Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘दिल्ली पॅटर्नची पुण्यात गरज नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिल्ली येथे सम-विषम तारखेनुसार चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय पुण्यात लागू करण्याची काहीच आवश्यकता नाही. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास दुसऱ्या कोणत्याही पर्यायाची गरज नाही. दिल्लीतील सम विषय वाहतुकीचा निर्णय प्रदूषणात वाढ झाल्यामुळे घेतला आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दिल्लीत सम-विषम तारखेनुसार चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय शुक्रवारपासून अंमलात आला आहे. दिल्लीतील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम तारखेनुसार चारचाकी वाहने दिल्लीतील रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून सीएनजी गाड्या आणि दुचाकींना वगळण्यात आले आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत दिल्लीमध्ये ही योजना अंमलात येणार आहे. या बाबत पुण्यातील काही वाहतूक तज्ज्ञांनी संपर्क साधला असता पुण्यात अशा प्रकारची योजना राबविण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. त्याबरोबरच पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास दुसऱ्या कोणत्याही पर्याची आवश्यकता राहणार नाही. दिल्लीतील सम-विषम वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय वाढते प्रदूषण पाहता घेण्यात आला आहे. पुणेच काय मुंबईतसुद्धा हा निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.

दिल्लीत मेट्रो, लोकल ट्रेन, स्थानिक बस सेवा अशी सर्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आहे. पुण्यात पीएमपीबरोबरच इतर बीआरटी, मेट्रो सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था समक्ष झाल्यास इतर पर्याय शोधण्याची गरज लागणार नसल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंहगडाच्या पायथ्याजवळ गुरुवारी सकाळी मारुती कार दरीत कोसळली. सुदैवाने या कारमधील दाम्पत्याला कोणीतीही गंभीर इजा झाली नाही. घाट रस्त्यावरील धोकादायक वळणांवर सुरक्षा कठडा नसल्याने हा प्रकार घडला.

नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी सिंहगडावर गर्दी केली होती. सकाळी साडेदहाच्या दरम्यान एमएच १२ जीव्ही ८०७० ही अल्टो कार चालविणाऱ्या चालकाचे घाटाच्या शेवटच्या टप्प्यात वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. वळणाचा अंदाज चुकल्यामुळे गाडी थेट पंधरा फूट खाली दरीत गेली. या भागात झाडी भरपूर असल्याने गाडी त्यात अडकली. सुदैवाने या गाडीत बसलेल्या दाम्पत्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. दुपारी क्रेनच्या साह्याने गाडी काढण्यात आली.

गेल्या वर्षभरापासून सिंहगडाचा घाट रस्ता धोकायदायक झाला आहे. खड्डे आणि दरडीच्या दगडांमुळे पर्यटकांना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते आहे. काही ठिकाणी तर वळणावर खड्डे चुकवताना गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. या धोकादायक वळणावर वन विभागाने तातडीने कठडे बसवावेत, तुटलेले कठडे दुरूस्त करावे, अशी मागणी स्थानिक जीपचालक आणि पर्यटकांनी वारंवार केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच कठडा नसल्यामुळे एक कार घाट रस्त्यावरून दरीत कोसळली होती. तरी देखील वनाधिकारी ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, असे सांगून याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी बिपिन रावत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांनी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून शुक्रवारी सूत्रे स्वीकारली. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून रावत यांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना मुख्यालयातर्फे 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

मुख्यालयाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग गुरुवारी (३१ डिसेंबर) निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर रावत यांनी हा पदभार स्वीकारला. लष्कराचे दक्षिण मुख्यालय कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सज्ज असल्याचे मत सिंग यांनी आपल्या निरोप समारंभादरम्यान व्यक्त केले.

दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून नव्याने सूत्रे स्वीकारलेल्या लेफ्टनंट जनरल रावत यांनी लष्करी सेवेदरम्यान अनेक मोहिमांमध्ये यशस्वी कामगिरी बजावली आहे. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांसाठी जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून मुंबईमध्ये कार्यरत होते. त्यांचे शालेय शिक्षण शिमला येथील सेंट एडवर्ड्स स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अॅकेडमीमधून (आयएमए, डेहराडून ) लष्करी प्रशिक्षणासह आपले शिक्षण पूर्ण केले. उंच प्रदेशातील लढाया आणि सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठीच्या लष्करी कारवायांचा त्यांना मोठा अनुभव आहे. पूर्वेकडील प्रत्यक्ष सीमारेषेवर त्यांनी एका इन्फन्ट्री बटालियनचे नेतृत्त्व केले होते. आयएमए, डेहराडूनमध्ये इन्स्ट्रक्शनल ऑफिसर, मिलिटरी ऑपरेशन्स डिरेक्टोरिएटमध्ये जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड २ आदी पदांवरही त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. पूर्व मुख्यालयामध्ये मेजर जनरल जनरल स्टाफ म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये त्यांनी एका बहुराष्ट्रीय ब्रिगडचेही नेतृत्व केले आहे.

रावत अमेरिकेतील फोर्ट लिव्हेनवर्थ तेथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत. ३७ वर्षांच्या त्यांच्या लष्करी सेवेत त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडलसह अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि नेतृत्त्व या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीज विषयामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना मेरठ येथील चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटीने पीएचडी पदवीने सन्मानित केल्याची माहिती शुक्रवारी लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रस्नेही शिक्षकांना सरकारचे पाठबळ

$
0
0


Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : राज्यात शैक्षणिक उपक्रमांसाठी पूरक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना समाजासमोर आणण्यासाठी शिक्षण खात्यानेच आता पावले उचलली आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या पातळीवरूनच त्याची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच राज्यातील सर्व शिक्षकांसाठी मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.

म्हसवड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी २०१६ वर्ष डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशी सोळा मोबाइल अॅप्लिकेशन्स विकसित केली आहेत. त्यांच्या या कार्यावर प्रकाश टाकून 'मटा'ने त्यामधील वेगळेपण नुकतेच मांडले होते. 'मटा'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन तावडे यांनी जाधव यांच्या सर्व अॅप्लिकेशन्सची शुक्रवारी माहिती घेतली. तसेच, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या सर्व अॅप्लिकेशन्सचे मुंबईमध्ये औपचारिक प्रकाशनही केले. शिक्षकांच्या अशा वेगळ्या प्रयत्नांविषयी खात्याच्या दृष्टिकोनाबाबतही तावडे यांनी या निमित्ताने 'मटा'शी संवाद साधला.

'कोणतेही वेगळे मानधन दिले नसताना आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय शिक्षकांनी स्वतःहून असे उपक्रम करणे, ही खूपच मोठी बाब आहे. अशा सर्व शिक्षकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहणार आहे. राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांच्या गटांच्या माध्यमातून अॅप्स तयार करणारे असे जवळपास ५७ शिक्षक असल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे. त्याशिवाय या गटाच्या माध्यमातून कार्यरत असणारे एकूण १५९ शिक्षक राज्यभरात आहेत. या सर्व शिक्षकांना एका मेळाव्याद्वारे आपण लवकरच एकत्र आणणार आहोत. या मेळाव्याद्वारे त्यांनी केलेल्या प्रकल्पांची माहिती घेऊन, ती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहोत,' असे तावडे यांनी सांगितले.

या मेळाव्याच्या माध्यमातून या शिक्षकांचे कार्य जाणून घेऊन ते राज्यातील इतर शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार केला जाईल. तसेच, या शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देण्यासाठीही हा मेळावा महत्त्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

..
खरं तर शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते अॅप्लिकेशनचे उद् घाटन करण्याचा तसा कोणताही विचार कधी मनात आला नव्हता. मात्र मटामध्ये बातमी आल्यानंतर त्या विषयीच्या विचारांना चालना मिळाली. शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंदकुमार यांनीही त्यासाठी पाठबळ दिले. तावडे सरांनी स्वतः या कामाबद्दल खूप तपशीलाने माहिती घेतली. ऑफलाइन अॅप्सचे वेगळेपण आणि त्याचा राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणारा फायदा या विषयीची त्यांनी जाणून घेतले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक म्हणून माझ्यासाठी ही बाब खूपच प्रोत्साहक आहे.

बालाजी जाधव, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या वर्षात अनुभवा खगोलीय पर्वणी

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

दिवसा आणि रात्रीच्या आकाशात घडणाऱ्या अनेक नयनरम्य घटनांच्या पार्श्वभूमीवर २०१६ हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. ग्रहणे, उल्कावर्षाव, ग्रहांच्या युतीसोबत यंदा बुध ग्रहाचे दुर्मिळ अधिक्रमण आकाशप्रेमींचे आकर्षण राहणार आहे. यातील बहुतेक घटना वर्षाच्या पूर्वार्धात घडणार आहेत.

वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे तीन जानेवारीच्या रात्री 'क्वाड्रांटीड' नावाचा उल्कावर्षाव दिसणार असून, वर्षातील तीन मोठ्या उल्कावर्षावांमध्ये त्याची गणना होते. चार जानेवारीच्या पहाटे ताशी १२० इतके उल्कांचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे. भूतप तारकासमूहामध्ये या उल्कावर्षावाचा उगमबिंदू आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच कॅटलिना हा धूमकेतूही आकाशप्रेमींचे आकर्षण ठरेल. सध्या भूतप तारकासमूहातच कॅटलिना दिसत असून त्याची प्रत (मॅग्निट्यूड) सुमारे ६ इतकी आहे.

नऊ जानेवारीच्या पहाटे होणारी शुक्र आणि शनीची युती आकाशप्रेमींसाठी फोटोची दुर्मिळ संधी असेल.

जानेवारीच्या उत्तरार्धात आणि फेब्रुवारीच्या पूर्वार्धात पहाटेच्या वेळी ग्रहांचे संमेलन भरणार असून, बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे पाचही ग्रह यावेळी साध्या डोळ्यांनी पाहता येतील. ८ मार्चला गुरुची प्रतियुती होत असल्यामुळे तेजस्वी गुरुचे दर्शन रात्रभर घडेल. ९ मार्चच्या सूर्योदयाला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारताच्या पूर्वेकडील राज्यांमधून पाहता येणार आहे. महाराष्ट्रातून पाहताना चंद्राने सूर्याचा फक्त पाच टक्के भाग झाकलेला दिसेल. पाठोपाठ २३ मार्चला चंद्रोदयाला होणारे उपछाया चंद्रग्रहण संपूर्ण देशातून दिसणार आहे.

हॅलेच्या धूमकेतूमुळे दिसणारा इटा अॅक्वारीड हा कुंभ राशीतील उल्कावर्षाव सहा मेच्या पहाटे पाहता येईल. या वर्षीचे सर्वात मोठे आकर्षण असणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण नऊ मे रोजी दिसणार असून, बुध ग्रहाचा सूर्यावरून होणारा प्रवास आकाशप्रेमींना पाहता येईल. सूर्यास्ताच्या वेळी ही घटना दिसणार असून, पश्चिमेकडील राज्यांमधून सुमारे दोन तास बुधाचा काळा ठिपका सूर्यावरून सरकताना पाहता येईल.

गुरु आणि शुक्र या तेजस्वी ग्रहांची युती २७ ऑगस्टला होणार असून, सूर्यास्ताच्या वेळी गुरु- शुक्राची जोडी पश्चिम क्षितिजावर पाहता येईल. वर्षातील दुसरे उपछाया चंद्रग्रहण १६ सप्टेंबरला होणार असून, संपूर्ण ग्रहण देशाच्या सर्व भागांतून दिसेल. मान्सूनचे महिने संपल्यावर दिसणारे मृग, सिंह आणि मिथुन तारकासमूहांमधील उल्कावर्षाव मात्र चंद्रप्रकाशामुळे यावर्षी फारसे प्रभावी ठरणार नाहीत.

..

यंदाची अवकाशातील मेजवानी

३ जानेवारी क्वाड्रांटीड उल्कावर्षाव

जानेवारी पहिला आठवडा कॅटलिना धूमकेतू

९ जानेवारी शुक्र- शनी युती

फेब्रुवारी पहिला आठवडा बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी यांचे दर्शन

८ मार्च गुरुची प्रतियुती

९ मार्च खंडग्रास सूर्यग्रहण

२३ मार्च उपछाया चंद्रग्रहण

६ मे कुंभ राशीतील उल्कावर्षाव

९ मे बुध ग्रहाचे अधिक्रमण

२२ मे मंगळ ग्रहाची प्रतियुती

३ जून शनीचे वर्षातील तेजस्वी दर्शन

२७ ऑगस्ट गुरु- शुक्र युती

१६ सप्टेंबर उपछाया चंद्रग्रहण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानभाषेची उठाठेव पद गेल्यानंतर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यावर भाषेच्या संदर्भातही टीका होऊ लागली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने डॉ. सबनीस यांनी भान राखून मराठी या आपल्या सध्याच्या तात्पुरत्या पदाशी संबंधित भाषेबाबत आपले विचार प्रदर्शित करावेत. अन्य कोणत्या भाषा ज्ञानभाषा आहेत याची उठाठेव या पदावरून उतरल्यावर करावी असा टोला मराठी राष्ट्रभाषा समितीचे अध्यक्ष अनिल गोरे तथा मराठीकाका यांनी लगावला आहे.

एका छोटेखानी मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना डॉ. सबनीस यांनी एक अमराठी भाषा ज्ञानभाषा असल्याची भलावण करणारी अनावश्यक आणि अनुचित टिप्पणी केली. डॉ.सबनीस यांच्या या वक्तव्याबाबत मला खेद वाटतो. त्यांनी यापुढे जबाबदारीचे भान राखून औचित्य सांभाळावे, असे आवाहन गोरे यांनी केले आहे.

'मराठीच्या परिघातील कार्यक्रम आणि उपक्रमाच्या प्रसंगी अन्य अमराठी भाषेचे गोडवे गाण्याचा उपक्रम डॉ. सबनीस यांच्याप्रमाणेच अन्य अनेक मराठी साहित्यिकांनी मराठीच्या प्रसार, प्रचाराशी संबंधित मोठे पद मिळाल्यावर यापूर्वीही केला आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषिक संस्थांचे, संमेलनाचे पदाधिकारी अशी अन्य भाषांची उठाठेव त्या पदावरून करीत नाहीत. मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी संबंधित संस्थेत, उपक्रमात मोठे पद मिळाल्यावर अकारण अन्य भाषेचे गोडवे गाणे हे मराठीच्या विकासाला निश्चितपणे मारक आहे,' अशी टीका गोरे यांनी केली आहे.

..

संमेलनाध्यक्षांना दिले आव्हान

मराठी माध्यमात शिकावे असा प्रचार करणारे 'लबाड' आहेत अशीही अनावश्यक आणि अनुचित टिप्पणी डॉ. सबनीस यांनी केली आहे. त्या निष्कर्षानुसार मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे असा प्रचार मी आणि माझे अनेक मित्र, सहकारी मिळून आम्ही करतो. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना 'लबाड' म्हणणे भावी साहित्य संमेलन अध्यक्षांना शोभणारे नाही. आमची यात काय लबाडी आहे हे डॉ. सबनीस यांनी कृपया सर्व मराठी समाजाला समजावून द्यावे व मराठी ज्ञानभाषा आहे की अज्ञानभाषा आहे याबाबत आपले मत डॉ. सबनीस यांनी लवकरात लवकर प्रसिद्ध करावे, असे जाहीर आव्हान गोरे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यजमान पुणे पोलिस; आयोजन जवानांचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेचा यंदाचा मान जरी पुणे पोलिसांना मिळाला असला तरी, स्पर्धेचे आयोजन मात्र राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) मैदानावर करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी 'एसआरपीएफ'च्या जवानांनी कंबर कसली असून, पूर्वतयारीसाठी अगदी कमी वेळ मिळाला असल्याने मैदान तयार करणे, स्टेडियम, सीमा भिंत बांधण्यापासून रस्ते तयार करणे, आदी छोट्या-मोठ्या कामांमध्ये स्वतःला झोकून दिले आहे.

महाराष्ट्र पोलिसांची २८ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०१६ रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) मैदान आणि सणस मैदान येथे होत आहे. राज्यभरातून अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, पुणे, कोकण, नांदेड, नाशिक, ठाणे, रेल्वे व 'एसआरपीएफ' असे १४ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धा तीन जानेवारी रोजी सुरू होत आहे तर, स्पर्धेचे औपचारिक उद् घाटन येत्या गुरुवारी (८ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन पुणे पोलिसांना देण्यात आल्यानंतर स्पर्धेचे आयोजन बालेवाडी स्टेडियमवर करण्यात येणार होते. मात्र, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ही स्पर्धा 'एसआरपीएफ'च्या मैदानावर घेण्याची सूचना केली. त्यानिमित्ताने या मैदानांची डागडुजी होऊन पोलिसांचा पैसा पोलिस दलासाठी खर्च होऊ शकेल, अशी कल्पना त्या मागे होती. त्यामुळे या स्पर्धेमध्ये 'एसआरपीएफ'च्या ग्रुप एक आणि दोनला सहभागी करण्यात आले आहे. 'एसआरपीएफ' ग्रुप दोनचे कमांडट मनोज पाटील यांच्याकडे ओपनिंग आणि क्लोजिंग कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली. तर, 'एसआरपीएफ' ग्रुप एकचे कमांडट अमोल तांबे यांच्याकडे काही प्रमुख खेळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

..

डागडुजीची जबाबदारी एसआरपीएफ'वर

अचानक जबाबदारी आल्याने टेंडर काढून मैदानांची कामे करणेही शक्य होत नव्हते. अखेर जवानांनीच ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पडेल ती कामे करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धेची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही कार्यक्रम 'एसआरपीएफ'च्या मैदानावर होत आहेत. त्यासाठी 'एसआरपीएफ'चे दोन्ही ग्रुप कामाला लागले आहेत. या दोन्ही ग्रुपमधील जवानांनी रस्ते तयार करणे, मैदाने तयार करणे, मैदांनाच्या सीमा भिंत बांधणे, स्टेडिअम बांधणे, 'व्हीआयपी' थांबणार असलेल्या ठिकाणी डागडुजी करणे, आदी कामे जोरात सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष इच्छुकांसाठी कसोटीचे

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले आहे. सरत्या वर्षात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून अनेक चांगल्या कामांची सुरुवात झाली. पण, बरेच प्रकल्प मात्र अद्याप रखडले आहेत. २०१७ला होणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छुकांची खरी कसोटी चालू वर्षात लागणार आहे.

एकतर राजकीय उलथापालथीमुळे पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून तुच्छ लेखणाऱ्यांच्याच पंगतीला जाऊन बसणाऱ्यांची संख्या चालू वर्षात वाढणार आहे. त्यातच येत्या निवडणुकीत प्रभाग पद्धत असेल, की वॉर्ड हे अजून निश्चित कोणाला सांगता येत नसल्याने इच्छुकांची भाऊ गर्दी होणार असे दिसते. पुढील वर्षीच्या निवडणुकांची आचारसंहिता जानेवारी २०१७च्या सुरुवातीलाच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न आणि महानगरपालिका प्रशासन यांची सांगड घालावी लागणार आहे. त्यासाठी चालू वर्षात सध्याच्या नगरसेवकांसह इच्छुकांना हालचाली कराव्या लागणार आहेत. अनेकांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना 'लक्ष २०१७'चे फ्लेक्स लावले खरे. पण, केवळ फ्लेक्स लावून नगरसेवक होणार का, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

'स्मार्ट सिटी' योजनेत डावलले गेल्याचे शल्य हे पदाधिकाऱ्यांना नसले, तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नागरिकांच्या मनात कायम आहे. मेट्रो असो वा स्मार्ट सिटी, शहराबाबत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावर दोन निवडणुका अनेकांनी पदरात पाडून घेतल्या. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले. पण, अजूनही हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेले नाही. मागील निवडणुकांप्रमाणेच आगामी निवडणूक पदरात पाडून घेण्यासाठी याच मुद्द्याचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे शहराचे राज्यकर्ते मोठ्या जोमाने हा विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडत आहेत.

पिंपरी-चिंचवडचे नगरपालिकेतून महानगरपालिका रूपांतर होऊन तीन दशके उलटत आहेत. असे असले, तरी पारंपरिक प्रश्न म्हणजे रस्ते, पाणी, वीज हेच मुद्दे येत्या निवडणुकीत चघळले जातील. शहरातील रस्ते खरतर देशासह परदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. दुमजली उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील कोंडी काही अंशी कमी झाली आहे. मात्र, अजूनही अंतर्गत रस्ते हे शहराचे 'गावपण' टिकवून ठेवल्याचे सिद्ध करतात.

अनेकांना कमळाचा मोह

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या येत्या वर्षात वाढणार असेच सध्याचे चित्र आहे. केंद्र व राज्याप्रमाणाचे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी शहरातील पदाधिकारी प्रयत्नशील आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असल्याचे छातीठोक पणे सांगणाऱ्या अनेकांना कमळाचा मोह लागला आहे. सलग दहा-पंधरा वर्षे नगरसेवक असणाऱ्यांची मात्र अजूनही पक्षांतराची मानसिक नसल्याचे बोलले जात आहे. पण, एकहाती सत्ता आणायची झाल्याल बड्या माशांना गळाला लावण्यासाठी भाजप निश्चित प्रयत्न करत आहे. पक्षांतराची चाहूल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी सर्वच जुन्या-जाणत्यांची बैठक घेतली होती. ही पर्यायी व्यवस्था असल्याचे देखील बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अँक्सिडेंट फ्री ३१ डिसेंबर साजरा करा असे सांगत वाहतूक पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या आवाहनाला हिंजवडीत गालबोट लागले. कंपनीत लॉगऑफ करण्यासाठी जाणाऱ्या दोघा आयटी इंजिनीअरचा दुचाकी घसरून अपघाताता मृत्यू झाला. ३१ डिसेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. दोघे इंजिनीअर 'इन्फोसिस' कंपनीत कामाला होते.

विनोद अल्लगपन (वय २५, रा. इन्फोटेक पार्क, माणगाव, मूळगाव - बेंगळुरू, कर्नाटक) आणि शिवबालन मशिमत्तू (वय २५, रा. वसंत सोसायटी, मूळगाव - पिल्लुपुरम, तामिळनाडू) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघा इंजिनीअरची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि शिवबालन हे दोघे इन्फोसिस कंपनीत कामाला होते. कंपनीमध्ये इन-आउट लॉगिन सिस्टिम असते.

गुरुवारी (३१ डिसेंबर) विनोद व शिवबालन हे मित्रांबरोबर होते. लॉगआउट करायचे राहिल्याचे लक्षात आल्याने ते परत कंपनीत जात असताना हा अपघात झाला. दोघेही कंपनीत जात होते. वेळेत हे लॉगआउट करणे आवश्यक होते, अशी माहिती दोघांच्या मित्रांनी पोलिसांना दिली.

हिंजवडीमधील कल्याण भेळ समोरील रस्त्यावर हा अपघात झाला. विनोद मित्राची करिझ्मा दुचाकी चालवत होता, तर शिवबालन हा मागे बसला होता. येथील रस्त्यावर असणाऱ्या स्पीड ब्रेकरवरून दुचाकी उडाली. त्यामुळे विनोदचा ताबा सुटला. त्यात आहे त्याच वेगात दुचाकी प्रथम फुटपाथवर चढली. त्यानंतर तेथील झाडावर आदळून पुन्हा रस्त्यावर आली. यामध्ये दोघेही दुचाकीवरून खाली पडून दोघांचेही डोके फुटपाथवर आदळले.

अपघाताची माहिती मिळताच दोघांना जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शुक्रवारी दोघांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलसीडी घोटाळ्याची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या शाळांना देण्यात आलेले एलसीडी परस्पर लाटण्यात आल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. शाळांना देण्यात आलेले एलसीडी आणि त्याची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. शिक्षणप्रमुख बी. के. दहिफळे यांनी हे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे, यासाठी मंडळाकडून २०१२ मध्ये ५९९ तर २०१४ साली २५० एलसीडीचे वाटप शाळांसाठी केले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने एलसीडी दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात शाळांना देण्यात आलेले एलसीडी आणि मंडळांकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे यामध्ये तफावत असल्याचे समोर आले होते. चार शाळांच्या तपासणीमध्ये १४ एलसीडी परस्पर लाटण्यात आल्याचे संभाजी महाराज संघर्ष समितीने केलेल्या पाहणीत समोर आले होते. या प्रकाराची दखल घेऊन याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय शिक्षण मंडळ प्रशासनाने घेतला आहे.

एलसीडी वाटपाची मंडळाकडील कागदपत्रे आणि शाळांना प्रत्यक्षात मिळालेले एलसीडी आणि त्यासंबधीची कागपत्रे यांची तपासणी केल्ल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे, असे शिक्षण मंडळाचे प्रमुख बी. के. दहिफळे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शाळांकडून त्यांना मिळालेल्या एलसीडीची आकडेवारी आणि कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आज, शनिवारची (दोन जानेवारी) अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही कागदपत्रे आल्यानंतर तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे ‌दहिफळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटच्या गोळ्याला आईनेच केले पोरके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका वयोवृद्ध दाम्पत्याकडे आपले आठ महिन्यांचे मूल सोपवून आई निघून गेल्याचा प्रकार शिवाजीनगर एसटी स्टँडवर गुरुवारी दुपारी घडला. मोठ्या मुलीला शौचाला नेते असे सांगून 'ती' आई निघून गेली. आपल्याच पोटच्या गोळ्याला पोरके करण्याच्या या घटनेने संबंधित लोक मात्र, हेलावून गेले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्या महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोरक्या झालेल्या बाळाला पोलिसांनी ससूनच्या 'श्रीवत्स'मध्ये दाखल करण्यात आले आहे.

या बाबत पोलिस नाईक प्रकाश मदगे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर एसटी स्टँडवर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मारुती भुजंग आदेते आणि त्यांची पत्नी सरुबाई आदेते परळीला जाण्यासाठी बसची वाट पहात होते. त्यावेळी एक महिला कमरेवर लहान मूल घेऊन त्यांच्या जवळ आली. माझ्या मोठ्या मुलीला शौचाला घेऊन जायचे आहे. तो पर्यंत हे बाळ तुम्ही सांभाळाल का अशी विनंती त्या महिलेने आदेते यांच्याकडे केली.

पाच ते दहा मिनिटांचा प्रश्न असल्याने आदेते आजीआजोबांनीदेखील आनंदाने बाळाला आपल्याकडे घेतले. आश्चर्य म्हणजे ते बाळही न रडता त्यांच्याजवळ बसले. आजीबार्इ त्या मुलाला खेळवत असल्याने त्याने त्रास दिला नाही. मात्र, पंधरा-वीस मिनिटे झाली तरी बाळाला घेण्यासाठी त्याची आई परत आली नाही. दुपारी चार वाजता बाळाला ताब्यात देऊन निघून गेलेली आई सायंकाळचे सहा वाजले तरी परत न आल्याने आणि दरम्यान बाळानेही रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने आदेते दाम्पत्य भयचकीत झाले. या गोंधळात त्यांची परळीला जाणारी बसही चुकली. त्यामुळे या आजीआजोबांनी बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रकाला माइकवरून बाळाच्या आईला बोलविण्याची विनंती केली. त्यानंतर वाहतूक नियंत्रकाने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बस स्थानकामध्ये बोलावून घेतले. माइकवरून घोषणा करूनही ती महिला आली नाही. त्यामुळे शेवटी हे बाळ त्यांनी पोलिसांकडे दिले. पोलिसांनी ससून हॉस्पिटलमधील 'श्रीवत्स' केंद्रामध्ये बाळाला दाखल केले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आजीआजोबा बसलेले ठिकाण सीसीटीव्हीमध्ये येत नसल्याने ती महिला सीसीटीव्हीत आढळून आली नाही. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर. एन. गट हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबनीसांच्या विधानाने वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत. सबनीस यांनी या वक्तव्यांसाठी माफी मागावी, अन्यथा त्यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येऊ देणार नाही, असा इशारा या भागातील राज्यसभेवरील भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे यांनी दिला आहे.

विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद‍्घाटन कार्यक्रमात गुरुवारी येथे सबनीस यांनी मोदींच्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यांनी बोलण्याच्या ओघात मोदींचा उल्लेख एकेरीही केला होता. त्याचे पडसाद शुक्रवारी पिंपरी-चिंचवड भागात उमटले. सबनीस यांचा त्यांच्या वक्तव्यांसाठी निषेध करून, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 'आपल्या विधानांचा विपर्यास करण्यात आला', अशी बाजू सबनीस यांनी शुक्रवारी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सबनीस यांनी माफी मागावी, अन्यथा संमेलनस्थळी त्यांना फिरकूही देणार नाही, असा इशारा खासदार साबळे यांनी दिला.

रामदास आठवलेंचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा, संमेलन उधळून लावण्याची ताकद रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिला. एका कार्यक्रमानिमित्त आठवले पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

भाजपला राजकारण लखलाभ : सबनीस

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधायक राष्ट्रवादाचा मी केलेला गौरव भाजपला समजत नसेल, तर त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो. भाजपने माझा पुतळा जाळून असहिष्णुतेवरच शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचा सांस्कृतिक दहशतवाद व मुस्कटदाबी मी सहन करणार नाही. त्यांच्या या राजकारणामुळे त्यांनाच फटका बसेल', असा इशारा ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…तर साहित्य संमेलन उधळून लावू : आठवले

$
0
0

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती असून त्यांच्याविरोधात श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा अपशब्द काढले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नांना आठवले यांनी आपल्या नेहमीच्या बेधडक वृत्तीने उत्तरे दिली.

गोध्रा हत्याकांड व गुजरातमधील दंगल ही देशातील सर्वात विघातक घटना होती. परंतु त्या गोष्टीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवणं चुकीचं आहे. नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती असून प्रत्येक जाती-धर्माचा ते मान ठेवतात. त्यामुळे कोणीही उठावं आणि मोदींवर आरोप करावेत हे आरपीआयचे कार्यकर्ते कधीही सहन करणार नाहीत; असे आठवले म्हणाले.

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा जर मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, तर आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते हे साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…तर साहित्य संमेलन उधळून लावू: आठवले

$
0
0

मटा ऑनालइन वृत्त। पिंपरी-चिंचवड

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निषेध केला आहे. नियोजित अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानांबाबत जर असे वक्तव्य करत असतील ते साहित्यिक कसले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

पंतप्रधान मोदी हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती असून त्यांच्याविरोधात श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा अशआ प्रकारचे अपशब्द काढले तर आरपीआयचे कार्यकर्ते साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.

चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

गोध्रा हत्याकांड व गुजरातमधील दंगल ही देशातील सर्वात विघातक घटना होती. परंतु त्या घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवणं चुकीचं आहे असेही आठवले पुढे म्हणाले. प्रत्येक जाती-धर्माचा मान राखणारे पंतप्रधान मोदी हे एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत असेही आठवले यांनी स्पष्ट केले. कोणीही उठावे आणि नरेंद्र मोदींवर आरोप करावेत हे अयोग्य असून आरपीआयचे कार्यकर्ते हे कधीही सहन करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिलाय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिफ’मध्ये यंदा चर्चासत्र अन् दिग्गजांशी संवादही

$
0
0

'पिफ'मध्ये यंदा चर्चासत्र अन् दिग्गजांशी संवादही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपटाशी संबंधित कार्यशाळा आणि चर्चासत्र, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद, चित्रपट संग्रहालयाचे दृक-श्राव्य प्रदर्शन, चित्रपट माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ... अशा स्वरुपात चित्रपटाशी संबंधित सर्व घटकांचा यंदा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) एका छताखाली समावेश केला जाणार आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त 'स्मिता पाटील पॅव्हेलियन' हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी या उपक्रमाची माहिती दिली. महोत्सवातील जागतिक चित्रपट स्पर्धेतील १४ चित्रपटांची घोषणाही या वेळी करण्यात आली. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि महोत्सवाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर समर नखाते, सचिव रवी गुप्ता या वेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या १४ व्या वर्षात पिफ बाजारची (पॅव्हेलियन) नवी संकल्पना मांडण्यात येत असून, कोथरूड-सिटीप्राइडच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत त्या अंतर्गत सर्व उपक्रम घेण्यात येतील, असे डॉ. पटेल यांनी सांगितले. १४ व्या पिफमध्ये सुमारे ६५ देशांमधून आलेले २८० चित्रपट दाखविले जाणार आहेत. या चित्रपटांचे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सात सिनेमागृहांत ३५० हून अधिक खेळ होणार आहेत.
जागतिक स्तरावर चित्रपट आणि खेळ या दोन गोष्टी परस्परांमधील मतभेद दूर सारण्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात. हीच महोत्सवाची यंदाची थीम असून, त्याअंतर्गत आठ चित्रपट दाखविले जाणार आहेत. लगान, चक दे, भाग मिल्खा भाग, इक्बाल यासारख्या चित्रपटांचा त्यात समावेश असेल, असे गुप्ता यांनी सांगितले.
जागतिक चित्रपट स्पर्धेसह विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा, टर्कीतील चित्रपटांवर कंट्री फोकस, इंडियन सिनेमा, रेट्रोस्पेक्टिव्ह, कॅलिडोस्कोप, ग्लोबल सिनेमा, एशियन फिल्म अशा विविध विभागांमध्ये जगातील सर्वोत्तम चित्रपट पाहण्याची संधी चित्ररसिकांना उपलब्ध होणार आहे.
............
शैक्षणिक संस्थांचेही पिफला सहकार्य
शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह पाच प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांचेही सहकार्य यंदापासून 'पिफ'ला लाभणार आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), भारती विद्यापीठ आणि डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस या संस्थांचा त्यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाहा १५० जातींचे दोन हजार गुलाब

$
0
0

पाहा १५० जातींचे दोन हजार गुलाब

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुलाबप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी दी रोझ सोसायटी ऑफ पुणे यांच्यातर्फे टिळक स्मारक मंदिरात हिवाळी गुलाब प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात ७७ विभाग असून, त्यामध्ये गुलाब पुष्पांसह पुष्परचना, गुलाबाची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने सुमारे १५० जातींचे दोन हजार गुलाब पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे.
दी रोझ सोसायटी ऑफ पुणे यांनी भरविलेले हे ९७ वे गुलाब प्रदर्शन असून, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे यांच्या हस्ते शनिवारी त्याचे उद् घाटन झाले. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. दीपक टिळक उपस्थित होते. उद् घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या सहकार्यवाह भाग्यश्री किवळकर यांना कै. लक्ष्मीबाई अनंत नाईक स्मृती रौप्यपदकाने, तर माजी अध्यक्ष अरुण पाटील प्रायोजित 'गुणवंत गुलाब शेतकरी' या पुरस्काराने गुलाब शेतकरी राजेंद्र राऊत यांना गौरविण्यात आले. या वेळी नाईक कृषी उद्योग कंपनीचे आशिष नाईक आणि सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विविध स्पर्धांमध्ये ए. डी. मोरे यांच्या गुलाबाने किंग ऑफ द शो, विकास म्हसकर यांच्या गुलाबाने क्वीन ऑफ द शो, तर राजेंद्र निम्हण यांच्या गुलाबाने 'विजयश्री- गुलाब ऑफ द शो' हे बक्षीस पटकावले. मॅनचेर इराणी यांच्या गुलाबाला 'प्रिन्स ऑफ द शो' आणि विकास म्हसकर यांच्या गुलाबाने 'प्रिन्सेस ऑफ द शो'चा मान मिळविला. प्रदर्शनाचा आज (तीन जानेवारी) शेवटचा दिवस असून, संध्याकाळी सहा वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षा नलिनी खासनीस यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रदर्शन सकाळी ९ ते ८ या वेळेत खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्ह्यात बनविणार २१६ किलोमीटरचे रस्ते

$
0
0

पुणे जिल्ह्यात बनविणार २१६ किलोमीटरचे रस्ते

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील वाड्या-वस्त्या रस्त्यांनी जोडण्याबरोबरच दुरवस्था झालेल्या रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पुणे जिल्ह्यात २१६ किलोमीटर लांबीचे रस्ते हाती घेण्यात येणार आहेत. राज्यभरातील सात हजार २०० किमीचे रस्ते या योजनेतून केले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्याने न जोडलेली गावे व लोकवस्त्यांमध्ये नवीन रस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्यात राबविली जाणार आहे. राज्यात रस्त्यांनी जोडल्या न गेलेल्या गावांची संख्या लक्षणीय आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये ८४ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते दर्जोन्नतीच्या गटात आहेत. या योजनेतून राज्याला आतापर्यंत २३ हजार किमी लांबीचे रस्ते मंजूर झाले आहेत. त्यामुळे दर्जोन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रामुख्याने पंतप्रधान ग्रामसडक योजनेत नसलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. राज्यातील दरवर्षी साधारणपणे १४६ किमी लांबीचे नवीन रस्ते करण्याचे व दोन हजार किमी रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आगामी चार वर्षांमध्ये उर्वरित रस्त्यांची कामे टप्प्या-टप्प्याने केली जाणार आहेत. गतवर्षी (२०१५-१६) दोन हजार किमी लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा समावेश करण्यात आला होता. यंदा (२०१६-१७) या वर्षासाठी ५,२०० किमी लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हानिहाय रस्त्यांचे वाटपही करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २१६ किमी लांबीच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील १८७ किमी, सांगलीतील १४४ किमी, कोल्हापूरमधील १३४ किमी व सोलापूर जिल्ह्यातील २८१ किमी लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३१७ किमी लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.त्याखालोखाल नाशिक व गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी २८१ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जोन्नतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नवीन रस्त्यांचा समावेश करताना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये पाचशे व आदिवासी क्षेत्रात अडीचशेपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांतील न जोडलेल्या वाड्या-वस्त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्येही नदीघाट व वाळू उत्खननामध्ये ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वपरीक्षेची तारीख बदलली

$
0
0

पूर्वपरीक्षेची तारीख बदलली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीला मोफत कोचिंग क्लासला पाठविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय बार्टीने घेतला आहे. ही परीक्षा आता सात फेब्रुवारीला होणार आहे; तसेच या परीक्षेसंबंधी काही बदल असल्यास ते बार्टीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील, असे बार्टीने कळविले आहे.
बार्टीची प्रवेश परीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्हा महिला व बालविकास पदासाठीची परीक्षा २४ जानेवारीला होणार होती. एमपीएससीची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी बार्टीच्या परीक्षेसाठी इच्छुक होते. त्यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने, विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे 'बार्टी'च्या परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्याचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत बार्टीचे महासंचालक डी. आर. परिहार यांनी बार्टीच्या परीक्षेची तारीख बदलण्याची घोषणा केली.
त्यानुसार सात फेब्रुवारीला परीक्षा घेण्याचे बार्टीने निश्चित केले आहे. मात्र, त्यामध्येही काही बदल झाल्यास त्याची पूर्व कल्पना विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे व वेबसाइटद्वारे दिली जाईल, असे परिहार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्लाइड मॅजिक अभ्यासक्रम येणार

$
0
0

अप्लाइड मॅजिक अभ्यासक्रम येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जादू हे विज्ञान असून त्याचा वैद्यकीय क्षेत्रात चांगला उपयोग होऊ शकतो या उद्देशाने अप्लाइड मॅजिक हा अभ्यासक्रम बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. अंधश्रद्धा दूर करण्याबरोबरच वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि मानसिक आजार केंद्रस्थानी ठेवून या अभ्यासक्रमाची रचना ठेवण्यात येणार आहे. यासाठी विविध नागरिकांवर आमचे प्रयोग सुरू आहेत,' अशी माहिती प्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार ज्युनिअर यांनी दिली.
ओंकार एन्टरटेन्मेंटतर्फे येत्या दोन ते ३० जानेवारी दरम्यान पुण्यात विविध ठिकाणी पी. सी. सरकार यांचे जादूचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने सरकार, जयश्री आणि त्यांची कन्या मनेका यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'जादू ही कला विज्ञानावर आधारित आहे. आजची जादू ही भविष्यातील प्रगत विज्ञान असते. भारतातील अभिजात कलांमध्ये जादू या कलेचा समावेश असून, त्याला इंद्रजाल विद्या असे म्हणतात. राजा महाराजांच्या काळापासून या कलेला राजाश्रय मिळाला होता. मात्र, बदलत्या काळानुसार हे कलाकार समाजाच्या मुख्य समुहापासून दूरावले गेले होते. पी. सी. सरकार यांनी भारताच्या जादू या विद्येला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून दिले. जगभरातील विविध देशांमध्ये प्रयोग करून त्यांनी आपली विद्या हजारो लोकांसमोर सादर केली. सरकार यांच्या आठव्या पिढीत मी आणि पुढे माझी कन्या मनेका हा वारसा पुढे नेणार आहे,' असे सरकार ज्युनिअर यांनी सांगितले.
'जादू या कलेला समाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्हा सर्व जादूगारांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय क्षेत्रातदेखील आज या कलेचा महत्त्वाचा भाग असलेल्या हिप्नॉटिझमचा भूल देण्यासाठी वापर होतो आहे. गेल्या काही वर्षांत घराघरात वाढत असलेली मानसिक अशांतता दूर करण्यासाठी आम्ही या विद्येचा उपयोग करणार आहोत. नागरिकांचा मानसिक ताण घालविण्याच्या दृष्टीने आमचे प्रयोग सुरू आहेत. विशेष म्हणजे यात यशही मिळते आहे. या अनुभवाच्या आधारे आम्ही अप्लाइड मॅजिक या विषयावर अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. साधारणतः पुढील दोन वर्षांत वैद्यकीय शिक्षणात या विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे,' असे सरकार यांनी सांगितले.
...
जादूटोणा विधेयक असलेच पाहिजे
'जादू या विद्येचा गैरवापरातून समाजाची फसवणूक करणाऱ्या लोकांना लगाम घालण्यासाठी जादूटोणा विधेयकाची गरज आहे. जादूटोण्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आम्ही लहान मुलांसाठीदेखील जादूची प्राथमिक शिबिरे आयोजित करीत आहोत. या मुलांना जादूमधील विज्ञानाचा उलगडा झाल्यास भविष्यात जादूटोण्यामुळे होणारी फसवणूक नक्कीच कमी होईल,' असे मत मनेका सरकार यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश मोतेवार यांना ‘डिस्चार्ज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'समृद्ध जीवन'चे सर्वेसर्वा असलेले महेश मोतेवार यांच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी अँजिओग्राफी करण्यात आली असली, तरी त्यात फारसे काही आढळले नसल्याने शनिवारी त्यांना हॉस्पिटलने डिस्चार्ज दिला.
मोतेवार सध्या उस्मानाबाद पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांना छातीत दुखत असल्याने गुरुवारी उपचारासाठी सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. पूर्वी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अॅँजिओग्राफी करण्यात आली होती. त्याशिवाय त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. मात्र त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. त्या अहवालात कोणताही दोष हृदयात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आल्याचे ससून हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images