Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एक्प्रेस-वे दुरुस्ती साहित्याला विलंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी, खंडाळा बोगदा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रात लोखंडी जाळ्या (रॉक बोल्टिंग) बसविण्याच्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य परदेशातून येण्यासाठी विलंब झाला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस-वे पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पावसाळ्यात आडोशी आणि खंडाळा बोगदा परिसरात दरड कोसळून दुर्घटना झाल्या होत्या. त्यानंतर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई आयआयटीतील तज्ज्ञ व इटालियन शास्त्रज्ञांनी या भागाची पाहणी करून दरडप्रवण क्षेत्रे निश्चित केली होती. त्यांच्या सूचनेनुसार धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊन बंद लेनही सुरू होईल, अशी शक्यता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वर्तविली होती. पण, परदेशी साहित्य उशिरा प्राप्त झाल्याने काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे.

आडोशी व खंडाळा बोगदा परिसरात जाळ्या बसविण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन ठिकाणी जाळ्या बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या परिसरात उच्च दर्जाच्या जाळ्या बसविण्यात येत आहेत. तसेच जाळ्या घट्ट बसविण्यासाठी 'रॉक बोल्टिंग'चा वापर केला जात आहे. त्यामुळे जाळ्या बसविलेल्या परिसरामध्ये एकही दगड रस्त्यावर पडणार नाही, असे 'एमएसआरडीसी'चे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले.

-----

वास्तविक, हे जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत १५ फेब्रुवारी आहे. मात्र, मुदतीच्या आधीच हे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार आतादेखील मुदतीपूर्वी रस्ता संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे लक्ष दिले जाईल.

संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेलिब्रेशन करा पहाटे पाचपर्यंत

$
0
0

पुणे : सेलिब्रेशनसाठी पुण्यात पहिल्यांदाच पहाटे पाच तर, ग्रामीण भागात पहाटे तीन वाजेपर्यंत पार्ट्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सेलिब्रेशन करावे, मात्र आपल्या आणि दुसऱ्याच्या जिवाचाही काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुणे शहरात गेल्यावर्षी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. यावर्षी सरकारने पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा आदेश तंतोतंत पाळण्याचे धोरण स्वीकारून यंदाही पुण्यात पहाटेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सहआयुक्त सुनील रामानंद यांनी सांगितले. पुण्यात अपघातमुक्त थर्टी फर्स्ट राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलिस दलातील सर्व अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. पोलिसांच्या सुट्टा, रजा रद्द करण्यात आल्या आहेत, असेही रामानंद म्हणाले.

रस्त्यांवर, पार्ट्यांमध्ये महिलांबाबत कुठलाही गुन्हा घडणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक परिमंडळात एक महिला अधिकारी आ​णि त्यांच्यासोबत काही कर्मचारी देण्यात आले आहेत. महिलांना त्रास देण्यात येत असल्याची कुठलिही माहिती मिळाली तर तत्काळ त्यांना मदत करण्यासाठी हे पथक तयार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखांची लाच भोवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी येथे केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी पाच लाखांची लाच घेणाऱ्या इंजिनीअरसह चौघांना कोर्टाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी हा आदेश दिला.

गॅरिसन इंजिनिअर जॉय पी. थॉमस (वय ५५, रा. शांतीविहार, पुणे कॅन्टोमेंट), असिस्टंट गॅरिसन ऑफिसर ए. के. खान (वय ६०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), कृष्णराज वेणुगोपाल सर्वानंद (वय ५३, रा. शांतीविहार, पुणे कॅन्टोमेंट ) आणि ज्युनिअर इंजिनीअर रवीकुमार सूरज पॉल (वय ३१, रा. पुणे कॅन्टोमेंट) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध कुलदीप जैन यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

जैन हे गौरीमल महाजन अँण्ड सन्स या कंपनीचे काम करतात. कंपनीच्या सर्व कंत्रांटांसाठी ते कुलमुखत्यार म्हणून काम करतात. त्यांना लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी येथे काही बांधकाम काढले होते. त्यासाठी इंजिनिअरची मंजुरी आवश्यक होती. जैन यांच्या कंपनीची दोन बिले मंजूर करण्यात आली होती. यातील एक बिलाचे १३ लाख रुपये, तर दुसऱ्या बिलाचे ७२ लाख रुपये मिळाले होते. मंजूर झालेल्या बिलांसाठी कमिशन म्हणून आरोपींनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. जैन यांनी तक्रार दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०१२ रोजी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौघांना पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. थॉमस यांच्या कडून दीड लाख रुपये, थॉमस यांच्या कपाटातून एक लाख, खान यांच्याकडून एक लाख रुपये, के. सर्वानंद यांच्याकडून ५0 हजार रुपये, रवी पॉलकडून एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले.

लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयचे अतिरिक्त सरकारी वकील मनोज चलाडन यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची मागणी केली. कोर्टाने या चौघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी ‘ईएमआय’ची सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांधेरोपणासारख्या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी आता रुग्णांना पैसे उभे करण्याचे दडपण घेण्याची गरज राहणार नाही. औंधचे साईश्री ऑर्थ्रोपेडिक सुपर स्पेशालिटी अँड जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर आणि आरोग्य फायनान्स यांच्यातर्फे गरजू रुग्णांना 'ईएमआय' (सुलभ मासिक हप्ता) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डॉ. प्रमोद जोशी आणि तुषार करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुडघेरोपण, खुब्याचे सांधेरोपण अशा शस्त्रक्रियांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे. यात पूर्ण वैद्यकीय खर्चाचा समावेश आहे. खर्चाच्या परतफेडीचा कालावधी बारा महिने ते ४८ महिने आहे. सहा टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो. महाराष्ट्रात प्रथमच सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध झाली आहे. हॉस्पिटलतर्फे ३ जानेवारी रोजी सांधेरोपण व मणक्याच्या आजारांसंदर्भात शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. 'गेली चार पाच वर्षे वैद्यकीय उपचारांसाठी ईएमआय सुविधा मिळू लागली आहे. मात्र, सांधेरोपणासारख्या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी ती मिळत नव्हती. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,' असे करंदीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊशे मॅनहोल्स धोकादायक स्थितीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्वच भागांमध्ये पावसाळी गटारांची आणि ड्रेनेजची तब्बल नऊशेहून अधिक झाकणे (मॅनहोल्स) धोकादायक असल्याचे महापालिकेने केलेल्या प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. त्यापैकी निम्म्या मॅनहोल्सची दुरुस्ती करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांमध्ये उर्वरित सर्व धोकादायक मॅनहोल्सचि दुरुस्ती केली जाईल, असा दावा पालिकेने केला आहे.

धोकादायक मॅनहोल्समुळे गेल्या महिन्याभरात दोन नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे, पालिकेच्या कारभारावर सर्व स्तरांतून टीका होत असल्याने धोकादायक मॅनहोल्सची पाहणी करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी पथ आणि ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. शहर आणि उपनगरांतील तब्बल सव्वादोन हजार किमीच्या रस्त्यावर ड्रेनेजची एक लाख, तर पावसाळी गटारांची २५ हजार झाकणे असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रमुख रस्त्यांसह काही छोटे रस्ते, गल्ली-बोळ या ठिकाणची मॅनहोल्सही धोकादायक असल्याचे पथ विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. अनेक रस्त्यांवर ही झाकणे रस्त्याच्या पातळीत नसल्याने त्या ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच, पावसाळी गटारांवर लावण्यात येणारी सिमेंट आणि लोखंडाची झाकणे तुटल्याने, मोडकळीस आल्याने दुचाकीस्वारांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी कबुलीही पालिका प्रशासनाने दिली आहे.

'प्राथमिक पाहणीतून धोकादायक स्थितीत असलेल्या नऊशे झाकणांची दुरुस्ती तातडीने करावी लागणार आहे. ही पाहणी करत असतानाच, काही झाकणांची दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने आत्तापर्यंत निम्म्या झाकणांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे', अशी माहिती पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघेरे टोळीचे तिघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुंड बाळू वाघेरे टोळीच्या दोन सक्रिय गुंडांसह तिघांना अँटि गुंडा स्कॉडने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कोंढवा येथून एकाला अटक करून त्याच्याकडून विदेशी पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

देविदास काळूराम नखाते (वय ४०, रा. गजानन कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, रहाटणी), संजय बाबुराव देशमुख (वय ३०, रा. नोवेल पॅकेजिंग कंपनी, टेम्पो चौक, वडगांव शेरी) आणि निखिल बाळकृष्ण काळे (वय २४, रा. सिद्धार्थनगर, तलाठी कार्यालयसमोर, रहाटणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रादेशिक भागातील टोळ्याच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात असून त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान बाळू वाघेरे याच्या टोळीबाबात माहिती घेत असताना, पोलिस नाईक सचिन जाधव यांना टोळीतील दोन सक्रिय सदस्य चिंचवड परिसरात येणार असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अँटि गुंडा स्कॉडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी काळे हा देविदास नखातेकडे पिस्तूल विक्री करण्यासाठी आला होता. त्याच्याविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास नखाते आणि संजय देशमुख हे वाघेरे यांच्या टोळीतील सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तसेच, कोंढवा येथील साईबाबा मंदिराच्या परिसरातून कासीम बादशाह शेख (वय२९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी बनावाटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किष्किंधानगरात पाच दुचाकी जाळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील किष्किंधानगर परिसरात मैदानावर लावलेल्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. नागरिकांनी तत्काळ दुचाकींना लागलेली आग विझविली. या आगीत पाच दुचाकी जळाल्या असून, दोन लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत गुलाब केंडे (वय २९, रा. किष्किंधानगर , कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किष्किंधानगर परिसरात टेकडीच्या चढावर राहत असलेल्या व्यक्तींना वर दुचाकी घेऊन जात येत नाहीत. त्यामुळे वर राहणारे नागरिक खालीच रस्त्याच्याकडेने आणि रमेश सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत दुचाकी लावतात. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास काही नागरिकांना दुचाकींना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी आरडा-ओरडा करून नागरिकांना गोळा केले. तसेच, जवळच असलेल्या किष्किंधानगर पोलिस चौकीतील पोलिसांना माहिती दिली. नागरिकांनी पाणी टाकून आग विझवली. मात्र, तोपर्यंत पाच दुचाकी जळून गेल्या होत्या.

नागरिकांनी तत्काळ आग विझवल्यामुळे इतर काही दुचाकी वाचल्या. ही आग पेट्रल अथवा इतर ज्वलनशील पदार्थ टाकून लावली असण्याची शक्यता आहे. या बाबत पोलिस उपनिरीक्षक ए. सी. जोगदंड यांनी सांगितले, की 'दुचाकी पेटविल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी गेले. नागरिकांच्या मदतीने आग विझवली. यामध्ये दोन स्पेंडर, दोन अॅक्टिव्हा आणि एक पॅशन प्रो दुचाकी जळाली आहे. या दुचाकीचे मालक हे नोकरी अथवा छोटी-मोठी कामे करतात. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

या परिसरात मद्यपान करून रात्री उशिरापर्यंत अनेकजण गोंधळ घालतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीनेच गाड्या जाळल्या असण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली. या भागात रात्री पोलिस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचे बजेट ढकलले पुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण मंडळाच्या आगामी आर्थिक वर्षाच्या (२०१६-१७) बजेटसोबत आवश्यक असणारी कागदपत्रेच जोडली नसल्याने मंगळवारी पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे, आता येत्या गुरुवारी (३१ डिसेंबर) होणाऱ्या सभेत शिक्षण मंडळाच्या बजेटला मान्यता देण्यात येईल.

शिक्षण मंळळाच्या नव्या आर्थिक वर्षाच्या ३४१ कोटी रुपयांच्या बजेटला स्थायी समितीने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. या बजेटला ३१ डिसेंबरपूर्वी सर्वसाधारण सभेने मान्यता देणे आवश्यक आहे. त्यासाठी, मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. परंतु, शिक्षण मंडळाच्या खास सभेसाठी सुरुवातीला पुरेशी गणसंख्याच नसल्याचा मुद्दा काँग्रेसच्या सुधीर जानजोत यांनी उपस्थित केला. त्यामुळे, सभेत काही काळ कोणतेच कामकाज झाले नाही. त्यानंतर, गणसंख्या पूर्ण झाल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. तरीही, मंडळाच्या बजेटसोबत उत्पन्न आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्याचा मुद्दा मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, काँग्रेसच्या कमल व्यवहारे आणि मनसेच्या अस्मिता शिंदे यांनी उपस्थित केला.

बजेटसोबत आवश्यक असलेली काही कागदपत्रे नजरचुकीने जोडायची राहिली असतील, असा खुलासा शिक्षण प्रमुख बबन दहिफळे यांनी केला. परंतु, सदस्यांनी त्याबाबत तीव्र आक्षेप घेतला. तसेच, सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर बजेटला मंजुरी दिली जावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. त्यामुळे, ही सभा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. आता, शिक्षण मंडळाच्या बजेटला गुरुवारी होणाऱ्या सभेत मान्यता देण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ड्रिंक बट डोंट ड्राइव्ह’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पार्टी झाल्यावर नशेमध्ये गाडी चालवून कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यापेक्षा ड्रायव्हरला बोलवायचे अथवा कॅबने प्रवास करण्याचा पर्याय पुणेकरांनी शोधला आहे. पार्टी संपल्यावर कॅब शोधण्यात वेळ दवडण्यापेक्षा दोन दिवस आधीच नागरिकांनी बुकिंगला सुरुवात केली आहे. कॅब कंपन्यांनीही 'थर्टी फस्ट'च्या निमित्ताने 'ड्रिंक बट डोंट ड्राइव्ह' मोहीम हाती घेतली आहे.

पार्टीचा संपल्यावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने तळीरामांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहराच्या विविध भागात गुरुवारी संध्याकाळपासूनच शुक्रवारी सकाळपर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे. आठ हजार पोलिस आणि अडीचशे वाहनांचा ताफा या तळीरामांवर करडी नजर ठेवणार आहे. गेल्या आठवड्याभरात पोलिसांनी पाचशेहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या धर्तीवर मद्यपानानंतर गाडी चालवून धोका पत्करण्यापेक्षा नागरिक ड्रायव्हर बोलावण्याला अथवा कॅब बुकिंगला प्राधान्य देत आहेत.

ओला, केके, विंग्ज, उबर, रेडिओ कॅब, टॅक्सी फॉर शुअर अशा दहापेक्षा अधिक टॅक्सी कंपन्या सध्या पुण्यात कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन झाल्यावर कॅबने घरी जाण्याचा पर्याय नागरिकांनी स्वीकारला असून दर वर्षी हे प्रमाण वाढत आहे. या कंपन्यांनी देखील 'ड्रिंक बट डोंट ड्राइव्ह', 'आमची कॅब तुम्हाला घरातून घेऊन जाईल आणि तुमच्या इच्छेनुसार घरी आणून सोडेल' अशा वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. याशिवाय काही कंपन्यांनी हॉटेल आणि पार्टी संयोजकांबरोबर करार केले असून येणाऱ्या लोकांना संयोजकांतर्फे कॅबने घरी सोडण्याची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे पार्ट्यांसाठी कॅबची मागणी वाढली आहे.

ओला कॅब कंपनी 'रिस्प्केट द रोड' या मोहिमेमध्ये सहभागी झाली आहे. मद्यपान करून गाडी चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे मद्यपान करून गाडी चालविण्याऐवजी आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला घरी सुरक्षित पोहोचवतो, असे आवाहन करण्यात येत आहे. लोकांचाही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, अशी माहिती ओला कॅबच्या मार्केटिंग कम्युनिकेशन विभागाचे वरिष्ठ संचालक आनंद सुब्रह्मण्यम यांनी दिली.

..

पार्टीनंतर कॅबने जाणाऱ्यांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. या वर्षी देखील नागरिकांनी तीन दिवसांपूर्वीपासूनच बुकिंगला सुरुवात केली आहे. पुणे परिसरातील ठिकाणांसाठी सर्वाधिक मागणी आहे
शिरीष एरंडे, प्रमुख, टी कॅब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘नो व्हेइकल झोन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

थर्टी फर्स्टच्या रात्री सेलिब्रेशन करणाऱ्या उत्साही तरुणाईची गर्दी पाहता चांदणी चौक, एमजी रोड, नॉर्थ मेन रोड (कोरेगाव पार्क) आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोडवर (फर्ग्युसन रोड) नो-व्हेइकल झोन करण्यात येणार आहे. गर्दीची तीव्रता पाहून या रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.

पुणेकरांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री जोरदार सेलिब्रेशन होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. या बंदोबस्ताची माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक आणि वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी मंगळवारी दिली.

शहरात नववर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी दीडशेहून अधिक पार्ट्या होऊ घातल्या आहेत. त्याशिवाय चांदणी चौक, एमजी रोड, नॉर्थ मेन रोड (कोरेगाव पार्क) आणि गोखले रोडवर (फर्ग्युसन रोड) पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात होते. या रस्त्यांवर नो-व्हेइकल झोन करण्याचा विचार आहे. योग्य वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आवाड यांनी दिली.

..

'त्या' तळीरामांना नोटिसा

गेल्या वर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ३७८ तळीरामांवर कारवाई केली होती. या तळीरामांना यंदा सीआरपीसी १४९ नुसार नोटिसा बजावण्यात येणार आहेत. यंदा त्यापैकी कोणीही मद्य पिऊन पुन्हा वाहन चालवताना आढळल्यास त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी या महिन्यांत १२०० तळीरामांवर कारवाई केली आहे.

..

पहाटे पाचपर्यंत परवानगी

राज्य सरकारने यंदा सेलिब्रेशनसाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी दिली आहे. त्या आदेशानुसार पुण्यातही पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्पीकरसाठी रात्री बारापर्यंतच परवानगी असणार आहे. नागरिकांनी सेलिब्रेशन करावे, त्याचबरोबर स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी, असे आवाहनही रामानंद यांनी केले आहे.

..

२८ ​ठिकाणी कडेकोट बंदोबस्त

गर्दीची ठिकाणे आणि शहरातील एंट्री-एक्झिट पाँइंट लक्षात घेऊन २८ ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यांना आठशे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी अतिरिक्त देण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने तळीरामांवर कारवाई करण्यावर भर असणार आहे. दहशतवादी कृत्ये घडू नयेत, या साठी जलद प्रतिसाद दल आणि बॉम्बशोधक पथकांची प्रत्येकी चार पथके तैनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे शहराबरोबरच कँटोन्मेंटही ‘स्मार्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेबरोबरच आता पुणे कँटोन्मेंट बोर्डदेखील 'स्मार्ट' होणार असून, त्याबाबतचा १०० कोटी ४४ लाख रुपयांचा प्रकल्प आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारने देशातील प्रमुख शहरांबरोबरच काही कँटोन्मेंट बोर्डांचाही स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला आहे. त्यामध्ये पुणे कँटोन्मेंटची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने १०० कोटी ४४ लाख ५३ हजार रुपयांचा प्रकल्प आराखडा बनविला आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांनी सर्वसाधारण सभेत हा आराखडा सादर केला. त्यास मंजुरी देण्यात आली. सभेला बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, उपाध्यक्ष किरण मंत्री, नगरसेवक विवेक यादव, अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, रुपाली बिडकर आणि विनोद मथुरावाला उपस्थित होते. या प्रकल्प आराखड्यात भुयारी गटारे, सौर ऊर्जा, पाणीपुरवठा सुधारणा योजना, पाण्याचा पुनर्वापर, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह या प्रमुख योजनांवर भर देण्यात आला आहे.

बोर्डाच्या परिसरातील काही ठिकाणी अजूनही उघडी गटारे आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणची गटारे ही भुयारी केली जाणार आहेत. सौर ऊर्जा ​निर्माण करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शाळांच्या इमारतींमध्ये सोलर सिस्टिम उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक वॉर्डामधील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन टाकल्या जाणार आहेत. पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले.

...............

प्रकल्प आणि अंदाजे खर्च

भुयारी गटारे - २९ कोटी ७१ लाख

सौर ऊर्जा प्रकल्प - एक कोटी ४२ लाख

पाणीपुरवठा सुधारणा योजना - पाच कोटी ९७ लाख

सुशोभिकरण - चार कोटी ८१ लाख

पाण्याचा पुनर्वापर - चार कोटी ६७ लाख

कचरा प्रक्रिया प्रकल्प - ३८ कोटी २५ लाख

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह - १५ कोटी ५८ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभराने मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी जानेवारी २०१५मध्ये अर्ज करणाऱ्या एका 'भाग्यवान' वाहन चालकास, वर्ष संपताना का होईना लायसन्स मिळणार आहे. लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर १५ दिवस ते महिन्याभरात मिळणाऱ्या लायसन्सची प्रक्रिया पूर्ण होण्यास मात्र, वर्षभराचा कालावधी लागला आहे.

कसबा पेठेत राहणाऱ्या किशोर रक्ते यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. रक्ते यांनी नऊ जानेवारी २०१५ रोजी आरटीओकडे दुचाकीच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करून त्याचे शुल्कही भरले होते. मात्र, त्यानंतर आजतागायत त्यांना घरपोच लायसन्स मिळालेले नाही. अर्ज केल्यानंतर एका महिन्यात लायसन्स पोस्टाने घरपोच येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु, लायसन्स प्राप्त न झाल्याने सहा ऑगस्ट आणि १५ ऑक्टोबरला त्यांनी पुन्हा आरटीओकडे चौकशी केली असता, त्यांना नूतनीकरण शुल्क पुन्हा भरण्यास सांगितले. त्यामुळे रक्ते यांनी लायसन्सची चौकशी करणेच थांबवले होते. मात्र, अशाचप्रकारे एका अर्जदारास साडेतीन महिने लायसन्स न मिळाल्याचे मटा'मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वाचले. त्यानंतर त्यांनी पुन्हा लायसन्सकरीता पाठपुरावा सुरू केला.

रक्ते यांनी आठ डिसेंबर रोजी आरटीओकडे लायसन्सची पुन्हा चौकशी केली. त्यावेळीही त्यांना नूतनीकरण शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी पैसे भरणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. सुरुवातीला पैसे भरूनही लायसन्स का मिळाले नाही, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर आरटीओतील लायसन्स विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना केवळ अर्ज करण्यास सांगितले आणि १५ दिवसात लायसन्स घरपोच येईल, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही अद्याप त्यांना लायसन्स मिळालेले नाही.

अखेर, आज मिळणार लायसन्स

दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे या प्रकाराबाबच विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीचे लायसन्स २१ डिसेंबर रोजी आरटीओतून जनरल पोस्ट ऑफिसकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बुधवारी (ता.३०) त्यांना लायसन्स देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पब्जमधील पार्ट्यांवर भरारी पथकांची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी शहरातील हॉटेल्स, पब्ज, क्लब आणि डिस्कोथेकमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर तीस भरारी पथकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. खासगी पार्ट्यांमध्ये मद्यसेवन होत असल्यास त्याचेही परमिट तपासले जाणार आहे.

जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली. नववर्ष स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांच्या परवानगीसाठी यंदा गतवर्षीपेक्षा कमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत केवळ ६३ हॉटेल्स, क्लबकडून परवानगीसाठी अर्ज आले आहेत. पुढील दोन दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. शहरात प्रवेशशुल्क लावून होणाऱ्या पार्ट्यांसाठी करमणूक कर भरणे आवश्यक आहे. हा करमणूक कर भरला की नाही याची तपासणी करण्यासाठी तीस पथके नेमण्यात आली आहेत.

या पथकांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ३१ डिसेंबरला ही पथके शहरातील हॉटेल्स, पब्ज व क्लबची तपासणी करणार आहेत. या तपासणीसाठी पथकांना चेकलिस्ट देण्यात आली आहे. प्रवेशशुल्क लावलेल्या हॉटेल्सने करमणूक कर भरला आहे का, तिकीट विक्री किती झाली आणि प्रत्यक्षात किती व्यक्ती हॉटेल्समध्ये आहेत, तिकिटांची जादा दराने विक्री तसेच मद्यविक्री परवाना याची तपासणी ही पथके करणार आहेत, असेही राव यांनी सांगितले. करमणूक कर खात्याकडून परवानगी घेतलेल्या तसेच परवानगी न घेतलेल्या हॉटेल्सचीही तपासणी ही पथके करणार आहेत. त्यात कायदेभंग झाल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात अनेक ठिकाणी खासगी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये मद्यसेवन होते. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट घेतले आहे काय, याची तपासणी केली जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत ८५ 'वन डे परमीट' दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन जाहिरातींवर नजर

शहरात प्रवेशशुल्क लावून पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. त्याची जाहिरात वर्तमानपत्रे तसेच व्हॉटसअॅप, फेसबुकच्या माध्यमातून केली जाते. या पार्टीसाठी शुल्क आकारले जात असल्याने अशा जाहिरातींवरही नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश मोतेवार यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

डेअरी प्रकल्पामध्ये फसवणूक उस्मानाबाद पोलिसांनी अटक केलेल्या 'समृद्ध जीवन'चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोतेवार यांच्याविरोधात मुरुम पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सोमवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमिष दाखवून ३५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उमरगा कोर्टाच्या आदेशाने २०१२ मध्ये महेश मोतेवार यांच्याविरुद्ध ४२०, ४४८, ४२७, ४९१, ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात कोर्टात २०१३ साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवार यांना फरारी घोषित केले होते. पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर, सोमवारी सायंकाळी त्यांना अट करण्यात आली होती. त्यांना उमरगा कोर्टामध्ये सादर करण्यात आल्यानंतर, कोर्टाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. या वेळी पोलिसांनी तपासासाठी वेळ मागितला. तसेच, भागीदारी पत्रकावर देण्यात आलेल्या पत्त्यावर समन्स बजावले असता, ते स्वीकारण्यात आले नाही. तसेच, त्यांच्या पत्नीकडे समन्स बजावण्यात आल्यानंतरही, ते आतापर्यंत हजर झालेले नाहीत, याकडे सरकारी पक्षाकडून लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थांबवा सर्वेक्षण, द्या संरक्षण

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरीः सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेरीवाला धोरण राबविण्यासाठी समितीची स्थापना केली. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अतिक्रमणे वाढत असून, प्रश्न अधिकच जटील होऊ लागला आहे. आता संरक्षणाची गरज शहरातील फेरीवाल्यांच्या संघटनांनी व्यक्त केली आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांप्रमाणेच रस्त्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. यामध्ये प्रामुख्याने फेरीवाले, हातगाडीवाले, पथारीवाले, किरकोळ विक्रेते यांचा समावेश आहे. फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोनच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्री गिरिजा व्यास यांनी दिले होते. त्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव तयार करण्यासाठी वेगाने हालचाली झाल्या. त्याअंतर्गत हॉकर्स झोनच्या निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, एक वर्षानंतरही परिस्थिती 'जैसे-थे' आहे. बैठकांव्यतिरिक्त काहीही हालचाल झालेली नाही.

फेरीवाला धोरण राबविण्यासाठी प्रभाग आणि शहर पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद महापालिका आयुक्तांकडे आहे. अन्य सदस्यांमध्ये पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगररचना विभागाचे उपसंचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता, महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी (महापालिका) यांचा समावेश आहे. याशिवाय संघटनांचे प्रतिनिधी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक असतील. तसेच, विशेष निमंत्रित म्हणून एसटी महामंडळ, मध्य रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागांचे प्रतिनिधी असणार आहेत. प्रभाग अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. या समितीची दर दोन महिन्यांतून एकदा बैठक होणे अपेक्षित आहे. त्यानुसार कागदोपत्री हालचाली होतात. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याची खंत फेरीवाल्यांमध्ये आहे.

शहरातील प्रमुख चौक, चौकापासून शंभर मीटर, शाळा-महाविद्यालय आणि धार्मिक स्थळे यांच्यापासून शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर 'हॉकर्स झोन' स्थापन करण्याचे नियोजन आहे. या शहरात आजपर्यंत २००८, २०१२ आणि २०१४ मध्ये तीन वेळा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे. आजमितीस दहा हजार ५८३ फेरीवाल्यांची नोंद आहे. त्यांचे पुन्हा बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण होणार आहे. हे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले आहे. अजून किती वेळा नुसतेच सर्वेक्षण करणार कि संरक्षण देणार हा मुद्दा फेरीवाल्यांकडून उपस्थित होता आहे.

फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण राबविण्यास प्रशासन कटीबद्ध आहे, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहे. 'बीआरटी'मुळे मुंबई-पुणे महामार्ग अरुंद झाला आहे. तेथे व्यावसायिकांचे पुनर्वसन शक्य नाही. परंतु, फेरीवाले समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. त्यानुसार फेरीवाला धोरण राबविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र, ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण आयुक्तांना हवे संरक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या कार्यालयात केलेल्या झाडाझडतीनंतर शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या झाडाझडतीनंतर डॉ. भापकर यांच्या कार्यालयात काही संघटनांनी आंदोलने केल्याने त्यांनी शिक्षण आयुक्तालयाला पोलिस संरक्षण मागितले आहे. मात्र, पूर्ण वेळ संरक्षण देणे शक्य नसून, गरज पडेल तेव्हा संरक्षण पुरविण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

जाधव यांच्या कार्यालयात डॉ. भापकर यांनी १५ डिसेंबर रोजी अचानक भेट देऊन सुमारे दोन तास झाडाझडती घेतली होती. मागितलेली माहिती वेळेवर न मिळाल्याने त्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची जबाबदारी समजावून दिली; तसेच काम सुधारण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. काम न सुधारल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर काही संघटनांनी आंदोलने केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भापकर यांनी पोलिस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

'शिक्षण आयुक्तालय 'बालभारती'च्या परिसरात आहे. या ठिकाणी होणारे आंदोलने ही अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असून, 'बालभारती'च्या मालमत्तेसाठी धोकादायक आहे,' असे डॉ. भापकर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, पूर्णवेळ संरक्षण पुरवणे शक्य नसल्याचे उत्तर विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी मंगळवारी भापकर यांना दिले. 'शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाला स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी वारंवार भेट देतील. पोलिस संरक्षणांची गरज असेल, त्यावेळी ते पुरवण्यात येईल,' असे पाठक यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

'बोगस संघटनांवर आक्षेप'

'मला कोणत्याही संघटनेची वा खात्यातील अधिकाऱ्यांची भीती नाही. शिक्षण खात्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये निष्कारण ढवळाढवळ करणाऱ्या बोगस संघटनांवर आक्षेप आहे. आयुक्त कार्यालयामध्ये सध्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांसाठीची कागदपत्रे आहेत. 'बालभारती'च्या आवारात हे कार्यालय असल्याने तिच्या मालमत्तेच्या संरक्षणाचाही विचार करावा लागतो,' असे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्फोसिस कॅम्पसमध्ये महिलेवर अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हिंजवडी येथील आयटी पार्कमधील 'इन्फोसिस' कंपनीच्या आवारात असलेल्या कँटीनमधील कॅशिअर विवाहितेवर तेथील कामगाराने स्वच्छतागृहात बलात्कार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अत्याचार होत असताना मोबाइल फोनमध्ये त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तेथील दुसऱ्या कामगाराने पीडितेला दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

परितोष सुभाष बाग (वय २१, रा. लाला साखरे चाळ, हिंजवडी, मूळ - पश्चिम बंगाल) व प्रकाश किसन महाडिक (वय ३०, रा. मारुती मंदिराजवळ, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी ठेकेदारामार्फत कंपनीत हाउस कीपिंगचे काम करतात. त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. दोघांना एक जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. पीडित महिला २५ वर्षीय असून, ती कँटीनच्या ठेकेदारामार्फत नोकरीला होती.

'पीडित महिला रविवारी (२७ डिसेंबर) कँटीनमधील वॉशरूममध्ये गेली असता आरोपी परितोष हा तिच्या मागे वॉशरूममध्ये गेला. तेथे त्याने बलात्कार केला. प्रकाश देखील तेथे गेला आणि त्याने आपल्या मोबाइल फोनवर अत्याचाराचे फोटो काढले. भेदरलेल्या पीडितेने मुख्य प्रवेशद्वारावरील महिला सुरक्षा रक्षकाला हा प्रकार सांगितला. या वेळी तिने वैद्यकीय उपचार देखील घेतले. त्यानंतर तिने हा प्रकार पतीला सांगितल्यावर दोघांनी पोलिसांत फिर्याद दिली,' असे वरिष्ठ निरीक्षक सुरेश भोसले यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सी. एम. सूर्यवंशी तपास करीत आहेत.

कंपनीकडून चौकशी सुरू

आपल्या कँटीनमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेची चौकशी करीत असल्याचे 'इन्फोसिस'तर्फे सांगण्यात आले. 'ही घटना आमच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या अन्य कंपनीच्या कंत्राटी स्टाफशी संबंधित आहे. पोलिसांना तपासामध्ये पूर्ण सहकार्य केले जात आहे. लैंगिक अत्याचाराशी संबंधित कोणत्याही प्रकारचा गुन्हा खपवून घेतला जात नाही. हा नियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठीही लागू आहे. पुण्यातील घटनेसंदर्भात आम्ही आमच्या धोरणानुसार योग्य ती कार्यवाही करू,' असे 'इन्फोसिस'तर्फे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थर्टी फर्स्ट’साठी प्रशासनाचे ‘चीअर्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आता सरकारनेही 'चीअर्स' साठी हात उंचावला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांना पुण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शहराच्या हद्दीत पहाटे पाच वाजेपर्यंत, तर ग्रामीण भागात पहाटे तीन वाजेपर्यंतचा जल्लोष कायद्याने मान्य केला आहे. मात्र, या काळात गोंधळ किंवा नियमांचा भंग केला, तर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. मध्यरात्रीनंतरही या पार्ट्या सुरू राहतात आणि या पार्ट्यांमधून करमणूक कर आणि एक्साइज या माध्यमातून सरकारला मोठा महसूलही मिळतो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून अशा कार्यक्रमांना उशिरापर्यंत परवानगी देण्यात येते. मात्र, यंदा प्रथमच पहाटे पाच वाजेपर्यंत अशी परवानगी देण्याचा निर्णय पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, या काळात गोंधळ होऊ नये किंवा नियमांचा भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. वर्षाअखेरीच्या दिवशी सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही अशा पार्ट्या व पब्जवर नजर ठेवण्यासाठी तीस भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पर्वती,तळजाई, भांबुर्डा वनविहार अशा शहर आणि परिसरातील टेकड्यांवरह वन विभागानेही कडक बंदोबस्त ठेवला आहे.

मद्यपान करून सुसाट वाहने चालविणे आणि अपघातांचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून 'ड्रंक अँड ड्राइव्ह' विरोधात ठिकठिकाणी कारवाई आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई टाळण्यासाठी कॅब्जनाही शहरात मोठी मागणी आली आहे.

नो व्हेइकल झोन

दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री अनेकजण वाहनांवरून शहरभरात फिरतात. त्यामुळे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रोड), तसेच कँप परिसरातही वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी फर्ग्युसन रोड, चांदणी चौक, कोरेगाव पार्क परिसरातील नॉर्थ मेन रोड आणि कँपातील महात्मा गांधी रोडवर गुरुवारी सायंकाळनंतर 'नो व्हेइकल झोन' जाहीर करण्यात आला आहे. या काळात तेथे वाहने नेणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापच्या निवडणुकीत ११ हजार २७७ मतदार

$
0
0

मसापच्या निवडणुकीत ११ हजार २७७ मतदार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मतदारसंख्या माहीत नसलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला अखेर मतदारसंख्येचा ताळेबंद गवसला आहे. परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ हजार २७७ मतदार सहभागी होणार आहेत. एकूण १३ विभागांतून ११ हजार २७७ मतदार सभासद असून कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांसह ३३ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
साहित्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, १५ मार्च २०१६ रोजी नवीन अधिकार मंडळ अस्तित्वात येणार आहे. ते पाच वर्षांसाठी असेल. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी बुधवारी निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर केली. निवडणूक अधिकारी अॅड. सुभाष किवडे व प्रा. सुधाकर जाधवर या वेळी उपस्थित होते.
अॅड. परदेशी म्हणाले, 'परिषदेच्या अधिकार मंडळासाठी कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, प्रत्येकी एक कोषाध्यक्ष, सहा स्थानिक कार्यवाह, तीन पुणे शहर प्रतिनिधी, तसेच पुणे, ठाणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यासाठी प्रत्येकी तीन सदस्यांची निवड होणार आहे. अहमदनगर, नाशिक येथून प्रत्येकी दोन सदस्यांची निवड होणार आहे. सांगली, धुळे, जळगाव, कोल्हापूर व कोकण विभाग येथून प्रत्येकी एका सदस्याची निवड करता येणार आहे. मतपत्रिका आता पोस्टाने पाठविण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागेल. मतदार यादी येत्या एक जानेवारीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
.............
१३ विभागातील मतदार संख्या
पुणे शहर शाखा २८६६, ठाणे जिल्हा १३०९, पुणे जिल्हा १५४०, अहमदनगर ६९३, नाशिक ५७९, धुळे २८२, जळगाव ४९७, कोल्हापूर २३१, सोलापूर १३४९, सातारा १०५९, सांगली ४५८, कोकण ३५७ आणि बेळगाव ५७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नापास होण्याच्या भीतीमुळे रचला अपहरणाचा बनाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीनंतर मुलाने इंग्रजीमध्येच शिक्षण घ्यावे म्हणून आईने आग्रह धरला. नाईलाजास्तव मुलाने इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखेला प्रवेश घेतला. पण, त्याला इंग्रजी शिक्षण जड जाऊन लागले. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुलाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. आईला फोन करून आपले अपहरण झाल्याचे सांगून अपहरणकर्त्यांनी शिरवळला सोडून दिल्याचे सांगितले. खडक पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन तपास केल्यानंतर इंग्रजी माध्यमातील शिक्षण अवघड जात असून, नापास होण्याच्या भीतीने आपण अपहरणाचा बनाव रचल्याचे मुलाने कबूल केले.

या बाबत मुलाच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारदारांचा १७ वर्षाच्या मुलगा २८ डिसेंबर रोजी सकाळी शिकवणीला गेला होता. दुपारी शिकवणी संपल्यानंतर घरी परतत असताना खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रणव लॉजच्या समोर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना मास्क घातलेल्या चार व्यक्तींनी लाल रंगाच्या मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर शिरवळ येथे गेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याचा फोटो काढूनव्हॉट्सअॅपद्वारे कोणाला तरी पाठविला. मात्र, अपहरणकर्त्यांना दुसऱ्याच कोणत्या तरी मुलाचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी मुलाला चालत्या गाडीतून खाली ढकलले आणि त्याचा मोबाइल फेकून दिला.

शिरवळ येथून मुलाने आईला फोन करून घटनेची माहिती दिली. त्याच्या आईने एका प्रवासी जीपचालकास मुलास कात्रज येथे घेऊन येण्यास सांगितले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार शिकवणीच्या शिक्षकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अपहरणाचा प्रकार असल्यामुळे पोलिसांनी गंभीर दखल घेतली. चौकशीला सुरुवात करून पोलिसांनी प्रथम घटनास्थळी जाऊन प्रणव लॉजच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. त्यावेळी अपहरणाचा प्रकार घडलाच नसल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी मुलाकडे चौकशी केल्यानंतर त्याने लॉजच्या पुढे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना त्याच्याविषयी शंका आली. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे अधिक विचारणा केली. त्यानंतर त्याने खरा प्रकार पोलिसांना सांगितला.

इंग्रजी माध्यमाची भीती नडली

मुलाचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. पण, आईच्या आग्रहास्तव आपण अकरावीला इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मला इंग्रजी माध्यमातील शिक्षण जड जात होते. कॉलेजच्या सहामाही परीक्षेत इंग्रजी आणि मराठी सोडून अन्य विषयांत आपण नापासही झालो होतो. वार्षिक परीक्षेतदेखील नापास होण्याची भीती आपल्याला वाटत होती. म्हणून स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे संबंधित मुलाने स्पष्ट केले. पाचगणी हे शांत ठिकाण असल्याचे आपण कुठेतरी ऐकले होते. त्यामुळे त्याने पाचगणीला जाण्याचा विचार करून स्वारगेटवरुन महाबळेश्वरचे तिकीट काढले. एका तासानंतर आपण कुठे तरी दूर जात असल्याची जाणीव झाली. घाबरून तो बसमधून शिरवळ येथे उतरला.

मुलाची परिस्थिती हलाखीची

आईला फोन करून स्वत:चे अपहरण झाल्याचे सांगितले. मुलाच्या घरची परिस्थिती हलाखीची असून, त्याची आई एका दुकानात नोकरी करते. पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव व सहायक निरीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने तपास करुन हा प्रकार उघडकीस आणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images