमुद्रापार आयुर्वेदाला नेण्याचे स्वप्न पाहिले जात असताना देशात नवे नियम लागू करण्याचा सुरू केलेला प्रयत्न हा देशातील आयुर्वेदाला घातक की मारक ठरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुर्वेदाच्या वैद्यकीय शाखेची प्रवेश प्रक्रिया डिसेंबरपर्यंत संपते. परिणामी, सहा महिन्यात शिक्षक अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार आणि विद्यार्थी कशी परीक्षा देणार असा संतप्त सवाल मेडिकल कॉलेजमधून विचारण्यात येत आहे. 'सीसीआयएम'च्या प्रस्तावाला राज्यातील आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून तीव्र विरोध होत असून, हा प्रस्ताव आयुषकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. दर वर्षी वैद्यकीय शाखांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होतो. मॉडर्ननंतर डेंटल आणि नंतर आयुर्वेदाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. आयुर्वेदाचे प्रवेश पूर्ण होण्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना उजाड़तो. त्यामुळे वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही तर अभ्यासक्रम काय शिकविणार आणि सेमिस्टर पद्धत लागू केल्यास विद्यार्थी परीक्षा काय देणार, असा सवाल आयुर्वेद तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
'ऑक्टोबरला प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी वर्गात येण्यास सुरुवात होते. कधी कधी प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत 'सीसीआयएम'कडून वाढ करण्यास येते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास डिसेंबर महिना पूर्ण जातो. विद्यार्थ्यांचा प्रवेश उशिरा होत असल्याने पहिली 'सेमिस्टर' कधी सुरू होणार असा प्रश्न आहे. नोव्हेंबरला वर्ग सुरू झाल्यास एप्रिलपर्यंत चार महिन्यात पहिली सहामाही परीक्षा घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर दुसरी सहामाही अंतिम परीक्षा ही मे महिन्यात येते. मग एका महिन्याच्या अंतराने दोन सहामाही विद्यार्थी कसे देणार आणि दोन्हीपैकी कोणत्या परीक्षेवर लक्ष केंद्रीत करणार,' असा सवाल आता विद्यार्थ्यांसह आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य सवाल करू लागले आहेत.
पदवी मिळायलाही सहा महिन्यांचा विलंब?
दोन्ही परीक्षांचा विद्यार्थ्यांवर ताण येण्याची शक्यता आहे. त्याबरोबर एका महिन्याच्या अंतराने मे महिन्यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या अंतिम सहामाहीचा अभ्यासक्रम एका महिन्यात शिक्षक कसे पूर्ण करणार आणि विद्यापीठाच्या नियमानुसार शिकविण्याचे २४० दिवस कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे. पहिली 'सेमिस्टर' एप्रिलमध्ये संपल्यानंतर दुसरी नोव्हेंबरमध्ये संपविली तरी चालू शकेल का, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. परिणामी, आयुर्वेदाची वैद्यकीय पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त करण्यास सहामाहीमुळे आणखी सहा महिने विलंब लागण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
...
आयुर्वेद महाविद्यालयात सेमिस्टर पद्धतीचा निर्णय 'सीसीआयएम'ने मान्य केला आहे. मात्र त्याला अंतिम मान्यता अद्याप मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
- डॉ. सतीश डुमरे, अधिष्ठाता आयुर्वेद विभाग .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्त्री समानतेसाठीहवी सांस्कृतिक क्रांती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात असलेली पुरुषांची सत्ता मोडीत निघून, खऱ्या अर्थाने स्त्रियांना बरोबरीने वागणूक मिळण्यासाठी सांस्कृतिक क्रांती घडण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका व कार्यकर्त्या कमला भसीन यांनी शनिवारी व्यक्त केले. संविधानाने महिलांना समान हक्क दिले आहेत, पण रुढी, परंपरा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे, असेही त्या म्हणाल्या.
'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिव्यक्तीतर्फे 'पुरुषांची सत्ता कोठपर्यंत' या विषयावरील व्याखानाचे आयोजन केले होते. या वेळी त्या बोलत होत्या. 'लोकायत'च्या अलका जोशी या वेळी उपस्थित होत्या. बहुतांश ठिकाणी पुरुष सत्ता गाजविण्यासाठी अहिंसेचा वापर करतात. जगात ३५ ते ४० टक्के स्त्रियांवर त्यांच्या नवऱ्याकडून अत्याचार केला जातो. भारतात याचे प्रमाण जास्त आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.'समाजाच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची सत्ता आहे. आपल्याकडे लहानपणापासून घरातून पुरुष सत्तेचे धडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिले जातात. तसेच, महिलांची मानसिकताही ते स्वीकारण्याची झाली आहे. त्यामुळे लहान मुलांचे संगोपन करताना, त्यांच्या मनावरही तेच विचार कोरले जातात. सर्व धर्मांत पुरुषांची सत्ता आहे. त्यास कोणी अपवाद नाही. धर्म, रूढी, परंपरा यांच्या नावाखाली महिलांना अनेक ठिकाणी डावलले जाते,' असे भसीन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे कोर्टातील लिफ्ट बंद

$
0
0

पायऱ्या चढण्यामुळे महिलेला आली चक्कर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीतील लिफ्ट बंद पडल्याचा फटका कोर्टात येणाऱ्या पक्षकार, वकील आणि कर्मचाऱ्यांना बसतो आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे पायऱ्या चढून जावे लागल्यामुळे एका महिलेला चक्कर आल्याचा प्रकार शनिवारी कोर्टात घडला.
संबंधित महिलेला आजूबाजूला असलेल्या महिलांनी उचलून इमारतीतून खाली आणले. त्यानंतर तिला ​रिक्षा बोलावून तिला उपचारासाठी नेण्यात आले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीत सध्या तीन लिफ्ट आहेत. यातील दोन लिफ्ट गेली अनेक महिने पूर्णपणे बंद आहे. तर एक लिफ्ट सुरू आहे. मात्र ही लिफ्ट अनेकदा बंद पडल्याचे प्रकार घडतात. लिफ्ट मध्येच बंद पडल्यामुळे अनेकदा पक्षकार आणि वकील लिफ्टमध्ये अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोर्टात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांना अनेकदा आपल्या केसेसचे कामकाज करण्यासाठी विविध कोर्टात जाऊन काम पाहावे लागते. त्यामुळे वकिलांची धावपळ सुरू असते. लिफ्ट बंद पडल्याचा फटका वकील आणि पक्षकारांना बसतो आहे. पायऱ्या चढून जाण्याची कसरत त्यांना करावी लागते.
कोर्टात येणारे आजारी, वयोवृद्ध, अपंग, महिलांना लिफ्ट बंद असल्याचा फटका बसतो आहे. कोर्टातील लिफ्ट सुरू करण्यात यावी म्हणून वकिल आणि पक्षकारांकडून वेळोवेळी मागणी करण्यात येते आहे. मात्र, अजूनही बंद​ पडलेल्या लिफ्ट सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात नाही म्हणून ओरड करण्यात येते आहे.
कोर्टातील लिफ्टची वापर करण्याची सुविधा बंद पडेर्पंयत प्रशासन वाट पाहणार आहे का, लिफ्टची एक्सपायरी डेट संपल्यानंतरची लिफ्टचा वापर करण्यात येत होता. शेवटी लिफ्ट पूर्णपणे बंद पडल्या तरी त्या पूर्ववत सुरू करण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, अशी विचारणा कोर्टात येणाऱ्या पक्षकारांकडून करण्यात येते आहे.
....
इलेक्ट्रॉनिक विभागाचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इलेक्ट्रॉनिक विभागाकडून वारंवार दुर्लक्ष केल्याचे चित्र वारंवार पाहवयास मिळते आहे. लिफ्ट सुरू नसल्याने याचा त्रास ज्येष्ठ पक्षकार, ज्येष्ठ वकील, अपंग पक्षकार यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकारात लवकर लिफ्ट सुरू करण्यात यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष संतोष खामकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी दिनाला प्रतिसादच नाही

$
0
0

१० डेपो आणि १२ स्टँडवरून फक्त पाच सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वेबसाइट आणि हेल्पलाइनवर प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस पडतो. मात्र, पीएमपीतर्फे आयोजिल्या जाणाऱ्या प्रवासी दिनाला प्रवाशांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. शनिवारी शहरातील १० बस डेपो व १२ महत्त्वाच्या बस स्टँडवर झालेल्या प्रवासी दिनात प्रवाशांकडून केवळ पाच सूचना प्राप्त झाल्या.
शनिवारी झालेल्या प्रवासी दिनात स्वारगेट व हडपसर डेपोत प्रत्येकी दोन सूचना व कोथरूड डेपोत एक सूचना प्राप्त झाली. उर्वरित डेपोंमध्ये व स्टँडवर एकही सूचना किंवा तक्रार प्राप्त झाली नाही. पीएमपी सेवेबाबत प्रवाशांच्या तक्रारी, सूचना व उपाययोजना जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवासी दिनाचे आयोजन केले जाते. पीएमपीच्या सेवेचा दर्जा वाढावा या उद्देशाने, प्रवासी व पीएमपी प्रशासन यांच्यात थेट संवाद व्हावा, यासाठी प्रवासी दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, प्रवाशांकडून सातत्याने या दिनाकडे दुर्लक्ष केले जाते. काही मोजक्या डेपो व स्टँडवर दरवेळी ठराविक लोकच यामध्ये सहभाग घेतात.
दरम्यान, प्रवासी दिनाच्या कार्यक्रमाची योग्य पद्धतीने माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जात नाही. माहिती फलक योग्य ठिकाणी लावले जात नाहीत. त्यामुळे कमी संख्येने प्रवासी या कार्यक्रमाला येतात. तसेच, जबाबदार अधिकारी या दिनाला दांडी मारतात. प्रवाशांच्या सूचना व तक्रारींची नोंद नीट ठेवली जात नाही, त्यामुळे प्रवाशांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असा दावा पीएमपी प्रवासी मंचाच्या जुगल राठी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी मार्ग महापालिकेपर्यंत?

$
0
0

रावेत-औंध, निगडी-बोपोडी मार्गांसाठी प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी-चिंचवड शहरात येत्या काही दिवसात कार्यान्वित होऊ घातलेले रावेत-औंध व निगडी-दापोडी हे बीआरटीचे मार्ग महापालिकेपर्यंत वाढविण्यासंबंधीचा प्रस्ताव पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणे महापालिकेकडे सादर केला आहे. महापालिकेच्या येत्या आर्थिक वर्षातील बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्यात येणाऱ्या संख्या प्रचंड आहे. तसेच, पीएमपीच्या या मार्गावरील बसची प्रवासी संख्या जास्त आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता. रावेत-औंध रस्ता जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रशस्त आहे. त्यानंतर मात्र, मुळा नदीवरील पूल ओलांडून पुढे गेल्यास औंध गाव व त्यापुढे ब्रेमेन चौकापर्यंत वाहतूक धीम्यागतीने चालते. परिणामी, औंधपर्यंत वेगात व विनाअडथळा येणाऱ्या वाहनांना तेथून पुढे खूप वेळ लागतो. एमपी बसच्या प्रवाशांनाही गर्दीतून मार्ग काढत जावे लागते. त्यामुळे औंधपासून पुढेही बीआरटी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे जुना पुणे-मुंबई रोडवरील निगडी-दापोडी बीआरटीबाबतही परिस्थिती सारखी आहे. दापोडी-बोपोडीचा हॅरिस ब्रिज ओलांडून पुढे आल्यानंतर वाहतूक कोंडीचाच सामना करावा लागतो. त्यामुळे हे दोन्ही मार्ग महापालिकेपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावाचा विचार करण्यात आला, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत होणार निर्णय
बोपोडीजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. तसेच, औंध गावातून बाहेर पडल्यानंतर विद्यापीठ चौकापर्यंतचा रस्ता पुरेसा रुंद आहे. या ठिकाणी बीआरटी करताना, फारशा अडचणी येणार नाहीत. मात्र, विद्यापीठापासून पुढे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्या दृष्टीनेही विचार केला जात आहे. प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडला जाईल. त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र, महापालिका आयुक्त या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची चर्चा पीएमपी वर्तुळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गोवारीकरांचे जीवनकार्य प्रेरणादायी

$
0
0

पहिल्या स्मृतिदिनी डॉ. किरणकुमार यांची आदरांजली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शून्यापासून स्वयंपूर्णतेपर्यंतची भारतीय अवकाश कार्यक्रमाची झेप ही शास्त्रज्ञांच्या बुद्धीमत्तेप्रमाणेच समजाविषयीच्या त्यांच्या कर्तव्यभावनेमुळेच शक्य झाली. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासाठी आणि देशासाठी कशाप्रकारे करता येऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. वसंतराव गोवारीकर. त्यांचे जीवनकार्य तरुण पिढीला सदैव प्रेरणा देत राहील,' अशा शब्दांत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) संचालक डॉ. ए. एस. किरणकुमार यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना आदरांजली वाहिली.
डॉ. गोवारीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त इस्रो आणि नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स (एनसीएससी) यांच्या वतीने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. गोवारीकर यांच्या पत्नी सुधाताई गोवारीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे, डॉ. माधव ढेकणे, डॉ. आर. आर. नवलगुंद, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. पिल्लई, एनसीएससीचे अ पां. देशपांडे, सुहास नाईक साटम, इस्रोचे आजी- माजी शास्त्रज्ञ तसेच गोवारीकर कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ. किरण कुमार म्हणाले, 'अवकाश कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला रॉकेटसाठी लागणारे इंधन स्वतः विकसित करणे आवश्यक होते. डॉ. गोवारीकर यांच्या पुढाकारामुळे भारताला कमी कालावधीत ते इंधन विकसित करणे शक्य झाले. आतापर्यंत इस्रोने १३० यशस्वी अवकाश मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमांचा देशाला विविध क्षेत्रांत मोठा फायदा झाला आहे. तंत्रज्ञान समाजात किती मोठे बदल घडवू शकते याची जाण डॉ. गोवारीकरांना होती. इस्रोनंतरच्या आयुष्यातही ती त्यांनी जपली आणि अखेरपर्यंत समाजोपयोगी संशोधनात व्यस्त राहिले.''वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगात शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया बनली आहे. नवे ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करतानाच त्याचा दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी वापर करावा,' असा सल्लाही त्यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमात स्लाइड शो आणि व्याख्यानांमधून भारतीय अवकाश कार्यक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्स्फूर्त गायकी अन् बहारदार जुगलबंदी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेवाती घराण्याचे युवा गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या उत्स्फूर्त गायकीने बहरलेली संध्या अन् रोणू मुजुमदार, उस्ताद तौफिक कुरेशी आणि पं. रामदास पळसुले यांच्या कलाविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी जुगलबंदी सादर करत स्वरझंकार महोत्सवाचा दुसरा दिवस गाजविला. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि व्हायोलिन अकादमी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्यातर्फे आयोजित या महोत्सवाचे दुसरे पर्वही रंगतदार झाले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग मैदानावर सुरू असणाऱ्या या महोत्सवात जाणकार रसिकांची दाद कलाकारांनाही प्रोत्साहन देणारी ठरली.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा श्रीगणेशा संजीव अभ्यंकर यांनी राग शुद्ध कल्याणने केला. 'पपिहा बोलन लागी' आणि 'मै तुमपे वारी वारी इतनी मानो हमारी' या रचना गात त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर राग चंद्रकंसमध्ये सादर केलेल्या 'अरज सुनो मोरी', 'निसदिन तुमरी याद सताए' या रचनांनी वातावारण रंगले. संत तुकाराम महाराजांच्या 'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल' या भजनाने त्यांनी पहिल्या सत्राची सांगता केली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम) आणि रोहित मुजुमदार (तबला) यांनी साथसंगत केली.
उत्तरार्धात प्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार, किंग ऑफ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी आणि प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी 'व्हायब्रेशन्स' ही अफलातून जुगलबंदी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. फ्यूजन अंगाने प्राकारात सादर झालेला हा कलाविष्काराचा रसिकांनी टाळ्यांच्या गजराची साथसंगत देत आनंद घेतला. अतुल रनिंगा (सिंथेसायझर) आणि मनीष कुलकर्णी (बेस गिटार) यांच्या साथीनं या कलाविष्काराची रंगत वाढली.
महोत्सवाच्या मध्यंतरात व्हायोलिन अकादमीतर्फे 'गुरुवर्य बा. शं उपाध्ये' स्मृती पुरस्कार युवा गायक अमोल निसळ यांना तर वादनासाठी औरंगाबादचे व्हायोलिनवादक नीलेश विश्वनाथन यांना प्रदान करण्यात आला. तबलावादक नीलेश रणदिवे यांना 'डॉ. विनोद देऊळकर युवा तबलावादक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोणू मुजुमदार, तौफिक कुरेशी आणि रामदास पळसुले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजतर्फे पं. अतुलकुमार उपाध्ये, राजस, तेजस आणि वृषाली उपाध्ये यांचा सन्मान क्लबचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केला. अकादमीतर्फे रोटरी क्लबच्या उपक्रमांसाठी मदतनिधी देण्यात आला. वीणा गोखले यांनी निवेदन केले.
रागबदल योग आणि उत्स्फूर्तता
पं. संजीव अभ्यंकर हे राग दिन की पुरिया आणि राग बागेश्री सादर करणार होते, मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांना राग शुद्धकल्याण आणि राग बागेश्री सादर केले. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'उत्स्फूर्त गायन मला अचानक भेटलेल्या मित्रासारखे वाटते. काय गायचे याची तयारी मी घरी बसून कधीच करत नाही. उत्स्फूर्त कला सादरीकरणात एक वेगळीच मजा आहे. गुरूु पं. जसराज यांच्याकडून त्याची अनुभूती मिळाली. आज कदाचित 'रागबदल योग' असावा, असे त्यांनी म्हणताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकाशवाणीचे शास्त्रीय संगीताचे चॅनेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उडत्या चालीच्या चित्रपट संगीताने तरुणांना कायमच आकृष्ट केले असले, तरी अभिजात शास्त्रीय संगीताचे स्थान आजही अबाधित आहे. आकाशवाणीचे 'रागम्' त्याची साक्ष पटवते. शास्त्रीय संगीतप्रेमींना आकाशवाणीकडून लवकरच नवीन वर्षाची भेट मिळणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताला वाहिलेले 'रागम्' हे चोवीस तास सुरू राहणारे नवीन चॅनेल येत्या २६ जानेवारीला सुरू होणार आहे.

अभिजात शास्त्रीय संगीताचा ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रागम् सुरू होणार आहे. यामध्ये पं. भीमसेन जोशी, सुब्बलक्ष्मी, कुमार गंधर्व, पं. जसराज यांसह अनेक दिग्गज हिंदुस्तानी आणि कर्नाटक घराण्यातील गायक आणि वादकांना ऐकण्याची संधी संगीतप्रेमींना मिळेल. तरुण कलाकारांनाही या निमित्ताने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. आकाशवाणीने नव्या चॅनेलची माहिती शनिवारी ट्वीटरवरून जाहीर केली.

शास्त्रीय संगीताची आवड असलेला श्रोता वर्ग मोठा असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र रेडिओ चॅनेल असावे, अशी अपेक्षा गायक आणि वादकांनी सातत्याने व्यक्त केली होती. शास्त्रीय संगीतावर आधारित स्वतंत्र चॅनेल टीव्हीवरही अलीकडेच सुरू झाले आहे. या धर्तीवर आकाशवाणीने पुढाकार घ्यावा, त्यांच्याकडील संगीताचा खजिना रसिकांसाठी खुला करावा, अशी मागणी संगीतप्रेमींतर्फे करण्यात आली होती. याची दखल घेऊन आकाशवाणीने चोवीस तास सुरू राहणारे स्वतंत्र चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीला त्याचे अधिकृत उद्-घाटन होणार आहे. हे चॅनेल डीटीएच प्लॅटफॉर्म आणि आकाशवाणीच्या वेबसाइटवरही ऐकू येईल. याशिवाय गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर लवकरच स्वतंत्र अॅप्लिकेशन प्रसिद्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माकपचे दोन नगरसेवक बडतर्फ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

विधानपरिषदेच्या निवडणुकीत पैसे घेऊन मतदान केल्याचा ठपका ठेवून येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) दोन नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. माशप्पा विटे आणि महादेवी अलकुंटे अशी कारवाई झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

'विधान परिषदेच्या निवडणुकीत माकपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतरही विटे आणि अलकुंटे यांनी पक्षाचा आदेश पायदळी तुडवून पैसे घेऊन संबधित उमेदवारांना मतदान केले होते. या दोघांनी प्रत्येकी किमान सहा लाख रुपये घेतल्याची माहिती पक्षाला मिळाली. त्यानंतर या दोन्ही नगरसेवकांना बडतर्फ करण्यात आले,' असे पक्षाचे नेते, माजी आमदार आडम यांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी पक्षाने व्हिप काढलेला नव्हता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या दोन्ही नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकत नाही; परंतु नैतिक जबाबदारी स्वीकारून दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आडम यांनी केली. ते म्हणाले, 'आतापर्यंत पक्षाला कधीच व्हिप बजावण्याची वेळ आली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत माकपच्या दोघा नगरसेवकांनी पैसे घेऊन मतदान केल्यामुळे पक्षाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.' दरम्यान, बडतर्फ नगरसेविका महादेवी अलकुंटे यांच्याशी सपर्क झाला नाही. त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, 'त्यांनी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत.'

मतदान करण्याचा अधिकार राज्यघटनेने आम्हाला दिला आहे. मी गुप्त मतदान केले. मतदान करायचे नसते, तर 'नोटा'चा अधिकारही आहे. कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. आडम यांचे आरोप खोटे आहेत. सोलापूर मनपा शिक्षण मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करण्यास सांगितले होते. त्या वेळी तटस्थ भूमिका का घेतली नाही? - माशप्पा विटे, नगरसेवक

विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून सुमारे ४५ ते ५० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकाराला सर्वस्वी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. - नरसय्या आडम, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनवेगात पुणे प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून तब्बल ४० लाख वाहने... दुचाकी वाहनांची सर्वाधिक संख्या... दर वर्षी सरासरी दोन लाख वाहनांची भर... यामुळे वाहतूक कोंडीच्या चक्रव्युहात पुणेकर रोजच फसतात. तरीही हे चक्रव्यूह भेदण्याचे कसब पुणेकर वाहनचालकांनी साध्य केल्याचे दिसत असून, शहरातील वाहनांचा सरासरी ताशी वेग (प्रति तास २३ किमी) देशात सर्वाधिक असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

पुणे आणि दिल्ली या दोनच शहरांनी सरासरी ताशी वेगात आघाडी घेतल्याचे दिसत असले, तरी प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या जंजाळातून सुटण्यासाठी दोन्ही शहरांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत.

'ओला टूरिस्ट कॅब'तर्फे देशातील प्रमुख महानगरांमधील वाहनांचा ताशी वेग आणि सर्वाधिक गर्दीची वेळ याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात पुणे आणि दिल्लीचा ताशी वेग देशात सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलकाता आणि बेंगळुरू या दोन शहरांमध्ये वाहनांचा सरासरी वेग नीचांकी (अनुक्रमे प्रति तास १७ आणि १८ किमी) असल्याचे निरीक्षण 'ओला'च्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि जयपूर या प्रमुख आठ शहरांमध्ये 'ओला कॅब्स'ने केलेल्या ट्रीपमधूनच ही आकडेवारी समोर आली आहे.

दिवसभराच्या विविध टप्प्यांत वाहनांचा सरासरी वेग किती असतो, याचीही आकडेवारी 'ओला'ने जाहीर केली आहे. त्यानुसार सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सरासरी वेग सर्वांत कमी (प्रति तास १७ किमी) असतो आणि पहाटे तीन ते चार दरम्यान तो सर्वाधिक (प्रति तास ३३ किमी) असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतनाट्यशास्त्राचा सर्वांगणीअभ्यास होणे आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आधुनिक रंगभूमीवरील प्रयोगांसाठी भरतनाट्यशास्त्राचा सर्वांगीण अभ्यास होणे आवश्यक आहे,' असे मत प्रा. सरोज देशपांडे यांनी नुकतेच व्यक्त केले. दोन हजार वर्षांपूर्वी भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राचा उपयोग आत्ताच्या काळातही होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.निमित्त होते प्रसाद प्रकाशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे आयोजित 'भरताख्यान' या कार्यक्रमाचे. विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्कृत साहित्याच्या अभ्यासिका डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते झाले. प्रकाशनाच्या संचालिका उमा बोडस, प्रा. माधव वझे आदी या वेळी उपस्थित होते.'ज्याला आपण मराठी नाटक म्हणतो त्याला भारताने 'दशरूपक' ही संज्ञा दिली. नाटक, प्रकरण, समवकार, डिम, ईहामृग, उत्सृष्टिकांक, व्यायोग, प्रहसन, भाण आणि वीथी असे ते दहा प्रकार आहेत. नाट्यशास्त्र हा खूप मोठा विषय आहे. त्यात आठ रस, आठ स्थायी भाव, चार वृत्ती, चार संधी, पाच अर्थ प्रकृती असे प्रकार आहेत,' असेही देशपांडे म्हणाल्या.वझे यांनी नाट्यशास्त्राची ओळख करून देताना १८९६ ते १९४० या कालखंडातील नाट्यशास्त्रीचा तपशील सांगितला. भरतमुनींच्या काळातील तसेच आधुनिक काळात नाट्यशास्त्रातला फरक ज्येष्ठ नृत्यगुरु रोशन दाते तसेच माधुरी आपटे, स्मिता महाजन आणि हृषिकेश पवार यांनी नृत्यातून प्रात्यक्षिकांसह स्पष्ट केला.चैतन्य कुंटे यांनी भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रातील संगीताची माहिती आणि त्यातले बारकावे उलगडले. प्रवीण भोळे यांनी नाट्यप्रवेशांतील फरक प्रात्यक्षिकांतून दाखवला. सुवर्णा बोडस यांनी निवेदन केले.

Story Info
History
Comment

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षे पूर्ण झालेलेपहिलीच्या वर्गात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय प्रवेशासाठीच्या किमान वयाच्या धोरणाच्या अंमलबजावणीला अखेर येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होणार आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी त्या विषयीचे स्पष्ट आदेश दिले असून, पहिल्या टप्प्यात शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी ३१ जुलैला पाच वर्षे पूर्ण होणारी बालके पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.राज्यात शालेय शिक्षणाच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांची समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सरकारने सादर केल्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठीच प्रवेशासाठी किमान वयाचे धोरण लागू करण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढला होता. मात्र, गेल्या वर्षी हा आदेश निघण्यापूर्वीच्या काळातच अनेक संस्थांमधील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या आदेशाला शैक्षणिक संस्थांकडून विरोध झाला होता. त्यानंतरच्या टप्प्यात किमान वयाच्या या धोरणाची अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. यंदा या धोरणाच्या अंमलबजावणीविषयीचे निर्देश अपेक्षित होते. त्यानुसार माने यांनी हे आदेश दिले आहेत.

माने यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना किमान वयाच्या निकषांबाबतचे पत्र लिहिले आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी ३१ जुलै रोजी वयाची तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना नर्सरीच्या प्रवेशासाठी पात्र धरले जाणार आहे. याच अटीनुसार, वर्ष २०१९-२० मध्ये वयाची सहा वर्षे पूर्ण करणारी बालके पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र धरली जातील. तसेच, यंदा ३१ जुलै रोजी वयाची पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना पहिलीसाठी पात्र ठरविले जाईल. २०१७-१८ साठी वयाची पाच वर्षे चार महिने, २०१८-१९ मध्ये पाच वर्षे आठ महिने; तर २०१९-२० मध्ये वयाची सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना पहिलीला प्रवेश द्यावेत, असे निर्देश या पत्रामध्ये स्पष्टपणे देण्यात आले आहेत. राज्यभरातील सर्व प्रकारच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हे नियम लागू असल्याचेही या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Story Info
History
Comment

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेहांच्या अदलाबदलीने गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉस्पिटलच्या शवागारात ठेवलेल्या नातेवाइकांच्या मृतदेहाची ओळख व्यवस्थित करून न घेतल्याने आणि हॉस्पिटलकडूनही ओळख नीट करून न दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी राव नर्सिंग हॉस्पिटलमध्ये घडला. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे दोन्ही बाजूच्या नातेवाइकांनी हा प्रकार धारेवर धरल्यानंतर अखेर हॉस्पिटलने चूक मान्य करीत दोन्ही कुटुंबीयांची माफी मागितली.

बिबवेवाडीतील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रमेशचंद्र वेद यांचा एक जानेवारीला मृत्यू झाला. त्यांचे परदेशातील कुटुंबीय येईपर्यंत वेद यांचा मुलगा संदीप यांनी त्यांचा मृतदेह बिबवेवाडी रस्त्यावरील राव नर्सिंग हॉस्पिटलमधील शवागारात (मॉर्च्युरी) ठेवला. दरम्यान, राव हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे श्रीराम गंधे यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनीही मृतदेह शवागारात ठेवला. सकाळी साडेसहाच्या सुमारास गंधे कुटुंबीय वेद यांचाच मृतदेह घेऊन गेले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी ओळख पटवून मृतदेह ताब्यात दिल्याचा दावा हॉस्पिटल आणि गंधे कुटुंबीयांकडून करण्यात आला.

गंधे यांच्या नातेवाइकांनी वेद यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दरम्यान, वेद यांच्या कुटुंबीयांनी रमेशचंद्र वेद यांच्या मृतदेहाची मागणी केली. शवागारात वेद यांची शवपेटी रिकामी असल्याचे दिसले. त्यामुळे वेद कुटुंबीयांना धक्का बसला आणि हॉस्पिटलमध्ये धावपळ उडाली. चौकशी केल्यावर सकाळी एक मृतदेह नेल्याची माहिती समोर आली. काही वेळाने गंधे यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये असल्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अन्य कोणावर तरी अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणाव वाढला. अखेर राव नर्सिंग हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एन. पी. राव यांनी दोन्ही कुटुंबीयांची माफी मागत चुकीची कबुली दिली.

'आम्हाला आमचे वडील रमेशचंद्र वेद यांच्या मृतदेहाची अस्थी मिळावी,' अशी मागणी संदीप यांनी केली आहे. तसेच, 'हॉस्पिटलची चूक असून हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे वडिलांचे अंतिम दर्शन घेता आले नाही,' अशा शब्दांत संदीप वेद यांनी संताप व्यक्त केला. 'सकाळी आमचे बंधू श्रीराम गंधे यांचा मृतदेह ओळख पटवून नेले होते. मृतदेहावर टॅगही होता. त्यामुळे आमची चूक नसून हॉस्पिटलचीच चूक आहे,' असे गंधे यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images